Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सुपरस्टार रजनीकांतची शाळेत ‘एन्ट्री’

$
0
0
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत चक्क शाळेत परततोय! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) ‘लर्निंग टू कम्युनिकेट’ या विभागातील इयत्ता सहावीच्या एका पाठ्यपुस्तकात रजनीकांत यांच्यावरील धडा समाविष्ट करण्यात आला आहे.

मृतांना डोक्यासह छातीवरही गंभीर जखमा

$
0
0
स्लॅब कोसळून ठार झालेल्या तेरा जणांच्या डोक्यासह हात, पाय, तसेच छातीवर मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

बांधकाम साहित्याचा दर्जा तपासा

$
0
0
वाघोली येथील पंचकर्म हॉस्पिटलच्या बांधकामासाठी वापरलेल्या गेलेल्या साहित्याचा दर्जा तपासण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभागाला दिले आहेत. याबाबतचा अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

परवाने निलंबनप्रकरणी आज सुनावणी

$
0
0
परवाने निलंबनाच्या कारवाईविरोधात कोर्टात धाव घेतलेल्या मार्केट यार्डातील आडत्यांना बुधवारी औटघटकेचा दिलासा मिळाला. बाजार समितीच्या कारवाईला कोर्टाने एक दिवसाची स्थागिती दिली असून, यासंदर्भात गुरुवारी (आज) सुनावणी होणार आहे.

बलात्का-यांना कठोर शासन द्या

$
0
0
राजधानी नवी दिल्लीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे गंभीर पडसाद पुण्यातही उमटले आहेत. पुण्यातील अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

इंजिनिअरिंग ‘निकाला’चा निकाल लावण्यासाठी समिती

$
0
0
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी अपूर्ण ठेवल्यानंतरही त्यांचे निकाल लावण्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देशही विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत.

पत्नी, मुलीला मारणा-यास जन्मठेप

$
0
0
बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश के. डी. वढणे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी सिद्धप्पा विश्वनाथ अवाळे ( वय - ३२, रा. सांगवी ) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सर्व शिक्षा अभियानात काय केले?

$
0
0
राज्य सरकारच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याचे बुधवारी सर्वसाधारण सभेत सादरीकरण केले. यानिमित्ताने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत गेल्या दहा वर्षांत कोणती कामे करण्यात आली, याचा अहवाल देण्याची मागणी करण्यात आली.

मुदत संपणा-या परवान्याचे नूतनीकरण करा

$
0
0
परवाना अथवा नोंदणीची मुदत येत्या डिसेंबर अखेरपर्यंत असणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांनी त्यापूर्वीच नूतनीकरण करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केले आहे. वेळेवर परवान्याचे नूतनीकरण न केल्यास दररोज शंभर रुपयांप्रमाणे दंड आकारला जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

उपनगरांतही धावतोय ‘धोका’

$
0
0
एसटीमुळे शहरातील वाहतूक धोकादायक झाल्याची ओरड केली जात असताना, उपनगरामधील अनिर्बंध एसटी वाहतुकीकडे मात्र सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे.

पुरवठा सुधारण्यासाठी बोगद्याने पाणी?

$
0
0
पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत बोगद्याने पाणी आणण्याची योजना जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनयूआरएम) राज्य आणि केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. ‘जेएनयूआरएम’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या योजनांचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

टीम इंडियावर कुठलेही दडपण नाही

$
0
0
‘भारतीय संघाने मायदेशातील इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली, तरी याचे कुठलेही दडपण न घेता टी-२० मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणी याने व्यक्त केली.

भारताचा आज इंग्लंड संघाशी पहिला टी-२० सामना

$
0
0
महेंद्रसिंह ढोणीच्या टीम इंडियाला मालिकेतील पहिल्या ट्वेंटी-२० क्रिकेट सामन्यात गुरुवारी (२० डिसेंबर) इंग्लंडच्या यंग ब्रिगेडशी दोन हात करायचे आहेत. कसोटी मालिका गमावल्याने कर्णधारपद गमावण्याची टांगती तलवार असलेल्या ढोणीला नव्या आव्हानाला सामोरे जायचे आहे.

‘मजुरांचे कल्याण’ नावापुरतेच

$
0
0
अपुरी यंत्रणा आणि ढिसाळ नियोजनामुळेच महाराष्ट्र इमारत आणि अन्य बांधकाम कामगार कल्याण मंडळ केवळ नावापुरतेच उरले असल्याचा आरोप बांधकाम मजदूर सभेने (महाराष्ट्र) केला आहे. बांधकाम मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हानिहाय यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

पालिकेचा अजब कारभार, घरबसल्या पगार

$
0
0
महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी कामावर येत नसलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचे वेतन कपात करावे किंवा त्यांची सदर दिवसांची अर्जित रजा खतविण्यात यावी, असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. परदेशी यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी लेखा विभागातील लिपिकांपासून अधिका-यांपर्यंत सर्वांनाच कामाला लावले असून, घरबसल्या पगार घेणा-या कर्मचा-यांवर कारवाईचे सूतोवाच दिले आहेत.

दोन दिवसांत वेतन आणि पुनर्नियुक्तीही

$
0
0
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणा-या विषयतज्ज्ञांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची कबुली शिक्षण मंडळ प्रशासनाने बुधवारी सर्वसाधारण सभेत दिली. तसेच, येत्या दोन दिवसांत त्यांना पुनर्नियुक्तीचा आदेश आणि वेतन देण्यात येणार असल्याचे प्रभारी शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी जाहीर केले.

येत्या दोन वर्षांत उभारणार ‘मॉडेल कोर्ट’

$
0
0
केंद्र सरकारने न्यायालयीन कामकाजासाठी आदर्श कोर्ट असावेत म्हणून देशभरात १०० मॉडेल कोर्टाची उभारणी करण्यासाठी १२० कोटी रुपयांचा निधी न्याय आणि विधी खात्याला दिला आहे. दोन वर्षात या मॉडेल कोर्टाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिर्व्हसिटीचे संस्थापक माधव मेनन यांनी दिली.

कासारवाडीत कचरा डेपोला आग

$
0
0
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कासारवाडीतील कचरा डेपोला मंगळवारी (१९ डिसेंबर) पहाटे आग लागली. या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास झाला. त्यामुळे येथील कचरा डेपो स्थलांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कासारवाडी दरोड्यात दोघांना अटक

$
0
0
सराफावर खुनी हल्ला करून तीन किलो सोन्याची लूट करणा-या दरोडेखोरांपैकी दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट तीनने गजाआड केले. पोलिसांनी या आरोपींकडून पन्नास लाख रुपयांचे सोनेही जप्त केले आहे. आरोपींनी फरार आरोपींचा शोध सुरू केला असून त्यांच्याकडे आणखी दीड किलो सोन्याचे दागिने असण्याची शक्यता आहे.

मनुष्यबळाअभावी रखडली जातपडताळणी

$
0
0
राज्यातील पंधरा विभागीय जात पडताळणी समितीच्या तब्बल अध्यक्षांची दहा पदे रिक्त‌असून, दोन अध्यक्ष रजेवर गेल्याने तब्बल एक लाख ८६ हजार जात पडताळणीचे प्रस्ताव रखडले आहेत. यामध्ये इंजिनीअरिंग, वैद्यकीय शाखेला प्रवेश घेतलेल्या एक लाख ४२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांचा समावेश आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images