Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरात कत्तलखाना उभारू देणार नाही

$
0
0
पिंपरीतील उड्डाणपुलाखालील अनधिकृत कत्तलखाना महापालिकेने बंद केला असला तरी, यापुढे शहरात कोठेही कत्तलखाना उभारू देणार नाही, असा इशारा गोवंश रक्षा समितीने दिला आहे.

झोपडपट्टीवासीय होणार ‘मालक’

$
0
0
शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या नावावर झोपड्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण झोपडी विकल्यास त्याचे हस्तांतरण शुल्क भरून महापालिकेच्या दप्तरी नोंद करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

पुण्यात नक्षलग्रस्त भागातून गांजा

$
0
0
पुणे शहरात विक्रीसाठी येणारा सर्वाधिक गांजा हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील नक्षलग्रस्त भागातून येत असल्याची धक्यादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाली आहे. गुन्हे शाखेने या वर्षात पकडलेल्या दीडशे किलो गांजापैकी ९० किलो गांजा हा नक्षलग्रस्त भागातून आला आहे.

विमानतळाचे शेड्युल्ड अनिश्चित

$
0
0
राजगुरूनगरजवळील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मंत्री के सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

यसाजी कंक भोरमधील भूतोंडे गावचे

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वासू सरदारांपैकी एक यसाजी कंक यांचे मूळ गाव भोर तालुक्यातील भूतोंडे असल्याचे त्यांच्या वंशजांनी स्पष्ट केले आहे. भूतोंडे येथे लवकरच शिवसृष्टी उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

प्रश्नपत्रिकेचे नव्याने ‘इंजिनीअरिंग’

$
0
0
इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाचा मंगळवारी होणारा पेपर शहरातील एका इंजिनीअरिंग कॉलेजने विद्यार्थ्यांना चुकून शनिवारच्या परीक्षेवेळी दिल्याची घटना घडल्याने पुणे विद्यापीठाला नव्याने प्रश्नपत्रिका काढावी लागली. या प्रकरणी दोषी कॉलेजवर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

डोक्यात सिलेंडर घालून पत्नीची हत्या

$
0
0
पिंपरी शहरामध्ये एका दारुडयाने आपल्या पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.

५ औषधांच्या विक्रीवर FDAची बंदी

$
0
0
सर्दी, ताप, खोकला, पचनावरील प्रतिजैविके (अॅन्टीबायोटिक) अप्रमाणित आढळल्याने राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विविध कंपन्यांच्या पाच औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. विविध कंपन्याच्या ठराविक सामूहिक क्रमाकांच्या औषधांची खरेदी विक्री करू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

$
0
0
पुणे- सोलापूर रोडवर गायकवाड हॉस्पिटलजवळ मंगळवारी सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्ती ठार झाली. हडपसर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

कार्ला फाट्यावर अपघात ३ ठार, ३ गंभीर

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथील तरे पेट्रोल पंपासमोर कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात अंबरनाथ येथील तिघे जण ठार, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास झाला. हे सर्वजण एकवीरा देवीचे दर्शन घेऊन घरी परतत होते. जखमींवर लोणावळ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भारनियमनमुक्तीच्या अपयशाला पाणीसाठा जबाबदार

$
0
0
पावसाने मारलेल्या दडीमुळे राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठा घटला आहे. परिणामी वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला पाणीसाठा उपलब्ध न झाल्याने काही ठिकाणचे वीजसंच बंद करण्यात आले आहे. यामुळे डिसेंबरपूर्वी राज्याला भारनियमनमुक्त करण्याचे स्वप्न अद्यापही अपूर्णच आहे, अशी कबुली जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांनी बुधवारी दिली.

‘सुझलॉन एनर्जी’च्या संचालकांसह ५ जणांवर गुन्हा

$
0
0
‘सुझलॉन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह पाच आरोपींनी भागधारकांची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ‘सुझलॉन एनर्जी’च्या कामगारांकडून नातेसंबंधातील कंपन्यांमध्ये कामे करवून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गावांच्या चर्चेचे गुऱ्हाळ उद्या तरी संपणार का?

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत २८ गावांचा समावेश करण्यासंदर्भातील गेले दीड वर्ष विधी समितीपुढे निर्णयाविना पडून असलेल्या ठरावावर उद्या (गुरूवारी) तरी विधी समितीच्या बैठकीत निर्णय होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य सरकारकडे याबाबत हरकती सूचना नोंदविण्याची मुदत समाप्त होऊन महिना लोटला, तरी राजकीय एकमताअभावी महापालिकेची भूमिका ठरलेली नाही.

बाजार समितीतील ‘प्रशासकराज’ संपुष्टात येणार

$
0
0
तब्बल नऊ वर्षांनंतर पुणे प्रादेशिक बाजार समितीसह हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश पणन खात्याचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा ‘प्रशासकराज’ संपुष्टात येण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी निवडणुका घेण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुर्गप्रेमींना खुणावणारा भैरवगड सुरक्षित...

$
0
0
आपल्या उभ्या चढाईमुळे ठाणे जिल्ह्यातील मोरोशीजवळचा भैरवगड तमाम ट्रेकर्सना कायमच खुणावतो. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये याच गडावरील पारंपरिक चढाईचा आणि ट्रेकिंगचा मार्ग चढाईसाठीचे बोल्ट गंजल्याने धोकादायक बनला होता. पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था आणि सेफ क्लायंबिंग इनिशिएटिव्हच्या (एससीआय) पुढाकारातून नुकत्याच करण्यात आलेल्या री-बोल्टिंगमुळे हा मार्ग सुरक्षित झाला आहे.

अभ्यासकांना सापडले शिवरायांचे पत्र

$
0
0
न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी स्त्रियांशी गैरवर्तन करणा-या गावाच्या पाटलाला थेट हातपाय तोडण्याची शिक्षा सुनावली होती... हा प्रसंग सविस्तर सांगणारे शिवाजी महाराजांचे सर्वांत जुने आणि अस्सल पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाचे अभ्यासक अजित पटवर्धन आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी यांना मिळाले आहे.

पुण्यातील एक आठवण अशीही

$
0
0
ज्येष्ठ सतारवादक भारतरत्न पं. रविशंकर बरोबर पाच वर्षांपूर्वी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांची हॉटेलमध्ये सोय करण्यासाठी त्यांच्या एजन्सीला एक वेळ ‘कुणी खोली देता का खोली,’ असं म्हणायचीच वेळ आली होती. अखेर हॉटेल डेक्कन राँदेवूचे राजेंद्र केळशीकर मदतीला धावून आले आणि पंडितजींची चोख व्यवस्था झाली...

एसीपी सातव यांची उलटतपासणी

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे रचला गेल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आपण कोलंबोला गेलो नव्हतो. मात्र ‘एटीएस’च्या पोलिस उपायुक्तांनी इंटरपोलला याबाबत तपास करण्यासाठी पत्र दिले होते. ते पत्र कोर्टात सादर करण्यात आले आहे, अशी माहिती या केसचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त विनोद सातव यांनी बुधवारी कोर्टात दिली.

कर्वे रोडवरील ‘नो पार्किंग’ला मुदतवाढ

$
0
0
कर्वे रोडवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, म्हणून या रस्त्यावरील काही भागांमध्ये राबवण्यात येणा-या ‘नो पार्किंग’च्या उपक्रमाला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. सध्या राबवण्यात येणा-या या उपक्रमासंदर्भात हरकती सूचना पाठवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मेट्रोसाठी निधी ‘टीटीएमएम’

$
0
0
आपल्या हद्दीबाहेरून जाणा-या मेट्रोच्या प्रकल्पासाठी निधीचा वाटा उचलण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने नकार दिल्यामुळे आता पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी ‘टीटीएमएम’ (‘तुझे तू-माझे मी’) फॉर्म्युला स्वीकारला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images