Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

७६ लाखांची फसवणूक डॉक्टर अटकेत

$
0
0
वैद्यकीय महाविद्यालयांच्या वार्षिक तपासणीसाठी दिल्ली येथील ओळखीच्या विक्रेत्याकडून कमी किमतीत वैद्यकीय साहित्य आणून देतो, असे सांगून ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. ए. कोटणीस यांनी दिला.

शेट्टीनी देशातील शेतक-यांचे नेतृत्व करावे

$
0
0
‘खासदार राजू शेट्टी यांच्याशी आमची राजकारणाबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही सध्या तरी आम्ही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर एक होण्याचे ठरविले आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर राजकारणावर विचार करू. त्या संदर्भात बोलणी करू’, असे ‘आम आदमी पक्षाचे संस्थापक’ अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यात चारा घोटाळा

$
0
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माढा, करमाळा तसेच पंढरपूर या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावण्यांमध्ये जनावरांच्या बोगस नोंदी केल्याप्रकरणी तपासासाठी जिल्हा प्रशासनाने घातलेल्या छाप्यांमध्ये ७२ छावण्यांमध्ये सुमारे सात हजार १४१ जनावरांची नोंदणी बोगस असल्याचे उघड झाले.

नदीपात्रात सापडले दोन मृतदेह

$
0
0
बालगंधर्व रंगमंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी नदीपात्रात दोन मृतदेह सापडले. काही अंतरावर सापडलेल्या मृतदेहांपैकी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सुरक्षा एजन्सीजवर कारवाईचा बडगा

$
0
0
राज्यातील ५९ बोगस सुरक्षा एजन्सींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील निगडी येथील आर्मर सिक्युरिटी सर्व्हिसेस या एजन्सीवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी नागपूर अधिवेशनात दिली.

परीक्षांमधील सुसूत्रतेसाठी उपक्रम

$
0
0
एच. व्ही. देसाई कॉलेजच्या अंतर्गत परीक्षेतील वादग्रस्त प्रश्नपत्रिकेबाबत संबंधित तज्ज्ञांकडून तपासून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे कॉलेजने कळविले आहे. परीक्षांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विविध योजना राबविल्याचेही कॉलेजने स्पष्ट केले आहे.

शहरातील पाणीपुरवठा उद्या बंद

$
0
0
जलकेंदांचा वीजपुरवठा महावितरणकडून बंद केला जाणार असल्याने आणि दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे.

येत्या बुधवारी पेन्शनरांचा मेळावा

$
0
0
लेखा व कोषागार विभागाच्या वतीने पेन्शनरांचा मेळावा बुधवारी (१२ डिसेंबरला) आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार कार्यालयात सायंकाळी चार वाजता हा मेळावा होणार असून, यासाठी जिल्हा व महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कथाकार ‘जीए’ असामान्यच

$
0
0
जी. ए. कुलकर्णी असामान्य प्रतिभेचे लेखक होते, असे उद्गार ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी काढले. जी. ए. कुलकर्णी कुटुंबियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रिय जी. ए. महोत्सवात देण्यात येणारा कथाकार पुरस्कार लेखक मिलिंद बोकील यांना त्याच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ निबंधकार श्रीनिवास विनायक कुलकर्णी उपस्थित होते.

गंधर्वगानासाठी ‘सवाई’ साज

$
0
0
मंडप तोच.., तरी पाऊल टाकल्यावर जाणवणारी भव्यता, बैठक व्यवस्था तीच.., तरी रचनेतला फरक लक्षात येण्याजोगा, स्वरमंचाची परंपरा कायम..., तरीही ‘बॅकड्रॉप’ला आकर्षक सजावट, सहा दशकांची पारंपरिकता जपत अन् त्याचवेळी नव्या वैशिष्ट्यांना स्थान देत हीरकमहोत्सवी ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ने मंगळवारी रसिकांचे स्वागत केले.

‘SP’मध्ये शिकता येणार ११ वीपासून फ्रेंच

$
0
0
पुण्यातील टिळक रस्त्यावरील ऐतिहासिक एस. पी. कॉलेजमध्ये सुमारे ७० वर्षांपूर्वी बंद पडलेला फ्रेंच भाषा विभाग पुढील शैक्षणिक वर्षात (२०१३-१४) पुन्हा सुरू होतो आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अकरावीपासूनच फ्रेंच भाषा शिकता येणार असून, फ्रेंचमध्ये बीएसुद्धा करता येणार आहे.

डिझाइनपेक्षा उपयुक्तता महत्त्वाची

$
0
0
‘एखाद्या प्रकल्पाच्या डिझाइनपेक्षा ती जागा समाजाच्या किती उपयोगात येते, याला महत्त्व देऊन ती विकसित करणे आवश्यक आहे,’ असे मत अमेरिकेच्या प्लेसमेकिंग लीडरशिप ट्रेनिंगफोरमचे उपाध्यक्ष इथान केंट यांनी व्यक्त केले.

रस्त्याचे काम वेगाने करण्याची मागणी

$
0
0
अनेक दिवसांपासून सुरू असणारे पुणे-सोलापूर महामार्गाचे काम पूर्ण होण्यास आणखी तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. दरम्यान, संथ गतीने सुरू असणारे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे सल्लागार चांदमल परमार यांनी सांगितले.

थंडी वाढणार तापमान घटण्याची शक्यता

$
0
0
ऐन थंडीत उकाड्याचा ‘फील’ घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी (११ नोव्हेंबर) पुन्हा गारठ्याने परतण्याची चाहूल दिली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानात तीन अंशांनी घट होऊन पारा १३ अंशांवर स्थिरावला. पुढच्या दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

‘ITS’द्वारे अखेर फेरटेंडर काढणार

$
0
0
महापालिकेची यंत्रणा आणि ठेकेदारास मलिदा; अशा तरतुदी असलेल्या ‘आयटीएस’ यंत्रणेद्वारे बेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीच्या विषयात अखेर फेरटेंडर काढण्यात यावे, असा निर्णय मंगळवारी स्थायी समितीने घेतला आहे.

माजी नगरसेवकाच्या मुलीवर कोयत्याने वार

$
0
0
कोथरुड परिसरातील एका माजी नगरसेवकाच्या मुलीवर एका माथेफिरु तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर घडली. याप्रकरणी अनमोल अतुल जाधवराव (वय - २३, रा. कोथरुड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित वीस वर्षीय मुलीने चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

‘टांगा राइड’च्या फायलीचा ‘मिसिंग वॉक’

$
0
0
एके काळी ‘टांग्यांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांना टांग्यामध्ये बसून भेटी देण्यासाठी राबवण्यात येणा-या ‘टांगा राइड’ या योजनेची फाइलच महापालिकेच्या हेरिटेज सेलमधून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

गुटखा विक्रीप्रकरणी ७ जणांवर खटले

$
0
0
अन्न पदार्थात मॅग्नेशियम कॉर्बोनेट आणि निकोटिनसारखे शरीरास घातक ठरणारे घटक आढळ्याने त्याची विक्री करणा-या पुण्यासह पिंपरी चिचंवडमधील सात व्यापा-यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खटले दाखल केले आहेत.

पाणीमीटरला विरोध मावळला?

$
0
0
शहरात पाणीपुरवठ्यासाठी मीटर पद्धती लागू करण्यास विविध पक्षांनी यापूर्वी केलेला विरोध मावळल्याचे समोर आले आहे. मीटरच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी सादर झालेला ठराव मंगळवारी स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने दप्तरी दाखल केला.

'एनडीएत या; पंतप्रधान व्हा...!'

$
0
0
'मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, ही आपली इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाले, तर ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात...' लोकसभेचे माजी सभापती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जाहीर शुभेच्छा दिल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images