Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुदतवाढ मिळताच KYC कडे पाठ

$
0
0
मुदतीत नो युवर कस्टमर (केवायसी) भरून न देणा-या ग्राहकांचे गॅस कनेक्शन एक जानेवारीपासून ब्लॉक होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी केवायसी भरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीमुळे नागरिक निर्धास्त झाले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अद्यापही शहरातील दीड लाख ग्राहकांचे केवायसी अर्ज येणे शिल्लक असल्याचे या अधिका-यांनी सांगितले.

‘सवाई’च्या अनुभवांचा संग्रह नोंदवहीत

$
0
0
‘सवाई’बद्दल कलाकारांच्या भावना, त्यांचे अनुभव; श्रोत्यांचे अभिप्राय, आठवणी आणि संगीतप्रेमी या नात्याने केलेल्या प्रेमळ सूचनाही... महोत्सवाशी संबंधित अशा दुर्मिळ ठेव्याचा संग्रह एक दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे.

विना पगारवाढ उपसंचालकपदी बढती

$
0
0
राज्याच्या आरोग्य खात्यात उपसंचालकाच्या अठरा रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात येणारा अडथळा दूर करण्यासाठी सहायक संचालक पदावरील बारा अधिका-यांना तर अन्य तीन अधिका-यांना लोकसेवा आयोगामार्फत उपसंचालकपदी बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बढती मिळालेल्या बारा अधिका-यांना पूर्वीच्याच पदाचे वेतन मिळणार असून काम मात्र उपसंचालकाचे करावे लागणार आहे.

८ टक्के वसुलीमुळे २५१ आडत्यांना नोटिसा

$
0
0
प्रादेशिक बाजार समितीचे परिपत्रक धुडकावून गुलटेकडी मार्केट यार्डातील आडत्यांनी आठ टक्के दरानेच पावत्या केल्या. त्यामुळे अखेर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत समितीने अडीचशे जणांना परवाना निलंबनाच्या नोटिसा सोमवारी जारी केल्या.

ढोणी संघासाठी लायक नाही

$
0
0
‘कर्णधार महेंद्रसिंह ढोणीने वर्षभरात संघासाठी काय केले? कामगिरी हा निकष लावला, तर ढोणी संघात कुठेही बसत नाही. भारतीय क्रिकेट संघासाठी तो लायकच नाही. मात्र, त्याला संघातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्याचा या निवड समितीत दमच नाही,’ अशी टीका भारतीय संघाचे माजी कसोटीपटू मोहिंदर अमरनाथ यांनी केली.

सराफावर भरदुपारी खुनी हल्ला

$
0
0
गहाणवटीचा व्यवसाय करणा-या सराफावर धारदार शस्त्राने भरदुपारी वार केल्याची घटना सोमवारी (१० डिसेंबर) कासारवाडी येथे घडली. आरोपी फरार असून जखमी सराफाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रेशन दुकानदारांचा आज बंद

$
0
0
विविध मागण्यांसाठी राज्यातील रेशन दुकानदारांनी मंगळवारी (११ डिसेंबर) लाक्षणिक बंद पुकारला आहे. रोख सबसिडी नको धान्य व रॉकेल, गॅस हवा, कमिशन व मानधन नको वेतन हवे, अशी या दुकानदारांची प्रमुख मागणी आहे.

PMPMLचे लेखापरिक्षणच नाही

$
0
0
केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचे अनुदान तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असणा-या पीएमपीएमएलचे स्थापनेपासून आजपर्यंत लेखापरिक्षणच झालेले नाही, अशी बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. याबाबतची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘बेईमान लेखकाला प्रश्न पडणार नाहीत’

$
0
0
‘प्रामाणिकपणे जगणा-या जीएंसारख्या लेखकालाच प्रश्न पडू शकतात. बेईमान लेखकाला प्रश्न पडणारच नाहीत’, अशी टिप्पणी करत ‘बाह्य घटना म्हणजे जीवनाचे सत्य नाही किंवा घटना माहिती असली, तरी त्यामागील सूक्ष्म सत्य समजेलच याची शाश्वती नाही. घटना आणि सत्य यातील फरक लेखक समजून घेत नाहीत,’ अशी खंत ज्येष्ठ नाटककार, लेखक महेश एलकुंचवार यांनी सोमवारी व्यक्त केली.

दहावीची पेपर तपासणी ‘ऑन-स्क्रीन’

$
0
0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांचे पेपर ‘ऑन-स्क्रीन’ तपासले जाणार आहेत. पेपर तपासणीतील चुका टाळण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी या हेतूने ‘सीबीएसई’ने हे क्रांतिकारक पाऊल उचलले आहे.

सरकारच बनले आहे जमिनींचे एजंट

$
0
0
‘प्रकल्पग्रस्त, विस्थापित आणि भूमिहिनांना २० -२५ वर्षे लढा देऊनही जमीन मिळत नाही. मात्र, कंपन्या आणि बिल्डरांना मागतील तेवढी जमीन सवलतींसह दिली जाते. लोककल्याणकारी काम करण्याचा आव आणणारे सरकार प्रत्यक्षात जमिनींचे एजंट बनले आहे,’ अशी खरमरीत टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोमवारी केली.

ATVM मशिन बसविण्यास रेल्वेची दिरंगाई

$
0
0
पुणे स्टेशनवर येणा-या प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट विनासायास काढता व्हावे, म्हणून त्याठिकाणी ऑटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशिन बसवण्याची योजना रेल्वेकडून अद्याप मार्गी लागली नसल्याचे समोर आले आहे.

६.५ हजार केसेस लोकअदालतीत निकाली

$
0
0
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये सहा हजार ४६७ केसेस निकाली काढण्यात आल्या. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात या लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अनंत बदर, जिल्हा न्यायाधीश एस.पी. तावडे, न्यायाधीश एस. डी. दरणे आदी उपस्थित होते.

स्कॉलरशिप परीक्षांच्या फीमध्ये वाढ

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणा-या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांच्या शुल्कामध्ये वर्ष २०१४ पासून वाढविण्यात येणार आहे. याविषयी परिषदेने पाठविलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली.

माउलींचा लागे लळा, रंगे कार्तिकीचा सोहळा

$
0
0
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपूत्र या भावनेने माउलींचे आशिर्वाद घेण्यासाठी वैष्णवांची मांदियाळी सोमवारी आळंदीत अवतरली होती. निमित्त होते कार्तिकी एकादशीचे. सहभागी भाविकांनी ज्ञान, प्रेम अन भक्तीचा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवित माउलींवरील असिम श्रद्धेचा जणू प्रत्ययच दिला.

५० कोटी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणार

$
0
0
नोकरीच्या संधी उपलब्ध असल्या तरी उद्योग क्षेत्राला अपेक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे २०२० पर्यंत ५० कोटी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने आखले आहे.

बिल्डरला नव्हे तर झोपडीधारकालाच TDR

$
0
0
बिल्डरऐवजी थेट झोपडीधारकालाच टीडीआर देण्याची तरतूद असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला (एसआरए) पूरक अशा संजीवनी योजनेला एसआरएने हिरवा कंदील दाखविला असून ती राज्य सरकारच्या मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती नगरसेवक आबा बागूल यांनी सोमवारी दिली.

अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम अपूर्णच

$
0
0
तब्बल आठ वर्षांचा कालावधी आणि १९ कोटी रुपयांचा खर्च करूनही सातारा रोडवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम कधी पूर्ण होणार, याचे उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे दक्षिण पुण्यातील नागरिकांना नाट्यगृहापासून वंचित रहावे लागत आहे.

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

$
0
0
पुणे महापालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गुरूवारी(ता.१३) शहराच्या विविध विभागांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

उद्यमशीलता नसल्याने सहकाराचे महत्व मोठे

$
0
0
कोणालाही फक्त श्रीमंत करण्याच्या गोष्टी करण्याऐवजी सहकार चळवळीतील माणूस हा चिंतनाचा विषय असला पाहिजे, असे मत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images