Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात १५० उद्याने होणार विकसित

$
0
0
‘पुणे शहर उद्यानांचे शहर म्हणून विकसित होत असून पुण्यात आगामी काळात दीडशे उद्याने विकसित होणार आहेत. नवीन उद्यानांमध्ये मनोरंजनासोबतच शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान याची जोडही दिली जाणार आहे,’ अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी दिली.

नाट्यसंमेलनाने साधला दुर्मिळ मुहूर्त

$
0
0
शतकातून एकदाच येणारा '१२-१२-१२' हा दुर्मिळ योग साधण्यासाठी बारामतीतील ९३ व्या नाट्यसंमेलनाच्या संमेलनपूर्व कार्यक्रमांचा शुभारंभ मंगळवार, ११ डिसेंबर रोजी मध्यरात्री करण्यात येणार आहे. अष्टविनायकातील आद्यस्थान मोरगाव गणपतीसह बारामती तालुक्यातील तब्बल ५४ ग्रामदैवतांचे रात्रौ १२ वाजून १२ मिनिटांनी पूजन करून हा अनोखा 'मुहूर्त' साधला जाणार आहे.

समस्यांची 'उद्घोषणा' अन् स्वयंपूर्णतेचे 'प्रसारण'

$
0
0
कोणाला आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे... कोणाला प्रसारणाची वेळ वाढवायची..., कोणाची आशय सुधारण्यासाठीची धडपड... तर कोणी स्थानिक जाहिराती मिळवण्याबाबत साशंक......'कम्युनिटी रेडिओ' चालविणा-या स्वयंसेवी संस्थांना येणा-या अडचणींना व्यासपीठ मिळाले अन् त्यातून आर्थिक स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी 'शेअरिंग'ही झाले.

मराठी रंगभूमीमुळे झालो सशक्त

$
0
0
'मी कन्नड असलो, त्याच भाषेत लिहित असलो, तरी माझे मूळ मराठी रंगभूमीतच आहे. याच रंगभूमीमुळे मी सशक्त झालो,' अशा भावना ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाड यांनी रविवारी व्यक्त केल्या.

'एक्स्टर्नल' मुळे परीक्षांचे 'निकाल'!

$
0
0
पुणे विद्यापीठात बहिःस्थ (एक्स्टर्नल) विद्यार्थ्यांची वाढत चाललेली संख्या निकाल वेळेवर लागण्यात मोठा अडथळा ठरत असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे निरीक्षण आहे. इंटर्नल आणि एक्स्टर्नल विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या फारच मर्यादित असल्याने पेपर तपासणीवर मोठा ताण येत आहे.

निसर्ग संरक्षण, ग्रामीण विकासावर परिषद१२ ते १४

$
0
0
पुण्यातील पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन १२ ते १४ डिसेंबर रोजी निसर्ग संरक्षण आणि ग्रामीण विकासावर परिषद होत आहे. नवी पेठेतील निवारा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या परिषदेचे उद्‍घाटन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुहास परांजपे यांच्या हस्ते होणार आहे.

खंडणी मागणारे दोघे गजाआड

$
0
0
बांधकाम व्यावसायिकास पिस्तुलाच्या धाकाने एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाचे चाळीस लाख रुपयांचे बांधकाम साहित्यही बळजबरीने नेल्याचे निष्पन्न झाले आहे.

इंजिनिअरच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्याच बरोबर नोकरी करणा-या तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल झाला आहे. ‘त्या’ दोघांनी धमकावल्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रविण गि-हे (वय २७, रा. औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुण्यात आता थेट शेतमाल विक्री

$
0
0
आडत वसुलीच्या मुद्द्यावरून आडत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अखेर शेतक-यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी पुण्यात ‘शेतमाल विक्री’ केंद्रे सुरू करण्याचा आदेश राज्याचे पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी दिला. पणनमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आडत्यांची पंचाईत होणार आहे.

२ गटांतील मारामारी; ७ जणांना सक्तमजुरी

$
0
0
पूर्ववैमनस्यातून एकमेकांशी झालेल्या मारामारीप्रकरणी दोन गटातील सात जणांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने यांनी हा निकाल दिला.

बबलू श्रीवास्तवला न्यायालयीन कोठडी

$
0
0
उद्योजक सागर लडकत खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी बबलू श्रीवास्तव याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचा आदेश कोर्टाने दिला. या आदेशानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला रायबरेली येथील तुरुंगात नेले.

साज-या न होणा-या वाढदिवसाला भरभरून शुभेच्छा

$
0
0
‘वाढदिवस साजरा करणार नाही,’ अशी भूमिका ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्यानंतरही शहराच्या सर्वच भागांमध्ये ‘बॅनर’जींच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांत शहरात असे शेकडो अधिकृत-अनधिकृत फलक झळकले आहेत आणि इतर वेळी फलकांच्या विषयावर सडेतोड भूमिका घेणारे महापालिकेतील माननीयही त्यामध्ये आघाडीवर आहेत.

आडतीच्या भाजीला राजकारणाचा तडका

$
0
0
बाजार समित्यांमधील आडत वसुलीच्या मुद्यावर सुरू असलेल्या वादामध्ये राजकारणाची फोडणी पडली आहे. या मुद्द्यावरून राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात खडाखडी सुरू झाल्याचे वरिष्ठ वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

मालमोटारीतील फरशी अंगावर पडून ३ ठार

$
0
0
दुकानाच्या गोदामामध्ये मालमोटारीतून उतरविण्यात येणारी फरशी (कडप्पा) अंगावर पडून तीन मजूर जागीच ठार झाले. तर, तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भोरमधील विलास ट्रेडर्स या दुकानाच्या गोदामात ही घटना घडली.

डॉ. एन. एन. मालदार सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू

$
0
0
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सोशल कॉलेजमधील प्राध्यापक आणि सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. एन. मालदार यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी सोमवारी निवडीवर शिक्कामोर्तब केले.

‘LBT’बाबत अद्याप पालिकेला आदेश नाही

$
0
0
महापालिकेतील जकात कर रद्द करून स्थानिक संस्था कर म्हणजेच (एलबीटी) आकारण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही आदेश पुणे महापालिकेला मिळालेला नाही. तत्पूर्वी महापालिकेने विविध विभागांकडून व्यापाऱ्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.

ठोस भूमिका कुणाच्या गावीच नाही

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अशा दिग्गजांनी दखल घेतली असली, तरी महापालिकेतील माननीय त्या विषयाकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. या संदर्भात महापालिकेत दाखल झालेल्या प्रस्तावावर सर्वपक्षीय माननीयांचे गेली दीड वर्षे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

श्वेतपत्रिका नव्हे स्तुतीपत्रिका...

$
0
0
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका ही केवळ स्तुतीपत्रिका आहे. या प्रकरणात कोणतीही लोकशाही प्रक्रिया न राबवता केवळ राजकारणच करण्यात आले, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोमवारी केला. ‘सरकारी श्वेतपत्रिकेतून काहीही समोर येणार नाही, हा आमचे भाकित खरे ठरले.

आरोपपत्र दाखल

$
0
0
कोथरुडमधील गणंजय सोसायटीमध्ये शिवाजीनगर कोर्टातील महिला अधीक्षकावर दोघांनी चाकूने हल्ला केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे. मोहन रामनाथ महाडिक (वय - १९, रा. भुमकर चौक, वाकड), संदीप दादासाहेब झिरपे ( २१) या दोघांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

‘एनए’ परवान्यांसाठी एकच गर्दी

$
0
0
महापालिकेत समाविष्ट करण्यात येणा-या २८ गावांतील आपल्या जागा आरक्षणातून सुटाव्यात, यासाठी त्यावर बांधकाम करण्याची धडपड संबंधितांकडून सुरू झाली आहे. त्यासाठी जमीन मोजणी व बिगरशेती परवान्यासाठी गर्दी होत आहे. गेल्या दोन महिन्यांत मोजणीच्या प्रकरणांमध्ये तब्बल २५ टक्के वाढ झाली असल्याची माहिती हवेलीचे भूमी अभिलेख उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images