Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्याचे प्रश्न मार्गी लागणार का?

$
0
0
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुण्याचा पाणीप्रश्न, वाहतूक, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असे पुणेकरांचे प्रश्न मार्गी लागणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील आमदारांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे.

मराठी रंगभूमीमुळे झालो सशक्त

$
0
0
‘मी कन्नड असलो, त्याच भाषेत लिहित असलो, तरी माझे मूळ मराठी रंगभूमीतच आहे. याच रंगभूमीमुळे मी सशक्त झालो,’ अशा भावना ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाड यांनी रविवारी व्यक्त केल्या.

‘एक्स्टर्नल’ची वाढती संख्या लावतीये परीक्षांचे ‘निकाल’!

$
0
0
पुणे विद्यापीठात बहिःस्थ (एक्स्टर्नल) विद्यार्थ्यांची वाढत चाललेली संख्या निकाल वेळेवर लागण्यात मोठा अडथळा ठरत असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे निरीक्षण आहे. इंटर्नल आणि एक्स्टर्नल विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या फारच मर्यादित असल्याने पेपर तपासणीवर मोठा ताण येत आहे.

तळीरामाने केली वायरलेस टॉवरवर चढाई

$
0
0
नारायणगाव बसस्थानकातील वायरलेस टॉवरवर एका तळीरामाने हातातील बॅग घेऊन आज दुपारी चढाई केली. मात्र तो टॉवरवर कशासाठी चढला हे कोणाच्याच ध्यानात न आल्याने काही घातपातासाठी त्याने चढाई केली की तो मनोरुग्ण होता,अशा अनेक शंका उपस्थित झाल्याने एस.टी प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

अन्यथा परवाने रद्द

$
0
0
‘प्रादेशिक बाजार समितीने सहा टक्क्यांनी वसुली करण्याच्या काढलेल्या परिपत्रकाची आडत्यांनी अंमलबजावणी न केल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील,’ असे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, आठ टक्क्यांनी वसुली करणा-या व्यापा-यांच्या पावत्यांसह दफ्तरची तपासणी मोहीम बाजार समितीने हाती घेतली आहे.

जादूटोणा कायदा वारक-यांनी समजून घ्यावा

$
0
0
जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदी वारकरी बांधवांनी समजून घेतल्यास त्यांचा कायद्याबाबतचा गैरसमज दूर होईल, त्यामुळे वारकरी समाजाने या तरतुदी समजून घ्याव्यात, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समित‌ीच्या वतीने करण्यात आले आहे.

२८ गावांचा पालिकेत समावेश करणारच

$
0
0
उपनगरांचा सुनियोजित विकास करण्यासाठी कितीही विरोध झाला तरी हद्दीलगतच्या २८ गावांचा महापालिकेत समावेश करणारच असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी स्पष्ट केले.

४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून

$
0
0
चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना रविवारी कासारवाडी येथे उघडकीस आली. येथील रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछीन्न अवस्थेत या मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आडत्यांचे शरद पवारांना साकडे

$
0
0
पुणे प्रादेशिक बाजार समिती आणि आडते असोसिएशन यांच्यात सहा की आठ यावरून काही दिवसांपासून रंगलेल्या कलगीतुऱ्यानंतर आता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना आडत्यांनी याबाबत साकडे घातले आहे. हा विषय समजून घेतल्यानंतर ‘थेट मुख्यमंत्र्यांशी बोलू,’ असे आश्वासन देत पवार यांनी आडत्यांना दिलासाही दिला.

सोन्याच्या बांगड्या चोरल्या

$
0
0
साधु वासवानी चौकातील गोल्ड मार्ट या दुकानातून दीड लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरीस गेल्या आहेत. सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघा चोरांनी ही चोरी केली. विकास प्रकाशचंद ललवाणी (वय ५०, रा. साधू वासवानी चौक) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

समस्यांची ‘उद्घोषणा’ अन् स्वयंपूर्णतेचे ‘प्रसारण’

$
0
0
कोणाला आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे..., कोणाला प्रसारणाची वेळ वाढवायची..., कोणाची आशय सुधारण्यासाठीची धडपड..., तर कोणी स्थानिक जाहिराती मिळवण्याबाबत साशंक......‘कम्युनिटी रेडिओ’ चालविणा-या स्वयंसेवी संस्थांना येणा-या अडचणींना व्यासपीठ मिळाले अन् त्यातून आर्थिक स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ‘शेअरिंग’ही झाले.

सम्यक साहित्य संमेलन १४ डिसेंबरपासून पुण्यात

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि स्टडीज सेंटर पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे सम्यक साहित्य संमेलन पुणे विद्यापीठात येत्या चौदा ते सोळा डिसेंबरदरम्यान होणार आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बालकुमार साहित्य संमेलन शुक्रवारपासून राजापूरला

$
0
0
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे होणा-या २४ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन येत्या चौदा ते सोळा डिसेंबरदरम्यान होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष मदन हजेरी यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे.

‘मिलेनियम फी’ विरोधात पालकांचे आंदोलन

$
0
0
कर्वेनगर परिसरातील मिलेनियम स्कूलमधील विद्यार्थ्यांची फी वाढविण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पालकांनी नुकतेच आंदोलन केले. फीवाढीसह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी पालक संघाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘कम्युनिटी रेडिओ’साठी महाराष्ट्राकडून मदत नाही

$
0
0
‘कम्युनिटी रेडिओ’ केंद्रांची चळवळ विस्तारण्यासाठी देशातील बहुतांश राज्ये आर्थिक हातभार लावत आहेत. मात्र, याबाबत देशात अग्रस्थानी असणा-या महाराष्ट्राने एक रुपयाचीही मदत कोणत्याच केंद्राला केलेली नाही’, अशा शब्दांत ही चळवळ उभी करण्यात पुढाकार घेणाऱ्या डॉ. आर. श्रीधर यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले.

वाढीव पाणी मिळण्यात राज्य सरकारचाही अडसर

$
0
0
पाणीपुरवठा प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारणीस होत असलेल्या विलंबासाठी महापालिकेला जबाबदार धरण्यात आले. मात्र, महापालिकेबरोबरच राज्य सरकारच्या असहकाराचाही फटका या योजनांना बसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पुणेकरांना वाढीव पाणी मिळण्यात राज्य सरकारचाही अडसर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेडरेशनकडून केंद्र आणि रिझर्व्ह बँकेचा निषेध

$
0
0
भारतातील सहकारी आणि जिल्हा बँकांना सरसकट काळ्या यादीत टाकण्याच्या ब्रिटन सरकारने केलेल्या कारवाईप्रकरणी हात झटकल्याचा आरोप करीत ‘महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन’ने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा निषेध केला आहे. देशाच्या अस्मितेचा मुद्दा असल्याचे लक्षात घेऊन काहीतरी तोडगा काढा, असे साकडे परराष्ट्र मंत्रालयाला घालण्याचेही फेडरेशनने ठरविले आहे.

लक्ष्मी रोडवरील वाहतूक विस्कळीतच

$
0
0
पादचा-यांच्या सोयीसाठी लक्ष्मी रोडवर राबवण्यात येत असणा-या वॉकिंगमध्यच्या उपक्रमातील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेले बॅरिकेट्स हलवण्याचे प्रकार वारंवार होतात, त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार सातत्याने होत असतात.

बेकायदा बांधकामांवर हातोडा

$
0
0
ग्रामीण भागातील नियमित होऊ न शकणारी १०८९ बेकायदा बांधकामे पाडण्याची नोटीस जिल्हाधिकारी प्रशासनाने बजावली आहे. या बांधकामांवर येत्या काही दिवसांतच कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले.

...तर राज्यभर एसटीचा चक्का जाम

$
0
0
एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित वेतन कराराचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकार चालढकल करीत असून येत्या महिन्याभरात हा प्रश्न मार्गी न लागल्यास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images