Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात आंतरराष्ट्रीय सहकार परिषद

$
0
0
पुण्याच्या 'दि कोऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन'तर्फे येत्या शनिवारपासून दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होत आहे. राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये या परिषदेचे उद्‍घाटन होणार आहे.

नागरिकांना मिळणार 'टेंपररी आधार'

$
0
0
नोंदणी करून कित्येक महिने लोटले, तरी आधार कार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो नागरिकांना सरकारने आता दिलासा दिला आहे. आधार कार्ड मिळेपर्यंत या नागरिकांना पोर्टलवरून टेंपररी आधार कार्ड मिळणार आहे. ज्या नागरिकांकडे इंटरनेट नाही, अशा नागरिकांना महा ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, संग्राम केंद्र येथे दोन रुपये घेऊन 'आधार'ची प्रत दिली जाणार आहे.

दुचाकीच्या धडकेत एक ठार

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर लोणावळा येथील साईमोरेश्वर हॉटेल समोर दुचाकीच्या अपघातात लोणावळा नगरपालिकेच्या एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरूवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

पक्षापेक्षा कोणीमोठा नाही!

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षापेक्षा कोणीमोठा नाही. आपले नेते अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारच आहेत. याचे भान इतर स्थानिक नेत्यांनी ठेवावे, अशा भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (सहा डिसेंबर) व्यक्त केल्या.

श्री एकवीरा देवस्थानचा वाद चिघळला

$
0
0
श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टमध्ये बनावट देणगीच्या पावत्याद्वारे बेकायदेशीर देणगी वसूल करणाऱ्या विरोधात येत्या आठ दिवसांत कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

गरीब ज्येष्ठ नागरिकांची पालिकेकडून निराशा

$
0
0
‘निवृत्तांचे शहर’ म्हणून गणना होणाऱ्या पुण्याची महापालिकाच ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचारासाठी अर्थसाह्यामध्ये वाढ करण्यात तयार नाही. एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना दोन लाख रुपये अर्थसाह्य देण्यास महापालिकेच्या प्रशासनाने नकार दिला आहे.

समान पाणीवाटपासाठी पाच प्रभागांत प्रायोगिक योजना

$
0
0
पुण्यात समान पाणीवाटप करण्यासाठी ‘२४ बाय ७’ योजना प्रायोगिक तत्त्वावर पाच प्रभागांमध्ये राबवली जाणार असून, त्याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. या अहवालाच्या आधारे लवकरच टेंडर काढले जाणार आहे.

दुर्बिणीने शोध घेऊनही सीसी कॅमेरे सापडेना!

$
0
0
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणारे सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाने अद्याप बसविले नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी दुर्बिणीद्वारे ‘कॅमेऱ्यांचा शोध’ घेण्याचा दौरा विरोधी पक्षीय आमदारांनी गुरुवारी काढला.

सलग ३६ तास अभ्यास करून डॉ. आंबेडकरांना आदरांजली

$
0
0
सलग ३६ तास अभ्यास करून धम्म अभियान युवा समिती ध्यास या ग्रुपने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (६ डिसेंबर) आदरांजली अर्पण केली.

पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पतीला सक्तमजुरी

$
0
0
दारूच्या पैशांसाठी पत्नीला मारहाण करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीला सात वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अति​रिक्त सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी हा निकाल दिला.

बाइकला ठोकून पळणाऱ्या कारला अपघात

$
0
0
दुचाकीला उडविल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेली कार समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकल्याने कारमधील चौघे युवक ठार झाले तर, अपघातग्रस्त दुचाकीस्वारावरही जखमी झाला आहे. पौड रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला.

बाजार बंदप्रकरणी आडत्यांना नोटिसा

$
0
0
पूर्वपरवानगीशिवाय आडत्यांनी गेल्या सहा दिवसांपासून बंद केल्याप्रकरणी प्रादेशिक बाजार समितीने आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांच्यासह अकरा आडत्यांसह एका दिवाणजीला नोटीस जारी करून जाब विचारला आहे.

आडत दरावरून व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम

$
0
0
आडत कपातीवर राज्य सरकारकडून अंतिम निर्णय होईपर्यंत परिपत्रकातील सहा टक्के दराप्रमाणे कपात करण्याचे पणन मंडळाच्या बैठकीत गुरुवारी निश्चित करण्यात आले. तथापि, आडते असोसिएशनने आठ टक्केच कपात करणार असल्याचे जाहीर केल्याने आडत नेमकी किती कापायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

येत्या ५ मे रोजी होणार ‘नीट’ परीक्षा

$
0
0
राज्यातील इंजिनीअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६ मे २०१३ रोजी प्रवेश परीक्षा (एमटी-सीईटी) होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत ही परीक्षा घेतली जाईल.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

$
0
0
ज्येष्ठ कवी, गीतकार सुधीर मोघे, प्रसिद्ध गायक रवींद्र साठे, ज्येष्ठ गायक पुरुषोत्तम कासलीकर यांच्यासह विविध कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या १२ व्यक्तींची निवड सांस्कृतिक पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे.

राजापूरलाही सापडली गूढ कातळ शिल्पे

$
0
0
कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर आढळणाऱ्या कातळ शिल्पांचे गूढ कायम असतानाच याच भागातील राजापूरच्या कातळावरही आता तब्बल चौदा चौरस किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत. मासे, जलकुंभ, जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती या कातळांवर कोरलेल्या आहेत.

बोचरे वारे नव्हे; ‘गरम हवाएँ’

$
0
0
ऐन थंडीच्या दिवसांमध्ये बोचऱ्या वाऱ्यांनी हवेत थंडावा निर्माण होण्याऐवजी ढगाळ हवेमुळे शहरातील हवा गरम झाल्याचा अनुभव पुणेकर घेत आहेत. शहरातील पारा गुरुवारी १७.९ अंशांवर स्थिरावला असून, आणखी दोन दिवस तरी किमान तापमान ‘जैसे थे’च राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

विशेष ‘अॅप’द्वारे ‘सवाई’ची माहिती

$
0
0
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे वेळापत्रक, कलाकार याबद्दलची खडानखडा माहिती दर्दी रसिकांना मोबाइलवर सहज उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष ‘अॅप्लिकेशन’ तयार करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षांत बदलाची शिफारस

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवांच्या परीक्षा अधिक कालसुसंगत करण्यासाठी त्याच्या स्वरूपात आमुलाग्र बदल करण्याच्या शिफारशी डॉ. अरुण निगवेकर समितीने केल्या आहेत.

आम्ही हतबल, असहाय...

$
0
0
देशातील नागरी सहकारी बँकांना सरसकट ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी ब्रिटन सरकारवर दबाव आणण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक, ब्रिटिश उच्चायुक्तालय यांच्याकडे मदत मागितली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही साकडे घातले; पण त्यातून काही साध्य झाले नाही. आता फक्त कोर्टाची पायरी चढणे, बाकी आहे; पण कायदेशीर अडचणी लक्षात घेता, त्यातून हाती फारसे लागण्याची शक्यता कमीच आहे...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images