Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आडतीच्या अभ्यासासाठी आता समिती

0
0
आडते आणि बाजार समितीच्या प्रशासनाची पणनमंत्र्यांकडे झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे राज्यभरातील आडतीच्या दरांचा अभ्यास करण्यासाठी आडते, बाजार समिती आणि पणन संचालकांचे प्रतिनिधी अशा सतरा जणांची एक अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डेंगीचा आणखी एक बळी

0
0
डेंगीमुळे पर्वती दर्शन येथील एका तरुणाचा केईएम हॉस्पिटलमध्ये मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. आतापर्यंत शहरातील डेंगीच्या मृतांची संख्या अकरा झाली आहे.

भाजी विसरा अन् कांदा-लिंबूही लिमिटेड...

0
0
भाजीऐवजी दाल फ्राय..., कांदा-लिंबू लिमिटेड... आणि फळांचा ज्यूस शिल्लक नाही...! आडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील हॉटेलांमध्ये अशी परिस्थिती ओढावली आहे. आडत्यांच्या या बंदमुळे फळे आणि भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेकडो हॉटेलांमधील मेन्यू मंगळवारपासून बदलू लागला आहे.

वाहतूक नियमावलीबाबत शाळा अनभिज्ञ

0
0
चिमुरड्यांच्या सुर‌क्षिततेसाठी राज्य सरकारने वाहतूक नियमावली अमलात आणली खरी, मात्र शाळा व्यवस्थापन अजूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत बेफिकीरच असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक शाळांभोवती संरक्षित भिंतच उभारली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. शाळांच्या निष्काळजीपणामुळेच विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

‘ईशान्ये’ला वाचविण्यासाठी केंद्रावर दबाव आणा

0
0
भारत दौ-यादरम्यान ईशान्य भारतातील प्रश्नांबाबत जनजागृती करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे. ‘आसामसह ईशान्येकडील नैसर्गिक संपत्तीचाही नाश होत आहे. त्याबाबत केंद्र सरकार गंभीर नाही. त्यासाठी केंद्रावर दबाव टाकला पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी येथे केले.

‘LBT’ने वाढणार फ्लॅटच्या किंमती

0
0
महापालिका क्षेत्रातील जकात कर रद्द करून स्थानिक संस्था कर म्हणजेच (एलबीटी) आकारण्याची पुण्यात अंमलबजावणी करायचे ठरल्यास पुण्यातील फ्लॅटच्या किंमती आणखी वाढणार आहेत. कारण एलबीटीच्या नियमावलीनुसार फ्लॅट किंवा जमिनीची खरेदी-विक्री करताना मुद्रांक शुल्काबरोबरच एक टक्का एलबीटी आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

...तर कडक कारवाई करू

0
0
‘बाजार बंद’मुळे बाजार समितीच्या आवारात फळभाज्या विकणा-या शेतक-यांनाच दमदाटी देऊन त्यांना हुसकावून लावण्याचे काही प्रकार मंगळवारी (६ डिसेंबर) घडले. दरम्यान, मार्केटयार्डमध्ये पुरेसा बंदोबस्त असून, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे पोलिसांनी बजावले आहे.

नर्सरी, केजीच्या प्रवेशांना ब्रेक!

0
0
वंचित आणि दुर्बल घटकांमधील मुलांना शालेय प्रवेशामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीला खासगी शाळांकडून हरताळ फासला जात असल्याने, नर्सरी व केजीच्या प्रवेशप्रक्रिया थांबविण्याचा आदेश राज्याचे शिक्षण संचालकांनी दिले आहेत. या कारवाईमुळे प्रवेशप्रक्रियांविषयी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकिरा कुरोसावांचे दुर्मिळ चित्रपट पाहण्याची संधी

0
0
भारत-जपान राजनैतिक संबंधांच्या हीरक महोत्सवानिमित्त प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे दुर्मिळ पंधरा चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. नऊ ते १३ डिसेंबर दरम्यान हे चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळू शकेल.

सवाईत ‘षड्ज’, ‘अंतरंग’ची पर्वणी

0
0
शास्त्रीय संगीतातील प्रख्यात कलावंतांच्या गायनासह यंदाही कलावंतांचे लघुपट पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी रसिकांना ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त मिळणार आहे. ‘षड्ज’ हा लघुपट महोत्सव आणि ‘अंतरंग’ हा कलावंतांशी संवादात्मक कार्यक्रम १२ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार आहे.

सह्याद्रीच्या अभयारण्यात ‘वनखात्या’सह पदभ्रमंती

0
0
पश्चिम घाटात लपलेल्या रहस्यमय वाटांमधून भटकणा-या गिर्यारोहकांसाठी ‘सह्याद्रीच्या अभयारण्यातील पदभ्रमंती’ हा अनोखा उपक्रम वनविभागातर्फे सुरू झाला आहे. येत्या शुक्रवारी भीमाशंकर अभयारण्यातून या उपक्रमाची सुरुवात होणार असून, ‘भीमाशंकर- कलावंतीणी महाल- सिद्धगड- गोरखगड ते आहुपे’ असा पहिला ट्रेक मार्गस्थ होणार आहे.

अंतराळ संशोधनावर उद्या तंत्रज्ञान परिषद

0
0
संरक्षण आणि अंतराळ संशोधनातील निरनिराळ्या पैंलूंविषयी चर्चा करण्यासाठी पाषाण येथील शस्त्र संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (एआरडीई) आठव्या राष्ट्रीय अंतराळ तंत्रज्ञान परिषदेचे गुरुवारी ( ६ डिसेंबर) आयोजन करण्यात आले आहे.

जादा व्याजाच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

0
0
जादा व्याजदराच्या आमिषाने शिरुर तालुक्यातील एका नागरिकाची साडेचौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अपघातात दुचाकीस्वार ठार

0
0
हिंजवडी परिसरातील मारुंजी रोडवर रविवारी सायंकाळी दोन दुचाकींच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘LBT’ला पूना मर्चंट्स चेंबरचा विरोध

0
0
जकातीला पर्याय म्हणून राज्य सरकारने येत्या एक एप्रिल २०१३ पासून पुण्यासह पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर आदी महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कराची (एलबीटी) अंमलबजावणी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला दि पूना मर्चंट्स चेंबरने तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात येत्या १२ डिसेंबर रोजी व्यापा-यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

‘क्लिनिकल एस्टॅबिलिशमेंट’ला ‘IMA’चा विरोध

0
0
लहान, मध्यम स्वरूपाच्या हॉस्पिटलच्या रजिस्ट्रेशनपासून ते पेशंटच्या रजिस्ट्रीपर्यंतची माहिती संकलित करण्याची डोकेदुखी, त्यामुळे पेशंटच्या खिशावर पडणारा मोठा भुर्दंड, तपासणीतील त्रुटींमुळे सोसावा लागणारा दंड यासारख्या जाचक अटींमुळे प्रस्तावित ‘क्लिनिकल एस्टॅबिलिशमेंट’ कायद्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बंडाचे निशाण फडकविले आहे.

भाजप महिला आघाडीची राज्यव्यापी संग्राम यात्रा

0
0
महागाई, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अन्यायाच्या विरोधात प्रदेश भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने बुधवारपासून राज्यव्यापी संग्राम यात्रा काढण्यात येणार आहे. पुण्यात बुधवारी या यात्रेला प्रारंभ होणार असल्याची माहिती महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मेधा कुलकर्णी यांनी दिली.

नाणेघाटात उभे राहणार पवनचक्क्यांचे जाळे

0
0
नाणेघाटाच्या ऎतिहासिक परिसरावर पवनऊर्जा कंपन्यांची वक्रदृष्टी झाली आहे. पश्चिम घाटाचा अविभाज्य घटक असलेल्या नाणेघाट आणि परिसरातील डोंगररांगांवर लवकरच मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांचे जाळे उभे राहणार आहे.

आळंदीत भरणार सहिष्णुता सप्ताह

0
0
श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीतर्फे सहा ते बारा डिसेंबर दरम्यान आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ७१६ व्या संजीवन सोहळ्यानिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

एलकुंचवार, बोकील यांना ‘जीए’ पुरस्कार

0
0
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना पाचवा ‘प्रिय जी.ए’ सन्मान जाहीर झाला आहे. तर लेखक मिलिंद बोकील यांना ‘प्रिय जी.ए. कथाकार’ पुरस्कार देण्यात येणार आहे. १० व ११ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणा-या पाचव्या ‘प्रिय जी.ए’ महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images