Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शरद पवार यांचा आरोप चुकीचा

$
0
0
देशात शुद्ध सोन्याच्या विक्रीच्या नावाखाली सराफांकडून दर वर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक होत असल्याच्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विधान चुकीचे असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने केला आहे.

अजय व्हर्सेस शेरखान

$
0
0
आगामी ‘हिंम्मतवाला’मध्ये अजय देवगण चक्क वाघाबरोबर फायटिंग सीन देणार आहे. त्यासाठी सिनेमाची टीम लवकरच मॉरिशसला रवाना होतेय. अॅक्शन मास्टरच्या यादीत अजय देवगणला सध्या तोड नाही. ‘सन ऑफ सरदार’नंतर हा पठ्ठ्या आगामी सिनेमात कोणत्या अॅक्शनमध्ये स्वतःला आजमावणार, याची उत्सुकता तमाम चाहत्यांना लागून राहिली आहे.

‘पृथ्वी’ गोळीबाराचा तपास सुरू

$
0
0
कर्वेरोडवरील हॉटेल ‘पृथ्वी’वर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला चोवीस तास उलटून गेले तरी तपास पुढे सरकलेला नाही. मात्र, पोलिसांचे पथक पुण्याबाहेर रवाना झाले असून, संशयितांकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सोमवारी रात्री सांगितले.

१.५ वर्षे प्रस्ताव बासनात पडून

$
0
0
समाविष्ट गावांमधील प्रमुख रस्ते दीडपट रूंद करण्याच्या प्रस्तावास अखेर महापालिकेत ‘डीम्ड सँक्शन’ मिळाले आहे. स्थायी समितीने गेले दीड वर्ष हा प्रस्ताव अनिर्णित अवस्थेत ठेवल्याने कायद्यानुसार तो परस्पर मान्य करण्याची प्रक्रिया आयुक्तांनी अवलंबिली आहे.

मागण्यांसाठी ITI चे आंदोलन

$
0
0
राज्यातील खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना (आयटीआय) इतर राज्यांच्या धर्तीवर अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी खासगी आयटीआय कर्मचारी व संस्थाचालक येत्या बुधवारी(पाच डिसेंबर) मुंबईत धरणे आंदोलन करणार आहेत.

शि-या-आबांची जोडी पुन्हा जमणार

$
0
0
शि-या आणि आबा या लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारणारे विकास कदम आणि दिलीप प्रभावळकर ‘नारबाची वाडी’ या सिनेमात प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या गाजलेल्या मालिकेतील आबा आणि शि-या या लोभसवाण्या आणि लोकप्रिय भूमिकांतील अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि विकास कदम मालिकेनंतर प्रथमच एकत्र एकत्र येत आहेत.

६ वर्षांच्या मुलीचा पित्याकडून खून

$
0
0
मानसिक स्थिती ढासळलेल्या बापाने स्वत:च्या सहा वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास येरवडा येथे घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

ब्लॅकलिस्ट करण्याचा मनपाला अधिकार नाही

$
0
0
एखाद्या आर्किटेक्टला कौन्सिल ऑफ आर्किटेक्टचरने (सीओए) सदस्यत्व दिल्यानंतर संबंधित आर्किटेक्ट देशभरात कुठेही व्यवसाय करू शकतो. त्यानंतर कोणतीही महापालिका आर्किटेक्टला व्यवसाय करण्यापासून रोखू शकत नाही, असा दावा ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट’ (आयआयए) च्या पुणे शाखेतर्फे मंगळवारी करण्यात आला.

बनावट नोटांप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

$
0
0
पंचवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील तिघांना सहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी हा निकाल दिला.

अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोप सिद्ध

$
0
0
पिंपरी चिंचवड येथील एका उद्योजकाच्या मुलाचे अपहरण करून खंडणीची रक्कम घेऊन त्याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी सहा आरोपींना मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. पी. तावडे यांनी मंगळवारी दोषी ठरविले.

स्फोटासाठी बेगला आठ हजार युरो

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी आरोपी मिर्झा हिमायत बेगला श्रीलंकेतील कोलंबो येथे आठ हजार युरोची मदत फरारी आरोपी झबीउद्दीन अन्सारी आणि फय्याज कागझी यांच्याकडून मिळाली होती. बेग हा मार्च २००८ मध्ये दोन आठवड्यांसाठी कोलंबोत गेला होता. तिथे बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

विमानतळावर आगीचे मॉकड्रिल

$
0
0
लोहगाव विमानतळावर हवाई दलातर्फे गवत पेटवून मॉकड्रिल घेण्यात आले. विमानतळाच्या टेक्निकल एरियाच्या परिसरात आग लावण्यात आली होती. दहशतवादी हल्ले तसेच आपत्कालीन काळातील ‘रिपॉन्स’ तपासण्यासाठी हे मॉकड्रिल घेण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

FTII च्या कर्मचा-यांचा नियोजित संप स्थगित

$
0
0
कर्मचा-यांच्या थकित ‘फॅमिली पेन्शन’च्या मागणीसाठी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) कर्मचारी संघटनेतर्फे पुढील आठवड्यापासून करण्यात येणारा बेमुदत संप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या आश्वासनामुळे मागे घेण्यात आला आहे.

‘BSNL’ हेल्पलाइनला हवे मदतीचे ‘कनेक्शन’

$
0
0
ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी किंवा त्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी उपलब्ध असलेला ‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (बीएसएनएल) हेल्पलाइन क्रमांकालाच (१५००) गेल्या दहा दिवसांपासून ‘हेल्प’ची गरज आहे. ग्राहकांकडून या क्रमांकावर केला जाणारा संपर्क कोणत्याही प्रतिसादाअभावी पूर्णच होत नसल्याची तक्रार केली जात आहे.

दहशतवादी संघटनांमध्ये महिलेकडून भरती

$
0
0
‘इंडियन मुजाहिदीन’ (आयएम) आणि ‘लष्करे तय्यबा’ या दहशतवादी संघटनांनी ‘रिक्रूटमेंट’साठी शाहीन नावाच्या एका महिलेला नेमले असल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणांसमोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुणे आणि मराठवाड्यात या महिलेचा शोधही घेण्यात येत आहे. दहशतवादी संघटनांनी प्रथमच अशा प्रकारे एका महिलेला सामील केल्याने गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे.

कार्गो हब उभारणीचा मार्ग सुकर

$
0
0
लोहगाव विमानतळाजवळ कार्गो हबसाठी सुमारे आठ एकर जागा निश्चित झाल्याने कार्गो हब उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे. त्यासाठीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना जिल्हाधिका-यांनी एअरपोर्ट अॅथॉरिटीला केली आहे.

शुद्ध सोन्यावरून पवार-सराफ यांच्यात जुंपली

$
0
0
‘शुद्ध सोन्याच्या विक्रीच्या नावाखाली सराफांकडून दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक होत असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सिद्ध करावे, अन्यथा आपले विधान बिनशर्त मागे घ्यावे,’ असे आव्हान महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने दिले आहे.

बजेटला ६८ कोटींची कात्री

$
0
0
शिक्षण मंडळाने सादर केलेल्या बजेटला महापालिका प्रशासनाने ६८ कोटी रुपयांची कात्री लावल्याचे समजते. शिक्षण मंडळातील नियोजित भरती आणि काही योजनांना यामध्ये कात्री लावण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.

‘CBI’ला येरवड्यात हक्काचे कार्यालय

$
0
0
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) येरवडा येथील अत्यंत मोक्याचा शासकीय भूखंड आता हक्काच्या कार्यालयासाठी मिळणार आहे. ही जागा सीबीआयला देण्यास हिरवा कंदिल मिळाला असून, मोजणीनंतर सीबीआयला लवकरच जागेचा ताबा दिला जाणार आहे.

बाजार बंदच; भाज्या कडाडल्या

$
0
0
आडतीच्या दरावरून चौथ्या दिवशीही गुलटेकडी मार्केट यार्डातील बाजार बंदच राहिला. बंदमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत, किरकोळ विक्रेत्यांकडून फळभाज्यांची चढ्या भावाने विक्री होत असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाचा फटका बसत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images