Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

निविदेच्या गुगलीवर सीएमचा मास्टरस्ट्रोक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान पाणी पुरवठा योजनेच्या वादग्रस्त​ निविदा रद्द करण्याचा निर्णय घेऊन आपणच पुण्याचे कारभारी असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. तसेच, योजनेच्या ४५५ कोटी रुपयांच्या वाढीव दराने आलेल्या वादग्रस्त निविदा रद्द करून पारदर्शक कारभाराची चुणूकही दाखवून दिली.
समान पाणी पुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेने कर्जरोखे उभारून ती प्रतिष्ठेची केली होती. या कामासाठी काढण्यात आलेल्या १७१८ कोटी रुपयांचे नियोजन असलेल्या निविदा ४५५ कोटी रुपयांनी वधारल्या. या निविदा संगनमताने काढण्यात आल्याचा दावा करून पुणेकरांचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा सातत्याने आरोप होत होता. तरीही पालिका प्रशासन, सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी याबद्दल चकार शब्दही बोलायले तयार नव्हते.
पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी या निविदा मंजूर होण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याची तयारी केली होती. या निविदांमुळे पालिकेचे नुकसान होणार असल्याने त्या मंजूर करू नयेत, यासाठी पालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन उभारले. अतिवरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये त्यावरून शीतयुद्धही सुरू झाले होते. या युद्धात काही पदाधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
विरोधकांनी या निविदा रद्द करण्यासाठी दुखावल्या गेलेल्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन निविदांना सातत्याने लक्ष्य केले. परिणामी, वाढीव निविदांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेणे भाग पडले. मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांचे हित जोपासून फेरनिविदा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निविदा रद्द करीत असल्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करण्याचा दिलेला शब्द पाळून आपणच पुण्याचे कारभारी असल्याचेही दाखवून दिले.

दोनशे कोटींच्या व्याजाचा भुर्दंड
महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी (२४ बाय ७) मोठा आटापिटा करून दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे काढले असतानाच, आता संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागणार असल्याने त्याच्या व्याजाचाही भुर्दंड पालिकेवर पडणार आहे. साठवण टाक्या वगळता इतर सर्व प्रक्रिया पुन्हा होणार असल्याने चालू आर्थिक वर्षात दोनशे कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता धूसर असून, त्यावर दर महा तीन कोटी रुपयांचे व्याज मात्र पालिकेला भरावे लागणार आहे.
पाणीपुरवठा योजनेसाठी दोन हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपयांचे रोखे काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत मुंबईत मोठा समारंभ झाला. या रोख्यांचे पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. पाइपलाइन आणि वॉटर मीटरची टेंडर उघडण्यात येणार असल्याने त्यासाठीच्या कामांना हा निधी वापरता येईल, अशी पालिकेची योजना होती. दुर्दैवाने, संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा राबविण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी तीन ते चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर, प्रत्यक्ष कामे सुरू होतील. त्यामुळे, येत्या वर्षात तरी दोनशे कोटी रुपये खर्ची पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तरीही, हे पैसे पालिकेच्या खात्यात जमा झाल्यापासून त्याचे व्याज सुरू झाले असून, पैसे खर्च न करताच व्याजापोटी सुमारे २०-२५ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहगड घाट रस्ता आठ ​दिवस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगडाच्या घाटरस्त्यावर दरड कोसळल्यामुळे राडारोडा हटविण्याचे काम सुरू असून, ते काम पूर्ण होईपर्यंत आणखी आठ दिवस हा रस्ता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. या आदेशाचे वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सिंहगडावर धारजाई मंदिराच्यापुढे सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर गेल्या रविवारी दुपारी दरड कोसळली. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी; तसेच सुट्टीच्या दिवशी​ सिंहगडावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यातच पुन्हा दरड कोसळल्यास मोठ्या प्रमाणात ​हानी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर किल्ल्याच्या पायथ्यापासून ते गडापर्यंतचा रस्ता आठ दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे सध्या येथील राडारोडा हटविण्याचे काम सुरू आहे.
आदेशाची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अंमलबजावणीत कसूर झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्था कायदा २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही राव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पसंतीक्रमासाठी नव्याने अर्ज करता येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीअखेर ५१, ३४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, अद्याप २९,५६० विद्यार्थी प्रवेशापासून दूर आहेत. प्रक्रियेची चौथी आणि शेवटची फेरी गुरुवारपासून सुरू झाली. त्यात उपलब्ध रिक्त जागा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या जागांसाठी आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यत पसंतीक्रम तसेच नव्याने अर्ज करता येणार असल्याची माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली. या फेरीची गुणवत्ता यादी रविवारी जाहीर होणार असून, सोमवारपासून पासून प्रवेशाला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांचे गुण आणि ठरावीक कॉलेजांनाच पसंती यामुळे नामांकित कॉलेजांचे कट ऑफ कायम आहेत. त्यामुळे कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजांमधील प्रवेश सध्या दुरापास्त आहे. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती https://pune.11thadmission.net या वेबसाइटवर मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहीम बारगळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मे महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कमवा व शिका आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यापीठातील वसतिगृह, कँटिन व परिसरात सकाळी सात ते नऊ दरम्यान स्वच्छता मोहीम राबवित होते. विशेष म्हणजे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे सहभागी होत होते. मात्र, नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या कार्यकाळात ही मोहीम बारगळली आहे.

विद्यापीठातील स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि विद्यापीठाचा परिसर देखील स्वच्छ राहावा या उद्देशाने माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या काळात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी विद्यापीठात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत होती. कमवा व शिका तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील वसतिगृहे, कँट‌िन, विद्यापीठातील महत्त्वाचा परिसर याची स्वच्छता मोहिम राबविण्यात येत होती. यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच माजी कुलगुरू डॉ. गाडे यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायचे. त्यामुळे विद्यापीठातील परिसर स्वच्छ राहत होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये देखील स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण व्हायची.

मात्र, डॉ. गाडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कुलगुरू डॉ. करमळकर यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी १८ मे रोजी विद्यापीठाचा कारभार आपल्या हाती घेतला. मात्र, त्यानंतर त्यांच्या काळात ही स्वच्छता मोहीम बारगळली असून बंद पडली आहे. त्यामुळे विद्यापीठात सध्या अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे डॉ. करमळकर यांना स्वच्छतेविषयी काही वावडे आहे का, असा सवाल आता विद्यार्थ्यांना पडला आहे. याविषयी डॉ. करमळकर म्हणाले,‘ मी सध्या विद्यापीठात राहत नाही. त्यामुळे मला या मोहिमेत सहभागी होता आले नाही. विद्यापीठात राहण्यास आल्यानंतर मी या मोहिमेत सहभागी होणार आहे.’

स्वच्छतेत क्रमांक घसरणार?

देशातील विद्यापीठे आणि कॉलेजांच्या शैक्षणिक व संशोधनातील गुणवत्तेनुसार त्यांची ‘एनआयआरएफ’ क्रमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केली. त्याचप्रमाणे आता शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील स्वच्छतेनुसार त्यांची क्रमवारी (स्वच्छता रँकिंग) जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून स्वच्छ कॉलेज अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार ही क्रमवारी जाहीर करण्यात येणार आहे. परिसरातील स्वच्छतेला ८५ टक्के आणि स्वच्छतेच्या प्रसारासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना १५ टक्के गुण देण्यात येणार आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अस्वच्छता असल्यास देशात शैक्षणिक गुणवत्तेत दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या विद्यापीठाचा क्रमांक स्वच्छतेत घसरण्याची शक्यता आहे.


मॅनेजमेंट कोट्याचे आमिष

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेत अंतिम वर्षाच्या निकालात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल एक महिन्यानंतर येणार आहे. अशातच नामवंत कॉलेजांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (मास्टर्स) प्रवेश घेण्याची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आहे. याच संधीचा फायदा शहरातील ‘नामवंत’ कॉलेज प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सामान्य प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेऊन ठेवा, असे आमिष कॉलेज प्रशासनाकडून दाखविण्यात येत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

विद्यापीठाच्या विज्ञान, कला, वाणिज्य अशा विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमांचा निकाल जून महिन्यात जाहीर झाला. यामध्ये अंतिम वर्षाला असणारे अनेक विद्यार्थी काही गुणांच्या फरकाने एक ते दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामु‍ळे या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या उत्तरपत्रिका अर्जाद्वारे मागविल्या. या प्रती विद्यापीठाकडून येण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागला. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार त्यांना या प्रती २० जुलैच्या पुढे मिळाल्या आहेत. या छायांकित प्रतींमध्ये विविध कारणांनी विद्यार्थ्यांचे गुण वाढत असल्याचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मात्र, या पुनर्मूल्यांकनाचा निकाल येण्यासाठी साधारण एका महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

अशा परिस्थितीत नामवंत कॉलेजांमध्ये विद्याशाखेत विविध अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर पदवीला (मास्टर्स) प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पदवीच्या अंतिम वर्षात अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, हा निकाल येईपर्यत कॉलेजांची ‘मास्टर्स’ला प्रवेश घेण्याची प्रवेश प्रक्रिया संपणार आहे. त्यामुळे पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, हे स्पष्ट होत आहे. याचाच फायदा शहरात मध्यवर्ती भागात असणाऱ्या कॉलेजांकडून घेण्यात येत आहे. पुनर्मूल्यांकनाचा निकाल येईपर्यत कॉलेजांमधील प्रवेश प्रक्रिया संपणार आहे. तसेच, तुम्हाला हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे पेसै भरून मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेऊन ठेवा, असे आमिष कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना दाखविण्यात येत आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

निकाल दहा दिवसात लावण्याची मागणी


विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनाचा निकाल येण्यासाठी सुमारे ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे.या निकालात आम्ही उत्तीर्ण झाल्यावर आम्हाला शहरातील कोणते कॉलेज मास्टर्सला प्रवेश देणार आहेत, याबाबत विद्यापीठाने स्पष्टीकरण द्यावे. कॉलेज प्रशासनाकडून आम्हाला पैसे भरून मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाचा निकाल दहा दिवसात लावल्यास आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटू शकतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जायका’साठी आता नवा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील मुळा-मुठा या नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ‘जायका’ प्रकल्पाच्या कामाला आता १५ सप्टेंबरचा नवा मुहूर्त मिळाला आहे. ऑगस्टअखेरपर्यंत या कामासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर सप्टेंबरपासून प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

शहरातील नद्यांचे प्रदूषण दूर करण्यासाठी ११ नव्या जलशुद्धीकरण केंद्र आणि त्या अनुशंगाने आवश्यक पाइपलाइन टाकण्याच्या प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिली. या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी, ‘जायका’कडून कर्ज ९०० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध होणार असून, उर्वरित खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सल्लागार नियुक्तीचे काम रखडले असल्याने हा प्रकल्प पुढे सरकला नव्हता. अखेर, सल्लागार नियुक्तीची सर्व प्रक्रिया ऑगस्टअखेर पूर्ण करण्याचे संकेत राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने (एनआरसीडी) दिल्याचे स्पष्टीकरण खासदार अनिल शिरोळे यांनी दिले. शहराच्या काही प्रलंबित प्रश्नांबाबत शिरोळे यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत जायकाचे काम सुरू होणार असल्याचा निर्वाळा देण्यात आला. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, आयुक्त कुणाल कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

शहराची भूजल पातळी वाढवण्यासाठी अस्तित्वातील सर्व खासगी आणि सार्वजनिक विहिरींचे संवर्धन करण्याची सूचना शिरोळे यांनी केली. या सर्व विहिरींच्या सर्वेक्षणासाठी लवकरच स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी या वेळी दिले. पाषाण तलावाच्या शुद्धीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ऑगस्टमध्ये पहिली यादी

प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत महापालिकेकडे तब्बल एक लाख अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जांची छाननी सध्या सुरू असून, आत्तापर्यंत १२ हजार अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. ऑगस्टमध्ये त्याची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपी रोडवर ‘शांतता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवात वादन करणाऱ्या नामवंत ढोल पथकांचे हक्काचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या म्हात्रे पूलालगत असलेल्या डीपी रस्त्यावरील ढोलांचा आवाज कमी झाला आहे. रस्त्यावर असलेल्या कार्यालयांवर महापालिकेकडून कारवाई सुरू असल्याने कार्यालयांमध्ये सराव करणाऱ्या अनेक पथकांनी आपले सराव अन्य ठिकाणी हलवले आहेत. त्यामुळे, डीपी रस्त्यावर काही प्रमाणात शांतता पसरली असून सिंहगड रस्ता आणि सातारा रस्ता पथकातील वादकांचे नवे कट्टे होऊ लागले आहेत.

गणेशोत्सवाच्या आधी महिनाभर डीपी रस्त्यावर अनेक पथकांचे सराव सुरू असतात. सायंकाळी या परिसरात तरुणाईचे अनेक कट्टे रंगतात. सरावासाठी हजारोंच्या संख्येने वादकांची रेलचेल या रस्त्यावर असते. सध्या मात्र, चित्र काहीसे वेगळे असून महापालिकेच्या कारवाईमुळे अनेक पथकांनी आपले सराव उपनगरांमध्ये सुरू केले आहेत. काही मोजकीच पथके या रस्त्यावर सराव करीत आहेत.

महापालिकेने कार्यालयांनी केलेले बांधकाम काढून टाकण्यास सांगितल्याने पथकांवर पावसात सराव करण्याची वेळ आली होती. सरावामध्ये सातत्याने खंड पडत असल्याने पथकांनी अखेर दुसरीकडे सराव करण्याचा निर्णय घेतला असून सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, वारजे अशा उपनगरांमध्ये पथकांनी पर्यायी जागा शोधून सराव सुरू केले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून डी-पी रस्त्यावरील पथकांना अनेक अडचणी येत होत्या. आवाजाच्या त्रासामुळे नागरिकांकडून सतत पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींमुळे अनेकवेळा पथकांचे सराव बंद करण्यात येत होते. यंदा कार्यालयांवरच कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने पथकांनाही सरावाचे ठिकाण बदलणे भाग पडले. त्यामुळे, आता सिंहगड रस्त्यावरील राजारामपूलाचा परिसर आणि सातारा रस्त्यावरील मार्केटयार्ड, बिबवेवाडीच्या परिसरात पथकांनी सराव सुरू केले आहेत. आजूबाजूला फारशी लोकवस्ती नसल्याने सरावामध्ये अडथळा येत नसल्याने पथकांनी त्यांचे सराव उपनगरांमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

कुंभारवाड्यात लगबग

हडपसर : गणेश उत्सवाची लगबग केशवनगरमध्ये सुरू झाली आहे. संपूर्ण कुंभारवाड्यातील मूर्तिकाराच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य मूर्ती पूर्ण करण्यात मग्न झाला आहे. अंदाजे पन्नास हजार गणपती मूर्तिशाळेत तयार केले जात आहेत. यामध्ये पाच फुटांच्या शाडूच्या मातीच्या दगडूशेठ गणपती मूर्तीची ठरली आकर्षण आहे. साच्याचा वापर न करता हाताने केलेल्या मूर्तीचे कौतुक केले जात आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, हैद्राबाद येथे केशवनगर कुंभारवाड्यातील मूर्ती पाठवण्यात येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या मूर्ती तयार होत आहेत.

महापालिकेने कसबा पेठ येथील कुंभारवाड्याचे पुनर्वसन केशनवनगर येथील गायरान जागेवर केले होते. पारंपरिक गणपती मूर्ती बनवणारे कारागीर केशवनगरला मोठ्या प्रमाणात आहेत. कुंभारवाड्यात ६२ कारखाने असून, २५० च्या वर कारागीर गणपती बनवण्यात व्यस्त आहेत. बाहुबलीच्या रूपातील गणपती मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहेत. प्रवीण बावधनकर हा युवक युवकाने शाडूच्या मातीची पाच मूर्ती हाताने बनवत आहे. प्रवीण म्हणाला, ‘गणेशमूर्तीचे बुकिंग जोरा सुरू असून, शाडूच्या मूर्तींना मागणी वाढत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुम्ही कोण’ विचारणारे तुम्ही कोण?

$
0
0

विक्रम गोखले यांचा परखड सवाल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशाच्या घटनेने मला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा अधिकार दिला आहे. ‘भारताविरोधात बोलणाऱ्यांना फाशी द्यायला हवी’, या माझ्या वक्तव्यावर अनेकांनी ‘फाशी द्यायला सांगणारे तुम्ही कोण’ असा प्रश्न मला विचारला गेला. पण मला हा प्रश्न करणारे तुम्ही कोण?, असा उलट सवाल मी त्यांना करतो,’ असे सांगून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी टीकाकारांना लक्ष्य केले.
क्रीडामहर्षी हरीभाऊ साने प्रतिष्ठानतर्फे गोखले यांना ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते क्रीडामहर्षी हरीभाऊ साने कला व क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी गोखले यांनी चौफेर फटकेबाजी करून टीकाकारांवर ताशेरे ओढले. भारताच्या विरोधात बोलणाऱ्यांना फाशीच द्यायला हवी, या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात अभिनेता सुव्रत जोशी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनाही मोघे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब साने, डॉ. आरती दातार आदी या वेळी उपस्थित होते.
गोखले म्हणाले, ‘मी सैनिकी जीवन जवळून पाहिले आहे. त्यांच्या बरोबर राहिलो आहे. सैनिक सीमेवर पैसे कमावण्यासाठी जात नाहीत. घरदार, परिवार सोडून ते देशाचे रक्षण करण्यासाठी जातात. काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक केली जाते. पण ते शांतपणे सहन करतात हीच सर्वात मोठी सहिष्णूता आहे. दुसरीकडे देशात असहिष्णूता पसरली आहे, असा आव आणून काही साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचे नाटकही केले. त्यांना पुरस्कार देणे हीच चूक होती.’
‘माझ्या देशात रहायचे, इथेच खायचे,प्यायचे आणि देशाच्या विरोधात घोषणा द्यायच्या, अशांना फासावर लटकवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. माझ्या या विचारांमुळे अनेकदा मी टीकेचे लक्ष्य झालो. काहींनी मला ‘अभिनय म्हणजे काय असतो, ते जरा शिका,’ असे सल्लेही दिले. मला माझे मत मांडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. घटनेने मला तसा अधिकार दिला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एकीकडे राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर फटकेबाजी करत असताना दुसरीकडे गोखले यांनी सुव्रत जोशी या नवोदित अभिनेत्याला अभिनयाच्या टीप्सही दिल्या. ‘अभिनेत्याने इतके खोटे काम करावे, की ते खरे वाटायला हवे, रोजचे जगणे रंगमंचावर मांडले की अभिनय जमतो,’ असे त्यांनी सांगितले. सुव्रत एक गुणी कलाकार आहे त्याच्याबरोबर काम करायला आवडेल, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. श्रीकांत मोघे, सुनंदन लेले, सुव्रत जोशी यांनीही आपले विचार मांडले.
------------------------------
भारत- पाक सरकारवर टीका
काश्मीरचा प्रश्न ज्वलंत ठेवण्याचा काम दिल्ली आणि इस्लामाबादमधून सुरू आहे. अमेरिका त्याला खतपाणी घालण्याचे काम करते, त्यामुळे, तेथील जीवन विस्कळित झाले आहे. काश्मीरमध्ये सैनिकांचे नाहक बळी जात आहेत, असे सांगत गोखले यांनी दोन्ही भारत आणि पाकिस्तानच्या सरकारला धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाला शिस्त कधी लागणार ?

$
0
0


पुणे : दरड पडण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी सिंहगडावर जाणे टाळावे, पर्यटकांनी घाट रस्त्यात कोठेही गाडी थांबवू नये, असे वन विभागाने वारंवार आवाहन करूनही पर्यटकांनी गेल्या ‘विकेंड’ला स्वतःचा हट्टच पूर्ण केला. वन विभागाच्या नियमांना कचऱ्याची टोपली दाखवत ठिकठिकाणी गाड्या लावून घाटात फोटो काढणे, कड्यावर उभे राहून सेल्फी, डोंगराच्या सुळक्याशेजारी बेशिस्तपद्धतीने गाड्या लावणे असे सर्व प्रकार या पर्यटकांनी केले. सिंहगडावर वाढत असलेले पर्यटन असो, की खडकवासला चौपाटीवर होणारी वाहतुकीची कोंडी अथवा ताम्हिणीत मद्य धुंद पर्यटकांची हुल्लडबाजी ! दर वर्षी पावसाळ्यात दिसणाऱ्या या पर्यटनाला शिस्त कधी लागणार, हा प्रश्न यंदाही पुढे आला आहे.
पावसाचा आनंद लुटण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच दर शनिवारी आणि रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक भटकंतीसाठी बाहेर पडत असून, पुणे परिसरातील सर्व पर्यटनस्थळांमधील वाहतुकीच्या नियमांचे बारा वाजत आहेत. दर वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये हे पर्यटन उच्चांक गाठते. ‘आखाड पार्ट्यांसाठी’ बहुतांश लोक पर्यटनस्थळांचीच निवड करतात. त्यामुळे पुणे परिसरातील लोकप्रिय ठिकाणे अर्थातच सिंहगड, खडकवासला, पानशेत, मुळशी, ताम्हिणी आणि लोणावळा परिसरात लाखोंच्या संख्येने पर्यटकांची उपस्थिती पाहायला मिळते. सकाळी आठ-नऊपासून सुरू होणाऱ्या वर्दळीचे दुपारी गर्दीत रूपांतर होते आणि संध्याकाळी परतीच्या वेळेत वाहतुकीची कोंडी बघायला मिळते. दुदैवाने, या पर्यटनाची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही. अशा वेळी गावातल्या लोकांनाच रस्त्यावर येऊन कोंडी सोडवावी लागते. या कोंडीत एवढी गुंतागुंत असते, की एखाद्या पर्यटकाला अपघात झाल्यास त्या ठिकाणी अॅम्ब्युलन्सलाही जाणे शक्य होत नाही.
पावसाळा संपल्यानंतर पुढील वर्षीपासून आम्ही नियोजन करून पर्यटकांना शिस्त लावणार आहोत, असे उत्तर पोलिसांकडून ऐकायला मिळते. तर आमच्याकडे बंदोबस्तासाठी मनुष्यबळ नाही, अशी भूमिका वन विभागाची ठरलेली असते. हद्दीचा वाद घेऊन पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी वाद घालत बसतात आणि उपद्रवी पर्यटकांचे फावते.
या वर्षी देखील सिंहगडला आत्तापर्यंत पन्नास हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. लोणावळ्यातील विविध धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पंचवीस हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे. ताम्हिणी-मुळशी परिसरात पर्यटकांची जत्रा भरते आहे. तसेच पानशेत, लवासा, पाबेघाट या भागातही मोठ्या संख्येने पर्यटक जात आहेत. मात्र, सिंहगडावरील टोलनाक्याचा अपवाद वगळता इतर ठिकाणी पर्यटकांच्या गाड्या तपासल्या गेल्या नाहीत. लोणावळा परिसरातील धबधबे, ताम्हिणी-मुळशी मार्गावरील धबधब्याच्या परिसरात ऐन रस्त्यांवर तळीरामांच्या पार्ट्या रंगत आहेत. बेशिस्त पर्यटक रस्त्यावर कोठेही गाड्या लावून मोठमोठ्या आवाजांतील गाण्यांवर कपडे काढून बीभत्स नृत्य करताना दिसत असताना त्यांच्यावर कठोर कारवाई अद्याप झालेली नाही. या अनियंत्रित पर्यटनाला रोखण्यासाठी प्रशासन नियोजन आराखडा करण्यास इच्छुक नाही. मोठा अपघात घडल्यावरच स्थानिक चौकीतील पोलिस अथवा वन खाते जागे होणार का, हा प्रश्न रविवारी झालेल्या गर्दीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा परवाना अर्जांची सोमवारपासून छाननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा परवान्यासाठी तयार केलेली ऑनलाइन अर्जप्रणाली सोमवारपासून सुरू झाल्यानंतर तीन हजार जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्या अर्जदारांची कागदपत्र स्वीकृती आणि छाननी सोमवारपासून सुरू होणार आहे. दरदिवशी शंभर अर्जदारांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. अर्ज छाननीनंतर संबंधितांना रिक्षा परवान्याचे इरादापत्र घरपोच पाठविले जाणार आहे.
आरटीओ प्रशासनाने रिक्षा परवान्यासाठीच्या अर्ज प्रक्रियेसाठी दिल्ली येथील नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) मदतीने वेबसाइट तयार केली आहे. गेल्या आठवड्यात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या वेबसाइटचे उद्‍घाटन झाले. तेव्हापासून त्या वेबसाइटला तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागत असून, अर्ज प्रक्रिया सातत्याने ठप्प होत आहे. मात्र, आतापर्यंत तब्बल तीन हजार इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. या अर्जदारांना आता त्यांच्या मोबाइल क्रमांकावर अपॉइंटमेंटचा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे. या एसएमएसद्वारे त्यांना अर्ज व कागदपत्रांच्या छाननीसाठी बोलाविले जाणार आहे. संबंधितांनी आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत बाळगावीत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिले.

रिक्षा चालकांनी घाबरू नये
रिक्षा परवान्यासाठीचा अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. वेबसाइट बंद पडणे, पैसे जमा न होणे, पैसे जमा झाल्याची पावती न मिळणे, अशा अनेक अडचणी शुक्रवारीदेखील उद्‍भवल्या आहेत. त्यामुळे अनेक जण एकापेक्षा अधिक वेळा पैसे जमा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारांमुळे इच्छुकांनी घाबरून जाऊ नये. संबंधितांनी पैसे भरले आहेत, परंतु त्यांना त्याची पावती मिळाली नसेल, तरीही आम्ही कागदपत्रे स्वीकारताना पैसे जमा झाल्याचा ‘मेसेज’ ग्राह्य धरणार आहोत. त्यामुळे कोणत्याही रिक्षा चालकाचे पैसे बुडणार नाहीत. तसेच, सर्वांना रिक्षा परवाना मिळणारच आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही, असे स्पष्टीकरण बाबासाहेब आजरी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेल गायकीत रंगले रसिक

$
0
0

सावनी शेंड्ये, जयतीर्थ मेवुंडी यांना उस्फूर्त दाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भजन अशा विविध संगीतप्रकारांच्या स्वरमंचावरील स्वरमयी संध्येची अनुभूती रसिकांनी घेतली. कसदार गायन आणि संवादिनी, तबला यांची दमदार साथ यांचा सुरेख संगम रसिकांनी सूर संगम या गानमैफलीत अनुभवला. प्रख्यात गायिका सावनी शेंड्ये व जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल गायकीने मैफलीत बहार आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘सूर संगम’ हा कार्यक्रम झाला.
मैफलीची सुरुवात सावनी शेंड्ये यांनी मारू-बिहाग रागातील विलंबित एकतालातील ‘रतीया मैं तो जागी’ या बंदिशीने केली. यानंतर मध्यलय तीनतालातील ‘जाओ सजना मैं नाही बोलू...’ आणि द्रुत एकतालातील तराण्याच्या सादरीकरणाने रसिकांची दाद मिळविली. मिश्र-पहाडी रागातील बरसाती प्रकारामधील ‘कदंबकी छैंयातले हुई मुलाकात सैंया’ या दादऱ्याच्या सादरीकरणाने रसिकांची विशेष दाद मिळविली.
जयतीर्थ मेवुंडी यांनी रागेश्री रागातील ‘सबसुख देओ मोरे कर्ता’ आणि ‘तुम तो जाने सब गुन के आगर’ या बंदिशींच्या सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळविली. सोहनी रागातील ‘रंग न डारो श्यामजी’ या बंदिशीने श्रोत्यांची मने जिंकली. यानंतर सावनी शेंड्ये यांनी मिया- मल्हार रागातील ‘घनन घनन घन गरजत आये’ या बंदिशीने उपस्थितांवर स्वरांचा वर्षाव केला. ‘राम का गुणगान करीये’, ‘बाजे रे मुरलीया’, ‘अवघा रंग एक झाला’ या भजन आणि अभंगांच्या सादरीकरणाने रसिक भक्तिरसात न्हाऊन निघाले. राहुल गोळे (हार्मिनिअम), प्रशांत पांडव (तबला), नंदू भांडवलकर (पखवाज), आनंद टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण हवेच

$
0
0

शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीतांच्या अनेक शाखांचा अभ्यास करून पं. डॉ. मोहन दरेकर संगीत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या संगीत शिक्षणाच्या या प्रवासाला नुकतीच ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. शास्त्रीय संगीताबरोबर उपशास्त्रीय संगीताचेही धडे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहेत. संगीत शिक्षणासाठी दमदार रियाज आणि शास्त्रशुद्ध शिक्षण हवे, अशी त्यांची धारणा आहे. डॉ. दरेकर यांनी संगीत शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करत परदेशातही अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल आदित्य तानवडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद...

...

शास्त्रीय संगीतातील अनेक घराण्यांचा अभ्यास का करावासा वाटला ?

डॉ. दरेकर : शास्त्रीय संगीतामधल्या रागदारीमध्ये दर वेळी नावीन्य पाहायला मिळते. प्रत्येक घराण्याची राग सादर करण्याची पद्धती निराळी असते. त्यांचे काही नियम असतात. कोणत्याही एका घराण्याचा अभ्यास केला तर त्या घराण्याच्या नियमानुसार संगीताची साधना होते. मला सुरुवातीपासून अनेक घराण्यांचे गुरू लाभत गेले. त्यातून मी आग्रा, जयपूर, इंदूर, बनारस अशा विविध घराण्यांची गायकी आत्मसात केली. कारकिर्दीमध्ये अनेक घरांचा अभ्यास केल्याने संगीताचा सर्वंकश अभ्यास व्हायला मदत झाली. दुसरीकडे संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षणही पूर्ण केले. त्यातून स्वतःची एक वेगळी शैली तयार होण्यासाठी मदत झाली.

– तुम्हाला अनेक गुरूंकडून संगीताचे धडे गिरवण्याची संधी मिळाली.

- लहानपणी बीडला राहात असताना मंदिरातून, आणि कार्यक्रमांमधून भक्तिसंगीत गायला लागलो. ते पाहून घरच्यांनी संगीताचे धडे घेण्यासाठी अनिल हम्प्रस यांच्याकडे पाठवले. ते माझे संगीताचे पहिले गुरू. त्यानंतर डॉ. पेंढारकर, विष्णुपंत धुतेकर यांचे मार्गदर्शन लाभले. बीड सोडून मुंबईला पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकायला आल्यावर सांगीतिक जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. अभिषेकीबुवांकडून मिळालेला संगीताचा ठेवा आयुष्यभर पुरणारा आहे. पं. राजन-साजन मिश्रा आणि संगीताचार्य विकास कशाळकर यांचेही मार्गदर्शन मला लाभले आहे.

००

शास्त्रीय संगीताच्या रियाजासह शास्त्रशुद्ध शिक्षण हवे, असे वाटते का ?
गुरूंकडे संगीताची तालीम घेतल्याने संगीताची जाण येते. ती एक साधना आहे. त्यातून उत्तम कलाकार घडतोच; पण त्याला शास्त्रशुद्ध शिक्षणाची जोड दिली तर संगीताचा अभ्यास मार्गदर्शक ठरतो. त्यामुळेच गुरूंकडची तालीम अत्यंत महत्त्वाची आहेच; त्याच्या जोडीला संगीताचे शास्त्रही आत्मसात करायला हवे. त्यातूनच संगीतातले बारकावे कळतात. त्या बारकाव्यांचा उपयोग पुढे जाऊन आपण विद्यार्थ्यांना शिकवतो त्या वेळी होतो. त्यामुळेच ‘अलंकार’पासून ते एमए आणि पुढे पीएचडीपर्यंतचे संगीत शिक्षण मी पूर्ण केले.
...
संगीताचे शिक्षण देताना तुम्ही केवळ शास्त्रीय संगीतापुरते मर्यादित राहिला नाहीत.
डॉ. दरेकर – विद्यार्थी संगीत शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीच्या संगीताला आत्मसात करण्याची कला असते. ती कला ओळखून त्यांना त्या पद्धतीचे शिक्षण दिले तरच ते विद्यार्थी पुढे जाऊन त्यामध्ये करीअर घडवतात. एखाद्या भावसंगीताच्या विद्यार्थ्याला सतत शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायला सांगणे योग्य नाही. त्याच्या कलेची पारख योग्य वेळी व्हायला हवी. त्याच्या मर्यादा शिक्षकाला किंवा गुरूला कळायला हव्यात. यासाठी मी सर्व प्रकारच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये उपजत असलेल्या कलेप्रमाणे शिक्षण देण्याचे काम मी करत आलो आहे. दादरा, ठुमरी, गझल, भावसंगीत, भक्तिसंगीत, सुगम संगीत अशा अनेक उपशास्त्रीय प्रकारांचा अभ्यास केला. काही वर्ष मी दिवंगत सईदुद्दिन डागर यांच्याकडे धृपद-धमार गायकीचाही अभ्यास केला आहे. त्याचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहे.
...
संगीत शिक्षणात तुम्ही तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केलात ?
- तंत्रज्ञानामुळे खरे तर भारतीय अभिजात संगीताचा जगभर प्रवास झाला आहे. इंटरनेटमुळे जगात कोठेही संगीताचे मार्गदर्शन करता येते. त्यातूनच परदेशी विद्यार्थीही भारतीय अभिजात संगीताचे धडे गिरवताना दिसतात. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड येथील अनेक परदेशी विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून संगीत शिक्षणाचे धडे दिले आहेत. तेथील भारतीयही शास्त्रीय संगीताचा अभ्यास इंटरनेटद्वारे करत आहेत. गुरू आणि शिष्यांमध्ये सातासमुद्रांचे अंतर असले तरी संगीत शिक्षणात कोणताही फरक पडलेला नाही. तिकडचे कलाकार स्वतःचे कार्यक्रम करू शकतील एवढे तयार झाले आहेत. तंत्रज्ञानाची ही किमया म्हणजे एकप्रकारची क्रांती आहे. परदेशी होणाऱ्या या संवादातून तेथील संगीताचे प्रवाहही शिकायला मिळत आहेत.
..
सध्याच्या तरुण पिढीचा कल कोणत्या प्रकारच्या संगीताकडे अधिक आहे?
- ही गोष्ट प्रत्येकाच्या रुचीवर अवलंबून आहे. सध्याची पिढी अधिक प्रगत आणि हुशार आहे. योग्य प्रकारे प्रशिक्षण दिल्यास त्यांना संगीताची जाण लवकर होते. काही जणांना शास्त्रशुद्ध संगीत शिक्षणाची डिग्री हवी असते, म्हणून ते संगीत शिकतात. काहींना संगीत शिक्षक होऊन अर्थार्जन करायचे असते. काहींना शास्त्रीय गायक व्हायचे असते. या सर्व प्रकारातील विद्यार्थी चटकन ओळखता येतात. त्यानुसार त्यांना शिक्षण दिले जाते. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणारे विद्यार्थी साधनेसाठी नेहमी तयार असतात. त्यातूनच पुढे जाऊन ते पट्टीचे गायक होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवलतीच्या दरात मंडळांना वीजजोडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सार्वजनिक गणेशोत्सवात गणेश मंडळांना ‘महावितरण’कडून सवलतीच्या दरात तात्पुरती वीजजोडणी दिली जाणार आहे. मंडळांसाठी प्रती युनिट चार रुपये ३१ पैसे या दराने वीजपुरवठा केला जाणार असून, मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजना करून अधिकृतपणे वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन ‘महावितरण’च्या वतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रती युनिट तीन रुपये दहा पैसे अधिक एक रुपया २१ पैसे वहन (व्हिलिंग) आकार; तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलिंग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त दहा पैशांनी अधिक आहे, तर वाणिज्यिक दरापेक्षा दोन रुपये ९९ पैसे प्रती युनिटने कमी आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा घ्यावा, असे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. अर्थिंगची खबरदारी घ्यावी, अशा सूचना ‘महावितरण’ने केल्या आहेत.
वायरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वायर वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने; तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर अनेक ठिकाणी तुटलेल्या, टेपने जोडलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होऊन अपघाताची शक्यता असते. त्यामुळे याबाबतही खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मदतीसाठी संपर्क क्रमांक
गणेश मंडळाच्या पदा​धिकारी आणि कार्यकर्त्यांना ‘महावितरण’कडून मदतीची गरज असते. त्यासाठी १९१२ किंवा १८००२००३४३५ अथवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

गणेश मंडळांना सूचना
* विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.
* वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक.
* वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून अपघात घडू शकतात.
* वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी.
* वायरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वायर या वीजभारासाठी सक्षम असल्याची खात्री करून घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा ‘मुघल ए आझम’

$
0
0

सिनेमाला ५७ वर्षे झाल्यानिमित्त रंगीत पोस्टर पाहण्याची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वार्थाने अत्यंत दर्जेदार कलाकृती ठरलेल्या ‘मुघल ए आझम’ या भव्य-दिव्य चित्रपटाचे तितकेच भव्य दहा बाय पाच अशा आकाराचे पोस्टर उजेडात आले आहे. विशेष म्हणजे आज, शनिवारी ‘मुघल ए आझम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला ५७ वर्षे पूर्ण होत आहेत. हे निमित्त साधून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हे पोस्टर पाहण्याची संधी चित्रपट रसिक व जाणकारांना साधता येणार आहे.
पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार यांच्या अभिजात अभिनयाने, मधुबालाच्या घरंदाज सौंदर्याने आणि नौशाद यांच्या रागदारी संगीताने नटलेल्या के. आसिफ दिग्दर्शित ‘मुघल ए आझम’ चित्रपटाचा पगडा भारतीय जनमानसावर आजही आहे. ५ ऑगस्ट १९६० रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला आज ५७ वर्षे पूर्ण होत असताना चित्रपटाचे रंगीत पोस्टर समोर आल्याने तो योगायोग ठरला आहे. हे पोस्टर हाताने तयार केलेले आहे.
संग्रहालयाला भारतीय चित्रपटांची अडीच हजार पोस्टर मिळाली आहेत. दीड हजार हिंदी चित्रपटांचे पोस्टर तर उर्वरित पोस्टर ही तमीळ, तेलगु, कन्नड, मल्याळम या भाषेतील चित्रपटांची आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ही पोस्टर तयार करण्यात आली होती. संग्रहामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ९० चित्रपटांच्या पोस्टरचा समावेश आहे.
प्रदर्शित न झालेल्या जमानत या चित्रपटासह संजोग (१९७१), रोटी (१९४२), शेर-ए-बगदाद (१९४६), अनमोल घडी (१९४६), अॅटॉम बॉम्ब (१९४७), स्टंट क्वीन (१९४७), पुग्री (१९४८), संत नामदेव (१९४९), अपना देश (१९४९), वीर घटोकच (१९४९), दीदार (१९५१), अलम आरा (१९५६), दिल्ली का ठग (१९५८), फागुम (१९५८), मंझील (१९६०), रझीया सुलताना (१९६१) अशा चित्रपटांची पोस्टर असून त्यावर दिलीप कुमार, मधुबाला, राज कपूर, मीरा कुमारी, गुरू दत्त, नर्गिस, शम्मी कपूर, देव आनंद, मुमताझ, धर्मेंद्र, दारा सिंह, अमिताभ बच्चन ही दिग्गज कलाकार मंडळी झळकत आहेत.
संपूर्ण रामायण (१९६१), श्री गणेश (१९६२), वीर अभिमन्यू (१९६५), शंकर सती अनुसुया (१९६५), वीर भीमसेन (१९६४), लक्ष्मी नारायण (१९५१), बलराम श्रीकृष्ण (१९६८) या पौराणिक चित्रपटांची पोस्टर उपलब्ध झाली आहेत.
----------------
भारतीय चित्रपटांच्या इतिहासाच्या दृष्टीने हा ठेवा महत्त्वाचा आहे. चित्रपट संग्रहालय हा ठेवा जपून ठेवणार आहे, जेणेकरून पुढील काळात हा ठेवा देशाच्या चित्रपट संस्कृतीची साक्ष देईल. चित्रपट कलाकार, दिग्दर्शक; तसेच रसिकांकडे चित्रपटासंबंधीचे साहित्य, फिल्म असेल, तर ते त्यांनी संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी द्यावे.
- प्रकाश मगदूम, संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’मुळे वाचले पुणेकरांचे ५०० कोटी

$
0
0

‘मटा’मुळे वाचले

पुणेकरांचे ५०० कोटी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्यासाठी राबविण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निविदेतील गैरप्रकार ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने मांडल्याने या निविदा रद्द झाल्या असून, पुणेकरांवरचा भुर्दंड टळला, अशा शब्दांत विविध राजकीय पक्षांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने घेतलेल्या भूमिकेचे शुक्रवारी स्वागत केले. पारदर्शक कारभारासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महाराष्ट्र टाइम्सने केलेला पाठपुरावाच निर्णायक ठरला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊ शकली. त्याचा परिणाम सत्ताधाऱ्यांवर झाला अन् पुणेकरांच्या कररूपी निधीतून होणारा अपव्यय टळला, याकडे बहुतेक पक्षाच्या नेत्यांनी लक्ष वेधले.

..

कोट

समान पाणीपुरवठा योजनेत अनेक चुकीचे बदल करण्यात आल्याने प्रारंभापासूनच याला विरोध होता. पालिकेत बहुमत असल्याने कोणताही विषय रेटून नेता येईल, अशी भावना सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची झाली होती. या योजनेतील चुकीच्या कामाची माहिती सतत पुणेकरांसमोर मांडून ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हा विषय चांगलाच लावून धरला, त्यामुळे नागरिकांमध्ये जगजागृती झाली. परिणामी चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले पाणीपुरवठा योजनेचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

चेतन तुपे, विरोधी पक्षनेते

.........

समान पाणी पुरवठा योजनेच्या वादग्रस्त निविदा रद्द होण्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ने घेतलेल्या भूमिकेचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे पुणेकरांचे ५०० कोटी रुपये वाचणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निविदा रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे पुणेकरांची होणारी संभाव्य लूट थांबली. त्याबद्दल त्यांचेही प्रामुख्याने आभार. या निविदांना मंजुरी दिली असती, तर पुणेकरांच्या तिजोरीला ५०० कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार होता. यापुढील निविदा पारदर्शक पद्धतीनेच निघतील, अशी आशा आहे.

सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर

......................

पाणी पुरवठा योजनेच्या निविदा वाढीव दराने आल्या असून त्यामुळे पुणेकरांची लूट होत असल्याचा विषय सर्वप्रथम मांडल्यावर अनेकांनी विश्वास ठेवला नव्हता. अनेक नगरसेवक, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचाही यावर विश्वास नव्हता. अगदी ठराविक पत्रकार, वृत्तसमूहांनी या आरोपांची दखल घेतली होती. प्रामुख्याने ‘मटा’ने सुरुवातीपासून ठोस भूमिका घेऊन पुणेकरांची लूट होणार नाही, याची काळजी घेतली. गेल्या चार महिन्यांत या वाढीव दराने आलेल्या निविदांसदर्भांतील प्रत्येक बातमी ‘मटा’मध्ये आली. अखेर त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही घ्यावी लागली आणि निविदा रद्द करण्याचा निर्णय झाला. ‘महाराष्ट टाइम्स’ने फॉलोअप नसता घेतला तर हे शक्य झाले नसते.

अरविंद शिंदे, गटनेते, काँग्रेस

...................

पाणी पुरवठा योजनेच्या निविदांबाबतचे गंभीर आक्षेप ‘मटा’ने पुणेकरांसमोर आणले. त्याचा सातत्याने फॉलोअप केल्याने अखेर या निविदा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला याबद्दल ‘मटा’चे आभार. या निविदा काढण्यापूर्वीच ‘एस्टिमेट’मध्येच घोळ होता. निविदा काढताना त्यातील अटी-शर्ती ठराविक कंपन्यांसाठीच पूरक ठेवल्या होत्या. एखाद्या कंपनीला सर्वाधिक फायदा कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. याप्रकरणी काँग्रेसनेही सभागृहात सातत्याने आवाज उठवला होता. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि विरोधकांच्या प्रयत्नांमुळे अखेर या निविदा रद्द करण्यात आल्या.

रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष

................

निर्देशांनुसार राबवा निविदाप्रक्रिया

आमदार अनंत गाडगीळ म्हणाले, ‘सार्वजनिक जीवनामध्ये सरकार आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या पारदर्शकतेकडे डोळेझाक करून पुण्यात समान पाणीपुरवठ्याचा प्रकल्प राबविण्याचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा डाव होता. महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये साठवण टाक्यांसह पाइपलाइन आणि वॉटर मीटरच्या टेंडरमध्ये सुरू असलेल्या गोंधळ आणि घोळांबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सर्वप्रथम आवाज उठविला. एवढेच नाही, तर त्यातून पालिकेचे आणि पर्यायाने पुणेकरांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असल्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महाराष्ट्र टाइम्सने बजावलेली ही कामगिरी निश्चितच प्रशंसनीय आहे.’ ‘पाणीपुरवठा निविदांची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार असल्याने आता त्यामध्ये कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) निर्देशांनुसारच निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.

..............

समान पाणी पुरवठ्याचे पुणे शहरात सत्ताधाऱ्यांनी स्वप्न दाखवले होते. मात्र, या योजनेत काळेबेरे असल्याची शंका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सुरूवातीपासून उपस्थित केली होती आणि त्याची पोलखोल फॉलोअपच्या माध्यमातून सातत्याने केली. पुणेकरांसमोर अखेर सत्य आले आणि या योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

वसंत मोरे, गटनेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना

......................

समानपाणी पुरवठा योजनेच्या त्रुटींबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने ठोस भूमिका घेतली होती. त्यामुळे या योजनेंबरोबरच निविदांतील त्रुटी पुणेकरांसमोर आल्या. त्यातून पुणेकरांची होणारी संभाव्य लूट टळली. फेरनिविदा प्रक्रिया सुरू केल्याने या योजनेच्या कामास उशीर होणार आहे. या योजनेच्या अनुषंगाने पुणेकरांवर १५ टक्के अतिरिक्त पाणीपट्टी लादण्यात आली आहे. या कामास उशीर होणार असल्याने वाढीव पाणीपट्टीला स्थगिती द्यावी आणि त्यात पुणेकरांसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने पुढाकार घ्यावा, अशी विनंती आहे.

विशाल तांबे, माजी अध्यक्ष स्थायी समिती

....

लोण्याचा गोळा कोणा खायचा, यामधून भाजपमध्ये झालेली भांडणे पुणेकरांनी पाहिली. या सत्ताधाराऱ्यांना पुणेकरांच्या हीत जपण्यास थोडेसेही स्वारस्य नव्हते. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर आंदोलन उभे केले. राजकीय पक्षांनी कितीही आंदोलन केले तरी त्याला वृत्तपत्रांची, माध्यमांची साथ लाभत नाही, तोपर्यंत ते यशस्वी होत नाही. ‘महाराष्ट टाइम्स’ने यात निर्णायक भूमिका घेतली आणि या योजनेतील त्रुटी पुणेकरांसमोर आणल्या. त्याबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स’चे अभिनंदन. या भूमिकेमुळे पुणेकरांचे ९०० कोटी रुपये वाचणार आहेत.

प्रशांत जगताप, माजी महापौर

........

समान पाणी पुरवठा योजनेच्या काढलेल्या निविदांमुळे कसा तोटा होतो आहे, याची ठोस भूमिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडली. वर्तमानपत्रात काय करू शकते, हे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दाखवून दिले. ‘मटा’ने सातत्याने मांडलेल्या भूमिकेमुळे पुणेकरांचे एक हजार कोटी रुपये वाचले आहेत. पुणेकरांची एवढी मोठी रक्कम वाचल्याने पुणेकरांना त्याचा मनापासून आनंद आहे. सत्ताधारी भाजपला उशिरा का होईना पण शहाणपण सुचले. यापुढची प्रक्रियाही विचारपूर्वक राबवावी,अशी त्यांना सूचना आहे. पुण्यात पाणीपुरवठ्यासंबधी अनेक तज्ज्ञ असून त्यात माजी सनदी अधिकारीही आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेतेले तर कर्ज घेण्याचीही गरज पडणार नाही आणि योजना मार्गी लागेल.

आबा बागूल, माजी उपमहापौर

..............

ठराविक कंपन्यांना पाणीपुरवठा योजनेचे काम मिळावे, यासाठी निविदा प्रक्रियेतील अटी बदलण्यात आल्या होत्या. यापूर्वी पाण्याच्या टाक्यांच्या कामामध्येही अनियमितता झाल्याचे समोर आले होते. आपण काहीही केले तरी आपल्याला कोणी विचारणारे नाही, असा काहीसा समज पालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि महापालिका प्रशासनाचा झाला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा समज दूर केला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सतत या विषयाचा पाठपुरावा केला. चुकीच्या पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची माहिती पुणेकरांपर्यंत पोहचविली. महाराष्ट्र टाइम्समुळे पुणेकरांना सहन करावा लागणारा पाचशे कोटी रुपयांचा भुर्दंड वाचला आहे. या योजनेवर यापुढील काळातही आमचे लक्ष राहणार आहे.

संजय बालगुडे, महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव

.........

महापालिकेत सत्ताधारी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एककल्ली कारभार सुरु केला आहे, याचे चांगले उदाहरण म्हणून समान पाणीपुरवठा योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदांकडे पाहता येइल. ठराविक कंपन्यांचे हित साधण्यासाठी नियमात बदल करून वाढीव दराने निविदा मागविण्याचा प्रशासनाचा डाव होता. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय मांडून यातील वस्तुस्थिती जनतेसमोर आणली. या योजनेच्या फेरनिविदा काढण्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका ‘मटा’ने घेतल्याने विशेष अभिनंदन केले पाहिजे.

शिवा मंत्री, माजी स्थायी समिती अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोनबिल भरूनही नोटिस

$
0
0

पुणे : बीएसएनएलच्या लँडलाइन कनेक्शनची वर्षभराची आगाऊ रक्कम भरूनही ग्राहकाला थकीत रकमेसंदर्भात कोर्टाची नोटिस बजावण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. कॅम्प परिसरातील टेलिफोन एक्सचेंजमधील अनागोंदी कारभारामुळे ग्राहकावर निष्कारण न्यायालयीन कारवाईची नामुष्की ओढवली आहे.
कॅम्प परिसरात राहणाऱ्या महंमद पाटणवाला यांनी वर्षभरापूर्वी बीएसएनएलकडून लँडलाइनचे कनेक्शन घेतले. त्यांनी वर्षभराची रक्कम भरली. वर्षभरानंतर पाटणवाला यांना बीएसएनएलच्या तक्रारीवरून महालोकअदालतच्या माध्यमातून न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. कनेक्शनचे पैसे भरले असतानाही नोटीस बजावल्याने पाटणवाला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी टेलिफोन एक्सचेंजमध्ये विचारणा केली असता, ‘अशा पद्धतीच्या नोटिसा येत राहतात. तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. निर्धास्त राहा,’ अशा प्रकारची बेजबाबदार उत्तरे देण्यात आली आहेत.
पाटणवाला यांनी वर्षभरापूर्वी ६९२५ रुपयांची रक्कम भरून कनेक्शन घेतले होते. गेल्या महिन्यात कनेक्शन बंद झाल्याने त्यांनी पुन्हा ६३० रुपये भरून महिन्याभरासाठी ते सुरू केले. मात्र, २९ जून २०१७ रोजी त्यांना न्यायालयाने नोटीस बजावली. त्यामध्ये ६२२४ रुपयांची रक्कम नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे पाटणवाला यांनी भरलेल्या आणि न्यायालयाच्या नोटीसमध्ये प्रविष्ट करण्यात आलेल्या रकमेतही तफावत असल्याने टेलिफोन एक्सचेंजने तक्रार दाखल करताना, नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे केली हे कळायला मार्ग नाही. याशिवाय एक्सचेंजकडून आणखीही काही ग्राहकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्याही सत्यतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
यासंदर्भात पाटणवाला म्हणाले, ‘बीएसएनएलने स्कीम काढल्याने एक वर्षाची रक्कम एकदम भरली आणि वर्षानंतर थेट न्यायालयाची नोटीस हातात मिळाली. माझ्याकडे रक्कम भरल्याची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. शिवाय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी तुमच्यावर कारवाई होणार नाही, असे सांगितले आहे. यावरून टेलिफोन एक्सचेंजचा कारभार उघडा पडला आहे. कोणत्या निकषांवर आणि कागदपत्रांच्या आधारे मला नोटीस देण्यात आली. तेही सांगायला तेथील अधिकारी तयार नाहीत. कोणतीही चूक नसताना न्यायालयाच्या फेऱ्या मारून नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.’

ग्राहकांना वारंवार चुकीच्या नोटीसा
बिलाची रक्कम किंवा एखाद्या स्कीमचे पूर्ण पैसे भरूनही ग्राहकांना न्यायालयाकडून नोटीसा येण्याचे प्रकार सध्या वाढत आहे. टेलिफोन एक्सचेंजमध्ये चाललेल्या संथ कारभारामुळे या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे, ग्राहकाने घेतलेल्या कनेक्शनचे संपूर्ण तपशील टेलिफोन एक्सचेंज कार्यालयात उपलब्ध असतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तक्रार नेमकी कोणत्या निकषांवर केली जाते हेही कळू शकत नसल्याने ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस संभ्रम वाढत चालला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बडीकॉप’ उपक्रम राज्यातही राबविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आयटी व इतर क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेतासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेला ‘बडीकॉप’ उपक्रम काही पोलिस आयुक्तालय व जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मिळणारा प्रतिसाद पाहून हा प्रकल्प राज्यातील सर्व पोलिस घटकांमध्ये राबविण्याचा पोलिस महासंचालक कार्यालयाचा विचार सुरू असून, त्या दृष्टीने काम सुरू आहे.
हिंजवडी येथील आयटी कंपनीत आयटी इंजिनीयर तरुणीच्या खुनानंतर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आयटीतील व नोकरी करणाऱ्या महिलांसाठी पोलिसांकडून मदत करण्यासाठी ‘बडीकॉप’ ही योजना सुरू केली. त्यानुसार सर्व आयटी कंपन्यामध्ये त्याबाबत प्रबोधन करण्यात आले. संबंधित पोलिस ठाण्यात आयटीतील महिला व पोलिस अधिकारी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनविण्यात आला आहे. एका बडीकॉप ग्रुपमध्ये पन्नास महिला व संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी आहेत. महिलांना सुरक्षेसाठी मदत हवी असल्यास पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याऐवजी बडीकॉपला सांगितल्यानंतर घटनास्थळी जाऊन महिलांना मदत करण्यात येत आहे.
पुण्यात बडीकॉपच्या मदतीने आयटीतील महिलांना तत्काळ मदत मिळाली होती. त्यातील आरोपींना तत्काळ बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर या योजनेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक महिला पोलिस ठाण्यात येऊन बडीकॉपच्या ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. आता अनेक पोलिस ठाण्यात बडीकॉपचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना मदत केली जात आहे. पुण्यातील या बडीकॉप उपक्रमाची अनेक पोलिस घटकांनी माहिती घेतली आहे. नागपूर पोलिस आयुक्तालयाने हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच, कोल्हापूर परिक्षेत्रातील जिल्ह्यात हा उपक्रम राबिण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा उपक्रम चांगल्या असल्यामुळे त्याची पोलिस महासंचालक कार्यालयाने देखील दखल घेतली आहे. हा उपक्रम लवकरच राज्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या, की पुण्यातील बडीकॉप उपक्रम काही ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यात हा उपक्रम राबविण्याचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने काम सुरू केले आहे.

‘पोलिस काका’ उपक्रमाचे मंगळवारी उद्घाटन

महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडीकॉप उपक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतसाठी ‘पोलिस काका’ हा पुणे पोलिसांनी नवीन उपक्रम सुरू केला आहे. पोलिस काका उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी होणार आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ते या पोलिस काकांकडे तक्रार करू शकतील. पाच शाळांसाठी एक पोलिस काका राहाणार असून, त्या पोलिस काकाचा मोबाइल क्रमांक शाळेच्या बाहेर लावण्यात येणार आहे. या कामाला सुरुवात झाली आहे. पोलिस काकांना प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबार प्रकरणातील गुन्हे सरकार मागे घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
‘सहा वर्षांपूर्वी झालेल्या मावळ गोळीबार प्रकरणातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लावण्यात आलेले गुन्हे सरकार मागे घेणार आहे. हे गुन्हे क्रांतीदिनापूर्वी येत्या आठ ऑगस्ट रोजी मागे घेण्यात येणार आहेत, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे,’ अशी माहिती मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी दिली.
आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची गुरुवारी भेट घेऊन ९ ऑगस्ट २०११ रोजी बंदिस्त पवना जलवाहिनी विरोधात पुकारलेल्या आंदोलनातील आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. मुनगंटीवर यांनी त्वरित गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर शेलार, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, भाजपचे मावळ प्रभारी भास्करराव म्हाळसकर, आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना मावळ विभाग प्रमुख राजू खांडभोर, शिवसेना ज्येष्ठ नेते भारत ठाकूर, भाजयुमेचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले तसेच आंदोलक व शेतकरी उपस्थित होते.
९ ऑगस्ट २०११ रोजी बंदिस्त पवना जलवाहिनीच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बौर व राऊतवाडी गावच्या हद्दीत रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मावळातील सुमारे १९० पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासोबत आमदार बाळा भेगडे आणि शेतकऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या वेळी मुनगंटीवर म्हणाले, ‘आमदार भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन हे अत्यंत योग्य होते. आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. नुकसानबाबत चुकीची माहिती देऊन आंदोलक शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.’



सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चुकीच्या मार्गाने नोंदविलेले गुन्हे निश्चितपणे मागे घेण्यात येतील. आठ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले आहे.
- आमदार बाळा भेगडे


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओत ई-पेमेंटलाही ‘वेटिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) आतापर्यंत लायसन्सच्या परीक्षेसाठी ‘वेटिंग’ असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता लायसन्सची परीक्षा दिल्यानंतर ‘लायसन्स फी’ भरण्यासाठी ‘ई-पेमेंट’ करण्यासाठीही सुमारे २४ तासांचे ‘वेटिंग’ दाखवत असल्याची अजब बाब शुक्रवारी पाहायला मिळाली.
आरटीओमध्ये काही वर्षांपूर्वी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर कामकाज चालत होते. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक शिकाऊ आणि पक्क्या लायसन्ससाठी परीक्षा देण्यासाठी येत होते. त्यामुळे आरटीओ कार्यालयामध्ये मोठी रांग लागत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी परिवहन विभागाने ऑनलाइन अपॉइंटमेंटची अंमलबजावणी केली. तसेच, कामकाजात ‘कोटा’ पद्धती, म्हणजे एका अधिकाऱ्याने दिवसभरात किती काम करावे याची कमाल मर्यादा निश्चित केली. त्यामुळे तेव्हापासून आरटीओच्या कामकाजात ‘वेटिंग’ हा प्रकार उदयास आला आहे. चारचाकी वाहनाचे लायसन्स काढण्यासाठी सहा महिन्यांपर्यंतचे वेटिंग असल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे.
लायसन्सची परीक्षा देण्याआधीच अर्जदारास लायसन्सचे शुल्क भरावे लागते. यासाठी आता ई-पेमेंट केले जाते. मात्र, शुक्रवारी ई-पेमेंट करताना तांत्रिक अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ही पेमेंट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागेल, अशी ‘एरर’ प्रणालीमध्ये दिसत होती. त्यामुळे आता ई-पेमेंटसाठीही वेटिंग असल्याची चर्चा आरटीओ कार्यालयात रंगली होती.
दरम्यान, या प्रकारामुळे अनेक नागरिकांना लायसन्ससाठीची प्रक्रिया विना अडथळा पूर्ण करता आली नाही. साधारणपणे ५० टक्के अर्जदारांना या ‘एरर’चा सामना करावा लागला. या नागरिकांनी ई-पेमेंट होत नसल्यामुळे लायसन्स विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून पर्यायी मार्ग शोधून काढला. त्यानंतर त्यांचे शुल्क स्वीकारले गेले. वास्तविक, पेमेंटसाठी ‘वेटिंग’ असण्याची अजिबात शक्यता नाही. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे प्रणालीमध्ये ही ‘एरर’ दाखविण्यात येत असून, लायसन्स विभागाचे अधिकारी त्यासंबंधीची दुरुस्ती करून देत आहेत. यामुळे लायसन्स विभागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रांग लागली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडी फोडण्यासाठी मानवी साखळी

$
0
0


म. टा. प्रतिनधी, पिंपरी
आयटीपार्क हिंजवडी परिसरात सध्या वाहतूक कोंडी हा कळीचा मुद्दा झाला आहे. दररोज शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून येथे कामासाठी येणाऱ्या आयटीन्सला वाहतूक कोंडी मोठा सामना करावा लागत आहे. येथील अरुंद आणि मोजके रस्ते, नियोजनाचा अभाव, रस्त्यांवरील खड्डे, वैयक्तिक वाहनांची मोठी संख्या यांसारख्या अनेक कारणांमुळे येथील कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. यापूर्वी यावर अनेकदा चर्चा आणि नियोजन करण्यात आले. मात्र, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हिंजवडीचे गावकरी आणि आयटीयन्स प्रथमच शुक्रवारी (४ ऑगस्ट) एकत्र आले होते.
वाहतूक पोलिस आणि हिंजवडी आयटी असोसिएशन तसेच स्थानिक पोलिसांकडून हिंजवडीमधील विविध समस्यांबाबत चर्चा केल्या जातात. याबाबत ठोस उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील काही युवकांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्र्यांशी संपर्क केला. आयटीपार्कमुळे हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातील जमिनींना सोन्याचे भाव आले. परंतु, येथील प्रशासनाकडून मूलभुत गरजा देखील पुरविण्यात आले नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. उद्योगमंत्र्यांशी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही वाहतूक कोंडी सोडविण्याचा एक भाग म्हणून गावकरी आणि आयटीयन्सनी एकत्रितपणे आज शुक्रवारी मानवीसाखळी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी येथील कंपनीत रसिला ओपी या अभियंता तरुणीचा खून झाला होता. त्यानंतर आयटीन्स एकत्र आले होते. त्यांनी व्हॉट्सअॅप व फेसबूकवरून त्यांची ऑनलाइन कमिटी स्थापन केली. त्यावरच काहीजणांनी हिंजवडीच्या वाहतूक कोंडीचा विषय छेडला आणि प्रत्येकाने आपले अनुभव त्यावर एकमेकांना सांगण्यास सुरुवात केली; मग यातूनच काही तरुणांनी पुढाकार घेत हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे व शाम हुलावळे यांच्याशीही याबाबत चर्चा केली. त्यांनीही या वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास सांगितला. त्यानुसार उद्योगमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सविस्तर निवेदन देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना ई-मेलवर सगळ्या समस्या पाठवल्या. त्यावर त्यांनी उपाय योजना करण्याचे आश्वासन मंत्र्यांकडून देण्यात आले आहे.
शुक्रवारी मानवी साखळीला आयटीपार्कमधील तरुण, तरुणी, हिंजवडी गावचे माजी सरपंच श्यामराव हुलावळे, सागर साखरे चंद्रकांत जांभूळकर, संतोष ढवळे, मल्हारी साखरे आदी उपस्थित होते.

हिंजवडीमधील सध्याची वाहतूक परिस्थिती
हिंजवडी येथे २२५ पेक्षा अधिक कंपन्या आहेत. हिंजवडीमध्ये दररोज काम करणाऱ्यांची प्रवास करणाऱ्यांची अंदाजे संख्या साडेसहा लाख आहे. सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत हिंजवडीच्या रस्त्यावरून सुमारे एक लाख चारचाकी वाहने जातात, तर दीड लाख दुचाकी जातात. हिंजवडी अससोसिएशनच्या १३० मेट्रोझिप बस, अंदाजे ४०० सहाआसनी आणि तीन आसनी रिक्षा. त्याचप्रमाणे पीएमपीएमएलच्या ४० मार्गांवरून १३ बस दर ४५ मिनिटांच्या अंतराने धावतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायती जोडणार ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या, १४०७ ग्रामपंचायती आणि ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पांना अत्याधुनिक संगणक प्रणाली उपलब्ध करून इंटरनेट आणि व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधेने जोडले जाणार आहे. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला असून तो एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे तालुकास्तरावरील सर्व कार्यालये या यंत्रणेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिली. इंटरनेट व व्हिडिओ कॉन्फरन्सने जोडल्यामुळे दैनंदिन अहवाल, योजनांची अंमलबजावणी, विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी समन्वय साधण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. पुणे जिल्हा विस्ताराने मोठा असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत बैठकांना जिल्हा परिषदेत यावे लागते, त्यामुळे तालुकास्तरावर अनेक कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेट यंत्रणेसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्हा परिषदेतून जिल्ह्यात सर्वत्र नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. यामुळे वेळ आणि पैशाचाही अपव्यय टळेल. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आळा बसण्यास मदत होईल. ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना दाखले व इतर कामांसाठी ताटकळत राहावे लागत असल्याची स्थिती आहे. काही ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर व इतर कर्मचारी गैरहजर असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे वारंवार येत आहेत; तसेच नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत.
जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे जिल्हा परिषदेपासून शंभरहून अधिक किलोमीटर अंतरावर आहेत. जुन्नर, आंबेगाव, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यांतील काही भागांमध्ये तर दळणवळणाची साधनेही अपुरी आहेत. येथील काही भाग दुर्गम असल्याने तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत बैठकांसाठी येण्या-जाण्यातच मोठा वेळ जातो; तसेच इंदापूर आणि बारामती तालुक्यांमधून जिल्हा परिषदेमध्ये ये-जा करण्यासाठीही संपूर्ण दिवस खर्ची होत असल्याचे चित्र आहे. मात्र इंटरनेट आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध झाल्यास वेळेची आणि पैशाचीही बचत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images