Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

... अन् बहरले स्वरयोगिनीचे कविमन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकदा का कलाकार एखाद्या कलेमध्ये स्वतःला आजमावायला लागला, की त्याला इतर कलाही भुरळ घालतात. ज्याप्रमाणे सूर, ताल, लयीमध्ये मुक्तपणे वावरणाऱ्या गायक-संगीतकाराला शब्द मोहिनी घालतात आणि त्यांचे कविमन ते शब्द कागदावर उतरवतात. प्रसिद्ध गायिका डॉ. प्रभा अत्रे अशाच एक कलाकार... एरवी सूर, लयीत रमणाऱ्या प्रभाताई शब्ददुनियेतही रमल्या आणि आकारले ‘अंतःस्वर’. ‘मुक्त संगीत चर्चासत्रा’निमित्त त्यांच्या या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी झाले. या वेळी त्यांचे कविमन रसिकांसमोर उलगडत गेले.
गानवर्धन, ललित कला केंद्र गुरूकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जुलैपर्यंत चालणाऱ्या या चर्चासत्राचे उद्घाटन प्रभाताईंच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी त्यांनी आपल्या ‘अंतःस्वर’ या पुस्तकातील कविता, बंदिशी आणि गझलांचे वाचन केले. आरती कुंडलकर, चेतना बनावत, आश्विनी मोडक, रागेश्री वैरागकर, अतिंद्र सरवडीकर या शिष्यांनी पुस्तकातील प्रभाताईंच्या रचना गायल्या. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनियमवर, तर माधव मोडक यांनी तबल्यावर साथसंगत केली. या सादरीकरणाला सोबत होती, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी घेतलेल्या प्रभाताईंच्या मुलाखतीची... या गप्पांमधून दवणे यांनी प्रभाताईंच्या कविमनाला साद घालून बोलते केले.
‘सूर आणि लयीत भिजलेला शब्द हाच माझा अंतःस्वर आहे,’ असे सांगून प्रभाताईंनी गप्पांना सुरुवात केली. गप्पांमध्ये बंदिशी आणि गझलांचे गायन यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. बंदिशी लिहिण्यामागची प्रेरणा सांगताना प्रभाताई म्हणाल्या, ‘प्रत्येक कलाकाराचा रागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. एखादा राग मांडताना मला त्याच्या भावाप्रमाणे शब्द लागतात. नादमाधुर्य आणि गुंजन असलेले शब्द समोर असावेत म्हणून मी नव्या बंदिशी लिहिल्या. मात्र, ते शब्द राग फुलवण्यासाठी ‘लाँचिंग पॅड’चे काम करतात. तिथे सूर आणि लयच महत्त्वाचा.’ हे अधिक स्पष्ट करण्यासाठी ‘नभ गरज हे बादरा’ ही मियामल्हार रागातली बंदिश त्यांच्या शिष्याने सादर केली. त्यानंतर प्रभाताईंनी ‘सूरांची साधना पाण्यावरच्या रेघेसारखी, उमटत असतानाच मिटत जाणारी’ ही कविता वाचून दाद मिळवली.
‘साधनेमधला उच्च स्तर गाठत नाही तोपर्यंत साधक हा साधकच असतो आणि रसिक त्याच्या जवळ येतो तेव्हाच तो खऱ्या अर्थानं कलाकार होतो,’ असे स्पष्ट करताना प्रभाताईंनी यशाचे गमकही उलगडले.
‘कलाकारासाठी पुरस्कार क्षणिक असावेत. कपाटात ठेऊन द्यावेत ते. चालत राहण्यातच त्याचे यश दडले आहे,’ असे त्यांनी आपल्या कवितेतून अधिक स्पष्ट केले. ती कविता होती, ‘ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात, त्याचा मोती होईपर्यंत चालायला हवं,’ असे सांगून त्यांनी मैफलीचा समारोप केला. ‘मुखी नाम तुझे रे गोविंदा’ या भक्तिगीत गायनाने अतिंद्रने समारोपाला अधिक उत्कट केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्सव डॉल्बीमुक्त करण्याची गरज

$
0
0

पालकमंत्र्यांचे गणेश मंडळांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शांततेत आणि उत्साहात पार पडणाऱ्या पुण्याच्या गणेशोत्सवाची ख्याती टिकवण्यासाठी गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालक मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले.
पुणे पोलिसांतर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बापट यांनी कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांना सहकार्य करावे, अशी सूचना केली. महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डिकर, आमदार जगदीश मुळीक, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते यांच्यासह गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
‘डॉल्बी, डीजे बाबतीत मंडळांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. डॉल्बी लावून नियमांचे आणि कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलिसांची कारवाई रोखता येणार नाही. पोलिसांनीही मंडळांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचा लौकिक जगभरात असून, त्यात भर टाकण्यासाठी मंडळांना शिस्तीने वागावे लागेल. कार्यकर्ते परवानगीसाठी आल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक पोलिसांनी देणे गरजेचे आहे,’ असे बापट म्हणाले.
मंडळांच्या परिसरात स्वच्छता राखण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा, पोलिसांनी बेवारस गाड्यांवर कारवाई करून त्यांना तातडीने ताब्यात घ्यावे, जेणेकरून उत्सवात काही अनिष्ट प्रकार घडणार ऩाहीत. उत्सवात नेमक्या कोणत्या दिवशी रात्री १२ पर्यंत परवानगी देणार हे पोलिसांनी आधीच जाहीर करावे, कार्यकर्त्यांना सर्व नियम समजावून सांगावेत, अशा सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.

डॉल्बीमुक्त मंडळाला पुरस्कार
वर्षभर मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी डॉल्बी न वापरणाऱ्या मंडळाला एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल, असे अशोक गोडसे यांनी बैठकीत जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी, बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल

$
0
0

विज्ञान शाखेसाठी निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी व बारावीच्या विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांनुसार आता प्रत्येक पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याला महत्त्व आले आहे. एका प्रश्नाला त्याच धड्यातील प्रश्नाचा पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घोकंपट्टी न करता संपूर्ण धड्याचा नीट अभ्यास करावा लागणार आहे.

इयत्ता अकरावीसाठी हा निर्णय या वर्षीपासूनच लागू होणार असून बारावीची फेब्रुवारी २०१९ मध्ये होणारी परीक्षा या निर्णयानुसारच होईल. ‘नीट’ किंवा ‘जेईई’सारख्या परीक्षा देताना राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अडचण येत असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांकडून केली जात होती. कौन्सिल आॅफ बोर्डस आॅफ स्कूल एज्युकेशन इन इंडियाने (कॉब्से) देशातील इयत्ता अकरावी व बारावीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या चार विषयांच्या परीक्षांचे देशपातळीवर एकाच पद्धतीचे आराखडे तयार केले होते. त्याआधारे या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे नवे स्वरूप ठरविण्यात आले आहे.
नव्या आराखड्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांची १०० गुणांपैकी लेखी परीक्षेसाठी ७० गुण असतील; तर ३० गुणांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. गणित व संख्याशास्त्रासाठी ८० गुणांची लेखी; तर २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असेल. प्रात्यक्षिक परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचे दोन भाग केले जात होते. भाग १ मध्ये ठराविक घटक व भाग २ मध्ये इतर घटकांवरील प्रश्न दिले जात होते. आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकांसाठी स्वतंत्र भाग दिला जाणार नाही. मात्र, बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू), एका वाक्यात उत्तरे (व्हीएसए), थोडक्यात उत्तरे १ (एसए १) आणि थोडक्यात उत्तरे २ (एसए २) असे प्रश्ननिहाय चार भाग करण्यात आले आहे. यामध्ये कोणत्याही घटकातील प्रश्न कोणत्याही भागात असून शकतो. प्रत्येक भागासाठी गुणही निश्चित करण्यात आले आहेत. प्रश्नांना दिलेले जाणारे पर्याय कमी करण्यात आले असून, एका प्रश्नाला केवळ एकच पर्यायी प्रश्न दिला जाईल.

नीट, जेईई व देशपातळीवर होणाऱ्या परीक्षांचा विचार करून हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोणताही घटक बाजूला ठेवता येणार नाही. प्रत्येक घटक शिकवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनाही प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागेल.
- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि बघे फोटो काढत होते!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भरधाव वाहनाने ठोकरल्याने दुचाकीवरील आयटी इंजिनीअर तरुणाचा मृत्यू झाला. घटनास्थळी बरीच गर्दी झाली. परंतु, तरुणाच्या मदतीला कोणीच आले नाही. तो तरुण रस्त्यावर तडफडत असताना बघे केवळ फोटो आणि व्हिडीओ घेण्यात मग्न होते. मोबाइलवर चित्रिकरण करण्यातच सर्व दंग असल्यामुळे या तरुणाला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. अखेर तेथून जाणाऱ्या एका डॉक्टरने त्याला रुग्णालयात दाखल केले; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

भोसरीत इंद्रायणीनगर कॉर्नर येथे दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. सतीश प्रभाकर मेटे (२५, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश दोन दिवसांपूर्वी मित्रांसोबत चहा घेऊन घरी निघाला होता. त्यावेळी त्याचा अपघात झाला. सतीश मूळचा औरंगाबादचा होता व तो पिंपरीतील केएसबी पम्प्स या कंपनीत संगणक इंजिनीअर म्हणून कामाला होता. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनकोट घालताना इंजिनीयर तरुणीचा विनयभंग

$
0
0

पिंपरीः हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीतून घरी जात असताना पाऊस आल्याने रेनकोट घालण्यासाठी थांबलेल्या आयटी अभियंता तरुणीचा दोघांनी विनयभंग केला. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास चांदे-नांदे रोडवर ही घटना घडली. पीडित तरुणी शुक्रवारी बाणेर येथील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पीडित तरुणी बुधवारी दुपारी हिंजवडी येथील कंपनीतून दुचाकीवरून घरी जात असताना पाऊस आला. त्यामुळे ती चांदे-नांदे रस्त्यावर दुचाकी थांबवून रेनकोट घालत होती. त्यावेळेस टेम्पोतून आलेल्या दोन युवकांनी तिला टेम्पोत टाकले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तिथं लोक जात असल्याची चाहूल लागल्यानं ते दोघे घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर त्या तरुणीनं मोबाइल अॅपवरून मित्रांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. ही तरुणी मूळची तामिळनाडूची असून हिंजवडी आयटी पार्कमधील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते.

वाहतूक कोंडीमुळे आडमार्ग

पीडिता दुपारी चार वाजता कंपनीतून बाहेर पडली. हिंजवडी ते बाणेर या पट्ट्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ती हिंजवडी सूस रस्त्यावरून चांदे गावातून जात होती. वाहतूक कोंडी नसती, तर ती सरळ रस्त्याने घरी गेली असती व तिला या प्रकाराला सामोरे जावे लागले नसते, अशी प्रतिक्रिया तिच्या सहकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यातील भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुसळधार पावसामुळं लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅमचा बांध व पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असल्यानं पर्यटकांना भुशी डॅमच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे लोणावळ्यातील सहारा (अॅम्बी व्हॅली) रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं टायगर व लायन्स पॉइंटकडं जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

लोणावळा व खंडाळ्यासह मावळात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळं अनेक पुल पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. तसंच, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे व जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदगतीने सुरू आहे. मावळातील प्रमुख धरण असलेले पवना धरण ८३ टक्के भरले असून, सर्वच धरणांच्या पाण्यात कमालीची वाढ होत आहे. मागील २४ तासांत लोणावळ्यात २२० मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

आषाणे धबधब्यात दोघे वाहून गेले!

कर्जतमधील आषाणे धबधब्याच्या प्रवाहात वडील आणि मुलगी वाहून गेले आहेत. या दोघांचाही शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळवलकरांचे ५ हजार ग्रंथ भांडारकर संस्थेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुस्तकांना जीव लावणारे अस्सल ग्रंथप्रेमी, वाचनाचे जणू व्यसन असलेले तळवलकर...मराठी, इंग्रजी साहित्याबरोबरच अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रावरही उत्तम प्रभुत्व असलेले तळवलकर...धारदार लेखणीद्वारे टीका करणारे आणि प्रसंगी पाठीशीही उभे राहणारे तळवलकर... अशा ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकरांच्या आठवणींना त्यांच्या स्नेहीजनांनी शनिवारी उजाळा दिला.

निमित्त होते, 'महाराष्ट्र टाइम्स'चे दिवंगत संपादक गोविंदराव तळवलकर यांच्या वैयक्तिक संग्रहातील सुमारे पाच हजार ग्रंथ पाटील यांच्या हस्ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला प्रदान करण्याचे. तळवलकर यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून हा अनमोल ठेवा पाटील यांनी संस्थेला प्रदान केला. संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर, विश्वस्त राहुल सोलापूरकर, नियामक मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, उपाध्यक्ष हरि नरके, आमदार विजय काळे, माजी खासदार प्रदीप रावत, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते.

'पत्रकारासाठी आवश्यक ते सर्व गुण अंगी असलेल्या गोविंदराव तळवलकरांना लोभ नव्हता. त्यामुळे त्यांच्या लेखणीत निस्पृहतेचे सामर्थ्य होते. त्यांनी आपल्यावर टीका करणे हे देखील त्यावेळच्या राजकारण्यांना वैभव वाटत असे. त्यांंच्या स्वकष्टाची, सरळमार्गाची सर्व कमाई भांडारकर संस्थेला देणे ही दानत मोठी आहे. 'आपल्या हातून एखादी चूक झाली, तर ती मान्य करण्याचा मोठेपणा तळवलकरांच्या अंगी होता. ती चूक सुधारून ते संबंधितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत. सत्पात्री दान द्यावे, अशा भांडारकरसारख्या संस्थाही आता दुर्मिळ आहेत,' असे पाटील म्हणाले.

'तळवलकर हे पत्रकारितेचे मुक्त विद्यापीठ होते. तेच त्याचे कुलगुरुही होते. त्यांचा हा ठेवा संस्थेत उत्तम पद्धतीने जतन केला जाईल,' असे नरके म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, सारंग दर्शने यांनीही तळवलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

'तळवलकर हे बहुआयामी व्यक्ती होते. मराठी, इंग्रजी साहित्य, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. भांडारकर संस्था ही प्राच्यविद्येशी संबंधित असली, तरी आम्हाला कोणताही विषय व्यर्ज नाही. तळवलकरांच्या ग्रंथसंपदेमुळे संस्थेची समृद्धता वाढली आहे,' असे बहुलकर यांनी सांगितले.

'तळवलकर यांची संस्थेला दोन वेळा प्रत्येकी पाच लाखांची देणगी दिली आहे. त्यातून डिजिटायझेशनचे काम केले जाते. आता तळवलकर यांची ग्रंथसंपदा प्राधान्याने डिजिटाईज करण्यात येईल,' अशी माहिती भूपाल पटवर्धन यांनी दिली. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले. गोविंदराव तळवलकर यांच्या कन्या सुषमा व निरूपमा यांनी 'ई मेल' द्वारे पाठवलेल्या पत्राचे राहुल सोलापूरकर यांनी वाचन केले.

हा तर आमच्या मैत्रीचा कलश - पाटील

'कुठले पुस्तक दुर्मिळ आहे, हे ठरविणाऱ्या खूप कमी व्यक्ती असतात. गोविंदराव तळवलकर हे त्यातलेच एक. एका विद्वान माणसाने जमविलेली पुस्तके वेगळी असणारच. त्यांना भांडारकर संस्थेचे काम, कीर्ती व उपयुक्तता माहित होती. म्हणूनच आपल्या ग्रंथसंपदेची जपणूक येथेच होऊ शकेल, याची खात्री असल्याने त्यांनी ही ग्रंथसंपदा संस्थेच्या हवाली केली. तळवलकर अमेरिकेत असताना मी या संग्रहाची देखभाल केली. आता आमच्या मैत्रीचा हा कलश मी त्यांच्या गैरहजेरीत संस्थेच्या हवाली करत आहे,' अशी भावना तळवलकरांचे जीवलग स्नेही विनायकदादा पाटील यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉलिवूड आणि वशिलेबाजी

$
0
0

- प्रसाद पवार

हिंदी सिनेसृष्टीत येणाऱ्यांचे सरळसरळ दोन गट पडलेले दिसतात. एक स्वकर्तृत्वावर धडपडत इथे स्वतःला सिद्ध करणारे आणि दुसरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आणि फार काही स्ट्रगल न करता धूमधडाक्यात ‘लाँच’ होणारे. अभिनयाचे वा कोणत्याही हेतूने इथे येताना तुमचे नाणे खणखणीतच असावे लागते तरच तुम्ही टिकू शकता हे जरी खरे असले तरी बॉलिवूडने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक चेहरे कलाकार म्हणून रसिकांवर लादण्याचा प्रयत्न केला, हे नाकारता येणार नाही. प्रत्येक क्षेत्राला लागलेले वशिलेबाजीचे ग्रहण बॉलिवूडला जरा जास्तच ग्रासणारे आहे म्हणूनच निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सैफ अली खान आणि वरुण धवन यांनी जेव्हा नेपोटिझम अर्थातच वशिलेबाजीचे समर्थन केले तेव्हा त्यांची खरी मानसिकता त्यांच्या चाहत्यांसमोर आली.
निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा ‘कॉफी विथ करण’ हा टॉक शो चालवतो. कलावंतांनी चाहत्यांसमोर येताना छान मनमोकळ्या गप्पा माराव्यात, विविध विषयांवरची त्यांची मनमोकळी मते मांडावीत आणि बॉलिवूडचा स्वभावधर्म म्हणजेच गॉसिप करावे, असा हा कार्यक्रम. तिथे रॅपिड फायर नामक प्रकारात कलाकारांना काही गोष्टी स्पष्ट बोलाव्या लागतात. अनेकांनी अंगावरच्या न दिसणाऱ्या टॅटूपासून स्वतःच्या बेडरूमपर्यंत आणि सेक्शुअल ओरिंएंटेशनपासून अफेअर्सपर्यंत विविधरंगी किस्से करणने दिलेल्या या व्यासपीठावर कुठलीही तमा न बाळगता मांडले. करण जोहरच्या बॅनरचा सिनेमा मिळावा म्हणून जेव्हा अनेक कलावंत जोहरांपुढे लोटांगणे घालत असतात, तेव्हा कंगना रनोटसारख्या स्पष्टवक्त्या अभिनेत्रीने मात्र स्पष्ट शब्दांत करण जोहरला ‘वशिलेबाज मंडळींचा नेता’ या विशेषणाने गौरविले. शालजोडीतला हा सत्कार करणने जेव्हा त्याच्या विशेष अंदाजात स्वीकारला, तेव्हा कंगनाने स्पष्टपणे केलेली शेरेबाजी त्याला आवडली नाही, हे दिसून आले. इथेच वादाची ठिणगी पडली. त्यानंतर अनेक मुलाखती आणि कार्यक्रमांमध्ये कंगनाला डिवचणे करणने सोडले नाही. कंगना नंतरही तिच्या मुद्द्यांवर ठाम राहिली. मात्र करण आणि त्याच्या समर्थकांना तिचे हे आरसा दाखवणे रूचले नाही. काहींनी तिची बाजू घेतली, काहींनी सिनेसृष्टीत वारसदार म्हणून जन्माला येणाऱ्यांची बाजू मांडली; तर काहींनी कंगनाचे जाहीर अभिनंदनही केले. काही दिवस गेले आणि सगळे शांत झाले असे वाटत असतानाच करणने सैफ अली खान आणि वरुण धवन यांच्या मदतीने पुन्हा एकदा कंगनाला लक्ष्य केले.
बॉलिवूडचे पुरस्कार सोहळेही ‘जिथे भेळ तिथे खेळ’ याच मानसिकतेतून आखले जातात, हे एव्हाना सर्वज्ञात आहे. ज्याची चलती त्याने व्यासपीठावर येऊन काहीही केले तरी चालते किंवा अशा व्यासपीठांचा वापर कुणी आणि कशासाठी करायचा यावर हे सोहळे बेतलेले असतात. पुरस्कार कुणाला द्यायचे इथपासून कुणी परफॉर्म करायचे, कुणाला किती मानधन द्यायचे, कुणावर कॅमेरे सतत फिरवायचे, सोहळ्यात कुणाला किती किंमत द्यायची, कुणाची कशी जिरवायची आणि कोणता पुरस्कार कोणाला कोणाच्या हस्ते द्यायचा, सोहळ्यात बसायला जागा कुठली हवी या सगळ्याचे गणित आधीच ठरलेले असते. किंबहुना मध्यंतरी एका नामांकित पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकाने कलाकारांच्या नखऱ्यांविषयी जाहीर भाष्य केले तेव्हा अनेकांच्या भावनाही दुखावल्या होत्या. तर एकूणात पुरस्कार सोहळेही विनोदाच्या आवरणाखाली एखाद्याला टार्गेट करण्यासाठी असतात, याची प्रचिती वारंवार येत असते. अशाच एका सोहळ्यात करण, सैफ आणि वरुण एकत्र असताना कंगनाचा विषय छेडून वशिलेबाजीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणण्यात आला. पुरस्कार सोहळ्याच्या रंगमंचावर सैफ, वरुण आणि करण हे तिघं एकमेकांना सतत आपण फिल्मी कुटुंबातून आलो आहोत, याची मुद्दाम आठवण करून देत होते. एका क्षणी वरुणने करणला त्याच्या एका सिनेमातलं ‘बोले चुडिया, बोले कंगना’ हे गाणे आठवतेय का, असे विचारले आणि करणने, ‘कंगना खूप बोलते. ती नाही बोलत तेच बरे असते’, असे उत्तर दिले. सगळ्यात शेवटी या तिघांनी ‘नेपोटिझम रॉक्स’ असे म्हणत वशिलेबाजीचा जयजयकार केला.
या सगळ्या प्रकारावर काही सेलिब्रेटींसह सामान्य चाहत्यांनीही तीव्र निषेध नोंदवला. कंगनासारख्या परिणामांची पर्वा न करता खरे बोलणाऱ्या अभिनेत्रीचा, एका स्त्रीचा भर सोहळ्यात असा अपमान केला जातो हे अयोग्य असल्याचे मत काहींनी नोंदवले, तर काहींनी या तिघांनी ही सगळी बडबड कंगनासमोर करून दाखवण्याचे आव्हान दिले. आपला उद्दामपणा दाखवण्यापेक्षा चाहत्यांना जिंकून दाखवा, असे म्हणायलाही चाहते विसरले नाही. हा प्रकार खपून जाईल अशी अपेक्षा असणाऱ्या या तिघांचे डोळे तेव्हा खाडकन उघडले, जेव्हा सर्वसामान्यांनी त्यांना चार गोष्टी सुनावल्या. करण जोहरसह सैफ आणि वरुणलाही अखेर या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागण्याची बुद्धी झाली. कंगनासोबत काम केलेल्या सैफने तर जाहीर पत्र लिहून चुकल्याचे कबूल केले. ही पश्चातबुद्धी कदाचित त्याला त्याच्या करिअरकडे पाहून झाली असावी, ‘छोटे नवाब नवाबी तुमच्या घरी दाखवा. कंगनाचे सिनेमे शंभर कोटी क्लबचे आहेत. तुमच्या भूमिका तुम्हाला तरी आठवतात का,’ अशा ढिगाने प्रतिक्रिया त्याच्या सोशल अकाउंटवर उमटल्या. जे चूक ते चूकच या न्यायाने तिघांनी दाखवलेला हा माजुर्डेपणा एका अर्थाने त्यांचा खरा चेहरा उघड करणारा ठरला.
बॉलिवूडमध्ये उद्दामपणा करणाऱ्यांची कमी नाही. यश, पैसा, प्रसिद्धी, घराण्याचे नाव आणि चाहते किंवा फॉलोअर्सची संख्या या सगळ्याची नशा या मंडळींच्या वागण्यातून सतत दिसत असते. अद्वातद्वा बोलणे आणि वागण्याचे जणू लायसन्स आपल्याकडे आहे, अशा थाटातच ही मंडळी वावरत असतात. एकीकडे अशा मंडळींची कमी नसताना दुसरीकडे बॉलिवूडमध्ये त्यांची बाजू घेणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मुलाने वडिलांची जागा घेणे अर्थातच चुकीचे नाही कारण जे वातावरण पाहून ही मंडळी लहानाची मोठी होतात तेव्हा त्या क्षेत्रात करिअर करण्याची त्यांची इच्छा असल्यास त्यात वावगे काहीच नाही. मात्र घराण्याचे मोठेपण दाखवतानाच अंगी नम्रता असेल तर कलाकार म्हणून यशस्वी नसलेल्यांनाही चाहत्यांकडून आदर मिळतोच. अभिनेता अभिषेक बच्चनचे उदाहरण त्यासाठी अनेकदा दिले जाते. अभिषेकला त्याचे सिनेमे आणि बिग बींशी तसेच बायकोशी केल्या जाणाऱ्या तुलनेतून सतत डिवचले जाते. मात्र उर्मट वर्तन किंवा अर्वाच्य भाषा त्याने कधीही वापरलेली नाही. ज्येष्ठ अभिनेेते विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नानेही सिनेमासाठी ओळखींचा वापर करत नसल्याचे किंवा त्यासाठी पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांना जात नसल्याचे सांगितले आणि त्याचे वर्तनही नेहमीच सभ्यतेला धरून असते. रणबीर कपूरही वडिलांसारखा कधी कपूर घराण्याचा वारसा दाखवण्याचा प्रयत्न न करता आणि विचलित न होता शांतपणे चाहत्यांसमोर येत असतो. थोडक्यात, यश मिळवण्यासाठी कष्टच करावे लागतात, याला आपणही अपवाद नाही याची जाणीव काही मोजक्यांना आहे.
स्टारकिडसची एक बाजू आहेच. मात्र, कलाकाराचा मुलगा असण्याने इथला प्रवेश सुकर होतो हे नाकारूनही चालणार नाही. कारण महेश भट यांची कन्या आलिया भटला इथे येण्यासाठी काहीच स्ट्रगल करावा लागला नाही. करण जोहरने तिचे पालकत्व पत्करले. सलमान खानने जुन्या मैत्रीला जागत अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजला लाँच केलं. आगामी काळात तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी, सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा, चंकी पांडेची मुलगी अनन्या यांना खुद्द करण जोहरच लाँच करणार आहे. जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरीला संजय लीला भन्साळींच्या बॅनरचे बोलावणे आले आहे. रणबीर कपूर आणि सोनम कपूरलाही भन्साळींनीच पदार्पणाचा सिनेमा दिला होता. म्हणूनच या मंडळींना इथे येण्यासाठी स्ट्रगल नसतो, मात्र नंतर कामातून स्वतःला सिद्ध करावे लागते. दुसरीकडे इंडस्ट्रीत ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ म्हणत अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून काही शे मुली दर वर्षी दाखल होतात. तेव्हा कुठे त्यातली एखादीच कंगना रनोट पुढे जाते आणि शंभर कोटी क्लबचे सिनेमे आपल्या खांद्यावर पेलण्याची हिंमत बाळगते. मालिका-जाहिरातींमध्ये धडपडणारा विद्या बालनसारखा एखादाच चेहरा स्वतःच्या नावावर सिनेमा गर्दी खेचेल याची शाश्वती देऊ शकतो. म्हणूनच सहज इंडस्ट्रीत दाखल झालेल्या वारसदार मंडळींनी ‘चार दिन की चाँदनी, फिर काली रात है’ ही बॉलिवूडच्यात गाण्यांमध्ये सतत कानी पडणारी ओळ लक्षात ठेवली पाहिजे.
कंगनाचा मुद्दा चर्चेत असतानाच अचानक अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने केलेल्या एका ट्विटवरून वर्णद्वेषाची लागणही बॉलिवूडच्या झगमगाटाला असल्याचे दिसून आले. आज नवाझुद्दीन सिद्दीकी इंडस्ट्रीतले मोठे नाव असले, तरी इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. संघर्षाच्या काळात रंग-रूपावरून त्याची कायम निंदा केली जायची आणि अभिनेता म्हणून त्याला आपल्या सिनेमात न घेणाऱ्यांची संख्याही खूप मोठी होती. नवाझने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘मी कुणा गोऱ्या-हँडसमबरोबर काम करू शकत नाही, कारण मी काळा आहे. दिसायला चांगला नाही याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. पण मी या गोष्टींकडे कधीच लक्ष दिले नाही.’
नवाझने अचानक असे ट्विट करण्यामागे नेमका काय उद्देश आहे, त्याचा इशारा कुणाकडे आहे हे कळलेले नाही. कदाचित अभिनेत्री चित्रांगदा सिंगने अचानक त्याच्यासोबतचा सिनेमा सोडल्यामुळे असे घडलेय की काय, अशीही चर्चा आहे. एकूणात मात्र इंडस्ट्रीतला वर्णभेद त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकरने ‘पेज थ्री’ आणि ‘फॅशन’ या सिनेमांतून बॉलिवूडचा बुरखा काढून दाखवला. ‘बडा घर पोकळ वासा’ या उक्तीप्रमाणे बॉलिवूडच्या अंतरंगाचे दर्शन त्यातून घडले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक घटना घडल्या आणि घडत राहणार आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणेच इथली वशिलेबाजीही थांबेल की नाही, हा खरेतर उत्तर माहिती असणारा आणि नसणाराही प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सारा खेळ गुंतवणुकीचा!

$
0
0

- श्रीपाद अपराजित
हुरहूर लागावी, आठवण यावी असे भारतात आहे तरी काय, असा पुरेसा मग्रूर प्रश्न विजय मल्ल्याने परवा विचारला. भारतीय बँकांची ९ हजार कोटींहून अधिक रक्कम बुडवून तो सध्या लंडनला जाऊन बसलाय. हे टगे लोकही अनेकदा खरे बोलतात. मल्ल्याने भारतात यावे असे काहीच उरलेले नाही. भारतात येऊन अडचणी वाढणार असतील तर कशाला यायचे, हा त्याचा व्यावहारिक प्रश्न आहे. व्यवहारविहीनता संवेदनशील व्यक्तीत आढळते. भावना-संवेदनांचा मल्ल्याशी काही संबंध नाही. लंडनची मौज सोडून भारतात परतण्याएवढा मी मूर्ख नाही असेच कदाचित त्याला म्हणायचे असावे.
सभ्य आणि सुरक्षित समाजाच्या देशधारणा वेगळ्या असतात. असभ्य आणि दुष्ट लोकांच्या त्याहून भिन्न. सभ्य समाजाला सारेच देशवासीय निकोप बनतील असा भास होत असतो. याउलट गुंडपुंडांना सभ्य समाजाला लुटण्याची प्रेरणा खुणावत असते. हा समाज असाच नेभळट राहिला तर आपल्या साम्राज्याला नख लागणार नाही हा खल प्रवृत्तीचा विश्वास दुणावत जातो. मल्ल्याचे बहुधा तसेच झाले असावे.
माझे बहुतांश नातलग विदेशात आहेत, असे मल्ल्याच म्हणतो. ‘मी स्वतः १९९२ पासून लंडनमध्ये राहतोय. मला पळून जाण्याची गरज नाही. भारतात परतण्याला स्थिती अनुकूल नसल्याने मी सध्या भारतात जाणार नाही’ असे तो म्हणाला. त्यातील ‘सध्या’ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याचे सख्खे आणि सावत्र नातलग ब्रिटन आणि अमेरिकेत राहतात. त्याला आपलेसे वाटणारे आणि मागील अनेक वर्षांत त्याने आपलेसे करून घेतलेले लोक त्याच्या संपर्कात आहेतच. ‘मल्ल्याला भेटले तर फाशी’ असा कुठलाही कायदा आपल्या देशाने केलेला नाही. भारत आपल्यासारखाच मल्ल्याचाही देश आहे. देशवासीयांची लुबाडणूक केली असल्याने भारताला तो हवा आहे. तातडीने हवा आहे की नाही, यावर निश्चितच वाद असू शकतात. ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण खटला सुरू आहे. पुरावे घेऊन मोठा चमू तिथे गेला आहे. एवढी राळ उठली असतानाही मल्ल्याच्या कॅलेंडरमधील चैन चुकलेली नाही. तो वाट्टेल तिथे जातो. क्रिकेट सामने बघतो. रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्यांना, अश्वशर्यतींना त्याची हजेरी असते. नुकताच तो ‘फॉर्म्युला वन’च्या कार्यक्रमात झळकला. १९९२ पासून तो लंडनला ये-जा करीत असल्याने लंडनदेखील त्याच्यासाठी घरासारखेच बनले असणार. सर्व सुरळीत असताना भारतात परतण्याचा प्रश्नच कुठे येतो?
मल्ल्याने ज्या बँकांना गंडविल्याचा आरोप आहे, त्या बँकांत देशाचा पैसा गुंतला असल्याने लोकांचा रोष आहे. स्वदेशाविषयीची आत्मीयता लोकस्नेहातून येते. त्यातूनच आपला परिसर, दगड, माती, नद्या, किल्ले आपलेसे वाटायला लागतात. हा देशाभिमान मोजणारे मीटर कोणाजवळही नसते. ही देशीय आत्मीयता बाळगतानाच प्रत्यक्षात आपल्या खिशावर थेट डल्ला मारलेला नाही असा समज पोसणारा आणि त्या कल्पनेने सुखावणाराही एक वर्ग देशात असतो. देश सोडून पळण्याच्या मल्ल्याच्या कृतीवर लोकांना आक्षेप असला तरी तो तीव्र संतापात परावर्तित झाल्याचे दिसले नाही. त्याला अद्दल घडावी म्हणून देवभोळ्या जनतेने मंदिरात यज्ञ केल्याचेही स्मरणात नाही. या सार्वजनिक प्रगटीकरणामागे दडली असते गुंतवणूक. ती किती खोल आहे यावर सर्व काही ठरते.

ओहोटीचा शोध
गुंतवणूक फक्त पैशांची असते असे नाही. गुंतवणूक भावनांची असते. देशप्रेमाची असते. एखाद्या आरोपीवर वेळेत कारवाई होत नसल्याने मन दुखावते. तो त्रास असतो गुंतवणुकीचा. पैशांच्या गुंतवणुकीवर हात साफ करून देशाबाहेर पळण्यात मल्ल्या का यशस्वी होतो? त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांची देशाबद्दलची गुंतवणूक कमी झाली असते म्हणून. अशी ओहोटी लागलेल्यांचा शोध मल्ल्या प्रवृत्तींकडून सातत्याने सुरू असतो. राज्यकर्त्यांच्या गुंवतणुकीचा लाभ दहापटीने होतो. राज्याचा रेटा वाढला की माळीणच्या पुनर्वसनातील दिरंगाई दूर होते. केंद्राचा रेटा वाढला की महाडचा खचलेला पूल मुदतीआत बांधला जातो. देशवासीयांची ‘इमोशनल इन्व्हेस्टमेन्ट’ कमी होत चालली काय, याची एखादी चाचणी घ्यायला हवी.
देशाच्या एकूणच रचनात्मक विकासाची, भौगोलिक प्रगतीची आस ज्यांना असते, ते असतात देशाचे खरे गुंतवणूकदार. आपण राहू शकत नसलेल्या, घर विकत घेऊ शकत नसलेल्या काश्मिरातही विकास व्हायला हवा असे या भावनिक गुंतवणूकदारांना वाटते. अंतर फार असले तरी तिथला दगड अशांच्या अंगणात पडतो. खोऱ्यात शांतता नांदावी अशी त्यांची मनापासूनची इच्छा असते. कारण असे लोक ‘देश’ या संकल्पनेवर घट्ट प्रेम करतात. चहा प्यायल्यानंतर डिस्पोजेबल कप कचरापेटीत टाकण्यासाठी दोन पावले चालण्याची ते तसदी घेतात. पोलिसांची नजर चुकवून सिग्नल तोडणारे आणि भर रस्त्यात थुंकणारे तुलनेने निर्धास्त असतात. आपले काही चुकले असे त्यांना वाटतच नाही. त्यांच्यात ती जाणीव निर्माण करणे म्हणजेही गुंतवणूकच. शेगावचे सेवेकरी भाविकांनी भिरकावलेले कागदी बोळे, बिस्किटांचे पुडे स्वतः उचलून कचरापेटीत टाकतात. ही गुंतवणूक दिसली की सामान्यांचे डोळे उघडतात. पुन्हा तशीच चूक करण्यासाठी त्यांचे मन धजावत नाही. ही सामूहिक गुंतवणूक जगण्या-बोलण्यातून प्रतिबिंबित झाली तर गैरप्रकारांवरील दडपण गडद होत जाईल.
सामान्य माणसाचे मन तसेही दुखरे असते. विदेशाचे आकर्षण असले तरी त्यांची मानसिकता ‘अपने घर में भी है रोटी’ अशीच असते. चौकात थांबलेल्या गाडीपुढे हात पसरणाऱ्याला पाच रुपये देऊ शकलो नाही तर घरी परतेपर्यंत त्यांना रुखरुख लागते. ही चुटपूट म्हणजे खरी गुंतवणूक. अशी तृप्ताई सामान्यांना गवसते. अब्जोपती असूनही मल्ल्या प्रवृत्तीचे लोक अशा गुंतवणुकीपासून कोसो दूर असतात. बनेल उद्योजकांना व्यवहारवाद संतुलित आणि रुक्ष बनवतो. लंडनच्या क्रिकेट सामन्यात अचानक दृष्टीस पडणाऱ्या मल्ल्याची यथेच्छ टर उडवून सामान्य लोक राग शांत करून घेतात. पत्रकारांचे आक्षेपार्ह प्रश्न आल्यावरही मल्ल्या रागावल्याचे दिसत नाही. खरे तर त्याने आपले संतुलन गमवायला हवे होते. याउलट एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो, ‘मी एक प्रामाणिक देशभक्त असून भारतीय ध्वज उंचावण्यात मला नेहमीच अभिमान वाटतो.’

उमाळा नको, ऊर्जा हवी!
मुळात, व्यवहारी लोकांच्या आणि सामान्यांच्या देशभक्तीत मोठा फरक असतो. लंडनमधील लिलावात कोट्यवधीची बोली लावून टिपू सुलतानची तलवार खरेदी करणे ही झाली मल्ल्याची देशभक्ती. देशभक्तीत स्वप्रतिमेचे उदात्तीकरण नको. सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीच्या आग्रहामागे असतो अभिनिवेश. लोहपुरुषाच्या निरपेक्ष देशभक्तीचा अंगीकार ही झाली खरी ऊर्जा. या तुलनेत टिपूच्या समशेरीसाठी मल्ल्याने केलेली आर्थिक गुंतवणूक क्षुल्लक ठरते. त्याने देशाच्या व्यवस्थेसोबत केलेली फसवणूक मोठी ठरते. भारतीय लोकशाहीने राज्यसभेचे सदस्यत्व प्रदान केल्यानंतरही मल्ल्याला देशाच्या ऋणानुबंधांशी फारकत घ्यावीशी वाटते.
स्वतः अप्रामाणिक राहून जगाकडून भलेपणाची अपेक्षा करणाऱ्यांचा इतिहास असाच दुर्दैवी असतो. अशा दुतोंडी दैवतांना कौल लावणे बंद केले तर बावनकशी गुंतवणुकींची कितीतरी लख्खचित्रे डोळ्यांपुढून सरकू लागतील. दक्षिण आफ्रिकेतून शिक्षण घेऊन परतणाऱ्या महात्म्याची आणि लंडनमधील तीन वर्षांच्या शैक्षणिक वास्तव्यानंतर परतणाऱ्या बाबासाहेबांची मायदेशाविषयीची ओढ म्हणजे आत्मीय गुंतवणूक. या अंतस्थ कळकळीनेच उच्च शिक्षणानंतर खुणावणारे वैयक्तिक ऐश्वर्य सोडून त्यांना मातृभूमी गाठावीशी वाटली. स्वातंत्र्यवीरांच्या समुद्र उडीमागेही हीच तळमळ होती. व्यवहारी अर्थकारण त्यागणाऱ्या त्या महानायकांचे देशासाठी कासावीस होणे मल्ल्याला कळणार नाही. ‘आठवण येण्याजोगे भारतात आहे तरी काय’ हे बेताल बोल अचानक येत नाहीत. आठवांचे संचित न कळणाऱ्यांच्या तोंडीच अशी भाषा येऊ शकते. मातृभूमीची ध्वजा उंचावण्याच्या वल्गना मल्ल्याने न केलेल्या बऱ्या. कर्तृत्वाची गुंतवणूक साधणाऱ्या एखाद्या सामान्य खेळाडूला तो सन्मान निश्चित मिळेल. देशवासीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या मल्ल्याला नव्हे! गुंतणे माणसाला अक्षरशः गोठवून टाकते. कितीही अमान्य केले तरी स्वदेशातील प्रताप मल्ल्याला डाचत राहतील. विस्मृतींची सोबत सोपी असते. स्मृतींचा शाप घेऊन जगणे अधिक कठीण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रों, तुमचा मोदीवर भरोसा नाय का?

$
0
0


- श्रीरंजन आवटे

दिल बहलाने के लिए पहलाज का खयाल अच्छा है! पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाला एव्हरेस्टवर नेले आहे. सेक्स, प्रेम वगैरे ‘पाप’ गोष्टींच्या संदर्भात कात्री लावून झाल्यानंतर अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटात त्यांनी गाय, गुजरात..इ. शब्द वगळायला सांगितले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटात अमर्त्य सेन हे शब्द उच्चारता येणार आहेत, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत सोशल मीडियावर. पहलाजभैय्यांची कात्री एकीकडे तर दुसरीकडे काँग्रेसने इंदू सरकारवरून माजवलेले रणकंदन. मधुर भांडारकरचा नवा सिनेमा इंदू सरकार, इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविषयी आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधून इंदिरा गांधींची बदनामी करण्यात आलेली आहे, असा कांगावा करत काँग्रेसने मधुर भांडारकरच्या पत्रकार परिषदा बंद पाडल्या. मधुरने ही कटू आठवण सांगत ट्विटरवरून त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचारले आहे राहुल गांधींना. राहुल गांधी अजून मौनात आहेत. काँग्रेसनंतर पुन्हा भाजपच्या भावना दुखावल्या गेल्या. तन्मय भटने मोदींवर विनोद केला म्हणून. मोदींची बदनामी कोण करू शकणार? पण तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एकीकडे इंदू सरकार दुसरीकडे भोंदू सरकार! तन्मय भटच्या विनोदाने व्यथित झालेली मंडळी पोस्टकार्डस या संकेतस्थळावरून इंदिरा गांधींविषयी अश्लील विकृत माहिती पसरवण्यात आघाडीवर असतात. वैयक्तिक बदनामी करण्याचे तंत्र वापरत आता उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्याविषयी काहीही अवमानकारक पसरवले जात आहे. ज्यांचे विचार तुम्हाला पटत नाही, त्यांना या ना त्या पद्धतीने संपवा, अशी योजना सुरू आहे. ईपीडब्लूचे संपादक परनजॉय गुहा ठाकूर्ता यांना राजीनामा द्यावा लागणं तर निखिल वागळे यांचा शो अचानक बंद करणं किंवा जेएनयूच्या ३० विद्यार्थ्यांना निदर्शनं करतात म्हणून सस्पेंड करणं, अशा अनेक घटनांमधून दिसतं आहे. सोशल मीडिया या धाकदपटशाहीच्या विरोधात उभा राहतो आहे.
दरम्यान अमरनाथ हल्ल्याने देश हादरला. याविषयी अगदी मोजक्या प्रतिक्रिया संयत होत्या. बहुतेकांनी पाकिस्तानचा समाचार घेण्याची भाषा केली. भाजप नेत्यांनी कुठं आहेत ‘नॉट इन माय नेम’ वाले, असे ट्विटरवरून सवाल केले. देशभरात झुंडींनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ सर्वत्र ‘नॉट इन माय नेम’ या नावाने या हत्यांचा निषेध करण्यात आला होता. याच आंदोलनाने अमरनाथ हल्ल्याचा निषेधही केला. मात्र धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या अजेंड्यासाठी याचा वापर झाला, होतो आहे, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली. या हल्ल्यातून यात्रेकरूंचा बचाव करणारा ड्रायव्हर सलीम शेख हीरो झाला. पण एक मुस्लिम या घटनेचा नायक कसा, म्हणून हा ड्रायव्हर नव्हताच, अशी खोटी बातमी पसरवण्यात आली. अल्टन्यूजने पुन्हा एकदा ही फेक न्यूज पसरवणाऱ्यांना उघडं पाडलं. बंगळुरूमध्ये डेमॉक्रसी ट्रॅवल्स ही बस चाललेली होती. त्यावर फोटो होतो जीनांचा. कुणी एकाने त्याचा फोटो पोस्ट केला आणि भारतात जिनांचे समर्थक कसे, असे विचारत या ड्रायव्हरची हत्या करण्यासाठी आवाहन करण्यात आले. जीनांचा फोटो लावणं एवढी स्फोटक गोष्ट असू शकते, याची कल्पना आपण करू शकत नसल्याचे अनेकांनी फेसबुकवर नोंदवले. गंमतीचा भाग म्हणजे ती बस आणि जीनांचा तो फोटो हा एका सिनेमातील शूटिंगमधील प्रसंग होता. फेक न्यूज चोहीकडे किती वेगाने पसरत आहेत, याचे हे उत्तम उदाहरण होय. फेक न्यूजच्या संदर्भात रवीश कुमार या हिंदी पत्रकाराने केलेले शोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. शेरोशायरी सुरू झाली-झूठों ने झूठो से कहा है की सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है की सच बोलो या राहत इंदौरींच्या ओळीही व्हाट्सअॅपवर शेअर केल्या गेल्या. मार्क ट्वेन म्हणाला होता, ‘सत्य पायात चप्पल घालेपर्यंत असत्याने अर्ध जग पादाक्रांत केलेलं असतं.’ मोदींनी अनेक परदेश दौरे करत निम्मे विश्व एव्हाना पालथं घातलेलं आहे. त्यातून परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास वगैरे बराच झालेला आहे, असा दावा मोदीभक्त करत असतात. मोदींनी परत एकदा विधान केलं – गोरक्षकांना आवरा. गोरक्षकांचा मोदींवर भरोसा आहे की नाही कोण जाणे! मोदींच्या विधानाचं स्वागत अनेकांनी केलं. मात्र विश्व हिंदू परिषदेनं मोदींनाच विरोध केला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भारतभर गोहत्याबंदी करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. मनोहर पर्रीकरांनी तर बीफ कमी पडलं तर आयात करू, अशी हमी दिली त्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. आहे मनोहर तरी मिळेल बीफ, असंही म्हटलं गेलं.
रामनाथ कोविंदांसाठी मात्र सारे मनोहर घडले आहे. ६५ टक्के मतदानासह ते विजयी झाले. १२ वर्षांच्या खासदारकीच्या काळात दलित अॅट्रॉसिटीविषयी एकही प्रश्न न विचारणारे ‘दलित’ कोविंद हे राष्ट्रपती झाले आणि दलितांचे प्रश्न राज्यसभेत मांडता येत नाहीत, म्हणून मायावतींनी उत्तर प्रदेशमधील दलित वोट बँक गमावल्यानंतर आणि खासदारकीचे एक वर्ष बाकी असताना राजीनामा दिला. या दोघांच्या निमित्ताने दलित प्रश्नांवर चर्चा सुरू झाली, प्रतीकात्मक राजकारणाविषयी ताशेरे ओढले गेले. कुणाच्याच राजकारणाविषयी भरवसा राहिलेला नाही.
नुकतचं आरजे मलिष्काने ‘मुंबै, तुझा बीएमसीवर भरोसा नाय का’ हे गाणं सादर केलं आणि शिवसेना व्यथित झाली. एवढी व्यथित झाली की ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याची वृत्तं येत आहेत. आरजे मलिष्कावर वैयक्तिक टीका करणारं एक गाणं सेनेनंही तयार केलं. त्याला पुन्हा रेडएफएमने उत्तर दिलं असं सारं गाण्यातून युद्ध सुरू झालं आहे. त्याचे व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी नवनवी गाणी तयार झाली.
मित्रों, तुमचा मोदीवर भरोसा नाय का ?
मोदींची आश्वासनं गोल गोल
अच्छे दिनचा झाला झोल झोल
पंधरा लाखांचे वादे झाले फोल फोल
शोनू, तू मोदीसंग गोड बोल!
अशी गाणी तयार होताहेत. मोदींविषयी गोड बोलण्याशिवाय पर्याय नाही. तिळगूळ मिळेल न मिळेल, भारतावर संक्रांत आलेली असल्याने गोड बोलणे भाग आहे. सोशल मीडिया मात्र गोड बोलता बोलता खडे बोलही सुनावतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावाची ओढ

$
0
0

पावसाळा सुरू झाल्यावर ट्रेकिंग आणि निसर्ग सहलींच्या जाहिराती फेसबुक अथवा इतर सोशल नेटवर्किंग साइटवर झळकायला लागतात. ‘आय एम इन’ असा प्रतिसाद देत तरुण मंडळी या सहलींना भरघोस प्रतिसाद देतात. काही दिवसांपूर्वी फेसबुक चाळताना ‘भात लावणी शिबिर, मोजक्याच जागा शिल्लक’ अशी एक पोस्ट दिसली. भात लावणी दोन वेळा का करतात, चिखलात भाताची रोपे लावल्यावर ती वाहून कशी जात नाहीत, भात चिखलात येऊनही पांढरा कसा असतो... या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घ्यायची मिळविण्यासाठी शेतात भात लावणी करायला या ..असा मेसेज या पोस्टवर लिहिला होता. कुतूहलामुळे मी संबंधित संयोजकांशी संपर्क साधून चौकशी केली असता, ते म्हणाले, ‘भात लावणी हा सध्या ‘ट्रेंडिग’ विषय आहे. लोकांना शेतात चिखलात जाऊन काम करावेसे वाटते आहे. पालकांनाही मुलांना पुस्तकी धडे प्रत्यक्ष शेतात जाऊन देण्याची इच्छा आहे. यामुळे भात लावणीची शिबिरे लोकप्रिय होत आहेत. शेतकऱ्यांनाही पर्यटकांच्या मदतीचा हातभार लागतो आहे.’ संयोजकाच्या या प्रतिसादाने मला सुखद धक्का दिला. सुट्टीच्या दिवशी गाडी काढायची कुठल्याशा धबधब्यामध्ये, दऱ्या खोऱ्यांमध्ये फिरायचे, जोरजोरात गाणी ऐकत मनमुराद नाचायचे, दारू पार्टी करायची, बेशिस्तपणे गाडी चालवत वाहतुकीच्या कोंडीला हातभार लावायचा, असा उद्योग करणारे उपद्रवी पर्यटक वाढत असताना, ग्रामीण पर्यटनाकडे वळणाऱ्यांची नवी फळी उभी राहणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब वाटली.
पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हंगाम असतो. मुख्यतः भाताचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांची पावसाळा सुरू झाला की लावणीची लगबग सुरू होते. पहिल्या पावसात भाताची रोपे करायची आणि पावसाने वेग धरला, की एका दमात कुटुंबाने भातलावणी करायची, अशी परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी भातलावणी हा जणू स्नेहमेळावाच. घरातल्या महिला सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी न्याहारी करतात. कोवळ्या उन्हात कुटुंब शेताकडे रवाना होते. महिला दुपारचा स्वयंपाक उरकून शेतात मदतीसाठी जातात. या वेळी मनोरंजनासाठी महिला गावाकडची जुनी पारंपरिक गाणी, ओव्या म्हणतात. पुरुष मंडळीही त्यांना दाद देत स्वतः गाणी म्हणतात. दुपारचे जेवण झाल्यावर पुन्हा सूर्यास्तापर्यंत हा उपक्रम सुरू असतो. चोहोबाजूला हिरवाईने नटलेले डोंगर, खळाळणाऱ्या धबधब्यांचा अखंड कानावर पडणारा आवाज, दरीमध्ये आखीव रेखीव चौकोनांमध्ये सुरू असलेली भात लावणी बघणे म्हणजे नेत्र दीपक सोहळा ठरतो. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रक्रियेमध्ये अलीकडे नवीन अडथळा निर्माण झाला आहे. नोकरीनिमित्त तरुण मंडळींनी शहराकडे धाव घेतल्याने गावाकडचे मनुष्यबळ कमी होते आहे. त्यामुळेच मदतीला हात हवेत म्हणून शेतकऱ्यांनी शहराला या कामात सहभागी होण्याची साद घातली आहे. विशेष म्हणजे नागरिकांचाही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लोक कौटुंबिक सहल म्हणून ही भात लावणीचे कष्ट आणि मजा अनुभवत आहेत. घरात येणारा भात तयार होण्यामागचे कष्ट पाहिल्यावर भाताचे प्रत्येक शीत किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव बच्चे कंपनीला होते आहे. विविध स्वयंसेवी संस्थांनी कॉलेजमधील मुलांना शेतकऱ्यांशी जोडून दिले असून शेकड्यांच्या संख्येने विद्यार्थी भोर, वेल्हे भागात भात लावणीसाठी जात आहेत. याशिवाय काही कॉर्पोरेट, आयटी कंपन्यांतील कर्मचारी ‘टीम बिल्डिंग’चा अनुभव घेण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे नियोजन करत आहेत.
भात लावणी नव्हे तर नांगरणी स्पर्धाही नव्यानेच पुढे आली आहे. कोकणात नुकत्याच झालेल्या या स्पर्धेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावात दर वर्षी नांगरणी आणि लावणी स्पर्धा घेतली जाते. तरुण वर्ग शेतीकडे वळावा हा या स्पर्धेचा उद्देश असतो. खरे तर पूर्वी कोकणात शेती करताना एकमेकांच्या मदतीला संपूर्ण गाव एकत्र येत असे. अलीकडे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती हद्दपार होते आहे. तरुणांचा सहभाग कमी पडतो आहे. कडवईच्या शेतकऱ्यांनी मात्र सामुदायिक शेतीची परंपरा आजही कायम ठेवली आहे. या परंपरेला शहरापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी तिला स्पर्धेचे रूप दिले आहे. स्पर्धेसाठी तीन वाड्या एकत्र येतात. शेताच्या तीन बाजूला रेलिंग लावली जाते आणि या रेलिंगला कमीत कमी वेळेत वळसा मारून जो नांगरी येतो तो नांगरी विजेता. जी बैलजोडी कमीत कमी वेळात हे अंतर कापते, त्याला बक्षीस दिले जाते. रेलिंगबाहेर जाणारी बैलजोडी बाद होते. विशेष म्हणजे नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण स्पर्धेसाठी पुन्हा गावात येण्यास सुरुवात झाली आहेत. याच वेळी पर्यटक नांगरणी परंपरा अनुभवण्यासाठी हजेरी लावत आहेत.
केवळ पावसाळाच नव्हे; थंडीमध्ये हुरडा पार्टीच्या निमित्ताने पर्यटकांची गावाकडे जाण्याची ओढ वाढली आहे. कृषी पर्यटन केंद्राऐवजी मित्र मैत्रिणींच्या गावाकडच्या घरी जाऊन लोक हुरड्याचा आनंद लुटत आहेत. शेतकऱ्यांबरोबर राहून त्यांचे जीवन जवळून बघण्याचे कुतूहल पर्यटकांमध्ये आहे. शेतात जाऊन नांगरणी, भाजी लावणे, पिक काढणे, बैलगाडीत फिरण्यामध्ये लहान मुलांसह त्यांच्या पालकांनाही विशेष रस आहे. उन्हाळ्यामध्ये गावाकडे आंबा, द्राक्ष खाण्याच्या, रानमेवा गोळा करण्याच्या स्पर्धा रंगत असून पर्यटक सर्व ताणतणाव, स्पर्धेचे आयुष्य विसरून या उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होत आहेत. गावाकडच्या लोकांना या परंपरांमध्ये नाविन्य जाणवत नसले तरी पर्यटकांसाठी हे उपक्रम नवचैतन्याचा आनंद देणारे आहेत.
गेल्या पाच वर्षांत अचानक लोकप्रिय झालेला काजवा महोत्सव याचे उत्तम उदाहरण. चित्रपट, मालिका आणि पुस्तकांमध्ये पाहिलेले, वाचलेले काजवे हजारोंच्या संख्येने कसे झाडावर एकत्र येऊ शकतात, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पर्यटक भीमाशंकर, जुन्नर, नगर, भंडारदरा या भागातील गावकऱ्यांकडे राहायला जातात. झाडांवर लुकलुकणारे हे तारे बघण्यात त्यांना प्रचंड औत्सुक्य असते. एवढेच कशाला गावाकडच्या जत्रांनाही आता ‘स्टेटस’ मिळाले आहे. ग्रामीण संस्कृती आणि खाऊगल्लीत फिरण्यासाठी पर्यटक आवर्जून जत्रांमध्ये हजेरी लावतात. बंदुकीएवढ्या मोठ्या कॅमेऱ्याच्या लेन्स घेऊन दऱ्या खोऱ्यांमध्ये फिरणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी हे उपक्रम, जत्रेतील रंगंबिरंगी वातावरण म्हणजे पर्वणीच ठरते. या सर्व उपक्रमात उपस्थित राहून या रंगाच्या उत्सवांचे साक्षीदार होण्यासाठी फोटोग्राफरमध्येही स्पर्धा निर्माण झाली आहे.
एकूणच काय, तर अत्याधुनिक सुविधा मिळविण्यासाठी शहराकडे गेलेल्या अनेकांच्या मनाच्या कोपऱ्यात आजही गावाची ओढ कायम आहे. आजही दिवसभर एसीमध्ये बसलो तरी गावाकडच्या पारावर संध्याकाळी अंगावर येणारी वाऱ्याची झुळूक अधिक गारवा देणारी वाटते. चिखलात काम केल्यावर बांधावर बसून चुलीवर केलेले पदार्थ खाण्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. गावातल्या मातीशी पुन्हा नाळ जुळण्यासाठी गावकरी आणि शहरी माणूस यांच्यातील संवादाची दरी कमी झाली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल, टीव्ही, कम्प्युटर, आयपॅड यांची शहरात गरज असली, तरी वर्षातून काही दिवस या गॅजेट्सला सुट्टी देऊन गावाकडे जाऊन तिथल्या मातीत एकरूप झाले पाहिजे. पूर्वजांनी इतका सुंदर परंपरा आणि संस्कृतीचा वारसा आपल्याला दिला आहे, तो पुढच्या पिढीकडे पुस्तक रूपाने नव्हे; तर प्रत्यक्ष अनुभवातून पोहोचविण्यासाठी आजच्या पालकांनी एक पाऊल गावाच्या दिशेने टाकावे, एवढीच अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’मध्ये शुद्धलेखनाच्या १४० चुका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षकांची पात्रता ठरविणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) मराठी माध्यमाच्या पेपर एक आणि पेपर दोनच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल १४० पेक्षा अधिक शुद्धलेखनाच्या चुका आढळून आल्या आहे. त्यामुळे ही परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत मराठीत प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांचीच पात्रता परीक्षा घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट होत आहे. अशातच यंदाचे दोन्ही पेपरची काठीण्यपातळी ही गेल्या परीक्षेच्या तुलनेत अधिक असल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले.
राज्यात डीएड आणि बीएड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी शिक्षक होण्याच्या पात्रतेचे आहेत की नाही, हे तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षा घेण्यात येते. ही टीईटी परीक्षा मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेतून होते. ‘डीएड’ पदविकाधारक विद्यार्थी पेपर एक तर ‘बीएड’ पदविकाधारक विद्यार्थी पेपर दोन देतात. प्रत्येक पेपर हा १५० प्रश्नांचा असतो. शनिवारी झालेल्या दोन्ही पेपरच्या मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल १४० शुद्धलेखनाच्या चुका आढळून आल्या. त्यामुळे परीक्षार्थ्यांना प्रश्न नेमका काय आहे आणि प्रश्नातील शब्दाचा अर्थ काय घेण्यात यावा, यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. प्रश्‍नपत्रिकांमधील साधे आणि सोपे शब्दसुद्धा अशुद्ध लिहण्यात आले आहेत. सर्वाधिक चुका या प्रश्नपत्रिकांमधील मराठी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, सामाजिक शास्त्रे या भागांतील आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. पहिल्या पेपरमध्ये ३० ते ३५; तर दुसऱ्या पेपरमध्ये १२० पेक्षा अधिक चुका झाल्याचे एका विद्यार्थीने सांगितले.
दरम्यान, या चुका केवळ मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत आढळून आल्या आहेत. इंग्रजी आणि उर्दु माध्यमांच्या प्रश्नपत्रिकेत चुका आढळून आल्या नसल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले. टीईटीसाठी राज्यात दोन लाख ९७ हजार २४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. याबाबत परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे म्हणाले, ‘टीईटीच्या प्रश्‍नपत्रिकांमध्ये शुद्धलेखनाच्या काय चुका झाल्या आहेत, याबाबतच्या लेखी हरकती विद्यार्थ्यांनाकडून आल्या नाहीत. हरकती आल्या तर त्या तज्ज्ञांपुढे ठेवल्या जातील आणि त्या सोडविण्यात येतील.’

उशिरा पोहोचल्याने परीक्षेला मुकले
दरम्यान, टीईटीचा पेपर एक सकाळी १०.३० ते १; तर पेपर दोन दुपारी २ ते ४.३० या वेळेत होता. परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही परीक्षार्थी केंद्रांवर उशिरा पोहोचल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीसाठी प्रेरक स्पर्धा

$
0
0

हापूस आंब्याबरोबरच किंबहुना त्याहूनही अधिक भात म्हणजेच तांदूळ हीच कोकणाची ओळख आहे. ‘कोकणे आणि भातबोकणे’ असेही म्हटले जात असे. अलीकडे त्यात बदल झाला आहे. भातशेतीचे क्षेत्र झपाट्याने कमी होऊन शेती ओस पडू लागली आहे. हे विदारक चित्र बदलण्याचा प्रयत्न शेतीची आस असणाऱ्या काही जणांनी चालविला आहे. शेती सोडून देणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच मुंबईकडे जाणाऱ्या तरुणांना शेतीकडे वळविण्याच्या प्रयत्नातूनच नांगरणी आणि भातलावणीची आगळीवेगळी स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या प्रतिसादात दर वर्षी घेतली जात आहे.

- प्रमोद कोनकर
मुंबई-गोवा महामार्गावरचे, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली हे गाव गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. महामार्गाजवळच गरम पाण्याची कुंडे असून ते पर्यटकांचे आकर्षण आहे. याच गावात महामार्गाजवळच असलेल्या ‘देव’ शेतात आज मोठी लगबग सुरू होती. शेकडो लोक जमा झाल्याने भर पावसाळ्यात परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. लोक लावणी स्पर्धेसाठी जमले होते. (पण ही फडातली लावणी नव्हती. कोकणात लावणी हा शब्द शेतीशी निगडीत आहे. भाताची रोपे चिखलात रोवणे म्हणजे लावणी.) जत्रा देवशेतात भरली असली, तरी ती काही कोणत्या देवस्थानाची नव्हती. तिला फार तर श्रमदेवतेचे नाव देता आले असते. कारण जत्रेत कोण्या देवाचे अभंग गायिले जात नव्हते, तर गाऊ मोटेवरचं गाणं, चल माझ्या राजा चल रं सर्ज्या, लिंगोबाचा डोंगुर अशी श्रमाचे आणि शेतीचे महत्त्व सांगणारी स्फूर्तिगीते तेथे ऐकू येत होती. त्याला कारण होते ते म्हणजे शेताच्या नांगरणीची आणि भातलावणीची स्पर्धा! आरवली गावातील केदारनाथ पालखी नृत्य पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत जिल्हाभरातील ४५ बैलजोड्यांची जोते सहभागी झाली होती. गेल्या आठवड्यात हा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ही अशी स्पर्धा गेल्या सात-आठ वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात भरविली जात आहे.
भातशेतीसाठी कोकण प्रसिद्ध आहे. पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने संकरित बियाण्यावरही सातत्याने संशोधन होत आहे. या बियाण्याला कर्जत, पनवेल, फोंडाघाट, पालघर, रत्नागिरी, सिंधू, सह्याद्री अशी कोकणाशी निगडीत नावेच दिली जातात. तरीही प्रत्येक भागातील पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार आणि वातावरणातील वैविध्यामुळे संशोधित बियाणे कोकणात सर्वत्र चांगले उत्पन्न देईलच, याची खात्री नसते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनेच शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. परिणामी भातशेतीचे उत्पन्न आणि अर्थातच भातशेतीखालील क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. आतबट्ट्याची भातशेती करण्यापेक्षा प्रथेनुसार तरुणांनी रोजगारासाठी मुंबईची वाट धरणे आणि गावात राहिलेल्यांनी शेतामध्ये आंबा-काजूची लागवड करणे हा नवाच रिवाज सुरू झाला. राज्य सरकारने १९९० साली रोजगार हमी योजनेखाली फळबाग लागवडीची योजना लागू केल्यानंतर भातशेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले. सुमारे पाच लाख हेक्टरवर भातलागवड होणाऱ्या कोकणात सध्या सुमारे चार लाख हेक्टरवरच लागवड होते. त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गातील सुमारे सव्वा लाख हेक्टरचा समावेश आहे. दर वर्षी भातलागवडीच्या क्षेत्रात घट होत आहे.
बदलते हवामान, पावसाचे बदललेले प्रमाण, मजुरीला माणसे मिळण्याची वानवा, तरुणांचा शहरांकडे असलेला कल, घटते उत्पन्न आणि फळबागायतीचा निर्माण झालेला पर्याय हीच भातलागवडीचे क्षेत्र घटण्याची कारणे आहेत. तरीही अनेक कुटुंबांचे घर अजूनही भाताच्या उत्पादनावरच चालते. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले बैल बाळगणे आणि शेतमजूर मिळणे कठीण होत असल्याने त्यांना शेत नाइलाजाने पडीक ठेवावे लागते. इतरांच्या शेतावर मजुरी करून असे शेतकरी उदरनिर्वाह करतात. तरुण वर्ग शहरांकडे वळल्याने गावात शेतीतील मनुष्यबळही कमी झाले. त्यामुळे सामूहिक शेतीची कल्पना मागे पडली. या स्थितीत बदल कसा करायचा, हा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच सामूहिक शेतीची कल्पना पुन्हा एकदा पुढे आली. बदलत्या काळातही स्पर्धा आणि खेळांच्या माध्यमातून गाव एकत्र येते, हे लक्षात घेऊन काही जणांनी पुढाकार घेतला. त्याचेच मूर्त रूप म्हणजे नांगरणी आणि लावणीची स्पर्धा. संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात या स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून होत आहेत. आता तर त्याचा ‘इव्हेंट’ झाला आहे आणि अन्य भागातील लोकही या स्पर्धा पाहण्यासाठी मुद्दाम येतात.
आज काहीसे व्यापक स्वरूप धारण केलेल्या या स्पर्धा सुमारे आठ वर्षांपूर्वी कोकण कृषी विद्यापीठात सुरू झाल्या. युवा पिढीला शेतीची ओढ लागावी, यासाठी दापोलीच्या कृषी महाविद्यालयाने अनोखा उपक्रम राबवला. शेतात जाऊन थेट विद्यार्थ्यांची भातपीक लावणीची स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी लावणीचा शेतातील आनंद अगदी मनमुराद लुटला. शहरात राहणारे विद्यार्थीदेखील त्यामध्ये सहभागी झाले. मात्र तो एक प्रयोगच ठरला. नंतर तो उपक्रम बंद पडला. या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन किंवा स्वयंस्फूर्तीने संगमेश्वर तालुक्यात पोंक्षे आंबव, आरवली या भागात सामूहिक भातलावणी स्पर्धा सुरू झाल्या. माखजन विभागात गेल्या सहा-सात वर्षांपासून नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यावर्षीही स्पर्धेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिरवीगार सृष्टी, दमदार पाऊस, उत्साही शेतकरी, बैलांनी तयार केलेल्या चिखलात दिसणारी त्यांची मनमोहक प्रतिबिंबे, भोवताली उपस्थित टाळांच्या कडकडाटात दाद देणारे नागरिक आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे या सर्व वातावरणातून निर्माण होणारा उत्साह हे सारे दृश्य आगळेच असते. मधूनमधून पावसाच्या हलक्या सरी आणि पडणारे ऊन यामुळे स्पर्धेच्या ठिकाणचे वातावरण उल्हसित बनते. साधारणतः एकरभर जागेत दोन तास नांगरणी आणि चिखल झाल्यानंतर त्यामध्ये बैलजोड्यांसह कमी वेळेत नेमून दिलेले अंतर पार करणाऱ्या प्रथम तीन शेतकऱ्यांना रोख पारितोषिके आणि चषक देऊन त्यांचा गौरव, असे या स्पर्धेचे स्वरूप असते. स्पर्धेत जिल्हाभरातील स्पर्धक होतात. तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून शेतकरी ग्रामस्थही स्पर्धा पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हजर राहतात. शेतकऱ्यांचे आपल्या बैलावर असणारे प्रेम, बैलांच्या डोळ्यांत आपल्या मालकाबाबत असणारी आस्था हे दृश्यही पाहण्यासारखे असते. पावसात भिजत अंगावर उडणाऱ्या चिखलाकडे लक्ष न देता स्पर्धेचा आनंद लुटणाऱ्या नागरिकांच्या मनात नांगरणी आणि भातलावणी स्पर्धेने निश्चितच शेतीविषयी आपुलकी निर्माण होते.
या स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक असलेले कडवई गावचे विजय कुवळेकर यांनी स्पर्धेमुळे झालेल्या बदलाची माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकरी आपल्या शेतातून आपल्याला वर्षभर पुरेल, एवढे धान्य पिकवत. पण अलीकडे मनुष्यबळाची वानवा निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पूर्वीची सामूहिक शेतीची पद्धत अमलात आणली, तर चांगला बदल होईल, अशी अटकळ मनाशी बांधली. कोकणातील शेतकऱ्यांचे क्षेत्र मर्यादित असते. तेवढ्यासाठी बैल पोसणेही शक्य होत नाही. असे चार-पाच शेतकरी आले, तर खर्च विभागला जाईल आणि एकमेकांना शेतीत मदत केली, तर कमी वेळेत शेती होईल, हे शेतकऱ्यांना पटवून दिले. पूर्वी शेरी म्हणजे सहकारी पद्धतीचा भिशीसारखा एक प्रकार होता. थोडथोडे पैसे जमा करून ते वाडीत पूजा असेल किंवा कोणाचे आजारपण असेल, तर त्यासाठी वापरले जात. याच पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून स्पर्धेची कल्पना निघाली. पाच-सहा वर्षांपूर्वी ८-१० बैलजोड्या असत. यावर्षी ६१ जोड्यांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा पाहिल्यानंतर गावातून मुंबईत छोट्या-मोठ्या रोजगारासाठी गेलेले काही तरुणही शेतीसाठी परत येऊ लागले आहेत. रब्बीतही पिके घेतली जाऊ लागली आहेत. पाच ते सात एकर क्षेत्रात भेंडीचे भरघोस उत्पन्न मिळाले. त्याच चार-पाच महिन्यांत महिन्याला चांगले वीस ते पंचवीस हजाराचे उत्पन्न एका गटाला मिळाले. प्रत्येक शेतकऱ्याला एक ते पाच हजार रुपये मिळाले. सामूहिक शेतीचा हा फायदा शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागला आहे.
कर्नाटक, केरळसारख्या राज्यांमध्ये याच पद्धतीचे लावणीचे महोत्सव वर्षातून दोन वेळा होतात. देशविदेशातील पर्यटक, छायाचित्रकार या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तेथील राज्य सरकारांनी त्या उत्सवाला पर्यटनाचा दर्जा दिला आहे. कोकणातही स्पर्धेच्या रूपाने रुजू पाहणाऱ्या या स्पर्धांना महोत्सवाचा दर्जा दिला, तर कोकणातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शेती करायला प्रवृत्त करणाऱ्या या लावणी स्पर्धा भविष्यात पर्यटनालाही चालना देऊ शकतील, यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव मानधनाची चर्चा तर होणारच!

$
0
0

नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आवश्यक तो खर्च भागविण्यासाठी राज्य सरकारने नगरसेवकांचे मानधन २० हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार, खासदारांच्या वेतनामध्ये झालेल्या वाढीनंतर सर्वच स्तरातून यावर मोठी टीका झाली होती. आमदार, खासदारांना पैशाची काय कमी आहे, त्यांच्या वेतनामध्ये वाढ करून सरकारच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड टाकण्याची गरज काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सोशल मीडीयावरदेखील एका वर्षाला खासदारावर पगार, तसेच त्याला मिळत असलेल्या विविध भत्ते, सोयीसुविधा या माध्यमातून सरासरी किती रुपये खर्च केले जातात, याचे अनेक मेसेज व्हायरल झाले होते.
वाढती महागाई, इंधनाच्या दरात होत असलेली वाढ या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आमदारारांच्या वेतनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यामुळे आमदारांना यापूर्वी मिळत असलेले वेतन ४४ हजारावरून थेट ७० हजार रुपयांवर पोहोचले आहे. आमदारांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्येही दुप्पट वाढ केल्याने ही वाढ झाली आहे. खासदार म्हणून काम करणाऱ्यांच्या वेतनामध्येही दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) कडे पाठविण्यात आला असून पुढील दोन ते तीन महिन्यांत त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. खासदारांचे वेतन ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्याची शिफारस या प्रस्तावात केली आहे. स्थानिक पातळीवर नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात राज्य सरकारने घेतला असून त्याचा अध्यादेशदेखील काढण्यात आल्याने त्याची अंमलबजावणी देखील आता सुरू होणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या वेतनात किंवा मानधनात वाढ झाली की लगेच त्यावर टीका होण्यास सुरुवात होते.
लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्यांना वाढीव मानधनाची गरज ती काय? त्यांना मिळणाऱ्या मानधनावर त्यांचे कुठे अडलेले असते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना इतर अनेक गोष्टीतूनच त्यांची ‘कमाई’ सुरू असल्याने त्यांना कशाला पाहिजे मानधन आणि वेतन अशी तक्रार सतत सुरू असते. हातात पैसा आणि मनगटात बळ असलेली व्यक्तीच राजकारणात येऊन लोकप्रतिनिधी होत असते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या बहुतांश ठिकाणी हे चित्र पहायला मिळत असले तरी प्रत्येक लोकप्रतिनिधी हा ‘जहागिरदार’ असेल असे नाही. समाजात काही तरी बदल घडविण्याच्या हेतूने आजही अनेक व्यक्ती या राजकारणात प्रवेश करून वेगवेगळ्या माध्यमातून आपला लढा देत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. खिशात एक पैसा नसला, तरी आपल्या तत्त्वांना सोडायचे नाही, अशा काही व्यक्ती आजही राजकारणात पाहायला मिळतात. त्यामुळे अशा तत्वनिष्ठ व्यक्तींसाठी हे वाढीव वेतन किंवा मानधन महत्त्वाचे ठरू शकते. नगरसेवकांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव यापूर्वी अनेकदा मांडण्यात आला होता. वेगवेगळ्या पक्षांच्या सभासदांनी हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्यावर चारही बाजूंनी टीका होत असल्याने त्याला मान्यता दिली जात नव्हती. पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेत कारभारी म्हणून गेली पंधरा वर्षे काम करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातही नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मानधन वाढीच्या प्रस्तावावरून कडक शब्दांत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर हे प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आले होते.
राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नव्याने सत्ताधारी झालेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र कोणत्याही टीकेची पर्वा न करता महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी संभाळणाऱ्या नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार २० हजार रुपये मानधन मिळणार आहे. यापूर्वी म्हणजे २०१० मध्ये नगरसेवकांच्या मानधनात वाढ करून ते ७५०० हजार रुपये महिना असे करण्यात आले होते. त्यापूर्वी पालिकेतील नगरसेवकांना महिन्याला अवघे अडीच ते साडेचार हजार रुपये मानधन मिळत होते. या मानधनाबरोबरच प्रत्येक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिल्याबद्दल प्रती सभा १०० रुपये भत्ता असे महिन्यातील चार सभांसाठीचा भत्ता असा जास्तीत जास्त ४०० रुपये भत्ता पालिकेकडून दिला जातो. शासनाने मानधन वाढीबाबत नव्याने काढलेल्या आदेशात केवळ मानधनात वाढ सुचविली आहे. सभासदांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांच्या वाढीबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.
स्थानिक पातळीवर नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी येतात. वाढती महागाई, कार्यकर्त्यांचा खर्च, भेटायला येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी कार्यालय, मोबाइल खर्च, दूरध्वनी खर्च, प्रभागातील समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठीचे आवश्यक ते मनुष्यबळ अशा अनेक प्रकारचा खर्च नगरसेवकांना करावा लागतो. नगरसेवक म्हणून मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनातून हा खर्च भागविणे अशक्य असल्याने आपोआपच वेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. प्रभागातील गरीब आणि गरजू नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा त्या भागातील नगरसेवकाला अंत्यविधी, आर्थिक मदत, होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. महापालिकेत महापौर, उपमहापौर, गटनेते, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष असे पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना तसेच विविध समित्यांची अध्यक्षपदे भूषविणाऱ्यांना पालिकेच्या वतीने वाहन पुरविले जाते. पाच वर्षांत काही मोजक्याच नगरसेवकांना ही संधी मिळते. उर्वरित नगरसेवकांना पालिकेत ये जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहन अथवा वाहनभत्ता पालिका देत नाही. बसने फिरण्यासाठी मोफत पीएमपीएमएलचा पास तेवढा पालिकेच्या वतीने नगरसेवकांना दिला जातो.
नगरसेवक म्हणून प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या मानधनाची रक्कम ही पूर्णपणे संबंधित नगरसेवकाला मिळत नाही. ज्या पक्षाच्या तिकीटावर तो पालिकेत प्रतिनिधित्व करतो, त्या पक्षाला दर महिन्याला मानधनातून काही ठराविक निधी पक्षनिधी म्हणून जमा करावा लागतो. तसेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे दौरे शहरात असल्यानंतर त्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठीदेखील नगरसेवकांना काही टक्के ‘हातभार’ लावावा लागतो. सर्वच नगरसेवक हे भ्रष्टाचार करतात असे नाही. पालिकेकडून मिळत असलेल्या मानधनावर समाधान मानून समाजसेवा करणारे काही नगरसेवक आहेत. त्यामुळे या नगरसेवकांसाठी वाढलेले मानधन हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई, कार्यकर्त्यांचा वाढता खर्च, इंधन दरवाढ या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नगरसेवकांना आता पूर्वीच्या मानधनापेक्षा अडीच पट वाढीव मानधन मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवकांवरील जबाबदारीदेखील वाढली आहे. मानधन म्हणून चांगली रक्कम मिळणार असल्याने लोकप्रतिनिधी इतर मार्गांनी पैसे मिळविण्याचा प्रयत्न करणार नाहीत, अशीच अपेक्षा आता ठेवली जाईल. लोकप्रतिनिधी म्हणून सतत नागरिकांच्या कामासाठी तत्पर राहणाऱ्या या नगरसेवकांच्या वाढीव मानधनाकडे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळवलकरांची ग्रंथसंपदा भांडारकर संस्थेस प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुस्तकांना जीव लावणारे अस्सल ग्रंथप्रेमी, वाचनाचे जणू व्यसन असलेले, मराठी, इंग्रजी साहित्याबरोबरच अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रावरही उत्तम प्रभुत्व असलेले, धारदार लेखणीद्वारे टीका करणारे आणि प्रसंगी पाठीशीही उभे राहणारे तळवलकर... अशा आठवणींना ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकरांच्या स्नेहीजनांनी उजाळा दिला.
निमित्त होते, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे दिवंगत संपादक गोविंदराव तळवलकर यांच्या वैयक्तिक संग्रहातील सुमारे पाच हजार ग्रंथ तळवलकरांचे स्नेही आणि माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला प्रदान करण्याचे. तळवलकर यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून हा अनमोल ठेवा पाटील यांनी शनिवारी संस्थेला प्रदान केला. संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर, विश्वस्त राहुल सोलापूरकर, नियामक मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, उपाध्यक्ष हरी नरके, आमदार विजय काळे, माजी खासदार प्रदीप रावत, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते.
‘पत्रकारासाठी आवश्यक ते सर्व गुण अंगी असलेल्या गोविंदराव तळवलकरांना लोभ नव्हता. त्यामुळे त्यांच्या लेखणीत निस्पृहतेचे सामर्थ्य होते. त्यांनी आपल्यावर टीका करणे हेदेखील त्या वेळच्या राजकारण्यांना वैभव वाटत असे. त्यांंच्या स्वकष्टाची, सरळ मार्गाची सर्व कमाई भांडारकर संस्थेला देणे ही दानत मोठी आहे. आपल्या हातून एखादी चूक झाली, तर ती मान्य करण्याचा मोठेपणा तळवलकरांच्या अंगी होता. ती चूक सुधारून ते संबंधितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत. सत्पात्री दान द्यावे, अशा भांडारकरसारख्या संस्थाही आता दुर्मिळ आहेत,’ असे पाटील म्हणाले.
‘तळवलकर हे पत्रकारितेचे मुक्त विद्यापीठ होते. तेच त्याचे कुलगुरुही होते. त्यांचा हा ठेवा संस्थेत उत्तम पद्धतीने जतन केला जाईल,’ असे नरके म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, सारंग दर्शने यांनीही तळवलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
‘तळवलकर हे बहुआयामी व्यक्ती होते. मराठी, इंग्रजी साहित्य, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. भांडारकर संस्था ही प्राच्यविद्येशी संबंधित असली, तरी आम्हाला कोणताही विषय व्यर्ज नाही. तळवलकरांच्या ग्रंथसंपदेमुळे संस्थेची समृद्धता वाढली आहे,’ असे बहुलकर यांनी सांगितले.
‘तळवलकर यांनी संस्थेला दोन वेळा प्रत्येकी पाच लाखांची देणगी दिली आहे. त्यातून डिजिटायझेशनचे काम केले जाते. आता तळवलकर यांची ग्रंथसंपदा प्राधान्याने डिजिटाइज करण्यात येईल,’ अशी माहिती भूपाल पटवर्धन यांनी दिली. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले. गोविंदराव तळवलकर यांच्या कन्या सुषमा व निरुपमा यांनी ‘ई मेल’द्वारे पाठवलेल्या पत्राचे राहुल सोलापूरकर यांनी वाचन केले.

हा तर आमच्या मैत्रीचा कलश : पाटील
‘कुठले पुस्तक दुर्मिळ आहे, हे ठरविणाऱ्या खूप कमी व्यक्ती असतात. गोविंदराव तळवलकर हे त्यातलेच एक. एका विद्वान माणसाने जमविलेली पुस्तके वेगळी असणारच. त्यांना भांडारकर संस्थेचे काम, कीर्ती व उपयुक्तता माहीत होती. म्हणूनच आपल्या ग्रंथसंपदेची जपणूक येथेच होऊ शकेल, याची खात्री असल्याने त्यांनी ही ग्रंथसंपदा संस्थेच्या हवाली केली. तळवलकर अमेरिकेत असताना मी या संग्रहाची देखभाल केली. आता आमच्या मैत्रीचा हा कलश मी त्यांच्या गैरहजेरीत संस्थेच्या हवाली करत आहे,’ अशी भावना तळवलकरांचे जीवलग स्नेही विनायकदादा पाटील यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्गणीसाठी जबरदस्ती करणाऱ्यांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सण व उत्सवाच्या दिवसांमध्ये व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी दिला. त्यासंदर्भात नागरिकांनी थेट लेखी तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी दिले.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी मेळाव्यात मुंढे बोलत होते. या प्रसंगी सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार, पोलिस निरीक्षक विष्णू पवार, जीएसटी उपायुक्त आर. आर. पाटील, आर. बी. पवार, अविनाश चव्हाण, संदीप शिंदे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, सुनील गेहलोत, उमेश यादव, नवनाथ सोमसे आदी उपस्थित होते.
‘सण व उत्सव साजरे झाले पाहिजेत. परंतु, त्याचा त्रास होता कामा नये. वर्गणी ही स्वेच्छेने द्यायची गोष्ट आहे. त्यामुळे जबरदस्तीने कोणी वर्गणी मागत असेल तर लेखी स्वरूपात तक्रार द्यावी. त्यावर कारवाई केली जाईल. तसेच, व्यापाऱ्यांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यातील एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने लावावा. ज्यामुळे गुन्ह्याचा तपास करणे सोयीचे जाईल,’ असेही प्रवीण मुंढे यांनी संगितले. सण आणि उत्सव तारखेनुसारच साजरे करावेत. तारखेच्या आधी किंवा नंतर कोणत्याही मंडळांना सण आणि उत्सव साजरे करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. व्यापाऱ्यांना व नागरिकांना काही त्रास झाला तर त्यांनी पोलिसांना
संपर्क करावा, असे आवाहन शिवाजी पवार यांनी केले.
किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये अनेक जण तंत्रज्ञानाशी सुपरिचित नसल्याने जीएसटी क्रमांकासाठी नोंदणी करणे त्यास अडचणीचे होत आहे. यासाठी आता पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनने किरकोळ व्यापाऱ्यांना किरकोळ व्यापाऱ्यांना मोफत जीएसटी क्रमांक काढून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग का दरिया है…और डूब के जाना है

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गझलेला दु:खाची किनार असते. ती मेंदूला भेदून हृदयात उतरते. सुखाबरोबर दु:ख असते. प्रत्येक दु:खाच्या मागे सुख आहे. दु:खाची पिडा अनुभवल्याशिवाय सुखाचा आस्वाद घेता येत नाही. शोकांतिका हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एक आग का दरियाँ है, और डूब के जाना है...’ उर्दू काव्याचे अभ्यासक आणि विचारवंत डॉ. अनीस चिश्ती गुरुवारी गझलेतून जीवनाचे रंग टिपत होते. प्रेम, दुरावा, दु:ख असे जीवनाचे रंग गझलेच्या आकृतिबंधातून गुंफण्यात आले.

उर्दू साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ कवी हिमांशू कुलकर्णी यांच्या ‘कतरा कतरा गम’ या उर्दू गझल संग्रहाचे प्रकाशन चिश्ती यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध संगीतकार रवी दाते, गझलकार प्रदीप निफाडकर, राजहंसचे संपादक डॉ. सदानंद बोरसे व कवी हिमांशू उपस्थित होते.

‘कुराणामध्ये सुख हा शब्द दु:खानंतर वापरला आहे,’ असा दाखला देऊन चिश्ती म्हणाले, ‘गझल हा नाजूक प्रकार आहे. आपले दु:ख जगाचे करणे ही कवीची खासियत असते. हिमांशू यांनी मात्र जगाचे दु:ख आपलेसे केले आहे. महाराष्ट्र असा एकमेव प्रांत आहे, जिथे मराठी व उर्दू दोन्ही भाषा एकत्र पुढे जातात. एक भाषा मेली की तिच्या जवळची भाषा मरते. कोणतीही भाषा मृत होऊ नये. हिमांशू यांनी मराठी व ऊर्दूच्या मिलाफातून तिसरी शायरी निर्माण केली आहे. भाषा खोलवर उतरलेली असते. बेरीज, वजाबाकी मातृभाषेतच केली जाते.’

‘गझल गेय असली तर ती गाता येते अन्यथा गाणाऱ्याला त्रास होतो,’ याकडे दाते यांनी लक्ष वेधले. ‘देशातील घडामोडी पाहिल्या की उर्दूची किती गरज आहे हे लक्षात येते, कारण ही प्रेमाची भाषा आहे,’ असे मत निफाडकर यांनी व्यक्त केले. विनिता पिंपळखरे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संग्रह म्हणजे रसिकता नाही

$
0
0

चित्रांसाठी जलरंगाचे माध्यम तुम्हाला आपलेसे का वाटते?

मनात आहे ते पटकन कॅनव्हासवर उतरवणं मला जलरंगामुळे शक्य होते. जलरंग लवकर वाळत असल्याने निसर्गातले एखादे दृष्य चित्ररूपात साकारताना वेळेचा विलंब लागत नाही. हवा तो परिणामही लगेच साधता येतो. माझ्या मनातील किंवा निसर्गात समोर दिसणारं चित्र कागदावर साकारायला जलरंगामुळे अपेक्षित वेग मिळतो. एकंदरितच, चित्र काढण्याच्या माझ्या स्वभावाशी जलरंग सांगड घालत असल्यानं मी या माध्यमात रमतो; पण मला इतर माध्यमंही आवडतात. तसंच, कमी आणि अचूक रंगात केलेलं ‘स्टेटमेंट’ मला जास्त योग्य वाटते.

कलाकाराला कला साकार करण्यासाठी दृष्टी असावी असते. तुमचा काय अनुभव आहे?

दृष्टीच असावी लागते. मला कुठंही चित्र दिसतं. विषय, जागेला फारसं महत्त्व नाही. मग समोर वाडा आहे, निसर्ग आहे, इमारत आहे, की झोपडपट्टी आहे हे मी पाहत नाही, तर त्या दृष्यातले रंग, आकार, गडद-फिक्या नैसर्गिक छटा, रेषा आणि दिशा यांची झालेली सुरेख गुंफण मला विषयापेक्षा जास्त भावते. ही गुंफण मी कुठंही शोधतो. मनमोहक निसर्गच समोर पाहिजे असा काही आग्रह नाही. अनेकदा मला चौकात लागलेल्या चित्र-विचित्र होर्डिंग्जमध्ये चित्र सापडतं.

तुमच्या घरातच चित्रकलेचं वातावरण होतं. पहिल्यांदा ब्रश केव्हा हातात घेतला?

वडील प्रताप मुळीक यांच्यामुळे मला हे वातावरण मिळालं. रवी परांजपे, शिवाजी तुपे हेही माझे गुरू. वयाच्या पाचव्या वर्षापासून मी चित्र काढू लागलो; पण एखाद्या लहान मुलाने चित्र काढणे ही काही वेगळी कला नाही. बोलणे, चालणे, लिहिणे जसे कुणाही लहान मुलाला येते, तसे चित्रांचेही आहे. मात्र, चित्र काढण्याकडे कुणी वाढीच्या टप्प्यातील एक टप्पा म्हणून पाहत नाही. मी त्याच्याकडे वेगळे कौशल्य म्हणून कधीच पाहिले नाही, की आत्मसात केले नाही. रांगणे, चालणे, बोलणे, लिहिणे यांच्यासारखाच चित्रे काढणे हा माझ्यासाठी एक नैसर्गिक टप्पा होता. प्रत्येक लहान मूल पहिल्या दोन वर्षांपर्यंत वाढीचे प्राथमिक टप्पे पार करते. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला भाषा शिकवली जाते. मग दोन ते पाच या मधल्या काळात तो काय करतो? तर तो चित्रांतूनच संवाद साधतो. मात्र, एकदा का शाळा किंवा भाषाशिक्षण सुरू झाली, की त्याची ही क्षमता दुरावते, जे चुकीचे आहे. चित्रकला वेगळी शिकण्याची गरज नाही. ती अंगभूत असते. हेच खतपाणी मला वडिलांमुळे मिळाले.

चित्रकाराची मूळ कलाकृती घरातील भिंतीवर लावण्याकडे तसा कमी कल आहे. चित्ररसिकता कमी असण्याचे हे लक्षण वाटते?

सुबत्ता आल्यानंतर रसिकता येते असे माझे मत आहे. घरात चित्रे, शिल्प मांडणे म्हणजेच रसिकता नाही, तर ती एक प्रतिष्ठेचीही गोष्ट असू शकते आणि ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून चित्र बाळगणे म्हणजे रसिकता नाही. खरी रसिकता सांगणे तसे अवघड आहे. अनेकांना चित्र-शिल्पांच्या कलेक्शनमधून श्रीमंतीचा देखावा करायचा असतो. काहींसाठी तर ती गुंतवणूक असते. रसिकता म्हणण्यापेक्षा मुळात आपल्याकडे चित्र खरेदी करण्याची मानसिकता नाही. चित्रांच्या किमतीही उगाचच जास्त असतात. समजा तुम्हाला दहा हजार रुपये खर्च करायचे आहेत, तर तुम्ही ते स्वतःसाठी, घरातल्या गोष्टींवर खर्च कराल; पण चित्र खरेदी करणार नाही. आपल्याकडे ते प्राधान्ययादीतच नाही आणि मलाही हे अयोग्य वाटत नाही. परदेशात मात्र ही मानसिकता दिसून येते. कमी उत्पन्न असले, तरी तिकडे आवर्जून चित्रे खरेदी केली जातात. स्वीडनमध्ये एका वयस्कर महिलेने माझे चित्र विकत घेतले. दोन हजार युरो तिला सरकारकडून पेन्शन म्हणून मिळायचे. त्यातले १००-२०० युरो ती बाजूला ठेवून सहा महिन्यांनी चित्र खरेदी करायची.

मग खरा चित्ररसिक कोण?

माझ्या मते, चित्र खरेदी केलेला प्रत्येक व्यक्ती चित्ररसिक असतोच असे नाही. माझ्या मते, कोणत्याही चित्रकाराचे चित्र पाहून सुंदर अनुभूती मिळालेला, चित्रांतून स्वानुभवाशी जवळीक साधलेला आणि चित्रकाराशी त्या चित्रांतून शब्दाविना संवाद साधणारा खरा रसिक आहे.

चित्र काढण्यामागची तुमची प्रेरणा कोणती?

छोट्या गोष्टींत मला जास्त सौंदर्य दिसते. वास्तू भव्यदिव्य असेल, तर मला ती चित्र म्हणून भावत नाही. तिची भव्यदिव्यता अंगावर येते. अनेकदा ‘लार्जर दॅन लाइफ’ वास्तूपेक्षा छोट्या वास्तूत चित्र दिसते, जी वास्तू माणसांशी जोडली आहे. कदाचित ताजमहाल मुख्य चित्र म्हणून मला भावणार नाही; पण चाळीत अनेक चित्ररंग सापडतील. सौंदर्यापेक्षा त्या वास्तूची भव्यदिव्यता अंगावर येणारी नसावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल विभाग नव्हे, बालग्रंथालय

$
0
0

Chintamani.Patki @timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

पुणे : ग्रंथालयांमध्ये एक पाटी हमखास असते. बाल विभाग. लहान मुले-मुली यांसाठीचा हा स्वतंत्र विभाग. तिथे बालसाहित्य उपलब्ध असते; पण ते सुट्टीपुरतेच. हल्ली बालविभाग बंद पडू लागले आहेत. त्यामुळे स्वतंत्र बालग्रंथालय आपल्याकडे आढळतच नाही. वारजेतील आदित्य गार्डन सिटी हे ठिकाण याला अपवाद आहे. याठिकाणी बच्चेकंपनीने मुले-मुली यांसाठी चालवलेले एक ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाचे सदस्य पन्नास लहान मुले-मुली आहेत. कार्टून पाहण्यापेक्षा त्यांना पुस्तके महत्त्वाची वाटतात, हे आशादायी चित्र आहे.

आदित्य गार्डन सिटीच्या क्लब हाउसमध्ये दर सोमवारी आणि मंगळवारी एक ग्रंथालय उघडे असते. त्याचे नाव ‘एकलेक्टिक बुक क्लब’. येथे ६ ते १२ वयोगटातील मुले-मुली एकत्र येतात. मात्र, येथे किलबिलाट नसतो, तर वाचन प्रेरणेतून निर्माण झालेली शांतता असते. ती मनाला समृद्ध करते. सिफर जिरगाळे हा नऊ वर्षांचा मुलगा हे ग्रंथालय चालवतो. त्याचा ग्रुप मदतीला असतोच.

सिफरचे वडील विश्वेश जिरगाळे एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये असून आई स्मिता यांची स्वत:ची स्टार्ट अप कंपनी आहे. या दोघांनाही वाचनाची खूप आवड असल्यामुळे सिफरवरही वाचनाचा संस्कार झाला. आई-बाबांनी आणून दिलेली ४०० पुस्तके त्याने वाचून काढली. या पुस्तकांचे आता काय करायचे, ती इतर मित्र-मैत्रिणींना वाचता देता आली तर... या विचारातून गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याने ग्रंथालय सुरू केले. या ग्रंथालयासाठी सोसायटीने जागाही दिली. बच्चेकंपनीची गर्दी आणि त्यांची पुस्तकांशी मैत्री असे चित्र तेथे दिसते.

‘घरात खूप पुस्तके संग्रही झाल्याने ग्रंथालय सुरू केले. ग्रंथालयाचे ४४ सदस्य असून ३३५ पुस्तके वाचली गेली आहेत. पन्नास रुपये मासिक शुल्कातून ९५० रूपये जमा झाले आहेत. नवीन पुस्तकेही विकत घेत आहोत. सध्या ग्रंथालयात ४२५ पुस्तके आहेत. आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी मिळून ग्रंथालय चालवतो. ग्रंथालय सुट्टीत रोज चालू असायचे. इतर सोसायटीमधील काहीजण सभासद झाले आहेत. हे ग्रंथालय आणखी मोठे करणार आहोत...’ लहानगा सिफर ग्रंथालयाविषयी पुस्तकांच्या प्रेमातून भरभरून सांगत होता. तुम्हाला कार्टून आवडते की पुस्तकं, असा प्रश्न सिफर, आरव कामत, अगस्त पाठक, सौमित्र जोशी, नंदिनी सिंग, स्वराली अनासपुरे या बच्चे कंपनीला विचारला असता त्यांनी पुस्तकं आवडते, असे उत्तर दिले.

‘वाचन संस्कार’

ग्रंथालयामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तके आहेत. इंग्रजी पुस्तकांचे प्रमाण अधिक असून इंग्रजीमधील अभिजात बालसाहित्य येथे उपलब्ध आहे. ग्रंथालयात पालकांचा हस्तक्षेप नसतो. वाचनाची गोडी आणि पूरक वातावरण निर्माण केले तर वाचनाचा संस्कार होतोच. ग्रंथालयामध्ये आता अभिवाचन, नाटक, लेखकांशी गप्पा असे उपक्रम आयोजित करणार आहोत.

- विश्वेश व स्मिता जिरगाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात ४१ टक्के पाणीसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात कोकण, नाशिक आणि पुणे विभागांमधील​ निम्मी धरणे भरली गेली आहेत. मात्र, अमरावती, नागपूर आणि मराठवाडा या विभागांमध्ये अद्यापही पावसाचे प्रमाण कमी आहे. तरीही राज्यातील धरणांमध्ये सरासरी सुमारे ४१.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा हा जास्त आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत सुमारे ३४.०५ टक्के पाणीसाठा होता. राज्यात सर्वाधिक पाऊस कोकण विभागात झाल्याने या भागातील धरणांमध्ये सुमारे ८५.४४ टक्के, तर त्याखालोखाल पुणे विभागातील धरणे सरासरी ५४.२८ टक्के धरणे भरली गेली आहेत. कोकण आणि पुण्यानंतर नाशिक विभागांतील धरणांमध्ये पाणीसाठा आहे. नाशिकधील धरणांचा पाणीसाठा हा सरासरी ४१.७५ टक्के झाला आहे.

पुणे, कोकण आणि नाशिक भागात पावसाचे प्रमाण समाधानकारक असले, तरी अमरावती, नागपूर आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाने अद्याप जोर पकडलेला नाही. अमरावती विभागातील धरणांमध्ये आतापर्यंत सरासरी २०.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाडा भागातील धरणांमध्ये सरासरी १९.७६ टक्के, तर सर्वांत कमी पाणीसाठा हा नागपूर विभागात आहे. या विभागांतील धरणांमध्ये केवळ १८.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यात मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये झालेल्या पाण्याचे प्रमाण हे सुमारे ४१.५१ टक्के असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण हे शंभर टक्के भरले आहे. पानशेत धरण हे ८६.६४ टक्के, टेमघर ४४.९५ टक्के, तर वरसगाव ५८.३८ टक्के भरले गेले आहे. पवना धरणाचा साठा हा ८५.४५ टक्के झाला आहे.



शंभर टक्के भरलेली धरणे

खडकवासला (पुणे)

कवडास बंधारा (पालघर)

डोलवाहल बंधारा (रायगड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images