Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नववीचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सीमाप्रश्नावरून भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले असतानाच बालभारतीचे नववीचे पुस्तकही याच कारणावरून वादात सापडले आहे. नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात असलेला क्यूआर कोड अक्साई चीन हा वादग्रस्त प्रदेश असल्याचे सांगणाऱ्या चित्रफितीशी जोडला गेल्याने पुस्तक वादात सापडले आहे. त्यामुळे ही लिंक तात्पुरती काढून टाकण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना संबंधित पाठाविषयी आणखी माहिती मिळावी, यासाठी पुस्तकातील धड्यांमध्ये क्यूआर कोड देण्याचा निर्णय बालभारतीने घेतला. मात्र, या क्यूआर कोडशी जोडलेल्या संकेतस्थळावरील मजकूर आणि चित्रफितींची तपासणी करण्यात आली होती का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. इतिहासाच्या पुस्तकात दिलेल्या ‘क्यूआर कोड’शी १९६५ आणि १९७१ मध्ये झालेले भारत पाकिस्तान युद्ध, मॅकमोहन लाइन, कारगिल युद्ध, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर आणि पंडित नेहरू, संरक्षण मंत्रालय, डॉ. वर्गीस कुरीयन, आणीबाणीशी संबंधित वेबसाइटसची लिंक देण्यात आली आहे. यामध्ये अक्साई चीन आणि मॅकमोहन लाइनशी संबंधित टॉप हिस्टॉरिकल इव्हेंट्स ही व्हिडिओ क्लिपही होती. त्यात अक्साई चीन हा वादग्रस्त भाग असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना पाठाशी संबंधित पूरक माहिती मिळावी, यासाठी क्यूआर कोड दिले होते. त्याची तपासणीही झाली होती. मात्र, तरीही त्याची पुन्हा पडताळणी करण्यात येईल. तोपर्यंत याची लिंक काढून टाकण्यात आली आहे, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अमर’ श्रद्धेची आव्हानात्मक यात्रा

0
0

मयुरेश प्रभुणे, जम्मू

सुसज्ज अशा लष्करी ताफ्यासह जम्मू - श्रीनगर महामार्गावरून जाणारा भाविकांचा जत्था पाहिल्यावरच काश्मीर खोऱ्यातील सध्याच्या वातावरणाची कल्पना येते. जम्मू ते पहलगाम आणि बालटालच्या मार्गावर दर काही मीटरवर उभे असलेले जवान, ठिकठिकाणी लागलेल्या चेकपोस्ट प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी दाखवून देतात. अमरनाथ यात्रेकरूंवर सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने यात्रेसमोरील मानवी संकट अधोरेखित झाले. मात्र, तेवढ्याच तीव्रतेची नैसर्गिक आव्हानेही समोर असताना ‘बाबा बर्फानी’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ कायम आहे.
सोमवारच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अमरनाथच्या यात्रेकरूंच्या उत्साहात कोठेही कमतरता नाही. मंगळवारी पहाटे तीन वाजता जम्मूवरून ३,२८९ भाविकांचा जत्था पहलगाम आणि बालटाल या अमरनाथकडे जाणाऱ्या दोन मार्गांकडे रवाना झाला. सोमवारच्या घटनेनंतर यात्रेच्या मार्गावरील सुरक्षा व्यवस्था आणखी चौकस करण्यात आल्याचे अमरनाथ श्राईन बोर्डातर्फे सांगण्यात आले. मात्र, या यात्रेसमोर फक्त दहशतवाद्यांचे आव्हान नाही. पावसाच्या लहानशा सरीनेही डोंगरावरून कोसळणारे दगड (शूटींग स्टोन), चार हजार मीटरची उंची गाठताना वाढत जाणारी थंडी आणि कमी होत जाणारा ऑक्सिजन, दरडी कोसळल्यामुळे सातत्याने बंद होणारी वाहतूक आणि हे सर्व कमी म्हणून की काय, फुटीरतावाद्यांकडून ठिकठिकाणी होणारी दगडफेक.. या सर्व आव्हानांतूनही अमरनाथयात्रेच्या उत्साहात कोठेही कमतरता नाही.
आषाढी वारीप्रमाणेच ऐन मान्सूनच्या काळात येणाऱ्या या यात्रेसमोर मात्र नैसर्गिक आणि मानवी अशी दोन्ही आव्हाने उभी असतात. १९९६ मध्ये अवकाळी बर्फवृष्टीचा मारा होऊन यात्रेतील २४२ जणांचा मृत्यू झाला होता. २००० मध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३० जणांचा बळी गेला. २०१२ मध्ये यात्रेदरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १३० होती, ज्यातील बहुतेक जण अतिउंचावरील हवामानाशी जुळवून घेऊ शकले नाहीत, तर काही जण यात्रेदरम्यानच्या अपघातात मरण पावले. यंदाही यात्रेच्या सुरुवातीलाच डोंगरावरून वेगाने आलेला दगड लागून (शूटिंग स्टोन) एका भाविकाचा मृत्यू झाला.
यंदा २९ जून रोजी यात्रेला सुरुवात झाली. नऊ जुलैपर्यंत अमरनाथाचे दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या एक लाख ३४ हजार ७७१ आहे. नारळी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेचे नियोजन अमरनाथ श्राईन बोर्डातर्फे केले जाते.

नैसर्गिक उगमाचे श्रद्धास्थान
पूर्णतः नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या जगातील मोजक्या श्रद्धास्थानांमध्ये अमरनाथचा समावेश होतो. उन्हाळ्यात हिमालयाच्या पर्वतशिखरांवरील बर्फ वितळू लागल्यानंतर अमरनाथच्या गुहेमध्ये पाणी झिरपण्यास सुरुवात होते. गुहा समुद्रसपाटीपासून ३८८८ मीटर उंचीवर असल्यामुळे पाणी बर्फाच्या स्वरूपात जमा होत जाऊन शिवलिंगाचा आकार घेते. गुहेमध्ये मुख्य शिवलिंगाप्रमाणेच बर्फाचे आणखी दोन लहान स्तंभही आकारतात. पुरातन काळापासून अमरनाथच्या गुहेतील महादेव, पार्वती आणि गणेशाचे दर्शन घेण्यासाठी उन्हाळ्यात भाविकांची रीघ लागलेली असते.

‘आयएमडी’तर्फे विशेष सुविधा
अमरनाथ यात्रेदरम्यान नैसर्गिक आपत्तींपासून भाविकांचे रक्षण करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) विशेष सुविधा दिली जाते. याबाबत आयएमडीच्या श्रीनगर केंद्राचे संचालक सोनम लोटस म्हणाले, ‘जम्मू- श्रीनगर महामार्गावर थोड्या पावसातही अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता असते. यात्रेची वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी यासाठी सॅटेलाइट इमेज, रडारच्या उपयोग करून स्थानिक पातळीवरील पावसाचा अंदाज दोन ते तीन तास आधीच प्रशासनाला देण्यात येतो. यात्रेच्या मार्गावरील पाऊस, बर्फवृष्टीची शक्यता पाहण्यासाठी यात्रेच्या काळात चोवीस तास हवामानावर नजर ठेवण्यात येते. हवामानाचे अपडेट देण्यासाठी आयएमडी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, वाहतूक विभाग यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यावरून देण्यात येणाऱ्या माहितीनुसार प्रशासनातर्फे यात्रेचे नियोजन करण्यात येते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानगीविनाच कमी वृक्षतोड शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्ता रुंदीकरण, मेट्रो प्रकल्प आणि शहरातील मोठ्या विकासकामांसाठी पंचवीसपेक्षा कमी झाडे तोडायची असल्यास, त्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता राहिलेली नाही. ही झाडे महापालिका आयुक्त / मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने तोडता येतील, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
महापालिका स्तरावरील वृक्ष तोडीसंदर्भातील परवानगी सध्या वृक्ष प्राधिकरणामार्फत दिली जाते. वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष मान्यता मिळेपर्यंत बराच कालावधी जातो. शहरातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी काही झाडे तातडीने काढणे आवश्यक असते. वृक्षतोडीची परवानगी मिळण्यास विलंब झाला, तर संबंधित प्रकल्प प्रलंबित राहतात. तसेच, काही वेळा नागरिकांसाठी धोकादायक ठरणारी खासगी मालमत्तेतील झाडे तोडणेही आवश्यक असते. कधीकधी या परवानगीला बराच वेळ लागतो. त्यामुळे, २५ पेक्षा कमी झाडे तोडायची असल्यास, त्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.
वृक्षतोडीची परवानगी देण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडून बराच वेळ घेतला जात असल्याने एखाद्या ठिकाणच्या झाडांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ४८ तासांत त्यासंबंधीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्याने वृक्ष प्राधिकरण समितीसमोर सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, वृक्ष तोडण्यासंदर्भातील अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची जागेवर पाहणी, चौकशी करून नागरिकांकडून हरकती-सूचना मागवून त्यावरील अहवाल १२ दिवसांत सादर करण्याचे बंधन संबंधित वृक्ष अधिकाऱ्यांवर घालण्यात आले आहे. सरकारच्या नव्या सूचनांमुळे वृक्ष तोडीच्या परवानगीच्या कामांना अधिक गती प्राप्त होईल, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त अद्याप बेघरच

0
0

घरे मालकीहक्काने देण्याचा निर्णय प्रलंबित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील पूरग्रस्तांच्या वसाहतीतील घरे मालकीहक्काने देण्याचा तसेच पूरग्रस्तांच्या मूळ भूखंडालगतच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय कॉँग्रेस सरकारने घेतला होता. मात्र, या निर्णयाची तीन वर्षांपासून युती सरकारने अंमलबजावणी केली नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी निषेध नोंदविला आहे.
पानशेत धरण १९६१मध्ये फुटले. त्यातील पूरग्रस्तांना शहरात तेरा ठिकाणी भाड्याने घरे देण्यात आली. या घरांची मालकी मिळावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. कित्येक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार मोहन जोशी यांनी पाठपुरावा केला. २०१३ मध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. विधिमंडळातही याबाबत प्रश्न मांडून त्यासंदर्भात सरकारचे लक्ष जोशी यांनी वेधले होते. १२ जुलै २०१३ला सरकारने अध्यादेश जारी करून पूरग्रस्तांना त्यांची घरे मालकी हक्काने करून देण्याचा निर्णय घेतला.
पूरग्रस्तांना दिलेल्या गाळ्यांच्या भोवतालच्या मोकळ्या जागेत केलेल्या वाढीव बांधकामासहित अतिक्रमण नियमित करण्याचे ठरले. तसेच, ज्या पूरग्रस्तांनी सहकारी सोसायट्या स्थापन केल्या होत्या; त्यातील १०३ सोसायट्यांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने सरकारने जागा दिल्या होत्या. त्यांना ही रक्कम स्वीकारून मालकी हक्क देण्याचे ठरले. तरीही युती सरकारने गेल्या तीन वर्षांत निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. पानशेत धरण फुटण्याच्या दुर्घटनेला ५६ वर्षे झाली असून, युती सरकार पूर्वीच्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजवणी होणार नसेल, तर आंदोलन करण्याचा इशारा जोशी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोक्यात रॉड घालून लुटले

0
0

राजाराम पुलाजवळील प्रकार; जखमीचा डोळा निकामी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहरात रात्रीची लूटमार सुरूच असून, राजाराम पुलाजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीला पाठीमागे कट मारला म्हणून डोक्यात रॉड घालून लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत जखमीचा डोळा निकामी झाला आहे. हल्ला करणाऱ्या दोघांना नागरिकांनी जागेवरच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन जोशी (वय ३८, रा. हिंगणे खुर्द) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी इंद्रजित अजय परदेशी (वय २२, रा. पुलाची वाडी, डेक्कन) आणि इम्तियाज महंमदअली लष्करी (वय २४, रा. नॅशनल पार्क, माणिकबाग) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरात जोशी यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. रविवारी रात्री ते मित्रांसोबत जेवण्यासाठी बाहेर गेले होते. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ते घरी परतत होते. राजाराम पुलाजवळ जोशी यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून ते लघुशंकेसाठी गेले. त्या वेळी दोन्ही आरोपी त्यांच्याजवळ आले. गाडीला कट मारून का आलास म्हणून, त्यांनी जोशी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पैसे मागितले.
जोशी यांच्यासोबत वाद सुरू असतानाच परदेशीने त्यांच्या डोक्यात रॉड घातला. तसेच, ब्लेडने वार केले. त्यांच्याजवळील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्याच वेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक तेथे आले. त्यातील एकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. नियंत्रण कक्षाकडून सिंहगड रोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जोशी यांना मारहाण करणाऱ्यांना नागरिकांनी पकडून ठेवले होते. पोलिस आल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिले. जोशी यांना तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत जोशी यांचा एक डोळा निकामी झाला. हल्ला करणाऱ्यांनी मद्यपान केले होते. त्यातील परदेशी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. लष्करी याचे पूर्वीचे रेकॉर्ड नसून, तो पिंपळे गुरव येथील कंपनीत काम करतो. या दोघांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फॅमिली कोर्टा’चे लवकरच स्थलांतर

0
0

सप्टेंबरमध्ये नवीन जागेत जाणार; रंगकाम अंतिम टप्प्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फॅमिली कोर्टाच्या स्थलांतराला अखेर मुहूर्त सापडला असून, सप्टेंबर महिन्यात नवीन इमारतीत फॅमिली कोर्ट सुरू होणार आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ फॅमिली कोर्टाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे सध्या रंगरंगोटीचे आणि फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
भारती विद्यापीठ भवन येथे सातव्या आणि नवव्या मजल्यावर गेली २८ वर्षे फॅमिली कोर्टाचे कामकाज सुरू आहे. फॅमिली कोर्टात दाखल होणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्याची कोर्टाची जागा अपुरी पडत होती. पक्षकार आणि वकिलांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीचा घाट घालण्यात आला. त्यानुसार शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ इमारतीचे काम हाती घेण्यात आले. गेली आठ वर्षे बांधकाम सुरू होते. सरकारने या इमारतीसाठी ३९ गुंठे जागा देऊन १० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. न्या. स्वतंत्रकुमार यांच्या हस्ते या जागेचे २००९मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. दोन वर्षांत इमारत बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निधीअभावी तसेच पालिकेच्या काही परवानग्यांअभावी बांधकाम रखडले होते.
इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक फर्निचरसाठीही निधी अपुरा होता. फॅमिली कोर्टातील वकिलांनी त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर फर्निचरच्या कामाला सुरुवात झाली. सध्या फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, फॅमिली कोर्टाची नवी इमारत उद् घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

उद् घाटनाला मुख्यमंत्री?
फॅमिली कोर्टाचे स्थलांतर सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी सांगितले. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच उद् घाटन होईल. उद् घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची तारीख मिळावी म्हणून, त्यांची नुकतेच भेट घेतल्याचेही कवडे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगेश तेंडुलकर यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुंचल्याच्या फटकाऱ्यातून विविध विषयांवर कोरडे ओढणारे आणि सुजाण नागरिकत्वाची बिजे रोवणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर (वय ८०) यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, कन्या, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. लेखक, कलावंत, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी यांच्या उपस्थितीत मंगळवारी वैकुंठ स्मशानभूमीत तेंडुलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तेंडुलकरांनी काढलेली व्यंगचित्रे गालावर हसू उमटवून अंतर्मुख करायला लावणारी असल्याने ती कायमच चर्चेचा विषय होती. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, शहर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध प्रश्न आणि घटना यावर तेंडुलकर हे आपल्या व्यंगचित्रकलेच्या माध्यमातून कायम तिरकसपणे भाष्य करीत. त्यांची व्यंगचित्रे केवळ प्रदर्शनापुरती नव्हती. रस्त्यावर उतरून त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून विविध विषयांवर व्यापक जागृती घडवली. वाहतुकीच्या नियमांबाबत ते रस्त्यावर, चौकांमध्ये याबाबतची पत्रके वाटत. शहरातील वाहतूक व्यवस्था उच्च दर्जाची व्हावी, यासाठी ते वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. ते नियमितपणे दिवाळीच्या सुमारास शहरांतील चौकात उभे राहून वाहतुकीविषयक जागृती करणाऱ्या शुभेच्छापत्रांचे वाटप करीत असत.

तेंडुलकर यांनी रूढ अर्थाने व्यंगचित्रकलेचे शिक्षण घेतले नव्हते. आपल्या उत्कट प्रतिभेच्या जोरावर त्यांनी ही कला आत्मसात केली होती. डोक्यातील विचार बोटांच्या सुंदर हलचालीतून ते पटलावर उमटवित असत. त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून एकही विषय सुटला नाही. नाट्यआस्वादक, ललित लेखक अशीही त्यांची ओळख होती. तेंडुलकर यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे ९०वे प्रदर्शन मे महिन्यात बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे आयोजित करण्यात आले होते; पण प्रकृती अचानक बिघडल्याने प्रदर्शन रद्द करावे लागले. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. दोन महिन्यांपासून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तीस हजार युवकांना रोजगाराभिमुख शिक्षणाचे उद्दिष्ट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मागासवर्गीय समाजातील ३० हजार युवकांना दर वर्षी कौशल्याधारित शिक्षण देऊन रोजगाराभिमुख करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिली. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

‘बार्टी’तर्फे मागासवर्गीय समाजातील युवकांना कौशल्य विकास योजनेची माहिती देण्यासाठी पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहामध्ये ‘कुशल महाराष्ट्र मेळावा’ आयोजिण्यात आला होता. या वेळी बडोले बोलत होते. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, ‘बार्टी’चे महासंचालक राजेश ढाबरे, करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, बार्टीच्या निबंधक सविता नलावडे, प्रकल्प संचालक रुपाली आवळे आदी उपस्थित होते.

बडोले म्हणाले, ‘एका बाजूला तांत्रिक प्रगती वाढत असताना, तांत्रिक ज्ञान नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती आहे. तर, दुसरीकडे तांत्रिक ज्ञान नसल्याने तरुणांना नोकऱ्या मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या काळात तरुणांना केवळ शिक्षित न करता त्यांना कुशल बनविणे महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळेच बार्टीच्या माध्यमातून उद्योजकता विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देऊन, रोजगाराभिमुख करण्याचा प्रयत्न आहे.’

कांबळे म्हणाले, ‘तरुणांनी केवळ पदवी घेऊन फायदा नाही. आताच्या जमान्यात कौशल्यदेखील पाहिजे. त्यासाठी ‘बार्टी’तर्फे शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरांवर ‘कुशल’ मेळावे घेतले जाणार आहे. त्यामुळे वस्ती पातळीवरील कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.’ पुणे शहरातील ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. त्यांना रोजगाराच्या संधी नाहीत. या लोकांना कौशल्य विकासात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाने मिळून एक प्रारूप तयार करावे, अशी सूचना डॉ. धेंडे यांनी केली. या मेळाव्यामध्ये विविध शासकीय आणि खासगी संस्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.

मोदींच्या आधी ‘बार्टी’कडून कौशल्य विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कौशल्य विकास योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यासाठी विशेष विभागाची स्थापना करण्यात आली. मात्र, ‘बार्टी’ने देशात सर्वप्रथम कौशल्य विकसनाचा कार्यक्रम सुरू केला. या अंतर्गत सुमारे २६ हजार युवकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सहा हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यापैकी साडेतीन हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या. आता इतरांचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती राजकुमार बडोले यांनी दिली.

‘विश्रांतवाडी वसतिगृह कामाची चौकशी करू’

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीच्या झालेल्या दुर्दशेप्रकरणी चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने काम करून घेण्याचे आश्वासन राज्याचे या विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिले.

सामाजिक न्याय विभागाच्या विश्रांतवाडी येथील वसतिगृहाचे काम पूर्ण होऊन काही महिनेच उलटले आहेत. मात्र, एवढ्यातच या वसतिगृहाची दुर्दशा झाली. वसतिगृहाच्या इमारतीमधील प्रत्येक जिन्याचे रेलिंग तुटले आहे. रूममधील कपाटाची दारे निखळली आहेत. सिलिंगमधून पाणी झिरपत आहे, असे चित्र या वसतिगृहात पाहायला मिळत आहे. हा प्रकार ‘मटा’ने समोर आणला. तसेच, कोट्यवधी रुपये खर्च करून या वसतिगृहाची उभारणी करण्यात आली असून, अल्पावधीत याची दुरवस्था झाल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बडोले यांना विचारणा केली, असता त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त गेले वर्ष राज्य सरकारतर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी १२५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. या अंतर्गत विविध शहरांमध्ये वसतिगृहे बांधण्यात आली. पुण्यात विश्रांतवाडी येथे साकारण्यात येत असलेल्या सामाजिक न्याय भ‍वनच्या आवारात एक हजार विद्यार्थी क्षमतेचे मुलांचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. तर, मुलींच्या वसतिगृहाचे काम सुरू आहे. समाजकल्याण आयुक्तालयाच्या आवारातील संत ज्ञानेश्वर वसतिगृहात, आळंदी येथील वसतिगृह, कोरेगाव पार्क येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी सध्या येथे राहत आहेत.

या वसतिगृहाचे काम अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे येथे ज्या गोष्टींमध्ये उणिवा असतील, त्या पुन्हा नव्याने करून घेता येतील. या कामाची चौकशी करून, संबंधित ठेकेदाराकडून ते करून घेतले जाईल.

राजकुमार बडोले, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. रेषांच्या फटकाऱ्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रं, नियतकालिकांमधून ललित लेखनही केलं होतं. आज दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

मंगेश तेंडुलकरांनी अखेरच्या क्षणापर्यंत ब्रश सोडला नव्हता. ते वयाच्या पाष्ठीनंतरही कार्यरत होते. अगदी मागील महिन्यातच पुण्यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरले होते. त्यांच्या चित्रप्रदर्शनला आजही गर्दी होतं होती इतकी बोलकी चित्र ते रेखाटायचे. हास्य व्यंगचित्रकार म्हणून मंगेश तेंडुलकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली ती साध्या सोप्या चित्रसंकल्पानांच्या आधारावर.

तेंडुलकरांनी काही पुस्तकेही लिहिली. त्यात प्रामुख्याने 'भुईचक्र', 'पॉकेट कार्टून्स' आणि 'संडे मूड' या सारख्या पुस्तकांचा समावेश होतो. यापैकी 'संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याशिवा त्यांना मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता. व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा, १९९८), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवळी अंक २००३), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवळी अंक २००३), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रिम, दिवळी अंक २००३) लेख बरेच गाजले.

तेंडुलकर एक उत्तम वाचक होते. त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या दुनियेमध्ये रमताना पुस्तकांशी फारकत घेतली नव्हती. वडिलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने त्यांना वाचनाची लहापणापासूनच सवय होती. सुरुवातील नोकरी व्यवसाय करता करता व्यंगचित्रे काढणाऱ्या तेंडुकलकरांनी वाचन आणि व्यंगचित्रे अशा दोन्ही आवड एकाच वेळेस जोपसल्या होत्या. वयाच्या साठीनंतर त्यांनी कॅरिकेचर प्रकार हाताळला तसेच वयाच्या साठीनंतर त्यांनी महाभारत आणि मनाचे श्लोक वाचायला घेतले. वाचनाला वय, वेळ, काळाचे कोणतेही बंधन नाही आणि वाचन हे महत्त्वाचे आहे असे तेंडुलकर म्हणत.

सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होतच, पण सामाजिक जाणिवेतून ते पुण्यातल्या वाहतूक समस्येसाठी अगदी रस्त्यावरच उतरले होते. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ते कर्वे रोडवर उभे राहत. त्यांचं हे काम खरोखरच आदर्श आणि प्रेरणादायी होतं.

तेंडुकरांच्या जाण्याने सध्याच्या व्यंगचित्रकारांवर ज्यांचा प्रभाव आहे असे भारदस्त व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे मत कलाक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशक्ती पतसंस्थेला दणका

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवशक्ती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील घोटाळ्याप्रकरणी पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. या पतसंस्थेतील मुख्यालयातील रोख रकमेचा अपहार करून; तसेच संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांना कर्जपुरवठा करून सुमारे सहा कोटी ६३ लाख ९६ हजार रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. राज्याचे प्रभारी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी १० जुलै रोजी गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. ‘या सोसायटीचे २०१५-१६मध्ये लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार या अपहारास जबाबदार असलेले पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करावेत,’ असे दळवी यांनी आदेशात म्हटले आहे. गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक एस. के. पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संजय कलाटे, प्रभारी महाव्यवस्थापक बाळकृष्ण पोळ आणि कार्यकारी संचालक नौशाद पीरजादे यांच्यासह संचालक मंडळाने हा घोटाळा केल्याचा ठपका सहकार खात्याने केलेल्या लेखापरीक्षण अहवालात ठेवला होता. कलाटे, पोळ आणि पीरजादे यांच्यासह उपाध्यक्ष राजेंद्र नेटके, संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, संचालिका शुभांगी वानखेडे, संचालक रोहिदास मुरकुटे, संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक दत्तात्रय साने, दिलीप कलाटे आणि मच्छिंद्र जांभुळकर यांनी या आर्थिक घोटाळ्यात साह्य केल्याचाही ठपका या अहवालात होता.

या पतसंस्थेचे बाणेर येथे मुख्यालय असून, पुणे आणि मुंबईत सात शाखा आहेत. मागील तीन वर्षांत केलेल्या लेखापरीक्षणामध्ये या पतसंस्थेला क आणि ब दर्जा मिळाला होता. २०१५-१६ या वर्षीच्या लेखापरीक्षणात ड दर्जा मिळाला. या पतसंस्थेचे ९५८२ सभासद आहेत. या पतसंस्थेमध्ये झालेल्या घोटाळ्याचे पाटील यांनी विशेष लेखापरीक्षण करून सहकार खात्याकडे १३ फेब्रुवारीला अहवाल सादर केला होता.

या पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आणि संचालकांनी स्वतःच्या नावावर; तसेच वडील, पती, पत्नी, भाऊ, मुले यांच्या नावावर नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटले. त्यामुळे पतसंस्था आर्थिक अडचणीत सापडली. संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कर्जाची परतफेड म्हणून रकमा भरल्याचे कागदोपत्री भासविले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या रकमा पतसंस्थेत नसल्याने लेखापरीक्षण अहवालावरून स्पष्ट झाले होते.

पतसंस्थेत सहा कोटी ६४ लाख २० हजार रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. संबंधित रक्कम महाव्यवस्थापक पोळ यांच्या ताब्यात होती; मात्र प्रत्यक्षात अवघे २४ हजार २९५ रुपये शिल्लक होते. उर्वरित रकमेचा अपहार झाल्याचेही लेखापरीक्षण अहवालात नमूद केले होते.

लेखापरीक्षण अहवालातील ठळक मुद्दे

* पतसंस्थेला रोख रकमेची गरज नसताना; तसेच कारण नसतानाही बँकांतील ओडी कर्जखात्यांतून सुमारे तीन कोटी ४५ लाख ८० हजार रुपयांचा अपहार

* पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संजय कलाटे आणि कार्यकारी संचालक नौशाद पीरजादे यांनी सहीचे अधिकार बदलून स्वतः‍कडे घेतले

* दोघांनी संयुक्त सहीने सहा बँकांतील ओडी कर्जखात्यांतून १३ वेळा रकमा काढल्या.

* चेकच्या मागील बाजूला पीरजादे, पोळ आणि लिपिक शेखर कसाळे यांच्या स्वाक्षऱ्या; पण काही ठिकाणी बलराज खन्ना या पतसंस्थेशी संबंधित नसलेल्या व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या

* या रकमा कलाटे, पीरजादे आणि पोळ यांनी संगनमताने काढून अपहार केला.

* पतसंस्थेच्या मुख्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी जमा झालेल्या सुमारे एक कोटी ८० लाख ६० हजार रुपयांचा अपहार. त्यास कलाटे, पीरजादे आणि पोळ जबाबदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तीस हजार युवकांना रोजगाराभिमुख शिक्षणाचे उद्दिष्ट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मागासवर्गीय समाजातील ३० हजार युवकांना दर वर्षी कौशल्याधारित शिक्षण देऊन रोजगाराभिमुख करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिली. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

‘बार्टी’तर्फे मागासवर्गीय समाजातील युवकांना कौशल्य विकास योजनेची माहिती देण्यासाठी पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहामध्ये ‘कुशल महाराष्ट्र मेळावा’ आयोजिण्यात आला होता. या वेळी बडोले बोलत होते. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, ‘बार्टी’चे महासंचालक राजेश ढाबरे, करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, बार्टीच्या निबंधक सविता नलावडे, प्रकल्प संचालक रुपाली आवळे आदी उपस्थित होते.

बडोले म्हणाले, ‘एका बाजूला तांत्रिक प्रगती वाढत असताना, तांत्रिक ज्ञान नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती आहे. तर, दुसरीकडे तांत्रिक ज्ञान नसल्याने तरुणांना नोकऱ्या मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या काळात तरुणांना केवळ शिक्षित न करता त्यांना कुशल बनविणे महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळेच बार्टीच्या माध्यमातून उद्योजकता विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देऊन, रोजगाराभिमुख करण्याचा प्रयत्न आहे.’

कांबळे म्हणाले, ‘तरुणांनी केवळ पदवी घेऊन फायदा नाही. आताच्या जमान्यात कौशल्यदेखील पाहिजे. त्यासाठी ‘बार्टी’तर्फे शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरांवर ‘कुशल’ मेळावे घेतले जाणार आहे. त्यामुळे वस्ती पातळीवरील कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.’ पुणे शहरातील ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. त्यांना रोजगाराच्या संधी नाहीत. या लोकांना कौशल्य विकासात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाने मिळून एक प्रारूप तयार करावे, अशी सूचना डॉ. धेंडे यांनी केली. या मेळाव्यामध्ये विविध शासकीय आणि खासगी संस्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.

मोदींच्या आधी ‘बार्टी’कडून कौशल्य विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कौशल्य विकास योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यासाठी विशेष विभागाची स्थापना करण्यात आली. मात्र, ‘बार्टी’ने देशात सर्वप्रथम कौशल्य विकसनाचा कार्यक्रम सुरू केला. या अंतर्गत सुमारे २६ हजार युवकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सहा हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यापैकी साडेतीन हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या. आता इतरांचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती राजकुमार बडोले यांनी दिली.

‘विश्रांतवाडी वसतिगृह कामाची चौकशी करू’

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीच्या झालेल्या दुर्दशेप्रकरणी चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने काम करून घेण्याचे आश्वासन राज्याचे या विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिले.

सामाजिक न्याय विभागाच्या विश्रांतवाडी येथील वसतिगृहाचे काम पूर्ण होऊन काही महिनेच उलटले आहेत. मात्र, एवढ्यातच या वसतिगृहाची दुर्दशा झाली. वसतिगृहाच्या इमारतीमधील प्रत्येक जिन्याचे रेलिंग तुटले आहे. रूममधील कपाटाची दारे निखळली आहेत. सिलिंगमधून पाणी झिरपत आहे, असे चित्र या वसतिगृहात पाहायला मिळत आहे. हा प्रकार ‘मटा’ने समोर आणला. तसेच, कोट्यवधी रुपये खर्च करून या वसतिगृहाची उभारणी करण्यात आली असून, अल्पावधीत याची दुरवस्था झाल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बडोले यांना विचारणा केली, असता त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त गेले वर्ष राज्य सरकारतर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी १२५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. या अंतर्गत विविध शहरांमध्ये वसतिगृहे बांधण्यात आली. पुण्यात विश्रांतवाडी येथे साकारण्यात येत असलेल्या सामाजिक न्याय भ‍वनच्या आवारात एक हजार विद्यार्थी क्षमतेचे मुलांचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. तर, मुलींच्या वसतिगृहाचे काम सुरू आहे. समाजकल्याण आयुक्तालयाच्या आवारातील संत ज्ञानेश्वर वसतिगृहात, आळंदी येथील वसतिगृह, कोरेगाव पार्क येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी सध्या येथे राहत आहेत.

या वसतिगृहाचे काम अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे येथे ज्या गोष्टींमध्ये उणिवा असतील, त्या पुन्हा नव्याने करून घेता येतील. या कामाची चौकशी करून, संबंधित ठेकेदाराकडून ते करून घेतले जाईल.

राजकुमार बडोले, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ लाखांची घरफोडी उघडकीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोमवार पेठेतील व्यावसायिकाचे बंद घर फोडून ३५ लाखांचा ऐवज चोरल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २३ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेश मारुती काटेवाड (वय ३२, रा. आळंदी, ता. खेड), ज्योती राजेश पपुल (२५, रा. मातावाडी फाटा, भूगाव, मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, मुख्य आरोपी राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) हा फरारी आहे. आरोपीच्या घरातून २४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवार पेठेतील मयुरगंध सोसायटीत राहणाऱ्या अंकित सुरेश धोका (वय २६) यांचा फ्लॅट दोन जुलै रोजी फोडण्यात आला होता. त्यांच्या घरातून २५ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दहा लाख २५ हजार रुपये रोख चोरीला गेले होते. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्याआधारे संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. सीसीटीव्हीतील व्यक्ती ही राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) हा असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीच्या संपर्कातील लोकांकडे चौकशी करण्यात आली. त्या वेळी तो हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाली. सात दिवस शोधल्यानंतर त्याचे घर सापडले. घराची झडती घेतल्यानंतर सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा २३ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. चोर राजा व गणेश यांनी मिळून ही चोरी गेली होती. चोर राजावर हडपसर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून त्यामध्ये तो फरारी आहे. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, घरफोडी असे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत, असे मोरे यांनी सांगितले.

दामिनी पथकाचा मुलीला दिलासा

आईने भाऊ मानलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा भागात उघडकीस आला आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी मुलीला त्रास देऊन हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. शाळेत मार्गदर्शन करण्यासाठी गेलेल्या दामिनी पथकाला मुलीने माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

विशाल विलास कदम (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची आई तरुणाच्या नातेवाइकांकडे भाड्याने राहण्यास होती. त्यामुळे त्यांची ओळख होती. अल्पवयीन मुलीच्या आईने त्याला लहान भाऊ म्हणून मानले होते. त्यामुळे विशालचे घरी येणे-जाणे होते. पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिकते. ती एकटी असताना विशाल घरात आला. त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला हा प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने कोणालाही सांगितले नाही.

विशाल तिला एकांतात भेटाण्यासाठी दबाव टाकू लागला. ती शाळेत निघाल्यानंतर तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याने पीडित मुलीला रस्त्यात अडवले. ‘माझ्याकडे मोबाइलमध्ये क्लिप आहे. तू एकांतांत भेटली नाही, तर मी प्रसिद्ध करुन बदनामी करेल. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारीन,’ अशी धमकी त्याने दिली.

पुणे पोलिसांकडून महिला, तरुणी व मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तयार केले आहे. शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये पथकाकडून मुलींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते. मुलींच्या समस्यांचे निवारण केले जाते. गेल्या आठवड्यात दामिनी पथक पीडित मुलीच्या शाळेत समस्या निवारण कार्यक्रमासाठी गेले होते. त्या वेळी या पीडित मुलीने दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर तिच्या आई-वडिलांना घटनेची माहिती समजली. या प्रकरणी अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

छेड काढणाऱ्याला वर्षाची सक्तमजुरी

शाळकरी मुलींसमोर अश्लील हावभाव करणाऱ्याला एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. नीलेश रामचंद्र मोरे (वय ३१, रा. न्हावी सांडस, हवेली) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. २०१४मध्ये ही घटना घडली. संबंधित मुलगी दहावीत शिक्षण घेत होती. १४ ऑगस्ट रोजी ती आणि तिच्या मैत्रिणी शाळेत पायी निघाल्या. त्या वेळी नीलेशने त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी संबंधित मुलगी मैत्रिणींसह शाळेत निघाल्या होत्या. त्या वेळी पुन्हा मोरे याने अश्लील हावभाव केले. त्यामुळे घाबरून संबंधित मुली एका घरात घुसल्या. तेथून त्यांनी फोनवरून घरी ही माहिती दिली. त्यानंतर मोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी या खटल्यात नऊ साक्षीदार तपासले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनजीटीने स्पष्ट आदेश द्यावेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नदीपात्रातील ब्लू लाइनमध्ये (निळी रेषा) असलेल्या बांधकामाबाबत यापूर्वी पालिकेच्या कोर्टाने दिलेल्या स्थगितीबाबत नक्की काय भूमिका घ्यायची, याबाबत स्पष्ट आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) द्यावेत,’ अशी विनंती पालिकेच्या वतीने केली जाणार आहे. नदीपात्रातील पूररेषेत येणारी सर्व बांधकामे पालिकेने चार आठवड्यात काढून टाकावीत, असे आदेश गेल्या आठवड्यात एनजीटीने दिले आहेत. मात्र, २२ मिळकतींवर कारवाई करण्यास पालिकेच्या कोर्टाने यापूर्वीच स्थगिती दिली असल्याने त्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची विनंती एनजीटीकडे करणार असल्याचे पालिकेचे विधी सल्लागार रवींद्र थोरात यांनी सांगितले.

नदीपात्रातील पूररेषेत झालेल्या बांधकामाबद्दल कारवाई करण्याचे आदेश एनजीटीने दिले आहेत. एनजीटीने दिलेल्या आदेशानुसार ४८ तासांत कारवाई करण्याची घोषणा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली होती. मात्र, आठवड्यानंतरही कारवाई झालेली नाही. यापूर्वी नदीपात्रातील ज्या बांधकामांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या कोर्टाने स्थगिती दिली आहे, अशी बांधकामे काढण्याचे उल्लेख ‘एनजीटी'च्या आदेशात नसल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने आता वेळकाढूपणा सुरू केला आहे. एनजीटीच्या आदेशाची स्पष्टता समजून घेण्यासाठी विधी विभागाकडून या दाव्यातील महापालिकेच्या वकिलांबरोबर चर्चा करण्यात आली. त्यानंतरदेखील यामध्ये स्पष्टता न आल्याने आता थेट ‘एनजीटी'कडे आदेशाची स्पष्टता जाणून घेण्यासाठी पत्रव्यवहार करून स्पष्ट आदेश देण्याची विनंती करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला आहे. याबरोबरच यापूर्वी नदीपात्रातील बांधकामावर कारवाई करण्यास स्थगिती देणाऱ्या पालिका कोर्टाच्या निदर्शनास ही वस्तुस्थिती आणून दिली जाणार असल्याचे पालिकेचे विधी सल्लागार थोरात यांनी सांगितले.

स्पष्ट आदेशानंतरच कारवाई होणार?

पालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार एनजीटीला विनंतीपत्र दिले जाणार आहे. त्यावर स्पष्टीकरण येइपर्यंत या बांधकामावर कारवाई करता येणार नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. याबरोबरच पालिका कोर्टाच्या निदर्शनास एनजीटीने दिलेला आदेश आणून दिला जाणार आहे. यासाठी कोर्टाला विनंतीपत्र देणे, प्रतिवादींना नोटीस देणे, त्यानंतर त्यावर प्रत्यक्ष सुनावणी घेणे अशी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. स्पष्ट आदेशानंतरच कारवाई होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो जणांना करोडोंचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘टेम्पल रोझ रिअल इस्टेट प्रा. लि.’कडून चार हजार नागरिकांची तीनशे कोटींची फसवणूक केल्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात समोर आली आहे. पोलिसांकडे आतापर्यंत अडीचशे तक्रारदार समोर आले असून त्यांची आठ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून यामध्ये कसून तपास सुरू असून जास्तीत जास्त तक्रारदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्लॉट खरेदीत गुंतवणूक करा, चार वर्षांनंतर प्लॉट नको असेल, तर दुप्पट रक्कम परत मिळवा, असे आमिष दाखवून अनेकांना ‘टेम्पल रोझ’कडून गंडा घातल्याचे समोर आले होते. या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने देविदास गोविंदराम सजनानी (वय ६७, रा. बांद्रा, मुंबई) याला अटक केली आहे. तर, दीपा देविदास सजनानी, वनिता देविदास सजनानी, थोरात, केशव नारायण हे चौघे फरार आहेत. याबाबत नितीन शुक्ला (वय ३४, रा. एनसीएल कॉलनी, पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा तपास व्यापक असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात आले होते. त्यानुसार तपास करून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आले आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास व त्याच्या साथीदारांनी २००७मध्ये ‘गोल्डन रोझ रियल इस्टेट प्रा. लि.’ आणि ‘गोल्डन रोझ लाइफ स्टॉक प्रा. लि.’ नावाने दोन कंपन्या स्थापन केल्या. लाइफ स्टॉक कंपनीच्या नावाने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे २०११-१२मध्ये तब्बल ४४० एकर जागा विकत घेतली. ‘या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी हप्त्याने पैसे भरा आणि प्लॉट विकत घ्या. प्लॉट नको असल्यासे चार वर्षांत दुप्पट पैसे घ्या,’ अशी योजना जाहीर केली. त्यास अनेकांनी प्रतिसाद दिला. मात्र, अनेकांची मुदत पूर्ण झाली, तरी पैसे मिळाले नाहीत आणि प्लॉटही नावावर झाला नाही. प्लॉटची चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर ही जमीन ‘गोल्डन रोझ रियल इस्टेट’ची नसून ती ‘गोल्ड रोझ लाइफ स्टॉक प्रा. लि.’च्या नावाची आहे. तसेच, ही जमीन एनए नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिवारी यांनी मार्च महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून देवीदास सजनानीला अटक केली.



फसवणुकीबाबत बातम्या आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे येऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा. लि.च्या संचालकाने अशा प्रकारे महाराष्ट्रातील चार हजार नागरिकांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आतापर्यंत अडीचशे तक्रारदार समोर आले आहेत. त्यांची आठ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढू शकतो, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

कंपनीची ७६ खाते गोठवली

टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा. लि.ची पोलिसांनी आतापर्यंत ७६ बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यामध्ये आठ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कंपनीची आणखी काही बँक खाती आहेत का, याचा तपास सुरू आहे. मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील इतर शहरांमधील नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी’चा १६८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलल्या १६८ कोटी ७० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पात मांडलेल्या ४२ विषयांपैकी महिला व बाल कल्याण समितीचे विषय वगळता अन्य सर्व विषयांमध्ये किरकोळ दुरुस्त्या सुचविण्यात आल्या.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा सुरू होती. त्या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, महिला बालकल्याण सभापती राणी शेळके, कृषी सभापती सुजाता पवार आणि समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे; तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत सर्वाधिक आरोग्य विभागाच्या १२ विषयांना मान्यता देण्यात आली. तर, महिला व बालकल्याण समितीच्या शालेय पोषण आहार आणि इतर दोन विषयांना मान्यता देण्यात आली नाही. या विषयावर चर्चा करताना सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, सभेच्या सुरुवातीला राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी विविध पक्षाच्या नेत्यांची चढाओढ सुरू होती.

पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीतील एक रिक्त पद भरणे, जिल्हा परिषद स्वनिधीचा अंदाजपत्रक अवलोकनार्थ मांडणे, ग्रामविकास निधीतून ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी देणे, छोटे पाटबंधारे विभागाकडील कामांच्या निविदांना मान्यता देणे, ५० ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणा मार्फत करावयाची कामे, लेबर बजेट सन २०१७-१८ रक्कम लाखात करणेबाबत, जिल्हा नियोजन समिती पुणे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राकरिता औषधे, साधन व यंत्रसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता, आदिवासी भागातील आरोग्य सुविधा पुरविणे व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या औषध अनुदानात वाढ अंतर्गत औषध खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक साहित्य व सामग्रीपुरवठा अंतर्गत खरेदीस प्रशासकीय मान्यता या विषयांना सभेने मान्यता दिली.

सीओंची दांडी

झेडपीच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई हे अनुपस्थित होते. कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने महत्त्वांच्या विषयावर चर्चा कशी करायची, असा सवाल पदाधिकाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली. याबाबत अध्यक्षांकडे खुलासा मागण्यात आला.

विकासकामांसाठी ६८ कोटींचा निधी ?

पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत २०१७ ते १८ या वर्षाचा १६८ कोटी ७० लाख रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पा मान्यता देण्यात आली. परंतु, गेल्या वर्षीच्या कामासाठी सुमारे १०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यांना त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी केवळ ६८ कोटी ७० रुपये खर्चासाठी उपलब्ध होणार असल्याने परिषदेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन गेल्या वर्षीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध कामांना मंजुरी दिली होती. या कामासाठी सुमारे १०० कोटी रुपये द्यावे लागणार असून जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांच्या पदरी फारसा निधी मिळणार नसल्याकडे भाजपचे गटनेते शरद बुट्टे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘मागील पदाधिकाऱ्यांच्या काळात पैशांची प्रचंड उधळपट्टी झाली असून, नको तेवढी कामे मंजूर करण्यात आली. निधी वाटपात नियम डावलण्यात आले आहेत. काही निर्णय चुकले, तर काही कामे चुकली आहेत. त्यात आर्थिक अनियमितता आढळली आहे. मुद्रांक शुल्कापैकी ग्रामपंचायतींना ५० टक्के निधी द्यावा लागणार आहे.’

ग्रामपंचायतींना ढोल ताशांसारखे वाद्य खरेदी करून देण्याची योजना गेल्या वर्षी राबविण्यात आली. योजनेसाठी सरकारची परवानगी नव्हती. ग्रामपंचायतीसाठी खरेदी केलेल्या वाद्यांपैकी ९० टक्के ग्रामपंचायतींनी ते ताब्यात घेतले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गोदामांमध्ये ढोल-ताशांची वाद्ये धूळ खात पडून असल्याची धक्कादाक माहिती बुट्टे पाटील यांनी सभागृहात दिली. योजनेत पारदर्शकता नाही. हवेली, खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींनीच सर्वाधिक वाद्ये नेल्याचे उघडकीस आणले. वाद्यांसाठी ३५ लाख रुपयांची केलेली खरेदी ही वाया गेली असून पुन्हा या वर्षी २५ लाख रुपयांची तरतूद कशासाठी केली असा जाब प्रशासनाला विचारला.

शाळामध्ये वॉटर फिल्टर बसवण्याची तरतूद करायला हवी होती. त्यामुळे पाण्यापासून होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असते, याकडे काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आव्हाळे यांनी लक्ष वेधले. सदस्य पांडुरंग पवार म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामधील दहा योजनासाठी ३९ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, यापैकी एकही रुपया खर्च झाला नाही. यामुळे या योजना रद्द करण्यात याव्यात.’ अर्थसंकल्पामध्ये बेरोजगारांना मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन तसेच कॅन्सरग्रस्तांसाठी आर्थिक मदत यासाठी तरतूद करण्याची मागणी सदस्य रोहित पवार यांनी केली.

शाळांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी अर्थसंकल्पामध्ये देण्यात यावा. जलयुक्त शिवाराप्रमाणे इतर जलसंधारण योजनासाठी निधी उपलब्ध करावा. शाळांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम राबवावी, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि सायकल द्यावे. महिलासाठी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात यावे. अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत. शाळा दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशा मागण्या रणजित शिवतरे, प्रमोद काकडे, वीरधवल जगदाळे, अभिजित तांबिले आणि इंदापूर तालुक्याचे सभापती करणसिंह घोलप यांनी केल्या.

पदाधिकाऱ्यांसाठी, की ठेकेदारांसाठी खरेदी?

लाभार्थ्यांची यादी तयार नसताना जिल्हा परिषदेने ४८ लाख रुपयांमध्ये २२१० सौर कंदिलाची खरेदी केली. यादी अथवा लाभार्थी तयार नसताना सौर कंदिलाची खरेदी पदाधिकाऱ्यांसाठी, की ठेकेदारांसाठी असा सवाल करून प्रशासनाला भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी धारेवर धरले. हवेली तालुक्यातील गोदामात खरेदी केलेले सौर कंदिल हे धूळ खात पडून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वारगेट स्थानकातील कॅमेऱ्यांची ‘दृष्टी’ धूसर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वारगेट एसटी स्थानकात भुरटी चोरी, लूटमार, फसवणूक अशा घटना सुरूच आहेत. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दृष्टी क्षीण झाल्यामुळे येथे घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी अडचणी येत आहेत. एसटी महामंडळाकडून या कॅमेऱ्यांची देखभाल केली जात नसल्यामुळे आवारातील पाच कॅमेरे सुरू असले तरी कॅमेऱ्यांद्वारे मिळणारे चित्रीकरण मात्र धूसर आहे. त्यामुळे चोरट्यांचे अधिकच फावत असल्याचे दिसून आले आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. उन्हाळा व दिवाळी सुट्टीत तर या ठिकाणी उभे राहण्यासही जागा नसते. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आमदार निधीतून स्थानकाच्या आवारात पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर, शासनाचे चार कॅमेरे आवारात बसविण्यात आले आहेत. एसटी स्थानकाच्या आवारात भुरट्या चोरांचा वावर असतो. त्यामुळे प्रवाशांच्या बॅगांमधील लाखोंचा ऐवज चोरीला जाणे, मोबाइल, लॅपटॉप चोरणे अशा घटना तेथे कायम घडतात. काही दिवसांपूर्वी एसटी स्थानकाच्या आवारात एका चोरट्याने एसटीच्या वाहकासारखा गणवेश परिधान करून प्रवाशांना तिकिटांची विक्री करून पैसे उकळले होते. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, चार दिवसांपूर्वी मुंबईला निघालेल्या व्यक्तीशेजारी एकजण बसला. त्याने गुंगीचे बिस्कीट देऊन नागरिकाकडील ऐवज लुटल्याचा प्रकार समोर आला होता.
स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या गुन्ह्यांबाबत स्वारगेट पोलिस सीसीटीव्ही चित्रीकरण पाहण्यास जातात. त्या वेळी आमदार निधीतून बसिवलेल्या कॅमेऱ्याचे चित्रीकरण खूपच धुसर असल्यामुळे चोरट्यांची ओळख पटविणे कठीण जाते. रात्रीच्या वेळी तर सीसीटीव्हीचे चित्रीकरण काहीच दिसत नाही. त्यामुळे चोरट्यांचा माग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे या कॅमेऱ्यांची देखभाल करावी किंवा तेथे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेले कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी विनंती स्वारगेट पोलिसांकडून एसटी प्रशासनाकडे वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप आमदार निधीतून बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मुंबई-बोरिवली दरम्यान धावणाऱ्या शिवनेरी बसच्या फलाटालगत चोरट्यांचा वावर असतो. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बॅगेतील लॅपटॉप, मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना तेथे कायम घडतात. शिवनेरी बससेवेच्या फलाटालगत कॅमेरे बसविल्यास चोरट्यांचे वर्णन उपलब्ध होईल. उन्हाळ्यात मोठी गर्दी असल्यावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते. शासनाचे चार कॅमेरे असले, तरी ते कमी पडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी लवकार लवकर नवीन कॅमेरे बसविण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीप्रेमींनी दत्तक घेतला किनारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संकटग्रस्त मुठा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनावर अवलंबून राहण्याऐवजी या कामात स्थानिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जीवित नदी संस्थेने ‘दत्तक घेऊ या नदी किनारा’ ही अनोखी मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे आपली नदी पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेली दिसावी, यासाठी एका नदीप्रेमी गटाने विठ्ठलवाडी मंदिर परिसरातील मुठा नदीचा किनारा सध्या दत्तक घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात विठ्ठलवाडी किनारा दत्तक घेतलेली मंडळी वर्षभर तिथे काम करणार आहेत. या परिसरातील नियमित स्वच्छता, प्रदूषण स्रोत, जैववैविध्याचा ते अभ्यास करणार असून नैसर्गिक परिसंस्थेशी निगडीत वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करणार आहेत. या किनाऱ्यावर गेल्या सात रविवारी संस्थेच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत, अशी माहिती जीवितनदी - लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन या संस्थेच्या आदिती देवधर यांनी सांगितले.
नदीविषयी आत्मीयता असलेल्या अवघ्या तीन जणांनी सुरू केलेल्या या उपक्रमात आता तीस जण सहभागी झाले आहेत. दर आठवड्याला या गटाची संख्या वाढते आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुठा नदीवर ‘रिव्हर वॉक’ करताना पुणेकरांमध्ये असलेली नदीबद्दलची संवदेनशीलता जाणवली. नदीला सौंदर्य मिळवून देण्यासाठी आम्हाला काही तरी करायचे आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. यातूनच ‘दत्तक घेऊया नदी किनारा’ ही संकल्पना पुढे आली. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून प्रतिसाद वाढतो आहे, असे देवधर म्हणाल्या.
या प्रकल्पाची कल्पना जीवितनदीची असली तरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत इतर अनेक संस्था काम करीत आहेत. या भागातील प्लास्टिकला रोखण्यासाठी सागरमित्र संस्था काम करते आहे; तर नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी सेरी संस्था मार्गदर्शन करणार आहे. इकॉलोजिकल सोसायटीच्या डॉ. स्वाती गोळे या तेथील परिसंस्था सुधारण्यासाठी आराखडा देणार आहेत. स्थानिक लोकांच्या सहभागातून नदी काठ स्वच्छ झाल्यास, आगामी काळात ते नदीबद्दल अधिक संवदेनशीलतेने विचार करतील आणि भविष्यात तेच या नदीचे संरक्षक होतील, असा विश्वास देवधर यांनी व्यक्त केला.
नदी किनारा दत्तक घेतलेल्या ग्रुपने वर्षभरात त्या जागेचा, जैवविविधतेचा अभ्यास आणि प्रदूषणाची कारणे शोधणे अपेक्षित आहे. तसेच त्या परिसराची स्वच्छता आणि परिसंस्थेचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी उचलण्याची जबाबदारी त्यांना देण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक नदीप्रेमींनी सहभागी व्हावे. यासाठी ७३५००००३८५, ९४२०४८१३६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देवधर यांनी केले.

रंगल्या नदीकाठच्या गोष्टी
दत्तक घेऊ या नदी किनारा या उपक्रमांतर्गत रविवारी ‘नदीकाठच्या गोष्टी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी वैशाली सेकर- कुलकर्णी यांनी ‘द स्टोरी स्टेशन’ तर पक्षी अभ्यासक धर्मराज पाटील यांनी नदीकाठच्या गोष्टी सांगितल्या. अवघ्या पाच ते साठ वर्षे वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. धर्मराज पाटील यांनी नदी परिसरातील विविध वन्य आणि पाणपक्ष्यांची माहिती दिली. मुलांनी दुर्बिणीतून पक्षी पहिले, शिवाय ह्या पक्ष्यांची चित्रे दाखवून बारकावे सांगण्यात आले. वैशाली कुलकर्णी यांनी मुलांना नदीबद्दलच्या गोष्टी मुलांना सांगितल्या. विनोद बोधनकर यांनी नदी प्रदूषणातील बारकावे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसला तरुणांची आठवण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला तरुण मतदारांची आठवण झाली आहे. राज्यात १८ ते ३५ वयोगटातील सुमारे ४० टक्के मतदार असल्याने पक्षाने राष्ट्रवादी युवक, युवती आणि विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती तातडीने करण्यास सुरुवात केली आहे. या नियुक्ती करताना पदाधिकाऱ्यांसाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.
‘जनतेने आम्हाला विरोधी पक्षात काम करण्याची संधी दिली आहे. सक्षम विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावत आहोत. त्याचबरोबर संघटनेची व्याप्ती वाढवण्याचे कामही जोरात सुरू आहे. राज्यात संघटनेचे वेगवेगळे २४ सेल असून त्यावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी युवक, युवती आणि विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असून त्यांच्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) भरघोस यश मिळाले असून त्यामध्ये तरुणाईचा वाटा सर्वाधिक आहे. राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील सुमारे ४० टक्के मतदारांनी भाजपवर दाखवलेला विश्वास इतर पक्षांना विरोधात बसण्यासाठी पुरेसा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादीमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. गेल्या १५ वर्षांत त्या तरुणांपैकी अनेक जणांनी सत्ता उपभोगलीही. मात्र, सत्तेच्या काळात राष्ट्रवादीत तरुणांचे ‘इनकमिंग’ अत्यंत मर्यादित राहिले. परिणामी त्याचा फटका निवडणुकांमध्ये
बसला आहे.
पक्षापासून दुरावलेल्या तरुणाईला पुन्हा साद घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी युवक, युवती आणि विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगवेगळ्या २४ सेलवरील राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत जिल्हा, तालुका तसेच विधानसभा मतदारसंघानुसार पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे.

अशी आहे वयोमर्यादा
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी होण्यासाठी २२ ते २६ अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व्हायचे असेल, तर २८ ते ३२ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. युवक काँग्रेससाठी ३५ ही कमाल वयोमर्यादा आहे असली, तरी पदाधिकारी होण्यासाठी ३२ वर्षे हीच अंतिम मर्यादा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा उघडण्यात आल्या असून त्यामध्ये ज्या कंपनीने पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे, त्यांनाच ऑप्टिकल फायबर (डक्ट) टाकण्याचे काम मिळाले असल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. दरम्यान, ही निविदा प्रक्रिया राबविताना मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यामधून पुणे महानगरपालिकेचे ४८० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा उघडण्यात आल्या असून त्यामध्ये तीन कंपन्यांना सर्व कामे मिळाली आहेत. ही कामे दोन प्रकारची आहेत. पाइपलाइन टाकणे तसेच त्याच वेळी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे कामही करणे, यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. ठेकेदार कंपन्यांनी या निविदा भरताना संगनमत केले असून या सर्व निविदा २५ ते २८ टक्के जादा दराने भरण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे सुमारे ४८० कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे.
शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पाणीपुरवठा योजनेच्या निविदा भरतानाच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला होता. ठेकेदार कंपन्यांनी या निविदा संगनमत करून भरल्या असून त्या जादा दराने भरण्यात आला असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. ही निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा राबवावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.
पारदर्शक कारभाराची हाक देणारे मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट या गैरव्यवहारांमध्ये लक्ष घालणार का? पुणे महापालिकेचे करोडो रुपयांचा तोटा होत असून तो राखणार का? असा सवाल शिंदे यांनी केला आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष घातले नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे ​शिंदे आणि तुपे यांनी सांगितले.
दरम्यान, पाइपलाइन टाकणे तसेच त्याचवेळी ‘ऑप्टिकल फायबर’ टाकण्याच्या निविदाही संगनमताने भरण्यात आला असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे एकच कंपनी पाइपलाइन आणि डक्ट टाकण्याचे काम करणार आहे. चारपैकी एकाच निविदेमध्ये दोन वेगवेगळ्या कंपन्या पाइपलाइन आणि डक्ट टाकण्याचे काम करणार आहेत. इतर तिन्ही निविदांमध्ये उरलेल्या दोन कंपन्यांना ही कामे मिळाली आहेत. ठेकेदार कंपन्यांनी निविदा भरताना केलेले संगनमत यामुळे उघड झाले असून पुणे महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे शिंदे म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या सत्तेच्या काळात भामा आसखेड, खडकवासला ते पर्वती जलकेंद्र तसेच इतर अनेक कामांच्या निविदा या जादा भावाने काढण्यात आल्या होत्या. त्याबद्दलही विरोधकांनी माहिती द्यावी, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुगम-दुर्गम’नुसार बदल्यांचा मार्ग मोकळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षण विभागाच्या सुगम-दुर्गम निर्णयानुसार जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या राबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांच्या शिक्षकांच्या बदल्या आता शिक्षण विभागाने घेतलेल्या सुगम-दुर्गमच्या निर्णयानुसार होणार आहेत.

सुगम-दुर्गम बदल्यांबाबतची मुंबई उच्च न्यायालयातील गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली सुनावणी मंगळवारी झाली. न्यायालयाने विरोधी पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे यापूर्वी याचिकाकर्त्यांना दिलेला स्थगितीचा आदेश न्यायालयाने रद्द केला व बदलीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसेच, विभागाला बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुगम-दुर्गम बदल्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून आता बदली प्रक्रियेला वेग येणार आहे.

सुगम-दुर्गम बदल्यांच्या विरोधात नागपूर व औरंगाबाद न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला होता. त्यानंतर पुणे जिल्हा प्रायणिक शिक्षक संघातर्फे आणि अन्य शहरातील शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झाली. न्यायालयाने बदलीप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. तसेच, बदली प्रक्रियेच्या काळात जर सुगम भागातील शिक्षकावर अन्याय झाला तर त्यांना व्यक्तिगत याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. या याचिकांवर न्यायालयाकडून विचार करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले. बदल्यांसंदर्भातील निर्णयाने दुर्गम भागातील शिक्षकांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांसाठी नवीन धोरण जाहीर केले होते. त्यानुसार सुगम आणि दुर्गम शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. धोरणानुसार सुगम भागातील शिक्षक दुर्गम भागात आणि दुर्गम भागातील शिक्षक सुगम भागात जाणार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images