Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मूल्य, भावनांच्या अभावाने संघर्षाचा उद्भव

$
0
0
‘मानवी जीवनातून नैतिक मूल्ये आणि भावनांना वेगळे करता येणार नाही; परंतु सध्याच्या काळात जीवनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बुद्धिवाद आणि विज्ञानात या गोष्टींना स्थान नाही. त्यामुळे ‘क्राइसेस’ निर्माण होतात,’ असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. के. रं. शिरवाडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

रंगभूमीसाठी पाच कलमी कृती कार्यक्रम

$
0
0
कलावंतांना सरकारी सेवेत संधी, वृद्ध कलावंतांसाठी कलाश्रय, सर्व परवान्यांसाठी एक खिडकी योजना, अडीअडचणीच्या वेळी निवाऱ्यासाठी सरकारी विश्रामगृह आणि राज्यभर स्वस्त नाटक योजनेचा प्रसार या पाच संकल्पांच्या पूर्ततेद्वारे नाट्य व्यावसायिकांसमोरील अडीअडचणी दूर करण्याच्या उद्देशाने कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी बारामती नाट्यसंमेलनात प्रयत्न केले जाणार आहेत.

नाट्य कलाकारांसाठी पाच संकल्पांचा कृती कार्यक्रम

$
0
0
कलावंतांना शासकीय सेवेत संधी, वृद्ध कलावंतांसाठी कलाश्रय, सर्व परवान्यांसाठी एक खिडकी योजना, अडीअडचणीच्या वेळी निवाऱ्यासाठी शासकीय विश्रामगृह आणि राज्यभर स्वस्त नाटक योजनेचा प्रसार.... या पाच संकल्पांच्या पूर्ततेद्वारे नाट्य व्यावसायिकांसमोरील अडी-अडचणी दूर करण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी बारामती नाट्यसंमेलनात प्रयत्न केले जाणार आहेत.

पाण्यावरुन आंदोलने सुरुच

$
0
0
नाशिक-नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मराठवाड्याने पळविल्याबद्दल सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदतो आहे. गुरुवारी नगरच्या शेतकऱ्यांनी श्रीरामपुरात पाटबंधारे खात्याविरुद्ध मोठा मोर्चा काढून सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

नाट्यज्योतीने उजळणार बारा दिवसांचा जागर

$
0
0
बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन समारंभात नाट्यज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. नाट्यज्योतीसह बारा दिवस चालणाऱ्या संमेलन कार्यक्रमांमुळे बारामतीत होणारे नाट्यसंमेलन नवा पायंडा ठरणार आहे.

मीरा बडवे यांना बाया कर्वे पुरस्कार

$
0
0
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा 'बाया कर्वे पुरस्कार' यंदा 'निवांत अंध मुक्त विकासालया'च्या संस्थापिका मीरा बडवे यांना जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पायरसीविरोधी लढ्याला दोन कोटींच्या निधीचे बळ

$
0
0
भारतीय चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन जगताची सर्वांत मोठी डोकेदुखी असलेल्या पायरसीला रोखण्यासाठी केंद्र सरकारनेही पुढाकार घेतला आहे. २०१२-१७साठीच्या पंचवार्षिक योजनेमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वाढत्या पायरसीला पायबंद घालण्यासाठी योजना आखली असून, त्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

राजगडावरील सेवा; ढेबेंना पुरस्कार

$
0
0
राजगडावरील २५ वर्षांच्या सेवेबद्दल पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी रामभाऊ ढेबे यांना शुक्रवार पेठेतील श्री अंबिकामाता भजनी मंडळातर्फे ‘अंबिकामाता गौरव पुरस्कार’ राजगडावर प्रदान करण्यात आला.

पुणे मॅरेथॉन म्हणजे एकीचे बळ

$
0
0
दोन डिसेंबर रोजी होणार्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत पुन्हा एकदा एकीचे बळ दिसेल. या मॅरेथॉनच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग, राजकीय एकी आणि धार्मिक सलोख्याचे दर्शन घडते. गणपती मंडळ, सामाजिक संस्था, धार्मिक केंद्र, नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते धावपटूंच्या स्वागतासाठी या निमित्ताने एकत्र येत असतात.

चीनच्या सीमेला 'टार्गेट' नाही

$
0
0
'चीनच्या सीमेवर स्ट्रायकिंग फोर्स उभारण्याचा निर्णय हा कोणत्याही एका देशाला 'टार्गेट' करून घेण्यात आलेला नाही. देशाच्या संरक्षणसिद्धतेवर भर देऊनच हे पाऊल उचलण्यात आले आहे,' असे स्पष्टीकरण लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांनी गुरुवारी दिले.

मनसे, बसपची कामगिरीच निर्णायक

$
0
0
पुण्याचा येत्या निवडणूकीतील खासदार हा काँग्रेस किंवा भाजप या पारंपरिक राजकीय पक्षाचाच असेल असे समजण्याचे दिवस संपले, असाच इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन समाज पक्षाने गेल्या वेळच्या निवडणुकीत दिला होता.

पुढचा जन्म राजकारण्यांचा दे...

$
0
0
'आता फक्त पैसे असून भागत नाही. पैशांच्या पेट्यांसोबत तितकाच तगडा वशिलाही लागतो. आम्हाला मुलाखतीला गेल्यावर एखाद्या गुन्हेगारासारखं तपासतात. पैसे मागितलेले कुठं रेकॉर्ड व्हायला नको, म्हणून भीतीपोटी आमचं पेनही काढून घेतात. पेनमध्ये आम्ही कॅमेरा नेतो की काय अशी शंका असते त्यांना...'

तळजाई जंगलात मानवी हाडे सापडली

$
0
0
तळजाई जंगलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून एक किलोमीटर अंतरावर नऊ मानवी हाडे सापडली आहेत. पोलिसांनी ही हाडे ताब्यात घेतली असून, ती तपासणीसाठी ‘फॉरेन्सिक लॅब’ला देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहकारनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी दिली.

श्वेतपत्रिकाच वाचली नाही

$
0
0
सिंचन श्वेतपत्रिका मी वाचलीच नाही. त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. कोणी काहीही म्हणोत शेवटी दूध का दूध आणि पानी का पानी होईलच, असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (३० नोव्हेंबर) केला.

सोलर वॉटर हीटरबाबत ‘ITI’मध्ये अभ्यासक्रम

$
0
0
सोलर वॉटर हीटर उभारणी करिता लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आयटीआयमध्ये या पद्धतीचा अभ्यासक्रम उपलब्ध व्हावा, म्हणून इंटरनॅशनल कॉपर प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ सल्लागार वीरेंद्र गुप्ता यांनी शुक्रवारी (३० नोव्हेंबर) दिली.

पथारीधारकांना विस्थापित केल्यास जेलभरोचा इशारा

$
0
0
आळंदीत कार्तिकी यात्रेदरम्यान स्थानिक टपरी, पथारी आणि हातगाडी धारकांवर अतिक्रमण कारवाई करून त्यांना विस्थापित केल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा टपरी-हातगाडी-पथारी पंचायतीने दिला आहे.

फार्मासिस्टच्या समस्या, सुविधांवर चर्चा

$
0
0
राष्ट्रीय औषधनिर्माणशास्त्र सप्ताहानिमित्त फार्मासिस्टच्या समस्या, त्यांची कर्तव्ये, त्यांनी रुग्णांना द्यावयाची माहिती याबाबत नुकताच ऊहापोह करण्यात आला. या निमित्त या क्षेत्रामध्ये परदेशात असणा-या विविध संधींची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

पुण्याचे विभाजन नाही

$
0
0
पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याच्या केवळ अफवा असून, असे कोणतेही प्रकार होणार नसल्याचे अजित पवार यांनी सासवड येथे एका बँकेच्या नवीन शाखेच्या उद्‍घाटन प्रसंगी सांगितले.

मराठीच्या संवर्धनासाठी पालिका सरसावली

$
0
0
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुणे महापालिका प्रकल्प राबवणार असून, त्याअंतर्गत मराठी भाषिकांबरोबरच अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषा शिकवण्याचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीमध्ये दाखल केला आहे.

विकासाच्या नावाखाली सर्वनाशाला निमंत्रण

$
0
0
पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध खजिना लुटण्यासाठी सर्व राजकीय विचारांमध्ये एकमत आहे. त्याला कोणाचेही संरक्षण नसल्याने विकासाच्या नावाखाली सर्वनाशालाच आमंत्रण दिले जात आहे, अशा कठोर शब्दांत दिल्लीच्या गांधी शांती प्रतिष्ठानच्या अनुपम मिश्र यांनी सरकारला इशारा दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images