Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कच-याचे वर्गीकरण घरातच व्हावे

0
0
घरातील ओल्या-सुक्या कच-याचे घरातच वर्गीकरण झाले पाहिजे, असा स्पष्ट आदेश कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसेच या ओल्या आणि सुक्या कच-याची वेगवेगळ्या ट्रकमधूनच वाहतूक करण्यात यावी, असेही कोर्टाने बेंगळुरू महापालिकेस बजाविले आहे. इतकेच नव्हे, तर या उपाय योजनांवर हायकोर्टाची देखरेख राहणार आहे. पुण्यासह अनेक प्रमुख शहरांसाठी हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संदीपचं ‘व-हाड’ रंगभूमीवर

0
0
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी जगप्रसिद्ध केलेला ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हा धमाल एकपात्री प्रयोग पुन्हा रंगभूमीवर येतोय. अष्टपैलु अभिनेता संदीप पाठक हे शिवधनुष्य पेलणार आहे.

डान्सिंग सचिन!

0
0
सशक्त आणि गंभीर अभिनेता म्हणून ओळख असलेला सचिन खेडेकर आगामी ‘आयना का बायना’ या सिनेमात चक्क धमाल डान्स करताना दिसणार आहे.

घडामोडी पहा, भानगडी नको

0
0
एमपीएससी, युपीएससी परीक्षेत सद्य घटनांवर आधारीत माहितीची गुंफण संदर्भग्रंथांमधील माहितीशी घालून प्रश्न तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातही पुरस्कार, नियुक्त्या यांसारख्या केवळ माहितीवर आणि तिच्या घोकंपट्टीवर आधारित सोडविता येणा‍-या प्रश्नांची संख्या कमी होत चाललेली आहे. ह्या दोन्ही बाबींचे भान कायम डोळ्यांसमोर ठेवून सद्य घडामोडींचा अभ्यास आवश्यक आहे.

जिल्ह्यात ५८ टँकरने पाणीपुरवठा

0
0
पावसाच्या अवकृपेमुळे ग्रामीण भागातील गावांना यंदा हिवाळ्यातच तब्बल ५८ टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या टंचाईच्या तीव्रतेत आणखी भर पडण्याची शक्यता असल्याने, त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यात येत आहेत.

हडपसर येथे वॉचमनचा खून

0
0
हडपसर येथील पाटील हाइट्स सोसायटीत महिनाभरापूर्वी चोरी करताना पकडल्याच्या रागापोटी एका सराईत गुन्हेगाराने सुरक्षारक्षाकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

गिरीश कर्नाड यांना 'तन्वीर सन्मान पुरस्कार'

0
0
प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांना 'तन्वीर सन्मान पुरस्कारा'ने गौरविले जाणार आहे. तर लेखक, प्रकाशयोजनाकार प्रदीप वैद्य यांना 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार' दिला जाणार आहे.

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आजपासून

0
0
डेक्कन जिमखानातर्फे राज्यस्तरीय जलतरण आणि वॉटर पोलो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक तलाव येथे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान या स्पर्धा होणार आहेत.

पवारांनीही केले होते नाटक !

0
0
राज्याच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कधीकाळी रंगभूमीवरही भूमिका बजावली होती! शाळकरी वयात त्यांनी बारामतीतील एका संस्थेच्या इमारत निधीकरिता मदत म्हणून झालेल्या नाटकात सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारली होती.

गुंड गोट्या धावडेचा भोसरीत भरदिवसा खून

0
0
भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे दिवंगत अध्यक्ष अॅड. अंकुश लांडगे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन ऊर्फ गोट्या कुंडलिक धावडे याच्यावर गोळीबार आणि तलवारीने वार करून गुरुवारी (२९ नोव्हेंबर) भरदिवसा खून करण्यात आला.

'अॅट्मा'बाबत उलगडला माहितीचा खजिना

0
0
'हाउ टू क्रॅक एमबीए एन्ट्रन्स टेस्ट...' करिअरचे 'मॅनेजमेंट' करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 'एमबीए' इच्छुकांच्या डोक्यात सातत्याने घोळणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर त्यांना गुरुवारी मिळाले. 'असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एम्स) आणि 'बीएमसीसी'तर्फे गुरुवारी आयोजित मार्गदर्शन सत्रामध्ये या प्रश्नासोबतच त्यांना आपल्या क्षमतांचीही जाणीव झाली.

दोन लाख ग्राहकांचे अर्ज नाहीत

0
0
एकाच पत्त्यावर असलेले एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन ब्लॉक होऊ नयेत, यासाठी आवश्यक असलेला केवायसी अर्ज भरण्याची शुक्रवारी (३० नोव्हेंबर) अखेरची मुदत आहे. शहरातील दोन लाख ग्राहकांनी हे अर्ज भरले नसल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम घाट वाचवा मोहिमेची 'पंचवीशी'

0
0
सह्याद्रीच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या 'पश्चिम घाट वाचवा' मोहिमेला २५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींची तीन दिवसीय परिषद येत्या शुक्रवारपासून (३० नोव्हेंबर) महाबळेश्वर येथे होणार आहे.

संवाद ‘हेल्पलाइन’वर ग्रामीण महिलांचे सर्वाधिक ‘कॉल्स’

0
0
‘एचआयव्ही’ कसा होतो इथपासून ते तो टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करता येतील इथपर्यंत माहिती जाणून घेण्यासाठी आता शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील महिलांच्या ‘फोनकॉल’ची संख्या वाढल्याचे संवाद हेल्पलाइनच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

रहदारीच्या रस्त्यांना प्रतिक्षा 'सेफ्टी ऑडिटची'

0
0
वाहतुकीची कोंडी, अरुंद रस्ते, अशा अनेक समस्यांमध्ये फसलेल्या शहरातील रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट झालेले नाही, त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांचा प्रवास धोकादायक होत चालला आहे.

ऐसी लागी लगन...

0
0
श्याम तेरी बन्सी पुकारे.., राम राम ही मीठा है.., प्रभूजी तुम चंदन.. अशा भक्ती गीतांनी प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्या भजनसंध्येत रसिक मंत्रमुग्ध झाले. पिंपरीतील शंभू लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथा प्रवचन सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ही भजनसंध्या झाली.

भय इथले संपत नाही...

0
0
सहा वर्षांपूर्वी अंकुश लांडगे यांचा झालेला खून आणि उसळलेली दंगल यानंतर सावरत असतानाच पुन्हा गुरुवारी गोट्या धावडेचा खून झाला. आणि भोसरीकरांच्या मनातील भय अजूनही संपलेले नाही, याची प्रचिती आली.

पंचायत समिती सभापतींचा ‘पाहुणचार’

0
0
शिक्षण हक्क कायद्याच्या जागृतीसाठी बोलाविलेल्या विशेष सभेत मार्गदर्शन करणाऱ्या ‌शिक्षणखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याला अरेरावी करत पंचायत समिती सभापतींनी त्यांचा चांगलाच ‘पाहुणचार’ केला. भलत्याच प्रश्नांवर चर्चा करून ही सभा गुंडाळण्यात आली.

मॅरेथॉनसाठी १७ लाखांची तरतूद

0
0
येत्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी १७ लाख रुपयांची तरतूद स्थायी समितीने गुरुवारी केली; तसेच कात्रज आणि गुलटेकडी येथे सीएनजी पंपांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासही समितीने मान्यता दिली.

कत्तलखाना बंदीसाठी महापालिकेवर मोर्चा

0
0
अवैध कत्तलखाना बंद करा.. गाय हमारी माता है.. अशा घोषणा देत विविध २१ संघटनांनी पिंपरीतील कत्तलखान्याविरोधात गुरुवारी (२९ नोव्हेंबर) पिंपरी- चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images