Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अर्जांची रक्कम परत करा

$
0
0

विद्यापीठ प्रशासनाचे कॉलेजांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॉलेजांमध्ये पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असल्याने कॉलेजांनी प्रवेश अर्ज आणि माहितीपुस्तिकेसाठी शुल्क आकारू नये, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत. मात्र, विद्यापीठाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शहरातील अनेक कॉलेज विद्यार्थ्यांकडून अर्ज आणि माहितीपुस्तिकेच्या नावाखाली तीनशे ते सातशे रुपये उकळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता विद्यापीठाने कॉलेजांना ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी शुल्क न घेण्याचा सज्जड दम दिला आहे. तसेच, ज्या कॉलेजांनी शुल्क आकले आहे, त्यांनी ते विद्यार्थ्यांना परत करण्याचेही बजावण्यात आले आहे.
राज्यात बारावी आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातच कॉलेजांमधील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, विद्यापीठाने ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी कोणतेही शुल्क निश्चित केलेले नाही. तसेच, माहितीपुस्तिकेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा समावेश शैक्षणिक शुल्काच्या ‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे कॉलेजांना प्रवेश अर्ज आणि माहितीपुस्तिकेच्या नावाखाली शुल्क आकारण्याचा अधिकार नाही, असे विद्यापीठाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मात्र, शहरातील अनेक कॉलेज पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज आणि माहितीपुस्तिकेसाठी तीनशे ते सातशे रुपये आकारात आहेत. याबाबत अनेक पालकांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संबंधितांना शुल्क न आकारण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या आदेशांना कॉलेज प्रशासनाने हरताळ फासला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कॉलेजांना सज्जड दम भरला आहे. कॉलेजांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये तसेच ज्या कॉलेजांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले आहे ते विद्यार्थ्यांना त्वरित परत करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे कॉलेजांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकेसाठी शुल्क घेता येणार नाही. कॉलेज प्रशासन विद्यापीठाच्या आदेशाला ऐकत नसल्यास त्यावर कारवाई करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांवर पाणी का?

$
0
0

पहिल्या एखाद्या पावसामध्येच शहरातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप येते. घाटांमधील रस्त्यांवरही पाण्याचा जोरदार प्रवाह पाहायला मिळतो. अवघ्या काही तासांमध्ये पडणाऱ्या पावसाने शहर आणि घाटांत अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर नियोजनात कमतरता राहतात, हे नक्की. पुण्यासारख्या शहरात पावसाळी गटारांची पुरेशी व्यवस्थाच नाही, तर चुकीच्या पद्धतीने डोंगरफोड होत असल्याने घाटांमधील प्रवास धोकादायक झाला आहे. या दोन्हींकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

- सुनीत भावे

पहिला जोरदार पाऊस होऊनही रस्त्यांवर कुठेही पाणी साचलेले नाही..., शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पावसाळी गटारांची सोय केली आहे...., नालेसफाई झाल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यातील अडचणी कमी झाल्या आहेत..., काँक्रिटच्या रस्त्यांवरही पाणी मुरण्यासाठी खास सोय केली आहे..., पावसाळ्यामध्ये रस्त्यात एकही खड्डा नाही..., भरपूर पाऊस होऊनही शहरात कुठेच वाहतूक कोंडी झालेली नाही..., एखाद्या ‘स्मार्ट’ शहराला शोभेल असेच हे चित्र; पण हे स्वप्न पुण्यात पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार, याचे उत्तर ना प्रशासनाकडे आहे, ना ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखविणाऱ्या नवनिर्वाचित सत्ताधाऱ्यांकडे!
पावसाने शहरात पहिली वर्दी देताच, संपूर्ण व्यवस्था कोलमडण्याचा प्रकार पुणेकरांना नवा नाही. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तसेच, पावसाळापूर्व कामांसाठी त्यावर पुन्हा खर्चाचे इमले चढवले जातात, तरीही एकूण व्यवस्थेमध्ये सुधारणा दिसून येत असल्याचे अभावानेच जाणवते. काही दिवसांपूर्वी शहरात अवघ्या काही तासांमध्ये ५० मिमी पाऊस झाला, अन् अल्पावधीत शहराच्या अनेक भागांतील रस्त्यांना एखाद्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. हे चित्र शहरात फक्त पहिल्या पावसानंतरच दिसते असे नाही, तर संपूर्ण पावसाळी हंगामात अनेकदा ही स्थिती पाहायला मिळते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईची कामे करण्याचा मोठा गाजावाजा पालिकेकडून केला जातो. महापौर, महापालिका आयुक्त यांच्याकडून नालेसफाईची पाहणी केली जात असल्याचे माध्यमांना कळविले जाते. त्यांच्या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. या पाहणीसाठी आवर्जून भेटी देणारे हे पदाधिकारी शहराच्या बहुसंख्य भागांत पाणी साचल्यानंतर नेमके कुठे असतात, याचा पत्ता अजून तरी लागलेला नाही. पाणी साचल्यानंतर विरोधकांकडून अधिकाऱ्यांवर आगपाखड, अधिकाऱ्यांकडून साचेबद्ध कारणमीमांसा, असे सर्व सोपस्कार होत असले, तरी दरवर्षीच ही स्थिती का उद्‍‍भवते, याचा खोलात जाऊन विचार करण्याची तसदी कोणीच घेत नाही.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार संपूर्ण पुणे शहरात साधारणतः दोन हजार किमीचे रस्ते आहेत. विकास आराखड्यात (डीपी) दाखविण्यात आलेले मुख्य रस्ते, त्याला जोडणारे उपरस्ते, लहान-लहान गल्ली-बोळातले रस्ते आणि इतर छोट्या-मोठ्या सर्व प्रकारच्या रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी निम्म्या रस्त्यांवरही पावसाळी गटारांची व्यवस्था पालिकेला अद्याप करता आलेली नाही. ही पावसाळी गटारे नेमकी कशासाठी असतात? पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी सहज वाहून जावे, यासाठी ही व्यवस्था आवश्यक असते. दुर्दैवाने, पुण्यासारख्या देशातील आठव्या क्रमांकाच्या महानगरात पावसाळी गटारांची स्थिती भयावह आहे. अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर ही व्यवस्थाच अस्तित्वात नाही, तर ज्या ठिकाणी पावसाळी गटारे आहेत, त्यापैकी बरीच गटारे पुन्हा सांडपाणी/मैलापाणी वाहिन्यांना जोडण्यात आली आहेत. शहरातील एकूण लोकसंख्येची वाढ लक्षात घेता, या सांडपाणी वाहिन्या अपुऱ्या पडत असल्याने पावसाळी गटारांतून येणारे पाणी यात मिसळले, की सर्वच वाहिन्या तुंबतात आणि गटारातील दुर्गंधीयुक्त पाणीही पुन्हा उलटे रस्त्यावर येऊ लागते. पावसाळी गटारांची व्यवस्था निर्माण करण्याची आश्वासने यापूर्वी अनेकदा दिली गेली, आताही दिली जातात; पण रस्ते-पाणी, वीज, आरोग्य अशा महत्त्वाच्या सुविधांप्रमाणे त्यासाठी खर्च करावा लागतो, याचे भान कोणालाच राहत नाही.
साधारणतः कोणत्याही शहराची रचना करताना उंचसखल भाग लक्षात घेतले जातात. पावसाळ्यात साठणारे पाणी नैसर्गिक उतारानुसार ओढे-नाले, नदीच्या दिशेने वाहून जाणे अपेक्षित असते. परंतु, सध्या आपला वॉर्ड, प्रभाग, परिसर चकाचक करण्याच्या नादात ‘काँक्रिटच्या रस्त्यां’चे अक्षरशः पेव फुटले आहे. आजूबाजूच्या नगरसेवकाच्या वॉर्डातील रस्त्यांपेक्षा आपल्या हद्दीत जास्त काँक्रिटचे रस्ते झाले पाहिजेत, अशी अहमहमिका जणू सर्वांमध्ये लागली असल्याने कोणत्याही नियोजनाशिवाय हे रस्ते केले जात आहेत. शेजार-शेजारच्या दोन काँक्रिटच्या रस्त्यांची ‘लेव्हल’ एकसारखी नाही. तर, अनेक काँक्रिटच्या रस्त्यांवर पावसाळी गटारांची व्यवस्थाच निर्माण करण्यात आलेली नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात रस्ते साचलेल्या ठिकाणांचे नीट विश्लेषण केले, तर बहुतेक ठिकाणी काँक्रिटच्या रस्त्यांवरच पाणी साचल्याचे चित्र दिसून येईल. गल्ली-बोळात काँक्रिटचे रस्ते करणाऱ्या नगरसेवकांकडून पुन्हा प्रशासनावरच खापर फोडण्यात येईल. रस्त्यांची ‘लेव्हल’ कशी ठेवायची, हे यांनीच ठरवायला हवे ना, असा सूर व्यक्त केला जाईल; पण आपल्या भागांत खरेच काँक्रिटचे रस्ते आवश्यक आहेत का, याचा विचार करण्याची तसदी घेतली तरी रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल.
शहरात साठणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असताना, डोंगर-दऱ्यांतून काढणाऱ्या रस्त्यांवरही पावसाच्या वाहणाऱ्या पाण्याने केव्हाही अपघात घडू शकतो, अशी स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियातून पुणे-सातारा रस्त्यावरील खंबाटकी घाटातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा व्हिडिओ फिरत होता. या पाण्यातून वाट काढत जाणाऱ्या वाहनचालकांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारच द्यायला हवा. कारण, चुकीच्या पद्धतीने केलेली डोंगरफोड, डोंगरावरून येणारे पाणी रस्त्याच्या कडेने वाहून जावे, यासाठीच्या यंत्रणेचा अभाव आणि एकूणच सर्वच स्तरांवरील नियोजनशून्यता, यामुळे खंबाटकीसारख्या घाटांमध्ये यापुढील काळातही धोका संभवतो. काही वर्षांपूर्वी कात्रज जवळच्या शिंदेवाडी परिसरात अशाच पावसामध्ये दुर्दैवी अपघात झाला होता. त्यानंतर सरकारी स्तरावरून अनेक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी त्याच्या अंमलबजावणीत उदासीनता आहे. वाहनांची वाढणारी संख्या गृहित धरता रस्ते रुंद करण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. घाटातील रस्ते वाढत्या वाहतुकीला अपुरे पडू लागल्याने त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे रस्ते रुंद करताना डोंगर कशा पद्धतीने फोडावा, याचे तंत्र असते. परंतु, या तंत्राला हरताळ फासून कशाही स्वरूपात केली जाणारी डोंगरफोड भविष्यातील अपघातांना निमंत्रण देत असते. पुणे-मुंबई दरम्यानच्या बोरघाटामध्ये जोराच्या पावसात दरडी कोसळून अनेक अपघात झाले आहेत. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात संरक्षित जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र, आता या घाटाप्रमाणेच इतर अनेक घाटांमधील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अशावेळी, संबंधित भागांमध्येही सुरक्षेच्या योग्य उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. डोंगरावरून वाहत येणारे पाणी थेट रस्त्यावर येऊ नये, यासाठी डोंगर आणि रस्त्याची कड यामध्ये चर खणला जातो. अनेक घाटांमध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व पाणी थेट रस्त्यांवर येते.
रस्ते बांधताना अथवा विस्तारीकरणादरम्यान पावसाच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे, अशी मागणी भूशास्त्राचे अभ्यासक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांसह इतर अभ्यासकांनी वेळोवेळी केली आहे. पश्चिम घाटातील बहुतांश घाट रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र यात पावसाळी पाण्याचा विचार झालेला दिसत नाही. घाटाच्या पायथ्याशी पावसाचे पाणी साठविण्याचे नियोजन काही ठिकाणी झाले आहे; पण ते पाणी शास्त्रीयदृष्ट्‍या उताराकडे आणण्याबाबत उपाययोजना नाही. त्यामुळे अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील रस्ता वाढवताना डोंगर आणि रस्ता यामध्ये लहानसा खंदक केला पाहिजे. यामुळे मुसळधार पाऊस पडला तरी डोंगरावरील पाणी रस्त्यावरून वाहण्याऐवजी ते शास्त्रीय पद्धतीने उताराकडे जाऊ शकते. आगामी काळात सर्वच घाटांच्या नियोजनात खंदकाचा समावेश करावा, असे कार्लेकर यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरासह आसपासच्या परिसरात आणि घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसात काही बदल निश्चित झाले आहेत. यापूर्वी एकसलग पडणारा पाऊस आता अत्यंत कमी कालावधीत जोरदार बरसतो, असे दिसून येत आहे. त्यामुळे सरासरी पाऊस गृहित धरून नियोजन करण्यापेक्षा कमाल पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच यापुढे पावसाळी कामे करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवाशुल्काचा भुर्दंड

$
0
0

आरटीओ, वाहतूक पोलिसांचे शुल्क भरताना नागरिकांची लूट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्राने ‘कॅशलेस’ व्यवहाराचे धोरण स्वीकारल्याने सर्वच सरकारी विभागात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिवहन विभागामार्फत लायसन्ससाठीचे शुल्क आणि वाहतूक पोलिसांकडून दंडाची रक्कमही ऑनलाइन स्वीकारण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांना सेवा शुल्क म्हणून तीन रुपयांपासून चौदा रुपयांपर्यंत भुर्दंड बसत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रोखीने दंड किंवा शुल्क भरण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘वाहन ४.०’ आणि ‘सारथी ४.०’ या अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केल्यापासून बहुतांश सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध झाल्या आहेत. तसेच, वाहनांचे कर भरणे किंवा लायसन्स काढण्यासाठीचे शुल्क ऑनलाइन स्वीकारले जात आहे. पक्क्या लायसन्ससाठी ४६४ रुपयांचे शुल्क आहे. मात्र, ऑनलाइन शुल्कभरणा करताना १४ रुपये अतिरिक्त भरावे लागत आहेत. दोन महिन्यांपासून वाहतूक विभागाकडून ‘ई-चलन’ योजनेच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांकडून ‘कॅशलेस’ दंड स्वीकारला जात आहे. त्यासाठी शहरातील २८ वाहतूक विभागात ‘पीओएस’ मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, हे शुल्क आकारण्यासाठी वाहतूक शाखेने व्होडाफोन कंपनीसोबत करारही केला आहे. ‘पीओएस’द्वारे किंवा व्होडाफोन कस्टमर केअर गॅलरीमध्ये दंडाची रक्कम भरणाऱ्या नागरिकांनी दोनशे रुपयांच्या दंडासाठी २०३ रुपये भरावे लागत आहेत.

जास्तीची रक्कम कशासाठी?
लायसन्ससाठीचे शुल्क ऑनलाइन भरल्यामुळे आरटीओमध्ये जाणे टळत नाही. वाहन चालविण्याची चाचणी देण्यासाठी आरटीओमध्ये जावेच लागते. त्यामुळे हे शुल्क आरटीओमध्ये थेट रोख स्वरूपात भरणे शक्य आहे. तसेच, वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यानंतर आकारण्यात येणारा दंड पोलिस कर्मचाऱ्याकडे रोख स्वरूपात भरता येत होता. त्यासाठी ऑनलाइन पद्धत ही चांगली बाब आहे. परंतु, ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांकडून जास्त पैसे आकारण्यात येत असल्याने नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर कसे स्मार्ट होईल?

$
0
0


स्मार्ट सिटी योजना कार्यान्वित होऊन वर्ष उलटत आहे. मात्र, त्याची सुरुवात अडखळत झाली असून, शहराच्या स्मार्टपणाबद्दल अनेकांना कल्पना नाही. त्याबद्दल...

- गणेश चव्हाण

पुणे शहर स्मार्ट करायचं म्हणजे नक्की काय करायचं, याचं उत्तर सामान्य पुणेकरांकडून मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. खुद्द महापालिकेत काम करणारे अधिकारीही कानावर हात ठेवतील. काही बोटावर मोजता येणाऱ्या अधिकाऱ्यांना याची थोडीफार कल्पना आहे; पण त्यांना माहीत असणाऱ्या योजना प्रत्यक्षात राबवल्या जातील, असे ते छातीठोकपणे सांगू शकणार नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्ट सिटी संकल्पनेचा केला गेलेला वरवरचा प्रचार आणि नागरिकांना दाखवली गेलेली अवास्तव स्वप्ने!
पालिका प्रशासनाने नागरिकांकडून अभिनव कल्पना मागवण्याची एक स्पर्धा घेतली. चालून आलेल्या या उत्तम संधीचा लाभ घ्यायचे मी ठरवले. १५ ऑक्टोबर २०१५ ते ३१ ऑक्टोबर २०१५ दरम्यान जगातील ८ देशांमधील ७० महापालिका, १५ सिटी कौन्सिल, काही आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्था, वाहतूक व्यवस्था, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन यांच्याशी संबंधित संस्थांचा अभ्यास करून, सलग १५ दिवस, दिवसाचे १४ तास या गोष्टीसाठी देऊन २००० पेक्षा जास्त अभिनव कल्पना मी पुणे महापालिकेला दिल्या. पण त्यापेक्षा मोठी प्रेरणा कुठली असेल, तर मागची दहा वर्षे फक्त पीएमपीने केलेला प्रवास आणि संपूर्ण पुणे शहर पायी चालत फिरून शहराचे समजलेले प्रश्न आणि त्यावर शोधलेली उत्तरे! त्यातल्याच काही मुख्य कल्पनांचा परामर्श येथे घेणार आहोत.
वास्तविक, मनुष्यबळ व्यवस्थापन, शहराची अर्थव्यवस्था, पर्यावरण, वाहतूक व दळणवळण, आंतरराष्ट्रीय संपर्ककक्षा, नागरी नियोजन, तंत्रज्ञान, नागरिकांचे आरोग्य, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा पुरवठा या सर्व परिमाणांमध्ये ज्या दिवशी आपण अग्रेसर राहू, त्याच दिवशी पुणे स्मार्ट झाले असे म्हणता येईल. प्रथम मनुष्यबळ व्यवस्थापनाचा विचार करूयात. स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी संबंधित व्यवस्थेमध्ये जे मनुष्यबळ असेल त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असावा. शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर, सुरक्षा दलातून; तसेच प्रशासनातून निवृत्त झालेले अधिकारी, विविध सामाजिक विषयांवरती काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तींचा सदर व्यवस्थेमध्ये असणारा समावेश म्हणजेच मनुष्यबळ व्यवस्थापन! पण या पहिल्याच मुद्द्यावरती पुणे प्रशासनाचे घोडे पेंड खात आहे; कारण स्मार्ट पुण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ हे खासगी कंपन्यांमधून आयात केले जाणार आहे. अशा मनुष्यबळाची पात्रता, अनुभव कोण तपासणार? ती व्यक्ती ज्या कंपनीमधून आली आहे त्या कंपनीच्या फायद्यासाठी नवीन पदाचा दुरुपयोग करणार नाही, याची शाश्वती कोण देईल? किंवा खास याच कारणासाठी त्यांची ठरवून निवड केली जाण्याची सुद्धा शक्यता आहे. सैन्यदलातून किंवा पोलिस दलातून अति वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले अधिकारी आज पुण्यात राहत आहेत; पण त्यांच्या ज्ञानाचा फायदा शहराच्या अंतर्गत सुरक्षेसाठी होताना दिसत नाही. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा सध्या ऐरणीवर आहे.
दुसरा मुद्दा शहराची अर्थव्यवस्था सुधारण्याचा. स्थानिक उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी विशेष योजना तयार करणे, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी परवानगी देणे शक्य तेवढे सुलभ करणे, सुधारित करप्रणाली तयार करणे, भरमसाठ कर आकारणी केल्याने छोट्या उद्योगांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. नवीन उद्योगांना सुरुवातीला कर सवलत द्यावी. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उद्योग शहरात आणण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी मुबलक जागा, पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत सोयींच्या प्रश्नाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे. तिसरा मुद्दा पर्यावरणाचा. पर्यायी ऊर्जेचे स्रोत शोधणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, शहरातील वाहनांची नियमित प्रदूषण नियंत्रण चाचणी करणे, प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करणे, पेट्रोल-डिझेलमधील भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करणे, वृक्ष लागवडीवर भर देणे, शहराच्या आसपासच्या टेकड्यावर वने उभारणे, लोकांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण करणे, रस्त्यावर थुंकणे, कचरा करणे यावर बंदी घालून कडक नियम करणे, प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्याला कडक शासन करणे असे अनेक उपाय करता येतील. शुद्ध हवा आणि पाणी यांचे गुणवत्ता नियंत्रण व्हायला हवे. सध्या मुठा नदीमध्ये मैलापाणी सोडले जाते ते तसे न सोडता प्रत्येकी तीन प्रभागांमध्ये मिळून एक मैलापाणी प्रक्रिया केंद्र उभारावे. हे शक्य नसल्यास बंद पाइपलाइनद्वारे हे पाणी शहराबाहेर नेऊन तिथे प्रक्रिया करावी; पण नदीचे प्रदूषण पूर्णपणे थांबवावे. एकूणच पर्यावरणाच्या दृष्टीने हे शहर राहण्यायोग्य बनवायला हवे.
चौथा मुद्दा वाहतूक व दळणवळण हा घेऊयात. पुणे शहराच्या वाहतुकीच्या बाबतीत आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे नियोजन केले गेले नाही. देशातील सगळ्यात जास्त दुचाकींची संख्या असलेले पुणे शहर वाहतुकीची कोंडी होण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. नागरी नियोजनाचा अभाव, अपुरे रस्ते, चुकीच्या पद्धतीने बांधले गेलेले उड्डाण पूल, रस्त्याच्या शेजारी असणारी अतिक्रमणे, फूटपाथवरील अतिक्रमणे, बेशिस्त वाहतूक, नियमांचे पालन न करणे, वाहतूक पोलिसांचे संपूर्ण दुर्लक्ष अशी एक ना अनेक कारणे वाहतुकीचा गुंता व्हायला कारणीभूत आहेत. यासाठी रस्त्यांची पुनर्बांधणी होणे गरजेचे आहेच पण वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील.
पोलिस आयुक्त हे स्मार्ट सिटीचे संचालक आहेत; पण हे पद शोभेचे न ठेवता समन्वय ठेवून काम करायला हवे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कायम तोट्यात असते. ती फायद्यात आणण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न होत नाहीत. शहरातल्या जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवासासाठी पीएमपीचा वापरा करावा यासाठी जनजागृती करण्याबरोबरच वाहतूक व्यवस्थेचा दर्जासुद्धा सुधारायला हवा. प्रवाशांना सौजन्यपूर्वक सेवा देऊन बसची उपलब्धता वाढवावी. फक्त स्त्रियांसाठी अधिक प्रमाणावर स्वतंत्र बसची गरज आहे. महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मोफत पास देण्यात यावा, असे निवेदन मी आधीच महापौरांना दिलेले आहे. ज्यामुळे पीएमपीचा तोटा कमी होईल, रस्त्यावरील वाहने काही प्रमाणात कमी होतील, अपघातांचे प्रमाण कमी होईल तसेच महापालिकेचा इंधनावरती तसेच नवीन वाहने घेण्यावरती होणारा खर्च आपोआप कमी होईल.
पाचवा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय संपर्ककक्षा. जगातल्या इतर शहरांशी पुण्याची संपर्ककक्षा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हायला हवे. पुणे ते जगातील इतर मुख्य शहरे यांच्यामध्ये थेट विमानसेवा सुरू करण्यात यावी. असे केले तरच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या संस्था पुण्यात गुंतवणूक करतील. तसेच पुणे एक महत्वाचे पर्यटन केंद्र व गुंतवणुकीचे शहर म्हणून वेगळी ओळख करावी लागेल. सहावे परिमाण म्हणजे नागरी नियोजन. त्याचा अभाव असणाऱ्या शहरात गुंतवणूक करण्यास कंपन्या टाळाटाळ करतात. चांगले रस्ते, वीज, पाणी, जागेची उपलब्धता नसेल तर नागरिकांचे हाल होतात; पण शहरामध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. शहर विकासाच्या कृती आराखड्यावर मतभेद न होता प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात व्हायला हवी. मुबलक स्वच्छतागृहे, घरे बांधण्यासाठी विशिष्ट धोरणे, चांगले रस्ते, फूटपाथ, आरोग्य सेवा केंद्रे आणि इतर पायाभूत सोयी सहज उपलब्ध होत असतील तरच नागरी नियोजन चांगले आहे असे म्हणता येईल.
सातवा मुद्दा तंत्रज्ञानाचा. जलद इंटरनेट सेवा, महापालिकांच्या सर्व सेवांचे डिजिटायझेशन, ऑनलाइन तक्रार निवारण, फायलींचे डिजिटायझेशन, कॅशलेस व्यवहार, स्मार्ट सिग्नल सिस्टीम, या सारख्या विविध योजनांचा तंत्रज्ञानामध्ये समावेश होतो. आठवा मुद्दा म्हणजे नागरिकांचे आरोग्य होय. शहरात पसरणाऱ्या रोगांची माहिती प्रशासनाला असायला हवी तसेच त्यासंबंधी तातडीने पावले उचलून अशा रोगांचे समूळ उच्चाटन करावे. जेनेरिक औषधांचा प्रसार, महत्त्वाच्या लसींची सहज उपलब्धता, स्वस्तात औषधोपचार, नियमित आरोग्य तपासणी संबंधी जनजागृती अशी कामे केली तरच शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील. नववा मुद्दा पाणीपुरवठा आहे. शहरातील लोकांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी मिळेल वर्षभर मिळेल या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. सध्या लोकांना २४/७ पाणीपुरवठा योजनेचे अमिष दाखवले जात आहे; पण शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धारणांमध्येच जर पुरेसा पाणीसाठा नसेल तर योजनेच्या अंमलबजावणीवर नक्कीच प्रशचिन्ह लागेल. लोकांना पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता रोजच्या रोज तपासायला हवी.
दहावा मुद्दा कचरा व्यवस्थापनाचा. शहरातील कचरा रोजच्या रोज उचलला जावा. आठवड्यातून एकदा प्लास्टिक कचरा पूर्ण शहरातून गोळा करून त्याचा उपयोग रस्तेबांधणीत करावा. उचलेला कचरा शहराच्या नेण्याऐवजी तीन प्रभागांत मिळून एक कचरा प्रक्रिया केंद्र उभारून सदर कचऱ्याची विल्हेवाट लावावी. अकरावा ऊर्जा पुरवठ्याचा. पुणे शहराची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी स्वतंत्र बायोमास प्रकल्प असावा. ज्यामुळे वीज उत्पादनावर येणारा ताण कमी होईल; तसेच लोकांना स्वस्त दरात ऊर्जापुरवठा करता येईल. पुणे शहराच्या भोवताली असणाऱ्या टेकड्यांवरती पवनचक्क्या बसवून तिथूनही ऊर्जानिर्मिती करता येईल. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाण्यावर छोटे-मोठे नवीन ऊर्जा प्रकल्प सुरू करता येतील अथवा बंद पाइपलाइनद्वारे जे मैलापाणी सोडले जाते त्यावरही ऊर्जानिर्मिती करता येईल. तसेच विजेची बचत करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तापमानवाढीवर उपाययोजना करण्यासाठी पर्यायी ऊर्जेचे स्रोत शोधणे ही काळाची गरज आहे.
ही परिमाणे शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने पुरेशी नाहीत; पण या संकल्पनेमध्ये यांचा विचार मुख्यत्वे केला जातो. स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यामागे मुख्य आव्हाने कुठली असतील तर ते म्हणजे लोकसंख्येची घनता आणि मोठे क्षेत्रफळ. या दोन्ही गोष्टींचे प्रमाण जास्त असेल तर एकूणच व्यवस्थेवर ताण येतो. साधन सामग्रीची कमतरता, निधीची कमतरता, मनुष्यबळाची कमतरता अशा नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. सध्या स्मार्ट सिटीसाठी फक्त औंध-बाणेर-बालेवाडी या भागांची निवड करण्यामागचे कारण हेच आहे; पण याच गतीने पुढे गेलो तर संपूर्ण पुणे स्मार्ट व्हायला अजून किती वर्षे लागतील, हे सांगता येणार नाही. खासगी कंपन्या आणि राजकीय पक्ष तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यात कसे संबंध आहेत यावरही स्मार्ट सिटीचे भवितव्य अवलंबून आहे. स्मार्ट सिटीची योजना राबवणारे हात कार्यक्षम, निःपक्षपाती आणि इमानदार असायला हवेत, नाहीतर तोच तो इतिहास परत परत लिहिला जाईल!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांसाठी नियमावली ठरतेय अडचणीची

$
0
0


कैद्यांना भेटण्यासाठी वकिलांना येणाऱ्या अडचणी, जेलमध्ये कैद्यांना मिळणाऱ्या असुविधा याकडे लक्ष वेधण्यासाठी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर हायकोर्टाने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडून नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. जेलमधील कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी आता वकिलांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार वकील सकाळी नऊ ते साडेदहा यावेळेतच कैद्यांना भेटू शकतात. यापूर्वी जेलमध्ये कैद्यांना भेटण्यासाठी दिवसातून दोनदा वेळ देण्यात आली होती. मात्र आता ही वेळ सकाळची केल्यामुळे ती अडचणीची ठरू लागली आहे.

- वंदना घोडेकर

जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे वकीलपत्र घेण्यासाठी तसेच त्यांच्या बाजूने कोर्टात लढत असताना वकिलांना कैद्यांची जेलमध्ये जाऊन भेट घ्यावी लागते. राज्यातील बहुतांश जेलमध्ये सध्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे कैद्यांना सुविधा मिळत नाहीत. तसेच उपलब्ध असलेल्या सुविधाही पुरेशा नाहीत. कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या वकिलांना आणि कैद्यांच्या नातेवाइकांनाही याचा सामना करावा लागतो. मुलाखत घेण्याची प्रकिया क्लिष्ट असल्यामुळे तसेच येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील वकिलांनी हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने कैद्यांच्या भेटीसाठी स्वतंत्र नियमावलीच परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. कैद्यांची भेट घेण्यासाठी यापूर्वी नियमावली नव्हती. या याचिकेमुळे ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र कैद्यांना भेटण्यासाठी देण्यात आलेली वेळ पुरेशी नाही असे वकिलांचे, तसेच महिला वकिलांचे म्हणणे आहे. येरवडा जेलचा विचार केला; तर सध्या येथे तीन हजाराहून अधिक कैदी आहेत. यामध्ये शिक्षा सुनावण्यात आलेले आणि न्यायालयीन बंदी असलेल्या कैद्यांचा समावेश आहे.
कैद्यांच्या बाजूने लढताना त्यांच्या केससंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेकदा वकिलांना जेलमध्ये कैद्यांची मुलाखत घ्यावी लागते. मात्र मध्यंतरी या संदर्भात जेल प्रशासनाकडून काही बदल करण्यात आले होते. त्याचा वकिलांना मुलाखत घेताना त्रास होत होता. मुलाखत घेण्यासाठी येताना वकिलांनी ड्रेसकोड पाळावा, वकिलपत्राची कॉपी त्यांच्याबरोबर असावी, ओळखपत्र असावे, तसेच कैद्याची सही वकिलपत्रावर असावी अशा काही सूचना जेल प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या बदलांमुळे वकिलांना अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुण्यातील जनअदालत संघटना, अॅड. इब्राहिम शेख आणि आरोपी असलेला गणेश पवार यांच्यामार्फत येरवडा जेल प्रशासनाविरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका दाखल करताना पुण्यातील ३०० वकिलांच्या सह्यांचे निवेदन जोडण्यात आले होते. हायकोर्टात अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेत मुलाखत घेताना वकिलांना येणाऱ्या अडचणींबरोबरच जेलमध्ये असलेल्या कैद्यांना मिळणाऱ्या असुविधा, त्यांच्या अडचणी, महिला जेलमध्ये असलेल्या महिलांच्या अडचणी याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील जेलमध्ये कैद्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार हायकोर्टाकडून काही निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कैद्यांना भेटण्यासाठी देण्यात येणाऱ्या वेळा, भेटण्यासाठी कोणत्या सुविधा असाव्यात याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता मुलाखत घेताना संबंधित बदल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केलेले अॅड. इब्राहिम शेख यांनी, वकिलांना मुलाखत घेण्यासाठी देण्यात आलेली एक वेळ मात्र अडचणीची ठरत असल्याचे सांगितले. याचिका दाखल करताना आपण इतर मुद्द्यांकडेही लक्ष वेधले होते. मात्र दिवसातून दोनदा भेटण्यासाठी असलेली वेळ ही आता सकाळचीच करण्यात आली आहे. लांबून येणाऱ्या लोकांना, महिलांना ही वेळ अडचणीची ठरते आहे. सकाळच्या वेळी मुलाखत घेण्यासाठी आलेल्या वकिलांची संख्या अधिक असते. तसेच कैद्यांना भेटण्यासाठी मिळणारा वेळ कमी मिळतो आहे. कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी जेलमध्ये आधी अर्ज द्यावा लागतो. तिथे सध्या दोन कम्पुटरवर नोंदणी केली जाते. याठिकाणी आणखी एक कम्पुटर आणि कर्मचारी मिळावा आणि ही वेळ वाढवून दुपारीही करण्यात यावी यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करणार आहोत, असे अॅड. इब्राहिम शेख यांनी नमूद केले.
याचिकेनुसार आपण कैद्यांचे प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी, मुलाखत घेण्यासाठी लावण्यात आलेल्या नियमावली याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. कैद्यांची भेट घेण्यासाठी आता एकच वेळ देण्यात आली आहे. पुढील काही दिवसात यामुळे नेमक्या काय अडचणी येतात. ही वेळ योग्य आहे हा, हे पाहून पुढील गोष्टींसाठी प्रयत्न करू, असे जनअदालत संघटनेचे अध्यक्ष अॅड. सागर नेवसे सांगतात.
केवळ यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल झाली म्हणून एक वेळ करणे सोयीची नाही. सायंकाळी मुलाखत घेण्याचीही वेळही योग्य आहे. दिवसभराचे कोर्टाचे कामकाज संपल्यानंतर वकिल सायंकाळी कैद्यांची मुलाखत घेऊ शकत होते. त्यामुळे या वेळेचा पुन्हा विचार होणे वकिलांच्या आणि कैद्यांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणारे आहे, असे येरवडा जेलमध्ये विधी सेवा प्राधिकरणातर्फे जेल को-ऑर्डिनेटर म्हणून काम पाहत असलेले अॅड. अतिश लांडगे म्हणतात.
हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमुळे अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले गेले. कैद्यांना मिळणाऱ्या सुविधांचा या निमित्ताने पुन्हा आढावा घेण्यात आला. समाजाचा आरसा म्हणून वकिलांकडेही पाहिले ​जाते. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या वकिलांकडून जेलमध्ये असलेल्या कैद्यांच्या प्रश्नांकडे यानिमित्ताने मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिले गेले. मात्र त्यातून समोर आलेली नियमावली अडचणीची आणि जाचक होऊ नये यासाठी वकिलांकडूनच पुन्हा पुढाकार घेतला जाईल हे नि​श्चितच.

मुलाखत घेण्यासाठी करण्यात आलेली नियमावली
- वकील सकाळी नऊ ते साडेदहा वेळेतच कैद्यांना भेटू शकतात. वकील असल्याचे ओळखपत्रही संबंधित अधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.
- कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी अर्ज करताना त्यासोबत बार असोसिएशनच्या ओळखपत्राची छायांकित प्रत जोडायची आहे.
- वकील भेटीचे अर्ज त्याच दिवशी सकाळी आठ ते नऊ दरम्यान मुलाखत नोंदणी कक्षात स्वीकारले जातील. त्याची नोंद कम्प्युटरवर केली जाईल. जेलच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणीच्या अधीन राहून वकिलांना मुलाखत कक्षात प्रवेश दिला जाईल.
- वकील भेटीसाठीची वेळ सकाळी नऊ ते साडेदहा अशी राहिल; तसेच रविवार आणि जेलच्या सुटीच्या दिवशी भेट बंद राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीरा नदीत माउलींचे स्नान

$
0
0

सातारा जिल्ह्यात प्रवेश; आज पहिले उभे रिंगण

म. टा. वृत्तसेवा, सातारा

श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा चांदीच्या पादुकांना शनिवारी दुपारी दीड वाजता नीरा नदीतील दत्तघाटावर ‘माउली... माउली’च्या जयघोषात वारकरी आणि पालखीसोहळा प्रमुखांनी नीरास्नान घातले. लाखो वैष्णवांच्या या वारी सोहळ्याने मोठ्या उत्साहात आणि टाळ मृदंगाच्या निनादात सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. आता येत्या चार दिवसांत हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान करणार आहे.
शनिवारी दुपारी नीरा येथील विसावा आटोपून दीड वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या जुन्या पुलावरुन नीरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. या वेळी चोपदार राजाभाऊ आणि बाळासाहेब यांनी रथातील पादुका हातात घेऊन दत्तघाटावर नेल्या. पादुकांना स्नान घालण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात असलेल्या पाडेगाव येथील टोलनाक्यावर आल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

स्नानाची जागा बदलली
पारंपरिक स्नानाच्या ठिकाणी ठेकेदाराने घाटाचे नूतनीकरण करताना चौथरा बनवला होता. हा चौथरा पाण्यापासून उंच असल्याने तसेच चौथऱ्याच्या कडेला खड्डे पडल्यामुळे स्नानाची जागा बदलावी लागली. ऐनवेळी स्नानाची जागा बदलावी लागल्याने वारकऱ्यांची पंचाईत झाली.

लोणंद येथे मुक्काम
पाडेगावहून टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या पालखी सोहळ्याने दुपारचा विसावा चार वाजता पाडेगाव फार्म येथे केला. सायंकाळी सहा वाजता सोहळा लोणंद येथील मुक्कामासाठी विसावला. लोणंद येथे सायंकाळी समाज आरती झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गावात मुक्कामासाठी उतरलेल्या दिंड्यांमधून भजन, भारुडे, प्रवचन आणि कीर्तनाने लोणंद माउलीमय झाले होते. दीड दिवसाचा मुक्काम लोणंद येथे होणार असल्याने दर्शनासाठी गर्दी झाली होती.

चांदोबाचा लिंब येथे रिंगण
आज, रविवारी दुपारी महाआरती आणि नैवेद्य झाल्यावर माउलींचा पालखी सोहळा दीड दिवसांच्या मुक्कामानंतर तरडगावकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान आज, रविवारी दुपारी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्याचे पहिले उभे रिंगण होणार आहे.

चंद्रभागेतील धोकादायक खड्डे कायम
पंढरपूर : चंद्रभागा नदीकडे वाळू माफियांनी आपली दृष्टी वळवली असून, नदी अक्षरशः ओरबाडून काढली आहे. जवळपास पाच फुटापर्यंत वाळू उचलल्यामुळे चंद्रभागेत मोठे खड्डे पडले आहेत. याच खड्यात बुडून काही दिवसांपूर्वी चार बालकांचा बळी गेला होता. त्यामुळे आषाढी यात्रेतही नदीतील खड्डे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
वाळू माफियांची नजर चंद्रभागेच्या पात्रावर गेली असून, पात्रातील अनेक ठिकाणी वाळू उपसा केल्याने पात्र धोकादायक बनले आहे. काही दिवसांपूर्वी अशा जीवघेण्या खड्ड्यात एकाचवेळी चार चिमुरड्यांना प्राण गमवावे लागले होते. आषाढी यात्रेच्या तयारीसाठी प्रशासन वाळवंटातील खड्डे जेसीबीच्या मदतीने बुजवित असून, वाळवंटाचे सपाटीकरण सुरू आहे. वाळू उपसा झाल्याने येथे बाहेरून वाळू आणून भरल्याशिवाय खड्डे बुजविणे अशक्य आहे. याच वाळवंटातून जप्त केलेली शेकडो ब्रास वाळू सध्या तहसील आणि प्रांत कार्यालयाच्या आवारात पडून असून, तिला विविध मार्गाने पाय फुटत आहेत. अशावेळी प्रशासनाने जप्त केलेल्या वाळूने चंद्रभागा पात्र आणि वाळवंटातील खड्ड्यात भरण्याची मागणी जोर धरू लागली आहे . चंद्रभागेच्या पात्रात देखील मोठ्या प्रमाणात शेवाळे आणि पाण वनस्पती उगविल्या असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, प्रशासनाकडून फक्त जेसीबी फिरवून वरवरची मलमपट्टी सुरू आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे चंद्रभागेत स्नान करणाऱ्या १५ ते २० लाख भाविकांना जीवावर उदार होऊनच स्नानाला उतरावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबाराय विसावले मोरोपंत नगरीत

$
0
0

पालखी सोहळ्याचे बारामतीत उत्स्फूर्त स्वागत; शहर भक्तिमय

म. टा. वृत्तसेवा, बारामती

। सावध जालो सावध जालो । हरिच्या आलों जागरणा ॥१॥
तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥धृ॥
पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥
तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥

खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका..टाळ-मृदंगाचा गजर.. मुखी हरिनाम..अशा भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठलाच्या ओढीने पंढरीला निघालेल्या वैष्णवांचा मेळावा कवी मोरोपंतांच्या नगरीत विसावला. लाखो वारकऱ्यांसमवेत संपूर्ण शहर विठ्ठलनामात रंगून गेले. नागरिकांनी वारकऱ्यांचे भक्तिभावाने स्वागत केले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागत बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी केले. या वेळी मुख्याधिकारी मंगेश चितळे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी प्रत्येक दिंडीतील विणेकऱ्यांचा श्रीफळ, शाल देऊन स्वागत केले. सायंकाळी ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या गजरात पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून भाविकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. तुकोबांच्या दर्शनासाठी सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या भाविकांनी हा अनुपम भक्तिसोहळा डोळ्यांत साठवला. पालखी येताच पादुकांना स्पर्श करून दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उसळ्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
शारदा प्रांगणात पालखी येताच ‘पुंडलिक वरदा..हरी विठ्ठल ! श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष करून खांदेकऱ्यांनी पालखी मंडपात स्थानापन्न केली. समाज आरती झाल्यानंतर दर्शनरांगा खुल्या करण्यात आल्या. बारामती शहर आणि परिसरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आणि संघटनांतर्फे उपवासाचे पदार्थ देऊन वारकऱ्यांची सेवा केली. शनिवारी दुपारनंतर शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्रीराम मंदिर ,सिद्धेश्वर मंदिरासह सर्व मंदिरांमध्ये वैष्णव विसावले. थोडा विसावा घेऊन वारकरी पुन्हा भजन आणि कीर्तन करीत हरिनामामध्ये दंग झाले.

तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग....
दरवर्षीच पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी उसळते. यंदाही तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून परंपरा कायम ठेवली. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, आयटी क्षेत्रातील नोकरदार मंडळी अनुपम पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी सहभागी झाली होती.

संस्था, संघटनांतर्फे स्वागत
दिंडीमध्ये आलेल्या वारकऱ्यांना अन्नदान ,प्रथोमोपचार पेट्यांचे वाटप, आरोग्य शिबिरे, मोफत उपचार आदी सेवा प्रदान करण्यात आल्या. बारामती मेडिकल, डॉक्टर संघटना यांच्याकडून मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात आली. बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून अन्नदान करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांनी ससून रुग्णालयाच्या सहकार्याने २० डॉक्टरांच्या मदतीने वारकऱ्यांची तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटीची कामे अजूनही अपूर्णच

$
0
0

अनंत गाडगीळ यांनी केला पंचनामा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत गाजावाजा करून जाहीर केलेल्या एकाही प्रकल्पाला अद्याप सुरुवात झालेली नाही. पालिकेत पूर्ण बहुमत असणाऱ्या भाजपचे केंद्रीय मंत्री, आठ आमदार, दोन खासदार असूनही प्रकल्प जैसे थेच आहेत. त्यामुळे सध्याचे सत्ताधारी पुण्याला काय स्मार्ट सिटी करणार,’ असा सवाल आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त योजनांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर एकही काम मार्गी लागले नसल्याची टीका गाडगीळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. या कामासाठीच्या चारशे कोटी रुपयांच्या निधीपैकी दहा टक्के रक्कमही अद्याप खर्ची पडलेली नाही. सार्वजनिक वाहतूक, झोपडपट्टी पुनर्वसन, सौर उर्जेचा वापर, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अशा अनेक योजना मांडण्यात आल्या मात्र, त्यापैकी कोणतीही योजना सुरू झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
‘जगभरात नागरीकरणाचा वेग वाढत असल्याने देशात २०२० पर्यंत ४० टक्के नागरीकरण अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये सेवा पुरविणे अपेक्षित आहे. मात्र, पुण्यात स्मार्ट सिटी योजनेपैकी ७० टक्के निधी तीन टक्के भागावरच खर्च करण्यात येत आहे. एकूणच पुण्यात स्मार्ट सिटीच्या नावाखाली शुद्ध बावळटपणा सुरू आहे,’ असे टीकास्त्र गाडगीळ यांनी सोडले.

टाक्या पुन्हा विधिमंडळात
शहरात २४ तास पाणी पुरविण्याच्या योजनेसाठी सुरू करण्यात आलेल्या टाक्यांच्या खरेदी प्रक्रियेबाबत गाडगीळ यांनी विधिमंडळात आक्षेप घेतले होते. त्यानंतर या प्रक्रियेची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या चौकशीचे काय झाले, याबाबत विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एका पावसात माळीणची काय अवस्था झाली बघा!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

तीन वर्षांपूर्वी दरडीखाली गाडल्या गेलेलं माळीण गाव नव्याने वसवून, त्याचं लोकार्पण करून राज्य सरकारनं सगळ्यांचीच मनं जिंकली होती. परंतु, पहिल्याच पावसात माळीणमधील अनेक रस्ते खचल्याचं, घरांच्या भिंतींना तडे गेल्याचं चित्र असल्यानं पुनर्वसनाच्या कामाच्या दर्जाबद्दल शंका निर्माण झाली आहे.

३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गाव होत्याचं नव्हतं झालं होतं. डोंगरकडा कोसळल्यानं हे अख्खं गाव मातीखाली गेलं होतं. त्यात १५१ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकोपातून वाचलेली अनेक मंडळी निराधार झाली होती. त्यांना आधाराचा हात देण्यासाठी प्रशासन, सरकार पुढे सरसावलं होतं आणि एप्रिल महिन्यात सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या पुनर्वसित माळीण गावाचं मुख्यमत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. नवी घरं, शाळा, मंदिर, रस्ते असं गावाचं लोभसवाणं रूप पाहून सगळेच हरखले होते. पण काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने या गावाची अवस्था बिकट होऊन गेलीय.

माळीणवासीयांनी काढलेले खालील फोटो पाहून आपल्याला धक्काच बसेल. गावाचं हे रूप पाहून गावकरीही हादरलेत. काही जण तर गाव सोडण्याचाही विचार करताहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा शासन-प्रशासनाकडे वळल्या आहेत.










मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीने आम्ही समाधानी नाहीः पवार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केलं आहे. अर्थात, या निर्णयामुळे ते संपूर्ण समाधानी नाहीत, पण सरकारला वेळ देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

'सरकारच्या कर्जमाफीमुळे संपूर्ण समाधान झालेलं नाही. मात्र हे सरकारचे पहिलं पाऊल आहे. काही शेतकरी नेते त्याबाबत आत्ताच नाराजी व्यक्त करू लागलेत. मात्र, हा निर्णय योग्य की अयोग्य याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस इतक्यात बोलणार नाही. त्यासाठी आणखी वेळ द्यावा लागेल आणि सरकारसोबत समन्वयाचीच आमची भूमिका राहील', अशी भूमिका पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. कर्जमाफी हे एक पाऊल झालं, आता आमची मागणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची आहे, असंही ते म्हणाले.

>> कर्जमाफी ही ३० जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने ३० जून २०१६ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.

>> ज्यांचं कर्ज दीड लाख रुपयांहून अधिक आहे त्यांना कर्ज फेडण्यासाठी मुदत देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे केली. राज्य सरकारनी त्याला अनुकूलता दर्शवली. मात्र, दीड लाखाच्या पुढचं कर्ज एकाच वेळी भरण्याची अट घातली. ते शक्य नाही. त्यांना सरकारनी हप्ते बांधून द्यावेत.

>> काही शेतकरी नेते आत्ताच नाराजी व्यक्त करायला लागलेत. मात्र आम्ही सरकारला वेळ देऊ. शेतकरी संपूर्ण समाधानी नाही ही वस्तुस्थिती आहे.

>> राज्यात कांद्याचे दर कोसळलेत. तुरीचे उत्पादन जास्त झाल्याने त्या तुरीचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यासाठी सरकारने या दोन पीकांवरची निर्यातबंदी उठवावी.

पूर्णवेळ संरक्षणमंत्री हवा!

काश्मीरमध्ये दररोज देशाचे जवान शहीद होत असताना केंद्र सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. पाकिस्तानसोबत युद्ध करा, असं मी म्हणणार नाही. पण कडक कारवाई गरजेचीच आहे. त्यासाठी देशाला पूर्णवेळी संरक्षणमंत्री असणंही आवश्यक आहे, असं मत शरद पवार यांनी मांडलं. कधी-कधी सुरक्षारक्षकांकडून होणारी चौकशी काश्मिरी जनतेसाठी त्रासाची होते आणि मग त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येते. तेही आपलेच नागरिक आहेत, हे ओळखून त्यांना वागणूक मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ही तर त्यांच्या मनातली खदखद!

शिवाजी महाराज हे गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, असं विधान शरद पवार यांनी अलीकडेच केलं होतं. त्यांच्या या तर्कावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्याबाबत विचारलं असता पवार म्हणाले की, शिवरायांनी अफझलखानाला मुस्लिम होता म्हणून नाही तर स्वराज्याचा, रयतेच्या राज्याचा शत्रू होता म्हणून मारलं. छत्रपती शिवरायांनी कधी जात - धर्माचा विचार केला नाही. अफझलखानाला जसा मारला तसा कृष्णाजी कुलकर्ण्यालाही मारला. स्त्रियांबाबत गैरवर्तन करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडले. बजाजी निंबाळकर, जावळीचे मोरे अशा कित्येकांवर शस्त्र चालवली. पण माझ्या विधानाचे हवे ते अर्थ घेण्यात आले. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या मनात किती खदखद आहे हे यातून दिसून येतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीबाबत सरकारशी समन्वय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्य सरकारने ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कर्जमाफीच्या निर्णयाबाबत पूर्णपणे समाधानी नसलो, तरी राज्य सरकारशी समन्वय साधून सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पाहिजेत, यासाठी आग्रही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, ‘राज्य सरकारने कर्जमाफीबाबत घेतलेले हे पहिले पाऊल आहे. राज्यात ४० लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. या कर्जाची रक्कम ३४ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करताना ३० जून २०१६पर्यंत थकबाकी असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. खरे तर हा निर्णय घेताना ३० जून २०१७ पर्यंतच्या शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे, त्यांना २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो ५० हजार रुपयांपर्यंत असावा, अशी मागणी केली आहे.’

पवार म्हणाले, ‘राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी कर्ज एकरकमी भरण्याची अट घालण्यात आली आहे. ही अट शिथिल करून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची मुदत द्यावी, त्यासाठी आता बँकांनी पुढे आले पाहिजे.’

कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न

पवार म्हणाले, ‘शेतकरी थकबाकीदार का होतात, याचा शोध घेऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे. शेतमालाला योग्य किंमत (एमएसपी) मिळाली पाहिजे. भाजपने निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. या शिफारसी लागू झाल्यानंतर त्याच्यावर थकबाकीदार होण्याचे संकट येणार नाही.’ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे व्यवहार्य आहे का, या प्रश्नावर ‘भाजपमध्ये अनेक तज्ज्ञ आहेत, जाहीरनाम्यात उल्लेख केला असल्याने त्यांनी याबाबत विचार केला असेल,’ असा टोला लगावला.

‘कृषिमूल्य आयोग स्थापन करा’

‘राज्य सरकारकडून कृषिमूल्य आयोगाची स्थापना करण्यात येते. त्यात शेतीशी संबंधित तज्ज्ञांना घेतले जाते. हा आयोग केंद्र सरकारशी अनेक निर्णयांमध्ये सुसंवाद साधत असतो. या सरकारने कृषिमूल्य आयोगाची स्थापना केलेली नाही. त्यामुळे, तो लवकरात लवकर स्थापन करावा, अशी सूचना पवार यांनी केली.

‘कांदा, तूर निर्यातीला अनुदान द्या’

‘कांद्याचे भाव पडले असून त्याचा सर्वाधिक फटका हा जिरायतदार शेतकऱ्याला बसला आहे. ​तसेच, तुरीचे झाले आहे. गेल्या वर्षी तुरीचे भाव गगनाला भिडले होते. सरकारने शेतकऱ्यांना तूर लावण्यासंदर्भात प्रोत्साहित केले. सध्या तुरीचे उत्पादन अधिक झाल्याने खरेदी केली जात नाही. मराठवाडा, खान्देशातील शेतकरी यात भरडला जात आहे. तूर आणि कांदा निर्यात करणे आवश्यक असून या निर्यातीला अनुदान दिले पाहिजे,’ अशी मागणी पवार यांनी केली.

‘पूर्ण वेळ संरक्षणमंत्री हवा’

‘काश्मीरमधील परिस्थिती गंभीर होत असून दररोज जवान मारले जात आहेत. दहशतवादी आता श्रीनगरमध्ये घुसले आहेत. पाकिस्तानशी युद्ध करावे, अशी आमची भूमिका नसली, तरी देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी कठोर निर्णयांची आवश्यकता आहे. सरकारने बघ्याची, नरमाईची भूमिका घेणे हिताचे नाही. देशासाठी पूर्णवेळ संरक्षणमंत्री नेमण्याची गरज आहे,’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत कर्जमाफी, काश्मीर प्रश्न, पूर्ण वेळ संरक्षणमंत्री; तसेच त्यांनी ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणून केलेले विधान, कांदा, तूर उत्पादन यावर भाष्य केले. पवार यांना श्रीनगर येथील त्यांचे मित्र विजय धर यांचा रविवारी सकाळी फोन आला होता. धर यांच्या श्रीनगर येथील शाळेत दहशतवादी घुसले होते. ही माहिती देतानाच पवार यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. काश्मीरमधील दहशतवादप्रकरणी सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

पवार म्हणाले, ‘काश्मीरमध्ये श्रीनगरपर्यंत दहशतवादी घुसले आहेत. सीमेपलीकडून घुसणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकवला पाहिजे. राज्य सरकारने याकडे वेगळ्या भूमिकेतून बघण्याची गरज आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धडा शिकवणार असल्याचे सांगितले होते. मी त्यांना युद्ध करा, असे म्हणणार नाही. मात्र, सीमेचे संरक्षण नीट करा. लष्कराचे मनोधैर्य उंचावण्यासाठी काही निर्णय तत्काळ घेण्यासाठी पूर्ण वेळ संरक्षणमंत्र्याची गरज आहे.’

मीरा कुमार योग्य उमेदवार

‘राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘यूपीए’च्या उमेदवार मीरा कुमार या सर्वोत्तम उमेदवार आहेत. त्यांनी सात देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना संसदेचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी पाच वर्षे केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून, तर पाच वर्षे सभापती म्हणून काम पाहिले आहे. संसदेची त्यांच्याइतकी चांगली माहिती आताच्या उमेदवारांमध्ये कोणालाही नसावी,’ अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार या मीरा कुमारच असल्याचे त्यांनी एका प्रश्नादरम्यान सांगितले. ‘एनडीए’ने आणखी चांगला उमेदवार देण्याची आवश्यकता होती का, याबाबत पवार यांनी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले. मात्र, लालकृष्ण अडवाणी हे उपपंतप्रधान होते, त्यांनी पक्षाचे नेतृत्वही केले आहे. मुरलीमनोहर जोशी हे विद्वान आहेत. मात्र, ‘एनडीए’चा निर्णय हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

वाटच पाहतोय...!

अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) देशात अनेक ठिकाणी कारवाया करीत आहेत. पवार कुटुंबातील सदस्यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार असल्याच्या बातम्या झळकल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, ‘आम्ही वाटच पाहतोय. बदनामी करण्यासाठी असे प्रकार केले जातात. मात्र, मला त्याची चिंता वाटत नाही. यापूर्वी माझे दाउदशी मैत्री असल्याचे आरोप झाले. सिंचन खात्यात ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे आकडे छापले जात आहेत. मात्र, वस्तुस्थिती पाहिली असता किती खर्च झाला? या सरकारने तर तीन वर्षांच्या काळात जलसंपदा विभागाची कामेच केली नाहीत.’

‘एवढे काय झोंबते…’

‘इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हटलेले नाही. याकडे लक्ष वेधल्यानंतर एवढे काय झोंबते, हे मला समजत नाही’, असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या विधानाचा रविवारी पुनरुच्चार केला. माझ्यावर जातीयवादाचे आरोप करणाऱ्यांना मी किंमत देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वाच्या प्रकल्पांना जागांचा आगाऊ ताबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निकडीच्या सार्वजनिक प्रकल्पांकरिता विविध विभागांकडील आवश्यक जागांचा ताबा आगाऊ स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने शहरातील रेल्वे, मेट्रो, विमानतळासह रिंग रोड आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रक्रियेसाठी सरकारने कालमर्यादा निश्चित केल्याने जागांच्या हस्तांतरणात जाणारा वेळ वाचणार आहे.

राज्याच्या वेगवेगळ्या भागांत सध्या रस्ते-द्रुतगती मार्ग, रेल्वे प्रकल्प, विमानतळ, बंदर विकसन, मेट्रो-मोनो रेल्वे, मोठे सिंचन व जलविद्युत प्रकल्प यासारखे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना राज्य सरकारच्या इतर विभागांकडील जागेची आवश्यकता असते. अनेकदा या जागा मिळण्यास विलंब होत असल्याने प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे, संबंधित सरकारी जागांचा आगाऊ ताबा देण्याचा निर्णय गेल्या महिन्यात सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतला होता. या निर्णयाचा आदेश (जीआर) नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, जागांचा आगाऊ ताबा मिळविण्याची प्रक्रिया आणि त्याचा कालावधी सरकारने निश्चित केला आहे. विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी जागेची मागणी केल्यानंतर संबंधित विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ठरावीक कालावधीत त्याचा आगाऊ ताबा द्यावा, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत.

सरकारने घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा पुणे मेट्रो, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) राबवल्या जाणाऱ्या मेट्रो व रिंगरोड प्रकल्पाला होणार आहे. त्याशिवाय, पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गासाठी (ट्रॅक) लवकरच काम सुरू केले जाणार आहे. विविध जागांचा आगाऊ ताबा मिळविण्यासाठी या सर्वच महत्त्वाच्या प्रकल्पांना त्याचा फायदा होणार आहे. संबंधित जागेची मोजणी आणि इतर प्रक्रियाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी ही सर्व प्रक्रिया तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावी, असे बंधन घालण्यात आले आहे.

‘पीएमआरडीए’कडून राबवण्यात येणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी पोलिसांसह कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची गरज लागणार आहे. या जागांचा आगाऊ ताबा देण्याचे अधिकार सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, त्यानुसार पुढील टप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या निर्णयामुळे सरकारी विभागांच्या जागा ताब्यात घेण्यासाठी होणारा विलंब टाळता येणार आहे.’

किरण गित्ते,

महानगर आयुक्त, पीएमआरडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिवंत समाधी’चा साहसी खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

गेल्या काही दिवसांपासून विश्रांतवाडी परिसरात साहसी खेळ आणि जादूचे प्रयोग करणाऱ्या काही जणांनी शनिवारी वीट आणि सिमेंटचा चौथरा बांधून एकाला पाच तास जिवंत समाधी दिल्याचा प्रकार घडला. काही सजग नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौथरा तोडून एकाला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. साहसी जादूचे खेळ करून पैसे कमविण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

विश्रांतवाडी परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दुसऱ्या जिल्ह्यातून काही जण पैसे कमविण्यासाठी आले होते. काही दिवस आजूबाजूच्या भागात विविध साहसी खेळ केल्यानंतर शनिवारी एकतानगरमध्ये ते पोहोचले. तिथे त्यांनी वीट आणि सिमेंटचा चौथरा तयार करून त्यांच्यातीलच जुबेर सय्यद (वय ३८, रा. इगतपुरी, नाशिक) याला जिवंत झोपवले. त्यावर लोखंडी पलंग टाकून सिमेंटचा कोबा करून बंदिस्त करण्यात आले.

चौथऱ्यावर फुले वाहून सय्यदने जिवंत समाधी घेतल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी घोषणा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घटनास्थळी जमा झालेल्या लोकांकडून चौथऱ्यावर पैसे टाकण्याची विनंती करू लागले. सुमारे पाच तास हा सगळा प्रकार चालू होता. काही सजग नागरिकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस रात्री दहाच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. चौथरा उद्ध्वस्त करून कथित ‘जिवंत समाधी’ घेतलेल्या सय्यदला बाहेर काढून त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पैशासाठी साहसी खेळ आणि जादूचे प्रयोग करीत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

साहसी जादूचे प्रयोग करून चौथऱ्यात ‘जिवंत समाधी’ घेणाऱ्या आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात कोणीही तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही.

दिलीप शिंदे, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उभे रिंगण उत्साहात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रविवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर तरडगावकडे निघाला. दुपारी पावणे चार वाजता चांदोबाचा लिंब येथे या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होणार होते. त्याची तयारी करण्यासाठी वारकरीही उपस्थित होते पण आज नियोजित ठिकाणी रिंगण न होता ते पुढे एक किलोमीटर अंतरावर झाल्याची बातमी आल्यामुळे वारकरी, माध्यमांचे प्रतिनिधी सगळेच संभ्रमात पडले. त्यानंतर माउलींचा रथ तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाला.

‘दिंड्यांमध्ये पडलेल्या अंतरामुळे आजचे उभे रिंगण चांदोबाच्या लिंबाच्या नियोजित ठिकाणाच्या थोडे पुढे झाले. हे रिंगण नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने झाले. दिंड्यांतील अंतर अधिक असल्यास माउलींचा घोडा उभ्या रिंगणाबाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात घडू शकतो. अपघात होऊ नये याची दक्षता घेत यंदा थोडे पुढे रिंगण घेण्यात आले. त्यात काहीही गैर नाही, ’ अशी माहिती आळंदी संस्थानचे विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीला दिली.

दुपारी अडीच वाजल्यापासूनच लाखो वारकऱ्यांना रस्त्याच्या दुतर्फा रांगांमध्ये उभे करण्याचे काम स्वयंसेवक आणि सोहळ्यातील मानकरी करीत होते. रिंगण पाहण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासूनच मिळेल त्या जागी भाविक बसले होते, मात्र रिंगणाची वेळ उलटून गेली आणि अखेर माउलींचा रथही तरडगावकडे निघाल्यावर अनेकांचा हिरमोड झाला. रिंगण झाल्याचे समजल्यानंतर आणि टाळ मृदुंगाच्या टिपेला पोहचलेल्या स्वरात ‘माउली, माउली आणि ग्यानबा तुकाराम ’चा एकच जयघोष करीत वारकऱ्यांनी तरडगावची वाट धरली. आजचा रिंगण सोहळा अचानक झालेल्या बदलामुळे अनुभवताच आला नाही, असे अनेक भाविकांनी सांगितले.

रिंगण संपल्याचे समजताच तरडगावच्या मुक्कामासाठी वारकरी वेगानेच निघाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखी रथ तरडगाव हद्दीत आल्यावर स्वागत कमानीजवळ रथाचे फटाके आणि नामघोषात स्वागत करुन पंचारतींनी औक्षण करण्यात आले. व त्यानंतर तरडगावची खास प्रथा म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या पादुका असलेली पालखी गावच्या पंच तसेच मान्यवरांनी खांद्यावर घेत संपूर्ण गावात ही पालखी मिरवत पालखी तळावर नेली. गावातून पालखी सोहळा नेत असताना विविध चौकांत तसे घरांपुढे या पालखीचे स्वागत करण्यात आले. सोमवारी पहाटे हा पालखी सोहळा फलटणच्या दिशेने रवाना होणार आहे.


काटेवाडीत मेढ्यांचे रिंगण

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे गोल रिंगण काटेवाडी (ता. बारामती) येथे रविवारी पार पडले. या वेळी काटेवाडी येथे पारंपरिक पद्धतीने पालखीच्या स्वागतासाठी धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

काटेवाडी परिसरातील भाविकांनी बस स्थानकाजवळच्या फाट्यावर पालखीचे स्वागत केले. १३७ वर्षांपासूनची ही प्रथा आजही सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. काटेवाडी गावात गौरी काटे (सरपंच) यांनी पालखीचे स्वागत केले. मुख्य मार्गापासून गावातील मैदानावर पालखी नेण्यात आली. या वेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केले. त्यानंतर सुरू झाला डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा. सुरुवातीला पालखीभोवती मेंढ्या धावल्या. त्यांच्यापाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावन आणि कलश डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले. रिंगण पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबा आणि माउलीचा नामघोष सुरू होता. रिंगण सोहळ्यानंतर पालखीने सणसर मुक्कामी प्रस्थान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

$
0
0

भोर : वेल्हे गावातील अहिल्यानगर येथील चिमाबाई भगवान ढेबे (वय ५४) यांचा वीज वाहिनीला धक्का लागून जागीच मृत्यू झाला. चिमाबाई यांच्याबरोबर त्यांची गाय व बैल यांचाही मृत्यू झाला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपासून वेल्हे परिसरांत कमी-अधिक प्रमाणात पाउस पडत आहे. चिमाबाई दुपारी घराजवळ असलेल्या रानात जनावरांना चारा घालण्यासाठी गेल्या होत्या. त्या परिसरात वेल्हे येथील वीज मंडळाच्या एका डीपीच्या तारा पडल्या होत्या. चरता-चरता त्यांच्या गायीचा पाय विजेच्या तारेवर पडल्यामुळे ती खाली पडली. त्यामुळे चिमाबाईने विजेची तार बाजूला करण्यासाठी हातात घेताच त्यांचाही जागीच मृत्यू झाला. याच तारेवर पुढे चरत असलेल्या बैलाचा पाय पडून तोही जागेवर मृत झाला. पोलिसांना कळविल्यानंतर डीपीचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आला. वीज मंडळांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे या तिघांचे बळी गेल्याची चर्चा या परीसरातील नागरिक करीत आहेत.

ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

भोर : तालुक्यातील शिंद येथील शेतकरी दत्तात्रय गेनबा ढमाळ (वय ४५) यांचा शेतात मशागतीचे काम करताना ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला. ढमाळ हे पत्नीसमवेत शेतात ट्रॅक्टर घेऊन गेले होते. काम करताना त्यांचा ट्रॅक्टर बांधावर गेला व तो पलटी झाला. त्यामुळे ते खाली पडले व त्यांच्या पोटावर ट्रॅक्टर पडला. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर जवळ असलेले काही शेतकरी तेथे आले. त्यांनी ट्रॅक्टर बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. अखेरीस गावातून आणखी काही लोक आल्यानंतर त्यांनी मिळून ट्रॅक्टर बाजूला केला. तोपर्यंत, ढमाळांना मोठी इजा झाली होती. जखमी अवस्थेत त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंगच्या जागा यंदाही शिल्लक राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुमारे एक लाख ३२ हजार जागा उपलब्ध असताना यंदा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १ लाख १९ हजार विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. अशातच प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेत नाही. त्यामुळे यंदा देखील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये सुमारे २० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत या रिक्त जागांची संख्या कमी राहण्याची शक्यता आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यात पदवी इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कक्षातर्फे ‘एमएचसीईटी’ ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत गुण मिळविणाऱ्या एकूण १ लाख १९ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. त्या तुलनेत राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजामध्ये प्रवेश क्षमता ही सुमारे एक लाख ३२ हजार एवढी आहे. या जागांमध्ये वाढ अथवा घट होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास कॉलेजांमध्ये सुमारे २० हजारांपेक्षा जागा रिक्त राहणार आहेत.
गेल्या वर्षी राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी सुमारे १ लाख ४३ हजार ८०३ जागा होत्या. त्यापैकी ७० हजार ४०५ जागांवर प्रवेश झाले; तर ७९ हजार ४३५ जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे रिक्त जागांचे प्रमाणदेखील तब्बल ४४.७८ टक्के होते. गेल्या वर्षी जागांच्या प्रमाणात अर्जांची संख्यादेखील अधिक होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी केवळ आपला प्रवेश सुरक्षित राहावा म्हणून प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात त्यांनी इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक राहिल्या होत्या. यंदा देखील तशीच परिस्थिती उद्‍भवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, रिक्त असणाऱ्या जागांचे प्रमाण कमी राहणार आहे. गेल्या काही वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेहून विद्यार्थ्यांचा इंजिनीअरिंग शाखेकडे जाण्याचा कल कमी होत असल्याचे चित्र स्पष्ट होते.

विद्यार्थी इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अनुत्सुक असल्याने इंजिनीअरिंग कॉलेजांमधील एकूण प्रवेशक्षमता कमी होऊन एक लाख ३२ हजार झाली आहे. या प्रवेशक्षमतेच्या तुलनेत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १९ हजार ८५४ आहे. त्यामुळे यंदा देखील जागा रिक्त राहणार आहेत. मात्र, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहणार आहे.
- डॉ. चंद्रशेखर ओक, संचालक, तंत्रशिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वित्तीय आराखड्यासाठी नेमणार सल्लागार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता आणि वित्तीय आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून यापूर्वीच प्रस्ताव मागविण्यात आले असून, आता आर्थिक आराखडा निश्चित करण्यासाठी पीएमआरडीएने पुढचे पाऊल टाकले आहे.
शहरातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) विकसित करण्यात येणार आहेत. तर, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग पीएमआरडीएमार्फत केला जाणार आहे. पीएमआरडीएने काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गासाठी विविध इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले आहेत. त्याला देश-विदेशातील कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नुकतेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले होते. येत्या काही दिवसांत कोणत्या कंपन्या पुढे आल्या आहेत, हे स्पष्ट होणार आहे. ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच, या संपूर्ण प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता जाणून घेण्यासह त्याचा वित्तीय आराखडा तयार करण्यासाठी पीएमआरडीने तयारी सुरू केली आहे.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) छाननी करून सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) हा प्रकल्प विकसित करण्यासाठीचा आर्थिक आराखडा तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्यात येणार आहे. सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया पीएमआरडीएने सुरू केली आहे. आर्थिक आराखडा तयार करण्यासह ‘पीपीपी’वरील या प्रकल्पासाठी निविदेच्या अटी-शर्ती (टेंडर डॉक्युमेंट) निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित सल्लागाराकडे सोपविण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे.
आर्थिक, कायदेशीर, तांत्रिक (इंजिनीअरिंग), वाहतूक आणि बांधकाम विकास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार अहवाल तयार करण्याचे काम सल्लागाराकडे सोपविण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प २३.३ किमीचा असून, त्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गावर मेट्रोची २३ स्थानके असतील, असेही डीएमआरसीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. ‘पीपीपी’च्या माध्यमातून या मार्गाचा विकास करताना ‘आर्थिक आराखडा’ तयार करावा लागणार असून, त्यानंतर संभाव्य गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणत्या कामांचे उद्घाटन करणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचा वर्धापनदिन दणक्यात साजरा करण्याचा पुणे महापालिकेचा प्रयत्न असला तरी २५ जूनचा मुहूर्त हुकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळाली नसल्याची कारणे सांगण्यात येत असली तरी स्मार्ट सिटीची कामे अपूर्ण असल्याने उद्‍घाटने तरी कुठली करणार, हा खरा प्रश्न असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
स्मार्ट सिटीचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी पुणे महापालिका सरसावली असून, या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहावे, असे निमंत्रण महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांना दिले होते. या वेळी काही पूर्ण झालेल्या कामांचे उद्‍घाटन तसेच काही नवीन कामांचे भू​मिपूजन करण्याचा प्रयत्न असणार होता. स्मार्ट सिटीच्या वर्धापन दिनासाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास कंपनीने मान्यताही दिली होती. मात्र, उद्‍घाटन करण्यात येणारी बाणेर-बालेवाडी येथील रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. ही कामे महिनाअखेर संपणार असून त्यानंतर सात-आठ जुलैच्या दरम्यान वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी २५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांचा प्रारंभ पुण्यातून झाला होता. त्यात पुण्यातील चौदा प्रकल्पांचाही समावेश होता. त्याला २५ जूनला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पुणे महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचा वर्धापनदिन साजरा करण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना महापौर टिळक यांनी त्यांना या प्रकल्पांच्या अनुषंगाने काही उद्‍घाटनांचे निमंत्रण दिले होते. मात्र, नेमके कुठले कार्यक्रम घेणार आहेत, याबाबत फारशी माहिती दिलेली नाही. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प फसवा असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार करण्यात येत असल्याने या कार्यक्रमांविषयी फारसे काही जाहीर करण्यात आलेले नाही.
‘स्मार्ट सिटी’च्या उद्‍घाटनानंतर शहरात मोठमोठे प्रकल्प सुरू होतील, अशी सर्वसामान्यांना आशा होती. मात्र, रस्त्यांचे सुशोभीकरण, ई-बस खरेदीचा प्रस्ताव आणि गणेशखिंड रस्त्यावर ‘बीआरटी’साठी रस्ता रुंदीकरण वगळता कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत. ‘स्मार्ट सिटी प्रकल्पाचा फज्जा’ अशा नामफलकाच्या उद्‍घाटनांचा कार्यक्रम करत काँग्रेसने आंदोलने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘जातीयवादाच्या आरोपांना किंमत देत नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हटलेले नाही. याकडे लक्ष वेधल्यानंतर एवढे काय झोंबते, हे मला समजत नाही’, असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या विधानाचा रविवारी पुनरुच्चार केला. माझ्यावर जातीयवादाचे आरोप करणाऱ्यांना मी किंमत देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. या प्रकरणी पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले असता ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाची हत्या मुस्लिम होता म्हणून केली नव्हती. तर, तो स्वराज्यावर चालून आला होता म्हणून केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात-धर्माचा विचार केला नाही. अफझलखानाला जसा मारला तसा कृष्णाजी कुलकर्णी यालाही मारला. स्त्रियांबाबत गैरवर्तन करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडले. बजाजी निंबाळकर, जावळीचे मोरे अशा कित्येकांवर शस्त्र चालवली. पण, माझ्या विधानाचे हवे ते अर्थ घेण्यात आले. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या मनात किती खदखद आहे, हे यातून दिसून येते.’

इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हटलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणून चुकीचा इतिहास सध्याच्या तरुणाईवर लादला जात असल्याचा प्रकार अस्वस्थ करणारा आहे, असे वक्तव्य पवार यांनी नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यावरून जोरदार गदारोळ झाला होता. अनेकांनी पवारांवर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी रविवारी पुन्हा आपल्या भूमिकाचे पुनरुच्चार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बडीकॉप’ आपलंसं करा

$
0
0

Rohit.Athavale

@timesgroup.com

Tweet - @AthavaleRohitMT

पिंपरी : ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ (आयटी) पार्कमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘बडीकॉप’ला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. चार महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या संकल्पनेकडे आत्तापर्यंत केवळ तीन तक्रारी आल्या असून, अवघ्या काही मिनिटांत त्याचे निराकरण या संकल्पनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी केले होते. खुद्द पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आयटी पार्कमध्ये जाऊन तेथील मुली-महिलांशी वारंवार संवाद साधत आहेत. परंतु, या महिलांच्या बाबतीतील गुन्हे कमी झालेत, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे खास आयटी पार्कमधील मुली-महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या संकल्पनेचा पुरेपूर वापर करणे नितांत गरजेचे आहे. एखादी गंभीर घटना घडण्याची वाट न पाहता कोणत्याही अनुचित घटनेबाबत ‘आयटी’मधील तरुणींनी त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असून, त्यांनी ‘बडीकॉप’ला आपलंसं करणे त्यांच्या स्वतःसह सहकारी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

‘आयटी’मुळे पुणे, पिंपरी-चिंचवडला जगाच्या नकाशावर स्वतःचे स्थान अधिक भक्कम करण्यात मोलाची मदत झाली आहे. विविध जिल्हे आणि राज्यांसह परदेशातील मुलीदेखील हिंजवडी, खराडी, हडपसर, येरवडा आदी भागांत कार्यरत आहेत. हिंजवडीमधील रसिला ओपी या तरुणीचा खून झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ‘बडीकॉप’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. त्यासाठी सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतंत्र टीम कार्यरत करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक राधिका फडके या ‘बडीकॉप’ संकल्पनेच्या नोडल ऑफिसर असून, त्यांनी आत्तापर्यंत आयटी पार्कच्या पोलिस ठाण्याच्या अखत्यारितील तब्बल १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.

पोलिसांकडे तक्रार करावयास गेल्यास अनेकदा, प्रकार कोठे घडला, अशी विचारणा होते. तसेच, ज्या ठिकाणी प्रकार घडला, ती आमची हद्द नाही, असे सांगून अन्य पोलिस ठाण्यात किंवा चौकीत तक्रार देण्यासाठी पाठविण्यात आल्याचे अनुभव काही जणांना येत असतात. मात्र, बडीकॉपसाठी हद्द हा विषय वरिष्ठांनी संपवून टाकला आहे. ‘बडीकॉप’ला तक्रार अथवा माहिती देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हद्दीचा वाद आता राहिलेला नाही. अगदी एखादी युवती पुण्यापासून काही अंतर लांब असेल आणि तिला मदत हवी असेल, तरीदेखील पुणे पोलिसांचे ‘बडीकॉप’ तिला स्थानिक पोलिसांची मदत मिळवून देऊ शकतात, असेही हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक अरूण वायकर यांनी स्पष्ट केले.

शहरात आज मुली-महिलांच्या बाबातील अनेक गुन्हे घडत आहेत. चंदननगर भागातील एका आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ पदावरील तरुणीचा गेल्या अनेक दिवसांपासून विनयभंग होत असल्याची तक्रार तिने रविवारी पोलिसांकडे केली आहे. हेच संबंधित तरुणीने ‘बडीकॉप’ला तात्काळ कळविले असते, तर त्यातील आरोपीला तेवढ्याच तत्परतेने पोलिसांनी जेरबंद केले असते. हे एक उदाहरण आहे. अशा अनेक घटना दररोज घडत आहेत. मात्र, तरुणी तक्रार देण्यासाठी पुढेच येत नसल्याचे दिसून येत आहे. बडीकॉप असो वा कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार केली, तरी संबंधित तरुणीची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवली जाते. तिचे नाव, पत्ता, कंपनी अथवा कोणाबाबत तक्रार केली, हे अन्य कोणालाही सांगितले जात नाही. त्यामुळे तरुणींनी तक्रार देण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

‘बडीकॉप’साठी मोबाइल नंबर, व्हॉट्सअॅप नंबर, ई-मेल आदी माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. मात्र, त्यालादेखील म्हणावा तेवढा प्रतिसाद तरुणींकडून दिला जात नाही. एखादी गंभीर आणि तेवढीच अनुचित घटना घडल्यावर केवळ कँडलमार्च काढून प्रश्न मिटणारे नाहीत. त्यामुळे आयटी पार्कमधील तरुणींनी कोणत्याही आपत्कालीन घटनेची माहिती देण्यास मागे हटणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

येत्या काही दिवसात ‘लोकेशन बेस अॅप्लिकेशन’ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, ‘बडीकॉप’वर केलेली तक्रार थेट संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते थेट त्या विभागाचे प्रमुख असणारे सहायक आयुक्त आणि परिमंडळाचे उपायुक्त यांना मिळणार आहे. त्यामुळे संबंधित तरुणीला मदत मिळाली, की नाही ते याबाबत काय गुन्हा दाखल झाला हे समजणे शक्य होणार आहे.

असे आहे बडीकॉप

पुणे शहरातील खासकरून हिंजवडी, चंदनगर (खराडी), हडपसर, येरवडा येथील पोलिस ठाण्यात बडीकॉप ही संकल्पना कार्यान्वित करण्यात आली आहे. व्हॉट्स अॅपवर आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या तरुणींचे ग्रुप तयार करण्यात आले असून, ४० तरुणींसाठी एका कर्मचाऱ्याला बडीकॉप म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बडी (मित्र) कॉप (पोलिस) अशी ही संकल्पना असून, आत्तापर्यंत ४० ग्रुप तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये २५० तरुणींचा सहभाग आहे. छेडछाड असो वा अन्य कोणत्याही बाबतीत तरुणी ग्रुपमधील बडीकॉपशी थेट संपर्क करू शकतात. एखादी घटना ग्रुपवर शेअर करण्यासारखी नसेल, तर पर्सनल मेसेज, कॉलद्वारेदेखील तक्रार करता येते. त्याचबरोबर ‘एसएमएस’, ‘कॉल्स’, ‘ट्विटर’, ‘इ-मेल’ या माध्यमातून ‘बॅडीकॉप’शी संपर्कात राहता येणार आहे. चोवीस तास सुरू असलेले हे ‘बडीकॉप’ महिलांना आपण संकटात आहोत, असे वाटल्यास ते तुमच्या मदतीला धावणार आहेत. पोलिस आणि मदतीसाठी हाक देणारी जनता यामधील दुवा म्हणून ते काम करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images