Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सहकारी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स नको

0
0
इन्कम टॅक्स विभागाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना साडेचार ते पाच हजार कोटींच्या नोटिसा बजाविल्या आहेत. सहकारी साखर कारखाने शेतक-यांच्या मालकीचे असल्याने, त्यामध्ये पैसा कमाविणे हा हेतू नसतो. त्यामुळे साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स असता कामा नये, अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे मांडली जाणार असल्याचे राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

जावयाच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीला आणि नातेवाईकांन कोठडी

0
0
पत्नी आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून जावयाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पत्नी, सासू-सासरे यांना पिंपरी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. विनोद उर्फ तम्मा गंगाराम दांडगे (वय २०, रा, इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

हिवाळी अधिवेशनात ११ विधेयकांवर चर्चा

0
0
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या दहा डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. नागपूर येथे होणा-या या अधिवेशनात सेल्फ युनिव्हर्सिटी, ग्रामपंचायत सभासदांची जात पडताळणी प्रमाणपत्र, सहकार खात्यातील ९७ वी घटना दुरुस्ती यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरील अकरा विधेयक चर्चेला ठेवली जाणार आहे. राज्याचे संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (२८ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दुचाकींच्या नंबरसाठी स्वीकारणार डीडी

0
0
एजंटांच्या गोंधळानंतर खडबडून जागे झालेल्या ‘आरटीओ’ने आता दुचाकीच्या सिरीजमधील नंबर वाटपाच्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. चारचाकीपाठोपाठ आता दुचाकीच्या नंबरसाठीही लोकांकडून ‘डिमांड ड्राफ्ट’ (डीडी) स्वीकारले जाणार आहेत. परिणामी, अधिकारी आणि कर्मचा-यांना वेठीस धरणा-या एजंटांना लगाम बसण्याची आशा आहे.

थिसेनक्रूप कंपनीत वेतनकरार १० हजारांची वाढ

0
0
पिंपरी येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रीज व थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया वर्कर्स युनियन यांच्यामध्ये नुकताच वेतनकरार करण्यात आला. या करारानुसार, कामगारांना सरासरी दहा हजार रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.

‘ऑक्टोबर’चा निकाल जाहीर

0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ऑक्टोबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. दहावीच्या दोन लाख २० हजार ८०३ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या एक लाख ७२ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

२ वर्षांच्या ‘गॅप’नंतरही क्लास इम्प्रूव्हमेंट शक्य

0
0
दहावी-बारावीची मार्च २०११ मध्ये परीक्षा देत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी (क्लास इम्प्रूव्हमेंट) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने खास सवलत दिली आहे. त्यानुसार आता मार्च २०१३ मधील परीक्षेलाही बसून ते निकाल सुधारू शकतील. राष्ट्रीय ‘सीईटीं’च्या स्पर्धेत उतरू पाहणा-या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

‘एफडीआय’मुळे थांबेल शेतक-यांचे शोषण

0
0
‘सावकार, व्यापारी आणि मध्यस्थ यांच्याकडून होणा-या शेतक-यांच्या शोषणाला किरकोळ क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीमुळे आळा बसेल. परंतु, त्यासाठी उद्योजक, कृषी विद्यापीठे आणि शेतकरी यांनी एकत्र येण्याची गरज आहे’, असे मत राज्यपाल आणि पुणे विद्यापीठाचे कुलपती डॉ. के. शंकरनारायणन यांनी बुधवारी व्यक्त केले.

महापुरुषांच्या विचारांचे महाराष्ट्राला विस्मरण

0
0
असामान्य प्रतिभेने राज्य घडविणा-या महापुरुषांच्या विचारांचे महाराष्ट्राला विस्मरण झाले आहे, अशी खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी व्यक्त केली.

‘एनडीए’त प्रथमच राजकीय ‘परेड’

0
0
संरक्षण, शिक्षण, व्यवस्थापन, प्रशासन, संशोधन अशा घटकांशी संबंधित व्यक्तीला पदवीप्रदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्याच्या संकेताचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीकडून (एनडीए) यंदाच्या वर्षी ‘कोर्टमार्शल’ करण्यात आले. यंदा १२३ व्या तुकडीला पदवीप्रदान करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमंत्रित करून राजकारण्यांच्या ‘परेड’ची नवी प्रथा सुरू करण्यात आली आहे.

समाजविघातक शक्तींकडून सोशल मीडियाचा गैरवापर

0
0
‘पारंपरिक युध्द न पुकारता काही बाह्य शक्तींची मदत घेऊन देशात विघातक कृत्ये करण्याचा डाव काही भारतविरोधी घटक राबवित आहेत. त्यातच आता सोशल मीडियाचा वापर करून अस्वस्थता पसरवण्याचे काम केले जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अधिक जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केले.

परप्रांतीय युवकाला अटक

0
0
बेकायदा पिस्तुल बाळगणा-या परप्रांतीय गुन्हेगारास पिंपरी पोलिसांनी सोमवारी (२७ नोव्हेंबर) अटक केली. सय्यद महंमद शाकीर (वय २०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी, मूळ - आझमगड उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पार्टी विथ... डिफरन्स? नव्हे, डिफरन्सेस!

0
0
काँग्रेसमधील मतभेदांचा पुरेपूर फायदा उठवून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याची सर्वाधिक संधी कोणाला असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर भाजप असेच असेल. पण गेल्या दोन वर्षांमध्ये अंतर्गत मतभेदांचे सर्वाधिक ओंगळवाणे प्रदर्शन घडविणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र त्याबद्दल खात्री वाटेनाशी झाली आहे.

‘एचआयव्ही’बाधितांमधील कॅन्सरचे ‘बायोमार्कर’द्वारे निदान

0
0
‘एचआयव्ही’बाधित महिलांना होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’चा (एचपीव्ही) शोध घेण्यासाठी शरीरातील ‘बायोमार्कर’चा (बायोलॉजिकल इंडिकेटर्स) वापर करण्याचा प्रयोग राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेने (नारी) हाती घेतला आहे. यामुळे बाधित महिलेला होणा-या ‘एचपीव्ही’चे निदान करून त्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे.

फरारी दरोडेखोराला पिंपरीत अटक

0
0
आठ महिन्यापूर्वी सांगलीमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानावर आणि घरावर दरोडा टाकून पळालेल्या चार जणांच्या टोळीतील एका फरार आरोपीला पिंपरी पोलिसांनी नुकतीच अटक केली. न्यायालयाने त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दादांच्या बालेकिल्ल्यात ‘सीएम’च्या भेटीगाठी

0
0
दोन दिवसांच्या शहराच्या मुक्कामात मुख्यमंत्र्यांनी नियोजित कार्यक्रम तर केलेच; पण त्यासह कार्यकर्त्यांपासून धार्मिक स्थळांना धावत्या भेटी दिल्या. अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी झंझावाती प्रचार केला होता. त्यानंतही आता ‘सीएम’नी पुण्यात दांडगा संपर्क कायम ठेवला आहे.

‘कारभारी’ मात्र गायब!

0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून दांडगा जनसंपर्क प्रस्थापित केला जात असतानाच पुण्याचे ‘कारभारी’ अजित पवार हे मात्र सर्वच सार्वजनिक व्यासपीठांवरून गायब होते. विशेष म्हणजे, पुणे विद्यापीठातील कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका व कोनशीलेवर नामोल्लेख असतानादेखील दादा अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरले.

उद्योग नगरी बनतेय शॉपिंग नगरी

0
0
उद्योगनगरी असा नावलौकिक असलेलं पिंपरी-चिंचवड आता शॉपिंग नगरी म्हणून नावारुपाला येतंय. या शहरात भोसरी, आकुर्डी, निगडी, चिखली, खडकी, सांगवी परिसरांत बाजारपेठा विकसित होत असून, तिथं पुणेकरही खरेदीसाठी जाताहेत, हे विशेष.

प्रवाशाला लुटणारा जेधे चौकात गजाआड

0
0
स्वारगेट ‘एसटी स्टॅण्ड’वरून नटराज हॉटेलकडे रिक्षासाठी निघालेल्या प्रवाशाशी झटापट करत त्याच्याकडील दहा हजार रुपये हिसकावण्याचा प्रकार घडला. पैसे घेऊन पळणा-या तिघा आरोपींपैकी एका आरोपीला वाहतूक पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग करून पकडले.

बाणेरही गजबजतंय

0
0
फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कॅम्प परिसराप्रमाणेच पश्चिम पुण्यातील औंध आणि बाणेर परिसर हॅपनिंग प्लेस म्हणून उदयास येत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी हॉटेल्स हेही या भागात येण्यामागचं प्रमुख आकर्षण आहे. हिंजवडी राजीव गांधी आयटी पार्कमुळे पुढारलेल्या या परिसराची वाढ मोठ्या प्रमाणात झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images