Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

व्हीएलएसआय परिषद पाच जानेवारीपासून पुण्यात

$
0
0
‘व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे आयोजित करण्यात येणारी २६ वी आंतरराष्ट्रीय ‘व्हीएलएसआय डिझाईन परिषद’ पाच ते १० जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. या परिषदेसह एम्बेडेड सिस्टीम परिषद आणि सहावी विद्यार्थी परिषद देखील या दरम्यान होणार आहे.

अतिक्रमणविरोधी पथकाकडून नुकसान वसुली करा

$
0
0
खडकीमध्ये वाढत असलेल्या विनापरवाना फ्लेक्सला आणि वाढत्या अतिक्रणाला अतिक्रमण विरोधीपथक जबाबदार आहे. त्यामुळे बोर्डाचे झालेले नुकसान अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल केले जावे अशी मागणी कॅन्टोन्मेंटमधील विरोधीपक्षाचे नगरसेवक सुनील जाधव यांनी केली आहे.

सहकारी दूध संघाची जुनीच कॅसेट

$
0
0
राज्यातील सहकारी संघांकडील अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाल्याची जुनीच रेकॉर्ड पुन्हा वाजवत, शालेय आहार योजनेच्या माध्यमातून तो प्रश्न सोडविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीने मंगळवारी केली. तसेच, राज्याबाहेरील ‘अमूल’ला महाराष्ट्रात दूध संकलन करण्यापासून रोखावे, असेही समितीने म्हटले आहे.

‘आधारा’साठी आणखी वेटिंग

$
0
0
पुण्यातील ८० टक्के नागरिकांना ३१ डिसेंबरपर्यंत आधार कार्ड देण्याचा आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिला असला, तरी या कामाचे कंत्राट दिलेल्या चारपैकी दोन कंपन्यांचे काम बंद असल्याने पुणेकरांना ‘आधारा’साठी आणखी वेटिंग करावे लागणार आहे. संबंधित दोन्ही कंपन्यांना राज्य सरकारने ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.

दृक-श्राव्य अ‌भिव्यक्तीची ‘सदाफुली’

$
0
0
ग्रामीण, निमशहरी भागांत शालेय शिक्षण..., कोणीतरी क्वचित थिएटरमध्ये सिनेमा पाहिलेला....कट टू....देशातील महत्त्वाच्या सिनेमा, टीव्ही प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण, मार्गदर्शन....अन् पुढच्या चार दिवसांत एका मिनिटाची ‘फिल्म’ तय्यार....

जिल्ह्यात साडेतीन लाख मतदार स्थलांतरित

$
0
0
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांची संख्या तीन ते साडेतीन लाखांच्या घरात गेली आहे. स्थलांतरीत झालेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांचे नाव रद्द करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

बजेटवरून आयुक्तांना चेकमेट

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमधील तरतूद खर्च न झाल्यामुळे विकासकामे प्रलंबित राहिल्याची जोरदार टीका मंगळवारी (२७ नोव्हेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यावर केली. सदस्यांच्या शाब्दिक हल्ल्यामुळे आयुक्तही अडचणीत सापडले.

अवैध कत्तलखाना बंद करा!

$
0
0
पिंपरी उड्डाणपुलाखालील अवैध कत्तलखाना त्वरीत बंद करण्यासाठी मातृभूमी दक्षता चळवळीचे अध्यक्ष मुबारक शेख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण करण्यात आले आहे. पिंपरी उड्डाणपुलाखालील अवैध कत्तलखान्यामुळे प्रदूषण वाढत असून, पर्यावरण कायद्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर सर्रास उल्लंघन होत आहे.

राजकीय वादातून काळेवाडीत भांडण

$
0
0
राजकीय वादातून काळेवाडीच्या तापकीर बंधूमध्ये भांडणे जुंपली असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. माजी विरोधीपक्ष नेते मच्छिंद्र तापकीर आणि राज तापकीर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरेगाव पार्कमधून कोकेन जप्त

$
0
0
कोरेगाव पार्कात कोकेनच्या विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीसह धानोरी येथे राहणाऱ्या एका नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या आरोपींकडून ३५ ग्रॅम कोकेन आणि एल. एस. डी. नावाच्या अमली पदार्थाचे ड्रॉप्स जप्त करण्यात आले आहेत.

खेळाडूंबाबत प्रशासनाची अनास्था

$
0
0
कौशल्य पणाला लावून शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंविषयी प्रशासनाची अनास्था दिसून येत असल्याची टीका पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केली. खेळाडूंना प्रोत्साहन देणारे धोरण राबविण्याची गरज आहे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

पुण्यातले ५५ 'अॅक्सिडेंड स्पॉट'

$
0
0
शहरातील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असले तरी दुसऱ्या बाजूला ५५ ठिकाणे अॅक्सिडेंट स्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड आणि येरवडा या भागांमध्ये हे स्पॉट आहेत.

रक्तपुरवठ्यासाठी 'व्हॉलेंटियर्स'

$
0
0
डेंगीच्या पेशंटमध्ये ‘प्लेटलेट’ कमी होत असल्याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य खात्याने घेतली असून त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर ‘स्वेच्छिक रक्तसंकलन समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. उन्हाळ्यासह दिवाळीच्या दरम्यान रक्ताचा होणारा तुटवडा दूर करण्यासाठी ही समिती प्रयत्नशील राहणार आहे.

गिरणी कामगारांना पुण्यात घरे!

$
0
0
मुंबईत जमीन आणि घरांच्या मर्यादेमुळे सर्वच गिरणी कामगारांना घरे मिळण्यात अडचणी आल्या असतानाच या कामगारांना आता पुण्यात हक्काची घरे मिळणार असून त्यासाठी शहराभोवतीची ५३ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर ५,८१५ कामगारांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

आता लक्ष्य महाभारत

$
0
0
‘तारें जमीन पर’सारख्या संवेदनशील सिनेमातून यशस्वी दिग्दर्शन केल्यानंतर ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खानला पुन्हा सिनेमा दिग्दर्शित करायचाय. त्याला आता महाभारतावर सिनेमा करण्याची उत्सुकता असून, तो त्याचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या मंजुरीसाठी राज्यभर मेळावे

$
0
0
अनेकदा पाठपुरावा करूनही राज्य सरकार दुर्लक्ष करत असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याला येत्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी देण्याच्या मागणीसाठी राज्यभर मेळावे घेण्यात येणार असून, या मोहिमेची सुरुवात येत्या ३ डिसेंबरला पुण्यातून होणार आहे, अशी अंधश्रध्दा निर्मून समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाण्याच्या टाकीमध्ये पडून ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

$
0
0
खेळताना पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. मोशी-आळंदी रस्त्यावरील समर्थ सोसायटी, फेज-२मध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. शहरात. तुषार बालाजी माळी (वय चार वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या घटनांमध्ये तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.

आडत दरातील कपातीचा वाद चिघळण्याची चिन्हे

$
0
0
आडत दरात कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात बाजार बंद ठेवण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम राहिले असून, परराज्यातून येणारा माल थांबवण्याचा निर्णय त्यांनी बुधवारी घेतला. परंतु, बेमुदत बाजार बंदसंदर्भात उद्या (गुरुवारी) निर्णय होणार आहे. त्यामुळे आडत दरातील कपातीवरून व्यापारी आणि सरकार यांच्यातील वाद आता चिघळण्याची चिन्हे आहेत.

डीव्ही कारसाठी १८ लाखांची तरतूद

$
0
0
अतिमहत्त्वाच्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या डीव्ही कारच्या दुरुस्तीसाठी १८ लाख २९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी डिसेंबर महिन्यापूर्वी खर्च करण्याची सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

ग्रा. पं. निवडणुकीसाठी आता प्रशिक्षणाची अट

$
0
0
निवडून आल्यानंतर कारभार सांभाळण्याऐवजी तो कसा करावा याचे प्रशिक्षण घेण्यातच बराचसा वेळ जात आहे. मात्र, यापुढील काळात आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना उभे राहण्यासाठी पंचायत राजच्या विविध कामांचे प्रशिक्षण घेण्याची अट असावी का, असा विचार राज्य सरकार करीत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images