Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साहित्य संस्थांच्या अनुदानाचा प्रस्ताव धूळ खात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संस्थांना राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा निधी तीन लाख रुपयांनी वाढवून तो आठ लाखांपर्यंत करण्यात यावा, या प्रस्तावावर सरकारने दीड वर्षांनंतरही निर्णय घेतलेला नाही. तुटपुंज्या निधीमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या संवर्धनाचे काम कसे करायचे, असा प्रश्न संस्थांपुढे उभा राहिला आहे. निधी वाढवून देण्यात चालढकल होत असल्याने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकार किती गंभीर आहे, असा सवाल संस्थांनी केला आहे.
राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ मराठी साहित्य संघ, नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थांना मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी दर वर्षी पाच लाख रुपयांचा निधी दिला जातो. आजच्या काळात पाच लाख रुपये हा निधी कमी असून, तो वाढवून मिळावा, अशी मागणी साहित्य संस्था अनेक वर्षे करत होत्या. त्याची दखल मंडळाने घेतली होती.
साहित्यविषयक काम करणाऱ्या या संस्थांना प्रत्येकी तीन लाख वाढीव मिळावेत, असा प्रस्ताव मंडळाने नोव्हेंबर २०१५मध्ये सरकारला दिला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. ‘मंडळाने प्रस्ताव पाठवूनही तीन लाख रुपये वाढवून मिळालेले नाहीत. तुटपंज्या निधीमध्ये काम करणे अवघड होत आहे. संवर्धनाचे काम ही फक्त साहित्य संस्थांची जबाबदारी नाही. सरकार निधी देत नसल्याने ते किती गंभीर आहेत, हे स्पष्ट होते,’ अशी प्रतिक्रिया साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली.
‘वाढीव निधीसाठी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे; पण प्रस्ताव विचाराधीन आहे, मंजूर करू अशी उत्तरे दिली जातात. सरकारची उदासिनताच यातून समोर येते,’ अशी टीका साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘मटा’शी बोलताना केली.


साहित्य संस्थांना तीन लाख वाढीव अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव नोव्हेंबर २०१५मध्ये आम्ही सरकारला दिला आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आम्ही पाठपुरावा करत असून, सचिवांशी याबाबतीत नुकताच पत्रव्यवहार झाला आहे. प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
- बाबा भांड,
अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनचोरीचे प्रकार वाढले

$
0
0

येरवडा विभागात पाच महिन्यांत ३२५ चोऱ्या

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाहनचोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या वर्षी मे महिनाअखेर येरवडा आणि हडपसर विभागातून ३२५ वाहने चोरीला गेली आहेत. त्यामुळे शहर पोलिसांसमोर वाहनचोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात वाहनांची खरेदी वाढल्याने जगात सर्वाधिक दुचाकीचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नोंदणीनुसार शहराच्या लोकसंख्येएवढी वाहनांची संख्या झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांची संख्या आहे.

चालू वर्षाच्या जानेवारी ते मे या पाच महिन्यांत परिमंडळ ४ अंतर्गत (खडकी आणि वानवडी विभागात) सुमारे ३३७ वाहनांची चोरी झाली आहे. यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहे. वानवडी विभागात एकूण २०१ वाहने चोरीला गेली असून हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक ९७ वाहनांची चोरी झाली आहे. त्याखालोखाल कोंढवा ५०, वानवडी ४४ आणि मुंढव्यातून १० वाहने चोरीला गेली आहेत.

खडकी विभागात १३६ वाहनांची चोरी झाली असून चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३५, येरवडा ३१, विमानतळ २५, दिघी २१, खडकी १६ आणि विश्रांतवाडीतून आठ वाहने चोरीला गेली आहेत.

येरवडा आणि हडपसर विभागात वाहन चोरीचे गुन्हे वाढल्याने पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून बऱ्यापैकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अल्पवयीन मुलांकडून मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरण्याचे प्रकार वाढल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनचोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलिसांकडून वेळोवेळी संशयित वाहनांची तपासणी, नाकाबंदी करून वाहनचोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

पुणे पोलिसांकडून वाहनचोरांवर बारीक लक्ष असून संशयित वाहनांची कसून तपासणी होते. नागरिकांनी देखील वाहने पार्किंग करताना सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी, तसेच दुकानदारांनी दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. नागरिकांनी वाहनांची पार्किंग सुरक्षित ठिकाणी करावी. सीसीटीव्ही असणाऱ्या ठिकाणी वाहने पार्किंगला प्राधान्य द्यावे. हँडल लॉकसोबत साखळीचे लॉक लावावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’च्या पाच हजार जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी पाच फेऱ्या होऊनही पुणे जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये जवळपास ५ हजार ५८० जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने नुकतीच सहावी फेरी घेतली असून प्रवेशाची लॉटरी आज, शुक्रवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘आरटीई’मध्ये शाळांमध्ये रिक्त जागा भरून काढण्यासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी पालक व संघटनांनी केली होती. त्यामुळे या जागांसाठी त्यानुसार प्राथमिक विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांना सहावी फेरी घेण्यासंबंधी आणि फेरीची प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण सूचना दिली होती. त्यामुळे आज शुक्रवारी (९ जून) आरटीई प्रवेशासाठी सहावी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरटीई प्रवेशाअंतर्गत आतापर्यंत प्रवेशाच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ८४९ शाळांमध्ये १५ हजार ६९३ जागांमधील जवळपास १० हजार ११३ विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळाला असून अद्यापही ५ हजार ५८० जागा रिक्तच आहेत.

सध्या सहाव्या फेरीसाठी लॉटरी काढण्यात येईल व त्यानंतर शाळांमध्ये जागा शिल्लक राहिल्यास नव्याने अर्ज मागवून आणखी एक फेरी घेण्यात येणार आहे. अशा प्रकारची फेरी नगर जिल्ह्यात पूर्ण देखील करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या आरटीई प्रवेशात नगर जिल्हा पुढे असल्याचे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले. दरम्यान, सहावी लॉटरी ही ५ हजार ५८० जागांसाठी काढण्यात येईल.या फेरीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागा रिक्त राहील्यास तर टेमकर यांच्या सूचनेनुसार नव्याने अर्ज मागवून त्या जागांवर देखील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूना मर्चंट्‍स चेंबरतर्फे आज व्यापारी परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून होत असल्याने काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी दि पूना मर्चट्स चेंबरच्यावतीने आज, शुक्रवारी (९ जून) व्यापाऱ्यांची परिषद आयोजित केली आहे.

जीएसटीमध्ये मिरची, धने, हळद, चिंच, बेदाणे व अन्य कृषी उत्पादनांवर पाच टक्के जीएसटी कर लागू होणार आहे. तसेच अन्यधान्य, आटा, रवा, मैदा, बेसन, या जीवनावश्यक वस्तूंवर शून्य टक्के कर ठेवण्यात आला आहे. परंतु, त्याच वस्तू ट्रेडमार्कमध्ये आल्या तर त्यास ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे. हे अन्यायकारक आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी चेंबरने शुक्रवारी व्यापारी परिषदेचे आयोजन केले आहे. त्या वेळी जीएसटीबद्दल जाणकारांकडून माहिती देण्यात येणार आहे. ही परिषद चेंबरच्या व्यापारी भवनात दुपारी ३ वाजता होणार आहे. या परिषदेला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांची बाजू ऐकण्यास नकार

$
0
0

शुल्क पुनर्परीक्षण समितीवर आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शैक्षणिक शुल्कवाढ नियंत्रण कायद्यात बदल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पुनर्परीक्षण समितीत पालकांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, समितीच्या बैठकीत पालकांच्या शुल्कवाढबाबतच्या सूचना व्यवस्थित ऐकून घेण्यात येत नसून पालकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. पालक प्रतिनिधींचे ऐकूनच घ्यायचे नसल्यास त्यांना समितीत स्थानच का दिले, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. तसेच, पालकांचा आवाज दाबण्याचाच प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप पालक प्रतिनिधींनी केला आहे.

खासगी शाळांच्या वाढत्या शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या अस्तित्वात असणारा शैक्षणिक शुल्कवाढ नियंत्रण कायदा अपुरा पडत आहे. शाळांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात अमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मत मांडले. त्यानुसार शिक्षण विभागाने कायद्यात बदल करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती व्ही. जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्परीक्षण समिती नेमली. या समितीत पालक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना देखील स्थान देण्यात आले आहे. या समितीच्या दोन बैठका पार पडल्या. या बैठकीत पालकांच्या शुल्कवाढबाबतच्या सूचना व्यवस्थित ऐकून घेण्यात येत नाहीत. तसेच, पालकांना त्यांचे म्हणणे व्यवस्थितपणे मांडू देत नाहीत. त्यामुळे समितीत शुल्कवाढीबाबत बाजू मांडता येत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

समितीच्या बैठकीत पालक प्रतिनिधींचे म्हणणे ऐकूनच घ्यायचे नसेल, तर त्यांना समितीत स्थान का देण्यात आले, असा प्रश्न पालक प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. समितीच्या बैठकीमध्ये पालक प्रतिनिधींचा आवाज दाबण्याच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या समितीच्या बैठकीला सतीश मुंदडा, प्रसाद तुळसकर, अनिल साठे, सुनील चौधरी, सयाजी झेंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकांची बाजू मांडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अनुभा सहाय यांनी तावडे यांची भेट घेऊन पालक प्रतिनिधींसोबत घडणाऱ्या प्रकारची माहिती दिली. पालकांना सोबत घेऊनच नवा कायदा तयार करण्यात येईल. समितीच्या प्रत्येक सदस्याला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे, असे आश्वासन या वेळी तावडे यांनी दिल्याचे सहाय यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराबंद आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रश्न सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यावर महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी मुंबईत गुरूवारी चर्चा केली. मुदतीचा एक महिना होऊनही सत्ताधाऱ्यांनी ​आश्वासन न पाळल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कचरा बंद आंदोलन करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
कचरा डेपोला पावणेदोन महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीनंतर ग्रामस्थांनी कचराबंद आंदोलनाचा प​​वित्रा घेतला. त्यानंतर २२ दिवसांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामस्थांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढला होता. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येईल, तसेच स्थानिकांना महापालिकेत कायमस्वरुपी नोकऱ्या देण्यात येतील आणि बाधित जमिनीचा काही भाग स्थानिकांच्या ताब्यात घेण्याची प्र​क्रिया पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली होती. ही आश्वासने महिनाभरात पूर्ण करण्यात न आल्याने शुक्रवारपासून कचरा डेपोमध्ये कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, पालिकेने तयार करण्यात आलेल्या कचऱ्याचा बृहत आराखडा मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आराखडा दाखवला. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान कचराडेपोमध्ये जमीन गेलेल्या बाधितांचा नोकरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आल्याबाबत चर्चा झाली. तसेच, कचरा डेपोमध्ये साठलेल्या कचऱ्यावर बायमानिंग प्रक्रिया करून रिकाम्या होणाऱ्या जागेपैकी २५ ते ३० टक्के जागेवर प्रकल्पग्रस्तांना सुविधा देण्याचे विचाराधीन असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती टिळक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे?

$
0
0

पुणे : भाजप आणि ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या दोन्ही पक्षांनी उपमहापौरपदासाठी ‘आरपीआय’चे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे उपमहापौरपद रिक्त झाले होते. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने लता राजगुरू यांचा अर्ज दाखल केला. मात्र, महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने धेंडे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे.
उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, गुरुवारी अर्ज भरण्यात आले. येत्या बुधवारी विशेष सभेत मतदानाने उपमहापौरपदाची निवड होणार आहे. धेंडे प्रभाग क्रमांक दोन येथून (नागपूर चाळ-फुलेनगर) तिसऱ्यांदा पालिकेत निवडून आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोच्या पिलरचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या प्राधान्य मार्गावरील मेट्रोच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. या मार्गावर नाशिक फाट्यालगत मेट्रो मार्गिकेचे (व्हायडक्ट) खांब (पिलर) उभारण्यासाठी खोदकाम नुकतेच सुरू करण्यात आले असून, दुभाजकांच्या जागेवर सरासरी तीस मीटरवर मेट्रोचे पिलर उभे राहणार आहेत.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) शहरातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील रेंजहिल्सपर्यंतच्या १०.७ किमीच्या मार्गाचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. या मार्गाचे काम एनसीसी लिमिटेडतर्फे केले जाणार आहे. गेल्या महिन्यामध्ये नाशिक फाट्याजवळ बॅरिकेडिंग करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले होते. आता, प्रत्यक्ष पिलरच्या बांधकामासाठी रस्ता आणि दुभाजक खोदण्यास सुरुवात झाली असून, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुणेकरांना मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स आणि वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदाम या दोन मार्गांसाठीची प्रक्रिया महामेट्रोने सर्वप्रथम राबवली. त्यात, रेंजहिल्सच्या मार्गाचे जमिनीवरील काम आता सुरू झाले असून, लवकरच वनाज ते शिवाजीनगर गोदाम या मार्गावरील कामही सुरू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जरोखे प्रस्ताव सरकार दरबारी

$
0
0

हुडकोने कर्जासाठी दिली १५ जूनची मुदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक २,२६४ कोटी रुपयांचे कर्ज किंवा कर्जरोखे घेण्याचा प्रस्ताव सरकारच्या मान्यतेसाठी गुरुवारी तातडीने नगरविकास खात्याकडे देण्यात आला. सवलतीच्या दरात योजनेसाठी आवश्यक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ‘हुडको’ने १५ जूनची मुदत दिल्याने सरकारकडून लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक आहे.
शहरात २४ बाय ७ योजनेतंर्गत २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी २,२६४ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे. साडेसात तास चर्चा करून बुधवारी रात्री हा सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा महापौर मुक्ता टिळक यांनी प्रस्तावावर अंतिम स्वाक्षरी केली. त्यामुळे गुरुवारी सकाळी हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला.
पालिकेकडून साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून योजना राबविली जाणार आहे. योजनेसाठी अनुदान देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने स्पष्टपणे नकार दिल्याने पालिकेला कर्ज घेऊन योजना राबवावी लागणार आहे. योजनेसाठी आवश्यक कर्ज किंवा कर्जरोखे घेण्याच्या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात स्थायी समितीने मान्यता दिली. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाने एका दिवसातच आवश्यक प्रक्रिया पूर्ण‍ करून हा विषय तातडीने मान्य व्हावा, यासाठी स्थायी समितीसमोर ठेवला. समितीनेही केवळ अर्ध्या तासात हा विषय मान्य केला. योजना राबविताना खर्च वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडून कमी अधिक २० टक्के खर्च या भरवशावर प्रस्ताव मान्य केला. योजना राबविण्यासाठी कर्ज किंवा कर्जरोखे उभारायचे झाल्यास त्याची परतफेड करताना पालिकेला काही कोटी रुपये व्याज द्यावे लागणार आहे. त्यामुळे यासाठी राज्य सरकारची मान्यता घेणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा
पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी हुडकोबरोबर कर्जासाठी पत्रव्यवहार केला होता. सवलतीच्या दरात कर्ज देण्यासाठी हुडकोने १५ जूनची मुदत दिल्याने मुख्य सभेत प्रस्ताव तातडीने दाखल करुन मान्य करण्यात आल्याची चर्चा आहे. कचराप्रश्नाची चर्चा करण्यासाठी मुंबईला गेलेल्या महापौर, आयुक्तांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी‌ कर्जरोख्यांबाबतही चर्चा करून तातडीने मान्यता देण्याची मागणी केल्याचे समजते.

‘तर पुणेकर माफ करणार नाहीत’

समान पाणीपुरवठा योजना आणणे, त्यासाठी कर्जरोखे उभारणे या सर्व योजना यापूर्वी सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या काळातील आहेत. पुणेकरांच्या हितासाठी या योजना राबविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भविष्यातील पाण्याची गरज पाहता या योजना वेळीच राबवल्या नाहीत तर पुणेकर माफ करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे उभारण्यास विरोधी पक्षांनी सर्वसाधारण सभेत कडाडून ​विरोध केला. अखेर मतदानाने सत्ताधारी भाजपला हा ​प्रस्ताव मंजूर करावा लागला. या पार्श्वभूमीवर बापट म्हणाले की, समान पाणीपुरवठा योजना राबवण्याचा मूळ प्रस्ताव यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचा आहे. ही योजना राबवण्यासाठी कर्जरोखे उभारण्यास याच सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या काळात मान्यता दिली आहे. पुणेकरांची भविष्यातील पाण्याची गरज पाहता ही योजना राबवली गेली पाहिजे. या योजनेची अंमलबजावणी झाली तर चार ते पाच ‘टीएमसी’ पाणी वाचणार असून भविष्यात याच वाचलेल्या पाण्याचा पुणेकरांना फायदा होणार आहे. ही योजना वेळीच राबवली गेली नाही तर ही चूक पुणेकर कधीही माफ करणार नाहीत.
या योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येणार, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. पाण्याच्या टाक्या बांधण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. शहरात ८२ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून त्या-त्या परिसरात पाण्याची नेमकी किती गरज आहे, हे या योजनेच्या माध्यमातून समोर येणार असल्याचे बापट म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढल्याने भाज्या आवाक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्केट यार्डातील तरकारी विभागात नियमित आवकपेक्षा सव्वाशे ट्रक भाज्यांची आवक अधिक झाल्यामुळे दरात २० ते ३० टक्के घट झालीहे. भाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी ग्राहकांअभावी काही प्रमाणात माल शिल्लक पडत आहे.
गुरुवारी संपाच्या आठवया दिवशी मार्केट यार्डात सुरुवातीला घटलेली आवक पूर्वपदावर आली आहे. भाज्यांच्या नियमित होणाऱ्या आवकपक्षा अधिक आवक झाल्यामुळे संपाची धग कमी झाल्याचे दिसून येत आहे. ‘मार्केट यार्डात गुरुवारी १२५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. पुणे विभागातून ८० टक्के आणि परराज्यातून २० टक्के आवक झाली आहे. नेहमीच्या तुलनेत दीडपटहून अधिक आवक झाली आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत भाज्यांचा पुरवठा अधिक झाल्याने तसेच ग्राहकांकडून गुरुवारी फारशी मागणी नसल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत,’ अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. खरेदीदार नसल्याने शेतमाल विक्रीअभावी शिल्लक राहिल्याचे सांगण्यात आले.
शेतमालाची गुरुवारी मोठी आवक होईल, असा अंदाज होता. त्यानुसार कोबी, बटाटा, ढोबळी, मिरची, गाजर यांची परराज्यातून मोठी आवक झाली. उर्वरित सर्व भाज्या पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यासह शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यातून आवक झाली.

शेतकरीपुत्रांशीच आमची चर्चा : शेट्टी
‘शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय त्यांच्याशीच आमची चर्चा होईल,’ अशी टीका करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या शेतकऱ्यांशीच चर्चा करणार, या फडणवीस यांच्या वक्तव्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले.
पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील सभेत शेट्टी बोलत होते. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या न्याय हक्कासाठी लढा चालू ठेवला पाहिजे, असे सांगून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोनलात आपल्यावर ३२ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या साठ ते सत्तर वर्षात फक्त तीन वेळाच कर्जमाफी झाली असल्याचे सांगून सरकार अंबानी आणि अदानींना सवलती देते, विजय मल्ल्या कर्ज बुडवून तिकडे क्रिकेटचे सामने पाहतोय. आमचा शेतकरी मात्र मरतोय, त्याचे सरकारला काहीच वाटत नाही अशी टीकाही त्यांनी केली. कर्जमाफी हा आमचा हक्क आहे आणि आम्ही तोच आम्ही मागत असल्याचे त्यांनी ठणकावले.

वकिलांनी केले फिती लावून काम
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वकिलांनी गुरुवारी खिशाला काळी फित लावून काम केले. शेतमालाला हमीभाव मिळावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एक जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी अन्नदाता आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजेत, अशी भूमिका वकिलांनी घेतली. गुरुवारी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर कोर्टात एकत्र येऊन वकिलांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड, अॅड. संतोष जाधव, सचिव अॅड. विवेक भरगुडे, अॅड. आशिष ताम्हाणे, खजिनदार अॅड. दत्तात्रय गायकवाड, हिशेब तपासणीस अॅड. कुमार पायगुडे, कार्यकारिणी सदस्य ओंकार चव्हाण, सुनील क्षीरसागर, अमित खोत, संतोष मोटे, ज्योती जाधव, योगिनी गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलागुणांमुळे लांबला दहावीचा निकाल

$
0
0

शिक्षण विभागाच्या ‘उद्योगां’चा मंडळाला फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दहावीच्या निकालाच्या तारखांवरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच आता ऐनवेळी आलेल्या कलागुणांच्या निर्णयामुळे निकाल रखडल्याची माहिती समोर येत आहे.
शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला बसला आहे. त्याची परिणती निकाल लांबण्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत कलागुण म्हणून १५ ते २५ अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून ऐनवेळी घेण्यात आला. या अतिरिक्त गुणांचा समावेश विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये करण्याचे काम सध्या मंडळाकडून सुरू असल्याने दहावीच्या निकालाला उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दर वर्षी, जूनच्या सुरुवातीला दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. यंदाही बारावीच्या निकालापाठोपाठ दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये कलागुणांचे वाढीव गुण समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे निकालास विलंब होत आहे.
शिक्षण विभागाने गेल्या वर्षी ७ जानेवारीला कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेपासून करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, अचानक मार्च २०१७ पासून हा निर्णय अंमलात आणण्याचे ठरविण्यात आले. शिक्षण विभागाच्या या ‘उद्योगां’मुळे निकाल रखडल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार यंदा दहावीसाठी १७ लाख ६६ हजार ९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ९ लाख ८९ हजार ९०८ विद्यार्थी तर, ७ लाख ७६ हजार १९० विद्यार्थिनींचा समावेश आहे.

गुणपत्रिका आज मिळणार
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या महिन्यात ३० मे रोजी बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. या गुणपत्रिका आज, शुक्रवारी (९ जून) सकाळी संबंधित विभागीय मंडळांकडून कॉलेजांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी तीननंतर कॉलेजांमध्ये गुणपत्रिका मिळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरती अंकलीकरांच्या गायनाने पुणेकर मुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे पावसाच्या चाहुलीने हवेत निर्माण झालेला गारवा आणि दुसरीकडे सुरांच्या बरसलेल्या सरी असा निसर्ग आणि संगीताने साधलेला अनोखा संगम गुरुवारी पुणेकरांनी अनुभवला. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या घरंदाज गायकीने रसिकांवर मोहिनी घालून स्वरांची मुक्त उधळण केली.
निमित्त होते आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ‘शुभकामना’ या कार्यक्रमाचे. पं. भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यानेही मैफलीत रंग भरले. ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे आणि पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य व गायक पं. उपेंद्र भट यांना राज्य सरकारचा सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल आर्य संगीत मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त रामभाऊ जोशी यांच्या हस्ते मुळे आणि भट यांना सन्मानित करण्यात आले. मंडळाचे विश्वस्त डॉ. प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, शुभदा मूळगुंद, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांबरोबरच शिल्पा जोशी, पं. आनंद भाटे आदी या वेळी उपस्थित होते.
आरती अंकलीकर टिकेकर यांनी राग बागेश्रीद्वारे हळूवार सुरूवात करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांच्या आलापी आणि तानांनी रसिकांना अभूतपूर्व स्वरानंद दिला. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), स्वरूपा बर्वे, अबोली गद्रे, शरयू दाते (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली. विराज जोशी याने राग पुरिया कल्याण सादर केला. आज सोबन लाड लाडावन देत... या त्याने सादर केलेल्या रचनेला उपस्थितांनीही दाद दिली. त्यानंतर त्याने मियां मल्हार मधील महंमद शाह रंगीला रे.. या बंदिशीने गायनाची सांगता केली. त्याला प्रशांत पांडव (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), वृंदा बाम, बाळासाहेब गरुड (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने मुळे आणि भट या दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीनिवास जोशी यांनी मुळेंच्या गमतीदार आठवणी सांगून सभागृहात हशा पिकवला.

‘भीमसेनजींमुळे किराणा घराणे समृद्ध’
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची गायकी ही त्यांच्या खास भीमसेनी ढंगातील होती. आधी कोणी असे गायले नव्हते आणि त्यानंतर कोणी गाऊ शकले नाहीत. त्यामुळे पं. भीमसेन जोशींनी किराणा घराण्याची गायकी आपल्या गायकीने खऱ्या अर्थाने समृद्ध केली, अशा भावना पं. उपेंद्र भट यांनी व्यक्त केल्या. हा पुरस्कार मला नसून, भीमसेनजींच्या गायकीला असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकडे खुनातील आरोपींची सुटका

$
0
0

बनावट मुद्रांक प्रकरण; गुन्हा सिद्ध करण्यात अपयश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बनावट मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीसह अटकेत असलेले तत्कालीन फौजदार प्रताप प्रभाकर काकडे यांचा येरवडा जेलमध्ये खून केल्याच्या आरोपातून पाच जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींमध्ये तुरुंगाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. जिल्हा न्यायाधीश विकास एम. कुलकर्णी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
साधारणतः बारा वर्षांपूर्वी २३ फेब्रुवारी २००५ रोजी पहाटे दोनच्या सुमारास काकडे यांचा खून झाल्याचा संशय होता. खुनाच्या आरोपावरून येरवडा तुरुंगाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तार अहमद सईद शेख, तुरुंगरक्षक कृष्णा दिनकर दोडके, आकाराम तान्नाप्पा कांबळे, तपासणी अंमलदार लक्ष्मण संभाजी आवारे, तुरुंगा​धिकारी अशोक शंकर कदम यांना राज्य गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली होती. बारा वर्षे खटल्याचे कामकाज चालूक सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खटल्यात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आरोपींतर्फे अॅड. मिलिंद पवार, संजय गांधी , शिरीषकुमार जगदाळे यांनी युक्तिवाद केला.
फौजदार प्रताप काकडेंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही. तुरुंगातील बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आरोपींना या प्रकरणाता गोवण्यात आल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. बनावट मुद्रांक घोटाळाप्रकरणी ठाण्यातील नालासोपाऱ्यात नेमणुकीवर असलेल्या काकडे यांना सीबीआयने चौकशीअंती अटक करून येरवडा तुरुंगातील खोली क्रमांक आठमध्ये न्यायालयीन बंदी म्हणून ठेवले. तेथेच तेलगी प्रकरणातील इतर आरोपींना ठेवण्यात आले होते. त्यामध्ये काही वरिष्ठ पोलिस अधिकारी, माजी आमदार, आंध्र प्रदेशातील माजी मंत्र्याचाही समावेश होता.
काकडे यांच्या खुनाप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नवनाथ बेरे यांनी फिर्याद दिली होती. काकडे यांच्या पत्नी स्नेहल यांनी पतीचा मृत्यू तुरुंगातच झाल्याचा संशय व्यक्त करून सखोल तपासाची मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकील असल्याचे सांगून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जातीच्या प्रमाणपत्रासाठी नोटरी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वकील असल्याचे सांगून, पैसे लुबाडल्यानंतर त्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी याबाबत विचारणा केल्यावर धक्काबुक्की केल्याचा प्रकार शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरात घडला.
या प्रकरणी ऐश्‍वर्या नायकवडी( २३, विमाननगर) या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तोटे नावाच्या वकिलावर शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला जातीच्या प्रमाणपत्रासाठी नोटरी करायचे होते. ती रविवारी चार जून रो​जी शिवाजीनगर कोर्टात गेली. रविवार असल्याने कोर्टात कोणी नव्हते. तोटे नावाची व्यक्ती तिच्याकडे आला आणि त्याने आपण वकील असल्याचे सांगून तिच्याकडून ४५० रुपये घेतले. तसेच, नोटरी करतो असे सांगून निघून गेला. दुसऱ्या दिवशी फिर्यादी तरुणीने त्याच्याकडे नोटरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने तिला धक्काबुक्की करून तेथून निघून गेला. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस. बी. पाटील करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचासह ग्रामसेवकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
बांधकाम नोंद करण्यावरून झालेल्या वादातून कासरासाई गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे महिन्यांतील हा सर्व प्रकार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारसाई येथील सरपंच ललित आनंद शिंदे, ग्रामसेवक स्वप्नील नामदेव रासकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज हनुमंत कलाटे ग्रामपंचायत कर्मचारी केतन सुरेश शितोळे व इतर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
कासारसाई येथील ग्रामपंचायतीने देवराम खंडू थोरवे (रा. चर्मकार आळी, कासारसाई) यांना बेकायदा बांधकाम केले म्हणून लेखी नोटीस पाठवली व त्यांना सुनावणीसाठी ग्रामपंचायतीमध्ये बोलावले. या वेळी सुनावणी सुरू असताना सरपंचांनी बोगस नोंदी व कागदपत्रे दाखवली. या वेळी पुराव्याची विचारणा केली असता थोरवे यांना शिवीगाळ केली व धक्के मारून हाकलून दिले. त्यानुसार हिंजवडी पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त विक्रम पाटील या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पीएमपीएमएल’आणि‘स्थायी’त वाद रंगण्याची शक्यता

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी आम्ही सत्ताधारी झालेलो नाही. प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे किंवा सक्षम अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन अडचणी जाणून घ्याव्यात,’ अशी ठाम भूमिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी शुक्रवारी घेतली. त्यामुळे मदतनिधीच्या मुद्यावरून पीएमपीएमएल आणि स्थायी समितीत वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या महापालिकेने ‘पीएमपीएमएल’ला गेल्या दहा वर्षांत विविध कारणांसाठी ४६७ कोटी ७९ लाख रुपये आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी ४९ कोटी ४४ लाख रुपये असे एकूण तब्बल ५१७ कोटींहून अधिक रुपये दिले आहेत. त्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविली जात नाही, असा आरोप सावळे यांनी केला आहे. येथील समस्या जाणून घेण्यासाठी ‘पीएमपीएमएल’चा एकही सक्षम अधिकारी पिंपरी-चिंचवडकडे फिरकत नाही. ही बाब चुकीची आहे. जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी आम्ही सत्ताधारी झालेलो नाही. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शहरात येऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या जनतेला येणाऱ्या अडचणी जाणून घ्याव्यात, अशी मागणी सावळे यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या, ‘पीएमपीएमएल’ला पुणे महापालिका ६० टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के निधी देते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या दहा वर्षांत तब्बल ५१७ कोटींहून अधिक निधी दिला आहे. हा निधी घेत असाल, तर पिंपरी-चिंचवडला सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवावी, ही मागणी चुकीची ठरत नाही. संचलन तुटीपोटी दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. ही तूट आम्ही सोसत आहोत. शहरांतर्गत भागात सक्षम बसव्यवस्था नाही. औद्योगिक परिसरात कामगारांसाठी पुरेशा बस नाहीत. शहराचा विस्तार वाढला आहे. आसपास अनेक गावे आहेत. त्या गावांना शहराशी जोडण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ने आजपर्यंत पाऊल उचलले नाही.’
शहरालगत देहू आणि आळंदी मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. तेथे जाण्यासाठी भाविकांना शहराच्या प्रत्येक भागातून बससुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्याच वाहनांचा वापर करावा लागतो. या प्रकारच्या समस्या असताना ‘पीएमपीएमएल’चा एकही अधिकारी पिंपरी-चिंचवडच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिरकत नाही. ही येथील नागरिकांची फसवणूक आहे. आम्ही सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करू इच्छित नाही, असे सावळे यांनी म्हटले आहे.
महापालिकेची स्थायी समिती कायदेशीर आहे. या समितीपुढे येणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा करूनच मंजुरी दिली जाते. समितीपुढे ‘पीएमपीएमएल’चा विषय असल्यास त्यावरही चर्चा होणारच. अशा परिस्थितीत ‘पीएमपीएमएल’च्या संबंधित अधिकाऱ्यांनी समितीच्या सभेला उपस्थित राहणे बंधनकारकच असले पाहिजे. वास्तविक, मुंढे सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्याही समस्या जाणून घ्याव्यात. ‘पीएमपीएमएल’चे तत्कालिन अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनीदेखील त्यावेळी नगरसेवकांची बैठक घेऊन शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे मुंढे यांनी देखील येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था जाणून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महोत्सवातूनही ‘ब्रेक्झिट’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर या ‘ब्रेक्झिट’चा परिणाम चित्रपट महोत्सवांवरही होऊ लागला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये उद्या, रविवारपासून होणाऱ्या युरोपीय चित्रपट महोत्सवात ब्रिटनचा एकही चित्रपट दाखविला जाणार नाही. दर वर्षी होणाऱ्या या महोत्सवात ब्रिटनचे चित्रपट आवर्जून दाखविले जातात. यंदा मात्र महोत्सवात एकाही चित्रपटाचा समावेश करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या महोत्सवात ब्रिटनचे चित्रपट दाखविण्यात आले होते. महोत्सवासाठी ते शेवटचे ठरले आहेत.
संग्रहालयाबरोबर युरोपीय महासंघ, चित्रपट महोत्सव संचालनालय यांच्यातर्फे ११ ते १७ जून या कालावधीत आयोजित महोत्सवात युरोपातील आशयघन व दर्जेदार चित्रपटकलाकृतींचा रसास्वाद रसिकांना घेता येणार आहे. युरोपातील विविध देशातील २२ चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत. ११ तारखेला सायंकाळी ६.३० वाजता एस्टोनियाचे भारतातील राजदूत रिहो क्रूव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, एस्टोनियातील तरुण दिग्दर्शक कॅट्रिन मायमिक व अँड्रेस मायमिक उपस्थित राहणार आहेत. या दोघांनी दिग्दर्शित केलेली ‘चेरी टोबॅको’ ही ओपनिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार आहे. महोत्सवाचे यंदा २२ वे वर्ष असून, महोत्सवात ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, इटली, लॅटविआ, लिथुनिआ, लक्झेमबर्ग, माल्टा, द नेदरलँडस्, पोर्तुगाल, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन या देशांमधील २२ नवीन आणि पुरस्कारप्राप्त चित्रपट दाखविले जाणार आहेत. यामध्ये ब्रिटनचा समावेश केलेला नाही.
व्यावहारिकदृष्ट्या ‘ब्रेक्झिट’ होत असले तरी, ब्रिटन आता सांस्कृतिकदृष्ट्याही युरोपीय महासंघातून बाहेर पडला असल्याचेच यंदाच्या महोत्सवावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या महोत्सवात ब्रिटिश कौन्सिल सहभागी झाले होते. तसेच ब्रिटनच्याच चित्रपटाने सुरुवात व समारोप झाला होता. गेल्या वर्षीचा समोराप ब्रिटनच्या चित्रपटांसाठी अखेरचा समारोप ठरला आहे. गेल्या वर्षी ‘ब्रेक्झिट’चा परिणाम महोत्सवावर झाला नव्हता, तरी आगामी काळात महोत्सवात ब्रिटनचे चित्रपट दाखवता येणार नाहीत, या समस्येने महासंघाचे चित्रपट विभागातील पदाधिकारी आणि संयोजक चिंताग्रस्त झाले होते. राजकीय निर्णयाचा परिणाम युरोपीय कलासंस्कृतीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. ती अखेर खरी ठरली आहे. ब्रिटन आता युनायटेड किंग्डम (युके) म्हणून ओळखला जात असून, त्यात इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि आयर्लंड यांचा समावेश आहे.


युरोपीय महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट युरोपीय महासंघातर्फे निवडले जातात. त्या-त्या वर्षांतील चित्रपटांचे पॅकेज महासंघातर्फे पाठवले जाते. या निवडीमध्ये संग्रहालयाचा सहभाग नसतो. त्यामुळे यंदाच्या महोत्सवात ब्रिटनचे चित्रपट का नाहीत, हे सांगता येणार नाही. गेल्या वर्षी चित्रपट दाखविण्यात आले होते.
- प्रकाश मगदूम,
संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटपौर्णिमेच्या दिवशी दागिने हिसकावले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
वटपौर्णिमेची पूजा करत असताना महिलेच्या गळ्यातील तब्बल १९ तोळे वजनाचे सोने दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. देहूगाव येथे आळंदी रस्त्यावर बाणेर पतसंस्थेसमोर ही घटना घडली. असाच वडगाव मावळ येथेही घडला आहे.
रेश्मा संतोष चोपडे (रा. ओंकार हाउसिंग सोसायटी, देहूगाव) या गुरुवारी (८ जून) सायंकाळी ५ च्या सुमारास देहूगाव आळंदी रोडवरील वडाच्या झाडाची पूजा करण्यास गेल्या होत्या. या वेळी काळ्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी रेश्मा यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले. यामध्ये रेश्मा यांचे ५ लाख ७० हजार रुपयांचे तब्बल १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले आहेत. या प्रकरणी देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नळ स्टॉप’ची कोंडी फोडण्यासाठी चक्राकार वाहतूक

$
0
0

कर्वे रस्त्यावर नळ स्टॉप ते एसएनडीटीपर्यंत एकेरी वाहतूक; लॉ कॉलेज व प्रभात रस्त्यावरही बदल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नळ स्टॉप चौक परिसरात सातत्याने भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस शाखेने कर्वे रस्ता, प्रभात रस्ता आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. चक्राकार वाहतूक पद्धतीचा अवलंब करीत नळ स्टॉप चौक व लॉ कॉलेज रस्त्यावरील आठवले चौक सिग्नल विरहीत करण्यात येणार आहेत. तसेच, नळ स्टॉप चौक ते एसएनडीटीपर्यंत कोथरूडच्या दिशेला जाण्यासाठी एकेरी वाहतूक असणार आहे.
सध्या नळ स्टॉप चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्याचा परिणाम आसपासच्या प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्यांमध्येही दिसून येतो. यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी लॉ कॉलेज रस्त्यावर होते. नळ स्टॉप चौकापासून लॉ कॉलेजवर वाहनांची मोठी रांग लागलेली असते. वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी काही दिवसांपूर्वी नळ स्टॉप चौकातील वाहतुकीची पाहणी केली होती. त्यानंतर तातडीने त्यांच्या पुढाकाराने येथे वाहतूक उपाययोजना करण्यात येत आहे. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सूचना व हरकतीनंतर त्यास अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
...............
ठळक मुद्दे
0 कर्वे रस्ता हा नळ स्टॉप चौक ते एसएनडीटी या दरम्यान एकेरी असणार आहे. केवळ लॉ कॉलेज रस्त्याने येणारी वाहनेच नळ स्टॉप ते एसएनडीटी या एकेरी मार्गावर धावू शकणार.
0 डेक्कनकडून कोथरूड किंवा पौड रस्त्याला जाणाऱ्या वाहनांना नळ स्टॉप चौकातून पुढे प्रवेश असणार आहे.
कोथरूडकडून डेक्कन येणाऱ्या वाहन चालकांना या पुढे ‘एसएनडीटी’पासून कर्वे रस्त्याने सरळ येता येणार नाही. त्यांना कॅनॉल रस्त्याने आठवले चौकात जाऊन उजवीकडे वळून नळ स्टॉप चौकातून पुढे जावे लागणार आहे.
0 लॉ कॉलेज रस्त्यावरील आठवले चौकातून प्रभात रस्त्याला जाण्यासाठी वापरला जाणारा कॅनॉल रस्ता एकेरी करण्यात आला आहे. या रस्त्यावर फक्त प्रभात रस्त्याकडून नळ स्टॉपला जाणारी वाहने जाऊ शकतात.
0 ‘एसएनडीटी’कडून कॅनॉल रस्त्याने येऊन डेक्कनकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांना लॉ कॉलेज रस्त्याने जावे लागेल. त्यासाठी आठवले चौक ते प्रभात चौक (लॉ कॉलेज रस्ता) हा रस्ता एकेरी करण्यात आला आहे.
0 प्रभात चौकातून उजवीकडे वळून पुन्हा कॅनॉल रस्ता मार्गे आठवले चौकात येणे शक्य आहे.
...................
एकेरी केलेले रस्ते
- नळ स्टॉप ते एसएनडीटी (कोथरूडकडे जाण्यासाठी)
- आठवले चौक ते प्रभात चौक (प्रभात चौकाकडे जाण्यासाठी)
- कॅनॉल रस्ता (प्रभात चौकापासून आठवले चौकापर्यंत)
...................
सिग्नल सिंक्रोनायझेशन बंद
कर्वे रस्ता आणि लॉ कॉलेज रस्त्यावर सिग्नल सिंक्रोनायझेशनमुळे उजवीकडे प्रत्येक चौकात उजवीकडे वळण्यास (नळ स्टॉप चौक वगळता) मनाई करण्यात आली होती. एकेरी वाहतूक व उजवीकडे वळण्यास ग्रीन सिग्नल दिल्याने सिंक्रोनायझेशन योजना बंद होण्याची शक्यता आहे.
...................
बदलाच्या माहितीसाठी दिशादर्शक
कर्वे रस्ता एसएनडीटीपर्यंत एकेरी केल्याने तेथे रस्ता दुभाजक तोडण्यात आला आहे. तसेच, या वाहतूक बदलाची माहिती होण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढाब्यासाठी एसटी ‘राँग साइड’

$
0
0

ढाब्यासाठी एसटी ‘राँग साइड’

Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

पुणे : पुणे-सोलापूर हा रस्ता चार पदरी झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढल्यामुळे त्याच प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात होणाऱ्या घटनांमध्ये खासगी वाहनांची संख्या जास्त असली, तरी ‘सुरक्षित प्रवास’ असे बिरूद मिरविणाऱ्या एसटीचे चालक लेन तोडून गाडी चालवत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. यवत ते भिगवण या दरम्यान असलेल्या आवडीच्या ढाब्यांवर जाण्यासाठी चक्क विरुद्ध दिशेने गाडी नेण्याचे धाडस चालक करत आहेत. चालकांच्या बेदरकार गाडी चालविण्यामुळे बसमधील प्रवासी आणि समोरून येणाऱ्या वाहनांच्या चालकांचा थरकाप उडू लागला आहे.
उरुळी कांचन ते यवत या टप्प्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर प्रदीर्घ कालावधीने यवत ते सोलापूर हा रस्ता चौपदरी करण्यात आला. त्यानंतर वाहनांची संख्या आणि वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता चांगला झाल्याने प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर; तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक डेपोंनी एक थांबा बस सुरू केल्या आहेत. फक्त इंदापूर थांबा आणि विनावाहक असलेल्या या बस चार तासांत पोहोचत असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. मात्र, त्याच वेळी काही चालकांचे गाडी चालविणे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकविणारे ठरत असून, महामार्गावर गाडी कशी चालवली पाहिजे, याचे भान एसटीच्या चालकांना नसल्याचे गेल्या काही प्रकारांतून समोर आले आहे.
यवत ते भिगवण या मार्गावर ढाब्यांची संख्या अधिक आहे. यवतहून भिगवणकडे जाताना डाव्या हाताला अनेक ढाबे दिसतात. त्या तुलनेत समोरील बाजूला ढाब्यांची संख्या कमी आहे. सोलापूर जिल्ह्यातून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसच्या चालकाने वळसा घेऊन ढाब्यांवर जाणे अपेक्षित असताना मधला मार्ग म्हणून चालक थेट विरुद्ध बाजूने गाडी चालवित असल्याचे प्रकार वाढले आहेत. पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या समोर बस येत असल्याने चालकांचा थरकाप उडत आहे. बसमधील प्रवाशीही या प्रकारामुळे भयभीत होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images