Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लायसन्ससाठी कोटा

$
0
0

पुणे : चार चाकी वाहन चालवण्यासाठी असलेल्या लर्निंग लायसन्सची वैधता संपण्यासाठी कमाल आठ दिवस राहिलेल्या लायसन्सधारकांना आता दिलासा मिळाला आहे. पक्के लायसन्स काढताना अपॉइंटमेंटमध्ये ३० जागांचा राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. यामुळे लायसन्स काढताना करावी लागणारी प्रतीक्षा कमी होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात चार चाकी वाहन चालविण्याचे लायसन्स काढण्यासाठी भोसरी येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रीसर्च (आयडीटीआर) येथे अत्याधुनिक ट्रॅकवर चाचणी घेतली जाते. ‘आरटीओ’ने या चाचणीसाठी अपॉइंटमेंट पद्धत सुरू केली आहे. तसेच, कोटा पद्धतीचाही अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे एका मोटार वाहन निरीक्षकाला एका दिवसात कमाल ६० लायसन्स देता येतात. यांमुळे ‘आयडीटीआर’ येथे एका दिवसात केवळ १७६ उमेदवारांना लायसन्ससाठी चाचणी देता येते. त्यामुळे लायसन्सच्या अपॉइंटमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा करावी लागते. लर्निंग लायसन्स काढल्यानंतर एका महिन्याने पक्क्या लायसन्ससाठी अर्ज करता येतो. मात्र, अनेकजण एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीनंतर अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा प्रतीक्षा यादी सहा महिन्यांपर्यंत असते. त्या वेळी त्यांना मिळणाऱ्या अपॉइंटमेंटच्या तारखांच्या आधीच लर्निंग लायसन्सची वैधता संपणार असते. त्यामुळे अनेकांवर पुन्हा लर्निंग लायसन्स काढण्याची वेळ येते. अशा उमेदवारांच्या सोयीसाठी आरटीओने राखीव कोटा ठेवला असून, त्याची अंमलबजावणीदेखील तातडीने होणार आहे.

अपॉइंटमेंट कोट्यात वाढ

‘आयडीटीआर’ येथे लायसन्ससाठी एका दिवसाला १७६चा कोटा आहे. त्यामध्ये ३०ने वाढ करण्यात आली आहे. हा वाढीव ३० जागांचा कोटा लर्निंग लायसन्सची वैधता संपणाऱ्यांसाठी राखीव ठेवला जाणार आहे. यामुळे प्रतीक्षायादी कमी होणार असून उमेदवारांना होणारा मनस्तापही कमी होईल. ‘परिवहन’ वेबसाइटवरून पक्क्या लायसन्ससाठी अपॉइंटमेंट घेताना, लर्निंग लायसन्सचा क्रमांक नमूद करावा लागतो. या क्रमांकावरून परवान्याच्या वैधतेची पडताळणी होऊन उमेदवाराला अपॉइंटमेट मिळणार आहे.

लायसन्स देण्याचा कोटा वाढविल्याने अपॉइंटमेंट देताना असलेली प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे. राखीव कोट्यामुळे लर्निंग लायसन्सचे नूतनीकरण करण्याची वेळ येणार नाही.

संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोरेगाव पार्क परिसरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.

रामदेव खरबू यादव (वय ४०, रा. झारखंड) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. एन. गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी २९ जून २०१६ रोजी ही कारवाई केली होती. त्यामध्ये पश्चिम बंगाल येथील २१ वर्षांच्या तरुणीची सुटका करण्यात आली होती. यादवचा या पूर्वी सत्र न्यायालयाने आणि हायकोर्टाने जामीन फेटाळला आहे. या गुन्ह्यातून कोर्टाने एका व्यक्तीला वगळले. या पार्श्वभूमीवर जामीन मिळावा, यासाठी यादव याने पुन्हा कोर्टात अर्ज केला होता. या अर्जाला अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला.

यादव याने वेश्या व्यवसाय करण्यासाठी पीडित मुलीला दिल्ली येथून विमानाने आणले होते. त्यावरून या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येते. वेश्या व्यवसाय करून घेतल्यासंबंधी यापूर्वी यादव याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात जामिनावर असताना त्याने पुन्हा हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. गुन्हा घडून तब्बल ११ महिने झाले. तरीही, अद्याप आरोपी यादव फरार आहे. याबाबत सखोल तपास करण्यासाठी त्याला अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी कोर्टात केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’ला पाच कोटी रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएआरडीए) बीजभांडवलापोटी पाच कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ‘पीएमआरडी’एकडून हे बीजभांडवल मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती.

राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘पीएमआरडीए’ला बीजभांडवालापोटी रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ‘पीएमआरडी’कडून पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. अर्थसंकल्पातही ही रक्कम देण्याबाबत तरतूद करण्यात आली होती, त्यानुसार पाच कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास मंजुदी देण्यात आली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाग्यश्री ट्रॅव्हल्स’चे वसंतराव गोळे यांचे निधन

$
0
0

पुणे : भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे संस्थापक संचालक वसंतराव बंडोपंत गोळे (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. रास्ता पेठ हायस्कूलमध्ये त्यांनी उपमुख्याध्यापक म्हणून काम केले होते. सहकारनगरमधील दत्तजयंती उत्सव समितीतही ते सक्रिय होते. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाउण लाख शाळांचे परिसर तंबाखूमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शाळांपासून ते हॉस्पिटलच्या दारापर्यंत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी असतानाही त्या ठिकाणी राजरोस विक्री करताना अनेक जण दिसतात. आरोग्य, अन्न व औषध प्रशासनासह अन्य विभागाने तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे राज्यातील ७६ हजार ४२७ शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत.

तंबाखूजन्य पदार्थांच्या खाण्यामुळे कॅन्सरसह अनेक आजार होतात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येते. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यातील जनतेला तंबाखू सोडण्याचे आवाहन केले आहे. ‘तंबाखू सोडा, आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडवू,’ या अशा शब्दांत आवाहन केले आहे. ‘शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. तरीही, अनेक शाळांसह हॉस्पिटलच्या परिसरात त्याची विक्री होत असल्याचे वारंवार आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी, तंबाखूजन्य पदार्थ विक्री, जाहिरात करणे, तंबाखूविरोधी २००३ कायद्यातील काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य, अन्न व औध प्रशासन, गृह विभागासह अन्य विभागांनी प्रयत्न केले. राज्यातील ३४ जिल्ह्यांत हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये राज्यातील ७६ हजार ४२७ शाळांचे परिसर तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. राज्यातील १२ हजार नागरिकांचे तंबाखू सोडण्यासंदर्भात समुपदेशन करण्यात आले आहे,’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

राज्यात तंबाखू खाणाऱ्या २ हजार १९५ नागरिकांकडून दंड आकारण्यात आला आहे. त्यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. १० ते ११ लाख सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. तंबाखूचा विळखा प्रगतीला धोका असून जागतिक तंबाखू विरोधी दिनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांना नकार देण्याची शपथ घेऊन आरोग्यदायी महाराष्ट्र निर्माण करू, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले.

गर्भातील बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी गर्भवतींनी धूम्रपान होत असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. जोडीदार घराबाहेर धूम्रपान करतात. अशा धूम्रपानामधून निर्माण होणारी तिसऱ्या टप्प्यातील राख त्यांच्या कपड्यांद्वारे पुन्हा घरात येते. हे टाळण्यासाठी धूम्रपान करताना कोट घालणे आणि घरामध्ये येण्यापूर्वीच काढून टाकण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

डॉ. वैभव पंढरकर, कोलंबिया आशिया हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाला कमी गुण; वडिलांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बारावीच्या परीक्षेत मुलाला केवळ ७१ टक्के गुण मिळाल्याने अपेक्षाभंग झाल्याने वडिलांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरी गावातील सुखवानी काल्टन या इमारतीत मंगळवारी ही घटना घडली. आत्महत्या करण्याचे कारण पोलिस पडताळून पाहात आहेत.

विश्वंबरम माधवन पिल्ले (४८, रा. सुकवानी काल्टन, पिंपरीगाव) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. नातेवाइक आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिल्ले यांच्या मुलाने विज्ञान शाखेतून यंदा बारावीची परिक्षा दिली होती. त्याला दहावीमध्ये ९१ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे कुटुंबीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मुलाला वैद्यकीय शिक्षण देण्याची तयारी वडिलांनी दहावीनंतरच सुरू केली होती. मंगळवारी बारावीचा निकाल लागला. तेव्हा पिल्ले यांच्या मुलाला ७१ टक्के गुण मिळाल्याचे समजले. त्यामुळे पिल्ले यांचा अपेक्षाभंग झाला होता, असे त्यांच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी सांगितले. घरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. पिल्ले यांनी दुपारी घरातील बाथरुममध्ये जाऊन गळफास घेतला. ही बाब समजताच कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, पिल्ले यांचा भोसरीतील लांडेवाडी येथे नूटक इंजिनीअरिंग या नावाचे भागीदारीत वर्कशॉप आहे. त्यामुळे पिल्ले यांनी मुलाच्या निकालामुळे आत्महत्या केली, की अन्य काही कारण त्यामागे आहे, याचा पिंपरी पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीवरून विरोधक आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पवना धरणात मुबलक पाणीसाठा असताना आणि पाटबंधारे खात्याकडून कोणतीही सूचना नसताना पिंपरी-चिंचवडमधील पाणीकपातीचा निर्णय नक्की कशासाठी आणि कोणासाठी, असा सवाल उपस्थित करीत विरोधकांनी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्याची दखल घेऊन पाणीकपात १५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या आठवड्यात पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्याचे संकेत मिळाले आहेत.

पाणी नियोजनासंदर्भात महापौर नितीन काळजे यांनी पालिकेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विधी समितीच्या सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसेवक विलास मडिगेरी, सुरेश भोईर, बाबासाहेब त्रिभुवन, पंकज भालेकर, संदीप वाघेरे, अॅड. मोरेश्वर शेडगे, नामदेव ढाके, मंगला कदम, सुमन पवळे, सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

शहरात दिवसाआड समान आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना महापौर काळजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र, पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी विरोधकांसह सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनीही केली. प्रशासनाचे नियोजन ढासळले असून, धरणात पाणीसाठा असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेतल्याबद्दल तीव्र टिका केली. त्यामुळे पाणीकपात काही प्रमाणात मागे घेतल्याचे प्रशासनाला भाग पडले.

तक्रारीसाठी हेल्पलाइन

ज्या भागात पाणी पुरवठ्याबाबत जास्त तक्रारी येतील, त्या भागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच, नळजोडाला थेट विद्युतपंप लावून पाणी खेचल्यास सदरचा नळजोड बंद करण्यात येऊन सदर नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा हर्डीकर यांनी दिला आहे. नागरिकांनी गळती आणि पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रारींची माहिती महापालिकेच्या सारथीवर (८८८८००६६६६) तसेच हेल्पलाइन क्रमांकांवर (७७२२०६९९९) यावर द्यावी. जेणेकरून पाणीपुरवठा विभागास कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.


महापौरांना श्रेयाची भीती

दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे ढासळल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बैठकीत मान्य केले. शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आजच्या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय घेतला असता, तर त्याचे श्रेय विरोधकांना गेले असते. त्यामुळे महापौरांनी निर्णय घेतला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. भविष्यात कपात रद्दच करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘शिवसेना नेत्यांचा तिळपापड’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीदादा आढळराव-पाटील या दोन्ही ‘दादां’ना जमले नाही ते भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आमदार महेशदादा लांडगे यांनी करून दाखवले. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा तिळपापड झाला आहे, अशी टीका पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली. टँकर लॉबीला खतपाणी घालण्यासाठी भाजपने पाणीकपातीचा निर्णय घेतल्याच्या आरोपाला पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालखीसाठी बैलजोड्या निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासाठी दोन बैलजोड्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यंदा हा मान लोहगाव (ता. हवेली) येथील भानुदास खांदवे यांच्या ‘सर्जा-राजा’ आणि चिंबळी (ता. खेड) येथील अप्पासाहेब लोखंडे यांच्या ‘माणिक-राजा’ या बैलजोड्यांना मिळाला आहे.

यासंदर्भात देहू येथील मुख्य मंदिरात मंगळवारी सकाळी बैठक झाली. संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळाप्रमुख अभिजीत मोरे, जालिंदर मोरे, सुनील दिगंबर मोरे, विश्वस्त विठ्ठल मोरे, सुनील दामोदर मोरे उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे येत्या १६ जूनला पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. या पालखी रथासाठी बैलजोडी उपलब्ध करण्याचा मान मिळावा, यासाठी संस्थानकडे १७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यात दत्तात्रय बधाले (नवलाख उंब्रे), सुरज खांदवे-मुकादम (लोहगाव), भानुदास खांदवे (लोहगाव), विशाल भोंडवे (रावेत), नानाजी शेळके (पिंपोळी), गणेश भुजबळ (चिखली), ज्ञानेश्वर शेडगे (वाकड), उषा पवार (लोहगाव), सुभाष मोरे, बाळासाहेब मोरे (टाळगाव-चिखली), अप्पासाहेब लोखंडे (चिंबळी), प्रदीप वाल्हेकर, आनंदा वाल्हेकर (वाल्हेकरवाडी), गोपाळ कुटे (आकुर्डी), बाळासाहेब कड (कुरुळी), सुनील जमदाडे (सातारा), हगवणे परिवार (देहूगाव), राजाराम राक्षे (साळुंब्रे), प्रणव शेळके (माण) यांचा समावेश होता.

अर्ज केलेल्या सर्व बैलजोडींची पाहणी करण्यात आली. त्यासाठी बैलांचे वय, शिंगे, रंग, शेपटी, खूर, त्यांची चाल आणि कामाची क्षमता हे निकष तपासण्यात आले. बैलांचे वैद्यकीय प्रमाणपत्र लक्षात घेऊन बैलजोड्या निश्चित करण्यात आल्याचे अध्यक्ष मोरे यांनी सांगितले. त्यासंदर्भातील नियम आणि अटींचे पत्र खांदवे आणि लोखंडे यांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ नैराश्याने त्रस्त मुलगी पास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत व मला माहिती आहे की, मी त्यामध्ये नापास होणार आहे...त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेलेली विद्यार्थिनी पास झाली आहे. निकालाच्या दोन दिवस आधी ती पुन्हा घरी परतल्यानंतर घरचे आधीच खुशीत असताना तिच्या पास होण्यामुळे सर्वांच्या आनंदात भर पडली आहे.

जुनी सांगवी येथील १९ वर्षांची विद्यार्थिनी २३ मेपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर घरात शोधाशोध केल्यावर तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीमुळे कुटुंब हादरून गेले होते. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने काही विषयांचे पेपर अवघड गेल्यामुळे थेट आत्महत्येचा निर्णय घेऊन घरातून निघून गेली होती.

तिच्या घरच्यांनी तत्काळ सांगवी पोलिस ठाण्यात नोंद केली. अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून ठिकठिकाणी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही विद्यार्थिनी निराश मनाने केतकावळे येथील मंदिरात गेली. तेथे रात्रभर थांबली व दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतली. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. त्यानंतर मंगळवारी (३० मे) बारावीचा निकाल लागला आणि संबंधित विद्यार्थिनी ५६ टक्के मार्क मिळवून पास झाली.

बेपत्ता झाल्यानंतर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तत्काळ तपास करणाऱ्या पोलिसांना मुलगी पास झाल्याचा निकाल तिच्या वडिलांनी आवर्जून कळविला. पोलिसांनीदेखील तिला शुभेच्छा देऊन नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

खचून जाऊ नका : शिंदे

परीक्षेत पास-नापास असे निकाल लागत असतात. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. एखाद्या परीक्षेत अपयश आले, तर खचून न जाता टोकाचा निर्णय घेऊ नये. एखाद्या टोकाच्या निर्णयामुळे आई-वडिलांचे काय होईल, याचा किमान एकदा तरी विचार करावा आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडचा निकाल ९२.२६ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा पिंपरी-चिंचवडचा निकाल ९२.२६ टक्के एवढा लागला. या वर्षीही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांचा निकाल ८९.५९ टक्के, तर मुलींचा निकाल ९४.४६ टक्के इतका लागला आहे.

शहरामध्ये बारावीच्या परीक्षेस एकूण १६,४६३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ८९७४ मुलांनी आणि ७४८९ मुलींनी परीक्षा दिली. निकालानंतर ८०४० मुले आणि ७१४९ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण १५,१८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील रात्रशाळेचा निकाल ७८ टक्के लागला.

मावळ तालुक्याचा निकाल ८८.६ टक्के इतका लागला. या वर्षी मावळमध्ये ३७१८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यामध्ये १९३७ मुले आणि १७८१ मुली होत्या. यातील १६०३ मुले, तर १६७१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचा निकाल ८२.७६ टक्के, तर मुलींचा निकाल ९३.८२ टक्के लागला असून, मुली अव्वल राहिल्या आहेत.

कचरा वेचकांच्या मुलींची उड्डाणे

विठ्ठलनगर येथील तुळशीबाई या आजी कचरा वेचक आहेत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या त्यांची नात अश्विनी साबळे हिचा सांभाळ करीत आहेत. अश्विनीने बारावीच्या परीक्षेत ६८.९ ऐवढे टक्के मार्क मिळाले आहेत. तर, गांधीनगर पिंपरी येथील शिवगंगा जाधव हिनेही विज्ञान शाखेतून ६० टक्के मार्क मिळवले आहेत. तिची आई देखील कचरा वेचक आहे. या दोन्ही कुटुंबांचा उदरनिर्वाह कचरा गोळा करून चालतो. हलाखीच्या परिस्थितीत विद्यार्थिनींनी यश मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. शिवगंगा जाधव भारतीय जैन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. पुढे ती फार्मसी चे शिक्षण घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहोरात्र पाण्यासाठी कर्जरोखे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सर्वत्र समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्यासाठी आवश्यक २२६४ कोटी रुपयांचा निधी कर्जरोख्यांद्वारे (म्युन्सिपल बाँड) उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी बहुमताने मंजूर केला. पहिल्या टप्प्यात दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या योजनेनुसार त्यावरील व्याजदरांमध्ये महापालिकेला दोन टक्क्यांची सवलत मिळण्याची शक्यता आहे.

समान पाणीपुरवठ्याची योजना महापालिकेच्या निधीतून अमलात येऊ शकत नसल्याने त्यासाठी अर्थसाह्य घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने, कर्जरोख्यांद्वारे निधी उभारण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी स्थायी समितीसमोर सादर केला होता. शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने ही योजना राबवणे आवश्यक असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याबाबत अनुकूल भूमिका घेऊन हा प्रस्ताव मान्य केला.

‘पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. त्यादृष्टीने, ही योजना वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याने कर्जरोख्यांद्वारे निधी उभा केला जाणार आहे. त्याचा कोणताही अतिरिक्त बोजा पालिकेवर पडणार नसून, पाणीपट्टी वाढीतून जमा होणाऱ्या निधीतून परतफेड केली जाईल,’ अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेने कर्जरोखे उभारण्याच्या योजनेला विरोध केला. काँग्रेसचे सदस्य बैठकीला अनुपस्थित होते; परंतु कर्जरोख्यांद्वारे निधी उभारण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे गटनेते अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर आता हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असून, त्यानंतर राज्य सरकारने मान्यतेची मोहोर उमटवणे गरजेचे आहे.

महापालिकांच्या हद्दीतील पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी ‘म्युनिसिपल बाँड’ला चालना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार, कर्जरोख्यांवरील व्याजदरात दोन टक्के सवलत देण्याचे संकेत अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आले असून, त्याचा फायदा पुण्याला होईल, असा दावा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केला. केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी कर्जरोख्यांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उभारता यावा, यासाठी काही नियम शिथिल केले आहेत. असे कुमार यांनी सांगितले.

समान पाणीपुरवठा योजना

एकूण खर्च : ३३०० कोटी रुपये
केंद्र-राज्याचे अनुदान : ५०० कोटी रुपये
महापालिकेचा हिस्सा : ५५० कोटी रुपये
कर्जरोखे : २ हजार २६४ कोटी रुपये
प्रकल्प कालावधी : ५ वर्षे
पाणीपट्टीत वाढ : २०२१ पर्यंत दर वर्षी १५ टक्के तर त्यानंतर २०४७ पर्यंत ५ टक्के


‘भार पडण्याची भीती अनाठायी’

शहरातील नागरिकांसाठी हिताच्या योजनांना वेळेत सुरुवात होणे आणि त्या ठरावीक कालमर्यादेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, संबंधित योजनांवरील खर्च वाढत जातो. शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना महत्त्वाची असून, कर्जरोख्यांचा भार पालिकेवर पडण्याची भीती अनाठायी आहे.

- कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त तीस हजारांचीच घेणार परीक्षा

$
0
0

Sujit.Tambade @timesgroup.com
Tweet : @sujittambadeMT

पुणे : पुणे जिल्ह्यातून विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या ४३ ते ४७ हजार असताना, एका वेळी फक्त तीस हजार उमेदवारांचीच परीक्षा घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मान्यता दिली आहे. यामुळे उर्वरित उमेदवारांना परीक्षेसाठी अन्य जिल्ह्यात जावे लागणार आहे.

नुकतीच एमपीएससीने पोलिस निरीक्षक पूर्व परीक्षा-२०१६ आणि राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०१७ घेतल्या. त्यासाठी अनुक्रमे ४३,३०० आणि ४७,५०० उमेदवार बसणार होते. त्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी शाळा आणि कॉलेज उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयोगाने केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी परीक्षा घेतानाच्या अडचणींचा पाढा वाचून ३० हजार विद्यार्थ्यांचीच परीक्षा घेता येणे शक्य असल्याचे कळविले होते. याहून अधिक संख्येने परीक्षार्थी असल्यास नियोजनात चुका होण्याचीही भीती व्यक्त करून त्यांनी जिल्ह्यात ३० हजार परीक्षार्थींची क्षमता देण्याबाबतचा प्रस्ताव ‘एमपीएससी’ला सादर केला होता. तो आयोगाने मान्य केला आहे.

सध्या पुणे जिल्ह्यामध्ये स्वतंत्र परीक्षा विभाग अस्तित्त्वात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असलेली महसूल शाखा दैनंदिन कामकाज करून यासाठीचे नियोजन करते. ‘एमपीएससी’बरोबरच, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), कर्मचारी चयन आयोग आणि अन्य स्पर्धा परीक्षांचे कामकाज या विभागाला सांभाळावे लागते. हे काम रविवारी करण्यात येते. परीक्षा केंद्रांसाठी शाळा आणि महाविद्यालय निश्चित करणे, त्या केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, संबंधितांना प्रशिक्षण देणे, गोपनीय साहित्य केंद्रनिहाय वितरित करणे ही कामे करावी लागतात. हे काम निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल आणि सर्वसाधारण विभागांचे तहसीलदार, पाच कारकून, पंधरा ​लिपिक आणि सहा शिपाई यांच्यामार्फत करण्यात येते. त्यामुळे परीक्षार्थींची मर्यादा ३० हजार करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. केंद्र निश्चित करताना अनेकदा अडचणी येतात. पुणे जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यामुळे प्रत्येक शाळा आणि कॉलेजला केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क करावा लागतो, असे प्रस्तावात म्हटले होते.

विद्यार्थिकेंद्री धोरणाला हरताळ

‘शिक्षणाचे माहेरघर’ असलेल्या पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीच्या सोयी असल्याने विविध ठिकाणांहूनही विद्यार्थी येत असतात. त्यामुळे आणि एकूणच स्पर्धा परीक्षांबद्दल जागरुकता वाढल्याने एमपीएससीसह विविध परीक्षांना बसणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या सर्वांना पुणे केंद्रातून परीक्षा देता यायला हवी. विद्यमान प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मर्यादित विद्यार्थ्यांचीच सोय करण्याचा प्रस्ताव विद्यार्थिकेंद्री धोरणाला बासनात गुंडाळणारा आहे. परीक्षेसाठी मनुष्यबळ वाढविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. केवळ निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी देण्याऐवजी अन्य विभागांकडेही हे काम देऊन विद्यार्थ्यांची सोय करायला हवी.


‘केंद्राची सक्ती’

परीक्षा केंद्र देण्यास शाळा किंवा महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जाते. त्यामुळे सरकारी जमिनींवर असलेल्या शाळा किंवा महाविद्यालयांवर परीक्षा केंद्र देण्याची सक्ती केली जाणार आहे; तसेच यापुढे ३० हजार विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित झाल्यामुळे परीक्षा केंद्रांचीही अडचण दूर होणार आहे.

- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी निकालाचा टक्का वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यात ८९.५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णांचे प्रमाण २.९ टक्क्यांनी वाढले आहे. कोकण विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण (९५.२० टक्के) सर्वाधिक असून, मुंबई विभागातील प्रमाण (८८.२१ टक्के) सर्वांत कमी आहे. पुणे विभागात हे प्रमाण ९१.१६ टक्के आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून, त्यांच्या उत्तीर्णांचे प्रमाण (९३.०५) मुलांच्या प्रमाणापेक्षा ६.४० टक्क्यांनी अधिक आहे.

मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी निकाल जाहीर केला. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक या शाखांमधील १४,३१,२६५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी १४,२९,४७८ जणांनी परीक्षा दिली. त्यांमधून १२,७९,४०६ उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थ्यांमध्ये उत्तीर्णांची टक्केवारी ४०.८३ टक्के आहे. उत्तीर्णांचे प्रमाण २.९ टक्क्यांची वाढली असली, तरी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३८१९ आहे. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या तब्बल ६,०९,८५१ आहे. मंडळाने सामान्य गणित घेतलेल्या १,९०० विद्यार्थ्यांचा निकाल रोखला होता. तो निकाल देण्याचा निर्णय झाला आहे.

राज्यात मोठ्या संख्येने विशेष प्रवर्गातील विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यांपैकी ९३.०१ टक्के उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कॉपी प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी राज्यात एकूण ७९७ कॉपी प्रकरणे आढळून आली. गेल्या वर्षी ही संख्या ७२९ होती. एकूण १६२ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ११ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गेल्या वर्षी १० विषयांचा निकाल १०० टक्के होता. निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना ९ जून रोजी दुपारी तीननंतर त्यांच्या शाळेत वा कॉलेजमध्ये मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन साखळीचोर टोळ्यांवर मोक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी पुणे पोलिसांनी दोन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी सोनसाखळी चोरांवर केलेली ही दुसरी कारवाई ठरली आहे.
सूरज रवींद्र कांबळे उर्फ सुरेश उर्फ सुब्बा (वय ३०, रा. साईबाबा मंदिरासमोर, रामनगर येरवडा), नीलेश संजय सस्ते (वय २२, रा. काळेवाडी) अशी कोंढवा पोलिसांनी मोक्काची कारवाई केलेल्यांची नावे आहे. तीन डिसेंबरला या दोघांनी सूरज तारवाणी यांना अडवून चाकूच्या धाकाने गळ्यातील साखळी, दोन अंगठ्या जबरदस्तीने हिसकावल्या होत्या. दोघांनी एकत्रित​रित्या सात जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले होते. या दोघांसाठी कोंढवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश गोवेकर यांनी मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता.
फिरोज मिर्झा उर्फ इराणी (वय २४, रा. इराणी वस्ती, लोणीकाळभोर), मुक्तार सय्यद इनुइराणी (वय १९) आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर मोक्काची कारवाई केली आहे. इम्रान टोळीचा प्रमुख आहे. त्यानुसार भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाळे , दिलीप शिंदे यांनी तपास करून प्रस्ताव तयार केला होता. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या टीमने हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार या टोळीतील चौघांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी अनुदानाचे ८४ कोटी मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेला स्थानिक संस्था करापोटी (एलबीटी) राज्य सरकारकडून मे महिन्यात ८४.१८ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होणार असल्याने जूनमध्ये एलबीटी अनुदानाचा अखेरचा हप्ता पालिकेला प्राप्त होणार आहे.
एलबीटीच्या उलाढाल मर्यादेत बदल केल्यापासून सरकारकडून सर्व पालिकांना दर महा अनुदान दिले जाते. दर महा पहिल्या आठ-दहा दिवसांमध्ये अनुदान वितरित करण्याचे आदेश सरकारकडून दिले जातात. या महिन्याचे अनुदान देण्यास विलंब झाल्याने पालिकेच्या तिजोरीत निधी जमा होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेला ७५ ते ७८ कोटी रुपयांच्या दरम्यान अनुदान मिळत आहे. यामध्ये, दरवर्षी आठ टक्के वाढ केली जाणार असल्याने या महिन्यात पालिकेला ८४ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नुकतीच जीएसटी कायद्याला मंजुरी दिल्याने एक जुलैपासून हा कायदा अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वीच सर्व महापालिकांना जीएसटीचे अनुदान वितरित केले जाईल, असे आश्वासन विधिमंडळात दिले आहे. गेल्या काही महिन्यांत एलबीटी अनुदान वितरित करण्याबाबत चालढकल होत असल्याने जीएसटी अनुदान वेळेत मिळावे, अशी अपेक्षा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने आयटी इंजिनिअर तरुणीची ६.६८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रणती डोके (वय २६, रा. धनकवडी) हिने तक्रार दिली आहे. त्यानुसार अमोल दिलीप आढाव (रा.खराडी) , संजय नायर, श्रीकांत मारुती सुपेकर (रा.ढोले पाटील रोड), सोमनाथ बबन पाटोळे (रा. गुरूनानक नगर, भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोके या आयटी इंजिनीअर आहेत. त्यांचे शिक्षण सोलापुरात झाले असून, त्यांच्याच कॉलेजात आरोपी अमोल आढाव याने शिक्षण घेतले आहे. आढावने फेसबुकच्या माध्यमातून प्रणतीसोबत संपर्क साधला. प्रणती नोकरीच्या शोधात होत्या. त्यावेळी आढावने पुण्यातील कंपन्यांमध्ये नोकरीचे आश्वासन दिले. तसेच, तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी आणि लेखी परीक्षेसाठी तीस हजार रुपये घेतले. त्यानंतर मुलाखतीसाठी तुमची निवड झाल्याचे खोटे सांगून बँकेत पैसे जमा करायला लावले. संजय नायरने प्रणती यांची फोनवरून मुलाखत घेतली. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तयार करणे, ऑफर लेटर देणे आदी कामासाठी वेळोवेळी बँक खात्यावर रोख रक्कम जमा करायला लावले. तक्रारदार यांनी पैसे जमा करूनही आरोपींनी त्यांना संबंधित कंपनीत नोकरी मिळवून दिली नाही. तसेच, घेतलेले पैसे परत दिले नाही.
त्यामुळे प्रणती यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अप्पासाहेब वाघमळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बार्टी’ अधिकाऱ्याचा ५२ लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) पीएचडी आणि एमफीलच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या लॅपटॉपमध्ये ५१.६८ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी ‘बार्टी’तील प्रकल्प संचालकावर कोरेगांव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प संचालकाने लॅपटॉपची परस्पर विक्री केल्याचा संशय आहे. ‘बार्टी’च्या प्रभारी निबंधक सविता नलावडे (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल सिद्धार्थ रणवीर (रा. शिववंदन कॉम्प्लेक्स, भेकराई नगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्टीमध्ये रणवीर माहिती व तंत्रज्ञान विभागात प्रकल्प अधिकारी होता. तो सध्या येरवडा येथील समाजकल्याणच्या कार्यालयात कार्यरत आहे. बार्टीतर्फे मागास प्रवर्गातील निवडक विद्यार्थ्यांना पीएचडी आणि एमफीलसाठी लॅपटॉप देण्यात येतात. बार्टीत कार्यरत असताना रणवीरने जानेवारी २०१५ ते १८ जानेवारी २०१७ या कालावधीत ५१.६८ लाख रुपये किमतीच्या नवी​न १०३ लॅपटॉपची परस्पर विल्हेवाट लावली. २०१५ मध्ये निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांना एसर कंपनीचे नवीन लॅपटॉप देण्याऐवजी जुने लॅपटॉप देवून फसवणूक केली. ही बाब बार्टीच्या प्रभारी निबंधक नलावडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर चौकशी करून त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पृथ्वीच्या अंतानंतर मंगळाचा पर्याय शक्य

$
0
0

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांनी काही दिवसांपूर्वी पृथ्वी अजून शंभर वर्षे टिकेल, असे विधान केले आहे. त्यामध्ये कल्पनाविलास किंवा रंजकता नसून अभ्यास आहे. त्यामुळे, आगामी शंभर वर्षांत मनुष्याला इतर ग्रहांचा आधार घ्यावा लागेल. पृथ्वीनंतर मंगळ ग्रह सर्वांत सुरक्षित असून, तेथील तापमान, वातावरण पृथ्वीशी मिळतेजुळते आहे. त्यामुळेच भविष्यात मंगळाकडे पर्यायी जग म्हणून पाहिले जाईल,’ अशी शक्यता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांनी मंगळवारी व्यक्त केली.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या ‘पृथ्वीजिज्ञासा’ पुस्तकास स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने, अरुण करमकर यांच्या ‘पोलादी राष्ट्रपुरुष’ या पुस्तकाला चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी डॉ. नाईक बोलत होते. धनंजय बर्वे, अरुण करमरकर, श्रीकांत कार्लेकर, दिलीप ठकार, डॉ. अनुजा कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
‘चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा उपग्रह आहे. परंतु, तेथील तापमान आणि वातावरण मनुष्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यानंतर सर्वांत जवळ शुक्र आहे. तेथील तापमानही पृथ्वीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे, मंगळ ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. मंगळावर पाणी, कार्बनडाय ऑक्साइड या गोष्टी मूलभूत प्रमाणात असल्याने काही कंपन्यांनी माणसांना मंगळावर पाठवण्याची तयारी आरंभली आहे. नासादेखील इस्त्रोच्या सहकार्याने मंगळावर मानवी मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे,’ असे डॉ. नाईक म्हणाले.
‘इस्त्रोच्या चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमांमुळे संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहत आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
करमरकर, कार्लेकर यांनी पुस्तक लिहिण्यामागील भूमिका विशद केली. ‘सरदार पटेल यांच्याकडे भारतीय राजकारणाने अनेक वर्षे दुर्लक्ष केले. त्यांचे उत्तुंग कार्य समोर यावे, या हेतूने पुस्तक लिहिल्याचे करमरकर म्हणाले. पृथ्वीला मनुष्याने समजून घेण्याची गरज असल्याचे कार्लेकर यांनी नमूद केले. चारूदत्त निमकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

तर..वाढदिवस दोन वर्षांनी
पृथ्वीवरील पंधरा दिवस मिळून चंद्रावर एक दिवस होतो. पृथ्वीचे २६० दिवस मिळून शुक्रावर एक दिवस होतो. मंगळावर मात्र पृथ्वीसारखाच २४ तासांचा एक दिवस असतो. फरक एवढच की मंगळावरचे एक वर्ष पृथ्वीवरील दोन वर्षांइतके असते. त्यामुळे आपल्या सर्वांचे वाढदिवस दोन वर्षांनी येतील, असे डॉ. नाईक यांनी सांगतच सभागृहात हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधखरेदीचे टेंडर ठरावीक व्यक्तींना

$
0
0

पालिकेत गैरप्रकार उघड; फेरनिविदांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औषधखरेदीसाठी सातत्याने ठरावीक पुरवठादारांनाच टेंडर दिले जात असल्याचा आणखी एक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. अशाच प्रकारच्या चार कोटी ८० लाख रुपयांच्या दोन निविदांना स्थायी समितीने मंजुरी देण्यास नकार देऊन फेरनिविदांचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
पालिकेकडून नेहमीच्याच पुरवठादारांकडून औषधे खरेदी करण्यात येत असल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रकाशित केले होते. दरम्यान, त्याच ठेकेदारांच्या निविदांना मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना या प्रस्तावाला मंजुरी देण्यास नकार देऊन फेरनिविदांचे आदेश दिले. मात्र, फेरनिविदा काढण्यासाठी लागणाऱ्या कालावधीपर्यंत पूर्वीच्याच ठेकेदारांकडून औषध खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. हा कालावधी पंधरा दिवसांचा असेल, असेही मोहोळ यांनी सांगितले.
पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे दर वर्षी कोट्यवधींची औषधखरेदी केली जाते. औषध खरेदीसाठी काही मोजकेच पुरवठादार गेल्या काही वर्षांपासून टेंडर सादर करीत आहेत. तांत्रिक आणि व्यावसायिक असे टेंडरमध्ये प्रकार आहेत. त्यासाठी स्वतंत्र नियमावली असून, त्या आधारे पुरवठादारांनी विविध कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकांकडे काही परवाने नसल्याने किंवा पुरेशी कागदपत्रे नसल्याचे कारण देऊन टेंडर नाकारले जाते. या पार्श्वभूमीवर पुरवठादारांच्या निविदा भरण्यासाठीच्या अटी आणि शर्तींमध्येही बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालिका प्रशासनाने मंगळवारी तीन निविदाधारकांच्या निविदांना मंजुरी दिली. या निविदांनुसार आ​र्थिक तरतुदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. प्रशासानाच्या या दोन्ही निविदांबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याने फेरनिविदा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर-पुणे पॅसेंजरमध्ये टोळीची प्रवाशांना मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

सोलापूर-पुणे पॅसेंजरमध्ये किरकोळ कारणावरून २० ते २५ जणांच्या टोळक्याने सोमवारी महिला व लहान मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भीमराव लक्ष्मण भोसले (वय ४३, रा. हनुमाननगर, इंदिरा वसाहत, गणेशखिंड रोड, औंध) हे माढा रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे सहकुटुंब निघाले होते. भोसले यांच्या घरातील दहा वर्षांच्या मुलीचा पाय एका अज्ञात महिलेच्या पिशवीला चुकून लागल्याने त्या महिलेने तिच्या कानाखाली मारली. त्यावरून बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर या महिलेने मोबाइलवर फोन करून काही तरुणांना पारेवाडी रेल्वे स्टेशनला बोलावले. पॅसेंजर पारेवाडी येथे आल्यानंतर २० ते २५ तरुणांनी डब्यात प्रवेश करून हातातील रॅाड, केबल व काठ्यांनी भोसले यांच्या घरातील महिला व मुलांसह इतर प्रवाशांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

भोसले यांच्या फिर्यादीनुसार रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींना मंगळवारी (३० मे) पहाटे अटक करण्यात आली. जावेद अजीज शेख (वय २३), अशोक बाळासाहेब साळवे (वय ३२), गणेश भगवान शेलार (वय १९), महावीर ज्ञानदेव साळवे (वय २७), सागर अर्जुन शिंदे (वय २२), पद्मेश शिवराम नगरे (वय २२), पैगंबर अलाउद्दीन तांबोळी (वय २३), सुनील बंडू भोसले (वय २०), विशाल शिवराम नगरे (वय ३०), गणेश सुनील नगरे (वय २०) आणि महादेव प्रकाश ढवळे (वय २०, सर्व रा. पारेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) या अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मोबाइल करून तरुणांना बोलावणारी महिला फरारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images