Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आता येणार पर्सनल जिनोम कार्ड!

$
0
0
मानवी जनुकाचा आराखडा (ह्यूमन जिनोम सिक्वेन्स) देशात यशस्वीपणे तयार केल्यानंतर या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होऊ शकेल, असे वैयक्तिक जैविक माहितीचे (पर्सनल जिनोम इन्फॉर्मेशन कार्ड) भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

'हेरिटेज वॉक'सह फिरा टांग्यातूनही

$
0
0
मध्यवस्तीतील ऐतिहासिक ठिकाणे आणि शहराची परंपरा जोपासणाऱ्या व्यक्ती-संस्थांना 'हेरिटेज वॉक' अंतर्गत भेटी देत, नामशेष झालेल्या टांग्यातून शहराच्या पूर्व भागाची सफर अनुभवायची असेल, तर त्यासाठी आणखी केवळ महिनाभर प्रतीक्षा करावी लागेल.

साईसंस्थांनच्या ३ विश्वस्तांविरुध्द FIR

$
0
0
खोटी वाहने दाखवून साई संस्थांनाच्या तिजोरीवर चार विश्वस्तांनी प्रवास बिलापोटी लाखो रुपयांचा डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार तीन विश्वस्तांसह पाच जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

हवी आणखी एक मुंबई-पुणे गाडी

$
0
0
सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या दोन्ही गाड्यांच्यामध्ये पुण्याहून मुंबईसाठी आणखी एक गाडी सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. अशी गाडी झाल्यास प्रवाशांची सोय होईल, असे रेल ट्रॅव्हलर्स सव्हिर्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष माणिक बिर्ला यांनी सांगितले.

सोनसाखळीचोर जेरबंद

$
0
0
शनिवार पेठेत बिल्डींगखाली उभ्या असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ््यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा परप्रांतीय आरोपींपैकी एका चोरट्याला नागरिकांनी पाठलाग करत पकडले तर, दुसरा फरार झाला.

निवडणुका संपल्या अन् पाणी आटले!

$
0
0
सर्व धरणे १०० टक्के भरल्याने आनंदात असलेल्या पुणेकरांच्या तोंडचे पाणी पाचच महिन्यांत पळाले आहे. उन्हाळ्याला सुरुवातही झाली नसताना महापालिकेने पाणीकपात लागू केल्याने पुणेकरांना पाण्याचे चटके बसू लागले आहेत. आधी धोधो वाहणारे पाणी निवडणुकीनंतर कसे काय आटले?

पुणे मनपाचा विक्रम

$
0
0
पालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागातर्फे यंदाच्या आर्थिक वर्षात विक्रमी ४९७ कोटी रुपये मिळकतकर जमा झाला असून, मार्चमध्ये थकबाकीसह मिळकतकर वसुलीसाठी १४ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

EVM तक्रारींची दखल घ्या!

$
0
0
महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत मतदान यंत्रणेत (ईव्हीएम) घोळ झाल्याने अनेक उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने राजकीय पक्षांच्या 'ईव्हीएम'च्या तक्रारींची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी येथे केली.

अजित पवारांची काँग्रेसवर टीका

$
0
0
आम्हालाही वाटते 'मुख्यमंत्री' राष्ट्रवादीचा व्हावा, आमच्यावर वडीलधाऱ्यांचे संस्कार असल्याने काय मागावे काय मागू नये हे आम्हाला चांगले कळते. आजही आमचे पाय जमिनीवरच आहे. या शब्दात पवार यांनी कॉंग्रेस नेत्यांना फटकारले.

वडगावमध्ये पोलिसांवर गोळीबार

$
0
0
गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या हवेली पोलिसांच्या टीमवर गोळीबार झाल्याची घटना वडगाव बुदुक येथील तुकाईनगर येथे गुरूवारी मध्यरात्री घडली. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या टोळीतील चौघांना अटक केली असून, प्रमुख आरोपींसह तिघे फरार आहेत.

युवकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

$
0
0
हिश्श्याचे चिकन खाल्ल्याने सुधान टिपान मांजी (वय २३, रा. माणगाव, ता. मुळशी, मूळ पाटणा) या युवकाचा फावड्याने खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

पाण्यासाठी मोजा पाण्यासारखा पैसा

$
0
0
महापालिकेच्या पाणीकपातीच्या निर्णयाची झळ आता सामान्य पुणेकरांना सहन करावी लागणार आहे. 'पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर'चा वापर दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, उन्हाळ्यात पुणेकरांना पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ येऊ शकते.

...तर पाणीकपात टळली असती!

$
0
0
शहरभरात भेडसावत असलेल्या पाणीकपातीच्या संकटाचे मूळ आता समोर येऊ लागले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन महिने कालव्यातून जादा पाणी न सोडण्याचा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचा सल्ला संबंधितांनी ऐकला असता, तर मार्चच्या प्रारंभीच पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले नसते, अशी खात्रीलायक माहिती पुढे आली आहे.

२.६४TMC जादा पाणीवापरःपाटबंधारे

$
0
0
महापालिकेला मंजूर असलेल्या वाषिर्क पाण्यापेक्षा २.६४ अब्ज घनफूट (टीएमसी) जादा पाणीवापर होणार असल्याचे तुणतुणे पाटबंधारे खात्याने कायम ठेवले आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणांत पाणीसाठा कमी असल्याने शहराला पुढील साडेचार महिन्यांसाठी केवळ चार टीएमसीच पाणी दिले जाणार असल्याचा हेकाही खात्याने कायम ठेवला आहे.

आयुक्तांचा राष्ट्रवादीला सल्ला

$
0
0
'काही वेळा लोकानुनयी निर्णय घेण्याने शहराचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे धाडस दाखवून चांगल्या निर्णयासाठी नागरिकांचे मन वळविण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत,' असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी शनिवारी केले.

काँग्रेस गटनेतेपदी अरविंद शिंदे

$
0
0
पुणे महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांची शनिवारी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या संमतीनंतर शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले.

गैरहजर विद्यार्थी झाले उत्तीर्ण

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या सेकंड एअर इंजिनीअरिंगच्या परीक्षेस गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्याला 'एम-थ्री' विषयात उत्तीर्ण करण्यात आले आणि ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा निकालच राखून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कार्यक्षमतेविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

टँकरचालकांना पालिकेचा चाप

$
0
0
पाणीकपातीच्या काळात टँकरसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारणाऱ्या टँकरचालकांना महापालिकेने चाप लावला आहे. टँकरसाठी ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक दर आकारणाऱ्यांचे टँकर ताब्यात घेण्यात येतील, असा इशारा शनिवारी देण्यात आला.

प्रेमी युगुलाची आत्महत्या

$
0
0
लग्नास नकार दिल्याने प्रेमी युगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बारामती तालुक्यातील पणदरे गावात ही घटना घडली.

मनपाचे कारभारी १५ मार्चला ठरणार

$
0
0
शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या पंधरा मार्च रोजी होणार आहे. पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहाची पहिली सभा त्यादिवशी भरणार असून, त्यामध्ये या पदांची निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी देण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images