Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मी जाड, काळी सुंदर आहे’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अभिनेता अभय देओल याने काही दिवसांपूर्वी फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर आपले परखड मत व्यक्त केले. अशी उत्पादने फसवी असून, जे कलाकार त्या उत्पादनांच्या जाहिराती करतात, तेही सर्वसामान्यांना फसवतच असल्याचे त्याचे मत होते. याच अनुषंगाने ‘मी जशी आहे, तशी सुंदर आहे’ नावाचा उपक्रम नुकताच जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी पार्क येथे झाला.

‘अभिव्यक्ती’ ग्रुपच्या वतीने आयोजित या उपक्रमात त्वचेचा काळा रंग, जाड असणे यांना विरोध करण्यात आला आणि सौंदर्याची जनमानसात रुजलेली आणि ठसलेली व्याख्या बदलण्याची गरज असल्याची जनजागृती करण्यात आली. व्यक्ती जशा आहेत, तशाच सुंदर आहेत, यावर या उपक्रमात भर देण्यात आला. ‘काळं असणं वाईट नाही’, ‘गोरं असणं वरदान नाही’, ‘मी जाड, काळी सुंदर आहे’ असे लिहिलेले फलक हाती घेऊन १३ ते १५ तरुण – तरुणी संभाजी पार्कच्या मुख्य दरवाजापाशी उभे राहून जनजागृती करत होते.

‘फसव्या जाहिरातींना भुलू नका, जाहिरातींनी आपल्यावर ठसवलेले स्त्रीचे गोरेपण अयोग्य आहे, टीव्ही, सिनेमा आणि जाहिरातींसारखी माध्यमे आणि सेलिब्रेटींच्या ठसवण्यामुळे तयार झालेली गोरेपणा म्हणजेच सौंदर्य, ही सौंदर्याची व्याख्या योग्य नाही, जाडेपणाचा तिरस्कार करणे चुकीचे आहे,’ हे मुद्देसुद्धा हे तरुण उत्सुकतेपोटी येऊन विचारणाऱ्यांपर्यंत पोहोचवत होते. सायंकाळी सात वाजल्यापासून संभाजी पार्कपाशी सौंदर्याच्या व्याख्येवर पुनर्विचार करण्याविषयी सुचवणाऱ्या या तरुणांनी विविध वयोगटातील लोकांपर्यंत त्यांचा संदेश नेमक्या पद्धतीने पोहोचवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामर्थ्यवान पिढीसाठी संग्रहालये गरजेची

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ संग्रहालये महामानवांची समाजातील उणीव भरून काढतात. अनेक तरुणांच्या प्रेरणेचा शोध संग्रहालयात येऊन संपतो. येणाऱ्या पिढ्या सामर्थ्यवान घडवण्यासाठी संग्रहालयांची गरज आहे, त्यामुळे भविष्यात प्रत्येक संग्रहालय ज्ञानपीठ म्हणून उदयास यायला हवे,’ अशा अपेक्षा राज्याच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे नवनिर्वाचित संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी व्यक्त केल्या. ‘गेल्या काही वर्षात पुरातत्व आणि संग्रहालयांच्या संदर्भातील रखडलेली कामे पूर्ण करणार असल्याचे,’ आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सिम्बायोसिस विद्यापीठातर्फे पुण्यातील बारा संग्रहालयांमधील वस्तूंचे एकत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन डॉ. गर्गे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं. देगलूरकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. संजीवनी मुजुमदार आदी या वेळी उपस्थित होते.
‘मराठ्यांचा सामर्थ्यवान इतिहास आपण अभिमानाने सांगतो. त्यांना झालेल्या जखमा घेऊन आपण आनंदाने मिरवतो. तसे करणे गैर नाही. मात्र, युद्धाची माहिती देणारी संग्रहालये ही युद्ध पुन्हा होऊ नये, यासाठी असायला हवीत. परदेशात ‘शेम म्युझियम’ नावाचा प्रकार आहे. आपल्या पूर्वजांनी जी वाईट कृत्ये केली आहेत. ती पुढील पिढ्यांनी करू नयेत, यासाठी आहेत. संग्रहालये आपल्याला प्रेरणा देतात. त्यामुळेच प्रत्येक संग्रहालये ज्ञानपीठ व्हायला हवे. पुढील काळात त्यासाठीच प्रयत्न करणार आहे,’ असे डॉ. गर्गे यांनी सांगितले.
‘आपण पुण्यात राहून कधी संग्रहालयाची पायरी चढत नाही. आपल्या मुलांना ५०० रुपयांचे तिकीट काढून चित्रपट दाखवतो; मात्र संग्रहालयात नेत नाही. अशाने मुलांमध्ये जुन्या वस्तूंची आवड कशी निर्माण होणार ?,’ असा प्रश्न डॉ. देगलूरकर यांनी उपस्थित केला. ‘मुलांना जुन्या वस्तूंची गोडी लावण्यासाठी त्यांच्या घरातील ज्येष्ठांच्या ५० ते १०० वर्षे जुन्या वस्तू कपाटात जतन करून ठेवणे गरजेचे आहे,’ असे त्यांनी सांगितले. रवीकिरण साने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

‘सरकारवर का अवलंबून राहायचे ?’
‘संग्रहालयांची देखभाल होत नाही म्हणून वारंवार सरकारला दोष दिला जातो; पण प्रत्येकवेळी सरकारवर का अवलंबून राहायचे,’ असा डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी उपस्थित केला. ‘पुण्यात शेकडो उद्योगपती आहेत. प्रत्येकाने एक संग्रहालय दत्तक घेतले तरी त्याची योग्यपद्धतीने निगा राखली जाईल,’ असे सांगून मुजुमदार यांनी उद्योगपतींना आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ‘महावितरण’कडे पुरेसे साहित्य

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे परिमंड‍ळात वीजयंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य ग्राहकांनी आणून देण्याची गरज नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सदाशिव पेठेतील नीलसदन या सोसायटीला वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी साहित्य मागितल्याप्रकरणी संबंधित जनमित्रास निलंबित करण्यात आले; तर इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
महावितरणकडून या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी नीलसदन सोसायटीमध्ये जाऊन निवृत्त मेजर जनरल एस. सी. एन. जठार यांची भेट घेतली व दुरुस्तीसाठी साहित्य मागितल्याप्रकरणी माहिती घेतली. पुणे परिमंडळातील मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पावसाळी परिस्थितीमध्ये वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक व पुरेसे साहित्य सर्व मंडळ आणि विभाग कार्यालयांकडे उपलब्ध आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक दुरुस्तीच्या कामांसाठी कंत्राट देण्यात आले असून, कंत्राटदारांना आवश्यक साहित्याच्या पुरवठ्यासह (टर्न-की बेसिस) देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आलेले आहे.
मुख्य कार्यालयाकडून आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध होत असून, परिमंडळ, मंडळ आणि विभाग कार्यालयांना आवश्यक सुरक्षा साधने; तसेच तांत्रिक साहित्य खरेदीचेही अधिकार आहेत. वीज वितरण यंत्रणेची तांत्रिक दुरुस्ती व देखभाल; तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी सर्व साहित्यांचा महावितरणकडून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांवर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही आर्थिक जबाबदारी नसल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बंडगार्डन परिसरात
वीजपुरवठा खंडित
रस्त्याच्या खोदकामात महावितरणची २२ केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने गुरुवारी बंडगार्डन परिसरातील सुमारे चार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
नायडू हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमीजवळ हॉटेल शेरेटनच्या ड्रेनेज पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी खासगी कंत्राटदाराकडून जेसीबीने खोदकाम सुरू होते. महावितरणच्या नायडू उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी २२ केव्हीची वीजवाहिनी दुपारी पावणे एक वाजता तुटली. त्यामुळे ढोले पाटील रोड, बोट क्लब, बंडगार्डन रोड, गुगल लेन, माणिकचंद आयकॉन, लडकतवाडी परिसरातील सुमारे चार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
नायडू उपकेंद्रातून भारव्यवस्थापन शक्य नसल्याने पर्यायी व्यवस्थेतून या परिसराला वीजपुरवठा उपलब्ध करून देणे शक्य झाले नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तुटलेल्या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएएस’ नियुक्तीला विरोध

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याच्या पणन संचालक आणि पणन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय होऊन पंधरा दिवस लोटले, तरी त्याची अंमलबजावणी होण्यास तयार नाही. सहकार आणि पणन विभागातील लॉबीच्या विरोधामुळेच या नियुक्तीला ब्रेक लागल्याची चर्चा राज्यभरात सुरू झाली असून, नोकरशाहीतील वाद यानिमित्ताने उफाळून आले आहेत.
राज्याच्या पणन संचालकपदी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत गेली अनेक वर्षे चर्चा सुरू होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही कोंडी फोडली आणि आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. या पदावर नियुक्तीही करण्यात आली. मात्र, त्याला पंधरा दिवस लोटल्यानंतरही नव्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारलेली नाहीत. त्यामुळे विभागात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सहकार आणि पणन विभागाच्या केडरमधील अधिकाऱ्यांचा आयएएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीला विरोध असल्यामुळेच ही प्रक्रिया थांबल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने कृषिपणन क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा ठरणार आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या कारभारावर देखरेख ठेवणे, नवे परवाने देणे, ही जबाबदारी पणन संचालकांकडे आहे. तसेच, राज्य कृषिपणन मंडळाकडेही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असून, शेतमालाचे मार्केटिंग आणि निर्यात या मंडळामार्फत होते. या क्षेत्रात राज्यात हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याने यातील संस्थांवर नियंत्रण ठेवण्याकडे सर्वांचाच ओढा राहिला आहे. या सर्व कारभारात शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, झारीतील शुक्राचार्यांमुळे तो अडल्याचे सांगण्यात येत आहे. या हजारो कोटी रुपयांच्या उलाढालीवरील नियंत्रण सोडण्यास एका लॉबीचा विरोध असल्यामुळेच हे घडत असून त्यामुळे दोन केडरमधील वाद समोर आले आहेत.
राज्यातील साखर कारखानदारीच्या क्षेत्रातही हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखर आयुक्त पदावर आयएएस अधिकाऱ्याची पूर्वीपासून नियुक्ती होते. पणन क्षेत्रातील उलाढाल त्याहून मोठी आहे. मात्र, त्यावर अद्यापही आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती का होत नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडेही याबाबत चर्चा झाली असून, त्यांच्यासह राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलमध्ये मिळणार अपंगांना प्रमाणपत्र

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी शहरी भागातील हास्पिटलमध्ये यंत्रणा कार्यान्वित करावी,’ अशी लेखी सूचना राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांना केली जाणार असल्याची माहिती राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी दिली.
सरकारच्या ऑक्टोबर २०१२मधील अध्यादेशानुसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी प्रत्येक आठवड्यात बुधवारी किंवा शुक्रवारी अपंग प्रमाणपत्र वितरणाचे काम करण्याचे आदेश आहेत. मात्र, सध्या केवळ जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे प्रमाणपत्र वितरित केले जाते. यामध्ये अपंगांची हेळसांड होत असून, ग्रामीण भागातून त्यांना शहरात यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हे असेच सुरू आहे. ही बाब ‘मटा’ने समोर आणली होती.
अपंगांच्या प्रमाणपत्र वितरणासाठी करावयाच्या तपासणीसाठी विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपजिल्हा रुग्णालय स्तरावर सर्व अपंग प्रमाणपत्र वितरित करणे शक्य नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले होते. तसेच, अपंग प्रवर्गाच्या कर्णबधिर प्रवर्गात बोगसपणा अधिक आहे. त्यामुळे ही तपासणी चांगली व अद्ययावत पद्धतीने होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा उपरुग्णालय किंवा तालुका पातळीवर ही तपासणी शक्य नाही, त्यामुळे अपंग प्रमाणपत्रासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय किंवा जिल्हा रुग्णालयातच यावे लागते, असे स्पष्टीकरण आयुक्त पाटील यांनी दिले.
‘मात्र, जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही तपासणी व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास यंत्रणेवरील ताण हलका होऊन अपंग व्यक्तींची गैरसोय टळेल,’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारी पातळीवर प्रयत्न नाही
तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अपंगांचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे कारण सुरुवातीपासून दिले जात आहे. मात्र, इतक्या वर्षात अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम यंत्रणेची उभारणी करण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटायजेशन प्रक्रिया बेभरवशाची

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

@chintamanipMT

पुणे : जगात सर्वत्र दुर्मिळ चित्रपट, पुस्तके, छायाचित्रे असा ठेवा जतन करण्यासाठी डिजिटायजेशनवर भर दिला जात असताना हे माध्यम दीर्घ काळासाठी फायद्याचे नाही. ते बेभरवशाचे आहे, असे संशोधन पुढे आले आहे. ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या ‘अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस’ (अॅम्पास) या संस्थेने हे संशोधन केले आहे. करोडो रुपये खर्च करून दुर्मिळ साहित्याचे डिजिटायजेशन करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

‘अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’तर्फे ‘डिजिटल डायलेमा’ हा प्रबंध दोन भागांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. मिल्ट शेफ्टर हे त्याचे लेखक आहेत. दुर्मिळ चित्रपट, पुस्तके, छायाचित्रे; तसेच अशा प्रकारचे विविध साहित्याचे जतन करण्यासाठी डिजिटायजेशन ही आदर्श प्रकिया मानली जाते. ही प्रक्रिया खर्चिक असली, तरी साहित्याच्या जतनासाठी ती सर्वत्र अंमलात आणली जाते. अशा वेळी या संशोधनामु‍ळे या डिजिटायजेशनच्या कामांना खीळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिजिटायजेशन बेभरवशाचे असल्याचे संशोधन केले असले, तरी माहितीचा ठेवा दीर्घ काळ सुरक्षित राहण्यासाठी पर्यायी यंत्रणेचा उपाय त्यामध्ये देण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी ‘मटा’ला दिली.

हा प्रबंध भारतीयांपर्यंत; तसेच देशातील विविध संस्थांपर्यंत पोहोचावा म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने ते हिंदी भाषेत अनुवादित करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षाअखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे. चित्रपटांच्या फिल्म आणि डिजिटल या माध्यमांमध्ये जतनाच्या दृष्टीने फरक असतो. डिजिटल माध्यमातील चित्रपट दीर्घ काळ जतन करण्यासाठी वेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते, त्याबाबत यामध्ये महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत देशातील चित्रपटांचे डिजिटायजेशन करण्यासाठी २०२१ पर्यंत ६०० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याचे काम संग्रहालयाने सुरू केले आहे.

‘डिजिटल माध्यमात चित्रपटांच्या साठवणूक करण्याच्या तंत्राबद्दल या प्रबंधात माहिती देण्यात आली आहे. चित्रपट संस्था; तसेच डिजिटल स्वरूपात माहिती साठवणूक करणाऱ्या इतर संस्था व विभाग यांच्यासाठी हा प्रबंध महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते हिंदी भाषेत अनुवादित करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्यास ‘अॅम्पास’ने मान्यता दिली आहे,’ असे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.


डिजिटल माध्यमातील आव्हानांवर प्रबंधात भाष्य करण्यात आले आहे. डिजिटल प्रक्रिया दीर्घकालीन उपयोगाची नाही, असे संशोधनातून मांडण्यात आले आहे. तत्कालीन फायद्याचे म्हणून डिजिटल माध्यम ठीक आहे. साहित्य आणि माहिती डिजिटल केली, तरी ती कायम अद्ययावत करण्याशिवाय पर्याय नसल्याची सूचना करण्यात आली आहे.

- प्रकाश मगदूम, संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सई परांजपेंच्या ग्रंथास पुरस्कार

$
0
0

पुणे : ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा इंदिरा-भालचंद्र पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘सय-माझा कलाप्रवास’ या ग्रंथास जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

येत्या शनिवारी (२० मे) सायंकाळी साडेसहा वाजता, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या लकाकी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. नाट्यलेखनाव्यतिरीक्त नाट्यविषयक लिखाण करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. त्यामध्ये आत्मचरित्र, आत्मकथन, नाट्यविषयक वैचारिक लेखन यांचा समावेश असतो. या आधी विजया मेहता (झिम्मा), डॉ. अजय वैद्य (मास्टर दत्ताराम नाट्यवीर), मोहन जोशी (नट-खट) आणि रत्नाकर मतकरी (माझे रंग प्रयोग) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुणे नगर वाचन मंदिर या संस्थेच्या वतीने या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आई म्हणजे दुसरे आकाश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आईचे ऋण कधीच फेडता येत नाही. आई नुसता जन्म देत नाही, तर प्रकाश दाखवते. जगण्याचे बळ तिच्याकडून मिळते. खरे तर आई एक विद्यापीठच असते. आईची तुलना आकाशाशिवाय दुसऱ्या कुणाशी करता येणार नाही,’ अशी भावना व्यक्त करून ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.

बिबवेवाडी येथील लेक टाउनमध्ये मातृदिनानिमित्त ‘आईवरील कविता’ वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. कवी उद्धव कानडे व अलका कुंभार यांनी आईवरील अनेक कवितांचे वाचन करून आईच्या आठवणी जागवल्या. कॉ. विजयकुमार देशमुख या वेळी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, ‘समाजात घडून गेलेल्या थोर पुरुषांना, महामानवांना त्यांच्या आईनेच वाट दाखवली. पराक्रमाचा नवा इतिहास आईनेच निर्माण केला. प्रतिभावंत लेखकांना त्यांच्या आईनेच बळ दिले. आजही समाजात आई आपल्या मुलावर संस्कार करून त्याला घडवते, मार्ग दाखवते. कितीही संकटे आली, तरी त्याला तोंड देत खंबारपणे उभे राहण्याची ताकद आईमुळे मिळते. तिचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही.’ उद्धव कानडे आणि अलका कुंभार या जोडीने उत्तरार्धात आईविषयी सादर केलेल्या अनेक कवितांनी उपस्थित रसिक भावूक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यातील मुले चित्रपटसृष्टीत

$
0
0



पुणे : चित्रपट कसे निर्माण होतात, चित्रीकरण कसे असते, सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपट महामंडळ म्हणजे काय, हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये फरक तो काय...असे एक ना अनेक प्रश्न ‘त्यांच्या’ जिज्ञासू वृत्तीतून पुढे येत होते आणि प्रत्येक उत्तरागणिक त्यांची जिज्ञासा अधिकच वाढत होती. मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या मुला-मुलींनी चित्रपटसृष्टीचे जग नुकतेच समजून घेतले.

‘आंघोळीची गोळी’ आयोजित ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना; तसेच काही अनाथ मुलांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी नुकताच संवाद साधता आला. मराठवाड्यातील दुष्काळी भागातील या मुलांपैकी कुणाला अभिनेता व्हायची इच्छा होती. तर, कुणाला कॅमेराचे कुतूहल होते. अशा अनेकांनी आपली स्वप्ने उलगडून दाखवली. राजेभोसले यांनीही मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांना प्रगतीच्या नव्या वाटा उलगडून दाखविल्या. चित्रपटसृष्टीतील किस्से आणि व्यक्तिमत्त्वांविषयीही त्यांनी सांगितले. माधव पाटील यांनी उपक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगितली. जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले. शरद बोदगे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरून पक्षांत मतभेद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग पालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावरून प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे याबाबतच्या प्रस्तावावरील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील भक्ती-शक्ती चौक ते हॅरिस ब्रीज दापोडी हा पुणे-मुंबई रस्ता, मुकाई चौक रावेत ते सांगवी फाटा राजीव गांधी पूल हे दोन्ही रस्ते तसेच राज्य महामार्गावरील देहू ते आळंदी आणि दिघी ते आळंदी हे दोन रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशी इंद्रीयणी नदीपर्यंतचा रस्ता आणि पश्चिम बाह्यवळण महामार्गावरील किवळे-मामुर्डी ते वाकड मुळा नदीवरील पुलापर्यंत हे दोन्ही रस्ते पालिकेकडे वर्ग करावेत, असा प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटक सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, विभागप्रमुख अनिल सोमवंशी, अभिमन्यू लांडगे, नीलेश मुटके उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने प्रामुख्याने नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदीपर्यंतचा रस्त्याच्या वर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शविला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचए) ताब्यातील या मार्गाच्या दुतर्फा सुरू असलेली दारू दुकाने पूर्ववत चालू ठेवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा आरोप केला आहे. वर्गीकरणाच्या या प्रस्तावास शिवसेनेचा विरोध असून महापालिकेने नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदीपर्यंतचा रस्ता कदापि वर्गीकृत करू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. रहदारीचा प्रमुख मार्ग असलेल्या या बारा किलोमीटरच्या अंतरावर प्रवाशांच्या सोयीसाठी उन्नत (एलीव्हेटेड) बीआरटीएस प्रकल्प सुरू करावा, अशी सूचना या वेळी करण्यात आली.

नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदीपर्यंतचा रस्ता सहा पदरी करण्यात येणार आहे. त्या संदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत गेल्या वर्षी बैठक झाली. त्या वेळीही काही लोकप्रतिनिधींनी हा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली. तथापि, ती फेटाळण्यात आली होती, याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. रस्ते विकसनासाठी महापालिकेकडे हजार कोटी रुपयांचा निधी आहे का, अशी विचारणा करून महापालिकेने केवळ जागा उपलब्ध करून द्यावी. केंद्र सरकार रस्ता विकसित करेल, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले होते. तरीही, गेल्या वर्षभरात भूसंपादन करण्यास महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केली. अद्यापही भूसंपादनासाठी कार्यवाही झाली नाही, असे निदर्शनास आणून देण्यात आले.

नागपूरच्या धर्तीवर नाशिकफाटा ते मोशी इंद्रायणी नदीपर्यंतचा महामार्ग रस्त्यावर उन्नत (एलिव्हेटेड) बीआरटीएस प्रकल्प सुरू करावा, अशी सूचना शिवसेना शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही त्यास मंजुरी दिली आहे. आता महापालिका अधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी एकत्रितपणे उन्नत बीआरटीएस प्रकल्पाचे आराखडे, संकल्पचित्र तयार करतील. त्यास केंद्रीय पातळीवर मान्यता आणण्याचे काम करू, असे आश्वासन आढळराव-पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत.



रस्त्याचे नाव / सद्यस्थिती

निगडी ते दापोडी / हस्तांतरित

रावेत ते सांगवी / हस्तांतरित

देहू ते आळंदी / हस्तांतरित

दिघी ते आळंदी / हस्तांतरित

नाशिकफाटा ते मोशी / प्रस्तावित

किवळे-मामुर्डी ते वाकड / प्रस्तावित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाड काढल्याचा संशय; मुलांची धिंड

$
0
0

कर्वेनगर येथील प्रकार; चौघांना केली अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून तेरा वर्षीय दोन मुलांना बेदम मारहाण करून त्यांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा प्रकार कर्वेनगर येथील मावळे आळी येथे मंगळवारी घडला. या प्रकरणी वारजे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
नवीन कुंदन खुराना (वय ४७), यश नवीन खुराणा (वय १९), राजू पिराराम देवासी (वय २४), प्रदीप श्रीकृष्ण साळुंखे ( वय ३५, सर्व रा. शिवगंगा सोसायटी, कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि नवीन खुराना यांची मुलगी कोथरूड येथील एका शाळेत शिकतात. पीडित मुलाने आपल्या मुलीची छेड काढून तिला त्रास असल्याचा खुराणा यांचा समज झाला. मंगळवारी सायंकाळी पीडित आणि त्याचे दोन मित्र कर्वेनगर येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. रात्री आठच्या सुमारास मित्राला सोडण्यासाठी तो कर्वेनगर येथील मावळे आळी येथे गेला. तेथे रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकड्यावर हे दोघे गप्पा मारत बसले होते.
त्याचवेळी नवीन खुराना यांचा मुलगा यश, राजू आणि प्रदीप इतर दोघेजण तेथे आले. तू आमच्या मुलीला का छेडतोस असे विचारून त्यांना लाथाबुक्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांचे कपडे फाडून नग्नावस्थेत त्यांची धिंड काढण्यात आली. रस्त्यावरून येणारे- जाणारे लोक हा सर्व प्रकार बघत होते. या मारहाणीचे व्हिडिओ शुटिंगही करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलाच्या आईला तो पाहिला. त्यानंतर त्यांना धक्काच बसला.
या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. मुलांची धिंड काढण्यात आल्यानंतर मुलीच्या वडिलांनीही संबंधित दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पीडित मुलाच्या आईने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. मारहाण करणाऱ्यांनीच घटनेचा व्हिडिओ काढला आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वा. सावरकरांच्या जन्मदिनी तैलचित्राचे अनावरण

$
0
0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात येत्या २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र बसविण्यात येईल, असे आश्वासन महापौर नितीन काळजे यांनी गुरुवारी दिले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शिष्टमंडळाने महापौर काळजे यांची भेट घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशीच पालिका सभागृहात सावरकरांचे तैलचित्र बसविण्याची मागणी केली. त्या वेळी त्यांनी आश्वासन दिले. उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार या वेळी उपस्थित होते. शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, पुष्कराज गोवर्धन, राजन बुडुख, सुहास पोफळे, सुनील देशपांडे, महेश बारसावडे, मुकुंद कुलकर्णी, पियुष अवटी, माधुरी ओक, संदीप बेलसरे, गोपाळ कळमकर, अशोक पारखी, महेश कुलकर्णी यांचा समावेश होता.

पालिकेच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र बसविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. हे तैलचित्र २८ मे रोजी बसविण्यात येईल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत २८ मे रोजी दुपारी एक वाजता तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्या निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेत नव्याने रूजू झालेल्या आणि सहा महिन्यांच्या सुट्टीवरुन परतलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडील खात्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी शीतल उगले यांची नियुक्ती झाली आहे. गेले सहा महिने प्रसुती रजेवर असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार नुकत्याच रूजू झाल्या. त्यामुळे जगताप यांच्याकडील खात्यांचे उगले आणि देशभ्रतार यांना नव्याने वाटप करण्यात आले. उगले यांच्याकडे जनरल आणि इस्टेट तर देशभ्रतार यांच्याकडे विशेषचा पदभार सोपविण्यात आला आहे.

देशभ्रतार यांच्याकडील खाती :
प्रकल्प, वाहतूक नियोजन, नदी सुधारणा, बीआरटी, उड्डाणपूल, विशेष प्रकल्प, समाज विकास विभाग, परिमंडळ विभाग क्र. दोन आणि तीन, सुरक्षा विभाग, पथ विभाग, सामान्य प्रशासन, स्थानिक संस्था कर, कामगार कल्याण, मुद्रणालय, उद्यान, उपायुक्त विशेष विभाग, पीएमपीएमएल, आकाश चिन्ह आणि परवाना, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, बीओटी सेल, भांडार, बीएसयूपी, निवडणूक विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, घनकचरा आणि मोटार वाहन विभाग.

उगले यांच्याकडील खाती :
बांधकाम, मालमत्ता आणि व्यवस्थापन, मुख्य लेखा, वित्त, विधी, लेखा परिक्षण, भूसंपादन, तांत्रिक, जिल्हा नियोजन व विकास समिती, भवन रचना, समाज कल्याण, माहिती व तंत्रज्ञान, नगरसचिव, परिमंडळ एक, चार आणि पाच, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन, टेंडर सेल, आरोग्य विभाग, झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन, एसआरए, कर आकारणी, करसंकलन, विद्युत, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अवैध दारू विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या भूगाव येथील ‘वाइल्ड वूड्स’ या हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कारवाई केली. या वेळी पोलिसांनी तिघांना अटक करून चार हजार ९९० रुपयांची अवैध दारू जप्त केली. अनिल नारायणराव भुदाडे (वय ४२ रा. विमाननगर, येरवडा) सुनील प्रल्हाद जोशी (वय ७९ रा, भूगाव ) एकलव्य मलिक (वय ३२ रा. भूगाव ) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अवैध दारूविक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपार गुंडास अटक

चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने चिंचवड येथील पवनानगर भागात तडीपार गुंडास नुकतीच अटक केली आहे. या वेळी त्याच्याकडून एक तलवारही जप्त करण्यात आली. रणजित बापू चव्हाण (वय २४ रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मारामारी व दहशत पसरविण्याच्या गुन्ह्याखाली एका वर्षापासून तडीपार आहे. तडीपारीचे पालन न करता तो चिंचवड परिसरात फिरतच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चव्हाण याला अटक केली. चव्हाण याच्यावर वाकड पोलिस ठाणे व वडगाव मावळ पोलिस ठाण्यात मारामारी, धमकावणे, दरोड्याचा प्रयत्न करणे, दहशत पसरवणे, असे गुन्हे दाखल आहेत.

मांडव जाळल्याप्रकरणी महिलेला अटक

पुणे : प्रियकाराने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून त्याच्या लग्नाचा मांडव आणि गाडी जाळल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

या प्रकरणी सुषमा गणपत टेमघरे (वय ३६ रा. शनीनगर) हिला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनीनगर भागात एक दुचाकी गाडी, एक रिक्षा व लग्नासाठी घरासमोर घातलेला मांडव जाळण्याचा प्रकार झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

शनीनगर भागातील जो प्रकार घडला, तो एका महिलेने केला असून ती डी. मार्ट दत्तनगर येथे पळून जाण्यसाठी उभी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. टेमघरेला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. तिचे दीपक हरिभाऊ रेणुसे याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने लग्नाला नकार दिला होता. दुसऱ्या मुलीबरोबर त्याचे लग्न असल्यामुळे त्याचा राग मनात धरून त्याची गाडी जाळली. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या लग्नाच्या मांडवावर रॉकेलचे पेटते बोळे टाकल्याचे तिने कबूल केले. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंडे, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रशाळा शिक्षकांना दिलासा

$
0
0

कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार; वैद्यकीय लाभ मिळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील रात्रशाळा आणि ज्युनियर कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता वैद्यकीय सुविधांसोबत सेवेतील इतर लाभही मिळणार आहेत.
राज्यात १७६ माध्यमिक रात्रशाळा, ५६ ज्युनियर कॉलेज आणि ८ सीनियर कॉलेज आहेत. त्यामध्ये मिळून ३३,५८० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळा-कॉलेजांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या २,१००पेक्षा अधिक आहे. त्यापैकी एक हजार ३५८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी दिवसा पूर्णवेळ आणि रात्री अर्धवेळ शाळा-कॉलेजांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची नोकरी दुबार होत होती. त्यामुळे सरकारी तिजोरीवर ३४.५० कोटींचा अतिरिक्त बोजा पडत होता.
मात्र, सरकारच्या या निर्णयाचा फायदा गेल्या अनेक वर्षांपासून रात्रशाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांना होईल. त्यांची संख्या सुमारे ६१० इतकी आहे. दुबार नोकरीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी शिक्षण विभागाने निर्णय घेऊन रात्रशाळा आणि ज्युनियर कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता शिक्षक-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियामवलीनुसार वैद्यकीय सुविधा आणि सेवेतील इतर लाभ मिळणार आहेत.
दरम्यान, आता शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतरत्र दुबार नोकरी करता येणार नाही. तसेच, रात्रशाळा आणि कॉलेजांना बायोमेट्रिक प्रणाली लावावी लागेल. या कर्मचाऱ्यांना सेवा मिळण्यासाठी प्रा. अविनाश ताकवले, निरंजन गिरी, सुनील सुसरे, दर्शना पांडव यांच्यासह शिक्षक आमदारांनी प्रयत्न केले. या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा. ताकवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि विभागाचे सचिव नंदकुमार यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक उद्योगाला भविष्यात संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘पाच लाखांहून जास्त लोकसंख्येच्या शहरातील प्लास्टिक गोळा करून त्याचा रस्त्याच्या कामामध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्लास्टिक उद्योगाला भविष्यात चांगली संधी आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.

पिंपरी-चिंचवड प्लास्टिक असोशिएशनचा वर्धापनदिन आणि पुरस्काराचे वितरण चिंचवड येथे नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, बाबू नायर, मधुकर बाबर, अनिल भांगडिया, नितीन कोंढाळकर, आनंद राजदेरकर, शशी रामुगडे, सिद्धार्थ परमार, अरुण कुंबोजकर, रवी जसनानी, पंकज गर्ग या वेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘प्लास्टिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पूर्वी पाण्यासाठी शेतातील चरातून पाणी दिले जात होते. त्यानंतर लोखंडी, सिमेंटचे पाइप आले. आता प्लास्टिकचे पाइप आले असून, ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. घरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर होत आहे. या चांगल्या गोष्टींबरोबर त्याचा जास्तीचा वापर डोकेदुखीचा होत आहे. परंतु, यातूनही मार्ग काढला जाईल.’

प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर यांनी केले. नितीन गट्टाणी यांनी आभार मानले. अश्विन गर्ग यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी ‘पॉलिमर आयकॉन पुरस्कारां’चे वितरण झाले. तळवडे येथील रवी अॅन्ड कंपनीला ‘इमर्जिंग कंपनी ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला. नंद कॉम्पोझेट कंपनीला ‘नावीन्यपूर्ण उद्योजक’ पुरस्कार, प्रदीप प्लास्टिक मोलडर्स कंपनीला ‘पॉलिमर कंपनी ऑफ द इयर’ पुरस्कार, रधनिका प्रधान यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला.

असोशिएशनची २०१७ ते २०१९ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये नितीन कोंढाळकर (अध्यक्ष), नितीन गट्टानी (उपाध्यक्ष), सुनील गोसावी (सरचिटणीस), संदीप लखानी (खजिनदार), कन्हैयालाल खत्री (सह खजिनदार) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘स्मार्ट’पेक्षा आनंदी शहराची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘सध्या आपले शहर स्मार्ट करण्यासाठी आणि पर्यायाने परकीय गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. स्मार्ट सिटी हे खरे तर गौडबंगाल आहे. त्यामुळे शहर स्मार्ट होण्यापेक्षा आनंदी व्हावे, यासाठी प्रयत्न गरजेचा आहे,’ असे मत ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, महाराष्ट्र राज्य विकास औद्योगिक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष सुदाम मोरे, उपाध्यक्ष बाजीराव सातपुते, मनोहर पारळकर आदी या वेळी उपस्थित होते.

‘ग्रॅप फायर इंडस्ट्रीज’चे व्यवस्थापकीय संचालक गजानन चरपे यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार, तर उद्योग विभूषण पुरस्कार एक्सलंट डायिस एंड मोल्ड्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहरसिंग वर्मा यांना प्रदान करण्यात आला. उद्योग भूषण पुरस्कार प्रेरणा किचन रॅक्सचे संचालक प्रवीण शिंदे, डायमंड इंडस्ट्रीजचे संचालक राघवेंद्र दलाल यांना देण्यात आला. मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीजच्या व्यवस्थापकीय संचालक राजश्री गागरे यांना उद्योग सखी पुरस्कार, राज इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजेश पालवे यांना उद्योग विकास पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरसेविका म्हणून निवडून आल्याबद्दल प्रियांका बारसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शेजवलकर म्हणाले, ‘शहर स्मार्ट होताना शहरवासीयांच्या प्राथमिक बाबींकडे डोळेझाक तर होत नाही ना, हे पाहणे अग्रक्रमाचे ठरते. शहरात नवनव्या गोष्टी असाव्यात, याची भुरळ पडण्यापेक्षा शहरवासीयांना काय हवे आहे, याचा साधकबाधक विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्मार्ट या बिरुदापेक्षा शहवासीयांचा आनंद, समाधान हे पाहणे महत्त्वाचे ठरते.’ ‘आपला देश घडवणारे हात कष्टकऱ्यांचे आहेत. प्रत्येक सामान्य माणसांत एक असामान्य शक्ती आहे. माणसाने अंतर्मुख होऊन ती शक्ती ओळखावी. आपल्या मर्यादांवर मात करून आपल्या जीवनाला कलाटणी देणारे कार्य करावे,’ असा सल्ला त्यांनी दिला.

खासदार अमर साबळे म्हणाले, ‘कामगार आपल्या उद्योजकांचा सत्कार या टाटा पुरस्कार सोहळा कार्यक्रमाच्या माध्यमातून करतात, ही कौतुकाची बाब आहे. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाचा सदस्य या नात्याने मी ठिकठिकाणी जातो. कामगारांचे प्रश्न आजही भीषण आहेत. कामगारांना प्राथमिक सोयी सुविधा, पेन्शन, कौटुंबिक तसेच सामाजिक सुरक्षा यांचा अनेक ठिकाणी अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते. खरे पाहता आपल्याकडच्या प्रत्येक उद्योगाने एका कामगाराचे प्रश्न हाताळले, तरी नक्कीच हे प्रश्न लवकरात लवकर सुटतील.’ महापौर म्हणाले, ‘कोणताही व्यवसाय उभारताना अनेक अडचणी येतात. मीदेखील माझा व्यवसाय सुरू करताना मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण, त्यातूनच मला कष्ट आणि चिकाटीने व्यवसाय करण्याची शिकवण मिळाली. प्रत्येक व्यवसायिकाने ही चिकाटी ठेवावी आणि सातत्याने कार्यरत राहावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले, तर सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारभारात नातेवाइकांचा हस्तक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कारभारामध्ये निवडून आलेल्या नातेवाइकांचा हस्तक्षेप वाढला असून, प्रशासनापुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता प्राप्त केल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांचा कारभार चालू आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर बैठका, प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करणे, बजेटमधील तरतूद वर्गीकरण, पत्रव्यवहार आदी कामे होत असतात. या कामांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. परंतु, त्याचबरोबर त्यांच्या नातेवाइकांचाही हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

काही नगरसेवकांचे नातेवाइक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कामकाजात उत्साहाने सहभागी होत आहेत. यापूर्वी नगरसेविकांच्या पतिराजांचा हस्तक्षेप असल्यामुळे महिलांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. आता काही नगरसेविकांची मुले कामकाजात भाग घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करू लागली आहेत. बैठकांना उपस्थित राहून प्रसंगी जाबही विचारत आहेत. त्यांना उत्तर देणे बंधनकारक आहे का, या विवंचनेत अनेक अधिकारी आहेत. या प्रकारच्या थेट हस्तक्षेपाविषयी पालिकेत कुजबूज आहे. परंतु, थेट तक्रार करण्यास कोणी धजावत नाही. मतदारांनी लोकप्रतिनिधींना निवडून दिले, की त्यांच्या नातेवाईकांना, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

वास्तविक, स्वयंविकासाबरोबरच समाजात समानतेने, बरोबरीने विकसित होण्यासाठी महिलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार किंवा तसे वातावरण तयार करणे म्हणजे महिला सक्षमीकरण असे म्हटले जाते. त्यानुसार वातावरण आणि अधिकार असूनही त्याचा वापर नातेवाइकांच्या हस्तक्षेपामुळे करता येत नाही. याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. महिला आरक्षणाचा लाभ घेऊन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अधिकार गाजवणारी पुरुषी मानसिकता बदलत नसल्यामुळे महिला सक्षमीकरणाला अडथळा निर्माण ठरत असल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. करमळकर कुलगुरूपदी रूजू

$
0
0

डॉ. देवानंद शिंदेंकडून स्वीकारली सूत्रे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विसावे कुलगुरू म्हणून डॉ. नितीन करमळकर यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून गुरुवारी पदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी विद्यापीठातील विद्यार्थी, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी डॉ. करमळकर यांनी नियुक्ती केली. त्यामुळे करमळकर रूजू होतील अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. करमळकर यापूर्वी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. पद स्वीकारताना त्यांच्या पत्नी रोहिणी, प्रभारी कुलसचिव डॉ. ए. डी. शाळिग्राम, डॉ. अंजली क्षीरसागर यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राव यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती केली होती.
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी म्हणून प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर प्राध्यापक आणि आता कुलगुरू पदापर्यंत पोहोचलो. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घेईन, तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करीन,’ अशी प्रतिक्रिया डॉ. करमळकर यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण कसे देता येईल, याकडे आपले विशेष लक्ष असेल. सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर आपला भर राहील, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले.

जावडेकरांची घेतली भेट
डॉ. करमळकर यांनी गुरुवारी सायंकाळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. आगामी काळात विद्यापीठाचा दर्जा आणि नावलौकीक वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्याचबरोबर समाजाच्या गरजांना अनुसरून विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये संशोधन कार्य व्हावे आणि विद्यापीठाची नाळ सामाजिक उपक्रमांशी जोडली जावी, अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली.

देशात शैक्षणिक गुणवत्तेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दहावा क्रमांक मिळविला. विद्यापीठाचा हा नावलौकिक आणखी सुधारण्यासाठी नवीन कुलगुरूंनी योजना तयार कराव्यात. त्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सर्वतोपरी सहकार्य राहील.
प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाच्या नोटिशीवर पालिका मौन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेला मिळालेली येरवडा येथील राज्य सरकारची जमीन महापालिकेने परस्पर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग (सीडॅक) या संस्थेला भाडेतत्त्वावर दिल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीला मुदत संपल्यावरही महापालिकेने उत्तर दिलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.

पुणे महापालिकेला येरवडा येथे सरकारी जमीन देण्यात आली आहे. १९९२मध्ये ही जागा महापालिकेला मिळाली. त्यानंतर महापालिकेने परवानगी न घेता ही जागा भाडेतत्त्वावर ‘सीडॅक’ या संस्थेला दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महापालिकेला नोटीस बजावली. या नोटिशीला आठ दिवसांत उत्तर देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र, मुदत संपली तरीही महापालिकेने उत्तर दिलेले नाही. ‘सरकारी जमीन देण्यात आल्यावर तिचा वापर हा भाडेतत्त्वावर करता येत नाही. मात्र, महापालिकेने ही जागा परवानगी न घेता ‘सीडॅक’ या संस्थेला दिली आहे. त्यामुळे कराराचा भंग झाला आहे. त्यावरून महापालिकेला नोटीस बजाविण्यात आली आहे. मात्र, महापालिकेकडून खुलासा आलेला नाही.’ असे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी सांगितले.

‘कोणत्याही संस्थेला सरकारी जमीन मिळाल्यानंतर तिचा वापर हा संबंधित संस्थेने करारात नमूद केलेल्या कारणासाठीच केला पाहिजे. जमीन व्यापारी तत्त्वावर द्यायची असल्यास त्याबाबतचा नजराणा भरावा लागतो. त्यानंतर राज्य सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. महापालिकेने ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. ‘सीडॅक’ या संस्थेकडून महापालिका किती भाडे आकारत आहे, याची माहिती घेऊन त्यानंतर दंड वसूल करणे किंवा जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली जाईल.’ असे हिरामणी यांनी स्पष्ट केले.

जूनपासून पुन्हा कारवाई

‘कोणत्याही संस्थेला सरकारी जमीन मिळाली असल्यास त्यांनी त्या ठिकाणी याबाबतचा फलक लावणे सक्तीचे आहे. मात्र, अनेक संस्थांनी फलक लावलेले नाहीत. त्यांच्याविरूद्ध जून महिन्यापासून पुन्हा कारवाईला सुरवात करण्यात येणार आहे. यापूर्वी १४ पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली होती.’ असे हिरामणी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images