Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

थंडीचे पुनरागमन डिसेंबरमध्येच

$
0
0
शहर आणि परिसरात ढगाळ हवा सोमवारीही कायम असल्याने किमान तापमानात अंशतः वाढ झाली. आणखी दोन दिवस हवा ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने थंडीच्या पुनरागमनासाठी पुढील महिन्याचीच प्रतीक्षा करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

‘अॅट्मा’च्या तयारीसाठी येत्या गुरुवारी ‘मॉक टेस्ट’

$
0
0
‘असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स’ अर्थात ‘एम्स’तर्फे घेण्यात येणाऱ्या ‘एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट अॅडमिशन्स’ म्हणजे ‘अॅट्मा’ या परीक्षेची तयारी करण्याची एक अनोखी संधी ‘एम्स’, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ने विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

धरणात सर्वस्व गमावलेल्यांना पर्यायी जमिनीत प्राधान्य

$
0
0
गुंजवणी धरणग्रस्तांचा रेंगाळलेला प्रश्न सोडविण्यासाठी धरणाच्या बुडित क्षेत्रांत सर्वस्व गमाववेल्यांना पर्यायी जमीन वाटपात प्रधान्य देण्याची सूचना विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सोमवारी केली.

‘महामानवांची वाटणी रोखणे काळाची गरज’

$
0
0
लोकशाही ही कमॉडिटी झालेली असून किंमत लावून ती विकत घेतली जाते. अशा परिस्थितीत सुदृढ समाजाची निर्मिती करायची असेल तर महामानवांची वाटणी होऊ न देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी सोमवारी केले.

ऑनलाइन वीजबिलिंगमध्ये पुणेकर आघाडीवर

$
0
0
वीजबिले भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास आणि विलंब झाल्यास होणारा दंड टाळण्यासाठी ऑनलाइन वीजबिले भरणा-या ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिन्यात ऑनलाइन वीजबिले भरणा-या पुणेकरांची संख्या सव्वादोन लाखांवर पोहोचली आहे.

जिल्ह्यातच होणार जात पडताळणी

$
0
0
कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यापासून ते राज्य सरकारच्या विविध स्कॉलरशीप योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातील जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा लागणार आहे.

जप्त केलेल्या वाहनांचा होणार लिलाव RTO ची कारवाई

$
0
0
वाहतूक नियमावलीकडे पाठ फिरवून ‘मोटार व्हेइकल टॅक्स’ न भरलेल्या सुमारे दीडशे वाहनांचा आता ‘आरटीओ’ लिलाव करणार आहे. टुरिस्ट परवाना असलेल्या कारचा यामध्ये समावेश असून, या संदर्भात वाहनमालकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तरीही टॅक्स भरला जात नसल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.

कायदा पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

$
0
0
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांतील बालकांना प्राथमिक शिक्षणात २५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, चालू वर्षी राज्यातील अनेक शाळांनी या तरतुदीकडे दुर्लक्ष करत, या जागांवर अन्य बालकांना प्रवेश दिला.

नवमतदारांना आता गाजर... फोटो ओळखपत्राचे

$
0
0
मतदार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेदरम्यान दोन लाख ७२ हजार नवीन मतदारांच्या नोंदणीचे अर्ज आले आहेत. या अर्जांची पडताळणी सुरू असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर या सर्वांना मतदार फोटो ओळखपत्र (इपिक कार्ड) दिले जाणार आहेत.

दीड हजार मजुरांनी उघडले बँकेत खाते

$
0
0
बांधकामाच्या साईटवर काम करणाऱ्या मजुरांनाही आता बँकेत खाते उघडता येणार आहे. यासाठी कुशल क्रेडाई पुणे मेट्रो आणि सेन्ट्रल बॅँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात दीड हजार मजुरांचे बँक खाते उघडण्यात आले आहे.

‘रस्ते खोदाई शुल्क वाढीतून महावितरणला वगळा’

$
0
0
रस्ते खोदाई शुल्कातील वाढीतून महावितरणला वगळण्यात यावे, अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी महापालिकेच्या स्थायी समितीकडे केली आहे. दरम्यान, या वाढीमुळे महावितरण आणि ‘बीएसएनएल’च्या विकासकामांना फटका बसेल आणि पुणेकर नव्या सुविधांपासून वंचित राहतील, असे सजग नागरिक मंचाने म्हटले आहे.

निधी खर्च न करणा-या अधिका-यांवर वचक हवा

$
0
0
‘मागासवर्गीय बहुजन समाज आणि अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी शासनातर्फे कल्याणकारी योजनांतर्गत मुबलक निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु, हा निधी पुरेशा प्रमाणात खर्च न करणा-या अधिका-यांवर यापुढे वचक ठेवायला हवा’, असे मत आमदार आणि मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी सोमवारी व्यक्त केले.

जनता वसाहतीतील ७ वर्षांचा मुलगा गायब

$
0
0
जनता वसाहतीत उसने पैसे घेतल्यावरून दोन कुटुंबात वाद सुरू असतानाच एका कुटुंबातील सात वर्षांचा मुलगा गायब झाल्याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, मुलाला गायब केल्याप्रकरणी संशय व्यक्त करण्यात येत असलेल्या महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार घडला.

उपद्रवी उद्योगांमुळे जीवाशी खेळ

$
0
0
उपद्रवी पर्यटकांमुळे इतरांच्या जीवावर बेतू शकते, याचा अनुभव चंदननगर येथील तरुणांच्या ग्रुपने रविवारी राजगडावर घेतला. दगड मारून डिवचलेल्या मधमाश्यांनी हल्ला केल्याने या ग्रुपमधील एका तरुणावर जीव गमाविण्याची वेळ आली होती. मात्र वेळेत मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.

आडत दरातील कपात मागे घेण्याची मागणी

$
0
0
गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील व्यापाऱ्यांनी सोमवारी पणन संचालकांची भेट घेऊन आडत दरात केलेली कपात मागे घेण्याची मागणी केली. हा निर्णय मागे घेईपर्यंत बाजार बंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे ‘आडते असो‌सिएशन’ने म्हटले आहे.

ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८१ टक्के मतदान

$
0
0
जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी सरासरी ८१ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान किरकोळ वादाचे प्रसंग वगळता कोणताही गैरप्रकार घडला नाही. निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे.

विमानतळ विरोधाची अजित पवार यांना चुणूक

$
0
0
खेड तालुक्यातील विमानतळाच्या प्रस्तावित ठिकाणी स्थानिक शेतक-यांच्या किती जमिनी शिल्लक राहिल्या आहेत? विकासाच्या दृष्टीने हा विमानतळ महत्त्वाचा असून, विकासच झाला नाही, तर जमिनीच्या किंमती वाढणार तरी कशा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला.

लोहगाव येथे तरुणाचा खून

$
0
0
लोहगाव येथे हॉटेल जंजिराजवळ एका २३ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनोहर बंडू निंबाळकर (वय २३, रा. मोजे आळी, लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

येरवड्यात ९० हजारांचा गुटखा जप्त

$
0
0
येरवड्यातील एका व्यापाऱ्याकडून ९० हजार ७०५ रुपयांचा गुटखा जप्तीची कारवाई पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रविवारी केली. यासंदर्भात येरवडा पोलिसांनी एफडीएला माहिती दिली होती.

लावणीच्या ठेक्यातून सुरक्षेचे धडे

$
0
0
लावणीचा ठेका, आदिवासी नृत्य आणि वाहतूकविषयक जागरूकता निर्माण करणारे पथनाट्य...... राज्यभरातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अशा विविधरंगी अदाकारीतून गेले तीन दिवस पुण्यात राज्यस्तरीय युवक महोत्सव रंगत गेला. गडचिरोलीच्या संघाने बांबूनृत्य सादर करून आदिवासी जंगलांची सफर घडवली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images