Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कोंडी सुटणार; आव्हान कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकात वाहतुकीची स्थिती सुधारण्यासाठी काही वर्षांपासून कामे सुरू आहेत. गेल्या वर्षी उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तर, आता ग्रेड सेपरटरचे कामही होत आले आहे. येत्या काही दिवसांत जेधे चौक पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय टळेल. मात्र, चौकातील वाहनांची संख्या कमी झाल्यानंतर येथे अतिक्रमण व अवैध वाहतुकीची साधने फोफावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.

सातारा रस्त्याने येऊन शंकरशेठ रस्त्याकडे आणि सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी व्होल्गा चौकाच्या अलिकडून उड्डाणपूलावरून जावे लागते. तर, शंकरशेठ रस्त्याने येऊन सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ग्रेड सेपरेटर लवकरच खुला होणार आहे. त्यामुळे टिळक रस्ता व शिवाजी रस्त्याने येऊन सातारा रस्ता किंवा शंकरशेठ रस्त्याला जाणारी वाहनेच प्रत्यक्ष चौकातून ये-जा करतील. तसेच, पीएमपीच्या बस, एसटी बस आणि रिक्षाची वाहतूक चौकातून चालेल. त्यामुळे चौकावरील वाहनांचा भार मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असे चित्र आहे. आता सध्या सातारा रस्त्याने येणारी बहुतांश वाहने उड्डाणपुलावरून जात असल्याने चौक बहुतांशी वेळा रिकामा असतो. अशावेळी बेशिस्त वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून येते. सिग्नलचे पालन न करणे, झेब्रा क्रॉसिंगच्या बरेच अंतर पुढे थांबणे असे प्रकार सर्रास घडतात. यामुळे वाहन संख्या कमी असूनही अपघाताचा धोका संभवतो. ग्रेड सेपरेटर सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती आणखी धोकादायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘पीएमपी’साठी स्वतंत्र लेन हवी

एक ते दोन आठवड्यापूर्वी पीएमपी प्रशासनाने पीएमपी बससाठी स्वारगेट चौकात एक स्वतंत्र लेनचा प्रयोग राबविला होता. सध्या बस स्टॉपच्या परिसरात अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे येत्या काळात पीएमपी बससाठी स्वतंत्र लेन अवश्य करावी. त्याचे पालन व्यवस्थितपणे केले जाईल, याची खबरदारी पीएमपी व्यवस्थापन व वाहतूक पोलिसांनी करावे.

रिक्षांचा अडथळा

उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे जेधे चौकातील रिक्षा स्टँड व शेअर रिक्षा स्टँड वारंवार हलविण्यात येत होते. त्यामुळे स्वतंत्र रिक्षा स्टँड आणि शेअर रिक्षासाठी अन्य वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही, अशी स्वतंत्र लेन सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. आता सध्या बहुतांश रिक्षा नेहरू स्टेडिअम पोलिस चौकीच्या समोरून जाणाऱ्या लेनमध्ये थांबलेल्या असतात. तेथे पीएमपीचाही बस स्टॉप आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चांदणी चौकातील उड्डाणपुलाबाबत आज बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकात उड्डाणपुलाच्या काम सुरू होणार असून त्यापूर्वी करण्यात येणारे भूसंपादन, अतिक्रमण काढणे, नागरी सुविधा स्थलांतर करणे आदी कामांच्या पूर्ततेच्या आढाव्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी आज, गुरुवारी बैठकीचे आयोजन केले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी या बैठकीची मागणी केली होती.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशान्वये चांदणी चौकातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या सोडवण्यासाठी येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या उड्डाणपुलांची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. या उड्डाणपुलाच्या कामासाठीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यांत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी १०.७६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन, अतिक्रमण काढणे, नागरी सुविधांचे स्थलांतर करणे, वृक्षतोड, व​नविभाग, संरक्षण विभागाची जमीन संपादित करणे आदी कामांबाबत आढावा घेण्यात आला होता. उड्डाण पुलाच्या कामास खोंळबा होऊ नये तसेच रखडलेली कामे मार्गी लावावीत, यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली होती. दरम्यान, उड्डाणपुलाची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांसाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा निर्णय स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आहे. या ठिकाणी कोणती कामे पालिकेला करावी लागणार याचा पालिकेने आढावा घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसदेची वित्त समिती आज पुणे दौऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संसदेची वित्त विभागाची स्थायी समिती ११ मे रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात या समितीसमोर प्राप्तिकर विभाग तसेच बँकिंग क्षेत्राबाबतचे सादरीकरण होणार आहे. त्यामध्ये करापोटी मिळालेल्या महसुलाचा आढावा घेण्याबरोबरच प्रत्यक्ष कररचनेतील प्रस्तावित सुधारणांची दिशा ठरविण्यात येईल. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राचा आढावा घेऊन आर्थिक सर्वसमावेशकता वाढविणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याविषयीच्या उपाययोजना व त्यांचे फलित यावर चर्चा होणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या दोन्ही सभागृहांची वित्तीय स्थायी समिती ११ मे रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. यामध्ये पुण्याचे लोकसभा खासदार अनिल शिरोळेंचाही समावेश आहे. या समितीपुढे होणाऱ्या सादरीकरणाविषयी उच्चपदस्थ सूत्रांनी ‘मटा’ला अधिक माहिती दिली.

या सादरीकरणामध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नोटाबंदीदरम्यान व त्यानंतरच्या काळातील कारवाई व त्यातून जमा झालेला महसूल, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत समोर आलेला काळा पैसा, करदात्यांच्या तक्रारी व त्यावरील उपाययोजना, करबुडव्या व्यक्ती व त्यांच्याकडील थकबाकी याविषयी सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष करांमधील प्रस्तावित सुधारणांविषयी स्वतंत्र सादरीकरण देखील होणार आहे.

तसेच बँकांकडून होणाऱ्या सादरीकरणाची जबाबदारी राज्याची अग्रणी (लीड) बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रवर सोपविण्यात आली आहे. बँकांविषयीच्या सादरीकरणामध्ये भारतातील बँकिंग क्षेत्राची सद्यस्थिती, आव्हाने आणि भावी दिशा याविषयी चर्चा होईल. तसेच, आर्थिक सर्वसमावेशकता (फायनान्शियल इन्क्लुजन) योजना, लक्ष्य आणि साध्य याविषयी दुसरे सादरीकरण होईल आणि डिजिटल व्यवहारांची सद्यस्थिती व त्याला चालना देण्यासाठी उपाययोजना यावरही चर्चा होणार असल्याचे समजते.

ही समिती १२ मे रोजी मुंबईला भेट देणार असून तेथे इन्शुरन्स क्षेत्राची सद्यस्थिती व आव्हाने याविषयी सादरीकरण होईल. त्यानंतर १३ मे रोजी कोची येथे इन्शुरन्स क्षेत्राविषयी पुन्हा सादरीकरण होईल. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियातर्फे बँकिंग क्षेत्राविषयीचे सादरीकरण केले जाईल.

या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, व्यंकटेश बाबू टी. जी, पी. सी. गड्डीगोदर, श्यामचरण गुप्ता, चंद्रकांत खैरे, सी. गोपाल, रायापती सांबाशिवाराव, सुगता रॉय, दिनेश त्रिवेदी, शिवकुमार उदासी, गोपाळ शेट्टी, संवरलाल जाट, गजेंद्र सिंह शेखावत, निशिकांत दुबे, अजय संचेती आदी सहभागी होणार आहेत. याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, किरीट सोमय्या आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही या समितीत सहभाग आहे. मात्र, ते या बैठकीला उपस्थित राहणार किंवा नाही, याची माहिती मिळू शकली नाही.

सादरीकरणाची तयारी युद्धपातळीवर

पुणे दौऱ्यावर येणारी संसदेची वित्तीय स्थायी समिती ही सर्वोच्च समिती आहे. त्यांच्यापुढे विविध अहवाल आणि माहिती सादर करावी लागणार आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभागामध्ये युद्धपातळीवर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचेही अधिकारी सादरीकरणाच्या तयारीत गुंतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोर तालुक्यात दोन टँकर सुरू

$
0
0

भोर : उन्हाचे चटके वाढत असताना तालुक्यातील चार गावे व एका वस्तीला दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. भाटघर व निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दहा गावे आणि तेरा वाडी-वस्तीमधील ग्रामस्थांनी टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली आहे. भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांच्या विलंबानंतर शिरवली हिमाचे गावठाण, चौधरी वस्ती, निवंगणसाठी एक टँकर तर भूतोंडे गावासाठी दुसरा टँकर सुरू झाला आहे.

टँकरच्या मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे २३ मार्च रोजी मिळाले आहेत. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी गांवातील पिण्याच्या पाण्याची पाहणी केली. गुहिणी, वरोडी खुर्द, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख, शिळीम, खुलशी ही गावे तर मोरवाडीची पाचलिंगे वस्ती, म्हसर बुद्रुकची धनगर वस्ती, डेरेची खिलदेववाडी, पसुरेची धनगर वस्ती, जयतपाडची हुंबेवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती, रायरीची धारांबे वस्ती, खुलशीची धनगर वस्ती, शिळीमची राजवडी वस्ती येथे पाण्याची टंचाई आहे.


वेल्हे तालुक्यात एक टँकर सुरू

वेल्हे तालुक्यातील चऱ्हाटवाडी व मेटपिलावरे, टेकपोळे येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून तालुक्यातील बारागांव मावळ, पानशेत खोरे परिसरातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव वाहनांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या अठरा चालकांकडून बुधवारी सायंकाळी प्रत्येकी हजार रुपये प्रमाणे अठरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत केवळ महामार्गावर वापरण्यात येणारी ‘स्पीड गन’ प्रथमच शहरातील वाहतूक पोलिसांना देण्यात आल्याने पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

शहरातील अनेक रस्त्यांवर वाहने धीम्या गतीने वाहने चालवावी, यासाठी ठिकठिकाणी गाड्यांचा स्पीड दाखविणारे फलक लावण्यात आलेले आहे. मात्र, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालक वाहने चालवीत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. या घटना टाळण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये जागृती करण्यासाठी वाहतूक शाखेकडून बुधवारी वाहतूक पोलिसांना ‘स्पीड गन’चे वाटप करण्यात आले. स्पीड गन प्राप्त होताच वाहतूक पोलिसांनी भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या चालकांकडून दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

विश्रांतवाडी वाहतूक पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मेंटल कॉर्नर चौकात चार ते सहा या दोन तासांमध्ये अठरा वाहन चालकांकडून अठरा हजार रुपये दंड वसूल केला. सुरुवातीचे काही दिवस धीम्या गतीने वाहन चालवावे याबाबत जनजागृती करण्यात येईल. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे विश्रांतवाडी वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक संतोष पैलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसमधील वाद फेसबुकवर; दोघांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नाशिक ते पुणे शिवनेरी बस प्रवास... युवक-युवतींमध्ये वाद... फेसबुक ग्रुपवर युवतीची पोस्ट आणि भोसरीत बस अडवून दोन युवकांना बेदम चोप... असा काहीसा प्रकार रविवारी (७ मे) नाशिक ते भोसरी बस प्रवासादरम्यान घडला.

उच्चशिक्षित युवती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवनेरी या वातानुकुलीत बसमधून नाशिक संगमनेर ते पुणे असा प्रवास करीत होती. तर याच बसमध्ये दोन परप्रांतीय तरूण देखील कुटुंबासह प्रवास करीत होते. बसमध्ये मोबाइलवर बोलवण्यावरून युवतीबरोबर त्या दोन युवकांचा वाद झाला होता. त्यातून हे प्रकरण नाशिक येथील पोलिस ठाण्यापर्यंत गेलं. त्यानंतर तेथील पोलिसांनी हा वाद मिटवून बस पुण्याच्या दिशेने रवाना केली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ते दोन युवक छेड काढत होते त्यामुळे तिने हा प्रकार फेसबुकवरील एका ग्रुपवर शेअर केला. या ग्रुपमधील भोसरीत असलेल्या मेंबर्सनी ती पोस्ट पाहिली. त्यानंतर दुपारी भोसरी येथील अशोका हॉटेल समोर भोसरीतील संबंधित ग्रुपचे मेंबर असलेल्या युवकांनी शिवनेरी बस अडवली. त्या दोन्ही मुलांना बसमधून खाली उतरवून बेदम चोप दिला. भर रस्त्यातच हा सर्व प्रकार सुरू होता. तसेच या प्रकराचे शुटिंग करून तो व्हिडीओ फेसबुकवर देखील अपलोड करण्यात आला. काही वेळाने या दोन्ही युवकांना सोडून देण्यात आले.

दरम्यान, तिसऱ्या दिवशी मंगळवारी (९ मे) हे प्रकरण भोसरी पोलिस ठाण्यात पोहचले. दोन्ही युवकांनी आपला विनयभंग केला असून त्याबाबत तक्रार द्यायची असल्याचे त्या युवतीने सांगितले. तर आम्ही कुटुंबातील सदस्याचे अंत्यविधीनंतरचे सोपस्कार पार पाडून घरी परतत होता. त्यामुळे बसमध्ये मोबाइलवर हळू बोला एवढेच त्या युवतीला सांगितले होते. त्यावरून वाद झाला होता. परंतु भोसरीत येथे बस येताच आम्हाला काही जणांनी बेदम चोप दिला, असे त्या दोन युवकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून त्या दोन युवकांवर विनयभंगचा गुन्हा भोसरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, तपासासाठी हे प्रकरण नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. तर त्या दोन युवकांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या युवतीसह ६-७ युवकांवर मारहाण, जिवे मारण्याची धमकी आदी स्वरूपाचे गुन्हे भोसरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांचा तावडेंना घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याचे शिक्षण मंत्री खासगी शाळांच्या शुल्कवाढ रोखण्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देत नाहीत आणि शुल्कवाढ रद्द करण्यासाठी कोणताच ठोस निर्णय घेत नाही. तसेच, शाळांच्या पालक संघटनांच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ देत नाहीत अशा विविध गोष्टींवर उत्तरे मागण्यासाठी संतप्त पालकांनी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना बुधवारी घेराव घातला. पालकांच्या प्रश्नांनी तावडे यांना सळो की पळो करून सोडले आणि त्याचवेळी तावडे - पालकांमध्ये कलगीतुरा रंगल्याने एकच गोंधळ उडाला.
तावडे भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या एका कार्यक्रमासाठी धनकवडीच्या शैक्षणिक संकुलात आले होते. या वेळी पालकांनी तावडे यांना गाठून खासगी शाळांच्या शुल्कवाढीवर सरकारचे नियंत्रण नसल्याचे सांगितले. तसेच, याबाबत पालकांनी आपल्याला शुल्कवाढ आणि शाळेच्या मनमानी कारभाराविषयी माहिती दिली. तसेच, पालक संघटनांच्या प्रतिनिधींना आपण भेटण्यासाठी वेळ देत नाहीत तसेच शुल्कवाढीबाबत चर्चा करत नाही. खासगी शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी सक्ती करत असताना देखील मंत्री म्हणून तुम्ही ठोस पावले उचलली नाहीत. तसेच, पालकांनी दिलेल्या मागण्यांच्या निवेदनांवर आपण कोणत्याच प्रकारची कारवाई न करता केवळ आश्वासने दिली असल्याचे पालकांनी तावडेंना सांगितले. पालकांच्या वतीने हेमलता शिंदे, प्रिया अहिरके, प्रवीण मेटकुटे यांनी प्रश्न उपस्थित केले. या वेळी प्राजक्ता पेटकर एज्युकेशनल ट्रस्टतर्फे पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
शुल्कवाढीबाबत माझ्याकडे आतापर्यत आलेल्या ३२ शाळांच्या तक्रारींचे निवारण केले आहे. पालक संघटनांचे प्रतिनिधी आणि शाळांच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन या तक्रारी सोडविण्यात आल्या आहे. त्यामुळे तुम्हाला देखील येत्या ४ दिवसांत सुनावणीसाठी बोल‍ावण्यात येईल. येत्या काही दिवसांत शैक्षणिक साहित्य खरेदी आणि शुल्कवाढीबाबत पालकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी सोडविण्यात येईल. मी एकटा असून पालकांच्या तक्रारींची संख्या मोठी आहे. त्यामुळे तक्रारी सोडविण्यासाठी थोडा कालावधी लागेल, असे तावडे यांनी उत्तर दिले.

‘शाळा सुरू होण्याआधी तक्रारी सोडवू’
प्रत्येक शाळेच्या पालक संघटनेच्या प्रतिनिधीला त्याच्या तक्रारी मांडण्याची संधी दिली जाईल. राज्यातील खासगी शाळांच्या शुल्कवाढीबाबत ज्या शाळांच्या विरोधात तक्रारी आहेत, अशांचे निवारण शाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात येईल. त्यामुळे येत्या महिन्याभरात शुल्क वाढीबाबतच्या तक्रारी निकाली काढण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिक, विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पीएचडी न करताही खगोलशास्त्र, पृथ्वी विज्ञान, जैविक शास्त्रे, तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांमध्ये नागरिक आणि विद्यार्थ्यांना संशोधन कसे करता येईल, याविषयी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन येत्या १३ आणि १४ मे रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आले आहे. पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या नॅशनल वर्कशॉप ऑन सिटीझन सायन्स या कार्यशाळेत कोणत्याही पार्श्वभूमीचे नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
सेंटर फॉर सिटीझन सायन्स, विज्ञान भारती आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेमध्ये खगोलशास्त्र, पृथ्वी विज्ञान, जैविक शास्त्रे, तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांतील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ संबंधित विषयांमधील संशोधनाच्या संधींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी निसर्गातील विविध घटकांची निरीक्षणे, जैवविविधतेचे सर्वेक्षण, हवामानाच्या नोंदी, खगोलशास्त्रीय निरीक्षणे यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात येतील. सिटीझन सायन्स नेटवर्क अंतर्गत नागरिक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचेही कार्यशाळेत सादरीकरण होणार आहे. नागरिकांच्या सहभागातून देण्यात येणारे हवामान अंदाज, दरडींची पूर्वसूचना, जैवविविधतेच्या नोंदी, खगोलशास्त्रीय संशोधन यांविषयी नागरिकांचे रिसर्च पेपर या वेळी सादर होतील. कार्यशाळेत आकाशदर्शन आणि निसर्गनिरीक्षणाचेही आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, इच्छुकांनी ९९२२९२९१६५ किंवा ९९२२७३०५५१ या क्रमांकांवर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www.ccsorg.wordpress.com ही वेबसाइट पाहावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फयाज यांच्या हत्येने ‘एनडीए’मध्ये संताप

$
0
0

पुणे : हुशार विद्यार्थी व आघाडीचा क्रीडापटू... उत्तम शारीरिक क्षमता असलेल्या लेफ्टनंट उमर फयाज यांच्या निर्घृण हत्येची बातमी आल्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत अस्वस्थतेचे आणि संतापाचे वातावरण होते. काश्मीरमधून सैन्यात दाखल झालेल्या एका तरुण अधिकाऱ्याला दहशतवाद्यांकडून अशा प्रकारे ठार करण्यात आल्याने एनडीएमध्ये संताप व्यक्त होत होता.
सुटीवर असताना काश्मीरमधील दहशतवाद्यांकडून अपहरण करून हत्या केले गेलेले लेफ्टनंट उमर फयाज हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२९ व्या तुकडीचे छात्र होते. हुशार, उत्साही, मनमिळाऊ आणि उत्तम खेळाडू अशी उमर यांची ओळख होती.
एनडीएमधील २०१२-२०१५ या तीन वर्षांच्या प्रशिक्षण काळात उमर एनडीएच्या डेल्टा स्क्वाड्रनमध्ये होते. हॉकी आणि व्हॉलीबॉलच्या संघातील प्रमुख खेळाडू होते. ‘उमर यांचे वडील काश्मीरमधले सफरचंद उत्पादक आहेत. साध्या घरातून आलेल्या उमरची शैक्षणिक गुणवत्ता उत्तम होती. उमरला कधीही शारीरिक समस्या उद्भवली नाही,’ अशी माहिती एनडीएच्या प्रशिक्षकांनी दिली.
एनडीएमधील प्रशिक्षण संपल्यानंतर उमर पुढील प्रशिक्षणासाठी इंडियन मिलिटरी अकादमीत दाखल झाले. तेथील प्रशिक्षण संपल्यानंतर डिसेंबर २०१० मध्ये उमर लष्कराच्या ‘२, राजपुताना रायफल्स रेजिमेंट’मध्ये दाखल झाले होते. मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांमध्ये लोकप्रिय असलेल्या उमर यांना सप्टेंबर महिन्यात यंग ऑफिसर्स अभ्यासक्रमासाठीही पाठविण्यात येणार होते. त्यापूर्वीच एका नातेवाइकाच्या विवाहासाठी सुटीवर आलेल्या उमर यांचे अपहरण करून दहशतवाद्यांनी त्यांना ठार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत निवडणुकीवर गावांचा बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका हद्दीलगतच्या गावांचा पालिकेत समावेश करण्यास राज्य सरकारने अनुकूलता दर्शवल्याने निम्म्याहून अधिक गावांमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे निव्वळ फार्स ठरणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून ती रद्द करता येत नसल्याने आता ग्रामपंचायतींनी सर्व प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरालगतच्या ३४ गावांचा समावेश पालिकेत करण्याची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून रखडली आहे. त्याचा निर्णय सरकारने घ्यावा, यासाठी हवेली तालुका नागरी कृती समितीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान सरकारने गावांचा समावेश करण्याबाबत सकारात्मक भूमिका कोर्टासमोर मांडली. ३४ पैकी १९ गावांमध्ये मे अखेरीस ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी स्थानिक आमदार आणि कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु, निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्याने त्याला थांबवणे शक्य नसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. त्याचवेळी गावे निश्चित घेणार, याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे, आता गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. उत्तमनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन पंडित आणि उपसरपंच सुभाष नाणेकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये २७ मे रोजी होमाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. महापालिकेमध्ये गावाचा समावेश होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणूक नको, असा पवित्रा या वेळी स्थानिक नेत्यांनी घेतला. आगामी काळात हवेली तालुक्यातील इतर काही ग्रामपंचायतींकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेत ३४ गावांचा समावेश करताना त्या त्या गावांना राज्य सरकारकडून विचारणा झाली होती. त्यानंतर अनेक गावांनी पालिकेत समावेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या त्या गावांच्या इच्छेनुसार नंतर जिल्हा परिषदेने ठराव केला, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत ३० मे रोजी मराठा क्रांती मोर्चा

$
0
0

मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ३० मे रोजी मुंबईत सकल मराठा क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या मांडला जाणार आहे. पुण्यात बुधवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. महामोर्चासंदर्भात संपूर्ण राज्यात जनजागृती आणि प्रचार करण्यात येणार आहे.
सकल मराठा मोर्चाच्या आयोजकांनी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात झाली. या वेळी पाच मुलींची भाषणे झाली. त्यांनी मराठा समाजाच्या व्यथा मांडल्या. मुंबईत आझाद मैदान ते मुंबई मंत्रालय असा मराठा आरक्षण महामोर्चा निघणार आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, असा ठाम निर्धार आयोजकांनी केला. मोर्चानंतर आझाद मैदानावर बेमुदत उपोषणही करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

मराठा आरक्षण तत्काळ जाहीर करावे, त्यासाठी विधानसभेचे स्वतंत्र अधिवेशन बोलावून मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, यासाठी सर्व आमदारांना पत्रे पाठविण्यात येणार आहेत, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. मुंबईतील महामोर्चाबाबत जनजागृती करून युवक, युवती, महिला आणि सर्व समाजबांधवांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

कोल्हापूर येथे मराठा समाजाच्या झालेल्या गोलमेज परिषदेत मुंबईतील महामोर्चा रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हा मोर्चा रद्द करण्यात आलेला नसून, मोर्चाला वेगळे वळण लावण्यासाठी समाजातीलच काही मंडळी प्रयत्न करीत असल्याचा आरोप सकल मराठा मोर्चाच्या आयोजकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना देणार ‘पीएमपी’चे ‘मी कार्ड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगरसेवकांना स्वतंत्र ओळखपत्र देण्याऐवजी ‘पीएमपी’तर्फे प्रवाशांना देण्यात येणारे ‘मोबाइल इंटिग्रेटेड कार्ड’ (मी कार्ड) देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी नगरसचिव विभागाला दिले आहेत.
पालिकेच्या निवडणुकीत ७० टक्के सभासद प्रथमच निवडून आले आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांना आतापर्यंत पालिकेकडून स्वतंत्र ओळखपत्र दिले जात होते. प्रशासनाकडून यापूर्वी स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता त्यात बदल करून नगरसेवकांना ओळखपत्र म्हणून ‘मी कार्ड’ देण्यात येणार आहे. त्यावर नगरसेवकाचे नाव आणि पदाचा कालावधी असणार आहे.
निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना उलटल्यानंतरही प्रशासनाने नगरसेवकांना ओळखपत्र दिलेले नाही. त्यामुळे नगरसेवकांना आपली ओळख पटवून देताना अडचणी येत आहेत. अनेक नगरसेविकांचे ‘पती’ आपणच सभासद असल्याचे सांगून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत. नगरसेवक म्हणून ओळख सांगितल्यास थेट ओळखपत्राची मागणी होत असल्याने लोकप्रतिनिधी हैराण झाले आहेत.

काय आहे ‘मी कार्ड’?
पीएमपी प्रवासाव्यतिरिक्त पालिकेच्या सशुल्क सेवांसाठी डेबिट कार्डच्या धर्तीवर ‘मी कार्ड’ तयार करण्यात आले आहे. हे कार्ड रिचार्ज केल्यानंतर नागरिकांना तिकिटासाठी रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही. कार्डद्वारे तिकीट तसेच पास घेता येणार आहे. कार्डच्या माध्यमातून पालिकेचे पार्किंग, मिळकतकर, तसेच पालिकेशी संबंधित शुल्क भरता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुसंख्य एटीएम पडली कोरडीठाक

$
0
0

रकमेसाठी किमान पाच केंद्रांवर जाण्याची वेळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील बहुसंख्य एटीएम बंद असल्याने सर्वसामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. शहरातील खासगी बँकांबरोबरच आता सरकारी बँकांचीही एटीएम बंद असल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. शहरातील मोजकीच एटीएम सुरू असून, त्यातील रोकडही लवकर संपुष्टात येत असल्याने ती बंद ठेवण्याचीची वेळ येत आहे.
अनेक बँकांनी एटीएमचे शटर ओढून ती बंद ठेवणे पसंत केले. काही बँकांनी एटीएममध्ये रोकड नसल्याच्या पाट्याही लावल्या होत्या. काही एटीएममध्ये जाऊन कार्ड टाकल्यानंतर त्यात रोकड नसल्याचे खातेदारांना समजत होते. चार- पाच एटीएममध्ये फिरूनही रक्कम मिळू शकली नाही.
नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. आता मात्र बँकेतून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे खातेदार त्यांना हवी तितकी रक्कम काढू शकतात. खासगी बँकांमधूनही खातेदार मोठ्या प्रमाणावर रक्कम काढत आहेत. त्यामुळे या बँकांना मिळणारी रोकड बँकेच्या शाखांमध्येच पाठवावी लागत आहे. परिणामी त्यांची बहुतांश एटीएम बंद राहात आहेत.जी एटीएम सुरू आहेत, तेथे ग्राहक एकापेक्षा अधिक कार्ड वापरून रक्कम काढत आहेत. त्यामुळे तेथील रोकड संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या शाखेतून फक्त खातेदारांनाच पैसे काढता येत असल्याने बँका एटीएम बंद ठेवून शाखेत येणाऱ्या खातेदारांना प्राधान्य देत आहेत.
‘रिझर्व्ह बँकेकडून रोकड पुरवठा अजूनही सुरळित झालेला नाही. उपलब्ध रकमेतच बँकेच्या शाखा आणि एटीएम चालवा, असे सांगण्यात येत आहे. मात्र, बँकेकडे उपलब्ध असलेल्या नोटा एटीएममध्ये टाकण्याजोग्या नाहीत. त्यामुळे एटीएम चालवणे अवघड झाले आहे,’ असे एका सरकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

पगाराच्या आठवड्यानंतर खडखडाट
सध्या मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. या महिन्यात पगाराबरोबरच खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार आणि बोनसची रक्कम खात्यात जमा झाली होती. त्यामुळे खातेदारांनी पगाराची पूर्ण रक्कम किंवा मोठा हिस्सा काढून घेतला. त्यामुळे आता एटीएम कोरडी पडल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नक्षलवाद्यांच्या तपासाबाबत पुणे रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नक्षलवाद्यांच्या शहरी सहानुभूतीदारांना वेसण घालण्याचे सूतोवाच करताना हैदराबाद आणि दिल्लीबरोबरच पुण्यातही त्यांचे पाठीराखे असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. गृह खात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी, नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत झालेल्या बैठकीत पुण्याचा उल्लेख केल्यामुळे पुणे तपासाच्या रडारवर आले आहे.

छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोमवारी बैठक घेतली. ‘पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांमध्ये नक्षलवाद्यांचे देणगीदार आणि सहानुभूतीदार तयार झाले आहेत. प्रा. साईबाबाच्या मुसक्या आवळल्यामुळे ते आता आक्रमक होऊ शकतात,’ अशी भूमिका फडणवीस यांनी या वेळी मांडली होती.

पुणे शहरातही नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केल्यामुळे तपासचक्राची सुई पुण्याकडेही वळल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत जंगलातील नक्षलवाद्यांचे पुणे आणि परिसरात वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या काही नक्षलवाद्यांना पुण्यात अटक झाली, तर पुण्यातील काही तरुण गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांबरोबर पोलिसांविरोधात लढत असल्याचे उघडकीस आले आहे. सुकमा हल्ल्यानंतर पोलिस यंत्रणा आक्रमक झाल्या आहेत.

प्रा. साईबाबाला शिक्षा झाल्यानंतर शहरी सहानुभूतीदारांवर कायद्याच्या चौकटीत राहून कशी कारवाई करता येऊ शकते, याचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. अशा शहरी सहानुभूतीदारांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

जंगलातील नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार वाढत असल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिंता व्यक्त करून त्यांना वेसण घालण्याची मागणी केली आहे. गुप्तचर यंत्रणा, तसेच राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पुण्यातील नक्षलवाद्यांच्या सहानुभूतीदारांच्या हालचालींवर कसून लक्ष ठेवण्यात येते आहे. या चळवळीला मदत होऊ शकेल, अशी कोणतीही घटना पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवरही पोलिसांचे बारीक लक्ष आहे.

या समर्थकांनी पुण्यापासून दिल्लीतील ‘जेएनयू’च्या आवारापर्यंत शहरी भागातही छुपे बस्तान बसवले असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नक्षलवाद्यांसाठी पैसे गोळा करणे, त्यांना वकिलापासून सल्ला देण्यापर्यंतची सारी रसद या सहानभूतीदारांकडून पुरवली जाते. त्यांचा हा तोंडवळा सभ्य समाजातील वाटतो. तो हुडकून वेसण घालण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आक्रमकतेने राबवायला हवा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

नव्या वादाची शक्यता
पुण्यात नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार असल्याचे आरोप आणि प्रत्यारोपांचा धुरळा यापूर्वीही उडाला होता. त्यातून राजकीय वादही निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती असलेल्या फडणवीस यांनीच थेट अशा स्वरूपाचा उल्लेख केल्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानासाठी हवा ‘फर्स्ट क्लास’

$
0
0

केंद्राच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या संस्थाच ठरणार पात्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार पुढील तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार असले, तरी त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘फर्स्ट क्लास’ मिळविण्याचे बंधन केंद्राने घातले आहे. केंद्राच्या निकषांनुसार ६० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१५-२० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्राकडून ८७ हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यापैकी, ८० टक्के निधी विविध पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी मूलभूत निधी म्हणून दिला जाणार आहे. उर्वरित २० टक्के निधी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गुणवत्तेशी जोडण्यात आला असून, त्यामध्ये ६० पेक्षा अधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या संस्था अनुदानासाठी पात्र ठरणार असल्याचे केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
चालू आर्थिक वर्षापासून (२०१७-१८) हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी, गुणांकनाचे निकष केंद्राने निश्चित केले आहेत. या निकषांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्व-मूल्यांकन करून सविस्तर अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारला सादर करायचा आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अहवालांची तपासणी करून राज्य सरकारने ३० ऑक्टोबरपर्यंत नगरविकास विभागाला सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारने सादर केलेल्या मूल्यांकनाची छाननी करून नगरविकास विभागातर्फे अंतिम गुणांकन निश्चित केले जाणार आहे. तसेच, संबंधित संस्थांना अनुदान वितरित करण्याची शिफारस अर्थ मंत्रालयाला केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, विविध करांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारलेला निधी, वेतन आणि प्रशासकीय खर्च वगळता इत विकासकामांवर केला जाणारा खर्च, पाणीपुरवठ्याची स्थिती, सार्वजनिक स्वच्छतागृहे/शौचालयांना २४ तास पाणीपुरवठा, शहरात निर्माण होणाऱ्या एकूण घनकचऱ्यावर ८० टक्क्यांहून अधिक प्रक्रिया, अशा विविध निकषांवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यांकन केले जाणार आहे. या सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर कमाल किती गुण मिळतील, याचाही आराखडा केंद्राने सादर केला आहे.

पायाभूत सुविधांसाठीच निधीचा विनियोग
चौदाव्या वित्त आयोगाच्या सूचनांनुसार केंद्राकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध होणारा निधी केवळ शहरातील पायाभूत सुविधांसाठीच खर्च करण्याचे बंधन आहे. यामध्ये, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची देखभाल, पदपथ (फूटपाथ) निर्मिती, पथदिवे आणि स्मशानभूमी यावरच अनुदान खर्च केले जाणे अपेक्षित आहे, असे स्पष्ट निर्देश केंद्राने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अत्याचारांना आळा नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र अर्थात बालसुधारगृहात गेल्या दोन वर्षांत अनैसर्गिक अत्याचाराच्या पाच घटना घडल्या आहेत. अत्याचार करणारी मुले अल्पवयीन असल्याने त्यांना कारागृहात पाठविता येत नाही. त्यामुळे अशा मुलांचे केवळ सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन केले जाते. परिणामी अत्याचाऱ्याच्या घटनांना अद्याप आळा बसलेला नाही.

शिवाजीनगर येथील बालसुधारगृहात सात वर्षांच्या मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. बालकल्याण समितीने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. मात्र, येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात (बालसुधारगृह) वारंवार अल्पवयीन मुलांकडून मुलांवर सामूहिक अत्याचार घडूनही प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाय योजना होत नाही. केवळ अत्याचार करणाऱ्या मुलांचे एनजीओमार्फत समुपदेशन केले जाते.

खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, चोऱ्या करणाऱ्या विविध गंभीर गुन्ह्यातील बाल गुन्हेगारांना अशा बालसुधारगृहात ठेवले जाते. काही मुले सतत गुन्हे करीत असल्याने त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नसतो. तर, काही अल्पवयीन मुले हातून चुकून अथवा जाणूनबुजून गुन्हा करून प्रथमच बालसुधारगृहात निरीक्षणाखाली असतात.

बाल सुधार गृहात गेल्या दोन वर्षात मुलांनीच मुलांवर नैसर्गिक अत्याचार केल्याचे पाच प्रकार घडले आहेत. अत्याचार केल्यानंतर मुलांना जीवे मारण्याची धमकी देतात. त्यामुळे या घटना वेळेवर उघडकीस येत नाही. मात्र, संस्थेकडून समुपदेशन करून मनमोकळे बोलल्यानंतर मुलांकडून अत्याचाऱ्याच्या घटना कळतात. अत्याचार केल्याची माहिती समजताच केंद्राकडून पोलिसांत गुन्हा दाखल केला जातो. त्या वेळी अत्याचार करणाऱ्या मुलाचे वय तपासून पाहिले जाते. अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्याला कारागृहात पाठविले जाते. तर अल्पवयीन मुलाला पुन्हा त्याच सुधारगृहात पाठविले जाते. अल्पवयीन असल्याचा फायदा घेत अनेक बाल गुन्हेगारांकडून निष्पाप मुले अत्याचाराला नाहक बळी पडतात. त्यामुळे मुलांच्या मनावर विपरित परिमाण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.

‘संस्‍थेकडून समुपदेशन’

बालसुधारगृहात अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येताच पोलिस ठाण्यात संबंधित मुलांवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार देतो. त्या वेळी पोलिसांकडून मुलाचे वय तपासल्यानंतर त्याला केंद्रात पाठवायचे की कारागृहात हे ठरविले जाते. अल्पवयीन असल्यास त्याला पुन्हा सुधारगृहात ठेवले जाते. या मुलांकडून पुन्हा अत्याचाऱ्याच्या घटना घडू नयेत म्हणून संस्थेकडून समुपदेशन केले जाते.

- शरद कुऱ्हाडे, अधीक्षक, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येरवडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ‘सीईटी’ची परीक्षा

$
0
0

राज्यातून चार लाख विद्यार्थी बसणार; पुण्यात ४४ केंद्रे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात इंजिनीअरिंग आणि औषधीनिर्माणशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आज, गुरुवारी होत आहे. या परीक्षेला राज्यातून सुमारे ३ लाख ९८ हजार विद्यार्थी बसणार आहेत. पैकी ४४ हजार विद्यार्थी पुण्याचे आहेत.
परीक्षा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी ४५ मिनिटे अगोदर केंद्रावर प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नीट प्रवेश परीक्षेमध्ये देशभरात विद्यार्थ्यांना ड्रेसकोड, दागिणे न घालणे आदींची सक्ती करण्यात आली होती. शहरात एकूण ४४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. सकाळी दहा ते दुपारी साडेचार या वेळेत ही परीक्षा होणार आहे.
गणिताचा पहिला पेपर सकाळी १० ते ११.३० दरम्यान होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० ते दोन या वेळेत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पेपर होणार आहे.. तिसरा पेपर जीवशास्त्राचा असून, तो दुपारी ३ ते ४.३० या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना पुस्तके, घड्याळ, मोबाइल, कॅलक्युलेटर, लॉग टेबल आदी वस्तू आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशपत्र बाळगणे आवश्यक
सीईटीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे तंत्रशिक्षण मंड‍ळाने (डीटीई) दिलेले प्रवेशपत्र असणे आवश्यक आहे. ऐनवेळी एखाद्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र गहाळ झाल्यास त्याला छायाचित्र असलेल्या ओळखपत्राच्या आधारे प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अथवा सरकारने जारी केलेले कोणतेही ओळखपत्र सोबत बाळगावे, अशा सूचना ‘डीटीई’कडून देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून १५ मेपर्यंत अंदमानात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून येत्या काही दिवसांत म्हणजेच १५ मेच्या आसपास अंदमानात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मान्सून अंदमान निकोबार बेटाच्या काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे निरीक्षण हवामान विभागाने नोंदवले आहे. हा अंदाज खरा ठरल्यास मान्सून पाच दिवस आधीच अंदमानात दाखल होईल.

दर वर्षी भारतात मान्सून अंदमान, निकोबारमार्गे दाखल होतो. दर वर्षी सर्वसाधारण वेळापत्रकानुसार २० मे रोजी मान्सून अंदमानच्या किनारपट्टीवर दाखल होतो. त्यानंतर पुढील प्रवास करीत एक जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदाचा मान्सून निर्धारित वेळेच्या पाच दिवस आधीच म्हणजेच १५ मेच्या आसपास अंदमानचा दक्षिण भाग आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंदमान व निकोबार बेटांच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे या भागात मान्सूनची आगेकूच होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सून अंदमानमध्ये सर्वप्रथम दाखल होत असला, तरी प्रत्यक्षात केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मान्सून भारतात दाखल झाल्याचे मानले जाते. सर्वसाधारणपणे एक जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. त्या पार्श्वभूमीवर यंदा निर्धारित वेळेच्या काही दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनची त्यानंतरची वाटचाल मात्र अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यावर अवलंबून असेल, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्यात उद्या पाऊस?
पुण्यात बुधवारी ३९.६ अंश सेल्सिअस कमाल तर २१.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर लोहगाव येथे ४०.५ अंश सेल्सिअस कमाल आणि २३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला येथे (४४.१ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पुण्यात शुक्रवारी दुपारी किंवा सायंकाळी पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात पाणीकपात नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये सुमारे ६.८० टीएमसी पाणीसाठा आहे. हा साठा १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा असल्याने जलसंपदा विभागाने पाणीकपातीचा प्रस्ताव तयार केलेला नाही. त्यामुळे पुणेकरांची या उन्हाळ्यातील संभाव्य पाणीकपातीतून सुटका झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ११ मे रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर पाण्याची आढावा बैठक घेण्यात येणार होती. मात्र, बापट परदेश दौऱ्यावरून आले नसल्याने ते आल्यानंतर ही बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पुण्याला दररोज १३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दहा एप्रिलला कालवा समितीची बैठक घेण्यात आली होती. त्या वेळी खडकवासला धरणामध्ये सुमारे १०.२६ टीएमसी पाणीसाठा होता. दररोजचा पाणीवापर आणि उन्हाळी आवर्तन यामुळे सध्या धरणांमध्ये ६.८० टीएमसी पाणीसाठा उरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडिट कार्ड ‘फ्रॉड’ तिपटीने वाढले

$
0
0

चार महिन्यांत फसवणुकीच्या ७७३ तक्रारी


Shrikrishna.Kolhe
@timesgroup.com
Tweet : ShrikrishnakMT

पुणे : केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर ‘कॅशलेस’ व्यवहाराला प्रोत्साहन देऊन सर्व व्यवहार कार्डद्वारे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला असून कार्डद्वारे व्यवहार वाढले आहेत. मात्र, वाढत्या ऑनलाइन व्यवहरांचा सायबर चोरटे गैरफायदा घेत आहेत. पुण्यात क्रेडिट, डेबिट व कार्डमनीद्वारे व्यवहार करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. गेल्या चार महिन्यांत ७७३ जणांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा तिपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सरकारने नोव्हेंबर महिन्यात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर पाचशे व दोन हजारांची नवीन नोट बाजारात आणली. त्याबरोबरच नागरिकांनी जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करण्याचा सूचना दिल्या. नागरिकांनी देखील कॅशलेश व्यवहाराला चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करण्यास सुरुवात केली. अनेकांनी स्वतःचे क्रेडिट, डेबिट कार्ड काढून घेतले. कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देण्यास सुरुवात केली. पण, सायबर चोरट्यांनी कार्डद्वारे व्यवहार करणाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काहींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कार्डची गोपनीय माहिती घेत ऑनलाइन पैसे काढून घेतले जात आहेत.

गेल्या वर्षभरात (२०१६) पुण्यात क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे फसवणुकीचे ७४३ अर्ज आले होते. यामध्ये नागरिकांची लाखो रुपायंची फसवणूक झाली आहे. नोटाबंदीनंतर पुण्यात या वर्षी हा अकडा खूपच वाढला आहे. चार महिन्यातच गेल्या वर्षीचा अकडा पार झाला असून या चार महिन्यांत क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे फसवणुकीच्या ७७३ घटना घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images