Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटीच्या जादा गाड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उन्हाळ्याची सुटी आणि लग्नसराईमुळे प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नियमित गाड्यांबरोबर १०४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध भागांत या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाकडून उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत प्रवाशांच्या मागणीनुसार दर वर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदा देखील जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, प्रवाशांची एसटी स्टँडवर होणारी गर्दी लक्षात घेऊन जादा कर्मचाऱ्यांची नेमणूकही केली आहे. जादा गाड्यांमध्ये विनावाहक गाड्यांचाही समावेश आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी www.msrtc.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन तिकीट आरक्षणाची सेवा उपलब्ध करून दिली आहे.

दर तासाला व्होल्वो
स्वारगेट एसटी स्टँड येथून मुंबई मार्गावर सध्या दर तासाला शिवनेरी गाडी आहे. मात्र, प्रवाशांची वाढती मागणी असल्याने दर अर्ध्या तासाला शिवनेरी गाडी सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एक मेपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे-दादर आणि पुणे-बोरिवली या मार्गावर पहाटे पाच ते रात्री दहा या गाड्या धावतील, असे एसटीच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्वेलरी आणि थ्रीडी रांगोळी शिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पेपर क्विलिंगचे आकर्षक दागिने आणि भन्नाट थ्रीडी रांगोळी शिकण्याची संधी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या वतीने देण्यात आली आहे. शनिवारी २९ एप्रिल रोजी ज्वेलरी आणि थ्रीडी रांगोळीची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी चार ते सहा या वेळात निगडीच्या इन्स्पिरीया मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर एकलव्य हॉलमध्ये ही कार्यशाळा होईल.
पेपर क्विलिंगचा वापर करून वैविध्यपूर्ण कलात्मक वस्तू बनवता येतात. या कार्यशाळेत पेपर क्विलिंगच्या कलेतून विविध आकार कसे बनवायचे, हे शिकवले जाईल. त्यानंतर त्याच आकारांचा वापर करून ग्रीटिंग, कानातले झुमके या वस्तू बनवायला शिकवल्या जातील. तुम्ही स्वतः बनवलेले आवडत्या रंगातील झुमके घरी नेता येतील. यासाठी लागणारे सर्व साहित्य तुम्हाला पुरवले जाईल. याव्यतिरिक्त आणखी दोन प्रकारचे पेपर क्विलिंगचे कानातले आणि ग्रीटिंग हे प्रात्यक्षिकाद्वारे शिकवले जातील.
याचबरोबर रांगोळीचा एक वेगळा प्रकार म्हणजे थ्रीडी रांगोळी शिकवली जाईल. यात रोज देव्हाऱ्यासमोर काढायची रांगोळी आणि निसर्गचित्र असे दोन प्रकार शिकवले जातील. संगीता आणि चैतन्य सुतार याबाबत मार्गदर्शन करतील. ही कार्यशाळा सर्वांकरिता खुली असून यासाठी शुल्क असणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सदस्यांना या कार्यशाळेत विशेष सवलत असणार आहे. कार्यशाळेत येताना प्रत्येकाने लहान आकारातील फेव्हीकॉल आणि वही, पेन घेऊन येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक असून ९९७५४०४०२६ आणि ९७६२४२९३८५ या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्काळ तिकिटापेक्षा परवडतोय दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तत्काळ तिकीट काढून जागा आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना जादा पैसे मोजून तिकीट काढण्याची आवश्यकता नाही. ऐनवेळच्या प्रवाशांनी जनरल डब्याचे तिकीट काढून आरक्षित डब्यात बसावे आणि तिकीट तपासणी वेळी ‘टीसी’ला जनरल तिकीटाच्या रकमेएवढेच पैसे दंड म्हणून द्यावेत, असे केल्याने प्रवाशाला मूळ तत्काळ तिकिटाच्या निम्म्याहून कमी रकमेत प्रवास करता येतो.

मुंबईला जाणाऱ्या हैदराबाद एक्स्प्रेसने बुधवारी क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी पुण्याहून दादरपर्यंत प्रवास केला. या प्रवासासाठी त्यांनी रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्रातून स्लीपर कोचचे तत्काळ तिकीट घेतले. त्यासाठी त्यांनी ३८५ रुपये शुल्क दिले. या नियमित तिकिटासाठी १२० रुपये शुल्क आहे. तत्काळ तिकीट घेऊन प्रवास करणारे देशपांडे प्रवास करीत असलेल्या डब्यात जनरल तिकीट काढलेला एक प्रवासी प्रवास करीत होता. ‘टीसी’ने तपासणी केली असता, त्याच्याकडे आरक्षित स्लीपर कोचचे तिकीट नसून, जनरल डब्याचे तिकीट असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी ‘टीसी’ने संबंधित प्रवाशाला ७० रुपये अतिरिक्त शुल्क व दंड आकारून त्यास आरक्षित डब्यात अधिकृतपणे सामावून घेतले. त्यामुळे या प्रवाशाने मुंबई प्रवासासाठी एकूण १४० रुपये शुल्क दिले. ही रक्कम तत्काळ तिकिटाच्या निम्म्याहून कमी आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे तत्काळ तिकीच धारकांची लूट असल्याची भावना संबंधित प्रवाशाने व्यक्त केली.

दरम्यान, हा रेल्वेचा धोरणात्मक निर्णय असून, तत्काळ तिकिटाची रक्कम व आरक्षित डब्यात जनरल तिकीटाद्वारे प्रवास करणाऱ्यांकडून आकारले जाणारे शुल्क, हे रेल्वे प्रशासनाने ठरविल्याप्रमाणेच घेतले जातात, असे स्पष्टीकरण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

तत्काळ तिकीट आणि जनरल तिकीट घेणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट शुल्कात इतकी तफावत असल्यास, मी तत्काळ तिकीट घेतले, ही चूक झाली असे म्हणावे लागेल. रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकीटाचा दर कमी करावा किंवा जनरल तिकीटाचे आरक्षित तिकिटात रूपांतर करताना आकारले जाणारे शुल्क व दंड याचा फेरविचार करावा.
- विकास देशपांडे (प्रवासी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयाचा उन्माद नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘निवडणुकीतील अभूतपूर्व विजयामुळे हुरळून जाऊन त्याचा उन्माद चढू देऊ नका, विजय नम्रपणाने स्वीकारायला शिका,’ अशा शब्दांत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी स्वपक्षातीलच नेते आणि कार्यकर्त्यांना घरचा आहेर दिला. ‘सत्ताबदल झाल्यानंतर पूर्वीच्या राजवटीत आणि आपल्यामध्ये काही फरक दिसणार नसेल, तर जनतेचा भ्रमनिरास होईल,’ अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे औपचारिक उद्घाटन बुधवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी अनेक जुन्या संदर्भांचा दाखला देत, कार्यकर्त्यांची शिकवणीच घेतली. अवघ्या काही दिवसांपूर्वीच पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरून पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रकार झाला होता. त्याचा थेट उल्लेख गडकरी यांनी केला नसला, तरी विजयाचा उन्माद नको, अशी भूमिका मांडत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना योग्य भाषेत संदेश दिला. ‘धरणे, निदर्शने, सत्याग्रह, आंदोलन अशा स्वरूपात जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका आपण योग्य तऱ्हेने बजावली आहे; पण आता आपण सत्ताधारी आहोत, सत्ता चालविणारे आहोत, याचा विचार करायला शिका,’ असा सल्ला गडकरी यांनी दिला. तसेच, ‘विरोधी पक्षासारखे वागण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ नका,’ असा टोमणा त्यांनी लगावला.

एखाद्या निवडणुकीत पराभव झाला, की त्याचे विश्लेषण अनेकप्रकारे केले जाते. मात्र, विजयाचे विश्लेषण करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहून आणि कितीही पराभव झाले तरी त्याने खचून न जाता संघटनवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या यापूर्वीच्या कार्यकर्त्यांच्या समर्पण वृतीमुळेच पक्षाला सध्याचे दिवस पाहायला मिळत आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

‘आत्मविश्वासाचे रूपांतर अहंकारात नको’
‘आत्मविश्वास आणि अहंकार यामधील सीमारेषा अत्यंत धूसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅप’च्या तीनच फेऱ्या होणार

$
0
0

नव्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी; विद्यार्थ्यांचा त्रास वाचणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे


राज्यात इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेऱ्या होणार आहेत. यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांसाठी ‘कॅप’च्या चार फेऱ्या झाल्या होत्या. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशावेळी होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, आवडीच्या कॉलेजात प्रवेश मिळणे सोयीचे होणार आहे.

अशी माहिती तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात काही वर्षांपूर्वी इंजिनीअरिंगच्या डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यातच इंजिनीअरिंगला प्रवेश न मिळालेले किंवा बारावीला अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी दहावीच्या गुणांवर डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत होते. त्यामुळे राज्यात इंजिनीअरिंग डिग्रीसोबतच डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठीच्या कॉलेजांमध्येही मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित नोकऱ्या मिळत नसल्याने इंजिनीअरिंगच्या डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी प्रवेश प्रक्रिया राबवताना सरकारने दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी चार फेऱ्यांऐवजी तीनच फेऱ्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची प्रवेशावेळी होणारी धावपळ कमी होण्याची आणि प्रवेश प्रक्रिया कमी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. या प्रवेश प्रक्रियांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रेवेशाच्या तीन फेऱ्या पार पडल्यानंतर कॉलजांमध्ये अनेक जागा रिक्त राहत असल्याचे प्रकार घडत होते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने जागांची भरती सक्षम प्राधिकाऱ्याच्यामार्फत कम्प्युटर प्रणालीद्वारे एकत्रितपणे सामायिक प्रवेश पद्धतीद्वारे करणार असल्याचे जाहीर केले. याबाबत सविस्तर माहिती कॅप फेऱ्यांसोबत जाहीर करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्यांची संघर्षयात्रा, आमची संवादयात्रा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक संघर्षयात्रा काढत आहेत. तर, आम्ही सुमारे २५ लाख शेतकऱ्यांशी संवाद यात्रा काढणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या चिंचवड येथील बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा खरपूस शब्दांत समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, केवळ नाव दिल्याने यात्रा संघर्षाची होत नाही. त्यासाठी मनातून संघर्ष करावा लागतो. `व्हिआयपी` संस्कृतीत काम केलेल्यांना १८ वर्षांनंतर जमिनीवर येऊन आंदोलन करण्याची उपरती झाली, याबद्दल आनंदच वाटतो. परंतु, शेतकऱ्यांच्या समस्यांना जबाबदार असणारे कोडगे नेतेच निर्लज्जपणे संघर्ष यात्रा काढत आहेत, याचे वाईट वाटते. सत्तेवर असताना यांनीच भ्रष्टाचार केला. केंद्र सरकारकडून पॅकेज घेत पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे.`

संघर्षयात्रेला समर्थन मिळत नसल्याचा दावा करून मुख्यमंत्री म्हणाले, `पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी कार्यविस्तार योजनेच्या माध्यमातून सुमारे २५ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावे. शिवारावर जाऊन संवाद साधावा. मोठ्या सभा घेऊ नयेत. कोपरा सभांवर भर द्यावा. समस्या जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहचवाव्यात', असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव, शेतकऱ्यांकडून तूर खरेदी आणि दारुबंदी या मागण्यांसाठी चिंचवड येथे आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या ठिकाणी येऊन देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी तूरडाळ, कांदा आणि दारुच्या बाटल्या सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ फेकून आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोनलामुळे पोलिसांची धांदल उडाली. त्यांनी तातडीने देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

समारोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. शिवसेनेबाबतच्या भूमिकेबद्दल विचारले असता शिवसेना आणि भाजपत `मधुर` संबंध असल्याचे दानवे मिश्किलपणे म्हणाले. दोन्ही पक्षांना त्यांचे संघटन वाढविण्याचा अधिकार आहे. दोन्ही पक्षांनी हद्द ठरवून घेतलेली नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन भोजन करून आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांत योग्य समन्वय आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत योग्य वेळी निर्णय होईल, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने महिलेची फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जीवनसाथी डॉटकॉम’च्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेला लग्नाच्या आमिषाने फसवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या महिलेचे आक्षेपार्ह फोटो तसेच व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिची बदनामी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबईस्थित एका संघटनेच्या उपाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुमित उर्फ महेश शिवकुमार सूर्यवंशी (वय ३१, रा. पनवेल, जि. राजगड) याच्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करण्यात आलेल्या महिलेचे लग्न झाले आहे. मात्र, या महिलेचे आपल्या पतीशी पटत नसून, घटस्फोटासाठी कोर्टात दावा दाखल आहे. घटस्फोट मिळणार असल्याच्या शक्यतेने तिने ‘जीवनसाथी डॉटकॉम’वर आपले प्रोफाइल तयार केले होते. या वेळी त्यांना महेश सूर्यवंशी या नावाने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली होती. त्यातून त्यांच्यात ओळख झाली होती. सूर्यवंशीने या महिलेशी लग्नाच्या बहाण्याने तिच्या दोन्ही मुलींचा स्वीकार करण्याचे आश्वासन दिले.
सूर्यवंशीने या महिलेची फसवणूक करत तिच्यासोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो हे सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांकडून ७२ मोबाइल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
वाकड येथील मोबाइल शॉपीत ७२ मोबाइल चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी पाठलाग करून गुरुवारी (२७ एप्रिल) पहाटे अटक केली. त्यांच्याकडून मोबाइलसह चोरीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
यशवंत उर्फ गोंड्या बाळू वाघमारे (वय १८) आणि तालिफ उर्फ मिरची वली शेख (१८, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फौजदार रत्ना सावंत यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. वाघमारे आणि शेख हे पिंपरी चौकात आल्याची माहिती मिळाल्यानंतर फौजदार सावंत या पथकासह त्याठिकाणी पोहोचले. परंतु, पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या वाघमारे आणि शेख या दोघांना संत तुकारामनगर मार्शलचे पोलिस शिपाई घाडगे, कुंभार, हवालदार खेडकर, महिला शिपाई पाटील, शिंदे यांनी पाठलाग करून अटक केली.
या दोघांनी काही दिवासांपूर्वी वाकड येथील एक मोबाइल शॉपीचे दुकान फोडले होते. तेथे रिपेरिंगसाठी आलेले तब्बल ७२ मोबाइल संच या दोघांनी चोरल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच, पिंपरी येथून चोरलेली पल्सर देखील या दोघांकडून जप्त करण्यात आली आहे. शहरातील अन्य काही गुन्हे या दोघांकडून उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांचे ‘इशारे’; प्रदेशाध्यक्षांचे ‘फवारे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘विजयाच्या यशामुळे उन्मत्त न होता लोकांच्या विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, गच्छंति अटळ आहे,’ असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत ‘सावधान’ केले; तर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हास्याचे फवारे उडवित कार्यकर्त्यांना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिला.

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या त्रैमासिक बैठकीचा समारोप चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भाषणांनी झाला. नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्र्यांनी गंभीर मुद्द्यांना हात घालीत कार्यकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला. तर, दानवे यांनी खुमासदार शैलीत प्रसंगी विनोदी चिमटे काढत पक्षविस्तारासाठी कार्यरत राहण्याचा सल्ला दिला. विजयाचा जल्लोष विसरून आता लोकांशी संवाद साधण्याचे आवाहन दोन्ही वक्त्यांनी या वेळी केले.

बैठकीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरवात पक्षाची भविष्यातील दिशा, प्रस्ताव-२ आणि खासदार-आमदारांच्या प्रवासाचा आढावा या कार्यक्रमांनी झाली. दुसऱ्या सत्रात, राष्ट्रीय अध्यक्षांचा प्रवास आणि प्रस्ताव-३ कार्यक्रम झाले. त्यानंतर राजकीय ठराव आणि समारोप झाला. केंद्र, राज्य आणि राज्यातील नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे भाजप खऱ्या अर्थाने महाराष्ट्रमय झाली असून, आता सत्ता हे सेवेचे साधन असल्याच्या तत्त्वानुसार लोकप्रतिनिधींनी काम करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

चार ‘सी’चे राजकारण पक्षाच्या विजयाची मालिका थांबणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘यशामुळे उन्मत्त न होता, अहंकार न बाळगता समाजपरिवर्तनासाठी एकत्र काम करावे. पक्ष कोणामुळे थांबत नाही. जनतेने सत्ता दिली असताना तत्त्वांशी तडजोड न करता काम करावे. अन्यथा, सत्ता गेली तरी चालेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण कास्ट, करन्सी, करप्शन आणि क्राइसिस ऑफ क्रेडिबिलीटी या चार ‘सी’वर अवलंबून होते. तर, आपले राजकारण कॅपिसीटी, कमिटमेंट, कॅरेक्टर आणि क्रेडिबिलीटी या चार ‘सी’वर आधारित असावे. विश्वास मिळविणे सोपे असते. परंतु, तो टिकविणे फार अवघड असते, याची जाणीव ठेवावी.’

दानवेंचे हास्याचे फवारे

‘लाल दिवे गेल्यामुळे लोक आता आपल्याला ओळखेनासे झाले आहेत. नाक्यावरचा शिपाईदेखील गाडीत कोण आहेत?,’ असा प्रश्न विचारू लागला आहे, असे खुमासदार शैलीत नमूद करून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी धीरगंभीर वातावारणात हास्याचे रंग भरले. एका मंत्र्याला तर त्याला दिलेल्या खात्याचे काम काय? या प्रश्नाने चक्रावले होते. हा प्रसंग सांगितल्यानंतर सभागृहात हसता हसता पुरेवाट झाली. जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्त्वाची चर्चा असल्याचा किस्सा सांगताना स्वतः दानवे यांनी केवळ ‘How Much’ शब्दाच्या जोरावर बारा देश फिरल्याचे प्रांजळपणे मान्य केले. त्यावर सभागृहात जोरदार हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैठकीत चिंतन अन् रस्त्यांवर आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या चिंचवड येथील बैठकीच्या निमित्ताने विचारमंथन, चिंतन होत असताना भूमाता ब्रिगेडसह विरोधी सर्वपक्षीय आंदोलनांतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले.
शेतकरी कर्जमुक्ती, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, शास्तीकर माफी यांसह राज्यातील जनतेला दिलेल्या विविध आश्वासनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला आठवण करून देण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बुधवारपासून (२६ एप्रिल) उपोषण करण्यात आले. त्याअंतर्गत गुरुवारी दुपारी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करीत मुख्य संयोजक मारुती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्वराज अभियानचे मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, देवेंद्र तायडे, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला.
चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात झालेल्या दोन दिवसीय आंदोलनाला खासदार राजू शेट्टी यांच्यासह विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्विकारावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, सुरक्षिततेच्या कारणास्तव ती अमान्य करण्यात आली. शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे आल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. हे सर्वजण बैठकीचे ठिकाण असलेल्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, कांद्याला योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात यावी, दारूबंदी आदी मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बैठकीच्या ठिकाणी अचानक येऊन आंदोलन केले. प्रेक्षाृहाच्या प्रवेशद्वारावर तूरडाळ, कांदा आणि दारुच्या बाटल्या फेकल्या. त्यामुळे महिला पोलिसांनी देसाईसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची ‘वर्ग’वारी

$
0
0

नाट्यसंमेलनाच्या देणगीसाठी पदांनुसार ‘रेट कार्ड’

Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

पुणे : नाट्य संमेलनाचा खर्च पेलण्यासाठी आयोजकांनी चक्क रेट कार्ड छापले आहे. विशेष म्हणजे सरकारची कामे करण्यासाठी नेहमी ज्यांना जुंपले जाते त्या शिक्षकांसाठीच हे रेट कार्ड छापण्यात आले आहे. देणगी देणे ऐच्छिक असले, तरी त्यातील शिक्षकांची पदानुसार आणि पगारानुसार केलेली ‘वर्ग’वारी चर्चेचा विषय ठरली आहे.
९७व्या नाट्य संमेलनाचा समारोप झाल्यानंतरही स्वागताध्यक्षांचे हे पत्रक नाट्यनगरीत चर्चेत आहे.
नाट्य संमेलनाचा मान उस्मानाबादला दिल्यानंतर शंका व्यक्त केली जात होती. सतत दुष्काळ सोसणारा हा भाग आणि उस्मानाबादसारखे छोटे शहर खर्चाचे शिवधनुष्य कसे पेलणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यातच हे संमेलन सर्वांच्या सहभागातून यशस्वी करायचे असल्याने आयोजकांकडून मदतीचे आवाहन केले जात होते. सरकारच्या २५ लाख रुपयांपेक्षा अधिक निधी हवा असल्याने पुन्हा एकदा विश्वासू घटक असलेल्या शिक्षकांवर निधी संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. संमेलनाचा खर्च तीन ते चार कोटीपर्यंत गेल्याचे बोलले जात असून यामध्ये शिक्षकांनी केलेली मदत मोलाची ठरली आहे.
स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शिक्षकांसाठी काढलेले पत्रक चर्चेचा विषय ठरले आहे. यातील शिक्षकांची पदानुसार आणि पगारानुसार केलेली ‘वर्ग’वारी गंमतीशीर आहे. परंतु, त्यातून ‘वर्ग’ पद्धत निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. पत्रकानुसार मुख्याध्यापकांनी एक हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांनी सातशे रुपये, प्राथमिक शिक्षकांनी पाचशे रुपये, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तीनशे रुपये, अशी देणगी द्यायची आहे. ही देणगी स्वीकारण्याची जबाबदारी पुन्हा शिक्षकांवरच सोपविण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यात प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहेत.
‘माझ्याकडे आतापर्यंत एक लाख रुपये जमा झाले आहेत. ही देणगी ऐच्छिक असून शिक्षक स्वयंस्फूर्तीने मदत करत आहेत. काही शिक्षक वेतन मिळाल्यानंतर देणगी देणार आहेत. देणगी ठरलेल्या रकमेनुसार द्यायची असल्याने कमी देणगी स्वीकारली जात नाही. त्यामुळे देणारे देतात, तर काही जण नकार देतात,’ असा अनुभव एका शिक्षक प्रतिनिधीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ‘मटा’ला सांगितला. दरम्यान, असे पत्रक केवळ शिक्षकांसाठीच का, असा सवाल विचारला जात आहे.

कोट

उस्मानाबादमधील हा पहिलाच मोठा सोहळा होता. नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांची मदत अपेक्षित होती. त्यासाठीच मदतीचे आवाहन करणारे पत्रक काढण्यात आले. कोणावरही सक्ती केलेली नाही.
- सुजितसिंह ठाकूर, स्वागताध्यक्ष व आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीची पाठ्यपुस्तके बदलली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विद्या प्राधिकरणाने (एनसीईआरटी) इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये बदल करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात आली आहे. या निर्णयानुसार अभ्यासक्रमाला व्यावसायाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी गुरुवारी दिली.
या नव्या निर्णयानुसार आता माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) हा विषय न राहता त्याचा समावेश सर्व विषयांमधून करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणित या विषयाचा पर्याय राहणार नाही. केवळ भूमिती आणि बीजगणित हेच विषय राहणार आहेत. सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल या विषयाबरोबर अर्थशास्त्र विषय राहणार नसून त्याऐवजी भूगोल आणि गणित या विषयांमध्ये अर्थशास्त्रविषयक क्षमता व आशय यांचा समावेश केला आहे.
आता व्यक्तिमत्त्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन यांच्याऐवजी ‘स्व-विकास आणि कलारसास्वाद’ हा विषय असेल. दरम्यान, संरक्षणशास्त्र विषयाला पर्याय म्हणून स्काउट गाइड, नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा, एनसीसी राहणार आहेत. शिक्षण व्यावसायाभिमुख व्हावे म्हणून नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) हे नववीसोबत दहावीसाठी सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने ज्या शाळांना ‘एनएसक्यूएफ’चे विषय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, त्यांनाच हे विषय घेता येतील. तसेच, या विषयाला इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इतर विषय पर्याय म्हणून दिले आहेत.
इयत्ता नववीसाठी याची अंमलबजावणी २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून; तर दहावीसाठी २०१८-१९ शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. ‘एनएसक्यूएफ’च्या विषयासाठी एकूण १०० गुण राहणार असून ३० गुणांची लेखी; तर ७० गुणांची प्रत्याक्षिक परीक्षा असेल. या विषयामध्ये मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स, ऑटोमोबाइल सर्व्हिस टेक्निशियन, रिटेल मर्चंडायझिंग, हेल्थकेअर जनरल ड्युटी असिस्टंट, ब्युटी अॅन्ड वेलनेस, फिजिकल एज्युकेशन अॅन्ड स्पोर्ट्स, टूरिझम, अॅग्रीकल्चर, मीडिया अँड एंटरटेन्मेंट, बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिस अशांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना यापैकी एक विषय अभ्यासासाठी निवडता येईल. दरम्यान, व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरांसाठी राज्याचे ‘अमृत’ कमी

$
0
0

पुणे : केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेमध्ये राज्यातील ४४ शहरांचा समावेश करण्यात आला असला, तरी संबंधित शहरातील विविध योजनांसाठी राज्याने गेल्या दोन वर्षांत निधीचा ५० टक्के वाटा उचलला नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने चारशे कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले असताना, राज्याने त्यांच्या ४७७ कोटी रुपयांपैकी जेमतेम २०९ कोटी रुपये वितरित केले आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने राज्याच्या विविध शहरांतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ‘अमृत’ योजना जाहीर केली. त्या अंतर्गत एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली ४४ शहरे निवडण्यात आली. या सर्व शहरांचा एकत्रित वार्षिक आराखडा (सॅप) केंद्राला सादर करण्यात आला. त्यानुसार २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांमध्ये केंद्र सरकारने विविध प्रकल्पांसाठी ४१८ कोटी रुपये मंजूर करून वितरित केले. अमृत योजनेंतर्गत संबंधित शहरांतील विकासासाठी राज्यांना त्यांचा हिस्सा उचलावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याने त्याकरिता ४७७ कोटी रुपये वितरित करणे अपेक्षित होते. परंतु, अवघ्या २०९ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सुपूर्त केले आहे. राज्याचा प्रलंबित हिस्सा तातडीने संबंधित शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग केला जावा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्याला केल्या आहेत.
अमृत योजनेमध्ये राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांसह अकोला, नगर, बार्शी, इचलकरंजी, नंदुरबार, शिर्डी, उदगीर, बीड अशा आणखी शहरांचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण यासारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी केंद्र-राज्याकडून अनुदान प्राप्त होणार आहे. यामध्ये मोठ्या शहरांपेक्षा लहान-लहान शहरांमधील प्रकल्पांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, राज्याकडून अपेक्षित निधी वितरित केला जात नसल्याने छोट्या शहरांमधील पायाभूत सुविधांचे प्रकल्प अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

राज्याने दिली केवळ ४५ टक्के रक्कम
अमृत योजनेच्या पहिल्या वर्षात (२०१५-१६) केंद्र सरकारने विविध प्रकल्पांसाठी १८२ कोटी रुपये मंजूर करून वितरित केले. त्यानुसार राज्याने २१४ कोटी रुपयांचा वाटा उचलणे अपेक्षित होते. त्यापैकी निव्वळ ९१ कोटी रुपयेच राज्याने वितरित केले. गेल्या वर्षीही (२०१६-१६) केंद्राने त्यांच्या हिश्श्याचे २३५ कोटी रुपये मंजूर केले. राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना २६२ कोटी रुपये वितरित करणे अपेक्षित असताना, अवघे ११७ कोटी रुपयेच वितरित केले गेले. त्यामुळे दोन्ही वर्षांत राज्याने केवळ ४५ टक्के रक्कमच शहरांतील प्रकल्पांसाठी दिली असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुण्यात पाणीवापर जास्त
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून पुण्यातील विविध प्रकल्पांना निधी मिळण्याची अपेक्षा होती. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी समान पाणीपुरवठा प्रकल्पासाठी केंद्राचे अनुदान मिळेल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, राष्ट्रीय निकषांनुसार इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात दरडोई पाणीवापर जास्त असल्याने अमृत योजनेमध्ये शहरातील पाणीपुरवठा योजनेचा समावेश होऊ शकला नाही. गेल्या दोन वर्षांत पुण्याला अमृत योजनेतून जेमतेम १५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन महामंडळाचा महाराष्ट्र दिन म्युनिकमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्रातील पारंपरिक खेळांसह राज्याची ओळख असलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य संस्कृतीची ओळख जर्मन नागरिकांना करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे यंदाचा ‘महाराष्ट्र दिन’ म्युनिक आणि स्टुगार्ट या शहरांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. जर्मनी येथील भारतीय दूतावास आणि महाराष्ट्र मंडळ म्युनिक यांच्यातर्फे येत्या ६ आणि ७ मे रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जर्मनमधील नागरिकांना भारतीयांबद्दल खूप कुतूहल आणि आकर्षण आहे. भारतात फिरायला येणारी ही मंडळी आवर्जून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे बघण्यासाठी येतात. काही दिवसांपूर्वीच बर्लिनमध्ये झालेल्या एका पर्यटन प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ (एमटीडीसी) सहभागी झाले होते. त्या वेळी महाराष्ट्र मंडळ बर्लिनच्या टीमने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली संस्कृती आणि परंपरेचा प्रवास उत्तम पद्धतीने मांडला. जर्मन नागरिकांनी उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. या धर्तीवर मंडळाने आता तेथील भारतीय दूतावासाच्या साह्याने म्युनिक आणि स्टुगार्टमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती एमटीडीसीच्या सरव्यवस्थापक स्वाती काळे यांनी दिली.
महोत्सवासाठी भारतीय दूतावास आणि महाराष्ट्र मंडळ म्युनिक यांनी जय्यत तयारी केली आहे. यासाठी मंडळातर्फे त्यांना सात लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट महोत्सव, महाराष्ट्रीय खाद्य पदार्थांची गल्ली, राज्याचा ऐतिहासिक वारसा उलगडणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. राज्यातील पर्यटनाची सविस्तर माहिती देणारे स्टॉलही येथे उभारण्यात येणार आहेत. एमटीडीसी येथे स्वतंत्र स्टॉल मांडणार असून तिथे माहितीपत्रके, नकाशे, सांस्कृतिक-ऐतिहासिक पर्यटनस्थळांवर आधारित लघपुट दाखविण्यात येतील. स्टुगार्ट हे शहर मुंबईच्या धर्तीवरच साकारण्यात आले आहे. या शहरातही महोत्सवादरम्यान महाराष्ट्राचे विविध पैलू सांस्कृतिक कार्यक्रम आणि छायाचित्र प्रदर्शनातून उलगडण्यात येणार आहेत, असे काळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरती ​प्रक्रियेसाठी डमी उमेदवार उभा

$
0
0

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल; रॅकेटची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) भरती प्रक्रियेदरम्यान डमी उमेदवार उभा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पोलिस भरतीमध्ये डमी उमेदवारांचे रॅकेट उघडकीस आले होते. त्यामुळे ‘एसआरपीएफ’च्या भरतीतही असे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘एसआरपीएफ’ बल गट क्रमांक दोनचे पोलिस निरीक्षक वैजनाथ श्यामराव चव्हाण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, नितीन बाबूराव पवार (वय ३७, ओतूर ता. जून्नर, जि. पुणे) व त्याचा साथीदार आणि दीपक तुकाराम पानसरे (वय २५, डिंगोरे ता. जुन्नर, जि. पुणे) व त्याचे दोन साथीदार अशा एकूण पाच जणांवर वानवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘एसआरपीएफ’च्या ५० जागांसाठी नुकतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात ८९० उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी ७७९ उमेदवारांनी एप्रिल महिन्यात ‘एसआरपीएफ’ बल गट क्रमांक दोनच्या वानवडी येथील मैदानावर लेखी परीक्षा दिली. फिर्यादी चव्हाण यांच्यावर भरती प्रक्रियेचे कामकाज सोपविण्यात आले होते. या दरम्यान लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीच्या वेळी व्हिडिओ शुटिंग आ​णि सीसीटीव्हीचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, २५ एप्रिल रोजी पोलिस निरीक्षक चव्हाण आणि त्यांचे सहकारी लेखी परीक्षेच्या उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासत होते. त्यावेळी दीपक पानसरे या उमेदवाराचा हजेरी पटावरील फोटो, ओळख पत्र, रजिस्टर आणि लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जातील फोटो वेगवेगळे दिसून आले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यावेळी त्यांनी एक एप्रिल रोजी झालेल्या शारीरिक चाचणीचे व्हिडिओ फुटेज तपासले. त्यामध्ये शारीरिक चाचणीला दुसरी व्यक्ती असल्याचे दिसून आले. १८ एप्रिल रोजी झालेल्या लेखी परीक्षेला सुद्धा पानसरे ऐवजी दुसरी व्यक्ती होती.
ही पाहणी करताना नितीन बाबूराव पवार या उमेदवाराच्या हजेरी पटावरील फोटो, ओळखपत्र रजिस्टर व लेखी परीक्षेच्या आवेदन पत्रावरील फोटो एकाच व्यक्तीचे असल्याचे आढळून आले. मात्र, एक एप्रिल रोजी झालेल्या शारीरिक चाचणीचे रेकॉर्डिंग तपासल्यावर त्याच्याऐवजी दुसरीच व्यक्ती शारीरिक चाचणी देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या पाच जणांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात कुरिअरने पाठवल्या बॉम्बसदृश्य वस्तू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नारायण पेठेतील कार्यालयामध्ये कुरिअरद्वारे डेटोनेटर, बॅटरी, पावडर आदी बॉम्ब सदृश्य वस्तू आणि धमकीचे पत्र पाठविण्यात आल्याचे गुरूवारी सायंकाळी उघडकीस आले. हे कुरिअर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

कम्युनिस्ट पक्षाचे अप्पा बळवंत चौकापासून जवळच केळकर रस्त्यावर कार्यालय आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या कार्यालयामध्ये कुरिअरद्वारे एक पार्सल आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अजित अभ्यंकर यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास पार्सल उघडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना माहिती दिली.

बॉम्ब शोधक पथक (बीबीडीएस) आणि विश्रामबाग पोलिसांनी माकपच्या कार्यालय गाठले. ‘बीडीडीएस’च्या पथकाने कुरिअर ताब्यात घेऊन पाहणी केली. त्यामध्ये पावडर, डिटोनेटर, बॅटरी असे बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्या. दरम्यान, या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे. तसेच, हे पार्सल कोणाकडून आले, ते शोधण्यासाठी पेठांमधील कुरिअर व्यवसायिकांची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात कुरिअर पाठविण्यात आले आहे. हे ‘बीडीडीएस’च्या पथकाकडून तपासण्यात आले. हे कुरिअर कोणाकडून आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
...........

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि गोखले रस्ता येथील (फर्ग्युसन) रानडे इन्स्टिट्यूटला अशाच प्रकारे कुरिअरने डेटोनेटर, बॅटरी व पावडर पाठविण्यात आली होती. पोस्टाच्या कार्यालयातून हे पार्सल आल्याचे समोर आले होते. मात्र, अद्याप त्यामध्ये काहीच आढळून आलेले नाही. आता त्याचप्रकारे पार्सल पाठविण्यात आल्याने, याचाही शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माकप कार्यालयात बॉम्बसदृश वस्तू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नारायण पेठेतील कार्यालयामध्ये कुरिअरद्वारे डिटोनेटर, बॅटरी, पावडर आदी बॉम्बसदृश वस्तू आणि धमकीचे पत्र पाठविण्यात आल्याचे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आले. हे कुरिअर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
कम्युनिस्ट पक्षाचे अप्पा बळवंत चौकापासून जवळच केळकर रस्त्यावर कार्यालय आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या कार्यालयामध्ये कुरिअरद्वारे एक पार्सल आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अजित अभ्यंकर यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास पार्सल उघडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना माहिती दिली.
बॉम्बशोधक पथक (बीबीडीएस) आणि विश्रामबाग पोलिसांनी माकपचे कार्यालय गाठले. ‘बीडीडीएस’च्या पथकाने कुरिअर ताब्यात घेऊन पाहणी केली. त्यामध्ये पावडर, डिटोनेटर, बॅटरी आदी बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्या. दरम्यान, या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे. तसेच, हे पार्सल कोणाकडून आले, ते शोधण्यासाठी पेठांमधील कुरिअर व्यवसायिकांची चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांसमोर आव्हान
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि गोखले रस्ता येथील (फर्ग्युसन) रानडे इन्स्टिट्यूटला अशाच प्रकारे कुरिअरने डिटोनेटर, बॅटरी व पावडर पाठविण्यात आली होती. पोस्टाच्या कार्यालयातून हे पार्सल आल्याचे समोर आले होते. मात्र, अद्याप त्यामध्ये काहीच आढळून आलेले नाही. आता त्याचप्रकारे पार्सल पाठविण्यात आल्याने, याचाही शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात कुरिअर पाठविण्यात आले आहे. ते बीडीडीएसच्या पथकाने तपासले आहे. हे कुरिअर कोणाकडून आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमीभावासाठी कायद्याची गरज

$
0
0

डॉ. बुधाजीराव मुळीक यांची सरकारला सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा केला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. त्यामुळे आता कायद्याने शेतमालाला हमी भाव देण्यात यावा,’ अशी सूचना ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी राज्य सरकारला केली.
ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक अमृत महोत्सवानिमित्त गौरव समितीच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शिंदेशाही पगडी, मानपत्र, तसेच ७५ हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा सन्मान कऱण्यात आला. गिरीश गांधी अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार उल्हास पाटील, आमदार जगदीश मुळीक उल्हास पवार, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, मुळीक यांच्या पत्नी शालिनी मुळीक, पाशा पटेल आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. मुळीक यांची मुलाखत सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी घेतली. त्यावेळी शेतीविषयक विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले.
‘'राज्यात स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे अनेकजण आहेत. पण त्यांना शेतीतले काहीच कळत नाही. खासदार, आमदार, मंत्री, हॉटेलचालक, वकीलदेखील अंशतः शेतकरी आहेत. हमीभावाचा कायदा असता तर शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळाली असती आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या,’ असेही डॉ. मुळीक महणाले. सरकारकडे कोणतीही भूमिका नाही. सचिव सांगतात तसे राज्याचे धोरण ठरते. मात्र, सचिवाला खरोखरच किती कळते हा कळीचा प्रश्न आहे. ज्यांना कळत नाही तेच धोरण ठरवितात हे आपले दुर्देव आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या धोरणावर टिप्पणी केली.

‘जाणता राजा’ एकच
नेत्यांवर विसंबून राहू नका. त्यांच्यावर अवलंबून राहिल्यास ते वर जातील आणि तुम्ही खाली जाल. सिंचन विषयात आपण पीएचडी केली. पण, मुळाला पाणी देण्याऐवजी आपण फळाला पाणी देत राहिलो. ही सर्वात मोठी चूक झाली, अशी कबुली डॉ. बुधाजारीव मुळीक यांनी दिली. त्यावेळी शेतीतले स्वतःला खूप कळते असे अनेकजण सांगतात. पण ते खोटे बोलतात. देशात रयतेचा राजा, जाणता राजा हे शिवाजी महाराज होते. बाकीचे गोष्टी सांगून स्वतःला जाणता राजा म्हणवतात, अशा शब्दांत डॉ. मुळीक यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट ऑफ’ घसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जेईई-अॅडव्हान्स्ड’साठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या निर्णयामु‍ळे यंदा ‘जेईई-मेन’चा ‘कट ऑफ’ घसरला आहे. यंदा ‘कट ऑफ’ ८१ गुणांवर आला असून, गेल्या वर्षी तो १०० होता.
‘जेईई-मेन’ या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. ‘कट ऑफ’मध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हे यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे. ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’मधील प्रवेशांसाठी गेल्या वर्षीपर्यंत बारावीच्या गुणांनाही वेटेज देण्यात येत होते. ते यंदापासून बंद केल्याने विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन’चा निकाल रँकसह देण्यात आला आहे. एनआयटी, आयआयआयटी आदी संस्थांतील प्रवेशांबरोबरच राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांतील १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशांसाठीही ही रँक उपयोगी पडणार आहे. ‘जेईई-मेन’ला यंदा देशभरातून सुमारे १२ लाख विद्यार्थी बसले होते. त्यातील दोन लाख २० हजार विद्यार्थी ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ला पात्र ठरले आहेत. मात्र, ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’चा टप्पा पार करणारे विद्यार्थीच आयआयटी प्रवेशाला पात्र ठरतील. ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ येत्या २१ मे रोजी होणार आहे.

गेल्या वर्षी सव्वाबारा लाख विद्यार्थ्यांनी ‘जेईई-मेन’ दिली होती आणि त्यातील दोन लाख विद्यार्थी ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ला पात्र ठरले होते. त्या आधीची तिन्ही वर्षे ‘जेईई-मेन’मधून ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाख इतकी ठरविण्यात आली होती. त्या वेळी ‘कट ऑफ’ १०५ ते ११३ पर्यंत होता. यंदा पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात आली असल्याने ‘कट ऑफ’ घसरल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

‘कट ऑफचा विचार करता, ‘जेईई-मेन’मध्ये ३६० पैकी ८१, म्हणजे साधारण २२.५ टक्के मिळालेले विद्यार्थी ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ला पात्र ठरले आहेत. पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने ‘कट ऑफ’ खाली आला असला, तरी तो ज्या प्रमाणात खाली आहे, ते अचंबित करणारे आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी हा चिंतनाचा विषय ठरणार आहे,’ असे मत आयआयटी प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी व्यक्त केले.
‘पुण्याचा विचार करता, यंदा ‘जेईई-मेन’ला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. राज्यातील इंजिनीअरिंगचे प्रवेश राज्याच्या ‘सीईटी’वर होणार असल्याने ही घट झाल्याचे दिसते. यंदा सुमारे १५ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले असावेत, असा अंदाज आहे. पहिली तीन वर्षे ही संख्या याच्या दुप्पट होती. आमच्या संस्थेचे सुमारे ३०५ विद्यार्थी ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’साठी पात्र ठरले आहेत,’ असेही मंगेशकर म्हणाले. बाकलीवाल ट्युटोरिअल्सचे ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’साठी पात्र ठरल्याचे; तसेच आकाश चुग या विद्यार्थ्याने देशात सातवा क्रमांक मिळवल्याचे वैभव बाकलीवाल यांनी सांगितले. प्राइम अॅकॅडमीचे २५० पेक्षा अधिक विद्यार्थी ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’साठी पात्र ठरले असल्याची माहिती ललित कुमार यांनी दिली.

आता वेध ‘सीईटी’चे

‘जेईई-मेन’चा यंदाचा निकाल जाहीर झालेला असताना इंजिनीअरिंग प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना येत्या ११ मे रोजी होणाऱ्या राज्याच्या ‘सीईटी’चेही वेध लागले आहेत. त्याचप्रमाणे यंदा अकरावी सायन्स पूर्ण करून बारावीला गेलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी राज्याची सीईटी होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पुढच्या वर्षी इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी केवळ ‘जेईई-मेन’ हीच राष्ट्रीय प्रवेश परीक्षा असेल, अशी मध्यंतरी चर्चा होती. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) यंदा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या डिप्लोमा, पदवी वा पदव्युत्तर प्रवेशांसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशांचे नियम जाहीर केले आहेत. संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर ते उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फाइन आर्ट’ला सर्वाधिक पसंती

$
0
0

दहावीच्या कलचाचणीचा निकाल जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता दहावीच्या कल चाचणीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. एकीकडे देशात आणि राज्यात माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) बोलबाला असताना राज्यातील दोन लाख ४५ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी कला (फाइन आर्टस्) शाखेची आपल्याला आवड असल्याचे चाचणीद्वारे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा कल आरोग्यशास्त्राकडे आहे.
मंडळाने दहावीच्या कल चाचणीचा निकाल जाहीर केला. कला, आरोग्यशास्त्र, तांत्रिक, सेवा क्षेत्र, वाणिज्य, कला आणि मानव्यशास्त्र, कृषी या सात शाखांसाठी ९ फेब्रुवारी ते ३ एप्रिल दरम्यान ही चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षण अथवा नोकरी, व्यवसायासाठी नेमका कोणत्या क्षेत्रासाठी कल आहे हे पाहण्यासाठी चाचणी घेण्यात येते. राज्यातील १६ लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी चाचणी दिली. हा निकाल विद्यार्थ्यांना www.mahacareermitra.in येथे पाहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकावा लागणार आहे. तसेच, निकालाची गुणपत्रिका दहावीच्या गुणपत्रिकेसोबत छापील स्वरूपात मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
चाचणीच्या निकालानुलार दोन लाख ४५ हजार विद्यार्थ्यांचा कल कला शाखेकडे असल्याचे दिसून आले. त्यानंतर, दोन लाख १७ हजार ३६७ विद्यार्थ्यांचा कल आरोग्यशास्त्राकडे आहे. कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा फारसा कल राहणार नाही, अशी परिस्थिती असताना एक लाख ९२ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी या क्षेत्राला पसंती दिली आहे. दरम्यान, संघटित सेवा क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय एक लाख ८८ हजार २७७ विद्यार्थ्यांनी घेतला आहे. वाणिज्य शाखेकडे जाण्यासाठी एक लाख ७२ हजार ४८३ विद्यार्थ्यांचा कल आहे. तसेच, कला आणि मानव्यशास्त्र शाखेकडे जाण्यासाठी एक लाख ४५ हजार ११६ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे.

तांत्रिक शाखेचे आकर्षण घटले
दरम्यान, विद्यार्थ्यांचा सर्वात कमी कल हा तांत्रिक शिक्षण शाखेकडे आहे. एक लाख ६ हजार २०७ विद्यार्थ्यांनी या शाखेला पसंती दर्शवली आहे. तसेच, दोन शाखांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख ८० हजार ८२० आहे.

शाखा - विद्यार्थी संख्या
कला - २,४५,०००
आरोग्यशास्त्र - २, १७, ३६७
कृषी - १,९२, ६१८
संघटित सेवा - १,८८,२७७
वाणिज्य - १,७२, ४८३
कला आणि मानव्यशास्त्र - १, ४५, ११६
तांत्रिक - १,०६, २०७

एकत्रित शाखेत आवड - विद्यार्थी संख्या
२ - २,८०,८२०
३ - ७३,२४६
४ - २०,३९३
५ - ६,४२२
६ - ३, ०६२
७ - १६,०९४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images