Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाटसजवळ दीड तास वाहतुकीची कोंडी

$
0
0
पुणे सोलपूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस गावाजवळ दीड दोन तासाची वाहतूक कोंडी हा रोजचाच प्रकार झाला आहे. महामार्गाच्या चार पदरी कामाच्या अंतर्गत पाटस गावाजवळ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या बाजूने संपूर्ण महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यातच भीमा पाटस या तालुक्यातील सर्वात मोठ्या साखर कारखान्याचा हंगाम जोरात सुरु आहे.

दुबार नावे डिसेंबरपर्यंत काढणार

$
0
0
मतदार यादीतील तब्बल सव्वादोन लाख दुबार व ९५ हजार मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

होमिओपॅथी औषधांनी डेंगी होतो बरा

$
0
0
निकोटिनविरहित तंबाखूची तीव्रता कमी करून त्याद्वारे तयार करण्यात आलेल्या होमिओपॅथी औषधांनी डेंगी बरा होत असल्याचे एका प्रायोगिक अभ्यासातून स्पष्ट झाले. त्यामुळे रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत होऊन भूक वाढीस लागते.

‘मुठे’च्या स्वच्छतेसाठी रास्ता रोको

$
0
0
नवीन मुठा उजव्या कालव्यामध्ये घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच परिसरातील अवैध वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी मंगळवारी नवीन मुठा उजवा कालवा परिसरातील कर्मचारी आणि रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, या परिसरातील समस्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

‘ग्रीन बिल्डिंग’ चा उपाय

$
0
0
जुन्या पुण्याच्या पर्यावरण रक्षणासाठी विकास आराखड्यात (डीपी) ‘ग्रीन बिल्डिंग’ ही संकल्पना सुचवण्यात आली असून, त्यानुसार इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरउर्जा, एलइडी बल्बचा वापर आणि मलनिस्सारण‘ग्रीन बिल्डिंग’ करण्यात आली आहे.

ST परीक्षेचा निकाल ‘स्टँडवर’च !

$
0
0
एसटीमध्ये नव्याने भरती करण्यात येणा-या कर्मचा-यांच्या परीक्षेचा निकाल लावण्यासाठी प्रशासनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. परीक्षेचा निकाल लावण्यात विलंब होत असल्यामुळे ड्रायव्हरवर येणारा डबल ड्युटीचा ताण आणखी सहा महिने कमी होण्याची चिन्हे नसल्याचे समोर आले आहे.

FS व्यावसायिकांची जागा देण्याची मागणी

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि फॅशन स्ट्रीटमधील दुकानदार यांच्यातील तडजोडीच्या मुद्यावरून आता वादाला सुरुवात झाली आहे. फॅशन स्ट्रीट येथील ९२ व्यावसायिकांना तातडीने जागा देण्याची मागणी या दुकानदारांनी लावून धरली आहे. तसेच, फॅशन स्ट्रीट शॉपिंग सेंटरच्या पदाधिका-यांना विश्वास न घेता कोणताही निर्णय घेऊ नका, असेही त्यांनी म्हटले आहे.

महिलेला मारहाण करत दागिने लुटले

$
0
0
महापालिकेत जाण्यासाठी रिक्षाने निघालेल्या एका महिलेला रिक्षाचालकासह दोघा महिला आरोपींनी मारहाण करत तिचे ३५ हजार रुपयांचे दागिने हिसकावले आणि पळ काढला. या प्रकरणी कल्पना शेर्वेते (३५, रा. शिवाजीनगर, गावठाण) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दौंड रेल्वे स्टेशनवरील समस्यांचा वाचला पाढा

$
0
0
दौंड रेल्वे स्थानकावर नव्याने होत असलेल्या पुलाला रॅम्पची सुविधा द्यावी या प्रमुख मागणीसह सीसीटीव्ही यंत्रणा, स्थानकाच्या दोन्ही बाजूला तिकीट विक्री कार्यालयात चौकशी सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी बंगला साईड बाजूने रस्त्यालगत नवा फलाट, अनधिकृत खाद्यविक्रेते व तृतीय पंथीयांवर कारवाई...

PMP चा अपघात टळला

$
0
0
महापालिकेकडून वाडेबोल्हाईकडे बस घेऊन निघालेल्या पीएमपीच्या ड्रायव्हरच्या छातीत कळ आल्याची घटना पुणे स्टेशनजवळील अलंकार टॉकीजसमोर मंगळवारी सायंकाळी घडली. प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने बस थांबविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या ड्रायव्हरला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पैठणी विणकरांना नाबार्डने दिली साथ

$
0
0
पैठणी. म्हटलं तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव. राज्यभरातील महिलांसाठी अत्यंत आवडीची आणि स्वप्नवत खरेदीची साडी. राज्यभरामध्ये पैठणीचा हा लौकिक असला, तरी राज्याबाहेर मात्र इतर राज्यांमधील साड्यांच्या लौकीकापुढे या पैठणीचा साज काहीसा फिकाच पडतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत.

१७९ रिक्षाचालकांवर कारवाई

$
0
0
प्रवासी नाकारणा-या सुमारे १७९ रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात येणार आहे. रिक्षाचालकांकडून दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. नजिकच्या काळात अचानकपणे ही मोहिम राबवण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

मूल्यांकनाच्या शिडीवर विद्यापीठ दौडेल

$
0
0
जागतिक मूल्यांकनामध्ये खिजगणतीतही धरल्या न जाणाऱ्या भारतीय विद्यापीठांनी आता किमान दखल घेतली जाऊ लागली आहे. याच वाटचालीमध्ये यापुढील काळात जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देत पुणे विद्यापीठ मूल्यांकनात स्थान पटकावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

१९ TMC पाणी मिळालेच पाहिजे

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत २८ गावांचा समावेश करताना शहराला १९ टीएमसी इतका पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. अशा आशयाची शिफारस करणारा प्रस्ताव विधी समितीपुढे सादर झाला आहे.

प्रामाणिकपणा जिवंत आहे...

$
0
0
समाजातील लोक अलिकडे स्वार्थी, धूर्त झाले आहेत. कोणाची मदत करणे तर दूरच संवाद देखील साधण्यास हे स्वकेंद्रीत नागरिक पुढे येत नाहीत, अशी वारंवार टीका होते. मात्र, आजही समाजात प्रामाणिक माणसे असल्याची प्रचिती पीएमपीचे कंटक्टर अभिजीत लाड यांनी टीका करणा-या नागरिकांना दिली आहे.

नवे वर्ष, नवे चेक

$
0
0
बँकिंग सिस्टीम आणि अकाउंटधारकांच्या हितासाठी एक जानेवारी २०१३ पासून चेक ट्रंकेशन सिस्टीम (सीटीएस २०१०) लागू होणार आहे. यामुळे सध्याचे चेक रद्द होणार असून, नवे चेक अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे कर्जसाठी देण्यात आलेले ‘पोस्ट डेटेड चेक’सुद्धा (पीडीसी) बाद होणार आहेत, अशी माहिती बँकांनी दिली.

साखर आयुक्तांची कार पेटवलीच

$
0
0
साखर आयुक्त विजय सिंघल यांच्या होंडा सिटी या शासकीय कारला आग लागली नव्हती, तर ती पेटविण्यात आली होती, हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणेकर आदित्यचा ‘मॅजिक स्प्रे’

$
0
0
सतत पाण्यात किंवा ज्वलनशील पदार्थांसमवेत काम करणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या आणि डायबेटिक व्यक्तींना हाता-पायांची निगा राखण्याचे आव्हान आता आठवीतील पुणेकर विद्यार्थ्याच्या संशोधनामुळे पेलता येणार आहे. त्वचेच्या पृष्ठभागावर कवचकुंडलासारखे काम करणारा त्याने विकसित केलेला स्प्रे ही जादू करणार असून नॅशनल इनोव्हेशन स्पर्धेत त्याच्या कामगिरीचा गौरवही करण्यात आला आहे.

‘ऑइच’ पार्टी पडली २७ लाखांना!

$
0
0
परवानगी न घेता पार्टी आयोजित करणा-या फातिमानगर येथील ‘ऑइच क्लब’ला करमणूक कर विभागाने २७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड तातडीने न भरल्यास जप्तीच्या कारवाईपर्यंत कडक पावले उचलली जाणार आहेत.

उसाला टनामागे ३०० रुपये वाढले

$
0
0
ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे साखर कारखान्यांनी उसाच्या पहिल्या उचलीसाठी टनामागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या पदरात किमान दोन हजार कोटी रुपये जादा पडणार आहेत. स्वाभीमानी शेतकरी संघटनेने उसाची पहिली उचल टनामागे ३ हजार रुपये मिळावी, अशी मागणी केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images