Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मॉरिशसमध्ये व्हा एम. ए. मराठी

0
0
मराठी भाषेची गळपेची होत असल्याची ओरड राज्यभरात होत असतानाच, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मॉरिशससारख्या एका परक्या मुलखात जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचीच परिणीती की काय, आता ‘युनिव्हर्सिटी ऑफ मॉरिशस’मध्येही एम. ए. मराठीचे वर्ग सुरू होणार आहेत.

नाट्य परिषदेच्या निवडणुकीलाही मुहूर्त

0
0
बारामतीत होणा-या नाट्यसंमेलनाचे ‘काउंटडाऊन’ सुरू असतानाच, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीलाही ‘मुहूर्त’ मिळाला आहे. तब्बल दहा वर्षांनी होणा-या या निवडणुकीसाठी २६ डिसेंबरपासून इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून, पुढील वर्षी २० फेब्रुवारीला नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे.

अपघातात तरुण ठार

0
0
खासगी बसच्या दारात उभा असलेला तरुण रस्त्यावर पडल्याने ठार झाल्याचा प्रकार फातीमानगर येथे रेसकोर्सजवळ सोमवारी पहाटे घडला. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘माया’च्या मालकिणीचा अटकपूर्व जामीन कायम

0
0
मध्यरात्रीपर्यंत बेकायदा मद्य पार्टी सुरू ठेवणाऱ्या वाघोली येथील माया हॉटेलची मालकीण अंजली निर्मल यांच्यासह तेथील डीजे सय्यद कासीम चिनी यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. धरणे यांनी मंगळवारी कायम केला.

‘ब्रँडनेम’चे परवाना नूतनीकरणही नाही

0
0
‘ब्रँडनेम’ऐवजी जेनेरिक नावाने औषधांची विक्री करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाची दखल राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे. त्यानुसार राज्यातील दोन हजारांहून अधिक उत्पादकांना या नियमावलीची अंमलबजावणी करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. परिणामी, परवाना देताना आणि नूतनीकरणावेळी ‘ब्रँडनेम’चा अडसर उद्भवणार आहे.

गॅस ग्राहक, विद्यार्थ्यांना प्राधान्याने ‘आधार’

0
0
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘यूआयडी’ (आधार) कार्ड योजनेमध्ये पुढी‌ल काळात गॅस ग्राहक आणि शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी ही माहिती दिली. शहरी आणि ग्रामीण भागातील अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळावे यासाठी दोनशे नवीन मशीन घेतली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

यशवंतराव संमेलनासाठी सरकारचा हात आखडता

0
0
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली असली, तरी त्यांच्या नावाने फलटण येथे होणा-या संमेलनासाठी राज्य सरकारने हात आखडता घेतला आहे. तरीही, स्थानिक संयोजकांच्या पुढाकारामुळे या संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल.

परत या, परत या... बाळासाहेब परत या!

0
0
‘परत या, परत या, बाळासाहेब परत या’...‘अमर रहे, अमरे रहे बाळासाहेब अमर रहे...,’ अशी आर्त साद घालत पाणावलेल्या डोळ्यांनी पुणेकरांनी मंगळवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. शिवसैनिकांसह बाळासाहेबांच्या विविध क्षेत्रातील चाहत्यांनी ‌अस्थींच्या दर्शनासाठी शिवसेना भवनात गर्दी केली होती.

रहिवास दाखल्यांसाठी शाळांतून ५ हजार अर्ज

0
0
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी रहिवास दाखल्यांसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी शाळांमधून दाखले वाटप योजनेला पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे. या विद्यार्थ्यांना लवकरच दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे.

पुणे विद्यापीठाची ‘एसपी’वर कारवाई

0
0
एस. पी. कॉलेजमध्ये एम. एस्सी. प्रवेशप्रक्रियेमध्ये झालेले गैरप्रकार आणि नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या प्रवेशप्रकरणी कॉलेजला दंड ठोठावण्यावर पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच, यापुढील काळात असे प्रकार होऊ नये, यासाठी कॉलेज प्रशासनाला समज देण्यात येणार आहे.

बाळासाहेबांचे पुण्यात स्मारक हवे

0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झाला असल्याने पुणे महापालिकेने त्यांचे यथोचित स्मारक पुण्यात उभारण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचा ठराव शिवसेनेकडून स्थायी समितीमध्ये दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

पारा स्थिरावला ८.६ अंशांवर

0
0
शहर आणि परिसरातला गारठा मंगळवारी कायम होता. शहरात ८.६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील नीचांकी ७.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नगर येथे झाली. पुढच्या दोन दिवसांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दिवाळीनंतर शहराच्या गारठ्यात वाढ झाली आहे.

सरकारी वकिलांच्या नेमणुका गृहविभागामार्फत

0
0
‘सरकारी वकिलांच्या नेमणुका पुर्वी प्रमाणे गृहविभागाकडून होणे गरजेचे आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. या नेमणुका गृहविभागाकाकडे देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिका घेत आहे,’ अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

IT कायद्याविरोधात आता ONLINE लढा

0
0
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगणा-या नेटिझन्सच्या हक्कांवर गदा आणणा-या माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या विरोधात ऑनलाइन लढा उभारण्यात येत आहे.

राजगुरूनगर विमानतळाला नोटिफिकेशनची प्रतीक्षा

0
0
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राजगुरूनगरजवळील पाच गावांतील चार हजार १७२ एकर जमिनीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून या विमानतळाच्या कामाला आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नोटिफिकेशनची प्रतीक्षा उरली आहे.

१५ जणांना डेंगीची लागण

0
0
डेंगीची आणखी पंधरा जणांना लागण झाल्याने आतापर्यंतच्या पेशंटची संख्या आठशेच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आठवड्याभरात साठ जणांना लागण झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

यंदाच्या मान्सूनवर हिंदी महासागराची कृपा

0
0
‘एल निनो’मुळे यंदा भारतात दुष्काळाची शक्यता वर्तवण्यात येत असताना ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) हा घटक पावसाची सरासरी भरून काढण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

किंगफिशर ब्रँडवर उमटले एअरलाईन्समुळे पडसाद

0
0
किंगफिशर एअरलाइन्स वित्तीय पेचात सापडली असली, तरी बीअर ब्रँडचे नाव विमान कंपनीला देऊन ग्राहकांना संभ्रमात टाकून स्पर्धकांना व्यवसायाची संधी विजय मल्ल्या यांनी उपलब्ध करून दिली. किंगफिशर एअरलाइन्सबाबत घडलेल्या घटनांचे पडसाद किंगफिशर या ब्रँडवर उमटले आहेत, असे मत आंत्रप्रेनुअर प्रकाश बंग यांनी व्यक्त केले.

सरकारला जेव्हा जाग येते...

0
0
शिवाजी महाराजांच्या काळात देखील झाले नसतील एवढ्या हद्दीच्या वादात अडकलेल्या किल्ल्यांच्या संवर्धन होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. हद्दीचे कारण सांगून एवढी वर्षे किल्ल्यांकडे दुर्लक्ष करणारे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ, वन विभाग आणि केंद्र व राज्य शासनाचे पुरातत्व विभाग यांनी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नुकताच सामंजस्य करार केला आहे.

आदिवासी गरोदर महिलांना मिळणार विशेष आरोग्य सेवा

0
0
पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम विशेषत: आदिवासी वाड्या वस्त्यांवरील गरोदर महिलांना आता लवकरच विशेष आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. अशा महिलांसाठी मातृत्व प्रतिक्षालय योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांच्या घरोघरी ही सेवा मिळणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images