Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

१४५ मतदान केंद्रे संवेदनशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील १३ प्रभागातील सुमारे १४५ मतदान केंद्रे महापालिकेने संवेदनशील म्हणून घोषित केली असून या केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त येथे ठेवला जाणार आहे.

चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी (प्रभाग क्रमांक ७), औंध, बोपोडी (प्रभाग क्रमांक ८) आणि बाणेर, बालेवाडी, पाषाण (प्रभाग ९) मध्ये सर्वाधिक म्हणजे ८४ बुथ संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी आज (मंगळवारी) २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सुमारे २६ लाखांहून अधिक मतदार यामध्ये मतदान करणार असून शहरातील विविध भागात ३ हजार ४३१ मतदार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

मतदान करताना गडबड गोंधळ होण्याची अधिक शक्यता असल्याने पोलिसांनी शहरातील १३ प्रभागातील १४५ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित केली असून यामध्ये २०३ बूथचा समावेश आहे. शहरातील संवेदनशील मतदार केंद्रांची; तसेच बूथची माहिती पोलिस खात्याने महापालिकेला कळविली असून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्याची काळजी घेतली जाणार असल्याचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या तीन प्रभागांमधील भाग सर्वांत जास्त संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आला असून शहरातील सर्वांत जास्त मतदारांची संख्या असलेल्या बाणेर, बालेवाडी, पाषाण प्रभागात ५७ बुथ संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. याबरोबरच हिंजवडी, सहकारनगर, हडपसर, कोथरूड, डेक्कन, खडक, फरासखाना, समर्थ आणि सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रभागातील काही भाग पोलिसांनी संवेदनशील म्हणून घोषित केला आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस खात्यांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी जे भाग संवेदनशील म्हणून घोषित केले, त्या ठिकाणी अतिरिक्त‌ सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून तैनात केली जाणार असल्याचे महापालिका प्रशसनाने स्पष्ट केले.

प्रभागाचे नाव संवेदनशील बूथ

कसबा, सोमवार पेठ ०४

रास्ता पेठ, रविवार पेठ ०५

खडकमाळ आळी ०३

लोहियानगर, कासेवाडी ०४

एरंडवणा, हॅपी कॉलनी ०८

पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी १७

औंध, बोपोडी १०

बाणेर, बालेवाडी, पाषाण ५७

रामटेकडी, सय्यदनगर १२

खराडी, चंदननगर ०३

वडगाव, धायरी ०२

सहकारनगर, पद्मावती ०१

बावधन, कोथरूड १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्लिप वाटपाचा सावळा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोठा गाजावाजा करून हाती घेतलेले मतदार स्लिप वाटण्याचे महापालिका प्रशासनाचे काम सोमवारपर्यंतही पूर्ण होऊ शकले नाही. अखेर शहराच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना राजकीय पक्षांनी वाटलेल्या स्लिपवरच अवलंबून रहावे लागण्याची वेळ आली असून, आज, मंगळवारी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. अनेक भागांमधील मतदान केंद्रांचा घोळ अजूनही कायम आहे. मतदान केंद्रे न सापडणे आणि एकाच घरातील सदस्यांना वेगवेगळी मतदानकेंद्रे मिळणे हा अनुभव यंदाही येत आहे.
निवडणुकीपूर्वी मतदारांना मतदानकेंद्रांचा तपशील पुरविणाऱ्या मतदार स्लिप पूर्वी राजकीय पक्षांच्या यंत्रणांमार्फत घरोघरी वाटण्यात येत असत. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रशासनाने हे काम आपल्या हाती घेतले. मात्र, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे तसेच कर्मचाऱ्यांना पत्ते शोधण्यात येणाऱ्या अडचणींमुळे हे काम पूर्ण होत नाही, असे यापूर्वी आढळून आले आहे. हाच अनुभव यंदाही मतदारांना येत आहे. हजारो कुटुंबांमध्ये प्रशासनाकडून मिळणाऱ्या स्लिप पोहोचलेल्या नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये घरोघरी आपल्या नावाने स्लिप वाटल्या, त्यांचा मतदारांना उपयोग होणार आहे. अनेक भागांमध्ये प्रशासन स्लिप देणार असल्याने उमेदवारही त्या भरवशावर राहिले. प्रत्यक्षात मात्र, अजून मोठ्या प्रमाणावर स्लिपचे वाटप झालेले नाही. त्यामुळे अनेक मतदार मतदान केंद्रांबाबत अनभिज्ञ आहेत. गोखलेनगर परिसरात महापालिका प्रशासनाच्या स्लिप रस्त्यावर सापडल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे.

केंद्रांचा घोळ कायम
दरम्यान, मतदार यादीत नावे नोंदविणे आणि त्यांना क्रमांक देण्याचा जुनाच पायंडा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील काही सदस्यांचे मतदान एका केंद्रात, आणि काहीजणांचे दुसऱ्या केंद्रात अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, यंदा प्रभागाचा आकारही वाढल्यामुळे मतदान केंद्रेही दूर असल्याची तक्रार मतदारांकडून करण्यात आली आहे.

सीमेवर राहताय? दुसऱ्या प्रभागात शोध घ्या...
तुम्ही प्रभागाच्या सीमेवर राहताय का? मग तुमच्या प्रभागाच्या मतदार यादीत तुमचे नाव सापडले नाही, तर निराश होऊ नका. शेजारच्या प्रभागाच्या मतदार यादीतही शोध घ्या, त्यात तुमचे नाव असू शकेल. त्यामुळे तुमची मतदान करण्याची संधीही डावलली जाणार नाही. शहरात अनेक ठिकाणी प्रभागाच्या सीमेवर राहणाऱ्या शेकडो नागरिकांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून गायब झाल्याचे दिसून आले आहे. संबंधित नागरिक घरी मशिन घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांकडे किंवा बूथवर जाऊन नाव तपासत आहेत. मात्र, यादीत त्यांचे नाव सापडत नाही. त्यामुळे यंदा आपली संधी हुकली असा समज करून घेण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांची नावे निवडणुकीसाठीच्या मुख्य यादीत शेजारच्या प्रभागात आढळत आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या नव्हे तर शेजारच्या प्रभागासाठी मतदान करावे लागणार असले तरी, त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहील.
कोथरूड, पौड रोड परिसरातील प्रभागाच्या सीमेवर असणाऱ्या काही सोसायट्यांमधील नागरिकांची नावे अशा प्रकारे शेजारील प्रभागाच्या यादीत आढळली आहेत. त्याचबरोबर काहींच्या घरातील काही नावे त्यांच्या स्वतःच्या प्रभागात तर काहींची नावे शेजारच्या प्रभागात असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे ज्यांना आपल्या प्रभागाच्या यादीत स्वतःचे अथवा कुटुंबीयांचे नाव सापडत नसेल, अशांना शेजारील प्रभागाच्या यादीत शोध घ्यावा लागणार आहे. पालिकेच्या मुख्य यादीत शोध घेणे त्यासाठी आवश्यक आहे.

मतदान करा; मोफत मेंदी काढा
महिलांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मृगनयनी मेंदी आर्ट आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे मोफत मेंदी काढून देण्यात येणार आहे. मतदानाची खूण दाखवा आणि दुपारी ११ ते ४ या वेळेत मेंदी काढून घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. मृगनयनी मेंदी आर्टसच्या संचालिका धनश्री हेंद्रे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संस्थेच्या महिला बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर प्रशाला, आदर्श विद्यालय, गोपाळ हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालय प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हा उपक्रम राबविणार आहेत. तसेच साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा आणि कार्यकर्ते मतदानविषयक जनजागृती करणार आहेत.

मोफत पेट्रोल दुपारपर्यंतच
शहरातील अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी पुणे शहरातील पेट्रोल पंप डीलर असोसिएशन आणि क्रेडाईच्या वतीने मोफत पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, मंगळवारी (२१ फेब्रुवारीला) मतदान करणाऱ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येईल. त्यातील विजेत्यांना प्रत्येकी एक लिटर पेट्रोल मोफत दिले जाणार असून, दुपारी बारा वाजेपर्यंतच पेट्रोल दिले जाणार आहे. कोणत्या पेट्रोलपंपावर हे पेट्रोल मिळणार आहे, याची यादी मतदान प्रत्येक केंद्रांवर लावण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. मंगळवारी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर सर्वांत प्रथम मतदानासाठी आलेल्या शंभर पुरुष आणि शंभर मतदारांना केंद्राच्या बाहेर आल्यानंतर ‘स्क्रॅच कार्ड’ (कुपन्स) दिले जाणार आहे. या कुपन्समधील प्रत्येकी पाच कार्डावर मोफत एक लिटर पेट्रोल दिले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अशा पद्धतीने दहा मतदारांना मोफत पेट्रोल दिले जाणार आहे. शहरातील ३४३१ केंद्रांवर ही सुविधा दिली जाणार आहे.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आज, मंगळवारी होत असलेल्या मतदानासाठी दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील केंद्रांवर जादा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान केंद्र आणि मतदार संख्येमध्ये झालेली वाढ पाहता पोलिसांनी बंदोबस्तातही वाढ केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसह जिल्हा परिषदेचाही काही भाग आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. त्यादृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी मतदान यंत्रांच्या वाटपापासून बंदोबस्त लावण्यात आला आहे. या बंदोबस्तावर स्वत: पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनील रामानंद लक्ष ठेवून आहेत.
उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक तसेच उपनिरीक्षक बंदोबस्तामध्ये असणार आहे. शहर पोलिसांसोबतच गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, शीघ्र कृती दलाची पथके बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आली आहेत. सहायक आयुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आली आहे. यासोबतच भरारी पथकांमार्फत हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहर पोलिसांतील साडेसहा हजार अधिकारी तसेच अडीच हजार कर्मचाऱ्यांसह अन्य जिल्ह्यांतूनही कुमक मागविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला वसतिगृहासाठी ‘बजाज’चे ५० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बजाज ऑटोतर्फे पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) महिला वसतिगृहासाठी पन्नास कोटी रुपयांची देणगी देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या करारावर सोमवारी स्वाक्षरी करण्यात आली.
या देणगीतून उभारण्यात येणाऱ्या दहा मजली हॉस्टेलमध्ये सुमारे ८०० महिला राहू शकतील. करारावेळी बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, आयसरचे संचालक प्रा. डॉ. के. एन. गणेश, आयसरचे रजिस्ट्रार कर्नल जी. राजशेखर (नि), जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी आदी उपस्थित होते.‘आयसर’च्या पाषाण येथील आवारात हे वसतिगृह उभारण्यात येणार आहे.
‘महिला सक्षमीकरण आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींना बजाज ऑटोने कायमच प्रोत्साहन दिले आहे. वसतिगृह उभारणीतून उच्च शिक्षणाला चालना देऊन राष्ट्र उभारणीची बजाज ऑटोला चांगली संधी आहे,’ असे बजाज यांनी सांगितले.
‘आयसरसारख्या संस्थेत ४० टक्के महिला असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह आवश्यक होते. त्यासाठी बजाज ऑटोने घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वपूर्ण, स्वागतार्ह आहे. स्त्री-आणि पुरूष ही समाजाची दोन तितक्याच तोलामोलाची चाके आहेत. त्यासाठी स्त्रियांनाही उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन सक्षम करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलीही आयसरमध्ये शिक्षण घेऊन सुरक्षित वातावरणात राहू शकतील,’ असे डॉ. माशेलकर म्हणाले.

असे असेल वसतिगृह
या २१ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दहा मजली इमारतीत ८०० महिलांची व्यवस्था करण्यात येईल. भूकंप प्रतिरोधक इमारतीत एका व्यक्तीच्या २९६ खोल्या, तर दोघांच्या २३३ खोल्या असतील. याशिवाय अभ्यागत, वसतिगृह अधिकारी व अन्य काही खोल्यांचाही समावेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात माजी महापौरांकडून मतदानयंत्रांची पूजा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एका उमेदवारावर काळ्या जादूचे प्रयोग झाल्यामुळं खळबळ उडाली असतानाच आता पुण्यातील एका मतदान केंद्रावर तेथील माजी महापौर व उपमहापौरांनी नवाच पराक्रम केला आहे. माजी महापौर चंचला कोदे व उपमहापौर बंडू गायकवाड यांनी एका मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनची पूजा करून वेगळाच पायंडा पाडला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रभाग क्रमांक २२ मधील एका मतदान केंद्रावर हा अजब प्रकार घडला. माजी महापौर असलेल्या व सध्या काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणाऱ्या चंचला कोदे आणि बंडू गायकवाड यांनी चक्क मतदान यंत्राची पूजा केली. प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांनी या प्रकाराला जोरदार आक्षेप घेतला आहे. राजकीय कार्यकर्त्यांना इतक्या मोठ्या संख्येनं मतदान यंत्राजवळ जाऊ कसे देण्यात आले,' असा सवाल विरोधकांनी केला आहे. पुणे महापालिकेचे निवडणूक निर्णय आधिकारी सतीश कुलकर्णी यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुका सारख्या याव्यात

$
0
0

Aditya.Tanawade@timesgroup.com

@AdityaMT

पुणे :​साधारण दुपारची वेळ. शहरात चाललेली महापालिकांची रणधुमाळी काहीशी शमलेली. कार्यकर्ते जेवणासाठी कार्यालयांमध्ये दाखल झाले. तितक्यात एका उमेदवारासाठी पथनाट्य करणारे कलाकारही दमून भागून पोहोचले. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येकानेच सुटकेचा निःश्वास टाकलेला. कलाकारांनी जेवणाची ताटे घेतली आणि घोळका करून बसले. जेवताना प्रचाराचे, पथनाट्याचे सादरीकरण करतानाचे अनेक किस्से रंगवले जात होते. तेवढ्यात एक वाक्य अचानक कानी येऊन पडले. ‘यार निवडणुका सारख्या सारख्या याव्यात. बरेच पैसे मिळतात. पुढच्या दोन महिन्यांचा खर्च सुटला.’ इतरांसाठी ते वाक्य साधारण होते. मात्र, क्षणात ते मनाला चटका लावून गेले. निवडणुकीव्यतिरिक्त इतर वेळी काम न मिळणाऱ्या असंख्य तरुणांची भावना याद्वारे व्यक्त होत होती.

गेल्या महिनाभरात महापालिकांच्या निवडणुकांसाठी शहरातील बड्या नेत्यांनी आणि पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या पक्षाला विजयी करण्यासाठी जोरदार ताकद लावली. त्यांचे भवितव्य मंगळवारी ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले. या उमेदवारांची चांगली कामे मतदारांपर्यंत पोहोचवणारे पथनाट्याचे कलाकार, सोशल मीडियाचे तंत्रज्ञ, निवडणुकीच्या अहवालापासून ते प्रचार साहित्याचे वाटप करणारी तरूण मंडळी, असे अनेकजण गेल्या अनेक दिवसांपासून अविरतपणे काम करत आहेत. तिकीट जाहीर झाल्यापासून ते प्रचार थांबेपर्यंत दररोज या मंडळींनी उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ दिला आहे.

निवडणुकीच्या काळात रोजगार मिळतो, काही महिन्यांची गरज भागते, अशा आशेने ही मंडळी निवडणुकीत झोकून काम करतात. त्यांना निवडणुका पुन्हा पुन्हा यायल्या हव्या आहेत. इतर वेळी प्रायोगिक नाटकांमधून आपल्या अभिनयाची कला सादर करूनही हातात काही न पडणाऱ्या कलाकारांना निवडणुकांच्या रणधुमाळीत मात्र, ‘ऐका हो ऐका’ असे ओरडण्याचे चांगले पैसे मिळतात. निवडणूक त्यांच्यासाठी पैसे मिळवण्याचे साधन होते. काहींनी थकलेली भाडी देण्यासाठी, काहींनी मेसचे पैसे भरण्यासाठी तर काहींनी कुटूंबाला मदत म्हणून ही कामे स्वीकारली आहेत. मतदान मंगळवारी झाले. येत्या काळात कुणाच्या तरी हातात पाच वर्षे सत्ता जाईल. २३ फेब्रुवारीला विजयाचे जल्लोष होतील. मात्र, रोजगाराच्या शोधात फिरणाऱ्या तरुणांना आत्तापासूनच पुढच्या निवडणुकीचे वेध लागतील.


गेल्या पंधरा दिवसांपासून पथनाट्याद्वारे आम्ही जनजागृती करत आहोत. सकाळी आम्ही एका ठिकाणी जमायचो आणि मग १० जणांच्या गटांमध्ये विभागून प्रभागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य सादर करायचो. अनेकदा काही लोकांकडून विरोध व्हायचा, रस्त्याची कोंडी व्हायची; पण आम्ही संयमाने वागलो. पथनाट्य सादरीकरणाचे चांगले पैसे मिळाले. अशी कामे मिळत गेली तर अर्थिकदृष्ट्या कुटुंबाला हातभार लावण्यास मदत होईल.

अक्षय साळवे, पथनाट्य कलाकार

मी गावाकडून पुण्यात शिकायला आलो आहे. जमतील तशी छोटी मोठी कामे करून स्वतःचा खर्च भागवतो. निवडणुकीत पैसे मिळवण्याची संधी चालून आली आणि लगेच होकार दिला. या कामातून मिळणाऱ्या पैशांमधून आता दोन महिन्यांचा खर्च सुटला आहे.

राहुल रोकडे, महाविद्यालयीन विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीतातील माधुर्य संपले

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

chintamanipMT

पुणे : ‘नवीन गाणे दोन-चार महिने किंवा एक-दोन दिवस टिकते. इलेक्ट्रॉनिक वाद्य आणि तंत्रज्ञान हे संगीताला जडवादी करत आहेत. संगीतातील माधुर्यच संपुष्टात आले आहे,’ अशी खंत ख्यातनाम संगीतकार उत्तमसिंग यांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षीच्या अखेरीस सिंग यांना राज्य सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला. त्यानंतर ते प्रथमच पुण्यात आले असता ‘मटा’ने त्यांच्याशी संवाद साधला. पुरस्काराबद्दलची भावना व्यक्त करतानाच त्यांनी एकूण संगीत या विषयावर आपले विचार मांडले. ‘दिल तो पागल है’, ‘दुश्मन’, ‘फर्ज’, ‘दिल दिवाना होता है’, ‘गदर - एक प्रेम कथा’ या चित्रपटांतील संगीतातून माधुर्याची झुळूक देणाऱ्या सिंग यांनी संगीतातील हरवलेल्या माधुर्यावर खंत व्यक्त केली.

सिंग म्हणाले, ‘पूर्वी गाण्याचे ध्वनिमुद्रण असेल, तर सर्व वाद्यांसह वादकांचा ताफा स्टुडिओमध्ये हजर असायचा. एकच वाद्य वीस-वीस जण वाजवत असत. यातून निर्माण होणारे संगीत जिवंत अनुभव देणारे होते. आज तसे होत नाही. त्यामुळे संगीत कृत्रिम वाटते. संगीतावर तंत्रज्ञानाने पकड मिळवली आहे. सतार, बासरी, संतूर, सरोद अशा वाद्यांचा स्वर आजच्या गाण्यांमध्ये कुठे ऐकायला मिळतो? जो आवाज असतो, ती नक्कल असते? लता दीदींच्या नावाचा पुरस्कार मिळाला ही मोठी गोष्ट आहे. त्यांच्याबरोबर अनेक चित्रपटांसाठी काम करता आले. ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाचा अनुभव भारावून टाकणारा आहे.’

चौथ्या वर्षापासून संगीताचे धडे

उत्तम सिंग म्हणाले, ‘वडिलांकडून वयाच्या चौथ्या वर्षापासून मी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांनी सात वर्षे मटका वाद्य, ६ महिने सतार वाद्य व दोन वर्षे गायनाचे शिक्षण दिले. मी १२ वर्षांचा असतानाच वडील मला मुंबईत घेऊन आले. तेव्हा तबला व व्हायोलिन याचे शिक्षण घेतले. मी तीन वर्षे व्हायोलिन वादनाचे काम केले. मला नौशाद, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, राहुल देव बर्मन यांच्यासारख्या ज्येष्ठ सगीतकारांसोबत काम करायला मिळाले. त्यातून माझी जडण-घडण झाली.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाचा पहिला तर दुसऱ्याचाशेवटचा बंदोबस्त...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगरपालिकेचा एका पोलिसाचा हा पहिला बंदोबस्त होता आणि त्याच केंद्रावर असणाऱ्या दुसऱ्या पोलिसाची ही शेवटची बंदोबस्ताची ड्युटी होती. मात्र, बंदोबस्ताचे काम करताना दोघांचा उत्साह सारखाच होता. शेवटचा बंदोबस्त करणाऱ्या पोलिस मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना मदत करत होता. तर, पहिला बंदोबस्त करणारा पोलिस अनेक नवनवीन गोष्टी शिकत होता. बंदोबस्त शांततेत झाल्यामुळे दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.
औरंगाबादहून पुण्यात बंदोबस्तासाठी आलेले सहायक फौजदार एन. एस. हरकल यांचा हा शेवटचा बंदोबस्त होता. पुण्यातील पोलिस शिपाई विनायक पोमन यांचा निवडणुकीचा हा पहिला बंदोबस्त होता.
हरकल हे औरंगाबाद येथून १७ फेब्रुवारी रोजी पुण्यात महापालिकेच्या बंदोबस्तासाठी आले होते. ते म्हणाले, ‘गेल्या ३३ वर्षापासून पोलिस दलात आहे. आतापर्यंत अनेक बंदोबस्त केले. पुढच्या सात दिवसांनंतर पोलिस खात्यातून निवृत्त होणार आहे. त्यामुळे ही माझी शेवटची बंदोबस्त ड्युटी आहे. ग्रामीण भागात निवडणुकीचा बंदोबस्त करताना खूप दक्ष राहावे लागते. पण, या ठिकाणी काहीही गडबड, गोंधळ नाही. नागरिक शांततेत मतदान करत आहेत. जास्त काम नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना कोणत्या ठिकाणी मतदान आहे, याची माहिती देत आहे. या ठिकाणचे मतदार खूपच समजदार असल्याचे दिसून आले.’
पोमन म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी पोलिस दलात दाखल झालो. स. गो. बर्वे या मनपा शाळेतील केंद्रात मतदानाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक झाली. महापालिका निवडणुकीचा हा माझा पहिलाच बंदोबस्त आहे. सकाळपासून या ठिकाणी कोणतीही गडबड नाही. नागरिक शांततेत मतदान करत आहेत. सकाळी मतदान केंद्रावर रांगा होत्या. दुपारी थोड्या कमी झाल्या आहेत. पोलिसांच्या जेवनाची सोय पोलिस ठाण्यांकडून करण्यात आली आहे. बंदोबस्त करताना बरेच काही शिकता आले.’
मतदानासाठी पेट्या मिळाल्यापासून केंद्रावरील पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शंभर मीटरच्या आत मतदारांव्यतिरिक्त कोण येणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात होती. गर्दी करणाऱ्यांना पांगविण्यात येत होते. मतदारांनासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून मदत केली जात होती. मतदानाची स्लिप पाहून त्याचे मतदान कोणत्या खोलीत आहे. याची माहिती पोलिस नागरिकांना देत होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श मतदान केंद्रावरील वातावरणाने मतदार भारावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती
दारासमोर रांगोळी, केळीचे खुंट, सनईचे सूर, मंद सुगंधाचा दरवळ, फुलांनी होणारे स्वागत, पताकांनी सजलेले केंद्र आणि एकाच रंगाच्या पोशाखातील हसतमुख कर्मचारी... एखाद्या लग्न घरात शोभेल अशा वातावरणात आज सुपेकर आणि काटेवाडीकरांनी मतदान केले. आदर्श मतदान केंद्र साकारताना प्रशासनाने केलेल्या अनोख्या उपक्रमामुळे मतदार अक्षरश: भारावून गेले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती तालुक्यात २० आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामधील सुपा मतदान केंद्र ‘पोपटी’ तर काटेवाडी मतदान केंद्र ‘गुलाबी’ रंगाच्या थीमनुसार मतदारांना आकर्षित करुन घेण्यासाठी विशेष रंगसंगतीने सजविण्यात आले होते.
बारामतीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव व सहयक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी आलेल्या पहिल्या पाच मतदारांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले. या मतदान केंद्राला मुख्य निवडणुक निरीक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली.
-----------------
रंगसंगती साधली....
या दोन्ही मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षासह सर्व मतदान केंद्र अधिकारी महिला होत्या. मदतनीस शिपाई आणि पोलिस कर्मचारीही महिला होत्या. महिला पोलिस वगळता सर्व कर्मचारी केंद्राने दिलेल्या रंगसंगतीचा पोशाख करून आल्या होत्या. या दोन्ही मतदान केंद्रात केंद्रासाठी निवडलेल्या रंगाचे पताके, फुगे लावण्यात आले होते. त्याच बरोबर या दोन्ही मतदान केंद्राच्या आवारात मतदारांना सावलीची व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याचे थंड पाणी, कचराकुंडी, अग्नीशमन यंत्रणा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती.
--------------------
१८ मतदान केंद्रे स्वच्छ सुंदर....
सुपा आणि काटेवाडी ही दोन्ही मतदान केंद्रासह तालुक्यातील इतर १८ मतदार केंद्र ही आदर्श मतदार केंद्र म्हणून स्थापित करण्यात होती. या मतदान केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवण्यात आला होता. सुपा आणि काटेवाडी मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रमोद काळे, भूमी अभिलेख उपाधिक्षक अमरसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्क अभियंता व्ही. एम ओहळ, क्षेत्रीय अधिकारी कृषिमंडल अधिकारी राजेंद्र शितोळे, शाखा अभियंता जयंत काकडे यांनी विशेष परिश्रम घेऊन ही संकल्पना पूर्ण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुलालाचे शिंपण, मारामारीत भाविक दंग

$
0
0

गुलालाचे शिंपण, मारामारीत भाविक दंग
श्रीनाथ म्हस्कोबाची यात्रेची उत्साहात सांगता
म. टा. वृत्तसेवा, सासवड
‘सवाई सर्जाचं चांगभलं -नाथ म्हस्कोबाच चांगभलं’ अशा जयघोषात मंगळवारी दुपारी १ वाजून ३० वा. श्री क्षेत्र वीर ता. पुरंदर येथे श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरी यांच्या अंगावर गुलालाचे शिंपण आणि पारंपरिक मारामारी सोहळा झाला. या सोहळ्यानंतर गेले दहा दिवस सुरू असणाऱ्या यात्रेची सांगता झाली. या वेळी गुलाल आणि खोबऱ्याची भाविकांनी मुक्तपणे उधळण केली.
मंगळ‍वार (२१ फेब्रुवारी ) हा यात्रेचा मुख्य दिवस होता. पारंपरिक मारामारीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवारी रात्री देऊळवाड्यात छबिना सुरू झाला. मानाच्या सर्व पालख्या, काठ्यांसह पहाटे देवाचे मानकरी आप्पा शिंगाडे यांची भाकणूक झाली. त्यानंतर पहाटे छबिन्याची सांगता झाली.
मंगळवारी दुपारी १२.३० वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर भाविकांनी श्रीनाथ म्हस्कोबाच चांगभलं असा गजर केला आणि गुलाल, खोबरे उधळले.
त्यानंतर देवाचे मानकरी भारत जमदाडे व जमदाडे परिवाराकडून रंगाचे शिंपण करण्यात आले. याचवेळी कुंजीरवाडीचे विशाल धुमाळ आणि पुण्याचे आनंद शिंगाडे यांच्या वतीने देण्यात आलेल्या हेलिकॉप्टरमधून देवस्थानच्या वतीने मंदिर व परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर सर्व पालख्या, काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर सर्व लवाजमा देऊळवाड्याबाहेर पडून पारंपरिक मारामारी सोहळा झाला. त्यानंतर या तेरा दिवसांच्या यात्रासोहळ्याची सांगता झाली. दिवसभरात सुमारे पाच लाख भाविकांनी उपस्थित लाविली. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, देवाचे मानकरी, वीर ग्रामपंचायत आणि ग्रामस् यांच्या सामूहिक नियोजनातून हा सोहळा संपन्न झाला.
.......
असा झाला सोहळा
० भाविकांसाठी पिण्याचे पाणी, विद्युत मनोरे उभारून प्रकाश व्यवस्था करण्यात आली.
० रुग्णवाहिका व सासवड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय पथकाची व्यवस्था
० गॅस सिलेंडर वापरावर निर्बंध घालण्यात आले होते.
० मंदिर व परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
० पार्किंगसाठी मैदान आरक्षित करण्यात आले होते.
0 सासवड पोलिस स्टेशनबरोबरच ग्रामसुरक्षा दलाच्या मंडळींचा बंदोबस्त.
0 जादा एस. टी. गाड्यांची व्यवस्था.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकार ‘हक्का’ला जागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मंगळवारी सगळीकडे चर्चा होती ती बोटांवर लागणाऱ्या काळ्या शाईच्या जादूची. पुण्यातील फक्त सिने क्षेत्रातीलच नाही, तर संगीत क्षेत्रातील कलाकारांनीही आपापल्या प्रभागांमध्ये मतदानाचा हक्क बजावला. फक्त स्वतः मतदान करूनच ते थांबले नाहीत, तर सोशल मीडियावर आपले मतदान केल्याचे फोटो अपलोड करून लोकांनाही मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आरोह वेलणकर, अक्षय टाकसाळे या युवा अभिनेत्यांसह पर्ण पेठे, शिवानी रांगोळे या युवा अभिनेत्रींनीही मतदानाचा हक्क बजावला. अमृता खानविलकर, सौरभ गोखले, रोहन मंकणी, श्रुती मराठे या कलाकारांसह दिग्दर्शक सुजय डहाके, संगीतकार - दिग्दर्शक अजय नाईक, अभिनेत्री-गायिका प्रियांका बर्वे, गीतकार संदीप खरे यांनीही मतदान केले. गायिका अंजली मराठे, संगीतकार नरेंद्र भिडे, संगीतकार - गायक डॉ. सलील कुलकर्णी, आनंद भाटे आणि सावनी शेंडे - साठ्ये या संगीत क्षेत्रातील कलाकारांनीही मतदान केले. गायक पं. संजीव अभ्यंकर यांनी त्यांची मुलगी ऋचासह मतदान केले. तिचे हे पहिलेच मतदान होते.
अभिनेता सुयश टिळक याने आपल्या कुटुंबासह मतदान करून त्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने मतदानाची ‘प्राउड मोमेंट’ सोशल मीडियावर शेअर केली. ‘शाळा’फेम अभिनेता अंशुमान जोशी याने पहिल्यांदाच मतदान केले. त्यानेही त्याचा मतदानानंतरचा अभिमान वाटणाऱ्या चेहऱ्याचा ‘सेल्फी’ सोशल मीडियावर अपलोड केला. यंदा सिनेमा आणि मालिकांच्या शुटिंगमुळे मतदानापासून लांब राहावे लागलेलेही कलाकार होते. यंदा अनुजा साठे, सुबोध भावे, दीप्ती लेले, कृतिका देव हे कलाकार मतदान करू शकले नाहीत.
......
‘मतदान केल्यावर जबाबदार नागरिक असल्यासारखे वाटते आहे. आपल्या देशाची लोकसंख्या बघता त्यातले ६५ टक्के लोक हे नोकरी-व्यवसाय करणारे आहेत. त्यातही तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. नवी पिढी ही खुल्या विचारांची आहे, जी विचारपूर्वक मतदान करते.’
- आर्या आंबेकर, गायिका-अभिनेत्री
...
आर्ची - परशाचे काय?
तरुणाईमध्ये तुफान क्रेझ असलेले ‘सैराट’फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोघांची निवडणूक आयोगाने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली खरी; पण मतदानाचा टक्का वाढावा; म्हणून त्यांनी नेमके काय केले, असा प्रश्न तरुणाईमधून विचारला जात होता. त्यांचे याबाबतचे अनुभव, त्यांनी केलेले काम जाणून घेण्यासाठी दोघांनीही सातत्याने फोन करण्याचा प्रयत्न केला असता, दोघांचेही फोन ‘नॉट रिचेबल’ होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवार-मतदारांकडून सोशल मीडियाचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेले पंधरा दिवस राजकीय पक्ष, नेते मंडळींची खिल्ली उडवणाऱ्या मेसेजचा पाऊस सोशल मीडियावर पाहावयास मिळाला. मतदानाच्या दिवशी मात्र मतदान केल्याचे फोटो जोरदार शेअर झाले आणि इतरांनीही मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या ‘एक्झिट पोल’ने मात्र सोशल मीडियावर मात्र जोरदार करमणूक केली.

गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सोशल मीडिया हे प्रचारातील प्रभावी माध्यम ठरले होते. या माध्यमाचा वापर सर्वांनीच केला. मतदानाच्यादिवशी अफवा परसवण्यासाठी या माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात आला. मतदानाच्या दिवशी हाणामारीचे, बोगस मतदानाचे कथित ‘व्हिडिओ’ तयार करून त्याचा वापर ‘हवा’ तयार करण्यासाठी झाला.

मतदारांनी मतदान केल्यानंतर आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करून मित्र परिवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. ‘जे मतदान करणार नाहीत, त्यांना सार्वजनिक प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अधिकार हवा असेल तर मतदान करा.. जय महाराष्ट्र’ असे मेसेज जोरदार व्हायरल झाले होते.

‘समस्त पुरुष वर्गासाठी, कदाचित तुमच्या मताला तुमच्या घरात किंमत नसेल, पण देशाला आहे. त्यामुळे जरूर मतदान करा!’, ‘मी मतदान केले, तुम्हीही करा’, असे विविध मेसेज निवडणुकीत मतदान आणि प्रचार संपल्याबाबत भाष्य करणारे फिरत होते. ‘ए​क्झिट पोल’ आल्यानंतर समर्थकांनी जोरदार ​टीका टिप्पणी सुरू केली होती. ‘गाजर, रामायण, सैराट, झिंगाट, कारभारी, ते सध्या काय करतात, गुंडाराज, खंडणीखोर, दंगल,’ असे विविध शब्द वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर गेली काही दिवस राज्य करत होते. या शब्दांना मतदानानंतर विश्रांती मिळाल्याचे चित्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिले-वहिले मतदान उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकशाही या संकल्पनेत दाखल झाल्याचे समाधान, पहिल्यांदाच मतदान करणार असल्याची उत्सुकता आणि सोशल नेटवर्किंगवर हे कर्तव्य बजावल्याची ग्वाही देऊव युवा वर्गाने त्यांचे पहिले-वहिले मतदान उत्साहात पार पाडले. कॉलेजियन्सने मतदान केल्यानंतर ‘मी मतदान केले, तुम्हीही करा’ असा संदेश देत व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सेल्फींचा अक्षरक्षः पाऊस पाडला. पहिल्यांदाच मतदानाला जातानाच अनेकांनी स्टेटस अपडेट करण्याला पसंती दिली. ‘गोइंग फॉर अ चेंज’, ‘कर्तव्य’, ‘डू वोट’ असे स्टेटस आणि हॅशटॅग करत या पोस्ट दिवसभर सोशल नेटवर्किंगवर फिरताना दिसत होते. कॉलेजियन्सने नेमक्या कोणत्या निकषांवर त्यांचे पहिले मत दिले हे त्यांच्याच शब्दांत.


पहिले मत देतानाचा आनंद खूप वेगळा आहे. एका मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली. आता निर्णयप्रक्रियेत जी माणसे असतील, त्यांची निवड बरोबर, की चूक हे येणारा काळ सांगेल. मात्र, मी या प्रक्रियेसाठी पात्र झाले याचे समाधान वेगळे आहे.

- आसावरी वाघमारे, पीईएस मॉडर्न कॉलेज, पुणे

मी उमेदवाराचे चारित्र्य आणि काम करण्याची क्षमता पाहून केले. माझ्या परिसराचे पुढील पाच वर्षांचे भवितव्य मी निवडून दिलेल्या उमेदवाराच्या हाती आणि विकासाच्या वाटेवर जाणारे असेल, असा विश्वास वाटतो.

- रविराज पवार, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी, पिंपरी

मला आयुष्यात पहिल्यांदा मतदान करून खूपच आनंद झाला आहे. मी माझे मत लोकशाहीला देऊन सुजाण आणि सुशिक्षित नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडले याचे समाधान वाटते.

- सुदर्शन डाके, एमएमआयटी कॉलेज, लोहगाव

प्रथमच मतदान करून मी लोकशाहीचा एक भाग झालो. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मी माझे एक पाऊल पुढे टाकले. या वर्षी प्रथमच मतदान करून जो अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे तो पूर्ण केल्याचे समाधान वाटते.

- तेजस ठोंबरे, विद्यार्थी

मी पहिल्यांदाच महानगरपालिकेसाठी मतदान केले. पहिल्यांदा मतदान केले आणि या वेळी चार गट केल्यामुळे चार मते देता आली. पहिल्यांदा मतदान केल्यावर खूप छान वाटले. भारताचा जबाबदार नागरिक म्हणून मी प्रत्येक निवडणुकीत यापुढेही माझे कर्तव्य बजावणार

- वैभव ढमढेरे, ट्रिनिटी कॉलेज, पिसोळी

..

मतदान करतानाच जबाबदार नागरिकांमध्ये आपण दाखल झालो आहोत याची जाणीव झाली. सभोवती काय घडणार हे ठरवण्याचा अधिकार मला मिळाला आहे. योग्य पारख करून मी माझे मत दिले आहे.

- सायली पवार, भिवराबाई सावंत कॉलेज, नऱ्हे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांकडून अॅपवर एकही तक्रार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘डिजिटल इंडिया’चा बोलबाला सुरू असताना महापालिकेच्या निवडणुकीत नागरिकांना तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने एक खास अॅप तयार केले होते. पण, पुण्यात नागरिकांकडून या अॅपवर एकही तक्रार करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘डिजिटल इंडिया’त पुणेकर उदासीन असल्याचे आढळून आले आहे.

शहरात कोठे आचारसंहिता भंग, पैसे वाटप होत असेल तर नागरिकांना त्याची तक्रार देण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘कॉप डॉट सिटिझन ऑन पेट्रोल’ नावाचे अॅप सुरू केले होते. कुठे गडबड सुरू असेल, पैसे वाटप होत असेल, तर नागरिक थेट त्याचे फोटो, व्हिडिओ काढून या अॅपवर टाकू शकत होते. त्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी पोहोचून कारवाई करणार होते. यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.

नागरिक हे अॅप डाउनलोड करून निवडणुकीच्या गडबडीसंदर्भात त्यावरून माहिती देऊ शकणार होते. जीपीएसवर आधारित चालणारे हे अॅप आहे. त्यामुळे ज्या भागातील नागरिक तक्रार करतील, त्या भागातील निवडणूक अधिकारी व पोलिसांना तक्रार जाणार होती. पोलिसांकडून त्याची नोंद करून घेऊन त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली जाणार होती. पण, पुणे व पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी एकही तक्रार अॅपवर केली नसल्याचे आढळले आहे.

‘व्हॉट्स अॅप’ क्रमांकावर आठ तक्रारी

नागरिकांना निवडणुकीच्या संदर्भात तक्रारी देण्यासाठी पुणे पोलिसांकडून एक व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू करण्यात आला होता. या ‘व्हॉट्स अॅप’ क्रमांकालादेखील नागरिकांकडून म्हणावा, असा प्रतिसाद मिळालेला नाही. या अॅपवर फक्त आठ तक्रारी आल्या आहेत. बहुतांश नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाच्या शंभर क्रमांकावर फोन करून तक्रारी दिल्या असल्याचे आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीसाठी ७० टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी आणि पंचायत समितींच्या १५० गणांसाठी ​जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदानामध्ये सहभाग घेतल्याने मतदानाची टक्केवारी वाढली असून, गेल्या निवडणुकीत हे प्रमाण ६५.६० टक्के होते. जिल्ह्यात वादावादीचे अनेक प्रकार घडले असून, बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील श्रीमंत शंभूसिंह महाराज मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली.

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर आणि वेल्ह्यात सुमारे ७५ टक्के झाले. त्याखालोखाल इंदापूर आणि मावळमध्ये सरासरी ७४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हवेलीत सर्वांत कमी सुमारे ५८ टक्के मतदान झाले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या तालुक्यातील हे प्रमाण जास्त आहे. गेल्या वेळी ५५.८५ टक्के मतदान झाले होते.

दौंड, भोर, मुळशीत मतदान कमी

जिल्ह्यातील मतदानाची सरासरी ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली असताना, दौंड, भोर आणि मुळशीत मतदारांनी मतदानात निरुत्साह दाखविला. दौंडमध्ये सुमारे ६६ टक्के मतदार झाले. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण ६७.८० टक्के होते. भोरमध्ये सुमारे ६७ टक्के मतदान झाले असून, गेल्यावेळी सुमारे ६९.१३ टक्के प्रमाण होते. मुळशीत मतदानाचे प्रमाण ६४ टक्के आहे. हे प्रमाण मागील निवडणुकीत ६६.७६ टक्के होते.

मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदानाचा वेग कमी होता. पहिल्या दोन तासांत अवघ्या ११ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी सुमारे २५.८९ टक्के झाली होती. दुपारी दीड वाजेपर्यंत हे प्रमाण सरासरी ३९.६८ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५१.५५ टक्के मतदान झाले. दुपारी चारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी सरासरी ७० टक्क्यांवर पोहोचली.

दरम्यान, मतदानाला तासाभराचा कालावधी उरला असताना माळेगाव येथे काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

जिल्ह्यात सुमारे २८ लाख मतदार असून, ३३६९ मतदान केंद्रांवर मतदान झाले. मतदानासाठी सुमारे दहा हजार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; तसेच सुमारे ५०० वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. आवश्यक तेथे पुरेसे सुरक्षा बल नेमण्यात आले होते. मतदारांनी मतदानाकडे आकर्षित व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.

यावेळच्या निवडणुकीत ग्रामीण भागामध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. मतदारयादीमध्ये इतरांची नावे शोधून देण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना तरुणांकडून मदत करण्यात आली.

तालुका आणि टक्केवारी

जुन्नर - ६८

आंबेगाव - ७१

शिरूर- ७५

खेड - ७०

मावळ - ७४

मुळशी - ६४

हवेली - ५८

दौंड - ६६

पुरंदर - ७१

वेल्हे - ७५

भोर - ६७

बारामती - ६९

इंदापूर - ७४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीला गालबोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीगाव प्रभागातील उमेदवार हिरानंद ऊर्फ डब्बू असवानी आणि भाजप उमेदवार धनराज आसवानी, तर मासूळकर कॉलनी-नेहरूनगर प्रभागातील राष्ट्रवादी-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. नेहरूनगर येथून पोलिसांनी एका कारमध्ये लपविलेल्या तीन तलवारी आणि एक कोयता जप्त केला असून, मतदान अंतिम टप्प्यात आल्यानंतर मंगळवारी (२१ फेब्रुवारी) दुपारी या दोन्ही घटना घडल्या आहेत. याव्यतिरिक्त भाटनगर पिंपरी, मोहननगर आणि निगडी यमुनानगर या प्रभागात किरकोळ कुरबुरीच्या घटना घडल्या असून, तुंबळ हाणामारीच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीला गालबोट लागले.

पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवानी आणि भाजप उमेदवार धनराज आसवानी या दोघांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील शाळा आणि पिंपरी मनपा शाळा येथे हाणामारी झाली. यात दोघेही जखमी झाले असून, त्यानंतर दोघा भावांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. राज्य राखीव पोलिसदल आणि पिंपरी पोलिसांनी लाठीमार करून येथील गर्दीवर नियंत्रण मिळविले. या हाणामारीमुळे काही मिनिटे सामान्य नागरिकांना येथे मतदान करण्यात अडथळा आला. परंतु, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत गर्दी पांगविली. या प्रभागात आणि दोन्ही उमेदवारांमध्ये निवडणुकीत हाणामारीची परंपरा तीन निवडणुकानंतर यंदा देखील कायम राहिली. प्रत्येक निवडणुकीत याच प्रभागामुळे शहरात गालबोट लागते.

यासह मासुळकर कॉलनी-नेहरूनगर या प्रभाग क्रमांक ९मध्ये शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल भोसले आणि भाजप उमेदवार राजेश पिल्ले यांच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील नेहरूनगर येथे तुफान हाणामारी झाली. या वेळी एका कारची तोडफोड करण्यात आली. तसेच, एका कारमधून पोलिसांनी तीन तलवारी आणि एक कोयता ताब्यात घेतला आहे. दोन्ही घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी येथील बंदोबस्तात वाढ केली असून, निकालानंतरही हा बंदोबस्त कायम राहणार आहे. पिंपरीगाव आणि नेहरूनगर येथील हाणामारीत दोन्ही पक्षांचे काही कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरीत ६७ टक्के मतदान मतदानाचे प्रमाण वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात सुमारे ६७ टक्के मतदान झाले. पिंपरी आणि नेहरूनगरमधील वाद वगळता सगळीकडे शांततेत मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
शहरात ३२ प्रभागांतून १२८ जागांसाठी ७७३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भोसरीतील प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. उर्वरित १२७ जागांसाठी सुमारे ११ लाख ९२ हजार मतदारांकरिता एक हजार ६०८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.
सर्व केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासांत शहरात सगळीकडे ९.५६ टक्के मतदान झाले होते. पिंपळे सौदागरमध्ये पहिल्या दोन तासांत सर्वाधिक १४.०३ टक्के मतदान झाले होते. तर, दापोडी-कासारवाडी भागात पहिल्या दोन तासांत सर्वात कमी ६.७७ टक्के मतदान झाले होते. साडेअकरापर्यंत शहरात २२.०२ टक्के मतदान झाले. दुपारी दीडपर्यंत ३५.७६ टक्के, साडेतीनपर्यंत ४८.९६ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासांत जवळपास १९ ते २० टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भाटनगर येथील मतदानकेंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होते.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक फंडे वापरले गेले. काही हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवर सवलत होती. काही ठिकाणी रिक्षाचालकांनी प्रवाशांना मोफत सेवा देऊ केली. कॅब सर्व्हिसमध्येही पाच किलोमीटर परिसरात सवलत देऊ करण्यात आली होती. त्याचा लाभ प्रामुख्याने वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांनीही स्वयंस्फूर्तीने मतदान केले. त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर डोली आणि व्हिलचेअर्सची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यक्तींच्या सोबत ओळखीच्या व्यक्तींना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
शहरातील सेलिब्रिटींनीही शूटींगच्या शेडुल्डमधून वेळ काढला आणि मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रियांका यादव, मृण्मयी गोंधळेकर, अभिनेता सौरभ गोखले, डॉ. संजीवकुमार पाटील, महांतेश्वर भोसगे यांचा समावेश आहे. या सर्वांनी मतदानाचे कर्तव्य बजावल्याचे समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानादरम्यानही गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अ, ब, क आणि ड या गटांनुसार मतदान यंत्रे उपलब्ध असतील, असा प्रचार प्रशासनाकडून आणि सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी मतदानासाठी गेलेल्या मतदारांना केंद्रांवर मतदान यंत्रांवर गटांचा उल्लेख दिसला नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती होती. बहुतांश ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व अशिक्षितांना मतदानासाठी केंद्र अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागली.

महापालिका निवडणुकीसाठी यंदा चार उमेदवारांची प्रभाग रचना करण्यात आली होती. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी यंदा प्रथमच एका वेळी चार उमेदवारांना मतदान केले. बहुतांश मतदान केंद्रात तीन मतदान यंत्रे उपलब्ध होती. तीन यंत्रांवर चार गटातील उमेदवारांचा समावेश होता. त्या गटांची नावे यंत्रांवर देण्यात आली नव्हती. तर, गट समजण्यासाठी गटनिहाय रंग बदलण्यात आला होता. मात्र, मतदारांना ते समजून घेताना त्रास झाला.

सर्वच मतदान केंद्राबाहेर मतदान यंत्रावरील उमेदवारांच्या याद्या लावण्यात आल्या होत्या. मतदानासाठी नागरिकांची रांग लागली असताना, त्यांना दिसेल अशा ठिकाणी त्या याद्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश मतदारांना मतदान यंत्र पाहून प्रश्न उपस्थित झाल्याचे निदर्शनास आले. याबरोबरच मतदान कसे करावे, बटण कोणत्या क्रमाने दाबायचे, याबाबत मतदारांना मार्गदर्शन करावे लागले. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अधिक अडचणी आल्या. अनेक नागरिकांना आपण कुणाला मत दिले हेच कळाले नाही. काहींनी एकाच गटातील दोन उमेदवारांच्या चिन्हापुढील बटण दाबल्याच्याही घटना घडल्या.

नेमून दिलेले काम सोडून समस्यांचे निराकरण

मतदान केंद्रामध्ये केंद्र अधिकारी व तीन सहाय्यक अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. मतदारांना मतदान यंत्राबाबत भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम, त्यास नेमून दिलेले काम सोडून करीत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चभ्रू वस्तीत नावे गायब

$
0
0

मतदान वाढल्याने निकालाविषयी उत्कंठता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये मंगळवारी दिवसभर मतदानासाठी उत्साह दिसून आला. वडारवाडी, हनुमाननगरसारख्या वस्त्यांमध्ये मतदानासाठी मोठ्या रांगा होत्या. मात्र, अन्यत्र मोठ्या रांगा दिसून आल्या नाहीत. प्रभात रोड, शिवाजीनगर, रेव्हेन्यू कॉलनीसारख्या सोसायट्यांच्या भागात काही मतदारांची नावे गायब असल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. कसबा पेठ मंगळवार पेठ या प्रभागात तब्बल ६१.२१ टक्के मतदान झाल्याने निकालाविषयी उत्कंठा वाढली आहे.
सकाळच्या टप्प्यात असलेला उत्साह दुपारी कडक उन्हामुळे काहीसा कमी झाला होता. मात्र, अखेरच्या दोन तासात पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. शेवटच्या क्षणी तर अनेक केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. उशिरा पोहोचलेल्या अनेकांना वाद घालूनही मतदान न करताच परतावे लागले.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रभागातील सोसायट्यांमधील मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र होते. त्यामुळे काही काळ रांगा लागल्या होत्या. मतदारांपर्यंत स्लीप न पोहोचल्याने व मतदान केंद्र तसेच काहींचा प्रभागही बदलल्याने अनेकांना आपले केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. विधानसभा निवडणुकीत ज्या केंद्रावर मतदान केले, त्यात बदल झाल्याने केंद्र शोधण्यात लोकांचा वेळ जात होता. सोसायट्यांच्या भागातील सुशिक्षित मतदारांची नावेच गायब होती. लोकसभा, विधानसभेसाठी मतदान केल्यानंतर यावेळीच नाव कसे गायब झाले, अशी तक्रार नागरिक करत होते.
दुपारी दीडच्या सुमारास मतदारांना भुलविण्याच्या आरोपावरून शिवसेनेचे उमेदवार राजू पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब बोडके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे पोलिसांना धाव घ्यावी लागली. भरदुपारी काही काळ गर्दी कमी झाल्याने मतदान प्रक्रियेतील कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना जेवण करण्याची संधी मिळाली. दुपारी तीननंतर मतदानासाठी गर्दी वाढू लागली. साडेचारनंतर तर जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात रांगा लागल्या होत्या. कसबा पेठ मंगळवार पेठ या प्रभागातही दिवसभर गर्दी होती. या प्रभागात मतदानाला मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठ, भीमनगर परिसरात मतदान संपण्यापूर्वी मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तिथे मतदानाची वेळ संपल्यानंतरही कूपन देऊन उशिरापर्यंत मतदान सुरू होते. दिवसभरात ६१.२१ टक्के मतदान झाले.
अनेक ठिकाणी अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मतदारांसाठीच्या आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या नव्हत्या. रॅम्प किंवा लिफ्टची सोय नसल्याने मतदारांना खुर्चीत बसवून मतदान केंद्रापर्यंत न्यायला त्यांचे नातेवाईक आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागली. काही ठिकाणी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, संपत्ती, कर्ज व गुन्ह्यांची माहिती देणारे फलक ठळकपणे लावण्यात आले होते. त्यामुळे मतदार आवर्जून हा फलक वाचून मतदानासाठी जात होते. तर काही ठिकाणी हे फलक दर्शनी भागाऐवजी सहज दिसून न येणाऱ्या ठिकाणी लावल्याने मतदार तक्रारही करत होते.

पेट्रोलचे कूपन मिळाले
सकाळी लवकर मतदान केंद्र गाठणाऱ्या अनेक मतदारांना पुणे पालिकेतर्फे देण्यात येणारे पेट्रोलचे कूपनही मिळाले. तर याच काळात झोपडपट्टी भागातील मतदान केंद्रे काहीशी ओस पडल्याचे दिसून आले. दुपारी कडक उन्हामुळे मतदान केंद्रांवरची गर्दी ओसरली होती. काही ठिकाणी मतदारांना रिक्षा, कार, जीपमधून मतदान केंद्रावर सोडण्यात येत होते. वडारवाडी आणि हनुमाननगर, जनवाडी परिसरात सकाळीही रांगा दिसून येत होत्या. सकाळी मतदानाला आलेल्यांमध्ये सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांचा समावेश होता.

मतदान

प्रभाग क्रमांक ७ पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी ५२ टक्के
प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनी ५३.२६ टक्के
प्रभाग क्रमांक १६ कसबा पेठ मंगळवार पेठ ६१.२१ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या तासात मतांना ‘भाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदार यादीतील गोंधळ, मतदान यंत्र (ईव्हीएम मशिन) बंद पडणे, बोगस मतदान, आणि शेवटच्या एका तासात मतदारांच्या मतांना ‘भाव’ आल्याने सायंकाळी साडेपाचनंतर लागलेल्या रांगा...निवडणुकीत होऊ नये, असे वाटणारे सर्व प्रकार प्रभाग ३० (जनता वसाहत - दत्तवाडी), प्रभाग ३३ (वडगाव बुद्रुक - धायरी) आणि प्रभाग ३४ (हिंगणे-सनसिटी) या तीन प्रभागांमध्ये मतदानाच्या दिवशी घडले. या तिन्ही प्रभागांमध्ये सरासरी ५८.२९ टक्के मतदान झाले.
सिंहगड रस्त्यावरील धायरी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, दत्तवाडी, पानमळा वसाहत, दांडेकर पूल वसाहत आणि जनता वसाहत या परिसराचा समावेश असलेल्या या तीन प्रभागांपैकी प्रभाग ३३ मध्ये सोमवारी रात्री मतदारांना पैशाचे वाटप करताना कारवाई झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या प्रभागाकडे पोलिस आणि निवडणूक विभागाचे विशेष लक्ष होते. मात्र, दिवसभरात या प्रभागात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदार यादीच्या घोळाचा त्रास प्रामुख्याने धायरी आणि हिंगणे या भागातील मतदारांना झाला. एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदार केंद्रांवर विभागली जाण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. त्यामुळे मतदारांना त्रासाला सामोरे जावे लागले.
ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकार सनसिटी येथील केंद्रांवर घडला. ईव्हीएम मशिनची बॅटरी उतरल्याने ते बंद पडले. त्यानंतर मशिन बदलण्यात आले. या तिन्ही प्रभागात मतदानाचे प्रमाण सकाळच्या वेळी कमी होते. दुपारी दीडपर्यंत प्रभाग ३० मध्ये ३३.१८ टक्के, प्रभाग ३३ मध्ये ४०.४१ टक्के आणि प्रभाग ३४ मध्ये ३६.९४ टक्के मतदान झाले होते. ऊन जास्त असल्याने दुपारी साडेतीनपर्यंत प्रभाग ३० मध्ये ४४.८२ टक्के, प्रभाग ३३ मध्ये ४९.६८ टक्के आणि प्रभाग ४६.८८ टक्के मतदान झाले होते.
मतदानासाठी शेवटचा एक तास शिल्लक राहिल्यानंतर मतदार घराबाहेर पडू लागले. प्रामुख्याने जनता वसाहतीत हे चित्र दिसत होते. या वसाहतीमध्ये असलेल्या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे साडेपाच नंतरही या वसाहतीत मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. प्रभाग ३० मध्ये ५९.८४, प्रभाग ३३ मध्ये ५९.९८ आणि प्रभाग ३४ मध्ये ५८.२९ टक्के मतदान झाले. सरासरी मतदान ५८.२९ टक्के झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहायक निवडणूक निर्णय ​अधिकारी गजानन गुरव आणि अजय गोळे यांनी सांगितले.

‘बीएलओ’लाच फटका
बोगस मतदान करण्याच्या प्रकाराचा फटका बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यालाच बसला. उज्ज्वला शशिकांत पवार यांची नेमणूक ‘बीएलओ’ म्हणून करण्यात आली होती. सकाळी साडेसहा ते दीड वाजेपर्यंत त्यांनी काम केल्यानंतर मतदानासाठी त्यांना सोडण्यात आले. पवार यांचे नाव प्रभाग ३४ मधील सनसिटी येथील अग्निशमन दलाजवळील मतदान केंद्रावर होते. मतदान केंद्रात गेल्यावर त्या आणि त्यांचे पती शशिकांत पवार यांच्या नावावर मतदान झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांना प्रदत्त मतदान पत्रिका देण्यात आली. त्याद्वारे त्यांनी मतदान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुठे बोगस तर कुठे शांततेत..

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १ कळस-धानोरी, प्रभाग क्रमांक २ फुले नगर - नागपूर चाळ आणि प्रभाग क्रमांक ६ येरवडामध्ये काही ठिकाणी घडलेल्या बोगस मतदानाच्या घटनांचा अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ‘आयटी’ क्षेत्रातील नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली. त्यानंतर सायंकाळपर्यंत संथगतीने मतदान सुरु होते. सायंकाळी साडेचारनंतर मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या. तिन्ही प्रभागां मिळून सुमारे ५५ टक्के मतदान झाल्याची शक्यता आहे. प्रशासनाने २६८ मतदान केंद्रावर मतदानाची सोय केली होती. दुपारी दीड वाजेपर्यत २७ टक्के, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले. सुमारे ५५ टक्के मतदान झाल्याची शक्यता माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी वर्तवली. प्रभाग क्रमांक एकमध्ये बाबुराव टिंगरे शाळेत तर, प्रभाग क्रमांक दोनमध्ये जनता विद्यालयात बोगस मतदान झाल्याच्या घटना घडल्या. टिंगरे शाळेत अनिता पाटील यांचे मतदान आधीच झाल्याची घटना घडली. त्यामुळे पाटील यांचे मतदान पत्रिकेवर शिक्के मारून (प्रदत्त) मतदान करून घेण्यात आले.
अशाच प्रकारची घटना जनता विद्यालयात घडली. राकेश कदम यांचे मतदान भलत्याच व्यक्तीने केल्याचे उघड झाले. त्यामुळे कदम यांनी अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार प्रदत्त मतदान केले. अशा प्रकारची घटना यापूर्वी दोनदा घडल्या असल्याचे कदम यांनी सांगुतले. बाबुराव टिंगरे शाळा, विठ्ठलराव गाडगीळ शाळा, नारायण मोझे शाळा, गेनबा मोझे शाळा, जनता विद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक शाळा, अग्रेसन हायस्कूल, विद्यानिकेतन शाळा, भाऊसाहेब जाधव शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथील मतदान केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. केंद्रीय विद्यालयातील मतदान केंद्रात सर्वाधिक १९ बूथ होते. मतदान करताना कुठे चार तर, कुठे तीन मशिन असल्याने नागरिकांमध्ये मतदान करताना गोंधळाची स्थिती होती.
दरम्यान, सायंकाळी साडेचारनंतर नागरिकांचे जथ्थे घरातून मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी निघाले. मात्र, काहीच मतदान केंद्रांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत रांगा लागल्या होत्या. या वेळी युवावर्गासोबत ज्येष्ठ नागरिकांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला.

कर्मचारी सुविधांविना
प्रभाग क्रमांक १, २ आणि ६ मध्ये सुमारे २६८ मतदान केंद्रांवर विविध सरकारी कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी ड्युटी लावण्यात आली होती. यासाठी कर्मचारी सोमवारी दुपारपासूनच मतदान केंद्रांवर हजर होते. मात्र, दोन दिवस राहण्यासाठी त्यांना लागणाऱ्या कोणत्याच प्रकारच्या पायाभूत सुविधा देण्यात आल्या नाही. याशिवाय त्यांना नाश्ता, चहा आणि जेवणही मिळाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images