Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाज्यांची मोठी आवक; दर घसरले

0
0
मार्केटयार्डात रविवारी फळ आणि भाज्यांची मोठी आवक झाली. मात्र, या भाज्यांना उठाव नसल्याने त्या पडून राहिल्या. परिणामी, सर्वच भाज्यांचे भाव घरसले. वांगी, लसूण आणि कांद्याचे भाव स्थिर होते.

विदर्भ, मराठवाड्यात थंडीची लाट

0
0
थंडीने बस्तान बसवायला सुरुवात केली असून, शहरात रविवारी पारा नऊ अंशांवर घसरला. राज्यात सर्वत्र किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट आहे. सर्वांत कमी तापमान नगर येथे ७.८ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.

कास पठारावर फुटले फटाके

0
0
अनियमित पावसामुळे या वर्षी कास पठारावर दरवर्षीसारखी मोठ्या प्रमाणात फुले आली नसली, तरी प्रवेश शुल्कातून वनविभागाच्या खात्यात अवघ्या तीन महिन्यात तब्बल अकरा लाख रुपये जमा झाले आहेत.

पुणे-नागपूर दरम्यान २० तारखेला विशेष रेल्वे

0
0
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे पुणे ते नागपूर दरम्यान २० नोव्हेंबरला विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. पुणे स्टेशनवरून दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, २१ नोव्हेंबरला पहाटे साडेसहा वाजता नागपूरला पोहोचेल.

‘नो पार्किंग’ला स्थानिकांचा विरोध

0
0
वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा यावा, म्हणून कर्वे पुतळा ते पौड फाटा दरम्यान प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणा-या ‘नो पार्किंग’च्या योजनेला स्थानिकांनी विरोध केला आहे. दरम्यान, ‘नो पार्किंग’ची योजना काही भागामध्ये शिथील करता येईल का, याची चाचपणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

आता ‘यूआयडी’ घालणार बोगस लाभार्थ्यांना अटकाव

0
0
‘संजय गांधी निराधार योजने’सारख्या आर्थिक मदत देणाऱ्या विविध योजनांमधील बोगस लाभार्थ्यांना अटकाव घालण्याचे काम आता ‘आधार कार्ड’ (यूआयडी) करणार आहे.

जिल्ह्यात पावणेदोन लाख नव्या मतदारांची भर

0
0
पुणे शहर व ग्रामीण भागांतील एकवीस विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणा-या मतदार नोंदणी मोहिमेत तब्बल १ लाख ८३ हजार ४५२ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजेच २४,९८१ मतदार पुरंदर मतदारसंघातील आहेत.

‘चंगळवादी जमान्यात संस्कार संदर्भहीन’

0
0
‘सध्याची तरुण पिढी चंगळवादाच्या आहारी जाऊन आत्मकेंद्री होत आहे. त्यामुळे ध्येयवाद-संस्कार हे विषय संदर्भहीन होत आहेत,’ अशी खंत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केली. प्रभाकर पुराणिक स्मृती पुस्तक प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

लोणावळा नगराध्यपदाच्या हालचालींना वेग

0
0
लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनराध्यक्ष पदासाठी हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यासह इतर इच्छुक आपली वर्णी लागावी यासाठी नगरसेवक आणि पक्षश्रेष्ठींची मनधरणी करीत आहेत.

धडपडणा-या हातांना हवेय मदतीचे कोंदण

0
0
पुण्यापासून अवघ्या ४० ते ६० किलोमीटरच्या परिघात त्या संसाराची लढाई कसोशीने लढत आहेत, घर चालवतानाच शेतात खपत आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न अन् गाठीला दोन पैसे जमविण्यासाठी बचतगटही चालवित आहेत. मात्र पुण्यात जागेचा अभाव आणि बाजारपेठेचा अननुभव यांमुळे या लढाईत त्या मागे पडत आहेत.

ठिबक सिंचनमध्ये २७ कोटींची तफावत

0
0
ठिबक सिंचन संचाबाबतचे तब्बल २७ कोटींचे बोगस अनुदानाचे प्रस्ताव कृषी खात्याकडे आल्याचे राज्याचे कृषिमंत्री आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितले. सुदैवाने यापैकी एकाही प्रस्तावाचे अनुदान राज्य सरकारने दिले नसून याची चौकशी करण्याच्या सूचना कृषिआयुक्तांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतक-यांचा माल थेट ग्राहकांच्या दारी

0
0
शेतीमध्ये तयार झालेला माल थेट ग्राहकांना मिळावा, यासाठी पणन विभागाने पुढाकार घेतला असून शेतक-यांचा माल ग्राहकांना घरबसल्या मिळावा म्हणून खासगी उद्योजकांची मदत घेऊन ही योजना राबविली जाणार आहे.

अग्रसेन पतसंस्था सुरू होणार

0
0
अग्रसेन महाराज पतसंस्थेकडे सध्या एकही रुपया शिल्लक नाही. मात्र, कर्ज वसुलीसाठी पतसंस्था उघडावी लागणार आहे. जसजसे कर्ज वसूल होईल, तसतसे ठेवीदारांचे आणि खातेदारांचे पैसे परत दिले जातील, अशी माहिती पतसंस्थेचे सचिव इंद्रकुमार बंन्सल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

दुष्काळ पाहणी पथक पुण्याला भेट देणार

0
0
राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या भेटीवर येत असून, पुणे विभागातील दुष्काळाची पाहणीही हे पथक करणार आहे. या समितीच्या शिफारशीनंतर दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून जादा निधी मिळण्याची शक्यता आहे.

‘स्त्रीभ्रूण हत्ये’ऐवजी आता गर्भलिंग निदान शब्दप्रयोग

0
0
वैद्यकीय तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करीत गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपात केला जातो त्याला जनजागरण मोहिमेत ‘स्त्रीभ्रूण’ हत्या असा होणारा शब्दप्रयोग चुकीचा आहे. त्याऐवजी आता ‘गर्भलिंग निदान’ हा शब्दप्रयोग करावा, असे आवाहन विविध स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

कालव्यावरची घाण घालवा

0
0
स्वारगेट ते डायसप्लॉट दरम्यान कालव्यावर होत असलेली घाण आणि त्यामुळे पाण्याचे होणारे प्रदूषण थांबविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी ( २० नोव्हेंबर) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

पुण्याचा विकास होणार मुंबईप्रमाणे

0
0
पुण्याची लोकसंख्या २०२७ पर्यंत सुमारे ५७ लाख १४ हजार होण्याची शक्यता असून, त्यापैकी सुमारे २६ लाख ५० हजार लोकसंख्या जुन्या हद्दीमध्ये असेल. जुन्या पुण्यात येणा-या या लाखो लोकांच्या निवा-यासाठी तब्बल सहा लाख ५८ हजार घरांची गरज भासणार आहे.

डेक्कन एक्स्प्रेसचा डबा सुटला

0
0
मुंबईहून पुण्याला येणा-या डेक्कन एक्स्प्रेसचा डबा सुटल्याचा प्रकार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास मंकीहिलजवळ झाला. त्यामुळे गाडीला पुण्यात पोहोचण्यास चार तास उशीर झाला. या गोंधळात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

हट्टाचा विळखा होतोय घट्ट...

0
0
गेल्या काही दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आत्महत्येच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले आहे. नकार पचविण्याची क्षमता राहिलेली नाही, आयुष्यात येणा-या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता कमी होत चालली आहे, प्रसंगी स्वतःचे आयुष्य संपविण्यासही मागे-पुढे पाहात नाहीत. यासंबंधी तज्ज्ञांशी बोलून घेतलेला हा आढावा

हॉस्पिटलच्या दारातच प्रसूत...

0
0
संसार चालविण्यासाठी कचरा वेचणारी ती... गर्भवती असूनही घराला हातभार लावण्यासाठी तिची धडपड... रास्ता पेठेतील कचरापेटीजवळ अचानक तिला कळा सुरू झाल्या... तिची असहायता पाहून तेथून जाणा-या पोलिसांतील माणुसकी जागी होते... तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी धावपळ करतो... हॉस्पिटलच्या दारातच ती प्रसूत होते... तेही बाळासह सुखरूप!
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images