Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नावे शोधताना मतदार हैराण

$
0
0

अंतिम मतदार यादीत ‘सर्च’ सुविधेचा अभाव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी सुटसुटीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. सूचनेची काटेकोर अंमलबजावणी करून अंतिम मतदार यादी तयार केल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरीही मतदार यादीत नाव शोधताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालिकेने तयार केलेल्या मतदार यादीमध्ये ‘सर्च’ ची सुविधा नसल्याने मतदारांची नावे शोधताना तारांबळ उडत आहे.
महापालिकेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी पालिकेने नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. मात्र, यादीमध्ये नाव शोधण्यासाठी सर्चची सुविधा उपलब्ध नसल्याने नाव सापडत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. महापालिकेने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीत नाव सापडत होते; पण अंतिम यादीत मात्र नाव सापडत नसल्याने मतदार हैराण झाले आहेत. प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून प्रशासनाने हकरती आणि सूचना मागविल्या होत्या. बहुतांश हरकती नावात, तसेच पत्ता बदलाच्या असल्याने दुरुस्ती केल्याचे प्रशासनाने जाहीर केले.
पालिकेने प्रभागनिहाय प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदारयादीत नावच सापडत नसल्याने नागरिकांनी सावकरकर भवन येथे सुरू केलेल्या निवडणूक कार्यालयात विचारणा केली. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी मोठा खर्चही केला जात आहे. मात्र पालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असतील तर, कोणाकडे दाद मागायची असा प्रश्नही विचारला जात आहे. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीत ३१,५७२व्या क्रमांकावर असणारे नाव अंतिम यादीत ३५,७५४व्या क्रमांकावर गेले आहे. यादीची तपासणी केल्यानंतर संबंधित नाव चार हजार क्रमांकाने पुढे गेल्याचे लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ भाजपमध्ये उमेदवारीवरून पुन्हा खल

$
0
0

प्रस्थापितांची वरिष्ठांकडे धाव; यादी ‘होल्ड’वरच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारांची पहिली यादी जवळपास तयार असली, तरी त्यातून काही विद्यमानांची नावे वगळण्यात आल्याने त्यावरून पुन्हा खल सुरू झाला आहे. उमेदवारी यादीमध्ये नाव नाही, हे समजल्यावर अनेकांनी मुंबईत धाव घेतली असून, काहींनी थेट पक्ष सोडण्याची भाषा सुरू केली आहे.
पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले. पहिल्या यादीमध्येच अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्का देऊन काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याची चाहूल लागल्याने शुक्रवारी सायंकाळपासून अनेकांनी मुंबईचा रस्ता धरला आहे. पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी त्यात आपले नाव असावे, यासाठी अनेकांकडून आटापिटा सुरू झाला आहे. त्यासाठी, थेट वरिष्ठांच्या गाठी-भेटी घेतल्या जात आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची संधी डावलण्यात आल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. एवढेच नाही, तर पक्षाकडून तिकीट मिळाले नाही, तर इतर पक्षांकडून निवडणूक लढविता येईल का, याची चाचपणीही काही इच्छुकांनी आत्तापासूनच सुरू केली आहे. त्यामुळे, उमेदवारी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपसमोर बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘आरपीआय’चा आज निर्णय?
शिवसेनेसोबत युती होणार नसल्याने शहरातील सर्व जागांवर लढण्याची तयारी भाजपने सुरू केली असली, तरी काही जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी (आरपीआय) सोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीने, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्यात शनिवारी प्राथमिक चर्चा झाली. रविवारी दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा बैठक होणार असून, आरपीआयला नेमक्या किती जागा सोडल्या जाणार, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, दोन्ही पक्षांतर्फे पहिल्या टप्प्यातील उमेदवारी यादी जाहीर केली जाऊ शकते.

पहिली यादी उद्या?
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार यादीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज, रविवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवार निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) पुन्हा बैठक होणार असल्याचे समजते. शहराच्या काही प्रभागातील संभाव्य उमेदवारांवरून निर्माण झालेले वाद या बैठकीत मिटवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, पहिल्या टप्प्यातील उमेदवार यादी सोमवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आघाडीबाबत आज निर्णय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महापालिका निवडणुकीत जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, आता जास्त काळ वाट पाहता येणार नाही. आघाडीबाबत आज, रविवारी चित्र स्पष्ट होईल,’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. ‘दोन्ही पक्षांनी आपापली ताकद ओळखून आणि परस्परांचा सन्मान राखून जागावाटप करावे,’ असे ते म्हणाले.

पालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय घेण्याचे अधिकार दोन्ही पक्षांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले असून गेल्या काही दिवसांपासून त्यावर चर्चा सुरू आहे. मात्र काही प्रभागातील जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने आघाडीचा निर्णय लांबत आहे. रखडलेल्या आघाडीबाबत पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘वेगवेगळे लढल्याने भाजप, शिवसेना या जातीयवादी पक्षांना ताकद मिळते. हे टाळण्यासाठी आघाडी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. जागावाटपामध्ये काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजे, ज्या प्रभागात काँग्रेसची ताकद अधिक तेथे त्यांना जागा जास्त आणि जेथे राष्ट्रवादीची ताकद अधिक तेथे त्यांना जागा अधिक मिळाल्या पाहिजेत.’

दोन्ही पक्षांनी केलेल्या जागा वाटपाच्या चर्चेत ८० टक्के जागांचा प्रश्न सुटला आहे. उर्वरित २० टक्के जागांबाबत चर्चा सुरू आहे. शनिवारी रात्री दोन्ही पक्षांच्या कार्ड कमिटीची बैठक होणार असून यामध्ये निर्णय अपेक्षित आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीचे पोस्टमार्टेम करणार

$
0
0

अजित पवार गरजले; चुकीचे निर्णय घेतल्याची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंजूर करण्यात आलेल्या शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) आरक्षणांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केले आहे. डीपीला मान्यता देताना अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले असून, ही माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण डीपीचे पोस्टमार्टेम करणार आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश करण्यासाठी राज्य सरकारने शहराचा डीपी तसेच विकास नियंत्रण नियमावलीला (डीसी रुल्स) मान्यता दिली आहे. मात्र, मान्यता देताना अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांचे मोठे नुकसान होणार आहे. शहराचा डीपी आणि डीसी रुल्सचा सविस्तर अभ्यास राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केला आहे. आतापर्यंत त्यामध्ये घोळ असल्याचे समोर आले आहे. पा‌लिका निवडणुकीच्या मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मतदाराला मतदान करण्यापूर्वी यातील घोळ लक्षात यावेत, यासाठी त्याचे विश्लेषण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. डीसी रुल्समध्ये मोठ्या प्रमाणात एफएसआयची खैरात करण्यात आली असून, मेट्रो मार्ग तसेच बीआरटीच्या मार्गा‍च्या दोन्ही बाजूला अधिक एफएसआय देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उंच इमारती शहरातील सर्वच भागात उभ्या राहणार असून सिमेंटचे जंगल तयार होणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.
‘भाजपने डीपीला मान्यता दिल्याने पुणेकरांवर अन्याय झाला आहे. चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या डीसी रुल्समुळे सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन याबरोबर वाहतुकीची समस्या वाढणार आहे. एफएसआयमधून पालिकेला ‌मिळणाऱ्या प्रीमियमच्या उत्पन्नातील पन्नास टक्के वाटा राज्य सरकारला द्यावे असे बंधन घालण्यात आले आहे. अशाप्रकारे पालिकेच्या उत्पन्नातील हिस्सा घेणे शहरावर अन्यायकारक आहे,’ असेही पवार म्हणाले.

टिंगरेंची ‘घरवापसी’
ष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले धानोरी येथील माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी शनिवारी ‘घरवापसी’ केली. या वेळी टिंगरेसमर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. टिंगरे यांच्या घरवापसीमुळे पक्षाची ताकद वाढल्याचे शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी सांगितले. मागील निवडणुकीत टिंगरे यांना पक्षाने अन्यायकारक वागणूक दिल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. टिंगरे यांना राष्ट्रवादीतर्फे फुलेनगर, नागपूर चाळ या प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ठाकरे बंधू एकत्र यावेत’

$
0
0

पुणे ः ‘आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल,’ असा विश्वास शिवसेना नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शनिवारी व्यक्त केला. ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही सर्वांचीच इच्छा असल्याचे जोशी यांनी सांगितले.

‘युवा संसद’ या कार्यक्रमासाठी जोशी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, खासदार प्रितम मुंडे, रक्षा खडसे, आमदार भीमराव तापकीर, जाधवर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर, शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘निवडणुकांसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती असती, तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला असता यात दुमत नाही. एक ध्येयवाद असलेले दोन्ही पक्ष वेगळे झाल्यावर त्यांचे नुकसान होते. मात्र, युती तुटल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही. शिवसेना येत्या निवडणुकीत एकट्याच्या बळावर मुसंडी मारणार असून शिवसेनेचा विजय निश्चित आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. आगामी निवडणुका एकट्याने लढणार असल्याने शिवसेनेत सध्या आनंदाचे वातावरण आहे.’ महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र यावेत, ही सर्वांची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी या दोघा भावांनी आपसात चर्चा करणे करायला पाहिजे. हे दान्ही बंधू निवडणुकींसाठी एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल, असे मत जोशी यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्साही रस्त्यावर आनंदाची लाट

$
0
0

‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रमात नागरिकांची धमाल

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपळे सौदागरकरांचा रविवार (२९ जानेवारी) अगदी स्पेशल ठरला तो महाराष्ट्र टाइम्सच्या ‘हॅपी स्ट्रीट’मुळे... झुंबावर थिरकणारे पाय, तर कुठे गाण्यांवर डोलणारी तरुणाई... कुठे खेळण्यात दंग असलेली मुले... कुठे रंगरंगोटी करणारे बालक... वाहनांविना मोकळा रस्ता आणि त्यामुळे मनसोक्त फिरस्ती करणारे नागरिक... असे वातावरण पिंपळे सौदागरच्या कोकणे चौकात पाहायला मिळाले.

द टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स, व्हीजे डेव्हलपर्स, पुणे पोलिस, पुणे वाहतुक पोलिस, पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आयोजित ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रमात नागरिकांनी उत्साही रस्त्याचा अनुभव घेतला. पिंपळे सौदागर ते गोविंद गार्डन चौकापर्यंत धूम पाहायला मिळाली. पिंपळे सौदागर, नवी आणि जुनी सांगवी, वाकड, हिंजवडी, पिंपरी गाव, नाशिक फाटा, पिंपळे निलख अशा विविध भागांतून आलेल्या पिंपरी-चिंचवडकरांच्या गर्दीने हा रस्ता फुलून गेला होता.

वेगवेगळे व्यायाम प्रकार, चालणे, सायकलिंग आदींचे महत्त्व ‘हॅपी स्ट्रीट’च्या माध्यमातून नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न आहे. एकाच ठिकाण झुंबा, बॅडमिंटन, एरोबिक्स, योगसाधना, फुटबॉल, सायकलिंग, स्केटिंग या खेळांचा आनंद आबालवृद्धांनी अनुभवला. या वेळी शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली.

पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागरच्या कोकणे चौकात सकाळी ७ ते १० या वेळेत ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम झाला. गरिकांनी आपले कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्यासह एकत्र येऊन ‘हॅपी स्ट्रीट’चा मनमुराद आनंद घेतला. लहान मुलांसाठी खास टेन्टमधील फोटोशूट, पझल मेकिंग, ड्रॉइंग, बॅडमिंटन, स्केटिंग याकरिता खास सोय करण्यात आली होती. लहान मुले रस्त्यावर खडूंनी चित्र काढून कलाकारी दाखवत होती. काही डान्सग्रुपनी विविध स्टंट दाखवून उपस्थितांना खिळवून ठेवले. झुंबा या प्रकाराला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.

कोकणे चौकाचा सगळा रस्ता अगदी उत्साही दिसत होता. एकत्र येऊन सेल्फी, ग्रुफ्फी काढण्याचा मोहदेखील त्यांना आवरता आला नाही. उपस्थितांसाठी खास उभारलेल्या लाइव्ह स्टेजवर नागरिकांनी गाणी, नृत्य करण्याची संधीही नागरिकांनी सोडली नाही. गरजू वंचित मुलांकरिता जुनी पण चांगली खेळणी दान करण्याचा सामाजिक उपक्रमही घेण्यात आला. या उपक्रमाला देखील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख बाटल्या जमा

$
0
0

वृक्षवल्ली परिवाराची सिंहगडावर स्वच्छता मोहीम

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्यायामासाठी सिंहगड चढण्याबरोबरच निसर्गाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने वृक्षवल्ली परिवाराने वर्षभरापूर्वी पायवाटेवरच्या प्लास्टिकच्या बाटल्या उचलण्यास सुरुवात केली. बघता बघता मोहिमेतील कार्यकर्त्यांचे हात वाढत गेले अन् तब्बल दोन लाख पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्यांना पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात ग्रुपला यश आले आहे. उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त वृक्षवल्ली परिवाराने येत्या रविवारी प्लास्टिकमुक्त सिंहगड हे अभियान आयोजित केले आहे.

निगडी, भोसरी, पिंपरी-चिंचवड भागात राहाणाऱ्या लघु उद्योजकांचा वृक्षवल्ली हा परिवार. दर गुरुवारी, रविवारी ही मंडळी सिंहगडावर व्यायामासाठी येतात. गेल्या काही वर्षांत गडावर पायवाटेने जाणाऱ्या वाढत्या पर्यटकांमुळे पाण्याच्या बाटल्यांचा कचरा वाढायला लागला असल्याचे या ग्रुपच्या निदर्शनास आले. यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी दर गुरुवारी आणि रविवारी गड उतरताना वाटेत दिसणाऱ्या पाण्याच्या बाटल्या गोळा करण्यास सुरुवात केली. हळूहळू कामाची व्याप्ती वाढत गेली. यासाठी त्यांनी मोठ्या आकाराच्या कापडी पिशव्या शिवल्या. गडाच्या पायथ्याशी जमा झालेल्या बाटल्यांची पुनर्प्रक्रिया करण्याची जबाबदारी रुद्रा एन्व्हायर्न्मेंटल सोल्युशन इंडिया कंपनीने उचलली. विशेष म्हणजे या उपक्रमाला आता वर्ष पूर्ण झाले असून कार्यकर्त्यांनी आतापर्यंत दोन लाख बाटल्या उचलल्या आहेत.

वृक्षवल्ली परिवार गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विविध सामाजिक आणि पर्यावरण विषयक उपक्रम राबवित आहे. उत्साही आठ माणसांनी सुरू केलेल्या या मोहिमेमध्ये आता शंभरहून अधिक समविचारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. निगडी येथील सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाबरोबर घोरावडेश्वर येथे वृक्ष लागवड, तर देहू येथे वर्षभर दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. याशिवाय सिंहगडावर आम्ही आठवड्यातून दोन वेळा प्लास्टिक बाटल्या कचरा गोळा करतो, असे उपक्रमाचे समन्वयक ऋषिकेश पाटील यांनी सांगितले.

व्यायामासाठी गडावर येणारे काही हौशी लोक पाणी पिऊन झाल्यावर डोंगराच्या दिशेने बाटली भिरकावतात. या बाटल्या झुडुपांमध्ये अडकतात. आमचे कार्यकर्ते गड चढताना बाटल्या गोळा करतात. प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी दर दिवशी किमान पाचशे ते एक हजार बाटल्या जमा होतात. यासाठी आम्ही मोठ्या आकाराच्या पन्नास पिशव्या शिवल्या आहेत. आपापली कामे सांभाळून ग्रुपमधील प्रत्येक जण आठवड्यातून एक दिवस कचरा मोह‌िमेसाठी वेळ काढतो. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक बाटल्या पुनर्प्रक्रियेस पाठविल्या आहेत,’ असे पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचे काही जमेना

$
0
0

ठराविक जागांवरून दोन्ही पक्षांची चर्चा अडचणीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आघाडीचा अंतिम निर्णय रविवारी रात्री उशिरापर्यंत होऊ शकला नाही. आज, सोमवारी मुंबईत काँग्रेसच्या निवडणूक मंडळाची बैठक होणार असल्याने आघाडीची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसला अवघ्या ४६ जागा देऊ केलेल्या राष्ट्रवादीने हा आकडा ६० पर्यंत वाढवला. तर, काँग्रेसला ६७ जागांची अपेक्षा होती. तसा रितसर प्रस्तावही काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला होता. काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावावर रविवारी रात्री उशिरा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्यात चर्चा झाली. मात्र, त्यानंतरही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे, दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था कायम राहिली असून, आता अर्ज भरण्यास केवळ पाचच दिवस शिल्लक राहिले आहेत.

राज्याच्या विविध भागांतील महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता काँग्रेसच्या निरीक्षक मंडळाची महत्त्वाची बैठक सोमवारी मुंबईत होणार आहे. त्यादृष्टीने, शहरातील उमेदवारांची यादी अंतिम करणे काँग्रेसला क्रमप्राप्त आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेतल्याने आघाडी होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत. त्याबाबतची अधिकृत घोषणा कदाचित सोमवारी होण्याची शक्यता असून, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर होण्याची चिन्हे आहेत.

.............

या जागांवरून अडली चर्चा

- महापौर प्रशांत जगताप यांच्या प्रभागात राष्ट्रवादीने दोन जागांचा आग्रह धरला आहे, तर काँग्रेसला किमान एक जागा अपेक्षित
- नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रईस सुंडके यांना चारही उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्याचे आश्वासन, काँग्रेसला इथेही एक जागा हवी
- जनता वसाहत-दत्तवाडी प्रभागात शिवाजी गदादे यांना राष्ट्रवादीकडून दोन जागांचे आश्वासन, काँग्रेसला या प्रभागतही दोन जागा हव्या
- रास्ता पेठ-रविवार पेठ प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदेकर कुटुंबीयांना दोन जागांचे आश्वासन, काँग्रेस येथेही दोन जागांसाठी आग्रही
- औंध-बोपोडी प्रभागात काँग्रेसचे माजी महापौर दत्ता गायकवाड सर्व जागांसाठी आग्रही, राष्ट्रवादीला किमान दोन जागा अपेक्षित
- डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी प्रभागात विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे यांची जागा स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्यासाठी सोडण्यास काँग्रेसचा नकार
- सहकारनगर-पद्मावती प्रभागात सर्व जागांवर राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक. मात्र, काँग्रेसला माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासाठी दोन जागा हव्या
- पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी प्रभागात राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले खुल्या जागेतून लढणार. काँग्रेस विद्यमान नगरसेवक दत्ता बहिरट यांच्याकरिता त्याच जागेसाठी आग्रही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेदवारीबद्दलचा घोळ सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचा घोळ कायम असल्याने इतर पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यास जाणीवपूर्वक उशीर करण्यात येत असल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारी जाहीर करताना, पक्षाला खिंडार पडू नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. शिवसेना, भाजप हे पक्ष गणेश जयंतीचा मुहूर्त साधून पहिली यादी जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडी करण्याबाबत घोळ सुरूच आहे. आघाडी झाली तर दोन्ही पक्षांच्या मिळून १६२ उमेदवारांना संधी मिळणार नाही. यातील चांगले उमेदवार शिवसेना, मनसेमध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेना-मनसेमध्ये युती होणार का, अशी चर्चा रंगल्याने या दोन्ही पक्षांकडून दोन दिवस यादी रखडवून ठेवण्यात येईल.

भाजपकडून पहिली यादी जाहीर झाली, तरी वादग्रस्त जागांबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात येईल. आघाडीनंतर ज्या ठिकाणची राजकीय गणिते बदलणार आहेत, अशा ठिकाणी भाजप अचानक आपले उमेदवार बदलू शकतो. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तिकीट नक्की कोणाला मिळणार हे गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी उमेदवार यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र त्यांच्यातील आघाडीचा निर्णय रविवारी रात्रीपर्यंत झालेला नव्हता. त्यामुळे सोमवारी आघाडीचा निर्णय झाला की उमेदवारी जाहीर करण्यात येईल.

तीन फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्या दिवशी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना बी-फॉर्म जमा करायचे आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून लवकरात लवकर उमेदवारी यादी जाहीर होईल, अशी अपेक्षा इच्छुकांना आहे. ज्या उमेदवारांची उमेदवारी नक्की समजली जाते, त्यांनी प्रचार सुरू केला आहे; मात्र बहुतांश प्रभागांमध्ये महिला उमेदवारांची उमेदवारी निश्चित करण्यात न आल्याने घोळ कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या प्रचारात मराठी अभिनेतेही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे उमेदवारांची यादीची प्रतीक्षा असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात नियोजन बैठका सुरू आहेत. निवडणुकीचे अर्ज भरून झाल्यानंतर प्रचाराला रंगत येण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या माध्यमातून काही मराठी अभिनेत्यांच्या प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंसह अन्य स्टार प्रचारकांच्या तारखांचे नियोजनही सुरू आहे.

पक्षातर्फे निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो, रॅली, कोपरा सभा, मोठ्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. चित्रपट सेनेच्या माध्यमातून सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकारही प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. याचबरोबर राज यांच्या पत्नी शर्मिला, पुत्र अमित व पक्षाचे अन्य स्टार प्रचारकही पुण्यात प्रचारासाठी येणार असल्याचे समजते.

रविवारी पक्षातर्फे कार्यकर्त्यांंना उमेदवारी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर शहर कार्यालयात अन्य विषयांबाबतही बैठका घेण्यात आल्या. पक्षातर्फे विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. पक्षाच्या संपर्क यंत्रणेचाही आढावा घेण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराला अर्ज भरण्याविषयीच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

पक्षाची उमेदवार यादी अजूनही जाहीर झालेली नाही. त्यामुळे पक्षातर्फे प्रत्येक प्रभागातून इच्छुक असलेले उमेदवार एकत्र फिरत प्रचार करत आहेत. घरोघरी जाऊन पक्षाच्या नगरसेवकांनी आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती व अहवाल पोहोचविण्यात येत आहे. अर्ज भरून झाल्यानंतर सर्व उमेदवारांमध्ये समन्वय राहावा, यासाठी प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी निश्चित केला जाणार आहे. पक्ष कार्यालयातर्फे या प्रतिनिधीशी संपर्कात राहून प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे.

आयाराम, गयारामांवर लक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणखी काही नगरसेवक पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत आहेत. काहींची सेनेत घरवापसी होण्याची चर्चा असून, काही भाजप तर काही ‘राष्ट्रवादी’च्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर तिकीट वाटपानंतर अन्य पक्षातील छोटे मोठे मासेही मनसेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

भोसरीमधील प्रभाग क्रमांक ८ ची लढत चुरशीची

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भाजप-शिवसेनेची युती होणार नाही, हे जाहीर झाल्यावर सर्वच पक्ष ३२ प्रभाग लढविण्यासाठी तयार झाले आहेत; परंतु भोसरीमधील प्रभाग क्रमांक ८ ची लढत आजी-माजी तीन आमदारांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

भाजपकडून दोन-तीन जण या एकाच प्रभागासाठी आपला दावा सांगत आहेत, तर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे सारंग कामतेकर यांना पाठबळ आहे. दुसरीकडे भोसरीचे अपक्ष व भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी तुषार सहाणे यांना रिंगणात उतरवले आहे. आमदार लांडगे यांनी विधानसभेला प्रस्थापितांना धक्का दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या रिंगणात आपला उमेदवार पुढे करून आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे भोसरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी त्यांचा मुलगा विक्रांत लांडे याला याच प्रभागातून निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.

कोणत्याही पक्षाची उमेदवार यादी अद्याप जाहीर झालेली नाही. शिवसेना, काँग्रेस आणि अन्य पक्षांनी अद्याप येथून आपला उमेदवार कोण हे निश्चित केलेले नाही. उमेदवार कोण यापेक्षा आजी-माजी आमदारांनी हा प्रभाग प्रतिष्ठेचा केला आहे. अन्य पक्ष आपापले उमेदवार रिंगणात आणतील. मात्र, तीन नेत्यांच्या पुढे त्यांचा कितपत प्रभाव राहील हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

शिवसेना-भाजपचा काडीमोड झाल्याचा फायदा आम्हालाच होणार असे सर्वच पक्ष सांगत आहेत. भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे; परंतु एका प्रभागातील एका जागेसाठी तीन बडे नेते प्रतिष्ठा पणाला लावत असतील, तर येथील रणधुमाळी लक्षणीय म्हणावी लागेल. घराणेशाही हा मुद्दा भाजपने या ठिकाणी प्रचारात समोर आणला आहे.

दरम्यान, दोन वॉर्ड एकत्र झाल्याने येथील पूर्वीच्या नगरसेविका अन्य प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. लांडे यांना गावठाणातून जास्त ताकद मिळेत, तुम्ही तिकडून का निवडणूक लढवत नाही, असा सवाल अन्य नेते विचारत आहेत. लांडे यांच्याकडे राष्ट्रवादीची पूर्ण धूरा सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते शहराबरोबर या प्रभागात किती लक्ष देतात हा मुद्दा उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काही जणांना शस्त्रे जमा करावी लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यात नऊ हजार ४०० जणांकडे शस्त्र परवाने असून, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. निवडणुकीत शस्त्रांचा गैरवापर होऊ नये, यासाठी कोणाकडील शस्त्रे जमा करावीत, याचा निर्णय घेण्यासाठी ३१ जानेवारीला जिल्हा प्रशासनाची बैठक होणार असल्याने राजकीय मंडळींमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

आर्थिक उलाढाल करणारे, जीवाला धोका असणारे किंवा एखाद्यावर हल्ला झाला असल्यास संबंधित व्यक्तींना शस्त्र परवाना देण्यात येतो. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे नऊ हजार ४०० जणांना परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी संरक्षणाच्या दृष्टीने आणि आर्थिक उलाढाल होणाऱ्या ठिकाणी शस्त्रे अत्यावश्यक असल्यास त्या ठिकाणी शस्त्रे बाळगण्यास परवानगी दिली जाणार आहे. वैयक्तिक परवाने घेतलेल्यांना शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. त्यापैकी कोणाची शस्त्रे जमा करून घ्यायची, बाबतचा निर्णय घेण्यासाठी ३१ जानेवारीला होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निवडणुकीच्या काळात संबंधित शस्त्रांचा गैरवापर होऊ शकतो, ही बाब विचारात घेऊन शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. परवानाधारकांना शस्त्र जवळ बाळगायचे असल्यास युनिक आयडेंटिटी नंबर (यूआयडी) घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये शिबिरे भरविण्यात आली होती. मात्र, तरीही ‘यूआयडी’ नंबर न घेतलेल्यांची शस्त्रे ताब्यात घेतली जाणार आहेत. त्यांची अद्ययावत माहिती घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील कारभाऱ्यांमुळे शहराच्या विकासाला खीळ

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांचा आराेप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेतील कारभारी शहराचा विकास करण्यात सपशेल अपयशी ठरले असून, त्यांच्यामुळेच शहराच्या विकासाला खीळ बसली असल्याचा आरोप पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी केला.

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा अकार्यक्षम आणि नियोजनशून्य कारभार जनतेसमोर आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘निष्क्रियतेची दहा वर्षे’ या प्रदर्शनाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

‘कॉमन मॅन’च्या हस्ते काळी फीत कापून प्रदर्शनाचे निषेधात्मक उद्घाटन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक अशोक येनपुरे, दिलीप काळोखे, धनंजय जाधव, मंजूश्री खर्डेकर, शाम सातपुते, सुहास कुलकर्णी, प्रकाश मंत्री, संदीप खर्डेकर या वेळी उपस्थित होते.

‘केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेसची एकहाती सत्ता होती; पण शहरातील विकासाचा कोणताही मोठा प्रकल्प मार्गी लागला नाही. याउलट भाजपने गेल्या दोन वर्षांत मेट्रो, स्मार्ट सिटी, पुणे विकास आराखडा, रिंग रोड, पीएमआरडीएची स्थापना, मुळा-मुठा शुद्धीकरण आदी प्रकल्पांना चालना दिली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर भाजपच्या पाठीशी राहतील,’ असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.

निष्क्रियतेची दहा वर्षे हे प्रदर्शन पुढील काळात शहराच्या विविध भागांत आयोजित केले जाणार असून, पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे शहराच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष शहराच्या विविध भागांतील नागरिकांपर्यंत नेण्यात येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. येत्या मंगळवारपर्यंत (३१ जानेवारी) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८७व्या वर्षीही समाजकारणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्या‌र्थीदशेत स्वातंत्र्य संग्रामात... वयाच्या २१ व्या वर्षी महापालिका निवडणुकीच्या रणांगणात... गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आटा‌पिटा... पेन्शनर्सचा महागाई भत्ता असो की पोलिसांची फुल पॅन्ट... समाजवादी चवळवळींमध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीसाठी अग्रेसर असणारे मधुकर निरफराके खऱ्या अर्थाने सर्वांचे लाडके ‘अण्णा’ आहेत. वयाच्या ८७ व्या वर्षीही निरफराके अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या माध्यमातून समाजकारणात झटत आहेत.

पुणे महापालिकेच्या १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत निरफराके यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शिवाजी रोडमुळे शुक्रवार पेठेचे दोन भाग झाले. एका भागातून राम तेलंग, तर दुसऱ्या भागातून मधुकर पोतनीस निवडून आले. निरफराके आपल्या १० ते १५ सहकाऱ्यांच्या मदतीने दोघांच्या प्रचारात पूर्ण जोमाने उतरले होते, तेव्हा ते २१ वर्षांचे होते. याच दरम्यान ते राष्ट्र सेवा दलात सक्रीय झाले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, दिवंगत अभिनेते निळू फुले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, दादा बोरकर, शिवाजीराव खैरे, डॉ. राम ताकवले असे ५० हून अधिक सहकारी निरफराके यांना राष्ट्र सेवा दलात मिळाले.

महाराष्ट्रात ६० चे दशक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होते. राज्यात १९५७ साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. या चळवळीत निरफराके सक्रीय होते. त्यात त्यांना तीन वेळा अटक झाली, तर जवळपास ३२ दिवस त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यांचे एसएससीपर्यंत शिक्षण झाले होते आणि त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारलेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना १९६२ साली मिळाली. नागरी संघटनेने महापालिका निवडणुका लढवायचा निर्णय घेतला आणि त्यात निरफराके यांना शुक्रवार पेठेतून पॅनेलमधून लढण्याची संधी देण्यात आली.

गुरुवर्य जगताप, शिवाजी मुंगळे, सदाशिव भोंडे आणि निरफराके असे चौघांचे पॅनेल होते, तर काँग्रेसकडून या प्रभागातून नामदेवराव मते, शिवाजीराव ढेरे, बाळासाहेब मोरे आणि चंद्रकांत मोरे अशी बडी मंडळी होती. या निवडणुकीत निरफराके अवघ्या आठ मतांनी पराभूत झाले. काँग्रेसच्या दिग्गजांसमोर त्यांचा पराभव झाला; परंतु हा पराभव त्यांना यशाकडे घेऊन गेला. नागरी संघटनेने त्यांना शिक्षण मंडळावर काम करण्याची संधी दिली. शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी करण्यासाठी निरफराके यांनी प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणून १२० शिक्षकांची भरती करण्यात आली. शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात ते सक्रीय झाले. त्यानंतर १९६८ साली महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये त्यांची केशवराव पवारांच्या विरोधात लढत झाली. या निवडणुकीत ते पराभूत झाले. या निवडणुकीत मतदानात मयत व्यक्तींच्या नावावर मतदान झाल्याचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला आणि हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या निर्णयामुळे पवार यांचे पद रद्द झाले आणि निरफराके यांना नगरसेवक म्हणून पालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यापुढील १९७४ च्या निवडणुकीत त्यांनी डॉ. य. ग. शिंदे यांचा पराभव केला.

निरफराके यांनी आपल्या वाॅर्डातील कचरा पेट्यांना नावे दिली होती. अत्यंत स्वच्छ वाॅर्ड असा त्यांचा नावलौकीक होता. नागरिकांकडून त्यांना सहकार्य मिळत होते. ही वार्ता दिवंगत शंतनुराव किर्लोस्कर यांना स​मजली होती. त्यांनी त्या वेळचे महापालिका आयुक्त गुप्ते आणि विभागीय आयुक्त मोहिले यांच्या उपस्थितीत अचानक या वाॅर्डाची पाहणी केली. निरफराके यांना शोधून त्यांचे कौतुक करण्यात आले. किर्लोस्करांच्या सूचनेनुसार निरफराके यांनी वाॅर्डातील नागरिकांना पोस्ट खात्यामार्फत चालवत असलेल्या बचत योजनेची माहिती दिली. त्याचा नागरिकांना पुढे चांगला फायदा झाला.

भाई वैद्य राज्यात गृहराज्यमंत्री असताना त्यांच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांपैकी निरफराके एक होते. पोलिसांना फूल पॅन्टचा निर्णय असो की पेन्शनर्सला महाभाई भत्ता, हे दोन्ही निर्णय पुण्याने दिले. घोरपडे उद्यानात दिवे लावून रात्रभर ते विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करण्यात आले. या उद्यानात अभ्यास केलेले विद्यार्थी पुढे, खासदार, आयपीएस झाले.

.................

खडकीच्या आलेगावकर विद्यालयात मी ३२ वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली. एका शिक्षकाला राजकारणात पडता येते आणि निवडणूक लढवता येते, हा पायंडा माझ्यापासून पडला. मी अध्यापक सभेच्या माध्यमातून समाजकारण सुरू ठेवले आहे. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवण्यासाठी आम्ही सुरू ठेवलेल्या लढ्याला अल्पसे यश आले आहे. राज्यात ‘आरटीई’चा निर्णय घेण्यात आला. महापालिका शाळांमध्ये लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेणे बंधनकारक केले पाहिजे. अलाहाबाद कोर्टाच्या या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी.
- मधुकर निरफराके, ज्येष्ठ समाजवादी नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला बुडविणार

$
0
0

ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळाव्यात निर्धार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिवसेनेचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला. आज भाजप शिवसेनेला बुडविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्व शक्ती एकवटून भाजपलाच बुडवू,’ असा निर्धार र‌विवारी शिवसै‌निकांनी केला. शिवसेनाच आधार देईल हे सर्वसामान्यांना माहिती आहे. त्यामुळे विश्‍वासघात करून भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिवसेनेचे उपनेते व माजी कृ‌षिमंत्री शशिकांत सुतार यांनी या वेळी केला.

शहर शिवसेनेच्या वतीने कृष्णसुंदर गार्डन येथे ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक नंदू घाटे, शहरप्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार महादेव बाबर, तानाजी काथवडे, रमेश बोडके, राजाभाऊ रायकर, जगन्नाथ परदेशी, रामभाऊ पारीख यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता मिळविण्याचा आणि भाजपला धडा शिकविण्याचा एल्गार या मेळाव्यात करण्यात आला.

‘शिवसेना इतिहास निर्माण करते, इतिहासावर जगत नाही. आम्हा ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये आजही हत्तीचे बळ आहे. तरुणाईबरोबर ज्येष्ठ शिवसैनिकांची ताकद एकवटल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर विजय मिळवून, नवा इतिहास निर्माण करेल,’ असा आशावाद सुतार यांनी व्यक्त केला. शिवसेनेचा जन्म निवडणुकीसाठी नाही; तर अन्याय, अत्याचार, जुलूम जबरदस्तीविरुद्ध लढण्यासाठी झालेला आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी शिवसैनिकांनी पेटून उठले पाहिजे, असेही सुतार यांनी सांगितले.

‘शिवसेनेच्या जिवावर भाजपने राजकारण केले. आज तेच भाषणात मोठमोठ्याने ओरडून शिवसेनेला पाणी पाजण्याची भाषा करतात. भाजप म्हणजे भाजका, जळका पक्ष आहे,’ अशी टीका परदेशी यांनी केली. या वेळी नंदू घाटे, रमेश बोडके, निर्मला केंढे यांनीही मनोगते व्यक्त केली. गुलटेकडी भागातील संतोष घोलप, रेश्‍मा घोलप, नितीन उबाळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

.............

चौकट

शिवसेनेची ताकद अफाट‌ : निम्हण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ‘निखाऱ्यावरून चालण्याची तयारी ठेवा’ असा आदेश दिला आहे. शिवसैनिकांनीही त्याची तयारी दर्शवित युती तुटल्याचा आनंदोत्सव साजरा केला. तरुण शिवसैनिकांना ज्येष्ठ आणि अनुभवी शिवसैनिकांची ताकद मिळण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. शिवसेनेची ही ताकद अफाट आहे. या ताकदीच्या बळावर शिवसेना महापालिकेच्या सर्व १६२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी या वेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कसबा पेठेत ‘कलगीतुरा’

$
0
0

उमेदवारीवरून भाजपमध्ये जोरदार युद्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परंपरागत मतदारांच्या बळावर कसबा पेठेत नेहमीच सर्वाधिक नगरसेवकांची संख्या गाठणाऱ्या भारतीय जनता पक्षात आगामी निवडणुकीतील उमेदवारीवरून जोरदार युद्ध रंगले आहे. भाजपच्या तिकीट वाटपात विद्यमानांना डावलण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली असून, कसब्यातील काही प्रभागात पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याची धक्कादायक बाबही स्पष्ट झाली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने मध्य भागांतील पेठांचा समावेश होतो. या मतदारसंघातून पालकमंत्री गिरीश बापट सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत, तर महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत कसब्यातून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले आहेत. केंद्रात आणि राज्यातील सत्तेमुळे यंदा पालिका निवडणुकीसाठी कसब्यातही उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा असून, एकेका प्रभागात सर्वच इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये कसब्यातील काही उमेदवारांची नावे अंतिम झाल्याचे सांगितले जात असून, त्यातून काही विद्यमान नगरसेवकांच्या नावावर फुली मारण्यात आल्याचे समजते. हा धक्का अनेक विद्यमानांना सहन झाला नसून, त्यांनी पक्षाविरोधात आतापासूनच दंड थोपटण्याची तयारी केली आहे.

शहराच्या मध्यवस्तीतील एक-दोन प्रभागांमध्ये तर उमेदवारीवरून जोरदार खडाजंगी सुरू आहे. या भागांत काही विद्यमान नगरसेवकांमध्ये बदल होण्याची दाट चिन्हे आहेत. त्यामुळे आपले तिकीट बसवण्यासाठी संबंधितांनी आत्तापासूनच फिल्डिंग लावली आहे, तर काहींच्या आग्रहाखातर विशिष्ट उमेदवारांना पसंती दिली जाण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका पक्षाला बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका प्रभागात सक्षम उमेदवार नसल्याने इतर पक्षांमधून काहींना आयात करण्यात आले; पण त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचे सांगितले जात आहे. २०१२ च्या निवडणुकीत कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सहा प्रभागांतील १२ नगरसेवकांपैकी ७ नगरसेवक भाजपचे होते. त्यामुळे स्थानिक प्रभाग समितीही पूर्ण पाच वर्ष भाजपच्या ताब्यात राहिली होती. यंदाही या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांतून १२ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. त्यातून भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा केली जात असली, तरी उमेदवारीवरूनच सुरू असलेल्या ‘तू-तू-मैं-मैं’मुळे पक्षाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘या’ बाबतीत पुणे निरुत्साही

$
0
0

शिधापत्रिकेला आधार जोडण्यात विभागात पुणे जिल्हा मागे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडण्यात पुणे जिल्हा निरुत्साही असून, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ७९.२० टक्के नागरिकांनी आधार क्रमांक जोडणी करून घेतली आहे. शहरात हे प्रमाण अत्यल्प असून, केवळ ७३.८२ टक्के नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. पुणे जिल्ह्यापेक्षा सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनी आधार क्रमांक ‌जोडण्यात आघाडी घेतली आहे.

शिधापत्रिकेवर नाव असणाऱ्या प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक घेण्यात येत आहे. आधार क्रमांक नसल्यास संबंधितांच्या नावाचे धान्य किंवा केरोसीन देण्यात येत नाही. अनुदानित धान्य व केरोसीनचा पुरवठा योग्य व्यक्तीलाच करण्यासाठी हा ‌निर्णय घेण्यात आला आहे. एकापेक्षा अधिक शिधापत्रिकांवर नाव असल्यास त्यांचे नाव एका शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडण्याची मोहीम राबवण्यात आली; मात्र पुणे विभागातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी निरुत्साह दाखवला असल्याचे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये दोन लाख ४४ हजार ३३ ‘अंत्योदय’ आणि २८ लाख १५ हजार ५९६ ‘प्राधान्यक्रम’ असे ३० लाख ५९ हजार ६२९ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी २४ लाख २३ हजार २४१ म्हणजे ७९.२० टक्के नागरिकांनी आधार क्रमांक जोडणी करून घेतली आहे.

पुणे शहरात ही जोडणी करून घेण्याचे प्रमाण जिल्ह्यापेक्षा कमी आहे. शहरात ‘अंत्योदय’चे ६७ हजार ७१६ व ‘प्राधान्यक्रम असलेले’ २१ लाख २८ हजार १८१ असे २१ लाख ९५ हजार ८९७ लाभार्थी आहेत. त्यापैकी अवघ्या १६ लाख २१ हजार ७९ म्हणजे ७३.८२ टक्के नागरिकांच्या आधार क्रमांकांच्या जोडणीचे काम पूर्ण झाले असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

पुणे विभागामध्ये आधार क्रमांक जोडणीचे सर्वांत जास्त काम सोलापूर शहरामध्ये (९२.१३ टक्के) झाले आहे; मात्र सोलापूर जिल्ह्यातील प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ९०.१८ टक्के नागरिकांची जोडणी पूर्ण होऊ शकली आहे. त्याखालोखाल सातारा जिल्ह्यात ८९.२० टक्के आणि सांगलीत ८४ टक्के जोडणीचे काम झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २४ लाख ४४ हजार २२९पैकी १९ लाख ४१ हजार १५६ म्हणजे ७९ टक्के आणि सोलापूर शहरात चार लाख ५७ हजार ८२७पैकी चार लाख २१ हजार ८१६ म्हणजे ९२.१३ टक्के नागरिकांच्या आधार क्रमांकांची नोंदणी झाली आहे. कोल्हापूरमध्ये २६ लाख २६ हजार ६५३पैकी २३ लाख ६८ हजार ६७२ म्हणजे ९०.१८ टक्के जणांच्या क्रमांकाची नोंदणी झाली आहे.

सातारा जिल्ह्यात १९ लाख ४६ हजार ४०४ लाभार्थी असून, १७ लाख ३६ हजार १७१ म्हणजे ८९.२० टक्के लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंदणी झाली आहे. सांगलीतील १८ लाख ६७ हजार २९२ पैकी १५ लाख ८० हजार ५९८ म्हणजे सुमारे ८४ टक्के नोंदणी झाली असल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

.............

पुणे विभागात ८२.८४ टक्के जोडणी

पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागामध्ये अंत्योदय शिधापत्रिका असलेले १२ लाख ५९ हजार २०८, तर प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारक एक कोटी ३३ लाख ३८ हजार ७२३ असे एकूण एक कोटी ४५ लाख ९७ हजार ९३१ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी एक कोटी २० लाख ९२ हजार ७३३ सदस्यांचे म्हणजे ८२.८४ टक्के आधार क्रमांकांच्या जोडणीचे काम झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठार्फे वर्धापनदिनानिमित्ताने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. ‘बीएमसीसी’चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांना उत्कृष्ट प्राचार्य हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट विद्यापीठ विभागासाठी स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज आणि विधी विभागाची निवड झाली. उत्कृष्ट कॉलेजचा पुरस्कार शहरी भागासाठी दिघीच्या ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ला, तसेच पंचवटीच्या ‘व्यंकटराव हिरे कॉलेज’ला आणि पिंपरीच्या ‘डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज’ला मिळाला. ग्रामीण विभागातून नगरच्या विखे पाटील फाउंडेशनचे ‘इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट’ आणि बारामतीचे ‘तुळजाराम चतुरचंद कॉलेज’ला उत्कृष्ट ठरले आहे.

उत्कृष्ट प्राचार्य म्हणून शहरी भागातून सिंहगड संस्थेच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय सावंत, ‘बीएमसीसी’चे प्राचार्य डॉ. रावळ यांची निवड झाली. ग्रामीण भागातून नाशिकमधील ‘मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’चे प्राचार्य डॉ. गजानन खराटे, बारामतीच्या ‘तुळजाराम चतुरचंद कॉलेज’चे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाला.

उत्कृष्ट शिक्षक म्हणून शहरी विभागातून ‘सीओईपी’चे डॉ. मोहन खोंड, नाशिकच्या व्यंकटराव हिरे कॉलेजचे डॉ. रेशम भल्ला यांची निवड झाली. ग्रामीण भागातून नाशिकच्या ‘मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’च्या डॉ. वर्षा पाटील आणि वाघोलीच्या भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य कॉलेजचे डॉ. ज्योतिराम मोरे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.

नावीन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. दीपाली मालखेडे, विधी विभागाचे डॉ. तम्मा शास्त्री यांना जाहीर झाले. शहरी भागातून ‘एमआयटी कॉलेज ऑफ फार्मसी’च्या डॉ. अल्पना कुलकर्णी, गणेशखिंडच्या मॉडर्न कॉलेजचे डॉ. रवींद्र क्षीरसागर यांना, तर ग्रामीण भागातून अवसरीच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे डॉ. दिलीप पानगव्हाणे आणि वाघोलीच्या जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य कॉलेजचे डॉ. संजय गायकवाड यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘फेलिसिटेशन ऑफ टीचर’ म्हणून वनस्पतिशास्त्र विभागाचे डॉ. दिगंबर मोकाट आणि गणेशखिंडच्या मॉडर्न कॉलेजला पुरस्कार दिला जाणार आहे. सर्व पुरस्कार विद्यापीठाच्या फेब्रुवारी महिन्यातील वर्धापनदिनी प्रदान केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिटिशकालीन पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कराड आणि साताऱ्याजवळील तारगाव या ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. पावसाळ्यापूर्वी हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या दोन पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

‘पुणे विभागात ब्रिटिशकालीन ३९ मोठे पूल आणि १३८ लहान पूल आहेत. हे पूल सुमारे शंभर ते दीडशे वर्षे जुने असून, ते धोकादायक झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. कराड आणि साताऱ्याजवळील तारगाव येथील पुलांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने हे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे,’ असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, सांगलीत टँकरने पाणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात यंदा मान्सून चांगला झाला असला, तरी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच साताऱ्यातील माण आणि सांगलीतील खानापूर या भागांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या भागातील चार गावे आणि आठ वाड्यांतील सुमारे सहा हजार २०२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणे भरली आहेत; मात्र सातारा आणि सांगलीतील काही गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

या पाचही जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगला पडल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता; मात्र नोव्हेंबर महिन्यापासूनच साताऱ्यातील माण आणि सांगलीतील खानापूर परिसरात पाणीटंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चार टँकरद्वारे या भागातील काही गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पाणीटंचाई निर्माण झालेल्यांमध्ये चार गावे आणि आठ वाड्या आहेत. त्या ठिकाणी सुमारे सहा हजार २०२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images