Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रतापराव गोडसे यांचे निधन

0
0
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव बाबूराव गोडसे यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज, बुधवारी सकाळी ९ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

२४ x ७ पाणी? वाट बघा!

0
0
महापालिका निवडणुकीच्या रिंगणातील साठ टक्के उमेदवारांनी वॉर्डाला २४ तास पाणीपुरवठा देणार असल्याचे वचन पुणेकरांना दिले. पण पाणी वाटपाची सक्षम यंत्रणा तर दूरच, अपु-या साठ्यामुळे वर्षभर एक वेळ पाणी देतानाच महापालिकेच्या तोंडचे पाणी पळते आहे.

पाणी टंचाई पाठोपाठ आता विजेचा लपंडाव

0
0
गेल्या काही दिवसांत शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या काळातच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत

फॉर्म, हॉल तिकीट, रिझल्ट... सबकुछ ऑनलाइन!

0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पारदर्शी कारभाराचे धडे गिरविण्यास सुरूवात केली असून, विद्यार्थ्यांचे सविस्तर निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तोतया विद्यार्थ्यांना परीक्षा केंदाबाहेरच रोखण्यासाठी स्कॅन फोटो असलेले ऑनलाइन हॉल तिकीट देण्यासही सुरूवात करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या गटनेतेपदी बारणे

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक श्रीरंग बारणे यांची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

संगीतकार उलगडणार कोषातून

0
0
चित्रपट संगीताचे अभ्यासक मधू पोतदार यांनी १९३२ पासूनच्या सुमारे ४५५ मराठी चित्रपट संगीतकारांची माहिती असलेला मराठी चित्रपट संगीतकार कोष तयार केला असून शनिवारी (दि. ३ मार्च) त्याचे प्रकाशन होणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा पोतदार करतात

ग्राहक नाकारण्याचा सेक्स वर्करला अधिकार

0
0
सेक्स वर्कर महिलेस व्यक्तिगत इच्छा आणि वैयक्तिक स्वतंत्र अधिकार असून तिला ग्राहक नाकारण्याचा अधिकार आहे, असे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी निकालात म्हटले आहे. कोणताही ग्राहक तिच्यावर जबरदस्ती करू शकत नाही, असेही म्हटले आहे.

आता येणार पर्सनल जिनोम कार्ड!

0
0
मानवी जनुकाचा आराखडा (ह्यूमन जिनोम सिक्वेन्स) देशात यशस्वीपणे तयार केल्यानंतर या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होऊ शकेल, असे वैयक्तिक जैविक माहितीचे कार्ड (पर्सनल जिनोम इन्फॉर्मेशन कार्ड) भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. कॅन्सर, मधुमेह, क्षयरोग आदी व्याधींच्या पेशंटवर या कार्डवरील माहितीच्या आधारे डॉक्टरांना नेमके उपचार करता येणे शक्य होणार आहे.

'टीन एजर्स'ना विळखा हुक्कापार्टीचा

0
0
तंबाखू-सिगारेटपेक्षाही घातक असतानाही ऐश करण्याची तल्लफ शमविण्यासाठी 'टीन एजर्स'वर हुक्का पार्ट्यांचा विळखा पडत आहे. शहर व परिसरातील हुक्का पार्लर्समध्ये जाणाऱ्यांमध्ये १७ ते २२ या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय बनली आहे.

रेन वॉटर हावेर्स्टिंग प्रकल्प पाण्यात

0
0
ऐन उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा जाणवला, की पाणी बचतीचे आवाहन करणाऱ्या महापालिकेने 'रेन वॉटर हावेर्स्टिंग'बाबत मौन बाळगले आहे. कायद्यानुसार आता प्रत्येक सोसायटीत रेन वॉटर हावेर्स्टिंग प्रकल्प बंधनकारक असताना, महापालिका याकडे दुर्लक्ष करीत बांधकाम व्यावसायिकांना ना हरकत प्रमाणपत्र वाटत आहे.

पंधरा दिवसांत 'प्रीपेड रिक्षा बूथ'

0
0
गेल्या सहा वर्षांपासून चर्चेत असलेला 'प्रीपेड रिक्षा बूथ'चा प्रश्न आता मागीर् लागला आहे. पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट बस स्टँड आणि लोहगाव विमानतळ परिसरात हे बूथ सुरू करण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मीटरपाठोपाठ आता पुण्यात प्रीपेड बूथ सुरू होणार असल्याने रिक्षा प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कराराच्या वादात पुणेकर तहानलेले

0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पावणेबारा टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असला, तरी यापैकी चारच टीएमसी पाणी पुण्याला देता येईल, असा पवित्रा जलसंपदा खात्याने घेतला आहे.

पुण्याच्या दुप्पट पाणी शेतीला

0
0
कायद्याने पिण्याच्या पाण्याला दिलेला प्राधान्यक्रम बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखालील जलसंपदा खात्याने पिण्यापेक्षा शेतीला जास्त पाणी सोडल्याचे आढळून आले आहे.

कसं करायचं सांगा पाण्याचं?

0
0
'आता निवडणुका झाल्यानंतर काय परिस्थिती आहे, हे बघायलाही कोणी फिरकत नाही. आपल्या भागातले प्रॉब्लेम्सही लक्षात येत नाहीत त्यांच्या. पूर्वी फ्री टँकर तरी पुरवायचे. आता तर तेवढंही नाही. कसं करायचं सांगा पाण्याचं?' स्पायसर रोडवर राहणाऱ्या शारदा बेळगावकर यांचा हा संतप्त सवाल. पाणीकपातील सुरुवात झाल्यावर पुणेकरांची प्रातिनिधिक भावना व्यक्त करणारी ही प्रतिक्रिया आहे.

सातारा नव्हे, असुरक्षित रोड

0
0
वाजत गाजत सुरू करण्यात आलेल्या 'बीआरटी'वर करोडो रुपयांचा खर्च झाला असला तरी वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता पूर्णपणे सुरक्षित नाही. कमी उंचीचे डिव्हायडर, बालाजीनगर चौकातील वाहतुकीचा प्रश्न, पादचाऱ्यांसाठी 'रेज्ड पेडेस्ट्रियन'ची गरज, कात्रज चौकातील सुधारणा असे प्रश्न अजूनही सतावत आहेत

उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स मिळणार?

0
0
दहावी-बारावीच्या यंदाच्या निकालानंतर मार्कलिस्टबरोबर उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्सही मिळण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. माहितीच्या अधिकारात मागणी केल्यास विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव बोर्डाकडून शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

बालगंधर्व रंगमंदिराची पुन्हा डागडुजी

0
0
शहराचे प्रमुख सांस्कृतिक केंद अशी ओळख असणारे बालगंधर्व रंगमंदिर दुरुस्तीच्या कामासाठी येत्या १० मार्चपासून बंद राहणार आहे. रंगमंदिराच्या दुरुस्तीचे काम २० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पुन्हा खुले करण्यात येणार असल्याचे रंगमंदिराचे व्यवस्थापक अमर परदेशी यांनी सांगितले.

... पिंपरीत मात्र पाणीकपात नाही!

0
0
पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये तूर्तास पाणीकपातीचा विचार नाही. मात्र, काटकसरीने पाणी वापरण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी गुरुवारी सांगितले.

पहिल्याच पेपरला कॉपीचे १६८ प्रकार

0
0
राज्यातील १७ लाख ११ हजार विद्यार्थ्यांनी मराठीच्या पेपरसह दहावीच्या परीक्षेचा श्रीगणेशा केला. पहिल्याच पेपरला राज्यात कॉपी-गैरप्रकाराच्या १६८ घटना पकडण्यात आल्या.

पुणेकरांनी विचारला पाण्याचा हिशेब

0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये ऑक्टोबरअखेरपर्यंत २६.८८ टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतरच्या पुढच्या चार महिन्यांमध्ये शहराने सुमारे साडेपाच टीएमसी पाणी वापरले असल्याने उर्वरित पाणीसाठ्याचा हिशेब जलसंपदा विभाग देणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images