Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुरंदरमध्ये रस्त्यांसाठी विक्रमी निधी

$
0
0

जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांची माहिती
म. टा. वृत्तसेवा, सासवड
‘पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामांसाठी मी विक्रमी निधी आणला आहे. पहिल्या अर्थसंकल्पीय वर्षात १८ कोटींची कामे पुरंदर तालुक्यात पूर्ण झाली आहेत,’ अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे.
कोडीत फाटा ते सासवड या दीड कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सासवड येथे शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कोडीत फाट्यापासून डीवायएसपी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यापुढे हा रस्ता मोहिनी हॉटेलमार्गे जयप्रकाश चौकातून पुणे रस्त्याला मिळेल. संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या वेळी पंचायत समिती सदस्य दिलीप यादव, माजी नगराध्यक्ष प्रमोद जगताप, मोहन वांढेकर, प्रदीप लांडगे, वामन जगताप, नगरसेवक दिपक टकले, सचिन भोंगळे आदी उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, ‘सरकारकडून मिळवलेल्या निधीतून सासवड-कोंढवा, सासवड-कापूरहोळ, सासवड-शिंदवणे, जेजुरी-भोरवाडी-कोळविहिरे असे अनेक रस्ते मार्गी लागले. चालू वर्षांत १९ कोटींची कामे सुरू आहेत. हडपसर-सासवड रस्त्यासाठी ४५ कोटी रुपये निधी मंजूर करून हे कामही पूर्ण करण्यात आलेले आहे. १६३ कोटींचा निधी मंजूर करून चार रस्त्यांची कामे नुकतीच हाती घेतली आहेत. हे चारही रस्ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत चकाचक केले जातील.’
‘ग्रामीण मार्ग हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अखत्यारित असतात. तालुक्यातील ग्रामीण मार्ग सुधारण्यात येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती अपयशी ठरली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता शिवसेनेच्या हातात दिल्यास ग्रामीण मार्गांचेही भाग्य उजळेल,’ असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण भागामधील शिक्षणाकडे लक्ष द्या

$
0
0

कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांची अपेक्षा
म. टा. वृत्तसेवा, भोर
‘शिक्षणाची चांगली प्रगती झालेला देश आर्थिकदृष्ट्या जगात अधिक प्रगत झाला आहे. त्यामुळे सर्वांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यायला हवे,’ अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केली.
राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ. गाडे बोलत होते. या वेळी पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे माजी सदस्य पी. ए. कुलकर्णी, नियामक मंडळाचे अध्यक्ष विजय रावळ, उपाध्यक्ष द. गं. सहस्रबुद्धे, सचिव समीर वाकणकर, मुख्याध्यापक हेमंत बावीकर, एस. के. वाकणकर आदी उपस्थित होते.
डॉ. गाडे म्हणाले, ‘आज ६५ टक्के विद्यार्थी ग्रामीण भागात शिकतात. मात्र शहरी भागातील शाळांमध्ये, सुविधांमध्ये झपाट्याने बदल होतात. परंतु, ग्रामीण भागामध्ये हे बदल का होत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील शाळांकडे, तेथील सुविधा आणि शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. प्राथमिक शाळांतील ज्ञानामुळे माणसाचे आयुष्य घडवले जाते. विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवण्यापेक्षा विषयाचा सखोल अभ्यास करून त्यात प्रभुत्व मिळवावे. अशा प्रकारे प्रभुत्व मिळवल्यास जीवनात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा दत्तक घेउन विविध उपक्रम हाती घेतल्यास राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्व शाळांमध्ये बदल होऊन देशाच्या विकासाला हातभर लागेल.’ कुलकर्णी म्हणाले, ‘सध्या शिस्तीचा सर्वत्र अभाव आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत घेतलेल्या शिस्तीचे धडे समाजात वावरताना विसरू नयेत. आपली आवड पाहून शैक्षणिक क्षेत्र निवडावे.’ विक्रम शिंदे, माधुरी ताडफळे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता सुरक्षेचे ब्रँड अॅम्बेसिडर व्हा

$
0
0

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वाहनाचा माणूस व्हावे, परंतु माणसाचे वाहन होऊ देऊ नका. वाहनाच्या ताकदीला आपली ताकद समजून अतिवेगाने वाहन चालवू नका. वाहनाला बुद्धी नाही, मनुष्याला आहे. प्रत्येकाने स्वतःला रस्ता सुरक्षिततेच्याबाबत ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ समजले पाहिजे,’ असे आवाहन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी सोमवारी केले.

सोमवारपासून २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात झाली. आमदार भीमराव तापकीर, आमदार विजय काळे, जिल्हाधिकारी सौरव राव, वाहतूक पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, झील संस्थेचे संस्थापक संभाजी काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जयेश काटकर आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी तेंडुलकर म्हणाले, ‘माणसाचे शरीर अनमोल आहे आणि रस्ता सुरक्षा मौल्यवान आहे. अधिकारी कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन या गोष्टीता प्रचार आणि प्रसार करीत आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेऊन आत्मपरीक्षण केले पाहिजे.’ ‘कुटुंबीयांची आपण ज्या पद्धतीने काळजी घेतो, त्याप्रमाणे रस्त्यावरील नागरिकांचीही काळजी घेतली पाहिजे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या मुलांच्या पाठीशी पालकांनी उभे राहू नये,’ असेही तेंडुलकर यांनी सांगितले. ‘प्रत्येक नागरिकाने समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून रस्ता सुरक्षेचे दायित्व स्वीकारले पाहिजे. त्याची जाणीव ठेवली पाहिजे,’ असे राव यांनी सांगितले.

आजरी म्हणाले, ‘प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने अपघातांची संख्या वाढते. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व उपाय कायमस्वरूपी झाले पाहिजेत.’ ‘बहुतांश अपघातांमध्ये पादचारी मृत्यूमुखी पडतात. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय जनतेने स्वीकारला पाहिजे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होऊन वायू प्रदूषण, ध्ननी प्रदूषण यावरही उपाय होईल. रस्ता सुरक्षा अभियान १५ दिवसांचे असले, तरीही ते कायमस्वरूपी सुरू आहे, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीनंतर आयुर्वेदाचा अभ्यासक्रम नको

$
0
0

‘आयुष‘च्या प्रस्तावाला ‘सीसीआयएम‘चा विरोध
Mustafa.Attar@timesgroup.com
...............
@mustafaattarMT

पुणे : आयुर्वेदाचे साहित्य संस्कृत भाषेतून असल्याने संस्कृत विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आता दहावीनंतर आयुर्वेदाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आयुष विभागाने पुढे आणला आहे. या प्रस्तावाला ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन‘च्या (सीसीआयएम) आजी माजी सदस्यांनी विरोध दर्शविला आहे.
दोन वर्ष अभ्यासक्रमाचा प्रस्ताव अंमलात आल्यास आयुर्वेद शाखेस प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना आयुर्वेदाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. परंतु, सद्यस्थितीच हाच अभ्यासक्रम साडेपाच वर्षांत पूर्ण करावा लागतो आहे.
‘देशातील उत्तरप्रदेश किंवा त्या नजिकच्या राज्यात संस्कृत विद्यापीठ अधिक आहेत. तसेच आयुर्वेदाचे संपूर्ण साहित्य हे संस्कृत भाषेत असल्याने त्यांना आयुर्वेदाला प्रवेश घेण्याची इच्छा आहे. परंतु, दहावीनंतर बारावीचे दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आवश्यकता असते. मात्र, संस्कृतच्या या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इतर विषयांऐवजी दोन वर्षांचा आयुर्वेदाचा (प्री आयुर्वेद) असा अभ्यासक्रम राबविण्यात यावा. त्याचा संस्कृतचे ज्ञान घेतलेल्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो, असा प्रस्ताव ‘आयुष’ने मांडला आहे. या प्रस्तावास आमचा विरोध आहे. संस्कृतचे ज्ञान घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर अकरावी, बारावीचे धडे गिरविणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) विषयाचे ज्ञान घेणे शक्य आहे. किमान या विषयांचा अभ्यास आयुर्वेदाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे,’ असे मत सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांनी बैठकीत मांडल्याचे ‘मटा’ला सांगितले. दहावीनंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम आणि बारावीनंतर आयुर्वेदाच्या बीएएमएसचा असे दोन अभ्यासक्रम राबविणे अशक्य आहे, याकडे ही त्यांनी ‘आयुष’चे लक्ष वेधले आहे.
‘प्री आयुर्वेद नकोच’
‘दहावीनंतर दोन वर्षांचा ‘प्री आयुर्वेद’ हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि नंतर ‘बीएएमएस’चा अभ्यासक्रम पूर्ण करायचा अशी १९७० च्या दशकात पद्धत होती. त्यामुळे दोन वर्षाचा अभ्यासक्रम, मुख्य अभ्यासक्रमाचे साडेचार वर्ष आणि एक वर्ष इंटर्नशीप असे साडेसात वर्ष खर्च करावी लागत होती. काही वर्षे या पद्धतीने अभ्यासक्रम राबविला गेला. परंतु, नंतर तो बंद करण्यात आला. आता पुन्हा काही संस्कृततज्ज्ञांच्या मागणीनुसार या अभ्यासक्रमाचा विचार सुरू आहे. यामुळे काहीच साध्य होणार नाही. ‘प्री आयुर्वेद’ अभ्यासक्रम राबवायला नकोच,’ असे स्पष्ट मत ‘सीसीआयएम’च्या माजी सदस्यांनी मांडले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. येत्या १५ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियानात हेल्मेट जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये पोलिस, नागरिक, बाइकर्स सहभागी होणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिली.
रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन शनिवारवाडा येथे करण्यात आले. या अभियानात १५ जानेवारी रोजी निघणारी मोटारसायकल रॅली हा मुख्य कार्यक्रम आहे. ‘सकाळी साडेआठ वाजता पोलिस मुख्यालयातून ही रॅली निघेल. शहरातील विविध भागातून फिरून ती पुन्हा पोलिस मुख्यालय येथे संपेल. या रॅलीचे अंतर ३६ किलोमीटर असून, यामध्ये नागरिकही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षामध्ये नोंदणी करावी लागणार आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी हेल्मेट व वाहन चालविण्याचा परवाना सोबत ठेवावा लागणार आहे,’ असे बारवकर यांनी सांगितले.
या रस्ता सुरक्षा सप्ताहात वाहतुकींच्या नियमांबाबत जनजागृतीसाठी थिएटर्समध्ये व्हिडीओ क्लीप दाखविण्यात येणार आहेत. तसेच, नियम पाळणाऱ्या नागरिकांना थँक यू कार्ड देण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी सारसबाग ते झील इन्स्टिट्यूट दरम्यान सायकल रॅली काढण्यात येईल. पीएमपी बस चालकांना वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन केले जाणार आहे. सर्व शाळांच्या स्कूल बस चालक व मालकांचे प्रबोधन करून आरटीओच्या माध्यमातून स्कूलबसची तपासणी केली जाणार आहे. पथनाट्याद्वारे वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. तसेच, वाहतुकीच्या प्रश्नांवर स्टुडंट पार्लमेंट आयोजित करण्यात आली आहे. अशा विविध कार्यक्रमानंतर २३ जानेवारी रोजी सुरक्षा अभियानाचा समारोप होणार आहे, अशी माहिती बारवकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांना आजपासून दोन वेळा पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऐन निवडणुकीपूर्वी पुणेकरांना दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अखेर अंमलात येणार असून आज, बुधवारपासून दोनदा पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत शहराला दोनदा पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेला कोटा वाढवून देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागातर्फे त्याचे सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू होते. त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, पूर्वी दोन वेळा पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्येच पुन्हा दोनदा पाणी देता येणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरी स्मारके पुस्तकांमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकातील मराठी कळायला अवघड आहे. वाक्यांमध्ये अर्धविराम, पूर्णविराम ही चिन्हे कुठे द्यावीत, हे कळणाऱ्यालाच ते नाटक कळेल. असे असताना काही विकृत प्रकार होत आहेत. कवी, लेखक, नाटककारांची खरी स्मारके पुस्तकांमध्ये असतात,’ अशा शब्दांत जयंत सावरकर व डॉ. अक्षयकुमार काळे या नियोजित संमेलनाध्यक्षांनी मंगळवारी गडकरी यांचा पुतळा काढून टाकण्याच्या प्रकारावर आग्रही ‘भूमिका’ मांडली.

संवाद पुणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्यातर्फे नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर व नियोजित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचा पिंपरीच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्त उद्धव कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, भारत देसडला, सचिन इटकर, सुनील महाजन व निकीता मोघे या वेळी उपस्थित होते. साहित्यिक दर्पण दैनंदिनीचे प्रकाशन या वेळी झाले.

सावरकर म्हणाले, ‘बदललेल्या प्रेक्षकाप्रमाणे नाटक बदलायला हवे. तीनशे रुपये तिकीट असलेल्या नाटकाला एक कुटुंब महिन्यातून एकदाच जाऊ शकते. हे दर परवडणारे नाहीत. सामान्यांच्या आवाक्यात येतील, असे दर करण्याची गरज आहे. राज्यांतील नाट्यगृहांची अवस्था वाईट झाली आहे.’

डॉ. काळे म्हणाले, ‘संमेलनाध्यक्ष हे जबाबदार पद आहे. संमेलनात गोंधळ उडू नये म्हणून संवेदनशील विषयांना हात घालायचा नाही, ही भूमिका मी ठेवली आहे. पण, म्हणून सामाजिक प्रश्नांविषयी माझ्या मनात आस्था नाही, असे नाही. संमेलनाच्या व्यवस्थेत गडबड नको म्हणून मी हे प्रश्न दूर ठेवले आहेत. साहित्य व समाज अशी फारकत मी करत नाही.’

नियोजित संमेलनाध्यक्ष ‘शांत’

‘माझ्या अनुभवावरून सांगतो, की जयंत सावरकर व डॉ. अक्षयकुमार काळे या दोन नियोजित संमेलनाध्यक्षांचा स्वभाव शांत आहे. त्यामुळे ही संमेलने ९० टक्के इथेच यशस्वी झाली आहेत,’ डॉ. पी. डी. पाटील यांनी ही कोपरखळी मारताच सभागृहात हशा पिकला. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तृत्वशैलीचा संदर्भ पाटील यांच्या बोलण्याला होता. सबनीस आपल्या वक्तृत्वशैलीमुळे प्रसिद्ध असून त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्याने संमेलनात वाद निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन आश्रमशाळांत गैरप्रकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील तीन आश्रमशाळांत गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले असून प्रशासनाने एक आश्रमशाळा बंद करावी व दोन आश्रमशाळांचे अनुदान रोखावे, अशी शिफारस राज्य सरकारला केली आहे.

आंबेगाव येथील फुलवडे आणि मावळमधील वडेश्वर येथील मुलींच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तवणूक केली जात असल्याचे, तर जुन्नरमधील कोळेवाडीतील आश्रमशाळेत मुली धोकादायक इमारतीमध्ये राहत असल्याचे धक्कादायक प्रकार जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या तपासणी पथकाच्या निदर्शनास आल्यामुळे प्रशासनाने आपल्या अहवालात त्याची नोंद करून अभिप्राय पाठवला आहे. फुलवडे येथील आश्रमशाळा बंद करून मुलींचे अन्य शाळेत स्थलांतर करावे; तसेच वडेश्वर आणि कोळेवाडीतील आश्रमशाळांचे अनुदान बंद करावे, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे दिला आहे.

बुलडाणा येथील खामगाव तालुक्यातील पाळा गावातील आश्रमशाळेमध्ये मुलींवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळांची तपासणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र विकास सेवा, पोलिस आणि आदिवासी विकास विभागातील महिला अधिकाऱ्यांचा समावेश असावा, असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने महिला अधिकाऱ्यांची तीन पथके तयार केली होती. या पथकांनी ल्ह्यातील २४ आश्रमशाळांची तपासणी केली. त्यामध्ये दोन आश्रमशाळांमध्ये अनुचित प्रकार आणि एका शाळेत धोकादायक वातावरणात मुली राहत असल्याचे आढळून आले. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाकडे सादर केला आहे.

विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन

तपासणी पथकाने वडेश्वर येथील आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर विद्यार्थिनींशी संवाद साधला. या शाळेतील एक महिला कर्मचारी आपल्याशी वाईट वागल्याचे एका मुलीने पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार अधिक तपास करण्यात आला असता, त्या महिला कर्मचाऱ्याने असभ्य वर्तणूक केल्याचे स्पष्ट झाले. अन्य मुलीही सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या; पण त्या घाबरत होत्या, असे तपासणी अधिकाऱ्यांनी अहवालात स्पष्ट केले आहे. त्या महिला कर्मचाऱ्याची चौकशी करावी; तसेच या शाळेचे अनुदान बंद करावे, अशा शिफारशी जिल्हाधिकारी राव यांनी अहवालात केल्या आहेत.

कोळेवाडी आश्रमशाळेतील त्रुटी

- वसतिगृहाची इमारत सुस्थितीत नाही.

- सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही.

- आश्रमशास्ळेत साप निघत असताना, प्रथमोपचारासाठी सर्पदंशावरचे साहित्य नाही.

- आश्रमशाळाचालकांचे दुर्लक्ष असल्याने अनुदान बंद करण्यात यावे.

मुलींना मारहाण

- फुलवडे येथील आश्रमशाळेतील मुलींना मारहाण आणि त्यांच्याशी असभ्य वर्तवणूक केली जात असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले.

- मुलींसाठी वेगळे वसतिगृह नसून, त्या शाळेतील वर्गातच राहतात आणि झोपतात.

- स्नानगृह बंदिस्त नाही. स्नानगृहाला दरवाजे आणि खिडक्या नाहीत.

- स्वयंपाकघर हे स्नानगृह आणि शौचालयालगत आहे.

- पुरुष स्वयंपाकी काम करत असून, त्यांना मुलींच्या स्नानगृहात जाण्यासाठी मनाई केली जात नाही.

- मुलींना अंथरूण दिले जात नाही.

- शाळेतील शिक्षक शिकवत नाहीत.

- ही शाळा बंद करून येथील मुलींची आंबेगाव येथील गोऱ्हे गावातील आश्रमशाळेत राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था करण्याची शिफारस.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैधता प्रमाणपत्राची टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महापालिकेच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने सहा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द ठरण्याची टांगती तलवार कायम असल्याचे परिपत्रक राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी पाठविले आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाचे सहसचिव ज. ना. पाटील यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की निवडणुकीच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिका, नगरपरिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ३१ डिसेंबर २०१७ किंवा त्यापूर्वी असेल तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा नागरिकांचा मागासवर्ग यांच्याकरीता राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना उमेदवारी अर्जासोबत वैधता प्रमाणपत्राची सत्य प्रत किंवा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे. परंतु, निवडून आल्याच्या घोषित झालेल्या तारखेपासून सहा महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय, महापौर आणि नगराध्यक्ष यांच्या निवडणुकीसंदर्भातही हीच तरतूद लागू राहणार आहे.

राज्यातील बृह्नमुंबई वगळून सर्व महापालिका, आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांना २८ मार्च २०१६ च्या नियमानुसार निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या परंतु, सहा महिन्यांच्या कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यास अनर्ह ठरविण्याचे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नऊ डिसेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाचाही दाखला देण्यात आला आहे.

या अनुषंगाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आरक्षित पदांवर निवडून आलेल्या सर्व संबंधित सदस्यांची नावे आणि त्यांना अनुज्ञेय असलेल्या सहा महिन्यांची मुदत संपुष्टात येण्याचा दिनांक याबाबतची माहिती तयार करावी. तो तपशील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तात्काळ निदर्शनास आणून द्यावा. त्याचप्रमाणे अशा प्रकरणांचा निपटारा विहित मुदतीत होण्यासाठी संबंधित समित्यांकडे आवश्यक पाठपुरावा करावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘कुणबी’साठी धावपळ

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत अनेकांनी कुणबी जातीचा दाखला मिळवून ‘ओबीसी’ प्रवर्गातून निवडणुका लढविल्या आणि जिंकल्यादेखील. तोच कित्ता गिरवून अनेक इच्छुकांची कुणबीचा दाखला मिळविण्यासाठी धावपळ चालू आहे. त्यासाठी वंशावळ शोध मोहीम आणि पुरावे संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. आजपर्यंत निवडणुकीसाठी कुणबी जातीच्या दाखल्याची गरज भासली नाही म्हणून खटाटोप केला नाही. मात्र, आता घटनेनुसारच संधी असेल तर ती का सोडावी, असा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी’ला धक्का देण्याची खेळी

$
0
0

Sunil.Landge@timesgroup.com

Tweet - @sunillandgeMT

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देण्याचा निर्णय पक्का केलेला दिसून येतो. शहरातील महत्त्वाचे नेते आझम पानसरे यांना आपलेसे करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकहाती सत्तेला जबरदस्त हादरा दिला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून पानसरे यांना ओळखले जाते. परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पानसरे यांनी अप्रत्यक्षरीत्या कबूल केले. त्यांच्यामुळे ‘राष्ट्रवादी’ची भविष्यातील शहरातील वाटचाल काहीशी खडतर झाली आहे. तर, आमदार महेश लांडगे यांच्यापाठोपाठ पानसरे यांच्या प्रवेशामुळे भाजपची सत्तेच्या दिशेने वाटचाल काहीशी सुलभ झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीची भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळावयाच्या जगताप, लांडगे, खासदार अमर साबळे यांच्या यादीत पानसरेंचा समावेश होणार आहे. किंबहुना, पक्षाचे उमेदवार निश्चित करताना या चौघांच्याही भूमिकेला महत्त्व प्राप्त होणार आहे.

महापालिकेच्या स्थापनेपूर्वी शहराच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले कै. फकीरभाई पानसरे यांच्याकडून वारसा घेऊन आझमभाईंनी राजकीय प्रवासाला प्रारंभ केला. नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर १९९२मध्ये ते महापौरपदी विराजमान झाले. त्यानंतर शहरात त्यांचे नेतृत्त्व बहरले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून विश्वास संपादन करतानाच त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही खंबीर साथ दिली. त्याचेच फळ म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा आणि लोकसभेची उमेदवारी मिळाली. मात्र, निवडून येण्यात अपयश आले. त्यानंतरही त्यांनी पक्षात सक्रिय राहून काम केले. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.

सार्वत्रिक निवडणुकीतील अपयशानंतर विधानपरिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा पानसरेंना होती. परंतु, ती फोल ठरली. त्यामुळे समर्थकांच्या आग्रहास्तव पानसरेंनी ‘घड्याळा’ची साथ सोडून काँग्रेसचा ‘हात’ धरला. तेथेही उपेक्षाच झाली. त्यामुळे पुन्हा ते स्वगृही परतले. आमदार जगताप आणि लांडगे भाजपमध्ये गेले तरी पानसरेंच्या नेतृत्वाखाली निर्भेळ यश संपादन करू, असा विश्वास ‘राष्ट्रवादी’ला होता. परंतु, भविष्यात राजकीय पुनर्वसन होण्याच्या आश्वासनामुळे पानसरे ‘कमळा’कडे आकर्षित झाले. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ला खिंडार तर पडलेच; शिवाय एकहाती सत्तेच्या हॅट् ट्रिकच्या स्वप्नालाही बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाचा नाही म्हटले तरी ‘राष्ट्रवादी’ला नक्कीच फटका बसणार आहे.

पानसरे यांना भाजपमध्ये आणण्यात आमदार लांडगे यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. त्यांच्या आग्रहामुळे पक्षप्रवेशास अनुकूल झाल्याचे पानसरे यांनी कबूल केले आहे. एकेकाळी जगताप आणि पानसरे यांचा राजकारातणात छत्तीसचा आकडा होता. दोघंही एकमेकांना पाण्यात पाहत असे. तेच आता एकत्रित कसे काम करणार, मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे काय होणार, त्यांना सन्मानाची वागणूक मिळणार का, अशा शंका उपस्थित होत आहेत. त्याचीही उत्तरे जगताप-पानसरेंनी दिली आहेत. झालं-गेलं विसरून आम्ही चुका दुरुस्त करणार आहोत. पक्षामध्ये जुना-नवा भेद राहणार नाही, असे दोघांनी स्पष्ट केले. तरीही, पक्षांतर्गत गटबाजीची बीजे रुजू शकतात, ही बाब नाकारता येणार नाही. भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप करणारे पानसरे एकदम नरम होऊन मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडले आहेत. राज्य पातळीवर पक्षातील मुस्लिम चेहरा म्हणून नवीन कारकीर्द घडण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांनी घेतला संगीत नाटकांचा आस्वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चिंचवड येथील नादब्रह्म परिवाराने आयोजित केलेल्या पं. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. यानिमित्त नाट्यप्रेमींनी संगीत नाट्यांचा मनमुराद आस्वाद घेतला.

बलवंत संगीत मंडळीचे शताब्दी वर्ष आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे सहस्त्रचंद्र असा योग साधून नादब्रह्म परिवाराने चिंचवड येथील प्रेक्षागृहात या उपक्रमाचे आयोजन केले. समारोपाच्या दिवशी ‘संगीत मानापमान’चा प्रयोग झाला. या वेळी पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. वसंत गाडगीळ, दि. मा. फडके उपस्थित होते. पं. दीनानाथ यांच्या नाट्य वाटचालीतील नाट्यपदे डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि डॉ. वंदना घांगुर्डे यांनी सादर केली. तसेच, दृकश्राव्य माध्यमातून त्यांच्या गायकीचे दर्शन घडवले.

‘संगीत मानापमान’ नाट्यप्रयोगात डॉ. घांगुर्डे यांच्यासह अरविंद पिळगावकर, अस्मिता चिंचाळकर, संजय गोसावी, दादा पासलकर, प्रदीप रत्नपारखी, सयाजी शेंडकर, वैशाली गोसावी, नेहा कुलकर्णी यांनी भाग घेतला. उदय कुलकर्णी (ऑर्गन), विघ्नहरी देव (तबला), अविनाश लघाटे (व्हायोलिन) यांनी साथ केली. विनिता रायकर यांनी पार्श्वसंगीताचे नियोजन केले. महोत्सवाच्या माध्यमातून तिन्ही दिवस पं. दीनानाथांच्या नाट्य कारकिर्दीचे दर्शन घडविणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

करवीर पीठाचे जगद्‌गुरू विद्यानृसिंह भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाला प्रारंभ झाला. त्याच वेळी नादब्रह्म परिवाराच्या ‘नाद अनाहत’ वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर अनाहत पुणे निर्मित सावनी रवींद्र प्रस्तुत ‘स्वर हृदयांतरी’ कार्यक्रम झाला. त्याचे निवेदन प्रमोद पवार आणि दीप्ती भागवत यांनी केले. संगीत नियोजन विवेक परांजपे यांनी केले. प्रसन्न वाघ (हार्मोनियम), अमृता ठाकूर- देसाई (सिंथेसायझर), नितिन शिंदे (तबला), प्रशांत साळवी (कोरस), अजय अत्रे (ऑक्टोपॅड), आदित्य आपटे (साइड रिदम) यांनी साथ केली. ध्वनी संयोजन नीलेश यादव यांनी केले. महोत्सवासाठी विनिता रायकर, नेहा कुलकर्णी, शाल्मली कुलकर्णी, स्नेहल कोकीळ, वृषाली भणगे, मानस रायकर, दामिनी वाघमारे यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींकडून निरपेक्ष सेवेचा गुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘आभाराची अपेक्षा न करता निरपेक्ष सेवेचा गुण आदिवासी बांधवांकडून मिळाला,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. लोकबिरादरीमध्ये क्रूर प्राणी माणसांसारखे वागतात. परंतु, सद्यस्थितीत माणसेच क्रूर प्राण्यांसारखी वागताना पाहून वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या १७७व्या जयंतीनिमित्त ‘टाटा मोटर्स’तर्फे पाच सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर २०१६ दरम्यान ‘टाटा व्हॉलेंटिअर मंथ’ साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देण्यात आले. त्या वेळी डॉ. आमटे बोलत होते. डॉ. मंदाकिनी आमटे, अनिल सिन्हा, संगमनाथ दिग्गे, सुरेश जासूद या वेळी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत कामगारांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सामाजिक सेवा केली. त्याद्दल स्टार टीम पुरस्कार प्रॉडक्शन इंजिनीअरिंग टीमला देण्यात आला. स्टार व्हॉलेंटिअर पुरस्कार मॅनुफॅक्चरिंग आणि फाउंड्री टीमला मिळाला. प्रोटोशॉप इआरसी टीम आणि पर्चेस व सप्लाय टीमला विशेष पुरस्कार देण्यात आला. भगवान भोसले, सुनील मोरे यांना वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले.

सामाजिक कार्याचे अनुभव कथन करताना डॉ. आमटे म्हणाले, ‘सामाजिक कार्याचा वसा आम्हाला बाबांकडून वारसाहक्काने मिळाला. त्या वेळी कुष्ठरोगाविषयी समाजात प्रचंड घृणा होती. मात्र, बाबांनी घरच्यांचा आणि समाजाचा विरोध पत्करून कुष्ठरोगींसाठी काम सुरू केले. जंगलातील आदिवासी भागात काम करताना सुरुवातीला त्यांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे होते. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा पगडा होता. मात्र, मांत्रिकाच्याच आजारी मुलीवर उपचार केल्याचे पाहिल्यानंतर आमच्यावरील विश्वास दृढ झाला.’

प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले. शिवराम कृष्णन यांनी आभार मानले. रोहित सरोज आणि मयुरेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फ्लॅट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा पौड फाटा येथील इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुश्री आशुतोष पांडे (वय ५०, रा. बाणेर) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुश्री या गृहिणी आहेत. त्यांना दोन मुली असून, पतीचा कारखाना आहे. अनुश्री यांना नवीन फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांची पाहणी सुरू होती. पौड फाटा येथील ‘४५ निर्वाण हील’ या प्रकल्पाची त्यांनी चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी पाच वाजता त्यांना फ्लॅट पहाण्यासाठी बोलविण्यात आले. त्यामुळे त्या एकट्याच साइटवर गेल्या. साइटवरील कर्मचारी त्यांना नवव्या मजल्यावर फ्लॅट पाहण्यासाठी घेऊन गेले. फ्लॅट पाहिल्यानंतर मुलगी खाली येणार असल्याचे अनुश्री यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. तिला घेण्यासाठी एका कर्मचाऱ्याला खाली पाठविले. त्याचवेळी अन्य बांधकाम पाहात असताना अचानक तोल जाऊन त्या खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अनुश्री या नेमक्या कशा पडल्या, त्यांना फ्लॅट दाखविण्यासाठी कोणता कर्मचारी होता याचा शोध सुरू आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. इमारतीच्या पाहणीसाठी जाताना श्रीमती पांडे यांना हेल्मेट देण्यात आलेले नव्हते. पांडे यांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची मा​हिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीसाठी भाजपकडून सिग्नल

$
0
0

प्राथमिक चर्चेसाठी वरिष्ठांकडून अनुकूलता; वादग्रस्त मुद्द्यांचा अडथळा कायम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जाहीर भाषणांमधून परस्परांच्या विरोधात टीकास्त्रांना सुरुवात झाली असली, तरी आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाव्य युतीसाठी स्थानिक पातळीवर चाचपणीस भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र, प्राथमिक चर्चेसाठी अनुकूलता दर्शविण्यात आली असली, तरी जागावाटपासारख्या वादग्रस्त मुद्द्यांचे अडथळे भाजप आणि शिवसेनेला पार करावे लागणार आहेत.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत काही वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये चर्चेअंती ही भूमिका घेण्यात आल्याची माहिती पक्षाच्या गोटातून देण्यात आली. गेल्या काही दिवसांत भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये परस्परांच्या विरोधात टीकेच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही, याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही. राज्यात भाजपची मोठी लाट असली, तरी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रपक्षांना बरोबर घ्यावे, असे काही ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. मात्र, युती करणे हा राज्य पातळीवर धोरणात्मक विषय असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे डोळे वरिष्ठांकडे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत प्राथमिक टप्प्यावर आपापल्या ताकदीचा अंदाज घ्यावा आणि संभाव्य युतीसाठी काय परिस्थिती आहे, याची चाचपणी करावी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनुकूलता दर्शविल्याचे समजते.
युतीसंदर्भात थेट संकेत न मिळाल्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी पुण्यात इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचबरोबरीने अन्य पक्षातील संभाव्य उमेदवारांचेही प्रवेश जोरात सुरू आहेत. दुसरीकडे युती केल्यास प्रभागातील काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागतील आणि आपली निवडणूक लढविण्याची संधी हुकेल अशी भावना इच्छुकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे स्वबळावरच निवडणुका लढवाव्यात, असा मोठा दबाव नेत्यांवर आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागातील आपल्या ताकदीचा अंदाज घेण्याचे काम सुरू केल्याचे समजते. तसेच पुण्यात युती झाली नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्येही युती होणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.

हुकमी प्रभागांवर पाणी सोडणार?
महापालिका निवडणुकीत युतीच्या प्राथमिक चाचपणीबाबत अनुकूलता असली, तरी जागांचे वाटप हे दोन्ही पक्षांपुढील मोठे आव्हान ठरणार आहे. भाजपमधील काही नेत्यांनी शहराच्या विविध भागातील राजकीय स्थितीचा अभ्यास सुरू केला आहे. युती करण्याचे ठरल्यास, भाजपला विजयाची खात्री असलेल्या १२ ते १५ जागांवर पाणी सोडावे लागेल, अशी स्थिती असल्याचे या नेत्यांचे निरीक्षण आहे. कसबा, पर्वती, कोथरूड यासह अन्य काही मतदारसंघांमध्ये हुकमी जागा सोडण्यास पक्ष तयार होणार का, असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणाऱ्यांना जामीन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्याप्रकरणी अटक केलेल्या चौघांची आज जामिनावर सुटका झाली आहे. प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. नऱ्हे, आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. बालाजीनगर), स्वप्नील सूर्यकांत काळे (वय २४, रा. चऱ्होली, आळंदी) आणि गणेश देवीदास कारले (वय २६, रा. खेड) अशी या चौघांची नावं आहेत.

छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ३ जानेवारी रोजी हटवला होता. हातोडा आणि कुऱ्हाडीचे घाव घालून हा पुतळा तोडून उद्यानामागील नदीत टाकण्यात आला होता. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यांना कोर्टाने आधी रविवारपर्यंत आणि नंतर १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्यांना कोर्टापुढे हजर केलं असता, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान, गडकरींच्या पुतळयाच्या जागी संभाजी महाराजाचा पुतळा बसला पाहिजे. गडकरींच्या पुतळयास आणि तैलचित्रास कायम विरोध राहणार असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकशे सत्तर जणांच्या भाजपकडून मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखतींचे तिसरे सत्र मंगळवारी पार पडले. दिवसभरात १७० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आज, बुधवारी मुलाखतींचा अखेरचा दिवस आहे.
रविवारपासून भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भाजपकडे आतापर्यंत साडेनऊशेहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते. गेल्या तीन दिवसांत सव्वासहाशे जणांनी मुलाखती दिल्या आहेत. मंगळवारी पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये, विद्यमान नगरसेविका मनीषा घाटे, स्मिता वस्ते, मनीषा चोरबेले, कविता वैरागे, नगरसेवक धनंजय जाधव, श्रीनाथ भिमाले यांनी मुलाखती दिल्या. त्यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिलीप आबा तुपे, माजी नगरसेवक रमेश काळे, विनोद वस्ते, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महेश लडकत यांनीही मुलाखती दिल्या. आज, बुधवारी मुलाखतींचा अखेरचा दिवस आहे. यामध्ये, हडपसर, खडकवासला आणि कोथरूड व पर्वती मतदारसंघातील प्रभागातून (प्रभाग क्र ३१ ते ४१) इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.

शीतल सावंत अखेर भाजपमध्ये
काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल सावंत यांनी मंगळवारी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी त्यांचे पती अजय सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी, शीतल सावंतही त्यांच्यासमवेत होत्या. मात्र, आपण अजून काँग्रेसमध्येच असल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला होता. सोमवारी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. मंगळवारी पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे यांच्या उपस्थितीत सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील थंडीत किंचितशी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी शहराच्या तापमानात काहीशी घट झाली. राज्यात विदर्भ वगळता अन्यत्र तापमानात घट झाली. विदर्भात ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठी वाढ झाली.
मंगळवारी पुण्यात २९.९ अंश सेल्सिअस कमाल तर ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सोमवारी शहरात १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत सुमारे दीड अंशांची घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला होता. विशेषतः सायंकाळनंतर चांगली थंडी जाणवत होती.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली होती. विदर्भात मात्र, तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. मध्यप्रदेशाच्या काही भागात वातावरणाच्या वरच्या थरात असलेल्या हवेच्या चक्राकार स्थितीमुळे विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता आहे. मंगळवारी राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद नाशिक येथे (६.५ अंश सेल्सिअस) झाली. मालेगाव येथे ८.४, जळगाव येथे ९.६, सातारा येथे ११.८, औरंगाबाद येथे १३.४, नांदेड येथे १४, अमरावती येथे ११.६, नागपूर येथे १६.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसात तापमानात किंचित घट होण्याची शक्यताही हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्याच्या विरहातून विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

लाडका कुत्रा मरण पावल्याच्या विरहातून सिम्बायोसिसमध्ये एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडला. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कंवर हर्षवर्धनसिंग राघव (वय २२, सध्या रा. सिम्बायोसिस होस्टेल, खडकी, मूळ रा. रायपूर, छत्तीसगड ) आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंवर एमबीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील लष्करात कर्नल आहेत. हडपसरच्या गोंधळेनगर येथे कंवरच्या वडिलांचे मित्र कर्नल ठाकूर राहतात. पुण्यामध्ये दुसरे कोणी जवळचे नातेवाइक नसल्यामुळे सुट्टीत कंवर ठाकूर यांच्याकडे येत असे. रविवारी सायंकाळीही तो नेहमीप्रमाणे ठाकूर यांच्याकडे आला होता. त्याने ठाकूर यांच्या घरी मुक्कामही केला. मात्र, सोमवारी सकाळी त्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याचे आढळून आले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तपासादरम्यान, पोलिसांना कंवरच्या वहीत सुसाइड नोट सापडली. त्यामध्ये ‘मी बॉस्कीचा (कुत्र्याचा) विरह सहन करू शकत नाही. मी त्याच्याकडे जात आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. आई-वडिलांनी मला माफ करावे,’ असा मजकूर चिठ्ठीत लिहिला आहे. कंवरच्या बॉस्की नामक कुत्र्याचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आत्महत्येपूर्वी नैराश्यात
दरम्यान, पोलिसांनी राघव याच्या वडिलांकडे चौकशी केली असता, काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याचे समजले. तो एकाकी राहात होता. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचीही माहिती वडिलांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरांवरील कारवाईत घट

$
0
0

सर्वाधिक कारवाईत पुणे अव्वल; गेल्या वर्षी ९८५ कारवाया

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
Tweet : @ShrikrishnakMT

पुणे : लाचखोरांविरोधात तक्रार करण्यासाठी अॅप, हेल्पलाइन, व्हॉट्सअॅप आदी सुविधा पुरवूनही पुणे विभागातील लाचखोरांविरोधातील कारवाईत घट झाल्याचे आढळून आले आहे. तरीही राज्यात लाचखोरांवर सर्वाधिक कारवाई करण्यात पुणे विभागाने आघाडी मिळविल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे एकूण आठ विभाग आहेत. या विभागांमार्फत लाचखोरांवर कारवाई केली जाते. २०१३पर्यंत लाचखोरांवर कारवाईचा आकडा खूपच कमी होता. मात्र, त्यानंतरच्या दोन वर्षांत ‘एसीबी’कडून लाचखोरांविरोधात धडक मोहीमच सुरू करण्यात आली. त्यामुळे कारवाईचा आकडा दुप्पट झाला. लाचखोरांची माहिती देण्यासाठी ‘एसीबी’कडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या.
अॅप, हेल्पलाइन, व्हॉट्सअॅप आदींच्या वापरामुळे कारवाईत मोठी वाढ झाली. २०१५मध्ये राज्यात १,२४५ लाचखोरांना सापळा रचून अटक करण्यात आली. १७ जणांना अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. २०१४ मध्येही थोड्याबहुत फरकाने हीच स्थिती होती. २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत लाचखोरांच्या मनात ‘एसीबी’ची धडकी भरली होती. २०१६ मध्ये लाचखोरांवरील कारवाईत घट झाली असून, हा आकडा ९८५पर्यंत खाली आला. या वर्षात राज्यातील तसेच, पुणे विभागातीलही एसीबीच्या कारवाईमध्ये घट झाली. २०१५मध्ये पुणे विभागाने लाचखोर आणि अपसंपदा बाळगणाऱ्यांच्या विरोधात २२० गुन्हे दाखल केले. गेल्या वर्षभरात हा आकडा १८८वर आला आहे.
दर वर्षी नाशिक आणि पुणे विभागात कारवाईसाठी स्पर्धा होती. मात्र, यंदा नाशिक विभाग पिछाडीवर पडला आहे.

राज्यातील ‘एसीबी’ची कारवाई
वर्ष सापळा अपसंपदा अन्य भ्रष्टाचार
२०१३ ५८३ २२ १३
२०१४ १२४५ ४८ २३
२०१५ १२३४ ३५ १०
२०१६ ९८५ १७ १२

विभागवार कारवाई
विभाग सापळा असपंसदा अन्य भ्रष्टाचार
मुंबई ५८ ६ १
ठाणे १२० ३ ३
पुणे १८६ २ ०
नाशिक १५३ १ ४
नागपूर १३५ ३ २
अमरावती ११० ० ०
औरंगाबाद १२० ० ०
नांदेड १०३ १ २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाक्या स्थगितीचा आदेश गुलदस्तातच

$
0
0

महिना उलटूनही अद्याप पालिकेला आदेश नाहीच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील ८३ पाण्याच्या टाक्यांच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश डिसेंबर महिन्यात विधिमंडळ अधिवेशनात देण्यात आले होते. अधिवेशनानंतर महिना उलटूनही याबाबतचा लेखी आदेश राज्य सरकारकडून पालिकेला मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
शहरातील बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी महापालिकेने सुमारे २ हजार ८२८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये ८३ टाक्यांचे काम टेंडरद्वारे एल अँड टी कंपनीला देण्यात आले असून, कामाला सुरुवात झाली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल भोसले यांनी पाण्याच्या टाक्यांविषयी शंका उपस्थित केली होती. हे काम संबंधित कंपनीला देताना टेंडर प्रक्रियेला हरताळ फासला गेल्याचा आरोप करून काही ठिकाणी भूसंपादन झाले नसतानाही टेंडर काढल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची चौकशी करून कामाला स्थगिती देण्याची विनंती भोसले यांनी लक्षवेधीद्वारे केली होती. काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ आणि शरद रणपिसे यांनीही सभागृहात मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
कामाला स्थगिती देण्याचे आदेश देऊन महिना उलटला तरी कोणतेही लेखी ‌आदेश पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे कंपनीला दिलेल्या कंत्राटाची चौकशी अद्याप सुरू झालेली नाही. उलट कंपनीकडून टाक्यांच्या जिओ सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांना विचारले असता, ‘काम थांबविण्याबाबत सरकारकडून कोणतेही लेखी आदेश मिळाले नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेसाठी आवश्यक असलेली २२६४ कोटी रुपयांची रक्कम कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारण्याच्या पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली नाही. कर्जरोखे उभारण्यासाठी एसबीआय मर्चंट बँकेला सल्लागार नेमण्याची मान्यता देताना सर्वसाधारण सभेने ही सर्व प्रक्रिया निवडणुकीनंतर नवीन लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरच करण्याची अट घातली. त्यामुळे चोवीस तास पाणी पुरवठा योजनेबाबत राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मोठा घोळ असल्याची चर्चा सध्या पालिकेत सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images