Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘नोटाबंदीमुळे १५ कोटी बेरोजगार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नोटाबंदीमुळे देशात १५ कोटी नागरिक बेरोजगार झाले असून आर्थिक आणीबाणीचे सावट आहे. देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे,’ असा दावा करून काँग्रेसने शहरातील विविध भागांत घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन केले. टिळक चौक, सुभानशहा दर्गा आणि नरपतगिरी चौकात हे आंदोलन करण्यात आले.

टिळक चौकातील आंदोलनाची जबाबदारी युवक काँग्रेसकडे देण्यात आली होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ विश्वजित कदम, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास लांडगे, देविदास भन्साळी, श्रीरंग चव्हाण, आबा बागुल, संगिता तिवारी, सतिश मोहोळ आदी टिळक चौकातील आंदोलनासाठी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीने आधीच हैराण झालेला शेतकरी नोटाबंदीमुळे कठीण परिस्थितीतून जात असल्याची टीका पाटील यांनी केली. तर, देशात दोन कोटी नवीन रोजगार उपलब्ध करण्याची घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे १५ कोटी नागरिक बेरोजगार झाल्याची टीका शहराध्यक्ष बागवे यांनी केली.

नरपतगिरी चौकात सेवादल आणि एनएसयूआयतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, रवींद्र म्हसकर, भुषण रानभरे, लता राजगुरू, अविनाश बागवे, सदानंद शेट्टी आदी उपस्थित होते.

शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सुभानशहा दर्गा येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे उपस्थित होत्या. रिझर्व्ह बँकेकडून दररोज निर्णय बदलण्यात येत आहेत. अर्थव्यवस्था ५० दिवसांनंतरही सुरळीत झालेली नाही, अशी टीका व्यवहारे यांनी केली. महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सोनाली मारणे, अंजनी निम्हण, भारती कोंडे, अनिल सोंडकर, नारायण चव्हाण, विलास वाडेकर, मिलिंद काची, अजित दरेकर, राजू शेख आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बॉबी टिंगरे भाजपमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टिंगरेनगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे यांनी सोमवारी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या निवडणूक कार्यालयात टिंगरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा प्रवेश झाला.

गेल्या काही दिवसांपासून इतर पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढत आहे. शहराच्या पूर्व भागातील प्रभाग क्र. १मधील विद्यमान नगरसेवक अनिल टिंगरे हे भाजपमध्ये दाखल होणारे नवे नगरसेवक ठरले आहेत. पक्षात दाखल होण्यापूर्वी त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, सोमवारी दुपारी त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, आमदार जगदीश मुळीक, आमदार योगेश टिळेकर, प्रदेश चिटणीस धीरज घाटे या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम तरुणांत जमातवाद ः पटेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘तरुण मुस्लिम पिढीमध्ये आधुनिक जमातवाद वाढत आहे. सर्व समस्यांचे निराकरण कुराणमध्येच आहे, असे या तरुणांना वाटते. त्यांच्या एका हातात कम्प्युटर आहे, पण दुसऱ्या हातात कुराण आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,' असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल यांनी रविवारी दिला.
साधना ट्रस्ट प्रकाशनातर्फे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई लिखित व मिलिंद चंपानेरकर अनुवादित ‘भारतातील मुस्लिम राजकारण’ आणि ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा लिखित व कुमुद करकरे अनुवादित ‘कालपरवा’ या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दलवाई यांच्या पत्नी मेहेरुन्निसा दलवाई, रामचंद्र गुहा, डॉ. हमीद दाभोलकर या वेळी उपस्थित होते. माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले अध्यक्षस्थानी होते.
पटेल म्हणाल्या, ‘जगात अस्वस्थता निर्माण झाली असून आजचा काळ प्रचंड उलथापालथीचा आहे. अमेरिकेत ट्रम्प यांचा उदय झाला आहे, तर आपल्याकडेही वेगळे लोक सत्तेत नाही. भारतासह जगात मुस्लिमद्वेष वाढत आहे. कट्टर मुस्लिम विचारांचा सखोलपणे आभ्यास करण्याची गरज आहे. देशाची फाळणी व मुस्लिम नेत्यांची भूमिका याची छाप दलवाईंच्या लिखाणावर दिसून येते.’
‘जगात दोन अब्ज लोक मुस्लिम आहेत. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी मुस्लिमांना हाकलून देण्याची भाषा सुरू केली आहे. आपल्या देशातील लोकांनाही ही मांडणी सोयीची आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यातील तेढ पेटती ठेवणे ही धूर्त राजकीय खेळी आहे,’ याकडे केतकर यांनी लक्ष वेधले. ‘गुहा इतिहासकार आहेत, पण ते केवळ इतिहास सांगत नाहीत. ते इतिहासाच्या अनुषंगाने समकालीन संदर्भ आणि घडामोडींवर भाष्य करतात. ते राजकीय भूमिका घेतात, पण पक्षीय भूमिका घेत नाहीत,’ अशा शब्दांत केतकर यांनी गुहा यांच्या लेखनाचा वेध घेतला. सूत्रसंचालन विनोद शिरसाठ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवासवर्णन लिहावे

$
0
0

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पूर्वी परदेशात गेलेल्या भारतीयांना भारतीय खाद्यपदार्थ मिळविण्यासाठी धडपडावे लागे. आता जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही, जिथे भारतीय राहात नाहीत. त्यामुळे आपले भाषण ऐकायला लोक येतील की नाही, ही भीती पंतप्रधानांना वाटत नाही. २०१९ मध्ये निवृत्त झाले तर त्यांनीही एखादे प्रवास वर्णन लिहावे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्या परदेशवारीची खिल्ली उडवली.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे ज्योती दाते लिखित ‘दुनिया रंगबिरंगी’ या प्रवासवर्णन पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले, मीरा बडवे, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, ‘उत्कर्ष’चे सु. वा. जोशी व लेखिका दाते या वेळी उपस्थित होते.
‘अडीच कोटी भारतीय देशाबाहेर राहतात. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना ‘भारतीय’ असेच म्हटले जाते. सीरिया, इराक या देशांतील नागरिकांप्रमाणे ते स्थलांतरित ठरत नाहीत. प्रत्येक देशात राहणारे भारतीय वेगळे आहेत. त्यांची स्वतंत्र जीवनशैली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची भौतिक प्रगती जलद गतीने झाल्याने, तिथे अध्यात्माचे पेव फुटले आहे,’ याकडे केतकर यांनी लक्ष वेधले.
‘प्रवासवर्णन हा साहित्यातील निसरडा प्रकार आहे. प्रवासवर्णन हे भौगोलिक किंवा काय खाल्ले यांची जंत्री होण्याचा धोका असतो. चांगले प्रवास वर्णन हे नुसते प्रवासाचे वर्णन नसते. ते प्रवासातल्या माणसांचे केलेले वर्णन असते. अशा व्यक्तींची सोबत हा महत्त्वाचा भाग असतो. प्रवासवर्णनाकडे गुलाबी चष्म्यातून पाहण्याची पद्धत असते,’ असे गोडबोले यांनी सांगितले. अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांसाठी ‘फर्निचर मार्केट’

$
0
0

नांदेड सिटी रस्त्यावर गृहसजावटीसाठी विविध बजेटमधील पर्याय उपलब्ध
Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaMT
पुणे : घराला आकर्षक रूप देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ते सजवण्याकडे अनेकांचा कल असतो. घरात उपलब्ध असलेल्या जागेत जागेला शोभेल अशा प्रकारचे फर्निचर केले की घर उठून दिसते. पुणेकरांची ही आवड लक्षात घेऊन पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा फर्निचरचे एक मार्केट भरले आहे. मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये बसणारे आणि आकर्षक असे फर्निचर या मार्केटमध्ये उपलब्ध असून, त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पुण्यातील शहर आणि उपनगर परिसरात इमारतींची संख्या वाढत असून फ्लॅटमध्ये राहणाऱ्या पुणेकरांची संख्या मोठी आहे. त्यांच्या घरात उपलब्ध होणारी जागा लक्षात घेऊन त्यासाठी विविध प्रकारच्या फर्निचरचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकारचे फर्निचर नांदेड सिटीजवळ असणाऱ्या बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये लाकडी कपाट, लोखंडी कपाट, किचन ट्रॉली, वॉर्डरोब, सिंगल डबल बेड, शूज स्टँड, डायनिंग टेबल, स्टडी टेबल, सोफा सेट, आकर्षक खुर्च्या, भिंतीला टांगता येणारे आणि गॅलरीत लावता येणारे झोके, शोकेस असे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. मध्यमवर्गीयांच्या बजेटप्रमाणेच त्यांची बनावट करण्यात आलेली आहे. त्यामुळे ब्रँडेड फर्निचरला बक्कळ पैसे खर्च करण्यापेक्षा त्यापेक्षा निम्म्या किंमतीत ग्राहकांना फर्निचर उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी असलेल्या वस्तूंना मागणी वाढली आहे. या बाजारात उपलब्ध असणाऱ्या सर्वच वस्तू हे व्यापारी स्वतः तयार करत असल्याने इतर ठिकाणांपेक्षा तुलनेने येथील फर्निचर स्वस्त आहे. त्याशिवाय फर्निचर खरेदी केल्यानंतर ते लावून देण्याची व्यवस्थाही व्यापाऱ्यांमार्फत होत असल्याने ग्राहकांची डोकेदुखी आणखी कमी होते. ग्राहकांच्या मागणीनुसार फर्निचर तयार करून द्यायची व्यवस्थाही येथे आहे.
पुण्याच्या आजूबाजूला वाढणारा परिसर लक्षात घेऊनच या मार्केटची निर्मिती झाली आहे. पूर्वी टिंबर मार्केटच्या परिसरात आणि शहरात झालेल्या ब्रँडेड शोरूम्समधून फर्निटरची खरेदी केली जात होती. आता मात्र अनेक ठिकाणी छोटी छोटी फर्निचर मार्केट उदयास येत आहे. नांदेड सिटीच्या परिसरात असलेले हे फर्निचरचे मार्केट त्यातीलच एक मार्केट आहे. इथे फर्निचरमधील नवे प्रकार उपलब्ध असल्याने ग्राहकांचा राबता या मार्केटकडे वळलेला आहे. सोफा कम बेड हा सोफ्याचा प्रकार लाकडी आणि लोखंडी अशा दोन प्रकारांमध्ये केला जातो. त्याची एक बाजू उघडली की त्याचा डबल बेड तयार होतो. या प्रकाराला मागणी प्रचंड आहे. त्यामुळे या मार्केटमध्ये विविध प्रकारचे सोफा कम बेड उपलब्ध आहेत. घराबाहेर भिंतीवर टांगता येणारे आणि कमी जागेत मावणारे लोखंडी शूज रॅक बाजारात दाखल झाले आहे. घराबाहेरील भिंतीला ते सरळ बसवता येत असल्याने त्यासाठी जागा अत्यंत कमी लागते. त्यामुळे त्याचे देखील आकर्षक प्रकार येथे उपलब्ध करण्यात आलेले आहेत. फायबरमध्ये तयार केलेल्या आराम खुर्च्या, आकर्षक दिसणारे आणि घराला मॉडर्न लूक देणारे सोफासेटही या ठिकाणी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. या सगळ्या गोष्टी ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये होलसेलच्या दरात मिळत असल्याने हे मार्केट तेजीत सुरू आहे. ५०० ते १००० रुपयांपासून ते एक लाखापर्यंतचे सर्व प्रकारचे फर्निचर या मार्केटमध्ये उपलब्ध होत असल्याने पुणेकरांसाठी हे मार्केट एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमदार आदर्श गाव’ कागदावर

$
0
0

निधी न मिळाल्याने विकासकामांना मुहूर्त नाही; खेड तालुक्यात नाराजी
अतुल काळे, राजगुरुनगर
केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम’च्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श गाव योजना’ सुरू होऊन वर्ष होत आले. परंतु राज्य सरकारच्या निष्क्रिय व उदासीन भूमिकेमुळे खेड तालुक्यांतील आदर्श गाव बनविण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा विकासकामांना अद्यापही मुहूर्तच मिळालेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आमदारांकडून याबाबत पाठपुरावा केला जात नसल्याचे समजते.
खेड तालुक्यातील तब्बल चार गावे ‘आदर्श गाव योजने’अंतर्गत शिवसेनेच्या चार आमदारांनी दत्तक घेतलेली आहेत. ही सर्व गावे तालुक्याच्या पश्चिम भागातील आहेत. यामध्ये भामा आसखेड धरणालगतचे धामणे गाव शिवसनेचे स्थानिक आमदार सुरेश गोरे, चासकमान धरणांतर्गत साकुर्डी
गाव पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, तळवडे गाव चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी, तर कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी वांद्रे गाव दत्तक घेतलेले आहे.
या चार गावांसाठी एकूण तेरा कोटींपेक्षा अधिक रकमेचा विकास आराखडा बनविण्यात आलेला आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळालेली आहे. परंतु संबंधित विविध यंत्रणांनी अद्यापही प्रस्तावित विकास आराखड्यातील कामांचे अंदाजपत्रक तयार केलेले नाही. अंदाजपत्रक तयार न केल्यामुळे त्याला प्रशासकीय मान्यता मिळू शकलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा फटका या चांगल्या योजनेला बसला आहे.
खेड्यांचा सर्वांगीण व परिपूर्ण विकास व्हावा, यासाठी शहरी भागातील आमदारांनी एखादे गाव दत्तक घ्यावे, असा या योजनेमागचा हेतू आहे. परंतु वर्षभराच्या काळात योग्य तो पाठपुरावा न झाल्यामुळे ही आदर्श गाव योजना केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. मुळातच पुरेशा निधीचा अडसरदेखील या आदर्श गाव योजनेत आहे. कारण या योजनेअंतर्गत करावयाच्या कामांसाठी स्वतंत्र अशा निधीची तरतूद नाही.
जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा अन्य शासकीय यंत्रणेंच्या माध्यमातून विविध गावांमध्ये जी विकासकामे केली जातात, त्या विकासकामांमधून प्राधान्याने आदर्श गावांचा विचार करून तेथे अधिक कामे करावीत, असे या योजनेत अंतर्भूत आहे. परंतु गटातटांच्या राजकारणामुळे इतर गावांचा विकासकामांचा निधी प्राधान्याने आदर्श गावांना देण्यासाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य सहजासहजी कसे तयार होतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने आदर्श गाव योजनेसाठी वेगळा निधी द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत ‘राष्ट्रवादी’चा रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती
‘केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील गरीब शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. काहींना स्वतःच्या पैसा मिळवण्यासाठी आपला जीव गमवावा लागला आहे. नोटाबंदी शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोटाबंदी विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसने कारभारी सर्कल चौकात निदर्शने करून रास्ता रोको केले.
सर्व ग्रामीण भागात सामान्यांना पुरेसा पैसा मिळत नाही. ग्रामीण भागातील बँका सहकार्य करत नाही. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना लागणारा पैसा उपलब्ध होत नाही. केंद्र व राज्य सरकार लक्ष देत नसल्याने पन्नास दिवसानंतरही शेतकऱ्यांना स्वतः पैसा मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
नोटबंदी आंदोलकांना मुबई पोलिस अधिनियम ६८/६९ प्रमाणे कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी निवेदन देऊन वेळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी फोटोसाठी हुल्लडबाजी केल्याचा प्रकार पाहावयास मिळाला.
...
सासवडमध्ये रास्ता रोको
सासवड ः ‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे कष्टकरी, शेतकरी, कामगार महिला उघड्यावर आल्या आहेत. अदानी-अंबानी-मल्ल्यांसारख्या धनदांडग्यांची कर्जे बुडीत खात्यात जमा करणारा निर्णय किती चुकीचा होता, हे आता मतदार आगामी निवडणुकांमधून दाखवून देतील. त्यासाठी प्रदीर्घ आंदोलनाची तयारी लोकांनी ठेवावी,’ असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सासवड येथील रास्ता रोको आंदोलनात केले. सासवड पालिकेसमोरील राष्ट्रवादीने नोटाबंदीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. या प्रसंगी बँक ऑफ इंडियाच्या बंद एटीएम केंद्रास पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​माउंटन ब्रिज विकसित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उंच बर्फाच्छादित पर्वतराजीवर कार्यरत असलेल्या जवानांचे दळणवळण सोपे करण्यासाठी तात्पुरत्या पुलाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. डीआरडीओच्या दिघी येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने हा (आर अँड डीई) माउंटन फूट ब्रिज विकसित केला आहे. या पुलाच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून सध्या हे तंत्रज्ञान हस्तांतराच्या टप्प्यावर आहे.
युद्धकाळात सैन्याची हालचाल वेगाने होणे आवश्यक असते. मात्र, पर्वतांदरम्यान असलेल्या छोट्या मोठ्या दऱ्या, नदी, बर्फ यामध्ये अडथळा ठरते. त्यावर हा पूल पर्याय ठरू शकतो. या पुलाच्या माध्यमातून ३५ मीटर अंतराची दरी दूर होऊ शकते. हा पूल बर्फावरही उभारता येऊ शकतो आणि नव्याने झालेली बर्फवृष्टीही काही प्रमाणात सहन
करू शकतो.
‘एक पूल हा ३५ मीटर लांबीचा असून त्यामध्ये २४ पॅनेल आहेत. पुलाच्या प्रत्येक भागाचे वजन हे १८ किलोपेक्षा कमी असल्याने हा पूल सुटा करून सहज वाहून नेला जाऊ शकतो. सुमारे ३० जवानांना हा पूल उभा करण्यासाठी दोन तास लागतात. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्येही या पुलाचा वापर करता येऊ शकतो. नुकत्याच आलेल्या काही नैसर्गिक आपत्तींमध्ये या पुलांचा यशस्वीरीत्या वापर झाला. लष्कराबरोबरच निमलष्करी दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलालाही हा पूल उपयुक्त ठरेल,’ अशी माहिती आर अँड डी ई चे तांत्रिक अधिकारी एल. एन. भोसले यांनी दिली.
अॅल्युमिनियम संयुगांचा वापर करण्यात आला असल्याने हा पूल भक्कम असला, तरी त्याचे वजन कमी आहे. या पुलाची चाचणी सियाचिनसह आसामचा सीमावर्ती भाग आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून सध्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान हस्तांतराच्या टप्प्यात आहे. त्यानंतर या पुलाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन लष्करी तुकड्यांना वापरासाठी
उपलब्ध होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​शाळांना मूल्यमापनासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या तसेच सर्व शैक्षणिक मंडळांशी संलग्नित प्राथमिक व माध्यमिक शाळांनी ‘समृद्ध शाळा’ प्रकल्पामध्ये सहभागी होऊन २८ फेब्रवारीपर्यंत शाळेचे मूल्यमापन पूर्ण करायचे आहे. तसेच सर्व माहिती ‘स्कूल इव्हॅल्युएशन डॅशबोर्ड’वर भरणे अनिवार्य केले आहे. याबाबतचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.
शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे, यासाठी विविध राज्यांतील शैक्षणिक कृती प्रकल्पांचा अभ्यास करून राज्यात स्वतंत्रपणे समृद्ध शाळा प्रकल्प गेल्या वर्षी राबवण्यात आला. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावनिक आणि बौद्धिक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या शाळांनी चांगल्या पद्धतीने शाळा सिद्धी उपक्रमाची अंमलबजावणी केली त्यांना नुकतेच ‘एसए (शाळा सिद्धी) ’ या विशेष प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.
यावर्षीदेखील या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कार्यपद्धती तयार करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. यानुसार सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांनी २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांची माहिती ‘स्कूल इव्हॅल्युएशन डॅशबोर्ड’वर भरणे शाळांना अनिवार्य केले आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्हास्तरावरील व तालुक्यातील ज्या शाळांनी शाळा सिद्धी कार्यक्रमाकरिता नोंदणी केली आहे, त्यांची माहिती विद्याप्राधिकरणाला वेळोवेळी डॅशबोर्डवरून उपलब्ध करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शाळांची अंतर्गत मूल्यमापनाची माहिती विद्या प्राधिकरणाला मिळेल. संबंधित माहिती डॅशबोर्डवर भरणाऱ्या शाळांना विविध श्रेण्यांचे वाटप करण्यात येईल. यामध्ये ज्या शाळा ‘अ’ श्रेणी मिळवतील अशाच शाळांची विद्याप्राधिकरणाच्या वतीने बाह्य मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्राधिकरणाने पार पाडलेल्या अंतर्गत व बाह्य मूल्यमापनाच्या प्रक्रियेच्या आधारे शाळांना ‘समृद्ध शाळा २०१६-१७’ या प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती
निर्णयात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकी भरल्यास ‘ऑनलाइन’ सवलत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मिळकतकराची थकबाकी ‘ऑनलाइन’ भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात सूट देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने पुढे ढकल्यानंतरही महापालिका आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात थकबाकी भरणाऱ्यांना दंडावर पाच टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. येत्या बुधवारपासून (११ जानेवारी) मार्च अखेरपर्यंत संपूर्ण थकबाकी ऑनलाइन स्वरूपात एका वेळी भरणाऱ्या मिळकतकर दात्यांना ही सवलत लागू असेल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षभरात ऑनलाइन स्वरूपात कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, केंद्र सरकारनेही कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन स्वरूपात कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात पाच टक्के सूट देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. सर्वसाधारण सभेत रोख आणि ऑनलाइन स्वरूपाचा भरणा करणाऱ्या नागरिकांमध्ये तफावत करणे चुकीचे होईल, अशी भावना व्यक्त करून हा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलण्यात आला होता. कराबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सर्वसाधारण सभेला असले, तरी दंडाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना असल्याने थकबाकीदारांच्या दंडावर सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपूर्ण थकबाकी ऑनलाइन स्वरूपात भरणाऱ्यांनाच ही पाच टक्के सवलत लागू असेल, अशी माहिती मिळकतकर विभागप्रमुख सुहास मापारी
यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नोकरीच्या आमिषाने सीएची दीड लाखांची फसवणूक

$
0
0

पुणे ः एका नामांकित खासगी कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सनदी लेखापालची (सीए) एक लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रमोद ठाकूर (वय ३३, रा. बुधवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रिषभ मेहता व अमलेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ जून ते आठ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ठाकूर यांच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांना एका नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून एक लाख ६६ हजार रुपये घेतले. पण, त्यांना नोकरी लावली नाही. या प्रकरणी पोलिस निरीक्षक जे. डी. पायगुडे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका दिवसात २६८ मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा आणि कोथरूड या दोन विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी झाल्या. या दोन्ही मतदारसंघात इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याने एका दिवसांत तब्बल २६८ जणांच्या मुलाखती झाल्या.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वांच्या मुलाखतींना रविवारपासून प्रारंभ झाला. इतर सर्व पक्षांच्या तुलनेत शक्तीप्रदर्शन टाळून शिस्तबद्ध पद्धतीने मुलाखतींचा पहिला दिवस गाजला होता. सोमवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या मुलाखतींमध्ये शिस्त कायम होती; पण त्याचबरोबर अनेक विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी या मुलाखतींमध्ये सहभागी झाले होते.

महापालिकेच्या प्रभाग क्र ११ ते २० या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सोमवारी पूर्ण झाले. या दहा प्रभागांमध्ये बहुतांश भाग कसबा आणि कोथरूड या दोन विधानसभा मतदारसंघांचा होता. या दोन्ही ठिकाणी भाजपचे प्राबल्य असून, सध्या महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांमध्ये सर्वाधिक संख्या याच भागातील आहे. त्यामुळे, पालिकेतील गटनेते गणेश बिडकर, माजी गटनेते अशोक येनपुरे, नगरसेवक हेमंत रासने, दिलीप काळोखे, विष्णू हरिहर, बापू कांबळे, नगरसेविका मुक्ता टिळक, नीलिमा खाडे, प्रतिभा ढमाले, माधुरी सहस्रबुद्धे, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, मुरलीधर मोहोळ, शाम सातपुते, दिलीप उंबरकर अशा अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

पहिल्या दिवशी सुमारे १८० नगरसेवकांच्या मुलाखती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाखतींचा वेग वाढल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत २७० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आज, मंगळवारी हडपसर आणि पर्वती मतदारसंघांतील (प्रभाग क्र. २१ ते ३०) मुलाखती घेण्यात येणार आहेत.


दोन्ही खासदार अनुपस्थित

शहराचे खासदार अनिल शिरोळे आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे पहिल्या दिवशी पूर्ण वेळ उपस्थित होते; परंतु दुसऱ्या दिवशी दोन्ही खासदार अनुपस्थित होते. शिरोळे बैठकीसाठी दिल्लीला गेले होते, तर काकडे यांना काही महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने मुंबईला जावे लागल्याने ते उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी आणि बुधवारी मुलाखतींसाठी दोन्ही खासदार उपस्थित असतील, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताई-दादा उतरले रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वाजलेले बिगुल आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची होणारी आगेकूच रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या थेट रस्त्यावर उतरले आहेत. दौंड येथे तर सुळे यांना रास्ता रोको केला म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई करत काही वेळाने सोडून दिले.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा आणि पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. पुणे वगळता इतर दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला येथे फटका बसला होता. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजप मुसुंडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘अजितदादा’ आणि ‘सुप्रियाताई’ यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नोटाबंदीच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात पुण्यात अजितदादा यांनी आंदोलन केले. तर, दौंड, सासवड आणि इतर परिसरात आंदोलनाची धुरा सुप्रियाताई सांभाळली.

सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील चौफुला येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सुळेंच्या सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी सुळेंना मुंबई पोलिस कायदा कलम ६९ नुसार ताब्यात घेऊन सोडून दिले. सत्तेवर बसवण्याचा अधिकार नागरिकांना आहे; तसाच सत्ता राबविणारे चुकीचे वागले, तर त्यांना खाली खेचण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे, अशी शब्दात त्यांनी टीका केली.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मंडईतील टिळक पुतळा येथे जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. ‘बड्या घोषणा, पोकळ दावे, अर्थव्यवस्थेचे निघाले दिवाळे’, यांसारख्या घोषणांनी मंडईचा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ‘दादा आणि ताई’ या दोघांनीही रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलद शिक्षण धोरणाची आखणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी व सर्व शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जवळीकता साधता येण्यासाठी राज्य सरकारने आता ‘जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाची आखणी केली आहे.

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ची वाटचाल धीम्या गतीने होत असल्याचे आता ‘जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाची आखणी केली आहे. याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सोमवारी घेतला. राज्यात जून महिन्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी आखणी करण्यात आली. त्यानुसार शाळांमध्ये अपेक्षित बदल दिसून आले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळांच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर केवळ १५ हजार प्राथमिक शाळा, तर ४ हजार उच्च प्राथमिक शाळा प्रगत झाल्या. यामध्ये त्यांना प्राथमिक शाळांची प्रगती खूपच कमी असल्याचे लक्षात आले. यावर तात्काळ निर्णय घेऊन शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाऐवजी ‘जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ’ कार्यक्रमाची अंमलबजावणीचा आदेश देण्यात आला.

या माध्यमातून आता प्रगत शाळांना भेटी देणे, राज्यातील सर्व शाळांतील वर्ग डिजिटल करणे, १०० टक्के शिक्षकांना तंत्रस्नेही करणे, ई-साहित्य निर्माण करून त्याचा शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावी वापर करणे, वर्गातील मुलांचे संकल्पनिहाय संपादणुकीच्या विश्लेषणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे अशा कार्यक्रमांचा अवलंब करावा लागणार आहे. याबरोबरच सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, शाळाबाह्य मुलांना शोधून गुणवत्ता वाढवून शाळेत टिकविणे, स्थलांतरित होणाऱ्या मुलांची ‘सरल’ प्रणालीमध्ये १०० टक्के नोंद करणे, अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

व्हॉट्स अॅपद्वारे बदल

शिक्षण विभागात ‘व्हॉट्‌स अॅप’ सारख्या माध्यमाचा वापर करून मोठ्या प्रमाणात विविध बदल करण्यात आले. परंतु, या माध्यमाचा वापर करताना सदस्य संख्या २५६ असल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे राज्यातील सर्व शिक्षक व अधिकारी यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. यावर उपाय म्हणून आता एक स्टेप या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार आहे. याच्या वापरातून राज्यातील सर्वच शिक्षक आणि अधिकारी यांना एकाच ग्रृपमध्ये सहभागी होता येणार आहे. या माध्यमाला कोणतीही सदस्य संख्येचे मर्यादा राहणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’ चालकांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराची ‘लाइफ लाइन’ असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसच्या एक हजार चालकांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’तर्फे (आयडीटीआर) वाहतुकीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये वाहन चालविण्याच्या प्राथमिक नियमांपासून चालकाचे डोळे आणि क्षमतांची तपासणीही केली जाणार आहे.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ९ ते २३ जानेवारी या कालावधीत पीएमपीच्या सर्व डेपोंमध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत टाटा मोटर्स व काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘आयडीटीआर’मध्ये चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टाटा मोटर्सकडून २५० चालकांच्या प्रशिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ७५० चालकांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.
त्या बरोबरच रस्ता सुरक्षा सप्ताहात आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांच्या मदतीने डेपोत कार्यक्रम घेणे, गेट मिटींग आयोजन करणे, बसवर प्रबोधनात्मक स्टीकर लावणे, सेवाभावी संस्थांद्वारे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, चालकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग, गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे, सिग्नल तोडणे या बाबत जागृती करणे, बसला हेड लाइट, टेल लाइट, इंडिकेटर्स, ब्रेक लाइट, रिफ्लेक्टर, ब्रेक चेकिंग प्रणाली इत्यादी आवश्यक असते. त्याचे महत्त्व समजावून सांगितले जाणार आहे, असेही वाघमारे यांनी सांगितले.
ट्रीप रद्द, ब्रेक डाउन, वक्तशीरपणा इत्यादींबाबत आणि एकूणच परिवहन सेवा सुधारणेसाठी सर्व डेपो मॅनेजर यांच्या उपस्थितीत स्टार्टर, कंट्रोलर, चेकर, वाहतूक निरीक्षक, गॅरेज सुपरवायजर, टाइम कीपर यांची एकत्रित बैठक रविवारी स्वारगेट येथील पीएमपीच्या प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजिण्यात आली होती. या बैठकीत सद्य परिस्थिती आणि आवश्यक सुधारणा या विषयी चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी हॉस्पिटलांची दुरुस्ती आवश्यकच

$
0
0

हिम्मतराव बाविसकरांचे मत; नातू पुरस्कार वितरित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्यातील सरकारी रुग्णालये एका अर्थाने मंदिरे आहेत. मात्र या मंदिरांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्याठिकाणी गेल्यानंतर आपला देश किती बरबटलेला आहे, याची प्रचिती येते. सरकारने त्वरित सरकारी रुग्णालयांची दुरुस्ती हाती घेणे अत्यावश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बाविसकर यांनी व्यक्त केले.
नातू फाउंडेशनतर्फे प्रसिद्ध सर्जन डॉ. धनंजय केळकर यांना डॉ. बाविसकर यांच्या हस्ते महादेव बळवंत नातू स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. सुरेश डंबोळे यांना सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या वेळी बाविसकर यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या अवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त दत्ता टोळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्र. ल. गावडे आदी या वेळी उपस्थित होते.
‘सरकारी हॉस्पिटल्सची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्याउलट खासगी हॉस्पिटल्समध्ये पैशांच्या जोरावर अत्याधुनिक सुविधांचा भडिमार केला जातो. पेशंटला गरज नसतानाही त्याच्या मागे उपचारपद्धतींची जंत्री लावली जाते. उगाचच पैसे एमआरआय, सिटी स्कॅनसारख्या खर्चिक तपासण्या करायला सांगून नफा वाढवला जातो. डॉक्टरांनीच असे केले तर समाजाची उन्नती कशी होणार,’ असा सवाल बाविसकर यांनी उपस्थित केला. गडचिरोलीसारख्या भागातील आदिवासींचा विकास करायचा असेल तर त्यांना पैसा, कपडे, अन्न देण्यापेक्षाही चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे याकडेही बाविसकर यांनी लक्ष वेधले.
डॉ. केळकर म्हणाले, ‘देशातील तरुणांनी आधी देश, नंतर संस्था आणि मग स्वतःचा विचार करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने त्याच्या नेमके त्याच्या उलट होत आहे. समाजातील डॉक्टरही आधी स्वतःचा विचार करत आहेत. अशाने देशाचा विकास घडणार नाही.’ गडचिरोलीसारख्या भागात आजही अनेक समस्या आहेत. तेथे डॉक्टरपेक्षाही पुजाऱ्यांना, मांत्रिकांना अधिक महत्त्व दिले जात होते. काही पुजाऱ्यांनी तर, डॉक्टरांसारखी ओपीडी उघडलेली आहे. त्यामध्ये आदिवासींवर उपचार केले जात होते; त्यांच्यावर मंत्र टाकले जायचे. आता ही परिस्थिती बदलली असून, गडचिरोलीतील सेवाकार्याला चांगले दिवस आले आहेत, असे डॉ. डंबोळे यांनी नमूद केले. कार्यक्रमात सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या अनेक संस्थांना अर्थिक मदत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅट’मध्ये राज्याची सरशी

$
0
0

पुण्यातून यश चौधरी, पॅट्रिक डिसुझाने पटकावले स्थान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

व्यवस्थापन शाखेचे शिक्षण घेण्यासाठी नावाजलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये (आयआयएम) प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (कॅट) निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत वीस जणांना १०० पर्सेंटाइल मिळाले असून, त्यामध्ये राज्यातून यश चौधरी आणि पॅट्रिक डिसुझा यांनी स्थान पटकाविले आहे. यश पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीओईपी) विद्यार्थी आहे.
कॅट परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्यांमध्ये यंदा मुलांचे प्रमाण अधिक असून, बहुसंख्य जण इंजिनीअर आहेत. यशने टाइम संस्थेतून प्रशिक्षण घेतले आहे, तर पॅट्रिकने कोचिंग अॅकॅडमीतून प्रशिक्षण घेतले आहे. यश विमान नगर परिसरात राहत असून, सीओईपीमध्ये इलेक्ट्रिकल शाखेत अंतिम वर्षात शिकत आहे. गणिताची आवड असल्यानेच पदव्यत्तुर शिक्षण व्यवस्थापनात शाखेत फायनान्समध्ये घेण्याचे त्याने ठरवले. देशातील टॉपच्या म्हणजचे ‘आयआयएम’मधून एमबीएचे शिक्षण घेण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार जूनपासून कॅट परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यासाबरोबरच ऑनलाइन ‘मॉक’ परीक्षा देण्यावर त्याने भर दिला. ठरावीक कालावधीत अभ्यास झाला की मॉक परीक्षा देत होतो. या परीक्षेचा अधिक फायदा झाला, असे यशने सांगितले.
आयआयएम बेंगळुरूने चार डिसेंबरला देशभरातील १३८ परीक्षा केद्रांवर कॅट परीक्षा घेतली. सुमारे १ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पुण्यातून १० ते १५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सोमवारी सकाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाइलवर मेसेज पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांना www.iimcat.ac.in या संकेतस्थळावर ‘लॉग इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ टाकून निकाल पाहता येणार आहेत. परीक्षा कठीण असून देखील चांगला निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षित कॉलेजला प्रवेश मिळेल असे टाइम पुणे संस्थेचे संचालक टी. जी. परम यांनी सांगितले. दरम्यान, आयआयटी चेन्नईतून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये अंतिम वर्षाला शिकणाऱ्या यश माहेश्वरीला ९९.९ पर्सेंटाइल मिळाले आहेत.

अभियांत्रिकीची आवड असल्याने या क्षेत्रात आलो. मात्र, आता अहमदाबादच्या प्रसिद्ध आयआयएममधून फायनान्समध्ये एमबीए करण्याची इच्छा आहे. कॅट परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळाले असल्याने तेथे प्रवेश मिळेल अशी आशा आहे.
- यश चौधरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साहित्यातून देशाची जडणघडण’

$
0
0

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत आज, मंगळवारी ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज सायंकाळी सहा वाजता कोथरूडमधील स्वामीकृपा हॉलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. संत साहित्याच्या अभ्यासाला कृतिशीलतेची जोड देणारे अभ्यासक अशी डॉ. कामत यांची ओळख आहे. अमृतमहोत्सवानिमित्त चिंतामणी पत्की यांनी डॉ. कामत यांच्याशी साधलेला संवाद

आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता?
प्रवास अतिशय आनंदाचा होता. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, चित्राव शास्त्री, महादेव शास्त्री व अमरेंद्र गाडगीळ अशा मोठ्या लोकांचा सहवास मिळाला. या व्यक्तींमुळे मला ग्रंथ संग्रह, वाचन व लेखन या चांगल्या सवयी जडल्या. माझा वैयक्तिक ग्रंथसंग्रह १५ हजार पुस्तकांचा आहे. तो सर्वांसाठी खुला आहे. शाहू व गरवारे कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नामदेव अध्यासन उभे करता आले याचा आनंद आहे. मला नातेवाइकांसारखे मित्र व मित्रांसारखे नातेवाइक मिळाले.

गुरुकुल प्रतिष्ठानची संकल्पना काय आहे?
जे काम विद्यापीठात करता आले नाही ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करतो. संत साहित्याचे आत्तापर्यंत ३५० प्रकल्प पूर्ण केले आहेत. विद्यार्थ्यांचे संशोधन प्रसिद्ध केले जाते. माझे काम विद्यार्थी पुढे नेताहेत याचा आनंद वाटतो.

आगामी प्रकल्प काय आहेत?
आणखी दहा वर्षे कार्यरत राहण्यासारखे माझे आरोग्य, स्मरणशक्ती आहे. पुढील पाच वर्षांत मोठ्या दहा ग्रंथांचे काम करणार आहे. चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांनी महाराष्ट्र धर्म घडवला. त्यांच्यामुळे मराठी अभिजात आहे. या संतांवर सहा ग्रंथ तयार करत आहे. त्यासाठी देश-परदेशातील ८० लोक सहाय्य करत आहेत. याशिवाय मिलिटंट इंडिया हा ग्रंथ मी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत लिहित आहे. शीख धर्मीयांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

संत साहित्य आणि देशातील परिस्थिती याचा संबंध कसा लावता येईल?
आपल्या देशाची जडण-घडण साहित्यातून झाली आहे. ती द्वेषातून झालेली नाही. संतांच्या विचारांमुळे आपले सहजीवन सुरू असून, लोकशाही त्याचेच रूप आहे.

विद्यापीठातील अध्यासनांविषयी काय वाटते?
अध्यासनांची अवस्था बघवत नाही म्हणून, तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत आहे. नामदेव अध्यासन उभे केले पण ते आज बंद पडल्याचे पाहून वाईट वाटते. कोणत्याही विद्यापीठात मराठी विभागाचे काम दिसत नाही. हे विभाग शिल्लक तरी आहेत का हा प्रश्न मला पडतो. लेखक, प्राध्यापकांना संस्कृत शिवाय समृद्धी नाही. मराठी, हिंदी व संस्कृत या भाषा आल्या पाहिजेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्याचा मृत्यू झाल्यानं तरुणाची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

लाडका कुत्रा मरण पावल्यानं त्याचा विरह सहन न झाल्यानं एका २२ वर्षीय तरुणानं सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. कनवर हर्षवर्धन सिंग राघव असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा छत्तीसगडमधील रायपूरचा रहिवाशी आहे. शिक्षणासाठी तो पुण्यात आला होता. सिम्बॉयीसिसच्या हॉस्टेलमध्ये सध्या तो राहत होता.

सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला राघव हा सुटी दरम्यान त्याच्या वडिलाचे मित्र कर्नल ठाकूर यांच्याकडे हडपसर जोंधळे येथे जात असत. सोमवारी त्याला सुटी असल्यानं तो नेहमीप्रमाणं ठाकूर यांच्याकडं आला होता. संध्याकाळी घरात कुणीच नसताना त्यानं सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टराने सांगितले. आत्महत्येपूर्वी राघवने एका वहीच्या पानावर चिठ्ठी लिहिली असून त्यात म्हटलं आहे की, ' बॉस्की' या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने त्याचा विरह सहन करु न शकल्यानं मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये, आई-वडिलांनीही मला माफ करावे, मी माझ्या बॉस्कीकडं जात आहे, असं राघवनं चिठ्ठीत लिहिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेः फ्लॅट बघताना तोल जाऊन महिलेचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

नव्या इमारतीत फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या महिलेचा १७व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. अनुश्री पांडे असं या महिलेचं नाव असून, त्यांचा मृत्यू अपघात आहे की घातपात, याचा तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

पुण्यात पौड फाटा येथे कुमार बिल्डर ४२ मजल्याची इमारत बांधत आहे. ती पुण्यातील आत्तापर्यंतची सर्वात उंच इमारत असल्याचं बोललं जातं. या इमारतीत १७व्या मजल्यावर एक फ्लॅट पाहण्यासाठी अनुश्री पांडे गेल्या होत्या. त्यावेळी तोल जाऊन त्या खाली कोसळल्या आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

घटनेची माहिती मिळताच, कोथरूड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अनुश्री यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवला. त्याचवेळी त्यांची ओळखही पटली. त्यांचं घर बावधन परिसरात असून त्यांचे कुटुंबीय या बातमीने हादरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images