Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे टळली मोठी दुर्घटना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
नॅशनल इन्स्टिट्यूट बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम)च्या अॅडमिनिस्ट्रेशनच्या कार्यालयाची स्वच्छता करताना स्वाती कुंजीर यांना धक्काच बसला... खोलीत अवघ्या पाच फुटांवर बेसिनखाली बिबट्या बसला होता. जीव मुठीत धरून त्या बाहेर पडल्या. तेथील कर्मचारी राजू सूर्यवंशी आणि सूर्यकांत दळवी यांना घडलेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी धाडसाने दरवाजा बंद करून कुलूप लावले. कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानपणामुळे मोठी दुर्घटना टळली.
कुंजीर या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्वच्छता करण्यासाठी संस्थेत आल्या होत्या. स्वच्छतेचे सामान घेण्यासाठी त्या वॉश बेसिनच्या खोलीत गेल्या, समोर वॉश बेसिनखाली मोठे कान आणि चमकणारे डोळे पाहिले. समोर दिसणारे मांजर नसून जंगलात राहणारा बिबट्या आहे, हा धक्का त्यांना सहन झाला नाही. क्षणात बाहेर येऊन त्या ओरडल्या. सूर्यवंशी आणि दळवी मदतीसाठी धावले. त्यांनी दरवाजाला कुलूप लावल्यामुळे बिबट्या जेरबंद झाले.
‘स्वसंरक्षणार्थ बिबट्याने ऑफिसच्या बाहेर पळ काढला असता तर वस्तीमध्ये मोठा गोंधळ उडाला असता,’ असे दळवी यांनी सांगितले. घडलेल्या प्रकारामुळे मात्र, स्वाती कुंजीर यांना थंडी भरून आल्यामुळे त्यांना लगेचच घरी पाठवले. घाबरल्यामुळे त्या दिवसभर घराबाहेर देखील पडल्या नाहीत. बिबट्या रात्रीच्या वेळेस संस्थेच्या परिसरात अन्नाच्या शोधात आला असावा. ही संस्था साठ एकर परिसरात विस्तारलेली आहे. शेजारी मोठ्या प्रमाणात वन भाग आहे. मात्र बिबट्या कोठून कसा आला हे समजलेले नाही, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भटक्या कुत्र्यांमुळे बिबट्या वस्तीत

$
0
0

उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘कोंढवा परिसरामध्ये बिबट्याच्या वास्तव्याची नोंद नाही. मात्र ‘एनआयबीएम’ला लागून असलेल्या टेकडीवर सासवड अथवा वाघोली - कानिफनाथ डोंगराकडून बिबट्या आला असण्याची शक्यता आहे. या भागात भटक्या जनावरांचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे खाद्याच्या शोधात तो संस्थेत शिरला असेल,’ असे वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले.
‘सकाळी आठच्या दरम्यान माझ्या सहकाऱ्यांना एनआयबीएममध्ये बिबट्या आल्याचा फोन आला, तेव्हा आमचा विश्वास बसला नाही. एवढ्या वस्तीत बिबट्या येणार नाही, असे पहिल्यांदा वाटले. पण सहकाऱ्यांनी खात्री केल्यावर तत्काळ पुढची कार्यवाही सुरू झाली. पकडलेला बिबट्या हा पूर्ण वाढ झालेला नर असून, सुदृढ आहे. साधारणतः तीन ते साडेतीन वर्ष त्याचे वय असेल. पहिल्यांदा तो खूप घाबरलेला होता. त्यामुळे कपाट आणि टेबलामागे लपून बसला होता. पण रेस्क्यू टीमने केलेल्या उत्तम नियोजनामुळे त्याला कोणतीही इजा न करता, पकडण्यात यश आले. वैद्यकीय तपासणी झाल्यावर आम्ही आज लगेच त्याला निसर्गामध्ये सोडणार आहोत,’ असे गुजर म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भटकी कुत्री आणि इतर जनावरे असल्याने बिबटे मानवी वस्ती शेजारी वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वीच दौंडमध्ये आम्ही बिबट्याला ताब्यात घेतले होते. भटकी कुत्री हे त्यांच्यासाठी सहज सोपे खाद्य ठरत असल्याने त्यांचा वस्तीजवळचा वावर वाढतो आहे, अशी माहिती गुजर यांनी दिली.
........
वनाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे बिबट्या सुरक्षित
‘वन विभाग आणि पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवल्याने रेस्क्यू टीमच्या कामात अडथळा आला नाही. डॉ. अंकुश दुबे यांनी सहकाऱ्यांनी उत्तम पद्धतीने परिस्थिती हाताळली, त्यामुळे बिबट्याला इजा न करता पकडणे शक्य झाले.. वाघोलीजवळील केसनंद भागात काही बिबट्या वास्तव्यास आहेत. एखाद्या कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबट्या रस्ता चुकून या परिसरात आला असण्याची शक्यता आहे,’ असे प्राणी अनाथालयाचे प्रमुख नीलमकुमार खैरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या सुरक्षित अन् नागरिकही...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘एनआयबीएम’च्या ऑफिसमध्ये बिबट्या आहे, याची खात्री पटल्यावर वन विभागाची सूत्रे हलली. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्यप्राणी अनाथालयाची रेस्क्यू टीम तातडीने दाखल झाली. घटनास्थळापासून नागरिकांना दूर ठेवून वन विभागाचे अधिकारी, पोलिस आणि डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या नियोजनबद्ध कारवाईमुळे बिबट्याला विनाजखम सुरक्षित पकडणे शक्य झाले. तीन तासांच्या या ऑपरेशनमध्ये नागरिकांचीही गैरसोय झाली नाही.
विविध शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांमध्ये रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याचे खूप प्रकार घडले आहेत. या अनुभवातून धडा घेत पुणे वन विभाग आणि पोलिसांनी संस्थेच्या हाेस्टेलमधील विद्यार्थ्यांना घटनास्थळापासून दूर केले. ‌बिबट्याचे फोटो मिळविण्यासाठी लोकांची धडपड सुरू होती; मात्र पोलिसांनी कोणालाही पुढे येऊ दिला नाही. प्रसिद्धी माध्यम आणि स्थानिक नागरिकांना ठरवून गेटच्या बाहेर ठेवण्यात आले. बिबट्याला पिंजऱ्यात ठेवून गाडी गेटच्या बाहेर गेल्यानंतर लोकांना संस्थेच्या आवारात फिरण्याची मुभा देण्यात आली.
रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बिबट्या आक्रमक झाला होता. कार्यालयात जरी त्याला बंद केले असले, तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून लोकांना दूर ठेवल्यामुळे रेस्क्यू टीमला शांततेत काम करणे शक्य झाले. बिबट्या टेबल, खुर्च्यांखाली लपत असल्यामुळे टीमचे त्याच्यावर नेम धरण्याचे तीन ते चार प्रयत्न अयशस्वी ठरले. नंतर इंजेक्शन अचूक बसल्यामुळे बिबट्या बेशुद्ध झाला. वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ पिंजरा ऑफिसच्या दरवाजाजवळ नेऊन बिबट्याला पिंजऱ्यात ठेवले. मात्र, पिंजरा कापडाने झाकल्यामुळे लोकांना बिबट्या ‌दिसला नाही.
..............
मोबाइलमध्ये ‘अडकलाच’ नाही
प्रसिद्धी माध्यमांमुळे संस्थेत बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अवघ्या तासाभरात संस्थेच्या मुख्य गेटच्या बाहेर बघ्यांनी गर्दी केली. खरंच बिबट्या आहे की मांजर, इथपासून ते त्याला पकडण्यासाठी वन विभाग आत काय काय करत असेल, पूर्वी या भागात अनेक बिबटे होते, पण वस्तीमुळे ते गायब झाले, अशा विविध विषयांवर या नागरिकांच्या गप्पा रंगल्या होत्या. दुपारी दीडच्या दरम्यान एका सुरक्षारक्षकाला बिबट्या पकडला गेला, अशी माहिती मिळाल्याचे कळताच सर्वांनी मोबाइल बाहेर काढले, बिबट्याची गाडी जाईल तेव्हा तरी फोटो काढायला मिळतील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, गाडीत पिंजरा पूर्ण झाकलेला असल्याने कोणालाही फोटो टिपता आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी जमिनींवर होणार हॉटेल्स

$
0
0

हेरिटेज पॉलिसी अंतर्गत किल्ल्यांजवळील जमिनींचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्य सरकारने २०१७ हे ‘पर्यटन वर्ष’ म्हणून जाहीर केले असून, पर्यटनाला चालना देण्यासाठी हेरिटेज पॉलिसी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे ४५० किल्ल्यांजवळ असलेल्या सरकारी जमिनींवर हॉटेल आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.’ असे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

‘राज्यात जास्तीत जास्त पर्यटक यावेत, यासाठी आगामी वर्षभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यानुसार हेरिटेज पॉलिसी तयार करण्यात आली आहे. राज्यात सुमारे ४५० किल्ले आहेत. ते किल्ले पुरातत्त्व खात्याकडे आहेत. या किल्ल्यांच्या जवळ सरकारी जमिनी आहेत. त्या ठिकाणी हॉटेल आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्याचा विचार आहे. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतील.’ असे रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, ‘पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे, मुंबई आणि लोणावळा या ठिकाणी ‘वेलनेस सेंटर’ विकसित केले जाणार आहेत.’ ‘सोलापूर येथे पर्यटन विभागाच्या वतीने हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येणार आहे.’ असेही त्यांनी सांगितले.

कोकण पर्यटन विकास महामंडळ

‘कोकणामध्ये पर्यटकांची संख्या वाढवण्याबरोबर विविध योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या धर्तीवर (एमटीडीसी) कोकण पर्यटन विकास महामंडळ हा स्वतंत्र विभाग कार्यन्वित करण्यात येणार आहे. या विभागाकडून कोकणातील पर्यटन वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील.’ असे पर्यटनमंत्री रावल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणित झाले सोपे

$
0
0

विविध मॉडेल्सद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडली प्रमेये, भूमितीच्या संकल्पना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बीजगणिताचे फॉर्म्युले, भूमितीच्या संकल्पना आणि गणितातील विविध प्रमेये आदींची माहिती गणिताच्या मॉडेल्सद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेऊन शनिवारी समाधान व आनंद व्यक्त केला. याशिवाय गणित हा विषय समजावून घेतल्यास अतिशय सोपा आहे आणि त्यात गुण देखील चांगले मिळवता येतात, याची प्रचिती देखील विद्यार्थ्यांना आली.
शालेय विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण व्हावी, त्यांनी हसत-खेळत गणित सोडवावे, तसेच गणिताचा प्रसार-प्रचार व्हावा, या उद्देशाने एसपी कॉलेजच्या गणित विभाग आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे हे गणिताचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात मांडले जाणारे मॉडेल्स खास अहमदाबाद येथील ‘इस्रो’च्या विक्रम साराभाई सेंटरहून आणली आहेत. प्रदर्शनात सुमारे ४० मॉडेल्स मांडण्यात आली होती. हे मॉडेल्स बीजगणित, भूमिती, क्षेत्रफळ आदींशी संबंधित होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्रशासकीय अधिकारी आणि गणिततज्ज्ञ भगवानराव जोशी यांनी केले. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, संस्थेचे पदाधिकारी अशोक वझे, सतीश पवार, कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, प्रतिष्ठानचे डॉ. शशिकांत पित्रे, विभागप्रमुख डॉ. विनायक सोलापूकर, प्रा. गितांजली फाटक आदी उपस्थित होते. बीजगणितातील विविध संकल्पना, भूमितीमधील विविध प्रमेये आणि इतर गणितात अवघड वाटणाऱ्या गोष्टी रंजक पद्धतीने मांडल्या होत्या. लाकडी आणि प्लास्टिकपासून विविध आकारांमध्ये तयार करण्यात आलेल्या मॉडेल्सद्वारे गणित विभागात शिकणारे विद्यार्थी उपस्थितांना माहिती देत होते.
‘या प्रदर्शनाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने येत्या जानेवारी महिन्यात दोन दिवसांसाठी हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच, या मॉडेल्सद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण शालेय शिक्षकांना येत्या काही दिवसात देण्यात येईल,’ असे डॉ. शेठ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोनशे जागा ‘आरटीओ’त रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या दहा वर्षांत शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून, लोकसंख्याही प्रचंड वाढली आहे. त्याच तुलनेत वाहन खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामाचा बोजा वाढत आहे. मात्र, या कार्यालयात मंजूर पदांपेक्षा सुमारे पावणेदोनशे कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.
शहरात वर्षाला सरासरी दोन लाख नवीन वाहनांची भर पडते. त्यामुळे आरटीओमध्ये वाहनांशी संबंधित विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी हा परिसर कायमच गजबजलेला असतो. गेल्या अनेक वर्षांपासून आरटीओतील विविध पदे रिक्त आहेत. परिणामी कार्यरत असलेल्या प्रत्येक लिपिकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कामाचा बोजा वाढला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत पिंपरी, बारामती, अकलुज आणि सोलापूर उपप्रादेशिक कार्यालयांचे काम चालते. या कार्यालयांत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, लेखा अधिकारी, मोटार वाहन अभियंता, जनसंपर्क अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, प्रणाली प्रशासक, वरिष्ठ व कनिष्ठ लेखअधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ लेखा परिक्षक, लि‌पिक, शिपाई, पहारेकरी आदी पदे रिक्त आहेत. या जागा भरण्याबाबत परिवहन आयुक्तालयाकडे अनेकदा मागणी करूनही पदे भरण्यात आलेली नाहीत. लेखा परीक्षकांवर कामाचा ताण वाढल्याने प्रलंबित फायलींची संख्या वाढत आहे. वर्ग क्रमांक तीन आणि चारमधील रिक्त जागेचा आकडा मोठा असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कामाचा बोजा वाढला आहे.
.............
प्रादेशिक परिवहन विभागातील रिक्त पदांची संख्या

वर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

वर्ग क्रमांक १ - ९७ - ९५ - २

वर्ग क्रमांक २ - ६ - २ - ४

वर्ग क्रमांक ३ - ३५६ - २१० - १४६

वर्ग क्रमांक ४ - ४१ - २२ - १९

एकूण ५०० - ३२९ - १७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक जानेवारीपासून विशेष शिबिरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्ह्यातील नागरिकांना लर्निंग व पक्के ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, हलक्या वाहनांचे पासिंग करणे आदी कामे गावातच करता यावीत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक जानेवारी ते ३० जून २०१७ या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे.
आरटीओच्या विविध कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी दरमहा एक दिवसीय शि‌बिर घेण्यात येणार आहे. वेल्हे तालुक्यात जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला शि‌बिर होणार आहे, तर शिरूर तालुक्यात पाच जानेवारी, फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत सहा तारखेला आणि मे व जूनच्या ८ तारखेला, भोर तालुक्यात जानेवारी ते मार्चच्या नऊ तारखेला, १० एप्रिल, ११ मे, १२ जूनला शि‌बिर आहे. हडपसरला १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी, १४ मार्च, १५ एप्रिल, मे आणि जूनमध्ये १६ तारखेला, सासवडला जानेवारी ते मार्चमध्ये १६ तारखेला, १७ एप्रिल, १८ मे, १९ जून, पिरंगुटला जानेवारी ते मार्चमध्ये १८ तारखेला, १९ एप्रिल, २० मे, २१ जून, उरुळी कांचनला जानेवारी ते एप्रिलमध्ये २० तारखेला, मे आणि जूनमध्ये २२ तारखेला, कोंढापुरी (शिक्रापूर) येथे जानेवारी ते मार्चमध्ये २३ तारखेला, एप्रिल व मेमध्ये २४ आणि २७ जून, जेजुरी येथे जानेवारी ते एप्रिलच्या २७ तारखेला आणि २९ मे, २९ जून २०१७ रोजी हे शि‌बिर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’ला प्रवासी नकोसे झाले?

$
0
0

‘पीएमपी’ला प्रवासी नकोसे झाले?


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस स्टॉपवर हात दाखवूनही बस न थांबविल्याच्या एक हजार २४३ तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त झाल्या आहेत. एकीकडे गेल्या काही वर्षांत पीएमपीचे प्रवासी घटत असताना, दुसरीकडे पीएमपीने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना डावलण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे पीएमपीला प्रवासी नकोसे झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या पाच महिन्यांत पीएमपीने २३०० कर्मचाऱ्यांकडून सुमारे तीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. तरीदेखील तक्रारींचे प्रमाण घटलेले नाही.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक प्रामुख्याने ‘पीएमपी’ने प्रवास करतात. या प्रवाशांनी गेल्या चार महिन्यांत पीएमपीच्या विरोधात सहा हजार ९६३ तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी एक हजार २४३ तक्रारी स्टॉपवर बस न थांबविल्याच्या आहेत. जून महिन्यात एक हजार १६८ तक्रारी, जुलै महिन्यात एक हजार ३५६, ऑगस्ट एक हजार ५०७, सप्टेंबर एक हजार ५०२ आणि ऑक्टोबरमध्ये सुमारे एक हजार ४३० तक्रारी पीएमपीकडे प्राप्त झाल्या आहेत. पीएमपीने पाच महिन्यात सुमारे दोन हजार ३९१ कर्मचाऱ्यांकडून सुमारे दोन लाख ९९ हजार ३५० रुपये दंड केला आहे.
स्टॉपवर बस थांबविली नाही, बसला फलक नाही, सुट्या पैशांचा वाद, महिलांना राखीव सीट नाही, कर्मचारी कामाचा गणवेश वापरत नाहीत, बस अतिवेगात असतात, प्रथमोपचार पेटी नाही, अस्वच्छता, फलकांवर दिवा नसणे, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, अनधिकृत जा‌हिराती, हेल्पलाइन नंबर नसणे, बसला ब्रेक लाइट नाही, इंडीकेटर नाही, बस ब्रेकडाऊन होणे, यासंबंधीच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. बससेवा आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनासंबंधीच्या तक्रारी दूरध्वनी, एसएमएस व ईमेलद्वारे पाठविणे शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयएलएस लॉ कॉलेजला २५ हजार रुपयांचा दंड

$
0
0

आयएलएस लॉ कॉलेजला २५ हजार रुपयांचा दंड

पुणे ः ‘प्रो‌व्हिजनल अॅडमिशन’च्या वेळी पूर्ण शुल्क आकारणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणे आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दंडात्मक रक्कम आकारणे या कारणांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयएलएस लॉ कॉलेजला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तक्रारकर्ते अॅड. सिद्धार्थशंकर शर्मा यांनी शनिवारी दिली. मात्र, अद्याप इतर तक्रारींवर परिषदेने निर्णय घेतला नसल्याचा आरोप अॅड. शर्मा यांनी केला आहे.
आयएलएस लॉ कॉलेजमध्ये प्रोव्हिजनल अॅडमिशनच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारण्यात येत होते; तसेच कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येत होते. अशा विविध तक्रारी भारतीय क्रां‌तिकारी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी अॅड. शर्मा यांनी वेळोवेळी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाकडे केल्या. याबाबत डॉ. विलास खरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. हजेरीचे निकष बदलणे, खेळ भत्त्यात अफरातफर करणे, माहिती पुस्तिकेत अफरातफर आणि ‘स्टुडंट अॅक्टिव्हिटीज’च्या नावाखाली शुल्क स्वीकारणे, अशा तक्रारींवर विद्यापीठाने निर्णयच घेतला नाही, असेही अॅड. शर्मा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठोर निर्णय घ्यावेच लागतील

$
0
0

‘नोटाबंदी’च्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘काळा पैसा, भ्रष्टाचार, बेहिशोबी संपत्ती यासारख्या समस्यांवर यापूर्वीच्या सरकारने वेळीच उपचार केले असते, तर देशातील जनतेला सध्यासारखे रांगेत थांबावे लागले नसते’, अशी टीका करून ‘काही आजार पूर्ण बरे करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागणार’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीप्रमाणेच यापुढेही असे निर्णय घ्यावे लागतील, याचे संकेत दिले.

पुणे मेट्रोचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर नोटाबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तुमच्या आशीर्वादामुळेच खंबीर निर्णय घेण्याचे बळ मिळाले, अशी साद त्यांनी उपस्थित नागरिकांना घातली. ‘बेहिशोबी संपत्तीला आळा घालण्यासाठी १९८८ मध्येच केंद्र सरकारने कायदा केला; पण त्याची अंमलबजावणीच केली नाही. फाइलींच्या जंजाळात कायदा लुप्त झाला होता; पण केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेच काम आधीच्या सरकारने केले असते, तर नागरिकांना नोदाबंदीच्या निर्णयाचा त्रास झाला नसता’, अशी टिपण्णी त्यांनी केली.
‘नोटाबंदीनंतर अनेकांनी काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली; पण नोटांऐवजी अनेकांचा चेहराच काळा पडला. काही ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोलमाल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चेहरा लपवण्यासाठी जागा राहिली नाही. कायद्याचे पालन केलेत, तर तुम्हाला सुखाची झोप लागेल; पण कायदा पाळणार नसाल, तर तुमचा पिच्छा सोडणार नाही’, असा इशाराच मोदी यांनी आपल्या भाषणात दिला.

पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी त्यांना पुन्हा स्पर्धेत भाग घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी जाहीर केले.

राज्यपाल पी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे या वेळी उपस्थित होते.

पवार व्यासपीठावर; पण भाषण नाही

पुणे मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागावरून वाद उद्भवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पवार मोदींसमवेत व्यासपीठावर असणार, हे स्पष्ट झाले होते. तसेच, त्यांना भाषणाची संधीही दिली जाणार असल्याचे सांगितले जात होते. भूमिपूजन समारंभात मोदी व्यासपीठावर असले, तरी त्यांना बोलण्याची संधी दिली गेली नाही.

पंतप्रधान मोदींना फुले पगडी

महापौर प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. या वेळी, पारंपरिक पुणेरी पगडीऐवजी महात्मा फुले यांची पगडी पंतप्रधान मोदी यांना घालण्यात आली. तसेच, महात्मा फुले यांची प्रतिकृती मोदी यांना भेट देण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन महापौर प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ परिसरात काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ येरवडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिकांना पैसे काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने विमानतळ रोडवरील बर्माशेल चौकात काळे झेंडे घेऊन निषेध करण्यात आला. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या वाहनांचा ताफा येण्यापूर्वीच पोलिसांनी आयोजकांना ताब्यात घेऊन आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावले.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी शहरात येणार होते. विमानतळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचे नियोजन काँग्रेसकडून करण्यात आले होते. मोदी यांच्या वाहनांचा ताफा जाताना त्यांना काळे झेंडे दाखविले जाणार होते. मात्र, पंतप्रधानांचा ताफा येण्यापूर्वीच पोलिसांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि पोलिस यांच्यामध्ये वादही निर्माण झाला होता. पोलिस आंदोलकांना ताब्यात घेत असल्याने काही आंदोलक थेट पोलिसांच्या गाडीसमोरच झोपल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, संगीता तिवारी, अजित आपटे, सुनील मलके, मुख्तार शेख, संगीता देवकर, लता राजगुरु, सचिन आडेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस उपायुक्त बसवराज तेली आणि सहाय्यक आयुक्त वसंत तांबे यांनी आयोजकांशी चर्चा करून निषेध न करण्याची विनंती केली. मात्र, आयोजक आपल्या मागणीवर ठाम असल्याने पोलिसांनी मुख्य आयोजकांना ताब्यात घेत संपूर्ण चौक काही क्षणात मोकळा केला. सुरक्षिततेच्या कारणास्तव या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांना’ भूमिपूजनाचा अधिकार नाही

$
0
0

मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली काँग्रेसची खिल्ली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
लाल किल्ल्यासमोर उभे राहून भाषण केले, म्हणजे कोणी पंतप्रधान होत नाही. त्याप्रमाणेच एखादा कार्यक्रम घेतला, म्हणजे ते भूमीपूजन ठरत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमाची शनिवारी खिल्ली उडवली. मेट्रो प्रकल्पात अडीचशे त्रुटी काढणाऱ्यांना या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात काँग्रेसने शुक्रवारी मेट्रोचे ज्या पद्धतीने भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला. याचा कडक शब्दात समाचार फडणवीस यांनी आपल्या भाषणात घेतला. शहरातील आमदार, खासदार, महापौर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच मेट्रो प्रकल्प मार्गी लागण्यास मदत झाली आहे. शहरात मेट्रोची कमतरता गेली अनेक वर्षापासून होती. मात्र, ती पूर्ण झाली असून यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी सुधारणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच मेट्रोला मान्यता देण्याची गरज होती, पण या प्रकल्पाला मान्यता न देता त्यामध्ये त्रुटी काढल्यानेच या प्रकल्पाला उशीर झाला. तेच प्रकल्पाला विलंब झाल्याचे कारण पुढे करत भूमिपूजनाचा फार्स करत आहेत. ‘तुम्ही असेच भूमिपूजन करत राहा, हेच आता तुमच्या नशिबात आहे,’ अशा शब्दात फडणवीस यांनी काँग्रेसला सुनावले.
सत्तेवर आल्यानंतर मेट्रोची फाइल्स समोर आल्यानंतर तातडीने त्यामधील त्रुटी दूर करण्याबरोबरच नवीन प्रस्तावित मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करुन त्याला मान्यताही देण्यात आली. गेले अनेक वर्षापासून रखडलेल्या मेट्रोचे भूमिपूजन झाल्याने पुणेकर सुखावले असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शहरातील नदी सुधारणा करण्यासाठी ९०० कोटी रुपये मिळाले तर इंटरनॅशनल एअरपोर्टचेही पुण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
०००
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे भूमिपूजन एप्रिलमध्ये
शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे अधिक विस्तृत केले जाणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार असून त्याचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केले जाईल, असा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवीला हवी जाणकारांची दाद

$
0
0

संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सध्याच्या काळातील कवी गुळगुळीत शब्दांच्या आधारे तसेच शब्दछल करून कविता रचतात आणि वाहवा मिळवतात. मात्र हजारो सामान्य रसिकांची दाद मिळवण्यापेक्षा एका जाणकार रसिकाची दाद मिळाली तरी कवी उजळतो, असे सांगत ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी सध्याच्या कवींचा समाचार घेतला.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान तर्फे आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्यांनी वास्तववादी कवितेचा वेध घेतला. गोड गुलाबी, दिसायला देखणी तरुणी, आणि तिच्या भोवती गुंफल्या जाणाऱ्या कवितेपेक्षा वास्तवाचा आधार घेऊन समाजातील स्त्रियांची खरी परिस्थिती कथन करणाऱ्या आणि समाजाचे स्वरूप कथन करणाऱ्या कविताच साहित्याचा विकास घडवू शकतात असे त्यांनी सांगितले. कलावंमत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. ता. भोसले, महापौर प्रशांत जगताप, स्वागताध्यक्ष दिलीप बराटे, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, मुरली लाहोटी आदी उपस्थित होते. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रंथ महोत्सवाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
‘कोणत्या प्रकारचे साहित्य श्रेष्ठ, असा प्रश्न सध्या जाणवू लागला आहे. काही साहित्यिक नुसती पाने भरतात आणि कादंबऱ्या लिहितात मात्र त्यांच्या साहित्याचा दर्जा किती चांगला असतो, हा एक चिकित्सेचा भाग आहे. वाङ्मयीन संस्कृतीचा विकास होणे गरजेचे असेल, तर मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती करण्यापेक्षा श्रेष्ठ साहित्याची निर्मिती करणे गरजेचे आहे. प्रत्येक लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्याच्या साहित्यातून जगाची अनुभूती येते. साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व जर उन्नत, वैचारिक पातळीवर विचार करणारे, जनसामान्यांना कळवळा असणारे असेल, तर त्यांची अनुभूती विशाल परिणामांची असते. त्यामुळे साहित्यिकांना जीवनदृष्टीचा साक्षात्कार व्हायला हवा,’ असे मत डॉ. काळे यांनी व्यक्त केले.
द. ता. भोसले म्हणाले, ‘समाजात शेतकरी हा लोकसंस्कृतीचा अधारस्तंभ आहे, तर साहित्यिक मानवी संस्कृतीचा अलंकार आहे. समाजाच्या शाश्वत आणि सर्वस्पर्शी विकासासाठी वकील, डॉक्टर, राजकारणी, धर्मकारणी, इंजिनिअर यांच्यापेक्षाही शेतकरी आणि साहित्यिकांचे योगदान मोठे राहील.’ ‘सध्याच्या युगात माणसाचे आयुष्य विरघळल्यासारखे झाले आहे. त्या आयुष्याला नवी उभारी देण्यासाठी चांगल्या साहित्याच्या वाचनाची गरज आहे. घटकाभर मनोरंजन करणारे साहित्य वाचण्यापेक्षा समाजातील वास्तवतेचा पडदा उलगडणारे साहित्य अधिक वाचले जाणे गरजेचे आहे, याकडे भोसले यांनी लक्ष वेधले.’ वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनात चर्चासत्रे, कवी संमेलने, परिसंवाद आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंढवा परिसरात बिबट्याचा थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/हडपसर

गजबजलेल्या कोंढवा परिसरातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट’च्या (एनआयबीएम) आवारात शनिवारी बिबट्याचा थरार अनुभवयास मिळाला. ‘एनआयबीएम’च्या इमारतीत बेसिनखाली बिबट्या दिसल्यानंतर सुरुवातीला धास्तावलेल्या महिलेने आणि नंतर अन्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून इमारतीचे दरवाजे बंद केले. पोलिस, वन विभाग आणि रेस्क्यू टीम यांना माहिती दिली. पाच तासांच्या थरारनाट्यानंतर बिबट्याला सुरक्षित पकडण्यात यश आले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

या बिबट्याला कात्रज येथील वन्यप्राणी अनाथालयात नंतर नेण्यात आले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सायंकाळी पुण्यापासून दूर असलेल्या वनक्षेत्रात सोडण्यात आल्याची माहिती उप वनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी दिली.

शनिवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान ऑफिसची स्वच्छता करीत असताना एनआयबीएमच्या कर्मचारी स्वाती कुंजीर यांना पँट्रीच्या बेसिनखाली बिबट्या बसलेला दिसला. त्या घाबरल्या आणि ऑफिसच्या बाहेर पळत येऊन त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या. त्यानंतर सूर्यकांत दळवी आणि राजू सूर्यवंशी या कर्मचाऱ्यांनी ऑफिसचा दरवाजा कुलूप लावून बंद केला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वन विभाग अधिकारी आणि कात्रज प्राणी संग्रहालयाच्या रेस्क्यू विभागाची टीम काही वेळातच संस्थेत दाखल झाली.

सुरुवातीला दोन तास बिबट्या बंद ऑफिसमध्ये फिरत होता. इमारतीच्या प्रकाशन विभागात जाऊन तो कॉर्नर टेबल खाली अर्धा तास बसला. तिथून उठून शेजारील डीटीपी रूम मध्ये जाऊन त्याने तळ ठोकला. बिबट्या स्थिरावलेला पाहिल्यावर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. रेस्क्यू टीम, वन कर्मचारी आणि डॉक्टरांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू केले. मात्र, चपळ असलेला बिबट्या वेळोवेळी त्यांना गुंगारा देत होता. दोन ते तीन वेळा त्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या दिशेने धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खिडकीच्या बाहेर असल्याने बिबट्याचा पंजा काचेवर आदळला. सहा वेळा प्रयत्न करूनही बिबट्यावर नेम बसेना. दुपारी साडेबाराच्या दरम्यान तो कपाटाच्या आड काही वेळ लपून बसला होता. तो खिडकीच्या समोर यावा म्हणून टेबलवर कापडही टाकण्यात आले. मात्र, तो आतून गुरगुरत राहिला. अखेर दुपारी एकच्या दरम्यान त्याला इंजेक्शन देण्यात यश आले. पाच तासांच्या थरारानंतर बेशुद्ध बिबट्याला पिंजऱ्यात बंद केले.

बघ्यांची गर्दी कुंपणाबाहेर

बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा नको म्हणून वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना संस्थेच्या प्रवेशद्वाराबाहेरच अडवले होते. संस्थेतील हॉस्टेलमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसपासून दूर अंतरावर उभे केले होते. आपल्याला बिबट्याचा एक तरी फोटो मिळावा, म्हणून मोबाइलमधील कॅमेरे ऑन करून बसलेल्या नागरिकांची धडपड सुरू होती. एवढ्या वस्तीत बिबट्या खरेच आलाय, का, असे प्रश्नही वारंवार विचारले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो प्रकल्प मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुणे मेट्रो प्रकल्पाला उशीर झाल्याने नागरिकांमधील नाराजी स्वाभाविक आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत झाले असते, तर तो कमी खर्चात झाला असता. तरीही, देर आएँ, दुरुस्त आएँ’, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ केला. ‘आधीच्या सरकारला अनेक कामे अर्धवट ठेवायची सवय होती. कामे पूर्ण करण्याची संधी मला मिळत आहे,’ असे सांगून त्यांनी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारवर टीकाही केली.

‘पुणेकर नागरिकांना वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मेट्रो यापूर्वीच झाली असती, तर अनेकांनी स्वतःचे वाहन खरेदी करण्याऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला असता,’ असे निरीक्षण मोदी यांनी नोंदविले. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढताना, त्यांनी थेट ‘महापौर, आज तर तुम्ही खूप खूश असाल ना,’ असा खोचक टोमणाही लगावला.

मोदी म्हणाले, ‘देशात शहरांचे नियोजन आणि विकास करताना केवळ त्या वेळचा विचार करण्यात आला. त्यामुळे रस्ते-पाणी, वीज अशा पायाभूत सुविधांचे जाळे तुकड्या-तुकड्यांमध्ये निर्माण झाले. अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने त्यांचा खर्च वाढला, शहराच्या समस्येत भर पडली आणि त्याचवेळी हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही आवश्यक लोकसंख्येला अपुरे पडू लागले. शहरांच्या विकासाचे हे जुने मॉडेल हद्दपार करून पुढील २५-३० वर्षांचा विचार आत्ताच करण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,’ असे मोदी यांनी सांगितले.

शहरांसोबत ग्रामीण भागांचा कायापालट करण्यासाठीही तब्बल अडीच लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडले जात आहे. रस्ते-रेल्वे-विमानतळ अशा सुविधांप्रमाणेच माहिती-तंत्रज्ञानाच्या सुविधाही गावा-गावांत उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आधुनिक भारताचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.


पिंपरी-चिंचवडला पुन्हा संधी

‘स्मार्ट सिटी’साठी निवडण्यात आलेल्या राज्यातील दहा शहरांमधून पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आले होते. त्याला पुन्हा संधी देण्यात यावी, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मान्य केली. पिंपरी-चिंचवडला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.


शिवाजीनगर-हिंजवडीचे भूमिपूजन एप्रिलमध्ये

शहरातील पहिल्या टप्प्यातील दोन मार्गिकांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत असतानाच, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘शिवाजीनगर ते हिंजवडी’ या तिसऱ्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयटी कंपनीतील तरुणीची भर चौकात हत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीच्या निर्घृण हत्येनं पिंपरी परिसर हादरला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी आकुर्डीमध्ये राहणाऱ्या अंतरा देवानंद दास (वय २३) हिची केएनबी चौकात धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. अंतरा ही मूळची पश्चिम बंगालची रहिवासी होती.

शुक्रवारी रात्री अंतरा दास ही तळवडे येथील केएनबी चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले. सत्येंद्र कृष्णानंद सिंपी यांनी अंतराला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं आणि चिंचवडच्या खासगी हॉस्पिटलमध्येही नेलं. परंतु, उपचारांआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

या प्रकरणी सत्येंद्र सिंपी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी इसमाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी काही तरुण अंतराला त्रास देत होते, अशी माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्या आधारेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहाटेपर्यंत रंगणार सेलिब्रेशन

$
0
0

Vandana.Ghodekar@timesgroup.com
Tweet : vandanaaMT

पुणे : यंदाच्या वर्षी शनिवारी रात्री थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन आल्यामुळे आणि रविवार सुट्टीचा दिवस जोडून असल्यामुळे यंदाचे सेलिब्रेशन जोरात असणार आहे. सेलिब्रेशन करण्यासाठी रात्री बारानंतर घराबाहेर पडून रस्त्यावर येऊन एन्जॉय करण्याचा ट्रेंड वाढत आहे. शनिवारची रात्र आणि रविवारची सुट्टी असा दुहेरी आनंद असल्यामुळे यंदाचे सेलिब्रेशन पहाटेपर्यंत रंगणार आहे. थर्टी फर्स्टची नाइट चांगलीच रंगणार असल्याच्या अंदाज घेऊन हॉटेलवाल्यांनी जय्यत तयारी केली आहे.

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू झाली आहे. देशात नोटबंदी लागू करण्यात आल्यानंतर गेली दीड महिने लोकांना पैशांच्या चणचणीला सामोरे जावे लागले. मात्र, आता ही परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. अनेक ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे नोटबंदीचा परिणाम सेलिब्रेशनवर होणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील नाइटलाइफ बदलले असून थर्टी फर्स्टला रात्री बारानंतर लोक घराबाहेर येऊन एन्जॉय करू लागले आहेत. रात्री बारा वाजता नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक रस्त्यावर गर्दी करू लागले आहेत. रस्त्यावर होणारी गर्दी पाहण्यासाठी आणि गर्दीचा आनंद लुटण्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते हाउसफुल्ल होऊ लागले आहेत. यंदाच्या थर्टी फर्स्टला रात्री स्पीकर वाजविण्यास किती वाजेपर्यंत परवानगी आहे याबाबतचा काही निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजल्यानंतर लाउडस्पीकरला परवानगी नाही. डीजेचे म्युझिक, त्यावर जोरात थरकणारी पावले, सेलिब्रेशनचा भन्नाट मूड यासाठी पबला तरुणाई पसंती देऊ लागली आहे. पबमध्ये रात्री उशिरापर्यंत एन्जॉय करणारी तरुणाई नंतर पुन्हा रस्त्यावर येऊन गर्दी करू लागली आहे. त्यामुळे पुण्यातील नाइट लाइफ थर्टी फर्स्टच्या रात्री बदललेले दिसू लागले आहे. रस्त्यावर लोटणाऱ्या गर्दीसाठी शहरातील हॉटेलांचीही जय्यत तयारी सुरू झाली आहे.

डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर वाढला

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी हॉटेलांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी आहे. नोटबंदीचा परिणाम हॉटेलांवर होणार नाही. बहुतांश हॉटेलांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर वाढू लागला आहे. शनिवारी रात्री होणारे सेलिब्रेशन आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे यंदाच्या वेळी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा अंदाज आहे. पुण्यातील नाइट लाइफच्या खाऊगिरीसाठी हॉटेल सज्ज आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई टाळण्यासाठी ‘ड्रंक ऑर ड्राइव्ह’

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरची रात्र जल्लोषमय वातावरणात साजरी केली जाते. या दिवशी डिनरसाठी बाहेर पडणाऱ्यांसह विविध ठिकाणी होणाऱ्या पार्ट्या, तारांकित हॉटेल आणि पब या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यामध्ये मद्य सेवनाचे प्रमाण अधिक असते. तसेच, या दिवशी वाहतूक पोलिसांसकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई देखील जोरात केली जाते. या कारवाईतून वाचण्यासाठी आता ‘ड्रंक ऑर ड्राइव्ह’ची संकल्पना पुढे येत असून नागरिकांकडून त्याचा अवलंब केला जात आहे. परिणामी, अशा मद्य पार्ट्यांना जाताना ‘कॅब’ वापरणे किंवा केवळ त्या दिवसापुरता ‘ड्रायव्हर’ नेमला जात आहे.

‘खा, प्या, मजा करा आणि आनंद लुटा’ या संकल्पेपेक्षा अधिक व्यापक पद्धतीने ३१ डिसेंबरचा दिवस साजरा करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत रुढ झाला आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार, गायक यांच्या कार्यक्रमांचे आयोजन, तारांकित हॉटेलांमध्ये, पबमध्ये पार्ट्यांचे आयोजन, ‘कपल्स’ आणि कुटुंबासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन, यासह उपनगरांत लॉन्समध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या एका दिवसात देशी-विदेशी मद्याची विक्री काही पटींनी वाढते.

रात्री उशिरापर्यंत मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दक्षता म्हणून वाहतूक पोलिसांकडून मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. या कारवाईमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड पडतो. वर्षभर ही कारवाई सुरू असते, मात्र ३१ डिसेंबच्या रात्री कारवाईसाठी नेमलेल्या पोलिसांची संख्या अधिक असते. या परिस्थितीतही ‘३१ डिसेंबर’चे पार्टी सेलिब्रेशन करावयाचेच असते. त्यामुळे त्यावर मार्ग म्हणून स्वतःच्या वाहनाऐवजी भाड्याने कॅब घेणे किंवा वाहन स्वतःचे व एक दिवसासाठी मानधन देऊन ड्रायव्हर घेण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरात गेल्या दोन वर्षांत कॅब वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच, गेल्या काही महिन्यात कॅब कंपन्यांनी त्यांचे प्रवास दर देखील कमी केले आहेत. त्यामुळे या कंपन्यांना मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. या गाड्या बुक करण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन, हेल्पलाइन नंबर असल्याने नागरिकांना ते सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.

किमान फी सात हजार

पार्ट्यांची प्रवेश फी बड्या हॉटेलांमध्ये किमान सात हजार रुपये आहे. अनेक हॉटेलमध्ये रात्री राहण्याची सोय करण्यात येते. या फीमध्येच त्याचाही खर्च आकारण्यात येतो. केसनंद येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये अशाच प्रकारे राहण्याची सोय करण्यात आली आहे. केसनंद येथील एक दिवसाचे तिकिट कुठल्याही बड्या हॉटेलच्या तुलनेत कमी असल्याने या फेस्टिव्हलला जाण्यासाठी तरुणाई अधिक उत्साही असेल, असे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू इयर सेलिब्रेशनला नोटाबंदीचा फटका

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com
Tweet : @PrashantAherMT

पुणे : नोटाबंदीच्या निर्णयामुळे बाजारात आलेल्या मंदीचा फटका नववर्षांच्या पार्ट्यांनांही बसल्याचे चित्र आहे. फाइव्ह आणि सेव्हन स्टार हॉटेल, अॅम्बी व्हॅली अशा बड्या पार्ट्या सोडल्या, तर इतर छोट्या पार्ट्यांना या निर्णयाचा थेट फटका बसला आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी अवघे पाच दिवस उरले असताना पोलिस प्रशासनाकडे या पार्ट्यांच्या परवानगीसाठी अत्यल्प अर्ज आल्याने नोटबंदीचे सावट गडद झाल्याची चिन्हे आहेत.

वाहतूक पोलिसांकडे ख्रिसमस सेलेब्रेशनसाठी एकही अर्ज आला नव्हता, तर नववर्षांच्या पार्ट्यांसाठी आतापर्यंत कुठलाही अर्ज प्राप्त झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. नववर्षाच्या स्वागताला तात्पुरत्या करमणुकींच्या कार्यक्रमांसाठी अर्जांचा पाऊस पडत असताना या वर्षी या कार्यक्रमांची संख्या रोडवल्याचे चित्र आहे. नववर्षांच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांसाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी होते. ही तरुणाई शक्यतो कॅशलेस व्यवहार करते, तरीही या कार्यक्रमांना नोटाबंदीचा फटका बसत असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातारवण आहे. बाजारातील एकूण मंदीमुळे करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये घट होत असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून व्यक्त होते आहे.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री जंगी पार्ट्यांचे बेत आखले जातात. पार्टी आणि कार्यक्रमामध्ये तरुणाईच आघाडीवर असते. हॉटेल व्यावसायिकांकडून ही संधी साधून पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यासाठी किरकोळ एक दिवसाचे परमिट घेतले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या कार्यक्रमांसाठी ३० ते ३५ अर्ज आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने ही संख्या कमी आहे. करमणूक कर विभागाकडून या कार्यक्रमांच्या प्रवेशशुल्काच्या २० टक्के करमणूक कर आयोजकांकडून घेतला जातो. त्यात पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे पैशांची आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा नववर्षाचे सेलिब्रेशन फिके पडण्याची शक्यता दिसत आहे. नववर्षानिमित्तच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळेल की नाही, याबाबत शंका असल्याने कार्यक्रम घेण्याबाबत अनेकांच्या मनात धाकधूक आहे.

केसनंद येथे ‘सनबर्न’ हा मोठा इव्हेंट होत असून त्याठिकाणी देशभरातून हजारो चाहते जमण्याची शक्यता आहे. या इव्हेंटमुळे पुणे शहरातील आणि आजूबाजूच्या पार्ट्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. हा इव्हेंट चार दिवस चालणार असल्याने तरुणाईकडून साहजिकच ‘सनबर्न’मध्ये जाण्यासाठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्ष स्वागतासाठी कार्यक्रमांचे नियोजन

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com
Tweet : @HarshDudhe_MT

पुणे : कोणी म्हणतंय ‘पब’ किंवा ‘डिजे पार्टी’ला जाऊ फुल्ल नाचू, तर कोणी म्हणतंय मित्रमैत्रीणींसोबत संध्याकाळी ‘लाँग ड्राइव्ह’ला जाऊ. काहींचा एखाद्या शांत ठिकाणी आपल्या प्रियजनांसोबत जेवण आणि गप्पागोष्टींत संध्याकाळ घालवण्याचा बेत आहे. तर, काहींना लाँजमध्ये जाऊन चिलॅक्स-रिलॅक्स गाणी ऐकत आणि त्यावर थिरकत मनमुराद आनंद लुटायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘थर्टी फर्स्ट’ कसा सेलिब्रेट करायचा यावर कॉलेजच्या कट्ट्यांपासून ते आयटी कंपन्यांच्या आवारात अशीच चर्चा सुरू आहे. त्यामुळेच नोटाबंदीचा परिणाम तरुणाईच्या सेलिब्रेशनवर पडणार नाही, असेच चित्र आहे.

दरवर्षी ‘थर्टी फर्स्ट’ जवळ आला की, तो सेलिब्रेट करण्याचे विविध बेत आखण्याचे काम दहा दिवसांपूर्वीच सुरू होते. या वर्षी नोटाबंदीमुळे तरुण वर्गाच्या सेलिब्रेशनवर परिणाम होईल, असे चित्र होते. मात्र, परिस्थिती बदलत असतानाच थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचे फंडे जोर धरू लागले आहेत. शहरातील तरुण वर्गाला पबमध्ये थर्टी फर्स्टच्या संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत ‘बॉलीवूड’ आणि ‘हिपहॉप’ गाण्यांवर बेधुंद होऊन नाचायचे आहे. यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

काही मित्रमैत्रिणींना ग्रृपने शहराच्या आजुबाजूला ‘लाँग ड्राइव्ह’ला जायचे आहे आणि वर्षभरातील आठवणींना उजाळा द्यायचा आहे. तसेच, तेथेच जवळपास असणाऱ्या ढाब्यांवर मस्तपैकी जेवण करायचे आहे. काहींना आपल्या खास मित्रमैत्रिणींसोबत आणि प्रियजनांसोबत शहराच्याजवळ असणाऱ्या निवांत अथवा पर्यटनस्थळी जेवण आणि गप्पागोष्टींत संध्याकाळ घालवण्याचा बेत आहे आणि पहाटेपर्यंत घरी परतण्याचा प्लॅन आहे. काहींच्या मते शहरातील अलिशान लाँजमधील वातावरणात रंगून जाऊन चिलॅक्स आणि रिलॅक्स होणे पसंद करणार आहेत.

प्रसिद्ध हॉटेलमध्ये जाऊन तेथील खाद्यपदार्थांवर ताव मारण्याचा अनेकांचा बेत आहे. काही विद्यार्थी महिना अखेर असल्याने फ्लॅट किंवा रूमवर नॉनव्हेज बनवण्याचा आणि म्युझिक सिस्टीमवर नाचण्याचा कार्यक्रम आखत आहेत. कुटुंबीयांकडून संध्याकाळी एखाद्या ठिकाणी फेरफटका मारण्याचा आणि बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला जात आहे. शहरातील कॉलेजांमध्ये सांस्कृतिक महोत्सवांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’ला ‘डीजे नाइट’ अथवा एखाद्या हॉलमध्ये पार्टीच्या आयोजनाची तयारी सुरू आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. आयटी कंपन्यांमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनपासूनच खऱ्या अर्थाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होते. हे कार्यक्रम थर्टी फर्स्टपर्यंत सुरू राहतात. त्यामुळे बहुतेक कंपन्यांमध्ये थर्टी फर्स्टच्या संध्याकाळी डीजे पार्टी अथवा कलाकारांचे लाइव्ह इन कॉन्सर्ट आयोजित केले आहेत. ‘आयटीयन्स’ अशा कार्यक्रमात थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करणार आहेत, असे आयटी कंपनीत इंजिनीयर असणाऱ्या उत्कर्षा बधान शिरोडे यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील काही युवक थर्टी फर्स्टच्या रात्री बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना पाण्याच्या बाटल्या आणि वेफर्सची पाकीटे वाटून सेलिब्रेशन करतात. या वर्षी देखील असा उपक्रम राबवणार असल्याचे, मयंक पहाडे याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images