Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रबोधनाचे प्रयत्न वाया जाताहेत

$
0
0

प्रबोधनाचे प्रयत्न वाया जाताहेत

ज्येष्ठ प्रबोधनवादी विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांनी नुकतेच ८० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक पब्लिकेशन नेटवर्क यांच्यातर्फे त्यांचा आज (रविवारी) माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार होणार आहे. यानिमित्त पुरोगामी चळवळीपुढील आव्हाने, मुस्लिम समाजाचे प्रश्न याबाबत चिंतामणी पत्की यांनी बेन्नूर यांच्याशी साधलेला संवाद.

-----------

समाजाचे प्रश्न पाहता तुम्ही वैचारिक क्षेत्र जाणीवपूर्वक निवडले का?
कॉलेजच्या जीवनात आम्ही प्लेटो, अॅरिस्टॉटल यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने भारावून गेलो होतो. आदर्शवादाची संकल्पना मांडत होतो. पण १९७५ ला आलेल्या आणीबाणीने हे स्पष्ट झाले की राजकारणाने काही साध्य होत नाही. व्यक्ती कितीही चांगली असली, तरी ती सत्तेवर येताच पूर्वसुरींप्रमाणे भ्रष्ट होते. राजकीय विचाराचा भ्रम तेव्हा निघून गेला. तेव्हापासून जाणीवपूर्वक वैचारिक व सामाजिक क्षेत्र कार्यासाठी निवडले. मुस्लिम समाजाचे व सामाजिक सुधारणांचे प्रश्न गंभीर होतेच.

आसपासची परिस्थिती पाहता समाज प्रबोधनाच्या वाटेवर आहे असे वाटते का?
समाजाची आजची स्थिती हा जमातवादाचा परिपाक आहे. हा जमातवाद फाळणीने निर्माण झाला व तो अधिकच वाढला. हिंदूही चिडले व मुस्लिमही चिडले. याचा थेट परिणाम मुस्लिम मानसिकतेवर झालेला दिसून येतो. मी अनेक वर्षे सर्व धर्माच्या जमातवादावर लिहितोय व बोलतोय. गांधी, नेहरू, आंबेडकर ही आमची दैवते आहेत. पण आज भक्तांकडून त्यांच्यामध्येच वाद निर्माण केला जात आहे. प्रबोधनवादी विचारांनी इतकी वर्षे केलेले सगळे प्रयत्न वाया जातायत की काय अशी एकूण परिस्थिती आहे.

जगात सगळीकडेच उजव्या विचाराने उचल खाल्लेली दिसून येते, तुमचे निरीक्षण काय आहे?
उजवे राजकारण व सांस्कृतिक उजवी क्रांती करण्याचा भयंकर प्रचार सध्या जगभर सुरू आहे. भाजपच्या राजकीय विजयाला आक्षेप असण्याचे कारण नाही. पण टोकाच्या उजव्या राजकारणामुळे चळवळ व विचार थांबल्यासारखा झाला आहे. काही बोलले की मारण्यात येते किंवा तोंड बंद केले जाते. विचारस्वातंत्र्य पूर्णपणे दडपून टाकण्यात आले आहे. सद् विवेक व बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.

जमातवाद समाजात असतो की राजकारणातून निर्माण केला जातो?
माणूस अगतिक होत आहे. खरे तर माणूस सामान्यच असतो. त्याचे प्रश्न हे केवळ त्याच्या जगण्याचे असतात. पण राजकीय पक्षांनी राजकारणासाठी जमातवादी विचार प्रबळ केला आहे. समाजाची वैचारिक प्रक्रिया थांबली आहे. समाजात टोकाचा जाती व धर्मसंघर्ष होताना दिसत आहे. हे सारे प्रकार पाहून मन उदास होते.

उजवा विचार राजकीयदृष्ट्या नाकारणे हाच अंतिम उपाय ठरू शकतो का?
देशात मंडल आयोगानंतर उजव्या राजकारणाने उचल खाल्ली. तेव्हापासून वातावरण अधिक बदलले. जातीयवाद राजकीय पक्ष शिकवतात. स्वयंसेवक संघासारखी सेना भाजपच्या पाठीशी आहे. अशी सेना जर प्रत्येक पक्षाच्या मागे असती, तर देशात यादवी केव्हाच निर्माण झाली असती. पण असे असले तरी सर्व राजकीय पक्ष सारखेच असतात. एकाला झाकले तरी दुसरा तसाच असतो. त्यामुळे राजकारणाने हे प्रश्न सुटणारे नाहीत.

मग कोणत्या शक्यता शिल्लक राहतात?
उजवा विचार प्रबळ होताना कार्पोरेट व शहरातील लोक जास्त जातीयवादी होत आहेत. अशा परिस्थितीत प्रबोधन विचारांसाठी तरुण वर्ग हाताशी धरला पाहिजे. माध्यमांनी प्रबोधनवादी असणेच आवश्यक आहे. आम्ही गप्प बसणार नाहीत, अशीच भूमिका सर्वांनी मांडत राहायला हवी. प्रबोधनाचे काम सुरू राहायला हवे. कदाचित ही समाजाची एक अवस्था असेल, ती फार टिकेल असेही नाही.

हिंदू धर्माबद्दल काय चिंतन आहे?
हिंदू समाज सहिष्णू आहे. पण आजच्या तथाकथित बाबांनी हिंदूंना बदनाम केले आहे. धर्माला हुकूमशाहीचे स्वरूप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानात जी परिस्थिती मुस्लिमांची झाली आहे, तशीच ती भारतातील हिंदूंची करण्याचे हे प्रयत्न आहेत.

तोंडी तलाक व मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत तसेच आहेत का?
मुलीच्या पालकांना हे माहितीच नसते की आपल्याला न्यायालयीन लढाई लढता येते. इतके अज्ञान समाजात आहे. आजची परिस्थिती धर्मामुळे नाही, तर धर्मगुरूंमुळे निर्माण झाली आहे. सगळ्या धर्मातील पुरुष वर्चस्ववादी असतात. तोंडी तलाक बंद झाला पाहिजे, असा निकाल धर्मगुरूंच्या संघटनेने दिला आहे. मुस्लिम लॉ बोर्डाला तो मान्यच करावा लागेल; कारण त्यात काही सदस्य संघटनेचेच असतात. केवळ समान नागरी कायद्याने प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक धर्माच्या चालिरिती वेगळ्या आहेत. धर्मातील पुरूषाला जो अधिकार तोच अधिकार स्त्रीला या न्यायाने बदल होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप नेत्यांच्या मोटारीत १० लाखांच्या जुन्या नोटा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी। पुणे

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्या मोटारीत दहा लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बोपदेवजवळील हिवरे गावात निवडणूक अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली. यासंदर्भात प्राप्तिकर विभागालाही माहिती देण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी एक वाजण्याचा सुमारास चंदेरी रंगाची इनोव्हा (एम एच.१२ एल डी ९९९०) गाडी पकडण्यात आल्याचे गस्ती पथक प्रमुख राजेसाहेब लोंढे यांनी सांगितले आहे. गाडीचे मालक उज्ज्वल गोविंद केसकर,चालक अमोल दिलीप बलकवडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपक अशोक पोटे आणि प्रल्हाद रामभाऊ सायकर हे सर्वजण मोटारीत होते. त्यांना या रकमेचा समाधानकारक खुलासा करता आला न आल्याने प्राप्तिकर विभागाला याची माहिती देण्यात आली. बोपगाव-कोंढवा मार्गे पुणे रस्त्यावर हिवरे गावचे हद्दीत पकडण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे आणि तालुका भूमिअभलेख अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले आणि सहाय्यक अधिकारी विनोद जळक यांच्या आदेशानुसार ही कारवाई झाली. ही रक्कम वैयक्तिक कामासाठी बारामतीला घेऊन चालल्याचे या चौघांनी सांगितले, मात्र, रकमेबाबत संशय आल्याने याबाबत प्राप्तिकर विभागाकडे रीतसर माहिती कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पुणे बारामती रोडवरील हिवरे गावाच्या हद्दीत रामवाडी फाटा येथे नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी पुण्याहून बारामतीकडे निघालेल्या या इनोव्हाची पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवून तपासणी केली. त्यावेळी कारच्या पाठीमागील डिक्कीत एक कापडी पिशवी आढळून आली. त्या पिशवीमध्ये हजार रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले होती. पोलिस पंचनामा पूर्ण झाला असून चलनातून बाद केलेल्या ५०० आणि १००० च्या नोटांचा यात समावेश आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सासवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. आर. गौड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅगकडून होणार ‘पीएमपी’ची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) गेल्या पाच वर्षा‍तील कारभाराची चौकशी केली जाणार आहे. ‘पीएमपी’मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्याने या कंपनीच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय लेखा विभागाकडून (कॅग) ही चौकशी केली जाणार आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ‘पीएमपी’ची स्थापना करण्यात आली आहे. ‘पीएमपी’च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी खर्चात प्रवास करता यावा, यासाठी ही कंपनीची स्थापना झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तसेच आजूबाजूच्या ३०० गावांना आणि ७५ लाख नागरिकांना पीएमपी सेवा देते. ही कंपनी चालावी यासाठी दोन्ही महापालिका राज्य सरकारने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार याची तूट भरून काढतात. या कंपनीत वेगवेगळ्या प्रकाराने गैरव्यवहार झाल्याने अनेकदा समोर येऊनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या कंपनीच्या गेल्या पाच वर्षातील कारभाराची चौकशी करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली होती. त्याची दखल घेऊन या चौकशीसाठी कॅगने अनूकुलता दाखविल्याचे शिंदे यांनी सांगितले. सन २००५ ते सन २०१० या पाच वर्षांच्या कामकाजाची तपासणी यात करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केसकरांच्या गाडीत दहा लाख

$
0
0

हिवरे गावात निवडणूक अधिकाऱ्यांकडून रक्कम जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ सासवड

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्या मोटारीत दहा लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बोपदेवजवळील हिवरे गावात निवडणूक अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली. या संदर्भात प्राप्तिकर विभागालाही माहिती देण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी एक वाजण्याचा सुमारास चंदेरी रंगाची इनोव्हा (एम एच.१२ एल डी ९९९०) गाडी पकडण्यात आल्याचे गस्ती पथक प्रमुख राजेसाहेब लोंढे यांनी सांगितले आहे. गाडीचे मालक उज्ज्वल गोविंद केसकर,चालक अमोल दिलीप बलकवडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपक अशोक पोटे आणि प्रल्हाद रामभाऊ सायकर हे सर्वजण मोटारीत होते. त्यांना या रकमेचा समाधानकारक खुलासा करता आला न आल्याने प्राप्तिकर विभागाला याची माहिती देण्यात आली. बोपगाव-कोंढवा मार्गे पुणे रस्त्यावर हिवरे गावचे हद्दीत पकडण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे आणि तालुका भूमिअभिलेख अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले आणि सहायक अधिकारी विनोद जळक यांच्या आदेशानुसार ही कारवाई झाली. ही रक्कम वैयक्तिक कामासाठी बारामतीला घेऊन चालल्याचे या चौघांनी सांगितले. मात्र, रकमेबाबत संशय आल्याने याबाबत प्राप्तिकर विभागाकडे रीतसर माहिती कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुणे बारामती रोडवरील हिवरे गावाच्या हद्दीत रामवाडी फाटा येथे नाकाबंदी सुरू होती. त्या वेळी पुण्याहून बारामतीकडे निघालेल्या या इनोव्हाची पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवून तपासणी केली. त्या वेळी कारच्या पाठीमागील डिकीत एक कापडी पिशवी आढळून आली. त्या पिशवीमध्ये हजार रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले होती. पोलिस पंचनामा पूर्ण झाला असून, चलनातून बाद केलेल्या ५०० आणि १००० च्या नोटांचा यात समावेश आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सासवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. आर. गौड यांनी सांगितले.
सध्या नगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सुरू असून, त्यासाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारामतीमध्ये सभा होता. त्याच्या आदल्या दिवशीच ही रक्कम पकडण्यात आल्यामुळे याचा निवडणुकीसाठी वापर होत असावा, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

निवडणूक पथकाला सापडलेले पैसे माझेच आहेत. ही सर्व रक्कम कायदेशीर असल्याने लवकरच सत्य समोर येईल. बारामतीपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पूरबावी या गावात माझी शेती आहे. तेथून हे पैसे घेऊन पाचगणी येथे निघालो होतो. नोटाबंदीमुळे बँकेत गर्दी असल्याने पाचगणी येथील बँकेच्या खात्यात हे पैसे भरण्यासाठी घेऊन जात होतो. मंगळवारी सुनावणी आहे. त्यामध्ये योग्य ते पुरावे दिले जातील.
- उज्ज्वल केसकर (माजी नगरसेवक, भाजप)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सवाई’चा ‘साउंडमॅन’

$
0
0

प्रदीप माळींच्या ध्वनी संयोजनास मिळतेय दाद
Asawari.Chiplunkar@timesgroup.com
Tweet ः asawariMT
पुणे : एक पूर्णपणे अपरिचित तार वाद्य...या वर्षी संपूर्ण महोत्सवात असलेली एकूणच बहुसंख्य तारवाद्ये... नव्या आणि तरुण कलाकारांबरोबर जमवून घेण्याची सहजता आणि गेल्या १८ वर्षांचा याच मंचाचा पुरेपूर अनुभव यातून सर्वांत उत्तम दर्जाचा ध्वनी सध्या रसिकांच्या कानावर पडतो आहे, तो ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ येथे. ध्वनी संयोजक प्रदीप माळी हे त्या जादूगाराचे नाव.
आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ‘सवाई’ महोत्सवाच्या चौथ्या दिवशी माळी यांची खरी कसरत होती, ती एकाच मंचावर सरोद आणि सतार ही वाद्ये आल्यामुळे. लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या दोन्ही तरुण कलाकारांच्या अनुक्रमे सतार आणि सरोद वादनाने चौथा दिवस गाजवलाच; पण मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दर्दी रसिकांनी शनिवारी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. हातातील वेळ संपूनदेखील रसिकच त्यांना ‘वन्स मोअर’ म्हणत सोडेनासे झाले, तेव्हा त्यांनी आयोजकांकडून अगदी मोजून १० मिनिटे जास्तीची वेळ मागून घेऊन राजस्थानी धून वाजवून रसिकांना तृप्त केले. उत्तम सादरीकरणामागे अप्रतिम ध्वनीव्यवस्थेचेही मोठे श्रेय होते.
वयाच्या साठीकडे झुकलेल्या माळी यांचा ‘सवाई’ची ध्वनीव्यवस्था सांभाळण्यादरम्यानचा उत्साह या वर्षी तरुणालाही लाजवेल असाच होता. कापड पांघरलेल्या मंडपात मंचावरून येणारा ध्वनी हा मंचाच्या डावी-उजवीकडे बसलेल्यांना, खुर्च्यांवर मध्यभागी बसलेल्यांना आणि गॅलरीत वरच्या बाजूला बसलेल्यांनाही सारखाच उत्तम ऐकू यावा, यासाठीची रोजची खबरदारी ते घेत आहेत. दुपारी चार वाजता आणि रात्री १० वाजता ऐकू येणाऱ्या ध्वनीमध्ये वातावरणातील तापमान बदलामुळे (थंडीमुळे) फरक पडत असल्याचे ते सांगतात.
माळी या बदलाविषयी म्हणाले, ‘दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्रीपर्यंत अशा दोन टप्प्यांत ध्वनी संयोजन करावे लागते. सकाळी उठल्यावर माणसाचा आवाज ज्याप्रमाणे जडावलेला असतो, तसा कोरडा, जडावलेला आवाज दुपारी चार वाजता असतो. सुदैवाने फुंकवाद्याला योग्य अशा वातावरणातच म्हणजेच रात्री आठपूर्वीच सनई आणि बासरीवादन झाले. त्यामुळे रसिकांना ते जास्त भावले.’ कॅनडाहून खास मागवलेली ‘अॅडमसन’ साउंड सिस्टीम वापरत असलेल्या माळी यांना साथीचे वादक हे मुख्य गायक किंवा वादकाच्या ध्वनीच्या वरचढ होऊ देता येत नाहीत. त्याची खबरदारीही ध्वनी संयोजनातून घ्यावी लागत असल्याचे ते सांगतात. दाक्षिणात्य कलाकार त्यांच्या आवाज किंवा वाद्यांसाठी ‘साउंड सेटिंग’ करायला जरा जास्त वेळ घेतात. मात्र, एकदा सेटिंग झाले, की ते ध्वनी संयोजकाला पुन्हा त्रास देत नाहीत. अत्यंत शिस्तीत त्यांचे वादन सुरू असल्याचे समाधानही हा ‘सवाई’चा ‘साउंडमॅन’ वर्षानुवर्षे बाळगतो आहे.
..
‘सूरबहार’सारखे नवे वाद्य मंचावर सादर होणार असते, तेव्हा तर आवर्जूनच; पण शक्यतो प्रत्येक कलाकाराच्या सादरीकरणापूर्वी मी ग्रीनरुममध्ये त्यांच्यासह हजर राहातो. त्यांचा आवाज किंवा वाद्याचा ध्वनी कानात साठवून घेतो. फ्रिक्वेन्सी लक्षात घेतो. त्यानुसार ध्वनी संयोजन करतो. त्यामुळे आत्तापर्यंत कुठल्याही कलाकाराने कधी तक्रार केलेली नाही; उलट काही कलाकार आवर्जून माझे कौतुक करण्यासाठीच मला शोधत आले आहेत.’
- प्रदीप माळी, ध्वनी संयोजक (सवाई)
...
‘अण्णा माइककडे पाहत नसत’
‘सवाई’तील ध्वनी व्यवस्थापनाच्या १८ वर्षांपासूनच्या अनुभवाविषयी बोलताना माळी यांना स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. ते म्हणाले, ‘अण्णांचा रियाज तर जबरदस्त होताच; पण त्याचमुळे त्यांना त्यांच्याच आवाजाची इतकी खात्री होती, की ते माइककडे पाहायचेही नाहीत. आजच्या तरुण कलाकारांना स्टुडिओ रेकॉर्डिंग व हेडफोनमुळे ‘लाउड साउंड’ची सवय झाली आहे. त्यामुळे ते मॉनिटरवरून मोठा आवाज द्यायला सांगतात.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगली सरोद, सतारची जुगलबंदी

$
0
0

धनश्री घैसास, श्रीनिवास आणि विराज जोशींनाही रसिकांची दाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
एकीकडे धीरगंभीर तर दुसऱ्या बाजूला अवीट गोड वाद्य...एक विरह रसाला मोकळी वाट करून देणारे तर दुसरे आनंदाची अनुभूती देणारे...या दोन वाद्यांचे स्वर एकवटणे म्हणजे विरहानंतर मिळणाऱ्या सुखाची स्वर्गीय अनुभूतीच. सरोद व सतार या भगिनींचे असे एकवटणे रसिकांनी शनिवारी याची देही याची डोळा अनुभवले.
६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सरोद, सतार या दोन वाद्यांची अप्रतिम जुगलबंदी रसिकांना अनुभवता आली. लक्ष्य व आयुष मोहन गुप्ता या दोघा बंधूंनी सुरुवातीपासून घेतलेली स्वरांची आणि व्यासपीठाची पकड जराही सैल होऊ दिली नाही. जोग, मांजखमाज या रागांची मुक्त उधळण करत आलाप, जोड, झाला, गत व द्रुत तालातल्या मन मोहून टाकणाऱ्या रचनांनी अवकाशात प्रसन्नता व्यापून राहिली. सरोद व सतारीची ऐन रंगात आलेली जुगलबंदी द्रुत लयीतून स्वरांचा बहारदार आविष्कार करणारी ठरली. सतारीची मिंड रसिकांच्या मनातील तारांना स्पर्शून गेली. मिश्र मांडमधील रचना राजस्थानी सैर घडवणारी होती. राजेंद्रसिंग सोळंकी, पं. अखिलेश गुंदेचा, विनय चित्राव यांनी केलेल्या वाद्यसाथीतून मैफल सजली.
पूर्वार्धात अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या धनश्री घैसास यांचे गायन रंगले. आपल्या पहिल्याच मैफलीत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. भीमपलास राग व ‘रे बिरहा,’ ‘नजरिया लागे नही,’ या रचना सादर झाल्या. पुष्कराज जोशी, सिद्देश विचोलकर, अनुजा भावे व वैशाली कुबेर यांनी त्यांना सुरेख साथसंगत केली. पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी यांच्या गायनाला रसिकांची दाद मिळाली. यमन रागाचा त्यांनी खुबीने विस्तार केला. ‘माझा भाव तुझे चरणी,’ व ‘माझे माहेर पंढरी,’ या भजनांनी रसिक भक्तिरसात तल्लीन झाले. जोशी यांच्या गायनातील ताना, हरकतीने रसिक भारावले. विराजनेही आपल्या गायकीचा प्रत्यय रसिकांना दिला. पांडुरंग पवार, अविनाश दिघे, फारूक लतीफ, गंभीर महाराज, माउली टाकळकर, मुकुंद बादरायणी व नामदेव शिंदे यांनी साथसंगत केली. गुप्ता बंधूंच्या आविष्कारानंतर पं. उदय भवाळकर यांचे गायन रंगले. धृपद गायकीचा अनुभव त्यांनी रसिकांना दिला. राग बागेश्री, चौतालातील बंदिश, आये रघुवीर अयोध्या नगर, अरज मोरी मन रे या रचना रसिकांना सुखवून गेल्या. डॉ. एल. सुब्रह्मण्यम् व अंबी सुब्रह्मण्यम् यांची व्हायोलिनची जुगलबंदी या मैफलीचे अत्युच्च शिखर ठरले. रात्री बारापर्यंत रंगलेल्या मैफलीने रसिक तृप्त झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्नाशी सुसंगत सोने असल्यास भीती नाही

$
0
0

नागरिकांनी घाबरून जाऊ नये; तज्ज्ञांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सरकारने प्रत्येकाकडे किती सोने असावे, याबाबतच्या निर्देशांची पुन्हा एकदा आठवण करून दिली. त्यानंतर मोठी खळबळ उडाली असून सरकार सोने जप्त करणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, ज्यांच्याकडे आपल्या उत्पन्नाशी सुसंगत सोने आहे, त्यांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांचे सोने सरकार जप्त करणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये,’ असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
सरकारने गेल्या गुरुवारी संसदेत याबाबत घोषणा केली होती. विवाहित आणि अविवाहित महिलांना अनुक्रमे ५०० आणि २५० ग्रॅम सोने जवळ बाळगता येईल. तर, पुरुषांना केवळ १०० ग्रॅम सोने जवळ बाळगता येईल, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ही घोषणा नवी नव्हती, तर प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींचाच हा पुनरुच्चार होता.
प्राप्तिकर विभागातर्फे मारण्यात येणाऱ्या छाप्यांमध्ये संबंधितांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक सोने आढळल्यास ते खरेदी करण्यासाठी करचुकवेगिरी केल्याचा किंवा अघोषित उत्पन्नाचा वापर करण्यात आला आहे, असे समजून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. घरामध्ये ठेवण्यात आलेल्या सोन्याचे प्रमाण व्यक्तीच्या उत्पन्नानुसार असेल, तर संबंधितांना घाबरण्याची काहीही आवश्यकता नसल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या घोषणेचा अर्थ नीट समजून न घेतल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
'सरकारने एकूणच बेहिशेबी किंवा अघोषित संपत्तीबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अघोषित सोन्याच्या साठ्याविरोधातील कारवाई हा त्यातलाच एक भाग आहे. सरकारने घालून दिलेल्या मर्यादेत सोने असल्यास त्यांना कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. त्यापेक्षा अधिक सोने असेल, व ते तुमच्या घोषित उत्पन्नाशी सुसंगत असल्यास घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, हा सोन्याचा साठा घोषित उत्पन्नाशी सुसंगत नसल्यास मात्र, त्याची चौकशी होणार आहे,' असे कमोडिटी तज्ज्ञ अमित मोडक यांनी सांगितले.
'ज्यांच्याकडे संपत्ती आहे, व त्यावर कर भरला आहे, ते त्यांच्या संपत्तीशी सुसंगत असे कितीही सोने जवळ बाळगू शकतात. त्यावर कोणत्याही मर्यादा नाहीत. हे सोने ज्या वेळी खरेदी केले तेव्हाचे उत्पन्न सोन्याच्या दराशी सुसंगत असले पाहिजे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर काहींनी मोठ्या प्रमाणावर सोनेखरेदी केली होती. त्याला जरब बसवी, नागरिकांकडून चूक होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरिक किंवा वडिलोपार्जित सोने असल्यास २०१४ पर्यंत अस्तित्वात असलेल्या वेल्थ टॅक्सनुसार त्याची प्राप्तिकर रिटर्नमध्ये नोंद केली असल्यास व त्यावर कर भरलेला असल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही,' असेही मोडक यांनी स्पष्ट केले. विवाहित आणि अविवाहित महिलांना अनुक्रमे ५०० आणि २५० ग्रॅम सोने जवळ बाळगता येईल. तर, पुरुषांना केवळ १०० ग्रॅम सोने असल्यास वेल्थ टॅक्समध्ये हे सोने करपात्र समजले जात नव्हते.
०००
सरकारने घालून दिलेल्या मर्यादेत सोने असल्यास त्या व्यक्तींना कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. त्यापेक्षा अधिक सोने असेल, व ते तुमच्या घोषित उत्पन्नाशी सुसंगत असल्यास घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, हा सोन्याचा साठा घोषित उत्पन्नाशी सुसंगत नसल्यास मात्र, त्याची चौकशी होणार आहे.
- अमित मोडक, कमोडिटी तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्गाशी नाते जुळायला हवे

$
0
0

प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पूर्वजांपासून चालत आलेले बिबट्यांबरोबर सहचर्य आजही शक्य आहे. आदिवासी लोकांप्रमाणे शहरी नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. बिबट्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मनुष्य आणि प्राणी संघर्ष संपविण्यासाठी निसर्गाशी तुटलेले नाते पुन्हा जुळले पाहिजे,’ असे मत प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी व्यक्त केले.
पुणे वन्यजीव विभागातर्फे बीबीसी छायाचित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे वन्यजीव विभागातर्फे खानोलकर यांचा प्रसिद्ध सर्प अभ्यासक नीलमकुमार खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर, मानद वन्यजीव रक्षक अनुज खरे, किरण पुरंदरे यांसह वनाधिकारी उपस्थित होते. खानोलकर यांनी ‘बिबट्यांबरोबरच सहजीवन आणि छायाचित्रातून वन्यजीव संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
खानोलकर म्हणाले, ‘जीम कॉर्बेट अभयारण्याजवळील वस्तीत लोकांनी बिबट्याला जाळताना मी पाहिले आणि माझ्या फोटोग्राफीला वेगळे वळण मिळाले. वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांच्या मार्गदर्शन घेऊन बोरिवली नॅशनल पार्क परिसरात संशोधनाला सुरुवात केली. बिबटे जंगलात राहतात, हा गैरसमज आहे आणि ते वन विभागाची मालमत्ता आहेत, अशी लोकांची आज मानसिकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या ताणामुळे नागरिकांची सहनशक्ती कमी होत आहे. त्यामुळे ते वन्यजीवांवर राग काढत आहेत. मुंबईत वन क्षेत्राचा बफर आणि रहिवासी क्षेत्र अशी सीमा रेषा कधीच पुसली गेली आहे. संशोधनादरम्यान कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये मला वाड्या, सोसायट्यांजवळ राहणाऱ्या बिबट्यांचे अनेक अनोखे जग समोर आले.’
‘खरे तर बिबट्यांनी आता शहरात राहण्याची कला आत्मसात केली आहे. त्यांना वाहतुकीची भीती वाटत नाही. माणसाच्या नकळत वस्त्यांजवळ कसे राहायचे, रहदारीतून वाट कशी काढायची याचे प्रशिक्षण बिबट्या माद्या त्यांच्या पिल्लांना देत आहेत. कचऱ्यामुळे वाढलेली कुत्री आणि डुकरांमुळे बिबट्यांना मुबलक अन्न उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास न देता बिबट्यांची अनेक कुटुंब शहरात राहत आहेत, असे सांगून खानोलकर यांनी सांगितले. या विधानाला पुष्टी देण्यासाठी त्यांनी रात्री शांत झालेल्या वस्त्यांमध्ये वावणाऱ्या बिबट्यांची दुर्मिळ छायाचित्रे दाखविली. मनुष्य आणि बिबट्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे, असे आवाहन खानोलकर यांनी केले.
..,.....
इतरांच्या तुलनेत भारतीय वन्यप्राण्यांबाबत अधिक सहिष्णू आहेत. मात्र, शहरी नागरिकांची सहनशक्ती कमी होत चालली आहे. त्यांना घराजवळ जंगल हवे आहे, पण तेथील प्राण्यांचा उपद्रव नको आहे. तर दुसरीकडे बिबट्यांनी शहरात राहण्याची कला आत्मसात केली आहे. माणसाच्या नकळत बिबट्यांची कुटुंब वस्ती, इमारतींच्या जवळ वास्तव्यास आहेत. भटकी कुत्री, डुकरांमुळे बिबट्यांना अन्नाचा तुटवडा भासत नाही.
- नयन खानोलकर, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैशांवर माज करणाऱ्यांचे दिवस संपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘राज्यकर्तेच ठेकेदार बनल्याने नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. मात्र, आता सरकारने तेथील कामाचे ऑडिट करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमली आहे. जनतेच्या पैशावर माज करणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. आम्हाला जनतेच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत नेत्यांच्या नाहीत,’ असा हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील प्रचारसभेत शनिवारी चढविला.

फडणवीस यांनी जिल्ह्यात बारामती, लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी आणि शिरूरमध्ये प्रचारसभा घेतल्या. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, योगेश टिळेकर आदी या वेळी उपस्थित होते. ‘बारामती धनदांडग्याची नाही, ती गरिबांची, शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. हे परिवर्तन यंदा बारामतीतही दिसेल,’ असेही फडणवीस यांनी सांगितले. ‘बारामतीकरांनी सत्तापरिवर्तन केल्यास राज्याची तिजोरी बारामती शहराच्या विकासासाठी खुली राहिल, अशी ग्वाही देऊन काळ्या पैसा, भ्रष्टाचारविरुद्धच्या लढाईत बारामतीकरांची साथ हवी आहे,’ असे आवाहन त्यांनी केले.

मोदींचे सैनिक बनून काही दिवस त्रास सोसा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘नोटाबंदीवरून तोंड काळे झालेल्या काळ्या पैसेवाल्यांची ओरड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सैनिक बनून काही दिवस त्रास सहन करा, त्यानंतर आर्थिक गुलामगिरीतून कायमचे मुक्त होऊ,’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रचारसभेत केले.
महाराष्ट्र गावांप्रमाणेच शहरातही विस्तारलेला आहे. मागील सरकारने शहरांकडे दुर्लक्ष केले कसल्याही प्रकारचे नगर नियोजन केले नाही. स्वातंत्र्यानंतरही आपण अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजा देऊ शकत नसेल तर काय उपयोग अशी टिप्पणी त्यांनी मागील सरकारवर केली.

विजयाची सुरुवात तळेगावातून

‘पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची विजयी सुरुवात तळेगाव दाभाडेने केली आहे. त्यामुळे या नगरपालिकेला पैशांची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळेगावदाभाडे येथे दिली. तळेगावदाभाडे प्रमाणे सर्वत्र भाजपची घौडदौड कायम राहिल. सरकारने दिलेला निधी पारदर्शीपणे खर्च झाला पाहिजे. त्यासाठी पूर्णपणे पारदर्शी ई-टेंडर निघाले पाहिजे आणि म्हणून नगरपालिका पारदर्शी गतीशील व गुणवत्तापूर्ण असल्या पाहिजे,’ असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

नगरपालिकांमध्येही ई-टेंडरिंग झाले पाहिजे. त्यामुळे तेथेही कारभार पारदर्शी पद्धतीने चालेल आणि सरकारचा पैसाही मार्गी लागेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी आता स्वतंत्र वाचनालये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगभरात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती व्हावी, महिलांना आपल्या आवडीची पुस्तके, साप्ताहिके; तसेच मासिके वाचता यावीत, यासाठी खास महिलांसाठी स्वतंत्र वाचनालये सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महिलांना घरगुती वस्तुंची खरेदी करता यावी, यासाठी या वाचनालयाच्या आवारात शॉपिंग मॉल उभारले जाणार असून, पहिल्या टप्प्यात कर्वेनगर आणि वानवडी भागात हा प्रयोग केला जाणार आहे.

शहरातील विविध भागांत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाचनालये उभारण्यात आलेली असली, तरी या वाचनालयाचा उपयोग महिला वर्गाकडून फारसा केला जात नाही. महिलांना त्यांच्या आवडीची पुस्तके, मासिके सहजपणे वाचता यावीत, यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची सूचना पुढे आली होती. उपनगरांमध्ये वाचनालयाची सोय नसल्याने महिला वर्गाची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर कर्वेनगर, वारजे माळवाडी; तसेच वानवडी भागात ही वाचनालये सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वाचनालय उभारण्याचे काम सुरू केले जाणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या जागेत ही वाचनालये सुरू केली जाणार असून मराठीसह हिंदी, इंग्रजी या भाषेतील साहित्य येथे वाचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. या वाचनालयात सर्वसाधारण दीडशे ते दोनशे महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा बसविली जाणार आहे. महिलांसाठी सक्षमीकरण योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. वाचनालयात येणाऱ्या महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा विचार केला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही; तसेच सुरक्षा पथक नेमले जाणार असल्याचे महापौर जगताप
यांनी सांगितले.

लहान मुलांसाठीही स्वतंत्र कक्ष

महिलांसाठी स्वतंत्र वाचनालयाचा प्रकल्प कर्वेनगर, वारजे भागात राबविला जाणार असल्याचे स्थानिक नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी सांगितले. या वाचनालयांमध्ये लहान मुलांसाठीही स्वतंत्र कक्ष उभारण्याचा विचार असून सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत हे सुरू राहील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी येथे घेतली जाणार असल्याचे दुधाणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईचा स्वराविष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी राग मधुवंती सुरू करतो...अशा अस्खलित मराठीत तो बोलला. पुढील एक तास तो संतूरमधून बोलत होताच. त्याचे हे हळुवार बोलणे, संतूरच्या स्वरांतून सुमधुर व्यक्त होणे थांबूच नये असे वाटत होते. हा विनयशील कलावंत म्हणजे मूळचा जपानचा ताकाहिरो अराई. त्याच्या या व्यक्त होण्यानंतर अमान व अयान अली बंगश या बंधूंची सरोदमधून अभिव्यक्ती प्रकटली. जी स्वराविष्कार साधणारी होती.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे सत्र सुरू होण्याची वेळ दुपारची चारची. काही रसिक दुपारी दोनपासूनच येऊन बसलेले असतात. दुपारच्या तीन वाजता तो स्वरमंचावर येतो. बारीकशी अंगकाठी असलेला तो ध्वनियंत्रणा चोख करून घेतो. संतूरचा स्वर आणि ध्वनी यांची सांगड योग्य पद्धतीने घातली जात आहे, ही खात्री पटल्यावर तो निघून जातो. उपस्थित रसिकांसाठी हा सुखद धक्का असतो; कारण तो कलावंत म्हणजे पं. शिवकुमार शर्मा यांचा शिष्य ताकाहिरो. स्वरसत्राला सुरुवात होते, तो पुन्हा अवतरतो. ‘गुरुजनों को मेरा सादर प्रणाम... तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी राग मधुवंती सुरू करतो,’ हे त्याचे हिंदी व मराठी बोलणे रसिकांना सुखावून जाते. जपानी असूनही या भाषा कशा येतात, या विचारात रसिक गुंतलेले असतात, तोच तो आपल्या बहारदार वादनातून रसिकांच्या मनाची पकड घेतो. आलाप, जोड, झाला हे विलंबित झपतालात व द्रुत त्रितालात सादर करून तो कमालीचे चैतन्य निर्माण करतो. संतूरचे मनाच्या तारा छेडणारे स्वर डोळ्यांनाही जाणवू लागतात. एका तासाच्या बैठकीत त्याने ही किमया साधलेली असते. अधिक वादन व्हावे या रसिकांच्या आग्रहाला तो विनशीलतेनेच नकार देतो. ‘बडे लोगों का समय नहीं लेना चाहता, अगली बार जरूर बजाऊंगा,’ या त्याच्या वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होतो कारण संतूरवादनाबरोबर साथीला असलेल्या त्याच्या विनयशीलतेने रसिकांवर गारुड केलेले असते. गुरू पं. शिवकुमार शर्मा आपल्या शिष्याचे वादन भ्रमणध्वनीद्वारे ऐकत त्याचे कौतुक करतात.
अभिव्यक्त होण्याचा हा ख्याल पुढे असाच सुरू राहतो. पं. कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या बहारदार गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. राग पटदीप त्यांनी आपल्या भरजारी आवाजाने खुलवला. ‘देखो जिया बेचैन’ या बंदिशीने विरहरस निर्माण केला. आपल्या गायकीचा समारोप त्यांनी भजनातून केला आणि रसिक तल्लीन झाले. पं. रामदास पळसुले, सुयोग कुंडलकर यांनी सुरेख साथसंगत केली.
ताकाहिरोनंतरचे आकर्षण होते, अमान व अयान अली बंगश या बंधूंची जोडगोळी. सुरुवातीला राग पूरिया कल्याणमधून त्यांनी स्वरझंकार केला. या बंधूंचे सादरीकरण इतके दमदार होते, की सरोदचे धीरगंभीर स्वरही प्रसन्न भासू लागले आणि वातावरणात चैतन्य निर्माण झाले. या जोडगोळीचा सरोदचा हस्तस्पर्श स्वराविष्कार करणारा होता.
उस्ताद अमजद अली खाँ यांनी गणेशकल्याण राग खुलवला. खाँ यांचे स्वतंत्र वादन व मुलांचा स्वराविष्कार संपूर्ण महोत्सवाचेच अत्युच्च शिखर होता. स्वरचिंब झालेल्या रसिकांनी या तिघांना डोक्यावर घेतले. उस्तादजींनी सादर केलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘एकला चलो रे’ रचनेने रसिक वेडे झाले. तन्मय बोस व सत्यजित तळवलकर यांनी तबलासाथ केली. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने स्वरसोहळ्याची सुरेल सांगता झाली. संपूर्ण महोत्सवाचे निवेदन आनंद देशमुख यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​अवतरले तबकडी युग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रसिकांना ‘तकबडी युगा’ची सफर अनुभवता आली. या अनोख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्या जाणत्या रसिकांसह युवा पिढीच्या रसिकांनाही तबकडी युग अनुभवता आले. प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या या अनोख्या प्रदर्शनाद्वारे रसिकांना ही संधी साधता आली. महोत्सवातील हे प्रदर्शन रसिकांसाठी लक्षवेधी ठरले.
अभिजात संगीताच्या क्षेत्रातील बुजुर्ग गायक आणि वादक कलाकारांच्या आविष्काराची मर्मबंधातली ठेव म्हणजे तबकड्या. संगीत श्रवणासाठी ध्वनिफिती म्हणजेच कॅसेटचा जमाना आता गेला असून सध्या सीडी, डीव्हीडी आणि पेन ड्राइव्ह या आधुनिक माध्यमांचा उपयोग केला जात आहे. मात्र, ध्वनिफितीच्याही आधी ‘ग्रामोफोन रेकॉर्डस्’ म्हणजेच तबकडीचे युग होते. या युगाची माहिती प्रदर्शनातून मांडण्यात आली होती. तबकडी युगाची सफर अनुभवतानाच ज्येष्ठ कलाकारांची त्यांच्या उमेदीच्या काळातील छायाचित्रेही पाहण्याची या प्रदर्शनात ग्रामोफोन रेकॉर्डसच्या सुवर्णकाळातील कलाकारांच्या निवडक तबकडींची माहिती मिळाली. या रेकॉर्डसच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरील उत्कृष्ट डिझाइन, विविध प्रकारची टायपोग्राफी म्हणजेच सुलेखनकलेचा आविष्कार, ज्या कलाकाराची रेकॉर्ड आहे त्याचे छायाचित्र आणि रेकॉर्डमध्ये असलेल्या रागांची तसेच कलाकाराला साथसंगत करणाऱ्या कलाकाराची माहिती या सर्व गोष्टींचा प्रदर्शनात अंतर्भाव होता.
उस्ताद अब्दुल करीम खाँ, पं. सवाई गंधर्व, उस्ताद विलायत खाँ, पं. भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, मोगुबाई कुर्डीकर, उस्ताद अली अकबर खाँ, पं. जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ, येहुदी मेन्यूहिन-पं. रविशंकर, पं. व्ही. जी. जोग, माणिक वर्मा, पं. जितेंद्र अभिषेकी, नजाकत-सलामत अली, पं. ओंकारनाथ ठाकूर, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, बेगम अख्तर, पं. डी. व्ही.पलुस्कर, पं. पन्नालाल घोष अशा दिग्गज कलाकारांच्या रेकॉर्डसवर त्यांच्या उमेदीच्या काळातील दुर्मिळ छायाचित्रे पाहताना रसिक सुवर्ण काळात हरखून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवाई महोत्सवात‘प्रेमरसाचा राग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संगीत मनांना जोडते, असे म्हणतात. त्यामुळेच की काय संगीताशिवाय प्रेम ही कल्पनाच मान्य होऊ शकत नाही. प्रेमाभोवती फिरणारी हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीत हे एक वेगळेच नाते आहे. हिंदी चित्रपट संगीतात प्रेमरसाच्या निमित्ताने बहरलेली गाणी म्हणूनच सदाबहार ठरली. या संगीतप्रकाराने दोन जीवांना जसे जवळ आणले तसाच आविष्कार शास्त्रीय संगीतामुळेही होतो. सवाई महोत्सवातील प्रेक्षकांमधील ‘कपल्स’ हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण.
तरुण पिढी शास्त्रीय संगीत ऐकत नाही, हा समज सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने आधीच खोटा ठरवला आहे. महोत्सवाला येणाऱ्या तरुणांची संख्या दर वर्षी वाढत आहे. तरुण कलाकार व कलाकारांच्या जोड्या हे यंदाच्या सवाईचे वैशिष्ट्य. यंदा सवाईत तरुणांचा आविष्कार झाल्याने तो अनुभवण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती. या गर्दीत लक्ष वेधून घेत होते ते ‘कपल्स’. व्यासपीठावर कलाकारांच्या जोड्या बहारदार वादन करत असताना रसिकांमधील या जोड्याही विशेष ठरल्या.
भारतीय बैठकीच्या व्यवस्थेत बहुसंख्येने या विशेष जोड्या होत्या. शास्त्रीय संगीताची आवड, अल्पदराचे तिकीट यामुळे सहा तास सहवासाची संधी जोड्यांनी साधली. सवाईतील वातावरण मोकळेढाकळे असल्याने जोड्यांना संवाद साधता आला. मैफलीचा आस्वाद घेणारी ‘कपल्स’ ठिकठिकाणी नजरेस पडत होती. खाद्य पदार्थांचे स्टाॅल असल्याने तिथेही एन्जाॅय करण्याची संधी जोडप्यांनी ‘कपल्स’नी दवडली नाही. संगीताच्या साथीने वाफाळत्या काॅफीचा आस्वाद घेत जोड्यांचा संवाद रंगल्याने सवाई महोत्सव जोड्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘सवाई’ ठरला आणि प्रेमरसाचा राग बहरत गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पसरली गान‘प्रभा’

$
0
0

पुणे ः महोत्सवाच्या समारोप सत्रात स्वरयोगिनी डाॅ. प्रभा अत्रे यांचे गायन रंगले. शाम कल्याण राग त्यांनी खुलवला. ‘गजवदना हे गणराया रचना’, भिन्न कंस रागात बंदिश, तराणा, भैरवी राग अशा सादरीकरणाने त्यांचे गायन सजले.
गेल्या वर्षी अपुऱ्या कालावधीमुळे त्यांनी व्यासपीठावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदाच्या मैफलीकडे कानसेनांचे लक्ष लागले होते. आयोजकांनी खबरदारी घेऊन आधीचे कार्यक्रम वेळेत पूर्ण केल्याने डाॅ. अत्रे यांना सव्वा तास मिळाला. डाॅ. अत्रे यांचे गायन विस्तृतपणे ऐकायला मिळाल्याने रसिकांनी त्यांचा स्वर आनंदाने कानात साठवत सभामंडपाचा निरोप घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोदींच्या भाषणासाठी उत्सुक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘लोकसभेत मला बोलू दिले जात नाही, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप चुकीचा आहे. संसदेत पंतप्रधान बोलायला उभे राहिले की, सर्व सदस्य शांत राहतात. परंतु, त्यासाठी त्यांनी संसदेत भाष्य करण्याची तयारी दाखविली पाहिजे. त्यांना निश्चित बोलू दिले जाईल,’ असा टोला लगावत माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक असल्याचा चिमटाही काढला.

‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ आणि ‘डेमोक्रॅटिक पब्लिकेशन नेटवर्क’तर्फे प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त प्रा. बेन्नूर यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. चैत्रा रेडकर, सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निजामुद्दीन शेख, नगर येथील सुफी साहित्याचे अभ्यासक प्रा. महंमद आझम, ‘समंजस संवाद'चे संपादक
अरुण खोरे आदी या वेळी उपस्थित होते.

‘मी बोललो, तर विरोधकांचा खोटेपणा बाहेर येईल या भीतीने विरोधक मला लोकसभेत बोलू देत नाहीत,’ असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी जनसभेत केला होता. यावर बोलताना शिंदे यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे. काळ्या पैशाच्या विरोधातील लढाईला कोणाचाही विरोध नाही. मात्र, पंतप्रधानांनी त्यावर संसदेत बोलले पाहिजे. पंतप्रधानांना बोलू दिले जात नाही, हा आरोप अतिशय चुकीचा आहे. पंतप्रधान बोलत असताना संसदेत शांतता पाळली जाते,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रा. बेन्नूर आणि मी तरुण वयापासून सोबती आहोत. कोर्टात आम्ही एकत्र काम केले. अपार कष्ट, वाचन, मनन आणि चिंतन यामुळे प्रा. बेन्नूर आज विचारवंत झाले आहेत. माझ्या सहकाऱ्याचा सत्कार करताना मलाही आनंद होत आहे, असे गौरवोद्गार शिंंदे यांनी काढले. भीती, भूक, आभास आणि भयगंड या चार घटकांवर आपण विचार केला पाहिजे. भयमुक्त होऊन डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गी यांच्यासारखे निर्भयपणे आपले विचार मांडणे गरजेचे आहे, असे प्रा. बेन्नूर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतुकीचे तीन- तेरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे नामदार गोपालकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, बाजीराव रस्ता, फुरसुंगी, जेधे चौक या परिसरात नागरिकांना रविवारी सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जेधे चौकात पुलाचे काम जरी सुरू असले तरी तेथील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाईचा सपाटा लावण्यात पोलिसांनी धन्यता मानली.
दरम्यान, फर्ग्युसन आणि बाजीराव रस्त्यावर बेजबाबदारपणे दुहेरी पार्किंग करणाऱ्यांना पायघड्या घालण्याच्या धोरणामुळे कोंडीमध्ये भर पडत असल्याचे चित्र आहे. फर्ग्युसन रस्त्यावर रविवारी सायंकाळी कोंडीमुळे अॅम्बुलन्सही अडकली होती. अॅम्बुलन्सला बाहेर पडण्यासाठी रस्ता नसल्याने एकूणच गोंधळाचे वातावरण होते. बाजीराव रोडवर सदाशिव पेठेतून शुक्रवार पेठेकडे जाताना वाहन चालकांनी कोंडी केली. बाजीराव रस्ता ओलांडताना ही कोंडी होते आहे. त्यात वाहन चालकांकडून सर्रास दुहेरी पार्किंग करण्यात येत असल्याने ही कोंडी वाढत जाते. दुहेरी पार्किंग करणाऱ्या चालकांना काढण्यासाठी पोलिसांकडे कुठलिही यंत्रणा नाही. वाहतूक पोलिस कोंडी काढण्यापेक्षा पावत्या करण्यात धन्यता मानत असल्याने ही परिस्थिती उद् भवल्याची वाहन चालकांची तक्रार आहे.
जेधे चौकात सिंहगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसस्टॉपवर रिक्षा मोठ्या प्रमाणात उभ्या असतात. सर्व्हिस रोडवर या रिक्षा उभे राहत असल्याने तेथून वाहने अथवा ‘पीएमपी’ बस जाण्यासाठी अत्यंत कमी जागा मिळते. चौकामध्ये गर्दीच्या वेळी पोलिस उभे राहत असले तरी सर्व्हिस लेनवरील कोंडी काढण्यासाठी कोणाही पुढे धजावत नसल्याचे चित्र असते. या चौकात वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून गांभीर्याने नियमन केले जात नाही. चौकातील फ्लाय ओव्हरचे काम सुरू आहे. अशावेळी चौकात येणाऱ्या ​सर्व्हिस लेनचे डांबरीकरण करणे, खड्डेमुक्त रस्ता असणे अपेक्षित आहे. मात्र, याकडे महापालिका लक्ष देत नाही. पोलिसही नाहरकत देताना हे रस्ते चांगले असण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसत नाही.

वाहतूक उपायुक्त नागपूरला
वाहतूक उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे हे हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपूरला गेले असल्याने वाहतूक शाखेतील अधिकारी-कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगत आहेत. शहरातील रस्त्यांवर नेमके काय चालले आहे, हे पाहण्यासाठी कोणाही नसल्याने सगळा आनंदी आनंद असल्याचे चित्र आहे. पुणे शहरासमोर वाहतूक ही सर्वांत मोठी समस्या आहे आणि ती सोडवताना यंत्रणा अत्यंत निष्काळजीपणा दाखवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषोत्तम’’वर ‘पाझर’ची मोहोर

$
0
0

‘पीआयसीटीच्या ‘अवडंबर’ला तिसरा क्रमांक

म.टा. प्रतिनिधी, पुणे

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पाझर या एकांकिकेने महाअंतिम फेरीचे विजेतेपद मिळवून पुरुषोत्तम करंडकावर आपली मोहोर उमटवली. डीबीजे कॉलेज चिपळूणच्या ‘खारूताईचा ड्रॅमॅटिक वीकेंड’ या एकांकिकेने सांघिक द्वितीय तर, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या (पीआयसीटी) ‘अवडंबर’ या नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी ८ ते ११ डिसेंबर दरम्यान भरत नाट्य मंदिर येथे रंगली. जळगाव, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नागपूर या पाच केंद्रांवरील १८ संघांनी एकांकिका सादर केल्या. स.प. महाविद्यालयाच्या ‘३०० मिसिंग’ या एकांकिकेला प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार देण्यात आला. विजेत्यांना ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, स्पर्धेचे परीक्षक विनीता पिंपळखरे, किरण यज्ञोपवित, स्पर्धेसाठी अर्थिक सहकार्य करणारे आगटे दाम्पत्य आदी या वेळी उपस्थित होते.
‘स्पर्धेत सादर झालेल्या काही एकांकिका पाहिल्यानंतर तोंडातून व्वा…असे उदगार आपसूकच बाहेर आले., मात्र काही एकांकिका पाहून निराशा झाली. त्या मुळे निकाल लावायला फारसा वेळ लागला नाही,’ असे विनीता पिंपळखरे यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाला दुजोरा देऊन ‘का ला व्वा.. मध्ये बदलायचे असेल, तर संयोजकांनी स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांच्या तालमीपासूनच त्यांच्यावर नाटकांचे संस्कार करणे गरजेचे आहे. एकांकिका नेमकी कशी असावी, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे,’ असे बांदेकर म्हणाले. खांडेकर यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील नाटकांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘शेवटी मुंबईलाच यावे लागणार’
गेल्या वर्षी पुरुषोत्तम करंडकाच्या महाअंतिम फेरी मध्ये मुंबईच्या एका संघाने गैरवर्तन केले होते. त्या मुळे यंदा मुंबई केंद्रावर स्पर्धा घेण्यात आली नाही. मुंबईच्या मुलांना पुरुषोत्तमची शिस्त कळली नाही, असे महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे सांगण्यात आले. त्याविषयी बोलताना ‘‘केवळ एका संघाने गैरवर्तन केले म्हणून संपूर्ण मुंबईवर रोष धरू नका; तेथील कलाकार मेहनती आहेत. शेवटी पुण्यातील कलाकारांनाही टोल भरून मुंबईलाच यावे लागणार आहे,’’ असा मुंबईस्टाइल टोला बांदेकर यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म​हिनाअखेरीस महापौरपदाची सोडत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर शहराचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल, हे महिनाअखेरपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची सोडत लवकरच काढण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून, गेल्या १० वर्षांतील महापौर आरक्षणाची सर्व माहिती पालिकांकडून मागवण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल, याची सोडत काढण्यात येते. विविध पक्षांकडून इच्छुक असलेल्या सर्वांचे लक्ष सध्या या सोडतीकडे लागले असून, आपल्याला संधी आहे का याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. पहिल्या अडीच वर्षांसाठी हे पद कोणत्या गटासाठी राखीव होणार, याची उत्सुकता नजीकच्या काळात संपुष्टात येईल, अशी चिन्हे आहेत. त्यादृष्टीने, राज्य सरकारच्या पातळीवर तयारी सुरू झाली असून, गेल्या १० वर्षांतील महापौरपदाची आरक्षणे कोणकोणत्या गटासाठी होती, याची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच, २०११ची शहराची लोकसंख्या, सरकारच्या नव्या आदेशानुसार नव्या महापालिकेतील प्रभाग संख्या आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित प्रभाग अशी सर्व सविस्तर माहिती लवकरात लवकर पाठवावी, अशा सूचना सरकारने पालिकेला केल्या आहेत. पालिकेकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची सोडत काढण्यात येणार आहे.
विद्यमान महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होते. त्यात, अडीच वर्षांच्या कालावधीत सव्वा-सव्वा वर्ष संधी देण्याचे राष्ट्रवादीने सुरुवातीपासून ठरविल्याने दत्ता धनकवडे आणि त्यानंतर महापौर प्रशांत जगताप यांना संधी मिळाली. तत्पूर्वी, सुरुवातीची अडीच वर्षे ओबीसी (महिला) गटासाठी महापौरपद आरक्षित होते. यावेळी, वैशाली बनकर आणि चंचला कोद्रे यांना महापौरपद भूषविता आले. २००७ ते २०१२ या पाच वर्षांच्या कालावधीत सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण (पुरुष) या गटांसाठी महापौरपद राखीव होते. त्यावेळी, राजलक्ष्मी भोसले आणि मोहनसिंग राजपाल यांनी संधी देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेंबेवादन, सायकलिंगमध्ये पुणेकर दंग

$
0
0

लष्कर परिसरात अबालवृद्धांनी अनुभवली ‘हॅपी स्ट्रीट’ची मौज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुटीच्या दिवशी आराम करण्याऐवजी सकाळी लवकर उठून व्यायाम अन् कुटुंबाबरोबर विविध खेळ खेळण्याचा आनंद लष्कर भागातील नागरिकांनी रविवारी अनुभवला. काहींनी झुम्बाच्या तालावर व्यायाम केला अन् काहींनी जेंबे वादनातून मानसिक ताण दूर केला. तरुण मंडळी लष्कराच्या बँड वादनात आणि सायकलिंग करण्यात व्यग्र होती; तर लहान मुले रस्त्यावर खडूने मनसोक्त चित्र काढण्यात रमली होती. नेहमीपेक्षा हा रविवार त्यांच्यासाठी ‘हट के’ ठरला.
निमित्त होते, कॅम्पमधील एम. जी. रोडवर झालेल्या ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमाचे. एरवी रविवारी सकाळी निवांत उठायचे, निवांत न्याहारी आणि दुपारीनंतर भटकंतीला बाहेर पडण्याचे अनेकांचे नियोजन असते; पण गेले दोन रविवार कॅम्प परिसरातील नागरिकांनी हॅपी स्ट्रीटचा आनंद लुटला. घरातील लहान मुलांना घेऊन नागरिक सकाळीच उत्साहात घराबाहेर पडले होते. सकाळी सातपर्यंत रिकाम्या दिसणाऱ्या या रस्त्यावर बघताबघता हजारोंच्या संख्येने लोक दाखल झाले. रंगीबेरंगी फुगे घेऊन फिरणाऱ्या लहान मुलांनी आणि खेळाचे साहित्य घेऊन आलेल्या नागरिकांनी रस्ता फुलून गेला. रस्त्याच्या एका बाजूला झुम्बाच्या तालावर थिरकणारी तरुणाई तर, कुठे जेंबे वादनाचा ठेका धरलेले अबालवृद्ध, स्केटबोर्डवरून वाऱ्याच्या वेगाने फिरणारे विद्यार्थी, तर काही ठिकाणी लष्कराच्या घोड्यांवरून फिरण्याचा आनंद घेतला. सर्वाधिक प्रतिसाद झुम्बा आणि ड्रम सर्कलला मिळाला. जेंबे वादनाला सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक वादनापासूनचा हा तालप्रवास जुगलबंदीपर्यंत रंगला. छोट्या सायकली घेऊन मुले मनसोक्त फिरत होती. अनेकांनी योगा सेंटरमध्ये ताज्या हवेत मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार योगासने केली.
व्यायाम आणि करमणुकीच्या खेळांबरोबरच लष्कराचा बँड पथक लोकांचे आकर्षण ठरला. आम्ही आत्तापर्यंत लष्कराच्या उपक्रमात अनेक ठिकाणी वादन केले आहे. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि तेही रस्त्यावर पहिल्यांदाच वादन करीत असून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया बँड पथकाच्या वादकांनी दिली. बॅडमिंटन, फुटबॉल, रस्त्यावरील चित्रकलेलाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ड्रम सर्कलतर्फे लोकांना जेंबे वादनातून मानसिक तणाव दूर करण्याचे धडे देण्यात आले. येत्या रविवारी (१८ डिसेंबर)लाही याच रस्त्यावर उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिक देणार आठवणींना उजाळा

$
0
0

‘एनडीए’मध्ये आज ३१व्या तुकडीचा मेळावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) ५० वर्षांपूर्वी देशसेवेच्या निर्धाराने बाहेर पडून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी खंबीरपणे निभावणारे अधिकारी आज, सोमवारी पुन्हा जुन्या आठवणींमध्ये रमणार आहेत.
निमित्त आहे,‘एनडीए’च्या ३१व्या तुकडीच्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्याचे... कुटुंबीयांसहित एनडीएमध्ये एकत्र येऊन प्रशिक्षण काळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच, ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी आयोजित मेळाव्यात तिन्ही दलांमध्ये उपप्रमुख पदापर्यंत मजल मारलेले निवृत्त अधिकारीही सामील होणार आहेत. ‘संरक्षण दलांच्या तिन्ही शाखांचे प्राथमिक प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था असलेल्या एनडीएची ३१ वी तुकडी संरक्षण दलात दाखल होऊन ५० वर्षे पूर्ण होत आहेत. एनडीएची १३१ वी तुकडी नुकतीच दीक्षान्त संचलन होऊन पुढील प्रशिक्षणासाठी रवाना झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यापूर्वीच्या १०० तुकड्या आधी प्रशिक्षण घेतलेले माजी उच्चाधिकारी या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार असल्याने मेळाव्याला वेगळी उंची लाभली आहे,’ अशी माहिती या तुकडीचे सदस्य एअर मार्शल भूषण गोखले (नि) यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.
‘एनडीएमध्ये तिन्ही दलांच्या छात्रांना प्राथमिक प्रशिक्षण देतानाच समन्वयासाठी जॉइंटमनशिपचे धडेही दिले जातात. त्याचा या छात्रांना पुढे अधिकारी म्हणून काम करताना फायदा होतो. देशातविदेशात विविध पदांवर काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांना एनडीएमध्ये होणाऱ्या मेळाव्यातून पुन्हा एकत्र येण्याची, पुन्हा जुने दिवस अनुभवण्याची संधी मिळणार आहे,’ असेही गोखले म्हणाले. ‘एनडीएचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आमच्या तुकडीतील सदस्यांनी तिन्ही दलांमध्ये विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलल्या. माझ्यासह अनेकांना १९७१च्या युद्धात भाग घेता आला. त्यापैकी विंग कमांडर कृष्णमूर्ती बांगलादेश युद्धावेळी पाकिस्तानच्या ऐतिहासिक शरणागतीच्या फोटोतही झळकले आहेत. आमच्या तुकडीतील ३१ जणांनी देशासाठी बलिदानही दिले. आमच्यातील काही लेफ्टनंट जनरल, व्हाइस अॅडमिरल आणि एअर मार्शलही झाले. विविध गौरवपदकांसह आमच्या तुकडीने महावीरचक्रासह अनेक शौर्यपदके मिळवली,’ असे गोखले म्हणाले.
दहा वर्षांपूर्वी ब्रिगेडिअर के. एस. सैनी यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकत्र आलेल्या या तुकडीच्या यंदाच्या मेळाव्याच्या समन्वयाची जबाबदारी मेजर जनरल विजय पवार पेलत आहेत. आमच्या तुकडीचे माजी छात्र, वीरपत्नी व कुटुंबीय असे १७० हून अधिक मंडळी उपस्थित राहतील. एनडीएचे प्रमुखही आवर्जून या मेळाव्यात सामील होतील. मेळाव्याची सुरुवात ‘हट ऑफ रिमेम्बरन्स’ येथे पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहून होईल. त्यानंतर काही फिल्म, फोटो, अनौपचारिक गप्पा, पीकॉक बे मध्ये सैर, बॉल डान्स, कॅडेट मेसमध्ये आठवणी जागवत जेवण आणि परिवारासह आमच्या स्क्वाड्रनमध्ये मुक्काम असा भरगच्च कार्यक्रम आहे.

एनडीएमधील तीन वर्षांचा काळ खडतर होता. तिथले प्रशिक्षण, शिस्त आणि शिक्षा हे भविष्यात येणाऱ्या खडतर आव्हानांचा सामना करण्यासाठी किती आवश्यक होते, याची पूरेपूर जाणीव आम्हाला सेवा बजावताना झाली. या प्रशिक्षणामुळेच आम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही कणखर बनलो. माझा कॅडेट नंबर ५८७२ अगदी झोपेतही मी सांगू शकेन.
भूषण गोखले, एअर मार्शल (नि)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images