Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोर्च्यांच्या धसक्यानेच ‘युती’

$
0
0

राज ठाकरे यांची ‌शिवसेना-भाजपवर टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात निघालेल्या मराठा मोर्च्यांचा धसका घेतल्यानेच भाजप-शिवसेनेने पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये युती केल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. ‘देशाच्या इतिहासात मराठा मोर्च्यासारखे इतके शिस्तबद्ध मोर्चे निघालेले नाहीत. मात्र, जातीचा हा विचका मंडल आयोगामुळे झाला आहे. प्रत्येकजण एकमेकांकडे जातीने बघायला लागला आहे. मी जात मानत नाही, तुम्हीही मानू नका,’ असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजप-सेनेच्या युतीवर टीका केली. ‘मराठा मोर्च्यांचा धसका घेतल्यामुळेच ही युती झाली असून, मनापासून झालेली नाही. कोणी कोण्याच्याही जातीसाठी काहीही करत नाही. हे सगळे निवडणुकीसाठी वापर करून घेतील, बाकी काहीही नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ​
......
विकला जाणारा राज ठाकरे नाही
पाक कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांना विरोध केला, तर राज ठाकरेंनी मांडवली केल्याची टीका सुरू केली. पाक कलाकार असलेल्या चित्रपटांना मी आधीपासूनच विरोध केला होता. ​आता विरोध केला; कारण तो चित्रपट लागणार होता. निवडणुकांच्या तोडांवर विरोध केला असे कसे म्हणता. या भिकारड्यांच्या हातून विकला जाणारा राज ठाकरे नाही, अशी टीका त्यांनी या वेळी केली.
ते फेरीवाले, कधी या तर कधी त्या फूटपाथवर​
निवडणुकांचे वारे सुरू झाले असून अनेकांना तिकीट मिळण्याचे स्वप्न पडत आहे. मात्र, माझ्या भागाचा विकास करेन, असे कोणाला स्वप्न पडत नाही. निवडणुकीच्या तोंडावर इकडे तिकडे उड्या मारण्यास सुरुवात झाली आहे. यांना मी फेरीवाले नाव ठेवले आहे, अशी टीका ठाकरे यांनी या वेळी केली. पुणे महानगरपालिकेतील मनसेच्या तीन नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असल्याची किनार त्यांच्या या टीकेला होती. निवडून आले की हे दुकानदारी करतात आणि निवडणूक आली की फेरीवाले होतात. आज या फूटपाथवर उद्या त्या फूटपाथवर अशी यांची अवस्था असते. यांच्या घरच्यांना तरी काय वाटत असेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
.......
मराठा नाहीतर मराठी म्हणून अन्याय?
विशेष पोलिस ​महानिरीक्षक विठ्ठल ​जाधव यांची बातमी वाचली. मराठा असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अन्याय कोणी केला हे वाचत होतो तर ते नाव ‘माथूर’ होते. जाधव तुमच्यावर अन्याय मराठा म्हणून नाही तर मराठी म्हणून झाला असेल. कारण आपली ओळख मराठी आहे, असे ठाकरे म्हणाले.
...
अणे नावाचे ‘पाप्याचं पितर’
‘बेळगावात सीमाभागात आपल्या बांधवांना मारले जाते आहे, पकडले जाते आहे ते मराठी म्हणून होत आहे. या मराठी बांधवांना माझे सांगणे आहे की, हा विषय केंद्र सरकार सोडवील. त्या भागात राहत असताना त्यांचा जो कुठला दिन असेल तो काळा दिन म्हणून साजरा करू नका. महाराष्ट्रात जर महाराष्ट्र दिनाला कोणी काळा दिन म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कानफडवेल. अणे नावाचे ‘पाप्याचे पितर’ आले होते. विदर्भ स्वतंत्र करायचा म्हणे,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी समाचार घेतला.
....
दर वर्षी दोन लाख विद्यार्थी पुण्यात
पुण्यात दरवर्षी दोन लाख परप्रांतीय विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील ८० हजार विद्यार्थी पुण्यातच वास्तव्य करतात. अशा प्रकारे महानगरपालिकांची लोकसंख्या वाढत आहे. कुठपर्यंत या पालिका पुरणार आहेत. एकट्या ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिका आहेत. देशात ठाणे हा असा जिल्हा आहे की ज्यात देशभरातून सर्वाधिक लोक येत आहेत. मराठी तरुणांना येथे नोकऱ्या मिळत नाहीत. येथील शहरे बकाल होत आहेत आणि आपण भांडत आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंधरवड्यापूर्वी बँकांना गेल्या होत्या सूचना

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com
TWEET : @prasadpanseMT

पुणे : सर्व बँकांनी त्यांच्या एटीएम मशिनमध्ये शंभर रुपयांच्या नोटा देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, अशा सूचना सर्व बँकांना पंधरा दिवसांपूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्यासाठी बँकांच्या सॉफ्टवेअरमध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात, अशा सूचना बँकांना देण्यात आले होते. मात्र, त्याचवेळी हे बदल कशासाठी करण्यात येत आहेत, याची कोणतीही कल्पना बँकांना देण्यात आलेली नव्हती.

बँकिंग वर्तुळातील एटीएम संबंधी कामकाज पाहणाऱ्या वरिष्ठ सूत्रांनी ‘मटा’ला ही माहिती दिली. ‘एटीएम’मधून शंभरसह त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटा देता याव्यात, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व बँकांनी आपल्या एटीएमध्ये तांत्रिक सुधारणा कराव्यात,’ असे आदेश बँकांना पंधरा दिवसांपूर्वीच प्राप्त झाले होते. त्यात सर्व एटीएम मशिनमधील एकूण नोटांच्या किमान दहा टक्के नोटा या शंभर रुपयांच्या किंवा त्यापेक्षा कमी असाव्यात, असे म्हटले होते. त्यानुसार बँकांनी आपापल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याची चाचपणी सुरू केली होती, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

‘सर्व एटीएम मशिनच्या सॉफ्टवेअरमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या तसेच शंभर रुपयांच्या नोटा ‘वाचण्याची’ सुविधा असते. त्याआधारे हे व्यवहार होतात. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या या निर्देशांनुसार शंभर रुपये तसेच त्यापेक्षा कमीच्या नोटा रीड करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्यासाठी आता एक दिवस बँका आणि एटीएमही बंद राहणार आहेत,’ असे सूत्रांनी सांगितले.

‘बँकांना आलेल्या निर्देशांमध्ये ही सुधारणा प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे, असे म्हटले होते. त्यामुळे आम्हालाही त्याची कल्पना आली नाही. परंतु, आता त्यामागचे कारण स्पष्ट झाले आहे. तांत्रिक क्षमतेमुळे एकाच ठिकाणावरून सर्व एटीएमधील सॉफ्टवेअर अपडेट करणे शक्य आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसात हे काम पूर्ण होऊ शकते,’ असेही स्पष्ट करण्यात आले.

एटीएममधून शंभर रुपयांच्या नोटा सध्याही दिल्या जातात. मात्र, त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटा दिल्या जात नाहीत. शंभर रुपयांच्या नोटांसह त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची सध्या टंचाई आहे. त्यातच या नोटा एटीएममधून द्यायच्या झाल्यास, नोटांच्या संख्येवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघनखे, कातडे पोलिसांकडून जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
वाघाचे कातडे व वाघनखे विकण्यास घेऊ आलेल्या सराईत गुन्हेगारांना बारामती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भूषण बाळासाहेब देशमुख (वय ४०, रा. माळेगाव, ता. बारामती), संदीप रमेश बारवकर (वय २७, रा. सातववस्ती, बारामती), किरण जगन्नाथ कुंभार (वय ३४, रा. निरावागज, ता. बारामती) हे तिघेजण वाघाचे कातडे व वाघनखांची विक्री करण्यासाठी बारामतीत नीरा रोडला रेणुका टायर्स दुकानासमोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बारामती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिघांनाही अटक केली.
जप्त केलेले कातडे वाघाचे असल्याची खात्री वनरक्षक रोहन इंगवले यांच्याकडून करून घेण्यात आली. वाघाचे कातडे चार ते सव्वाचार फूट लांब व तीन फूट रुंद आहे. वाघाचे २० दात आणि नऊ नखे आरोपींकडे सापडली आहेत. त्याची किंमत १५ लाख रुपये असून एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. पोलिस हवालदार शिवाजी निकम, बाळासाहेब भोई यांच्यासह संदीप मोकाशी, सुभाष डोईफोडे, संदीप कारंडे, तुषार सानप, सदाशिव बंडगर या कारवाईत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकीत अतिक्रमण कारवाई सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी
खडकी कँटोन्मेंट बोर्डाने खडकी पोलिसांच्या सहकार्याने सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण विरोधी कारवाई केली. खडकी बाजारपेठ, बसस्थानकाजवळील जुनी चतुर्थक्षेणी कामगार वसाहत येथे कारवाई केली. येथे मोडकळीस आलेली १८ क्वार्टर्स तोडण्यात आली.
खडकी कँटोन्मेंट बोर्डाने मंगळवारपासून खडकीत धडक अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली. हळूहळू सर्व खडकीतील मोठ्या जागांवर झालेले अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे या जागा मोकळ्या मैदानासारख्या दिसू लागल्या. बोर्डाने केलेल्या या धडक कारवाईचे अनेक नागरिकांनी स्वागत केले. त्यामुळे बुधवारी, सलग दुसऱ्या दिवशी बोर्डाने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू ठेवली.
या कारवाईमध्ये बोर्डाने स्क्वेअर मार्केट येथील फुलविक्रेत्यांच्या रांगेत कारवाई केली. तसेच बसस्थानकाजवळील चतुर्थक्षेणी कामगारांच्या जुन्या वसाहतीतील १८ क्वार्टर्स जमीनदोस्त केल्या. या कारवाईमध्ये जेसीबी, अतिक्रमण विभागाचे ट्रक, बोर्डाचे सर्व विभागाचे अधिकारी तसेच खडकी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
बोर्डाने केलेल्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या टपऱ्या किंवा स्टाॅल, हातगाड्या कायमस्वरूपी जप्त करण्यात आल्या आहेत. त्या परत देण्यात येणार नाही असा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे अनधिकृत हातगाडी लावल्यास ती परत मिळणार नसल्याने यापुढे अतिक्रमण वाढणार नाही असा विश्वास बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीला बसणार चपराक : लक्ष्मण जगताप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीच्या निर्णयाची सणसणीत चपराक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना बसणार आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी केला.
पंतप्रधान मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत शहर भाजपने पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात साखर वाटून आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. खासदार अमर साबळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, शहराध्यक्षा शैला मोळक, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस माउली थोरात या वेळी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ‘आजपर्यंत पैशांच्या ताकदीवर निवडणूक लढवू पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाचशे, हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शहरात भाजपला चांगले दिवस येणार आहेत. तरीही भाजपच्या उमेदवारीसाठी निवडून येण्याची क्षमता हाच प्रमुख निकष असणार आहे. इच्छुकांकडे किती पैसे आहेत, याबाबत विचार केला जाणार नाही.’
खासदार साबळे म्हणाले, ‘हे वर्ष केंद्र सरकारने पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दलित कल्याण तसेच समता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयामुळे दलित, दिनदुबळे आणि उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी चालना मिळणार आहे. केंद्र सरकारचे हे ऐतिहासिक पाऊल असून, अतिशय धाडसी निर्णय आहे.’
‘महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युतीची चर्चा चालू असून, त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यात येत आहे,’ असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’चे पाचोऱ्याला समीक्षा संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणारे समीक्षा संमेलन यंदा जळगाव येथील पाचोरा या गावी रंगणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पाचोरा आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्रीशेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी हे संमेलन पार पडणार आहे.
ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, समीक्षा पद्धती व उपयोजना या विषयावर संमेलनात चर्चा रंगणार आहे. ही माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्राचार्य भी. ना. पाटील हे संमेलनाचे निमंत्रक असून, डॉ. वासुदेव वले हे या संमेलनाचे समन्वयक आहेत. कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. सतीश बडवे, विभागीय साहित्य संमेलनाचे निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह विनोद कुलकर्णी आणि प्राचार्य तानसेन जगताप यांच्यासह कार्यकारिणी सदस्य या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
‘संमेलनात दोन चर्चासत्रे होणार आहेत. डॉ. किसन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या चर्चासत्रात डॉ. सुभाष सावरकर (अमरावती), डॉ. विनोद कुमरे (मुंबई), डॉ. शैलेंद्र लेंडे (नागपूर ), डॉ. संजय कांबळे (बेळगाव), डॉ. ताहीर पठाण (अलिगढ) हे मान्यवर सहभागी होणार आहेत. डॉ. शिरीष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दुसऱ्या चर्चासत्रात डॉ. वंदना महाजन (मुंबई), डॉ. पुष्पा गावित (धुळे), डॉ. आशुतोष पाटील (जळगाव), डॉ. महेंद्र कदम (टेंभुर्णी), डॉ. शशिकांत पाटील (जालना) हे मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत.’ असे जोशी यांनी सांगितले. मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात गंभीरपणे साहित्य चर्चा होत नाही, अशी अनेक जाणकारांची खंत होती, तिचा विचार करून मसापने समीक्षा संमेलन सुरू केले. आजवर डॉ. के. रं. शिरवाडकर, डॉ. सुधीर रसाळ यांच्यासारख्या मान्यवरांनी या समीक्षा संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे,’ असेही जोशी यांनी नमूद केले.

चाळीसगावला रंगणार मेळावा
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा या वर्षीचा शाखा मेळावा चाळीसगाव (जि. जळगाव) येथे शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या शाखा मेळाव्याचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. मसापच्या शाखा प्रवाहीत राहणे आवश्यक आहे. आज शाखांसमोर अनेक अडचणी आणि आव्हाने आहेत. त्या दूर व्हाव्यात, शाखांचे कामकाज सुरळीत व्हावे या उद्देशाने शाखा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लोकांची वाङ्मयीन भूक भागविण्यासाठी मसापने विभागीय साहित्य संमेलन, शाखा मेळावा, युवा-साहित्य नाट्य संमेलन आणि समीक्षा संमेलन यासारखे वाङमयीन उपक्रम ग्रामीण आणि दुर्गम भागात राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे मिलींद जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचारी अनुभवतोय ‘सांस्कृतिक संचित’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पोलिस कर्मचारी कायम तणाव व गुन्हेगारीजन्य वातावरणात वावरतो. समाजातील सांस्कृतिक वातावरणापासून हा घटक कोसो दूर असतो. पोलिस कर्मचाऱ्यासाठी विचारांची मैफल तशी दुर्मिळच असते. अभिजित बोडरे हे पोलिस कर्मचारी यास अपवाद आहेत. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून ते पुण्यातील सांस्कृतिक वातावरणात पूर्णत: मिसळून गेले आहेत. यास कारण ठरले आहे ते साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे. साहित्य, संस्कृतीच्या संचिताची पालखी वाहणाऱ्या सबनीसांमुळे बोडरे यांना सांस्कृतिक संचित अनुभवायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वक्तव्याने सबनीस प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सबनीस यांना धमकी मिळाल्याने तेव्हापासून त्यांना पोलिस संरक्षण पुरविण्यात येत आहे. बोडरे सबनीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आहेत. बोडरे यांना सबनीसांमुळे वेगळ्या दुनियेची सफर घडत असताना सबनीस यांनाही बोडरे यांच्यामुळे सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळत आहे. बोडरे यांच्या कामाचे कौतुक करणारे पत्र सबनीस यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना पाठवले आहे.
‘समाज जीवन सुखमय करण्यासाठी आपण व आपले पोलिस कर्मचारी सदैव तत्पर व कर्तव्यदक्ष असतात. महाराष्ट्र शासन व आपण मला योग्य असे संरक्षण देत आहात. अभिजित बोडरे हे पोलिस कर्मचारी माझ्या संरक्षणासाठी सदैव सोबत आहेत. त्यांची कर्तव्यनिष्ठा व जबाबदारीची जाणीव प्रगल्भ आहे. बोडरे आमच्या परिवारातीलच एक सदस्य झाले आहेत. त्यांचा अभ्यास व समाजजीवनाचे आकलन सूक्ष्म व सुंदर आहे. पोलिस खात्यासंबंधी गैरसमज दूर व्हावेत, असे त्यांचे चारित्र्य व चरित्र आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या संरक्षणात पूर्णत: समाधानी आहोत. हे पत्र मी कर्तव्य भावनेने पाठवत आहे,’ अशा शब्दांत सबनीस यांनी बोडरे यांचे कौतुक केले आहे.


सबनीस सरांच्या निमित्ताने विविध साहित्यिकांना भेटता येते. त्यांचे विचार ऐकायला मिळतात. यामुळे मी वेगळ्या जगात आहे असे वाटते. वेगळे जीवन मी जगत आहे. सर व त्यांचे कुटुंबीय मला कुटुंबातीलच समजतात. चहादेखील मला सोडून घेत नाहीत. सरांचे वक्तृत्व अफाट आहे. सकाळी दिवसभराचा कार्यक्रम ठरतो. त्याप्रमाणे मी त्यांच्या बरोबर असतो.
-अभिजित बोडरे, पोलिस कर्मचारी


बोडरे यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू आहे. मला विविध विषयांवर बोलावे लागते. त्यास पूरक माहिती ते देतात. आमच्यात वैचरिक चर्चा होते. माझ्या भाषणातील कोणता मुद्दा आवडला, कोणता खटकला हे ते आवर्जून सांगतात. मी परगावी जाणार असेल तर गाडी निघेपर्यंत बरोबर असतात. दुसऱ्या गावात पोहचल्यावर तेथील पोलिस कर्मचारी आले का, याची आस्थेने चौकशी करतात. मी गावाहून आल्यावर कितीही वाजता सुरक्षेसाठी ते हजर होतात.
- डॉ. श्रीपाल सबनीस, साहित्य संमेलनाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हीएसआय०८००५’ उसाचा वाण अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) सिंधुदुर्ग येथील अंबोली ऊस प्रजनन केंद्रात विकसित केलेला ‘व्हीएसआय ०८००५’ हा उसाचा वाण ऊस आणि साखर उत्पादनात अव्वल ठरला आहे.
‘कोइमतूर येथील ऊस प्रजनन संस्थेच्या मदतीने हा वाण विकसित करण्यात आला आहे. हा वाण मध्यम उशिरा म्हणजेच १२ ते १४ महिन्यांत तयार होणारा आहे. अखिल भारतीय समन्वयित ऊस संशोधन प्रकल्पांतर्गत अंतिम-पूर्व मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या चाचणी अहवालानुसार दक्षिण भारतातील नऊ राज्यांत ऊस आणि साखर उत्पादन याबाबत हा वाण अव्वल ठरला आहे.’ असे ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.
‘पाणी आणि हवामान बदलत असल्याने दर हेक्टरी ऊस उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी, पाण्याचा ताण सहन करणारी, सरळ वाढणारी, तुरा न येणारी, खोडवा पिकाचे जास्त उत्पादन देणारी, जास्त तंतूमय पदार्थ अशा उसाची आवश्यकता असल्याने या वाणाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘को ०३१०’ आणि ‘को ८६०११’ या दोन जातींच्या संकरातून ‘व्हीएसआय ०८००५’ हा वाण निर्माण करण्यात आला आहे. हा वाण ठिबक सिचनासाठी योग्य आहे,’ असे देशमुख म्हणाले.
‘हा वाण कांडी कीड, काणी आणि तांबेरा; तसेच रेड रॉट या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. या वाणाच्या रसातील शर्करा २०.७१ टक्के आहे.’ असे देशमुख यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिक व्यवहार ठप्प

$
0
0

बाजारपेठेतील आवक-जावक झाली बंद, चेकद्वारे व्यवहारांवर भर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने गुलटेकडी येथील घाऊक भुसार तसेच फळभाज्या तसेच शहरातील विविध स्वरूपाच्या लहान मोठ्या बाजारातील आर्थिक व्यवहार बुधवारी ठप्प झाले. परिणामी, अनेकांनी दूरवरून येणारा माल उतरवून घेण्यास नकार दिला. फळे तसेच फळभाज्या विभागात अनेक विक्रेत्यांचे शेतकऱी, खरेदीदारांशी सुट्ट्या नोटांवरून वादविवाद झाले. तर अनेकांनी कोणत्याही प्रकारचे ट्रॅन्झॅक्शन केले नसल्याने ‘वेट अँड वॉच’ अशी करण्याची भूमिका घेतली.
मोदी सरकारने काल पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाजारातून बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. या निर्णयाचे पडसाद शहरातील मोठ्या गुलटेकडी तसेच विविध भागातील छोट्या मोठ्या बाजारपेठांत उमटले. अनेक व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त करताना थोडासा अवधी देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
‘मार्केट यार्डातील फळ विभागात फळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून शंभर-दोनशे रुपयांची फळे खरेदी केली जात होती. त्या बदल्यात पाचशे किंवा एक हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात होत्या. परंतु, या नोटा बाजारात चालणे अशक्य असल्याने त्या कशा घ्यायच्या, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे ग्राहकांशी त्याबाबत वाद झाले,’ अशी माहिती व्यापारी करण जाधव यांनी दिली.
‘शेतकऱ्यांचा शेत माल विकत घेतल्यानंतर त्यांना रोख पैसे द्यावे लागतात. तर अनेक शेतकरी व्यापाऱ्यांशी वर्षानुवर्षे व्यवहार करीत असतात. त्यामुळे गरजेवेळी एकदम पैसे उचलतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडून पैसे स्वीकारणे नाकारले. तर काही शेतकऱ्यांकडून पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला,’ असे व्यापारी युवराज काची यांनी स्पष्ट केले.
‘पाचशे आणि एक हजार रुपयांवरून बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला. ग्राहकांची संख्या घटली. ग्राहकांकडून आरडाओरड झाली. २० ते ३० रुपयांचा माल घेण्यासाठी पाचशे रुपये देणाऱ्या ग्राहकांकडून पैसे कसे स्वीकारायचे,’ असा सवाल फळभाज्यांचे विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी उपस्थित केला. अनेक ग्राहकांसह शेतकऱ्यांनी पाचशे एक हजार रुपयांच्या नोटांवर चक्क विक्रेत्यांचे नावच लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
नोटांअभावी मार्केट यार्डातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. मोटारचालकांनी गाडीभाड्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेणे नाकारले. शंभर रुपयांच्या नोटांमध्येच गाडीभाडे न दिल्यास माल उतरविणार अथवा घेऊन जाणार नसल्याचे चालक सांगत आहेत. त्यात बँका बंद आहेत. जळगाव, लातूर, मुंबईवरून येणाऱ्या वाहतूकदारांची उलाढाल देखील थांबेल. त्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या मालाची आवक विक्रेत्यांनी घेण्यास नकार दिला. आता मार्केट यार्डातील भुसार विभागात ५०० ते १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास घाऊक विक्रेत्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. बँका बंद असल्याने दोन ते तीन दिवस पैसे पाठविणे, डीडी काढणे किंवा आरटीजीएस करणे करता येणार नसल्याने आणखी गैरसोय झाल्याचे निरीक्षण घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी नोंदविले.
‘मार्केट यार्डातील फूल बाजारात देखील फळ तसे फळभाज्यांप्रमाणेच स्थिती झाल्याचे अनुभवयाला मिळाले. शेतकरी फुले विकायला तयार आहेत. पण पाचशे रुपयांच्या नोटा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे अडचण निर्माण झाल्याने माल पडून राहिला आहे. रोख रक्कम देण्याची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांना थेट चेकनेच व्यवहार करावे लागल्याची माहिती फुलांचे व्यापारी अरुण वीर यांनी दिली.
०००
शंभर रुपयांच्या मुबलक प्रमाणात बाजारात नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे व्यवहारात अडचणी येत आहेत. बँका सुरू झाल्यावर ही परिस्थिती सुधारेल. सरकारच्या निर्णयामुळे शहरातील विविध बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. उलाढाली मंदावल्या आहेत.
- महेंद्र पितळिया, सचिव पुणे व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटा बदलून देण्यास पोस्ट ऑफिस सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पोस्टामधील विविध बचत योजनांचे कामकाजही गुरुवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. त्यासाठी पोस्ट यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र, नागरिकांना नोटा बदलण्यासाठी ५० दिवसांचा अवधी असल्याने त्यांनी घाबरून न जाता नोटा बदलून घ्याव्यात, असे आवाहन पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वकर यांनी केले आहे.
नागरिकांची सोय व्हावी, यासाठी पोस्टातर्फे विशेष काउंटर उघडण्यात येणार आहेत. या ठिकाणी खातेदारांना पाचशे व हजारच्या आवश्यक तितक्या नोटा त्यांच्या खात्यात जमा करता येतील. व नंतर खात्यातून पैसे काढता येतील. पैसे काढण्यासाठी दिवसाला दहा हजार व आठवड्याला वीस हजार अशी मर्यादा आहे. ज्यांचे पोस्टात खाते नाही, अशांनी त्वरित नवीन खाते उघडण्याची सोयही करण्यात आली आहे, असे सावळेश्वकर यांनी स्पष्ट केले.
पोस्टात खाते नसलेल्यांनाही योग्य पुरावे देऊन काउंटरवरून बाद झालेल्या नोटा बदलून घेता येतील. त्यासाठी एका व्यक्तीला पंधरा दिवसातून एकदाच एका वेळी चार हजार रुपये देण्यात येतील, असेही सावळेश्वकर यांनी सांगितले.
सरकारने नोटा बदलून घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याचबरोबर नागरिकांना ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग असे पर्यायही उपलब्ध आहेत. उद्या पोस्टाला बँकांकडून कधी आणि कशी रोकड उपलब्ध होते, यावर पुढील चित्र अवलंबून आहे. त्यामुळे सुरुवातीला नागरिकांना पैसे देण्यास अडचण झाल्यास घाबरून न जाता, नागरिकांनी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
--
पोस्टात खाते नसलेल्यांनाही योग्य पुरावे देऊन काउंटरवरून बाद झालेल्या नोटा बदलून घेता येतील. त्यासाठी एका व्यक्तीला पंधरा दिवसातून एकदाच एका वेळी चार हजार रुपये देण्यात येतील.
- गणेश सावळेश्वकर, पोस्ट मास्तर जनरल, पुणे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेनेही नाकारल्या नोटा

$
0
0

ऑनलाइन पेमेंट करण्याचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याने मिळकतकर किंवा इतर शुल्क भरण्यास येणाऱ्या नागरिकांकडून या मूल्याच्या नोटा पुणे महापालिकेने स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे, नागरिकांमध्ये काहीसा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड अथवा ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करण्याचे आवाहन महापालिकेने केले असून, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मिळकतकर थकबाकीदारांसाठी पालिकेतर्फे सध्या अभय योजना राबवली जात आहे. त्याशिवाय, विविध स्वरूपाचे दैनंदिन व्यवहारही महापालिकेत सुरू असतात. सरकारी यंत्रणा असल्याने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा पालिकेत स्वीकारल्या जातील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. पालिकेने या नोट्या स्वीकारण्यास नकार दिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. त्याबाबत अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे विचारणा केली. दुपारी, पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत सर्व प्रमुख बँकांचे प्रतिनिधींसोबत बैठक झाली. त्यामध्ये, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार महापालिकेला या नोटा स्वीकारण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे, शंभर रुपये किंवा त्यापेक्षा कमी मूल्याच्या चलनाद्वारे कर भरणा किंवा इतर शुल्क रोखीने स्वीकारले जाईल, असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले.
...
ऑनलाइन व्यवहारांवर
अतिरिक्त शुल्क नाही
महापालिकेने चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाइन बँकिंगद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही बंधन नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे, नागरिकांनी या पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
‘आरबीआय’कडून मागवले निर्देश
पेट्रोल-डिझेल, प्रवास, औषधे, सरकारी हॉस्पिटल अशा ठिकाणी येत्या शुक्रवारी (११ नोव्हेंबर) रात्रीपर्यंत पाचशे आणि एक हजार रुपयाचे चलन स्वीकारले जाणार आहे. महापालिकांनी त्याबाबत काय करावे, याबाबत स्पष्टता येण्यासाठी थेट ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडून (आरबीआय) खुलासा मागविण्यात आल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. गुरुवारी त्याबाबतचे निर्देश येण्याचे संकेत त्यांनी दिले.
....................
‘ऑनलाइन’द्वारे ३४ टक्के निधी जमा
रोख भरण्यासह ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी पालिकेने डेबिट-क्रेडिट कार्डांच्या वापरावर कोणतेही अतिरिक्त शुल्क घेण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, कर भरण्यासाठी ऑनलाइन बँकिंगचा वापर यंदा मोठ्या प्रमाणात वाढला. गेल्यावर्षी, एकूण निधीपैकी १३ टक्के निधी ऑनलाइन व्यवहारांतून जमा झाला होता. यंदा, हेच प्रमाण आत्ताच ३४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ऑनलाइन व्यवहारांमधून महापालिकेला आत्तापर्यंत तब्बल १७१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. गुरुवारी एका दिवशी शंभर ऑनलाइन व्यवहारांतून पालिकेच्या तिजोरीत १६ लाख रुपये जमा झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सहकारी बँकानिर्णयाबाबत संभ्रमावस्थेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरी सहकारी बँकांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. मात्र, या नोटा एक्स्चेंज करून देण्याबाबत या बँकांपुढे पेच निर्माण झाला आहे. प्रत्येक नागरी सहकारी बँकेचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असून, त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणेच अवघे दहा हजार रुपये खात्यातून देण्याची तयारी राष्ट्रीयी​कृत बँकांनी दर्शवल्यामुळे या बँका संभ्रमावस्थेत पडल्या आहेत.
‘राष्ट्रीयीकृत बँकांनी नागरी सहकारी बँकांना सामान्य ग्राहक समजून दहा हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांपुढे त्यांच्या ग्राहकांना द्यावयाच्या रकमेबाबत पेच निर्माण झाला आहे.’ असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
‘याबाबत फेडरेशनने रिझर्व्ह बँक ऑफ ​इंडियाकडे दाद मागितली असता, त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन फेडरेशनला दिले. मात्र, याबाबत कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे.’ असेही अनास्कर म्हणाले.
‘बँकांच्या खातेदारांना आणि खातेदार नसलेल्यांनादेखील चार हजार रुपयांपर्यंत रद्द केलेल्या नोटा बदलून देण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र, या नोटा एका व्यक्तीला किती बँकांच्या किती शाखांमधून उपलब्ध होतील. याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.’ असेही अनास्कर म्हणाले.
‘बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी ​किंवा नोटा बदलून देण्यासाठी बँकांकडे शंभर आणि त्यापेक्षा कमी रकमेच्या नोटांचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे बँकांना आवश्यक तेवढी रक्कम उपलब्ध न झाल्यास ग्राहकांना नियमानुसार रक्कम देणे अवघड जाणार आहे.’ असे त्यांनी नमूद केले.
.................
महावितरण नोटा स्वीकारणार नाही
‘महावितरण’च्या राज्यभरातील वीज बिल भरणा केंद्रांमध्ये जमा झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा दहा नोव्हेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत बँकांच्या संबंधित शाखांमध्ये जमा करण्याचे निर्देश बँकांनी ‘महावितरण’ला दिल्यामुळे या नोटा स्वीकारण्यात येणार नसल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले. या निर्देशांमुळे वीज बिल भरणा, नवीन वीजजोडणीचे कोटेशन किंवा इतर रकमेचा भरणा करण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारता येणार नाहीत, असे ‘महावितरण’ने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. याबाबत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक मनी, ऑनलाइन बँकिंगला पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशाच्या अर्थव्यवस्थेतून सध्या अस्तित्वात असलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात सध्या नोटांची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. ‘रिअल मनी’ची जरी टंचाई असली, तरी प्लास्टिक मनी किंवा ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून विविध दैनंदिन व्यवहार करणे सहजशक्य आहे. त्याविषयी...
...
प्लास्टिक मनी किंवा कार्डांच्या माध्यमातून आपल्याला पैसे काढणे, दुसऱ्या खात्यासाठी पैसे पाठवणे, वस्तू अथवा सेवांची खरेदी करणे आदी व्यवहार करता येतात. सध्या भारतात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. या प्रत्येक कार्डाबाबत रिझर्व्ह बँकेने काही नियम घालून दिले आहेत. ते सर्व बँकांवर बंधनकारक आहेत. परंतु, खातेदारांच्या खात्याच्या प्रकारानुसार या कार्डांवरील शुल्काचे किंवा मोफत व्यवहारांचे किंवा व्यवहार मर्यादेचे प्रमाण ठरते.
...
डेबिट कार्ड
डेबिट कार्डच्या माध्यमातून खातेदारांना त्यांच्या खात्यामध्ये असलेल्या रकमेचा वापर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करता येतो. कार्डाद्वारे खर्चलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा होते. डेबिट कार्डचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी करता येतो. त्याचबरोबर पॉइंट ऑफ सेल म्हणजेच जिथे कार्ड स्वाइप करण्याची सुविधा आहे, अशा दुकानांमधून वस्तू अथवा सेवांची खरेदी-विक्री करण्यासाठीही त्याचा वापर होतो. ई-कॉमर्सच्या वेबसाइटवरून (देशांतर्गत-परदेशी) खरेदीसाठीही डेबिट कार्ड वापरली जातात. देशांतर्गत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठविण्यासाठीही डेबिट कार्ड वापरता येते. आता डेबिट कार्डवरूनही हप्त्यावर खरेदी करता येते.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार देशभरात ६९ कोटी ७२ लाख २२ हजार ४५५ डेबिट कार्ड वापरात आहेत. त्याद्वारे जुलै २०१६ या महिन्यात एटीएममधून ७५ कोटी २१ लाख ३३ हजार ४५४ व्यवहार झाले असून पॉईंट ऑफ सेलद्वारे १२ कोटी ९० लाख ६९ हजार ९७८ व्यवहार झाले आहेत.
....
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्डधारकांना संबंधित बँक अथवा कंपनीतर्फे विशिष्ट रकमेची उधारीवर (क्रेडिट) खरेदी करता येते. त्याची मर्यादा ठरलेली असते. त्यामुळे ग्राहकांना सध्या खिशात पैसे नसले, तरी वस्तू खरेदी करून त्याचे पैसे बँकेने ठरविलेल्या कालावधीत व्याजासहित चुकवता येतात. क्रेडिट कार्डचा वापर करून पॉइंट ऑफ सेल असलेल्या ठिकाणावरून, ई-कॉमर्स वेबसाइटवरून, इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्सद्वारे खरेदी करता येते. ही कार्ड देशांतर्गत तसेच देशाबाहेरील व्यवहारांसाठीही (लागू असल्यास) वापरता येतात. तसेच या कार्डाद्वारे एटीएममधून पैसेही काढता येतात. त्याचबरोबर अन्य देशांतर्गत खात्यांवर पैसेही पाठवता येतात.
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार देशात जुलै २०१६ अखेरीस दोन कोटी ५९ लाख ४३ हजार ७९४ क्रेडिट कार्डधारक आहेत. या कार्डधारकांनी जुलै २०१६ या महिन्यात एटीएमच्या माध्यमातून सहा लाख सहा हजार ३१४ तर पॉइंट ऑफ सेलच्या माध्यमातून सात कोटी ९४ लाख ४० हजार ७३४ व्यवहार केले आहेत.
....
प्रीपेड कार्ड
प्रीपेड कार्डाचा वापर ते कार्ड कोणाकडून जारी करण्यात आले आहे, यावर अवलंबून असतो. या कार्डाचा वापर करून एटीएममधून पैसे काढता येतात. पॉइंट ऑफ सेल किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवरून वस्तूंची खरेदी करता येते. तसेच देशांतर्गत खात्यांमध्ये पैसे पाठवता येतात. अशा कार्डसना ओपन सिस्टिम प्रीपेड कार्ड म्हणतात. बँकेतर घटकांकडून (ऑथोराइज्ड नॉन-बँक एंटिटिज) दिलेल्या प्रीपेड कार्डांचा वापर फक्त पॉइंट ऑफ सेल, ऑनलाइन खरेदी, देशांतर्गत खात्यांमध्ये पैसे पाठविण्यासाठी करता येतो. या कार्डांना सेमी-क्लोज्ड प्रीपेड कार्ड म्हणतात. या कार्डांचा वापर फक्त देशांतर्गतच करता येतो.
...
प्लास्टिक मनीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्यक्ष पैसे बाळगण्याची जोखीम घ्यावी लागत नाही. त्यामुळे या पैशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न येत नसल्याने हाताळणी सोपी होते. तसेच या व्यवहारांची नोंद सर्व्हरवर व खात्यामध्ये होत असल्याने आपोआपच पुरावाही तयार होतो. ग्राहकांना होणाऱ्या या फायद्यांबरोबरच यामुळे देशाच्या दृष्टीने नोटांची छपाई, हाताळणी व सुरक्षा यावरील खर्चही कमी होतो.
प्लास्टिक मनीच्या वापरात स्वीडन आघाडीवर असून, या देशामध्ये केवळ तीन टक्के व्यवहार रोखीच्या मार्गाने होत आहेत. अन्य ९७ टक्के व्यवहार हे प्लास्टिक मनीच्या माध्यमातून होतात. डेन्मार्क, नॉर्वे सारखे छोटे देशही प्रामुख्याने प्लास्टिक मनीला प्राधान्य देतात. अमेरिकेत प्लास्टिक मनीचा वापर हा ४५ ते ५० टक्क्यांदरम्यान असल्याचे सांगण्यात येते.
...
मोबाइल बँकिंग
मोबाइल बँकिंगमध्ये एसएमएस अथवा मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार करता येतात. मोबाइल बँकिंगद्वारे आपल्या खात्यातील शिल्लक जाणून घेणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणे, विविध बिलांचा भरणा करणे, हप्ते भरणे, रिकरिंग किंवा मुदत ठेवीत गुंतवणूक करणे यासह इतर अनेक कामे हवी तेव्हा व हवी तिथून करता येतात. त्यासाठी काही बँका शुल्क आकारतात तर काही बँका मोफत सुविधा देतात. जवळपास सर्वच आघाडीच्या बँकांसह काही सहकारी बँकांनी मोबाइल बँकिंग सुविधा उपलब्ध केली आहे.
..
ऑनलाइन बँकिंग
ऑनलाइन बँकिंगमध्ये संबंधित बँकेच्या वेबसाइटवर जाऊन आपला खाते क्रमांक व पिन क्रमांक टाकून लॉग-इन केल्यानंतर आपल्याला विविध व्यवहार करता येतात. शिल्लक पाहणे, बिलांचा भरणा, हप्ता भरणे, गुंतवणूक करणे, वस्तू अथवा सेवांची खरेदी करणे आदी कामे करणे शक्य होते.
...
इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस
इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ईसीएस') ही देण्याघेण्याच्या व्यवहारांसाठी वापरली जाणारी 'इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर' यंत्रणा आहे. या यंत्रणेद्वारे नियमित कालावधीनंतर विशिष्ट मर्यादेतील रक्कम संबंधित व्यक्ती, संस्था, कंपन्या यांच्याकडून इतरांना दिली वा घेतली जाते. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन, गुंतवणूकदारांना देय असलेल्या रकमा ‘ईसीएस’द्वारे देतात. बँका गुंतवणूकदारांकडून दरमहा रकमेचे हप्ते (ईएमआय म्हणजेच इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स) ‘ईसीएस’द्वारे स्वीकारतात. विविध सेवा (युटिलिटीज) पुरविणाऱ्या कंपन्या (टेलिफोन, मोबाइल, वीज बिले) त्यांना देय असलेल्या शुल्काच्या रकमा ‘ईसीएस’द्वारे स्वीकारतात.
...
एटीएमची संख्या
देशात बँकांची ऑनसाइट म्हणजेच बँकेच्या शाखेलगत एक लाख ३ हजार २८२ एटीएम आहेत. तर ऑफसाइट म्हणजेच बँकेपासून दूर असलेल्या एटीएमची संख्या ९८ हजार ५७९ आहे. देशभरातील ऑनलाइन पॉइंट ऑफ सेलची संख्या १४ लाख ४३ हजार ५९५ असून ऑफलाइन पॉइंट ऑफ सेलची संख्या ३०४ इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. रामास्वामी, प्रा. धुरंदरयांना विज्ञानरत्न पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एच. के. फिरोदिया पुरस्कारांतर्गत दिला जाणारा मानाचा विज्ञानरत्न पुरस्कार बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (आयआयएससी) भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. श्रीराम रामास्वामी यांना तर ‘आयुका’चे प्रा. संजीव धुरंधर यांना विज्ञानभूषण पुरस्कार बुधवारी जाहीर झाला आहे. विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांना दर वर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. एच. के. फिरोदिया फाउंडेशनतर्फे दिले जाणाऱ्या या पुरस्कारांचे २१ वे वर्ष आहे.
‘फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त उद्योजक अरुण फिरोदिया आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. येत्या २९ नोव्हेंबरला सायंकाळी सव्वा सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘एचडीएफसी’चे अध्यक्ष दीपक पारेख यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहे,’ अशी माहिती डॉ. माशेलकर आणि फिरोदिया यांनी दिली.
रामास्वामी यांनी जैविक भौतिकशास्त्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना जगातील मानाची फेलो ऑफ रॉयल सोसायटीची (एफआरएस) फेलोशिप जाहीर झाली आहे. प्रा. धुरंधर यांनी गुरुत्वाकर्षण लहरींवर आधारित संशोधनात म्हणजेच लायगो प्रयोगात मोलाची कामगिरी केली आहे. प्रा. रामास्वामी यांना सन्मानचिन्ह व दोन लाख रुपये रोख आणि प्रा. धुरंधर यांना सन्मानचिन्ह व एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येईल. या वेळी प्रा. रामास्वामी हे ‘अॅक्टिव्ह मॅटर’ तर प्रा. धुरंधर हे ‘गुरुत्वाकर्षण लहरी’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. डॉ. माशेलकर हे ‘विज्ञातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. समितीचे समन्वयक ए. व्ही. चितळे, अभिनेते रवींद्र मंकणी, रोटरी क्लब ऑफ पुणे इन्स्पिराच्या अध्यक्ष पिनल वानखडे, स्मिता विखणकर, डॉ. संध्या सूर्यवंशी उपस्थित होते.
..............
ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन
फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ पुणे इन्स्पिराच्या वतीने विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाइन स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://quiz.hkfirodiaawards.org/registeration या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरायचे आहे. या स्पर्धेचा निकाल येत्या २५ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल. विजेत्यांना आकर्षक पुरस्कार आणि शास्त्रज्ञांना भेटण्याची संधी मि‍ळेल, असे फिरोदिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकीटबारीवर ‘थंडा प्रतिसाद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या आणि त्याचा फटका शहरातील कलाव्यवहाराही बसला. शहरातील सर्वच नाट्यगृहांमध्ये नाटकांच्या बुकिंगसाठी थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या नाटकांच्या निर्मात्यांना आतापासूनच धाकधूक लागली आहे.
५०० आणि १०००च्या नोटा बंद झाल्याने सगळीकडे व्यवहार काही प्रमाणात ठप्प झाले. एरव्ही शनिवारी, रविवारच्या नाटकांसाठी अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या नागरिकांनी बुधवारी नाट्यगृहांकडे पूर्ण पाठ फिरवली. बुकिंगच्या खिडकीवर १००० आणि ५०० च्या नोटा घेत नसल्याने अनेक जण तिकिटाविनाच परत गेले. दिवसभर एटीएमही बंद राहिल्याने पैसे काढण्यात अनेकांना अडचणी आल्या. त्यामुळे दररोज खिडकीवर १० ते १२ हजारांचे बुकिंग होत असताना बुधवारी केवळ काहीशे रुपयांचा गल्ला जमला आणि निर्मात्यांची झोप उडाली. बालगंधर्व रंगमंदिरात बुधवारी एकह ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचे योजन केले होते. त्याचे एकही तिकीट खिडकीवर विकले गेले नाही. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या संयोजकांनाही रिकाम्या खुर्च्यांसह प्रयोग करावा लागला. यशवंतराव चव्हाण, पं. भीमसेन जोशी या नाट्यगृहांची देखील हीच परिस्थिती होती. त्यांच्याकडेही नाटकांचे बुकिंग हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच झाल्याने नाट्यसंयोजक देखील चिंतेत आहेत.
चालू आठवड्याच्या शेवटी शहरात ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘ए दिल अभी भरा नही’, ‘ग्रेट गुलजार’, ‘आई रिटायर होतेय’, ‘अहो नादच खुळा’ असे नाटकांचे आणि लावण्यांचे प्रयोग होणार आहेत. एरव्ही या नाटकांसाठी आणि कार्यक्रमांसाठी अॅडव्हान्स बुकिंग फुल झालेले असते. शनिवार-रविवारचे प्रयोग हाऊसफुल चालतात. बुधवार-गुरुवारपर्यंत ८० टक्के तिकिटे खपतात. परंतु, ५०० आणि १०००च्या नोटा बंद झाल्याने बुकिंग ठप्प झाले आहे. अनेकांनी तिकिटांसाठी ५००च्या नोटा दिल्या मात्र, त्यांना त्या परत घ्याव्या लागल्या.
दिवसभरात अनेकजण नोटा घेत नसल्याने परत गेले. परंतु, आमचीही अडचण असून कलाकारांना रोख मानधन द्यावे लागत असल्याने १००० आणि ५००च्या नोटा घेता येत नाहीत, असे तिकीट विक्रीसाठी बसलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
..
सर्वच ठिकाणी नाटकांना अत्यल्प बुकिंग मिळाले. गुरुवारपासून बँका सुरू होणार आहेत. शिवाय शनिवार आणि रविवारी देखील बँका सुरू राहणार असल्याने व्यवहार पुन्हा सुरळित होतील आणि नाटकांचे बुकिंग वाढेल, अशी अपेक्षा आहे.
समीर हंपी, नाट्य संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तेवढी खरेदी करा; अन्यथा सुटे पैसे द्या

$
0
0

जिल्हा​धिकारी सौरभ राव यांची सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांनी पेट्रोल, डिझेल, गॅस आणि औषधी दुकाने या ठिकाणी खरेदी केलेली रक्कम ५०० आणि १००० रुपये असल्यास तेवढ्याच पूर्ण रकमेचे इंधन भरावे किंवा औषधे खरेदी करावीत. इंधन किंवा औषधांची रक्कम शंभरापेक्षा कमी रकमेची असल्यास नेमके सुटे पैसे द्यावेत, अशा सूचना जिल्हा​धिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत.
राव यांनी जिल्हा पेट्रोल डिलर असोसिएशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आणि इंडियन ऑइल कार्पोरेशनचे अधिकारी, गॅस संघटनेचे पदधिकारी, शासकीय रुग्णालयाचे अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, अशासकीय वैद्यकीय संघटना, अन्न औषध प्रशासन (औषध व द्रव्ये) विभागाचे सहआयुक्त, सहधर्मादाय आयुक्त, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी या सूचना दिल्या.
सरकारी रुग्णालयातील औषधांची दुकाने; तसेच धर्मादाय रुग्णालये, खासगी दुकाने या ठिकाणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनसह पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. ही सवलत ११ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रुग्णाच्या कुटुंबीयांच्या सोयीसाठी ही सेवा देण्यात येत आहे. रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांनी ५०० रुपयांच्या आतील बिल असल्यास बिलाच्या रकमेएवढे पैसे द्यावेत; तसेच ५०० रुपयांपेक्षा अधिक बिल असल्यास ५०० व १००० च्या जुन्या नोटांचा वापर करावा, असे आवाहन राव यांनी केले आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस पंप; तसेच घरगुती वापराच्या गॅसची एजन्सी या सेवा अत्यावश्यक असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना ११ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या नोटा वापरण्याची सवलत देण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस खरेदी करण्यासाठी रुपये ५०० रुपयांच्या आतील बिलासाठी सुटे पैसे द्यावेत. ५०० रुपयांच्या वरील खरेदीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रुपये ५०० व १००० च्या जुन्या नोटांचा वापर करावा, असेही राव यांनी स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक बस सेवा, रेल्वे तिकीट बुकिंग, विमान तिकिटासाठी आणि स्मशानभूमीमध्ये जुन्या चलनी नोटा ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडांच्या आदेशांना कोर्टाकडून ‘कात्री’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जामिनाची रक्कम भरणे, दंड भरणे, पोटगीची रक्कम, नुकसानभरपाईची रक्कम लोकांना कोर्टातील केसेसच्या सुनावणीसाठी भरावी लागते. मात्र, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा वापरातून रद्द करण्यात आल्यामुळे शिवाजीनगर कोर्टातील बहुतांश आर्थिक कामकाज बुधवारी ठप्प होते. काही केसेसमध्ये लोकांना तातडीने पैसे भरणे शक्य नसल्यामुळे कोर्टाकडून त्यांना मुदतवाढ देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अचानक जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयाचे बुधवारी पडसाद उमटले. कोर्टातील कामकाजालाही या निर्णयाचा फटका बसला. अचानक निर्णय जाहीर करण्यात आल्यामुळे हातात पैसे असूनही ते वापरता येत नसल्यामुळे कामकाजावर याचा परिणाम झाला.
पुणे जिल्हा न्यायालयात सुरु असलेल्या विविध केसेसमध्ये कोर्टाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार लोकांना कोर्टात रक्कम भरावी लागते. जामिनाची रक्कम, दंडाची रक्कम, मोटार अपघात केसेसमध्ये भरावी लागणारी नुकसानभरपाईची रक्कम, पोटगीची रक्कम अशा विविध प्रकारच्या रकमा कोर्टात भराव्या लागतात. मात्र, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा वापरातून रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या कामकाजात रक्कम भरण्यासंदर्भातील आदेश सत्र न्यायालयांकडून देण्यात आले नाहीत. त्यामुळे दिवसभरात कोर्ट प्रशासनाकडे फारशी रक्कम भरण्यात आली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
या निर्णयाबाबत संदिग्धता असल्यामुळे दिवाणी न्यायाधीशांकडून बँकेच्या व्यवस्थापकांना पत्र पाठविण्यात आले होते. त्यामध्ये बुधवारी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात अथवा नाही याबाबत खुलासा करण्यात यावा, अशी विचारणा करण्यात आली होती. बँकेकडून देण्यात आलेल्या उत्तरात आठ नोव्हेंबर रोजी कोर्टात जमा झालेली रक्कमच स्वीकारण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, अशी माहिती पुणे जिल्हा न्यायालयाचे रजिस्टार नानासाहेब चव्हाण यांनी दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे चालणाऱ्या केसेसमध्ये पक्षकारांना काही केसेसमध्ये पैसे भरण्याचा आदेश देण्यात येतो, यासंदर्भात काही वकील आणि पक्षकारांना विचारणा केली असता त्यांनी, कोर्टाकडून पैसे भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगितले. कोर्टाच्या कामकाजावर या निर्णयाचा काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र, दिवसभर या निर्णयावर कोर्टातील कर्मचारी, पक्षकार, वकिलांमध्ये जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुका स्वस्त होणार की सोने वाटणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे आगामी ​निवडणुका स्वस्त होणार, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. ‘या निर्णयाचा निवडणुकांशी कुठलाही संबंध नाही; परंतु यामुळे निवडणुका स्वस्त झाल्या, तर त्याचे देशावर उपकारच होतील,’ अशी टिप्पणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केल्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
देशात उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत; तर महाराष्ट्रात नगर पंचायत, नगरपालिका, विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विधान परीषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे उमेदवारांना पैसे द्यायचे, तर कसे द्यायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक धनिकांना आपला ‘ब्लॅकमनी’ गुंडाळावा लागला असल्याने ‘कॅश फ्लो’ थांबला आहे. बाजारात ‘कॅश फ्लो’च नसल्याने मतदारांना पैसे कसे वाटणार आणि वाटले तरी जुन्या नोटा कोण स्वीकारणार? असा प्रश्न उमेदवारांपुढे उपस्थित झाला आहे.
विधान परिषदेत सोन्याची लयलूट?
विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांना उमेदवारांकडून खूप अपेक्षा आहेत. नगरपालिका, दोन्हीही महानगरपालिका आणि नगरपंचायतीतील मतदारांची ही शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या उमेदवारांकडून भरघोस मदतनिधी मिळेल, अशी प्रत्येकाला आशा आहे. नवीन नोटांचा ‘कॅश फ्लो’च नसल्याने मतदारांकडून सोन्याची मागणी होऊ लागली आहे. पैशांच्या बदल्यात इतर गोष्टीही पुरवण्याची काही उमेदवारांनी तयारी दर्शवली आहे. पैसे सोडून दुसरे काहीही मागा, अशी अवस्था उमेदवारांची झाली आहे; तर ‘रोकड’ मिळणार नसल्याने उमेदवारांचा नाराजीचा सूर आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांनाही सोने खरेदी करायचे म्हटले; तर काळ्या बाजारातून ते खरेदी करावे लागत आहे. काळ्या बाजारातील सोन्याचा दर जादा असल्याने नाहक भुर्दंड बसण्यास सुरुवात झाली आहे.
... तर देशावर उपकारच
अर्थमंत्री जेटली यांना निवडणुका आणि नोटा बंद करण्याच्या निर्णयाबाबत छेडण्यात आले होते. तेव्हा जेटली म्हणाले की, नोटा बंद करण्याचा निर्णय हा निवडणुका पाहून घेण्यात आलेला नाही. मात्र, या निर्णयामुळे निवडणुका स्वस्त होणार असतील, तर त्याचे देशावर उपकारच मानायला पाहिजेत.
..
टोल नाक्यांवर नाेटांवरून गोंधळ
केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बुधवारी पुणे जिल्ह्याभाेवतीच्या सर्वच टोल नाक्यांवर पैसे स्वीकारण्यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. टोलचालकांनी पाचशे व हजार रुपयाची नोट स्वीकारण्यास नकार दिल्याने सुट्या पैशांवरून वाहनचालक व टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी टोलनाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेक नाक्यांवर टोल न आकारता वाहन सोडण्यास सुरुवात केल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-बेंगळुरू महामार्ग, पुणे-सोलापूर महामार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील टोल नाक्यांवर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वाहनांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. टाेलनाक्यांवर पाचशे व हजार रुपयाच्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या, तर अनेक वाहनचालकांकडून टोलसाठी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा आग्रह धरला जात होता. या वादामुळे एक गाडी टोलनाक्यावर शुल्क भरून पुढे जाण्यासाठी नेहमी लागणाऱ्या वेळेपेक्षा अधिक वेळ लागत होता. परिणामी वाहनांची रांगच लागली.
एक्स्प्रेस वेवर खालापूर व उर्से टोल नाक्यावर मुंबईकडून पुण्याच्या दिशेला येणारी लेन पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे वाहतुकीची होत असलेली कोंडी लक्षात घेत, प्रशासनाने काही वेळाने या दोन्ही टोलनाक्यांवर विनाटोल वाहने सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोंडी सुटली. एक्स्प्रेस वेच्या तुलनेत पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी, खेड येथील टोलनाका व पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर येथीलच टोल नाक्यावर गर्दीचे प्रमाण कमी होते.
... तरीही टाेलवसुली
पाचशे व हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा टोलनाक्यांवर झालेला परिणाम पाहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर ११ नोव्हेंबरला मध्यरात्रीपर्यंत टोल आकारणी न आकारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यानंतरही खेड शिवापूर टोलनाक्यावर आकारणी केली जात असल्याची तक्रार वाचकांनी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल प्रशासनाला याबाबत काही आदेश दिला नसल्याचे वाहनचालकांना सांगण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीच्या बैठकीला शिवसेनेची दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार अशोक येनपुरे यांच्या प्रचारासाठी बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला युतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने दांडी मारली. त्यामुळे राज्य स्तरावरून युतीची अधिकृत घोषणा केली गेली असली, तरी स्थानिक स्तरावर भाजप-सेनेमध्ये अद्याप वितुष्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीकडून अशोक येनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी महायुतीची पहिली बैठक बुधवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह जिल्ह्यातील पक्षाच्या खासदार आणि आमदारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. शिवसेनेचा एकही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे शिवसेनेने महायुतीच्या प्रचार बैठकीकडे पूर्णतः पाठ फिरविल्याचे दिसून आले.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज भरला होता. भाजपकडून येनपुरेंनी, तर शिवसेनेकडून माऊली खंडागळे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक पंचरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात होती; परंतु माघारीच्या दिवशी खंडागळे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. साह‌जिकच भाजप-शिवसेना-आरपीआय यांच्या महायुतीचा एकच उमेदवार रिंगणात असेल, असे स्पष्ट झाले. येनपुरे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बुधवारी बैठक घेण्यात येणार असल्याचा निरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. पालकमंत्री बापट या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे कळविण्यात आले होते. तरीही शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीला दांडी मारणे पसंत केले. विधान परिषद निवडणुकीत भाजपला शिवसेनेची साथ मिळणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भाजपचे खासदार संजय काकडे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण या दोघांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढावे, अशी भूमिका मांडली आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात शिवसेनेने गेल्या महिन्यात महापालिकेवर भव्य मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. स्वतंत्र लढण्याची भाषा केली जात असतानाच, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढण्याचे दोन्ही पक्षांनी जाहीर केले. तरीही विधान परिषदेच्या बैठकीसाठी शिवसेनेच्या अनुपस्थितीमुळे युतीचे नक्की काय होणार, ही चर्चा रंगली आहे.

येनपुरे बाजी मारतील : बापट

नियोजनबद्ध प्रचार आणि संपर्कातून महायुतीचे येनपुरे विधान परिषद निवडणुकीत नक्की बाजी मारतील, असा ठाम विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी व्यक्त केला. मतदारसंघात प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा येनपुरे यांनी केला. या बैठकीला बापट, येनपुरे यांच्यासह खासदार अमर साबळे, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, महापालिकेतील आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, नवनाथ कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी, रेल्वे प्रवासी संख्येवर प‌रिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचा प‌रिणाम अप्रत्यक्षपणे एसटी व रेल्वेच्या प्रवासी संख्येवर झाला. वास्तविक, एसटी व रेल्वेमध्ये पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतरही प्रवाशांनी धोका पत्करण्याची तयारी दर्शविली नाही, असे एसटी स्टॅण्ड व रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती पाहून निदर्शनास आले. नेहमीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी गर्दीचे प्रमाण खूपच कमी होते. कायमच गर्दीने कोंडलेला असणारा रेल्वे स्टेशनचा परिसर ओस पडला होता.

वाहकांकडून नकार

एसटी, पीएमपीच्या वाहकांनी सुट्या पैशांचे कारण देत प्रवाशांकडून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा घेण्यास नकार दिला. त्यामुळे कंडक्टर व प्रवाशांमध्ये वाद झाला. रेल्वेच्या तिकीट काउंटर व तिकीट आरक्षण केंद्रांवर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात आल्या. मात्र, कमी रकमेच्या तिकिटासाठी तेथेही या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला.

आरटीओही पडले ओस

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहनांचे विविध प्रकारचे कर, लायसन्स शुल्क रोखीने स्वीकारले जाते. मात्र, आरटीओमध्ये पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत होते. परिणामी आरटीओही ओस पडले होते.

घरकामगारांची अडचण

घरकाम, स्वयंपाक, धुणीभांडी अशा कामांबरोबरच विविध प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर बुधवारी प्रतिकूल परिणाम झाला. या व्यक्तींचे बँकेत कोणत्याच प्रकारचे खाते नसल्याने ते पैसै घरीच किंवा स्वत:जवळ ठेवतात. त्यामुळे त्यांच्याकडील या नोटांच्या मोबदल्यात १०० रुपयांच्या नोटा मिळवताना त्रास सहन करावा लागत आहे. या व्यक्तींकडे १०० रुपयांच्या नोटा नसल्याने आणि लहान आर्थिक व्यवहार करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने त्यांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला; तसेच बँकेत खाते नसल्याने आपल्याला या नोटांच्या बदल्यात १०० रुपयांच्या नोटा मिळणार कशा, या प्रश्नाने त्यांच्या मनात गदारोळ होता.

कॅश डिपॉझिट मशीनसमाेर गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द चलनातून केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांनी त्यांच्याकडील या नोटा एटीएममध्ये कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसै जमा मंगळवारी रात्री गर्दी केली होती. मात्र, बुधवारी सकाळपासून विविध बँकांचे एटीएम बंद होते. काही एटीएममधील पैसे मंगळवार रात्रीपासूनच संपले होते. त्यामुळे बहुतांश नागरिकांना बुधवारी एटीएम बंद असल्याची माहिती नसल्याने या नोटा जमा करण्यासाठी आणि १०० रुपयांच्या नोटांमार्फत पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काहींनी थेट पोस्टाच्या कार्यालयात जाण्याचा मार्ग अवलंबला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images