Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लापशीत आढळली अळी

$
0
0
दांडेकर पुलाजवळील अंगणवाडी क्रमांक ९२मधील विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणात खायला देण्यात आलेल्या लापशीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुरवठादार महिला मंडळाकडे असलेला ५४८ किलो रवा जप्त केला असून, त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

हक्काच्या पाण्यासाठी पालिका ठाम

$
0
0
पुण्याचे हक्काचे पाणी पळविल्याची ओरड होत असताना आगामी वर्षासाठी शहराला १६ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे, असे महापालिकेने पाटबंधारे खात्याला ठणकावले आहे. वाढती लोकसंख्या, समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पेलण्यासाठी हे पाणी आवश्यक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

विद्वान सर्वत्र पूज्यते...!

$
0
0
महाराष्ट्र आणि कर्ना‍टक... सीमावादामुळे परस्परांबद्दल कटूभाव जोपासणारी राज्ये, असेच चित्र या दोन्ही राज्यांचे नाव घेताच डोळ्यासमोर येते.

अल्पवयीन मुलीची पिंपरीत आत्महत्या

$
0
0
टीव्ही पाहण्यावरून वडील रागावले, म्हणून ११ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चिखली येथे सोमवारी (५ नोव्हेंबर) घडली. गेल्या आठ दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेली ही पंधरावी आत्महत्या आहे.

शिवाजीनगर कोर्टातून आरोपीचे पलायन

$
0
0
अपहार प्रकरणातील एका अटक आरोपीने सोमवारी शिवाजीनगर कोर्टातून पलायन केले. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे त्यावेळी कोर्टात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात होता.

वेबसाइटवरची ओळख पडली अडीच लाखांना

$
0
0
‘शादी डॉट कॉम’ या वेबसाइटवर ओळख वाढवलेल्या एका ठगाने एकत्रितपणे फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्याने वानवडी येथील एका महिलेची सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीचा खून करणारा पती गजाआड

$
0
0
ताडीवाला रोड येथे सोमवारी रात्री पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण करत तिचा खून केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी संबंधित महिलेच्या नव-याला अटक केली आहे, तर सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

‘पीएमपी’ कर्मचा-यांना ८.३३ टक्के बोनस

$
0
0
‘पीएमपी’च्या कर्मचा-यांना ८.३३ टक्के बोनससह पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला. रोजंदारीवरील कर्मचा-यांनाही यंदा पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या कर्मचा-यांइतकेच सानुग्रह अनुदान ‘पीएमपी’च्या कर्मचा-यांनाही मिळावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

डिलिव्हरी बॉयकडून गॅस ग्राहकांची लूट

$
0
0
सवलतीच्या दरात मिळणा-या सहा सिलिंडरनंतरचा प्रत्येक सिलिंडर ग्राहकांना बाजारभावानुसार ९४८ रुपयांना मिळणार आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत गॅस एजन्सीचे डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून तेराशे ते पंधराशे रुपये आकारत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. सणासुदीच्या तोंडावर सिलिंडरच्या नावाखाली होत असलेल्या या लुटीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

मिनी विधानसभांची निवडणूक प्रक्रिया सुरू

$
0
0
जिल्ह्यातील २१२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज, (बुधवार) सात नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या सूचना जिल्हा पोलिसांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

साहित्यामुळे संस्कृतीला मिळते नवे भान

$
0
0
‘साहित्यामुळे संस्कृतीला नवे भान मिळते. चांगल्या साहित्यकृतींचा प्रभाव समाजावर पडतो आणि हेच साहित्य समाजाला विचारप्रवर्तक बनविण्याचे काम करते. अशाच साहित्याची समाजाने आणि साहित्याच्या विद्यार्थ्यांनी दखल घ्यायला हवी,’ असे मत ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मंगळवारी व्यक्त केले.

‘बाईं’च्या शब्दमैफलीत ‘शिष्यां’ची गुरुदक्षिणा

$
0
0
कोणी त्यांचे बोट धरून अभिनयाची पाऊले टाकलेली..., कोणी कलाक्षेत्राची ‘अ ते ज्ञ’ ही बाराखडी गिरवलेली...., तालमीतून रंगमंचावरील पात्रे घडविणारी मार्गदर्शिका...., तर कोणाच्या शिस्तप्रिय बाईदेखील... मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील दिग्गज कलावंतांच्या गुरुप्रेमाने ‘झिम्मा’ या विजया मेहतांच्या आत्मचरित्रातील शब्दांची मैफल मंगळवारी रंगली!

शिष्यवृत्ती वापरासंबंधात चौकशी करणार

$
0
0
संलग्नित कॉलेजेसमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा वापर योग्य प्रकारे करण्यात आला आहे की नाही, याची चौकशी करण्याचे आश्वासन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिले.

‘शॉपअॅक्ट’मधील अटींसंर्भात फेरविचार

$
0
0
‘सरकारच्या नव्या शॉपअॅक्ट नियमावलीत जाचक अटी असल्याच्या व्यापा-यांच्या गाऱ्हाण्याबाबत स्वतंत्र बैठक बोलावून फेरविचार करण्यात येईल; तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही याबाबत चर्चा करण्यात येईल,’ असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी दिले.

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

$
0
0
सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीयांसह अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्तीच्या (स्कॉलरशिप) मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता त्यासाठी येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज न भरलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी ग्रामकोष

$
0
0
दिवाळीच्या सुट्यांमध्ये फराळावर ताव मारण्याचे किंवा भरपूर फटाके उडविण्याचे बेत बहुतांश मुले आखत असली, तरी तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावातील मुले मात्र सध्या एका वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. आपण ज्या गावात राहतो, तेथील पर्यावरण, शेती, नैसर्गिक अधिवास, प्राण्यांचे वास्तव्य, स्वच्छता एकूणच पर्यावरणाचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी ‘ग्रामकोष’ तयार करण्याचा अनोखा उपक्रम या मुलांनी हाती घेतला आहे.

दिवाळीत महामार्ग पोलिसांची विशेष मोहीम

$
0
0
‘दिवाळीच्या सुटीत महामार्गावरून जाताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा, वेगमर्यादेचे उल्लंघन, लेन कटिंग करण्याचे धाडस करू नका....’ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या मंडळींवर कडक कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.

किल्ल्यांचा कल्ला सुरू

$
0
0
दिवाळीच्या सेलीब्रेशनला जिवंतपणा अन मुलांना मातीत खेळण्याची मनसोक्त मजा लुटण्याची संधी देतो तो अंगणातला किल्ला. अंगणासह, घराची गच्ची, गॅलरी अशा ठिकाणी किल्ले साकारण्याची मुलांची लगबग सुरु झाली आहे तर सजावटीसाठी बाजारात तयार किल्ल्यांसह मावळे, तोफा, हत्ती-घोडे अशी सुंदर चित्र दाखल झाली आहेत.

तुळशीबागेत केली ‘त्यांनी’ हौसेने खरेदी

$
0
0
दिवाळीसाठी नवेकोरे कपडे, छानशी ज्वेलरी, टिकल्यांची खरेदी आणि तीही तुळशीबागेत करताना त्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. कारण मुक्तपणे आपल्या आ‍वडीनुसार अशी खरेदी करण्याची संधी त्यांना प्रथमच मिळाली होती. नारायण पेठेतील अनाथ हिंदू महिलाश्रमातील अनाथ मुलींनी सोमवारी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.

आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0
खासगी कंपनीत काम करणा-या अभियंत्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले कंपनीतील वरिष्ठ अधिकारी गजानन कुलकर्णी, सिद्धु हुल्लर आणि विलास किन्हाळे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धनंजय शंकर तंटक (वय २७, रा. पारस बंगला प्राधिकरण निगडी) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images