Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​मतदारांना हवेत तरुण उमेदवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मेरा देश बदल रहा है’चा नारा दिला जात असताना मतदारही आपला उमेदवार कोण असावा, याबाबत चोखंदळ भूमिका घेत आहेत. समाजाशी नाळ असलेल्या; परंतु अंगुठाछाप उमेदवारालाही डोक्यावर घेणारे मतदार आता तरुण आणि शिक्षित उमेदवारांच्या प्रेमात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांना मतदारांकडून अधिक पसंती दिली जात आहे.
राज्यातील ३६ पैकी २६ जिल्ह्यांमध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आजपासून (२५ ऑक्टोबर) प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगासाठी म्हणून पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेने १८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा, विश्लेषण तुलनेने लोकसभेपेक्षा कमी होते. मात्र, मतदारांना आपल्या उमेदवाराविषयी अधिकाधिक माहिती मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

तरुण आणि सुशिक्षित
या निवडणुकांमध्ये उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असावे, असे आग्रही मत या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मतदारांपैकी ८४ टक्के मतदारांनी मांडले. मॅट्रिकपर्यंत शिक्षणही न झालेल्या उमेदवारांबाबत ७८ टक्के मतदारांनी नापसंती व्यक्त केली, तर उमेदवार किमान पदवीधर असावा, असे ९२ टक्के मतदारांना वाटते. त्यामुळे तरुण आणि सुशिक्षित उमेदवार असावा, अशीच मतदारांची अपेक्षा आहे.

भ्रष्टाचार हा मुद्दाच नाही!
या ठिकाणच्या मतदारांनी संस्थेच्या प्रतिनिधींशी ‘मन की बात’ साधून, आपला नेता कसा असावा, याचे चित्र मांडले आहे. मतदारांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक लढविणारे हे भ्रष्ट असतातच, श्रीमंत उमेदवार निवडणुका विकतही घेतात, मात्र उमेदवाराची पसंती ठरविताना भ्रष्टाचाराला फारसे स्थान नसते. कारण स्वच्छ प्रतिमेपेक्षा विकासकामे पार पाडता येणे, हा निकष ८६ टक्के मतदारांना अधिक महत्त्वाचा वाटतो.

सर्वाधिक पसंतीचे निकष
मतदारांसाठी उपलब्ध असणे, सुशिक्षित असणे, निवडणुकीदरम्यान आपल्या वॉर्डच्या समस्या- प्रश्न उमेदवाराला माहीत असणे हे प्रमुख निकष उमेदवाराची पसंती ठरविणार आहेत. या सर्वेक्षणात मतदारांकडून उमेदवारांची पसंती ठरविताना भ्रष्टाचार हा मुद्दा फारसा विचारात घेतला जात नाही, याची वारंवार प्रचिती आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणुकीत खेड विमानतळाचा मुद्दा केंद्रस्थानी

0
0

म. टा. वृत्तसंस्था, राजगुरुनगर

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागलेले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्याकडून गट व गणांची जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. तसेच, पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. इच्छूक उमेदवार देखील स्वतः मतदारसंघात हिंडून तसेच विविध प्रकारे आपली ताकद अजमावून पाहत आहेत. दरम्यान, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही कमालीची रंगतदार व अटीतटीची होणार असल्याचे चित्र आहे. खेड पंचायत समिती ही सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. परंतु, यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. असे असले तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक वाटते तेवढी सोपी असणार नाही, असे चित्र आहे. निवडणुकीतील प्रचाराच्या दृष्टीने विचार केला तर, विमानतळ हाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

विमानतळ पुरंदर तालुक्यात गेल्यामुळे खेड तालुक्याच्या विकासावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. विमानतळाचा प्रकल्प झाला असता तर खेड तालुक्यात पर्यायाने मोठी गुंतवणूक आली असती. परंतु तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची भूमिकाच, विमानतळ पुरंदरला जाण्यास कारणीभूत ठरली, अशी खदखद जनतेत आहे. खेड तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा महत्त्वाचा प्रकल्प केवळ शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव यांच्या विरोधामुळेच पुरंदर तालुक्यात गेला असून, याच मुद्द्यावर राष्ट्रवादीकडून आढळरावांना पद्धतशीरपणे कोंडीत पकडण्याचा डाव खेळला जात आहे.

दुसरीकडे राजगुरुनगर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात देखील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार दिलीप मोहिते यांनी विमानतळाच्या विषयावरून आढळरावांच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका केली होती. तसेच, तालुक्यातील अनेक व्यावसायिक व अगदी सर्वसामान्य नागरिक देखील खासदार आढळराव यांच्यावर नाराज आहेत. खेड तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला माझा विरोध नव्हता, असे सांगत खासदार आढळराव यांनी कितीही केविलवाणा व बचावात्मक पवित्रा घेतला असला तरी त्यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. किंबहुना त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण त्यांचा विमानतळ विरोध जगजाहीर आहे. आढळराव यांची विमानतळाबाबत असलेली भूमिका ही सातत्याने विरोधाचीच राहिलेली आहे.

मोठ्या प्रकल्पांना विरोध

मुळातच स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठीच खासदार आढळराव यांनी लोकसभेच्या २००४, २००९ व २०१४ या तिन्ही निवडणुका ‘विमानतळाला विरोध करणे’ या एकमेव राजकीय अजेंड्यावर लढविल्या व जिंकलेल्या आहेत. एकीकडे तालुक्यात हजारो कोटींची विकासकामे केल्याचा दावा आढळराव जरी करीत असले तरी तालुक्यातील कोणत्याही मोठ्या प्रकल्पांना विरोध करायचा, अशाच विरोधाभासाचे सूत्र त्यांचे राहिलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पुण्यामध्ये साकारतेय भाषांचे व्यासपीठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उद्योगविश्वात भाषा महत्त्वाचा विषय ठरत असल्याने भाषेच्या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतीय भाषांबरोबर परकीय भाषांच्या दुभाषकांना कंपन्यांमधून मागणी आहे. मात्र, मोठी क्षमता असूनही भाषेचे क्षेत्र विस्कळित स्वरूपात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सर्व भाषांसाठी एक व्यासपीठ आकार घेत आहे. असोसिएशन ऑफ लँग्वेज प्रोफेशनल्स हे त्या व्यासपीठाचे नाव.
भाषा क्षेत्रातील संधींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच भाषातज्ज्ञांचे जाळे तयार करण्याच्या हेतूने असोसिएशन ऑफ लँग्वेज प्रोफेशनल्सची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी जपानी भाषेच्या तज्ज्ञ केतकी नवाथे आणि जर्मन भाषेच्या तज्ज्ञ ललिता मराठे यांनी पुढाकार घेतला आहे.
‘भाषेच्या क्षेत्रात भाषांतर किंवा आशय तयार करणे एवढ्याच मर्यादित संधी आहेत, असे लोकांना वाटते. परंतु सबटायटलिंग तज्ज्ञ, शब्दकोशाकार, दुभाषक, मुद्रित शोधक, टेक्निकल रायटर, स्पीच रायटर अशा अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. या सर्वांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच भाषातज्ज्ञांसाठी समान व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने या असोसिएशनची स्थापना होत आहे,’ असे नवाथे यांनी सांगितले.
मराठे म्हणाल्या, ‘असोसिएशनमुळे भाषातज्ज्ञ, विद्यार्थी, भाषाप्रेमींसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून कौशल्यविकासाचे प्रयत्न करणार आहोत. संवादकौशल्य व भाषेवरील पकड असणे काळाची गरज आहे. यासाठी असोसिएशन चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषद याबरोबरच भाषातज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.’

पूर्वनोंदणी आवश्यक
असोसिएशन ऑफ लँग्वेज प्रोफेशनल्सचे सदस्यत्व भाषातज्ज्ञ, संस्था व विद्यार्थ्यांसाठी खुले असून त्याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक आहे. भाषा शिक्षणासंबंधित कोणालाही या व्यासपीठाचा भाग होता येईल. १२ नोव्हेंबर रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात असोसिएशन ऑफ लँग्वेज प्रोफेशनल्सची स्थापना होणार आहे. अधिक माहिती www.languageprofessionals.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

प्रादेशिक भाषातज्ज्ञांनाही संधी
‘परकीय भाषांमध्ये सध्या जर्मन, जपानी, रशियन, फ्रेंच, चिनी या भाषांमध्ये संधी आहे. प्रकल्प साकारताना प्रादेशिक भाषा महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे परकीय भाषांप्रमाणे प्रादेशिक भाषांच्या तज्ज्ञांना या क्षेत्रात मोठी संधी आहे. भाषा क्षेत्रातून मोठा रोजगार निर्माण होत आहे; पण त्याची निश्चित अशी आकडेवारी नाही. पुण्यामध्ये विविध कंपन्यांमधून हजारो भाषातज्ज्ञ काम करत आहेत. या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न आहे,’ असे या चळवळीतील उद्धव गोडबोले व संजय रुईकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसने ४४; आरक्षण ४५ चे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रणालीतील त्रुटींकडे महामंडळाकडून काणाडोळा केला जात आहे. एसटी महामंडळाच्या बहुतांश गाड्या या ४४ सीट क्षमतेच्या असताना, ऑनलाइन तिकीट आरक्षण तक्त्यात ४५ सीट दाखविले जातात. त्यामुळे ४५ सीट क्रमांकाच्या प्रवाशाला जागा मिळत नसून मनस्तापच सहन करावा लागत आहे.
एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट वेबसाइट आणि मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन आरक्षित करण्याची सुविधा एसटी प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली असून, आरक्षण केंद्रावरील रांगा आणि त्यासाठी करावी लागणारी धडपड यातून त्यांची मुक्ती झाली आहे. ऑनलाइन तिकीट आरक्षणाला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आहे. मात्र, या योजनेतील काही त्रुटींमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एसटीच्या बहुतांश बसची आसन क्षमता ही ४४ आहे. मात्र, ऑनलाइन तिकीट आरक्षित करताना प्रत्येक बसला ४५ सीटची क्षमता दर्शविली जाते. ४५ क्रमांकाचे सीट हे अगदी समोर, म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला दाखविले जाते. पुढील जागा असल्याने प्रवासी या सीटला प्राधान्य देतात. पण, प्रत्यक्ष प्रवास करताना कंडक्टरकडून ही गाडी ४४ सीटची असून ड्रायव्हरच्या शेजारील सीट हे कंडक्टरसाठी राखीव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रवाशांना बसायला जागाही मिळत नाही. याबाबत प्रवाशांकडून मोठ्या संख्येने तक्रारी केल्या जात आहेत.
सध्या दिवाळीमुळे एसटीच्या गाड्यांना तुडुंब गर्दी आहे. ऑनलाइन तिकीट आरक्षणही वाढले असून प्रवाशांकडून ४५ क्रमांकाची सीट आरक्षित केली जात आहे. मात्र, त्यांना प्रत्यक्षात जागा मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून या ४५ क्रमांकाच्या सीटचे गौडबंगाल उलगडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन गाड्यांमध्ये एक सीट वाढले आहे. त्यामुळे सीटची संख्या ४४ वरून ४५ झाली आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी केवळ ४४ सीटचे ऑनलाइन आरक्षण करण्याची सूचना संबंधित विभागाला करणार आहे.
- रणजितसिंह देओल (व्यवस्थापकीय संलाचक, एसटी महामंडळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​स्वस्त आयफोनच्या आमिषाने फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आयफोन सिक्स’ अवघ्या २६ हजार रुपयांत, अशी जाहिरात फेसबुकवर पोस्ट करून नवी सांगवी येथील तरुणाला वेगवेगळी कारणे सांगून ५८ हजार रुपयांना फसवण्यात आले. सायबर सेलने या प्रकरणी मूळचा बिहार येथील असलेल्या आरोपीला नवी मुंबई येथून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे २० सिमकार्ड, १३ डेबिट कार्ड, नऊ पासबुक, १२ चेकबुक, दोन लॅपटॉप, चार मोबाइल हॅण्डसेट असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ओसीम आक्तार (वय २१, रा. जुनी सांगवी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी शिबू सर्जु राय (वय २९, रा. नवी मुंबई, मूळ रा. दरभंगा, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आक्तार यांच्या फेसबुक अकाउंटवर Agrovat SA, Electronic Tech Ltd या कंपनीची आयफोन मोबाइल संदर्भात जाहिरात दिसली होती. आयफोन सिक्स हा हॅण्डसेट २६ हजार रुपयांमध्ये मिळेल व संपर्कासाठी kumar.sedique123@gmail.com हा आयडी व फोन नंबर दिला होता, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

आक्तार यांनी संबंधित क्रमाकांवर व्हॉटस् अॅपद्वारे संपर्क साधला होता. त्यावेळी आरोपीने आक्तार यांना आपण केल्वीन बोलत असून कंपनीचा मॅनेजर असल्याचे भासवले होते. दोन हॅण्डसेट खरेदी केल्यास ते प्रत्येकी २१ हजार रुपये आणि कॅश ऑन डिलिव्हरी या स्वरूपात मिळतील, असे सांगितले होते. मात्र, हॅण्डसेटचे शिपिंग चार्जेस म्हणून पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी अट घालण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी आक्तार यांना कुरिअर कंपनीचा ट्रॅकिंग कोड दिला होता. आक्तार यांनी त्या ट्रॅकिंग कोडवरून माहिती घेतली असता त्यांना सहा आयफोन पाठवल्याचे भासवण्यात आले.

आक्तार यांनी आरोपीशी संपर्क साधला असता, त्यांना चुकून सहा आयफोन पाठवल्याचे सांगितले. मात्र, त्याचा हिशोब नंतर करू असा बहाणा केला. आरोपीने आक्तार यांच्याशी संपर्क साधत भारतीय कस्टम अधिकाऱ्यांनी कुरिअर थांबवले असून त्यासाठी पैशांची मागणी केली. अशा प्रकारे आरोपीने वेगवेगळ्या कारणाने आक्तार यांच्याकडून ५८ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आक्तार यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती, असे पवार म्हणाले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक ​मनीषा झेंडे, फौजदार नितीन म्हस्के, नितीन खामगळ यांच्या पथकाकडे देण्यात आला होता. या पथकाने गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आरोपी हा नवी मुंबई येथे असल्याचे लक्षात आले. त्यानुसार रायला अटक करण्यात आली. रायविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडे विविध बँकांची पासबुक, डेबिट कार्ड सापडले आहेत.

अशा प्रकारच्या सहा तक्रारी

आयफोनची स्वस्त दरात विक्री करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या सहा घटना आतापर्यंत पुणे शहरात घडल्या आहेत. या घटनांमध्ये आरोपींनी एक लाख ते चार लाख रुपयांपर्यंत फसवणूक केली आहे. नजरचुकीने जादा आयफोन पाठवल्याचे भासवून नागरिकांना फसवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोबाइलची खरेदी अधिकृत व्यावसायिकांकडूनच करावी. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर सेलचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढीबाबत हायकोर्टाने पालिकेला फटकारले

0
0

३४ गावांच्या समावेशाबाबत उद्यापर्यंत बाजू मांडण्याचा कोर्टाचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याबाबत हायकोर्टाने सोमवारी राज्य सरकारला फटकारले. गावांच्या समावेशासंदर्भात बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ देण्यास नकार देऊन, उद्या, बुधवारपर्यंत बाजू मांडण्याचा आदेश कोर्टाने सरकारला दिला आहे.

‘राज्य सरकारने २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीच्या दरम्यान आपले म्हणणे सादर करावे, कळवावे अन्यथा कोर्ट निर्णय घेईल,’ असा आदेश न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने दिला असल्याचे हवेली तालुका नागरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले. याबाबत सहा महिने मुदतवाढ मिळावी, अशी विनंती राज्य सरकारने खंडपीठाला केली आहे.

‘पुणे पालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश केला नाही, तर निवडणुका घेऊ नये,’ अशी मागणी करणारी नवी याचिका हवेली तालुका नागरी कृती समितीने हायकोर्टात केली आहे. गावांच्या समावेशाबाबत राज्य सरकारच्या नकारात्मक पवित्र्यानंतर समितीने ही भूमिका घेतली आहे. गावे समाविष्ट करण्याबाबत हायकोर्टात दोन याचिका आहेत. यातील एका याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या वेळी सरकारतर्फे सरकारी वकील ठाकूर यांनी सहा ​महिने मुदतवाढीचे पत्र खंडपीठापुढे सादर केले. खंड​पीठाने सरकारला आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला. यापूर्वी तीन महिने मुदतवाढ दिली असतानाही पुन्हा मुदतवाढ मागितल्याने खंडपीठाने सरकारला फटकारले.

कृती समितीचे सचिव बाळासाहेब हगवणे यांनी ही याचिका राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग, महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्याविरुद्ध दाखल केली आहे. २०१४मध्ये ही गावे समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती; मात्र काही तांत्रिक बाबींमुळे गावे समाविष्ट झाली नव्हती. राज्य सरकारने गावे समाविष्ट न करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याचा दावा समितीने केला आहे. या गावांमध्ये कोणतीही निवडणूक घेऊ नये, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेळके हत्याप्रकरणी पाच जणांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. सोमवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई कारवाई करण्यात आली. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार-हल्लेखोर श्याम दाभाडे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. स्थानिक गुन्हे शाखा व तळेगाव पोलिसांनी पुणे व मावळ परिसरात ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश सहादू घारे (वय २५, रा. महागाव, मावळ), राजेश दादाभाऊ ढवळे (वय ३०, रा. रूपीनगर, तळवडे), शिवाजी भरत आढाव (२४), अमित अनिल दाभाडे (२३ दोघेही रा. पवनानगर, मावळ) सचिन लक्ष्मण ठाकर (२६, रा. ठाकूरसाई, मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. आरोपींना वडगाव मावळ कोर्टात हजर केले असता एक नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बंटी रामचंद्र दाभाडे, संदीप पचपिंड आणि खंड्या पचपिंड, आकाश दीपक लोखंडे या चौघांना यापूर्वी अटक करण्यात आली असून यांची ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी श्याम रामचंद्र दाभाडे हा अन्य साथीदारांसह अद्याप फरारी आहे.

तळेगाव दाभाडेतील खांडगे पेट्रोल पंपासमोर १६ ऑक्टोबरला सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. शेळके हे पेट्रोल पंपासमोरून त्यांच्या कारमधून येत असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवून गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर शेळके यांच्या पिस्तुलासह अन्य पिस्तुलातून गोळीबार केला; तसेच त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेखाली उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. कासारवाडी ते पिंपरी रेल्वे स्टेशनदरम्यान हा प्रकार घडला. रजनीसिंह (वय १८, रा. कुदळवाडी, चिखली) आणि सूरज विशिष्ठमल त्रिपाठी (वय २४, रा. पेंदा, डुमरिया गाव, उत्तर प्रदेश) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनी आणि सूरज हे एकाच गावचे रहिवासी असून ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

सूरजचे वडील सरकारी नोकरीत असून त्यांच्या घरची परिस्थीती चांगली आहे. त्याच्या घरी शेतवाडी मुबलक आहे. त्याचे शिक्षण कमी झाल्याने तो शेती करत होता; तर रजनी हिची शिक्षणातील प्रगती चांगली असल्याने पुढील शिक्षणासाठी ती कुटुंबासह पिंपरी-चिंचवड शहरात आली. रजनीचे कुटुंबीय याच ठिकाणी स्थायिक झाल्याने दोघांचे भेटणे बंद झाले होते. रजनी ही जाधववाडी येथील एका महाविद्यालयात बीसीए करत होती.

सूरज आठवड्यापूर्वी मुंबईत आला होता. मुंबईतून दोन दिवसांपूर्वी तो पिंपरी-चिंचवडमध्ये आला. त्या दिवसापासून रजनी देखील घरातून बेपत्ता होती. घरच्यांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. तेव्हा तिच्या घरच्यांनी सोमवारी रात्री निगडी पोलिस ठाण्यात माहिती दिली होती.

कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळच्या लोहमार्गावर मंगळवारी सकाळी या दोघांनी मुंबईच्या दिशेने जाणऱ्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली. शवविच्छेदनानंतर रजनीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सूरजचे कुटुंबीय उत्तर प्रदेश येथे असल्याने त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाकडे देण्यात आला. घरातून लग्नाला विरोध असल्याने त्यांनी हा मार्ग स्वीकारला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अॅट्रॉसिटीचा कायदा ब्राह्मणांना लागू करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘अॅट्रॉसिटीचा कायदा ब्राह्मणांसह सर्वच जाती धर्मांसाठी लागू करावा म्हणजे कोणीच कोणाला जातीवरून बोलणार नाही,’ असे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मुख्य प्रवक्ते रवीकिरण साने यांनी व्यक्त केले.

चिंचवडगाव येथील दर्शन हॉल येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे, संघाचे शहराध्यक्ष धनंजय बुडूख, कार्याध्यक्ष पवन वैद्य, महासचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

रवीकिरण साने म्हणाले, ‘राज्यात ब्राह्मणांची संख्या जास्त आहे. पिंपरी-चिंचवडच्या बहुतांश प्रभागांमध्ये ब्राह्मणांची संख्या ३० टक्के आहे. एकूण मतदार ६० टक्के होते. त्यात सर्व ब्राह्मणांनी मतदान केले तर आपण म्हणू तो उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जागावाटप करताना सर्वसाधारण गटात ३० टक्के जागा ब्राह्मण उमेदवारांना द्याव्यात.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ भसे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय लढत रंगणार

0
0

Sunil.Landge@timesgroup.com
Tweet : @sunillandgeMT

पिंपरी : भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच पिंपरी-चिंचवडमधील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय लढतीत रंगत येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महापालिकेतील एकहाती सत्तेची हॅटट्रीक करण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस बाळगून आहे, तर या पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने चालविली आहे. त्या अनुषंगाने लांडगे यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अपयश पुसून काढण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असे चित्र आता निर्माण झाले आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही दावा केला, तरी ही राजकीय लढाई म्हणावी तितकी सोपी नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे.

अजितदादांनी या शहराच्या राजकारणात १९९२पासून लक्ष घालण्यास सुरवात केली. त्यानंतर १९९७, २००२, २००७ आणि २०१२ या महापालिकेच्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वाखाली झाल्या. दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याशी वेळप्रसंगी समझोता करीत सुरुवातीला अजितदादांना सत्तेसाठी तडजोड करावी लागली. परंतु, गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी’ने निर्भेळ यश मिळविले. त्यामुळे देशातील सर्वाधिक प्रगतीचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडचा विकास करू शकलो, असा दावा पवार करीत आहेत. तो खरा की खोटा हे मतदारच ठरवतील. परंतु, सत्तेच्या हॅटट्रीकच्या वाटचालीत भाजपच्या बेरजेच्या राजकारणाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे, ही बाब मान्य करावी लागेल.

लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला जबरदस्त धक्का बसला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न होत असतानाच विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्या वेळी आमदार जगताप यांनी ‘राष्ट्रवादी’ला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करून आश्चर्याचा धक्का दिलाच होता. परंतु, आता आमदार लांडगे यांच्या भाजप प्रवेशाने ‘राष्ट्रवादी’ला मोठा दणका बसला आहे. जगताप आणि लांडगे हे एकेकाळचे ‘दादांचे’ शिलेदार आता त्यांनाच आव्हान देणार असल्यामुळे येथील राजकीय लढतीकडे सर्वांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. शिवसेनेचे दोन खासदार आणि एक आमदार, भाजपचा एक खासदार आणि दोन आमदार यांच्याशी लढत देणे दादांना म्हणावे तितके सोपे नक्कीच नाही. फक्त ते आता विजयासाठी काय रणनीती आखतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

लांडगे यांच्यामुळे भोसरी मतदारसंघात भाजपची ताकद पुन्हा वाढणार असा दावा केला जात आहे. यापूर्वी अंकुश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने चांगले यश संपादन केले होते. त्यापेक्षा अधिक यश मिळविण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे अजितदादांबरोबरच ‘राष्ट्रवादी’चे स्थानिक नेते शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, माजी महापौर आझमभाई पानसरे, योगेश बहल, मंगला कदम यांच्या नेतृत्त्वाचा कस लागणार आहे. आरोप-प्रत्यारोपांबरोबरच शह-काटशह या मुद्यांवरून निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारण लक्षात घेऊन पवार यांनीच आजपर्यंत वर्चस्व ठेवले आहे. त्याला आता काहीसा तडा जाऊ लागला आहे. त्यामुळे अन्य पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते ‘राष्ट्रवादी’मध्ये खेचण्याचे डावपेच अजितदादा आखत आहेत. त्याचे परिणाम आगामी काळत दिसतीलच, असा दावा केला जात आहे.

लांडगे-जगताप एकत्रिकरणामुळे ‘राष्ट्रवादी’लाच नव्हे, तर शिवसेनेलाही फटका बसण्याची शक्यता आहे. यदाकदाचित स्थानिक पातळीवर भाजप-सेना युती झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर भाजपशीही टक्कर द्यावी लागणार आहे. युती होणार नाही आणि माझ्या पसंतीच्या इच्छुकांना उमेदवारी मिळावी, या दोन प्रमुख अटींवर लांडगे यांनी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले, अशी चर्चा आहे. त्यामुळे युतीच्या शक्यतेला तडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे स्वबळावर वाटचाल करणे शिवसेनेला तुलनेने कठीण जाईल, असा राजकीय अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
मोडी लिपीच्या संवर्धनासाठी तिचा विविध पातळ्यांवर वापर वाढवा, या उद्देशाने श्रीधर आणि चित्रा फडके दाम्पत्याने पणत्यांवर मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पारंपरिक पणत्यांवर त्यांनी मोडी भाषेत ‘शुभ दिपावली’ असा संदेश देण्यात आला आहे.
मोडी लिपीच्या संवर्धनासाठी अभ्यासकांचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्यांमध्ये या भाषेविषयी कुतूहल वाढावे, त्यांनी या भाषेचा वैयक्तिक पातळीवर वापर करावा, यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. साताऱ्यात वास्तव्यास असलेले फडके दाम्पत्य यांनी दोन वर्षांपूर्वी दिवाळीला प्रायोगिक तत्वावर पणत्यांवर मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षी देखील त्यांनी अडीचशे मोडी लिपीतील पणत्या बनविल्या असून मागणी वाढते आहे.
दिवाळीच्या निमित्ताने लहान मुले आणि महिलांमध्ये मोडी लिपीबद्दल आस्था वाढवून त्यांना ही ऐतिहासिक लिपी शिकण्यासाठी प्रेरित करेल, असा विश्वास चित्रा फडके यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगील शब्दांची आतषबाजी

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘विदेशीला स्वीकारून स्वदेशीला टाळू लागले, पेग मारताच विन समजणारे पेंग्विन पळू लागले...अधरांचा थरथराट, तरी तिने मोह आवरला, त्याच्या नजरेतील ‘सर्जिकल स्ट्राइक’ पाहून तिने हळूच पदर सावरला...’अशा भाष्य कवितांमधून राजकीय व्यंग उघडे पडले आणि दिवाळी आधीच सभागृहात हास्याचे बॉम्ब फुटले. कवींनी सर्जिकल स्ट्राइक करून दिवाळीआधीच शब्दांची आतषबाजी केली.
निमित्त होते, संवाद पुणे व प्रबोधन विचारधारा यांच्यातर्फे आयोजित दिवाळी सांस्कृतिक महोत्सवातील कविसंमेलनाचे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवारी रंगलेल्या मैफलीत फटाके फुटले. ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे, कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, संदीप खरे, प्रदीप निफाडकर व अनिल कांबळे यांनी कविसंमेलनात हास्यफुलबाज्या उडविल्या. फुटाणे यांच्या ‘भारत माझा कधी कधी देश आहे,’ या कवितेला तीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते झाला. या वेळी शिवसेनेचे जिल्हासंपर्क डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार महादेव बाबर, योगेश मोकाटे, महेंद्र काळे, पृथ्वीराज सुतार, शिरीष राणे, सुनील महाजन उपस्थित होते.
‘फुटाणे दिवसा खाल्ले की प्रसाद होतो, रात्री खाल्ले की चकणा होतो’...‘तूच मिळवती तूच कमवती तू तर फक्कड मासिक हुंडा, काय तुझ्या बापाने द्यावे...’ अशा कवितांमधून दिवाळीच्या फराळाप्रमाणे रूचकर मैफल रसिकांनी अनुभवली. फुटाणे यांनी पेंग्विन आणि सर्जिकल स्ट्राइक या भाष्यकवितांमधून षट्कार ठोकला. नायगावकर यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या शैलीने रसिकांना हसायला लावले. म्हात्रे, खरे, कांबळे व निफाडकर यांच्या
कवितांना रसिकांची पसंती मिळाली.


रामदास फुटाणे हा माणूस व्यंगचित्रकार न होता, शब्दांच्या बाजूला गेला. व्यंगचित्र व राजकीय व्यंगकविता यांचा आशय एकच आहे. फुटाणे हे कोणत्या पक्षाचे आहेत, याबाबत मला कुतूहल आहे, कारण त्यांची कविता कोणत्याही पक्षावर होऊ शकते. देशातील परिस्थिती गेली कित्येक वर्षे आहे, तशीच आहे. प्रत्येक सरकार आणि पक्षाचा विचार करता परिस्थिती सारखीच राहिली असून, ती फुटाणेंच्या कवितेला पोषक आहे.

- मंगेश तेंडुलकर,
ज्येष्ठ व्यंगचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्गज साहित्यिकांचा रंगला फड

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाचा विजय होणार, उभय उमेदवारांचे चांगले-वाईट गुण इथंपासून ते भारताच्या संसदेत झालेल्या गमती-जमतींपर्यंत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आणि सोबत दिवाळीचा चविष्ट फराळ, असा फक्कड बेत सोमवारी जमून आला. साहित्य व्यवहारात मानवी भावनांचा वेध घेणाऱ्या दिग्गज साहित्यिकांचा हा फड गप्पा, हास्यविनोदांनी चांगलाच रंगला.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे दिवाळी अंक वाचक योजनेचा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, प्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी उपस्थित साहित्यिकांनी आणि उत्कर्ष ग्रंथालयाच्या वाचकांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. संत साहित्याचे अभ्यासक वा. ल. मंजुळ, कवयित्री मंगला गोडबोले, श्याम भुर्के, जयराम देसाई, सुधीर राशिनकर, विश्वास मेहेंदळे आदी या वेळी उपस्थित होते. ‘उत्कर्ष’चे सुधाकर जोशी यांनी ही मैफल आयोजित केली होती. एरव्ही आपल्या लेखनातून वाचकांना भेटणाऱ्या साहित्यिकांना प्रत्यक्ष पाहून त्यांच्याशी संवाद साधण्याची पर्वणी लाभलेल्या वाचकांनी साहित्यिकांशी मनमुराद गप्पा मारल्या.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यापैकी कोण विजयी होणार, तसेच संसदेत अनेक नेत्यांनी केलेले विनोद, दिवाळी अंकांमध्ये मांडण्यात आलेले विविध विषय, कोणता अंक यंदा गाजणार यावर चर्चा रंगल्या सोबतीला चिवडा, करंजी, चकलीचा फराळ होताच.
‘दिवाळी अंकांची संख्या वाढली असून वाचक कमी होत चालले आहेत. त्यामुळे ही वाचन संस्कृती टिकावी, यासाठी दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये नाममात्र शुल्कात वाचकांना सर्व दिवाळी अंक वाचता येणार आहेत. वा. ल. मंजुळ, सदानंद मोरे, अरुणा ढेरे यांच्यासारखे दिग्गज ग्रंथालयाचे सभासद असल्याने त्यांचे विचार सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या गप्पांच्या मैफलिचे आयोजन करण्यात आले होते.’ असे उत्कर्ष प्रकाशनच्या सुधाकर जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसापच्या सभागृहात वैचारिक भाषणांऐवजी किलबिलाट

0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रवेशद्वारात काढलेली फुलांची सुरेख रांगोळी... पायऱ्यांवर तेवणाऱ्या पणत्या... सनईचे मंगल सूर... छोटे छोटे आकाशकंदील... दिवाळीचे हे उत्सवी वातावरण कुणाच्या घरातील नाही, तर ते आहे एरवी वैचारिक भाषणांनी दिपून जाणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहाचे.
निमित्त होते, महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप)आणि मैत्र युवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित वंचित मुलांसाठीच्या अक्षरदिवाळीचे. या अनोख्या दिवाळीने मुलांचे चेहरे फुलले. सारस्वतांच्या व्याख्यानांनी, वैचारिक भाषणांनी, मुलाखतींनी आणि कविसंमेलनांनी दीपून जाणारे ‘मसाप’चे माधवराव पटवर्धन सभागृह बालकुमारांच्या किलबिलाटाने थोडेसे हलके-हलके व ताजेतवाणे झाले.
परिषदेतील कर्मचारी ज्योत्स्ना नांदगिरीकर, तृप्ती कुलकर्णी, मीनाक्षी केळकर, शोभना कुलकर्णी, माधवी घाडगे यांनी सर्व मुलां-मुलींना अत्तर लावून औक्षण केले. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते मुलांना अक्षरफराळ म्हणजेच पुस्तके आणि कंपास भेट म्हणून देण्यात आला. अक्षरफराळ बरोबरच मुलांनी दिवाळीच्या फराळावर ताव मारला. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, फाउंडेशनचे प्रमुख संकेत देशपांडे या वेळी उपस्थित होते.
‘मुलांनो आयुष्यात कधीही निराश होऊ नका. मनात कायम सकारात्मक विचारांची पणती तेवत ठेवा. आयुष्य उजळून टाकण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये आहे. हे विचार पुस्तकांतूनच मिळतात म्हणून पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकांना जवळचा मित्र बनवा,’ अशा शब्दांत प्रा. जोशी यांनी मुलांशी कानगोष्टी केल्या. साहित्य परिषदेत प्रथमच असा उपक्रम साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रज प्राणिसंग्रहालयाला हाय अॅलर्ट

0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिल्लीतील राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आलेल्या बर्ड फ्लूच्या (एच५एन८) साथीमुळे पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासह राज्यातील सर्व प्राणी संग्रहालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने याबद्दल सर्व संग्रहालयांना पक्ष्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या आठवडाभरात दिल्लीमधील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयामध्ये ६४ हून अधिक पक्ष्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. यामध्ये पेलिकन, पेटेंड स्टॉर्क आणि काही बदकांचा समावेश आहे. हा आजार कोठून आला, त्याचा संसर्ग अजून इतर कोणत्या पक्ष्यांना झाला आहे, याबद्दल संभ्रम असल्याने दिल्लीतील प्राणिसंग्रहालय सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाने सर्व राज्यातील प्राणिसंग्रहालयांच्या पदाधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पत्राबरोबरच पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी, याची नियमावलीही देण्यात आली आहे. याशिवाय राज्याच्या पशुसंवर्धन खात्यानेही या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
‘प्राधिकरणाकडून आम्हाला सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप हा आजार दिल्लीपर्यंतच मर्यादित असून, महाराष्ट्रापर्यंत तो येईल असे वाटत नाही. मात्र, आम्ही सतर्क राहणार आहोत,’ असे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.
संग्रहालयातील कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना आम्ही नियमावलीची माहिती दिली आहे. तसेच, दररोज पक्ष्यांच्या हालचालींची नोंद घेतली जाते आहे. या साथीमध्ये पक्ष्यांच्या नाकातून स्राव येताना दिसतो, त्यांच्या पंखांची पिसे गळतात आणि त्यांचे अन्न खाण्याचे प्रमाण कमी होते. सध्या आमच्याकडे १७ पक्षी असून यात मोर, घुबड आणि लांब चोचीच्या गिधाडांचा समावेश आहे. कर्मचारी त्यांच्यावर करडी नजर ठेवत आहेत, असे जाधव यांनी सांगितले.

स्थलांतर झालेल्या पक्ष्यांबद्दल प्रश्नचिन्ह
पुणे जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागातील जलाशयांवर दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात परदेशी आणि देशांतर्गत स्थलांतर पक्षी दाखल होण्यास सुरुवात होते. गेल्या आठवड्यात चित्रबलाक आणि काही परदेशी पक्षी पाणवठ्यांवर दिसायला सुरुवात झाली आहे. बर्ड फ्लूची बाधा या पक्ष्यांना होणार का किंवा त्यांच्यामुळे ही साथ देशभर पसरणार का, याबद्दल पक्षी अभ्यासकांमध्ये संभ्रम आहे.

‘गंभीर साथ’
‘एच५एन८ ही गंभीर रोगकारक साथ आहे. दिल्लीतून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार याचे मूळ कोरियामध्ये आहे. पण, तो भारतात कसा आणि कोठून आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यतः डुक्करांमध्ये या साथीची लक्षणे दिसतात. माणसांना याची लागण होण्याची शक्यता कमी आहे. स्थलांतरीत पक्ष्यांमार्फत महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल, असे वाटत नाही. कारण बर्ड फ्ल्यूची लागण झालेला पक्षी तत्काळ मरतो, तो लांबचा प्रवास करू शकत नाही. तरी देखील आम्ही पुण्यासह परिसरात येणाऱ्या स्थलांतरी पक्ष्यांच्या हालचालींबद्दल अधिक जागरूक राहणार आहोत,’ अशी माहिती प्रसिद्ध पक्षी अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिंदे, कोत्तापल्लेंमध्ये गावावरून जुगलबंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘माणसे खेड्यातून शहराकडे गेली. सरकारच्या धोरणामुळे खेडी उद्ध्वस्त झाली,’ या वक्तव्यावरून माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात जुगलबंदी रंगली. ‘गेल्या ५० वर्षांत जी धोरणे व अर्थव्यवस्था राबवली त्यामुळे देशातील खेडी उद्ध्वस्त झाली,’ अशी टीका डॉ. कोत्तापल्ले यांनी केली. त्यावर, ‘गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही. गावात जात कळते, शहरात जात कळत नाही,’ असा टोला शिंदे यांनी कोत्तापल्ले यांना लगावला. या दोघांच्या जुगलबंदीने गावगप्पा चांगल्याच रंगल्या.
ऋतुरंग प्रकाशन व अक्षरधारातर्फे अरुण शेवते संपादित ‘माझे गाव माझे जगणे’ या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, सचिन इटकर, रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.
‘खेड्याकडे चला असा संदेश, महात्मा गांधींनी दिला, तर शहराकडे चला असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. विकासासाठी लोक शहरात आले. पण त्यांच्या वाट्याला झोपडपट्टीच आली. गेल्या ५० वर्षांत जी धोरणे राबवली व अर्थव्यवस्था राबवली त्यामुळे देशातील खेडी उद्ध्वस्त झाली,’ अशी टीका डॉ. कोत्तापल्ले यांनी केली. खेडी उद्ध्वस्त होण्याला एकप्रकारे मागील सरकारला जबाबदार धरण्यात आल्याने कोत्तापल्ले यांना टोला लगावण्याची संधी शिंदे यांनी सोडली नाही. ‘गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही. गावात जात कळते, शहरात जात कळत नाही,’ अशी कोपरखळी शिंदे यांनी मारली. ‘गावात दलित अस्पृश्यतेमध्येच लोळत होते. माणूस पुढे गेला की जात कळत नाही. शहरात कोणी विचारत नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात,’ अशा शब्दांत शिंदे यांनी कोत्तापल्ले यांच्या टीकेचा समाचार घेतला.
‘आपले गाव जगण्याशी निगडीत असते. गाव म्हटले की लोक आठवणीत रमतात, भावनिक होतात. गाव ही केवळ भौगोलिक रचना नसते. महानगरालाही गावच म्हटले जाते,’ अशी भावना डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधवराव, घाटे यांचा शिवसेनेत प्रवेश

0
0


म. टा. वृत्तसेवा, सासवड
माजी कृषी राज्यमंत्री आणि जनता दलाचे नेते दादा जाधवराव आणि पुरंदर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दादा घाटे यांनी शिवसेना प्रमुख कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यामुळे मनसे आणि पूर्वाश्रमीच्या जनता दलात खळबळ उडाली आहे. दोन महिन्यानंतर येत असलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश धक्कादायक मानला जातो आहे.
गेली अनेक वर्षे केवळ राजकारणापायी भिजत ठेवलेला ‘रायता’ हा प्रकल्प पुन्हा नव्याने पूर्णत्वास नेण्यासाठी विधायक भूमिकेतून आपण शिवसेनेत जात आहोत. कारण मनसेमध्ये तालुका स्तरावर पूर्णपणे मरगळ आली असून, पक्ष आता फार मोठी उभारी घेईल अशी कोणतीही शक्यता नाही असे वाटल्यावरून मी तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी ‘मटा’ला बोलताना सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत भिवरी, पठारवाडी, अस्करवाडी हिवरे, चांबळी येथील माजी सरपंच-उपसरपंच आदी १०० कार्यकर्त्यांनी; तर मावडी-चाचर येथील १००लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी वाहनांवरही बेकायदा पोलिस लोगो

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर सर्रासपणे ‘पोलिस’ आणि ‘वाहतूक पोलिसांचे चिन्ह’ लावले जात असूनही त्याविरोधात कारवाई करण्याकडे काणाडोळा केला जात आहे. पोलिसांनी आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलिस’ किंवा ‘वाहतूक पोलिसां’चे चिन्ह लावणे बेकायदा आहे. मात्र, अशा एकाही खासगी वाहनावर सप्टेंबर २०१५ पासून आतापर्यंत पुण्यात कारवाई झालेली नाही.
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलिस व वाहतूक पोलिसांचे चिन्ह’ लावण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी राज्याच्या गृह विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा खासगी वाहनांवर ‘पोलिस’ लिहिणे किंवा स्टीकर लावण्यास बंदी घालण्यात आली. गृह विभागाने सात सप्टेंबर २०१५ रोजी त्यासंबंधीचे परिपत्रक काढले. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांवर पोलिस किंवा वाहतूक पोलिसांचे चिन्ह लावल्याचे दिसून येते. मात्र, गेल्या वर्षभरात एकाही वाहनावर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
लोकहित फाउंडेशनने वाहतूक पोलिस विभागाकडे माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली होती. कारवाईची आकडेवारी निरंक असल्याचे उत्तर त्यांना प्राप्त झाले आहे. तसेच, परिवहन आयुक्तालयाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना खासगी वाहनांवरील पोलिसांचा उल्लेख असलेल्या पाट्या, स्टीकर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडूनही काहीच कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पाण्याचे नियोजन डिसेंबरपर्यंत रखडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे नियोजनही विधान परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे धरणे पूर्ण भरलेली असूनही, पुणेकरांना दोन वेळच्या पाण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
पाटबंधारे विभागातर्फे धरणांचा १५ ऑक्टोबरपर्यंतचा साठा गृहित धरून शहर आणि ग्रामीण भागासाठी पिण्याच्या पाण्याचे आणि शेती व उद्योगांसाठीच्या पाण्याचे नियोजन केले जाते. ऑक्टोबर अखेरपूर्वी ही बैठक घेण्यात येत असल्याने त्यात पुढील वर्षी जुलैपर्यंतचे पाणीवाटप निश्चित केले जाते. यंदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये मिळून सुमारे ९७ टक्के पाणीसाठा होता. टेमघर धरण गळत असल्याने ते पूर्ण क्षमतेने भरण्यात आले नाही. तरीही धरणांतील पाणीसाठा शहरासह ग्रामीण भागात पिण्यासाठी आणि शेती-उद्योगांसाठी पुरेसा असल्याने पुणेकरांना पूर्वीप्रमाणे दोन वेळा पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती.
कालवा समितीच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाणे अपेक्षित असताना, नेमक्या ग्रामीण भागांत नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तर, शहरात विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणारी कालवा समितीची बैठकही लांबणीवर टाकण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने केलेल्या नियोजनानुसार सुरुवातीला दिवाळीनंतर ही बैठक घेण्याचे नियोजन होते. परंतु, आचारसंहिता लागल्याने आता ही बैठक थेट ग्रामीण भागांतील निवडणुका झाल्यावरच घ्यावी लागेल, अशी शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत १४ डिसेंबरला निवडणुका होणार असल्याने कालवा समितीची बैठकही त्यानंतरच लागण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेतर्फे सध्या दररोज १२०० एमएलडी पाणी घेण्यात येत आहे. शहराच्या काही भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धरणे पूर्ण भरली असल्याने पूर्वीप्रमाणे दररोज १३०० एमएलडी पाणी देण्यात यावे, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. त्याबाबत १५ ऑक्टोबरनंतर निर्णय घेण्यात येईल, असे बापट यांनी स्पष्ट केले होते. परंतु, आचारसंहितेमुळे आता कालवा समितीची बैठकच लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने दोन वेळच्या पाण्याबाबतचा निर्णयही प्रलंबितच राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवानी पेठेतील बोगस डॉक्टर अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भवानी पेठ परिसरात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला समर्थ पोलिसांनी अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. बी. गवारे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
आयूब हयात खान (५३, फिरोज चेंबर्स, गणेश पेठ) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कृष्णराव बेंडे (४७, रा. गणेश विहार, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पुणे शहरातील बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे मोहिम राबविण्यात येत आहे. फिर्यादी डॉ. दिनेश बेंडे कारवाई करत असताना त्यांना आयूब खान अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करताना आढळला. त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता त्याने मेडिकल कौन्सिल कोलकाता येथील ओळखपत्राची प्रत दाखविली. त्याने त्याच्याकडे बी फार्मसीची पदवी असल्याचे सांगितले. मात्र त्याच्याकडे महाराष्ट्र वैद्यक परिषद, महाराष्ट्र सम चिकीत्सा परिषद, महाराष्ट्र भारतीय चिकीत्सा परिषद, महाराष्ट्र दंतवैद्य परिषद या चार परिषदांपैकी वैद्यक परिषदेकडे नोंदणी झालेले प्रमाणपत्र मागितले असता त्याने प्रमाणपत्र दाखविले नाही. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. मूळ प्रमाणपत्र आणि दस्तऐवज जप्त करायचा आहे, पुणे शहरात त्याची किती क्लिनिक आहेत, याचा तपास करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील आर. आर. पाटील यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images