Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कम्प्युटर लॅबमधून झाला कोट्यवधींचा चुराडा

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शहरभरातील शाळांमधून उभारलेल्या कम्प्युटर लॅब गेल्या दीड वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. या लॅबकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मंडळाकडे प्रशिक्षित शिक्षक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी या लॅबमधील कम्प्युटरच्या देखभालीकडेही दुर्लक्ष झाल्याने जनतेच्या करामधून पालिकेकडे गेलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचेही समोर आले आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळातील कारभारामुळे गेल्या काही काळापासून मंडळाला शिक्षणप्रमुख मिळत नसल्याची बाब ‘मटा’ने नुकतीच उघड केली. या पदावर काम करत असताना विविध व्यवहारांसाठी येणारे राजकीय दडपण त्रासदायक ठरत असल्याने, शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी या पदावर काम करण्यास नकार दिला आहे. तसेच, मंडळाच्या कारभाराचे त्रयस्थ सरकारी यंत्रणेकडून मूल्यमापन करण्याची मागणीही अधिकाऱ्यांकडूनच पुढे आली आहे. मंडळाने शिपायांना शिक्षक म्हणून काम करण्याची अनोखी संधीही मिळवून दिल्याचे नुकतेच समोर आले. त्या पाठोपाठ हा कम्प्युटर लॅबचा कारभार समोर आल्याने मंडळाविषयीचे अविश्वासाचे धुके दाट होत चालले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव आणि विक्रांत अमराळे यांनी या विषयी मंडळाकडे माहिती मागविली होती. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मंडळाने आपल्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचे शिक्षण देण्यासाठी म्हणून शाळांमधून कम्प्युटर लॅब उघडण्याची योजना राबविली आहे. त्या आधारे मंडळाच्या शाळांमधून एकूण २६६ कम्प्युटर लॅब सुरू करण्यात आल्या. २२ जुलै २०१५ पर्यंत या लॅबमध्ये एकूण एक हजार ७३५ कम्प्युटर बसविण्यात आले. त्यापैकी एक हजार ९२ कम्प्युटर हे सुरू; तर ६६४ कम्प्युटर बंद अवस्थेत होते. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रशिक्षक नेमण्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सुरू असलेल्या कम्प्युटरच्या आधारे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी किती प्रशिक्षक आहेत, याची कोणतीही माहिती मंडळाकडे नसल्याचेही मंडळाने लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

शिक्षण मंडळाने गेल्या दीड वर्षांपासून या योजनेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मंडळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशीच खेळत आहे. या प्रकारात दोषी असलेले मंडळाचे अधिकारी आणि योजनेत सहभागी असलेल्या खासगी कंपन्यांवर त्वरीत गुन्हे दाखल करावेत. सर्व कम्प्युटर लॅब येत्या दोन आठवड्यात कार्यरत झाल्या नाहीत, तर मनविसे तीव्र आंदोलन करेल.

- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​मॅट्री‘मनी’चे जाळे

$
0
0

पुणे : ‘मॅट्रीमोनी’ वेबसाइटवर नोंदणी करणाऱ्या विधवा, घटस्फोटित आणि तिशीनंतर लग्न करणाऱ्या महिलांना लग्नाच्या आमिषाने जाळ्यात ओढण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात ‘मॅट्रीमोनी’ साइटवर नोंदणी केलेल्या पुण्यातील ३८ उच्चशिक्षित महिलांची तब्बल तीन कोटींची फसवणूक झाल्याचे सायबर शाखेने केलेल्या तपासात आढळून आले आहे. काही महिलांनी तर स्वतःचे घर विकून आरोपींना पैसे दिल्याचे आढळून आले आहे.
नोकरी, कौटुंबिक कारणामुळे लग्न उशिरा करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेक महिला ‘मॅट्रीमोनी’ वेबसाइटवर लग्नासाठी नावनोंदणी करतात. तसेच, विधवा, घटस्फोटीत महिलादेखील या साइटवर दुसऱ्या लग्नासाठी नाव नोंदवितात. याच साइटवर बनावट प्रोफाइल तयार करून या महिलांना जाळ्यात ओढणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. परदेशात मोठ्या पगाराची नोकरी असल्याचे प्रोफाइलवर टाकले जाते. महिलांना ‘रिक्वेस्ट’ पावठून त्यांच्याशी संपर्क वाढविला जातो.
लग्नासाठी मागणी घालून महिलेला बोलण्यातून ‘इम्प्रेस’ केले जाते. महिलेचे विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणे सांगून महिलेकडे पैसे मागितले जातात. भारतात आल्यानंतर विवाह करून पैसे देण्याचे आश्वासनही दिले जाते. तर, काही वेळेला परदेशातून मोठ्या रकमेचे गिफ्ट पाठविले असून ते कस्टमने पकडले आहे. ते सोडवून घेण्यासाठी महिलेला पैसे भरायला लावले जातात. महिला पैसे भरत राहते. मात्र, गिफ्टही मिळत नाही आणि लग्नाचे आश्वासन दिलेल्या व्यक्तीशी संपर्कही होत नाही. त्या वेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येते. मॅट्रीमोनी साइटवरून फसवणूक करणाऱ्या ओडीशातील दोघांना पुणे सायबर पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. त्यांनी देशभरातील २० महिलांची साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील काही महिलांनी विश्वास ठेवून स्वतः घर विकून पैसे दिल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. हडपसर येथील आयटी इंजिनिअर असलेल्या महिलेने मॅट्रीमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी स्वतःचे घर विकले होते. तर, एनसीएलमधून निवृत्त झालेल्या ६३ वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखविणाऱ्या व्यक्तीसाठी पाषाण येथील फ्लॅट विकून पैसे दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मॅट्रोमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीला पैसे देताना काळजी घेण्याचे आवाहन सायबर शाखेच्या पोलिसांनी केले आहे.

भेटल्याशिवाय विश्वास ठेवू नका
‘मॅट्रोमोनी’ वेबसाइटवरून फसवणूक झालेल्या महिलांचे वय तिशीच्या पुढे आहे. यामध्ये विधवा, घटस्फोटित आणि उशिरा लग्न करणाऱ्या महिलांचा समावेश आहेत. मॅट्रीमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच, कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता भंग केल्याने पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आचारसंहिता लागू असताना कष्टकरी कामगार पंचायतीने गुरुवारी (२१ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर बेकायदेशीरपणे जमाव जमवून घोषणा दिल्याने आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे पिंपरी पोलिसांनी पंचायतीच्या सात पदाधिकाऱ्यांवर निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एखाद्या संघटनेच्या आंदोलक पदाधिकाऱ्यांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल होण्याची पिंपरी-चिंचवडमधील ही पहिलीच घटना आहे.
महापालिकेचे कर्मचारी विलास बाळासाहेब वाबळे (वय ५३ , रा. पिंपळेगुरव) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कष्टकरी कामगार संघटनेचे प्रल्हाद रामभाऊ कांबळे, धर्मराज जगताप, काळुराम जगताप, नवनाथ जगताप, जयश्री वाघ, ललिता विटकर, कौशल्या नेटके यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाबळे हे महापालिकेत सहायक सुरक्षा अधिकरी या पदावर कार्यरत आहेत. सध्या शहरात पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे महापालिका भवनासमोर जमाव जमवून घोषणाबजी करण्यास बंदी आहे. कष्टकरी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी महापालिका भवनासमोर बेकायदेशीररीत्या जमाव जमविला. घोषणा देत कार्यालयाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोर सर्वांना रोखून धरले. त्याबाबत वाबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार बाळासाहेब अंतरकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​दिवाळीतील खरेदी ४० टक्क्यांनी वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अर्थव्यवस्थेला मिळालेली चालना, चांगले पर्जन्यमान, नोकरीच्या वाढत्या संधी, कर्जावरील व्याजदरात होत असलेली घट यामुळे ग्राहकांचा खरेदीकडील ओढा वाढू लागला आहे. यंदाच्या सणासुदीच्या काळातील खरेदीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज ‘असोचॅम’ने वर्तविला आहे.
‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ अर्थात असोचॅमने दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, चंदीगड, लखनौ आणि इंदोर या शहरांमध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात २४ ते ३४ आणि ३५ ते ४५ या वयोगटातील ग्राहकांचा सहभाग होता.
असोचॅमच्या सर्वेक्षणानुसार यंदाच्या सणासुदीच्या हंगामातील तीन महिन्यांत ग्राहकांकडून अन्नधान्यावरील खर्चात २० टक्के, सर्वसाधारण दरातील कपड्यांवरील खर्चात ५२ टक्के तर लाइफस्टाइल व फॅशन अॅक्सेसरीजवरील खर्चामध्ये ३२ टक्के वाढ अपेक्षित आहे.
यावर्षी पाऊसमानही चांगले राहिल्याने ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण आहे. वाहनोद्योग क्षेत्राला चालना मिळाली असून प्रवासी वाहतुकीसाठीच्या गाड्या, दुचाकी, मोबाइल हँडसेट्स, ग्राहकोपयोगी वस्तू आणि कपडे तसेच फॅशनशी संबंधित अन्य गोष्टींची मागणी वाढली आहे. सध्या पूर्व आणि पश्चिम भारतात खरेदीने जोर धरला असून दिवाळीच्या दिवसांत उत्तर भारतातही मागणी वाढेल, असे या अंदाजात म्हटले आहे. त्याचवेळी रिअल इस्टेट व घरांसाठीची मागणी फारशी वाढलेली नाही.
पुरुषांच्या तुलनेत महिला कपड्यांवर अधिक खर्च करणार असून महिलांच्या तुलनेत पुरूष लाइफस्टाइल अॅक्सेसरीजवर अधिक खर्च करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मोबाइलच्या खरेदीवर होणारा सरासरी खर्च १५ ते ३५ हजार रुपयांच्या दरम्यान असेल. सहा महिन्यांपूर्वी हीच रक्कम १० ते १५ हजार इतकी होती.
घरगुती वापरासाठीच्या वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने यासाठी सरासरी १५ ते २५ हजार रुपयांदरम्यान खर्च अपेक्षित आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोबाइल, लॅपटॉप व एलईडी टीव्हीला अधिक मागणी असेल, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. महानगरातील ग्राहक विविध सवलतींमुळे ई-कॉमर्स वेबसाइटकडे आकर्षित होत आहेत, असेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅब कंपन्यांना आरटीओचा परवाना?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ओला, उबेर या सारख्या कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला अधिकृत दर्जा देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. नागरिकांची गरज लक्षात घेऊन अशा प्रकारच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरांअतर्गत प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्याचा प्रस्ताव आहे.
राज्य सरकारने ‘नवीन महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१६’चा मसुदा परिवहन विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. त्या मसुद्यावर पाच नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, त्यानंतर या मसुद्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. नवीन अधिनियम मुंबई महानगर क्षेत्रासाठी लागू होणार आहे. उर्वरित राज्यात सरकारच्या आदेशानुसार वेळोवेळी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कॅब कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या शहरांतर्गत प्रवासी सेवेला विरोध केला जात होता. या कंपन्यांना, वाहनांना कोणत्याही प्रकारचा शहरांतर्गत प्रवासी परवाना नसताना ते वाहतूक करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरात रिक्षा संघटनांनी आंदोलने केली होती. मुंबईमध्ये कॅब वाहनांची जाळपोळही करण्यात आली होती. आता राज्य सरकारच्या नवीन अधिनियमात या कॅब वाहनांना परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी नियमावलीदेखील तयार करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व कॅब कंपन्यांच्या वाहनांकडून दिल्या जाणाऱ्या सेवेत फारसा फरक राहिलेला नाही. तसेच, टॅक्सीच्या तुलनेत कॅब कंपन्यांच्या बदलत्या प्रवासी भाड्यामुळे प्रवाशांना चांगला अनुभव मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना मिळणारा फायदा कायम ठेवत, कॅब कंपन्यांना अधिकृत करून त्यांना नियमांचे बंधन घालणे गरजेचे असल्याचे सरकारने मसुद्यात नमूद केले आहे.

‘सरकारचे षड्यंत्र’
‘ऑल इंडिया टुरिस्ट परमिटधारक वाहनांना शहरात बेकायदा स्थानिक प्रवासी वाहतूक करू दिली. त्यांना कसलेच बंधन नसल्यामुळे त्यांनी कमी दराने सेवा दिली. आता त्या कॅब ही जनतेची गरज आहे, असे सांगत त्यांचा धंदा नियमित करण्यासाठी राज्य सरकारने तकलादू नियमांची चौकट तयार केली आहे. त्यांना अधिकृत करून घ्यायचे असे पद्‍धतशीर षड्यंत्र रचले आहे,’ अशी टीका रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेला पेटवले; आठजणांविरोधात गुन्हा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून खून केल्याची घटना निगडीतील ओटास्कीम झोपडपट्टी येथील स्मशान भूमीजवळ घडली. या प्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुबिना सगीर बागवान (वय ३०, रा. निगडी) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती सगीर मुन्सीरजा बागवान, सासरे मुन्सीरजा बागवान, सासू नजबून मुन्सीरजा बागवान, नणंद रिजवान बागवान, शबनम बागवान, दीर मुन्ना बागवान, पप्पू बागवान, गुड्डू बागवान यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुबिनाची आई मदिना ताहीरअली राईन (वय ४५, रा. नवी मुंबई) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रुबिनाचा पती सगीर याचे एका बंगाली महिलेसमोर अनैतिक प्रेमसंबंध होते. तो रुबिनाला वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण करत होता. तसेच, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होता. नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून १४ ऑक्टोबर रोजी पतीसह कुटुंबातील सदस्यांनी राहत्या घरात तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये गंभीर भाजलेल्या रुबिनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रुबिनाच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पतीसह सासरच्या मंडळींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेनं तोडपाणी केली की काय?: अजित पवार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनावरून निर्माण झालेला वाद सध्यातरी मिटला असला तरी, त्यावरून राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला शाब्दिक 'खळ्ळ्खट्याक' थांबणं 'मुश्किल' झालं आहे. मनसेने या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत तोडपाणी केली की काय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केला. पवारांनी केलेल्या आरोपांना ठाकरे कसं उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिनेमाच्या निर्मात्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत लष्कर निधीसाठी ५ कोटी रुपये देण्याच्या अटीवर ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात परवानगी देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. आता पवार यांनीही पिंपरी - चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मनसेची भूमिका कधीच कायम राहिलेली नाही. पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात काम देणाऱ्या निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीला प्रत्येकी पाच कोटींचा निधी देण्याची राज ठाकरे यांची अट म्हणजे देशाची किंमत पाच कोटी झाली का, असा सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपाच्या मॅनेजरवर गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
देहूगावातील पेट्रेल पंपावर जमा झालेली रक्कम लुटण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी व्यवस्थापकावर गोळीबार केला. यामध्ये पेट्रोलपंप व्यवस्थापकाच्या पोटात एक गोळी लागली आहे. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

भीवसेन नथू कालेकर असे गंभीर जखमी झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालेकर हे देहूगावातील संत तुकाराम पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करतात. रोज दुपारी ते देहूगावातील एका बँकेत रक्कम जमा करण्यासाठी जातात. सोमवारी देखील ते नेमहीप्रमाणे या वेळी बँकेत आले होते. परंतु, या वेळी त्यांच्या दुचाकीच्या डिकीत नेहमीप्रमाणे रोकड नव्हती. मात्र, बँकेजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी कालेकर यांच्यावर गोळीबार केला. तसेच त्यांची दुचाकी पळवून नेली.

हल्लेखोरांनी या वेळी स्वतःची दुचाकी तेथेच सोडून दिली. ही दुचाकी चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनास्थळी मिरचीपूड देखील आढळून आली आहे. सध्या कालेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या बारा दिवसांपासून देहूरोड विभागीय पोलिस अधिकारी (उपाधीक्षक) पद रिक्त आहे. याच दरम्यान तळेगाव दाभाडे येथे सचिन शेळके यांचा आणि पौड येथे अन्य एकाचा खून झाला आहे. तसेच देहूरोड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे मेट्रोचा निर्णय पुढील महिन्यातच?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेची मोहोर दिवाळीपूर्वी उमटण्याची शक्यता आचारसंहितेमुळे जवळपास मावळली आहे. मेट्रोच्या माध्यमातून पुणेकरांना दिवाळी भेट देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असला, तरी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत त्यासाठी ताटकळत राहावे लागणार आहे.

केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) १४ ऑक्टोबरला मेट्रोला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर, दिवाळीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचा प्रस्ताव सादर होण्याचे संकेत दिले जात होते. येत्या आठवड्यात दिवाळी सुरू होत असून, त्यापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रोवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा होती. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने केंद्र सरकारलाही पुण्याची संबंधित निर्णय जाहीर करण्यावर बंधने आली आहेत. नगरविकास मंत्रालयाकडून पुणे मेट्रो संदर्भातील प्रस्तावाची सर्व तांत्रिकता पूर्ण करून घेण्यात येत असली, तरी सरकारला निर्णय घेता येणार नाही, अशी शक्यता आहे.

विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता १९ नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. त्यामुळे, पुणे मेट्रोचा प्रस्ताव त्यानंतरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाऊ शकतो. नोव्हेंबरमध्ये मेट्रो प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी डिसेंबरमध्ये मेट्रोचे भूमिपूजन केले जाऊ शकते, अशी शक्यता आहे. नागपूर मेट्रोप्रमाणेच पुण्याच्या मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेत्रीच्या नावाने फेसबुकवर अकाउंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फेसबुकवर बनावट अंकाउंट काढून ते बंद करण्यासाठी मराठी अभिनेत्रीला खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आला आहे. ‘सायबर सेल’च्या पोलिसांनी तपास केल्यानंतर नाशिक येथील तरुणाने हा प्रकार केल्याचे समोर आले असून, या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नावेद लतीफ शेख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात २१ वर्षीय युवा अभिनेत्रीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अभिनेत्री बिबवेवाडी परिसरात राहण्यास आहे. ती चित्रपट व मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करते. तिचे फेसबुकवर अकाउंट आहे. १९ ऑक्टोबर रोजी तिला सुफियान अन्सारी या नावाने एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकारली. मात्र, त्यानंतर तिला ते अकाउंट बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने त्याला ब्लॉक करून टाकले. मात्र, दुसऱ्याच दिवशी तिच्याच नावाने असणाऱ्या बनावट अकाउंटवरून तिला अश्लील मेसेज आला. तसेच, तिच्या नातेवाइकांचे फोटो टाकल्याचे आढळून आले. ‘सुफियान अन्सारी या अकाउंटला का ब्लॉक केले. मी आणखी बनावट अकाउंट तयार करतो,’ असे सांगून सर्व नातेवाइकांचे नग्न फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडे मोबाइल क्रमांक मागण्यात आला. मात्र, अभिनेत्रीने त्याच्याकडेच मोबाइल क्रमांकाची मागणी केली. त्या वेळी त्याने मोबाइल क्रमांकवर एक जीबी थ्रीजीचा इंटरनेट पॅक मारण्यास सांगितले. पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यासच मी अंकाउंट बंद करीन, अशी धमकी दिली. घाबरून तिने इंटरनेटचे रिचार्ज केले. मात्र, तरीही दुसऱ्या दिवशी तिच्या नातेवाइकांचे फोटो फेसबुकवर शेअर करण्यात आले. त्यामुळे तिने सायबर सेलकडे तक्रार दिली. सायबर सेलने तपास केला असता हा प्रकार नाशिक येथून होत असल्याचे समोर आले. आरोपी नावेद शेख याने बनावट अकाउंट तयार केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमएमसी’साठी ‘आयएमए’ रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील अॅलोपॅथीच्या डॉक्टरांवर वचक ठेवणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (एमएमसी) डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) रिंगणात उतरले आहे. नऊ जणांचे पॅनेल तयार करण्यात आले असून, यात पुण्यातून बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

‘एमएमसी’च्या निवडणुकीत नऊ जागांसाठी येत्या १८ डिसेंबरला निवडणुका होणार आहेत. एकूण १८ जागा आहेत. त्यापैकी उर्वरीत नऊ जागा या राज्य सरकारकडून नियुक्त केल्या जाणार आहेत. आयएमएच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांच्यासह डॉ. मंगेश गुळवडे, डॉ. संजय कदम, डॉ. अनिल लद्दड, डॉ. अर्चना पाटे, डॉ. निसार शेख, डॉ. अशोक तांबे, डॉ. शिवकुमार उत्तुरे यांचा पॅनेलमध्ये समावेश आहे. डॉ. सारडा पुण्यातून प्रतिनिधित्व करीत असून, ते पुण्यासह राज्य आयएमएच्या शाखेचे माजी अध्यक्ष होते. यासंदर्भात ‘आयएमए’ने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे.

यापूर्वी २००९ साली एमएमसीच्या निवडणुका झाल्या होत्या. परंतु, राज्य सरकारने उर्वरीत नऊ जागांवर सदस्यांची नियुक्ती करण्यास विलंब केला होता. त्यात दोन वर्षांचा काळ गेला. अखेर ‘आयएमए’ने हायकोर्टाची पायरी चढली आणि कोर्टाने सरकारला फटकारले. त्या वेळी नऊ जणांची नियुक्ती केली. त्यामुळे २०११ पासून राज्यात एमएमसीचा कारभार सुरू झाला. तत्कालीन माजी अध्यक्ष डॉ. किशोर तावरी यांची कारकीर्द पूर्ण झाली. तरीही नव्याने निवडणुका घेण्याची अधिसूचना सरकारकडून काढण्यात येत होती. अखेर कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर निवडणुका जाहीर करण्यात आल्या.

‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीसाठी आयएमएचे पॅनेल रिंगणात उतरले आहे. आयएमएचे राज्यात ८४ हजार मतदार असून ३८ हजार अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी आयएमकडे नोंदणी केली आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे गेल्या वीस वर्षात सुमारे तेराशे खटले प्रलंबित होते. त्यापैकी केवळ दोन टक्के डॉक्टरांना शिक्षा ठोठावण्यात आली. तर ४९४ खटले निकाली निघाले आहेत. आतापर्यंत एमएमसीच्या माध्यमातून आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी, नूतनीकरण तसेच सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे,’ असे एमएमसीच्या निवडणुकीचे उमेदवार डॉ. दिलीप सारडा यांनी सांगितले.

‘बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम’

‘आयएमएच्या विविध शाखांना एमएमसी ‘क्रेडिट अवर्स’साठी सीएमई आयोजित करण्याची परवानगी, बोगस तसेच कट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात आम्ही मोहीम सुरू केली आहे,’ अशी माहिती डॉ. दिलीप सारडा यांनी दिली. या वेळी पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी, डॉ. जयंत नवरंगे, माजी अध्यक्ष डॉ. अरुण हळबे, डॉ. राजकुमार शहा, डॉ. बी. एल. देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस-वेवरील अपघातांत दोन ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पुणे मुंबई एक्स्प्रेस-वेवर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. एका बालिकेचा मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका रविवारी रात्री अकराच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ दुभाजकावर आदळल्याने रुग्णवाहिका चालकाचा जागीच मृत्यू झाला; तर बर्फाची वाहतूक करणारा ट्रक हा सोमवारी पहाटे पाच वाजता आडोशी बोगद्याजवळ डोंगराच्या दगडवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले.

सुरेश शिवाजी गायकवाड (वय २५, रा. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे, तर बर्फाच्या ट्रकच्या अपघातात भगवान किसन मगर (वय २१, रा. पारनेर, अहमदनगर) याचा मृत्यू झाला. जखमींमध्ये ट्रकचालक राजू भाऊ थोरात (वय ३८), संतोष लक्ष्मण बोराडे (वय ३१), अशोक संपत सरडे (वय २२), अमोल संपत सरडे (वय ३१, सर्व रा. पारनेर, अहमदनगर) यांचा समावेश आहे.

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून येथे उपचार घेणाऱ्या मुंबईतील अंधेरी येथील भूमीता गोविंद जाधव (वय ६) हिचा रविवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. भूमीताचे पार्थिव पुण्यावरून मुंबईला घेऊन रुग्णवाहिका जात होती. खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ हलक्या व अवजड वाहनांसाठी दोन वेगवेगळ्या मार्गिका आहे. पुण्याहून मुंबईला जाताना तीव्र उतार आणि वळणांमुळे येथे वाहनांची फसगत होते. रविवारी रात्री या रुग्णवाहिकेच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका येथील दोन्ही मार्गिकांतील दुभाजकावर आदळली. त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक तांबीटकर, अल्ताफ पठाण, पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. या घटनेमुळे काहीकाळ वाहतूक विस्कळित झाली होती. पोलिसांनी भूमीताचा मृतदेह दुसऱ्या एका रुग्णवाहिकेतून मुंबईला पाठविला.

दुसरा अपघात खंडाळा (बोरघाट) घाटातील आडोशी बोगद्याच्या तोंडाजवळ असलेल्या डोंगराच्या दगडावर ट्रक आदळून झाला. चालकाचे येथील तीव्र उतारामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक दगडावर जोरात आदळला. ही धडक इतकी भीषण होते की, ट्रकमधील बर्फाच्या सर्व लाद्या आदळल्याने ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला. या दुर्घटनेत पाच जण ट्रकबाहेर फेकले गेले, तर एकाचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती कळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक तुकारम जोशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन देवदूत या आपत्कालीन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जखमीना उपचारांसाठी पनवेल येथील रुग्णालयात दाखले केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकार असंवेदनशील

$
0
0

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘राज्य सरकारच्या स्थापनेला येत्या ३१ ऑक्टोबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करायचे झाल्यास हे सरकार असंवेदनशील असल्याचे आणि नागरिकांची स्वप्ने पूर्ण करण्यात फोल ठरले आहे,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मते पवार यांनी जाणून घेतली. त्या दरम्यान पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापौर शकुंतला धराडे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर आझमभाई पानसरे, योगेश बहल या वेळी उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर पवार यांनी शहरातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.

‘राज्य सरकारने स्वतःची कौतुकाने कितीही पाठ थोपटवून घेतली, तरी त्यांची दोन वर्षांची कारकिर्द फोल ठरली आहे, असा आरोप करून पवार म्हणाले, या दोन वर्षांत कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आले आहे. शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन फोल ठरले आहे. राज्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. शिक्षक, बळीराजा समाधानी नाहीत. ‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’च्या गप्पा फोल ठरल्या आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. राज्यात अनेक मोर्चे निघत आहेत. समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. परंतु, त्यात सरकार लक्ष घालत नाही. सहनशीलतेचा अंत पाहत आहे. सरकारला अस्वस्थता दिसत नाही का,’ असा सवाल पवार यांनी केला.

पुण्यातील मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरीऐवजी निगडीपर्यंत असावा, असा आमचा आग्रह होता. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले. याउलट सरकारमधील मतभेदामुळेच मेट्रोला विलंब होत असल्याची टीकाही पवार यांनी केली. निवडणुका जवळ आल्यावर घोषणा करायच्या. भूमिपूजनाचा नारळ फोडायचा, एवढेच सरकारचे काम दिसते, असे नमूद करून पवार यांनी खेड येथे विमानतळ झाले असते, तर पिंपरी-चिंचवडला फायदा झाला असता, अशी टिपण्णी केली. ‘अॅट्रॉसिटी कायदा रद्द न करता त्याचा गैरवापर थांबवावा आणि निरपराध व्यक्तींना त्रास होऊ नये. सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता अन्य समाजाला आरक्षण मिळावे,’ असे मुद्देही पवार यांनी उपस्थित केले.

मनसेचे ‘तोडपाणी’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका कधीच कायम राहिलेली नाही. टोल नाक्याच्या सर्वेक्षणानंतर तोडपाणी झाले की काय? अशी शंका येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात काम देणाऱ्या निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीला प्रत्येकी पाच कोटींचा निधी देण्याची राज ठाकरे यांची अट म्हणजे देशाची किंमत पाच कोटी झाली का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

दादांची दिलगिरी

महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि टीडीआर प्रकरणाविषयी अजित पवार यांनी वक्तव्य केले होते. परंतु, जगताप यांच्या वडिलांचे निधन झाले असताना आणि ते दुःखात असताना पवार यांनी वक्तव्य करणे चुकीचे असल्याची टीका भाजपने केली होती. त्याबाबत पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विश्वकर्मा’च्या विद्यार्थ्यांची परीक्षा नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विश्वकर्मा क्रिएटिव्ह आय कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबर २०१५पासून परीक्षाच झाली नसल्याने सुमारे २०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लक्ष घालावे, तसेच ‘कर्नाटक ओपन स्टेट युनिव्हर्सिटी’ने (केएसओयू) तत्काळ परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी कॉलेजमध्ये जोरदार निदर्शने केली.

कॉलेजमध्ये ‘केएसओयू’च्या सहकार्याने फाइन आर्ट् स, डिझाइन आणि मीडिया या शाखांमध्ये पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असे अभ्यासक्रम २०१४पासून सुरू आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून सेमिस्टर परीक्षा वेळेवर घेणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठाकडून शेवटची परीक्षा ऑक्टोबर २०१५मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत परीक्षाच झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले असून आणखी काही वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे.

कॉलेज प्रशासनाने २०१४मध्ये विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ‘केएसओयू’सोबत करार केला. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘केएसओयू’ला जून २०१५पासून कर्नाटक राज्याबाहेर परीक्षा घेण्यास, तसेच नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे. तयानुसार कॉलेज प्रशासनाने जुलै २०१५पासून नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले नाही. मात्र, ‘केएसओयू’ विद्यापीठाने जुन्या विद्यार्थ्यांची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेणे अपेक्षित असताना विद्यापीठाने ऑक्टोबर २०१५नंतर परीक्षाच घेतली नाही. त्यामुळे कॉलेजच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी दोन सेमिस्टरची परीक्षाच दिली नाही. त्यामुळे तत्काळ परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.

विद्यापीठाने परीक्षा घ्यावी यासाठी कॉलेज प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परीक्षा घेण्यासंदर्भात योग्य ती मदत करण्याची तयारी दर्शविली. मात्र, विद्यापीठाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने कॉलेज प्रशासनाच्या बाजूने निर्णय देऊन विद्यापीठाला परीक्षा घेण्याचा आदेश दिला. त्यानंतरही विद्यापीठाने परीक्षा घेतलेली नाही, असे कॉलेजचे डॉ. अवधूत अत्रे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकाराबाबत लवकर निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांच्या वतीने मुंबई आणि कर्नाटक उच्च न्ययालयात जनहीत याचिका दाखल करण्यात येईल, असे ‘व्हिआयआयटी’चे व्यवस्थापकीय विश्वस्त भरत अग्रवाल यांनी सांगितले.

जावडेकरांची भेट घेणार

‘केएसओयू’ विद्यापीठ विद्यार्थ्यांची परीक्षा घेत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जावडेकर यांच्याकडे केली. मात्र, त्याच्याकडून मिळाला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत जावडेकर यांची भेट घेणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलेचा आस्वाद घेणाऱ्यानेही श्रम घ्यावेत’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘कलाविषयक भाषा परिचयाची नाही म्हणून कळत नाही. कळत नाही म्हणून कलाविषयक लेखन वाचले जात नाही. कलानिर्मिती करणाऱ्या कलाकाराबरोबरच त्या कलेचा आस्वाद घेणाऱ्यानेही श्रम घेणे अपेक्षित असते. कला समजून घेण्यासाठी आस्वादकाला श्रम घ्यावे लागतात,’ असे मत प्रसिद्ध चित्रकार-लेखिका माधुरी पुरंदरे यांनी व्यक्त केले. ‘विशिष्ट प्रकारची भाषा असल्याखेरीज विषय समजत नाही हे आम्हाला कळलेच नाही. आम्हाला सगळे अगदी सोपे, सुटसुटीत हवे असते,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.
चित्रकला आणि कलेवरील लेखन या विषयांबाबत कुतूहल असणाऱ्यांसाठी आयोजित एका अनोख्या उपक्रमात त्या बोलत होत्या. के. जी. सुब्रमण्यम यांच्या ‘द क्रिएटिव्ह सर्किट’चा अनुवाद करणारे अभिजित रणदिवे, प्रसिद्ध चित्रकार संजीव खांडेकर आणि ज्येष्ठ चित्रकार रावबहाद्दूर धुरंदर यांच्या चित्रशैलीच्या अभ्यासक प्रा. शुक्ला सावंत यांचा यामध्ये सहभाग होता. चर्चेचे सूत्रसंचालन कलासमीक्षक अभिजित ताम्हाणे यांनी केले.
‘कलाविषयक चिंतन ऐकण्याची आपल्याला सवय नाही. त्यामुळेच कलाविषयक संज्ञा-संकल्पनांची उकल करणारी भाषा विकसित होऊ शकली नाही. नाटक आणि संगीत याबाबत थोडे तरी घडले. दृश्यकला मात्र त्यापासून अनभिज्ञच राहिली,’ याकडे पुरंदरे यांनी लक्ष वेधले.
रणदिवे म्हणाले, ‘कलाविषयक लेखनाचे भाषांतर करताना संज्ञांच्या पातळीवर झुंजावे लागते. काही शब्दांना मराठी प्रतिशब्द नसतात. असलेच तर ते प्रचलित नसतात. अशा वेळी भाषांतर करताना काही ठिकाणी तळटीप द्यावी लागली. तर, काही ठिकाणी मराठी शब्द समजावा यासाठी कंसात इंग्रजी शब्द वापरावा लागतो.'
‘कलाकाराच्या दृश्य भाषेची ‘लँग्वेज’ होते. भाषा म्हणजे संस्कृती असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. काही गोष्टी अबाधित असतात. काळेशार पाणी, अंधार यावर कोणी मालकी सांगणार असेल तर नव्या जगाची भाषा आणि संस्कृती अभिव्यक्त कशी होणार,’ असा प्रश्न खांडेकर यांनी उपस्थित केला. सावंत यांनी आपल्या मनोगतातून धुरंदर यांच्या चित्रशैलीवर प्रकाश टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रभागरचनेवर हरकती देण्याचा अखेरचा दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रा-रूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्याचा उद्या (मंगळवारी) २५ ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील नागरिकांना यावर हरकती घेता येणार आहेत. दरम्यान, सोमवारी प्रा-रूप प्रभाग रचनेबाबत तब्बल १८० हरकती नोंदविण्यात आल्याने नोंदविण्यात आलेल्या हरकतींची संख्या ३२० झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने प्रा-रूप प्रभागरचना केली आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाने पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑक्टोबरला ही रचना जाहीर केली. यावर हरकती, सूचना नोंदविण्यासाठी आयोगाने २५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक नागरिकांनी याबाबत हरकती नोंदविल्या असल्याचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. मंगळवारी ही मुदत संपत असून दुपारी तीन वाजेपर्यंत हरकत नोंदविता येणार आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्वागत कक्षासह महापालिकेची पंधरा क्षेत्रीय कार्यालयात हरकती नोंदविता येणार आहेत.
निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेत पालिका प्रशासनाने अनेक ठिकाणी नैसर्गिक नदी-नाले, प्रमुख रस्ते अशा हद्दी ओलांडल्या आहेत. विनाकारण प्रभागाच्या हद्दी तोडल्या आहेत. आरक्षणामध्ये बदल केला आहे. सर्वसाधारण पालिकेकडे आलेल्या हरकतींमध्ये ८० टक्के हरकती या प्रभागरचनेत बदल केल्याच्या असून उर्वरित २० टक्के हरकती या आरक्षण तसेच प्रभागांची नावे बदलण्याबाबत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पालिकेकडे आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी आयोग अ‌धिकारी नियुक्त करणार असून या अधिकाऱ्यासमोर प्रत्येक हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे. चार ते सात नोव्हेंबर या दरम्यान ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीमध्ये नागरिकाने नोंदविलेली हरकत, त्यावर आयोगाच्या अधिकाऱ्याने नोंदविलेले मत आणि पालिका प्रशासनाचे त्यावरील म्हणणे अशी संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. त्यानंतर काय बदल करायचा याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

प्रभागाचे नाव बदला
पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रशासनाने प्रभाग क्रमांक १४ ला डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनी असे नाव दिले आहे. यातील मॉडेल कॉलनीचे नाव बदलून ‘वडारवाडी’ असे नाव करावे, अशी सूचना उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी केली आहे. तर प्रभाग क्रमांक ३६ लोअर इंदिरानगरचे नाव बदलून त्याला शंकर महाराज मठ नाव द्यावे, अशी मागणी राजेंद्र शिळीमकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​अधिव्याख्यात्याचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

पुणे : प्रलंबित मागणी पूर्ण होत नसल्याच्या कारणाने अधिव्याख्यात्याने सोमवारी दुपारी उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयातच किटकनाशकाच्या साह्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. ऐन वेळी आलेल्या कार्यालयातील अधिकारी व पोलिसांनी त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. विजय पांडुरंग नारखेडे (वय ५०, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली असून अधिव्याख्याता डॉ. माधव दगडू पगारे (वय ५८, रा. लोणी, जि. नगर) बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पगारे हे प्रवरानगर ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. ते १५ जून १९९२ पासून कार्यरत असल्याने तेव्हापासूनचे सर्व सेवा लाभ मिळावेत, अशी त्यांची मागणी होती. मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास कार्यालयात येऊन किटकनाशक पिण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील अधिकारी व पोलिसांनी हस्तक्षेप करून डॉ. पगारे यांच्या हातातील किटकनाशक ताब्यात घेऊन त्यांना ते पिण्यापासून रोखले. अधिकारी व पोलिसांनी डॉ. पगारे यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुन्हा आत्महत्या करण्याची धमकी दिली.
‘डॉ. पगारे यांना नियमानुसार सेवा लाभ तसेच २००९ मध्ये पीएचडी झाल्यानंतर मिळणारे लाभ मिळत आहेत. त्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही,’ असे स्पष्टीकरण नारखेडे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​लेखिका मंगला बर्वे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अन्नपूर्णा या पाकशास्त्रावरील लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला अच्युत बर्वे (वय ८९) यांचे रविवारी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुली, जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या ‘अन्नपूर्णा’ पुस्तकाची सध्या ७७ वी आवृत्ती बाजारात आहे. या बरोबरच ‘मांसाहारी इच्छाभोजन’, ‘चायनीज पदार्थ’, ‘डोहाळे-बारसे’, ‘रुखवताचे पदार्थ’, ‘छंद लोकरीच्या विणकामाचा’, यासह अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लेक्स, बॅनर, पोस्टरवर अखेर कारवाई सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी निवडणुकीची प्रा-रूप प्रभागरचना जाहीर झाल्यापासून शहरात जागोजागी लागलेल्या राजकीय मंडळींच्या फ्लेक्स, बॅनर, पोस्टरवर अखेर पुणे महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चौका-चौकांत लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई केली जात असून, गेल्या दहा दिवसांत सुमारे साडेतेरा हजार फ्लेक्स काढण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला.
विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता गेल्या आठवड्याता लागू झाली. तत्पूर्वीच, राजकीय पक्षांच्या फ्लेक्स/बॅनर आणि झेंड्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिल्या होत्या. अतिक्रमण कारवाईप्रमाणेच सूचना देऊनही बोर्ड-बॅनर पुन्हा आढळून आले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून फलक-बॅनर काढण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असून, अनधिकृतरीत्या लावण्यात आलेल्या सर्व स्वरूपाच्या बॅनर/पोस्टर/झेंडे यावर कारवाई केली जात आहे.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनुसार दररोज ही कारवाई केली जात आहे. त्यासाठी, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असून, गेल्या आठवड्यात आचारसंहिता लागू झालेल्या दिवशी रात्रीपर्यंत ही मोहीम सुरू होती. गेल्या १० दिवसांमध्ये विविध राजकीय पक्षांचे १३ हजार ५५७ फलक काढून टाकण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी दिली.
महिन्याच्या सुरुवातीला प्रा-रूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांतील इच्छुकांनी फ्लेक्स/बॅनर लावण्याचा सपाटाच लावला होता. विशेषतः आपल्या प्रभागात नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील संभाव्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले होते. संपूर्ण शहरात कमी-अधिक स्वरूपात हीच परिस्थिती होती. अखेर, आचारसंहितेमुळे तरी महापालिकेला त्यावर कारवाई करण्याचा मुहूर्त सापडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नोकरीच्या आमिषाने ४९ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परदेशात नोकरी लावून देतो, असे सांगून ३९ जणांची ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी विजय विठ्ठल भारती (वय ४२, रा. खेडशिवापूर, ता. हवेली), नवनाथ विठ्ठलराव डिंबळे (४२ रा. शिवरे, भोर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी मयूर वासुदेव घोलप ( वय २९ रा. धनकवडी) याला अटक करण्यात आली आहे. तर महंमद सुलतान महमद दिलावर कुरवले, आसमा महमंद सुलतान कुरवले, महमद नावेद महमद दिलावर कुरवले, भावेन पटेल, सुषमा सुतार यांचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी मोहन विष्णू देठे ( ३०, रा. सोलपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
ग्लोबल स्टार मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीतर्फे परदेशी नोकरी लावण्याची माहिती ‘जस्ट डायल’वरून मिळवून फिर्यादीला परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखविण्यात आले. परदेशात वेळोवेळी ​जाण्यासाठी चार लाख ८० हजार रुपये घेण्यात आले. फिर्यादी सारखेच ३९ जणांना नोकरीला लावतो असे आमिष दाखविण्यात आले. त्यांच्याकडून ४९ लाख ६,५०० रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अटक आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images