Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खुल्या प्रवर्गाला फायदा

0
0

‘ईबीसी’ योजनांमध्ये सकारात्मक बदल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्थिकदृष्ट्या मागास गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी कौटुंबिक वार्षिक उत्त्पन्नाची वाढलेली मर्यादा विद्यार्थ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. यापूर्वी केवळ उत्पन्नाच्या अटीमध्ये बसत नसल्याने, मात्र वाढत्या महागाईच्या काळात उच्चशिक्षण घेणे अवघड बनलेल्या, तसेच खुल्या प्रवर्गातील कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना या बदलांचा खऱ्या अर्थाने उपयोग करून घेणे शक्य होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना जाहीर करून आर्थिकदृष्ट्या मागास गटातील (ईबीसी) विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांमध्ये सकारात्मक बदल केले. उत्त्पन्नाची यापूर्वीची अट एक लाखावरून आता अडीच लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, अडीच लाखांहून अधिक आणि सहा लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्त्पन्न असलेल्या पालकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही ‘ईबीसी’ सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला बारावीला किमान ६० टक्के गुण आवश्यक करण्यात आले आहे. ‘ईबीसी’ सवलतीच्या आधारे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कातील निम्मे शुल्क राज्य सरकार प्रतिपूर्तीच्या आधारे देणार आहे.
राज्य बोर्डाच्या यंदाच्या बारावीच्या निकालानुसार, यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यापैकी ४७.१७ टक्के विद्यार्थी हे ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे आहेत. या विद्यार्थ्यांची राज्यभरातील एकत्रित संख्या पाच लाखांवर आहे. गेल्या काही वर्षांमधील बोर्डाच्या निकालांचा विचार करता ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांमधून उत्त्पन्नाची मर्यादा सहा लाखांपर्यंत येणाऱ्या, तसेच खुल्या गटातून मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना या बदलांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे या पुढील काळात राज्यभरातून लाखो विद्यार्थी या मर्यादेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अट्टल साखळीचोर ओ​डिशांत गजांआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहरात ५९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केलेल्या मम्मू उर्फ महंमदअली अजीज इराणी उर्फ जाफरी (वय २८, मूळ रा. लोणी काळभोर) याला ओडिशा येथे अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.
पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांना जाफरी ओडिशा येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाईकवाडी आणि त्यांचे सहकारी ओडिशात दाखल झाले. त्यावेळी जाफरी नवापाडा जिल्ह्यात दडलेला असल्याचे समजले. ठिकाण सापडल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दीडशे किलोमीटर पाठलाग केल्यानंतर एका रेल्वे स्टेशनच्या आवारात त्याला ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
जाफरीला पुण्यात आणल्यानंतर त्याने नव्याने केलेल्या ११ गुन्ह्यांची माहिती दिली. त्यानुसार त्याच्याकडून सात लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जाफरीचा साथीदार इम्रान फिरोज इराणी फरारी असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. जाफरीने इम्रान आणि अली अक्रम इराणी यांच्या मदतीने शहरात अनेक गुन्हे केले आहेत. अली इराणीला गेल्या महिन्यांत गजांआड करण्यात आले आहे, असेही भोसले म्हणाले.
जाफरी ओडिशातील नवापाडा जिल्ह्यातील करिया रोड येथे वास्तव्यास होता. ही माहिती नाईकवाडी यांना मिळाली होती. नाईकवाडी यांच्यासह पोलिस हवालदार राजनारायण देशमुख, गणेश साळुंके, विठ्ठल बंडगर आणि कैलास साळुंके यांचे पथक ओडिशात दाखल झाले होते. ओडिशा येथील अधीक्षक संदीप संपत यांनी पुणे पोलिसांना मदत केली. वरिष्ठ निरीक्षक दिवाकर पेडगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वशिलेबाजीने केली कबड्डी खेळाडूंची निवड’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

सांगली येथे आयोजित ६४व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा महिला आणि पुरुषांचा अंतिम संघ नुकताच जाहीर करण्यात आला. संघ निवडताना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वशिलेबाजी केल्याचा आरोप करून खेळाडूंनी आंदोलनाद्वारे जाहीर निषेध व्यक्त केला. दरम्यान, असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही खेळाडूंनी केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीमधून संघाची निवड करण्यात आली. मात्र, निवड समितीने निवडलेल्या खेळाडूंऐवजी आयत्या वेळेस अन्य खेळाडूंचा समावेश करून गुणी कबड्डीपटूंवर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप संतप्त खेळाडूंनी केला. कबड्डीपट्टू प्रवीण नेवाळे यांच्यासह अनेक खेळाडूंनी बाबूराव चांदेरे यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. ‘ज्या खेळाडूंची निवड करण्यात आली होती; त्यांची नावे बदलून ऐनवेळी दुसऱ्या खेळाडूंची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी हा प्रकार केला आहे,’ असे नेवाळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुंगरं बांधली की अपमान चालून येतो...

0
0

लावणीसम्राज्ञी छाया खुटेगावकर यांच्या भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पायात घुंगरं बांधली की अपमान चालूनच येतो. अनेकवेळा अपमानित होऊनही केवळ कलेपायी सहन करावे लागले. कधी कधी तर भरल्या मैफलीतून बाहेर पडावे लागले. पण, कलेच्या प्रेमापोटी सगळे घाव सहन केले. आयुष्यात नृत्यापेक्षा अधिक कोणत्याही गोष्टीला महत्त्व दिले नाही,’ या शब्दांत लावणीसम्राज्ञी छाया खुटेगावकर यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

रसिकांकडून लावणीसम्राज्ञी अशी पावती मिळवलेल्या छाया आणि माया खुटेगावकर यांना संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. त्यानिमित्त वेदवंती आणि कोथरूड नाट्यपरिषदेतर्फे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्या हस्ते दोन्ही भगिनींचा सत्कार करण्यात आला. कोथरूड नाट्यपरिषदेचे सुनील महाजन, शशिकांत कोठावळे या वेळी उपस्थित होते. मराठवाड्यातील खुटेगावाहून आलेल्या या दोघींनी रसिकांनी यशाच्या शिखरावर पोहोचवले, असे सांगून यशाचे श्रेय पुणेकरांना बहाल केले.

‘कष्ट, मेहनत केल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. लावणी सुरू करण्याआधी कथकचे धडे घेतले. अनेकदा भरल्या रंगमंचावर अपमान पदरी आला; पण खचून न जाता पुढे वाटचाल करीत राहिले. पारंपरिक लावणीवर अधिक भर दिला. नृत्य आणि कला यांशिवाय कशाचाच विचार केला नाही. सध्याच्या कलावंतांनीही ही परंपरा अशीच पुढे चालवून पारंपरिक लावणीला जिवंत ठेवणे आवश्यक आहे,’ असे मत छाया खुटेगावकर यांनी व्यक्त केले.

‘सगळ्यांनाच दुःखातून मोठेपण मिळते; दुःख सोसत नाही तो कलाकार कसला..पदरी आलेल्या अपमानातून पुढे जायचे असते. संगीतनाट्य अकादमीचा पुरस्कार मिळवून खुटेगावकर भगिनींनी एक वेगळी उंची गाठली आहे,’ या शब्दांत श्रीमती गांधी यांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सादर झालेल्या ठसकेबाज लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. छाया आणि माया खुटेगावकर यांनी सादर केलेल्या लावण्यांनी प्रेक्षागृह डोक्यावर घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'ही महाराष्ट्राच्या अध:पतनाची सुरुवात'

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'महाराष्ट्रात एका-एका समाजाचे मोर्चे निघत आहेत. ही लोकशाही आहे का? सर्व क्रांतिकारकांनी यासाठी लढा दिला का? पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यासाठी लोकशाही आणली का? सुधारकांचे विचार दूर सारल्याने महाराष्ट्राच्या अध:पतनाला सुरुवात झाली', असं भाष्य अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी राज्यातील विद्यमान परिस्थितीवर केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

'प्रामाणिक विचारस्वातंत्र्यावर गदा येते ती हुकूमशाहीची सुरुवात असते. सर्व मानवी मूल्यांच्या अंताची शेवटची पातळी म्हणजे हुकूमशाही असते. महाराष्ट्रात बोलायचे स्वातंत्र्य नाही. जगातील कोणत्याही स्त्रीवरील बलात्कार हा मानवी मूल्यांवरील घालाच असतो, असं मुणगेकर म्हणाले.

'सरकारची भूमिका काय हे कळत नाही. चुकीचे सांगायला वैचारिक ताकद हवी. देशात वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे. मोर्चे आणि सरकारची भूमिका या बद्दल संभ्रम आहे. गेल्या दोन-चार वर्षातच हे मूलभूत प्रश्न का निर्माण झाले?', असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

'तत्वाशी तडजोड केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. समाजाला आवडते ते करावे लागते. त्यातूनच विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतो', असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, मारवाडी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीनिमित्त विशेष प्रदर्शन

0
0

मटा कल्चर क्लब आणि स्माइलचा संयुक्त उपक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिवाळी म्हटले, की आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यासाठी होणारी खरेदी हा एक सोहळा असतो. आपण देणारी भेट इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक असावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र, ती बजेटमध्येही असावी; कारण अशा वस्तू बऱ्याच खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे बजेटमध्ये गिफ्ट खरेदी करण्याची संधी ‘महाराष्ट्र टाइम्स’चा ‘कल्चर क्लब’ आणि ‘स्माइल’ यांच्या संयुक्त विद्यमाने मिळणार आहे.
दिवाळीनिमित्त खास येत्या १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पणत्या, आकाशकंदील, फराळ या गोष्टी विक्रीकरिता ठेवल्या आहेत. तसंच, ज्यूट, खण आणि वारली पेंटिगपासून बनवलेले फोल्डर, विविध बॅग, पर्स आणि गिफ्ट आर्टिकल्सही उपलब्ध करण्यात येणार आहेत. विश्रामबाग वाडामध्ये सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
स्मृती महिला मंडळ आणि पुणे महानगरपालिका याच्या तर्फे ‘स्माइल’ हे विक्री केंद्र गेल्या १५ वर्षांपासून लोकमान्य नगर, कात्रज आणि विश्रामबाग वाडा येथे सुरू आहे. या निमित्ताने महिला आणि अपंगांनी तयार केलेल्या वस्तूंना भरपूर मागणी मिळते. ‘स्माइल’च्या अध्यक्षा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचा आयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा असतो.
...
पुणेकरांना उत्सवी भेट
नाट्य, नृत्य, गाणं, कार्यशाळा, कलाकारांशी भेट अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लबचे सभासद होताना पुणेकरांना खास उत्सवी भेट मिळणार आहे. एरवी २९९ रुपयांत मिळणारे कल्चर क्लबचं सभासदत्त्व आता फक्त १९९ रुपयांत मिळणार आहे. ही भेट तुम्ही तुमच्या कलाप्रेमी मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि आप्तांनाही देऊ शकता. अधिक माहिती आणि सभासदत्त्वासाठी ९६५७०३२६०९ या क्रमांकावर संपर्क साधा. कल्चर क्लबच्या उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनेकांचा मनसे प्रवेश

0
0

बाळा नांदगावकर यांचा दावा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्याने पक्षाला कोणताही फरक पडणार नाही आणि फटका बसणार नाही. या पक्षातून त्या पक्षात जाणे, हे राजकारणात कायम चालते. भाजपची अनेक मंडळी आमच्या संपर्कात आहेत. अनेकांशी माझे बोलणे सुरू असून लवकरच त्यांचा मनसे प्रवेश झाल्याचे पाहायला मिळेल,’ असा दावा मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्याकडे सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा शेडगे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, शहराध्यक्ष हेमंत संभूस, महापालिकेतील गटनेते अॅड. किशोर शिंदे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, बाबू वागसकर, रुपाली पाटील आदी या वेळी उपस्थित होते. ‘कोणाला पक्ष सोडून इतर पक्षात जायचे असेल, त्यांनी खुशाल जावे. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाच्या वाट्याला चढ-उतार येतात. मनसे राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांचे मत विचारात घेतले जाणार आहे,’ असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
‘पुरंदर विमानतळाला मनसेचा विरोध नाही. मात्र, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गळ्याला सुरी लावून विकास करण्यास विरोध आहे. हे विमानतळ बागायत शेती क्षेत्रात न करता त्या ठिकाणी असलेल्या उद्योजकांच्या व राजकारण्यांच्या क्षेत्रात करावे,’ अशी मागणी जाधवराव यांनी केली.
.............
अशी आहे मनसेची भूमिका
- अद्याप कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा मानस नाही.
- पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणारच
- महादेव जानकर राज्याचे प्रतिनिधीत्व करतात. सार्वजनिक व्यासपीठावर जबाबदारीने बोलावे
- कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता, आर्थिक निकषावर आरक्षणास पाठींबा
- ईबीसीसाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकावी.
- जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी २४ ऑक्टोबरला लोणवळा येथे एकदिवशीय शिबीराचे आयोजन.
....................
पुणेकरांची माफी
‘काम करताना चुका होतातच. आमच्या पक्षाच्या नगरसेवकांकडून काम करताना, काही चुका झाल्या असल्यास पक्षाचा नेता म्हणून, मी पुणेकरांची माफी मागतो,’ असे म्हणून बाळा नांदगावकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी संधी द्यावी, असे आवाहन केले. ‘निवडणुकीत शहरातील वाहतूक कोंडी, कचऱ्याचा प्रश्न यासारखे विविध मुद्दे घेऊन आम्ही पुणेकरांच्या समोर जाणार आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रिया गदादे यांना कारणे दाखवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका प्रिया गदादे यांना मनसेने कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. पक्षाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहण्याबरोबरच पक्षाच्या विरोधात मतदान केल्याने तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, असे पत्र पालिकेतील पक्षाचे गटनेते किशोर शिंदे यांनी गदादे यांना दिले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५६ मधून गदादे या मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेला सर्व सभासनदांनी उपस्थित राहून पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे, असा ‘व्हीप’ पक्षाने सर्व नगरसेवकांना बजाविला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करून गदादे या पहिल्या सभेला अनुपस्थित राहिल्या. मतदानाच्या वेळेस पक्षाचा आदेश डावलून त्यांनी पक्षाच्या बाजूने मतदान केले नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाचे गटनेते शिंदे यांनी गदादे यांच्याकडून २४ तासात खुलासा मागविला असून, कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस बजाविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन गॅरिसन इंजिनिअरना अटक

0
0

लोहगाव येथे ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले
म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोहगाव येथील हवाई दलाच्या स्टेशनमध्ये केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मिलटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेच्या (एमईएस) दोन गॅरिसन इंजिनीअर्सना ९० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लोहगाव येथे शुक्रवारी ही कारवाई केली.
असिस्टंट गॅरिसन इंजिनीअर आर. बी. आहेर व ज्युनिअर इंजिनिअर मिनू गुप्ता अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिलटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (एमईएस) यांच्याकडून या इंजिनीअरची लोहगाव येथील हवाईदलात नियुक्ती करण्यात आली होती. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील हवाई दलाच्या स्टेशनमध्ये काही कामे करण्यात आली होती. त्यासाठी ठेकेदाराने सात लाख रुपयांचे बिल मंजुरीसाठी पाठविले होते. परंतु, हे बिल मंजूर करण्यासाठी आहेर व गुप्ता यांनी एक लाख १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्यांच्यात ९० हजार रुपयांवर तडजोड झाली. याबाबत संबंधित ठेकेदाराने सीबीआयकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी लोहगाव येथील कार्यालयात दोघांना ९० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईनंतर दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरांची व कार्यालयाची झडती घेण्याचे काम सुरू केले आहे, असे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! गँगस्टर घराच्या पार्किंगमधून चोरतात दुचाकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

घराच्या पार्किंगमधून चोरीला गेलेली दुचाकी अंडरवर्ल्ड डॉनच्या हस्तकांनी बिल्डरवर गोळीबार करण्यासाठी वापरली असल्याचे समोर आले आहे. या दुचाकीचा मालक संभाजीनगर, चिखली येथे राहत असून हा प्रकार समजल्यानंतर त्याला धक्काच बसला. दुचाकीचोरीची फिर्याद त्याने वेळीच पोलिसांत दिली होती, मात्र त्याचा शोध लागलेला नव्हता.

३० जूनला बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये संबंधित उच्चशिक्षित युवकाने आपली दुचाकी लावली होती. त्यानंतर काही वेळाने दुचाकी चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने तत्काळ याबाबत शहर पोलिसांकडे फिर्याद दिली. परंतु या दुचाकीचा काही शोध लागला नाही.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ठाणे येथील गुन्हे शाखेचे पथक संबंधित युवकाच्या घरी आले. खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दुचाकीची कागदपत्रे आणि चोरीच्या फिर्यादीची कॉपी पाहिल्यावर संबंधित युवकाला ११ जुलैला कल्याण-डोंबिवली येथे घडलेली घटना सांगितली. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याच्या हस्तकांनी खंडणी उकळण्यासाठी एका बिल्डरवर गोळीबार केला होता. त्या वेळी या लोकांनी संभाजीनगर येथून चोरलेल्या दुचाकीचा वापर केला होता.

दुचाकी नेमकी कोणी चोरली आणि ती थेट अंडरवर्ल्ड डॉनच्या हस्तकांकडे कशी पोहोचली, याचा शोध सध्या ठाणे पोलिसांची गुन्हे शाखा करीत आहे. औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधून दर दिवशी दुचाकी वाहनांची चोरी होते. मध्यंतरी तर इनोव्हा कारच्या चोरीचे सत्रच पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात सुरू होते. सध्या हे प्रकार थांबले असले, तरी दुचाकी चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही.

पिंपरी-चिंचवड परिसरातील नऊ पोलीस ठाणी, गुन्हे शाखा यांच्याकडूनदेखील या चोरीच्या वाहनांचा म्हणावा तसा तपास होताना दिसत नाही. सध्या चोरीला गेलेल्या आणि न सापडलेल्या दुचाकींचा आकडा हा शेकड्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचा खर्च ५४ टक्क्यांनी वाढला

0
0

८ हजार कोटींचा खर्च आता १२ हजार २९८ कोटी रुपये

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) सादर झाल्यापासून प्रत्यक्ष सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (पीआयबी) मान्यता मिळेपर्यंतच्या सात वर्षांच्या कालावधीत मेट्रोचा खर्च तब्बल ५४ टक्क्यांनी वाढला. राजकीय इच्छाशक्ती, स्वयंसेवी संस्थांची विरोधी मानसिकता आणि प्रशासनाची दिरंगाई अशा तिन्ही आघाड्यांवर विविध टप्प्यांत मेट्रो रखडत गेल्याने ८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्पाचा खर्च आता थेट १२ हजार कोटींच्या पुढे पोहोचला आहे.

पुणे महापालिकेने २००६मध्ये दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर करण्यास मंजुरी दिली. डीएमआरसीने २००९मध्ये महापालिकेला डीपीआर सादर केला. तेव्हा, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचा खर्च ७ हजार ९८४ कोटी होता. या खर्चामध्ये सुमारे पाच किमीचा भुयारी मार्ग आणि स्टेशन यांचाही समावेश होता. दुर्दैवाने, महापालिकेपासून ते राज्य सरकारपर्यंत अनेकांनी त्यासाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत. या सर्व कालावधीत तीन-चार वर्षे गेल्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (२०१४) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने तत्कालीन नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्यासमवेत मेट्रोची बैठक झाली. या बैठकीत मेट्रोला तत्त्वतः मान्यता देण्यात आली. त्या वेळी, मेट्रोचा खर्च दोन हजार कोटींनी वाढून १० हजार १८३ कोटी रुपयांवर पोहोचला होता.

राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी भुयारी मेट्रो व्हावी, असा आग्रह धरला. त्याला काही स्वयंसेवी संस्थांनीही पाठिंबा दिला. परिणामी, मेट्रोच्या पुढील प्रवासात अडथळे निर्माण झाले.

केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर नागपूर मेट्रोला मंजुरी देताना, पुणे मेट्रो साइडट्रॅकवर पडली. त्या वेळी, मेट्रोचा खर्च १० हजार ८६९ कोटी रुपयांवर पोहोचला होता. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या वादग्रस्त मार्गाविषयी निर्णय घेण्यासाठी समिती नेमली. या समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर होईपर्यंत पुन्हा मेट्रोचा खर्च वाढला. अनेक सोपस्कार पूर्ण करून पीआयबीच्या बैठकीत मान्यता मिळेपर्यंत मेट्रोचा खर्च आता १२ हजार २९८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे, भुयारी मार्गासह ८ हजार कोटी रुपयांत होणाऱ्या दोन मार्गिकांसाठी शहराला तब्बल साडेचार हजार रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, स्वयंसेवी संस्थांची टोकाची भूमिका आणि केंद्र-राज्याच्या प्रशासनाने दाखवलेली दिरंगाई, यामुळे मेट्रोच्या खर्चाचे आकडे वाढतच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

खर्चाचा फुगवटा

वर्ष ........... खर्च
२००९ .......... ७,९८४
२०१३ .......... १०,१८३
२०१४ .......... १०,८६९
२०१५ .......... ११,५२२
२०१६ .......... १२,२९८
(सर्व आकडे कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चेच्या फेऱ्यांतून अखेर सुटका

0
0

काम सुरू झाल्यावर किमान चार वर्षांत एक मार्ग सुरू होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि चर्चेच्या फेऱ्यांमधून अखेर ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पाची सुटका झाली असून, केंद्रीय स्तरावरील सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) मान्यतेचे स्टेशन मेट्रोने गाठले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर मेट्रोचे भूमिपूजनही येत्या वर्षअखेरपूर्वी होण्याची चिन्हे आहेत. मेट्रोचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर पहिला मार्ग खुला होण्यास किमान चार वर्षांचा अवधी लागू शकतो.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मेट्रो प्रकल्प ‘साइडट्रॅक’ झाला होता. पुण्यापेक्षा अनेक लहान-लहान शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पाला गती मिळत असताना, शहराची मेट्रो वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत होती. मेट्रोला होणाऱ्या दिरंगाईवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे द्वंद्व सुरू होते. अखेर, अडथळ्यांचे अनेक टप्पे पार करून केंद्र सरकारच्या ‘पीआयबी’च्या मान्यतेची मोहोर मेट्रो प्रकल्पावर उमटली. महापालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वी मेट्रोचा नारळ फोडण्याचे संकेत पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर डिसेंबरमध्ये मेट्रोचे भूमिपूजन केले जाण्याची दाट शक्यता आहे.

शहराच्या मेट्रो प्रकल्पात दोन मार्गिका असून, वनाज ते रामवाडी हा सुमारे १४ किमीचा मार्ग पूर्णतः एलिव्हेटेड आहे. इतर शहरांमधील अनुभव लक्षात घेता, एलिव्हेटेड मेट्रोचे काम अधिक गतीने होऊ शकते. जयपूर आणि कोची या ठिकाणच्या एलिव्हेटेड मेट्रोचे काम सीडेतीन ते चार वर्षांत पूर्ण झाले आहे. त्यामुळे, पुढील वर्षी मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू झाले, तर २०२०-२१ पर्यंत वनाज ते रामवाडी मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मेट्रोसाठी सुमारे ४४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असून, त्यापैकी ३१.५७ हेक्टर (सुमारे ७१ टक्के) जमीन सरकारी मालकीची आहे. उर्वरित, २८.६५ हेक्टरचे भूसंपादन करण्यासाठी सुमारे ९३० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. भूसंपादन करताना टीडीआर किंवा अन्य पर्यायांचा वापर करून हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. तसेच, मेट्रोच्या भूसंपादनासाठीची प्रक्रिया त्वरेने सुरू केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनजीटी’समोरील सुनावणी बाकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे मेट्रो प्रकल्पाला विविध कारणांनी मोठा विरोध झाला, त्याविरोधात कोर्टाचे दरवाजेही ठोठावण्यात आले; पण मेट्रोच्या मान्यतेपूर्वीच त्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांची डाळ शिजली नाही. मुंबई हायकोर्टाने मेट्रोच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली असून, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (एनजीटी) अंतिम सुनावणी बाकी आहे.

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) मेट्रो प्रकल्पाचा अहवाल सादर केल्यापासूनच मेट्रोला स्वयंसेवी संस्था आणि काही अभ्यासकांकडून तीव्र विरोध केला जात होता. जंगली महाराज रस्त्याने जाणाऱ्या मेट्रोबाबत अनेक आक्षेप नोंदविण्यात आले. अखेर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीने जंगली महाराज रस्त्याच्या रचनेत बदल करून मेट्रोचा सुमारे दीड किमीचा मार्ग नदीपात्रातून नेण्याची शिफारस केली. या बदलांना मान्यता दिल्यानंतरही ‘परिसर’ संस्थेने हायकोर्टात धाव घेतली. ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जवळून मेट्रो जात असल्याने त्याला स्थगिती देण्याची मागणी केली गेली. पुरातत्त्व विभागाची मान्यता घेऊनच मेट्रो मार्गाची अंतिम आखणी करण्याचे आश्वासन महापालिकेच्या वकिलांनी दिल्याने कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

मेट्रोचा मार्ग नदीपात्रातून नेण्याचे निश्चित झाल्यावर त्या विरोधातही एनजीटीमध्ये याचिका दाखल केली गेली. राज्याच्या आणि महापालिकेच्या जैवविविधता मंडळ आणि समितीने मेट्रोमुळे पर्यावरणाला धोका नसल्याचा दाखला दिला आहे. तर, एनजीटीने याआधीच्या एका निर्णयामध्ये नदीपात्रात पिलर उभारून एलिव्हेटेड रस्ता करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीच मेट्रो प्रकल्पाला पर्यावरणीय मूल्यांकन अहवालाची (एन्व्हॉयर्नमेंट अॅसेसमेंट रिपोर्ट) आवश्यकता नसल्याचा निर्णय देत, सुप्रीम कोर्टाने एका मेट्रो प्रकल्पाला एनजीटीने दिलेली स्थगिती रद्द केली आहे. त्यामुळे, एनजीटीच्या पुढील सुनावणीत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक गावांचा विसर

0
0

आपत्तीचा धोका टाळण्यासाठी सरकारी निधी नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘माळीण’प्रमाणे भूस्खलन व दरड कोसळण्याचा धोका असलेल्या जिल्ह्यातील दहा गावांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. या गावांतील आपत्तीचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने निधी न दिल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरूनच जगावे लागणार आहे.

माळीणमधील दुर्घटना झाल्यानंतर जिल्ह्यातील आपत्तीच्या छायेतील गावांची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगकडे (सीओईपी) गावांची पाहणी करण्याचे काम देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील दहा गावे आपत्तीच्या छायेमध्ये असल्याचा अहवाल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने (सीओईपी) जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. या अहवालाच्या अनुषंगाने संबंधित गावांमध्ये तत्काळ सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे निधीची मागणी करण्यात आली होती.

सीओईपीच्या अहवालामध्ये आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, आसणे, काळेवाडी व पेंढारवाडी, तसेच मावळातील भुशी, माऊ, वेल्हा तालुक्यातील आंबवणे व धानवली आणि दौंड तालुक्यातील देहेन या गावांमध्ये तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या गावांना विशेषतः पावसाळ्यामध्ये अधिक धोका असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये काही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी तेथे तत्काळ काही कामे करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला. तसेच या गावांत सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा आराखडा आपत्ती व्यवस्थापन केंद्राने तयार केला. मात्र, हा आराखडा कागदावरच राहिला आहे.

सीओईपीने जिल्ह्यातील आपत्तीचा धोका असलेल्या गावांचे सर्वेक्षण केले. त्यात धोका असलेल्या २३ गावांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर तातडीची निकड असलेल्या या दहा गावांची यादी तयार करण्यात आली. या गावांतील कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. हा निधी देण्याचे आश्वासन राज्य सराकरने दिले. परंतु, हा निधी आजतागायत आलेला नाही. त्यामुळे या गावांमध्ये आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने कोणतीही कामे झाली नाहीत. या गावांतील ग्रामस्थांना ही कामे होईपर्यंत जीव मुठीत धरूनच जगावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सात वर्ष सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राजकीय वैमनस्यातून एकावर धारदार हत्यारांनी वार करून त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना सात वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
राजेंद्र विलास चौधरी (२४), विठ्ठल लक्ष्मण गाडे (२४) आणि इब्राहिम याकुब शेख (२०, तिघेही रा. सोरतापवाडी, हवेली) या तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुदर्शन जयप्रकाश चौधरी (३०, रा. सोरतापवाडी) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. वैभव अरविंद चौधरी (२६, महादेवनगर, सोरतापवाडी, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. २४ जुलै २०१३ रोजी सोरतापवाडी ग्रामपंचायात समोर हा प्रकार घडला.
सुदर्शन चौधरी राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, घटनेच्या तीन वर्षांच्या पूर्वी त्यांच्यावर राजकीय कारणातून गोळीबार झाला होता. घटनेच्या चार ते पाच दिवसापूर्वी आरोपी आणि सुदर्शन यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. ती नंतर मिटली होती. घटनेच्या दिवशी सुदर्शन हे फिर्यादी आणि त्यांच्या गाडीवरील चालकाबरोबर ग्रामपंचायतीच्या बैठकीसाठी गेले होते.
सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास मिटिंग संपवून सुदर्शन त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडत असताना आरोपी तेथे आले. त्यांनी त्यांच्या हातातील सत्तूरने व धारदार हत्यारांनी वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. वैभव चौधरी त्यांना वाचविण्यासाठी तेथे गेले असता आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर जखमी झालेल्या सुदर्शन यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी पाहिले. त्यांनी या खटल्यामध्ये बारा साक्षीदार तपासले. त्यांना खटल्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. आर. साळुंके, पोलिस नाईक संतोष भागवत, पोलिस हवालदार सुनील मोरे यांनी मदत केली. खटल्यातील जखमी सुदर्शन, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपमध्ये प्रवेश केल्याचा गलांडे यांचा इन्कार

0
0



म. टा. प्रतिनिधी, येरवडा
वडगाव शेरी भागातील कॉँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सुनीता गलांडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. ‘आपण काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या असून आगामी काळात पक्षासोबतच राहणार’ असेही गलांडे यांनी ‘मटा’ला सांगितले.
वडगाव शेरी भागातील प्रभाग क्रमांक १८ च्या स्थानिक विद्यमान नगरसेविका सुनीता गलांडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याचा नकार दिला. गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारे भामा आसखेडचे काम रखडले आहे. हे रखडलेले काम तातडीने सुरू करावे. तसेच, वडगाव शेरी मतदार संघातील उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे. या मागणीचे निवेदन देण्यासाठी गलांडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक, स्थानिक नगरसेवक योगेश मुळीक उपस्थित होते.
गलांडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी गलांडे यांना ‘करणे दाखवा ‘नोटीस बजावली. या पार्श्वभूमीवर गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण भाजप पक्षात प्रवेश केल्याच्या वृत्तास स्पष्ट शब्दांत इन्कार केला.



आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्या असून अखेरपर्यंत पक्षातच राहणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. स्थानिक विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, काहींनी जाणूनबाजून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याची चुकीची माहिती पसरवली. भविष्यात भाजप पक्षात प्रवेश करण्याचा कुठलाही मानस नाही. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक कॉँग्रेसच्या तिकिटावर लढवणार आहोत.
- सुनीता गलांडे, काँग्रेस नगरसेवक, वडगाव शेरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीसाठी उमेदवारीची मेरीट चाचणी सुरू

0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या मेरीट चाचणीला सुरुवात केली आहे. निवडून येण्याची क्षमता या प्रमुख निकषावर उमेदवारी देण्याची तयारी पक्षाच्या श्रेष्ठींनी ठेवली आहे.
आमदार महेश लांडगे यांचा भारतीय जनता पक्षातील निश्चित प्रवेश, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांची कुंडली असल्याचा दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापू लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर निवडणूक लढवित असल्याचे सांगत लोणावळा येथे शिबिर घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात पूर्ण क्षमतेने उतरण्याच्या तयारीत आहेत.
महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकहाती सत्तेची हॅटट्रीक पूर्ण करू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तर, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने जोरदार टक्कर देण्याची तयारी चालविली आहे. पालिकेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध स्पष्ट केला आहे. तर, शहर काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे आता प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे.
पक्षनिष्ठा, आर्थिक ताकद, जनसंपर्क याबरोबरच निवडून येण्याची क्षमता या प्रमुख निकषांवर उमेदवारी देण्याची तयारी या पक्षांच्या श्रेष्ठींनी ठेवली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रबळ कार्यकर्ता आपल्या पक्षात खेचण्यासाठी चढाओढ चालू आहे. तर, काहींनी संभाव्य उमेदवार कोण असेल याचा अंदाज व्यक्त करीत अन्य पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत पक्षप्रवेशाचे पेव फुटणार आहे. ही संधी पक्ष मेळाव्याच्या माध्यमातून साधली जाणार आहे. त्यामुळे प्रवेश करू इच्छिणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सध्या ‘वेटींग’वर ठेवण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी किंवा नंतर पक्षप्रवेशांच्या हालचालींना गती मिळेल, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविका कार्यालय तोडफोड; सहा जणांना अटक

0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
घर बांधण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या काळभोरनगर येथील संपर्क कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर, १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक रामाचरे तिवारी (वय ३८, रा. चिंचवड), संतोष गणाजी खंडागळे (३४, रा. चिंचवड), अनिल एकनाथ कांबळे (२७, रा. अजंठानगर, चिंचवड), अमर कचरू समिंदर (३०, रा. चिंचवड), राजेश मोहन इंगवले (२४, रा. चिंचवड), दीपक दिलीप कसबे (२५, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे इतर ८ ते १० साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. विशाल बाळा काळभोर (३३, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोरनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांचे संपर्क कार्यालय आहे. काल सकाळी दहा ते पंधरा जणांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला करून लाकडी दांडक्याने कार्यालयाची तोडफोड केली. तसेच, आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून एक लाख रुपयांची मागणी केली. घरबांधण्यासाठी खंडणीरूपी या पैशांची मागणी करण्यात आली होती. पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपींनी कार्यालयाची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. फौजदार एच. एस. बोचरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय परिवहन समिती बैठकीबाबत सूचना

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
शाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी पुणे शहर व जिल्ह्यातील काही शाळेत अद्याप शालेय परिवहन समितीची एकही बैठक झालेली नाही. अशा शाळांमध्ये तातडीने बैठकी घेण्यासाठीचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना देण्यात येतील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी शुक्रवारी ‘मटा’ला दिली.
सुरक्षित शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न सध्या जिकरीचा झाला आहे. त्यादृष्टीने शाळांमध्ये समितीची बैठक होणे आवश्यक आहे. मात्र, तशी परिस्थिती अद्याप नाही. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अखत्यारित येणाऱ्या पुणे शहर तसेच शिरूर, मुळशी, वेल्हा, पुरंदर व भोर या तालुक्यांमध्ये ३ हजार २४ शाळांमध्ये समित्यांची स्थापना झाली आहे. राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे या समितीची दर तीन महिन्यांनी शाळेत बैठक होणे आवश्यक आहे. मात्र, शाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेले तरी यापैकी कित्येक शाळांमध्ये समितीची अद्याप एकही बैठकच झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या चालू शैक्षणिक वर्षात देखील बैठकाच झाल्या नाहीत, अशी परिस्थिती उद‍्भवण्याची भीती आहे.
या समितीमध्ये मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली पालक-शिक्षक संघाचा प्रतिनिधी, वाहतूक पोलिस निरीक्षक किंवा पोलिस निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक, शिक्षण निरीक्षक, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचा प्रतिनिधी अशा सदस्यांचा समावेश आहे. सरकारने या बैठकींवर लक्ष ठेवण्याचे काम जिल्हापरिषदेचे व महापालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक)यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, या बैठकींवर लक्ष किंवा त्यांचा आढावा घेण्याचे काम संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयांकडून प्रभावी होत नाही. त्यामुळेच शाळांमध्ये दिलेल्या मुदतीत बैठक होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
शहर व जिल्ह्यातील शाळेत शालेय परिवहन समितीची एकही बैठक झालेली नाही, अशा शाळांमध्ये तातडीने बैठकी घेण्यासाठीचे आदेश संबंधत विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना देण्यात येतील. त्यासाठीची पावले शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून तातडीने उचलण्यात येतील, असे टेमकर यांनी सांगितले.

‘वाहतुकीबाबत जागरुकता गरजेची’
पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय परिवहन समितीच्या बैठकी झाल्या आहेत. काही शाळांमध्ये बैठक होणे राहील्यास तेथे तातडीने बैठक घेण्याबाबतच्या सूचना देण्यात येतील. या बैठकींमधून शालेय विद्यार्थी वाहतुकीबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी या बैठका शाळांनी घेणे आवश्यक आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हरून आतार यांनी सांगितले.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपाध्याय नव्हे; तर गांधी,नेहरू,आंबेडकर राष्ट्रपुरुष

0
0

डॉ. रावसाहेब कसबे यांचा घणाघात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ जनचळवळ केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. संघाचा जिंकण्याचा इतिहास नाही. दीनदयाळ उपाध्याय नाही तर, गांधी,नेहरू,आंबेडकर हेच खरे राष्ट्रपुरुष आहेत. चड्डीतील लहान पोर देखील गांधींबद्दल द्वेषाने बोलते. कारण देशात हुकूमशाही आणू न दिल्याचा हा राग आहे,’ अशी घणाघाती टीका ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी केली.
मारवाडी फाउंडेशनतर्फे ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ डॉ. कसबे यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी या वेळी उपस्थित होते.
‘सर्वसामान्य नागरिक जेव्हा संभ्रमात असतात; तेव्हा राजकीय लोक त्यांना अधिक संभ्रमित करतात. त्यांना प्रकाश दाखविण्याचे काम विचारवंतांचे असते. आज देशात अशांततेचे वातावरण आहे. गांधी-नेहरू-आंबेडकर या तीन महापुरुषांबद्दल झालेली विस्मृती समाजाला परवडणारी नाही,’ असे डॉ. कसबे यांनी नमूद केले. निवडणूक लढवण्यासाठी लोक एखाद्या नेत्याला आग्रह करतील तसेच, पैशासाठी राजकारण होणार नाही आणि राजकारणासाठी पैसा वापरला जाणार नाही, तेव्हाच देशात सुंदर लोकशाही निर्माण होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शिंदे म्हणाले, ‘देशाला सामाजिक, राजकीय विचारांचा वारसा मिळाला, तरी जातीयतेचे भूत काही उतरत नाही. कसबे यांनी समाजाची शस्त्रक्रिया साहित्यातून केली.’ डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘आंबेडकर कळत नाहीत, तोपर्यंत देशाचे प्रश्न सुटणार नाहीत. प्रामाणिक विचारांवर गदा आणली जाते, तेव्हा हुकूमशाहीची सुरुवात झालेली असते.’
‘सध्या निघणारे मोर्चे आणि त्यांची उकल याविषयांवर सामान्यांमध्ये वैचारिक गोंधळ सुरू आहे. यामध्ये सरकारची भूमिका पुन्हा गोंधळाची आहे. समाजातील सध्याचा वाढता वैचारिक दहशतवाद मोडून काढण्याची आवश्यकता आहे. आमच्या सरकारने कधी चुकीच्या प्रकारांचे समर्थन केले नाही,’ अशी टीका चव्हाण यांनी केली. बाळ कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर बाहेती यांनी आभार मानले.
------------------
‘म्हणून विठ्ठलाच्या पायावर डोके’
‘तत्वाशी तडजोड केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. समाजाला जे आवडते, ते आम्हाला बऱ्याचदा करावे लागते. म्हणून तर आम्ही विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवतो. समाजाला दुखवून चालत नाही. त्यासाठी तडजोड करावीच लागते,’ राजकीय नेत्यांची अशी दुसरी गोष्ट' सुशीलकुमार शिंदे यांनी कथन केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images