Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ट्रॅव्हल एजंटना नियमावली

$
0
0

फसवणूक टाळण्यासाठी ट्रॅव्हल एजंट संघटनेचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पर्यटन कंपन्यांकडून पर्यटकांच्या फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे’ या संघटनेने पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये तिकीट बुकिंगपासून ‘टूर’ संपेपर्यंतच्या विविध गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला असून, फसवणूक करणारे ट्रॅव्हल एजंट व कंपन्यांची माहिती प्रसारित केली जाणार आहे.

संघटनेने ‘आयएसओ’च्या धर्तीवर एक ‘व्यवसायिक मॉडेल’ तयार केले आहे. या मॉडेलमुळे ग्रहाकांना चांगली सेवा मिळणार आहे. तसेच, त्यांची फसवणूकही टळणार असून फसवणूक करणाऱ्यांची माहिती कंपन्यांना दिली जाणार आहे. हे मॉडेल पूर्णत: ग्राहकाभिमुख ठेवण्यात आले आहे. सेवा देणाऱ्या प्रत्येक एजंटला त्याने दिलेल्या सेवेच्या दर्जानुसार नामांकित करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे संचालक नीलेश भन्साळी यांनी दिली.

‘पर्यटन क्षेत्राचा अनुभव नसणारे लोक या क्षेत्रात येत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. ऑनलाइन पर्यटन सेवा देणाऱ्या कंपन्यांविरोधातही ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे प्रामाणिक ट्रॅव्हल एजंटच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सर्वच सदस्यांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेऊन हे पाऊल उचलले आहे. एखादा नवीन व्यावसायिक दाखल झाल्याय त्याचे शॉप अॅक्ट लायसन्स, सेल्स टॅक्स नंबर व इतर कागदपत्रांची खात्री केल्यानंतर त्याला संघटनेचे सदस्यत्व दिले जाईल,’ असे भन्साळी म्हणाले.

‘फसवणुकीची व्याख्या स्पष्ट करणार’

ट्रॅव्हल एजंट व्हिसा व पासपोर्टची सेवाही देतात. व्हिसा किंवा पासपोर्ट मिळण्याचा कालावधी हा ग्राहकांनी दिलेल्या कागदपत्रांवर आणि पासपोर्ट कार्यालयावर अवलंबून असतो. त्यामुळे एखाद्याचा व्हिसा नाकारला गेला किंवा पासपोर्ट न मिळाल्यामुळे ‘ट्रीप’ रद्द झाली, तर त्यास एजंट जबाबदार असू शकत नाही. मात्र अनेकदा ग्राहक एजंटलाच जबाबदार धरतात. मात्र, पर्यटनस्थळी गेल्यावर हॉटेलचे बुकिंग नसणे, वाहन उपलब्ध न होणे आदी गोष्टींची जबाबदारी एजंट टाळू शकत नाहीत. यामुळे ग्राहकांसाठी फसवणुकीची व्याख्या स्पष्ट केली जाणार आहे, असे नीलेश भन्साळी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंजाबी संमेलनाची स्मरणिका पाच भाषांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संमेलन म्हटले की स्मरणिका असतेच. विविध लेखांनी माहितीपूर्ण अशी स्मरणिका साहित्यरसिकांच्या आवडीचा विषय असतो. दर वर्षी महाराष्ट्रात होणारे साहित्य संमेलन हे ‘मराठी’ असल्याने स्मरणिका मराठीतूनच प्रसिद्ध होते; पण पंजाबी साहित्य संमेलन यास अपवाद असेल. या संमेलनाच्या निमित्ताने प्रसिद्ध होणाऱ्या स्मरणिकेत पाच भाषांचा मिलाफ अनुभवता येणार आहे.

‘सरहद’ संस्थेतर्फे गुरू गोविंदसिंग यांच्या ३५०व्या जयंतीचे औचित्य साधून १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत विश्व पंजाबी साहित्य संमेलन रंगणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हे संमेलन होईल. प्रथमच होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी पंजाब, तसेच देश-विदेशातून पंजाबी भाषिक, साहित्यिक येणार आहेत. संमेलनाच्या दृष्टीने विविध प्रयोग राबविण्यात येत असून पाच भाषांमधील स्मरणिका हा त्यापैकीच एक प्रयोग आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिका प्रसिद्ध केली जाते; पण ती केवळ मराठीमध्येच असते.

‘साहित्य संमेलनाची स्मरणिका ही वाचकांसाठी मेजवानी ठरते. विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेमध्ये पाच भाषांच्या लेखांचा सुंदर नजराणा वाचकांच्या हाती पडणार आहे. पंजाबी साहित्य, पंजाबी साहित्य आणि फाळणी, स्त्रियांचे साहित्यातील योगदान, आदी विविध विषयांवरचे उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि पंजाबी या पाच भाषांमधील लेख या स्मरणिकेमध्ये वाचायला मिळणार आहेत. कुलदीप नय्यर, डॉ. अशोक कामत अशा मान्यवरांचे स्मरणिकेमध्ये लेख असतील,’ अशी माहिती ‘सरहद’चे प्रमुख संजय नहार यांनी ‘मटा’ला दिली. पाकिस्तान सोडून तेरा देशांमधील पंजाबी भाषिकांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह राजदूतांनाही पत्रे पाठविण्यात आली आहेत. अमेरिका, ब्रिटन, अफगाणिस्तान आदी देशांच्या प्रतिनिधींनी येण्याचे मान्य केले आहे, असेही नहार म्हणाले.

ग्रंथदिंडी दिल्लीमधून निघणार

विविधेत एकता, हा संदेश देणारी विश्व पंजाबी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी दिल्ली येथून निघणार आहे. ग्रंथदिंडीची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावी, अशी विनंती ‘सरहद’ संस्थेतर्फे पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे. ही दिंडी देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन एकता आणि शांततेचा संदेश देणार आहे. ग्रंथदिंडी संमेलनादिवशी पुण्यात पोहचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​अंनिस आले ‘ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी झटणारी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ दोन दशके कार्य केल्यानंतर आता ‘ऑनलाइन’ आली आहे.
संघटना गेल्या २७ वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन यासाठी काम करत आहे. समितीच्या राज्यातील ३६ जिल्ह्यांतून ३०० पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी १९८९ मध्ये अंनिसची स्थापना केली. तेव्हापासून हजारो कार्यकर्ते अंधश्रद्धेविरोधात जनजागृती तसेच विज्ञानाबाबत जागृती करत आहेत. विज्ञानाबाबत जागृती करणारी ही संघटना आधुनिकतेच्या बाबतीत मात्र मागे पडत होती. तरुणाईशी तरुणाईच्या भाषेत संवाद साधावा लागेल, हे आधुनिक तत्व लक्षात घेऊन समितीची तीन भाषांमध्ये वेबसाइट तयार करण्यात आली आहे.
समितीच्या वेबसाइटचे उद‍्घाटन ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. यशपाल यांच्या हस्ते नुकतेच झाले. समितीच्या कार्याचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी www.antisuperstition.org, www.mahaanis.com, www.mahaanis.org अशी अनुक्रमे इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये अद्ययावत वेबसाइट तयार करण्यात आली आहे. समितीचे गेल्या २७ वर्षांतील काम, व्यसनाधीनतेवर जागृती, जादूटोणा विरोधी कायदा, प्रास्तावित जात पंचायत विरोधी कायदा, गणपती मूर्ती दान, बोगस डॉक्टर कायदा, पर्यावरणपूरक कायदे, विविध लेख, अशी विविधांगी माहिती देण्यात आली आहे. तीन भाषांमध्ये साइट पाहता यावी यासाठी विशेष लिंक देण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारी संघटना म्हणून यापूर्वीच तंत्रज्ञानाची जोड मिळायला हवी होती. या बाबीकडे लक्ष देण्यास संघटना कमी पडली. इंग्रजीमध्ये वेबसाइट होती; पण ती अद्ययावत नव्हती. या वेबसाइटला अद्ययावत करण्याबरोबरच हिंदी व मराठीमध्ये नवीन साइट करण्यात आली आहे. विविध भाषेतील लोकांना हे काम समजावे, हा त्यामागील हेतू आहे. याशिवाय संघटनेचे फेसबुक पेज असून त्या माध्यमातून जागृती करण्याचे काम करत आहोत. लवकरच अॅप सुरू करणार आहोत.
- अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘जवानांच्या पराक्रमावर शंका नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु, काही लोकांनी या संबंधी पुरावे मागितले. ते सरकारवर नाही, तर भारतीय जवानांच्या पराक्रमावर संशय घेत आहेत. जवानांचे मृतदेह परत आले तरच भारताच्या यशस्वी कामगिरीवर विश्वास ठेवणार का’, असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. ‘मुस्लिम आणि अन्य धर्मीय लोक पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा झाला पाहिजे असे
म्हणतात, त्यामुळे मूठभर लोकांचा विचार करायला नको’, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भागातर्फे विजयादशमीनिमित्त शनिवार पेठेतील रमणबाग प्रशालेत शस्त्रपूजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. व्यावसायिक फत्तेचंद रांका, संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, कसबा भाग संघचालक किशोर शशीतल, सहसंघचालक सुहास पवार या वेळी उपस्थित होते.

‘भारताने दहशतवादी तळ
उद् ध्वस्त करून यशस्वी कारवाई केली. कोणतेही युद्ध न करता केवळ शस्त्रांच्या प्रदर्शनानेदेखील शत्रू राष्ट्राच्या मनात भीती निर्माण होऊ शकते, हे सिद्ध झाले. युद्धाची परिस्थिती आल्यास भारत काय करू शकतो, याचा विचार शत्रूराष्ट्रांनी करायला हवा’, अशी टिप्पणी भांडारी यांनी केली.
‘देशामध्ये तब्बल ६५ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात वैचारिक परिवर्तन झाले आहे. हे परिवर्तन टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम करायला हवे. राष्ट्राला सर्वोच्च ठिकाणी नेण्यासाठी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी. तात्पुरता विजय पुरेसा नाही, तर चिरस्थायी विजय
मिळवायला हवा’, अशी सूचना त्यांनी केली. चिंतामणी थत्ते यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘मानवतावादाची आज गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यघटनाकारांनी मतदानासारखे शस्त्र सर्वसामान्यांच्या हाती दिले असून मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेल्या प्रतिनिधींना पाच वर्षे काम करू देण्याची गरज आहे. त्यांनी लोकशाहीला पूरक आणि विकासाभिमुख काम न केल्यास पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत जनता त्या प्रतिनिधीला धडा शिकवू शकते. मात्र, त्या आधी जनतेच्या प्रतिनिधीला पाच वर्षे काम करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. केवळ जातीवर आधारित मोर्चे काढून सरकारला वेठीस धरू नये. आता लोकशाहीकडून मानवतावादाकडे सरकण्याची आवश्यकता असल्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली.
दिलीपराज प्रकाशनतर्फे लक्ष्मीकांत देशमुखलिखित ‘इन्कलाब विरुद्ध जिहाद’ या कादंबरीचे प्रकाशन मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, लेखक लक्ष्मीकांत देशमुख, दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे, प्रसिद्ध समीक्षक डॉ. रणधीर शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
मुळे म्हणाले, ‘पूर्वी देशहित लक्षात घेऊन चळवळी सुरू व्हायच्या, परंतु अलिकडच्या चळवळी आणि मोर्चे यांचा जात हा पाया आहे. राष्ट्राची प्रगती या केंद्रभूत संकल्पनेवर मोर्चे निघत नाहीत. कोणत्याही धर्माने, समूहाने एखादा धर्मग्रंथ ग्राह्य मानून टोकाच्या भूमिकेचे अनुकरण करणे हे प्रगती खुंटल्याचे लक्षण आहे. मग हे समीकरण महाभारत, रामायण किंवा अगदी भगवतगीता असो. आज भारतासारख्या लोकशाही देशात मुस्लिम आणि हिंदू या दोन धर्मांच्या लोकांमध्ये उघडपणे चर्चा होऊ शकत नाही, हे लोकशाहीला पूरक वातावरण नाही. विचारांचे आदानप्रदान होणे गरजेचेच आहे. मुस्लिमांमधील चांगले गुण हिंदूनी स्वीकारावेत आणि हिंदूंच्या चांगल्या चालीरीती मुस्लिमांनी स्वीकारणे अपेक्षित आहे. परंतु दोन्ही बाजूंच्या धार्मिक मूलतत्त्ववाद्यांमुळे हे होत नाही’.
डॉ. मोरे म्हणाले, ‘अफगाणिस्तान इतका दुर्दैवी देश दुसरा देश नाही. तो रशियाच्या कम्युनिझम आणि अमेरिकेच्या भांडवलशाहीचा बळी ठरला. दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात तो देश भरडला जात आहे. अफगाणिस्तानमध्ये कट्टरतावाद टोकाचा होता. त्यांनी त्यांच्या परंपरांसोबत जीवन जगणे अपेक्षित होते. रशिया आणि अमेरिका आचार विचारांनी आधुनिक होते. इस्लामला आधुनिकता मान्य नव्हती, तरीसुद्धा हा विचारधारेचा संघर्ष अफगाणने पेलला. अफगाणने रशियाला घालवण्यासाठी अमेरिकेची मुत्सद्देगिरीने मदत घेऊन रशियाला अफगाणमधून हुसकावले. परंतु त्यानंतर अमेरिकेने हात झटले. त्यामुळे जिहादी समूहांच्या पंजात अफगाण सापडले’.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना स्कूलबसवर प्रशासन कारवाई करणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विद्यार्थी वाहतुकीचा परवाना न घेतलेल्या स्कूल बसचालकांवर ‘आरटीओे’ प्रशासनाकडून कारवाई केली जाणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शालेय वाहतूक धोरणाच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या शेकडो स्कूल बस शहरात राजरोसपणे विद्यार्थी करतात, मात्र त्यांच्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याने ‘आरटीओ’च्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
पटवर्धनबाग परिसरात गेल्या आठवड्यात गुरुवारी सीएनजीने पेट घेतल्याने स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागली तेव्हा व्हॅनमध्ये दहा मुले होती. मुलांनी व्हॅनमधून धूर निघत असल्याचे माहिती देताच, चालकाने चपळाईने त्यांना खाली उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
शहरात अद्यापही शेकडो स्कूल बस व व्हॅन परवान्याशिवाय विद्यार्थी वाहतूक करतात. तसेच, शालेय विद्यार्थी वाहतूक धोरणाची अंमलबजावणी न करता खासगी गाड्यांमधून वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यावर आरटीओकडून कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज पालकांनी व्यक्त केली. स्कूल बस चालकांकडे कोणत्या गोष्टींची मागणी करायची, त्याच्याकडील कोणत्या गोष्टी तपासायच्या या प्रत्येक गोष्टीची माहिती साधारणपणे पालकांना नसते. त्यामुळे आरटीओ व शालेय प्रशासनाकडून वचक ठेवण्याची गरज आहे, असे पालकांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ पालिकेचे न्यूजलेटर गायबच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘स्मार्ट’ सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या पुणे महापालिकेने केंद्र सरकारच्या सूचनांनुसार सुरू केलेले ‘ई-न्यूजलेटर’ गेल्या पाच महिन्यांपासून ‘लॉग ऑफ’ झाले आहे. महापालिकेशी संबंधित माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या भाषांत वेबसाइट, अॅप कार्यान्वित करणारी महापालिका न्यूजलेटरबाबत मात्र, आरंभशूर ठरली आहे.
स्मार्ट सिटीतील शहरांसाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रत्येक महापालिकेने ‘ई-न्यूजलेटर’ प्रसिद्ध करावे, असे बंधन घालण्यात आले होते. त्यानुसार, महापालिकेने गेल्यावर्षी मे पासून न्यूजलेटर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. या न्यूजलेटरमध्ये महापालिकेने गेल्या महिन्यात घेतलेले विविध कार्यक्रम-घडामोडी, नव्या प्रकल्पांची माहिती आणि पुण्याची ओळख सांगणाऱ्या विविध वास्तू-ठिकाणांचा परिचय अशा स्वरूपात न्यूजलेटर प्रसिद्ध केले जात होते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच न्यूजलेटर महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध व्हायचे. सलग वर्षभर ते नियमित प्रसिद्ध झाले. गेल्या जुलैमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ऑगस्टपासून न्यूजलेटरने विराम घेतला आहे. पाच महिन्यांपासून न्यूजलेटर प्रसिद्धच झाले नसून, अचानक ते का थांबविण्यात आले, याची माहितीही दिली जात नाही.
अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेतर्फे वेबसाइट अद्ययावत करण्यात आली. तसेच, देश-विदेशातील सुमारे ७६ भाषांमध्ये वेबसाइटवरील महापालिकेशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच, महापालिकेने अॅपद्वारेही नागरिकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न चालवला असताना, न्यूजलेटरमध्ये खंड का पडला, अशी विचारणा केली जात आहे. न्यूजलेटरचे काम करणाऱ्या संपादकीय मंडळाची पुनर्रचना केल्यानंतर ते पुन्हा नियमितपणे प्रसिद्ध केले जाईल, असा दावा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दुर्दैवाने, अद्याप संपादकीय मंडळाची पुनर्रचनाच करण्यात आली नसून, न्यूजलेटरबाबत विचारणा केल्यावर कोणताही प्रतिसाद दिला जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीविचारांचा वापर सत्ता मिळविण्यासाठीच

$
0
0

डॉ. सदानंद मोरे यांची राजकारण्यांवर खरमरीत टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे विचार लोक आणि राजकारण्यांमध्ये फारच अभावाने आढळतात. या विचारांचा वापर केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठीच केला जातो,’ अशी टीका संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी केली.
‘डेमॉक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क’ आणि ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ यांच्यावतीने गांधी जयंती सेवा सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वे‍ळी डॉ. मोरे यांच्या हस्ते ‘गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी’च्या विश्वस्त शोभना रानडे यांचा ९२व्या वाढदिवसानिमित्त, तर यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक समितीचे सचिव डॉ. विकास आबनावे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘गांधीजी आणि विनोबांचे विचार युवावर्गाला सांगायला हवेत; केवळ सप्ताहापुरते त्यांचे स्मरण योग्य नाही. राजकारण्यांना असलेली सत्तेची लालसा गांधींच्या विचारांना विसरायला भाग पाडत आहे. या विचारांचा वापर सध्या केवळ राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे तरुणपिढीच्या इच्छा, अपेक्षा समजून त्यांच्यात गांधी आणि विनोबांचे विचार रुजवले पाहिजेत.’ रानडे यांनी भावे आणि महात्मा गांधी यांच्या आठवणी सांगून आपला आजवरचा प्रवास विशद केला. त्या म्हणाल्या, ‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांनीच आजवर काम करीत आले. विनोबांच्या आदेशानुसारच १९७३पासून आगाखान पॅलेस येथे काम करायला सुरुवात केली आणि आजही करीत आहे.’ पवार म्हणाले, ‘आधुनिक जगात माणूस त्याच्या जीवनातील मुलभूत गोष्टींपासून आणि चांगल्या विचारांपासून दूर गेला आहे. त्यामुळेच जगात मोठ्या प्रमाणात प्रश्न आणि समस्या निर्माण होत आहेत. महात्मा गांधींचे विचार अंमलात आणल्यास सध्याच्या अनंत समस्यांवर आपल्याला उपाय सापडतील.’ पुरस्काराला उत्तर देताना श्रीमती काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. खोरे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊन, सरी अन् सांजगारवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सकाळी कडक ऊन, दुपारनंतर पावसाच्या दमदार सरी आणि सायंकाळनंतर गारवा अशी तीन ऋतूंची झलक पुणेकरांना रविवारी अनुभवता आली. रात्री साडेआठपर्यंत शहरात ११.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, ऑक्टोबर हीटमुळे शिवाजीनगर येथे ३१.६ तर लोहगाव येथे ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारीही दुपारनंतर पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
रविवारी सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सकाळी दहा वाजल्यानंतर बाहेर पडल्यास उन्हाचे चटके बसत होते. भरदुपारी उकाड्यात आणखी वाढ झाली. दुपारी तीनच्या सुमारास वातावरण ढगाळ झाले. साडेचार-पाचच्या सुमारास अंधारून आले आणि पावसाला सुरुवात झाली. सुमारे तास-दीड तास पावसाचा जोर कायम होता. गेले काही दिवस पडत असलेल्या कडक उन्हामुळे पावसाळा संपला असे समजून रेनकोट, छत्र्या कपाटात ठेवून दिलेल्या पुणेकरांची पावसामुळे पंचाईत झाली. अनेकांनी भिजणे पसंत केले, तर काहींनी जवळच आडोसा शोधला. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणीही साचले. या पावसामुळे सायंकाळी हवेत चांगलाच गारवा पसरला होता. परिणामी, पुणेकरांना एकाच दिवसात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तिन्ही ऋतू अनुभवण्याची संधी मिळाली.
दरम्यान, अरबी समुद्राचा मध्यपूर्व भाग ते कोकण किनारपट्टी भागात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे बाष्पाचे प्रमाण वाढून राज्याचा काही भागात पाऊस होत आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी येथे (८८ मिलिमीटर) झाली. तर महाबळेश्वर येथे ३, ब्रह्मपुरी येथे ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुढील दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
..
ऑक्टोबर हीटच्या झळा
गेल्या काही दिवसांपासून शहरात ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवू लागली आहे. शहरातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे साधारण दहा वाजल्यानंतर बाहेर फिरताना उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. भरदुपारी तर उन्हाचा कडाका आणखी वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनीही घेतला शिक्षणमंडळाचा धसका

$
0
0

प्रमुखपदाच्या नियुक्तीपासूनचा चार हात दूरच राहण्याची भूमिका

Yogesh.Borate@timesgroup.com
@yogeshborateMT

पुणे : गणवेश खरेदी असो, की पेन-पेन्सिल-बाकडे खरेदीतील घोटाळा... कुंड्यांची खरेदी असो की मग स्वेटर खरेदी घोटाळा... हे कमी की काय म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक पथकानेही पुणे महापालिका शिक्षण मंडळावर कारवाई करून काही पदाधिकाऱ्यांना गजाआड केले. त्यामुळे सातत्याने वादात अडकलेल्या शिक्षण मंडळाचा धसका आता शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनीही घेतला आहे. मंडळाच्या शिक्षणप्रमुखाच्या नियुक्तीचा विषय जरी निघाला, तरी शिक्षण खात्यातील अधिकारी ‘नको रे बाबा’ असा धोशा लावतात.
पुणे शहराचा शैक्षणिक लौकिक विचारात घेऊन मंडळाचे शिक्षणप्रमुख पद शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांसाठी कायमच ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरले आहे. शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात येत होती. मात्र, सध्या उपसंचालक दर्जाचे खात्यातील अधिकारी या पदावर रुजू होण्यासाठी इच्छुक नसल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला दिली. गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या या पदावर नियुक्ती देण्याबाबत शिक्षण खात्यामध्ये हालचाल झाली असली, तरी अधिकाऱ्यांनी शिक्षणप्रमुख पदावरच फुली मारली आहे. त्यामुळे आता नवे अधिकारी पदोन्नतीने पुढे आल्यावरच एखादा अधिकारी या पदाकडे वळण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
खात्यातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘मटा’ या सावळ्या गोंधळाविषयी माहिती दिली. या पदावर आल्यावर महापालिकेच्या हद्दीतील साधारण तीनशेहून अधिक प्राथमिक आणि सुमारे तीस माध्यमिक शाळांचा कारभार पाहावा लागतो. शिक्षण उपसंचालक पदाची जबाबदारी इतरत्र निभावत असताना, या संख्येपेक्षाही अधिक संख्येने शाळांचा कारभार अधिकारी सांभाळत असतात. त्यामुळे ही संख्या हा गौण विषय ठरतो. मात्र, शिक्षणप्रमुख झाल्यानंतर मंडळामधील राजकीय पुढाऱ्यांचे हेवेदावे आणि वैयक्तिक हितसंबंध सांभाळणे, ही खात्यातील अधिकाऱ्यांसाठी अडचणीची बाब ठरते. हितसंबंध विचारात घेऊन नियम हवे तसे वाकवून काही गोष्टी करण्यावर पुढारी जोर देतात. प्रत्यक्षात या बाबी समोर आल्यावर सर्व प्रकार हा अधिकाऱ्यांवर शेकवून, ते नामानिराळे राहतात. दरम्यानच्या काळात शिक्षणप्रमुख झालेल्या खात्यातील अधिकाऱ्यांनी हा अनुभव घेतला आहे. त्यामुळेच या पुढील काळात अनुभवी अधिकाऱ्यांनी या पदावर जायचेच नाही, अशी एक अलिखित भूमिका घेतल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
000
सध्याच्या कारभारावरही आक्षेप...
या निमित्त ‘मटा’ने मंडळाच्या सध्याच्या कारभाराचा आढावा घेतला. गेल्या काही काळात मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात घटती संख्या अद्याप कागदावर आलीच नसल्याची ओरड केली जात आहे. त्यामुळेच यंदा शिक्षकांच्या संचमान्यतेची प्रक्रिया अद्याप रखडल्याचे रविवारी समोर आले. या बाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मंडळाला नोटिसा बजावल्याची माहिती उघड झाल्याने, मंडळाच्या आक्षेपार्ह कारभाराची परंपरा सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभारी शिक्षणप्रमुख शुभांगी चव्हाण यांनी आक्षेप फेटाळून लावले. केवळ तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे रविवारी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखक सरकारी प्रशंसक नसावेत...

$
0
0

00

ब्रिटनमधील बालसाहित्यकार आणि शिक्षणतज्ज्ञ अॅलन गिब्बॉन्स नुकतेच पुणे भेटीवर आले होते. ब्रिटनच्या सरकारचे कडवे टीकाकार, तेथील शिक्षण व्यवस्थेमधील त्रुटी मोकळेपणाने मांडणारे लेखक आणि बालसाहित्यकार अशी त्यांची बहुआयामी ओळख या निमित्ताने झाली. साहित्य, लेखकांची लोकशाहीमधील भूमिका, वाचनसवयी आदी मुद्द्यांवर योगेश बोराटे यांनी गिब्बॉन्स यांच्याशी साधलेला हा संवाद.
000

प्रश्न : अमेरिका, ब्रिटन, भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेवर आधारलेल्या देशांमधून साहित्यिक वा लेखकांची भूमिका नेमकी कशा प्रकारची असावी ?
गिब्बॉन्स : लोकशाहीची प्रक्रिया बळकट होण्यासाठी लेखक, साहित्यिकांची भूमिका ही कायमच महत्त्वाची राहिली आहे. त्यासाठी लेखकांनी एखाद्याचे मुखपत्र म्हणून काम करणे चुकीचे ठरते. लोकशाही व्यवस्थेमध्ये लेखक हे कायमच व्यवस्थेसमोर वेगळ्या अर्थाने आव्हाने निर्माण करणारे ठरायला हवेत. व्यवस्थेवर खुलेपणाने टीका करू शकणारे व्यवस्थेचे मित्र म्हणून लेखकांची भूमिका असायला हवी. त्यांनी व्यवस्थेसमोर सातत्याने नवनवीन प्रश्न उपस्थित करायला हवेत.
..
अशी भूमिका बजावत असताना तुम्हाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे ?
बांग्लादेशमध्ये नुकताच एका ब्लॉगलेखकावर झालेला हल्ला खरं तर या प्रश्नामुळे आठवला. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांमध्ये आम्हाला तुलनेने खूप खुलेपणाने आमचे म्हणणे मांडायची संधी मिळते. आम्ही सरकारी धोरणांबाबतही खुलेपणाने टीका करू शकतो. असे असले तरी ब्रिटिश कौन्सिल सारखी सरकारी संस्था आमच्यासारख्या वेगवेगळ्या, म्हटले तर अगदी विरोधी मतांच्या विचारवंतांना एकत्र आणते. आम्ही आमचे विचार मांडताना मानवतावादी दृष्टिकोन, लोकशाहीची तत्त्वे, विविधतेचा पुरस्कार करण्याची परंपरा जपतो. कदाचित यामुळेच वाचकही आमचा खुलेपणाने विचार करतात. आमच्यावर नियंत्रण असते ते आमचे स्वतःचे...
..
राजकारण्यांविषयी काय सांगाल?
एक टीकाकार म्हणून राजकारण्यांशी ज्यावेळी संबंध येतात, तेव्हा असे जाणवते की त्यांना अगोदरच्या सरकारने केलेले सारे काही चुकीचेच वाटते. ते सरकार कोणाचेही असले तरी हीच परिस्थिती असते. वास्तविक राजकारण्यांनी डॉक्टर, इंजिनीअर, लेखक आदी व्यावसायिकांवरही विश्वास ठेवायला हवा. राजकारण्यांनी विनम्र आणि इतरांना आदर देण्याची भूमिका स्वीकारणे गरजेचे वाटते. व्यावसायिकांच्या कार्यातून जे परिणाम येतील, त्यांचा कसा वापर करायचा हे राजकारण्यांनी ठरवावे. परिणाम कसे येतील, हे सांगायचे काम राजकारण्यांचे नाही. त्यासाठी अर्थातच पुन्हा दिशादर्शन करण्याचे काम लेखकांकडून घडू शकते.
..
तंत्रज्ञानामुळे बदलत चाललेल्या वाचनसवयी आणि त्याचा साहित्यिकांवर होणारा परिणाम तुम्ही कसा पाहता?
मी तंत्रज्ञानाचा विरोधक नक्कीच नाही, त्याचवेळी मला छापील पुस्तके वाचायला जास्त आवडते. गेल्या काही काळामध्ये किंडलचा बोलबाला होता. सध्या मात्र तो कमी होत चालला आहे. त्यामुळे अनेक लेखक, प्रकाशकांनी किंडलसाठी पुस्तकांची विक्री थांबविली आहे, हे ब्रिटनमधील वास्तव आहे. हेच हळूहळू जगभरातही अनुभवायला मिळेल. छापील पुस्तके वाचण्याची सवय पुन्हा रूढ होऊ लागली आहे. लहान मुलांच्या साहित्य विश्वाबाबत बोलायचे, तर लहान मुलांची पुस्तके कायमच छापील स्वरुपात अधिक विचारात घेतली जातात.
..
या सर्व बाबींचा वाचन सवयींवर म्हणून काही परिणाम जाणवतो का?
वाचन कमी होत आहे, ही ओरड सार्वत्रिक आहे. मात्र एक नक्की, की जाणीवपूर्वक वाचनसवयी लावल्या, तर वाचण्याची सवय वृद्धिंगत होत जाते. ब्रिटनच्या बाबतीत बोलायचे, तर एका सर्वेक्षणानुसार गेल्या महिनाभराच्या काळात ब्रिटनमध्ये ४० लाख मुले अशी आहेत, की ज्यांनी एकही पुस्तक वाचलेले नाही. त्याचवेळी डिजिटल माध्यमांमधून पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा विरोधाभास म्हणून जरी विचारात घेतला, तरी वाचन होतच आहे. त्यामुळे वाचनावर तसा परिणाम होत नाही, असे वाटते. छापील पुस्तकांपासून ते डिजिटल पुस्तकांपर्यंत, वाचन हे सुरूच राहते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागरचना अनुकूल राहण्याचा आरपीआयला विश्वास

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
@kuldeepjadhavMT

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत नुकतीच पार पडली. बहुतांश प्रभागांची रचना बदलली आहे. यापूर्वी उपनगरांमध्ये आणि मध्यवस्तीतील काही ठरावीक प्रभागांमध्ये दलित मतांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), भारिप बहुजन महासंघ आणि बहुजन समाज पक्ष यांची भिस्त होती. दलित समाजाचे प्राबल्य असलेल्या अनेक प्रभागांचे स्वरूप आता पालटले आहे. त्यामुळे दलित मतांवर भिस्त असणाऱ्यांना विजयाचे गणित मांडताना परिश्रम घ्यावे लागण्याची शक्यता आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), भारिप बहुजन महासंघ आणि बहुजन समाज पार्टी या राजकीय पक्षांचे अस्तित्व बऱ्यापैकी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये व दलित वस्तीमध्ये आहे. त्यामध्ये लोहियानगर, कासेवाडी, महात्मा फुले पेठ, रामटेकडी, सय्यदनगर, अप्पर-इंदिरानगर, मोमीनपुरा, येरवड्यातील लक्ष्मीनगर झोपडपट्टी, नागपूर चाळ, जनता वसाहत, लक्ष्मीगर (सहकार नगर), तळजाई, बोपोडी, कोंढव्याच्या काही भागाचा समावेश आहे. वास्तविक, २०१२मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत केवळ प्रभाग क्रमांक चारमध्ये ‘आरपीआय’चे दोन नगरसेवक निवडून आले होते. बाकीच्या पक्षांना खातेही उघडता आले नव्हते. यंदाची प्रभाग रचना त्याहून विचित्र आहे. त्यामुळे अन्य पक्षाशी हात मिळवणी करण्यावर या पक्षांचा भर असू शकतो. अनुसूचित जाती-जमातीसाठी एकूण २४ जागा आरक्षित आहेत.
प्रभाग रचनेत दलितांचे प्राबल्य असलेल्या भागाला अन्य भाग जोडण्यात आल्याने, दलितांचा प्रभाव कमी होणार नाही. उलट आम्हाला अपेक्षित असलेल्या प्रभागांपैकी ८० टक्के प्रभागात अनुकूल वातावरण असल्याचे आरपीआयचे पदाधिकारी सांगत आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत आरपीआय, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीसह रिंगणात उतरले होते. यंदा आरपीआय भाजपसोबत असेल, असे पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आरपीआय भाजपसोबत गेल्यास त्यांना ‘कमळा’चे बळ मिळू शकते. प्रभागांच्या विस्ताराचा भारिप बहुजन महासंघ व बसपा यांच्यावर काहाही परिणाम होणार नसल्याचा दावा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. मात्र, महापालिकेच्या गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास ही रचना त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.
प्रभाग रचना व आरक्षण सोडतीनंतर लगेच इच्छकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, अद्याप युती-आघाडीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आरपीआयने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आरपीआयचे अन्य गट, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी हे पक्ष कोणासोबत जाणार किंवा स्वतंत्र निवडणूक लढविणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे सध्या तरी या पक्षांचा स्वतंत्र विचार करता ही प्रभाग रचना या पक्षांना फारशी अनुकूल नसल्याची चर्चा आहे.
............
नवीन प्रभाग रचनेनुसार अस्तित्त्वात आलेले ८० टक्के प्रभाग आमच्यासाठी अनुकूल आहे. या प्रभाग रचनेचा आम्हाला फायदाच होईल. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही भाजपसोबत ही निवडणूक लढविणार आहोत.
महेंद्र कांबळे, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसला विश्वास पुनरागमनाचा

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com
@prashantAherMT

पुणे : शहरातील खड्डे आणि ‘बीआरटी’वर शरसंधान करून सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेस संपवण्याचा विडा उचलल्याचे चित्र दिसत आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर शहर काँग्रेसला भरभक्कम नेतृत्त्व न मिळाल्याने पक्षाची वाताहत झाली आहे. तरीही पुणे आणि काँग्रेस हे एक घट्ट नाते असून, येत्या निवडणुकीतही काँग्रेस आपला प्रभाव दाखवेल, असा विश्वास स्थानिक नेतृत्वाला आहे.
महापालिकेच्या २००७च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला खड्ड्यांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या तोंडावर कलमाडी यांनी ‘बीआरटी’चे उद् घाटन केले. या ‘बीआरटी’विरुद्ध राष्ट्रवादीने रान पेटवून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एका जागेचा फरक पडूनही राष्ट्रवादी पालिकेतील सर्वांत मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीने पुणे पॅटर्न करूत पुण्याच्या विकासाची हाक दिली. हा पॅटर्न जेमतेम विधानसभा निवडणुकांपर्यंत टिकला. माजी उपमुख्यमंत्री ​अजित पवार यांनी कलमाडी यांच्या निवासस्थानी जाऊन ‘डिनर डिप्लोमसी’द्वारे मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे स्पष्ट केले. कलमाडी यांच्यावर २०१०मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि २०१२ च्या पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोकळे रान मिळाले. ते सत्तेवर आले. या दहा वर्षांच्या काळात राष्ट्रवादीने प्रामुख्याने काँग्रेसची कोंडी करण्याचाच प्रयत्न केला. या प्रयत्नांना भाजपची फूस राहिली.
आगामी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये प्रमुख लढत असल्याचे चित्र रंगविण्यात येत आहे. काँग्रेसमधील स्थानिक नेतृत्वाला पालिका निवडणुकीत सहा प्रभाग त्यांना अनुकूल (ए प्रभाग) आहेत तर, अन्य १० प्रभाग कमी अनुकूल असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांच्या या अंदाजानुसार आगामी निवडणुकीत २०१२च्या निवडणुकीप्रमाणे किमान २८ जागा तरी त्यांना मिळतील, असे सांगण्यात येत आहे.
..
समस्या नेतृत्त्वाची
कलमाडी यांच्यानंतर शहर काँग्रेसला भरभक्कम नेतृत्त्व मिळाले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यावर आपले लक्ष असल्याचे वारंवार दाखवले. ते मुख्यमंत्री असताना ते कायम पुण्यात येत होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आणि पुण्याच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे निराशेचे वातावरण निर्माण झाले. तरीही सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार उभे करू शकेल, असा एकमेव पक्ष सध्याच्या घडीला काँग्रेसच आहे. योग्य उमेदवारांना रिंगणात उतरवून निवडणूक जिंकण्यासाठी आटापिटा करेल, अशा नेतृत्वाची काँग्रेसला गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर्गत वाद सारून सेनेचे ‘है तय्यार हम’

$
0
0

Yogesh.Borate@timesgroup.com
@yogeshborateMT

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी बदललेल्या प्रभागरचनेमुळे शहरातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. शिवसेनाही त्याला अपवाद नसून, नव्या रचनेमुळे विद्यमान नगरसेवकांसमोरील बदलती समीकरणे लक्षात घेऊन बलाबल वाढविण्यासाठी सेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. पक्ष नेतृत्त्वाकडून सातत्याने मिळालेल्या संकेतांचा विचार करून शहर कार्यकारिणीने अंतर्गत मतभेद बाजूला सारून महापालिका निवडणुकीसाठी सर्व कसब पणाला लावले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना प्रभाव पाडण्यात अपयश आले आहे. २०१२च्या महापालिका निवडणुकीमध्ये कोथरूड, कोंढवा, येरवडा, चंदननगर, हडपसर, कात्रज परिसरातून सेनेच्या नगरसेवकांना चांगले मताधिक्य मिळाले. मात्र, २०१७च्या निवडणुकीसाठी या परिसरातील प्रभागांमध्ये मोठी फेररचना झाली आहे. येत्या निवडणुकीसाठी एकाच प्रभागातून एकाच वेळी चार उमेदवारांचा विचार पक्षाला करावा लागणार आहे. या बाबी पक्षनेतृत्त्वासाठी सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. प्रारूप प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर, तसेच इतर पक्षांमधून सेनेकडे वळणाऱ्या उमेदवारांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पक्षाकडून अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार असल्याचे पक्षांतर्गत पातळीवरून सांगितले जात आहे.
गेल्या काही काळातील सेनेच्या हालचालींचा विचार करता, शहरात पक्षाचे अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहमीप्रमाणे पुणे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळपास एकाच वेळी होणार असल्याने पक्षाचे मुंबईतील मोठे नेते या पुण्याकडे फिरकण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी शहरात पक्षाचे अस्तित्व दाखवून देणारे, जनसामान्यांना पक्षाचा विचार करायला लावणारे आणि या विचाराचे मतांमध्ये परिवर्तन करणारे उमेदवार जनतेसमोर आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीचे भवितव्य, तिकिटासाठी म्हणून का होईना, पण इतर पक्षांमधून सेनेकडे येऊ इच्छिणाऱ्यांची परिस्थिती आणि पक्षांतर्गत पातळीवरील धुसफूस शांत करण्यासाठी होणारे प्रयत्न शिवसेनेसाठी आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
000
कोणतेही बदल झाले, तरी शिवसेना तितक्याच ठामपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसैनिक कायमच कार्यरत असतात. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांना फार काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, ज्यांना जिंकायचे आहे; त्यांना कारणे देण्याची कोणतीही गरज नसते. सेनेकडे उमेदवारांची कोणतीही कमतरता नाही. भाजप'सोबतच्या युतीचा निर्णय पक्षप्रमुख घेतली.
शशिकांत सुतार, शिवसेना उपनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षांतर्गत गटबाजीचे मनसेसमोर आव्हान

$
0
0

नवी प्रभागरचना पक्षाला अनुकूल नसल्याची चर्चा

Prasad.Panse@timesgroup.com
@prasadpanseMT

पुणे : गेल्या महापालिका निवडणुकीत सर्वांचे अंदाज चुकवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २९ नगरसेवक निवडून आणून इतिहास घडवला. अर्थातच त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी आणि पक्षातून काही नेते वाहून गेले. नव्या प्रभागरचनेत मनसेच्या विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग जाणीवपूर्वक तोडल्याची चर्चा असली, तरी येत्या निवडणुकीत मनसे फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.
दहा वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत पक्षाचे अवघे नऊ नगरसेवक होते. विधानसभा निवडणुकांमध्येही पक्षाचे १३ आमदार निवडून आले. तेव्हा पक्षही तुलनेने नवीन होता. परंतु, या पाच वर्षांच्या कालावधीत या नगरसेवकांची कामगिरी लक्षवेधक ठरली. शहरातील काही महत्त्वाच्या विषयांवर पक्षाने घेतलेली भूमिकाही पुणेकरांनी लक्षात ठेवली. आणि त्याचा परिणाम पुढल्या महापालिका निवडणुकांमध्ये दिसून आला. भल्याभल्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकवत मनसेला २९ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले.
कोथरूड, कर्वेनगर, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, कात्रज या भागांमध्ये पक्षाचे पॅनेल विजयी झाले. तर मध्यवर्ती पेठांमध्येही पक्षाने लक्षणीय यश मिळवले. त्यामुळे यंदाही पक्षाला मोठ्या आशा आहेत. परंतु, नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभागरचनेत मनसेच्या नगरसेवकांच्या वॉर्डाचे तुकडे पडले आहेत. काहींचे वॉर्ड दोन प्रभागांमध्ये तर, काहींचे चक्क तीन प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे ही नवी प्रभागरचना पक्षासाठी फारशी अनुकूल नसल्याचे प्राथमिक चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षाला सपाटून मार खावा लागला. विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळच्या १३ आमदारांच्या तुलनेत अवघा एकच आमदार विजयी झाला. गेल्या महापालिकेच्या कार्यकाळात अवघे नऊ नगरसेवक असताना असणारा दबदबा २९ नगरसेवक असूनही राहिला नाही. त्यातच पक्षांतर्गत गटबाजी आणि भवितव्याच्या चिंतेने अनेकजण पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या बेतात असल्याचे समजताच त्यांची कानउघडणी झाली. पक्षाच्या कार्यकारिणीत आणि पदांमध्येही महत्त्वाचे बदल झाले. त्यामुळे काही काळ गळती थांबली असली, तरी पक्षांतरबंदी कायद्यामुळे अनेक नगरसेवक पक्षात टिकून असले, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काहींचा सेनेत, तर काहींचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.
प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर पक्षाची बैठक झाली. या बैठकीत प्रभागरचनेबाबत आक्षेप, हरकती नोंदविण्याचेही निश्चित झाले. त्याचबरोबर प्रभागरचना कशीही असली, तरी आपले कार्यकर्त्यांचे जाळे भक्कम करून निवडणुकीत यश मिळविण्याचा निर्धार मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याला पुणेकर कशी साध देतात, यावर मनसेचे रेल्वे इंजिन रूळांवरून धावणार की रूळावरून घसरणार हे ठरेल.
..
सत्तेचा वापर करून भाजपने आपल्याला अनुकूल प्रभागरचना केली आहे. मनसेच्या नगरसेवकांचे वॉर्ड जाणीवपूर्वक फोडण्यात आले आहेत. मात्र, निवडणुकीचा निकाल जनता ठरवेल. नगरसेवकांची कामगिरी, राज ठाकरेंची जादू आणि सर्वसामान्य मनसैनिकांची ताकद या बळावर आम्ही जनतेसमोर जाण्यास सिद्ध आहोत.
अजय शिंदे, शहराध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंडखोरी रोखण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान

$
0
0

तिकीटवाटप करताना नेत्यांचा कस लागणार

Chaitanya.Machale@timesgroup.com
@ChaitanyaMt

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह निवडणूक लढविण्यास इच्छुकांनाही जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. पालिकेची निवडणूक दोन ऐवजी चार सदस्यीय प्रभागपद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने सर्वच प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे तिकीटवाटप करताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असतानाही शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे शहरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थानिक पातळीवर सत्ता आल्याशिवाय तरणोपाय नाही, याची जाणीव झाल्याने भारतीय जनता पक्षाने पालिकेवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी चार सदस्यीय प्रभागांची खेळी केली आहे. त्यामुळे भाजपवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने प्रभागरचना प्रसिद्ध केल्यानंतर या टीकेमध्ये तथ्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे पालिकेच्या राजकारणात सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मध्यवर्ती भाग असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघासह कोथरूड, पर्वती या मतदारसंघांमध्ये अस्तित्व दाखविण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. शहराच्या उपनगरांमध्ये गेली अनेक वर्षे प्राबल्य असल्याने प्रभागरचनेत बदल झाला तरी, त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल, असा दावा वरिष्ठ पदाधिकारी करीत आहेत.
खराडी, विमाननगर, बाणेर, बालेवाडी, औंध, मुंढवा, वानवडी, हडपसर, बावधन, कोथरूड डेपो, येरवडा, धनकवडी, आंबेगाव पठार या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. प्रभागरचने यातील अनेक भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यातच काही प्रभागांमध्ये आरक्षणांनी घात केल्याने एका प्रभागातून एक अथवा दोनच व्यक्तींना संधी मिळू शकते. विद्यमान नगरसेवक असलेल्या दोनपैकी एकाच नगरसेवकाला पक्षाने निवडणुकीसाठी संधी दिल्यास दुसरा नाराज झालेला नगरसेवक उमेदवारी मिळविण्यासाठी इतर पक्षात जाऊ शकतो. उपनगरांमध्ये भाजपला सक्षम उमेदवार मिळण्यास अडचणी असल्याने विद्यमानांपैकी काही नगरसेवक गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीमधील विद्यमान नगरसेवकांना तसेच जुन्या निष्ठावंतांना फोडण्याची तयारी भाजपने आरंभली आहे. त्यामुळे पक्षातील नाराजांची समजूत काढून बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीला पेलावे लागणार आहे.
..
स्वतंत्र प्रचार यंत्रणेवर भर
राष्ट्रवादीला पालिकेतील सत्ता कायम टिकवायची असेल, तर अन्य पक्षांतील सक्षम उमेदवारांना पक्षात आणण्यासाठी कंबर कसावी लागेल. पालिकेत सर्वाधिक पक्षीय बलाबल निर्माण करण्यासाठी मोठ्या संख्येने नगरसेवक विजयी होणे आवश्यकता आहे. बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीला स्वतंत्र प्रचार यंत्रणाही उभारावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर

$
0
0

कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगरवर अधिक भर

Suneet.Bhave@timesgroup.com
@suneetMt

पुणे : केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाने पाहिले होते. त्याचदृष्टीने चार सदस्यीय प्रभाग, अनुकूल प्रभागरचना अशा गोष्टी त्यांनी पदरात पाडून घेतल्या आहेत. भाजपने जाणीवपूर्वक या गोष्टी केल्याचा आरोप विरोधकांतर्फे केला जात असला, तरी महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रभागरचना भाजपला झुकते माप देणारीच आहे, यात शंकाच नाही.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई वगळता इतर ठिकाणी होणाऱ्या महापालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने (चार सदस्यांचा एक प्रभाग) घेण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. केंद्र आणि राज्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सत्ता प्राप्त करण्याच्या हेतूनेच हा राजकीय निर्णय घेतला गेला. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रा-रूप प्रभागरचनेमुळे तर भाजपने स्वतःला फायदेशीर रचना करून घेतल्याचे जाहीर आरोप सुरू झाले आहेत. त्यावरून होणारे राजकीय नाट्य बाजूला ठेवले, तरी प्रभागांची नवी रचना इतर पक्षांच्या तुलनेत भाजपसाठी अधिक फायदेशीर ठरणारी आहे. विशेषतः भाजपचे हक्काचे मतदारसंघ असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेली प्रभागरचना पूर्णतः त्यांच्या उमेदवारांना लाभदायी ठरणारी आहे.
परीक्षेमध्ये एखाद्या अवघड जाणाऱ्या विषयात कमी गुण पडणार असले, तर आवडीच्या विषयात पैकीच्या पैकी (किंवा किमान ९० पेक्षा अधिक) गुण मिळवायचा प्रयत्न केला जातो. नव्या प्रभागरचनेतून भाजपने नेमके हेच साध्य केले आहे. वडगावशेरी, हडपसर आणि पुणे कँटोन्मेंट अशा मतदारसंघांतून कमी उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट असल्याने कसबा, कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगर या मतदारसंघांवर अधिक भर देण्यात आला आहे. या मतदारसंघांतील प्रभागांची रचना भाजपला ७० टक्क्यांपेक्षा अधिक अनुकूल आहे. काही ठिकाणी नवीन चेहरा शोधण्यासाठी धडपड करावी लागणार असली, तरी पक्षात गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेले ‘इनकमिंग’ पाहता, ही अडचणही भाजप दूर करू शकेल, अशी शक्यता आहे.
कसबा, कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगर या चार मतदारसंघांतील १९ प्रभागांमधून ७६ नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. पारंपरिक दृष्टीने या ठिकाणी भाजपला नेहमीच मोठे यश मिळत आले आहे. त्यामुळे, आगामी पालिका निवडणुकीतही या चार मतदारसंघातून किमान ‘डिस्टिंक्शन’ (७० टक्क्यांहून अधिक) मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजपला या चार मतदारसंघात अपेक्षेनुसार यश मिळाले, तर, उर्वरित चार मतदारसंघांमध्ये ‘काठावर पास’चा शिक्काही त्यांना सहज सत्तेपर्यंत नेऊ शकतो. आजमितीस तरी शिवसेनेशी युती होईल का, हे सांगता येण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे, युती झालीच तर कदाचित या संख्येमध्ये थोडीफार वाढ होऊ शकते.
................
सर्व मतदारसंघात भाजपला अनुकूल स्थिती आहे. प्रत्येक प्रभाग सुमारे ८०-८५ हजार लोकसंख्येचा असल्याने केवळ प्रभाग म्हणून विचार न करता, यापुढे मतदारांना संपूर्ण शहरासाठी विचार करण्याची संधी मिळाली आहे.
योगेश गोगावले,
शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गस्तीच्या पोलिसावर मद्यपीचा हल्ला

$
0
0

पुणेः कसबा पेठेतील नव्याने होत असलेल्या महापालिकेच्या बागेत गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात बिअरची बाटली घातल्याचा धक्कादायक प्रकार रात्री शनिवारी रात्री घडला. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर जखमी असून, त्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तपास करून फरासखाना पोलिसांनी तिघांना पकडले आहे. प्रदीप अरुण राळे असे जखमी झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राळे फरासखाना पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्यांची व पोलिस शिपाई गिरीश पाटील यांची शनिवारी साततोटी पोलिस चौकीच्या बीट मार्शलवर रात्रपाळी होती. फरासखाना पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे यांनी त्यांना कसबा पेठेतील अलोकनगरी इमारतीच्या बाजूला नव्याने तयार होत असलेल्या महापालिकेच्या बागेत दारू पीत बसणाऱ्यांवर व अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे राळे व पाटील त्या ठिकाणी गस्त घालत गेले. गार्डनच्या आतमध्ये गेल्यानंतर सुरक्षारक्षकाच्या खोलीत तीन ते चार व्यक्ती बसल्याचे दिसून आले. त्यातील जर्कीन घातलेल्या एका व्यक्तीला पकडण्याचा राळे यांनी प्रयत्न केला. पण, तो हिसका देऊन भिंतीवरून खाली उतरला. त्या वेळी त्याने फेकून मारलेली बिअरची बाटली राळे यांच्या कपाळावर बसली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात मुसळधार पाऊस, मोठी वाहतूक कोंडी

$
0
0

मटा ऑनलाइन। पुणे

काही दिवस दडी मारलेल्या परतीच्या पावसाने पुण्यात पुन्हा जोरदार हजेरी लावत पुणेकरांची दाणादाण उडवून दिली आहे. मुसळधार पावसामुळे अवघ्या काही मिनिटांत अनेक ठिकाणी पाणी साचले.

ठिकठिकाणी पाणी साचल्याने विद्यापीठ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी संचेती हास्पिटलपासून म्हसोबा गेटपर्यत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. याबरोबर शिवाजीनगर कोर्ट परिसरातही ठिकठिकाणी पाणी साचले आहे.



या मुसळधार पावसाचा फटका आरटीओ चौक, शनिवार वाडा परिसर, वाकडेवाडी डेक्कन परिसरालाही बसला आहे. या परिसरातही पावसाचे पाणी साचून वाहतूक कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हानाची शर्यत सुरू

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचे कडवे आव्हान

Sunil.Landge@timesgroup.com
Tweet : @sunillandgeMT

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रा-रूप प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सत्तेसाठी आव्हानाची शर्यत सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पक्षाने कडवे आव्हान दिल्यामुळे लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रा-रूप प्रभागरचनेत भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केल्यानंतर या दोन्ही पक्षांत आरक्षणाची सोडत होण्यापूर्वीच जुंपली होती. त्याच वातावरणात आरक्षण सोडत जाहीर झाली. प्रा-रूप प्रभागरचनेच्या आराखड्याची अधिसूचनाही निघाली. आता हरकती आणि सूचनांसाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्याबाबतचे चित्र त्या-त्या वेळी स्पष्ट होईल. परंतु, पहिल्या टप्प्यात सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जणू रंगीत तालीमच अनुभवयास मिळाली. एकहाती सत्तेची हॅटट्रिक होण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे. तर, लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिकेची सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न भाजप पाहत आहे. अंतर्गत मतभेद विसरून शिवसेना आणि काँग्रेस हे पक्षही सत्तेच्या शर्यतीत मागे राहणार नाही, अशी अपेक्षा बाळगून आहेत.

बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक निश्चित झाल्यानंतर प्रभाग रचना कशी होते? याबाबत उत्सुकता होती. शिवाय प्रशासकीय भूमिकेबाबतही साशंकता व्यक्त झाली. राज्य तसेच देशाच्या निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्या. त्यासंदर्भात आयोग भूमिका स्पष्ट करेलच. परंतु, या माध्यमातून निर्माण झालेले राष्ट्रवादी आणि भाजपमधील शीतयुद्ध चालूच राहणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती सत्तेला हादरा देण्याचे सामर्थ्य भाजप-सेना युती बाळगून आहे. निवडणुकीसाठी युती होणार किंवा नाही याचे भाकीत आता करता येणार नाही. परंतु, ‘राष्ट्रवादी’ला एकहाती सत्तेपासून दूर ठेवण्याचे समान ध्येय दोन्ही पक्षांचे आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून भाजपला दमदार नेतृत्त्व लाभले आहेच. त्यांना आमदार महेश लांडगे यांची साथ मिळावी, यादृष्टीने कमालीचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील आग्रही आहेत. तसे झाल्यास जगताप-लांडगे हे एकेकाळचे ‘राष्ट्रवादी’चे शिलेदार दुसऱ्या पक्षात जाऊन सत्तेच्या बुरूजावर हल्ला करणार आहेत. ‘राष्ट्रवादी’त असताना शिकलेले डावपेच त्यांच्या मदतीला येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर आझमभाई पानसरे, योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे या स्थानिक नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे.

प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीनंतर चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या दोन्ही मतदारसंघातील यशावरूनच सत्तेची गणिते निश्चित होतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. आमदार जगताप आणि लांडगे यांनी भविष्यात हातात हात घालून काम केल्यास ‘राष्ट्रवादी’ला निश्चितच कडवे आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे लांडगे आमचेच असल्याचा दावा हा पक्ष करीत आहे. सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. त्याला मतदार कसे प्रतिसाद देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images