Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पायाभूत चाचण्यांच्या मूल्यमापनावर आक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचण्यांच्या मूल्यमापनावर थेट आक्षेप घेण्यात आले आहेत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना उत्तरे सोडवण्यासाठी केली जाणारी मदत, अधिकाऱ्यांकडून शाळांना खालची श्रेणी देण्याला होणारा विरोध आदी बाबी ‘प्रगत’ महाराष्ट्राचे आभासी चित्रण करत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

पायाभूत चाचण्यांमधील गैरप्रकार आणि शालाबाह्य मुलांची आकडेवारीविषयी शिक्षणविषयक अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्राद्वारे आपली भूमिका मांडली आहे. कुलकर्णी यांनी हे पत्र माध्यमांसाठी खुले केले आहे. त्यातून पायाभूत चाचण्यांविषयीचे मुद्दे समोर आले आहेत. राज्यातील शालाबाह्य मुलांची आकडेवारी, केंद्राच्या तुलनेत असणारे प्रमाण, प्रत्यक्ष मोजणीतून समोर आलेले आकडे आणि शालाबाह्य मुलांची शाळेमध्ये नोंदणी झाल्यानंतरच्या काळातील परिस्थिती आदी मुद्द्यांवरही या पत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे.

या पत्रामध्ये नमूद मुद्द्यांनुसार, राज्यात येत्या १९ आणि २० ऑक्टोबरला पायाभूत चाचण्या घेण्यात येणार आहेत; मात्र या चाचण्यांच्या पूर्वानुभवानुसार, आपल्या वर्गात कोणीही अप्रगत दिसू नये, यासाठी अनेकदा शिक्षक मुलांना उत्तरे सांगत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांना खालचा दर्जा देऊ नका, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे पायाभूत चाचण्यांसाठी बाहेरच्या शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून पाठवणे गरजेचे आहे. यापूर्वी झालेल्या चाचण्यांचेही पुनर्मूल्यांकन व्हायला हवे. पायाभूत चाचण्या अधिक वस्तुनिष्ठ व्हाव्यात, अशी अपेक्षाही कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

000

‘शालाबाह्यां’चे काय झाले ?

२०११च्या जनगणनेनुसार, राष्ट्रीय पातळीवर आठ कोटी ४० लाख मुले शालाबाह्य असल्याचे मान्य करण्यात आले आहे. शालाबाह्य मुलांच्या केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा कित्येक पट मोठा आहे. राज्यामध्येही अशीच परिस्थिती आहे. राज्याने पहिल्या टप्प्यात ५५ हजार, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये १० हजार शालाबाह्य बालके शोधली. देशाच्या एकूण संख्येच्या तुलनेत ही संख्या वास्तवदर्शी आहे का, असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारने शोधलेल्या ६५ हजार शालाबाह्य बालकांचे पुढे काय झाले, हे शोधण्याची गरज असल्याचेही त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे. ही मुले केवळ पटावर आली; मात्र ती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. हा प्रकार शोधून काढण्यासाठी राज्यात गोपनीय तपासणी मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले आहे. पहिली ते आठवीच्या पातळीवर पायाभूत चाचणीमधील गैरहजर विद्यार्थी शालाबाह्य असण्याची दाट शक्यता आहे. चाचणीला गैरहजर असणारे कायम गैरहजर असतात का, याचा अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. नववीच्या वर्गाची काटेकोर पडताळणी व्हावी, अशा सूचनाही कुलकर्णी यांनी या पत्रात केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बॉसच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘डीएचएफएल’ फायनान्स कंपनीतील महिला क्रेडिट मॅनेजरने ​वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या त्या वरिष्ठांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वारजे परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहितेने गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेचा तपास वारजे पोलिस करत होते. महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार ‘डीएचएफएल’ कंपनीतील सूरज बुंदले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचे पती एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. संबंधित विवाहितेचा पती आठ सप्टेंबर रोजी घरी आला असताना घराचा दरवाजा बंद असल्याचे आढळले होते. त्यांनी शेजारील व्यक्तींच्या मदतीने दरवाजा उघडला असता त्यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. लटकलेला मृतदेह काढण्यात येत असताना ​महिलेच्या मोबाइलवर आरोपीकडून सारखा फोन येत होता. तिच्या पतीने तो फोन उचलला आणि ‘माझी पत्नी गेली,’ असे सांगून फोन कट केला होता, असे वारजे पोलिसांनी सांगितले.

आरोपी बुंदलेने विवाहितेला सारखे फोन करून त्रास दिला असल्याची तक्रार तिच्या पतीने केली आहे. या मोबाइलवर आरोपीचे बरेच मिस्ड कॉल आढळले आहेत. विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी पलंगाजवळ ​सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ‘मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. यात माझ्या कुटुबीयांना दोषी धरू नये,’ असे त्यात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाणकामगारांसाठी विशेष हेल्मेट

$
0
0

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे संशोधन; सरकारकडून दुर्लक्ष

Harsh.Dudhe@timesgroup.com
Tweet : @HarshDudheMT

पुणे : कोळसा खाणीतील कामगारांचे विषारी वायूमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी तीन इंजिनीअर मित्रांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने ‘इंटेलिजंट हेल्मेट’ तयार केले आहे. हे हेल्मेट कामगारांनी सरकारमार्फत वापरावे, यासाठी हे मित्र काही दिवसांपासून प्रयत्न करत असून त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यांनी या हेल्मेटची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडण‍वीस, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंतही पोहोचवली; मात्र त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. एकीकडे ‘मेक इन इंडिया’ व ‘स्टार्टअप इंडिया’ अशा उपक्रमांचे ढोल वाजवायचे आणि दुसरीकडे नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे, असेच चित्र यावरून दिसून येत आहे.

वर्धा येथील दत्ता मेघे इंजिनीअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रनिक्स शाखेचे आनंद दांदळे, अभिलेश चौरे, अनुराग भंडारवार या माजी विद्यार्थ्यांनी २०१५-१६मध्ये अंतिम वर्षाला असताना प्रोजेक्ट म्हणून ‘इंटेलिजंट हेल्मेट’ तयार केले. त्यासाठी त्यांनी चंद्रपूरच्या केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डच्या अखत्यारीत येणाऱ्या महाकालिका कॉलरी या खाणीत प्रत्यक्ष काही दिवस जाऊन प्रोजेक्टचा अभ्यास केला. कामगारांचे अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर हे हेल्मेट तयार केले. या हेल्मेटमध्ये सेन्सर्स, डिजिटल स्क्रीन, सर्किट बोर्ड, बॅटरी, बझर अशा साध्या उपकरणांचा वापर केला आहे. हे हेल्मेट प्रत्यक्षात वापरण्यासाठी खाणीमध्ये रीपिटर्स लावावे लागतात. या रीपिटर्सची रेंज सध्या १०० मीटर असून, कालांतराने त्यात वाढ करता येईल.

कामगारांना खाणीत काम करताना हे हेल्मेट डोक्यात घालून काम करायचे आहे. खाणीत विषारी वायू असतील, तापमान-आर्द्रता यांमध्ये बदल झाला किंवा वातावरण कोंदट झाले, तर त्यातील सेन्सरच्या प्रणालीमुळे माहिती डिजिटल स्क्रीनवर मिळेल. त्यानंतर कामगारांना बझरचा आवाज होऊन धोक्याची सूचना मिळणार आहे. त्यामुळे पुढील अपघाताचा अनर्थ टळणार आहे. हे हेल्मेट तयार करण्यासाठी साधारण दहा हजार रुपये खर्च येतो. सध्या कोळसा खाणीतील कामगारांचे वायूगळतीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे या हेल्मेटमार्फत विषारी वायूंची माहिती आधीच समजून दुर्घटना अथवा कामगारांचे मृत्यू रोखता येणार असल्याचे आनंद याने सांगतले.

.......

प्रतिसाद नाही
‘इंटेलिजंट हेल्मेट’ची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडण‍वीस, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत ई-मेलद्वारे पोहोचवली; मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या योजनांमधूनही मदत झालेली नाही. या हेल्मेटमुळे कोळसा खाणीत विषारी वायूमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी निश्चित मदतच होणार आहे. केंद्र सरकारने हे हेल्मेट कामगारांना वापरायला दिल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी ते महत्त्वाचे ठरेल. केंद्र सरकारने अशा प्रकारचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास नवे संशोधक घडतील, असे आनंदने सांगितले. हेल्मेटच्या शोधनिबंधाचे सादरीकरण दिल्लीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत करण्यात आले. दुबईतील परिषदेतूनदेखील सादरीकरणाबाबत निमंत्रण आले होते; मात्र पैसे नसल्याने तेथे जाऊन सादरीकरण करता आले नसल्याचे आनंदने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकांच्या 'पेठे'त वाचू आनंदे

$
0
0


पुण्याचे वाचनसंस्कृतीशी अजोड असे नाते आहे; पण वाचन संस्कृती फुलवणारी पुस्तकांची दालने शहरभर नाहीत, हेही तितकेच खरे. पुस्तकांच्या दालनांचे अप्पा बळवंत चौकातून विकेंद्रीकरण फारसे झालेले नाही. डेक्कन जिमखान्याकडून पुढे कोथरूड, चांदणी चौकाकडे जाताना पुस्तकाचे एकही दालन लागत नाही. स्मार्ट म्हणून उदयास आलेल्या या भागात पुस्तकांची ‘पेठ’ आकार घेत असून, आयडियल कॉलनी येथे सुरू होणाऱ्या ‘पुस्तक पेठ - वाचू या आनंदे!’ या दालनाने ही कसर भरून निघणार आहे. ख्यातनाम लेखक रंगनाथ पठारे व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘पुस्तक पेठ’चे उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने ‘पुस्तक पेठ’चे प्रमुख माधव वैशंपायन व संजय भास्कर जोशी यांच्याशी चिंतामणी पत्की यांनी साधलेला संवाद.

..................

पुस्तकांचे दालन का काढावेसे वाटले?

वैशंपायन : मी वयाच्या विसाव्या वर्षापासून पुस्तकांचा संग्रह करत आहे. व्यक्तिगत संग्रहात जवळपास हजार पुस्तके झाली आहेत. बँकेतील ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालो. पुस्तकांचे वेड स्वस्थ बसू देत नव्हते. पुस्तकांमध्ये जीव अतोनात रमतो; मग वाचनसंस्कृतीसाठी आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून काही का करू नये, या विचारातून हा निर्णय पक्का केला.

पुस्तक पेठेची संकल्पना कशी सुचली?

जोशी : सदाशिव, नारायण पेठेतील वैभव कोथरूड भागात स्थलांतरित झाले; पण पुस्तकांचे वैभव या भागाला लाभले नाही. डेक्कन जिमखान्याच्या पुढे पुस्तकांचे एकही प्रशस्त दालन नाही. या विचारातून व्यावसायिक या शुद्ध हेतूने वाचन संस्कृतीसाठी हातभार लावण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातूनच ही संकल्पना सुचली.

‘पुस्तक पेठ’चे स्वरूप कसे असेल?

वैशंपायन : पुण्यात अनेक पेठा आहेत; पण पुस्तकांची पेठ नाही. पुस्तक पेठेतून आम्ही ही उणीव भरून काढणार आहोत. प्रशस्त जागा, सौंदर्यपूर्ण रचना, पुस्तक वाचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, जोडीला हळुवार संगीताचे स्वर, बाहेर प्रशस्त अंगण व झाडी अशी पुस्तक पेठेची रचना असेल. पुस्तक पेठेत वाचकाचे कायम स्वागत असेल. येथे बसून विविध पुस्तके वाचता येतील. विकत घेण्याची सक्ती केली जाणार नाही.

कशा प्रकारचे साहित्य उपलब्ध असेल?

वैशंपायन : मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील दर्जेदार साहित्य आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. बालसाहित्याचा वेगळा विभाग असेल. तरुणांना पुस्तकांकडे खेचण्याचा प्रयत्न राहील. तरुण, मध्यमवयीन, तसेच ज्येष्ठांना आवडतील अशी पुस्तके या पेठेत असतील. यासाठी सर्व प्रकाशकांचे सहकार्य मिळणार आहे.

पुस्तक पेठेच्या अनुषंगाने साहित्यिक उपक्रम राबविणार आहात का?

जोशी : वाचनसंस्कृतीसाठी मी गेली दहा वर्षे झटत आहे. लेखक असल्यामुळे या क्षेत्रातील अनेक जण चांगले मित्र आहेत. याचा फायदा करून घेऊन पुस्तक पेठेत विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील. वाचक व लेखक या पेठेच्या केंद्रस्थानी असतील. सांस्कृतिक मेजवानी रसिकांना अनुभवता येईल. लेखक, कवींच्या भेटीगाठी असे कार्यक्रम आवर्जून होतील.

पुस्तकांच्या बाजारपेठेविषयी तुमचे निरीक्षण काय आहे?

वैशंपायन : आपल्याकडे प्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांचे संबंध अव्यवहारिक पातळीवरचे आहेत असे वाटते. त्यामध्ये शुद्ध व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो. आमचा प्रयत्न नेमका उलटा असेल. बँक, कार्पोरेट क्षेत्रातील अनुभव आम्ही त्यासाठी कामाला लावू; पण व्यावसायिकतेशी तडजोड करणार नाही. पारदर्शी कारभार हे वैशिष्ट्य असेल.

वाचन संस्कृतीबद्दल काय वाटते?

जोशी : वाचन संस्कृती लयाला गेल्याची ओरड केली जाते; पण ते खरे नाही. साहित्याला मोठे भवितव्य आहेच. साहित्याला उन्नत करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. आपल्याकडे पुस्तक व्यवसायात स्पर्धा नाही. स्पर्धा निर्माण झाली तर वाचकाला योग्य सेवा मिळू शकते. जीवनात पुस्तकांची अपरिहार्यता निर्माण करायला आपण कमी पडलो आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूरफवारणीत अडथळे

$
0
0

पालिकेकडील मशीन जुनी असल्याने समस्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेंगी, चिकुनगुनियाचा शहरात उद्रेक होत असताना डास नियंत्रणासाठी धूर व औषध फवारणीची अद्ययावत मशीनच पालिकेच्या आरोग्य खात्याकडे नसल्याचे उघडकीस आले. उपलब्ध मशीन जुनी असून, ती वारंवार बंद पडत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहे. जुनी मशीन वारंवार बंद पडतात. परिणामी, धूरफवारणीत अडथळे निर्माण होत आहेत.

डेंगी, चिकुनगुनियाचा प्रसार करणाऱ्या डासांची अंडी शहरातील घराघरांत, अडगळीच्या ठिकाणी सापडतात. त्या ठिकाणापर्यंत चांगल्या प्रकारे धूरफवारणी होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सध्या दोन प्रकारची मशीन उपलब्ध आहेत. ‘थर्मल फॉगिंग’ ही जुन्या प्रकारची, तर ‘अल्ट्रा लो व्हॅल्यूम’ (यूएलव्ही) ही दुसऱ्या प्रकारची मशीन आहेत. परंतु, जुनी मशीन दहा वर्षांपूर्वीची आहेत. सध्या आरोग्य खात्याकडे ६५ थर्मल फॉगिंग मशीन आहेत. त्यापैकी बहुतांश मशीन वारंवार बंद पडत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. चार मशीन यूएलव्ही प्रकारची असून, त्यापैकी एक मशीन नादुरुस्त आहे. धूरफवारणी करताना वापरल्या जाणाऱ्या ‘इलेक्ट्रिक कॉइल्स’ उपलब्ध होत नसल्याने मशीन बंद आहे.

थर्मल फॉगिंग मशीनमधून केल्या जाणाऱ्या औषध फवारणीवेळी बाहेर पडणारे औषधांचे कण मोठे असतात. त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याकरिता यूएलव्ही प्रकारची मशीन आवश्यक आहेत. परंतु त्या प्रकारची मशीन मोठी असल्याने गल्लीतील घरांमध्ये नेणे कठीण पडते. त्यासाठी थर्मल फॉगिंग मशीनचा वापर केला जातो. थर्मल मशीनमधून धूरफवारणी केल्यानंतर घराची दारे-खिडक्या अर्धा तास बंद ठेवणे आवश्यक असते. परंतु नागरिक कर्मचारी येण्यापूर्वीच घराची दारे-खिडक्या बंद करतात. फवारणीनंतर ते दारे-खिडक्या उघडून ठेवत असल्याने त्याचा फायदा होत नाही. घरात फवारणीचा धूर साठवून ठेवणे आवश्यक आहे. लोकसंख्येचा विचार करता या सर्व मशीनची संख्या अपुरी ठरत आहे.

‘महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे सध्या उपलब्ध थर्मल फॉगिंग मशीनपैकी ४२ मशीन नादुरुस्त आहेत. ती दुरुस्त करून घेण्यात येत आहेत. ‘यूएलव्ही’ प्रकारच्या एक मशीनमध्ये इलेक्ट्रिक कॉइल्स मिळत नसल्याने ते मशीन बंद आहे. जुन्या प्रकारची आणखी ५० मशीन नव्याने घेण्याचा प्रस्ताव आहे. यूएलव्ही प्रकारची आणखी आठ मशीन घेण्याचा प्रस्ताव आहे. या मशीनच्या खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे,’ अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.

.............................

डासांचा उद्रेक पाहता यूएलव्ही प्रकारच्या मशीनची आवश्यकता आहे. या मशीनमधून कीटकनाशकांच्या औषधांचे सूक्ष्मकण हवेत जास्त काळ राहतात. त्यामुळे डास नष्ट करण्यासाठी त्याचा फायदा होतो. हे मशीन मोठे असल्याने घरात नेता येत नाही. त्यासाठी थर्मल फॉगिंग मशीनचाही वापर आवश्यक आहे.

- डॉ. मुकुंद देशपांडे, कीटकशास्त्रज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामांवर कारवाईची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची प्रत्यक्ष नोटीस बजावण्यात येत असून, या बांधकामांवर लवकरच हातोडा टाकण्यात येणार आहे. या कारवाईअंतर्गत हिंजवडी व मांगडेवाडी भागातील अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी नोटीस चिकटवण्यात आली.

पीएमआरडीए प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्यांना नोटीस बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. अशा बांधकामांची पाहणी करताना अनधिकृत बांधकामांचे बिल्डर, जागामालक तसेच विकासक यांचे नाव आणि पत्ता मिळण्यात अडचणी येत होत्या. या बांधकामांवर प्रशासनाचे अधिकारी गेल्यावर संबंधित ठिकाणचे मजूर नोटीस स्वीकारण्यास नकार देतात. त्यामुळे या बांधकामांना नोटीस बजावण्याच्या अडचणी येत होत्या.

या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’चे आयुक्त महेश झगडे यांनी ‘एमआरटीपी अॅक्ट’नुसार अनधिकृत बांधकामांवर नोटीस ‘पंचनाम्याने डकवून’ ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात हिंजवडी भागातील चार आणि मांगडेवाडीमधील चार अनधिकृत बांधकामांवर नोटीस चिकटवली. ‘पीएमआरडीए’चे उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तसेच तहसीलदार विकास भालेराव, अर्चना पोळ यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. या नोटिशीवर संबंधित बिल्डरचे उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांदळाचे दर घटणार

$
0
0

उत्पादनवाढीमुळे व्यापाऱ्यांनी वर्तवला अंदाज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदा देशात तांदळाचे उत्पादन ९२० लाख टन एवढे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या दरात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली.

‘दर वर्षी उत्पादित तांदळापैकी ३०० लाख टन तांदूळ सरकारी योजनांसाठी वापरले जातात. १५० ते २०० लाख टन तांदूळ परदेशात पाठवण्यात येतात. उर्वरित तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. बासमती तांदळाची लागवड यंदा २० टक्क्यांनी घटली आहे. बासमतीचे इतर प्रकार बाजारात एक महिना आधीच दाखल होत आहेत. त्यात ११२१ जातीच्या बासमती तांदळाला परदेशातून अधिक मागणी आहे. त्यामुळे एक महिन्याआधीच हे तांदूळ उपलब्ध होतात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरात कोलम आणि उकड्या तांदळाची आवक सुरू होईल. कर्नाटकातून सोनामसुरी आणि मसुरी तांदळाची आवक सुरू होते,’ अशी माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.

पारंपरिक तांदळाची लागवड सप्टेंबरमध्ये केली जाते. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा येथून ११२१ जातीच्या तांदळाची आवक सुरू होणार आहे. त्यात २० टक्के उत्पादन अधिक होणार आहे. याच राज्यातून या वर्षी १५०९ हा बासमतीचा नवीन प्रकार पुढे आला आहे. परिमल तांदूळ ही जातही शेतकऱ्यांनी विकसित केली आहे. १५०९ या जातीच्या तांदळाला क्विंटलमागे ४००० ते ४२०० रुपये, तर परिमल तांदळाला २५०० ते २७०० रुपये दर मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढील हंगामात साखरेचा तुटवडा?

$
0
0

ऊस लागवडीखालील क्षेत्र घटण्याचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात आगामी गळीत हंगामात उसलागवडीखालील क्षेत्र घटणार असून, सुमारे १६० कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांच्या माध्यमातून सुमारे ५०.२१ लाख टन एवढीच साखर उत्पादित होणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे साखर आयुक्त विपिन शर्मा यांनी बुधवारी सांगितले. या अंदाजानुसार भविष्यात साखरेचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

गेल्या गळीत हंगामाचा आढावा आणि आगामी गळीत हंगामाची स्थिती याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना साखर आयुक्त शर्मा यांनी साखरेच्या भविष्यातील स्थितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘कृषी खाते आणि साखर आयुक्तालय यांच्या वतीने काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत. आगामी गळीत हंगामात उसाखालील क्षेत्रफळ सहा लाख ३३ हजार हेक्टर असणार आहे. गेल्या हंगामात हे क्षेत्रफळ नऊ लाख ८७ हजार हेक्टर होते. गेल्या हंगामात १७७ कारखाने सुरू होते. या वेळी सुमारे १६० कारखाने सुरू राहणार आहेत. गेल्या हंगामात साखरेचे उत्पादन ८४.१५ लाख टन झाले होते. या हंगामात हे प्रमाण ५०.२१ लाख टन होईल, असा अंदाज आहे.’

साखरेच्या विक्रीविषयी माहिती देताना शर्मा म्हणाले, ‘२०१४-१५मध्ये ८५ लाख टन साखरेची विक्री झाली होती. २०१५-१६मध्ये ७५ हजार ५०० लाख टन साखरेती विक्री झाली. आगामी हंगामात सुमारे ७२ लाख टन विक्री होऊन सुमारे ११ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे. सध्या ३२.७ लाख टन एवढा साखरेचा साठा आहे.’

............

६० कारखान्यांकडे साठा

‘राज्यात गेल्या हंगामात चाललेले १७७ कारखाने आणि मागील सात कारखाने अशा १८४ कारखान्यांमधून साखरेचे उत्पादन झाले. त्यापैकी ३७ टक्क्यांपेक्षा जास्त साखरेचा साठा ४४ कारखान्यांकडे आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त साठा असलेल्यांमध्ये १६ कारखाने आहेत. ३७ टक्क्यांपेक्षा जास्त साठा ठेवण्याबाबत केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे,’ असे शर्मा यांनी सांगितले.

................

ठळक बाबी

- १६४७१.६८ कोटी रुपये ‘एफआरपी’पैकी १६३४५ कोटी रुपये देण्यात आले.

- महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) १६४ कोटी रुपये वसूल. उर्वरित ९८ कोटी रुपये शिल्लक.

- १०३ कारखान्यांकडून सुमारे १८५० मेगावॉट वीजनिर्मिती. त्याद्वारे सुमारे ९५० कोटी रुपये कारखान्यांना मिळाले.

- १७ कारखान्यांचे परवाने रद्द.

- केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे ४५ रुपये प्रति टन अनुदान येणे बाकी आहे. त्यासाठी कारखान्यांनी ‘एफआरपी’ अडवून ठेवू नये, असे साखर आयुक्तांचे आदेश.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोतिबिंदूवरील उपचारांसाठी अद्ययावत तंत्र वापरा

$
0
0

आमदार विजय काळे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोतिबिंदूचे ऑपरेशन सुरक्षितपणे आणि अचूक होण्यासाठी आवश्यक अद्ययावत तंत्रांचा लाभ नागरिकांनी घ्यायला हवा, असे आवाहन आमदार विजय काळे यांनी केले.

राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेच्या (एनआयओ) औंध येथील दुसऱ्या हॉस्पिटलमधील मोतिबिंदू ऑपरेशन विभागाचे उद्घाटन आमदार काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. हॉस्पिटलचे संचालक आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. जाई केळकर, डॉ. योगेश चौगुले, डॉ. निखिल लाभसेटवार, ‘अमर बिल्डर्स’च्या संचालिका शुभांगी मांजरेकर, सिंध सोसायटीचे अध्यक्ष सुभाष संझगिरी आदी या वेळी उपस्थित होते.

‘मोतिबिंदूसारख्या विकारामुळे अंधत्व येते. परंतु ते टाळण्यासाठी नागरिकांना अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध होत असून, नागरिकांनी त्याचा फायदा करून घ्यावा,’ असे आमदार विजय काळे म्हणाले. डॉ. केळकर कुटुंबीयांविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले.

‘मोतिबिंदू ऑपरेशन विभागात ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक अद्ययावत फेम्टो लेसर मशीन, डोळ्यांच्या आतील कृत्रिम भिंगांचा आकार मोजण्यासाठी ऑप्टिकल बायोमीटर, याग लेसर, बुबुळाची माहिती घेण्यासाठी आवश्यक स्पेक्युलर मायक्रो मशीन, मोतिबिंदूचा सूक्ष्म छेद घेऊन केले जाणारे मशीन यांसारखे विविध अद्ययावत तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केले आहे. त्याचा पेशंटना फायदा होणार आहे,’ अशी माहिती डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रारूप प्रभागरचना जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना शुक्रवारी (सात ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. त्यावर दहा ते २५ ऑक्टोबरच्या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत.
प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच ती फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. या बाबीला भारतीय जनता पक्षाचे गलिच्छ राजकारण कारणीभूत असल्याचे म्हटले होते. प्रभाग रचना जाहीर करतेवेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, मनोज कांबळे यांनी आक्षेप नोंदविला. प्रारूप रचना जाहीर होण्यापूर्वी ती फुटल्याने गोपनीयतेचा भंग होत असल्याची तक्रार केली. त्यावर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी लेखी हरकत नोंदविल्यानंतर चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत १० ते २५ ऑक्टोबर दुपारी तीनपर्यंत राहील, असे स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील निवडणूक विभाग, अ, ब, क, ड, ई आणि फ कार्यालये या ठिकाणी हरकती, सूचना दाखल करता येणार आहेत. त्यासाठी डॉ. यशवंत माने (सहाय्यक आयुक्त), क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे (अ कार्यालय), सुभाष माछरे (ब कार्यालय), अण्णा बोदडे (क कार्यालय), चंद्रकांत खोसे (ड कार्यालय), चंद्रकांत इंदलकर (ई कार्यालय), मनोज लोणकर (फ कार्यालय) यांची नेमणूक करण्यात आली आहे.


प्रभाग क्रमांक, त्यामध्ये समाविष्ट भाग आणि (कंसात लोकसंख्या, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यानुसार) पुढीलप्रमाणे -

१ - तळवडे गावठाण, एमआयडीसी आयटी पार्क, शेलारवस्ती, चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरे वस्ती भाग, सोनवणे वस्ती, ज्योतिबानगर (एकूण - ५९,३४३, अनुसूचित जाती - ८,५७९, अनुसूचित जमाती - ७५५)

२ - चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, वुडस व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग (एकूण - ५७,६९४, अनुसूचित जाती - ७,५३४, अनुसूचित जमाती - ८२२)

३ - मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर, साई मंदिर परिसर, गोखले मळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोविसावाडी, चऱ्होली, डुडुळगाव (एकूण - ५१, ६२८, अनुसूचित जाती - ६,८२८, अनुसूचित जमाती - १,०७५)

४ - दिघी, गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर, कृष्णानगर, व्हीएसएनएल, गणेशनगर, रामनगर, बोपखेल गावठाण (एकूण - ५५,५३९, अनुसूचित जाती - ७,७९४, अनुसूचित जमाती - ४,२८६)

५ - रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत (एकूण - ४९,०४९, अनुसूचित जाती - ५,४३७, अनुसूचित जमाती - १,२१४)

६ - धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवे वस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन परिसर, सद्गुरूनगर (एकूण - ५३,१२०, अनुसूचित जाती - ४,७००, अनुसूचित जमाती - १,८००)

७ - शीतलबाग, सेन्चुरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डविक कॉलनी, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर, लांडेवाडी झोपडपट्टी (एकूण - ५६,८६५, अनुसूचित जाती - ७,३८५, अनुसूचित जमाती - ८२८)

८ - जय गणेश साम्राज्य, जलवायू विहार, केंद्रीय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर (एकूण - ५०,१६४, अनुसूचित जाती - ७,१९१, अनुसूचित जमाती - १,०९०)

९ - टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्यमनगर, स्वप्ननगरी, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर (एकूण - ५९,३९०, अनुसूचित जाती - ८,८९८, अनुसूचित जमाती - ६१०)

१० - संत ज्ञानेश्वरनगर (म्हाडा), मोरवाडी, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, इंदिरानगर, एचडीएफसी कॉलनी, दत्तनगर, विद्यानगर, शाहूनगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर (एकूण - ५४,०३६, अनुसूचित जाती - ८,८९८, अनुसूचित जमाती - ८५०)

११ - नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर, स्वस्त घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर (एकूण - ५४,५४१, अनुसूचित जाती - १०,३५६, अनुसूचित जमाती - ८७५)

१२ - ज्योतीबा मंदिर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रे वस्ती भाग, ताम्हाणे वस्ती भाग (एकूण - ५५,११९, अनुसूचित जाती - ५,९८६, अनुसूचित जमाती - १,२५६)

१३ - निगडी गावठाण, सेक्टर २-ओटा स्कीम, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, साईनाथनगर (एकूण - ५५,०७४, अनुसूचित जाती - १५,७७०, अनुसूचित जमाती - ७०५)

१४ - चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, ऐश्वर्यम सोसायटी, शुभश्री सोसायटी, जय गणेश व्हिजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, बजाज ऑटो, दत्तवाडी, तुळजाई वस्ती (एकूण - ५६,४२७, अनुसूचित जाती - ५,३९१, अनुसूचित जमाती - ५९५)

१५ - आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूकनगरी, सेक्टर क्रमांक २४, २५, २६, २७, २७ अ, २८, सिंधूनगर, परमार पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय वसाहत, एलआयसी, एक्साईज (एकूण - ५१,८५६, अनुसूचित जाती - ३,३९२, अनुसूचित जमाती - ४५७)

१६ - वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, नॅनो होम सोसायटी, शिंदे वस्ती, रॉयल कासा सोसायटी, सेक्टर क्रमांक २९, रावेत, नंदगिरी सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, मामुर्डी, किवळे (एकूण - ५९,३३०, अनुसूचित जाती - १०,३३७, अनुसूचित जमाती - १,८६४)

१७ - दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भोईरनगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, नागसेननगर, आहेरनगर, वाल्हेकरवाडी गावठाण, चिंचवडेनगर, बळवंतनगर, बिजलीनगर (एकूण - ५९,०८९, अनुसूचित जाती - ७,८८९, अनुसूचित जमाती - ८५७)

१८ - एसकेएफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर, तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राजपार्क, दर्शन हॉल, माणिक कॉलनी, लक्ष्मीनगर, यशोपुरम सोसायटी (एकूण - ५५,०१२, अनुसूचित जाती - ४,०७१, अनुसूचित जमाती - ४४६)

१९ - विजयनगर, न्यू एसकेएफ कॉलनी, उद्योगनगर, क्विन्स टाऊन, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईर कॉलनी, गावडे पार्क, एम्पायर इस्टेट, विस्डम पार्क, भाटनगर, भाजीमंडई, पिंपरी कॅम्प (एकूण - ५६,११०, अनुसूचित जाती - २२,३००, अनुसूचित जमाती - ३९६)

२० - विशाल थिएटर परिसर, एच. ए. कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभगनर, सीआयआरटी, पार्श्वनाथ सोसायटी, कासारवाडी भाग, अग्रसेननगर, कुंदननगर भाग (एकूण - ४९,३०९, अनुसूचित जाती - ८,४६८, अनुसूचित जमाती - ९२४)

२१ - मिलिंदनगर, जिजामाता हॉस्पिटल, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, वैष्णोदेवी मंदिर, मासुळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदिर, बालामल चाळ, बलदेवनगर, शास्त्रीनगर, कैलासनगर, ज्ञानेश्वरनगर (एकूण - ५५,४५९, अनुसूचित जाती - ८,९६१, अनुसूचित जमाती - ५१४)

२२ - काळेवाडी, विजयनगर, निर्मलनगर, आदर्शनगर, पवनानगर, तापकीरनगर भाग, ज्योतीबानगर भाग, नढेनगर (एकूण - ५५,६१५, अनुसूचित जाती - ६,७९३, अनुसूचित जमाती - ६०३)

२३ - प्रसुनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काउंट्री, थेरगाव गावठाण, पडवळनगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी (एकूण - ४९,८४८, अनुसूचित जाती - ११,१३८, अनुसूचित जमाती - ७१३)

२४ - आदित्य बिर्ला हॉस्पिटल, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, ग्रीन्स हाऊसिंग सोसायटी, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर भाग, गणेशनगर, म्हातोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर, बेलठिकानगर भाग (एकूण - ४९,५९७, अनुसूचित जाती - ६,९०६, अनुसूचित जमाती - ७१९)

२५ - माळवाडी, पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकानगर, निंबाळकरनगर, भूमकर वस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती, केमसे वस्ती, रोहन तरंग सोसायटी, प्रिस्टाईन सोसायटी, स्वरा प्राईड रेसिडेन्सी (एकूण - ५०,६१०, अनुसूचित जाती - १०,९११, अनुसूचित जमाती - १,१०५)

२६ - पिंपळे निलख, विशालनगर, पार्क स्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर परिसर, अण्णाबाऊ साठेनगर, वेणूनगर भाग, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्राॅनिक्स (एकूण - ४९,८४७, अनुसूचित जाती - ७,१७२, अनुसूचित जमाती - १,२१४)

२७ - तापकीरनगर भाग, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाम, तांबे शाळा परिसर, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, एसएनबीपी स्कूल परिसर, रॉयल ऑरेंज काउंटी, आकाशगंगा सोसायटी (एकूण - ५३,४१६, अनुसूचित जाती - ८,६६८, अनुसूचित जमाती - ७२८)

२८ - फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनिअम, कापसे लॉन्स, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ लॅड, गोविंद गार्डन (एकूण - ५१,५५०, अनुसूचित जाती - ५,५३७, अनुसूचित जमाती - ६६२)

२९ - कल्पतरू इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, वैदूवस्ती (एकूण - ४९,१४६, अनुसूचित जाती - ८,०४५, अनुसूचित जमाती - ३,३५६)

३० - शंकरवाडी भाग, सरिता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदननगर भाग, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिद्धार्थनगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एसटी वर्कशॉप (एकूण - ५७,४४६, अनुसूचित जाती - १३,०८४, अनुसूचित जमाती - १,९२०)

३१ - राजीव गांधीनगर, गजानन महाराजनगर, किर्तीनगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डेनगर भाग, विद्यानगर भाग, उरो रुग्णालय (एकूण - ५१,८४९, अनुसूचित जाती - ७,५५४, अनुसूचित जमाती - १,५५८)

३२ - सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, जयमालानगर, संगमनगर, पीडब्ल्यूडी कॉलनी, एसटी कॉलनी, कृष्णानगर, साईराज रेसिडेन्सी, शिवदत्तनगर (एकूण - ५४,६१४, अनुसूचित जाती - ९,०६९, अनुसूचित जमाती - १,७३८)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिंनीला मारहाण करणारे मोकाटच

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
लग्नास नकार दिल्यामुळे सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला मारहाण करणारा तरुण व त्याचे साथीदार अद्यापही मोकाटच आहेत. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून सागर कुमार अलकुंटे (रा. हडपसर) व त्याच्या आठ ते दहा सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थिनी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकते. अलकुंटेने तरुणीला आपण या कॉलेजमध्ये असल्याचे सांगितले त्यावरून त्यांच्यात ओळख झाली. मात्र, अलकुंट सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकत नसल्याचे तरुणीला समजल्यानंतर तिने त्याला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपीने तिला त्रास देत कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. तरीही तरुणी त्याला टाळत होती. तरुणी गुरुवारी कॉलेजमधून जात असताना त्याने तरुणीला मारहाण करत फरपटत नेले. त्याच्या साथिदारांनी तरुणीच्या मित्र व मैत्रिणीला मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून देखील आरोपी व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. कॉलेजच्या जवळ साथीदारांना घेऊन जात तरुणाने मारहाण केली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिस आयुक्तांनी डेक्कन पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डेक्कन पोलिस स्टेशनला भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत येत्या ८ ते १० ऑक्टोबरला सर्व मतदान केंद्रात नावनोंदणी करता येणार आहे.
महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला मतदानाची संधी मिळावी हा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठीच मतदार नोंदणीची विशेष मोहीम घेण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणी, दुबार नाव रद्द, नाव व पत्त्यामधील दुरुस्ती, एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात नावनोंदणी, मतदार यादीतून नाव वगळणे अशी कामे केली जाणार आहेत. या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी सलग तीन दिवस हे काम केले जाणार आहे. शहर व ग्रामीण भागातील सर्व मतदान केंद्रे, महापालिकांची क्षेत्रीय कार्यालये आणि तहसीलदार कार्यालयामध्ये नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात ६८ लाख मतदार आहेत. मतदार याद्या बोगस नावांनी फुगल्यामुळे मध्यंतरी दुबार, मयत व स्थलांतरीत झालेल्या साडेतीन लाख मतदारांची नावे कमी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी आपली नावे मतदार यादीत तपासून पाहावीत. यादीत नाव नसल्यास नव्याने नोंदणी अर्ज भरून द्यावा. तसेच, १ जानेवारी २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडी झाल्यास पोलिस परवानगी नाकारणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहतूक पोलिसांनी औंध येथे सुरू करण्यात येणाऱ्या ‘वॉकिंग प्लाझा’ आणि ‘सायकल ट्रॅक’ला तात्पुरती परवानगी देत वाहतूक कोंडी न होऊ देण्याची जबाबदारी पालिकेवर ढकलली आहे. महापालिकेच्या या ‘स्मार्ट कारभारामुळे’ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तर या योजनेला परवानगी नाकारण्याची तयारीही वाहतूक पोलिसांनी ठेवली आहे.
औंध येथील २४ मीटर रुंदीचा रस्ता थेट साडेचार मीटरवर आणत त्या ठिकाणी ‘वॉकिंग प्लाझा’ आणि ‘सायकल ट्रॅक’ सुरू करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. महापालिकेकडून आठ दिवसांसाठी हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. पालिकेकडून जरी हा पथदर्शी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कायमस्वरुपी बदलांसाठी टेंडर काढण्यात आल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. पालिकेकडून केवळ पैसे खर्च करण्यासाठी अशा प्रकारचे ‘उद्योग’ सुरू केल्याचा आरोपही लोकप्रतिनिधींनी महापालिकेत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केला आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत औंध-बाणेर या परिसराची निवड केली आहे. त्यानुसार औंध येथे वॉकिंग प्लाझा आणि सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे. ब्रेमन चौक ते परिहार चौक हा रस्ता एकेरी करत या ठिकाणी हे बदल करण्यात येणार आहे. परिहार चौक ते ब्रेमन चौक या लेनवर वॉकिंग प्लाझा आणि सायकल ट्रॅक प्रस्तावित असून, त्या कामास बुधवारी सुरुवात झाली. स्थानिकांमध्ये या बदलांबाबत विरोधाचे वातावरण आहे. मात्र, आठ दिवसांच्या ‘डेमो’दरम्यान आपल्या विरोधाची ‘झलक’ दाखवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.


वाहतूक पोलिसांनी या प्रकल्पाला तात्पुरती परवानगी दिली आहे. पुढील आठ दिवसांच्या बदलांदरम्यान जे परिणाम समोर येतील, त्यानुसार अंतीम निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. प्रवीण मुंढे,
वाहतूक पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे तिघे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तिघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मोशीतून अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख २० हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या अटकेमुळे दुचाकीचोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
आकाश बबन लांडगे (१९), सूरज सुखदेव समदाडे (१९) आणि अशोक श्रीकांत काळे (२१, सर्व रा. लक्ष्मीनगर, मोशी) अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त राम मांडूरके, वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी माहिती दिली. भोसरी आणि मोशी परिसरात दुचाकी चोरणारे आरोपी आळंदी रोड येथील एका हॉटेलसमोर बसले असल्याची माहिती पोलिस नाईक किरण काटकर यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोशीत सापळा रचून त्यांना जेरबंद केले.
मौजमजा करण्यासाठी बनावट चावीने दुचाकींचे कुलूप तोडून त्या चोरल्याची कबुली आरोपींनी दिली. पेट्रोल संपेल तिथेच अनेक दुचाकी सोडल्याचेही आरोपींनी सांगितले. त्यांच्याकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन, भोसरी आणि निगडी हद्दीतील दोन, पिंपरी हद्दीतील एक, चाकण हद्दीतील एक आणि दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक असे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. निरीक्षक दिलीप शिंदे, फौजदार भूषण पवार, हवालदार अरुण भालेराव, किरण काटकर, दादासाहेब गायकवाड, विशाल अंबटवार, विजय दौंडकर, नवनाथ पोटे, अविनाश कुमटकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षित प्रवेशांसाठी आजपासून दुसरी फेरी

$
0
0

१५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशांसाठी पुण्यात आजपासून (शनिवार) दुसरी प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या प्रक्रियेसाठी आठ हजारांवर प्रवेश उपलब्ध होणार आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून या विषयी देण्यात आलेल्या माहितीनुसार, २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशांसाठी यंदा एकूण ७८० शाळांमधून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १६ हजार ८२६ जागा उपलब्ध होत्या. प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधून त्यापैकी आठ हजार २२२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. २५ टक्क्यांसाठी उर्वरीत आठ हजार ६०४ जागांसाठी दुसरी फेरी राबविण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करण्यात येत होती. त्या विषयी अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर आता या उर्वरीत जागांसाठी दुसऱ्या फेरीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीमधून प्रवेशांसाठी अर्ज करण्याची गरज नाही; तसेच दुसऱ्या फेरीसाठी दोन वा अधिक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
00
एकूण सहभागी शाळा - ७८०
एकूण उपलब्ध जागा - १६ हजार ८२६
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी - २० हजार ५८१
पहिल्या फेरीत प्रवेशित विद्यार्थी - ८ हजार २२२
दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा - ८ हजार ६०४
प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत - ८ ते १५ ऑक्टोबर, २०१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरकपातीविरोधात बापटांच्या घरावर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने नोकरभरतीत केलेल्या कपातीविरोधात पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही बंदी उठवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांद्वारे तातडीने भरती व्हावी, या मागणीसाठी हे उमेदवार येत्या १७ ऑक्टोबरला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत.
स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी या उमेदवारांची एक बैठक शुक्रवारी नवी पेठेतील अहिल्या शिक्षण मंडळाच्या अभ्यासिकेमध्ये झाली. एक हजारहून अधिक उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उमेदवारांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कृती समिती, पुणे या संघटनेतर्फे देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, असिस्टंट या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तातडीने भरती व्हावी, नुकत्याच झालेल्या कृषिसेवक आणि कर सहायक परीक्षेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, ही चौकशी होईपर्यंत या दोन्ही पदांच्या भरतीला स्थगिती द्यावी आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून पालक मंत्र्यांसमोर मांडण्याचा निश्चय या बैठकीत करण्यात आला. या मोर्चासाठी उमेदवारांना मेस चालक, होस्टेल मालक, अभ्यासिका चालकांचाही पाठिंबा मिळाला आहे. तसेच, पुण्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनाही या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे या उमेदवारांकडून शुक्रवारी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्बल घटकांसाठी हव्या मोफत जागा

$
0
0

मंत्री विजय शिवतारे यांचे शिक्षणसंस्थांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘खासगी शिक्षणसंस्थांमध्ये सामान्यांना परवडणारे शिक्षण उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असूनही त्यांना उच्चशिक्षण घेता येत नाही. त्यासाठी शिक्षणसंस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी काही जागा मोफत उपलब्ध करून द्याव्यात; तसेच सरकारने या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसंस्थांच्या मदतीने धोरण आखावे,’ अशा सूचना जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केल्या आहेत.
‘एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडिया’ (इप्सी) आणि माईर्स एमआयटी शिक्षणसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शालेय आणि उच्च शिक्षणासंबंधी नवीन शैक्षणिक धोरणाची दिशा’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्रात शिवतारे बोलत होते. यावेळी ‘इप्सी’चे अध्यक्ष डॉ. जी. विश्वनाथन, प्रभारी अध्यक्ष डॉ. एच. चतुर्वेदी, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, माईर्स एमआयटीचे सचिव आणि ‘इप्सी’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, ‘शिक्षणसंस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना काही जागा मोफत उपलब्ध करून दिल्यास गुणवत्ता असलेले विद्यार्थी शिकतील. त्यातून चांगली पिढी निर्माण होईल. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने शिक्षणसंस्थांच्या मदतीने धोरण आखले पाहिजे.’ राज्यात अभियांत्रिकीच्या ६० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त असूनही लाखो विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून वंचित राहतात, याकडे लक्ष वेधून शिवतारे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी पैशांअभावी शिक्षण सोडून देतात. त्यासाठी सर्वसामान्यांना परवडेल, अशा पद्धतीचे शिक्षण देणारे शैक्षणिक धोरण आखायला हवे. बँकांनी शैक्षणिक कर्ज दिले पाहिजे. त्याचे व्याज शिक्षणसंस्थांनी भरावे, तर हमी सरकारने घेणे आवश्यक आहे.’
..
‘स्वायत्ततेचा उपयोग कमाईसाठी नको’
‘शिक्षणसंस्था औद्योगिक केंद्र बनल्या आहेत. स्वायतत्ता मिळाल्यास शिक्षणसंस्थांनी पैसे कमवण्यासाठी त्याचा उपयोग करू नये. कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या उच्च शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शिपाई, क्लार्क अशा नोकऱ्या करतात, तेव्हा खंत वाटते,’ असेही शिवतारे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागरचनेत पालकमंत्र्यांचा हात

$
0
0

महापौर प्रशांत जगताप यांचा हल्लाबोल; ‘आयोगाकडे सर्वपक्षीय दाद मागणार’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना करताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना फायदेशीर ठरणारी रचना करण्यात आल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला. गेले पंधरा वर्षे पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून बापट यांनी मनमानी पद्धतीने प्रभाग रचना केली आहे. त्या विरोधात भाजप वगळता सर्व पक्षांना एकत्र करून निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी झाली. यावेळी कोणत्या प्रभागामध्ये कोणते आरक्षण आहे, हे समजण्यासाठी प्रशासनाने प्रभाग रचनेचे नकाशे प्रसिद्ध केले. हे नकाशे प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच आरोपांच्या फैरी झडणे सुरू झाले आहे. ‘भाजपच्या उमेदवाराला अधिकाधिक फायदा कसा होईल, या दृष्टिने प्रभागरचना करण्यात आली आहे. बहुतेक प्रभागांची रचना करताना आयोगाने केलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. बापट यांनी पदाचा गैरवापर करून प्रभाग रचना केली आहे,’ असा आरोप जगताप यांनी केला. गेल्या २५ ते ३० वर्षांच्या काळात करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या तुलनेत अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रभाग तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभागाची रचना करताना नैसर्गिक सीमा, हद्दी तसेच नदी, नाले, ओढे, मोठे रस्ता याला कोणताही छेद देण्याची गरज नाही. मात्र, आगामी पालिका निवडणुकीसाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जे प्रभाग केले आहेत, त्यामध्ये नियमांकडे दुर्लक्ष करत चुकीच्या पद्धतीने सीमारेषा, हद्दी निश्चित करण्यात आल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपच्या उमेदवारांना फायदा व्हावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना त्रास व्हावा, या हेतूनेच बापट यांनी आपल्या अधिकराचा वापर केला आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या या प्रभागरचनेविरोधात दाद मागण्यासाठी भाजप वगळता इतर पक्षांना बरोबर घेऊन आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.
‘केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला पालिकेत सत्ता मिळावी, या उद्देशाने पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रभागरचनेत हस्तक्षेप केला आहे. शहरातील भाजपच्या आमदारांनी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फायद्याचे ठरावे म्हणून प्रभागरचना केली आहे,’ असा आरोप मनसेचे शहराध्यक्षा हेमंत संभूस यांनी केला. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेबाबात हरकती, सूचना देण्यात येणार असून, वेळप्रसंगी मनसे कोर्टात जाण्यासही मागे पाहणार नाही, असेही ते म्हणाले. भाजपने केलेल्या या चुकीच्या कारभाराला मनसे सक्षमपणे उत्तर देइल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
००००
प्रभाग रचनेत कोणाचाही हस्तक्षेप झाल्याचे होणारे आरोप चुकीचे आहेत. प्रशासनाने अत्यंत पारदर्शी आणि चांगल्या प्रकारे काम केले आहे. २०११च्या जनगणनेनुसार प्रभागाची रचना करण्यात आली आहे. आयोगाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले आहे.
कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंगाली बांधव दुर्गोत्सवात रममाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पारंपरिक बंगाली वेशभूषा...धूपारती हातात घेऊन केले जाणारे नृत्य...पारंपरिक संगीत...आणि जोडीला स्वादिष्ट बंगाली पदार्थ...काँग्रेस भवन येथे दसऱ्यापर्यंत असेच उत्सवी व प्रसन्न वातावरण असेल. निमित्त आहे, बंगाली समाजाच्या दुर्गोत्सवाचे. दुर्गोत्सवातून बंगाली संस्कृती या ठिकाणी अनुभवता येत आहे.
पुण्याच्या उत्सवांमध्ये आकर्षण ठरू लागलेल्या बंगाली समाजाच्या दुर्गोत्सवाला काँग्रेस भवन येथे शुक्रवारी प्रारंभ झाला. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला प्रमुख पाहुण्या होत्या. बंगाली समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. बंगिया संस्कृती संसदेतर्फे दुर्गोत्सव आयोजित करण्यात आला आहे. षष्ठीच्या दिवशी बंगाली बांधवांमध्ये सायंकाळी घट बसविण्यात येतात. मंडपामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिची सार्वजनिक पूजाअर्चा केली जाते. दहा भूजा असणारी दुर्गादेवीची महिषासुराचा वध करणारी मूर्ती हे बंगाली दुर्गामूर्तीचे वैशिष्ट्य आहे.
‘पुण्यात होणाऱ्या दुर्गोत्सवाचे यंदाचे ७७ वे तर काँग्रेस भवनातील ३२ वे वर्ष आहे. षष्ठी ते दसरा असा हा उत्सव रंगतो. रोज सकाळ व संध्याकाळ देवीची पूजा होणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम या काळात होतील. बंगाली समाज पारंपरिक वेशभूषेत या उत्सवात सहभागी होतो. बंगाली बांधव दुर्गापूजेमुळे एकत्र येतात. बंगालला जाणे शक्य नसल्याने आम्ही इकडेच उत्सव साजरा करतो,’ अशी माहिती बंगिया संस्कृती संसदचे सचिव अरुण चटोपाध्याय यांनी दिली.
काँग्रेस भवन येथे सामिष बंगाली पदार्थांचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत. याठिकाणी पारंपरिक बंगाली मिठाई तसेच विविध गोड पदार्थ चाखता येतील. बंगाल येथे दुर्गोत्सवात मांसाहारी पदार्थांना मागणी असते. याठिकाणी असलेल्या स्टॉल्समध्ये विविध बंगाली मांसाहारी पदार्थ उपलब्ध आहेत. विविध वस्तूंचे स्टॉल्स देखील या ठिकाणी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आढावांचे उपोषण मागे

$
0
0

येत्या १९ ऑक्टोबरला मागण्यांसंदर्भात चर्चेची द्वारे खुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. याबाबत येत्या १९ ऑक्टोबरला चर्चेला बोलावले आहे. मात्र, चर्चेनंतरही प्रश्न न सुटल्यास आणि सरकारने दिलेल्या शब्दाचे पालन न झाल्यास, आयुष्यातील उर्वरित प्रत्येक क्षण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चळवळ उभी करण्यासाठी वेचेन,’असे ठणकावून डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी उपोषण सोडले.
शेतमालाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मागण्यांसाठी डॉ. आढाव यांनी दोन ऑक्टोबरपासून सुरू केलेले उपोषण मुख्यमंत्र्यांकडून मागण्या तत्वतः मान्य केल्यानंतर सोडण्यात आले. आढाव यांच्यासोबत विजय पांढरे, गोरख मेंगडे, दत्तात्रय डोंबळे आणि संदीप धायगुडे देखील उपोषणाला बसले होते. कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या हस्ते नारळपाणी पिऊन डॉ. आढाव यांनी उपोषण सोडले. ‘राज्य सरकारने आमच्या मागण्या तत्वतः मान्य केल्याचे पत्र दिले आहे. त्याचा मी आदर करतो. सरकार या प्रश्नी गंभीर आहे असे मानतो. पण, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवला, तर आता ८७ व्या वर्षानंतर जेवढे आयुष्य उरले आहे. त्यातील प्रत्येक क्षण या प्रश्नावर चळवळ उभी करण्यासाठी वापरेन,’ असे डॉ. आढाव यांनी सांगितले.
‘तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही सरकारला जाग येत नाही. ही शरमेची बाब आहे. हा विषय आमच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नाही, तर समाजाचा संवेदनशीलतेचा आहे. या पाठीमागे सर्व घटकांनी उभे राहिले पाहिजे. उपोषण काळात राज्यभरातील १४० संस्था, संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला. सरकारपेक्षा या सर्वांवर विश्वास ठेवूनच मी उपोषण मागे घेत आहे,’ असे डॉ. आढाव यांनी स्पष्ट केले. नितीन पवार यांनी सभेची प्रस्तावना केली. संतोष नांगरे यांनी आभार मानले.
...............
जे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहत नव्हते. त्या सरकारने शेतमालाला हमीभाव व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. त्या सरकारकडून आश्वासन पूर्ती केली जाईल, अशी अपेक्षा आहे. हे प्रश्न देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेशी संबंधीत असून, ते कठीण आहेत. मात्र, याच सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात ते प्रश्न सोडविण्याचे नमूद करण्यात आले आहेत.
डॉ. बाबा आढाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images