Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आधी टाक्या बसवा; मगच वॉटर मीटर

$
0
0

वंदना चव्हाण यांचे आयुक्त, महापौरांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील साठवण टाक्या आणि जुन्या जलवाहिन्या बदलल्यानंतरच पाण्याचे मीटर बसविण्यात यावेत, या मागणीचा पुनरूच्चार करून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी महापौर प्रशांत जगताप आणि आयुक्त कुणाल कुमार यांना शुक्रवारी सविस्तर निवेदन दिले. शहरात २४ तास पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वीच मीटर बसविणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना (२४ बाय ७) राबविण्याच्या पहिल्या टप्प्याची नुकतीच सुरुवात केली आहे. त्यानुसार, शहरात नव्याने ८२ टाक्या बांधण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण होण्यास सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच, टाक्यांसोबतच शहरातील तब्बल सोळाशे किमीच्या जलवाहिन्या बदलणे क्रमप्राप्त आहे. हे काम पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. त्यानंतरच, पुणेकरांना २४ तास पाणी मिळू शकणार असल्याने मीटरची योजना कामे पूर्ण झाल्यावरच कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. २४ तास आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्यानेच पूर्वी मीटर पद्धती बंद केली होती. त्यामुळे, पुन्हा २४ तास पाणी मिळण्यापूर्वीच पुणेकरांवर मीटरची सक्ती लादणे अन्यायकारक असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मीटर बसविण्याच्या महापालिकेच्या अट्टाहासाचा फटका पुणेकरांना बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, नव्याने घेण्यात येणाऱ्या मीटरची वॉरंटी केवळ वर्षाचीच असल्याचे समजते. महापालिकेच्या नियोजनानुसार २४ तास पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच हा कालावधी संपुष्टात येणार आहे. तरीही, मीटरची घाई कशासाठी, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी उपस्थित केला आहे.

.............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे पालिकेचा गौरव

$
0
0

सर्वाधिक वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारण्याच्या कामगिरीची दखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात सर्वाधिक वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारण्याची कामगिरी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नवी दिल्लीतील विज्ञानभवनात झालेल्या कार्यक्रमात ‘स्वच्छ’ संस्थेच्या राधाबाई सावंत यांनी मोदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. या वेळी महापौर प्रशांत जगताप, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याच्या कामाबद्दल मोदींनी ‘स्वच्छ’च्या कामाचे कौतुकही केले.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या माध्यमातून पुणे महापालिकेने शहरात सुमारे २०,४५१ वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारली आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूर शहराने १९ हजार स्वच्छतागृहे उभारून दुसरा क्रमांक मिळवला. देशात सर्वाधिक स्वच्छतागृहे उभारल्याने पुणे शहराला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्राने काही दिवसांपूर्वीच केली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रातील अधिकारी, महापालिकेचे सभागृह नेते शंकर केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते किशोर शिंदे, शिवसेनेचे अशोक हरणावळ, महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि सहआयुक्त सुरेश जगताप उपस्थित होते.
..
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या वैयक्तिक स्वच्छतागृहाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. या अभियानांतर्गत आणखी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीचा आनंद ‘मटा’च्या प्रदर्शनांतून

$
0
0

लँड, हेल्थ आणि ऑटोचे भरपूर पर्याय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सणासुदीच्या काळात वाहनखरेदी, गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली मिळवून देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने तीन भव्य प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मटा लँड एक्स्पो’, ‘मटा ऑटो एक्स्पो’ आणि ‘मटा हेल्थ एक्स्पो’ या प्रदर्शनांमधून नागरिकांना खरेदीचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. आजपासून (शनिवार) ही प्रदर्शने सुरू होत आहेत. उद्यापर्यंत (रविवार) ती सुरू राहतील.
गणेश कला क्रीडा मंच येथे ‘मटा लँड एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही काळात जमिनींमधील गुंतवणूक आकर्षक परतावा देणारी ठरल्यामुळे यामध्ये गुंतवणुकीचा ट्रेंड ग्राहकांमध्ये वाढत आहे. त्यासाठी जमीनखरेदीचे सुरक्षित आणि आकर्षक परतावा देणारे पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध आहेत; तसेच गणेश कला क्रीडा मंच येथेच ‘मटा हेल्थ एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. धकाधकीच्या जीवनशैलीत सध्या आरोग्याचे अनेक प्रश्न भेडसावत असून निरोगी राहण्यासाठी हेल्थ आणि फिटनेसकडे सर्वच जण लक्ष देतात. या संदर्भातील माहिती, उत्पादने आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे.
सणासुदीला वाहन खरेदीचा योग साधण्यासाठी अनेक ग्राहक आतुर झाले आहेत. वेगवेगळ्या शोरुम्समध्ये जाऊन वाहनांची पाहणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी वाहनांचे अनेक पर्याय ‘मटा ऑटो एक्स्पो’मध्ये सादर करण्यात येत आहेत. हे प्रदर्शन साखर संकुल, शिवाजीनगर येथे भरविण्यात आले आहे. यामध्ये वाहनखरेदीच्या वेगवेगळ्या स्कीम्स, ऑन दी स्पॉट गिफ्ट्स यांबरोबरच सुपरबाइक्सचे खास दालन हे या एक्स्पोचे आकर्षण ठरणार आहे. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळात तिन्ही प्रदर्शने खुली राहणार आहेत. या प्रदर्शनांना भेट देऊन खरेदीचा आनंद लुटण्याची मोठी संधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस येत्या रविवारी रद्द

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई विभागात स्टेशन येथे मेन लाइनवर नऊ तासांचा मेगा ब्लॉक आणि हार्बर लाइनवर तीन ते साडेतीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी, दोन ऑक्टोबरला पुण्यावरून जाणारी व मुंबईवरून पुण्याकडे येणारी प्रगती व सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दिवा स्टेशन येथे सीएसटी ते कल्याण या मार्गावरील नवीन लाइनच्या कामासाठी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कल्याण-दिवा व कल्याण-मुलुंड या मार्गावरील ‘स्लो ’लोकल ‘फास्ट’ लाइनवर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवेवर देखील परिणाम होणार आहे. प्रगती व सिंहगड या दोन्ही गाड्यांची पुणे-मुंबई-पुणे सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात पुण्याहून मुंबईला जाणाऱ्यांना डेक्कन क्वीनचाच पर्याय असणार आहे.प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस येत्या रविवारी रद्द


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात झाला ९७ टक्के पाऊस

$
0
0

पुणे : सलग दोन वर्षे देशाच्या विविध भागांत दुष्काळाचा चटका सहन करावा लागल्यानंतर २०१६च्या पावसाळी हंगामाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. संपूर्ण देशभरात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) ९७ टक्के पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे. यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तविला होता. त्या तुलनेत झालेला पाऊस कमी असला, तरी देशात सर्वदूर पावसाचे प्रमाण समाधानकारक होते, असा निर्वाळा ‘आयएमडी’ने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्ध जीवन’च्या १९ जणांवर गुन्हा

$
0
0

गुंतवणूकदारांना ४२ लाखांना फसवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समृद्ध जीवन फाउंडेशनचे संस्थापक महेश मोतेवार यांच्या पत्नीसह समृद्धी जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या १९ जणांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांमध्ये गुरुवारी गुन्हा दाखल झाला. संबंधित गुंतवणूकदारांची ४१ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
किरण शांतीकुमार दीक्षित (वय ५३, रा. गणेशमळा, दत्तवाडी) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून समृद्धी जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संचालक प्रसाद चिद्रावार, लीना मोतेवार, वैशाली मोतेवार, वनश्री चिद्रावार आणि इतरांवर ‘महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९’च्या कलम ३ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित सेवानिवृत्त आहेत. दरम्यान त्यांनी समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची मुदतठेव आणि अन्य योजनांची जाहिरात पाहिली. आकर्षक व्याजाच्या हेतूने त्यांनी ३० जुलै २०१५मध्ये निवृत्तीनंतर प्राप्त झालेली काही रक्कम कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवली. गुंतवणुकीच्या रितसर पावत्याही त्यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात ‘समृद्ध जीवन’बाबत विविध वर्तमानपत्रांतून येणाऱ्या बातम्यांमुळे दीक्षित यांनी मुदतपुर्तीनंतर गुंतवलेली रक्कम परत मागितली. मात्र, संचालकांना पोलिसांनी अटक केली अशून, आताच पैसे देण्यात येणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. दीक्षित यांच्याप्रमाणेच वसंत कालिदास ठाकूर यांनीही ४ डिसेंबर २०१४मध्ये ३५ लाखांची गुंतवणूक केली. मुदतपूर्तीनंतर त्यांनीही कंपनीकडे रक्कम परत मागितली. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना टोलवण्यात आले. शेवटी कंटाळून ठाकूर यांनी कंपनीविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कासेवाडीतील बेपत्ता मुलींचे मृतदेह आढळले

$
0
0

प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कासेवाडी परिसरातून गायब झालेल्या तीन विद्यार्थिंनींपैकी दोघींचे मृतदेह हडपसर आणि वानवडीतील कॅनॉलमध्ये शुक्रवारी रात्री आढळले. प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना समजल्यामुळे घाबरून या मुलींनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिसऱ्या मुलीचा शोध अद्याप सुरू आहे.

शृती दिगंबर वाघमारे (वय १५) आबेदा शेख (वय १४ दोघीही रा. कासेवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. तर, मुस्कान इम्तियाज मुलतानी (वय १३, तिघीही रा. कासेवाडी) हिचा अद्याप शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आबेदा अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत, तर मुस्कान आठवीमध्ये शिकते. शृती राज धनराज गिरी महाविद्यालयात अकरावीला शिकत होती. या तिघींही मैत्रिणी असून, एकाच परिसरात राहतात.

गुरुवारी सायंकाळी खेळण्यासाठी म्हणून तिघीही घरातून बाहेर पडल्या. मात्र, घरी परतल्याच नाहीत. त्यानंतर पालकांनी तिघींचा शोध घेतला असता, त्या सापडल्या नाहीत. शेवटी पालकांनी खडक पोलिस स्टेशन गाठले. दरम्यान, गोळीबार मैदान येथे गुरुवारी सायंकाळी कॅनॉलच्या शेजारी पडलेल्या दप्तरातील मोबाइल वाजला. त्यावेळी तेथून जाणाऱ्या नागरिकांनी ही घटना पाहून त्याची माहिती पोलिसांना ​दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना कॅनॉलजवळ दप्तर, मोबाइल, ओढणी, चप्पल आढळून आली. मोबाइलवरून शोध घेतला असता तो कासेवाडीचा निघाला. हा मोबाइल मुस्कानचा असल्याचे तपासाअंती समजले. त्यानंतर कासेवाडीमध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता, तिघी गायब असल्याचे समजले. त्यामुळे खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी दिवसभर या तिघींचा शोध घेण्यात आला. मुस्कानच्या मोबाइलची तपासणी केली असता, तिने मित्राला फोन करून आपल्याला जगण्याची इच्छा राहिली नसल्याचे सांगितल्याचे समोर आले आहे. संबंधित मित्राकडेही चौकशी करण्यात आली. अग्निशमन दलाकडून कॅनॉलमध्ये मुलींचा शोध सुरू करण्यात आला. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शृतीचा मृतदेह वानवडी येथील चिमटे वस्ती कॅनॉलमध्ये सापडला. तर, आबेदाचा मृदतेह हडपसर येथे सापडला.

प्रेमकरण होते सुरू

या तिघींचेही प्रेमप्रकरण सुरू होते. त्यातच मुस्कानच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती मिळाल्याने तिची आई रागावली होती. त्यामुळे वस्तीमध्ये आपली बदनामी होईल, या भीतीने मुलींनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपीतून वगळलेली आरक्षणे कायम ठेवा’

$
0
0

विरोधी पक्षांची मुख्यमंत्र्‍यांकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकार नियुक्त समितीने शहराच्या विकास आराखड्यातून (डीपी) वगळलेली आरक्षणे पुनर्स्थापित करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या सर्व खासदार-आमदारांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सर्वांच्या सूचना विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
शहराच्या ‘डीपी’संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली होती. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यावर टीकास्त्र सोडले होते. त्या वेळी इतर पक्षाच्या आमदारांनाही विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहराचे खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ, शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड, अनिल भोसले आदी उपस्थित होते.
शहराचा डीपी ताब्यात घेतल्यानंतर राज्य सरकारने नेमलेल्या समितीने कोणताही विचार न करता तब्बल ३८० आरक्षणे वगळल्याचा आरोप वंदना चव्हाण आणि अनंत गाडगीळ यांनी केला. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही आरक्षणे पुनर्स्थापित केली जावीत, असा आग्रह त्यांनी धरला. शहराच्या मध्य वस्तीतून जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण पुन्हा प्रस्तावित करण्यात आले असल्याने त्यालाही विरोध करण्यात आला. हे रुंदीकरण मागे घेण्यात यावे आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना दिली जावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
.................
चार एफएसआयला विरोध
शहरात मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना सरसकट चार एफएसआय देण्याच्या तरतुदीलाही विरोध केला गेला. याबाबत प्रत्येक पक्षाची मते निरनिराळी असली, तरीही शहराच्या भवितव्याचा विचार करून आवश्यक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेट्रो’ स्थगितीस नकार

$
0
0

संरक्षित स्मारकांलगतचे मनाई क्षेत्र जाहीर करण्याची कोर्टाची सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऐतिहासिक संरक्षित स्मारकांलगतच्या मनाई क्षेत्रातून मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने त्याला स्थगिती देण्याची ‘परिसर’ संस्थेची मागणी मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळली. राष्ट्रीय संरक्षित स्मारकांपासूनचे मनाई क्षेत्र लवकरात लवकर जाहीर करावे, अशा सूचना कोर्टाने केल्या.

शहरातील पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस अशा तीन राष्ट्रीय संरक्षित स्मारकांजवळून मेट्रोचा मार्ग आखण्यात आला असून, त्यामुळे या स्मारकांना धोका निर्माण झाल्याचा दावा ‘परिसर’ने केला होता. या प्रकरणी कोर्टाने मेट्रोच्या बांधकामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती.

मेट्रो प्रकल्पाला अद्याप केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर मेट्रोच्या मार्गिकांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येईल. त्या वेळी ‘संरक्षित स्मारक कायद्याचा विचार करूनच मेट्रोची मार्गिका निश्चित करण्यात येईल; तसेच आवश्यकतेनुसार ‘नॅशनल मॉन्युमेंट मिशन’ची (एनएमएम) परवानगी घेण्यात येईल,’ असे प्रतिज्ञापत्र महापालिकेने कोर्टापुढे सादर केले. महापालिकेची बाजू विचारात घेऊन, मेट्रोला मान्यताच मिळाली नसल्याने कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. महापालिकेच्या वतीने अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’च्या शुल्कात वाढीला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) शैक्षणिक परिषदेच्या मुंबई येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत दहा टक्के शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. अभ्यासक्रम, वसतिगृहासह १५ विविध बाबींसाठी ही वाढ करण्यात आली आहे. संस्थेत पुढील वर्षीपासून प्रवेश परीक्षेबरोबर कलचाचणी घेतली जाणार असून, त्यानुसारच प्रवेश देण्यात येणार आहे, असे संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी ‘मटा’ला सांगितले.

विद्यार्थ्यांचा विरोध लक्षात घेता शुल्कवाढीसाठी २०१० ऐवजी २०१५ हे आधारभूत वर्ष मानले जाईल. त्यामुळे लाखाच्या घरात जाणारे शुल्क पुढील वर्षी केवळ वीस टक्क्यांनी वाढणार आहे. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून ही वाढ लागू होईल. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वयाचे बंधन घातल्यास गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे संस्थेतील कोणत्याही अभ्यासक्रमासाठी वयाचे बंधन यापुढेही नसेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनयाचा वेडेपणा अंगात भिनवत गेलो...

$
0
0

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शाह यांचा रसिकांशी दिलखुलास संवाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘अभिनय हा एक पेशा आहे, या विचाराने मी अभिनेता होण्याची तयारी केली. त्यासाठीचे शिक्षण कसे आणि कोठे घ्यायचे याची माहिती अनेकांना नसते. माझीही अवस्था अशीच होती. पण अभिनयाचे वेड माझ्यात भिनलेले होते आणि अभिनयाची आग निर्माण झाली, जी आजही जिवंत आहे,’ असे मत व्यक्त करून अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्या कलाप्रवासाबाबत रसिकांशी दिलखुलास संवाद साधला.‘आणि मग एक दिवस’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
पॉप्युलर प्रकाशन व अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत काळे, डॉ. विद्याधर वाटवे, रामदास भटकळ व रसिका राठिवडेकर उपस्थित होते. ज्योती सुभाष यांनी नसिर यांच्याशी संवाद साधला.
या वेळी बोलताना नासिरुद्दीन म्हणाले, ‘अभिनेता होणे भाग्यात असावे लागते, असे म्हणतात. लोक डॉक्टर, इंजिनीअर होतात. तसे मला अभिनेता व्हायचे आहे असे म्हटले तर कुठे बिघडले? खरे तर हाही एक पेशा आहे. याच विचारातून मी अभिनेता होण्याची तयारी सुरू केली. अभिनयाचे वेड माझ्यात होते आणि अभिनयाची आग निर्माण झाली. ती आजही जिवंत आहे.’
‘मी लोकप्रिय व्हावे, लोकांनी मला ओळखावे, अशी स्वप्ने घेऊन मी आलो होतो. फक्त कलात्मकता समाधान देऊ शकत नाही. पैसाही महत्त्वाचा असतोच. आयुष्यात स्ट्रगल तसे कमी वाट्याला आले; पण काही व्यावसायिक चित्रपट माझ्यासाठी स्ट्रगल ठरले. लोकप्रिय चित्रपटांशी स्नेह असेल तरच अशा चित्रपटांमध्ये तुम्ही काम करू शकता. मला हे जमणारे नव्हतेच...’ असेही नसिर म्हणाले.
‘अभिनेत्याने भूमिकेत गढून जाण्याची गरज नसते. आपली भूमिका वठवताना सजग राहायला हवं. अभिनय ही न संपणारी प्रक्रिया आहे. संगीत, चित्र परीपूर्ण असू शकते; पण अभिनय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. ज्यांना आपण ‘परफेक्ट’ आहोत असे वाटते, तो त्या अभिनेत्यांचा गैरसमज असतो,’ असा टोला त्यांनी ‘परफेक्शनिस्ट’ अभिनेत्याला लगावला. ‘काही जण मुलींसाठी, प्रसिद्धीसाठी, पैशासाठी अभिनेते बनतात; पण कलेची सेवा म्हणून कोणीच अभिनेता बनत नाही,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले. रमेश राठिवडेकर यांनी स्वागत केले. अस्मिता मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
-------------------------
चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी सहा वर्षे कशी ?
‘एफटीआयआयमध्ये आलो म्हणजे आपण ‘बाप’ झालो असे अनेकांना वाटते. चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी सहा वर्षे लागतातच कशी ? मुंबईमध्ये या मग कळेल की चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी एवढा वेळ कोण देईल ते. संस्थेची आत्ताची जी परिस्थिती झालीय त्याबद्दल मला फार आश्चर्य वाटत नाही,’ अशा शब्दांत नसिरुद्दीन शाह यांनी हल्ला चढवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोलकात्यासाठी विशेष एसी गाडी

$
0
0

कोलकात्यासाठी विशेष एसी गाडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दुर्गा उत्सवासाठी पुणे विभागाने पुणे-संतरागाची (कोलकाता) ही विशेष एसी गाडी सुरू केली आहे. येत्या तीन, पाच आणि सात ऑक्टोबरला पुणे स्टेशनहून सकाळी साडेदहा वाजता ही गाडी सुटणार असून, ३२ तासांचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता संतरागाची येथे पोहाेचणार आहे. त्यानंतर या गाड्या अनुक्रमे पाच, सात आणि नऊ ऑक्टोबरला संतरागाची येथून सकाळी सहा वाजता सुटणार आहेत. लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, विलासपूर, झारसुगुडा, राउलकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडकपूर या स्टेशनवर ही गाडी थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यासह पाच ठिकाणी डिफेन्स क्लस्टर

$
0
0

पुण्यासह पाच ठिकाणी डिफेन्स क्लस्टर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सैन्यदलांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी पुण्यासह पाच ठिकाणी डिफेन्स प्रॉडक्शन क्लस्टर्स निर्माण करण्यात येणार आहेत. पुणे, औरंगाबाद, बेळगावसह उत्तर प्रदेशातील दोन शहरांमध्ये ही क्लस्टर्स निर्माण केली जातील. त्यामध्ये लघु उद्योगांना प्राधान्य दिले जाईल,’ अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी दिली.
‘साप्ताहिक विवेक’तर्फे आयोजित विवेक संवाद कार्यक्रमात पर्रीकर यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योगपतींसह संरक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर, तसेच निमंत्रित उपस्थित होते. ‘संरक्षण उत्पादने आयात करण्यात भारत आघाडीवर आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठीच या डिफेन्स क्लस्टर्सची निर्मिती केली जाणार असून, त्यात लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्य असेल,’ असे पर्रीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्र महोत्सवाचे शानदार उद् घाटन

$
0
0

नवरात्र महोत्सवाचे शानदार उद् घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सतार, व्हायोलिन, बासरीची जुगलबंदी... नृत्याद्वारे केलेली गणेश वंदना, दुर्गा स्तुती व आदीशक्तीचा जागर... हिंदी मराठी गीतांचे फ्युजन आणि ठसकेबाज लावण्यांचे सादरीकरण, अशा शानदार कार्यक्रमांनी श‌निवारी पुणे नवरात्र महोत्सवाचे उद् घाटन झाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर मुकारी अलगुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, महापालिका गटनेते अरविंद शिंदे, पी. ए. इनामदार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, महोत्सवाचे अध्यक्ष नगरसेवक आबा बागुल, जयश्री बागुल आदी या वेळी उपस्थित होते. जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, कवी, गीतकार जयंत भिडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांना श्री लक्ष्मी माता कलासंस्कृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अशा प्रकारच्या महोत्सवातून कलाकारांना एक व्यासपीठ मिळतेच; परंतु जनसंपर्क वाढण्यासही मदत होते, असे सांगून चव्हाण म्हणाले, ‘मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत सकारात्मक बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत सध्या सामाजिक आशयांवर आधारित चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नो‌टिसा द्यायच्या कुणी?

$
0
0

नो‌टिसा द्यायच्या कुणी?

बेकायदा बांधकामांबाबत ‌जिल्हा प्रशासन संभ्रमात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) जिल्ह्यातील नऊ हजारांहून अधिक बेकायदा बांधकामांना नो‌टीस बजावण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयावर सोपवले असून, त्याबाबत जिल्हा प्रशासन संभ्रमात पडले आहे. नोटीस बजावण्याची कार्यवाही कोणी करायची याची स्पष्टता नसल्याने हवेली, मुळशी व मावळ तहसीलदारांकडे या नो‌टिसा पडून आहेत.
अवैध बांधकामे नियमित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर पुणे जिल्ह्यातील बेकायदा बांधकामांना नोटीस देऊन ती पाडण्याची कारवाई करण्यात येत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत. या बांधकामांची जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत पाहणी करण्यात आली. त्यात हद्दीलगतच्या गावांमध्ये हजारो बेकायदा बांधकामे आढळली.
या बांधकामांवर कारवाई करण्याबरोबरच काही बांधकामे नियमित करण्यासंदर्भात स्वाधीन क्षत्रिय यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला दिला. त्यावर मोठा उहापोह झाला; परंतु सरसकट बेकायदा बांधकामे नियमित न करता दंडात्मक कारवाई; तसेच आरक्षणावरील बांधकामांची गय न करण्याच्या निर्णयाप्रत सरकार आले. एकीकडे हा निर्णय घेतला असताना बेकायदा बांधकामांना नोटीस व ती पाडण्याची कारवाई केली जात असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
ही बेकायदा बांधकामे मुख्यत्वे हवेली, मावळ व मुळशी तालुक्यातील आहेत. पीएमआरडीएने नोटीस बजावण्यास दिल्या असल्या, तरी तहसीलदारांकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विकास क्षेत्रामध्ये नोटीस बजावणे व कारवाई करण्याचे काम पीएमआरडीएचे आहे. या भागातील नियोजन प्राधिकरण हे पीएमआरडीए आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे काम करणे अपेक्षित नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. राज्य सरकारचा निर्णय व बेकायदा बांधकामांवरील कारवाई यात विरोधाभास होत असल्याने त्याबाबतचे सुस्पष्ट आदेश होईपर्यंत कारवाई करणे उचित नसल्याचे मतही व्यक्त करण्यात येत आहे.
..............

४४५ बांधकामांना नो‌टिसा
पुणे महानगर विकास प्राधिकरणाने मागील आठवड्यात तीन बेकायदा बांधकामांवर कारवाई केली; तसेच दहा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले. याशिवाय ४४५ बांधकामांना नोटीस बजावल्या आहेत. माहिती अधिकाराच्या आधारे आलेल्या ९,०३१ प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यंत्रणेला नोटीस बजावण्याचे काम देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’च्या प्रदर्शनांना उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

‘मटा’च्या प्रदर्शनांना उत्स्फूर्त प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सणासुदीच्या दिवसांमध्ये वाहनखरेदी, गुंतवणूक आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली सांगणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या तीन प्रदर्शनांना शनिवारी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजही (रविवारी) ही प्रदर्शने खुली राहणार आहेत.
विविध कंपन्यांचे पर्याय, त्यावर आकर्षक सवलती, कर्जासह इन्शुरन्स आणि नोंदणीवरही खास सवलत असे खास नवरात्रीचे औचित्य साधून पुणेकरांसाठी या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शिवाजीनगरमधील साखर संकुलात आयोजित या प्रदर्शनांना घटस्थापनेचा मुहूर्त साधून भर पावसातही अनेकांनी आपल्या कुटुंबासहित भेट दिली आणि योग्य पर्यायाची निवड करत बुकिंगही केले. नवरात्र, दसरा आणि त्या पाठोपाठ येणारी दिवाळी या सणासुदीच्या दिवसात नवी कार खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी त्यांना विविध ब्रँडची विविध मॉडेल एकाच छत्राखाली उपलब्ध व्हावीत, हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. सर्व नामवंत कंपन्यांचे वितरक या प्रदर्शनात सहभागी असून त्यांनी स्पॉट बुकिंगवर खास गिफ्ट्स, विविध प्रकारच्या सवलती, कर्जयोजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिवाय सुपरबाईक्सही प्रत्यक्ष पाहण्याची संधीही या प्रदर्शनामुळे पुणेकरांना लाभली आहे.

मटा लँड एक्स्पो
जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड सध्या वाढतो आहे. जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, त्यामध्ये सुरक्षित आणि आकर्षक परतावा देणारे पर्याय याची माहिती मटा लँड एक्स्पोमधून देण्यात येते आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सोन्या मारुती चौक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र सोळंकी, उपाध्यक्ष पुष्कर अष्टेकर, सचिव गौतम सोळंकी यांच्या हस्ते या एक्स्पाेचे उद्घाटन झाले.

मटा हेल्थ एक्स्पो
धकाधकीच्या जीवनात सध्या आरोग्याचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. निरोगी राहण्यासाठी हेल्थ आणि फिटनेसकडे सर्वच जण लक्ष देतात. आरोग्यविषयक माहिती, उत्पादने आणि जीवनशैलीविषयक विविध प्रकारची माहिती महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हेल्थ एक्स्पोमध्ये उपलब्ध आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे भरविण्यात आलेल्या या हेल्थ एक्स्पोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आरोग्यविषयक कोणती उत्पादने सध्या लोकांसाठी उपलब्ध आहेत, त्याचा वापर कसा करायचा, कोणत्या उत्पादनांचा काय फायदा होतो, मुख्य म्हणजे आपली जीवनशैली कशी असावी याविषयी माहिती देणारे स्टॉल हेल्थ एक्स्पोमध्ये उपलब्ध आहेत. एक्स्पोला भेट दिलेल्या लोकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्न, समस्यांचे निराकरण करून माहिती देण्यात आली. आरोग्यविषयक उत्पादनांचा वापर कसा करायचा याची प्रात्यक्षिके या ठिकाणी उपलब्ध आहेत. आज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळात ही तिन्ही प्रदर्शने खुली राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’बाबत मुख्यमंत्र्यांची खासदार, आमदारांशी चर्चा

$
0
0

‘डीपी’बाबत मुख्यमंत्र्यांची खासदार, आमदारांशी चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराचा विकास आराखडा (डीपी) गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी आहे. या आराखड्याला महिनाअखेरपर्यंत मंजुरी द्यावी, डीपीमध्ये मेट्रोच्या एफएसएआयचे धोरण तयार करून या एफएसआयमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग केवळ मेट्रो प्रकल्पासाठीच करण्यात यावा, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
शहराच्या डीपीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील खासदार, विधान परिषदेचे आमदार यांची बैठक घेतली. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, खासदार वंदना चव्हाण, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अनिल भोसले, अनंत गाडगीळ उपस्थित होते. त्यामध्ये डीपी महिनाअखेरपर्यंत मंजूर करावा, अशी मागणी काकडे यांनी केली. डीपीला मंजुरी देताना राज्य सरकारने शहराची जुनी हद्द आणि नवीन हद्दीसाठी एकच नियमावली लागू करावी, कर्वेनगर येथील ६, ७ आणि ८ मध्ये असलेले आर्थि‍कदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करून तेथे रहिवासी झोन करण्यात यावा. हज हाउससाठी एक हेक्टर जागा डीपीमध्ये ठेवावी, अशी मागणी खासदार काकडे यांनी केली.
राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्य समितीने डीपीमधील अनेक आरक्षणे बदलली असल्याची चर्चा सुरू आहे. याची चौकशी करून समितीने केलेले बदल रद्द करावेत, बीडीपीमध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला मान्यता देऊ नये, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी केली. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे डीपीमध्ये विद्यार्थी वस‌तिगृहासाठी जागा राखीव ठेवण्यात याव्यात, त्याला वाढीव एफएसआय द्यावा, अशी मागणी भोसले यांनी केली. शहरातील पार्किंगच्या गंभीर समस्येची दखल डीपीमध्ये घ्यावी, असे अनंत गाडगीळ यांनी सांगितले; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत, असे धोरण डीपीत असावे, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी केली.
...............
विरोध करणारेच म्हणतात...
राजगुरुनगर येथे विमानतळ होऊ देणार नाही, अशी आग्रही भूमिका घेणाऱ्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहराचा नियोजित विमानतळ राजगुरुनगर येथेच करावा, अशी मागणी केली आहे. पुरंदर येथे विमानतळ न करता खेडमधील चाकण येथे करावा, ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यासाठी सेझमधील जागा देण्यास तयार असल्याचेही खासदार आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शटल सेवा वाढविण्याचा एसटीचा निर्णय

$
0
0

शटल सेवा वाढविण्याचा एसटीचा निर्णय

राज्यभरात १८३८ जादा फेऱ्या; प्रवाशांचा वेळ वाचणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तत्काळ बससेवा उपलब्ध करून देणे आणि प्रवासाचा कालावधी कमी करणे यासाठी एसटी महामंडळाने शटल बससेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत राज्यभरात एक हजार ८३८ बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
एसटीकडून सामान्य, जलद व विनाथांबा अशा सेवा दिल्या जातात. प्रवाशांची गरज ओळखून व अधिकाधिक प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एकाच मार्गावर तिन्ही सेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी शटल गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईसाठी २०४ फेऱ्या, पुण्यासाठी २६७, नाशिक ३६८, संभाजीनगर १४४, अमरावती ३८१, नागपूर २७४ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, असे एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.
या सेवेसाठी, तिकिट दरात कोणतीही वाढ केलेली नाही. प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे; तसेच लांब पल्ल्याच्या व रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा कल लक्षात घेऊन रातराणी सेवा वाढविण्यावर महामंडळाने भर दिला आहे. याच बरोबर दिवसा धावणाऱ्या अनावश्यक लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून त्याऐवजी रातराणी सेवेला प्राधान्य देण्याचे धोरण महामंडळ अवलंबत आहे.
-----
खासगी प्रवासी बस व्यावसायिकांशी स्पर्धा करण्यासाठी रातराणी सेवा वाढविणे गरजेचे आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी रातराणी बसला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रवाशांना रात्री उशिरा निघून सकाळी लवकर इच्छितस्थळी पोहाेचता येईल, असे एसटीचे वेळापत्रक बनविले जात आहे.
अभिजीत भोसले (जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामायूरी-विद्याराज्ञी

$
0
0

महामायूरी-विद्याराज्ञी

डॉ. मंजिरी भालेराव

बौद्धधर्म हा प्रमुख भारतीय धर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा धर्म आहे. वैदिक कर्मकांडाच्या विरोधात उभे राहून तत्कालीन जैन, आजीविक इ. पंथांच्या श्रमणांबरोबर राहून, त्यांचे धर्म समजावून घेऊन गौतम बुद्धांनी स्वतःचा असा एक ‘मध्यम मार्ग’ शोधला. त्याचा भारतभर प्रसार कसा होईल, याचे उत्तम नियोजन केले. कोणत्याही कर्मकांडाच्या मागे न जाता उत्तम आचरणाने आपले इप्सित साध्य करण्याचा एक मार्ग त्याने दाखवला आणि तो झपाट्याने लोकप्रियही झाला. पण सामान्य उपासक आणि भिक्षू आपल्या रोजच्या जीवनातील अडचणींचे निवारण करण्यासाठी अतिमानवी शक्ती म्हणजे विविध रक्षक यक्ष-यक्षी आणि देवता यांची आराधना-उपासना करू लागले. त्याचा परिणाम म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ३०० वर्षांनी अनेक लोकदेवतांची उपासना या धर्मात होऊ लागली असे दिसते.
यापैकी अनेकांचे भारहूतच्या स्तुपावर अंकन केलेले दिसते; तसेच तिथे त्यांची नावेही लिहिलेली दिसतात. इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर बौद्ध धर्मामध्ये अजून काही देवतांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. महायान पंथाची लोकप्रियता झपाट्याने वाढत असताना अनेक बोधिसत्त्व आणि देव-देवता यांचा समावेश असलेले ग्रंथ आणि मूर्ती यांची निर्मिती या काळात होत होती असे दिसते. काही वेळेस तर ग्रंथातल्या देवतेची मूर्ती करून तिचीही पूजा होत होती, असे लक्षात येते. त्यापैकी एक देवता म्हणजे महामायूरी. महामायूरी ही देवता नावाप्रमाणेच मयूर किंवा मोर याच्याशी संबंध असलेली आहे. महायान बौद्ध धर्मात लोकप्रिय असलेली ही देवता मुख्यतः एक रक्षक देवता होती. बौद्ध साहित्यात महामायूरी नावाचा एक ग्रंथ आहे. या देवतेचे वाहन मोर आहे. म्हणून तिचे नाव महामायूरी आहे.
बौद्ध भिक्षूंना धर्मप्रसारासाठी जेव्हा अनेक ठिकाणी जावे लागे, तेव्हा सर्पदंशाचेही भय असे. अशा वेळी साप चावल्यावर जर या देवतेचे आवाहन केले; तर विष उतरेल अशी त्यांची धारणा होती. सर्पदंशाच्या वेळेस ते भिक्षू ज्या भागात असतील, त्या प्रदेशातील ग्रामरक्षक यक्षाचे त्या वेळेस त्यांनी स्मरण केले असता त्यांचे रक्षण होईल अशीही त्यांची समजूत होती. त्यामुळे या ग्रंथात भारतातील निरनिराळ्या गावांचे रक्षक यक्ष कोण आहेत, हे सांगणारी मोठी यादीच दिलेली आहे. त्यामुळे त्या काळी कोणत्या गावात कोणते रक्षक यक्ष होते, याची माहिती आपल्याला मिळू शकते. महामायूरी-विद्याराज्ञी असेही या देवतेचे एक विशेषण आहे असे दिसते. यातून ती विद्येची देवता असल्याचे ध्वनित होते. जे भिक्षू ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील ते तिची उपासना करत असत. अशा प्रकारचे शिल्प आपल्याला वेरूळ येथे पाहावयास मिळते.
या देवतेच्या भारतातील सर्वात प्राचीन मूर्ती या वेरूळमध्येच आहेत. गुहा क्र. सहा, आठ आणि बारामध्ये त्या पाहायला मिळतात. या देवीने तिच्या उजव्या हातात मोराचे पीस धरले आहे; तर डाव्या हातात एक बीजपूरक नावाचे फळ आहे. शेजारी संपूर्ण पिसारा फुलवलेला मोर आणि शेजारी छोट्या टेबलावर ग्रंथ ठेऊन अध्ययन करीत असलेला भिक्षू हे या शिल्पात दाखवलेले आहेत. इसवी सनाच्या सहाव्या-सातव्या शतकात या मूर्तींची निर्मिती झालेली दिसते. त्यापूर्वी मात्र या देवतेची ग्रंथरूपातच आराधना होत असावी असे वाटते. हिंदू देवता सरस्वतीसारखी वैशिष्ट्य असणारी ही देवता महायान आणि वज्रयान पंथात खूप लोकप्रिय होती. पंचरक्षा देवतांमध्ये हिचा समावेश झाला होता. बौद्धधर्म जसा पूर्व आशियात गेला आणि हळूहळू भारतातून नाहीसा झाला, तसे या ग्रंथाचे तसेच देवतेचेही भारतीयांना विस्मरण झाले. पण तिबेटमध्ये ती आजही लोकप्रिय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासभस्था शीतला

$
0
0

रासभस्था शीतला

डॉ. सुरुची आणि डॉ. सतीश पांडे

शीतला नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशूला मानाचे स्थान दिले गेले आहे. देवतांच्या वाहनांमध्ये रानटी आणि पाळीव असे गाढवाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. फिकट पिंगट रंगाचे रानटी गाढव फार देखणे दिसते. कच्छच्या छोट्या रणात; तसेच लडाखमध्ये आपण रानटी गाढव पाहू शकतो. गुजराती भाषेत त्याला ‘घुडखर’ असे म्हणतात. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी उज्जैन येथे राजा विक्रमादित्याच्या काळात गाढवांचा बाजार पाहायला मिळतो. पुण्याच्या जवळच जेजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमारास म्हणजेच डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान हा बाजार भरतो. मल्हारी मार्तंडाचे जे मूळ मंदिर कडेपठारावर आहे, तेथे लागणाऱ्या सामानाची ने-आण गाढवावरून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरीवृत्ती सहनशीलपणा आणि अवघड परिस्थितीत तग भरून राहण्याचा चिवटपणा हे सारे गुण गाढवाच्या अंगी असतात. मात्र, मानव प्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचे अवमूल्यन करणारे शब्द मात्र वापरतो. गाढवाच्या ठायी जी चिवट, घट्ट वृत्ती आहे. त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टीचे चिन्हही गाढव असल्याचे दिसते.
अकराव्या-बाराव्या शतकाच्या सुमारास अनेक शीतला देवीच्या मूर्ती आढळतात. ‘शब्दकल्पद्रुम’ नावाच्या ग्रंथात तिचे रूप वर्णन करताना ती ‘रासभस्था’ आहे म्हणजे गाढवावर आरूढ झालेली असते, असे म्हटले आहे. शीतलेची वेगवेगळ्या प्रांतात पूजा केली जाते. ही देवी ज्वरासुराला म्हणजेच तापाच्या रुपाने आलेल्या असुराला दूर करते. माणसाला शीतल करते, असे मानले जाते. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. मोठीबाई, चेचकमाता, मसानी, उजाली अशी विविध नावे आहेत. काही परंपरांमध्ये शीतलेला पार्वतीचे एक रुप मानतात; तसेच तिला लोकदेवतेचेही स्थान आहे. शांत, कष्टाळू स्वभावाच्या गाढवावर आरूढ झालेल्या शीतलेला ठाकूरांनी, दयामथी, मंगला, करुणामयी अशी छान नावेही आहेत. बंगाली साहित्यात मंगलकाव्य नावाच्या काव्यरचना पंधराव्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेत शीतलामंग नावाचे काव्य आढळते. ‘देवदेवी ओ तादेर बाहन’ नावाच्या बंगाली पुस्तकात, शीतला देवीचे वाहन असलेल्या गाढव प्रतिकाबद्दल छान चर्चा केली आहे. माणसाचे रोग दूर करणाऱ्या शीतलेने गाढव आपले वाहन म्हणून निवडले याचे कारण गाढव सात्विक गुणी असते. गाढवाच्या पाठीवर जे सामान लादले जाते, त्याबद्दल त्याला किंचितही लोभ नसतो. निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निःस्वार्थता हे गुण माणसाने गाढवाकडून शिकावेत म्हणून शीतलेने त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकवू इच्छिणाऱ्या देवीला तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेते. आपल्या आसपास आढळणाऱ्या शांतपणे काम करणार्‍या प्राणिमित्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, याचे मोठे प्रतीक म्हणजे राजभस्था शीतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images