Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गणवेश वाटपासाठी डिसेंबर उजाडणार

$
0
0

प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्याने प्रक्रियेत अडसर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाचे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेल्याने खरेदीची संपूर्ण प्रक्रिया अडकून पडली आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थ्यांच्या हातात प्रत्यक्ष गणवेश पडण्यास डिसेंबर उजाडणार आहे. कोर्टाने निकाल दिल्यानंतर गणवेशाच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी होऊन खरेदी केली जाणार आहे.
महापा‌लिकेच्या शिक्षणमंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच गणवेश दिले जातील, अशी घोषणा शिक्षणमंडळाकडून करण्यात आली होती. दर वर्षी विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीमध्ये विघ्न निर्माण होत असले तरी, यंदा नियोजनामुळे विद्यार्थ्यांना गणवेशासाठी कोणताही त्रास होणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, गणवेश पुरविणारा ठेकेदार कोर्टात गेल्याने शाळा सुरू होऊन चार महिन्यांनंतरही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. शिक्षणमंडळातील जवळपास एक लाख विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन या प्रमाणे दोन लाख गणवेश खरेदी केले जाणार आहेत.
गणवेश खरेदीसाठी राबविलेल्या टेंडर प्रक्रियेत मफतलाल कंपनीला हे काम देण्यात आले होते. मात्र, मफतलालच्या विरोधात पेपरमेड या कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मफतलालच्या कपड्याच्या नुमन्यांच्या तपासणीत गैरकारभार झाला असून, या ठेकेदाराशी प्रशासनाने करार केला नसतानाही काम दिल्याचा आक्षेप घेण्यात आला. सुनावणीदरम्यान कोर्टाने महापालिका प्रशासनाबरोबरच मफतलालवरही ताशेरे ओढले. तसेच, गणवेशखरेदीसाठी पुन्हा नव्याने फेरटेंडर काढण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानुसार प्रशासनाने सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पुन्हा टेंडर मागविले. मात्र, हायकोर्टा‌च्या आदेशाविरोधात मफतलाल कंपनीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर कोर्टाने मंडळाला गणवेशासाठी फक्त टेंडर प्रकिया राबवा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेकडे टेंडर आल्यानंतरही ती उघडली नाहीत.
..
कोर्टाच्या आदेशानुसार कार्यवाही
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यावर पुढील कार्यवाही होणार आहे. मात्र, आलेल्या निविदेतून ठेकेदारांच्या गणवेशाच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खरेदीची ऑर्डर दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश मिळण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
...............
शिक्षण मंडळाने गणवेश खरेदीची निविदा प्रकिया राबवली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मात्र, कोर्टाचा आदेश नेमका कधी येईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे.
शुभांगी चव्हाण,
प्रभारी शिक्षण प्रमुख,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फलक न लावल्याने संस्थांना धाडल्या नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी जमिनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या संस्थांनी संबंधित जमिनीवर याबाबत फलक न लावल्याने जिल्ह्यातील सुमारे ८५० संस्थांना जिल्हा प्रशासनाने नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामध्ये शहरांतील अनेक नामांकित शिक्षणसंस्थांचा समावेश आहे. फलक न लावल्यास शर्तभंग होत असल्याने कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुमारे एक हजार ४०० संस्थांना सरकारी जमिनी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. पूर्वी १५ वर्षांसाठी या जमिनी देण्यात येत होत्या. आता ३० वर्षांसाठी दिलेल्या आहेत. संस्थांनी जमिनीवर फलक लावण्याची सक्ती आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्या होत्या. त्यामुळे सुमारे ५७१ संस्थांनी फलक लावले. मात्र, अन्य संस्थांनी फलक न लावण्याने त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जमीन भाडेतत्त्वावर देताना काही नियम केलेले आहेत. त्या नियमांचे पालन न केल्यास शर्तभंग होऊन जमीन ताब्यातून घेतली जाऊ शकते. त्यामध्ये जमिनीवर फलक लावण्याचा नियम असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सरकारी जमिनी मिळालेल्या संस्थांनी फलकावर जमिनीचा सर्व्हे क्रमांक, आकार, भाडेतत्त्वाबाबत केलेल्या कराराची मुदत, नूतनीकरणाची तारीख, कोणत्या उपक्रमासाठी जमीन देण्यात आली आहे आदी माहितीचा समावेश असतो. ही माहिती देण्यामागे संबंधित संस्थेला कोणत्या कारणासाठी जमीन देण्यात आली आहे, हे लोकांना समजू शकते. दिलेल्या कारणासाठीच जमिनीचा वापर होत आहे की नाही, हे फलकाद्वारे लोकांच्या निदर्शनास येते. अन्य वापर होत असल्यास त्याची माहिती लोकदेखील प्रशासनाला देऊ शकतात. त्यामुळे फलक लावण्याची सक्ती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सणासुदीच्या खरेदीसाठी उद्यापासून तीन प्रदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सणासुदीच्या खरेदीच्या सीझनमध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने तीन भव्य प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मटा लँड एक्स्पो,’ ‘मटा ऑटो एक्स्पो’ आणि ‘मटा हेल्थ एक्स्पो’ या प्रदर्शनांमधून नागरिकांना खरेदीचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
उद्या (शनिवार) व रविवारी या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे ‘मटा लँड एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही काळात जमिनींमध्ये गुंतवणुकीचा ट्रेंड ग्राहकांमध्ये वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जमीनखरेदीचे सुरक्षित आणि आकर्षक परतावा देणारे पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध आहेत; तसेच गणेश कला क्रीडा मंच येथेच ‘मटा हेल्थ एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. धकाधकीच्या जीवनशैलीत सध्या आरोग्याचे अनेक प्रश्न भेडसावत असून निरोगी राहण्यासाठी हेल्थ आणि फिटनेसकडे सर्वच जण लक्ष देतात. या संदर्भातील माहिती, उत्पादने आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, सणासुदीला वाहन खरेदीचा योग साधण्यासाठी अनेक ग्राहक आतुर झाले आहेत. वेगवेगळ्या शोरुम्समध्ये जाऊन वाहनांची पाहणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी वाहनांचे अनेक पर्याय ‘मटा ऑटो एक्स्पो’मध्ये सादर करण्यात येत आहेत. यामध्ये वाहनखरेदीच्या वेगवेगळ्या स्कीम्स, ऑन दी स्पॉट गिफ्ट्स यांबरोबरच सुपरबाइक्सचे खास दालन हे या एक्स्पोचे आकर्षण ठरणार आहे. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळात तिन्ही प्रदर्शने खुली राहणार आहेत. या प्रदर्शनांना भेट देऊन खरेदीचा आनंद लुटण्याची मोठी संधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाने माफी मागावी अन्यथा...

$
0
0

टीडीआर प्रकरणी सुभाष जगताप यांचे आयुक्तांना पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धनकवडी येथील टीडीआर प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेल्या नगरसेवक सुभाष जगताप यांनी या प्रकरणात आपला काहीही दोष नसून पालिका प्रशासनाने चुकीची माहिती माध्यमांना दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाने आपली लेखी माफी मागून टीडीआर रद्द करण्याचे पत्र मागे घ्यावे अन्यथा आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही दिला आहे.
धनकवडी येथील एका जमिनीचा टीडीआर सुभाष जगताप यांना महापालिकेने २०१० मध्ये दिला होता. या जागेच्या मालकीच्या उताऱ्यामध्ये इतर हक्कांमध्ये आपले नाव असताना व आपण हरकत घेतलेली असतानाही पालिका प्रशासनाने हा टीडीआर जगताप यांना कसा दिला, अशी हरकत घेतली होती. महापालिका आपल्या हरकतीला दाद देत नाही, हे पाहिल्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालय निकाल देण्याची वेळ येताच पालिका प्रशासनाने त्यापूर्वीच जगताप यांना देण्यात आलेला टीडीआर रद्द करण्यात आल्याचे पत्र थोरवे यांना दिले होते.
या पत्रात जगताप यांच्या विनंतीवरूनच हा टीडीआर रद्द करण्यात आल्याचेही म्हटले होते. या सगळ्यालाच जगताप यांनी हरकत घेतली आहे. या जागेवर पालिकेने परस्पर रस्त्याचे काम सुरू केले होते. त्या वेळेस आपण हरकत घेतल्यानंतर पालिकेने जागेची नुकसान भरपाई म्हणून आपल्याला टीडीआर दिला आहे. तो देतानाही पालिकेने एक तृतीयांशच इतकाच दिला आहे. त्यामुळे आपले या पूर्वीच नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तो रद्द करणे हा आपल्यावर अन्याय आहे.
या जमिनीच्या मालकी हक्कांवरून २००८मध्ये वाद झाला होता. त्या वेळेस या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर आपले नाव लावण्यात येऊ नये, अशी हरकत थोरवे यांनी घेतली होती. पण सर्कल अधिकाऱ्यांनी ती फेटाळली होती. त्यानंतर थोरवे यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितलेली नाही; तसेच थोरवे यांचे इतर हक्कांमध्ये नोंदविण्यात आलेल्या नावाबद्दलही आक्षेप घेण्यात आले आहेत.
................
जगतापांविरोधात त्यांच्याच पक्षातून आघाडी
सुभाष जगताप यांचे त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी पटत नसल्याचे चित्र आहे. जगताप यांनी विधानसभेच्या निवडणुकीतील आपल्या पराभवाची नाराजी नुकतीच पक्षाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे व्यक्त केली होती. या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग असण्याचाही फायदा त्यांचे पक्षातील विरोधक उठवित असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबत राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत,’ असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतची राज्य सरकराची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मोर्चांबद्दल दहा दिवसांपूर्वी वक्तव्य केले आहे. त्यानुसार सरकारची चर्चेची तयारी आहे. ही चर्चा राज्य किंवा जिल्हा स्तरावर चर्चा होऊ शकते. आरक्षण देण्याबाबत सरकार तयार आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.’ ‘अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्ती हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. याबाबत मराठा आणि दलित समाजातील नेत्यांनी एकत्र बसून त्यातून मार्ग काढावा, ही सरकारची सुरवातीपासून भूमिका आहे,’ असेही पाटील म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याबद्दल सरकारचे दुमत नसल्याचे सांगून पाटील म्हणाले की, ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाला सुमारे दोनशे कोटी रुपये निधी दिला आहे; तसेच आरक्षण नसलेल्या समाजातील सर्व घटकांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची सरकारची तयारी आहे. त्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासह सर्व गोष्टींची सवलत मिळण्यास मदत होणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहास विसरा, उद्योग करा; तावडेंचा नवा पर्याय

$
0
0

यशपाल सोनकांबळे । पुणे

मुलांना कठीण जातात म्हणून इंग्रजी व गणित हे विषय ऐच्छिक करण्याच्या विचारावर टीकेची झोड उठली असतानाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाजपच्या आवडत्या इतिहास विषयालाच हात घातला आहे. तावडे यांच्या शिक्षण खात्यानं आता आठवी, नववीतील इतिहास व नागरिकशास्त्र विषयाला उद्योग विषयाचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारनं तसा निर्णयच जारी केला आहे. त्यानुसार, यापुढं आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना इतिहास व नागरिकशास्त्राऐवजी उद्योग हा विषय पर्याय म्हणून निवडता येणार आहे. जिल्हा व नगर परिषद पातळीवर पुढील वर्षापासून या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे आदेश सरकारनं राज्य शिक्षण मंडळाला दिले आहेत. कालांतरानं सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हा निर्णय लागू केला जाणार आहे. शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

राज्य प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी सरकारनं तसे निर्देश दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये आधीपासूनच असा पर्याय आहे. आता अन्य प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येही त्याची अमलबजावणी केली जाईल,' असं त्यांनी सांगितलं.

शैक्षणिक प्रगती यथातथा असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याचे राज्य माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी सांगितलं. या निर्णयामुळं इतिहास व नागरिकशास्त्र शिकविणारे शिक्षक बेरोजगार होण्याची भीती निराधार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारच्या या निर्णयाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व राज्य डी. एड. अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. ए. एल. देशमुख यांनी विरोध दर्शवला आहे. 'विद्यार्थ्यांना सर्व विषयांची किमान ओळख करून देणं हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे. इतिहास व नागरिकशास्त्राला पर्याय दिल्यास विद्यार्थ्यांच्या सामाजिक आकलनावर परिणाम होईल. काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अगदीच यथातथा असते हे खरं आहे. पण ही संख्या अवघी १० टक्के आहे. केवळ त्यांनाच असा पर्याय उपलब्ध करून दिल्यास ते योग्य होईल. सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा,' असं आवाहनही त्यांनी केलं.

सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल यांनीही सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याचा इशारा दिला. 'हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. राष्ट्रबांधणीसाठी विद्यार्थ्यांना इतिहास व नागरिकशास्त्राचं ज्ञान अत्यावश्यक आहे. उद्योग हा त्यांना पर्याय कसा होऊ शकतो,' असा सवाल त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांदळाच्या काळाबाजारप्रकरणी बचत गटांविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शालेय पोषण आहार योजनेतील ४६ हजार रुपये किमतीचा तांदूळ काळ्या बाजारात विकायला नेणारा टेम्पो काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कासेवाडी येथे पकडला. खडक पोलिसांनी या प्रकरणी चार महिला बचट गटांच्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षण विभागाचे पोषण आहार अधीक्षक मदन हागवणे (४३, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी खडक पोलिस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मार्कंडेय महिला बचत गट, प्रतिक्षा महिला बचत गट, बालाजी व्यवसाय गट आणि चमेली महिला व्यवसाय गटाच्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही महिला गटातील महिलांसह रामजी नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कासेवाडी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांना शालेय पोषण आहाराचे तांदूळ काळ्या बाजारात विकण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तांदूळ घेऊन जाणारा टेम्पो शनिवारी रात्री पकडला. याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाला देण्यात आल्यानंतर त्या तांदळाची खातरजमा करण्यात आली. शालेय शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत एक हजार ११५ किलो तांदूळ चोरीस गेल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार ४६ हजार रुपयांचा तांदूळ चोरीस गेल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार एस .पी. देवकर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो मान्यतेसाठी पीआयबीची बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या मान्यतेसाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (पीआयबी) बैठक येत्या १४ ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत मेट्रोला मान्यता देण्याची औपचारिकता बाकी असून, त्यानंतर मेट्रोचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा केंद्र-राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असेल.

मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केल्या जाणाऱ्या मेट्रोसारख्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या ‘पीआयबी’ची मान्यता अनिवार्य असते. त्यासाठी, ‘प्री-पीआयबी’ बैठक जूनमध्येच झाली होती. या बैठकीत काढण्यात आलेल्या त्रुटी दूर केल्यानंतर मेट्रोची पीआयबी बैठक केव्हा होणार, याबाबत विचारणा केली जात होती. पीआयबीच्या ‘ग्रीन सिग्नल’ शिवाय मेट्रोचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केला जाऊ शकत नाही. ही बैठक १४ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.

या बैठकीत ‘पीआयबी’ची अंतिम मान्यता मिळण्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत. त्यानंतर, हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल. ऑक्टोबरमध्येच मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मोहोर उमटली, तर महापालिका निवडणुकांपूर्वी नोव्हेंबरमध्ये मेट्रोचे भूमिपूजन करण्याचाही केंद्र-राज्यातील सत्ताधारी भाजपचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाचाळ नेत्यांची वक्तव्ये मोदींच्या पायातील बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल ऑपरेशनबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराचे शुक्रवारी जाहीर अभिनंदन केले. त्याचवेळी भारतीय जनता पक्षामधील मोजक्या वाचाळ नेत्यांची विधाने ही राष्ट्रभक्त पंतप्रधान मोदींच्या पायातील बेड्या ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली.

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर केलेल्या आक्रमक कारवाईचे ‘क्रांती ज्योती पुणे’ संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भूमिका मांडताना डॉ. सबनीस यांनी या हल्ल्याबाबतची साहित्यिकांची भूमिका मांडली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. सतीश देसाई, संस्थेचे उमेश चव्हाण, भारिपच्या अॅड. वैशाली चांदणे आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. सबनीस यांनी या निमित्ताने संपूर्ण साहित्यविश्व आणि कलाकारांच्या वतीने केंद्र सरकार, लष्कर आणि एकात्मता जपणारी भारतीय जनता यांचे अभिनंदन केले. डॉ. सबनीस म्हणाले, ‘नरेंद्र मोदींच्या तत्त्वज्ञानाबाबत माझे कालही मतभेद होते, ते आजही असू शकतील. मात्र त्यामुळे भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा विसर पडू शकत नाही. पंतप्रधान म्हणून ते मला गांधी आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारी व्यक्ती म्हणून ते महत्त्वाचे वाटतात. सर्जिकल ऑपरेशनसाठी म्हणून त्यांनी निभावलेली मुत्सद्दी भूमिका केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारणालाही कलाटणी देणारी ठरते.’

‘देशांतर्गत पातळीवर हिंदू- मुस्लिम ऐक्याच्या बाबतीत भाजपची भूमिका लोकशाहीला धरून राहिलेली नाही. पाकिस्तानसारख्या राष्ट्राला देशातील फुटीरतावाद्यांच्या माध्यमातून अराजक निर्माण करायचे आहे. त्याला पूरक ठरणाऱ्या भाजपच्या वाचाळवीर नेत्यांची विधाने मोदींना मागे खेचणारी ठरतात. या बेड्या या पुढील काळात मोडून काढाव्या लागतील. त्यानंतरच मोदींना त्यांच्या राष्ट्रवाद आणि विश्वशांतीची भूमिका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडता येईल,’ असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले. डॉ. सप्तर्षी, डॉ. देसाई, अॅड. चांदणे यांनीही या वेळी लष्कराचे अभिनंदन केले. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मूल्यवर्धन’साठी महाराष्ट्र मॉडेल

$
0
0



Yogesh.Borate@timesgroup.com
Tweet : @yogeshborateMT

पुणेः राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाचे धडे देणारा ‘मूल्यवर्धन’ हा सरकारी कार्यक्रम आता गोव्यातील सर्व शाळांमधूनही विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेले मॉडेलच गोव्यात सुरुवातीच्या टप्प्यात वापरले जाणार आहे.

राज्यामध्ये शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या माध्यमातून ‘मूल्यवर्धन’ची सुरुवात झाली होती. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि फायदे पाहून, गेल्या नऊ महिन्यांपासून राज्य सरकारने शिक्षण खात्याचा उपक्रम राज्यभरात पोहोचविला आहे. या प्रयत्नांना मिळणाऱ्या प्रतिसादाची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतः गुरुवारी घेतली. याच निमित्ताने ‘मूल्यवर्धन’च्या विस्ताराबाबत ‘मटा’ने ‘एससीईआरटी’चे संचालक गोविंद नांदेडे आणि फाउंडेशनच्या शांतीलाल मुथा यांच्याशी संवाद साधला. त्यातून हा प्रकल्प आता राज्याच्या सीमा ओलांडणार असल्याचे समोर आले. गोव्यात या उपक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याच्या वृत्तास नांदेडे यांनी दुजोरा दिला. मुथा यांनी या प्रकल्पाच्या बारकाव्यांवर प्रकाश टाकला.

मुथा म्हणाले, ‘महाराष्ट्रात मूल्यवर्धनची अंमलबजावणी होत असताना ‘एससीईआरटी’ने तज्ज्ञांच्या मदतीने मूल्यवर्धन आराखडा, विद्यार्थी कृतीपुस्तिका, शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका आदी बाबी सुनियोजित पद्धतीने तयार केल्या होत्या. गोव्यातील एका खासगी संस्थेच्या शाळांमधून गेल्या एक वर्षापासून त्याआधारे ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणीही झाली. त्याला मिळालेले यश पाहून गोवा राज्य सरकारने फाउंडेशनशी करार केला. त्या आधारे या पुढील काळात मूल्यवर्धन हा गोवा राज्याचा सरकारी प्रकल्प म्हणून गोव्यातील सर्व शाळांमधून राबविण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.’ सध्या महाराष्ट्रातील मॉडेलचाच गोव्यात वापर होणार आहे. त्या पुढील टप्प्यात गरज वाटल्यास गोव्यातील शिक्षक त्यांच्या स्थानिक गरजा विचारात घेऊन, या मॉडेलमध्ये सुधारणा करू शकतील, असेही मुथा यांनी सांगितले.

काय आहे मूल्यवर्धन...

फाउंडेशन गेल्या सात वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमधून हा उपक्रम राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्ये, अभिवृत्ती व कौशल्य विकासाचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी कृतीआधारित शिक्षण, संपूर्ण शाळा सहभाग या तत्त्वांवर भर दिला जात आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी या उपक्रमाचे केलेले मूल्यमापन, त्यातून पुढे आलेल्या शिफारशी, प्रत्यक्ष अनुभव आणि संशोधनाच्या आधारे या उपक्रमाचा नवा आराखडा तयार झाला होता. या आराखड्यावर आधारित उपक्रम महाराष्ट्रात राबविण्यात येत आहेत. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ३४ जिल्ह्यांत ७३० शाळांमधून ३८ हजारांवर विद्यार्थी सध्या याचा लाभ घेत आहेत. सध्या इयत्ता पहिली ते तिसरीच्या वर्गांमध्ये ‘मूल्यवर्धन’चे उपक्रम राबविले जात आहेत. या पुढील टप्प्यांमध्ये तीन वर्षांत इयत्ता दहावीपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यायोगे पुढील तीन वर्षांत महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक शाळांमधून ‘मूल्यवर्धन’चे धडे देण्यासाठी शिक्षण खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी जमिनींच्या वापराची तपासणी

$
0
0

प्रशासनाकडून १४ जणांचे पथक तयार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सरकारी जमिनी भाडेतत्त्वावर किंवा कायमस्वरूपी दिल्यानंतर त्याचा वापर दिलेल्या कारणांसाठीच होत आहे की नाही, याचा तपास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ जणांचे पथक तयार केले आहे. या पथकाकडून संबंधित जमिनींच्या वापराचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कॉसमॉस बँकेला शिवाजीनगर येथील जमीनप्रकरणी जिल्हा प्रशासनाने नजराणा भरण्याबाबत नुकतीच नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर हा ​निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी जमिनी विविध कारणांसाठी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. निवासी किंवा अन्य कोणत्याही उपक्रमांसाठी जमीन दिल्यास त्याचा वापर त्याच कामासाठी केला पाहिजे. मात्र, अनेक ठिकाणी दिलेल्या जमिनींची विक्री करून कराराचा भंग करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे याचा तपास करण्यासाठी १४ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे.
एखाद्या व्यक्तीने जमिनीची परस्पर विक्री केल्यास शर्तभंग होतो. शर्तभंग झाल्यास संबंधितांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. पथकाकडून अशा जमिनींच्या वापराबाबतची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, सरकारी जमिनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या संस्थांनी त्या जमिनीवर फलक लावण्याची सक्ती आहे. त्यामध्ये जमिनीचा सर्व्हे क्रमांक, आकार, कराराची मुदत, नूतनीकरणाची तारीख, कोणत्या उपक्रमासाठी जमीन देण्यात आली आहे, त्याची माहिती देणे अत्यावश्यक आहे. मात्र, अनेक संस्था फलक लावत नसल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हा प्रशासनाने सुमारे ८५० संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे एक हजार ४०० संस्थांना ३० वर्षांसाठी सरकारी जमिनी भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ५७१ संस्थांनी फलक लावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चारचाकी वाहनातून शहरात घरफोडी करण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत लाखोंचा माल जप्त केला. त्यांच्यावर पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सिद्धार्थ राजेंद्र हारके (वय २२, रा. आंबेगाव पठार) व रवी उर्फ सोन्या उर्फ बंटी श्रीमंत वाघमारे (वय २०, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सराईत व फरार गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेंद्र जाधव व कर्मचारी हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कर्मचारी संजय गायकवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, घरफोडी गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता एक लोखंडी कटावणी व एक छोटा स्क्रू ड्रायव्हर जप्त केले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून फरासखाना, खडक, शिवाजीनगरसह विविध भागांतील सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून घरफोडीच्या पैशांतून घेतलेली एक कार, ५५ हजार रोख, इतर साहित्य असा माल जप्त करण्यात आला आहे. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर यासह इतर ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. फरासखाना पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेखा सांळुखे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, कर्मचारी अमेय रसाळ, संजय गायकवाड, संदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगताप डेअरी-साईचौकातील वाहतूक कोंडी फुटणार

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या सांगवी ते किवळे बीआरटीएस मार्गावरील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. जगताप डेअरी, साई चौकात उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर हे दोन्ही उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर उभारण्यासाठी विभागीय आयुक्तांनी एस. चोक्कलिंगम यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. दरम्यान, या मार्गावरील रक्षक चौक ते कुंजीर वस्ती हा रस्ता अद्याप बंदच असून, त्याबाबत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही.
या भागातील वाहतूक कोंडीवर कायमची उपाययोजना करण्यासाठी आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२९ शुक्रवारी) बैठक घेतली. पुण्यात झालेल्या या बैठकीला आमदार जगताप, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील, आशाराणी पाटील, अहिरराव आणि सर्व अभियंते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवी ते किवळे या मार्गावर बीआरटीएस बस सुविधा सुरू केली आहे. शहरातील झपाट्याने वाढलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातून हा मार्ग जातो. हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड आणि रहाटणी परिसरात वास्तव्याला आहेत.
रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागांत राहणारे कर्मचारी व नागरिक सांगवी ते किवळे या बीआरटीएस मार्गावरील जगताप डेअरी, साई चौकातून हिंजवडीच्या दिशेने जातात. या चौकात चारही बाजूने रस्ते येत असल्यामुळे तेथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यावर कायमचे मात करण्यासाठी साई चौकात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. परंतु, उड्डाणपुलामुळे केवळ सांगवी ते किवळे बीआरटीएस मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. पिंपळेसौदागर ते वाकड रस्त्यावरील कोंडीही कायमची दूर करायची असेल तर साई चौकात उड्डाणपुलासोबत ग्रेड सेपरेटरही उभारण्याची मागणी आमदार जगताप यांनी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली.
याबाबत त्यांनी माहिती घेतल्यानंतर साई चौकात उड्डाणपुलासोबतच ग्रेड सेपरेटरही उभारणे शक्य असल्याचे प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर हे दोन्ही उभारण्यास परवानगी दिली. उड्डाणपूल उभारण्यासाठी येत्या दहा दिवसांत निविदा काढण्याचे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांना आदेश दिले. त्याचप्रमाणे सर्व तांत्रिक बाजूंची तपासणी करून साई चौकात ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी महिनाभरात निविदा काढण्यासही त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
साई चौकातील होणारी प्रचंड वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर या दोन्हीची गरज असल्याचे जगताप यांनी सांगितले.

रक्षकरोड बचाव समितीची परवड कायम
गेल्या अकरा महिन्यांपासून कुंजीर वस्ती ते रक्षकचौक सोसायटी चौक यादरम्यानचा रस्ता लष्कराने बंद केला. हा रस्ता कोर्टाच्या आदेशावरून बंद झाल्याचे सांगितले जाते आहे. हा रस्ता बंद झाल्याने येथे राहणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा वळसा घालून दैनंदिन कामासाठी जावे लागते. हा रस्ता सुरू व्हावा यासाठी रक्षकरोड बचाव समितीची स्थापना झाली. गेल्या अकरा महिन्यांपासून या समितीमार्फत येथील विविध सोसायटींमध्ये राहणारे लोक लढा देत आहेत. परंतु, त्यांची परवड अद्याप कायम असून, याबाबत कोणताच ठोस तोडगा निघू शकलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्तीची आराधना आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आज (१ ऑक्टोबर) शनिवारपासून सुरूवात होते आहे. ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे ५ वाजल्यापासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापना करता येईल. या दिवशी सकाळी ९ ते १०.३० या काळात राहुकाल असला, तरीही त्या वेळेतही पूजन करता येईल, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.
नवरात्रीमध्ये घटस्थापनेकरिता राहुकाल वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. येत्या १० ऑक्टोबरला नवरात्र उत्थापन आणि पारणा आहे. उत्थापनाच्या दुसऱ्या दिवशी दसरा आहे. सर्वसाधारणपणे नवरात्र उत्थापन आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीशक्तीची जी उपासना केली जाते, त्याला नवरात्र असे म्हटले जाते. हे दिवस तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कमी अधिक होत असतात. या वर्षी घटस्थापनेपासून अकराव्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेकदा असे झाले आहे, त्यामुळे अकराव्या दिवशी दसरा येणे शुभ किंवा अशुभ अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अशौचामुळे ज्यांना १ ऑक्टोबरला घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी ४, ६ आणि ८ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी आणि १० नवरात्रोत्थापन करावे, असे दाते यांनी सांगितले.
उत्सवानिमित्त पुण्यातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. घराघरांतही महिलांनी तयारी केली आहे. पुढील दहा दिवस पुणेकरांना संस्कृती, परंपरा आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. विविध संस्था-संघटनांच्या वतीने नऊ दिवस रास, गरबा, महाभोंडला अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बंगाली समाजाच्या ‘बंगिया संस्कृती संसद’ संस्थेने खाद्यजत्रा, बंगाली संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, पिवळी आणि काळी जोगेश्वरी मंदिरांमध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत उत्सवाची तयारी सुरू होती. या प्रमुख मंदिरांसह भवानी पेठेतील भवानी माता, चतुःश्रृंगी पद्मावती मंदिर, तळजाई देवी, कात्रजमधील संतोषीमाता, कोथरूड येथील भवानीमाता, सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिर अशा विविध मंदिरांना रंगरंगोटी आणि सजावट करण्यात आली आहे. या मंदिरांमध्ये शनिवारी पहाटेपासूनच पूजा सुरू होणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी या मंदिरांमध्ये सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आदी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​योगिनी वृषानना

$
0
0

पूर्वजांनी दिलेला निसर्ग संवर्धनाचा संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी इला फाउंडेशन आणि वन विभागाने ‘प्राणी आणि देवता’ ही माहिती पुस्तकरूपाने वाचकांसमोर आणली आहे. नवरात्रीनिमित्ताने देशातील विविध देवी आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वाहनांची माहिती उलगडणारी ही मालिका....
--
कथा दुर्मिळ देवतांची

-डॉ. सुरुची आणि डॉ. सतीश पांडे
योगिनी वर्गातील देवता तंत्र आणि शाक्त संप्रदायातील गौण देवता होत. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले जाते. या सख्यांची संख्या ६४ आहे. पण त्यांच्या नावांमध्ये भेद आढळतात. वृषानना नावाच्या योगिनीची देखणी पाषाणाची शिल्पाकृती दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात पाहायला मिळते. ‘वृष’ या शब्दाचा अर्थ बैल आणि ‘आनन’ म्हणजे मुख. योगिनींच्या ठायी अपार शक्ती असल्याचे मानले जाते. त्या मावनाकृती, अर्ध-मानवी किंवा अर्ध पशू, पक्षी किंवा सरीसृप वर्गातील जीवांचे रूप धारण करणाऱ्या असू शकतात. त्यांची विशिष्ट वाहने असतात. म्हशीचे मुख असलेली योगिनी वृषाननाची मूर्ती मूलतः उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील लोखरी नावाच्या खेड्यात होती. या शिल्पाकृतीचे वजन सुमारे चारशे किलो आहे. तिच्या उजव्या हातात बेलफळ आहे आणि डाव्या हातात दंड आहे. चेहऱ्यावर अत्यंत शांत भाव आहे. तिचे वाहन क्रौंच पक्षी आहे. शिल्पाकृतीतील पक्ष्याच्या शरीररचनेचा अभ्यास केल्यावर हा पक्षी क्रौंच असल्याचे लक्षात येते. त्याच्या पायांची लांबी, मान आणि बोटांच्या मधे पडदे नसलेले पाय पाहताना तो क्रौंच पक्षी असल्याचे सूचित होते. दहाव्या- अकराव्या शतकाच्या सुमारास हे शिल्प तयार करण्यात आले असावे. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून या मूर्तीची चोरी झाली आणि अवैध मार्गाने ही मूर्ती भारताबाहेर नेण्यात आली. तस्करी होऊन ती पॅरिसमधील कला संग्राहकाला विकली गेली. यथावकाश तेथील भारतीय वकिलाने या देखण्या मूर्तीचा शोध घेतला. ज्या संग्रहाकाने ती विकत घेतली होती. ती व्यक्ति आता या जगात नाही. पण त्याच्या पत्नीने ही मूर्ती भारतीय वकिलाकडे परत दिली. योगिनी वृषाननेचा पुन्हा तिच्या मायदेशी परतीचा प्रवास सुरू झाला आणि २०१३ मध्ये तिची मोठ्या सन्मानाने राष्ट्रीय संग्रहालयामध्ये स्थापना करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​वेदमाता गायत्री

$
0
0

माणसाने प्राचीन काळापासूनच देवीची शक्तीरूपात आराधना केली आहे. कालानुरूप हा प्रवाह अधिक विस्तारत गेला. या प्रवाहाचा वेध घेणारी ही मालिका, खास नवरात्रानिमित्त. ज्ञात, अज्ञात, आजही पूजनीय असणाऱ्या आणि काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या स्त्री देवतांचा हा धावता आढावा.
---
डॉ. अंबरीष खरे
--
प्राचीन वैदिक साहित्यामध्ये देवता म्हणून उल्लेख नसूनही ‘वैदिक’ असणारी देवता म्हणजे गायत्री. याचे कारण असे, की मुळात गायत्री हा एक छंद (वृत्त) आहे. ऋग्वेदातील पद्यमय ऋचा त्रिष्टुभ्, गायत्री, अनुष्टुभ्, जगती, बृहती इत्यादी छंदांमध्ये रचल्या गेल्या आहेत. ऋग्वेदाचा प्रारंभ ज्या अग्निसूक्ताने (अग्निमीळे पुरोहितं) होतो, त्याचा छंद गायत्री आहे. या छंदात तीन पाद असून प्रत्येक पादात आठ अक्षरे असतात. म्हणजेच यातील एकूण अक्षरांची संख्या चोवीस असते. तीन चरण असल्याने गायत्री छंदाला त्रिपदा असे विशेषण मिळाल्याचे दिसते. तत्सवितुर्वरेण्यं अशी सुरुवात असणारा सुप्रसिद्ध सावित्री (सविता देवतेचा) मंत्र देखील विश्वामित्र ऋषींनी गायत्री छंदात रचला आहे. गायत्री या छंदावरून लोक या मंत्रालाच गायत्री मंत्र म्हणू लागले. नंतर या मंत्राच्या विलक्षण लोकप्रियतेमुळे गायत्रीसुद्धा एक स्वतंत्र देवता म्हणून ओळखली जाऊ लागली.
विद्महे, धीमहि आणि प्रचोदयात् असा एकेका चरणाचा शेवट असलेले विविध देवतांचे गायत्री छंदात रचलेले मंत्र उत्तर वैदिक साहित्यात सापडतात. यामध्ये रुद्र, विष्णू, गणपती, दुर्गा यांच्या मंत्रांचा समावेश आहे. हे मंत्र रुद्रगायत्री, गणेशगायत्री, विष्णुगायत्री इत्यादी नावांनी ओळखले जातात. वैदिक साहित्यात अशा प्रकारचे थोडेच गायत्रीमंत्र सापडत असले, तरी पुढेपुढे आपापल्या आराध्य देवतेचे गायत्री मंत्र लोकांनी तयार केल्याचे दिसते. आधुनिक काळात साईबाबा, स्वामी समर्थ अशा आराध्यांचेही गायत्री मंत्र त्यांच्या उत्साही भक्तमंडळींनी रचल्याचे आढळते.
गायत्रीने श्येन (ससाणा) पक्षी बनून तिसऱ्या स्वर्गातून पृथ्वीवर सोम आणल्याचे आख्यान ब्राह्मण ग्रंथांमध्ये सापडते. या कृत्यामुळे वैदिक परंपरेत गायत्री हा सोमाचा आवडता छंद मानला जातो. या ठिकाणी प्रथम गायत्रीची कल्पना मूर्तरूपात केल्याचे म्हणता येईल. उत्तरकालीन वैदिक साहित्यात गायत्रीचा उल्लेख छंदसां माता असा येतो. या ठिकाणी ती वृत्तांची जननी (प्राचीन अगर महत्त्वाचे वृत्त) आहे, असे सांगायचे असावे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण मी छंदांमधील (वृत्तांमधील) गायत्री आहे (गायत्री छंदसामहम्) असे प्रतिपादन करतात, हे या संदर्भात लक्षणीय ठरावे. मात्र, छंदस् या शब्दाचा दुसरा अर्थ वेद असाही होत असल्याने गायत्री वेदमाताही ठरली.
सावित्री मंत्र हा गायत्री छंदात असल्याने संध्योपासनेमध्ये गायत्रीला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. संध्यावंदनाचे प्रसंगी केल्या जाणाऱ्या ध्यानातील वर्णनाप्रमाणे गायत्री त्रिनेत्रा, पंचमुखी आणि दशभुजा असून तिच्या मुखांचे वर्ण मोतिया, प्रवाळवर्णी, सोनेरी, निळा आणि पांढरा असे असतात. तिचे दोन हात वरद आणि अभय मुद्रेत असून उर्वरित हातांमध्ये ती पाश, अंकुश, चाबूक, कपाल, शंख, चक्र आणि कमलद्वय धारण करते.
त्रिकालसंध्या करताना प्रत्येक वेळी गायत्रीच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे ध्यान करण्याची प्रथा आहे. प्रातःसमयी बालरूपातील गायत्री हातात ऋग्वेद धारण करते. त्यावेळी ती ब्रह्मदेवाप्रमाणे हंसारूढ असते. दुपारी ती तरुणी होऊन विष्णुप्रमाणे गरुडावर स्वार झाली असता हातात यजुर्वेद धारण करते. संध्याकाळी ती वृद्धावस्थेत असून हातात सामवेद धारण करते. या समयी ती रुद्राप्रमाणे वृषभावर बसलेली असते.
अशा प्रकारे ऋग्वेदात एक छंद असलेली गायत्री कालौघात एक देवता बनली. विश्वामित्रांनी रचलेल्या गायत्री मंत्राच्या महतीमुळे तिला
वैदिक परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. पुढे तिची विधिवत उपासना होऊ लागल्यावर विविध स्तोत्रे, नामावल्या आणि आरत्याही प्रचलित झाल्या.

(लेखक टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत आणि भारतीयविद्या विभागात सहायक प्राध्यापक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ मतदारांची नावे यादीतून वगळावीत

$
0
0

राजेश माने , खडकी

...........
लष्कराच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे करून राहणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. मध्य प्रदेश हायकोर्टाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवून लष्करी जमिनींवरील अनधिकृत बांधकामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मतदार यातीतून नावे वगळण्याचा निर्णय हा स्थानिक निवडणुकांसाठीच (कॅटोन्मेंट बोर्ड) मर्यादित असणार आहे.
मध्य प्रदेशातील पंचमढी कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या २००८मध्ये झालेल्या निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. मध्य प्रदेश हायकोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती अनिल आर. दवे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मंगळवारी (२७ सप्टेंबर) हा निकाल दिला. देशात १९२४मध्ये कॅन्टोंन्मेंटची स्थापना झाली असून. सध्या ६२ कॅन्टोंन्मेंट आहेत. दर पाच वर्षांनी येथे निवडणुका होतात आणि त्यासाठी स्वतंत्र मतदार यादी तयार करण्यात येते.
मध्य प्रदेशातील पंचमढी कॅटोंन्मेंट बोर्डाच्या २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका उमेदवाराने मतदार नोंदणीवरून कोर्टात धाव घेतली होती. ही केस सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आली असता कोर्टाने ‘रहिवाश्या’ची व्याख्या स्पष्ट करून हा निकाल दिला.
............
‘..तर नगरसेवकपद रद्द’
खडकी कॅटोंन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ‘या निकालाबाबत चर्चा आहे. मात्र, आम्हाला अद्याप असे आदेश मिळालेले नाहीत. कॅटोंन्मेंट कायद्यानुसार एखादी व्यक्ती कॅटोन्मेंटच्या निवडणुकीत निवडून आला असेल, तसेच तो अनधिकृत इमारतीत रहात असल्याचे सिद्ध झाल्यास नगरसेवकपद रद्द होऊ शकते.’
.......
लष्करी जमिनींवर अनधिकृत बांधकाम करून तेथे राहणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला आहे. कोर्टाचा हा आदेश स्थानिक निवडणुकीसाठी लागू होणार आहे. त्यामुळे लष्करी जमिनींवर अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी या निकालाचा फायदा होईल, असे प्रथमदर्शनी वाटते.
एस. के. जैन, ज्येष्ठ विधीज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल चाचणीनुसारच एफटीआयआयमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) पुढील वर्षी प्रवेश घ्यावयाचा झाल्यास प्रवेश परीक्षा तर द्यावीच लागेल, पण त्यासोबत कलचाचणी (सायकोमेट्रिक टेस्ट) द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचा चित्रपट व दूरचित्रवाणी या माध्यमाकडे असणारा कल पाहून त्यांची निवड करण्यात येणार असल्याने कोणालाही प्रवेश घेता येणार नाही.
‘एफटीआयआयच्या शैक्षणिक परिषदेच्या बी.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार चित्रपट व दूरचित्रवाणी या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी कलचाचणी द्यावी लागेल. बैठकीत दहा टक्के शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. अभ्यासक्रम, वसतिगृहासह १५ विविध बाबींसाठी ही वाढ करण्यात आली आहे,’ असे संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी ‘मटा’ला सांगितले. ‘दूरचित्रवाणीसाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षेतील लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल. मात्र, गुण ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. त्याऐवजी सादरीकरण आणि मुलाखत यामध्ये विभागून गुण देण्यात येतील,’ असेही कँथोला यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांचा विरोध लक्षात घेता शुल्कवाढीसाठी २०१० ऐवजी २०१५ हे आधारभूत वर्ष मानले जाईल. त्यामुळे लाखाच्या घरात जाणारे शुल्क पुढील वर्षी केवळ वीस टक्क्यांनी वाढणार आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वयाचे बंधन घातल्यास गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे संस्थेतील कोणत्याही अभ्यासक्रमासाठी वयाचे बंधन यापुढेही नसेल. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून हे सर्व नियम लागू होतील. बैठकीला सतीश शहा, पंकज चंद्रा, राजन वेळूकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लबचे सदस्यत्व मिळवा १९९ रुपयांमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘कल्चर क्लब’चे सदस्यत्व १९९ रुपयांमध्ये मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. खास नवरात्रानिमित्त पुणेकरांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन सदस्यत्त्व किंवा पुनर्नोंदणी करून यंदाच्या नवरात्रात कुटुंबीयांना सांस्कृतिक भेट देण्याची पर्वणी साधता येणार आहे.
मराठी मनाला भावणाऱ्या नाट्य संस्कृतीपासून ते कलाकारांशी थेटभेट, साहित्य, संगीत, नृत्य तालवाद्य असे नानाविध कार्यक्रम तसेच, ताणतणाव कमी करण्यापासून ते विविध खाद्यपदार्थांची निर्मिती, कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यशाळा, नावीन्यपूर्ण ठिकाणी भटकंती करण्याची संधी ‘कल्चरल क्लब’तर्फे सभासदांना देत आहे.
गेल्या वर्षभरात ‘कल्चर क्लब’ने सभासदांच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद घेता येतील असे शंभरहून अधिक कार्यक्रम आयोजित केले. सभासदांचाही सर्व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी काळातही अने नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. नामवंत कलाकारांचा सहभाग असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, प्रसिद्ध शेफच्या मार्गदर्शनातून उलगडणाऱ्या पाककृती, कलाकुसरीला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यशाळा, पर्यटनप्रेमी सभासदांसाठी नेचर ट्रेल, सहली, ट्रेकची पर्वणी सभसदांना मिळणार आहे.
एरवी कल्चर क्लबचे सभासद होण्यासाठी २९९ रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, खास नवरात्रानिमित्त १९९ रुपयांमध्ये सभासद होता येणार आहे. आजपासून दहा ऑक्टोबरपर्यंत ही सवलत उपलब्ध असेल. सभासदांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागात नावनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९८२३९८२५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
...
आगामी आकर्षण
- ४ ऑक्टोबर - मटा दांडिया नाइट
- ९ ऑक्टोबर - अनाहत - तौफिक कुरेशी लाइव्ह
- २३ ऑक्टोबर - डाएट फराळ कार्यशाळा
- ३१ ऑक्टोबर - पं. हरिप्रसाद चौरसिया यांची दिवाळी पहाट मैफल
.................
सभासद होण्यासाठी संपर्क :
मटा कल्चर क्लबचे सभासद होण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स पुणे कार्यालय (नामदार गोखले रोड), साई स्टुडिओ अँड अॅडव्हरटायझिंग (बिबवेवाडी), श्रीरंग अॅडव्हरटायझिंग (सातारा रोड), जेनेसिस अॅडव्हरटायझिंग (सहकारनगर), शशी बझार (सिंहगड रोड), ट्विडल (कोथरूड), सुगरण (पौड रोड), ग्राहक पेठ (टिळक रोड), कांकरिया अॅडव्हरटाइजिंग (हडपसर रोड), पिंपरी चिंचवड महाराष्ट्र टाइस् कार्यालय येथे अर्ज उपलब्ध कऱण्यात आले आहेत. या शिवाय www.mtcultureclub.com या वेबसाइटवरही नावनोंदणी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताम्हिणीतील अतिक्रमणावर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ताम्हिणी अभयारण्य परिसरातील राखीव वनामध्ये वृक्षतोड करून बांधकाम करणाऱ्या ‘कुंडलिका व्हॅली प्रकल्प’ या व्यावसायिकावर वन विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. वनक्षेत्रात घुसून वीस हेक्टर जागेवर बांधलेले कुंपण आणि बांधकामावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
पौड वनक्षेत्राच्या हद्दीत राखीव वनजमिनीत अतिक्रमण झाल्याचे वनाधिकाऱ्यांच्या सहा महिन्यांपूर्वी निदर्शनास आले. या संदर्भात सखोल मोजणी केल्यावर आरोपीने राखीव वनक्षेत्रामध्ये एकूण वीस हेक्टर जागा विक्रीसाठी वृक्षतोड करून प्लॉटिंग केल्याची माहिती पुढे आली. ‘व्यावसायिकाने या जागेत विविध प्रकारची बांधकामे केली होती. त्यासाठी वन विभागाकडून तसेच केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती. मोजणी दरम्यान जागा लक्षात आल्यानंतर त्यांना दोन वेळा नोटीस बजावून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र, त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला नाही. वन विभागाच्या पथकाने गुरुवारी कारवाई करून सर्व बांधकामे काढून टाकली. या परिसरातील सर्व सामान जप्त केले आहे,’ अशी माहिती उपवनसंरक्षक सत्यजीत गुजर यांनी दिली.
वन विभागाच्या मौजे निवे या भागातील वनक्षेत्रात २० हेक्टर जागेवर कारवाई झाली. आरोपींच्या विरूद्ध भारतीय वनअधिनियम, वन्यजीव अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत सहायक वनसरंक्षक एम. एस. ढेरे, एम. बी. तेलंग, एम. पी. भावसार, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. व्ही. कापसे, रुपलग पुंडे यांच्यासह कर्मचारी, वनपाल, वनसंरक्षक असे दीडशे कर्मचारी आणि पोलिस सहभागी झाले होते.
..........
वन​जमीन नोंदणी पाच वर्षांत शक्य
पुणे : विविध कारणांमुळे वनक्षेत्रात होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’तर्फे आता वन जमीनमोजणी प्रक्रियेत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. नवीन पद्धतीमुळे सर्वेक्षणाचा कालावधी दहा वर्षांवरून पाच वर्षांवर येणार आहे. पुणे जिल्ह्यातील वनक्षेत्र सर्वेक्षणाला नुकतीच सुरुवात झाली.
‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’तर्फे आतापर्यंत वनजमिनींचे जिल्हास्तरीय सर्वेक्षण करून देशपातळीवर एकत्रित माहिती जमा करून निष्कर्ष जाहीर केले जात होते. या कीचकट प्रक्रियेमुळे सर्वेक्षणाच्या प्रकियेला दहा वर्षे लागत होती. ‘नवीन पद्धतीमुळे पहिल्या वर्षभरात देशभरातील सर्व राज्ये ग्रीडवर आणण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रक्रिया करून पाच वर्षांच्या आत सर्वेक्षण पूर्ण होणार आहे,’अशी माहिती फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचे मध्यवर्ती विभागाचे प्रकल्प प्रमुख नाडा तारी यांनी दिली.
तारी यांचे पथक पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील वनक्षेत्राचे सर्वेक्षण करणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यात काम सुरू आहे सर्वेक्षणाअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील वन क्षेत्रातील वृक्षसंपदेबरोबरच हद्दीबाहेरील वृक्षसंपदेच्याही नोंदी घेण्यात येणार आहेत. सर्वेक्षणाचा कालावधी कमी झाल्याने वनजमिनींवर झालेल्या अतिक्रमणांची माहिती वनाधिकाऱ्यांना अल्पावधीत उपलब्ध होऊन योग्य वेळेत कारवाई करणे शक्य होणार आहे. ‘सर्वेक्षणादरम्यान आम्ही वनक्षेत्राच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहोत. नव्या प्रक्रियेत पहिल्यांदाच जमिनीची गुणवत्ता, वनस्पतींचे विविध प्रकार, गवताळ प्रदेश आणि मानवी हस्तक्षेपाचा दबाव अशा नोंदी घेण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांच्या आधारे वन व्यवस्थापन आराखडा तयार केले जातात, त्यामुळे अहवालात सर्वांगीण माहितीचा समावेश व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत,’ असे तारी यांनी सांगितले.
..
नवीन सर्वेक्षण पद्धतीमुळे वनक्षेत्रामुळे वातावरणातील कार्बन किती प्रमाणात जमिनीत मिसळला (कार्बन सिक्वेस्ट्रेशन) जातो, याची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय वनक्षेत्रातील मानवी हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेवर होणाऱ्या परिणामांचे निष्कर्षही काढता येतील.
सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images