Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ई-कंपनी’ने घातला अकरा कोटींचा गंडा

0
0

पंधरा राज्यांमध्ये गुन्ह्याची व्याप्ती; शहरातील ३०० जणांची फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबईत कार्यालय थाटून पुण्यासह पंधरा राज्यातील सुमारे हजारभर नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने ऑनलाइन कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. या कंपनीने नागरिकांना आतपर्यंत ११ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये पुण्यातील ३०० जणांचा समावेश आहे.
प्रियेश दिनेश शहा (वय ३५, रा. शीव पश्चिम, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहा याने डीझीडील एंटरप्रायजेस नावाची ऑनलाइन कंपनी सुरू केली फेसबुकवर व्यावसायिक कंपन्यांच्या जाहिरातींचे प्रमोशन केल्यास पैसे मिळण्याचे आमिष नागरिकांना दाखवण्यात आले होते. अशा प्रकारे शहा याने पुण्यासह १५ राज्यातील हजार नागरिकांना ११ कोटी रुपयांना फसवल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक साकोरे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
सभासद झाल्यानंतर आणि व्यावसायिक कंपन्यांचे प्रमोशन केल्यानंतर दर आठवड्याला २,९९५ रुपये खात्यात जमा होतात. अशा प्रकारे खातेदारांच्या खात्यात ५८ हजार ५०० रुपये जमा करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस पैसे खात्यात जमा करून विश्वास संपादन करण्यात आला. त्यामुळे नागरिक आमिषाला बळी पडले. त्यानंतर त्यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून १९ हजार ५०० रुपये कंपनीत भरण्याचा सपाटाच लावला. कालांतराने खात्यात करोडो रुपये जमा झाल्यानंतर शहाने आपला गाशा गुंडाळल्याचे पवार यांनी सांगितले.
कोंढवा येथील राहुल सोपान उभे यांनी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानुसार तपास करून सायबर शाखेने शहाला अटक केली. त्याच्या बँक अकाउंटची तपासणी केली असता, त्यात ११ कोटी रुपये जमा असल्याचे उघडकीस आले आहे. शहाने गाशा गुंडाळल्यानंतर फौजदार प्रवीण स्वामी यांनी त्याची माहिती काढून त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह स्वामी, राजू भिसे, अस्लम अत्तार, शिरीष गावडे, नितीन चांदणे, भास्कर भारती, बाबासाहेब कराळे, नीतेश शेलार आणि सायबर तज्ञ प्रदीप खळे यांचा तपास पथकात सहभाग होता.
..
सायबर सेलकडे ३०० तक्रारी
या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर नागरिकांनी सायबर शाखेत गर्दी करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ३०० जणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी सायबर शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जगताप यांच्या चौकशीचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धनकवडी येथील मिळकतीवरील आरक्षणाच्या मोबदल्यात देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या टीडीआर गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप, तत्कालीन आयुक्त, बांधकाम तसेच विधी ‌विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अकरा जणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. भंडारवार यांनी हा निर्णय दिला.
धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील सर्व्हे नंबर ४/१७/२ या मिळकतीवरील आरक्षणाच्या मोबदल्यात बेकायदा पद्धतीने टीडीआर देण्यात आला आहे. महापालिकेचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या दबावामुळे पालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे, बांधकाम तसेच विधी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून बेकायदा टीडीआर दिला. याबाबत अनेकदा फसवणूक होत असल्याची तक्रार संबधित अधिकाऱ्यांकडे करूनही दुर्लक्ष केल्याप्रकरणी संभाजी थोरवे यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जाची दखल घेऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल कोर्टाला सादर करण्याच्या सूचना शिवाजीनगर पोलिसांना दिल्या.
धनकवडी येथील तीन हत्ती चौकात असलेली २५ गुंठे जागा तक्रार संभाजी थोरवे यांनी विकसनासाठी घेतली आहे. यातील दहा गुंठ्याच्या जागेवर १९८७च्या विकास आराखड्यात (डीपी) रस्त्याचे आरक्षण पडले आहे. या मिळकतीचे सर्व कायदेशीर अधिकार या जागेचे मूळ मालक फरिद शेख, ताजुद्दीन शेख, शमीयबाय शेख, मरीयमबी शेख यांनी थोरवे यांना दिलेले असतानाही या मालकांनी नगरसेवक सुभाष जगताप यांनी या मिळकतीची खरेदीखताने विक्री केली. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही जगताप यांनी आपल्याकडे असलेल्या सभागृह नेतेपदाचा वापर करून पालिका प्रशासनाकडून टीडीआर घेतला. विकसक म्हणून झालेली फसवणूक थोरवे यांनी कोर्टाच्या लक्षात आणून ‌दिल्यानंतर संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या कुत्र्यांना बंदी

0
0

विमानतळ परिसरात 'नो डॉग झोन' राबविणार; महापौरांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भटक्या कुत्र्यांमुळे विमानतळाची सुरक्षा धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाचा परिसर 'नो डॉग झोन' करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. विमातळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी भटकी कुत्री अन्यत्र सोडण्याची सूचना महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला केली आहे.
लोहगाव विमानतळ आणि परिसरातील प्रश्न तसेच विमानतळ प्राधिकरणाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जगताप यांच्या पुढाकाराने गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विमानतळाचे संचालक अजय कुमार, उपसंचालक अनिल ठाकूर, माजी आमदार बापू पठारे, नगरसेवक अनिल टिंगरे, महेंद्र पठारे, महादेव पठारे, यांच्यासह महापालिकेच्या पथ विभागाचे अधिकारी राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.
विमानतळ परिसरात भटक्या कुत्र्यांची समस्या अत्यंत गंभीर झाली असून, त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, यासाठी पालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आल्याचे गाऱ्हाणे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडले. गेल्या काही महिन्यांमध्ये विमानतळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दोन महिन्यांपूर्वी धावपट्टीवर विमान उतरत असताना मध्येच कुत्रे आल्याने विमानाला पुन्हा उड्डाण करावे लागले होते. या प्रकारांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. या समस्येकडे पालिकेने गांभीर्याने पहावे आणि हा भाग 'नो डॉग झोन' करण्याची विनंती बैठकीत करण्यात आली. ही सूचना मान्य करून महापौरांनी विमानतळ परिसरातून भटक्या कुत्र्यांचे उच्चाटन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या. विमानतळ परिसरातील भटक्या कुत्र्यांवर दररोज कारवाई करून त्यांची नसबंदी करावी
आ​णि त्यांना अन्यत्र सोडण्याचेही जगताप यांनी नमूद केले.
..
परिसरात रस्त्याची कामे सुरू
विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रारही या वेळी करण्यात आली. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना विमानाच्या उड्डाणाच्या नियोजित वेळेत विमानतळावर पोहोचणे शक्य होत नाही. यासाठी या परिसरातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात एअरपोर्ट गेट ते ५०९ चौक दरम्यानचा दोन्ही बाजूचा रस्ता दीड मीटरनी रुंद करण्यात येणार आहे. या कामाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. या शिवया अन्य तीन रस्त्यांची कामेही ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असेही महापौरांनी सांगितले.
०००००
'ट्रान्झिट कॅम्पसाठी जागा देणार'
लोहगाव विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. लोहगाव विमानतळ हा लष्कराचाही तळ असल्याने हे क्षेत्र अति संवेदनशील आहे. विमानतळावर सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या जवानांच्या विश्रांतीकक्षाचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेची अॅमेनिटी स्पेस देण्याची तयारीही बैठकीत दर्शविण्यात आली. या जागेत ३०० जवानांची सोय होइल, असा ट्रान्झिट कॅम्प बांधण्यासाठी पालिका भाडेकराराने जागा पालिका देईल, असे आश्वासनही महापौरांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषोत्तमचा दर्जा घसरला’

0
0

पुणे : गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून रंगभूमीची पायरी समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिकांचा दर्जा घसरला असून, यंदा सादर झालेल्या ५१ एकांकिकांपैकी अंतिम फेरीसाठी एकांकिका निवडण्यासाठी परीक्षकांना खूपच परिश्रम घ्यावे लागले, अशी खंत प्राथमिक फेरीच्या परीक्षकांनी व्यक्त केली. अंतिम फेरीच्या परीक्षकांनीही या विधानाला दुजोरा दिला आहे. संयोजकांनी गेल्या काही वर्षांपासून दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी पार पडला. कार्यक्रमात प्राथमिक फेरीच्या परीक्षकांच्या वतीने बोलत असताना सुबोध पंडे म्हणाले की, ' काही अपवाद वगळता यंदा सादर झालेल्या एकांकिकांचे सादरीकरण अत्यंत सुमार होते. त्यातून अंतिम फेरीत त्यातल्या त्यात बऱ्या, अशा एकांकिकांना स्थान दिले गेले. यंदा ३५ विद्यार्थी लेखकांच्या एकांकिका सादर झाल्या. बहुदा त्यामुळेच स्पर्धेतील विषयांची मांडणी आणि सादरीकरणाचा दर्जा खालावलेला दिसून आला.' सिनेमा आणि मालिकेच्या प्रभावामुळे स्पर्धेतील नाटकांवर मोन्टाज आणि ब्लॅकआउट्सचा अधिक भरणा होता. त्यामुळे कथानकात खंड पडत होता, असेही पंडे म्हणाहले. पंडे यांच्या विधानांना अंतिम फेरीचे परीक्षक दिलीप जगताप यांनीही दुजोरा दिला. 'पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले पहिले दोन संघ वगळता इतर सातही संघांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. या सातही संघांच्या संहिता अत्यंत वाईट होत्या; त्यामुळे त्यांनी संहितेवर काम करणे गरजेचे आहे. तरुणांनी तिकिटांच्या खिडक्या फुल भराव्यात, म्हणून नाटक करू नये; तर स्वतःच्या जाणिवा आणि संवेदना रंगवण्यासाठी नाटक करणे गरजेचे आहे, असे जगताप म्हणाले. स. प. महाविद्यालय आणि कमिन्स या दोन्ही महाविद्यालयांचे सादरीकरण अप्रतिम होते, त्यांच्या एकांकिकांमध्ये आधुनिकता होती, असेही जगताप यांनी नमूद केले.
..
'शालेय स्तरावर स्पर्धा घेणार'
स्पर्धेच्या दर्जासंदर्भात आयोजकांनीही गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळेच 'महाराष्ट्रीय कलोपासक'तर्फे शालेय स्तरावर नाट्य स्पर्धा सुरू करून लहान वयातच मुलांवर नाटकाचे संस्कार घडवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचीही हाक... अतिथी देवो भव

0
0

Prashant.Aher@timesgroup.com
Tweet : @PrashantAherMT

पुणे : भारतातील पर्यटन स्थळांना भेटी देण्याऱ्या परदेशी नागरिकांना 'अतिथी देवो भव'ची अनुभती देण्यासाठी पोलिस सरसावले आहेत. अधीक्षक कार्यालय असो की आयुक्तालय प्रत्येक ठिकाणी 'टुरिस्ट' पोलिसांची नियुक्ती करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस दलही टुरिस्ट पोलिसांची नियुक्ती करणार असून, महापालिका त्यांना दोन चार चाकी वाहने पुरविणार आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत गुजरात (भुज) येथे पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक परिषद झाली होती. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते. या परिषदेला प्रत्येक राज्याचे पोलिस महासंचालक उपस्थिती होती आणि या वेळी झालेल्या मंथनातून काही निर्णय घेण्यात आले. त्यामुळे 'टुरिस्ट पोलिस' सुरू करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.

भारतातील पर्यटनस्थळांना परदेशी नागरिक भेटी देतात तेव्हा त्यांना फसवण्याचे प्रकार अनेकदा घडतात. टुरिस्ट पोलिस गाइडच्या भूमिकेत काम करतील, अशी कल्पना आहे. या पोलिसांना पर्यटनस्थळांची माहिती असेल तसेच एखाद्या राज्यात विशिष्ट देशाचे पर्यटक सर्वाधिक भेटी देत असतील तर पोलिसांना त्या देशाची भाषाही शिकवावी. पोलिसांना वेगवेगळ्या देशांच्या भाषा शिकवण्यासाठी शैक्षणिक संस्था तसेच भाषा शिकवणाऱ्या संस्थाची मदत घ्यावी, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

परदेशात 'टुरिस्ट पोलिस' ही संकल्पना आहे. या धर्तीवर आपल्या देशात ही संकल्पना सुरू करावी, असे भुज येथील परिषदेत ठरले आहे. पुणे पोलिसांनी टुरिस्ट पोलिस ही संकल्पना राबण्यास सुरुवात केली आहे. याबाबत महापालिकेशी चर्चा करण्यात आली आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी टुरिस्ट पोलिसांसाठी दोन चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

'ठिकाणांचे ज्ञान असणारे कर्मचारी असणार'

शहरातील विविध टुरिस्ट ठिकाणांचे ज्ञान असणारे कर्मचारी, अधिकारी या टुरिस्ट पोलिसांमध्ये असतील.

- सी. एच. वाकडे, अप्पर आयुक्त (प्रशासन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉटर मीटर’ची लढाई आता कोर्टात

0
0

निर्णयाच्या अधीन राहून प्रक्रिया करण्याचे निर्देश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात 'वॉटर मीटर' योजनेच्या अंमलबजावणीचे काम ठरावीक कंपनीला मिळावे, यासाठी टेंडरच्या अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्याचा ठपका ठेवून प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. योजनेला हायकोर्टाने स्थगिती देण्यास गुरुवारी नकार दिला असला, तरी कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच पुढील प्रक्रिया करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तसेच, पुढील सुनावणीपूर्वी यासंबंधी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.
शहरात समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्यासाठी साठवण टाक्यांसह घरोघरी वॉटर मीटर बसविण्याचे टेंडर महापालिकेने काढले होते. ठरावीक कंपन्यांच्या फायद्यासाठी या टेंडरमधील अटी-शर्ती कडक करण्यात आल्या असल्याने अनेक कंपन्या या प्रक्रियेतून हद्दपार झाल्या आहेत. त्यामुळे, या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती दिली जावी, अशी मागणी करत 'स्टेटस' कंपनीतर्फे मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. शंतनू केमकर आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी याचिकेची सुनावणी झाली.
तीनशे कोटींच्या प्रत्येकी दोन टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये १०० कोटींची उलाढाल असावी, असे बंधन घालण्यात आले होते. केंद्रीय दक्षता समितीने (सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी) दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून टेंडरमधील अटी ठरविण्यात आल्या असल्याने त्याला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती; पण कोर्टाने ती फेटाळून लावली. अशी माहिती महापालिकेच्या वतीने बाजू मांडणारे वकील अभिजित कुलकर्णी यांनी दिली. या वेळी, महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. परंतु, महापालिकेने कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिला, तरीही न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहूनच त्याची अंमलबजावणी करता येईल, असे स्पष्ट केले.
..
पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
महापालिकेने यासंबंधीची सर्व माहिती पुढील १५ दिवसांत कोर्टापुढे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. वॉटर मीटरच्या याचिकेवरील पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार आहे, असे विधी सल्लागार अॅड. रवींद्र थोरात यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लीलाताईंचा बंगला लष्कर ताब्यात घेणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्कराच्या संपदा (इस्टेट) विभागाने लीलाताई परूळेकर यांचा कॅम्पमधील बंगला ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. परूळेकर यांना हा बंगला लीजवर देण्यात आला होता. त्यांना कोणीही वारसदार नसल्याने बंगला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याविषयी जाहीर नोटीसही काढण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या 'बी ३' प्रकारच्या जागेतील क्वीन्स गार्डन येथील सर्व्हे क्रमांक २९ ए येथील 'चार ए' क्रमांकाचा बंगला 'सकाळ'चे संस्थापक डॉ. नानासाहेब परुळेकर यांना लीजवर देण्यात आला होता. हा बंगला सुमारे सव्वातीन एकर जागेवर आहे. परूळेकर दाम्पत्याच्या निधनानंतर त्यांच्या कन्या लीलाताई यांचे या बंगल्यात वास्तव्य होते.
लीलाताई यांचे १३ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यानंतर कोणीही वारस नसल्याने डिफेन्स इस्टेट विभागाने हा बंगला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुणे विभागाचे डिफेन्स इस्टेट ऑफिसर डॉ. डी. एन. यादव यांच्यातर्फे याबाबतची जाहीर नोटीस २२ सप्टेंबरच्या 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'आमच्याकडील नोंदीनुसार लीलाताई परूळेकर यांच्यानंतर त्यांचे कोणीही कायदेशीर वारसदार नाही. त्यामुळे सरकारी नियमानुसार संरक्षण मंत्रालयाच्या बी-३ प्रकारच्या जागेवरचा हा बंगला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संरक्षण मंत्रालयाला देण्यात येईल. मंत्रालयाकडून मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश मिळाल्यानंतर मालमत्ता ताब्यात घेण्यात येईल,' असे डॉ. यादव यांनी सांगितले.
'कायद्यातील बदलानुसार या जागेचे फेरवाटप होऊ शकणार नाही. त्यामुळे या जागेचा लष्करी कामासाठीच वापर केला जाईल. तोपर्यंत जागेचा ताबा व देखभाल करण्याची जबाबदारी डिफेन्स इस्टेट विभागावर असेल,' असेही ते म्हणाले. या बंगल्यावर कोणी आपला हक्क दर्शवू इच्छित असेल तर त्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी लेखी अर्ज करावा, असेही या नोटिशीत म्हटले आहे. त्याची छाननी करून योग्य निर्णय घेण्यात येईल.
..
'लष्कर घेईल प्राण्यांची​ काळजी'
दरम्यान, प्राणीप्रेमी असलेल्या लीलाताई यांनी या ठिकाणी काही प्राणी, कुत्र्यांची व्यवस्था केली आहे. सध्या हायकोर्टाच्या आदेशानुसार काही संस्था आणि व्यक्तींकडून या प्राण्यांची देखभाल करण्यात येत आहे. त्यांनीच तयारी दर्शविल्यास ते या प्राण्यांची व्यवस्था पाहू शकतील अथवा लष्करातर्फे या प्राण्यांची काळजी घेतली जाईल, असेही डॉ. यादव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्मविश्वास बाळगा; रंगमंच भरभरून देईल

0
0

नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचे तरुणाईला आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'माझे गोत्र नाटक हे असून, रंगदेवता हीच कुलदैवत आहे. रंगमंचाच्या मंतरलेल्या फळ्यांवर श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने पाऊल ठेवले तर, तो रंगमंच आपल्याला भरभरून देतो,' अशा भावना अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केल्या. रंगभूमीवर जे कराल ते चांगले करा; उगाच काहीतरी करण्यापेक्षा काहीच करू नका, असा गुरुमंत्रही त्यांनी तरुणाईला दिला.
भरत नाट्य मंदिरात पार पडलेल्या ५२व्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या विजेत्यांना गवाणकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. अंतिम फेरीच्या परीक्षक डॉ. माधवी वैद्य, दिलीप जगताप, प्राथमिक फेरीचे परीक्षक सुबोध पंडे, सुबोध राजगुरू, मनीष वाघ, 'महाराष्ट्रीय कलोपासक'चे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
पुरुषोत्तम करंडक विजेत्या स.प. महाविद्यालयाच्या संघाला गवाणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत कमिन्स महाविद्यालय आणि पीआयसीटी महाविद्यालयाने अनुक्रमे द्वितिय आणि तृतीय क्रमांक पटकावला. सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचे अनंत नारायण पारितोषिक अजित तोरसकर या भिवराबाई सावंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला 'कुडाज्ञान' एकांकिकेसाठी देण्यात आले. प्रायोगिक लेखनासाठीचे सत्यदेव दुबे पारितोषिक जयवर्धन खोत याला 'पारडं' या एकांकिकेसाठी, तर दिग्दर्शनासाठीचे गणपतराव बोडस पारितोषिक आणि अभिनयासाठीचे निर्मल पारितोषिक स. प. महाविद्यालयाच्या यश रुईकर याला प्रदान करण्यात आले. कमिन्स महाविद्यालयाच्या शरयू धोटे हिला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील अत्यंत महत्वाची आणि मानाची समजली जाणारी यशवंतराव स्वराभिनय आणि केशवराव दाते सर्वोत्कृष्ट अभिनय ही दोन्ही पारितोषिके गौरव बर्वे (स. प. महाविद्यालय) याने पटकावली. त्याने '३०० मिसिंग' या नाटकात त्याने जॉर्ज मेहिएसची भूमिका साकारली होती.
गवाणकर म्हणाले, की 'पुणेकरांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच वस्त्रहरण नाटक मोठे झाले. त्यामुळेच मी आज नाट्यसंमेलनाध्यक्षपदावर उभा आहे. पु.ल. देशपांडे यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाची थाप पाठीवर पडली नसती तर, आज इथवर आलो नसतो. उरी जिद्द बाळगली तर माणूस मोठ्या उंचीवर पोहोचतो. तरुणांनी जिद्दीने रंगभूमीची सेवा करत रहावे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उपप्रादेशिक परिवहन’साठी महापालिका देणार जागा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे आणि विविध प्रकारच्या परवान्यांसाठी नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) येणारा भार आता कमी होणार आहे. आरटीओच्या मागणीनुसार शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यासाठी महापालिकेने महंमदवाडीत २ एकर अॅमिनिटी स्पेस देण्याची तयारी दर्शविली आहे. या जागेच्या भाडेकरारापोटी येणाऱ्या २ कोटी २ लाख रुपयांच्या खर्चास परिवहन आयुक्तांनी मान्यता दिली असून, त्याबाबतचे पत्रही परिवहन कार्यालयाला देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच संगम पुलाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील कामांची विभागणी होणार आहे.
शहरात दर वर्षी सुमारे तीन लाख नवीन वाहनांची नोंदणी होते. तसेच शिकाऊ परवाना काढणाऱ्या उमेदवारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाची क्षमता अपुरी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या चारही दिशांना चार उपप्रादेशिक परिवहन कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यातील आळंदी रस्ता येथे कार्यालय सुरू झाले आहे. तर, आरटीओ कार्यालयाकडून हडपसर आणि बावधन येथील जागा महापालिकेकडे मागण्यात आली होती. या दोन्ही जागा विकास आराखड्यात प्रस्तावित असून, त्यातील महंमदवाडी येथील दोन एकर जागा महापालिकेने देण्याची तयारी दर्शविली आहे. या जागेच्या भाड्यापोटी सुमारे २ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चाचा प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडून परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्या खर्चास परिवहन आयुक्तांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
महंमदवाडी येथील दोन एकर जागेत वाहन तपासणी, ऑटोमेटेड वाहन तपासणी, ऑटॉमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक करण्यात येणार आहे. या ठिकाणी परवाने आणि वाहन परवाने नूतनीकरणाचे कामही शक्य आहे. बावधन येथील जागेबाबतही महापालिका प्रशासनाशी चर्चा सुरू असून, ही जागा मिळाल्यास मुख्य कार्यालयावर येणारा कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे, पाटील यांनी स्पष्ट केले.
...........
दिवे गावात उभारणार ट्रॅक
प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) सासवड रस्त्यावर दिवे गावात २५ एकर जागा आहे. या जागेवर विविध प्रकारच्या वाहनांची तपासणी करण्यासाठी 'ब्रेक टेस्टिंग ट्रॅक' उभारण्याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नुकताच परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या जागेवर २५० मीटरपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक लांबीचा ट्रॅक उभारता येणार आहे. त्यासाठी आयुक्त कार्यालयाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता अभ्यासक्रमात ‘रस्तेसुरक्षा’

0
0

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक साक्षरता आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार इंजिनीअरिंग शाखेच्या नव्या अ‍भ्यासक्रमाच्या तिसऱ्या सेमिस्टरपासून विद्यार्थ्यांच्या ऑडिट कोर्समध्ये 'रस्ते सुरक्षा' या ऐच्छिक विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कॉलेजांमध्ये सुरू झाली असून, कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना 'एपी' ही श्रेणी प्राप्त होणार आहे.
विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेचा अभ्यासक्रम २०१५ मध्ये क्रेडिट सिस्टीमनुसार करण्यात आला. या नव्या अभ्यासक्रमामध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षापासून सेमिस्टरमध्ये 'ऑडिट कोर्स' या विषयाचा समावेश करण्यात आला. या कोर्समध्ये समाजातील घटनांचा मानवावर होणारा परिणाम आणि अतिरिक्त कौशल्यांचे ज्ञान देणाऱ्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित सेमिस्टरमध्ये हा विषय घेऊन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना 'एपी' (पास्ड ऑडिट कोर्स) श्रेणी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत या श्रेणीचा समावेश असेल. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजांनी 'रस्ते सुरक्षा'प्रमाणेच सामाजिक शास्त्रे, पर्यावरण अभ्यास, अभियांत्रिकी अर्थशास्त्र, व्यावसायिक मूल्य आणि नैतिकता, मालमत्तेचे हक्क आणि पेटंट आदी विषयांचा अभ्यास आरंभला आहे. विद्यापीठाने संबंधित विषयांना अनुसरून अभ्यासक्रम आखला असून, त्यासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथांची यादी वेबसाइटवर प्रकाशित केली आहे.
.............
केवळ नामधारी श्रेणी
'ऑडिट कोर्स' हा विषय विद्यार्थ्यांना ऐच्छिक आहे. त्या अंतर्गत असणाऱ्या विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी यशस्वी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या गुणपत्रिकेत 'एपी' ही श्रेणी दिसणार आहे. ही श्रेणी 'एसजीपीए' आणि 'सीजीपीए'मध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच, या विषयाचे मूल्यमापन कॉलेजस्तरावर करण्यात येणार आहे, अशी माहिती इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमात नमूद करण्यात आली आहे.
.......
रस्तेसुरक्षा या विषयी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांसह मी स्वत: इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये जाऊन वाहतूक साक्षरता आणि व सुरक्षिततेच्या विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना माहिती देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती होण्यासाठी मदत होईल.
जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठरा रस्त्यांवर वाहनांना ‘नो एंट्री’

0
0

मराठा मोर्चासाठी पुणे पोलिस सज्ज; सकाळपासूनच बंदोबस्त तैनात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठा क्रांती (मूक) मोर्चाला येत्या रविवारी (२५ सप्टेंबर) लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांसह शहरातील १८ रस्त्यांवरील वाहतूक बंद राहणार आहे. नागरिकांनी मध्यवस्तीत वाहने आणण्याचे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
येत्या रविवारी डेक्कन येथील नदीपात्रातून मोर्चाची सुरुवात होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील नटराज चौक, खंडोजी बाबा चौक, टिळक चौकामार्गे (अलका टॉकिज चौक) लक्ष्मी रस्त्याने संत कबीर चौकी, नेहरू रस्त्याने पॉवर हाउस चौक, त्यानंतर उजवीकडे वळून समर्थ पोलिस ठाण्यासमोरून बॅनर्जी चौक, उजवीकडे वळून नेहरू चौक, दोराबजी मॉल चौकात डावीकडे वळून हॉटेल ब्लू नाइल समोरून विधानभवनावर मोर्चा जाणार आहे.
राज्यात आतापर्यंत ठिकठिकाणी झालेल्या मोर्चांमधील गर्दी पाहता पुण्यातील मोर्चालाही मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे. मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांची संख्याही काही हजारांच्या घरात असल्याची शक्यता गृहीत धरून वाहतुकीचे नियोजन करण्यता आले आहे,' असे डॉ. मुंढे म्हणाले. वाहतूक पोलिस सकाळी सात वाजल्यापासूनच बंदोबस्तासाठी सज्ज होणार आहेत. जशी गर्दी वाढेल, तशी रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यास सुरुवात होईल. काही रस्त्यांवरील वाहतूक सकाळी आठ वाजल्यापासूनच वळवण्याची गरज पडेल, असेही ते म्हणाले. मोठ्या रस्त्यांना जोडणारे इतर लहान रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.
..............
खुले ठेवण्यात आलेले पर्यायी मार्ग
टिळक रस्ता-डेक्कन : टिळक रस्ता, टिळक चौक, डावीकडे वळून सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रेपूलमार्गे डेक्कन.
बाजीराव रस्ता : पूरम चौकात बंद.
शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा चौकातून बंद.
जंगली महाराज रस्ता : स. गो. बर्वे चौकात बंद राहणार आहे. कोथरूड, पौड रस्ता येथे जाणाऱ्यांनी ​गणेशखिंड रस्त्याचा वापर करावा.
कर्वे रस्ता : नळस्टॉप चौकातून बंद राहणार आहे. पौड रस्ता, कर्वेरोड येथून येणाऱ्या वाहनचालकांनी शिवाजीनगर परिसरात जाण्यासाठी लॉ-कॉलेज रस्त्याचा वापर करावा.
केळकर रस्ता : आवश्यकतेनुसार गाडगीळ पुतळा, कुंभारवेस, शाहीर अमर शेख चौक ते आरटीओ चौक असा रस्ता सुरू राहील.
गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) : खंडोजीबाबा चौक ते चापेकर चौकापर्यंत बंद राहील. नागरिकांनी लॉ कॉलेज रस्त्याचा वापर करावा.
नेहरू रस्ता : सेव्हन लव्ह चौकातून पुणे स्टेशनकडे बंद राहील.
स्वारगेट ते शिवाजीनगर : जेधे चौक, जमनालाल बजाज पुतळा चौक डावीकडे वळून सावरकर चौक, सिंहगड रोड मार्गे शास्त्री रस्त्याने सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप किंवा सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून.
स्वारगेट -सोलापूर रस्ता : गोळीबार मैदान चौक, इस्ट स्ट्रीटने किंवा खान्या मारुती चौक, उजवीकडे वळून मम्मादेवी चौक, मोरओढा चौक, सर्किट हाउस, साधु वासवानी पुलावरून ब्लू डायमंड चौक, डावीकडे वळून मंगलदास चौक, बंडगार्डन रस्त्याने इच्छितस्थळी.
सोलापूर रस्ता ते डेक्कन : जेधे चौक, जमनालाल बजाज पुतळा चौक, डावीकडे वळून सावरकर रस्ता, सिंहगड रस्त्यामार्गे शास्त्री रस्त्याने सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप किंवा सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून.
नगर रस्ता ते स्वारगेट : खराडी बायपास रस्त्याने मगरपट्टामार्गे मुंढवा रस्ता चौक, उजवीकडे वळून ​आवश्यक ठिकाणी जावे.
नगर रस्ता ते शिवाजीनगर, कोथरूड : नगर रस्ता, पर्णकुटी चौक, महात्मा गांधी उद्यान, उजवीकडे वळून बंडगार्डन रस्ता, आरटीओ चौक, इंजिनीअरिंग कॉलेज चौक, स. गो. बर्वे चौक, सिमला ऑफिस चौक, डावीकडे वळून गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्ता.
............
बंद असलेले रस्ते
बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन (ससून रस्ता)
बोल्हाई चौक ते साधु वासवानी पुतळा (फायनान्स रस्ता)
बोल्हाई चौक ते आंबेडकर पुतळा (मोलेदिना रस्ता)
मुख्य पोस्ट ऑफिस ते बोल्हाई चौक
पॉवर हाऊस ते बॅनर्जी चौक (मुदलीयार रस्ता)
किराड चौक ते एसबीआय चौक (चर्च रोड)
नेहरू हॉल चौक ते जहांगीर चौक (साधु वासवानी रस्ता)
दोराबजी मॉल चौक ते मंगलदास चौक
एसबीआय हाउस ते ब्लू नाइल (तारापोर रस्ता)
सदर्न कमांड सिग्नल ते साधु वासवानी पुतळा (मानेकशाँ मेहता रस्ता)
सर्किट हाऊस चौक ते अलंकार चौक (जनरल वैद्य रस्ता)
क्वार्टर गेट चौक ते संत कबीर चौक (लक्ष्मी रस्ता)
क्वार्टर गेट चौक ते कादर चौक
नेहरू हॉल चौक ते जे. जे गार्डन
आरटीओ चौक ते बोल्हाई चौक
संचेती हॉस्पिटल चौक ते शाहीर अमर चौक (वेलस्ली रस्ता)
क्वार्टर गेट ते शांताई हॉटेल (डॅम रस्ता)
अपोलो सिनेमा ते पॉवर हाउस चौक (मुदलीयार रस्ता)
...................................
मोर्चेकरी वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे
सातारा रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी
एस. पी. कॉलेज, शाहू कॉलेज, शिंदे हायस्कूल, गणेश कला क्रीडा मंच, लक्ष्मी नारायण थिएटर समोरील मैदान, अण्णा भाऊ साठे सभागृह, महाराष्ट्र मंडळ, टिळक रस्ता, मार्केट यार्ड मैदान, मुक्तांगण हायस्कूल.
नाशिक-मुंबई- पुणे रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी
कृषी महाविद्यालय, साखर संकुल, आरटीओ, 'एसएसपीएमएस', शिवाजीनगर (दुचाकींसाठी), इंजिनीअरिंग कॉलेज
कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, मुळशीकडून येणाऱ्या वाहनांसाठी
गरवारे कॉलेज, विमलाताई गरवारे (दुचाकी), बीएमसीसी, फर्ग्युसन कॉलेज, धोंडुमामा साठे संजीवन समोर (दुचाकींसाठी), मॉडर्न कॉलेज, डी. पी. रस्ता, म्हात्रे पूल, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल.
सोलापूर रस्त्याहून येणाऱ्या वाहनांसाठी
बी. टी. कवडे रस्ता, ढोबळवाडी, रेसकोर्स शेजारील मैदान, गोळीबार मैदान, बी. जे. मेडिकल मैदान, सेंट्रल बिल्डिंग, मनपा कॉलनी- स्वारगेट, कटारिया हायस्कूल, मुकुंदनगर, स्वारगेट पोलिस वसाहत (दुचाकींसाठी) , ईदगाह मैदान
नगर रस्त्याहून येणाऱ्या वाहनांसाठी
'एसएसपीएमएस', 'आरटीओ', वाडिया कॉलेज, संगमवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांना मेसेजद्वारे ‘तारीख पे तारीख’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोर्टात सुनावणी सुरू असणाऱ्या खटल्यांच्या पुढील तारखा आता वकिलांना त्यांच्या मोबाइलवर 'एसएमएस'द्वारे मिळू लागल्या आहेत. याचा फायदा गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर जिल्हा कोर्टात कार्यरत साडेचार हजारांहून अधिक वकिलांना मिळत आहे.
न्यायालयीन यंत्रणेकडून ही सुविधा वकिलांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता पक्षकार आणि वकिलांना खटल्यांच्या पुढील तारखा घेण्यासाठी कोर्टाच्या चकरा मारण्याची गरज पडत नाही. ही सुविधा उपयुक्त असली तरी, कोर्टाकडून येणारा तारखेचा एसएमएस त्रोटक स्वरूपाचा असून त्यात आणखी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत वकिलांनी 'मटा'कडे बोलताना व्यक्त केले. कोर्टात सुनावणी सुरू असलेल्या खटल्यांच्या पुढील तारखा घेण्यासाठी पक्षकार, वकील आणि ज्युनिअर वकिलांना कोर्टात सातत्याने चकरा माराव्या लागतात. कोर्टाचे कामकाज पेपरलेस व्हावे म्हणून सध्या न्यायालयीन यंत्रणेकडून पुढाकार घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोर्टाकडून वकिलांना एसएमएसद्वारे तारखा पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोर्टात वकीलपत्र दाखल त्यावर वकिलांचा मोबाइल क्रमांक घेण्यात येतो. संबंधित वकिलाच्या मोबाइलवर कोर्टाकडून खटल्याची पुढील तारीख पाठविण्यात येते. शिवाजीनगर कोर्टात साधारणतः वर्षभरापूर्वी ही सुविधा राबविण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक वकील या सेवेचा लाभ घेत आहेत.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रताप परदेशी यांनी या सुविधेचे कौतुक केले आहे. वकीलपत्र दाखल करताना त्यावर वकिलांचा मोबाइल क्रमांक नमूद करण्यात येतो. त्यानंतर वकिलांच्या मोबाइलवर प्रकरणाचा क्रमांक आणि पुढील तारीख या विषयी माहिती देण्यात येते. त्यामुळे कोर्टात चकरा मारण्याचा वेळ वाचतो, असेही अॅड. परदेशी यांनी स्पष्ट केले. पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद पवार यांनीही ही सेवा उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. 'वकिलांना एसएमएसद्वारे खटल्याच्या पुढील तारखा मिळतात. मात्र, त्यात आणखी माहितीचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे,' असे अॅड. पवार म्हणाले. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. देवानंद ढोकणे म्हणाले की,' या योजनेमुळे वकिलांना खटल्याची पुढील तारीख सहज मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे वकील आणि पक्षकारांचा तारखा घेण्यासाठी लागणारा वेळ वाचू लागला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'भोसलेंसाठी खडसेंनी राज्याचे १ हजार कोटी बुडवले'

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मंत्रिपद गेल्यापासून आपण निर्दोष असल्याचे सांगत फिरणारे राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना आम आदमी पक्षानं पुन्हा एकदा धक्का दिला आहे. 'पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना फायदा व्हावा यासाठी खडसे यांनी राज्याचे १ हजार कोटी बुडवले आहेत,' असा आरोप 'आप'च्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला आहे.

पुण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अविनाश भोसले यांच्या पुण्यातील जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप मेनन यांनी केला. खडसे यांनी भोसले यांचे ५० कोटी रुपये वाचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या एका आदेशांना स्थगिती दिली. त्यांच्या या आदेशामुळं राज्य सरकारचा एक हजार कोटींचा महसूल बुडाला,' गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल लर्निंगचा खजिना खुला

0
0

- 'एससीईआरटी'च्या वेबसाइटवर होणार प्रसिद्ध; शिक्षकांच्या डिजिटल साहित्याचे प्रमाणीकरण
- दर्जेदार व्हिडिओंना मिळणार हक्काचे व्यासपीठ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यभरातील शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक व्हिडिओ, ब्लॉग, वेबसाइट्स आदी डिजिटल साहित्याचे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) लवकरच प्रमाणिकरण करणार आहे. प्रमाणित होणारे व्हिडिओ परिषदेच्या वेबसाइटवरूनच राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. याच प्रयत्नांचा भाग म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात खान अॅकेडमीसारख्या खासगी संस्थांची निर्मिती असलेले व्हिडिओ या वेबसाइटवरून उपलब्ध करून देण्याची सुरुवात संस्थेने केली आहे.
'एससीईआरटी'च्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण खात्याने गेल्या काही काळामध्ये विशेष प्रयत्न हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेची http://mscert.org.in/index.php ही वेबसाइटही अधिक आकर्षक आणि संवादी स्वरूपामध्ये अभ्यासकांसमोर मांडली जात आहे. ही वेबसाइट केवळ प्रशासकीय हेतूने न वापरता, त्याचा शैक्षणिक उपक्रमांसाठीही वापर व्हावा, यासाठी या वेबसाइटवरून शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यातूनच खान अॅकेडमी, क्वेस्ट, मराठीतून विज्ञान शिक्षण, नवनिर्मिती, अरविंद गुप्ता, पालकनीती, गणितीय मदत आदी खासगी संस्था आणि व्यक्तींच्या कामाच्या लिंक्स या वेबसाइटवरून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून संस्था व्हिडिओ, ब्लॉग्स आणि वेबसाइट्सचा खजिना विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर ठेवणार आहे.
'खान अॅकेडमीने तयार केलेल्या गणितविषयक व्हिडिओंचा संस्था पहिल्या टप्प्यात विचार करत आहे. हे व्हिडिओ वर्गातून पाहणे आणि त्या आधारे विद्यार्थ्यांना गणिताच्या संकल्पना शिकविणे शक्य आहे. त्यासाठी आम्ही शिक्षकांनाही आवाहन करत आहोत. हे व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही,' अशी माहिती संस्थेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी बुधवारी 'मटा'ला दिली. संस्था या पुढील टप्प्यात राज्यभरातील शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्यही प्रमाणित करणार आहे. त्यासाठीचा अधिकृत निर्णय लवकरच होणार आहे. त्याच अनुषंगाने संस्थेने राज्यभरातील शिक्षकांकडील अशा अभ्याससाहित्याची माहितीही गोळा केली आहे. त्यातून एक हजार ४६० शैक्षणिक अॅप्स आणि एक हजार ३९५ ब्लॉग आणि वेबसाइट्सची माहिती संस्थेकडे गोळा झाल्याचेही याच निमित्ताने संस्थेकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आर्टिस्ट्री’तर्फे ‘देणे समाजाचे’ उपक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आर्टिस्ट्री संस्थेतर्फे काही वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांचे 'देणे समाजाचे' हे प्रदर्शन भरविण्याचा अनोखा उपक्रम राबविला. दानशूर लोकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळता. बघता बघता दर वर्षी या मेळाव्याला प्रतिसाद वाढत गेला आणि यंदा प्रदर्शनाचे तपपूर्ती वर्ष साजरे होते आहे. कर्वे रोडवरील हर्षद हॉलमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
येत्या रविवारपर्यंत सकाळी १० ते ९ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या उपस्थितीत डॉ. अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी वीणा गोखले उपस्थित होत्या. प्रदर्शनाच्या निमित्ताने आर्टिस्ट्री संस्थेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार वैजू बोरा यांना देण्यात आला.
'अनेक संस्था आपापल्या पातळ्यांवर काम करीत असतात. काही संस्थांना दानशूर व्यक्तींचा पाठिंबा मिळतो, तर काहींना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या संस्था वंचिताना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. यातील अनेकांचे काम उल्लेखनीय असते, पण त्या समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास त्या कमी पडतात. वंचित घटकांसाठी झटणाऱ्या या संस्थांना त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्यासाठी या उपक्रमाची सुरूवात केली,' असे आर्टिस्ट्रीच्या संचालिका वीणा गोखले यांनी सांगितले.
यंदा प्रदर्शनात पुण्यासह डोंबिवली, ठाणे, धुळे, नाशिक अशा विविध भागातील २८ संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळण्यापासून निराधार मुलांना मायेचे छत देणाऱ्या, अंध-मूक-बधिर विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील, एकट्या महिलांना आधार देणाऱ्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या विविध भागातील संस्थांचा यात समावेश आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. या संस्थांना आर्थिक गरजेबरोबरच कपडे, वस्तू आणि फर्निचरची गरज आहे. अनेकांकडे जुन्या वस्तू पडून असतात, त्या दुरुस्त करून या संस्थांना देता येतील.
'आपल्या संस्कृतीचा एक भाग असलेल्या समाजऋणाच्या संकल्पनेनुसार सामाजिक संस्थांचे काम समाजापुढे आणण्यासाठी, त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला जातो. आतापर्यंत शंभरहून अधिक संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. ग्रामीण भागातील सेवाभावी संस्थांसाठी हे प्रदर्शन म्हणजे व्यासपीठ आहे,' असे गोखले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​लेक्चररला मारहाण केल्यावरून शिक्षक-पालकांचा मूक मोर्चा

0
0



म. टा. प्रतिनिधी, येरवडा
विश्रांतवाडी येथील विद्या विलास मंडळ संस्थेचे संस्थाचालक अंथनी ननावरे यांची मुलगी स्वप्ना ननावरे हिने गेस्ट लेक्चरर आणि महाराष्ट्र शिक्षक-शिक्षकेतर सनेचे पुणे शहर सचिव गणेश पाटील याला मारहाण केल्याचा निषेधार्थ शिक्षक व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलिस आयुक्तालयापर्यंत मूक मोर्चा काढला. बेकायदेशीर संस्थाचालक आणि संबंधित व्यक्तींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली.
गणेश पाटील हे जनता हायस्कूलमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून शिकविण्यासाठी आहेत. सोमवारी सकाळी संस्थाचालक ननावरे यांच्यासह त्यांच्या मुलीची पाटील यांच्याबरोबर वादावादी झाली. त्यानंतर स्वप्ना हिने पायातील चप्पल काढून पाटील यांना सर्वांदेखत तोंडावर मारहाण केली. त्यामुळे गणेश पाटील यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार केली असून, ननावरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने गणेश पाटील आणि मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांच्या हल्ल्याचा निषेधार्थ बुधवारी पोलिस आयुक्त कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, मनसे महिला अध्यक्षा रुपाली पाटील, उपाध्यक्ष जयराम लांडगे, अनिल साळुंखे, तुषार गवस, सुधीर धावडे, राहुल प्रताप, कृष्णा मोहिते, राजेंद्र राजपुरोहित, विशाल कांबळे, योगेश महिंद्रकर, रामा जाधव, मनसे कार्यकर्ते आणि शिक्षक व पालक सहभागी झाले होते.
या वेळी पदाधिकारी, शिक्षक तसेच पालकांनी पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यांना भेटून संस्थेच्या दोषी व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी करून निवेदन दिले. भविष्यात शिक्षक अथवा पालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा हल्ला झाल्यास मनसे स्टाइलनेच उत्तर देण्यात येईल, असे रुपाली पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाचा पुण्यात उद्या मोर्चा

0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
विविध मागण्यांसाठी उद्या (रविवारी) आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चास जनसागर उसळणार असून, समाजातील मुली या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चासाठी वाहतूक, आरोग्य आणि अन्य सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजास आरक्षण मिळावे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधित कायद्याचा (अ‍ॅट्रासिटी) गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती (मूक) मोर्चा आयोजिण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या तालुक्यांमधूनही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.
डेक्कन जिमखाना येथील गरवारे पुलाजवळील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर खंडुजीबाबा चौकापासून मोर्चास प्रारंभ होणार आहे. टिळक चौकातून लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौक, सोन्या मारुती चौक, नाना पेठेतून पॉवर हाउस, लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद कार्यालयमार्गे कौन्सिल हॉल येथे मोर्चा जाणार असून, तेथे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. मोर्चाच्या अग्रभागी लहान मुली, महिला राहणार असून त्यानंतर वकील आणि त्यानंतर नागरिक सहभागी होणार आहेत.
या मोर्चासाठी सुमारे पाच हजार स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्वयंसेवकांना खास टी-शर्ट देण्यात आले असून, ते पोलिसांना वाहतूक नियमनासाठी मदत आणि मोर्चातील नागरिकांना मदत करणार आहेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी सुमारे दोनशे डॉक्टरांचे पथक आणि ४० अॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच खंडुजीबाबा चौक, बेलबाग चौक, कॉमनवेल्थ बिल्डींग, सोन्या मारुती चौक, संत कबीर चौक, पॉवर हाउस, लाल देऊळ, कौन्सिल हॉल येथे वैद्यकीय सेवा व मदत केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी रविवारी शक्यतो आपली वाहने बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, जंगली महाराज रस्ता, नगर रस्ता, पुणे स्टेशन, लष्कर, पुणे-हडपसर रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, पुणे-सातारा रस्ता, पुणे-मुंबई रस्ता आदी रस्त्यांवर आणू नयेत. तसेच मोर्चाच्या मार्गांवर लावू नयेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

प्रमुख मागण्या
कोपर्डी घटनेसह महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी, त्यांच्याविरुद्ध खास न्यायालयात जलदगतीने खटल्याची सुनावणी सुरू करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. अ‍ॅट्रॉसिटी (अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) कायद्यातील गैरवापर थांबविण्यासाठी त्यात दुरुस्ती करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना, कर्जमुक्ती व शेतमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी बाजारभाव देण्यात यावा. मराठा समाजास शिक्षण नोकरीमध्ये आरक्षण शैक्षणिक सुविधा देण्यात याव्यात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ईबीसी उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ उच्च शिक्षण, प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी कार्यरत करावे आणि अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे व गडकिल्ले विकासाचे काम तातडीने सुरू करावे, अशा मागण्या यानिमित्ताने करण्यात आल्या आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाध्यक्ष होईन; पण २०२० नंतर : डॉ. गणेश देवी

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
'भाषा संशोधनाच्या कामामध्ये गुंतून घेतल्याने मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक नाही,' असे स्पष्टीकरण ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिले. '२०२० नंतर संमेलनाचे अध्यक्षपद बिनविरोध माझ्याकडे आले तर मी तो माझा बहुमानच समजेन,' असे त्यांनी आवर्जून सांगितले.
डोंबिवली येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचे नाव चर्चेत होते. या पार्श्वभूमीवर डॉ. देवी यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. कामाच्या व्यापामुळे पुढील किमान तीन-चार वर्षे तरी अध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे ते म्हणाले. प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी देवी यांचे नाव सुचविले होते.
'संमेलनाच्या अध्यक्षपदी चांगल्या व्यक्तीची बिनविरोध निवड व्हावी, असा विचार राजन खान यांच्याशी बोलताना आला होता. घुमान येथील साहित्य संमेलनामध्ये आमची या विषयावर चर्चा झाली होती,' असे डॉ. देवी यांनी सांगितले. 'युनेस्कोने जगभरातील सर्व भाषांच्या संख्यात्मक संशोधनाचे काम माझ्यावर सोपविले आहे. ही जबाबदारी मी नुकतीच स्वीकारली आहे. या कामासाठी मला केवळ राज्याबाहेरच नव्हे तर स्पेन, फ्रान्स, नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये राहावे लागणार आहे. अशा वेळी संमेलनासाठी वेळ देता येणार नसल्याने मी अध्यक्षपदासाठीचा उमेदवार नाही. या संशोधन कामाच्या पूर्तीसाठी तीन-चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे २०२० पर्यंत तरी मी अध्यक्षपदासाठी उत्सुक नाही. त्यानंतर माझी बिनविरोध निवड झाली तर मी हा माझा बहुमान समजेन,' असे डॉ. देवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आबेदा इनामदार, एमआयटीवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुरुड दुर्घटनेच्या प्रकरणाबाबत आबेदा इनामदार कॉलेजवर आणि रॅगिंग प्रकरणात एमआयटीच्या इंजिनीअरिंग कॉलेजवर नियमानुसार कारवाई करण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत गुरुवारी एकमत झाले. मात्र, कारवाई करण्यापूर्वी दोन्ही कॉलेजांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी दिली.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आबेदा इनामदार कॉलेजमधील काही विद्यार्थी मुरुड दुर्घटनेत मृत्युमुखी पडले होते. मुरूड येथील सहली दरम्यान महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नियमावलीचे पालन केले नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, असा आरोप पालकांनी केला. तसेच विद्यापीठाने चौकशी समितीच्या माध्यमातून तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानुसार मुरूड दुर्घटनेबाबतचा अहवाल आणि एमआयटी महाविद्यालयात घडलेल्या रॅगिंग प्रकरणी विद्यापीठाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने दिलेला अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत ठेवण्यात आले. व्यवस्थापन परिषदेने दोन्ही अहवाल स्वीकारून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला.
मुरूड दुर्घटनेप्रकरणी महाविद्यालयाने स्वत: चौकशी समिती स्थापन करून आपला अहवाल विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाला सादर केला होता. मात्र, महाविद्यालयाचा अहवाल सदोष असल्याचा आरोप पालकांनी केला होता. त्यामुळे विद्यापीठाने स्वत: समिती स्थापन केली होती. एमआयटी रॅगिंगप्रकरणी विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीने अहवाल देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे विद्यापीठाबाहेरील व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी स्थापन करण्यात आली. या समितीने दिलेला अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने स्वीकारला आहे.
...
आबेदा इनामदार महाविद्यालयाचा मुरुड दुर्घटनेबाबत आणि एमआयटी रॅगिंग प्रकरणासंदर्भातील समितीचा अहवाल गुरुवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. दोन्हीही अहवाल परिषदेने स्वीकारून कॉलेजांना दोषी ठरविले आहे. मात्र, महाविद्यालयांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य : मुख्यमंत्री

0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे विभागात पहिल्या क्रमांकाचे काम झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'मागेल त्याला शेततळे या योजनेनुसार पाच हजार २८७ शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली. त्यातील एक हजार ६९७ ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. २२ हजार ६६७ मंजूर सिंचन विहिरींपैकी १९ हजार २९१ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सिंचन विहिरी आणि शेततळी बांधण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन तीन ते चार शेतकरी एकत्र आल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या आहेत.' असे ते म्हणाले. पुणे विभागीय आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'कृषिपंप उर्जिकरणांतर्गत ३८ हजार ४७६ कनेक्शन देण्यात आली आहेत. आणखी सुमारे ४५ हजार अर्ज आले आहेत. त्यासाठी सुमारे एक हजार ६०० कोटी रुपयांचे नियोजन केले जाणार आहेत. गेल्या वर्षभरात चार लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. आगामी वर्षभरात आणखी चार लाख शौचालये बांधली जातील. सोलापूर जिल्हा वगळता पुणे, कोल्हापूर आणि सातारा हे जिल्हे मार्च २०१७ पर्यंत हगणदारीमुक्त होतील.' असे त्यांनी सांगितले.
'पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे नसणाऱ्यांना घरे बांधण्यासाठी जागा घेण्यास दहा हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी पद्धतीने सुमारे ८०० अभियंते नियुक्त करण्यात आले आहेत.' असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images