Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

यंदा नवीन कॉलेज नाही

$
0
0


Yogesh.Borate@timesgroup.com
पुणे : राज्यभरातील विद्यापीठांच्या कार्याच्या संभाव्य विस्ताराविषयी भाष्य करणारे विद्यापीठांचे बृहद आराखडे उच्चशिक्षण खात्याने पुन्हा विद्यापीठांकडेच पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षात एकाही विद्यापीठाला नव्याने कॉलेजांना मान्यता देण्याची परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात नेमक्या गरजांचा आढावा घेत, त्यानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठे बृहद आराखड्यांच्या माध्यमातून आपल्या विस्तार योजना मांडत असतात. या योजनांमध्ये नेमकेपणा यावा, तसेच त्यामध्ये सुसूत्रता असावी, यासाठी राज्य सरकारने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमली होती. या समितीच्या सूचनांचा विचार करत राज्यभरातील विद्यापीठांनी आपापले बृहद आराखडे नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये शिक्षणमंत्र्यांसमोर मांडले. मात्र, हे आराखडे पुन्हा विद्यापीठांकडे पाठविण्याचे आदेश तावडे यांनी या बैठकीत दिल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी सोमवारी 'मटा'ला दिली.
या विषयी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री तावडे यांनी राज्यभरातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि उच्चशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची एक उच्चपदस्थ बैठक नुकतीच मुंबईमध्ये घेतली. त्या बैठकीमध्ये विद्यापीठांच्या बृहद आराखड्यांविषयी चर्चा झाली. डॉ. जाधव यांच्या समितीने बृहद आराखडे तयार करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यामध्ये विद्यापीठांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत, नेमक्या कोणत्या बाबींवर भर देणे गरजेचे आहे, या विषयीही भाष्य केले होते. या सूचनांचा विचार करत यंदा पहिल्यांदाच राज्यभरातील विद्यापीठांनी आपापले बृहद आराखडे तयार केले होते. वाढता निकाल, विविध अभ्यासक्रमांसाठी असणारी मागणी आणि त्यानुसार त्यासाठी आवश्यक तुकड्या, कॉलेजांची संख्या आणि त्यामध्ये अपेक्षित वाढ वा घट आदी मुद्द्यांचा या आराखड्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, चर्चेअंती तावडे यांनी हे आराखडे पुन्हा विद्यापीठांकडेच परत पाठविण्याचे आदेश दिले. या विषयी तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

'तर हे होणार नाही...'
या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बृहद आराखड्यामधील महत्त्वाच्या तरतुदींचीही 'मटा'ने माहिती घेतली. यंदा विद्यापीठाने पदवी पातळीवर 'एव्हिएशन' अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव बृहद आराखड्यातून मांडला होता. तसेच, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः अंधांसाठी पूर्णपणे स्वतंत्र असे कॉलेज सुरू करण्याचा प्रस्तावही या आराखड्यातून मांडण्यात आला होता. विद्यापीठाचा आराखडा जर पुन्हा विद्यापीठाकडेच परत आला; तर यंदा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एकही नवे कॉलेज सुरू होणार नाही. तसेच, अंध आणि विशेष विद्यार्थ्यांसाठीचे प्रस्तावित स्वतंत्र कॉलेजही आता कागदावरच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांसाठी ‘विज्ञान दूत’प्रकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे नमुने हे टपाल विभागामार्फत पाठवण्यासाठी 'किसान विज्ञान दूत' हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पानुसार शेतकरी हे माती परीक्षण केंद्राला टपाल कार्यालयातून मातीचे नमुने पाठवू शकणार असून, त्याचे अहवाल शेतकऱ्यांना स्पीड पोस्टद्वारे मिळणार आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, कृषी विज्ञान केंद्रांनी या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ बारामती तालुक्यातील मोरगावजवळील मूर्ती या गावापासून करण्यात आला. पुणे परीक्षेत्राच्या डाक निदेशक सुमिता अयोध्या यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल्याचे सहायक पोस्टमास्तर जनरल एफ. बी. सय्यद यांनी सांगितले.
सय्यद म्हणाले, 'पुणे क्षेत्रामध्ये पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर या चार ​जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये दोन हजार १६१ टपाल कार्यालये आहेत. माती परीक्षण सुविधा शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध होण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शेतकरी आपल्या शेतातील मातीचे नमुने हे परीक्षणासाठी टपाल कार्यालयामार्फत पाठवू शकणार असून, माती परीक्षण अहवाल हे स्पीड पोस्टद्वारे वितरीत केले जाणार आहेत.'
'शेतकरी आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यात दूत म्हणून टपाल विभाग काम करणार आहे. हा प्रकल्प पुणे ग्रामीण विभागातील निवडक टपाल कार्यालयांमध्ये सुरू केला जाणार आहे.' असेही ते म्हणाले.
माती परीक्षण सुविधेबद्दल अनेक शेतकरी हे अनभिज्ञ आहेत. काहीवेळा माती परीक्षण केंद्र हे जवळ नसल्याने शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. माती परीक्षण न केल्यामुळे शेतकरी अयोग्य पिकांची लागवड करतात. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. आता टपाल विभागामार्फत ही सेवा दिली जाणार असल्याने शेतकऱ्यांना माती परीक्षण सुविधा घरपोच मिळू शकणार आहे.' असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार अधिकाऱ्यांना नोटीस

$
0
0

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीप्रमुखांना भेट म्हणून दिलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आयुक्त वाघमारे यांनी सहआयुक्त दिलीप गावडे यांच्यासह चौघा अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना भेट देण्यासाठी महापालिकेने सुमारे ६५० विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी केल्या. त्यासाठी खरेदीची अल्प मुदतीची ई-निविदा प्रक्रिया राबवली. तत्पूर्वी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने उत्पादित पुरवठाधारक किंवा अधिकृत वितरकांकडून दरपत्रक मागवले होते. त्यामध्ये मे. अक्षय ग्रीन एनर्जी या पुरवठादार ठेकेदाराने ३९५० रुपये, साई सेवा इंटरप्रायजेस यांनी ४५०० रुपये आणि मे. आल्हाट आर्ट स्टुडिओ यांनी ४१०० रुपये (प्रति नग) असे दर सादर केले. तसेच मे. राज इंटरप्रायजेस यांनी मे. साई सेवा इंटरप्रायजेस यांना निविदेमध्ये अधिकृतपणे भाग घेण्याबाबतचा दाखला दिला. हे सर्व पुरवठादार ठेकेदार एकच व्यक्ती असल्याचे पुरावे नगरसेविका सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी महापालिका आयुक्त वाघमारे यांना दिले होते. तसेच या प्रकरणात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी बनवाबनवी करून करदात्यांचे पैसे लाटल्याचा आरोपही केला होता. त्याची दखल घेऊन आयुक्त वाघमारे यांनी महापालिकेचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर यांची चौकशी समिती नियुक्त केली.

या समितीने त्यांचा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. त्यामध्ये ठेकेदारांनी संगनमताने निविदा भरल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा आणि खरेदीत निष्काळजीपणा झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. मूर्ती खरेदीची अंदाजित रक्कम निश्चित करण्यासाठी मागविलेल्या दर पत्रकासाठी तिन्ही पुरवठादार ठेकेदारांना महापालिकेमार्फत कोणतेही मागणीपत्र दिलेले नसणे, तसेच तिघेही सरकार किंवा महापालिकेचे अधिकृत व नोंदणीकृत पुरवठादार नसल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे. तिन्ही पुरवठादार अपात्र असताना त्यांना पात्र ठरवून दराबाबतची निविदा उघडण्यात आल्याचेही चौकशी समितीने म्हटले आहे. याशिवाय पुरवठादार ब्राँझ मूर्ती उत्पादक किंवा अधिकृत वितरक असल्याची खात्री न करणे, निविदा छाननीच्या वेळी भांडार विभागाने दक्षता घेतलेली नसणे, पुरवठादाराने आयकर आणि व्हॅट परताव्याची कागदपत्रे सादर केलेली नसताना निविदा अर्हता छाननी तक्त्यात आयकर परतावा भरले असल्याचे नमूद करणे, या संदर्भात तफावत असल्याचे नमूद केले आहे.

अहवालानुसार, तत्कालीन भांडार विभागाचे प्रमुख सहआयुक्त दिलीप गावडे, भांडार अधिकारी सुरेश लांडगे, लेखापाल प्रवीणकुमार देठे, लिपिक भगवंता दाभाडे यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांना नोटीस बजावून 'विभागीय चौकशीची कारवाई का करण्यात येऊ नये,' याचा खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडोशासाठी थांबलेला युवक दुचाकीसह खड्ड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पाऊस असल्याने आडोसा म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलेला युवक दुचाकीसह ड्रेनेजच्या बारा फूट खोल खड्ड्यात पडल्याची दुर्घटना रविवारी रात्री घडली. पुणे ते पिंपरी रस्त्यावर वल्लभनगर येथे रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने युवकाला फारशी दुखापत झाली नाही.

रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एक तरुण जोडपे दुचाकीवरून पिंपरीच्या दिशेने येत होते. नाशिक फाट्याच्या पुढे आल्यानंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हे जोडपे आडोसा शोधत महामार्गावरील वल्लभनगरमधील पेट्रोल पंपाच्या पुढे आले. आडोसा न मिळल्याने त्यांनी ग्रेड सेपरेटर आणि सर्व्हिस रोडच्या मधोमध असलेल्या दुभाजकामधील एका झाडाचा आसरा घेतला. बराच वेळ झाला तरी पाऊस थांबेना. त्यातच रात्री या ठिकाणी रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश अंधूक असल्याने त्यांना काहीच दिसत नव्हते.

या जोडप्याला पाऊस थांबण्यासाठी अर्धा तास वाट पाहावी लागली. तोपर्यंत सगळीकडे पावसाचे पाणी साचले होते. हे जोडपे ज्या ठिकाणी थांबले होते, तेथेच मागे ड्रेनेजचा दहा ते बारा फूट खोल खड्डा होता. पाऊस थांबल्यानंतर घराकडे जाण्यासाठी युवकाने दुचाकी मागे घतेली. परंतु चिखलामुळे गाडी घसरून थेट ड्रेनेजच्या खड्ड्यात जाऊन पडली. गाडीबरोबर युवकदेखील या खड्ड्यात जाऊन पडला. या वेळी युवती बाजूला उभी असल्याने तिला काही झाले नाही. हा प्रकार पाहून भांबावलेल्या युवतीने तेथील काही नागरिकांची मदत मागितली.

तिचा आरडाओरडा ऐकून नागरिक आणि दुकानदारांनी त्या ठिकाणी धाव घेतली. अंधार असल्याने आणि खड्डा खोल असल्यामुळे नागरिकांनी मोबाइलमधील बॅटरीच्या उजेडात खड्ड्यात पाहिले. त्या वेळी युवक दुचाकीसह या खड्ड्यात पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी युवकाला खड्ड्याबाहेर काढले. त्यानंतर ते जोडपे दुचाकी तेथेच सोडून घरी गेले. त्यानंतर सोमवारी दुपारी क्रेनच्या साह्याने दुचाकी बाहेर काढण्यात आली. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम राडारोड्यावर प्रक्रिया करणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या हद्दीत तयार होणाऱ्या बांधकामाच्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया केली जाणार आहे. या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी एका खासगी कंपनीला प्रति टन १९५ रुपये टिफिंग फी देण्यात येणार असून, यामध्ये प्रत्येक वर्षी पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे.
शहरात बांधकामे करताना तयार होणाऱ्या राडारोड्याचे प्रमाण मोठे आहे. यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने वाघोली येथील खाणीची जागा मिळावी अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ही जागा मिळण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' (बीओटी) तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्यासाठी टेंडर मागविले होते. यामध्ये एका खासगी कंपनीचे टेंडर सर्वात कमी रकमेचे आल्याने त्यांना हे काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. या कंपनीला राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रतिटन १९५ रुपये टिफिंग फी देण्यात येणार असून, यामध्ये दरवर्षी पाच टक्के वाढ केली जाणार आहे.
हा प्रकल्प उभारण्यासाठी तसेच चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या या ठेकेदाराने आणायच्या आहेत. ठेकेदाराकडून परफॉरमन्स बँक गॅरंटी म्हणून सव्वा कोटी रुपये घेतले जाणार आहेत.
यासाठी हा प्रकल्प सहा महिन्यांत उभारणे ठेकेदाराला बंधनकारक असून, १५ वर्षे हा प्रकल्प चालविल्यानंतर हा प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित करावा लागणार आहे. वाघोलीच्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यासाठी काही समस्या, अडचणी निर्माण झाल्यास या प्रकल्पाची जागा बदल करण्याचे सर्व अधिकार तसेच पर्यायी उपलब्ध जागेनुसार आवश्यक त्या क्षमतेचे प्रकल्प राबविण्याचे अधिकार पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येथे आहे ‘स्टायलिंग’चे भांडार

$
0
0

निरनिराळ्या प्रकारच्या सलून्सनी सजतोय भांडारकर रस्ता

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaMT

स्टायलिश दिसण्याकडे साहजिकच तरुणाईचा कल अधिक असतो. माणूस त्याच्या कपड्यांमुळे, स्टाइलमुळे, केसांमुळे जेवढा आकर्षक दिसतो तेवढे त्याचे समाजातील स्टेटस वाढत जाते, असे समजले जाते. तरुणाईला अशा स्टाइलकडे आकर्षित करण्यासाठी भांडारकर रस्त्यावर निरनिराळ्या प्रकारची सलून्स सुरू झाली असून, हा रस्ता शहरातील नवा 'स्टाइल हब' म्हणून उदयास आला आहे.

पुरुष आणि महिलांसाठी एकत्र असणाऱ्या या सलूनमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या स्टाइल्स करून दिल्या जातात. चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी, सुंदर दिसण्यासाठी काय करावे, याच्या टिप्सही दिल्या जातात. सलून्सच्या भाषेत सांगायचे झाले, तर पेडिक्युअर, मेडिक्युअर, फेशियल, ब्लीच, बॉडी पॉलिशिंग, बॉडी मसाज, हेअर स्पा, कलरिंग, हाइलाइटिंग, स्ट्रेटनिंग, हेअर कट, हेअर स्टायलिंग अशा सर्व सेवा या सलून्समध्ये उपलब्ध आहेत. व्यक्तीच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीराच्या सौंदर्याची आणि स्वच्छतेची काळजी या सलून्समध्ये घेतली जाते. लग्नासाठी नववधू आणि वराकरिताही या सलून्समध्ये वेगवेगळी पॅकेजेस उप्लब्ध आहेत. प्रत्येकाच्या आवश्यकतेप्रमाणे सेवा दिली जाते. वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने नामांकित कंपन्यांची असतात. त्यापासून त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्वचा खराब होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यामुळेच या ठिकाणी तरुण, तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती अनेकदा भेट देतात. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांसारख्या अनेक मान्यवर व्यक्ती येथे येतात. वर्षानुवर्षे येथे काम करणाऱ्या मंडळींच्या हातात असलेली कला या व्यक्तींना भावते आणि त्यामुळेच ते एकाच ठिकाणी हेअर कटिंगसाठी अनेक वर्षे जात आहेत. तरुण अभिनेते, अभिनेत्री, फॅशन क्षेत्रातील अनेक मॉडेल्सही भांडारकर रस्त्यावर 'स्टायलिंग'साठी येतात. एकदा कारागिराची कला आवडल्यानंतर सर्व मंडळी कायमचे ग्राहक होऊन जातात. त्यामुळे या रस्त्यावरील सलून्समध्ये गर्दी दिसत नसली, तरी त्यांचा व्यवसाय जोरात आहे.

पुरुष आणि महिलांसाठी असणाऱ्या विविध सेवांसाठी त्या त्या सलून्सचा ब्रँड आणि नावाप्रमाणे पैसे आकारले जातात. हेअर कटिंग आणि स्टायलिंग यांकरिता साधारणतः २०० ते ५०० रुपये आकारले जातात. फेशिअल करण्यासाठी ५०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. तसेच 'हेअर स्पा'साठी २०० ते १००० रुपयांपर्यंत खर्च येतो. लग्नासाठीची पॅकेजेस दोन हजारांपासून पाच ते सात हजारांपर्यंत आहेत. या सर्व सेवांसाठी वापरण्यात येणारी साधने अत्याधुनिक आणि परिणामकारक असल्याने सलूनमध्ये आलेल्या ग्राहकाला उच्च दर्जाची सेवा उपलब्ध होते. याशिवाय तुमचा चेहरा आणि एकूण शरीराची ठेवण याला अनुसरून तुमच्या केसांची स्टाइल कशी असावी, या संदर्भातही मार्गदर्शन केले जाते. 'कोणत्याही प्रकारच्या केसांना अगदी तुळतुळीत करून हवी ती स्टाइल करून दिली जाईल,' अशा वल्गना न करता ग्राहकांना आधीच सर्व शक्यतांची कल्पना दिली जाते, हे इथल्या सेवांचे वैशिष्ट्य आहे.

............

ग्राहकांना सलूनमध्ये आल्यानंतर स्वच्छता हवी असते. वापरली जाणारी उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधने ब्रँडेड असतील, तर ग्राहकाला चांगला उपयोग होतो. केस कापणे ही एक कला आहे. त्यामुळे ज्याच्या हातात ती कला चांगली असते, त्याच्याकडे ग्राहक अधिक. हा व्यवसाय कारागिरांच्या हातातील कलेवर अवलंबून आहे. सध्या तरुणाई वेगवेगळ्या स्टाइल्स करत असल्याने या क्षेत्रातही कामगारांना दररोज 'अपडेट' राहावे लागत आहे.

- अमोल मोढवे, संचालक, बटरफ्लाय मेन्स ब्यूटी सलून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य महामंडळात गटा-तटाचे राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीनंतर महामंडळातील अंतर्गत वाद समोर येऊ लागले आहेत. साहित्य संमेलन कुठे घ्यायचे यावरून पडलेले गट, संमेलनाची माहिती दडपून ठेवणे, माजी पदाधिकाऱ्यांवरील कारवाईला कात्रजचा घाट, विश्व साहित्य संमेलनाबाबत असलेली धरसोड भूमिका यावरून महामंडळात सावळागोंधळ निर्माण झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष विरुद्ध पदाधिकारी असे वातावरण तयार झाल्याने साहित्य महामंडळात सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महामंडळात गटा-तटाचे राजकारण सुरू झाल्याच्या चर्चेला साहित्य वर्तुळात उधाण आले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत आगामी साहित्य संमेलन डोंबिवली येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 'आम्ही काही जाहीर करणार नाही,' अशी विचित्र भूमिका महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घेतल्याने महामंडळातच त्यांच्याविरुद्ध असंतोष खदखदू लागला आहे. पुण्यात बैठक घेऊन साहित्य संमेलनाचा निर्णय घ्यायचा; पण तो जाहीर करायचा नाही, या अध्यक्षांच्या हटवादी भूमिकेने महामंडळाचे पदाधिकारीही आवाक झाले आहेत.

साहित्य संमेलन बेळगावला घ्यायचे की डोंबिवलीला, यावरून महामंडळात वेगवेगळे मतप्रवाह होते. महामंडळाचे अध्यक्ष बेळगावसाठी आग्रही होते. कर्नाटकमधील वातावरण ढवळून निघत असल्याने बेळगावमध्ये संमेलन घेणे शक्य नाही, तसेच डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक वातावरण असूनही त्या ठिकाणी साहित्य संमेलन झालेले नाही, यावर पदाधिकारी ठाम होते. त्यामुळे दोन गटांत खडाजंगी झाली. अखेर अध्यक्ष एकटे पडल्याने डोंबिवलीचा निर्णय घेण्यात आल्याची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. माजी पदाधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी व कारवाई व्हावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली; पण अध्यक्षांनी 'योग्य ती कृती करीन' असे म्हणून वेळ मारून नेत पदाधिकाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवल्याने महामंडळात गटा-तटाचे राजकारण सुरू झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

............

अध्यक्षांच्या भूमिकेच्या कोलांटउड्या

'साहित्य संमेलन दर वर्षी आयोजित केलेच पाहिजे असे नाही,' असे म्हणणाऱ्या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी 'साहित्य संमेलन हा मराठी भाषिकांचा उत्सव असून, तो झालाच पाहिजे' अशी भूमिका नंतर मांडली. असाच अनुभव विश्व संमेलन व सरकारच्या निधीवरून महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 'विश्व साहित्य संमेलन होणार नाही,' असे जाहीर करणाऱ्या अध्यक्षांनी यथावकाश 'निमंत्रण आलेच तर संमेलनाचा विचार करू' अशी भूमिका घेतली. तसेच एका संस्थेतर्फे भूतान येथे होत असलेल्या विश्व संमेलनाच्या आयोजकांबरोबर विश्व संमेलनाचा विचार मांडला. 'साहित्य संमेलनासाठी सरकारच्या मदतीच्या कुबड्या नको,' अशी राणा भीमदेवी गर्जना करणाऱ्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी 'सरकारने संमेलनासाठी एक कोटीचा निधी द्यावा,' अशी चमत्कारिक भूमिका मांडल्याने अध्यक्षांच्या भूमिकेच्या कोलांटउड्या साहित्यक्षेत्राने अनुभवल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’मध्ये आला जिवंतपणा

$
0
0

'ओपन डे'मुळे प्रशासन लागले कामाला

Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मधील (एफटीआयआय) सरकारी बाबू, विद्यार्थी व इतर घटकांसाठी ही संस्था म्हणजे एक बेट आहे. बेट अभेद्य राहणे, तसेच स्थानिक हस्तक्षेप वाढू न देणे, यासाठी येथील गट सतत ग्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हे चित्र आता बदलू लागले आहे. 'एफटीआयआय'ने आता अधिक सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, गडाला सुरुंग लागल्याची खदखद विद्यार्थ्यांमध्ये आहे. 'चलता है'ची सद्दी संपल्याने येथील विद्यार्थी, तसेच सरकारी बाबूंमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वर्षानुवर्षे मरगळलेल्या प्रशासनाला कामाला लावण्यात संचालकांना यश आले आहे. म्हणूनच एफटीआयआय आता जिवंत भासू लागली आहे.

'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए महाराष्ट्रात आहे, पण 'एनडीए'मध्ये महाराष्ट्र किंवा पुणे नाही,' असे पूर्वीपासून म्हटले जाते. हाच विचार 'एफटीआयआय'लाही लागू होतो. ही संस्था पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी आहे; पण संस्थेत पुणे नाही. त्याचे कारण म्हणजे एफटीआयआय संस्था पुण्याशी कायमच फटकून राहिली आहे. गेला शनिवार, रविवार त्यास अपवाद म्हणता येईल.

भूपेंद्र कँथोला यांनी संचालक म्हणून कारभार हाती घेतल्यापासून संस्थेत अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत. संचालकांची भूमिका आतापर्यंत तरी संवादी राहिल्याने प्रशासन, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, तसेच विद्यार्थी यांच्याकडून योग्य त्या पद्धतीने काम करून घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. आमदार विजय काळे व कँथोला यांच्या पुढाकारातून संस्थेत दोन दिवस 'ओपन डे' साजरा झाला. या उपक्रमाला चित्रपटप्रेमी व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एफटीआयआय ही संस्था आहे तरी काय, तिचे काम कसे चालते, हे नागरिकांना अनुभवता आले. पुणेकरांसाठी एफटीआयआय ही संस्था म्हणजे लॉ कॉलेज रस्त्यावरील एक महत्त्वाची खूण, ही आतापर्यंतची ओळख होती; पण या उपक्रमातून पुणेकरांना संस्थेत पाय ठेवता आला. दोन दिवसांत साधारण दहा हजार नागरिकांनी संस्थेला भेट दिल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. या दोन्ही दिवशी एफटीआयआय प्रशासन चांगलेच कामाला लागल्याचे दिसून आले. अधिकारी, कर्मचारीवर्ग मुसळधार पावसात नागरिकांना संस्थेची माहिती देताना दिसत होता. अर्थात सुरक्षारक्षकांची अरेरावीही नागरिकांनी अनुभवली. संस्थेतील कोणत्याही गटापेक्षा स्वत:ला ताकदवान समजणाऱ्या, तसेच आपण म्हणजेच संस्था असे समजणाऱ्या सुरक्षारक्षकांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. आपण संस्थेच्या, तसेच संस्थेतील लोकांच्या सुरक्षेसाठी आहोत; पण म्हणून येईल त्याच्या अंगावर धावून जाण्याचा आपल्याला अधिकार नाही, हे त्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे झाले आहे.

'ओपन डे' या उपक्रमाच्या आधी 'आझादी ७० साल, याद करो कुर्बानी,' या केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत ७०वा स्वातंत्र्यदिन अत्यंत कलात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला होता. कँथोला यांनीच यासाठी पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे या उपक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांकडून 'जालियनवाला बागे'चा सेट तयार करून घेतला होता. तो लॉ कॉलेज रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे आकर्षण ठरला. कँथोला संचालक म्हणून आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम काय केले असेल, तर विद्यार्थ्यांपासून प्रत्येक घटकाच्या बैठका घेतल्या. यामुळे संस्थेतील तणावाचे वातावरण दूर होण्यास सुरुवात झाली. कँथोला यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे आपली 'मन की बात' करून त्यांनी संस्थेतील सर्व घटकांना कामाला लावले आहे. याचा सकारात्मक परिणाम झाला असून, एफटीआयआय ही आपलीच गादी असल्याचे समजणाऱ्या काही गटांना धक्का बसला आहे. काम नाही केले तरी कोण विचारतो, अशा विचारांच्या सरकारी बाबूंना, तसेच विद्यार्थ्यांना हे आवडलेले नाही. बहुसंख्य लोकांनी संस्थेत यावे व ही संस्था स्थानिक व्हावी, ही बाब या घटकांच्या पचनी पडलेली नाही.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान व इतर सदस्यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यास आता वर्ष लोटले आहे. यादरम्यान संस्थेत सेमिस्टर व श्रेयांक पद्धत लागू झाली आहे. चौहान व इतर व्यक्तींच्या निवडीने संस्थेत हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जाईल, अशी भीती विद्यार्थी व्यक्त करत होते. ती किती खरी ठरली, हा मुद्दा असताना संस्थेतील गेल्या वर्षीचे वातावरण आणि सध्याचे वातावरण यामध्ये नक्कीच फरक पडला आहे. तो सकारात्मक आहे. संस्थेतील कारभार लोकशाही पद्धतीने करत असतानाच कोणताही धार्मिक, राजकीय अजेंडा राबवू न देणे हे संस्थेच्याच हिताचे आहे. असे झाल्यास विद्यार्थ्यांना आगामी काळात आंदोलनाची गरजच भासणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनोदोत्तम करंडक स्पर्धा शनिवारपासून सुरू होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वन किड फाउंडेशन'च्या वतीने २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भरत नाट्यमंदिरात होणार असून, एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता याच ठिकाणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या वेळी ज्येष्ठ नाट्यलेखक डॉ. सतीश आळेकर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील सर्वोत्तम एकांकिकांचे दोन ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता आणि रविवारी नऊ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादरीकरण केले जाणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी आणि स्पर्धेचे संस्थापक हेमंत नगरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष मनोहर कोलते, संयोजन समितीचे प्रमुख अमित काळे, अमर परदेशी, राजीव पुणेकर आणि शैलेंद्र भालेराव उपस्थित होते.

यंदा स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. स्पर्धेच्या निमित्ताने रंगकर्मींना विनोदनिर्मितीसाठी एक मनमोकळे, दिलखुलास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अशा विविध ठिकाणच्या कॉलेजांतील विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतात.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघाला दादा कोंडके मेमोरियल पुरस्कृत दहा हजार रुपये रोख, करंडक आणि स्मृतिचिन्ह असे बक्षीस देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक अमर परदेशी राजपूत पुरस्कृत असून, सात हजार रुपये रोख, करंडक आणि स्मृतीचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप आहे. सुहास देशपांडे यांच्या मातोश्री कुसुम देशपांडे यांच्या स्मरणार्थ तिसरे बक्षीस देण्यात येते. पाच हजार रुपये रोख, करंडक आणि स्मृतिचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप आहे अभिनय, नेपथ्य, लेखन, प्रकाश योजना आदी विभागांतर्गत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी दोन वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिके दिली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समूहकलेच्या आविष्काराने घातली रसिकांवर मोहिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतातील प्राचीन संगीत, शास्त्रीय-उपशास्त्रीय आणि लोकसंगीतातील विविध रचना गायक-गायिकांच्या समूहस्वरांतून रसिकांना अनुभवता आल्या. समूहकलेचा अनोखा आविष्कार रसिकांना थक्क करून गेला.

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. मधुप मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली ३०हून अधिक कलाकारांचा एकत्रित आविष्कार असलेला 'गांधर्व कॉयर' हा वृंदगानाचा कार्यक्रम रसिकांनी अनुभवला. गांधर्व महाविद्यालय आणि इंडो-सॉटले यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, पं. सुहास व्यास, पं. मोहनकुमार दरेकर, आनंद भाटे, संजीव अभ्यंकर, प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर, मंजूषा पाटील यांच्यासह अनेक रसिकांनी मैफलीचा आनंद लुटला.

ऋग्वेदातील स्वस्तिवचन गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मेघ रागातील धृपद रचना, होळीचे रसभरीत वर्णन असलेली धमारमधील रचना, काफी रागातील रागमालिका, माळवा प्रांतातील लोकसंगीतावर आधारित रचना सादर झाल्या. १३ गायिका आणि ११ गायक कलाकारांसह पाच वादकांनी या कार्यक्रमामध्ये रंग भरला. पु. ल. देशपांडे यांची स्वररचना असलेली गोविंदाग्रज यांची 'जयजयकार करा' ही रचना मराठी भाषाही बोलता न येणाऱ्या गायक कलाकारांनी सादर करून रसिकांची मने जिंकली.

रवींद्र संगीतातील रचना आणि बागेश्री रागातील चतुरंगची रचना समूहस्वरांत उत्कटरीत्या उमटली. 'चांदण्यात चांदणं' या मराठी लोकगीतासह भोजपुरी, आसामी भाषेतील लोकगीत, फारसी आणि अवधी अशा मिश्र भाषेतील कव्वाली सादर झाली. फिलिपाइन्स देशातील फिलीपिनी भाषेतील रचनाही सादर झाली. त्याला मधुप मुद्गल यांनी गिटारवादनाची साथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​कॅम्प परिसरात मनोरुग्णाचा गोंधळ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
कॅम्प परिसरात एका मनोरुग्ण असलेल्या नागरिकाने नर्सिंग होममध्ये घुसून आरडा-ओरड करत तुफान गोंधळ घातला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने दगड फेकून मारले. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उषा नर्सिंग होम येथे प्रकार घडला. गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील पुलगेट येथे उषा नर्सिंग होम आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री आठच्या सुमारास एक मनोरुग्ण व्यक्ती घुसला. त्याने नर्सिंग होममध्ये मोठ-मोठ्याने आरडा ओरडा करत गोंधळ घातला. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहून त्याने दगडफेक सुरू केली. तो पोलिसांनाही आवरत नसल्याने मार्शलला बोलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याने रोडवरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर दगड फेकून मारले. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली. लष्कर पोलिस ठाण्यातून अतिरिक्त कर्मचारी बोलवण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या डोळ्यांतून पाणी काढा

$
0
0

भाजपच्या डोळ्यांतून पाणी काढा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कधी कांदा महागल्याने ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी येते, तर कधी त्याचा भाव उतरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. तरीही केंद्र-राज्यातील भाजपचे सरकार यावर काही करत नाही. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत भाजपच्या डोळ्यांतून पाणी काढा,' अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भाजपवर हल्ला चढविला.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजप सरकारचे अपयश आणि पक्षाने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा आणि बहुमताने सत्ता प्राप्त करा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा मेळाव्यात पवार बोलत होते. आगामी निवडणुकीत आपण सगळ्यांनी मिळून बेरजेचे राजकारण केले पाहिजे; वजाबाकीचे नाही, अशी तंबीही त्यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, आमदार जयदेव गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, प्रवक्ते अंकुश काकडे आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पवार आणि तटकरे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठविला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठका घेण्यात पुढाकार घेतला. तरीही शहराचे प्रश्न सुटलेले नाहीत. यासाठी सरकारची धरसोड वृत्तीच कारणीभूत आहे. पुण्याचा कायापालट करण्याची भाषा बोलणाऱ्यांनी पुण्यासाठी काय केले, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीकडे पूर्ण बहुमत नसूनही गेल्या दहा वर्षांमध्ये पुण्याच्या विकासाचा ओघ कमी झाला नाही. अनेक पायाभूत सुविधांची निर्मिती केली; पण भाजपसारखे त्याचे मार्केटिंग करता आले नाही. त्यामुळे, शहरातील सुविद्य आणि प्रगल्भ नागरिकांपर्यंत पक्षाने केलेल्या सर्व कामांची माहिती पोहोचवून आगामी निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार करा आणि जिद्दीने कामाला लागा, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केली.
................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा-दलित समाजात संघर्ष पेटविण्याचे काम’

$
0
0

'मराठा-दलित समाजात संघर्ष पेटविण्याचे काम'

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'गेल्या दोन वर्षांत राज्य सरकार कोणत्याही घटकाला न्याय देऊ शकलेले नाही. त्यामुळेच मराठ्यांचे मोर्चे निघत असून, त्यालाही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा रंग दिला जात आहे. हे प्रस्थापित आणि विस्थापित कोण, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल,' असे ठणकावत, माजी उपमुख्यमंत्री अ‌जित पवार यांनी 'मराठा आणि दलित समाजात संघर्ष पेटविण्याचे काम सरकार करत असून, मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,' असा इशाराही दिला.
'संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत. हे लाखोंचे मोर्चे म्हणजे प्रस्थापितांविरोधात विस्थापितांचे आंदोलन असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका करताना, पवार यांनी राज्य सरकारच्या कारभाराचेही वाभाडे काढले. आजवर स्वतंत्र भारतात एखाद्या समाजाचे एवढे मोठे मोर्चे कधीच निघाले नाहीत. कुठेतरी अस्वस्थता आहे म्हणूनच मोर्चे निघत आहेत. शिक्षण, नोकरी याबाबत समाजासमोर असलेल्या अडचणी, त्यांच्यावर होणारा अन्याय या मोर्चांमधून व्यक्त होत आहे,' असे पवार यांनी नमूद केले.
मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मात्र त्यावरून टोलवाटोलवी सुरू असून, राज्य सरकारकडून कोर्टात सक्षम वकील नेमले जात नाहीत. सरकारकडून केवळ खेळवायचे काम सुरू असून, आता मराठा आणि धनगर समाजाला आपली चूक लक्षात आली आहे, असे निरीक्षण पवार यांनी नोंदविले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या करणऱ्या संस्था कोणत्या पक्षाशी संबधित आहेत, याची माहिती दिली गेली पाहिजे. मात्र त्याबाबत हे सरकार मूक गिळून गप्प बसले आहे, अशी टीका त्यांनी केली; तसेच दोन वर्षांत या सरकारने चिक्कीपासून ते महापुरुषांच्या फोटाेंपर्यंत प्रत्येक गोष्टीत घोटाळे करून ठेवले असून, भ्रष्टाचाराने पूर्ण माखले आहे, असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकारिणीचा लवकरच विस्तार

$
0
0

कार्यकारिणीचा लवकरच विस्तार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शहराच्या कार्यकारिणीवरील नियुक्तीवरून काही गैरसमज, मतभेद असले, तरी सर्व घटकांना सामावून घेत लवकरच कार्यकारिणीचा विस्तार केला जाईल', अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिली. आगामी महापालिका निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी युती करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी तटकरे यांनी रविवारपासून राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत पुण्यात शहर आणि ग्रामीणचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी पुण्यातील कार्यकारिणीवरून पक्षातच नाराजी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर, ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यकारिणीत सर्वांना सामावून घेण्यात येणार असून, त्याचा विस्तार करण्याचे संकेत त्यांनी दिले.
स्थानिक स्तरावरील पक्षांशी आघाडी करताना, घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले; तसेच नगरपालिका-महापालिका येथील राजकीय स्थिती लक्षात घेऊन, आघाडी करायची अथवा नाही, याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. विधान परिषदेसाठी आगामी काळात होणाऱ्या ११ जागा एकत्र लढविण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून, पुढील आठवड्यात आणखी एक बैठक होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
'अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र आणि राज्यातील भाजपच्या सरकारने नागरिकांचा पूर्ण भ्रमनिरास केला असल्याची टीका त्यांनी केली. राज्य सरकारच्या निर्णयांमध्ये कोणत्याही स्वरूपाचे सातत्य नसून, चुकीचे निर्णय मागे घ्यावे लागण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्न सुटेल म्हणूनच मोर्चे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यात यापूर्वी सत्तेत असलेल्यांकडून प्रश्न सुटले नाहीत; पण लोकशाही मार्गाने आलेल्या फडणवीस सरकारकडून प्रलंबित प्रश्न सुटेल, असे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सामान्य माणसाला वाटत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत,' अशी टिप्पणी जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी केली. जलयुक्त शिवार योजनेच्या पुणे विभागीय आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाच्या मोर्चांविषयी मतप्रदर्शन केले.

ते म्हणाले, 'यापूर्वी सत्तेत असलेल्या लोकांकडून प्रश्न सुटणार नव्हते. मात्र, या सरकारकडून प्रश्न सुटू शकतात, असे सर्वसामान्य माणसाला वाटत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या या सरकारकडून प्रश्न सुटले पाहिजेत, असे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या माणसांना वाटत असल्याने मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत.'

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरुण आणि अभ्यासू नेतृत्व आहे. सरकारने अनेक प्रश्नांमध्ये विशेष लक्ष घातले. राज्य पुढे जाण्यासाठी फडणवीस सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न फडणवीस सरकारच सोडवू शकते. त्यामुळे माेर्चे​ निघत असावेत, असे वैयक्तिक मत आहे,' असेही ते म्हणाले.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नी चर्चेला तयार असल्याचे म्हटले आहे. लोकशाहीत चर्चा केलीच पाहिजे,' असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने केलेल्या कामांविषयी ते म्हणाले, 'छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याबाबत मागील सरकारने घोषणा केली. त्याचे राजकीय भांडवल केले; पण ठोस कार्यवाही केली नाही. फडणवीस सरकार आल्यानंतर हा प्रश्न सुटला. इंदू ‌मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी जागेचा प्रश्न सोडवण्यात आला. पुणे शहरातील मेट्रो प्रश्न, मुंबईचा डीपी प्लॅन बदलणे आदी क्रांतीकारण निर्णय घेतले.'

कोपर्डी प्रकरणाविषयी ते म्हणाले, 'या प्रकरणातील आरोपी अटक करण्यात आले आहेत. आरोपींना जात, पात, धर्म नसतो. अत्याचारग्रस्त कुटुंब आणि गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करण्यात आली, ती मान्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खेड शिवापूर टोल नाक्यावर ‘ई-वसुली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची 'फास्टॅग' ही ई-टोल प्रणाली खेड शिवापूर टोल नाक्यावर बसविली जाणार असून, येत्या एक ऑक्टोबरपासून ती कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे या टोल नाक्यावर टोल भरताना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येतून वाहन चालकांची आता सुटका होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर 'फास्टॅग' ही ई-टोल प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये राज्यातील ३५, तर पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील कुसगाव, तळेगाव, सर्डेवाडी (इंदापूर), पाटस आणि खेड-शिवापूर या टोल नाक्यांचा समावेश आहे. आता खेड-शिवापूर टोल नाक्यावर ही प्रणाली बसविण्यात आली असून, ती एक ऑक्टोबरपासून कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी या टोल नाक्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना याबाबतची माहिती दिली जात आहे. वाहन चालकांनी 'फास्टॅग' प्रणालीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही केले जात आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सुरुवातीला पाचशे रुपये जमा करावे लागणार आहे. त्यामध्ये दोनशे रुपये टॅगचे शुल्क, दोनशे रुपये अनामत रक्कम व शंभर रुपये किमान रिचार्ज याचा समावेश आहे. त्यासोबत वाहनाची कागदपत्रे, वाहन मालकाचे ओळखपत्र व फोटो टोल कंत्राटदाराकडे सादर करावी लागणार आहे. या योजनेसाठी 'आयसीआयसीआय' बँकेशी करार करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यातील पाटस, कर्डेवाडी व सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाक्यावर यापूर्वी ई-टोल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आता खेड-शिवापूरला ती कार्यान्वित होत आहे. लोकांकडून यास प्रतिसादही मिळत आहे. मात्र, प्रतिसाद वाढण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रांगा कमी होणार

खेड-शिवापूर टोल नाक्यावर सुट्यांच्या काळात वाहनांच्या लागणाऱ्या रांगा नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरत होत्या. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावरून कमाल तीन मिनिटात वाहन टोलचे शुल्क भरून पुढे गेले पाहिजे, अशी यंत्रणा राबविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतर वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. अगदी जिल्हाधिकाऱ्यांनीही तेथे जाऊन पाहणी केली होती. आता ई-टोल आकारणीमुळे गर्दीच्या वेळेला वाहनांच्या रांगा लागण्याचे प्रमाण निश्चित घटेल.

'फास्टॅग' प्रणालीची वैशिष्ट्ये

- 'फास्टॅग' लावलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन
- विना थांबा वाहतूक
- ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा
- १० टक्क्यांपर्यंत कॅश बॅकची सुविधा
- एसएमएसद्वारे प्रत्येक व्यवहाराचा अॅलर्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील गुंड संदीप मोहोळच्या घरी चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात गुंड संदीप मोहोळ याच्या घरातील अकरा तोळे सोने व रोख रक्कम असा अडीच लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर बारा तासांच्या आत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून नऊ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

ऋषिकेश जीवराज कामटे (वय २६, रा. लोकमान्य नगर, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी संदीप मोहोळ याचे वडील शंकर मोहोळ (वय ६०, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा २००६ मध्ये टोळी युद्धातून गजा मारणे टोळीने खून केला होता. त्यानंतर संदीप याचे वडील व आई हे गुजरात कॉलनी येथे राहतात. घटनेच्या दिवशी शंकर मोहोळ यांची पत्नी गावी गेली होती. शंकर हे रात्री मार्केटयार्ड येथे कामाला जातात. कामावर जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. त्या वेळी आरोपी कामटे याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील अकरा तोळे सोने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ५२ हजार रुपयांचा माल चोरून नेला. कामटेने चोरी करताना शेजारच्या घरांना बाहेरून कडी लावली होती. सकाळी सात वाजता त्यांनी दार उघडण्याच्या प्रयत्न केला, त्या वेळी बाहेरून कडी असल्याचे समजले. त्यांनी तत्काळ सुरक्षारक्षकाला बोलावले. त्या वेळी मोहोळ यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. शंकर मोहोळ यांनी पाहणी केली व कोथरूड पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील व उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास केला असता, ही चोरी कामटे याने केल्याचे समजले. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी साडेनऊ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. कामटे हा व्यसनी असल्याचे समोर आले आहे.

मोहोळ हा सराईत गुंड होता. त्याच्यावर कोथरूड, डेक्कन, विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. टोळी युद्धातून त्याचा खून करण्यात आला होता. त्याच्या घरात चोरी झाल्यामुळे या घटनेची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी-ट्रकचा भीषण अपघात; ४ ठार, १५ जखमी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहे. हा अपघात आज दुपारी दीडच्या सुमारास तळेगाव चाकण रोडवरील माळवाडीजवळ घडला.

एसटी महामंडळाची शिरुर-कुर्ला (एमएच १४ बीटी ३४९२) ही बस कुर्ल्याकडे जात असताना समोरुन येणा-या ट्रकने बसला जोरदार धडक मारली. ट्रकच्या जोरदार धडकेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर पायोनियर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहित पोलिसांनी दिली. तर या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.

दुपारी दीडच्या सुमारास ट्रक भरधाव वेगाने बसच्या दिशेने येत असल्याचे दिसताच बस चालक आणि वाहक या दोघांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या. परंतु बस चालकाच्या मागे बसलेल्या काही प्रवाशांना समजण्याच्या आत हा अपघात झाला, अशी माहिती एका जखमी प्रवाशाने दिली. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी देहूरोड, तळेगाव आणि एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यासाठी पोलीस उपअधीक्षक हे दखील या ठिकाणी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत्युमुखींची नावे

भिकू गुलाबराव जाधव (६५), शैला विलास भागीत (२८), मुश्रफ जमादार (५५) अशी मृतांची नावे असून एकाची अद्याप ओळख पटलेली नाही.

जखमींवर या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

पवना हॉस्पिटलमध्ये एक, बडे हॉस्पिटलमध्ये ४ पुरूष, ४ महिला, पायोनियनर हॉस्पिटलमध्ये १ महिला २ पुरूष, अर्थव हॉस्पिटलमध्ये ५ पुरूष ८ महिला, जनरल हॉस्पिटलमध्ये ६ पुरूष २ महिलांवर उपचार करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीच्या माध्यमातून बेशिस्त चालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील चौकांमध्ये वाहतूक पोलिस उपलब्ध नसल्याचे पाहून अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते. मात्र, असे वर्तन करणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र टिपून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आंतरदेशीय पत्राद्वारे त्यांना घरपोच दंडाची पावती आणि संबंधित फोटो पाठविला जाणार आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील मुख्य चौकांत व उपनगरात महत्त्वाच्या ठिकाणी एकूण १२३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिस कंट्रोल रूममध्ये या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर वॉच ठेवला जातो. त्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक मोठ्या संख्येने आढळून येतात. त्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला. वास्तविक यापूर्वी देखील वाहतूक पोलिसांनी पोस्टाद्वारे घरपोच नोटीस पाठवून कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यामध्ये मध्यंतरी काही कारणास्तव खंड पडला होता. आता पुन्हा ती प्रक्रिया कार्यान्वित केली असून मंगळवारपासून या माध्यमातून कारवाई सुरू झाली आहे.
या कारवाईसाठी पोलिस कंट्रोल रूममध्ये वाहतूक शाखेचे सहा पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ते कर्मचारी सीसीटीव्हीमध्ये बेशिस्त वाहनचालकांचा शोध घेतील. तसेच, सीसीटीव्हीद्वारे नियमाचे उल्लंघन करतानाचे फोटो घेतील. गाडीच्या क्रमांकावरून त्या वाहनचालकाचे नाव, पत्ता शोधला जाईल. त्यांच्या पत्त्यावर आंतरदेशीय कार्ड, दंडाची पावती व नियमाचे उल्लंघन करतानाचा फोटो पाठविला जाणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस शाखेचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

दंड भरणे अनिवार्य
आंतरदेशीय पत्र मिळाल्यापासून सात दिवसांत पत्रामध्ये नमूद केलेल्या वाहतूक विभागात संबंधितांनी दंडाची रक्कम भरणे अनिवार्य आहे. त्यांनी विहित मुदतीत रक्कम न भरल्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (मोटार वाहन) कोर्टात खटला पाठविला जाणार आहे, अशी माहिती डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आपण मनसेत असल्याचा’ राजेंद्र बराटे यांचा दावा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पक्षांतर्गत कायद्यानुसार सहा वर्षे अपात्र ठरविण्याच्या तरतुदीचा वापर करून कारवाई होण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नगरसेवक राजेंद्र बराटे यांनी आपण मनसेमध्येच असल्याचे पत्र पक्षाच्या गटनेत्यांना दिले आहे. गेल्या आठवड्यात बराटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर यांच्या पुढाकारातून महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाबरोबरच मनसेचे विद्यमान नगरसेवक बराटे आणि माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश धाडवे यांनी आपण राष्ट्रवादीतच असल्याचे पत्र महापौर प्रशांत जगताप यांना दिले होते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मनसेचे आजी आणि माजी नगरसेवकांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांवर पक्षांतर्गत कायद्याचा आधार घेत सहा वर्षे अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. याचा वापर केल्यानंतर सहा वर्षे अपात्र ठरू शकतो, ही वस्तुस्थिती लक्षात आल्याने मनसेचे नगरसेवक बराटे यांनी पक्षाचे गटनेते किशोर शिंदे यांना मंगळवारी पत्र देऊन आपण मनसेमध्येच असल्याचे कळविले आहे. आपण मनसेमध्येच असून, एका वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे. कोणताही पक्षबदल केलेला नाही, याची नोंद घ्यावी, असे बराटे यांनी शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कारवाई होऊ नये, यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांकडून ही भूमिका घेत असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.



मनसेचे नगरसेवक राजेंद्र बराटे यांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी पक्षात असल्याचे पत्र मंगळवारी दिले असले तरी आमच्या दृष्टीने ते मनसेमध्ये नाहीत. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी हे पत्र दिले असावे.
- किशोर शिंदे, गटनेता, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images