Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘NOC’चे अधिकार काढले

$
0
0
महापालिका प्रशासनाची सर्व सत्ता हाती राहण्यासाठी बांधकाम विभागाने उद्यान विभागाबरोबर अतिक्रमण विभागाचेही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देण्याचे अधिकार काढून घेतले आहेत. बेकायदा वृक्षतोड करणा-यांचे बांधकाम थांबवण्याबाबत उद्यान विभागाने शिफारस केली असतानाही बांधकाम विभागाने अनेकांना भोगवटापत्र दिल्याचे उघड झाले आहे.

फरार आरोपी ‘चतुर्भुज’

$
0
0
‘मोका’अंतर्गत कारवाई केलेल्या फरार आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी शुक्रवारी पाठलाग करून ताब्यात घेतले. अप्पर इंदिरानगर येथे शुक्रवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

परीक्षा पद्धतीचाही आता पुणे पॅटर्न !

$
0
0
राज्यभरातील विद्यापीठांच्या परीक्षांमधील अडचणी टाळण्यासाठी आता पुणे विद्यापीठाच्या ‘एक्झाम ऑटोमेशन सिस्टीम’चा आधार घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. कारण, पुणे विद्यापीठाची ही ‘एक्झाम ऑटोमेशन सिस्टीम’ राज्यातील इतर विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतींच्या तुलनेमध्ये उजवी ठरली आहे.

चोरीचे मोबाइल विकणा-याला अटक

$
0
0
चोरीचे मोबाइल हँडसेट विक्रीला आणलेल्या चोरट्याला मार्केट यार्ड पोलिसांनी शुक्रवारी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ३८ हँडसेट पोलिसांनी जप्त केले. पर्वती दर्शन येथे ही कारवाई करण्यात आली.

मतदार नोंदणी आता ऑनलाइन

$
0
0
मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. एक जानेवारी २०१३ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या नागरिकांना २० नोव्हेंबरपर्यंत www.eci.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म ६ सोबत फोटो, जन्मतारखेचा पुरावा, रहिवास पुरावा, फोटो ओळखपत्राच्या अॅटेस्टेड प्रती जोडणे आवश्यक आहे.

डेंगीची २४ जणांना लागण

$
0
0
शहरात डेंगीची नव्याने २४ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर महिन्यांत तीन दिवसांत ६२ जणांना लागण झाली असली तरी वर्षभरात ५३१ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, मलेरियाच्या आजाराने एकावर उपचार सुरू आहेत.

टोपीवाला भटकळ नाही

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटापूर्वी बेकरीत बॅग ठेवणारा टोपीवाला हा यासीन भटकळ असल्याचे कोर्टात सांगणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एसटीएस) याबाबतचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे तो टोपीवाला हा भटकळ नसल्याचा दावा या प्रकरणातील आरोपी हिमायत बेगचे वकील ए. रहेमान यांनी शनिवारी कोर्टात केला. येत्या ३ डिसेंबर तपास अधिकारी विनोद सातव यांची साक्ष होईल.

‘समाजाच्या बरोबरीने जाण्यातच खरा अर्थ’

$
0
0
लोकमान्य टिळकांचे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक उद्या, मंगळवारी (सहा नोव्हेंबर) ६१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या व्यवस्थापनापासून कुलगुरूपदापर्यंत त्यांनी विविध जबाबदा-या सांभाळल्या. षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त त्यांचा गौरव समारंभही होणार आहे. त्यानिमित्त, त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्राध्यापकांचा आज मोर्चा

$
0
0
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एमफुक्टो) मागण्यांसाठी आज, सोमवारी (५ नोव्हेंबर) उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या मागण्यांची राज्य शासनाने पूर्तता न केल्यास संघटनेकडून आंदोलन करण्याचा इशारा शनिवारी संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला.

कोर्टात जायचंय, पण फी कशी भरणार?

$
0
0
नेट-सेट पात्रताधारक उमेदवारांवर शिक्षण संस्थाचालकांकडून होणारा अन्याय आणि त्यामुळे त्यांना येणा-या नानाविध अडचणी सोडविण्यासाठी या पात्रताधारक उमेदवारांना आता कोर्टाचे दार ठोठावण्याची वेळ आली आहे.

फरारी आरोपी ताब्यात

$
0
0
‘मोका’अंतर्गंत कारवाई केलेल्या फरारी आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. अप्पर इंदिरानगर येथे शुक्रवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

गावांच्या समावेशाला मनसेचा विरोध

$
0
0
शहराच्या हद्दीत २८ गावांचा समावेश करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. जुन्या हद्दीतील विकास आराखड्यातील आरक्षणे उठविण्यासही विरोध करण्याचा आदेशही त्यांनी मनसेच्या पदाधिका-यांना दिला आहे.

चोरीचा तपास अद्याप नाही

$
0
0
रास्तापेठेतील सराफ पेढी फोडलेल्या घटनेचे धागेदोरे पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाहीत. पेढीतील कर्मचा-यांकडे पोलिसांनी घटनेबाबत चौकशी केली; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रिलायन्सकडून फसवणूक झाल्याचा दावा

$
0
0
‘रिलायन्स गॅस ट्रान्स्पोर्टेशन अँड इन्फ्रास्टक्चर’ कंपनीने शिरूर तालुक्यातील शेतक-यांची आर्थिक फसवणूक केली असून, मुकेश अंबानी यांच्या दबावाखाली सरकारी अधिकारी काम करीत आहेत, असा आरोप युवक क्रांती दलाचे राज्य संघटक विकास लंवाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

‘ESI हॉस्पिटलमध्ये तातडीची सेवा नाही’

$
0
0
बिबवेवाडी येथील ईएसआय हॉस्पिटलचा वापर काही ठराविक व्यक्तींना ठराविक कारणांसाठीच होत असतो. येथे आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग किंवा कॅज्युलिटी विभाग नाही. केवळ बाह्यरुग्ण विभाग असून, प्रयोगशाळा तपासण्या व एक्स रे सुविधा पुरविल्या जातात; परंतु तातडीची सेवा मिळत नाही.

वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

$
0
0
मेंदूतील रक्तस्रावामुळे शारीरिक हालचाली थांबल्याने वृद्ध महिलेवर उपचारासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपये खर्च येत आहे. आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने त्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

भाज्या कडाडल्या

$
0
0
दिवाळी तोंडावर आली असतानाच भाज्यांचे भाव कडाडू लागले आहेत. गेल्या आठवड्यातील पावसामुळे भाज्यांची आवक घटली असून, परिणामी कोबी, फ्लॉवर, घेवडा, शेवगा, भेंडी, काकडी यांचे भाव वधारले आहेत. मुबलक आवक होऊनही कोथिं‌बिरीसह सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. आठवडाभरातच भाज्या महाग झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांचे बजेट कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दूरस्थ शिक्षण पद्धतीत सुधारणेचे प्रयत्न

$
0
0
दूरस्थ शिक्षण पद्धतीची परिस्थिती सुधारणे आणि त्याविषयी समाजामधील उदासिनता दूर करण्यासाठी दूरस्थ शिक्षण परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्येही विशेष तरतूदी आणि सूचना देण्यात आल्याची माहिती परिषदेचे संचालक डॉ. भारत भूषण यांनी नुकतीच दिली.

त्यांची दिवाळीही यंदा होणार तारांकित

$
0
0
दिवाळीच्या मुहूर्तावर शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत ७४ झोपडवासीयांना शनिवारी हक्काचे घर मिळाले. या योजनेनुसार केदार असोसिएटसने सदाशिव पेठ येथे उभारलेल्या ‘तारांकित’ या सोसायटीतील सदनिकांचा ताबा सदनिकांचा हस्तांतरण कार्यक्रमात झोपडवासीयांना देण्यात आला.

दिवाळीच्या फराळाची द्या मोबाइलवर ऑर्डर!

$
0
0
पूना गेस्ट हाऊसच्या ‘सरपोतदार केटरर्स’तर्फे रास्त दरात मोतीचूर लाडू, फराळ आणि शुगर फ्री फराळाचे विविध पदार्थ शहराच्या विविध भागात उपलब्ध केले आहेत. एवढेच नव्हे; तर पुणेकरांच्या सोयीसाठी मोबाइल फोनवर ऑर्डर आणि फिरत्या विक्री केंद्राद्वारेही फराळाची विक्री होणार आहे, अशी माहिती सरपोतदार केटरर्सचे किशोर सरपोतदार आणि उपक्रमाच्या समन्वयक उल्का मोकासदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images