Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ऊर्जा आणि सकारात्मकतेचा अपूर्व संगम

$
0
0

- आरती अंकलीकर - टिकेकर
गणपती ही विद्येची देवता. शास्त्रीय संगीताचा संपूर्ण पायाच विद्याग्रहणावर आधारलेला आहे. विद्या कशी कमावतात, यावर साधना अवलंबून असते. आवाज चांगला असला, तरी जन्माने कोणाला गाता येत नाही. त्यासाठी गुरूकडे जाऊन विद्या ग्रहण करावीच लागते. गुरूकडे जाऊन एक तप रियाज केला तर विद्याग्रहणाचे कलेत रूपांतर होते. विद्याग्रहण म्हणजे गणपतीचीच आराधना. या प्रवासाची सुरुवात करून देणारा, पाऊल टाकण्याचे सामर्थ्य देणारा, उत्तेजन देणारा देव म्हणजे कला व विद्येचा अधिपती गणपती. ऊर्जा आणि सकारात्मकतेचा तो अपूर्व संगम आहे.
ज्याने कोणी गणपतीच्या मूर्तीची कल्पना केली असेल, त्याला दंडवत घातले पाहिजे. गणपतीचे रूप अत्यंत गोजिरे, सुंदर व निरागस आहे. गणपतीच्या मूर्तीकडे पाहिल्यावर विविध भाव जाणवतात. खूप आपलेपणा निर्माण होतो. सगुण साकार रूपातील हे माझे आवडते दैवत आहे. गणपती प्रत्येकाला आपला आणि हवाहवासा वाटतो. एखादी व्यक्ती लांबच्या नात्यातील असते; पण तरीही आपल्या जवळची असते, असेच काही गणपतीच्या बाबतीत आहे. त्यामुळेच तो अधिक भावतो.
कलेची आराधना ही गणपतीची आराधना करण्यासारखे आहे. कला डोळसपणे मिळवावी लागते, म्हणून विद्याग्रहण महत्त्वाचे आहे. पाया नसेल तर इमारत उभीच राहू शकणार नाही. विद्याग्रहणावर अवलंबून असलेल्या कलेची सुरुवात होतेच ती मुळी गणरायापासून. कलेची साधना करणे म्हणजे सरस्वतीची आराधना करणे. गणपती ते सरस्वती या देवतांमधील हा प्रवास आहे. गणपती विविध रूपांत भेटत राहतो. त्याचे प्रत्येक रूप प्रत्येक वेळेला अधिक लोभस वाटते. कलेची देवता म्हणून गणपतीची, सरस्वतीची पूजा आणि त्यानंतर साधनेतून स्वराची पूजा बांधली जाते. स्वर हा निर्गुण, निराकार असतो. स्वराची पूजा बांधली जाते, तेव्हा आपण वेगळ्या मनोवस्थेमध्ये पोहोचतो. आधी शब्द असतात, पुढे शब्द गळून पडतात व स्वर आणि भाव उरतो. संगीताचा सगुण ते निर्गुण असा हा प्रवास असतो. गायक शब्दांच्या पलीकडे गाण मिळवण्याच्या प्रयत्न करतो. या प्रवासात आपण स्वतःही बाजूला राहतो. या प्रवासाची सुरुवात करून देणारा, पाऊल टाकण्याचे सामर्थ्य देणारा, उत्तेजन देणारा देव गणपती असतो. बलदंड शरीरयष्टी म्हटले की हनुमानाचा भाव जागृत होतो. सरस्वतीच्या आराधनेमुळे एखादे वाद्यात रस घ्यावा व ते मनसोक्त वाजवत राहावे असे वाटते.
गणपती डोळ्यासमोर आला, की त्याचे मोदक खावेसे वाटतात. अर्धा पेला रिकामा या पेक्षा अर्धा पेला भरलेला, असे दर्शविणारा हा देव काही निराळाच. आपले कोडकौतुक करून घ्यायला गणपतीला आवडतं. खाऊन-पिऊन सुखी, आनंदी असा हा बाप्पा आहे. गणपती हा प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता देणारा देव आहे.
लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्यामागचा हेतू अतिशय उदात्त होता. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला काय रूप आले आहे, हा वेगळा विषय होऊ शकतो; पण सण एकत्रपणे साजरे करायचे असतात, हे तितकेच खरे. पूर्वीचे दिवस मला आठवतात. गणेशोत्सव सुरू व्हायचा, घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा व्हायची आणि मी कार्यक्रमासाठी बाहेर जायचे. गणेशोत्सवातील बराचसा वेळ मी बाहेरच असायचे. मात्र, ते वातावारण भारावून टाकणारे होते. सर्वत्र आनंद, उत्साह आणि त्यामध्ये गायनातून गणपतीची सेवा घडवता येते, यासारखे दुसरे समाधान नसे. पूर्वी गणेशोत्सवात अनेक मैफली होत असत. त्यात मी सहभागी होत असे. गणेशोत्सवाचे चित्र बदलल्याने आता मी गणेशोत्सवात कार्यक्रम करत नाही. पण ते व्यासपीठ मला महत्त्वाचे वाटते.
तरुणपणातील एक आठवण माझ्या मनावर खासच कोरली गेली आहे. गणेशोत्सव जवळ आला, की मला ते दिवस आठवतात. आम्ही मुंबईमध्ये राहत असू. जवळील एका कॉलेजमधील मुले गणपती बसवत. माझा 'स्पेशल' भाऊ तेव्हा १४ वर्षांचा असेल. त्याला फारसं आकलन नव्हते; पण कॉलेजची मुले त्याला बरोबर घेऊन जात. ती मुले त्याची काळजी घेत, त्यामुळे आम्हीही त्याला जाऊ देत. एकदा विसर्जन मिरवणुकीसाठी तो गेला. रात्र झाली तरी आलाच नाही. मग आमची धावपळ सुरू झाली. याला बोलता येत नाही, रस्ते माहीत नाहीत, हा कुठे असेल या काळजीत आम्ही पडलो. पोलिसांना सांगितलं. सगळ्या नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली; पण पत्ता लागला नाही. त्यात पहाट झाली आणि एकदम फाटकाचा आवाज झाला. आम्ही बघितले तर तो राजू होता. तो घरी सुखरूप आल्याचा आनंद होताच, पण हा एकटा कसा आला, याचे आम्हाला सखेद आश्चर्य वाटत राहिले. त्याला विचारले. तो म्हणाला, 'मी नाचून दमलो. मग तिथेच दुकानाच्या पायरीवर झोपलो. जाग आली तर आपण कुठे आहोत, असा प्रश्न पडला. मग मी गणपती बाप्पाला नमस्कार केला व मला घरी घेऊन जा म्हणालो आणि आलो.' या त्याच्या निरागस उत्तरातच गणपतीचा आपलेपणा दडलेला आहे, असे मला वाटते. त्या क्षणाला त्याची आकलनक्षमता कामी आली असेल, विवेक जागृत झाला असेल; पण गणपतीचा सगुण ते निर्गुण असा भाव माझ्या मनामध्ये कोरला गेला आहे. गणपतीमुळे मिळणाऱ्या ऊर्जा आणि सकारात्मकतेचा हा प्रत्यय मला वाटतो.
(लेखिका ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आहेत.)
(शब्दांकन : चिंतामणी पत्की)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भांडणामुळे हृदयविकाराचा झटका येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, राजगुरूनगर

तिफणवाडी (ता. खेड) येथे शेतातील पाण्यावरून झालेल्या जोरदार भांडणामुळे गजानन राधू कडलग (६५) या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी खेड पोलिसांनी आरोपी दिलीप पांडुरंग कडलग याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा गावाजवळील तिफणवाडी येथील शेतकरी गजानन राधू कडलग गुरुवारी सकाळी ढवळाचा माळ येथील त्यांच्या भातशेताला पाणी देण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्या शेताशेजारील दिलीप पांडुरंग कडलग (रा. तिफणवाडी) यांच्याशी त्यांची पाण्यावरून बाचाबाची झाली. आरोपी दिलीप पांडुरंग कडलग यांनी मृत शेतकऱ्याचा मुलगा उल्हास याला झाल्या प्रकाराची माहिती दिली होती. दरम्यान, गजानन कडलग वाडा येथे गेले होते. तेथील एका हॉटेलात ते त्यांच्या सहकाऱ्याबरोबर चहा पीत असताना दिलीप पांडुरंग कडलग तेथे गेले आणि त्यांनी गजानन यांना शिवीगाळ करून धक्काबुकी केली. त्यानंतर संबंधित शेतकरी घरी गेल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना वाडा येथे उपचारासाठी खासगी दवाखान्यात आणण्यात आले. परंतु तेथे उपचार न झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी राजगुरुनगर येथील चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.

गजानन कडलग यांच्या मृत्यूस दिलीप कडलग जबाबदार असल्याबाबत गजानन यांचा मुलगा उल्हास यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिलीप यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजप्रबोधन करणारे देखावे

$
0
0

हडपसरमधील सार्वजनिक गणेश मंडळांचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

हडपसरमध्ये यंदा गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी पर्यावरणपूरक आणि सामाजिक प्रबोधन करणारे देखावे करण्यावर भर दिला आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग, झाडे लावा-झाडे जगवा, जल है तो कल है, आदींचे महत्त्व सांगणारे, तसेच ऑलिम्पिक खेळाडूंचे महत्त्व सांगणारे, त्यांचा गौरव करणारे संदेश या देखाव्यांतून देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या दहीहंडीच्या नियमांबद्दल जागृती करण्याचा प्रयत्नही काही मंडळांनी केला आहे.

ससाणेनगर येथील नवनाथ तरुण मंडळाने रेनवॉटर हार्वेस्टिंग, ओला-सुका कचरा वर्गीकरण, ई-कचऱ्याची विल्हेवाट, घरगुती खतप्रकिया, जागतिक तापमानवाढ, मुलगी वाचवा अशा पर्यावरणरक्षणाशी संबंधित बाबींबद्दल प्रबोधन करणारा देखावा व प्रात्यक्षिके सादर केली आहेत. मंडळातर्फे गणेशजयंती, शिवजयंती साजरी केली जाते. पारंपरिक पद्धतीने मिरवणूकही काढली जाते. दर वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने मूर्तिदानाचा उपक्रम करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गणेश हांडे, मेघराज जगताप, मुकेश वाडकर, सुशील जाधव यांनी दिली.

हडपसर गावातील यूथ क्लब मंडळाने 'सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दहीहंडी साजरी करा, हा संदेश देणारा देखावा साकारला आहे. मंडळाने दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले आहे. वारकऱ्यांना फराळवाटप, रामनवमी उत्सव असे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जगदीश राठी, शामसुंदर लोया व नंदकिशोर भट्टड यांनी दिली.

ससाणेनगर येथील राजमुद्रा मित्र मंडळाने 'झाडे लावा, झाडे जगवा,' 'बेटी बचाव' आणि 'ऑलिंपिकविजेत्या खेळाडूंचा गौरव' हा देखावा साकारला आहे. मंडळाच्या वतीने वर्षभरात दत्तजयंती, राष्ट्रपुरुषांच्या जयंती, महिलांसाठी हळदी-कुंकू असे विविध सामाजिक-धार्मिक उपक्रम राबवले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर जगताप, स्वप्नील डांगमाळी, अनिकेत रासकर, विजय देहगावी यांनी दिली.

कामधेनू मित्रमंडळाने 'सैराट पाण्याची झिंगाट कथा' या सामाजिक विषयावरील जिवंत देखावा सादर केला आहे. 'पाणी वाचवा-जल है तो कल है' या सामाजिक संदेशातून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महिला व मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, नेत्रतपासणी शिबिर, नवरात्र महोत्सव असे कार्यक्रम मंडळातर्फे वर्षभर घेण्यात येतात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आकाश घुले, अक्षय बोडरे, अजिंक्य डोळस यांनी दिली.

श्रमिक मित्र मंडळाने देखाव्यावर खर्च न करता सोसायट्यांमधून निर्माल्यदान करून त्यापासून कंपोस्ट खत निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मंडळाकडून ११ दिवस सोसायट्यांमधील निर्माल्य गोळा केले जाणार आहे. निर्माल्य ठेवण्यासाठी मंडळाच्या वतीने सोसायट्यांना बादल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निर्माल्यातून तयार झालेले खत सोसायट्यांना देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मंडळाचे कार्यकर्ते सोसायट्यांमधील नागरिकांचे प्रबोधन करत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी दिली.

रामटेकडी येथील संघर्ष मित्रमंडळाने फुलांच्या विद्युत रोषणाईचा देखावा केला आहे. मंडळातर्फे दर वर्षी स्वातंत्र्यदिन, शिवजयंती, गणेश जयंती, नवरात्रौत्सव आदी उत्सव साजरे केले जातात. आरोग्य शिबिरासारखे सामाजिक उपक्रमही राबवले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आप्पा गरड, तुषार जाधव, आप्पा शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सुवेळी पूजलेला ‘राज’गणेश

$
0
0

- अजय काकडे
स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान मिळालेला आणि 'गडांचा राजा आणि राजांचा गड' अशी ओळख असणारा राजगड हे पुण्याचा मानबिंदू. राजगडाच्या पद्मावती, संजीवनी, सुवेळा या एकाहून एक सुंदर माची आणि त्यांचा शिरोमणी असणारा बालेकिल्ला हे दुर्गबांधणीचे उत्तम नमुने. राजगडला भेट देणारे दुर्गयात्री सुवेळा माचीला सूर्योदय पाहायला आवर्जून जातात. असं म्हणतात की, १६४५ च्या सुमारास जेव्हा मुरुंबदेवाच्या या डोंगरावर किल्ला बांधायचे निश्चित झाले तेव्हा प्रत्यक्ष शिवछत्रपतींनी एका गणेशमूर्तीची स्थापना केली. सुवेळा माचीवर असणाऱ्या झुंजार बुरुजापासून एका दिंडीतून बाहेर पडताच वाट पुढे नेढ्याकडे जाते. इथे उजव्या हातास तटामध्ये एका देवळीत हा गणपती शेकडो वर्षांपासून विराजमान आहे. एका 'सु'वेळी या गणेशाची स्थापना करून दुर्गबांधणीस प्रारंभ झाला असे सांगतात. ही मूर्ती चतुर्भुज असून मागील हातात आयुधे आहेत. डाव्या हाती मोदक, तर उजवा हात मांडीवर स्थिरावला आहे. शेंदूर लावल्याने मूर्तीचे बारकावे आता उरले नाहीत. राजगडावर काळेश्वरी बुरुजाकडे जाताना अाणखी एक दुर्लक्षित; पण सुंदर गणेशमूर्ती आहे. सुवेळा माचीला येणारे ट्रेकर्स आपली तहान भागवायला या गणरायाच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाक्याकडे नक्की येतात. राजगडला जायचे झाल्यास पुण्याहून वेल्हे तालुक्यातील गुंजवणे, पाल वाजेघर अशा गावातून मार्ग आहेत. राजगडावरच्या या दोन्ही गणरायांचे दर्शन नक्की घ्या.

(लेखक वारसा अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजभान जागृत करणारे देखावे

$
0
0

पेठांमधील गणेशोत्सव मंडळांनी जपली समृद्ध परंपरा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विलोभनीय गणेश मूर्ती...मनमोहक आरास...नजर खिळवून ठेवणारे भव्य सेट्स...जिवंत देखाव्यांमधून कधी होते देशभक्तीची जाणीव, तर कधी पौराणिक देखाव्यांच्या आधारे होते मानवी मूल्यांची ओळख. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांमधून विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेले देखावे अनुभवताना, गणेशोत्सव हा केवळ भक्ती वा कल्पनाशक्तीपुरताच मर्यादित राहिला नसून, सर्वसामान्य नागरिकांचे समाजभान जागृत करण्याचे कार्यही उत्सवाच्या माध्यमातून सुरू असल्याची प्रचिती येत आहे.

शनिवार पेठेतील श्री कडबे आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ८१वे वर्ष आहे. अमित पळसकर यांच्या अध्यक्षतेखाली यंदा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसमोर विद्युत रोषणाईची आरास मांडली आहे. गाण्यांच्या तालावर लुकलुकणाऱ्या या विद्युत रोषणाईच्या मध्यभागी विराजमान झालेली बाप्पाची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. साईनाथ मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 'तरुणांनो लष्करात भरती व्हा' असा संदेश देणारा जिवंत देखावा सादर केला आहे. या भागातील छोट्या गल्ल्या, त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मंडळाने रस्त्याच्या वर उभारलेल्या व्यासपीठावर हा देखावा सादर करण्याची सोय केली आहे. १८ मिनिटांच्या या देखाव्यातून मंडळाने सैनिकांचे आयुष्य अत्यल्प कालावधीत दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

अप्पा बळवंत चौकाच्या परिसरात असलेल्या करळेवाडी सार्वजनिक मंडळ ट्रस्टने होलिका राक्षसिणीच्या वधाची कथा हलत्या देखाव्यातून मांडली आहे. भक्त प्रल्हादाच्या पौराणिक कथेवर आधारित असलेला हा देखावा बालगोपाळांसाठी आकर्षण ठरत आहे.

या परिसरातील आदर्श मंडळाने केलेली स्थिर सजावट आणि मंदिराच्या गाभाऱ्याचा देखावा आकर्षक रोषणाईने उजळून निघत आहे. तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलेली आरास लक्षवेधी ठरत आहे. लक्ष्मी रोडचा राजा गणपती चौक मित्रमंडळाची आकर्षक आणि तितकीच भव्य मूर्ती भाविकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. ही बैठी मूर्ती पाहताना अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नसल्याचेही दिसून येत आहे. श्री तुळशीबाग मंडळाची भव्य, देखणी मूर्ती नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरत आहे. जय बजरंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विद्युत रोषणाईही नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

सेट्सची भव्यता आणि बाप्पाची गोडी...

बाहेरगावाहून गणेशोत्सव पाहायला येणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या मध्य वस्तीतील काही मंडळांनी यंदाही भव्यदिव्य सेट्स उभारले आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच गणेशभक्तांनी हे सेट्स पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा श्याममहालाचा देखावा सादर केला आहे. नवसाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा १०८ फूट उंचीचे शिवगणेश मंदिर उभारले आहे. ९० फूट लांब आणि ३६ फूट रुंद असलेल्या या मंदिराच्या सेटची भव्यता नागरिकांना भारावून टाकणारी ठरत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक मंडळ ट्रस्टने यंदा श्री महाबलिपुरम् येथील श्री महाबली मंदिराचा देखावा सादर केला आहे. तुळशीबाग परिसरातील शिवशक्ती मंडळानेही मोजक्या जागेमध्ये बालाजी मंदिराचा देखावा उभा केला आहे. हे सर्वच देखावे मध्य वस्तीमध्ये गणेशोत्सव अनुभवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुण्यातील गणेशोत्सवाचे वेगळेपण दाखवून देणारे ठरत आहेत.

कल्पक देखावे कौतुकाचा विषय

शहराच्या मध्य वस्तीमध्ये, विशेषतः शिवाजी रोड आणि बाजीराव रोडच्या दरम्यानच्या भागात असणारी लहान-मोठी मंडळे नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरतात. पुण्यात बाहेरगावाहून गणेशोत्सव पाहायला येणाऱ्यांसाठी मानाच्या पाचही गणपतींच्या जोडीने या भागात असलेली इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही तितकीच महत्त्वाची ठरतात. मंडळांनीही ही बाब लक्षात घेऊन आकर्षक पद्धतीने आरास करून नागरिकांचा रसभंग होणार नाही याची काळजी घेतलेली दिसते. अगदी छोट्या छोट्या मंडळांनीही आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईच्या आधारे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न नागरिकांसाठी विविध कल्पक देखावे पुढे आणण्यास कारणीभूत ठरल्याने ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते खोदाईला मनाई असल्याने ‘महावितरण’ची अडचण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेकडून रस्ते खोदाईला मनाई करण्यात येत असल्याने 'महावितरण'ची अडचण झाली आहे. शनिपार चौकात 'महावितरण'च्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला असताना, महापालिकेकडून रस्ता खोदण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याने शहराचा मध्यवर्ती भाग कधीही अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्याच्या काळात महापालिकेकडून रस्ते खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे 'महावितरण'पुढे प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी रस्ते खोदण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
दुरुस्तीच्या कामासाठी​ रस्ते खोदण्यास परवानगी मागितली असता, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याचे 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या ​अधिकाऱ्यांनी रस्ता खोदण्यास मनाई केल्यामुळे शनिपार चौकातील वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. सध्या पर्यायी वीजवाहिनीवरून वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्या वीजवाहिनीवर ताण आल्यास शनिपार चौक परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे दुरुस्तीचे काम करणे अत्यावश्यक झाले असल्याचे 'महावितरण'कडून स्पष्ट करण्यात आले. शनिपार चौकात खोदाई करून दुरुस्तीचे काम होऊ शकणार आहे. मात्र, महापालिकेकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याने 'महावितरण'ची अडचण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, तुम्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात....

$
0
0

सीसीटीव्ही लावण्याकडे गणेश मंडळांचा वाढता कल
पुणे : गणेशोत्सवात शहरात मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने पोलिसांकडून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. संपूर्ण शहराची जबाबदारी केवळ पोलिस घेऊ शकत नसल्याने आता अनेक गणेश मंडळे स्वतःहून पोलिसांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यातूनच, मंडपाच्या आवारात आणि मंडपाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवर क्लोज सर्किट कॅमेरे (सीसीटीव्ही) बसविण्याकडे मंडळांचा वाढता कल दिसून येत आहे. याद्वारे येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होत असून, संशयास्पद हालचाली मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्वरेने समजत आहेत.
जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण शहरात राज्य सरकारने सीसीटीव्हीची यंत्रणा उभारली आहे. शहर पोलिसांमार्फत शहरातील सर्व सीसीटीव्हीचे नियंत्रण केले जाते. गणेशोत्सवासारख्या एखाद्या सण-समारंभ, उत्सवाच्या वेळी पोलिसांच्या पहाऱ्यासह मंडळांनीही दक्षता घेण्याचे आवाहन दर वर्षी केले जाते. पोलिसांच्या या आवाहनाला अखेर मानाच्या मंडळांसह इतर मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक मंडळांनी उत्सवातील दहा दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्हीची यंत्रणा बसवली आहे.
उत्सवाच्या कालावधीत शहरात नेहमीच खूप गर्दी होते. शहराच्या उपनगरांसह आसपासच्या गावांतील अनेक नागरिक गणपती, देखावे पाहण्यासाठी आवर्जून शहरात येतात. पाचव्या-सहाव्या दिवसानंतर ही गर्दी वाढतच जाते. अशा वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, संशयास्पद हालचाली दिसून आल्या, तर तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवून संभाव्य धोक्याची कल्पना देता यावी, या दृष्टीने सीसीटीव्ही निर्णायक भूमिका बजावतात. मंडपातील आणि मंडपाबाहेरच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी, गर्दीचा फायदा घेऊन केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत उत्सवातील शांतता कायम राखण्यासाठी अनेक मंडळांनी आवारात सीसीटीव्ही बसवले आहेत. मानाच्या बहुतेक मंडळांनी तर संपूर्ण परिसरातच ही यंत्रणा उभारली आहे. त्याशिवाय, पोलिस आणि महापालिकेनेही विसर्जनाचे प्रमुख मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत आणले आहेत.
उत्सवासाठी आवश्यक सुरक्षा पुरवणे, गर्दीचे नियंत्रण करणे आणि अनुचित प्रकार रोखणे, ही सर्वस्वी पोलिसांची जबाबदारी असल्याची भावना यापूर्वी व्यक्त केली जायची. मात्र, कालानुरूप मंडळांच्या मानसिकतेमध्ये बदल घडून येत असून, सुरक्षेचा भार उचलण्यासाठी आवश्यक पावले त्यांच्याकडूनही टाकली जात आहेत. पोलिस आणि मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समन्वयातून आणि सीसीटीव्हीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उत्सवाचा रंग टिकवून ठेवला जात आहे.
.................
मंडपांवर नजर सीसीटीव्हीची
मंडपातील आणि मंडपाबाहेरच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी, गर्दीचा फायदा घेऊन केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसवा आणि उत्सवकाळात शांतता कायम राहावी यासाठी गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मानाच्या सर्व गणपतींच्या मंडळांच्या गणपती मंडपांमध्ये सीसीटीव्हीद्वारे देखरेख केली जात आहे. त्याशिवाय इतरही मंडळांनी सीसीटीव्ही बसवला आहे. पोलिस आणि महापालिकेनेही विसर्जनाचे प्रमुख मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत आणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गट, गणांची संख्या निश्चित

$
0
0

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तालुकानिहाय संख्या निश्चित
म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची तालुकानिहाय संख्या निश्चित करण्यात आली असून, हवेली तालुक्यात सर्वाधिक १३ गट व २६ गण होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सन २०११ च्या जनगणनेवर आधारित ही गट व गणांची रचना करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक मार्च-२०१७ मध्ये होणार आहे. त्यासाठी गट व गणांची रचना तयार करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. या गट व गणांची रचना २०११ च्या जनगणनेप्रमाणे करण्याचेही आयोगाचे आदेश आहेत. या जनगणनेवर आधारित लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील बहुतांश गट व गणांची रचना बदलणार आहे.
या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीचे १५० गण होणार आहेत. २०११ प्रमाणे जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख ४७ हजार इतकी आहे. या लोकसंख्येनुसार पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचा एक गट असणार आहे. आयोगाच्या आकडेवारीनुसार हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १३ गट आणि पंचायत समितीचे २६ गण होणार आहेत. तसेच जुन्नरमध्ये सात गट (१४ गण), आंबेगाव तालुक्यात पाच गट (१० गण), शिरूरमध्ये सात गट (१४ गण), खेडमध्ये सात गट (१४ गण), मावळमध्ये पाच गट (१० गण), मुळशीत तीन गट (सहा गण), दौंडमध्ये सहा गट (१२ गण), पुरंदर तालुक्यात चार गट (८ गण), वेल्हा दोन गट (४ गण), भोर ३ गट (६ गण), बारामतीमध्ये सहा गट (१२ गण) व इंदापूर तालुक्यात सात गट आणि १४ गण असणार आहेत.
खेड व जुन्नर पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित होणार आहे. गतनिवडणुकीत ही जागा अनुसूचित जातीच्या स्त्रीसाठी आरक्षित होती. यंदा ही जागा स्त्रियांसाठी आरक्षित होणार नाही. शिरूर पंचायत समितीचा एक गण अनुसूचित जातीच्या स्त्रीसाठी आरक्षित होणार आहे. मावळ, मुळशी व पुरंदर या तीन पंचायत समित्यांध्ये प्रथमच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित होणार आहे. या जागांचे आरक्षण सोडतीनंतर निश्चित होणार आहे. वेल्हा पंचायत समितीचा एक गण इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहे. गतनिवडणुकीत हा गण इतरमागास स्त्रियांसाठी आरक्षित होता. त्यात यंदा बदल होणार आहे.
0000
- जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीचे १५० गण
- जिल्ह्याची लोकसंख्या - ३८ लाख ४७ हजार इतकी आहे.
- लोकसंख्येनुसार पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचा एक गट.
- हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे गट - १३
- पंचायत समितीचे गण - २६ गण
- जुन्नर - सात गट (१४ गण)
- आंबेगाव तालुक्यात पाच गट (१० गण)
- शिरूरमध्ये सात गट (१४ गण)
- खेडमध्ये सात गट (१४ गण)
- मावळमध्ये पाच गट (१० गण)
- मुळशीत तीन गट (सहा गण)
- दौंडमध्ये सहा गट (१२ गण)
- पुरंदर तालुक्यात चार गट (८ गण)
- वेल्हा दोन गट (४ गण)
- भोर ३ गट (६ गण)
- बारामतीमध्ये सहा गट (१२ गण)
- इंदापूर तालुक्यात सात गट आणि १४ गण
- खेड व जुन्नर पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिल्डरविरुद्ध वॉरंट जारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बाणेर येथील इमारत दुर्घटनेमध्ये अटक टाळण्यासाठी पळ काढणाऱ्या बिल्डरांवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. या बिल्डरांच्या करोडो रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
या गुन्ह्यातील बिल्डर, आर्किटेक्ट अटक टाळण्यासाठी पळ काढत असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली आहे. या बिल्डरांना फरारी घोषित करण्यासाठी शिवाजीनगर कोर्टात धाव घेण्यात आली. कोर्टाने या गुन्ह्यांतील सहा आरोपींविरुद्ध अजामीनपात्र अटक वाँरट जारी केले आहे. कोर्टाच्या या आदेशाचा बिल्डरांनी भंग केला, तर त्यांच्या करोडो रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू होईल, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. बालेवाडी येथील हाय स्ट्रीटवरील 'पार्क एक्स्प्रेस' सोसायटीच्या विनापरवाना मजल्याचा स्लॅब २९ जुलै २०१६ रोजी कोसळून नऊ कामगार मृत्युमुखी पडले होते, तर तिघे जण जखमी झाले होते.
पळ काढणाऱ्या बिल्डरांवर पोलिसांनी आता कायद्याचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी बिल्डर, आर्किटेक्ट पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी श्रीनिवास डेव्हलपर्स आणि 'प्राइड पर्पल प्रॉपर्टीज'चे अरविंद जैन, श्रवण अगरवाल, 'समर्थ ग्रुप'चे कैलास वाणी, 'मृगांक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड'चे श्याम शेंडे (वाणी), महेंद्र कामत, 'पार्क एक्स्चेंज जॉइंट व्हेंचर'चे भाविन हर्षद शहा, आर्किटेक्ट प्रदीप कौसुंबकर, स्ट्रक्चरल डिझायनर हंसल पारीख अँड असोसिएट्स, बांधकाम साइट प्रोजेक्टची जबाबदारी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष सोपान चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चतुःश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी श्रीकांत पवार, भावेन शहा, महेंद्र कामत, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष चव्हाण यांना अटक केली आहे. या गुन्ह्यांतील आरोपी अरविंद जैन, श्रवण अगरवाल, कैलास वाणी, श्याम शेंडे (वाणी), प्रदीप कौसुंबकर, पारिख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर सुनावणी सुरू असतानाही न्यायाधीशांवर दबाब आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या सहाही आरोपींविरुद्ध आजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुंडांवर कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत सहा गुन्हेगारी टोळ्यांसह १०० हून अधिक सराईतांना तडीपार केले आहे. शहरात उच्छाद मांडणाऱ्या ७००हून अधिक सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. घातपाताची शक्यता गृहीत धरून शहरातील सुमारे ४०० ठिकाणी बॉम्बशोधक आणि नाशक पथकांनी तपासणी केली आहे.
गणेशोत्सव काळात सराईतांवरील कारवाई सत्र सुरूच राहणार आहे. शिवाय शहराच्या मध्यवस्तीत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'बीडीडीएस' पथकाकडून वारंवार तपासणी करण्यात येत असून, कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनेनुसार पुणे पोलिसांच्या 'क्युआरटी' टीमने सात तर 'नॅशनल सिक्युरिटी गार्ड'ने ( एनएसजी) दोन ठिकाणी सुरक्षेबाबत ड्रिल घेतले. शहरातील ११ सराईतांवर 'एमपीडीए'तर्गंत कारवाई करण्यात आली असून, त्यांना तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
..
५० सराईतांवर 'मोक्का'
पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांत ५० सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियमानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. खडकी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात राजू उर्फ नकट्या प्रभु मुन्नास्वामी (वय २५, रा. गणेश मित्र मंडळाजवळ, खडकी), बाबू उर्फ बाब्या मोहन पिल्ले (वय २१, रा. आदर्शनगर,खडकी), राहुल उर्फ भैय्या प्रकाश तायडे (वय ३२, रा. आंबेगाव खुर्द, ता. हवेली), अविनाश उर्फ तन्या सुरेश वानखेडे (वय २०, रा. मुळा रोड,खडकी), श्रीनिवास उर्फ शित्रु गणेश चिन्नया उर्फ पिल्ले (वय १९, रा. आदर्शनगर, खडकी) आणि साहिल पिल्ले यांच्याविरुध्द 'मोक्का'तंर्गत कारवाई केली असल्याची माहिती सहायक आयुक्त वसंत तांबे यांनी दिली. पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी सराईतांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईस मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. शहरातील आकाश दादासाहेब माने, तेजस चंपालाल उणेचा, नीलेश घायवळ आणि शरद मोहोळ टोळीतील ३१ तर इतर दोन टोळ्यांमधील १० जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. शहराच्या मध्यवस्तीतून प्रवास करण्यासाठी मनाई करण्यात आली असून पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतुकीतील बदल गणेशोत्सवकाळात सायंकाळी पाचपासून गर्दी संपेपर्यंत असणार आहेत.
वाहतूक व्यवस्थेतील बदल :
- शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक-जंगली महाराज रोड-टिळक चौक (अलका चौक)- टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा किंवा सिमला चौक-कामगार पुतळा चौक-शाहीर अमर शेख चौक-बोल्हाई चौकमार्गे नेहरू रोडचा वापर करावा. गर्दी पाहून 'पीएमपीएमएल' बसदेखील या मार्गांनीच वळवण्यात येतील.
- चारचाकी वाहनचालकांनी शिवाजीनगरवरून स्वारगेटला जाण्यासाठी या मार्गाचा वापर करावा. गाडगीळ पुतळा ते शाहीर अमर चौक व पुढे नेहरू रोडने स्वारगेटकडे जाता येईल, तसेच जिजामाता चौक ते फुटका बुरूज येथून उजवीकडे वळून शनिवारवाडा, नदीपात्रातील रस्त्याने (चंद्रशेखर आपटे रोड), भिडेपूल येथून टिळक चौकामार्गे (अलका चौक) इच्छित ठिकाणी जावे.
- लक्ष्मी रोडवरील चारचाकीवाहन चालकांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहनांनी स्वारगेटला जाण्यासाठी लक्ष्मीरोडमार्गे हमजेखान चौकातून डावीकडून वळावे आणि महाराणा प्रताप रोडचा वापर करावा.
- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. अप्पा बळवंत चौकात डावीकडे वळून बाजीराव रोडने फुटका बुरूज मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, उजवीकडे वळून जिजामाता चौक, डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौकात उजवीकडे वळून हमजेखान चौकात यावे. तेथून महाराणा प्रताप मार्गावरून गोविंद हलवाई चौक, उजवीकडे वळून गोटीराम भैय्या चौकात डावीकडेवळून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जावे.
..
नो-पार्कींग बाबत
शिवाजी रोडवर जिजामाता चौक ते बेलबाग चौक, मंडई ते शनिपार चौक, सेवासदन चौक ते अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधने गणेशोत्सवावरच का?

$
0
0

राजकीय पक्ष, मंडळांकडून राज्य सरकारला संतप्त सवाल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सवात लाउडस्पीकरला दिली जाणारी पाच दिवसांची परवानगी कमी करून चार दिवसांवर आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे गुरुवारी शहरात तीव्र पडसाद उमटले. राजकीय पक्षांसह गणेश मंडळांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला असून, केवळ हिंदूंच्या सणावर निर्बंध आणून उत्सव बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत लाउडस्पीकरवर बंधने घातल्यानंतर गणेशोत्सवात दरवर्षी पाच दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी दिली जाते. यंदाही सरकारने हे पाच दिवस निश्चित केले होते. परंतु, नव्या आदेशात राज्य सरकारने चारच दिवसांची परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी असे चार दिवस निश्चित केले गेले आहेत. त्यातील दुसरा दिवस यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे, आता मंडळांना केवळ तीनच दिवस मिळणार असून, सरकारने पूर्वीप्रमाणे पाच दिवस परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, सर्व निर्बंध केवळ हिंदूंच्याच सणावर घातले जात असून, यामुळे काही वर्षांत केवळ मिरवणुकीपुरता उत्सव राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव आहे. त्यामुळे सरकारने लाउडस्पीकरविषयी असे अचानक निर्बंध लादण्याची भूमिका रास्त नाही. केवळ गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्येच नाही, तर सर्वधर्मीय सण- उत्सवांमध्ये सरकारने लाउडस्पीकरसाठी परवानगी दिली पाहिजे. त्याचवेळी सार्वजनिक मंडळांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने मंडळांनी आपले लाउडस्पीकर्स लावायला हवेत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
सत्ता प्राप्त झाल्यानंतर भाजपकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिका अचानक बदलल्या असून, गणपती मंडळांना वेठीस धरले जात आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अजय शिंदे यांनी केली. हिंदूंनी सणच साजरे करू नयेत, अशा पद्धतीने सर्व बंधने आणि नियम केले जात आहेत. या पद्धतीने कायदे झाले, तर काही वर्षांतच गणेशोत्सवाची चळवळ संपून जाईल, असा हल्ला त्यांनी सरकारवर चढवला.
मनसेप्रमाणेच शिवसेनेने राज्य सरकारच्या नव्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. सर्व प्रकारचे निर्बंध केवळ हिंदूंच्या सणावर घातले जात असून, सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही ३६५ दिवस वाजणारे भोंगे बंद करण्याची हिंमत सरकारमध्ये नाही, असा आरोप शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे यांनी केला. सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा तीव्र निषेध करून महाराष्ट्राचा हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांनी नव्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
.......................
भाजपलाही हवे पाच दिवस
शहरातील विरोधी पक्षांसह शहर भाजपनेही उत्सवात लाउडस्पीकरला पाच दिवस परवानगी दिली जावी, अशी मागणी केली आहे. पूर्वीप्रमाणे उत्सवात पाच दिवस परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. तसेच, याच उत्सवात ही परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
....................
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने सुप्रीम कोर्टात बाजू लढविल्याने उत्सवासाठी पाच दिवसांची मुभा मिळाली होती. दुर्दैवाने, राज्य सरकारने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर एक दिवस कमी केल्याने देखावे-सजावट पाहायला येणाऱ्या गणेशभक्तांचे नियोजन कोलमडणार आहे. लोकभावनेचा कोणताही विचार करण्यात आला नसून, सरकारने ही चूक तातडीने दुरुस्त करावी.
महेश सूर्यवंशी,
कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटल, दवाखाने फुल

$
0
0

सांधेदुखी, तापाने फणफणलेल्या पेशंटची शहरात वाढती संख्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर्दी, ताप, खोकल्यासह सांधेदुखी, घसादुखीच्या आजाराने हैराण झालेले पुणेकरांनी थेट हॉस्पिटलकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश हॉस्पिटल संसर्गजन्य आजाराच्या पेशंटनी भरून गेली आहेत. हॉस्पिटलमध्ये खाटा रिकाम्या नसल्याने 'ओपीडी'मध्येच पेशंटवर उपचार करण्याची वेळ ओढवली आहे. शहरात डेंगी, चिकुनगुनियाच्या साथीचा आजारांचे प्रमाण वाढले आहे.
'सध्या डेंगी, चिकुनगुनियाबरोबर विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढला आहे. संसर्ग वाढल्याने घराघरांत पेशंट आढळत आहेत. बिबवेवाडीच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तापासह सांधेदुखीच्या पेशंटने खाटा भरल्या आहेत. पेशंटना दिवसातून दोनदा उपचारासाठी तसेच इंजेक्शनसाठी हॉस्पिटलला बोलवावे लागत आहे. शिवाय अन्य आजाराचे पेशंटही येत असल्याने गर्दी वाढली आहे,' असे निरीक्षण सह्याद्री हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी नोंदविले. घरातील एकालाही ताप आला तरी, त्याचा संसर्ग दुसऱ्याला होतो. त्यामुळे एकाच घरातील पेशंटची संख्या वाढत आहे. डेंगी, चिकुनगुनियासह विषाणूजन्य आजार हा दोन दिवसांपासून वीस दिवसांपर्यंत राहतो. ताप आणि संधीवाताचा त्रास ही लक्षणे दोन ते सहा आठवड्यापर्यंत टिकतात, याकडेही डॉ. जोशी यांनी लक्ष वेधले.
'संसर्ग झालेले पेशंट गर्दीत गेल्यास त्याचा इतरांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. विषाणू संसर्गामुळे बाह्यरुग्ण विभागासह आंतररुग्ण विभागातही पेशंटवर उपचार सुरू आहेत,' अशी माहिती संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे यांनी दिली. 'गेल्या काही दिवसांत संसर्गजन्य आजाराचे पेशंट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. खाटा संपूनही अनेक पेशंटना गरजेनुसार दाखल करून घेतले जात आहे,' असे निरीक्षण हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले.
..
डेंगी, चिकुनगुनियाबरोबर काही दिवसांपासून संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ताप, सांधेदुखीच्या पेशंटची संख्या वाढली आहे. आता विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दिवसभरात किमान १० ते १२जणांच्या रोगनिदान तसेच रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या जातात.
डॉ. भारत पुरंदरे
..
काळजी काय घ्याल ?
संसर्ग झालेल्या पेशंटने गर्दीत जाणे टाळावे.
संसर्ग व्यक्तीला घरात वेगळे ठेवा.
आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित औषधोपचार घ्यावा.
औषधोपचारासह विश्रांती आवश्यक.
औषधांचा कोर्स पूर्ण करावा.
उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.
शिळे अन्न खाऊ नये.
पुरेसा आहार घ्यावा.
भरपूर पाणी प्यावे, फळे खावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायट्यांचे दुर्लक्ष ठरतेय कारणीभूत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील विविध सोसायट्यांमध्ये डेंगी आणि चिकुनगुनियाच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. अनेक मोठ्या सोसायट्या महापालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्याने पेशंटची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.
सोसायट्यांमधील टाकीच्या खाली साठलेले पाणी, जुने टायर, माठ, भांडी आणि कचरा डेंगीच्या डासांना निमंत्रण देत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना येण्यास मज्जाव करण्यात आल्यानेही संसर्ग वाढत आहे. डेंगीच्या पेशंटची संख्या वाढतच असून आतापर्यंत बाराशेहून अधिक पेशंट समोर आले आहेत. डेंगी तापासाठी कारणीभूत ठरणाऱ्या 'एडिस इजिप्ती' डासाची मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालते. काही सोसायट्यांमध्ये स्वच्छ पाणी साठत असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होत असल्याचेही दिसून आले होते. शहरातील काही सोसायट्यांमधील पाण्याच्या टाकीमधून पाणीगळती होऊन टाकीच्या खाली पाणी साठत आहे. काही ठिकाणी पार्किंगमध्ये असलेले जुने टायर, फुटक्या कुंड्या, प्लास्टिक किंवा पत्र्याचे डबे आदी ठिकाणी पाणी साठत आहे. काही सोसायट्यांमधील गच्चीवरही पाणी साठले आहे. त्यातून डासांची पैदास होत आहे.
डासांची पैदास होत असलेल्या जागांच्या मालकांना नोटीस बजावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. पालिकेतर्फे गेल्या नऊ महिन्यात १२११ जणांना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांच्याकडून २ लाख ८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोथरूड, धनकवडी, धायरी, माणिकबाग, नगर रोडसह पेठांमध्येही नोटिसा दिल्या आहेत. शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाहणीसाठी जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात येत असल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टमध्ये पेशंट दुप्पट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील विविध भागात डेंगीबरोबरच चिकुनगुनियाच्या पेशंटमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात डेंगीच्या पेशंटच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये साडेपाचशे डेंगीचे संशयित सापडले आहेत. चिकुनगुणियाच्या पेशंटची संख्या ११९वर पोहचली आहे. जुलैमध्ये ही संख्या २७ होती.
गेल्या महिन्यांपासून संपूर्ण शहरात डेंगीची साथ आली असून, दिवसेंदिवस डेंगीच्या पेशंटची संख्या वाढतच आहे. डेंगीबरोबरच चिकुनगुनियाने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत डेंगीच्या पेशंटची संख्या बाराशेच्या घरात पोहचली आहे. शहरातील धनकवडी, कात्रज या भागासह कोंढवा, कोथरूड, वारजे तसेच मध्यवर्ती भाग असलेल्या नारायण, सदाशिव, रविवार पेठेत डेंगीचे पेशंट सापडत आहेत. डेंगींच्या साथीवर आवश्यक उपाययोजना करण्यात महापालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याने पेशंटची संख्या वाढत असल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे.
डेंगीच्या निवारणासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात सर्वेक्षण करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. घरोघरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी नागरिकांकडून माहिती गोळा करत असल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी सांगितले. डेंगीवर योग्य ते औषधोपचार घेता यावेत, यासाठी महापालिकेने १७ हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कमला नेहरू आणि नायडू हॉस्पिटल येथे तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दवाखाना नव्हे; आजारांचे आगारच

$
0
0

महापालिकेच्या सुतार दवाखान्यात उपचार, स्वच्छतेची ऐशीतैशी; दुर्लक्ष कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बाळाच्या तपासणीसाठी लांबलचक रांगेत थांबलेल्या महिला...खाटांची सोय नसल्याने महिला आणि पुरुषांना बाकावरच सलाइन लावेलेले...'केसपेपर' आणि औषध घेण्यासाठी उभारलेल्या आणि विस्कळीत झालेल्या रांगेत आपला क्रमांक येण्यासाठी बाचाबाची करणारे नागरिक...दवाखान्यातील कोपऱ्यांना गुटखा आणि पानमसाला थुंकून आलेली 'झळाळी'...इमारतीच्या आजूबाजला पसरलेले घाणीचे साम्राज्य...अशा प्रतिकूल परिस्थितीत डेंगी आणि चिकुनगुनियावर उपचारच उपलब्ध नाही... अशी भीषण अवस्था गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास कोथरूडमधील पुणे महापालिकेच्या सुतार दवाखान्यात आढून आली.
नागरिकांच्या सोयीसाठी कोथरूड गावठाणमध्ये सुतार दवाखाना आहे. मात्र, महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या दवाखान्याला विविध समस्यांनी विळखा घातला आहे. पूर्वी या दवाखान्यात केवळ बाळंतपणाची आणि लहानग्यांच्या तपासणीची सोय होती. कालांतराने ओपीडी, क्षयरोग, दंतचिकित्सा, नेत्र तपासणी आदींची सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, महापालिकेचे दुर्लक्ष, अपुरे मनुष्यबळ आणि तपासणीसाठी अपुरी यंत्रणा यांमुळे दवाखान्याचा बोजवारा उडाला आहे.
शहरात डेंगी, चिकुनगुनियाची साथ सुरू आहे. कोथरूड, बावधन, कर्वे नगर, वारजे आदी भागातील रुग्ण तपासणीसाठी सुतार दवाखान्यात येतात. मात्र, रुग्णांसाठी आवश्यक खाटा आणि उपचाराची यंत्रणाच येथे उपलब्ध नाही. त्यामुळे आलेल्या रुग्णांची साधी तपासणी आणि हिमोग्रॅम पाहिले जाते. त्यानंतर औषधे देऊन त्यांना घरी पाठविण्यात येते. डेंगीमध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी आढळल्यास रुग्णाला नायडू हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला देण्यात येतो. दवाखान्यात रुग्णवाहिका असूनही संबंधिताला रिक्षा किंवा खासगी वाहनाने पाठविण्यात येते.
प्रस्तुत प्रतिनिधी गुरुवारी दवाखान्यात हजर असताना दोन रुग्णांची दवाखान्याच्या आवारातील बाकावरच तपासणी करुन सलाइन लावल्याचे चित्र आढळले. त्यानंतर काहीच वेळात पुरुष रुग्णाला नायडू रुग्णालयात तर, महिलेला घरी पाठविण्यात आले. संबंधित महिलेला अशक्तपणामुळे चालणेही शक्य नसताना तिला घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, सुतार दवाखान्यात डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचीही कमतरता आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.
...........
दवाखाना की कचराकुंडी?
सुतार दवाखान्याच्या इमारतीमध्ये तळ मजल्यावर स्वच्छतागृह आहे. स्वच्छतागृहाचा परिसर अतिशय गलिच्छ असून, बाहेरच्या बाजूला नागरिकांनी गुटखा आणि पानमसाल्याच्या पिचकाऱ्या मारून भिंती रंगवल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील स्वच्छातागृह बंद असल्याने रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांच्या गैरसोयीत भर पडत आहे. दवाखान्यात प्रवेश करताक्षणीच अस्ताव्यस्त पडलेल्या चपला निदर्शनास येतात. इमारतीच्या दोन्ही बाजूला टाकाऊ वस्तू आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तेथून डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दवाखान्यातील ही भयावह स्थिती पाहून सामान्य नागरिकही आजारी पडण्याची शक्यता असल्याची भीती रुग्णाच्या नातेवाइकाने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनपावलांनी गौराई आली...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आली..आली गौराई, सोन्या-रुप्याच्या पावलानं..' 'आली,..आली गौराई, धनधान्याच्या पावलानं..' गणरायाबरोबरच माहेरपणासाठी येणाऱ्या महालक्ष्मींचे गुरुवारी घराघरात मंगलमय वातावरणात महिलांनी स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मींचा यथोचित सन्मान केला. आज, शुक्रवारी गौरींचे महापूजन होणार असून, त्यांना नैवेद्य दाखविण्यात येईल.
महालक्ष्मीचे आगमन हा महिलांचा आवडता सोहळा ठरतो. घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी आणि रेखीव, कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिला महालक्ष्मींचे स्वागत करतात. शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचे सजावटीचे काम सुरू असते. नोकरदार स्रिया मात्र, रात्री जागून जय्यत तयारी करतात. यंदाही घराघरात महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे. गणरायापाठोपाठ गुरुवारी ज्येष्ठा आणि कनिष्ठा माहेरवाशीणी म्हणून घराघरात दाखल झाल्या. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या, पितळ्याच्या तर काही ठिकाणी सात खड्यांच्या रूपांत गौरीचे आगमन झाले. नदीवर जाऊन महिलांनी सात खडे आणले. बाजारपेठेत गौरींच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध असल्याने महिलांनी यंदाही गौरींसाठी नवीन दागिन्यांच्या खरेदीवर भर दिला. आकर्षक रोषणाई, फराळाची आरास, सजविलेल्या घरांमध्ये साड्या, नाजूक दागिने परिधान करून दाखल झालेल्या गौरींनी वातावरणात चैतन्यमय रंग भरले. गौराईचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशांनी चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवले जातात, त्याला गौरी चालवणे असे म्हणतात. विविध रंगाच्या फुलांची आरास करून सजावट केलेल्या गौराईचे स्वागत करताना 'गौरी चालवण्याची' प्रथाही आवर्जून पाळली.
गौराईचे आगमन झाल्यानंतर आज, शुक्रवारी तिचे पूजन केले जाणार आहे.
..
फूल बाजारात गर्दी
माहेरपणाला येणाऱ्या महालक्ष्मींच्या स्वागताची तयारी करताना महिलांची गुरुवारी धावपळ झाली. घरात गौरींचे आगमन झाल्यानंतर संध्याकाळी महिलांनी दुसऱ्या दिवशीच्या पूजेचे साहित्य आणि भाजीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. गौरी पूजनाला विविध प्रकाची फुले आणि नैवेद्यामध्ये विविध भाज्यांना विशेष मागणी असते. त्यामुळे या काळात एऱवी भाजी मंडईत बघायला न मिळणाऱी भाजी आणि फुले आवर्जून दाखल होतात. यंदा पाऊस चांगला झाल्याने बाजारपेठांमध्ये फुलांची आवक चांगली झाली असून, बहरलेल्या बाजारपेठा बघताना डोळ्यांना सुखद अनुभव मिळतो आहे. गणरायाच्या पाठोपाठ येणाऱ्या महालक्ष्मींचे गुरुवारी दुपारनंतर घराघरात आगमन झाले. त्यांचे स्वागत केल्या महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली. महात्मा फुले मंडई, शनिपार, गुलटेकडी यांसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये महिलांची लगबग सुरू होती. बहुतांश महिला नोकरी करीत असल्याने त्यांनी दुकानातूनच रेडिमेड फराळाचे पदार्थ विकत घेतले. फुलांच्या बाजारात निशिगंध, अॅस्टर, शेवंती, मोगरा, गौरींचे हात यांसह पत्री आणि दुर्वांना सर्वाधिक मागणी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड, हडपसरमध्ये पोलिसांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

पोलिसांवर हल्ले करण्याचे सत्र सुरूच असून, गुरुवारी असून हडपसर आणि दौंड भागात पोलिसांना मारहाणीचे दोन प्रकार घडले.

वाहतूक नियम करणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सनीदादा पोळ (वय २३, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता) व दत्ता रमेश लखन (वय २३, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी हडपसर वाहतूक शाखेच्या सोनाली संतोष कांरडे (वय २७, रा. पंधरा नंबर) यांनी फिर्याद दिली आहे. गांधी चौकात कारंडे या वाहतूक नियमन करीत होत्या. या वेळी माळवाडी रस्त्याकडून गांधी चौकात बंदी असतानाही दत्ता आणि रमेश यांनी दुचाकी आणल्या. कारंडे यांनी त्यांना अडविले असता, दोघे त्यांच्यावरच धावून गेले आणि शिवीगाळ केली.

दोंड येथे चार जणांच्या टोळक्याने कर्तव्य बजावित असणाऱ्या पोलिस शिपायाला मारहाण केली. संदेश रामकृष्ण सूर्यवंशी असे शिपायाचे नाव आहे. मारहाण केल्यानंतर या टोळक्याने पोलिस ठाण्यात जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. धरम हनुमंत बनसोडे (वय ४६), प्रतीक धरम बनसोडे (वय२४), मंगेश साठे (वय ३१), सिद्धांत बोराडे (वय २६ सर्व रा. दौंड) यांना अटक करण्यात आली. सूर्यवंशी गोलराउंड येथे नाकाबंदी करत असताना एसआरपी कँपमार्गे दौंडकडे ट्रक वळत असताना सूर्यवंशी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ट्रक न थांबविता पाटसमार्गे वेगाने जाऊ लागल्याने सूर्यवंशी यांनी पाठलाग करून ट्रक अडवला. या प्रकरणातील आरोपी धरम उर्फ पप्पू बनसोडे हा बहुजन रयत परिषदेचा माजी पदाधिकारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाउडस्पीकरचे दिवस वाढविण्याची मागणी

$
0
0

पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवातील अखेरचे पाच दिवस पूर्वीप्रमाणे राज्य सरकारने रात्री बारा वाजेपर्यंत लाउड स्पीकरची परवानगी देण्याची मागणी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे. महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी राव यांची भेट घेतली. या बाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशाराही जगताप यांनी दिला.

खडकमाळआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संजय बालगुडे, साखळीपीर तालीम मंडळाचे रवींद्र माळवदकर, हत्ती गणपती मंडळाचे श्याम मानकर यांच्यासह अनेक मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्य सरकारकडून गेली दहा वर्षे गणेशोत्सवात अखेरचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र, भाजप सरकारने नव्याने अध्यादेश काढून बारापर्यंत परवानगीचे दिवस पाचवरून चार केले. त्यामध्ये गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस, पाचवा दिवस, सातवा आणि विर्सजन मिरवणुकीचा दिवस आदींचा समावेश आहे. या आदेशाने मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. पुणेकरांना उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी पूर्वीप्रमाणे शेवटचे पाच दिवस १२ वाजेपर्यत स्पीकर्स वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राव यांच्याकडे करण्यात आली.

गणेशोत्सव मोडीत काढण्याचा डाव

अशा प्रकारचे आदेश देऊन शहराचा गणेशोत्सव मोडीत काढण्याची राज्य सरकारची खेळी आहे, या शब्दात महापौर प्रशांत जगताप यांनी निर्णयाचा निषेध केला. उत्सवात‌ स्पीकर वाजविण्याचे दिवस कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शहराचे पालकमंत्री गिरीश बापट यांना या निर्णयाची माहिती असतानाही त्यांनी विरोध का केला नाही. सरकारच्या निर्णयावर बापट गप्प का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारच्या निर्णयावर मंडळांची भूमिका ठरविण्यासाठी आज, शुक्रवारी (९ सप्टेंबर) केसरीवाड्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, असे महापौरांनी सांगितले.

महापौरांचा मुख्यमंत्र्यांना फोन

लाउडस्पीकरच्या परवानगीबाबत महापौर प्रशांत जगताप यांनी रात्री उशिरा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. सरकारने उशिराने आदेश काढल्याने राज्यातील सर्वच गणेश मंडळांवर अन्याय होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, अखेरच्या पाच दिवसांत लाउडस्पीकर रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर, शुक्रवारी तातडीने बैठक घेऊन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्‍यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गणेशोत्सवादरम्यान पुण्यात ११ आणि १३ सप्टेंबरलाही रात्री १२ पर्यंत लाउडस्पीकरना परवानगी देण्याची मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली असून, त्यानुसार सुधारीत शासन आदेश काढण्याचे आश्वासन दिल्याचे बापट यांनी सांगितले. त्यामुळे पुण्यात १२ आणि १४ सप्टेंबर वगळता ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान पाच दिवस लाउडस्पीकर रात्री १२ पर्यंत सुरू राहू शकतील. राज्य सरकारने या विषयी या पूर्वी काढलेल्या आदेशाविषयी गणेशोत्सव मंडळांना वेळेत कल्पना न मिळाल्याने, पुण्यातील मंडळांमध्ये नाराजी पसरल्याची बाब बापट यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. आदेशात तातडीने दुरुस्ती केल्यास पुण्यात उत्सवादरम्यान त्याचा उपयोग होणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानुसार मुख्यमंत्र्‍यांनी या विषयीच्या आदेशात तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्याचे बापट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुमाल ठरतोय एसटीसाठी डोकेदुखी

$
0
0

जागेसाठी सीटवर रुमालासह वस्तू ठेवण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांचे वाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये सीट निश्चित करण्यासाठी सीटवर रुमाल किंवा वर्तमान पत्र टाकण्याचा प्रकार एसटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. एखादी वस्तू टाकून सीट निश्चित करणारे आणि गर्दीतून वाट काढत जागा मिळविणारे प्रवासी यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद होतात. अनेकदा या वादामुळे बस पोलिस स्टेशनलाही न्यावी लागते. त्यामुळे एसटीचा वेळ व पैसा वाया जातो, तर वेळप्रसंगी प्रवाशांचाही वेळ वाया जातो.

एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी आपल्याकडे आजही मोठ्या प्रमाणावर एसटी बसचा वापर केला जातो. ठराविक मार्गांवर एसटीने प्रवास करणाऱ्यांची कायमच गर्दी असते. स्टँडवर प्रवाशांची गर्दी असल्यास बसमध्ये जागा निश्चितीसाठी अगदी पहिल्या स्टँडपासून प्रवासी किंवा त्यांचे नातेवाइक रुमालासह विविध प्रकारच्या वस्तू खिडकीतून सीटवर ठेवतात. अनेक जण गर्दीतून वाट काढत सीटपर्यंत पोहोचतात. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर सीटवर रुमाल टाकलेला असतो. काही जण रुमाल पाहून तेथे बसणे टाळतात, तर काहीजण रुमाल बाजूला करून त्या सीटवर बसतात. त्यामुळे संबंधित दोन्ही प्रवाशांमध्ये वाद होतो. गेल्या आठवड्यात जेजुरीमार्गे जाणाऱ्या पुणे-पंढरपूर गाडीत दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. वादात सहभागी असलेल्या महिलेने तिच्या नातेवाइकांना फोन करून पुढील स्थानकावर बोलावून घेतले. नातेवाइक पोहोचल्यावर जागेचा वाद हाणामारीपर्यंत गेला. अशा वादामध्ये कंडक्टरने मध्यस्थी करावी. रुमाल टाकून जागा निश्चित करणे अवैध आहे, हे सबंधितांना सांगावे, असे अनेकांना वाटते. पण, कंडक्टरही बहुतांश वेळा बघ्याची भूमिका घेतात. जे कंडक्टर या विरोधात मत मांडतात, त्यांच्यासोबतही प्रवासी वाद घालतात.

एसटी महांमडळाकडे प्रवाशांचे वाद आणि प्रवासी व कंडक्टरमधील वादाच्या घटनांची नोंद आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दादागिरी केली जाते. रुमाल टाकून सीट आरक्षित करण्याच्या प्रकाराला प्रतिबंध करणाऱ्या कंडक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिरूर, नारायणगावात महिला कंडक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना ताज्या आहेत. या प्रवृत्तींवर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी 'मटा'कडे व्यक्त केले.

एसटी प्रशासनाने घ्यावा निर्णय

एसटी बसच्या सीटवर खिडकीतून रुमाल टाकून, बॅग टाकून जागा निश्चित करणे योग्य आहे किंवा नाही, याचा अधिकृत निर्णय एसटी महामंडळाने घेण्याची आवश्यकता आहे. कारण, या प्रकारामुळे एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना जागा मिळवताना अडचण निर्माण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images