Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आरोपीची जामिनावर सुटका

$
0
0
खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने कोर्टाने आरोपीची जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

डेंगीचे पेशंट वाढले

$
0
0
शहर आणि ग्रामीण भागात डेंगीच्या आजाराचे थैमान वाढत असून, दिवसेंदिवस पेशंटच्या संख्येत वाढ होत आहे. या आजाराने शुक्रवारी आणखी एक पेशंटचा मृत्यू झाला. यामुळे या आजाराने बळी पडलेल्यांची संख्या सहावर गेली आहे.

स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू

$
0
0
‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे असतानाही उपचार घेण्यासाठी विलंब झाल्याने २५ वर्षीय महिलेचा गुरूवारी मृत्यु झाला. उपचार घेण्यास उशीर केल्याने गेलेला हा ‘स्वाइन फ्लू’चा दुसरा बळी आहे. आतापर्यंत या आजाराने २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

‘आयआरबी’च्या ऑफिसवर छापे

$
0
0
पुण्यातील माहिती अधिकारीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणी सुरू असलेल्या तपासात सीबीआयने आयआरबी’शी संबंधित चार कार्यालयांवर शुक्रवारी दिवसभर छापे घातले. शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी ‘आयआरबी’सह काही व्यक्तींवर शंका व्यक्त केल्याने त्या दृष्टीनेही तपास करण्यात येत आहे.

पोलिसांनी भुरट्या पोलिसाला पकडले

$
0
0
मुंबई येथे कुरिअर कंपनीत २० लाख रुपयांची रोकड घेऊन जाणा-या पुण्यातील तरुणाला पोलिस असल्याच्या बहाण्याने दोघांनी लुटले. सुदैवाने, दत्तवाडी पोलिस आणि दोघा नागरिकांनी एका चोरट्याला पाठलाग करून, पकडून त्याच्या ताब्यातील २० लाख रुपयांची रोकड जप्त केली.

शिक्षणपद्धतींची वाटचाल समांतर हवी

$
0
0
देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने उच्चशिक्षणाच्या प्रसाराची वाढती गरज भागविण्यासाठी दूरस्थ शिक्षणपद्धती आणि पारंपरिक शिक्षणपद्धतींनी समांतर वाटचाल करण्याची गरज असल्याचे मत केंद्राच्या दूरस्थ शिक्षण परिषदेचे (डीईसी) संचालक डॉ. भारत भूषण यांनी शनिवारी व्यक्त केले.

SP चे विद्यार्थी देणार ६४ कलांची माहिती

$
0
0
विस्मरणात चाललेल्या ६४ भारतीय कलांची माहिती तरुण पिढीला व्हावी, यासाठी एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी लेखनाचे शिवधनुष्य पेलले असून लवकरच या लेखक विद्यार्थ्यांचे ‘भारतीय (६४) चौसष्ट कला’ हे पुस्तक सर्वांना उपलब्ध होणार आहे.

शौर्य, समर्पणाला हवी तांत्रिक कौशल्याची जोड

$
0
0
‘लष्करात सामील होताना शौर्य आणि समर्पणभावाने बरोबरच काळाच्या गरजेनुसार आधुनिक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणेही आवश्यक आहे,’ असे मत १२ कॉर्प्स तुकडीचे प्रमुख आणि बॉम्बे सॅपर्सचे कर्नल कमांडंट, लेफ्टनंट जनरल एमएमएस राय यांनी शनिवारी व्यक्त केले.

डेंगीसह साथीच्या आजारांवर लक्ष द्या

$
0
0
राज्यात सुरू असलेल्या डेंगीसह मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारांच्या साथी नियंत्रित करण्याकडे देशातील सर्व राज्यांनी लक्ष द्यावे, असे आदेश केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांना दिले आहेत.

डीपीमधील काही उपसूचना गरिबांसाठी अन्यायकारक

$
0
0
‘जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होममध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के बेड्स राखीव ठेवण्याची सुविधा बंद करणे, मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायट्यांना प्रीमियम आकारणे या उपसूचना गरीब आणि मागासवर्गावर अन्याय करणा-या आहेत.

‘गड्या, आमुचा गावच बरा’

$
0
0
महानगरपालिकेच्या हद्दीत २८ नवीन गावांचा समावेश करण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली असली, तरी पालिका हद्दीत समाविष्ट होण्यासाठी बहुतांश गावांनी विरोध केला आहे.

शहराच्या अनेक भागात मंगळवारी पाणी नाही

$
0
0
जलकेंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे करायची असल्याने येत्या मंगळवारी शहरातील काही परिसरात पाणीपुरवठा केला जाणार नसल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे.

दीपोत्सवाच्या स्वागताला बाजारात झगमग

$
0
0
दिवाळीपूर्वीचा वीकएंड, मुलांच्या संपलेल्या परीक्षा आणि चाकरमान्यांच्या खिशात खुळखुळणारा पगार-बोनस असा तिहेरी योग शनिवारी जुळून आला आणि लक्ष्मी रोड, तुळशीबागेसह शहरातील मध्यवर्ती परिसर गणेशोत्सवानंतर पुन्हा गर्दीने फुलून गेला. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची अलोट गर्दी झाल्याने शनिवारी या भागातून चालणेही मुश्कील बनले होते.

नगरसेवकांना प्रशासनाने टोलविले

$
0
0
सर्वसाधारण सभेपुढे सादर झालेल्या विकास आराखड्यातील (डीपी) नकाशे आणि डीसी रूल्सच्या प्रती मिळाव्यात, अशी मागणी करणा-या नगरसेवकांना प्रशासनाच्या टोलवाटोलवीला शनिवारी तोंड द्यावे लागले. अखेर त्यांना प्रती उपलब्ध करून देण्यास प्रशासन राजी झाले. दरम्यान, काँग्रेसने आता आस्ते कदम धोरण स्वीकारल्याने ‘डीपी’चे प्रकाशन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

$
0
0
उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाणा-या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पळवून नेली. शिवाजीनगर येथील सुमन नर्सिंगजवळ शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजता ही घटना घडली.

‘डीपी’तील आरक्षणांची स्थळ पाहणी

$
0
0
पुणे महापालिकेच्या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) नगरविकास विभागामार्फत फेरबदल करण्यात आले असून त्यातील आरक्षणांच्या जमिनींची स्थळपाहणी करण्यात येणार आहे. या स्थळपाहणीनंतर त्यावर आलेल्या हरकती व सूचनांचा अहवाल राज्य सरकारला पाठविला जाणार आहे.

जुन्नरला शेतात आढळले बिबट्याचे ३ बछडे

$
0
0
जुन्नर तालुक्यातील बोरी गावामधील संभाजी पिंगळे यांच्या उसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना ऊस तोडणी मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून असून या बछड्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वनविभागाकडून ती पिले आर्इजवळ सोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बिबवेवाडीत स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी

$
0
0
बिबवेवाडी येथील स्मशानभूमी रस्त्यावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील पोर्चचा स्लॅब कोसळून ‌सात मजूर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि कं‌त्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती.

सदनिकाधारकांनीच व्हॅट भरणे अपेक्षित

$
0
0
मूल्यवर्धित कर(व्हॅट) हा अप्रत्यक्ष कर असून तो ‘एंड यूजर’ म्हणजे ग्राहकानेच डीलर म्हणजे बिल्डरकडे भरणे अपेक्षित असून बिल्डरने तो सरकारकडे भरणे अपेक्षित आहे, असे मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने शनिवारी म्हटले आहे. दरम्यान, व्हॅट भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी आणि एक टक्का दरानेच त्याची वसूली करावी, अशा मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या आहेत.

बर्फाच्या कारखान्यात तळवडेत वायू गळती

$
0
0
तळवडे येथील बर्फ तयार करणा-या कारखान्यातील रबरी पाइप तुटून शनिवारी (३ नोव्हेंबर) सकाळी अमोनिया वायूची गळती झाली. तळवडेतील श्री स्वामी समर्थ कारखान्यात सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. परिसरात काही काळ घबराट पसरली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images