Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हजारो कैदी पॅरोल, फर्लोविना

$
0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : बलात्कार, खून, दरोडा, अमली पदार्थ व दहशतवादी कृत्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुट्टी न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या गुन्ह्यांत राज्यातील जेलमध्ये साधारण पाच हजार आठशे कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे या कैद्यांना आता पॅरोल आणि फर्लोचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कैद्यांना पॅरोल व फर्लो दिल्यानंतर गंभीर गुन्ह्यांतील कैदी परत जेलमध्ये आले नसल्याचे काही प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे कैद्यांना दिल्या जाणाऱ्या या सुट्ट्यांबाबत सरकारने आपले धोरण कडक केले आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक बसविण्यासाठी बलात्कार, खून, दरोडा, लहान मुलांचे अपहरण, मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी व दहशतवादी कृत्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुट्टी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जेलमध्ये सध्या खून केल्याप्रकरणात पाच हजार दोनशे कैदी शिक्षा भोगत आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यांत २३६, दरोड्याच्या गुन्ह्यांत १२३ आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत ८४ कैदी शिक्षा भोगत आहेत. तसेच, दहशतवादी कृत्य व लहान मुलांच्या अपहरणात सुमारे पन्नास कैदी शिक्षा भोगत आहेत. या कैद्यांनादेखील आता यापुढे पॅरोल आणि फर्लोच्या सुट्टीचा लाभ मिळणार नाही. तर, या गुन्ह्यांत साडेसात हजार कैद्यांवर कोर्टात खटले सुरू आहेत. यामध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांनादेखील या सुट्टीचा लाभ मिळणार नाही.

राज्य सरकारने पॅरोल व फर्लोची सुट्टी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांपर्यंत शिक्षा झालेल्या कैद्यांना नात्यातील व्यक्ती आजारी असेल तसेच मुलामुलीच्या लग्नासाठी पूर्वी तीस दिवसांची पॅरोलची सुट्टी दिली जात होती. कैद्यांना ही सुट्टी ९० दिवसांपर्यंत वाढवून घेणे शक्य होते. पण, आता पॅरोल सुट्टीची कमाल मर्यादा ९० दिवसांवरून ६० दिवस आणि फर्लोची २८ दिवसांवरून २१ दिवसांवर आणण्यात आली आहे. सरकारने या सुट्ट्या कमी करून कैद्यांवर कायद्याचा वचक बसविण्याचा प्रयत्न केला आहे.

आपत्कालीन पॅरोल सात दिवसांची

जेलमधील सर्व कैदी आपत्कालीन पॅरोलसाठी पात्र असतील. आई, वडील, मुलगा, पत्नी, भाऊ, बहीण यांचा मृत्यू, यांच्यापैकी कोणी गंभीर आजारी असेल तसेच भाऊ, बहीण आणि मुलगा यांच्या विवाहासाठी कैद्यांना आपत्कालीन पॅरोल दिला जाईल. हा पॅरोल सात दिवसांसाठीचा असेल. त्यामध्ये वाढ होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्मार्ट सिटी’साठी सल्लागार मंडळ

$
0
0

लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्मार्ट सिटी'मध्ये शहरातील सर्व घटकांचा विचार व्हावा, या उद्देशाने 'सल्लागार मंडळ' स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने देशातील सर्व शहरांना दिले आहेत. 'स्मार्ट सिटी'च्या संचालक मंडळापासून दूर असलेल्या लोकप्रतिनिधींसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना या सल्लागार मंडळात स्थान देण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येच सल्लागार मंडळाचा उल्लेख केला गेला होता. देशातील अनेक शहरांमध्ये 'स्मार्ट सिटी'साठी स्वतंत्र कंपनी स्थापन होऊन त्याचे कामही सुरू झाले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये लोकप्रतिनिधींना कोणतेही स्थान नसल्याबाबतची नाराजी वारंवार व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अखेर 'स्मार्ट सिटी'साठी सल्लागार मंडळ स्थापन करण्याच्या स्पष्ट सूचना सोमवारी दिल्या आहेत.

स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे या सल्लागार मंडळाचे निमंत्रक असतील. या मंडळामध्ये संबंधित शहराचे महापौर, खासदार, विधानसभा सदस्य यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश केला जावा, असे सूचित करण्यात आले आहे. त्यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, झोपडपट्टी संस्था-संघटनांचे पदाधिकारी, टॅक्स असोसिएशनचे सदस्य आणि नागरिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष किंवा चिटणीस यांनाही सल्लागार मंडळामध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या सल्लागार मंडळाची लवकरात लवकर स्थापना करावी आणि त्या संदर्भातील सविस्तर अहवाल नगरविकास मंत्रालयाला सादर करण्यात यावा, असेही केंद्राच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

'स्मार्ट सिटी'च्या संचालक मंडळात अधिकाऱ्यांचा सर्वाधिक भरणा आहे. कंपनीच्या १५ संचालकांमध्ये पालिकेचे केवळ सहा पदाधिकारी आहेत. त्यामुळे शहरातील सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय राहावा आणि 'स्मार्ट सिटी'च्या अंमलबजावणीमध्ये संचालक मंडळाला योग्य सल्ला-मार्गदर्शन मिळावे, या हेतूने सल्लागार मंडळाची रचना करण्यात आली आहे.

.................
सल्लागार मंडळात सर्वपक्षीयांना स्थान

या सल्लागार मंडळात शहरातील सर्व खासदारांचा समावेश करण्यात येणार असल्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, अनिल शिरोळे यांच्यासह वंदना चव्हाण, संजय काकडे आणि अनू आगा यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या विधानसभेवर निवडून आलेल्या आठही आमदारांनाही सल्लागार मंडळात स्थान प्राप्त होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ग्राहकांकडून झेंडूच्या फुलांना अपेक्षित मागणी नसल्याने शेतकऱ्यांना झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. मार्केट यार्डात फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने एका किलोसाठी ५ ते २० रुपये दर मिळाला आहे.
मार्केट यार्डातील फुलबाजारात सोमवारी झालेली आवक ही रविवारच्या तुलनेत कमी होती. गणरायाच्या स्वागतामध्ये पुणेकर गुंतले होते. त्यामुळे झेंडूच्या फुलांच्या खरेदीकडे त्यांनी पाठ फिरविली. सोमवारी बाजारात आलेला झेंडू मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला. झेंडूला मागणी नसल्याने आणि मिळालेले दरदेखील कमी असल्याने शेतकऱ्यांना झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ आली. मार्केट यार्डात झेंडूच्या एका किलोसाठी ५ ते २० रुपये दर मिळाला आहे. कोलकाता जातीच्या झेंडूची कमी प्रमाणात आवक झाली आहे. त्याच्या एका किलोसाठी २० ते ३० रुपये दर मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यासह वाई, सातारा, टेंभुर्णी येथून झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी आली होती. त्या प्रमाणे गुलछडीलाही मागणी कमी झाल्याने दर उतरले आहेत. यवत, बारामती, सोपतापवाडी येथून गुलछडीची आवक झाली होती. त्याला मागणी कमी असल्याने एका किलोसाठी ९० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. कर्नाटकातून शेवंतीची आवक झाली. शेवंतीला एका किलोसाठी १५० ते २०० रुपये दर मिळाला आहे. गेल्या दोन आठवड्यात सातत्याने झेंडूचे दर कमी होत असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे व्यापाऱ्यांसह शेतकरी सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​रतनगडावरचा रिद्धी-सिद्धी गणेश

$
0
0

- अजय काकडे
रतनगड... सह्याद्रीतल्या दुर्गरत्नांमध्ये असणारं एक अमोलिक रत्न म्हणून रतनगड भटक्या मंडळींना परिचित आहे. या गडावर वर्षभर ट्रेकर मंडळींचा राबता असतो. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा परिसरात या गडाचे स्थान आहे. सह्याद्रीचे विहंगम दर्शन या परिसरात घडते. गडाजवळ प्रवरा नदी उगम पावते आणि त्यावर भंडारदरा हे धरण बांधलेले आहे. रतनगडावरील गुहा आणि पाण्याची टाकी, पायथ्याच्या रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर हे सगळे पाहता गडाचा पुरातन इतिहास खुणावू लागतो. या गडावरचे बाप्पा आग‍ळे-वेगळे नसतील तरच नवल. गडाच्या हनुमान दरवाजामध्ये आपल्याला रिद्धी-सिद्धी गणराय दर्शन देतात आणि आपण तिथे पोहोचल्याचे सार्थक होते. दरवाज्याच्या उजव्या बुरूजावर हे देखणे गणेशशिल्प आहे. एका बाजूला रिद्धी-सिद्धी गणराय तर दुसरीकडे हनुमानाचे शिल्प आहे. गणरायाचे हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प पाहताना त्याच्या प्राचीनत्वाची साक्ष पटते. गणरायाच्या हातात शस्त्र आहेत. बैठक आणि एकूणच शिल्पाची धाटणी फारच वेगळी आहे. पुणे-संगमनेर आणि तिथून अकोले-राजूर-भंडारदरा-रतनवाडी या मार्गे गडावर जाता येते. दुर्गम जागी वसलेल्या या गणेशाचे दर्शन आवर्जून घ्यायला हवे.
(लेखक वारसा अभ्यासक आहेत)
--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सप्तमातृका आणि गणेश

$
0
0

- आनंद कानिटकर
गुप्त राजांच्या काळात (इ. स. पाचवे /सहावे शतक) गणेशमूर्तींची संख्या वाढलेली दिसून येते. या काळात गणपतीची मूर्ती कशी असावी, याची माहिती वराहमिहिराच्या बृहतसंहिता (इ. स. ६वे शतक) या ग्रंथात देण्यात आलेली आहे. ज्यात तो गजमुख, लंबोदर, परशुधारी असावा, तसेच त्याच्या हातात मुळा असावा, असे नमूद केले आहे. उत्तर भारतात उदयगिरी, अहिच्छत्र, भितरगाव, देवगढ, राजघाट इत्यादी ठिकाणी गुप्त काळातील मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्तींची वैशिष्ट्ये म्हणजे या गणपतींचे हत्तीचे शीर नैसर्गिक आहे. त्यावर मुकुट अथवा अलंकार नाही. सर्व गणपती डाव्या सोंडेचे आहेत. देवगढ येथील गणेश मूर्तीच्या हातात मोदक पात्र नाही; परंतु परशू, मुळा घेतलेला दिसतो. त्याचीच जागा नंतरच्या काळात हस्तिदंताने घेतली. या मूर्तींच्या सोबत उंदीर नाही. या मूर्ती अलंकार विरहित आहेत. नागयज्ञोपवित मात्र आहे. त्यामुळे बौधायन गृह्य सूत्र व बौधायन धर्म सूत्र या ग्रंथांमध्ये वर्णन केलेली हस्तिमुख, एकदंत, लंबोदर ही विनायकाची विशेषणे गुप्तकाळातील या मूर्तींना लागू पडतात. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये विनायकाला मुळा, मोदक अर्पण करावे, असे सांगितले आहे.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात घारापुरी व वेरूळ येथील शैव लेण्यांतून गणेशाच्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला दिसतात. घारापुरी येथील लेण्यात शिव नटराजाच्या शिल्पपटात गणेश कोरलेला आढळतो. इतकेच नाही, तर येथील शिव-पार्वतीच्या विवाहप्रसंगाच्या शिल्पपटात देखील विविध देवतांसह गणेशाचे शिल्प आढळते.
वेरूळ येथील शैव लेण्यांतून गणेशाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यापैकी रामेश्वर लेणे व कैलास लेणे येथील गणेश हा सप्तमातृकांसह आहे. सप्तमातृका विविध देवांच्या शक्ती आहेत. ज्यांत ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेंद्री आणि नारसिंही यांचा समावेश होतो. यांनी शिवाला अंधकासूर वधाच्या वेळी मदत केली होती. या सप्तमातृका त्यांच्या बालकांसोबत दाखवतात. यांच्या सोबत वीरभद्र आणि गणेशही दाखवला जातो. 'सुप्रभेदागम' या ग्रंथात गणेश सप्तमातृकांसोबत दाखवावा, असे सांगितले आहे. या सप्तमातृकांसोबत दाखवल्या गेलेल्या गणेशाच्या अत्यंत सुंदर मूर्ती वेरूळच्या रामेश्वर व कैलास लेण्यात आहेत.
या सप्तमातृकापट्टाचा वापर इथेच न थांबता नंतरच्या काळात निर्माण होणाऱ्या मंदिरांमध्येही करण्यात आला. इसवी सनाच्या ११ ते १३व्या शतकात निर्माण झालेल्या अनेक शैव मंदिरांमध्ये मंडपात वीरभद्र गणेशासह सप्तमातृकापट्ट देवकोष्ठात विराजमान असतो. अशा रीतीने शैव पंथातील परिवार देवतांमध्ये गणपतीचा समावेश होऊन त्याला पुढील काळात मंदिराच्या मंडपातील देवकोष्ठात स्वतंत्र स्थान मिळालेले आढळते.

(लेखक भारतीयविद्यातज्ज्ञ आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धी दे गणनायका!

$
0
0

श्रीगणपती हे दैवत केवळ मोक्षसाधना करणाऱ्या गणेश भक्तांचेच नाही; तर शूरवीरांचेही आहे. तो विनायक आहे, तो गणपती आहे, तो तेहतीस कोटी देवांचा सरनोबत आहे, तो क्रांतिकारकांचा आणि समेजसेवकांचा आदिदेव आहे. गणेशोत्सव झालाच पाहिजे, उत्साहात आणि आनंदात तो गाजला पाहिजे; पण त्यात थिल्लरपणा आणि अमंगळ धिंगाणा कधीच येऊ नये.
......
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
........
गौरी-गणपती यांचा भाद्रपदातील उत्सव महाराष्ट्रात केव्हा सुरू झाला, हे सांगणे अवघड आहे. गौरी-गणपतीचे महात्म्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये गेली निदान एक हजार वर्षे निश्चित चालू आहे. कोणतेही मंगल कार्य सुरू करताना श्रीगणेशाचे स्तवन आणि पूजन हे केले जातेच. मग ते ग्रंथलेखन असो, की गडकोटांचे बांधकाम असो. श्रीज्ञानेश्वर माउलींनी आपला अलौकिक ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिताना श्रीगणेशाचे प्रथम स्तवन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग अन् साजरा-गोजरा यासारखे प्रचंड दुर्ग बांधले. तेही प्रथम श्रीगणेशाचे पूजन करूनच.
सुदैवाने आज राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी गडांवर महाराजांनी पूजन केलेल्या श्रीगणेशाच्या मूर्ती आणि मंदिरे अस्तित्त्वात आहेत. (श्री ज्ञानेश्वरी ग्रंथात गाणी, शाहीराचे पोवाडे, लावणी असो, त्यात प्रथम वंदन श्रीगणेशाला केले आहे.) श्रीगणेशाची लोकप्रियता महाराष्ट्रात प्रचंड आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात राजमाता जिजाऊसाहेब आणि बालशिवाजीराजे हे प्रथम रहावयास आले तेव्हा त्यांनी पहिले नमन आणि पूजन केले श्रीकसबा गणपतीचे. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे; पण एक विशेष गोष्ट अभ्यास करताना जाणवते की, मुघल सरदार शास्ताखान हा पुणे काबीज करून ऐन कसबा पेठेतच शिवाजी राजांच्या लाल महालात राहिला.
या लाल महालापासून कसब्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर फारतर पाऊणशे पावलावर असेल; पण औरंगजेबाच्या या मामाने म्हणजे शास्ताखानाने या गणेश मंदिराला कोणताही उपद्रव दिल्याची नोंद नाही. आणखी एक गंमत सांगू? पुण्याचा कसबा गणपती खूप ऐतिहासिक आहे. शिवाजीराजांच्या आधीही हा श्रीगणेश होता. राज्य अहमदनगरच्या निजामशहाचे होते. राज्याचा मुख्य वजीर होता मलिक अंबर. या अंबरानेही या गणेशाची आस्थाव्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी 'श्री'स उत्पन्न सुरू ठेवले होते. कसबा गणपतीचे विशेष महत्त्व सांगायचे तर आजही पुण्यातल्या लग्नकार्याचे किंवा कोणत्याही शुभकार्याचे पहिले निमंत्रण या गणपतीला दिले जाते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यावरही पहिला मानाचा गणपती म्हणून पालखी डोलत असते ती श्रीकसबा गणपतीची.
श्रीगणपती हे दैवत केवळ मोक्षसाधना करणाऱ्या गणेश भक्तांचेच नाही; तर शूरवीरांचेही आहे. तो विनायक आहे, तो गणपती आहे, तो तेहतीस कोटी देवांचा सरनोबत आहे, तो क्रांतिकारकांचा आणि समेजसेवकांचा आदीदेव आहे. सार्वजनिक गणेशोत्सव पुढे पुण्यात सुरू झाला. खरोखर, या उत्सवाची कल्पना ज्यांच्या अंतःकरणात प्रथम उमलली ते थोर प्रतिभावंतच. या उत्सवाच्या संकल्पनेचा उगम शनिवारवाड्यातच असावा. कारण गणेश उत्सवासंबंधीची कागदपत्रे पेशवे दफ्तरात सापडतात. कलावंतांचा आणि विद्यावंतांचा फार मोठा सन्मान श्रीकृष्णाच्या श्रावणाइतकाच श्रीगणेशाच्या भाद्रपदातही केला जात होता. शनिवारवाड्यात दोन उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जात. पहिला श्री कृष्णजन्मोत्सव आणि दुसरा श्रीगणेशोत्सव. कृष्णजन्मोत्सवाच्या कृष्णमंडपात मस्तानीचा नाच होत असे.
गणेशोत्सवात मात्र मस्तानीचा नाच झाल्याची नोंद सापडत नाही; पण तो होत असावा, असे वाटते. नट, नटवे, कीर्तनकार, शाहीर यांचे कार्यक्रम वाड्यात होत असत. रसिकांना आणि गणेशभक्तांना ही मोठी पर्वणीच असे. या उत्सवाला सार्वजनिक गणेशोत्सव का म्हणू नये? पेशवाई बुडाल्यावर पुढे बराच काळ‍हा उत्सव विश्रामबाग वाड्यात चालत असे. हे आज कुणाला माहिती आहे का? श्रीमंत नानासाहेब खासगीवाले, श्रीमंत भाऊसाहेब रंगार आणि सर्वमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तर या उत्सवाचा आनंद कल्लोळ केवळ पुण्यातच नव्हे; तर अवघ्या महाराष्ट्रात फुलविला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची उत्सवमूर्ती आजही प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देत आहे.
माझे स्वतःचे माझ्या शिशू वयापासून प्रेरणास्थान पुण्यात शालूकरांच्या बोळातील श्री भाऊ रंगारी यांच्या श्रीगणेश मूर्तीत आहे. गेली ९५ वर्षे मी आमच्या कुटुंबीयांसह अतिशय उत्साहाने या स्फूर्तिदायक गणेशाचे दर्शन घेत आहे. मी स्वतः आजही तिथे रमतो. शाळेच्या सुट्टीत मी नेहमीच या गणपतीचे दर्शन घेत आलो आहे. लहानपणी तर मी तास न् तास तिथं ताटकळत असे. श्री भाऊ रंगारी हा गणेश एका राक्षसाला आवेशाने ठार मारतो आहे, असे त्याचे दर्शन आहे. हा राक्षस म्हणजे, त्यावेळचा सत्ताधीश इंग्रज होता. आज मला त्या राक्षसाच्या जागी अज्ञान, आळस, सामाजिक भेदाभेद, भ्रष्टाचार आणि चैनबाजी एकवटलेली दिसते. आमचा आजचा हा शालूकर मार्गावरील रंगारी गणेश आम्हाला हाच आदेश देत आहे! गणेशोत्सव झालाच पाहिजे, उत्साहात आणि आनंदात तो गाजला पाहिजे; पण त्यात थिल्लरपणा आणि अमंगळ धिंगाणा कधीच येऊ नये, असे मनापासून वाटते. याकरिता बुद्धी दे गणनायका!
............
(शब्दांकन : प्रसाद पवार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चिंतामणी शरण चरण’

$
0
0

आदिदेव गणपतीला नमन करूनच आपण शुभकार्याची सुरुवात करतो. पूर्वी तर विविध संस्थाने, राजे-रजवाड्यांच्या मुद्रांमध्येही गणेशाचे नाव प्रथम घेतले जायचे. विविध शिक्क्यांच्या स्वरूपातील या गणेशमुद्रा...
................
- मंदार लवाटे
शिक्का अर्थात मुद्रा ही जुन्या पत्रांमधील महत्त्वाची गोष्ट. शिक्का असला म्हणजे जणू काही लेटरहेडच. शिवाजी महाराजांची मुद्रा तर प्रसिद्धच आहे. या मुद्रा पत्राच्या वर, पत्राच्या वरच्या भागात डाव्या-उजव्या बाजूस; तसेच मागील बाजूस उमटविलेल्या आढळतात. ज्या व्यक्तींच्या प्रति आदर व मान आहे, त्यांना लिहिलेल्या पत्राच्या मागील बाजूस मुद्रा उमटविलेल्या असतात. बऱ्याच पत्रांमध्ये मुद्रांमध्ये उपास्य दैवताचे नाव असलेले आढळते. गणपती हे अनेकांचे लाडके, आवडते दैवत. त्यामुळे, गणपतीचे नाव मुद्रांमध्ये अनेक भक्तांनी आवर्जून घेतलेले आढळते. गणपतीचे नाव असलेल्या या मुद्रा गोल, कोयरीच्या आकाराच्या आढळतात. मुद्रेमध्ये गणपतीचे नाव असलेली शिवकालीन मुद्रा म्हणजे महाराजांचे दानाध्यक्ष पंडितराव मोरेश्वर यांची. 'चिंतामणी चरण शरण' अशी ही मुद्रा होती. पटवर्धन घराणे हे तर गणपतीचे भक्तच. त्यांच्या घराण्याच्या सुरुवातीच्या पिढ्यांमधील त्रिंबक हरी यांची मुद्रा 'मंगलमुर्ती चरणी तत्पर हरीसुत निरंतर' अशी होती. ही चांदीची मुद्रा अजूनही त्यांच्या पुण्यातील वंशजांकडे आहे. इतिहासप्रसिद्ध परशुराम भाऊ पटवर्धन यांची मुद्रा 'श्री गणपती श्री पंतप्रधान चरणी तत्पर रामचंद्रसुत परशराम निरंतर' अशी होती. चंद्रचूड घराण्यातही गणेशभक्त होऊन गेले. त्यापैकी यशवंतराव गंगाधर यांची मुद्रा 'श्री मयुरेश्वर चरणी तत्पर यशवंतराव गंगाधर निरंतर' अशी आढळते. ही मुद्रा कोयरीच्या आकाराची आहे. निरनिराळ्या सुभेदारांच्या मुद्रांमध्ये गणपतीचे नाव घेतलेले आढळते. रत्नागिरीच्या सुभेदारांची 'श्री श्री हेरंब चरणी तत्पर दिनकर विश्वनाथ निरंतर' अशी मुद्रा असल्याचे १८०२ चे पत्र आहे. १८१७ साली इंग्रजी राज्य सुरू झाले. तरीसुद्धा मुद्रा उमटवून पत्र लिहिली जात. 'श्री मोरेश्वर चरणी तत्पर केसो बाबदेव निरंतर' अशी १८२५ च्या पत्रावर मुद्रा पाहावयास मिळते. इतकेच नाही तर सांगली, मिरज, जमखिंडी, कुरुंदवाड या पटवर्धनांच्या राज्यांमध्ये १९४७ पर्यंत निरनिराळ्या कागदपत्रांवर गणपतीच्या मुद्रा उमटविलेल्या आढळतात. खरं तर पेशवे हे गणपतीचे निस्सीम भक्त; पण त्यांच्या मुद्रांमध्ये गणपतीचे नाव न आढळता सातारकर महाराजांचेच नाव आढळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्व काही सरकार करेल, ही भूमिका नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सर्व काही सरकार करेल, ही भूमिका सोडून आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. समाजाच्या प्रयत्नांना पुढे सरकारी पातळीवर धोरणांचे आणि सर्वसमावेशक स्वरूप देणे शक्य आहे. समाजाच्या सक्रिय सहभागातूनच लोकशाही यशस्वी होऊ शकते', असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी रविवारी व्यक्त केले.
ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. ल. वि. (आप्पासाहेब) आगाशे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आगाशे कुटुंबीयांच्या वतीने डॉ. ल. वि. आगाशे स्मृती पुरस्कार धर्माधिकारी यांच्या हस्ते सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) या संस्थेला देण्यात आला. या प्रसंगी सीसीएसचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे, डॉ. बी. एम. करमरकर आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे, चित्रा सहस्रबुद्धे, राजाराम आगाशे, सुरेखा साने, सुजाता देशमुख आदी आगाशे कुटुंबीय उपस्थित होते.
दरडींची पूर्वसूचना देण्यासाठी सीसीएसने सुरू केलेल्या सतर्क या उपक्रमाचा दाखला देत धर्माधिकारी यांनी सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. ते म्हणाले, 'नागरिक जितके सतर्क आणि सक्रिय असतील, तितकी लोकशाही यशस्वी होत असते. सर्वकाही सरकारने करावे, ही अपेक्षा योग्य नाही. समाजाने पुढाकार घेतल्यास त्याला सरकारी पातळीवर धोरणाचे व्यापक स्वरूप देणे शक्य असते.'
डॉ. शौचे म्हणाले, 'संशोधन संस्था आणि नागरिकांच्या समन्वयातून विज्ञानाला अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनवणे शक्य आहे. अनेक मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधताना मोठ्या प्रमाणात आवश्यक असणारी शास्त्रीय माहिती जमा करण्यामध्ये, विज्ञान प्रसारामध्ये नागरिक आणि शास्त्रज्ञ एकत्रितपणे काम करू शकतात. सीसीएसच्या कामातून या समन्वयाची यशस्वी उदाहरणे पाहता येतात.' या वेळी जनसहभागातून चालणाऱ्या वैज्ञानिक प्रकल्पांवर सीसीएसच्या सभासदांनी सादरीकरण केले.
----
'दख्खनच्या पठाराचा ध्यास घेतलेला शास्त्रज्ञ'
'आयुष्यभर दख्खनच्या पठाराला ध्यास बनवलेल्या डॉ. आगाशे यांनी महाराष्ट्रात भूगर्भ अभ्यासकांची पिढीही घडवली,' अशी भावना डॉ. करमरकर यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे केलेल्या संशोधनातून दख्खनच्या पठाराचे नेमके स्वरूप आणि बारकावे डॉ. आगाशे यांनी जगासमोर आणले. महाराष्ट्राच्या भूकवचाबद्दलचे त्यांचे सखोल ज्ञान राज्यातील अनेक धरणे बांधतानाही उपयोगी पडले. त्यांच्या सल्ल्यामुळे अनेक ठिकाणी शासनाची कोट्यवधी रुपयांची बचतही झाली. शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक अशा दुहेरी भूमिकेतून त्यांनी अनेक भूगर्भशास्त्रज्ञांना घडवले', असेही डॉ. करमरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात वीस टक्के मुले लठ्ठ...

$
0
0

'आयएमए' देणार मुलांसह पालकांना वजन कमी करण्याचे धडे
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या दहा वर्षांत ५ ते १८ वर्षापर्यंतच्या लहान मुलामुलींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले असून त्याचे गांभीर्य वाढले आहे. पुण्यात या वयातील मुलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण हे २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मुलांसह पालकांना आता वजन कमी करण्याचे धडे देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेने पुढाकार घेतला आहे.
पुण्यासारख्या विविध शहरांमध्ये सध्या फास्टफूड खाण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. पालकांच्या कृतीचे मुलांकडून अनुकरण केले जात आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्या पिण्याच्या सवयी देखील बदलत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आपोपआप शरीरावर होत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत धावपळीच्या युगात आणि बैठे कामाच्या सवयीमुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. तीच स्थिती लहान मुलांमध्ये येऊ लागली आहे. हीच लहान मुले मुली प्रौढ झाल्यावर त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
'पुण्यात ५ ते १८ वयातील लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. १८ ते २० टक्के मुलांमध्ये अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणा असल्याचे दिसते. पूर्वी १०-१५ वर्षापूर्वी १२ टक्के मुलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण होते. हे प्रमाण दहा वर्षात वाढले आहे. त्यामुळे पालकांसह लहान मुलांमध्ये जनजागृती करण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा प्रयत्न आहे. त्यासाठी लहान मुलांसह पालकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तीन महिने पालकांसह मुलांना लठ्ठपणा कमी करणे, वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. मुलांसह पालकांनी देखील याचे धडे गिरविल्यास त्यामुळे दहा टक्के मुलांमध्ये वजन कमी होऊ शकते,' असा दावा या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. जयंत नवरंगे यांनी केला.
या संदर्भात पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शनिवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग उपस्थित होते. त्या वेळी बारा वर्षाखालील टेबल टेनिसपटू पृथा वर्टीकर हिचा सत्कार करण्यात आला. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश गोखले, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. जयंत जोशी, डॉ. शरद आगरखेडकर, आहारतज्ज्ञ डॉ. अपर्णा लेले यांनी मार्गदर्शन केले. लहान मुलांच्या समस्या आणि त्यांच्यातील लठ्ठपणाचे वाढते प्रमाण यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
...
लठ्ठपणाचे तोटे
गुडघ्यांचे आजार उद्भवणे
रक्तदाब वाढणे
हृदयविकाराचा त्रास वाढणे
मधुमेह
कार्यशक्ती कमी होणे
हालचाल मंदावणे
अपचन वाढणे, गॅसेस तयार होणे
महिलांमध्ये वंध्यत्व तयार होणे
प्रतिकारशक्ती कमी होणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षकांना आहे, त्या ठिकाणी नियुक्त करा

$
0
0

मॅट कोर्टाचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील मुदतपूर्व बदल्या करण्यात आलेल्या निरीक्षकांना मॅट कोर्टाने दिलासा दिला आहे. बदली करण्यापूर्वी ज्या पदावर हे निरीक्षक कार्यरत होते, त्याच ठिकाणी पुन्हा निरीक्षकांना नियुक्त करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत. यापूर्वी आठ कर्मचाऱ्यांना देखील कोर्टाच्या आदेशावरून पूर्वीच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर अन्य ५३ कर्मचारी मॅट कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या देखील पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ता करण्यात आल्या होत्या.
पुण्यातील निरीक्षकांचा 'डिफॉल्ट रिपोर्ट' महासंचालक कार्यालयात सादर करत बदल्या करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर पुणे शहर पोलिस दलातील निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे आयुक्तालयाच्या अखत्यारित नसलेल्या राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचा देखील 'डिफॉल्ट रिपोर्ट' पुण्यातून सादर झाला. त्यामुळे याबाबत काही अधिकाऱ्यांनी गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे ग्राऱ्हाणे मांडले होते.
बदल्या झाल्यानंतर मॅट कोर्टात धाव घेतलेल्या पुण्यातील काही निरीक्षकांच्या पुन्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे हे अधिकारी पुन्हा मॅट कोर्टात गेले होते. तेव्हा कोर्टाने आयुक्तालयाला फटकारत या बदल्या रद्द करून सर्वांना आहेत्या ठिकाणी नियुक्त करण्याचे आदेश दिले. पुणे शहर पोलिसदलातील खांदेपालट झाल्यावर अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच दुफळी तयार झाली होती. बदल्या करण्यासाठी जो 'डिफॉल्ट रिपोर्ट' सादर करण्यात आला, त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त करण्यात आल्याने खात्यांतर्गत नाराजीचा सूर उमटला होता. दरम्यान, हा आदेश आल्यावर दोन दिवसांपूर्वी चार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
०००
या अधिकाऱ्यांना मिळाला दिलासा
पुणे शहर पोलिस दलातील निरीक्षक मिलिंद गायकवाड, अरुण सांवत, रघुनाथ फुगे, सुनिल पवार, सिताराम मोरे, श्रीकांत नवले, राजेंद्र मोकाशी, स्मिता जाधव, रेहना शेख, बाळासाहेब सुर्वे, आर. एम. तोडकर, संदीपान सावंत, बी. आर. नाईकवडी व सहायक निरीक्षक ए. बी. वाघमारे आणि पुणे ग्रामीण मधील पोलिस निरीक्षक एस. बी. देवकर, कैलास पिंगळे, एन. एम. सारंगकर, बी. व्ही. मुंढे, ए. डी. इंदलकर यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातील निरीक्षक ए. बी. लेंगरे (रायगड), डी. टी. कचरे, के. एन. पाटील, ए. बी. शिंदे (सोलापूर), एस. एम. गायकवाड (सीआयडी कोल्हापूर), एस. जी. शिंदे (पालघर), ए. के. बोदाडे, एस. के. यादव (सीआयडी पुणे), एम. एच. मोरे (नवी मुंबई), यू. जी. देसाई (सहायक निरीक्षक सातारा) यांना देखील कोर्टाने दिलासा दिला आहे.
-------
बैठकच बेकायदा
बदल्या करण्यासाठी जी बैठक बोलाविण्यात आली होती, त्या बैठकीसाठी प्रिन्सिपल सेक्रेटरींना बोलाविण्यात आले नव्हते. प्रिन्सिपल सेक्रेटरींना किमान बैठकीसाठी आमंत्रित करणे तरी अपेक्षित होते. परंतु तसे करण्यात आले नाही. त्यामुळे ही बैठकच बेकायदा असल्याचे कोर्टाने आदेशात नमूद केले, असे अॅड. पूनम महाजन यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणरायचे जल्लोषात स्वागत

$
0
0

ढोल-ताशांच्या गजरात आणि मोरया मोरयाच्या गजरात उत्सवाला सुरुवात
म. टा. प्रतिनिधी पिंपरी
ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोरया... मोरयाच्या गजरात सोमवारी (५ सप्टेंबर) सकाळपासूनच उद्योगनगरीत उत्साही वातावरणात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कारखान्यात, घरोघरी, आणि सार्वजनिक मंडळांकडून श्रींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहत सायंकाळपर्यंत सुरू होती.
गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या अबालवृद्धांच्यामोठ्या उत्साहात प्रचंड जल्लोषात पिंपरी-चिंचवडकरांनी लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी सकाळपासुनच ढोल ताशांचा गजरात बाप्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत सकाळपासूनच गर्दी झाली होती. बाजारपेठांमधून मूषकावर बसलेले, गरूडावर आरूढ झालेले किंवा सिंहासनावर विराजमान झालेले, तसेच कृष्ण, महादेवाच्या, हनुमान, शिवाजी महाराज, जेजुरीचा खंडोबा यांच्या रूपातील बाप्पा दिसत होते.
घरोघरी आपापल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना वाजत गाजत आणले गेले. दुर्वा, फुले, धूप, दीप, पंचारती अशी साग्रसंगीत तयारी पूजेसाठी करण्यात आली होती. पूजा साहित्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. घरोघरीच्या बाप्पांच्या स्वागताबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील कारखाने, कार्यालये, दुकान आदी ठिकाणीही गणपतीची स्थापना करुन प्रत्येकाने आपापल्या परीने बाप्पांचे जोरदार स्वागत केले.
घरगुती गणरायांच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी सकाळी साडेसहा ते दुपारी दीड पर्यंतचा मुहूर्त होता. शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजाअर्चा करून गणरायाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक करण्यामध्ये घरातील महिलामंडळ व्यग्र झाले होते. काही महिलांनी दुकानांमधून मोदक विकत घेण्यास पसंती दिली.
शहरातील गणेश मंडळांचीही सकाळपासूनच धावपळ सुरू होती. ढोलताशे, बँडपथक, ध्वजपथक, सनई-चौघड्याच्या निनादात रथामध्ये किंवा पालखीमध्ये बसवून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत होती. मिरवणुका संध्याकाळपर्यंत सुरू होत्या.
०००
पत्र्यावळ्यांपासून गणपती
कल्पकता आणि कलाकुसर व रंगसंगतीच्या पत्र्यावळ्यांतून पिंपरीतील जयहिंदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदा गणपती तयार केला आहे. शाळेचा नऊ दिवसाचा गणपती आहे. गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी ही सर्व बच्चे कंपनी गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम सुरू होते. शाळेचे पर्यवेक्षक श्याम साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यापूर्वी विद्यार्थ्यांनी पेपरच्या रद्दीपासून, नारळ, पेपरच्या चहाच्या कपापासून विविध आकारतील गणपती तयार केले होते. यंदा हे चौथे वर्ष आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या योगदानांतून खर्च केला आहे. या संकल्पनेत दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
रेडीमेड मोदकांना मागणी
प्रसादासाठी उकडीच्या मोदकांना सालाबादाप्रमाणे शहरात मोठी मागणी होती. व्हॉट्सअॅप वरून देखील मोदकांचे बुकिंग घेण्यात येत होते. शहरातील चिंचवडगाव, अजमेरा, प्राधिकरण तसेच पिंपळेसौदागर मधील अनेकांकडे उकडीचे मोदक घेण्यासाठी गर्दी होती. प्रसिद्ध स्वीट मार्टमध्ये मिळणाऱ्या मोदकांपेक्षा घरगुती मोदकांना भाविकांनी अधिक पसंती दिली.
कडेकोट बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहुंताश कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहर पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव दलाची एक कंपनी, शीघ्रकृती दलाचे पथक शहरात तळ ठोकून आहे. बॉम्बशोधक-नाशक पथक, श्वान पथकाकडून प्रमुख मंडळाची पाहणी करण्यात येत आहे. ही दोन्ही पथक देखील पुढील दहा दिवस शहरात असणार आहेत.
दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी घाट
घरगुती गणेशोत्सवापैकी दीड दिवसांच्या बाप्पांचे विर्सजन करण्यासाठी महापालिकेने नदीघाटांवर हौद बांधले आहेत. चिंचवडगाव, निगडी प्राधिकरण (गणेश तलाव), पिंपरी, सांगवी, भोसरी, हिंजवडी, कासारवाडी-दापोडी नदी घाटांवर महापालिका, अग्निशामन दलाचे जवान आज, मंगळवारपासून (६ सप्टेंबर) तैनात असणार आहेत.
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजत-गाजत आले गणराय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मनामनांतील चिंता आणि नैराश्याचे सावट दूर करून उत्साह आणि मांगल्याचा प्रसाद घेऊन गणराय सोमवारी वाजत गाजत विराजमान झाले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे.
विघ्नहर्त्या श्री गणरायाचे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. 'श्रीं'चे घरोघरी आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 'श्रीं'ची मूर्ती घेण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने बाजारात दाखल झाल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त दुपारी दीडपर्यंत असल्याने सकाळच्या प्रसन्न वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यावर पुणेकरांनी भर दिला. विधिवत पूजा व आरास करण्यात घरोघरची मंडळी रंगून गेली होती. आवडत्या मोदकाचा प्रसाद गणरायाला दाखविण्यात आला. नंतर पुणेकरांनी उकडीच्या मोदकावर यथेच्छ ताव मारला.
सार्वजनिक गणेश मंडळांनीही मोठ्या दिमाखात व मिर‍वणूक काढून विघ्नहर्त्या विनायकाचे स्वागत केले. मानाचे पाच गणपती म्हणजे पुण्याचे वैभव. दगडूशेठ गणपती म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान. मंडईची शारदा गजाननाची विलोभनीय मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू, तर भाऊ रंगारीची मूर्ती गणरायाच्या शक्तीस्थानाचे प्रतीक. अशा या मंडळांबरोबर शहरातील उत्सवाची परंपरा सांगणाऱ्या सर्व मंडळांच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळपासूनच ढोल-ताशाच्या निनादात मिरवणुका निघाल्या होत्या. पारंपरिक वेशात तरुणाई मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. मिरवणुकांमुळे शहरातील मध्यभागात उत्साहाला उधाण आले होते. काही मंडळांच्या मिरवणुका सायंकाळपर्यंत सुरू होत्या. उपनगर भागातील मंडळांनीही सायंकाळी गणरायाची प्रतिष्ठापना केली. काही मंडळांनी गणरायाच्या आगमनाबरोबर देखाव्यांचेही उद्घाटन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल-ताशांचे नियम पथकांनी टोलविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मनामनांतील चिंता आणि नैराश्याचे सावट दूर करून उत्साह आणि मांगल्याचा प्रसाद घेऊन गणराय सोमवारी वाजत गाजत विराजमान झाले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे.
विघ्नहर्त्या श्री गणरायाचे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. 'श्रीं'चे घरोघरी आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 'श्रीं'ची मूर्ती घेण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने बाजारात दाखल झाल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त दुपारी दीडपर्यंत असल्याने सकाळच्या प्रसन्न वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यावर पुणेकरांनी भर दिला. विधिवत पूजा व आरास करण्यात घरोघरची मंडळी रंगून गेली होती. आवडत्या मोदकाचा प्रसाद गणरायाला दाखविण्यात आला. नंतर पुणेकरांनी उकडीच्या मोदकावर यथेच्छ ताव मारला.
सार्वजनिक गणेश मंडळांनीही मोठ्या दिमाखात व मिर‍वणूक काढून विघ्नहर्त्या विनायकाचे स्वागत केले. मानाचे पाच गणपती म्हणजे पुण्याचे वैभव. दगडूशेठ गणपती म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान. मंडईची शारदा गजाननाची विलोभनीय मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू, तर भाऊ रंगारीची मूर्ती गणरायाच्या शक्तीस्थानाचे प्रतीक. अशा या मंडळांबरोबर शहरातील उत्सवाची परंपरा सांगणाऱ्या सर्व मंडळांच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळपासूनच ढोल-ताशाच्या निनादात मिरवणुका निघाल्या होत्या. पारंपरिक वेशात तरुणाई मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. मिरवणुकांमुळे शहरातील मध्यभागात उत्साहाला उधाण आले होते. काही मंडळांच्या मिरवणुका सायंकाळपर्यंत सुरू होत्या. उपनगर भागातील मंडळांनीही सायंकाळी गणरायाची प्रतिष्ठापना केली. काही मंडळांनी गणरायाच्या आगमनाबरोबर देखाव्यांचेही उद्घाटन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवजड वाहन उलटल्याने एक्स्प्रेस वेवर कोंडी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळील उतारावर मालवाहतूक करणारा अवजड ट्रक बंद पडल्यामुळे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे आठ तास ठप्प झाली होती. वाहनांच्या सुमारे पाच ते सात किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ही घटना सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.

दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वेवरील अमृतांजन पुलाजवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भर रस्त्यात ट्रक उलटला होता. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन बंद होऊन वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती कळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम जोशी व एम. आर. काटकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळा (वळवण) एक्झिट येथून जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्ग व एक्स्प्रेस वेवरील खंडाळा एक्झिटजवळील आपत्कालीन छेद मार्गावरून विरुद्ध बाजूने पुणे-मुंबई मार्गावर वळविली. तत्पूर्वी पोलिसांनी या घटनेची माहिती आयआरबी कंपनीला कळविली. आयआरबीने बंद पडलेले वाहन हटविण्यासाठी क्रेन आणि कुलरचा वापर केला. मात्र, अवजड वाहन असल्याने अनेक वेळा कुलरचा पट्टा तुटला. अखेर दोन क्रेनच्या साह्याने दुपारी अडीच वाजता वाहन बाजूला करण्यास पोलिसांना यश आले. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्विटरवर बाप्पांचे ‘इमोजी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहा दिवसांच्या आनंदोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. बाप्पांचं आगमन घरा-घरांत, मना-मनांत आणि रस्त्यावरच्या सार्वजनिक मंडळांमध्ये नेहमीच्या उत्साहानं झालंय. कोणाचा दीड, कोणाचा पाच, कोणाचा सात, तर कोणाच्या घरी दहा दिवस बाप्पा विराजमान राहणार आहेत. घरच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा असो, वा सार्वजनिक बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची मिरवणूक, आजच्या पिढीला उत्सवासारखा 'इव्हेंट' सर्वांबरोबर साजरा करायचा असतो. त्यामुळं, अगदी सकाळी सातपासूनचं व्हॉट्स-अप आणि फेसबुकच्या वॉलवर 'मोरया'चं दर्शन सुरू होतं.

फेसबुक आणि व्हॉट्स-अपचा वापर आता अनेकांच्या सरावाचा भाग झालायं. जगभरात, किमान देशात तरी कोणती गोष्ट 'ट्रेंडिंग' आहे हे पाहण्यासाठी आजकाल ट्विटरचा आधार घेतला जातो. एखादी गोष्ट ट्विटर वापरणाऱ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी 'हॅशटॅग' (#) चा वापर केला जातो. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच ट्विटरवरही 'गणेश', 'गणेश चतुर्थी', 'गणेशोत्सव' असे हॅशटॅग इंग्रजी आणि मराठीतून झळकले. आता, यात काय नवीन आहे, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविकचं आहे. तर, या हॅशटॅगसोबत बाप्पाचं 'इमोजी'ही ट्विटरवर प्रथमचं झळकलं. मराठी आणि इंग्रजीतील या तिन्ही हॅशटॅगच्या पुढेच बाप्पाचं इमोजी सर्व ट्विट करणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतं होतं. ट्विटवरून सर्वाधिक 'अॅक्टिव्ह' असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांनी ही वार्ता मग 'ट्विट' करूनच समस्त महाराष्ट्रवासीयांपर्यंत आणि जगभरातील मराठी लोकांपर्यंत पोहोचवली.

बाप्पांच्या आगमनाबरोबरच ट्विटरवरच्या या नव्या हॅशटॅगलाही अल्पावधीतच अनेकांनी आपलंसं केलं. गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी असो वा, आपल्या घरच्या बाप्पांचं दर्शन ट्विटरकरांना घडवण्यासाठी सोमवारी दिवसभर या हॅशटॅगचा सर्वाधिक वापर झाला. ट्विटरवर 'गणेशचतुर्थी' हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये पहिल्या दोन-तीन क्रमांकावरील स्थान टिकवून होता.

महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवाचं जनमानसातलं स्थान हेरून त्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या ट्विटरवरच्या या नव्या प्रयोगाचं स्वागत करायलाचं हवं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौथ्या फेरीसाठी १४ हजार जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अकरावीच्या कॉलेजला प्रवेश घेता येण्यासाठी चौथ्या विशेष फेरीसाठी १४ हजार ९९७ रिक्त जागा जाहीर केल्या. जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि अद्याप ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येणार आहे.

त्यासाठी विद्यार्थ्यांना आज मंगळवारी ६ ते गुरुवारी ८ सप्टेंबर या कालावधीत माहिती पुस्तिका विकत घ्यावी लागणार आहे. या माहिती पुस्तिकेत नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्डचा समावेश आहे. त्याआधारे विद्यार्थ्यांना http://pune.fyjc.org.in वेबसाइटवर ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायचे आहेत. प्रवेश अर्जातील भाग एक भरायचा असून, त्याचे अॅप्रूव्हलही घ्यायचे आहे.

याच कालावधीत अॅप्रुव्हल घेतल्यानंतर प्रवेश अर्जातील भाग दोनमधील पसंतीक्रमाचा अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज ८ सप्टेंबरला सायंकाळी सहापर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर १० सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती समितीने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा पोहोचले सातासमुद्रापार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवसेंदिवस परदेशातील गणेशोत्सव अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेले किंवा काही वर्षांकरिता परदेशात गेलेले मराठीजन गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. गणेशोत्सवासाठी दर वर्षी पुण्यातून परदेशात मूर्ती पाठवल्या जातात. यंदाच्या उत्सवासाठीही मोठ्या प्रमाणात मूर्ती पाठविण्यात आल्या होत्या. गणरायाच्या मूर्ती सुखरूप पोहोचल्या असून परदेशातील मराठी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.

परदेशातील गणेशभक्तांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ग्राहक पेठेसह अन्य ठिकाणी गणेशमूर्तींची आगाऊ नोंदणी केली होती. त्यानुसार विविध कुरिअर कंपन्यांकडून मूर्ती पाठण्यात आल्या आहेत. ग्राहक पेठेतून अमेरिकेला ८०० तर ऑस्ट्रेलियाला ६५० मूर्ती पाठविण्यात आल्या आहेत. अनेक जण नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झाले आहेत. हे लोक दर वर्षी न चुकता गणेशमूर्ती विकत घेण्यासाठी येतात. परदेशातून घरगुती मूर्तींनाच मागणी आहे आणि छोटीशी आटोपशीर मूर्ती परदेशी नेली जाते. कारण लहान मूर्ती प्रवासातून नेण्यास योग्य असते. मुंबईचा लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेठ गणपती प्रसिद्ध आहे. दोन्ही गणेशांच्या मूर्ती आकर्षक आहेत. लालबागचा राजा आणि दगडूशेठ या गणेशमूर्तींना जास्त मागणी होती. याबरोबरच कुरियर कंपन्यांकडून विक्रेत्यांना पाठवण्यात आलेल्या मूर्तींनाही मोठ्या प्रमाणात मागणी होती.

ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी सांगितले, 'दर वर्षी मूर्तींसाठी परदेशातून नोंदणी होते. विंग्ज कार्पोरेशन या कुरिअर कंपनीच्या साह्याने या वर्षीही परदेशात मूर्ती पाठविण्यात आल्या होत्या. ग्राहक पेठेतून अमेरिकेला ८०० तर ऑस्ट्रेलियाला ६५० मूर्ती पाठविण्यात आल्या. यासाठी एक महिना आधीपासून तयारी सुरू होती. गणरायाच्या मूर्ती वेळेत पाठवल्याने त्या योग्य वेळेत पोहोचू शकल्या. परदेशातील मराठीजनांनी या मूर्तींची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबार करणाऱ्यांनी तरुणालाही लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाषाण टेकडीवर पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार करणाऱ्यांनी घटनेपूर्वी टेकडीच्या खाली फोनवर बोलत उभा असलेल्या एका व्यक्तीलाही लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांवर गोळीबार झाला त्या ठिकाणी गावठी पिस्तुल सापडले आहे. चतुःश्रुंगी पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस या आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
सुस खिंडीतील पाषाण टेकडीवर शनिवारी रात्री हवालदार गुंड आणि शिपाई शेख गस्त घालत होते. त्यावेळी टेकडीवर संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांना अडवून चौकशी केली. अंगझडती घेत असताना त्यांच्यातील एकाने एअरगनमधून गुंड यांच्यावर गोळी झाडली आणि शेख यांच्या कपाळवर एअरगनने हल्ला केला होता. पोलिसांवर गोळीबाराच्या घटनेपूर्वी एक तास अगोदर याच आरोपींनी टेकडीच्या खाली फोनवर बोलत उभारलेल्या तरुणाला मारहाण करुन लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हर्षल नारायण तुपे (वय २४, रा. लॉ कॉलेज रस्ता) याने तक्रार दिली आहे. हर्षल टेकडीच्या पायथाला दुचाकी उभी करून फोनवर बोलत उभा होता. त्यावेळी आरोपी दुचाकीवर आले. त्यांनी हर्षलकडे पाणी मागण्याच्या बहाण्याने त्याला मारहाण करून रोख रक्कम आणि मोबाइल जबरदस्तीने काढून घेतला. या आरोपींची टेकडीवर पोलिसांबरोबर झटापट झाली होती. त्यात आरोपींचा अंगावरचा शर्ट फाटला होता. तो शर्ट हर्षलला दाखवल्यानंतर त्याने तो ओळखला.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू केली आहे. परिसरातील झोपडपट्या आणि बांधकाम साइटवरील कामगारांकडे पोलिसांनी तपास केला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांची तीन पथके व गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर आहेत, अशी मा​हिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवाचा दमदार श्रीगणेशा

$
0
0

पारंपरिक पद्धतीने मानाच्या बाप्पांची प्रतिष्ठापना

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ढोलाच्या ठेक्याला ताशाची साथ मिळाल्याने झालेला गजर, त्यावर मनसोक्त थिरकणारी तरुणाई, श्रींच्या आगमनासाठी विविधरंगी फुलांनी सजवलेल्या रथातून निघालेली मिरवणूक आणि मानाच्या गणपतींचा दिमाखदार थाट पुणेकरांना सोमवारी अनुभवायला मिळाला.
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या मानाच्या गणपती मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी उत्साह निर्माण करून खऱ्या अर्थाने उत्सवाचा दमदार श्रीगणेशा केला. पारंपरिक पद्धतीने मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक यंदाही मुख्य आकर्षण ठरली. या मिरवणुकीमध्ये पाचहून अधिक पथकांनी सहभाग घेतला होता. सकाळी ८.३० वाजता दगडूशेठ मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक, नूमवि, टिळक पुतळा या मार्गाने मिरवणूक पुढे सरकत होती. बरोबर ११ वाजून ५५ मिनिटांनी 'श्रीं'ची इंदूरच्या त्रिपदी परिवाराचे डॉ. बाबासाहेब पराणेकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रभात आणि दरबार ब्रास बँडदेखील या मिरवणुकीत सहभागी होते. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी चौकाचौकात पुणेकरांनी गर्दी केली होती.
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने पालखीतून सकाळी साडेआठच्या सुमारास मिरवणूक सुरू झाली. कसबा गणपतीपासून हमाल वाडा, अप्पा बळवंत चौक, लोखंडे तालीम, लक्ष्मी रोड, कुंटे चौक, बुधवार चौक, जिजामाता बाग़ेतून उत्सवमंडप, असा मिरवणुकीचा मार्ग होता. श्रीराम आणि शिवतेज ढोल-ताशा पथकांनी वादन करून मिरवणुकीत रंगत भरली. परंपरेप्रमाणे प्रभात ब्रास बँड, देवळणकर बंधू यांचे सनई-चौघडा वादन मिरवणुकीमध्ये सहभागी होते. सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी प्रसाद प्रभुणे यांच्या हस्ते 'श्रीं'च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाची सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मंदार लॉज येथून वाजतगाजत मिरवणूक निघाली. शिवमुद्रा पथकाच्या उस्फूर्त वादनाने मिरवणुकीत रंगत आणली. सतीश आढाव यांचे नगारावादन, बाळासाहेब आढाव यांचा न्यू गंधर्व ब्रास बँड मिरवणुकीत सहभागी झाले होते. लोखंडे तालीम, कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता, गणपती चौक, जोगेश्‍वरी मंदिर या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात दाखल झाली. दुपारी दीडच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक मकरंद केळकर आणि अपर्णा केळकर यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक सकाळी ११.३० वाजता सुरू झाली. जयंत नगरकर यांच्या नागरावादनाने वातावरणात रंग भरला, शितळादेवी मंदिर, गणपती चौक, लक्ष्मीरस्ता, नगरकर तालीम, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर, सिटी पोस्ट या मार्गाने मिरवणूक मंडपात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक फुलांची सजावट रथाला करण्यात आली होती. नादब्रह्म, शिवगर्जना, गुरुजी प्रतिष्ठान ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होती. दुपारी २ वाजून ५ पाच मिनिटांच्या मुहुर्तावर मणिलाल गडा यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता गणपती चौकातून सुरुवात झाली. गणपती चौक, नगरकर तालीम, अप्पा बळवंत चौक, मजूर अड्डा, सिटी पोस्ट, गणपती चौक या मार्गाने मिरवणूक मंडपात दाखल झाली. गजलक्ष्मी ढोल-ताशा पथकाने मिरवणुकीत आपली कला सादर केली. दुपारी एकच्या सुमारास मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मंडळाची रमणबाग चौकातून मिरवणूक निघाली. श्रीराम पथकाने लयबद्ध वादन करून उत्साह भरला. दुपारी १२ वाजता डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, प्रणती टिळक यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शारदागजाननाची मनमोहक मूर्ती असलेल्या अखिल मंडई मंडळाने फुलांनी सजवलेल्या रथात श्रींच्या मूर्तींची मिरवणूक काढली. श्रींच्या मुकूटावर घातलेली बाजीराव पगडी भाविकांचे लक्षवेधून घेत होती. उत्सव मंडपातून मंडई पोलिस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भय्या चौक, झुणका भाकर केंद्र, बुरूड गल्ली असा मिरवणुकीचा मार्ग होता. मोरया, मृत्यूंजय, जल्लोष, नूमवि आदी पथके सहभागी झाली होती. १२.१५ वाजता स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक गणपती भवनापासून सुरू झाली. अप्पा बळवंत चौक, उत्सव मंडप या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. सव्वाशे वर्षानिमित्त यंदा प्रथमच मिरवणुकीत भाऊसाहेब रंगारी यांचा पालखी रथ समाविष्ट करण्यात आला होता. अब्दागिरी, छत्रछामर, घोडे, उंट अशा लवाजम्यासह शंभूगर्जना, ताल आणि वाद्यवृंद अशी पथके मिरवणूकीत सहभागी झाली होती. सकाळी ११ वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील बाप्पाचा ‘बर्मिंगहॅम’मध्ये थाट

$
0
0

पुणे : मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणरायाचे देशभरात आगमन झालेले असतानाच विदेशातील मराठीजनांच्याही घरी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. मूळचे पुण्याचे असलेले शिवप्रसाद मठ इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे स्थायिक असून, त्यांचे कुटुंब गेली सात वर्षे मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करते.
विशेष म्हणजे यंदाच्या गणेशोत्सवासाठी 'श्रीं'ची मूर्तीही ते स्वत: पुण्यातून घेऊन गेले आहेत. मराठीजन अत्यंत कमी संख्येने असणाऱ्या बर्मिंगहॅमच्या परिसरात मराठी संस्कृती फुलवण्याचे काम मठ कुटुंबीय गणेशोत्सवाच्या माध्यमातून करत आहेत. शिवप्रसाद मठ पेशाने इंजिनीअर, तर त्यांच्या पत्नी प्राजक्ता या शिक्षिका. मठ कुटुंब दहा वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त बर्मिंगहॅम येथे स्थायिक झाले. या परिसरात मराठी कुटुंब नाही, मूर्ती कुठून घेणार, ती विसर्जित कुठे करणार अशा अडचणींमुळे सुरुवातीची तीन वर्षे त्यांनी गणेशोत्सव साजरा केला नाही. मात्र, आपल्या दोन मुलांना परंपरेची माहिती असावी, त्यांच्यावर संस्कार व्हावेत, या विचारातून मठ दांपत्याने गणेशोत्सवाला सुरुवात केली.
'यंदा आम्ही सुट्टीसाठी पुण्यात आलो होतो. भरत नाट्यमंदिर जवळील दुकानात गणरायाची मनमोहक मूर्ती भावली. त्याक्षणी ती मूर्ती घेण्याचा निर्णय आम्ही घेतला,' मठ सांगत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images