Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

घरच्या घरी साकारा कारंज्याचा देखावा

$
0
0

आकर्षक लायटिंगचे यूएसबी हेल्मेट बाजारात दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संगीतावर नाचणारे कारंजे किंवा लायटिंगची आरास हे सार्वजनिक गणेशोत्सवातील वर्षानुवर्षाचे आकर्षण ठरले आहे. मंडळांचा कारंजे आणि लायटिंगचा देखावा पाहण्यासाठी आपली पावले आजही थबकतात. अशी आरास आणि देखावे यंदाच्या गौरी-गणपतीमध्ये घरीच अनुभवण्यास मिळाले तर...किंवा गौरी, गणपतीसमोर संगीतावर ठेका धरणारे कारंजे, लायटिंगचे यूएसबी हेल्मेट मिळाले तर.. ही कल्पना यंदा सत्यात येणार आहे. संगीतावर ठेका धरणारे कारंजे आणि लायटिंगने बाजारपेठ झळाळून निघाली आहे.
दिव्यांचा उत्सव म्हणजे दिवाळी असे समीकरण असले तरी, गौरी-गणपती या सणांचे दिव्यांशी वेगळे नाते आहे. गौरी-गणपतीची आरास दिव्यांशिवाय अशक्य आहे. यंदाची आरास सजणार आहे, ती 'एलईडी'च्या दिव्यांनी. सध्या बाजारात 'एलईडी'च्या दिव्यांची, माळांची चलती असून, यंदाच्या उत्सवात रोषणाईचा अनोखा झगमगाट अनुभवायला मिळणार आहे.
हात न लावताही माळांचे रंग आणि संगीत दुरूनही रिमोटच्या मदतीने बदलता येणार आहे. घरात कोठेही बसून दिव्यांची मजा अनुभवता येणार आहे. बाप्पाच्या आगमनाचे वेध लागल्याने वातावरण अधिकच चैतन्यदायी झाले आहे. विद्युत माळांनी दुकाने सजली आहेत. बाजारपेठेत 'एलईडी'च्या दिव्यांचा झगमगाट असून आधुनिक, आकर्षक रंगसंगत, वीज बचत आणि कमी किमतीमुळे 'एलईडी'ला अधिक पसंती मिळत आहे. 'एलईडी'च्या विद्युत माळा मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्या आहेत. लहान-मोठ्या आकारातील माळा गणेशभक्तांना आकर्षित करीत आहेत. त्यातच संगीतावर ठेका धरणारे कारंजे आणि लायटिंग यंदाचे आकर्षण बनले आहे.
--------------------
कारंजे, हेल्मेट आणि एलईडीचे झुंबर यंदाचे आकर्षण आहे. कारंज्याची किंमत एक हजार रुपयांपासून, तर तर हेल्मेटची किंमत सातशे रुपये आहे. एलईडी झुंबर अकराशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे. लाइटिंगच्या माळा २० रुपयांपासून ते ५०० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. एलईडी पाइप ५० रुपये मीटर दराने मिळू शकेल. यंदा पाऊस चांगला झाल्याने बाजारपेठेत गर्दी होत आहे.
इंद्रसिंह राजपुरोहित, 'एलईडी'व्यावसायिक
--------
छोट्या छोट्या एलईडी हॅलोजनला मागणी आहे. रंगीत, फिरणारे, चालू-बंद होणारे बल्ब आहेत. कमी-अधिक प्रकाश देणारे आणि विशेष म्हणजे केवळ गणेश मूर्तींवर प्रकाश टाकता येतील असे फोकस उपलब्ध आहेत. या सर्व वस्तू पन्नास-शंभर रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
अमेय कोठावळे, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठी विद्यापीठासाठी सारस्वतांची परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी विद्यापीठ व्हावे, यासाठी पुण्यात साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठी विद्यापीठाच्या मागणीला बळकटी देण्यासाठी या परिषदेत साहित्यिकांचे विचारमंथन होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी यांच्या तर्फे परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, येत्या मंगळवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार भवन येथे ही परिषद आयोजिण्यात आली आहे. मराठी विद्यापीठ अस्तित्वात यावे, यासाठी समविचारी संस्थांनी एकत्र यावे आणि याविषयी व्यापक चर्चा करावी, हा परिषदेचा उद्देश आहे.
परिषदेसाठी मराठी साहित्याच्या जाणकार मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेला संबोधित करतील. त्याचबरोबर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. प्र. ना. परांजपे, हरी नरके, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अनिल गोरे आदींची उपस्थिती असणार आहे. मराठी भाषेचे संवर्धन, जतन, अभिवृद्धी जपण्यासाठी राज्यात मराठी विद्यापीठाची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सरकारकडे प्रयत्न करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची चर्चा या परिषदेत केली जाणार आहे.
------------------------------
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी विद्यापीठाची मागणी होत आहे. मात्र, सत्तेवर आलेल्या कोणत्याही सरकारने ती पूर्ण केली नाही. मराठीच्या संवर्धनासाठी विद्यापीठाची आवश्यकता असून, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही असे विद्यापीठ उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन सकारात्मक चर्चा करणार आहेत.

श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅपद्वारे करा प्राणप्रतिष्ठापना

$
0
0

ज्ञानप्रबोधिनीची निर्मिती; मंत्रोच्च्चारही ऐकण्याची सोय उपलब्ध

म.टा प्रतिनिधी, पुणे
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी पुरोहितांना पाचारण केले जाते. मात्र, सणासुदीच्या दिवसांतील व्यग्रतेमुळे त्यांनाही सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने 'ज्ञानप्रबोधिनी गणेशपूजा' हे मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने पूजेच्या साहित्यासह संपूर्ण विधिवत पूजा करणे शक्य होणार आहे. पूजेच्या वेळी पुरोहितांकडून होणारे मंत्रोच्चारही ऑडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे आता बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना हायटेक पद्धतीने केली जाणार आहे.
सध्याच्या काळात घरच्याघरीच गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी पुरोहितांना पाचारण करून त्यांच्याकडून शास्त्रशुद्ध पूजा केली जात होती. मात्र, सध्या गणपती मंडळांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी व्यग्र असणारे गुरुजी कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे नागरिकांनी विविध कंपन्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींच्या आधारे पूजा करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्ञानप्रबोधिनीमार्फत अँड्रॉइडधारकांसाठी अॅप तयार करण्यात आले आहे. अॅपमध्ये प्राणप्रतिष्ठेसह अन्य पूजांची माहिती नमूद करण्यात आली आहे. या शिवाय पूजेच्या वेळी करण्यात येणाऱ्या मंत्रपठणाचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय संस्कृतमधील मंत्र आणि त्याचा मराठीतील अर्थही देण्यात आला आहे. पूजेची सुरुवात कशी करायची, नेमका कोणता मंत्र म्हणायचा, आचमन किती वेळा करायचे अशी संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
पूजेसाठी लागणारे साहित्य, पूजेची तयारी कशी करावी, मांडणी कशी असावी अशी पूजेपूर्वीची माहितीही अॅपमध्ये आहे. या शिवाय आरती संग्रह, अथर्वशीर्ष, गणेशस्तोत्र अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण अथर्वशीर्षाचा अर्थ या अॅपमध्ये देण्यात आला असून, विधिवत उत्तरपूजाही सांगण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी प्रबोधिनीद्वारे सुरू करण्यात आलेल्या या अॅपचा जगभर प्रसार झाला असून, विदेशातील गणेशभक्तांसाठी ते विशेष उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या अॅपद्वारे ते स्वतः पौरोहित्य करून गणेश पूजा करतात. सध्या ४५०० हून अधिक नागरिक या अॅपचा वापर करतात. केवळ पूजा करायची म्हणून नाही तर आपण करीत असलेल्या विधिवत पूजेचा अर्थ समजून घेण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आल्याचे ज्ञानप्रबोधिनीकडून सांगण्यात आले.
..
कोणतीही पूजा करीत असताना तिचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पूजेतील प्रत्येक विधीला विशिष्ट अर्थ असतो; तो अर्थ पूजा करणाऱ्याला समजला पाहिजे या हेतूने अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. स्वयंपौरोहित्याच्या संकल्पनेवर अॅप आधारले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती होत असून, दिवसेंदिवस या अॅपचा वापर वाढत आहे.
डॉ. आर्या जोशी, पौरोहित्य उपक्रम प्रमुख, ज्ञानप्रबोधिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चपदस्थांकडून वसुली झाली सुरू

$
0
0

पुणे : राज्य उच्चशिक्षण संचालनालयामधील 'काही' विशिष्ट अधिकारी सरकारी निधी वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. या अधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या लाखो रुपयांच्या निधीची संचालनालयाने वसुली लावली आहे. यामुळे संचालनालयातील आर्थिक व्यवहार चव्हाट्यावर आले आहेत. यामध्ये 'बड्या' अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने, संचालनालयातील गेल्या काही वर्षांच्या व्यवहारांचे स्वतंत्र लेखापरीक्षण लावण्याची मागणीही होत आहे.
राज्याच्या उच्चशिक्षण संचालनालयामध्ये अंतर्गत लेखापरीक्षण होत नसल्याची बाब 'मटा'ने सोमवारी उघड केली. विनाअनुदानित कॉलेजांच्या व्यवहारांवरही संचालनालयाचे कोणतेही नियंत्रण नसल्याची बाब प्रकाशात आली. या बाबी चर्चेत आल्याने उच्चशिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. त्यापाठोपाठ आता संचालनालयामध्ये काही अधिकाऱ्यांनी या पूर्वीच्या काळात संचालनालयाच्या निधीमधून घेतलेल्या लाखो रुपयांच्या निधीचे हिशेब तपासण्याचे काम सुरू झाले आहे. या बड्या अधिकाऱ्यांकडून वसुली लावण्यात आल्याची माहिती संचालनालयामधील वरिष्ठ सूत्रांनी 'मटा'ला दिली. तसेच, या कार्यालयामध्ये अंतर्गत लेखापरीक्षण होतच नसल्याने, मोठे गैरव्यवहार झाल्याच्या चर्चा खऱ्या आहेत की काय, असा सवालही उपस्थित होत आहे.
'मटा'ला मिळालेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी विविध कामांच्या निमित्ताने संचालनालयामधून निधी घेतला होता. मात्र उर्वरित निधी संचालनालयाकडे जमा करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. अशा अधिकाऱ्यांकडून ही वसुली लावण्यात आली आहे. राज्यातील एका विद्यापीठातील बेकायदा प्राध्यापक नियुक्तीच्या प्रकरणाची सरकारकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणात विद्यापीठांतर्गत २५ कॉलेजांमधून १५८ प्राध्यापकांना बेकायदा पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्राध्यापकांसाठी म्हणून २००७ ते २०१६ या कालावधीमध्ये जवळपास ७५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचा आरोपही होत आहे. या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, राज्यभरातील सर्वच विद्यापीठांमधील अशा संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी राज्यभरात जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वि. ग. कानिटकर यांचे पुण्यात निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दुसरे महायुद्ध आणि जागतिक राजकारणाची मराठी वाचकांना ओळख करून देणारे ज्येष्ठ लेखक विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर (वय ९०) यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
'नाझी भस्मासुराचा उदयास्त' या पुस्तकाने कानिटकर विशेष ओळखले जात. इस्त्रायल-युद्ध,युद्ध आणि युद्धच, विन्स्टन चर्चिल, महाभारताचा इतिहास, होरपळ अशा मौलिक ग्रंथसंपदेतून त्यांनी मराठी वाचकांना दुसरे महायुद्ध आणि जागतिक राजकारणाची ओळख करून दिली. कानिटकर यांचा जन्म २६ जानेवारी १९२६ रोजी मालाड, मुंबई येथे झाला. बी.एससी आणि बी.ए ( ऑनर्स) अशा दोन पदव्या त्यांनी संपादन केल्या. केंद्र सरकारच्या वित्तलेखा विभागात ३७ वर्षे नोकरी केल्यानंतर ते लेखनामध्ये अधिक काळ रमले. इतिहास व चरित्रे याविषयावर त्यांनी विपुल लेखन केले.
'माओ क्रांतीचे : चित्र आणि चरित्र', 'व्हिएतनाम : अर्थ आणि अनर्थ', 'अॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी', 'हिटलरचे महायुद्ध', 'अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष' ही त्यांची पुस्तके गाजली. त्यांच्या 'फाळणी : युगांतापूर्वीचा काळोख' या पुस्तकाला साहित्यसम्राट न.चिं केळकर
पारितोषिक मिळाले आहे. दर्शन ज्ञानेश्वरी गाजलेल्या प्रस्तावना या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. फ्रँक वॉरेल आणि रोहन कन्हाय अशी मुलांसाठी त्यांनी चरित्रेही लिहिली. खोला धावे पाणी, शहरचे दिवे यांसारख्या कादंबऱ्या तसेच मनातले चांदणे, आसमंत, सुखाची लिपी, लाटा, आणखी पूर्वज, जोगवा हे त्यांचे कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. 'पूर्वज' या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. संस्कार, वय नव्हतं सोळा, एक रात्रीची पाहुणी, अकथित कहाणी, अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न ही त्यांची अनुवादित पुस्तके गाजली. सदाशिव पेठेतील त्यांच्या निवासस्थानी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पाच दिवसांसाठी १२ पर्यंत लाउडस्पीकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सव काळात पाच दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत लाउडस्पीकर लावण्यास जिल्हाधिकारी सौरव राव यांनी परवानगी दिली आहे. या परवानगीनुसार गौरी विसर्जनानंतर सलग चार दिवस म्हणजे १० ते १३ सप्टेंबर आणि गणेश विसर्जनच्या दिवशी १५ सप्टेंबरपर्यंत रात्री उशिरापर्यंत लाउडस्पीकर लावता येणार आहेत.
गणेशोत्सव काळात यापूर्वी १०, ११, १३, १४ व १५ सप्टेंबर अशा पाच दिवसांसाठी रात्री बारापर्यंत लाउडस्पीकर लावण्यास परवानगी दिली होती. परंतु, गणपती मंडळांच्या झालेल्या बैठकीत मंडळांनी १४ सप्टेंबरऐवजी १२ सप्टेंबरला रात्री बारापर्यंतची लाउडस्पीकर लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. ही मागणी जिल्हाधिकारी राव यांनी मान्य केली. तथापि, लाउडस्पीकरच्या परवानगीमध्ये केलेल्या बदलाची माहिती राज्य सरकारला कळवून त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी होते.
ध्वनिप्रदूषणासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीमध्ये राज्य सरकारला पंधरा दिवस रात्री बारापर्यंत लाउडस्पीकरला परवानगी देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यातील बारा दिवस राज्य सरकारने निश्चित केले आहेत आणि तीन दिवसांचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लाउडस्पीकर वाजविण्याची सवलत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करता येणार नाहीत, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यामुळे गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता होती. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांची मुंबईत बैठक घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी राव यांनी लाउडस्पीकरच्या तारखेत झालेला बदल व कोर्टाच्या निकालाबाबत चर्चा केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तारखेतील बदल मान्य केला आणि कोर्टाच्या निर्णयातील अधिकारांमधील संदिग्धताही दूर केली. या लाउडस्पीकर वाजविण्याच्या तारखांना राज्य सरकारने संमती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास तक्रार करा’

$
0
0

पुणे ः गणेश उत्सवामध्ये कोणी जबरदस्तीने वर्गणी मागत असेल तर त्याची तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा. त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करून जबरदस्तीने वर्गणीची मागणी करणाऱ्यांच्या विरोधात नुकताच खडक पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, काही वेळा नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते. वर्गणी न दिल्यास मारहाण किंवा इतर पद्धतीने त्रास दिला जातो. त्रास देणारे त्या परिसरातील असल्यामुळे पुन्हा त्यांचा त्रास होण्याच्या भीतीने अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.
याबाबत पाटील यांनी सांगितले, की जबरदस्तीने वर्गणी न मागण्याच्या सूचना मंडळाना देण्यात आल्या आहेत. असे झाल्यास पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाईल. खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील. मात्र, एखाद्यावर पूर्वीचा राग म्हणून तक्रार देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​जर्मनीतील शिक्षणसंधी जाणून घ्या शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'जर्मन अॅकॅडेमिक एक्स्चेंज सर्व्हिसेस'तर्फे (डाड) येत्या शनिवारी (३ सप्टेंबर) 'रिडिस्कव्हर जर्मनी : हायर एज्युकेशन अँड बीयाँड' या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जर्मनीतील उच्च शिक्षणविषयक संधींबाबत या सत्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जर्मनीमध्ये उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधी, संशोधन संधी आणि शिष्यवृत्त्या याबाबत 'डाड'च्या पुणे माहिती केंद्राचे मानद संचालक डॉ. ख्रिस्तोफ सेन्फ्ट, माहिती अधिकारी धनश्री देवधर आणि गिरिजा जोशी मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील गोएथे इन्स्टिट्यूटच्या वैशाली करमरकर या जर्मनीत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आंतरसांस्कृतिक संबंधांबाबत विशेष कार्यशाळा घेणार आहेत. इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिश्री जामखेडकर अॅल्युम्नीपोर्टल डॉइचलँडबाबत माहिती देतील.
याच जोडीने 'जर्मनीतील करिअरसंधी' या विषयावर चर्चासत्रही होणार असून, त्यामध्ये
डीआयईएचएल मेटल इंडियाचे विनीत कपूर, अधिश्री जामखेडकर, वैशाली करमरकर आणि ख्रिस्तोफ सेन्फ्ट सहभागी होणार आहेत.
विद्यार्थ्यांना कोटक महिंद्रा बँक आणि डॉइश बँकेच्या प्रतिनिधींशीही संवाद साधता येईल.

सेमिनार : रिडिस्कव्हर जर्मनी : हायर एज्युकेशन अँड बीयाँड
तारीख : शनिवार, ३ सप्टेंबर
स्थळ : एस. एम. जोशी हॉल, नवी पेठ
वेळ : सकाळी १०
अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६७९२३५५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक्स्प्रेस-वेवर तरुणाचा मृत्यू

$
0
0

लोणावळा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर ताजे पेट्रोल पंपाजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. या अपघातात सहकारी मित्राच्या बंद पडलेल्या टेम्पोच्या दुरुस्तीसाठी मदत करणाऱ्या टेम्पो चालकाचाच मृत्यू झाला.
सूर्यमणी विष्णूकांत तिवारी (वय २५, रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. जखमींमध्ये अजयकुमार यादव, (वय ३५, रा. ऐरोली) रमाकांत शंकर ब्रीदलालपाल (वय २५, रा. भिवंडी, ठाणे) यांचा समावेश असून, अन्य दोघांची नावे समजली नाही.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून गुजरातला जाणाऱ्या एका टेम्पोचा (क्रमांक - एमएच- ४३/एफ-२११९) जॉइंट रॉड तुटला होता. दुरुस्तीसाठी टेम्पो चालकाने टेम्पो सर्व्हिस लेनवर उभा केला होता. या वेळी मागून येणाऱ्या त्याच्या सहकारी मित्राने टेम्पोच्या दुरुस्तीकरिता त्याचा टेम्पो (क्रमांक - जिजे - १/सीएक्स-३३३५) हा मार्गालगत उभा करून मित्राच्या टेम्पोचा तुटलेला जॉइंट रॉड बसविण्याचे काम करीत होता. या वेळी मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (डी एन ०९/एच-९९१३) नादुरुस्त टेम्पोला मागून जोरात धडक दिल्याने रॉड बसविण्याची मदत करणाऱ्या सूर्यमणीचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले आहे. यामध्ये दोन गंभीर जखमींचा समावेश आहे. अपघाताची माहिती कळताच खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पहाणी केली. तत्पूर्वी देवदूत आपत्कालीन यंत्रणेच्या विशाल ठाकर, राकेश खुळपे, अरविंद सावंत, संदीप केदार यांनी टेम्पोत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी निगडीतील लोकमान्य रुग्णालयात रवाना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदान करण्याची प्रतिज्ञा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अवयवापासून वंचित राहिलेल्यांना जीवदान देण्यासाठी पुणेकरांनी अवयवदान करण्याची प्रतिज्ञा मंगळवारी केली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी अवयवदान करण्याची प्रतिज्ञा दिली.
अवयवदान चळवळीच्या जनजागृतीसाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीला कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी हिरवा झेंडा दाखविला. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. संचेती हॉस्पिटल, वाडिया कॉलेज, शनिवारवाडा, ससून हॉस्पिटल, पूलगेट, सेव्हन लव्ह्ज चौक, आझम कॅम्पस अशा विविध ठिकाणांहून काढलेल्या रॅलीचा समारोप बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर झाला. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महापौर प्रशांत जगताप, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, समाजसेवक अण्णा हजारे, देवीसिंह शेखावत, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, डॉ. शरद हर्डीकर, अभिनेता राहुल सोलापूरकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, 'यूनो'ची दूत दीक्षा देंडे आदी या वेळी उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पांढरे टी शर्ट, डोक्यावर टोपी परिधान केली होती. 'आय एम ए डोनर' असे त्यावर लिहिले होते. पांढऱ्या रंगाच्या फुग्यांवरदेखील अवयवदानाचा संदेश लिहिला होता.
'स्वेच्छेने मृत्यूनंतर अथवा मस्तिष्क मृत्यूनंतर (ब्रेनडेड) सर्व अवयव पात्र गरजू पेशंटसाठी प्रत्यारोपणाकरिता दान करीत आहे. माझी ही इच्छा मी माझ्या कुटुंबीयांनासुद्धा कळवित आहे', अशा शब्दांत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी उपस्थित पुणेकरांना प्रतिज्ञा दिली. अवयवदान हे समाजोपयोगी दान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ अण्णा हजारे यांनी 'अवयव दान हे श्रेष्ठ दान' असे सांगितले. 'नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने अवयवदान करणे आवश्यक आहे. पुणेकरांनी अवयवदान करावे,' असे आवाहन हजारे यांनी केले. www.dmer.org या वेबसाइटवर त्यांनी अवयवदानांचा अर्ज सर्वांच्या उपस्थितीत भरला. त्या संदर्भात डॉ. चंदनवाले यांनी त्यांना 'डोनर कार्ड' दिले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अवयवदान मोहिमेचा उपक्रम चांगला असल्याचे म्हटले. 'रॅलीतून अवयवदानाबाबत जागृती वाढेल. मोठ्या प्रमाणात पुण्यात काढलेली रॅली राज्यात सर्व भागांत काढावी,' असे आवाहन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले. 'गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या रॅलीला महत्त्व आहे. गणराया प्रत्यारोपणाचे प्रतीक आहे. त्यामुळे अवयवदान करायला हवे,' असे आवाहन राहुल सोलापूरकर यांनी केले. या वेळी महापौर जगताप, डॉ. संचेती, डॉ. हर्डीकर यांनीदेखील अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. डॉ. चंदनवाले यांनी अवयवदानासंदर्भात प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभय योजने’ला अत्यल्प प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका हद्दीतील मिळकतींची करआकारणी करून घेण्यात किंवा वापरात झालेला बदल पालिकेला कळवण्यासाठी जाहीर केलेल्या 'अभय योजने'ला नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्याभरात या संदर्भातील जेमतेम ४०० अर्ज पालिकेकडे दाखल झाले असून, ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या नागरिकांना दंडातून सूट दिली जाणार आहे.

महापालिकेतील मिळकतींची कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी गेल्यावर्षी मिळकतकर विभागातर्फे 'अभय योजना' राबवण्यात आली होती. त्या अंतर्गत नागरिकांना दंडावर ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली. थकबाकीप्रमाणेच आत्तापर्यंत करआकारणीच करून न घेतलेल्या किंवा मिळकतींच्या वापरामध्ये बदल केला असूनही त्याची माहिती पालिकेला न कळविणाऱ्या

मिळकतींची संख्या मोठी आहे. या मिळकतींना कर लावण्यासाठी पालिकेतर्फे यंदा पुन्हा 'अभय योजना' जाहीर केली गेली आहे. त्या अंतर्गत, नोंदणी करणाऱ्या मिळकतींना करपात्र रक्कम निश्चित झाल्यानंतर लावण्यात येणारे १० टक्के शुल्क माफ केले जाणार आहे. त्यासाठी, गेल्या महिन्याभरापासून महापालिकेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. तरीही, नागरिकांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मिळकतकर विभागाकडे आत्तापर्यंत जेमतेम चारशेच अर्ज दाखल झाले आहेत. पालिकेने निश्चित केलेल्या अपेक्षेपेक्षा ही संख्या खूपच कमी असून, आगामी या मोहिमेत अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. नागरिकांनी मिळकतींची कर-आकारणी करून घ्यावी; तसेच मिळकतीच्या वापरात बदल असेल, तर त्यासाठी अर्ज भरावा, असे आवाहन मिळकतकर विभागप्रमुख सुहास मापारी यांनी केले आहे.

'महापालिकेतर्फे मिळकतींचे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये, करआकारणी करून न घेतलेल्या मिळकती आणि वापरात बदल असलेल्या मिळकतींची माहिती समजू शकणार आहे. संबंधित मिळकतींकडून दंड वसूल केला जाईल,' असा इशारा मापारी यांनी दिला. 'अभय योजने' त नोंदणी केली असल्यास हा दंड टाळता येणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मेट्रोच्या निधीतून दुरुस्ती

महापालिकेच्या बजेटमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी ठेवलेल्या ६७ कोटी रुपयांमधील सात कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करून त्यातून पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) डेपो दुरुस्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या वर्गीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

पालिकेच्या बजेटमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी ठेवण्यात आलेल्या निधीचे वर्गीकरण पीएमपीच्या विविध कामांसाठी करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. याला बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले. या वर्गीकरणाच्या निधीतून पीएमपीच्या डेपोंची दुरुस्ती केली जाणार आहे. पीएमपीच्या हडपसर, पुणे स्टेशन, कोथरूड, स्वारगेट आणि कात्रज या पाच महत्त्वाच्या डेपोंमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. कोथरूड व बिबवेवाडी येथे टर्मिनल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी, पीएमपीकडे निधी उपलब्ध नसल्याने महापालिकेने द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी सात कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून पीएमपीच्या बसडेपोची दुरुस्ती पालिकेच्या मार्फत टेंडर प्रक्रिया राबवून केली जाणार आहे. याबाबची उपसूचना बैठकीत मांडून हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे बोडके यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृताच्या कुटुंबीयांचा ‘महावितरण’वर आरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड
घरगुती वीज वापराचे अचानक आलेले तीस हजार रुपये बिल दुरुस्त करण्याऐवजी महावितरणने वीजजोड तोडल्याने मनस्ताप होऊन मोहन न्हालवे (वय ३०) या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याने मृताच्या नातेवाइकांनी महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केली.

मोहन हा सासवड येथील सेवानिवृत्त पालिका कर्मचारी रमेश न्हालवे यांचा मुलगा आहे. मोहन याने घरगुती वीज वापराचे अचानक आलेले ३० हजार रुपये बिल दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात आठ दिवस हेलपाटे मारले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याला अपमानास्पद वागणूक दिली. बिल भरल्याशिवाय वीज जोड मिळणार नसल्याचे सांगितले. यासंदर्भात तक्रार अर्ज लिहिताना मोहन याला हृदयविकाराचा झटका आला, असे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

मोहनच्या भावाने या प्रकरणी दिलेली तक्रार पोलिसांनी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केली. महावितरणच्या उद्दाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा मोहन याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातपंचायतीचा अघोरी विळखा

$
0
0

गवळी जात पंचायतीकडून २०० कुटुंब बहिष्कृत

संदीप भातकर, येरवडा

आंतरजातीय विवाह करणाऱ्या खडकीतील धीरज पुंगडवाले या तरुणाला परस्पर समाजात सामावून घेतल्यामुळे वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या कॅम्पमधील जात पंचायतीच्या पंचांनी येरवड्यातील सुमारे दोनशे कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जात पंचायतीने बहिष्कृत केल्याने गेल्या काही महिन्यांपासून येरवड्यातील गवळी समाजातील या कुटुंबांना शहरात राहणाऱ्या नातेवाईकांच्या विवाह, वाढदिवस, धार्मिक सण आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नसल्याचे समोर आले आहे. जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून वडगाव शेरीतील गवळी समाजाच्या अरुण नायकुजी याने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अरुणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कॅम्प येथील जात पंचायतीचे पंच वन्हाप्पा पहिलवान, मानकाप्पा औरंगे, विठ्ठल पहिलवान आणि किसन जानुसब यांच्यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मृत अरुण नायाकुजी यांचे बंधू आप्पा आणि खडकी परिसरात राहणारे धीरज पुंगडवाले हे चांगले मित्र आहेत. धीरज याचा पाच वर्षांपूर्वी पुण्यातील महिलेशी आंतरजातीय विवाह झाला होता. दोन वर्षांपूर्वी हा विवाह आंतरजातीय असल्याचे गवळी समाजाला समजले होते. हा विवाह करण्यासाठी अरुणचा भाऊ आप्पाने मदत केल्याचा समाजाला संशय होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून खडकीतील पुंगडवाले, वडगाव शेरीतील नायकुजी आणि बाळू महादेव गडाप्पा यांना गवळी समाजाने बहिष्कृत केले होते.

आपल्याला किमान येरवड्यातील समाजात पुन्हा सामावून घेण्यासाठी पुंगडवाले याने पंचांविरोधात जात पंचायतीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच विविध कायदेशीर मार्गाने दबाव टाकणे सुरू होते. त्यामुळे खडकी पोलिसांनी येरवड्यातील पाच पंचांना अटक केली होती. यामध्ये दोन पंच सरकारी नोकरदार होते. या प्रकरणामुळे सरकारी नोकरीवर गदा येणार असल्याने येरवड्यातील पंचांनी धीरज पुंगडवाले याला समाजत सामावून घेतले होते.

पाच महिन्यांपूर्वी येरवड्यात राहणाऱ्या गवळी समाजाने धीरज पुंगडवाले कुटुंबाला समाजात सामवून घेतल्याची माहिती कॅम्पमधील पंचांना समजली. त्यामुळे पंचानी येरवड्यातील सुमारे दोनशे कुटुंबांना समजातून बहिष्कृत केले, अशी माहिती काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

मंगलकार्यातून बेदखल

येरवड्यात राहणाऱ्या गवळी समाजातील कुटुंबांचे नातेवाइक शहरातील अनेक भागात, तसेच जिल्ह्यात आहेत. दोन महिन्यांपूर्वीच चिंचवड येथील आत्याच्या मुलाचा विवाह होता. पण समाजाने बहिष्कृत केल्याने आमच्या कुटुंबाला कार्यक्रमाला जाता आले नाही. हीच अवस्था येरवड्यात राहणाऱ्या शेकडो जणांची झाली आहे, असे एका नागरिकाने सांगितले. समाजातील कोणी नातेवाईक मरण पावल्यास अंत्यविधीला जाण्याची परवानगी असल्याचे त्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा ‘बाजीराव’ मूर्तीची क्रेझ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपट, दूरचित्रवाणींवरील प्रमुख भूमिकांचा परिणाम दरवर्षी गणेशोत्सवात दिसून येतो. 'बाहुबली' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला, तसेच 'जय मल्हार' ही मालिकादेखील तितकीच लोकप्रिय ठरली. याचेच प्रतिबिंब गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये उमटले होते. 'बाहुबली' आणि 'जय मल्हार' या रूपातील गणरायाच्या मूर्ती गेल्या वर्षी प्रकटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यंदा बाजीराव पेशवे यांच्या वेशातील मूर्तीची क्रेझ दिसून येत आहे.

गणरायाची मूर्ती घेताना पिवळे पितांबर, लाल सोवळे, डोळे, सोनेरी मुकूट या बाबी कटाक्षाने पाहिल्या जातात. यातील रचनेमध्ये थोडाही फरक आढळला, तर तो अनेकांना खटकतो, म्हणूनच उत्सवाबरोबर पारंपरिक मूर्ती घेणे हेही दिव्य कार्यच असते; पण आता काळ बदलला आहे. ही परंपरा टिकली असली तरी विविध आकारातल्या व वेशभूषा असलेल्या गणेश मूर्ती यंदा बाजारात दाखल झाल्या असून, या मूर्तींना मागणी वाढत आहे.

गणेशोत्सव जवळ आल्याने बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. चौका-चौकात गणेशमूर्तींचे स्टॉल लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत सजगता वाढली आहे. नागरिकांचा शाडूची मूर्ती घेण्याकडे कल वाढतो आहे. त्याच वेळी 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' च्या विविध वेशभूषेतील मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. या मूर्तींना पसंती मिळत असल्याची माहिती व्यावसायिकांनी 'मटा'ला दिली.

'मंगलमूर्ती'चे अतुल मारणे यांनी सांगितले की, 'बाहुबली, जय मल्हारच्या आकर्षणानंतर या वर्षी बाजीराव मूर्तीला मागणी आहे. लालबाग व मल्हार मूर्तींना पसंती कमी मिळत आहे. याशिवाय बाल गणेश, संत तुकाराम, मानाचे पाच गणपती, बालाजी अशा वेशातील गणेशमूर्ती विक्रीसाठी असून त्या आकर्षण ठरत आहेत. याशिवाय एलईडी लाईटने सजलेला, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी बसणारा अशा विविध मूर्ती उपलब्ध आहेत. पारंपरिक मूर्तींबरोबरच या मूर्तींना पसंती मिळत आहे. शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी असल्याचे यंदा जाणवत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. तळवलकर यांना स्वरभास्कर पुरस्कार

$
0
0

पुणे : महापालिकेतर्फे देण्यात येणारा २०१६चा 'स्वरभास्कर पुरस्कार' ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांना, तर पं. गुरू रोहिणी भाटे पुरस्कार कथक नृत्य कलावंत रोशन दात्ये यांना जाहीर करण्यात आला आहे.

महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही पुरस्कारांसाठीच्या निवड समितीची बैठक बुधवारी झाली. त्यानंतर, या दोन्ही पुरस्कारांची घोषणा महापौर जगताप यांनी केली. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरभास्कर पुरस्कार दिला जातो. २०११मध्ये सर्वप्रथम गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनतर, पं. बिरजू महाराज, पं. शिवकुमार शर्मा आणि डॉ. प्रभा अत्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गेल्यावर्षीचा पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना जाहीर झाला आहे. एक लाख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सुप्रसिद्ध नृत्यकलावंत आणि गुरू रोहिणी भाटे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत रोशन दात्ये यांची निवड एकमताने करण्यात आली. २०१२पासून हा पुरस्कार दिला जात आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासह शीतल कोलवालकर, परिमल फडके, जयश्री जंगम, रामदास पळसुले आणि श्रीपाद भावे या पाच सहकलाकारांनाही प्रत्येकी १० हजार रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरीच घडतेय बाप्पाची मूर्ती

$
0
0

पर्यावरणविषयक जनजागृतीमुळे प्रशिक्षणवर्गांना मिळतोय प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
घरीच गणपती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करण्याचा ट्रेंड सध्या पुणेकरांमध्ये वाढला आहे. गणेशमूर्ती बनविण्याच्या वर्गांना गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच, कॉलेजचे विद्यार्थी, गृहनिर्माण सोसायट्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडूनही गणेश मूर्ती प्रशिक्षण वर्गांच्या कार्यशाळांची मागणी होते आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल गेल्या काही वर्षांत झालेल्या जनजागृतीमुळे उत्सवाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन नागरिकांना मिळाला आहे. उत्सवातील पावित्र्याची कास जपताना प्रदूषण टाळण्याबद्दल तरुण पिढी आग्रही आहे. त्यामुळे घरगुती गणेशमूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गांची मागणी वाढते आहे.

'आम्ही गेल्या वीस वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहोत. काही वर्षांपूर्वीपर्यंत कागागिराने बनविलेली मूर्ती घेण्याबद्दल नागरिक आग्रही होते. पण गेल्या चार ते पाच वर्षांपासून सर्व वयोटातील नागरिकांचा प्रशिक्षण वर्गाकडे ओढा वाढला आहे. यंदा आम्ही शाळा, कॉलेज, विविध सोसायट्यांमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळा घेतल्या. विशेष म्हणजे बहुतांश लोक स्वतः बनविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. स्वतः बनविलेल्या मूर्तीचा आनंद अनोखा असल्याने हा चांगला बदल दिसतो आहे,' अशी माहिती मूर्ती प्रशिक्षक दर्शना ठकार यांनी दिली.

'सोसायट्यांमध्ये या कार्यशाळांचे प्रमाण वाढले असून यातून रहिवाशांचा संवादही वाढला आहे. अलीकडे गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होते आहे. या धर्तीवर कार्यशाळांमधून तयार होणाऱ्या मूर्ती या निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे,' असे ठकार म्हणाल्या.

महापालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रातर्फे विविध वयोगटातील नागरिक आणि नेस वाडिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच पर्यावरणपूरक सजावट साहित्य आणि मूर्ती प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या उपक्रमाच्या समन्वयक अश्विनी शितोळे म्हणाल्या, 'तरुण मंडळींमध्ये स्वतः मूर्ती बनविण्याचे कुतूहल दरवर्षी वाढत असून अनेक नागरिक याच मूर्तीला सुरेख रंगकाम करून प्रतिष्ठापना करतात. विशेषः लहान मुले असलेल्या घरांमध्ये त्यांच्या आग्रहामुळे हाताने बनविलेल्या मूर्तीचीही पूजा होते आहे.' या वर्षी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्राबरोबरच राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये घेतलेल्या कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे शितोळे यांनी सांगितले.

अष्टविनायक मित्र मंडळातर्फेही 'इको फ्रेंडली गणपती बनवा आणि घरी बसवा' ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यांचल शाळेत झालेल्या या कार्याशाळेत अवघ्या सहा वर्षांपासून साठ वर्षांपर्यंतच्या विविध वयोगटातील नागरिकांनी निसर्गसंवर्धनाचा वसा घेत सहभाग घेतला. या वेळी विद्यार्थी आणि पालकांनी एकत्रीत १२० मूर्ती तयार केल्या. निसर्ग संवर्धक उमेश वाघेला आणि चैतन्य राजर्षी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस पीओपीच्या मूर्तींचे प्रमाण वाढत असून विसर्जनानंतर नदी-तलावातील जलजीवन धोक्यात येते आहे. निसर्गाचे नुकसान न करता पर्यायवरपूरक गणेत्साव साजरा करणे गरजेचे आहे, असे वाघेला यांनी सांगितले. राजेंद्र हरिश्चंद्रे, राजेंद्र कांबळे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामांना अचानक ब्रेक

$
0
0

डेव्हलपमेंट चार्जेसबाबत विद्यापीठाची पालिकेशी चर्चा सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सातत्याने सुरू असलेली इमारतींची बांधकामे अचानक थांबली आहेत. बालेवाडीमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील ही बांधकामे थांबल्याची चर्चा सुरू आहे. डेव्हलपमेंट चार्जेसविषयी महापालिकेसोबत सुरू असलेल्या चर्चांचा अंतिम निर्णय होईपर्यंत बांधकामे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
विद्यापीठातील बांधकामांविषयीच्या तांत्रिक मुद्द्यांवरून गेल्या काही काळापासून वाद सुरू आहेत. त्या विषयी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्येही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी विद्यापीठाला डेव्हलपमेंट चार्जेसमधून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. दरम्यान बालेवाडीमध्ये इमारतीचा बेकायदेशीरपणे बांधलेला स्लॅब कोसळून ९ मजूरांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनांचा परिपाक म्हणून विद्यापीठात गेल्या काही काळापासून सुरू असलेली बांधकामे थांबल्याची चर्चा सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या बांधकामांच्या परवानगीबाबत महापालिका प्रशासनाकडून नकारात्मक संकेत दिले जात असल्याने, ही बांधकामे थांबविण्यात आल्याचेही या चर्चांमधून समोर आले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी या चर्चांचा स्पष्ट इन्कार केला. डॉ. गाडे म्हणाले, की 'विद्यापीठाच्या बांधकामांविषयी सध्या डेव्हलपमेंट चार्जेस हाच मुद्दा आहे. या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनासोबत सध्या सकारात्मक पद्धतीने चर्चा सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, त्या विषयीचा अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यापीठाने सध्या बांधकामे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये बालेवाडीतील अपघाताचा काहीही संबंध नाही.' या प्रक्रियेत विद्यापीठाला सरकारी संस्था मानायचे की नाही, याचा निर्णय महापालिका प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. विद्यापीठ ही खासगी संस्था मानल्यास, महापालिका वापरत असलेल्या विद्यापीठाच्या जागेपोटी महापालिका विद्यापीठाला ११०० कोटी रुपयांचे देणे लागते. त्यामुळे विद्यापीठ ही सरकारी संस्था ठरवायची की खासगी, याविषयीही महापालिकेला स्पष्ट भूमिका नोंदवावी लागणार आहे. ही भूमिका स्पष्ट झाल्यास अशा वादांविषयी विद्यापीठाची भूमिका नेमकेपणाने समोर येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वापाच लाखांची बर्फी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवासाठी पुण्यात विक्रीसाठी आलेली गुजरातमधील बर्फी आणि स्पेशल मिक्स मिठाईचा पाच लाख २७ हजार ३६० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही बर्फी गुजरातमध्ये अस्वच्छ ठिकाणी तयार करण्यात आली असून, वाहतूक करताना तापमान नियंत्रित न केल्याचे उघडकीस आल्याने कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न विभागाने ही कारवाई केली. गुजरातमधून पुण्यात विक्रीसाठी बर्फी येणार असल्याची माहिती मिळालीहोती. त्यानुसार पद्मावती बस पार्किंग येथे छापा टाकून बर्फी तसेच स्पेशल मिक्स मिठाईचा साठा जप्त कऱण्यात आला. एफडीएचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आय़ुक्त संजय शिंदे, अन्नसुरक्षा अधिकारी योगेश ढाणे, विजय उनवणे, धनश्री निकम यांच्या पथकाने कारवाई केली.
'गणेशोत्सवासाठी शहरात मिठाईची मागणी अधिक असते. त्यासाठी अहमदाबाद येथून बर्फी, स्पेशल मिक्स मिठाई पुण्यात आणण्यात येते. त्यानुसार काही दिवसांपासून अशा स्वरुपाची बर्फी ट्रॅव्हलमार्फत शहरात येत होती. पुण्यातील मिठाई विक्रेता ओमप्रकाश विश्वंभरनाथ अगरवाल यांच्या मालकीचा हा साठा असल्याचे निष्पन्न झाले आहे,' अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. 'बर्फी आणि स्पेशल मिक्स मिठाईमध्ये दूध पावडर आणि दूधाचे पदार्थ यांचा समावेश आहे. ही बर्फी अस्वच्छ वातावरणात तयार केल्याचे आढळले. तसेच, बर्फीची वाहतूक करताना तापमान संतुलन राखण्यात आले नसल्याने ३,२९६ किलो वजनाचा आणि ५ लाख २७ हजार ३६० रुपये किमतीचा साठा जप्त कऱण्यात आला. बर्फी व स्पेशल मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवालात येणाऱ्या निष्कर्षानुसार अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे,' असे अन्नसुरक्षा अधिकारी योगेश ढाणे यांनी सांगितले.
..
पद्मावती येथे येणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्सची तपासणी केली. त्यात गुजरातमधून आलेल्या बर्फीच्या काही बॅग आढळल्या. त्या बर्फीमध्ये साखरेचे मिश्रण करून त्याचे पेढे, मोदक, बर्फी तयार करून विक्री कऱण्याचा विक्रेत्याचा विचार होता. मात्र, त्यापूर्वीच कारवाई करण्यात आली.
शिवाजी देसाई, सहआयुक्त, एफडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिप्लोमाच्या अधिव्याख्यात्यांचे मंत्र्यांना निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तंत्रनिकेतनच्या इंजिनिअरिंग पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमामध्ये विज्ञान विषयाचे अस्तित्व कायम ठेवावे, विज्ञान विषयाचा प्रथम वर्षात दोन्ही सत्रांमध्ये समावेश असला पाहिजे, या विषयाच्या बळकटीकरणासाठी त्यात प्रात्यक्षिकांचा समावेश करावा, अशा मागण्या पदविकेच्या विज्ञान शाखेच्या अधिव्याख्यात्यांनी केल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन नुकतेच अधिव्याख्यात्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना नुकतेच दिले आहे.
महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने २०१७ पासून डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये लागू होणाऱ्या 'स्किम एक' या योजनेचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अॅन्ड रीसर्च (एनआयटीटीआर) संस्थेकडे दिली आहे. या संस्थेकडून पदविकेच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्रामधून विज्ञान विषयाला वगळण्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये असमोतल निर्माण होण्याचीच अधिक शक्यता असल्याचा आरोप अधिव्याख्यात्यांनी केला आहे.
विज्ञान विषय नसल्यास इंजिनीअरिंगच्या पायाभूत ज्ञानालाच धक्का लागणार आहे. विज्ञान विषयाला वगळल्यास शासकीय आणि शासकीय अनुदानित संस्थेतील अधिव्याख्यातांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच विनाअनुदानित संस्थेमधील अधिव्याख्यांतांच्या सेवांवर गडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये विज्ञान विषयाचे अस्तित्व कायम ठेवून तो अभ्यासासाठी प्रथम वर्षाच्या दोन्ही सत्रांमध्ये असला पाहिजे आणि या विषयाच्या बळकटीकरणासाठी त्यामध्ये प्रात्याक्षिकांचा समावेश करण्यात यावा. तसेच विज्ञान शाखेतील अधि‍व्याख्यात्यांच्या सेवा संरक्षित करण्यात याव्यात, अशा मागण्या अधिव्याख्यात्यांनी केल्या आहेत. त्यानुसार पाटील यांना निवेदन दिले आहे.

राज्याबाहेरची संस्था नको
इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमातील विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी राज्याबाहेरच्या संस्थेची निवड करू नये. त्यापेक्षा राज्यातील विज्ञान शाखेत २० ते ३० वर्षे अध्यापनाचा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञ अधि‍‍‍व्याख्यात्यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी अधि‍व्याख्यात्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पोलिसाकडून महिलेस मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
किरकोळ कारणावरुन एका ५५ वर्षीय महिलेला समर्थ पोलिस ठाण्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलने लाकडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार रात्री घडला. मात्र, अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मध्यस्थी करून त्या महिलेला उपचारासाठी म्हणून पैसे देऊन प्रकरण मिटवण्यात आले आहे. २०१५ मध्ये ससून येथील एका डॉक्टरला या कर्मचाऱ्याने मारहाण केली होती. त्यामध्ये त्याला निलंबित केले होते. काही महिन्यांपूर्वीच कामावर हजर झाल्यानंतर त्याने हा प्रकार केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही पद्मजी चौकीजवळील एका एका किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी पोलिस कर्मचारी त्या ठिकाणी आला होता. कर्मचाऱ्याने मद्यपान केल्यामुळे त्याबाबत महिलेने त्याच्याकडे विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्याने महिलेस लाकडाने भररस्त्यात जबर मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. त्यानंतर महिलेच्या नातेवाइकांना घटनास्थळी धाव घेतली. महिलेला उपचारासाठी रुग्णालायत दाखल केले. संबंधित महिलेच्या मुलीला बोलावून मध्यस्थी करण्यात आली. रुग्णालयासाठी झालेला खर्च देऊन प्रकरण मिटवण्यात आले. तर, गैरसमजुतीतून हा प्रकार झाला असल्याचा जबाब लिहून घेतला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images